Home Blog Page 1927

११ ते १७ ऑगस्ट दरम्यान स्वराज्य सप्ताह आयोजित करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

0

मुंबई, दि.14 : येत्या 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये स्वराज्य सप्ताह आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत असून यामध्ये चार स्तरावर कार्यवाही करण्यात येईल. राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर आणि वार्ड किंवा ग्राम स्तरीय स्तरावर लोकसहभागातून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून हे कार्यक्रम नेमके कोणते असावेत, या कार्यक्रमांमध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा, कार्यक्रमाची रुपरेषा कशी असावी, प्रत्येक स्तरावर तो कार्यक्रम वेगळा कसा असेल याबाबतचे नियोजन पुढील बैठकीत सादर करावे अशा सूचना श्री.देशमुख यांनी आज दिल्या.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोअर समितीची बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कामगार मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, सामाजिक‍ न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि ऑनलाईन पद्धतीने क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यस्तरीय कोअर समिती आजादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाच्या आयोजनाची रुपरेषा ठरविणे तसेच निधीची उपलब्धता याबाबत निर्णय घेणार आहे.

श्री.देशमुख म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये आजादी का अमृत महोत्सवानिमित्त “हर घर तिरंगा” हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. येत्या 11 ते 17 ऑगस्ट 2022 दरम्यान महाराष्ट्रातील सर्व घरांमध्ये तिरंगा फडकवला जाण्याचे नियोजन करण्यात येत असून यादृष्टीने सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत सर्व तयारी करावी. साधारणपणे महाराष्ट्रासाठी दोन कोटी तिरंग्याची आवश्यकता असणार आहे, त्यामुळे संविधानाचे नियम पाळून याबाबतची सर्व तयारी करण्यात यावी. येत्या 15 ऑगस्ट रोजी मरीन ड्राईव्ह येथे आजादी का अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारताची गेल्या 75 वर्षांतील प्रगती यावर आधारीत एका विशेष लेझर शोचे आयोजन करण्यासाठी तयारी करण्यात यावी. येत्या 9 ऑगस्ट रोजी दोन्ही सभागृहांचे सदस्य यांच्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांना एकत्र घेऊन एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन विधानभवनात करण्याचे नियोजन करण्यात यावे.

भारत आजही कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. कृषीबरोबरच कामगार आणि उद्योगक्षेत्राची प्रगती यांचाही समावेश या आजादी का अमृत महोत्सवात केला जावा. तसेच गावपातळीवर यानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करताना स्थानिक कलाकारांचा समावेश व्हावा अशा सूचना कामगार मंत्री श्री.मुश्रीफ यांनी दिल्या.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.टोपे म्हणाले की, आज महाराष्ट्रात मधुमेह, हायपर टेन्शन आणि कर्करोग हे सर्वाधिक आजार असलेले रुग्ण दिसून येतात. त्यामुळेच आजादी का अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आरोग्य अभियान राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय कार्डियाक कॅथलॅब यासह आयुष्यमान हेल्थकार्डची अधिक नोंदणी यावरही भर देण्यात येणार आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत काही वसतीगृहे, शाळा आहे ज्या खूप ऐतिहासिक आणि महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत महत्त्वाच्या आहेत. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या मुख्य दोन योजनांचा समावेशही आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमामध्ये करण्यात याव्यात, अशा सूचना यावेळी सामाजिक न्यायमंत्री श्री.मुंडे यांनी केल्या. आजादी का अमृत महोत्सवाच्या सर्व कार्यक्रमाची मांडणी माहितीपूर्ण असण्याबरोबरच आजच्या तरुणवर्गाला आकर्षित होण्यासाठी सामाजिक माध्यमांचा अधिक वापर करुन करण्यात यावा.

श्री. केदार म्हणाले की, आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी सेवाग्राम आश्रम येथे शिक्षण विभागाच्या मदतीने चर्चासत्रे आयोजित करण्यात यावी, यामध्ये एनसीसी यांचाही समावेश करण्यात यावा.याशिवाय प्रत्येक जिल्ह्यातील एका शाळेचा ऐतिहासिक शाळा म्हणून समावेश करण्यात येणार असून संबंधित पालकमंत्री या शाळेची निवड करतील.

आजादी का अमृत महोत्सवाचे दोन मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून यासाठी कोअर समितीचे सर्व मंत्री यांच्यासह मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्यासह संबंधित सचिव यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात यासंबंधी विस्तृत बैठक घेतली जाईल.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त संपूर्ण देशभरात ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवाचा शुभारंभ 12 मार्च 2021 रोजी ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून करण्यात आला.  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेमध्ये लोकशाही मुल्ये आणि भारतीय संविधानाचा जागर करण्यात येणार आहे. पुढील वर्षी म्हणजे ऑगस्ट 2023 पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यापूर्वीच सर्व सरकारी पत्रव्यवहारामध्ये आझादी का अमृत महोत्सव हे संकेतचिन्ह वापरण्यात येत असून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

राहुल यांच्याकडे 16 कोटींची प्रॉपर्टी; 72 लाखांचे कर्ज डोक्यावर

0

नवी दिल्ली-नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांची आज ईडीच्या अधिकाऱ्याने चौकशी सुरु ठेवली आहे.दुसऱ्या दिवशी देखील राहुल गांधी कारने तपास संस्थेच्या कार्यालयात पोहोचले. त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही होत्या. राहुल गांधी यांना सोडल्यानंतर प्रियांका गांधी तिथून निघून गेल्या. दोन दिवसांपासून काँग्रेस कार्यालयाबाहेर गोंधळ सुरू असून, त्यापार्श्वभूमीवर त्या भागात कलम 144 लागू करण्यात आले आहे.

राहुलसोबत पायी चालत निघालेले काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांना पोलिसांनी खेचून व्हॅनमध्ये नेले. मोर्चात सहभागी असलेल्या अन्य नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंदोलनादरम्यान त्यांना दुखापत झाल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला आहे. पी चिदंबरम यांनाही बरगडीला दुखापत झाली आहे.छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची काँग्रेस कार्यालयाजवळील बॅरिकेडवर थांबल्यानंतर दिल्ली पोलिसांशी झटापट झाली. ते पोलिसांना म्हणाले- तुम्ही मुख्यमंत्र्यांना रोखू शकत नाही. मात्र, पोलिसांनी त्यांना जाऊ दिले नाही.

ईडी राहुल गांधींची त्यांच्या संपत्तीविषयी चौकशी करत आहे. 2019 च्या निवडणुकीपूर्वी राहुल यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 15 कोटी 88 लाख रुपयांची संपत्ती व 72 लाख रुपयांचे कर्ज असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल यांच्या संपत्तीची माहिती पुढीलप्रमाणे

राहुल यांच्याकडे 15 कोटींहून अधिकची संपत्ती

  • 2019 च्या प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल यांच्याकडे 15 कोटी 88 लाख रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. 2014 मध्ये त्यांची संपत्ती 9.4 कोटी होती.
  • राहुल यांच्यावर 72 लाखांचे कर्ज असून त्यांच्याकडे स्वतःची कारही नाही.
  • राहुल यांच्याकडे 5 कोटी 80 लाख 58 हजार 799 रुपयांची जंगम व 10 कोटी 8 लाख 18 हजार 284 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
  • त्यांच्याकडे 40 हजारांची रोकड आहे. तसेच विविध बँकांत 17 लाख 93 हजार रुपये जमा आहेत.
  • त्यांनी रोखे, शेअर्स, म्युच्युअल फंडात 5 कोटी 19 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.

सुलतानपूरमध्ये वारसाहक्काने मिळालेल्या शेतीत वाटा

  • राहुल यांचा दिल्लीतील सुलतानपूर गावात वारसाहक्काने मिळालेल्या शेतीत वाटा आहे.
  • त्यांच्याकडे 333.3 ग्रॅम सोने आहे.
  • 2017-18 मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न 1 कोटी 11 लाख 85 हजार 570 होते.

राहुल यांच्या उत्पन्नाचा सोर्स कोणता?

  • खासदार म्हणून मिळणारे वेतन
  • रॉयल्टी उत्पन्न
  • रेंटल उत्पन्न
  • बॉन्ड्सद्वारे मिळणारे व्याज
  • म्युच्युअल फंडातून मिळणारा लाभांश आणि भांडवली नफा

ED ने विचारले -50 लाखांच्या शेअर्ससाठी पैसे कसे उभे केले?

  • तुमची मालमत्ता कुठे आहे? परदेशात काही मालमत्ता आहे का? जर होय, कुठे आणि किती?
  • एजेएलमध्ये तुमची भूमिका काय होती, तुम्ही यंग इंडियात कसे सहभागी झालात?
  • यंग इंडियाचे संचालक कसे झालात? कंपनी कधी-केवढ्यात स्थापन केली?
  • यंग इंडियाला एजेएलचा ताबा घेता येईल का?
  • AJL चे दायित्व काढून टाकण्यासाठी कोणाच्या निर्णयावर पैसे दिले गेले?
  • तुम्ही AJL मध्ये 50 लाख रुपये किमतीच्या शेअर्सचे पैसे कसे दिले?
  • तुमचा वाटा किती होता? तुम्ही शेअर्स कसे आणि केवढ्यात विकत घेतले? यासाठी पैसे कुठून आणला?
  • AJL चे 90.9 कोटी रुपयांची देणदारी माफ का करण्यात आली?
  • शेअर्स स्वत:च्या नावाने घेतले. पण, नॅशनल हेराल्डला काँग्रेसने 90.9 कोटी रुपये दिले?
  • टेकओव्हरसाठी जुन्या भागधारकांच्या बैठकीचे कार्यवृत्त? बैठक बोलावली नाही तर कारण काय?
  • बुडणारे जहाज असतानाही काँग्रेस पक्षाने एजेएलला कर्ज का दिले?
  • नॅशनल हेराल्डचे पुनरुज्जीवन करण्यामागचा हेतू काय होता?

शेळी मेंढी पालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी (भाग-१)

0

शेळी मेंढी पालन व्यवसाय हा प्रामुख्याने ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकाकडून केला जात असला तरी या व्यवसायाकरिता लागणारे अल्प भांडवल, कमी मनुष्यबळ व कायम स्वरूपी उपलब्ध असलेली बाजारपेठ यामुळे राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार, प्रगतीशील शेतकरी व व्यावसायिक या व्यवसायाकडे  आकर्षित होत आहेत.

राज्यातील पशुधनाच्या एकूण मांस उत्पादनापैकी शेळ्या-मेंढ्यांच्या मांसाचा ३७.९४ टक्के वाटा आहे. शेळ्या-मेंढ्यांच्या मासाला मोठ‌्या प्रमाणात मागणी असल्यामुळे या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे. तरूण सुशिक्षित रोजागारास उत्पन्न वाढीचा शाश्वत स्त्रोत निर्माण झाला आहे.

राज्यात शेळी मेंढी पालन व्यवसायास गती देण्यासाठी शासन स्तरावरून विविध कार्यक्रम राबविले जातात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचे यात महत्वाचे योगदान आहे. या महामंडळाची स्थापना ८ ऑगस्ट १९७८ रोजी झाली. पशुसंवर्धन विभागाचे ९ मेष पैदास प्रक्षेत्रे व १ लोकर उपयोगिता केंद्र आणि १ शेळी मेंढी पैदास प्रक्षेत्र १ एप्रिल १९८४ पासून आणि १ शेळी प्रक्षेत्र जुलै २०१० पासून महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.

महामंडळाच्या विविध १० जिल्ह्यात कार्यरत मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रावर उस्मानाबादी शेळ्या तसेच डेक्कनी, माडग्याळ जातींच्या मेंढ्यांचे पैदाशिकरिता संगोपन करण्यात येत आहे. या प्रक्षेत्रामार्फत राज्यातील मेंढपाळ व शेळी पालकांसाठी विविध विकासात्मक कार्यक्रम तसेच शासकीय योजना राबविण्यात येतात.

सुधारित जातींचे मेंढेनर व बोकड यांच्या पैदाशीसाठी वाटप

महामंडळाच्या विविध प्रक्षेत्रावर डेक्कनी व संगमनेरी व माडग्याळ जातीच्या मेंढ्या तसेच उस्मानाबादी, बेरारी, संगमनेरी जातीच्या शेळ्यांचे संगोपन करण्यात येते, त्यापासून  उत्पादित होणारे जातिवंत बोकड व मेंढनर स्थानिक शेळ्यांची अनुवंशिकता गुणवत्ता सुधारण्याकरिता पैदाशीसाठी शेतकऱ्यांना उनलब्ध करून देण्यात येते.

मेंढी व शेळी पालन प्रशिक्षण

मेंढी व शेळी व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रावर तसेच मुख्यालय गोखलेनगर पुणे येथे उपलब्ध आहे. प्रशिक्षण कालावधी तीन दिवसाचा आहे. राज्यातीत शेळ्या व मेंढ्यांच्या जाती, शेळ्यांचा निवारा, आहार व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्थापन, करडांची निगा, प्रक्षेत्रावरील दैनंदिन व्यवस्थापन, विमा, पैदास कार्यक्रमाचे नियोजन, पणन, शेळ्यांकरिता उपयुक्त चारा पिकांची लागवड, मुरघास तयार करण्याचे तंत्र याबाबत माहिती दिली जाते.

लोकर विणकाम आणि  लोकर कातरणी

ग्रामीण भागातील लोकर व्यवसायास चालना मिळावी तसेच स्वंरोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने महामंडळामार्फत लोकर विणकाम प्रशिक्षण दिले जाते. मेंढपाळ पारंपारिक पद्धतीने लोकर कातरणी करतात, त्यामुळे लोकरीच्या पाण्याचे बारीक तुकडे होऊन प्रतवारी कमी होते. त्यासाठी महामंडळामार्फत विजेवर चालणाचा यंत्राद्वारे मेंढ्यांची लोकर कातरणी रास्त दराने करून दिली जाते.

याशिवाय महामंडळ मेंढपाळामार्फत लोकर किफायतशीर भावाने खरेदी करून त्यापासून स्थानिक कारागिरांकडून लोकर वस्तू उत्पादन करून घेण्यात येते. महामंडळाच्या प्रक्षेत्रावर  शेळ्यामेंढ्यांकरिता उपयुक्त असलेले सुधारित जातींचे चारा बियाणे व संकरित गवतांचे थोंबे उत्पादित करून मेंढी पालकांना रास्त दरात उपलब्ध करून दिले जाते.

शेळी मेंढी पालन व्यवसाय करण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तीना या व्यवसायाचे मार्गदर्शन करण्यात येते. महामंडळामार्फत शेळया मेंढयाच्या स्पर्धा, मेंढपाळांचे व लोकर वस्तूचे प्रदर्शन आयोजित केले जाते. महामंडळामार्फत बकरीईद निमित्त बोकड तसेच मेंढेनर उपलब्ध व्हावे तसेच रोजी-मेंढी पालकांच्या मालास बाजारपेठ उपलब्ध व्हावे, यासाठी ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.

(क्रमश:)

– जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे जागतिक रक्तदाता दिनी रक्तदान मोहिमेचे आयोजन

0

मुंबई/पुणे१४ जून २०२२: भारतात पेट्रोलियम उद्योगक्षेत्रातील एक आघाडीची कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) आज त्यांच्या पुणे कार्यालयात रक्तदान मोहिमेचे आयोजन केले होते. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहयोगाने बीपीसीएलने हा उपक्रम राबवला.

समाजोपयोगी कामे करण्याची आणि समुदायांच्या कल्याणासाठी उपयोगी पडण्याची आपली वचनबद्धता अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने बीपीसीएलने हा उपक्रम हाती घेतला होता. या रक्तदान मोहिमेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, डीलर्स, वितरक आणि चॅनेल पार्टनर्स यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली चार बेड्स व सर्व आवश्यक उपकरणांची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी एकूण ५२ युनिट्स रक्त जमा करण्यात आले.  प्रत्येक रक्तदात्याला रुग्णालयाकडून एक प्रमाणपत्र देण्यात आले.

उपक्रमाबाबत प्रतिक्रिया नोंदवताना भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे एक कर्मचारीमहाराष्ट्र आणि पुणे – स्टेट हेड (आयअँडसीश्रीतन्मय जैसवाल म्हणाले, बीपीसीएलच्या सिद्धांतांचे पालन करत मी गेली ३० वर्षे सातत्याने रक्तदान करत आहे.  समाजाचे ऋण फेडण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याची भावना जागृत ठेवणाऱ्या अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये सहभागी होताना मला अतिशय अभिमान वाटतोरक्तदान करण्याची आजची माझी ३९वी खेप आहे आणि भविष्यात देखील मी रक्तदान करत राहीन  जितके शक्य होईल तितक्या जास्त लोकांच्या उपयोगी पडण्याचा प्रयत्न करेन.” 

ते पुढे म्हणाले, “एका वेळेचा कार्यक्रम म्हणून रक्तदानाची सुरुवात झाली आणि माझ्या मनावर त्याचा इतका सखोल परिणाम झाला की आज रक्तदान हा माझ्या जीवनाचा एक भाग बनला आहे.  मीमाझे आणि स्वतः यांच्या पलीकडे जाऊन काहीतरी करण्याच्या आंतरिक उर्मीने हे सर्व घडत गेले.  आज मी मानतो की जो समाज आपल्याला घडवतोइतके काही देतो त्याचे थोडेतरी ऋण फेडण्याचा हा एक मार्ग आहे.  रक्तदान म्हणजे तुम्ही तुमचेतुमच्यातले काढून इतरांना देतात्यामुळे परोपकाराचा सर्वोच्च मार्ग म्हणून रक्तदानाकडे पाहिले जातेत्यामुळे आपण सर्वांनी रक्तदान केले पाहिजे.”

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अशा प्रकारच्या स्वैच्छिक रक्तदान शिबिरांचे आयोजन दरवर्षी करते. अतिशय महत्त्वाच्या आणि गरजेच्या आरोग्य शिबिरांचे आयोजन देशभरात करण्यात ही कंपनी आघाडीवर आहे. 

इरई धरणावरील तरंगते सौर ऊर्जा पार्क पर्यटकांचे आकर्षण ठरणार

0

मुंबई : चंद्रपूर येथील इरई धरणावर १०५ मेगावॅटचे तरंगते सौर ऊर्जा पार्क उभारण्यात येणार असून यासंदर्भात आज ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्या उपस्थितीत ऊर्जामंत्री कार्यालयात आढावा बैठक पार पडली.
या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ५८० कोटी रुपये अपेक्षित असून १५ महिन्यात हा प्रकल्प उभा राहणार आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. 
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने चंद्रपूर येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्राला पाणीपुरवठा करण्यासाठी हे धरण बांधलेले आहे. यातून चंद्रपूर शहरालाही पाणीपुरवठा करण्यात येते.
या सौर ऊर्जापार्कची निर्मिती करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार असून पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य ठिकाण ठरणार आहे. 
 या ऊर्जापार्कचे पर्यटकांना अवलोकन करता यावे यासाठी गॅलरी व सेल्फी पॉईंटचे बांधकाम करण्यात येणार आहे. चंद्रपूर औष्णिक वीज निर्मिती केंद्रात वाघांचा व बिबट्याचा वावर असल्याने कर्मचारी व पर्यटकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे निर्देश डॉ राऊत यांनी महानिर्मिती व्यवस्थापनाला दिलेत.
या बैठकीला महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मराविम सुत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे,महानिर्मितीचे संचालक संचलन चंद्रकांत थोटवे व इतर अधिकारी उपस्थित होते.

देहूच्या कार्यक्रमात अवमान केल्याच्या भावनेने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत संतापाची लाट-

पुणे- देहूच्या कार्यक्रमात पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या कार्यक्रम पत्रिकेत द्वेंद्र फडणवीसांचे भाषण संमत केले आणि महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री , पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या भाषणाला मात्र संमती दिली नाही त्यामुळे पंतप्रधानांचे स्वागताला आणि कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या वतीने गेलेल्या अजित पवारांचा पर्यायाने महाराष्ट्राचा अवमान झाल्याची भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत पसरली असून यामुळे देहू संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांकडे याबाबत पंतप्रधान कार्यालयाने संमत केलेली कार्यक्रमपत्रिकेची प्रत मागितली जाऊ लागली आहे.आज पुण्याचे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीतील युवकांमधील लोकप्रिय नेते दीपक मानकर यांनी देहू संस्थांच्या अध्यक्षांना याबाबत फोनवरून विचारणा केली या संदर्भात त्यांचे देहू देवस्थानचे अध्यक्ष मोरे महाराज यांच्याशी झालेले फोनवर बोलणे व्हायरल झाले आहे …

राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेल्या ‘जलभूषण’ या नव्याने बांधण्यात आलेल्या वास्तूचे पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन

0

मुंबई 14 जून 2022

राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेल्या ‘जलभूषण’ या नव्याने बांधण्यात आलेल्या वास्तूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उदघाटन करण्यात आले.
जलभूषण या वास्तूला किमान 200 वर्षांचा इतिहास आहे. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टन यांनी मलबार हिल येथे सन 1820 – 1825 या काळात ‘प्रेटी कॉटेज’ नावाचा छोटा बंगला बांधला होता. ‘जलभूषण’ ही वास्तू याच जागेवर उभी आहे.


सन 1885 साली मलबार हिल येथे ‘गव्हर्न्मेंट हाउस’ स्थलांतरित झाल्यापासून या वास्तूमध्ये ब्रिटीश गव्हर्नर यांचे व स्वातंत्र्यानंतर मुंबईच्या व राज्यनिर्मितीनंतर महाराष्ट्राच्या राज्यपालांचे निवासस्थान राहिले आहे. 


अनेकदा बांधली गेलेली व विस्तारित केलेली जुनी वास्तू निवासासाठी असुरक्षित असल्याचे आढळून आल्यामुळे या ठिकाणी नवी वास्तू बांधण्याचे ठरविण्यात आले. 18 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या ‘जलभूषण’ इमारतीची पायाभरणी देखील केली होती. हे बांधकाम पूर्ण झाले असून नव्या वास्तूचे द्वारपूजन पंतप्रधानांच्या हस्ते याआज करण्यात आले.  

नवीन ‘जलभूषण’ वास्तूमध्ये जुन्या वास्तूमधील ठळक वारसा वैशिष्ट्ये जतन करण्यात आली आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत राजभवन येथे केले ‘क्रांती गाथा – गॅलरी ऑफ रिव्होल्युशनरीज’चे उद्घाटन

0

मुंबई-भारतीय क्रांतिकारकांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी मुंबईतील राजभवन येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या ‘क्रांती गाथा’ या दालनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यावेळी उपस्थित होते.

2016 मध्ये राजभवनाच्या खाली सापडलेल्या ब्रिटीशकालीन भूमिगत बंकरमध्ये देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामातील ज्ञात आणि अज्ञात क्रांतिकारकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी भारतीय क्रांतिकारकांचे दालन तयार करण्यात आले आहे. देश आझादी का अमृत महोत्सव वर्ष साजरे करत असतानाच क्रांती गाथा हे दालन समर्पित केले गेले आहे.
 

नागपूरच्या दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने इतिहासकार आणि लेखक डॉ. विक्रम संपत यांच्या मार्गदर्शनाखाली हे क्रांतिकारकांचे दालन तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अनेक क्रांतिकारकांचे स्मरण या दालनात केले गेले आहे. 1857 मधील पहिला स्वातंत्र्यसंग्राम ते 1946 मध्ये मुंबईत झालेला नौदलाचा उठाव या कालावधीचा आढावा या दालनात आहे. यामध्ये वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू, बाळ गंगाधर टिळक, वीर सावरकर, बाबाराव सावरकर, क्रांतीगुरु लहुजी साळवे, अनंत लक्ष्मण कान्हेरे, राजगुरू, मॅडम भिकाजी कामा यांची कहाणी ठळकपणे अनुभवायला मिळते.

तेव्हा बॉम्बे स्टेटचा भाग असलेल्या महाराष्ट्रातून ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या सशस्त्र लढ्याची कहाणी येथे शिल्पे, दुर्मिळ छायाचित्रे आणि भित्तिचित्रांद्वारे दाखविली आहे.
 
पहिली सशस्त्र क्रांतिकारी संघटना ‘अभिनव भारत’ आणि प्रति सरकार स्वराज्य 1940 च्या सातारा-सांगली विभागातील हालचाली देखील गॅलरीत टिपल्या आहेत. शाळकरी मुलांनी रेखाटलेल्या अनेक आदिवासी क्रांतिकारकांची सचित्र उपयुक्त माहिती देखील या दालनात समाविष्ट केली आहे.


 
राज्य पुराभिलेख विभाग, एशियाटिक सोसायटी, केसरी अभिलेखागार आणि सावरकर संग्रहालय यांच्याकडून माहिती मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे दृश्य या सभागृहात रेखाटलेले आहे.
2016 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल एन विद्यासागर राव यांना राजभवन येथील हे बंकर सापडले. पहिल्या महायुद्धापूर्वी बांधलेले हे बंकर ब्रिटीश शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा ठेवण्यासाठी वापरत होते. बंकरमध्ये विविध आकाराच्या 13 खोल्या आहेत आणि त्यामध्ये ‘शेल स्टोअर’, ‘गन शेल’, काडतूस स्टोअर, शेल लिफ्ट, सेंट्रल आर्टिलरी रूम, कार्यशाळा असे वेगवेगळे सेल होते. बंकरमध्ये पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था होती तसेच स्वच्छ हवा आणि नैसर्गिक प्रकाशही तिथे येत होता. बंकरमध्ये ठिकठिकाणी दीपमाळा ठेवण्यात आल्या होत्या. तेव्हापासून सर्व मूळ वैशिष्ट्यांचे जतन करून हे बंकर काळजीपूर्वक पुनर्संचयित केले आहे.

18 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या बंकरमध्ये आभासी वास्तव संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. 13 खोल्यांच्या बंकरमधील अनेक खोल्या रिकाम्या होत्या. यापैकी अनेक
दालनातील खोल्या तसेच भिंतीचा वापर आता क्रांती गाथा – गॅलरी साठी केला गेला आहे

पालखी मार्गांच्या विकासासाठी 1100 कोटी खर्च करणार, 350 किमीचा महामार्ग बनवणार!

0

पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देहूतील संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यानंतर सभेला संबोधित करताना पंढरपूर पालखी मार्गांच्या विकासासाठी सरकार 1100 कोटींचा खर्च करेल. या माध्यमातून 350 किलोमीटरचा महामार्ग तयार करण्यात येईल, अशी घोषणा नरेंद्र मोदींनी केली.

पालखी मार्गांच्या विकासासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाचे काम 3 टप्प्यात तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गाचे काम 2 टप्प्यात करण्यात येईल, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. याशिवाय महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थळ, मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूर येथील दीक्षा भूमीचाही विकास करण्यात येईल, असे मोदी म्हणाले.

देहूत येणे हे माझे भाग्य

देहू हे संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ आणि कर्मस्थळ आहे. अशा या देहूच्या पवित्र तीर्थभूमीवर मला येता आले, हे मी माझे भाग्य समजतो. ‘जेथे नांदे देव पांडुरंग, धन्य ते क्षेत्रवासी लोक’, अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, देहू मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे योगेश देसाई, पंढरपूर देवस्थान उपाध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसरे ,मारुतीबाबा कुरहेकर, आचार्य तुषार भोसले आदी उपस्थित होते.

तुकोबांच्या शिकवणीनुसारच आमचे धोरण

मोदी म्हणाले, संत तुकाराम यांची शिळा केवळ शिळा नसून ती भक्तीची प्रेरणा आहे. या शिळेवर स्वत: तुकाराम महाराजांनी 13 दिवस तपस्या केली. त्यामुळे ही शिळा भक्ती आणि ज्ञानाची आधारशिला आहे. तुकाराम महाराज यांच्या गाथांचे रक्षण करणारे सुदुंबरे येथील संत जगनाडे महाराज यांनाही मी नमन करतो. तुकाराम महाराज गरीब, श्रीमंत असा भेद मानत नव्हते. तसा भेदभाव करणे मोठे पाप असल्याचे तुकाराम महाराज म्हणत. सरकारदेखील तुकाराम महाराजांच्या याच शिकवणुनूसार सबका साथ ,सबका विश्वास या धोरणाने काम करत आहे, असे मोदी म्हणाले.

भारत ही संताची भूमी आहे. समाज आणि देशाला दिशा देण्याचे काम संतांनी सदैव केले आहे. भारतीय संस्कृती टिकवून ठेवत ती पुढे नेण्याचे काम संतांनी केले आहे. प्रतिकूल परिस्थितीत तुकाराम महाराजांनी त्याग करत समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या अभांगानी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. सांस्कृतिक मूल्य आधारित त्यांच्या अभंगांनी समाजाला उर्जा दिली, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

मोदी हे आपले वारकरी – फडणवीस

तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धा दूर करून सश्रद्ध समाज तयार करण्याचे काम केले. त्यांच्या शब्दांचे धन कोणीही बुडवू शकले नाही. इंद्रायणीने त्यांचे शब्द पुन्हा वर केले. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचे काम पंतप्रधान करत आहेत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. तुकोबांच्या जे का रंजले गांजले, या धर्मानुसारच पंतप्रधान करत आहेत. पंतप्रधान आपले वारकरी आहेत. वारकऱ्यात सारेच सेवक असतात. आपले पंतप्रधान प्रधानसेवक आहेत. संपूर्ण जग आपले आहे, हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले. तेच मानून संपूर्ण जगाला लस पोहोचवण्याचे काम मोदीजींनी केले, असे फडणवीस म्हणाले.

देहूतल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान

पुणे -देहूतल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. देहूमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात बोलले. मात्र, तिथे अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही, अशी खंत सुळेंनी व्यक्त केली. ते आज पत्रकारांशी बोलत होत्या.

पंतप्रधान मोदींकडे अजित पवारांनी भाषणाची मागणी केली होती. मात्र, त्या कार्यक्रमात फडणवीस यांना बोलण्याची संधी देण्यात आली आणि अजित पवारांना बोलू दिले नाही. मोदी पुण्यात दाखल होताच अजित पवार त्याच्या स्वागतासाठी विमानतळावर दाखल झाले होते.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. ज्या जिल्ह्यात पंतप्रधान जातात तेथील पालकमंत्र्याला त्यांच्यासोबत राहावे लागते तो या देशाचा प्रोटोकॉल आहे. त्यामुळे अजित दादांचे जागे हे कर्तव्य आहे. पण त्या कार्यक्रमात अजित दादांना बोलू न देणे हे मला अयोग्य वाटले.

म्हणून बोलण्याची संधी मिळाली नाही

देहू संस्थानकडून संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या संपूर्ण सोहळ्यात भाजप नेत्यांची छाप पाहायला मिळाली. स्टेजवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तुषार भोसले, देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. मात्र, जेव्हा फडणवीसांचे भाषण झाले त्यानंतर सुत्रसंचालन करणाऱ्या व्यक्तीने थेट पंतप्रधान मोदींना भाषण करण्यासाठी सांगितले. त्यामुळे अजित पवारांना भाषण करण्यात आले नाही.

मोदींनी माफी मागावी

सुप्रिया मतांशी मी सहमत आहे. प्रधानमंत्री हे पद संवैधानिक आहे त्या प्रोटोकॉलनुसार स्थानिक पालकमंत्री म्हणजे अजित पवारांना त्यांच्या स्वागतासाठी जाणे अपेक्षित आहे आणि ते गेले देखील. मात्र, असे असताना त्या प्रोटोकॉलमध्ये संवैधानिक पदावर मोदी आणि अजित पवार देखील आहेत. अजित पवारांना जर जाणिवपूर्वक डावलले असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. या बद्दल देशाचे पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यानाही दिल्ली पोलिसांची धक्काबुक्की तर सुरजेवाला,चिदंबरम जखमी,राहुल ईडी कार्यालयात पोहोचले

0

नवी दिल्ली- नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी राहुल गांधी दुसऱ्या दिवशी कारमधून तपास संस्थेच्या कार्यालयात पोहोचले. त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही कारमध्ये होत्या. राहुल यांना ईडी कार्यालयात सोडल्यानंतर प्रियांका तेथून निघून गेल्या. त्यांच्यासोबत पायी चालत निघालेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांना पोलिसांनी खेचून व्हॅनमध्ये नेले. त्यांच्याशिवाय अन्य नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंदोलनादरम्यान सुरजेवाला आणि चिदंबरम जखमी झाले आहेत.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची काँग्रेस कार्यालयाजवळील बॅरिकेडवर थांबल्यानंतर दिल्ली पोलिसांशी झटापट झाली. ते पोलिसांना म्हणाले- तुम्ही मुख्यमंत्र्यांना रोखू शकत नाही. मात्र, पोलिसांनी त्यांना जाऊ दिले नाही.

तत्पूर्वी, राहुल प्रियंका गांधींसह त्यांच्या घरातून काँग्रेस मुख्यालयात पोहोचले. राहुल-प्रियांका यांच्यासोबत काँग्रेस मुख्यालयात सर्व काँग्रेस नेत्यांनी चर्चा केली. येथून रणनीती तयार झाल्यानंतर राहुल ईडी कार्यालयाकडे रवाना झाला.

रणदीप सिंह सुरजेवाला, हरीश रावत, केसी वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी, गौरव गोगोई, दीपेंद्र सिंह हुडा, रंजीत रंजन, इम्रान प्रतापगढ़ी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अकबर रोडवरून ताब्यात घेतले आहे. त्यांना तुघलक रोड पोलिस ठाण्यात नेण्यात येत आहे. सोमवारी, सुमारे एक हजार काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले, त्यांना रात्री उशिरा सोडण्यात आले.

सरकार मालमत्ता विकत आहे, विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबत आहे : सुरजेवाला
काँग्रेस कार्यालयात बैठकीला संबोधित करताना रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले- 70 वर्षांत उभारलेल्या मालमत्ता सरकार विकत आहे. त्याविरोधात बोलत असलेल्या राहुल गांधींचा आवाज दाबण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. यामुळे काँग्रेस घाबरणार नाही

सरकार येत्या दीड वर्षात 10 लाख लोकांची युद्धपातळीवर भर्ती करणार : पंतप्रधान

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मनुष्यबळ स्थितीचा आढावा घेतला आहे.  पुढील दीड वर्षात युद्धपातळीवर 10 लाख लोकांची भर्ती सरकारने करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे;

“पंतप्रधान @narendramodi यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मनुष्यबळ स्थितीचा आढावा घेतला आणि येत्या दीड वर्षांत युद्धपातळीवर  10 लाख लोकांची भर्ती सरकारने  करावी असे निर्देश दिले.”

मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही-शरद पवार

0

मुंबई-राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार यांच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा आहे. यादरम्यान मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवारांनी आपण विरोधकांचे उमेदवार नसू असं स्पष्ट केलं आहे. “मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही,” असं शरद पवारांनी यावेळी उपस्थित कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं.शरद पवारांनी आपण या स्पर्धेत नाही असं स्पष्ट केलं असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, गुलाम नबी आझाद यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसने पसंती दर्शवली आहे.

राज्यात काँग्रेसने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचे नाव समोर येत असेल तर आमचा पाठिंबा राहील असं जाहीर केल्यानंतर हे विधान समोर आलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, “महाराष्ट्राचा व्यक्ती देशाचा राष्ट्रपती होत असेल आणि शरद पवार यांचे नाव पुढे आले तर महाराष्ट्र काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे”. दुसरीकडे आपचे संजय सिंग यांनीही शरद पवारांना रविवारी फोन केला होता.

दुसरीकडे राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. येत्या १५ जून रोजी विरोधकांची दिल्ली येथे बैठक होणार आहे. या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी बिगर भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच २२ विरोधी पक्षाच्या नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रित केलं आहे. या बैठकीत निवडणुकीसाठीच्या आगामी रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून कोण उमेदवार असेल यावरदेखील या निवडणुकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत.

नव्या राष्ट्रपतींची निवड करण्यासाठी निवडणूक आयोगाने १८ जुलै रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर केले आहे. या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया २१ जुलै रोजी पार पडेल.सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधक या दोघांनीही त्यांच्या उमेदवाराचे नाव अद्याप घोषित केले नाही. त्यामुळे या निवडणुकीविषयीची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. आकड्यांच्या समीकरणात ४८% मते असलेला एनडीएचा उमेदवार हा शर्यतीत सर्वात पुढे असणार आहे. ओडिसातील बिजू जनता दल आणि आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपी यांसारख्या मित्रपक्षांच्या साथीने एनडीएच्या उमेदवाराचा विजय सोपा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष मात्र राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध न होता गेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही लढत व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेसतर्फे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहेत.

काल रात्री राहुल गांधी ED ला म्हणाले ,’जर तुमचा मला रात्री थांबवण्याचा हेतू असेल तर मी जेवल्यानंतर चौकशीसाठी परत येतो’

0

नवीदिल्ली- नॅशनल हेराल्ड प्रकरणात आज सलग दुसऱ्या दिवशी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) राहुल गांधींची चौकशी करणार आहे. तपास यंत्रणेने सोमवारी राहुल गांधी यांची सुमारे 10तास चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या चौकशीदरम्यान राहुलने ईडी अधिकाऱ्याला सांगितले की, ‘जर तुमचा मला रात्री थांबवण्याचा हेतू असेल तर मी जेवल्यानंतर चौकशीसाठी परत येतो’सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान राहुल गांधींना दिलेल्या उत्तराने तपास यंत्रणा समाधानी नाही. त्यांच्याकडून काही कागदपत्रेही मागविण्यात आली आहेत.यामुळे चौकशीसाठी आज त्यांना पुन्हा बोलावण्यात आले आहे.

ईडीचा राहुल गांधी यांना प्रश्न, विदेशात खाते आहे का?, कुठे, किती आहे संपत्ती?; 10 तासांत 50 प्रश्न विचारले

काल सकाळी ११.१० वाजता ईडीच्या मुख्यालयात पोहोचलेल्या राहुल यांची दोन टप्प्यांत १० तासांपेक्षा जास्त चौकशी झाली. त्यांना ५० वर प्रश्न विचारण्यात आले. तुमची किती आणि कोणकोणत्या बँकांत खाती आहेत, असा प्रश्न ईडीने राहुल यांना विचारला. विदेशी बँक खाती आणि संपत्तीबाबतही प्रश्न विचारले. त्यांची रात्री १० वाजेपर्यंत चौकशी झाली.

  • तुमची मालमत्ता कुठे आहे? परदेशात काही मालमत्ता आहे का? जर होय, कुठे आणि किती?
  • AJL मध्ये तुमची भूमिका काय होती, तुम्ही यंग इंडियामध्ये कसे सामील झालात?
  • यंग इंडियाचे संचालक कसे झालात? कंपनी कधी स्थापन झाली?
  • यंग इंडिया AJL चा ताबा घेऊ शकेल का?
  • AJL चे दायित्व काढून टाकण्यासाठी कोणाच्या निर्णयावर पैसे दिले गेले?
  • तुम्ही AJL मध्ये 50 लाख रुपये किमतीच्या शेअर्सचे पैसे कसे दिले?
  • तुमचा यात किती वाटा होता? तुम्ही तुमचे शेअर्स कसे आणि कितीमध्ये विकत घेतले? यासाठी पैसे कुठून आणले?
  • ताब्यात घेतल्यानंतर AJL चे 90.9 कोटी रुपयांचे दायित्व का माफ करण्यात आले?
  • शेअर्स स्वत:च्या नावावर घेतले, तर नॅशनल हेराल्डला काँग्रेसने 90.9 कोटी रुपये दिले का?
  • टेकओव्हरसाठी जुन्या भागधारकांची बैठक झाली का? बैठक बोलावली नाही याचे कारण काय?
  • AJL बुडणारे जहाज असताना काँग्रेस पक्षाने त्यास कर्ज का दिले?
  • नॅशनल हेराल्डचे पुनरुज्जीवन करण्यामागचा हेतू काय होता?

वेणुगोपालांना धक्काबुक्की, पी.चिदंबरम यांनाही दुखापत
सकाळी ११.०० वाजता राहुल गहलोत, बघेल, पी.चिदंबरम, प्रियंकांसह काँग्रेसच्या नेत्यांसोबत पक्ष मुख्यालयातून पायी ईडी कार्यालयाकडे गेले. या नेत्यांना पोलिसांनी ईडी मुख्यालयाआधी रोखल्यावर त्यांनी धरणे आंदोलन केले. यानंतर राहुल गाडीतून ईडी मुख्यालयात गेले. चिदंबरम म्हणाले, तीन पोलिस अंगावर आल्याने बरगडीला फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे संगठन सरचिटणीस वेणुगोपाल यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत गाफील राहू नका, अपक्ष आमदारांच्या अपेक्षा पूर्ण करा

0

मुंबई-विधान परिषदेच्या निवडणुकीत गाफील राहू नका, अपक्ष आमदारांच्या अपेक्षा पूर्ण करा, अशी तंबी पवार यांनी आपल्या ज्येष्ठ मंत्र्यांना दिली आहे.विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर पवार यांनी सिल्व्हर ओक या निवासस्थानी ज्येष्ठ मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली होती. अपक्ष पण राष्ट्रवादीचे सहयोगी आमदार संजयमामा शिंदे आणि देवेंद्र भुयार या दोघांची मते फुटल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर २० जून रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला दगाफटका होऊ नये याची काळजी घेण्याचे आदेश पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिल्याचे कळते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कोणी कोणत्या आमदारांशी संपर्क करायचा, अपक्षांच्या मतदारसंघातील कोणती प्रलंबित कामे मार्गी लावायची, अपक्षांना आणखी किती निधीची अपेक्षा आहे याची माहिती गोळा करून अपक्षांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, असेही पवार यांनी सांगितल्याचे समजते. परिषद निवडणुकीत आघाडीचा एक उमेदवार पराभूत होणार आहे. त्यात राष्ट्रवादीचा उमेदवार असू नये याची पवार खबरदारी घेताहेत.