Home Blog Page 1925

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांची आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राला भेट

0


कोल्हापूर, 16 जून 2022

केंद्रीय माहिती आणि प्रसारण, मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राला भेट दिली. त्यांनी कोल्हापूर केंद्राच्या वतीने सुरू असलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. तसेच स्टुडिओ आणि संग्रहण सुविधाही पाहिल्या. केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांवर कार्यक्रम राबवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले जेणेकरून इतर लोकांनाही त्यांचा लाभ घेण्यासाठी पुढे येण्यास प्रोत्साहन मिळेल.

image.png

कोल्हापूर आकाशवाणी केंद्र

हे आकाशवाणी केंद्र 1992 मध्ये कार्यान्वित झाले. या केंद्रावरून बातम्या, संगीत, मुलाखत-आधारित कार्यक्रम तसेच पुस्तक वाचन आणि फोन-इन कार्यक्रम मराठी भाषेत प्रसारित केले जातात. कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील सुमारे 40 लाख लोकसंख्येपर्यंत ह्या  केंद्राची व्याप्ती आहे.

आकाशवाणी कोल्हापूर हे स्थानक रेडिओ स्टेशन आहे परंतु स्टेशनद्वारे स्वीकारलेला प्रोग्राम पॅटर्न हा मुख्य वाहिनीच्या कार्यक्रमांवर आधारित आहे. कोल्हापूर शहरापासून 27 किलोमीटर अंतरावर असलेल्या एफएम ट्रान्समीटरद्वारे कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते. 102.7 MHz  ही स्टेशनची वारंवारता आहे. उपमहासंचालक (अभियांत्रिकी) श्री अधीर गडपाले यांनी आकाशवाणी, कोल्हापूर येथे मंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख डॉ सुनील गायकवाड उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा

त्याआगोदर डॉ. एल.  मुरुगन यांनी आज कोल्हापुरात शासकीय विश्रामगृह इथं केंद्रीय कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेतला.

सुरुवातीला कोल्हापुरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या केंद्रीय कल्याणकारी योजनांसंदर्भात डॉ.एल. मुरुगन यांना माहिती दिली.

image.png

केवळ कोल्हापूर जिल्ह्याला पुरेल इतकंच नव्हे तर मेट्रो शहरांना लागणाऱ्या दुधाची  गरज इथून पूर्ण केली जाते, याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांना दिली.

कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेवर सुमारे 11 कोटी रुपयांचा निधी खर्च झाल्याची माहितीही यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मंत्री महोदयांना देण्यात आली.

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 2,24,000 कार्डांचं वितरण कशा पद्धतीनं करण्यात आलं, याचीही माहिती यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी कशी होत आहे याचीही माहिती डॉ एल मुरुगन यांनी घेतली.

कोल्हापूर जिल्ह्याला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण 2 हजार 870 घरकुलं मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 1 हजार 570 घरकुलं लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत.

प्रधानमंत्री आवास योजना नागरी अंतर्गत सुमारे 19 हजार 744 घरांचं कोल्हापूर जिल्ह्याला उद्दिष्ट असून यापैकी 7 हजार 196 बिगर झोपडपट्टी घरकुलं बांधकामासाठी सज्ज आहेत. परंतु झोपडपट्टी वासियांच्या विरोधामुळे बांधकामास विलंब होत असल्याचं मंत्रिमहोदयांना अवगत करण्यात आलं.

यावेळी मंत्रिमहोदयांनी मुद्रा योजनेअंतर्गत महिला तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांचीही माहिती घेतली.

गाववार जमिनीच्या प्रती संबंधी आणि या संदर्भातील उणिवा संबंधात गावकऱ्यांच्या फायद्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून यासंदर्भातील फलक त्याच्या गावात लावण्यात आल्याचं जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी सांगितलं.

डॉ एल मुरुगन, सध्या कोल्हापुरात बांधकाम चालू असलेल्या अमृत  सरोवरला भेट देतील.

बैठकीला कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, महसूल विभाग, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, दुग्ध व्यवसाय आदी शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते

शासकीय दाखला घेण्यासाठी ई केंद्र सुविधा

0

दहावी-बारावीचे नुकतेच निकाल लागले आहेत. निकालानंतर पुढील शैक्षणिक कामांसाठी लागणाऱ्या दाखल्यांकरिता विद्यार्थी व पालकांची लगबग सुरु झाली आहे. तहसिल कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये, सेतू केंद्र, आपले सरकार पोर्टलकेंद्र अशा ठिकाणच्या वाऱ्या पालकांना सतत कराव्या लागतात. एप्रिल ते जुलैअखरे डोमिसाईल, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर व रहिवासी, आदी स्वरूपाचे विविध दाखल्यांसाठी पालक आणि विद्यार्थ्यांच्या फेऱ्या चालू राहतात. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठीही शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. अशावेळी दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये त्रूटी आढळल्यातर पुन्हा फेऱ्या वाढतात. यामुळे वेळेसोबत विनाकारण आर्थिक नुकसानही होते. पालक आणि विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, त्यांची दलांलामार्फत फसवणूक होऊ नये यासाठी शासनाने ई-सेवा केंद्र, आपले सरकार, सेतु यासारख्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या सेवांमुळे शासकीय दाखले मिळणे सोपे झाले आहे.

नागरिकांच्या सुविधेसाठी शासनाने विविध सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. परंतु नागरिकांनी ही आपल्या काही जबाबदाऱ्या, काही कर्तव्ये पारपाडणे आवश्यक आहे. शैक्षणिक कामांसाठी, विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी, नोकरी संदर्भात आवश्यक असलेले दाखले काढण्यासाठी शासनाच्या नियमावलीनूसार आवश्यक कागदपत्रे आपण आधीच तयार ठेवली. तर दाखले काढताना लागणारा वेळ वाचेल, आर्थिक नुकसानही होणार नाही. विनाकारण छोट्या छोट्या कागदपत्रांसाठी माराव्या लागणाऱ्या फेऱ्याही वाचतील. शैक्षणिक तसेच नोकरी संदर्भात लागणारे विविध दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी (चेकलीस्ट) पुढील प्रमाणे आहे.

शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे

उत्पन्न दाखला (1 वर्षे) : तलाठी रहिवाशी दाखला, तलाठी उत्पन्न दाखला, शेती असलेस 7/12 उतारा व 8 अ, नोकरी असलेस पगार दाखला, पेन्शन असलेस पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.

उत्पन्न दाखला नॉन क्रिमीलेयर :- तलाठी रहिवाशी दाखला, तलाठी 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, शेती असलेस 7/12 उतारा व 8 अ, नोकरी असलेस पगार दाखला, पेन्शन असलेस पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.

उत्पन्न दाखला सरकारी योजना/ वैद्यकिय कामी :- तलाठी रहिवाशी दाखला, तलाठी उत्पन्नाचा दाखला, मंडळ अधिकारी (सर्कल) चौकशी अहवाल, शेती असलेस 7/12 उतारा व 8 अ, रेशन कार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.

दुबार /हरवलेले रेशनकार्ड : धान्य दुकानदार यांचा रेशनकार्ड खराब/ हरवलेचा दाखला, तहसीलदार यांच्या सहिने उत्पन्न दाखला, हरवलेले असल्यास पोलीस स्टेशनचा दाखला, खराबसाठी मुळ रेशनकार्ड/ हरवलेले असल्यास झेरॉक्स, सर्वांची आधारकार्ड झेरॉक्स.

नॉन क्रिमीलेयर : तहसीलदार उत्पन्न दाखला (3 वर्षाच्या उत्पन्नासहीत), जातीच्या ‘ड’ दाखल्याची झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.

डोमेसाईल/डोंगरीदाखला/स्थानिक रहिवाशी दाखला(SEC) : तलाठी रहिवाशी दाखला, शाळा सोडलेचा दाखला/ जन्मनोंद, दहावी किंवा बारावी प्रमाणपत्र/मार्कलिस्ट, रेशन कार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.

गॅझेट (राजपत्र) : नावात बदल वेगळी नावे असणारे दोन पुरावे, उदा. मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, 7/12 किंवा 8 अ उतारे, ॲफिडेव्हीट, इतर, जन्मतारखेत बदल : जुनी जन्म तारीख व नविन जन्म तारीख यांचे पुरावे व मतदान ओळखपत्र, आधारकार्ड झेरॉक्स इत्यादी

रेशनकार्डवर नाव वाढवणे : मुलांची नावे वाढवण्यासाठी – जन्म दाखला, बोनाफाईड, आधारकार्ड झेरॉक्स, स्वत:चे रेशनकार्ड, पत्नीचे नावे वाढवण्यासाठी -विवाह नोंद दाखला व जुन्या रेशनकार्ड मधील नाव कमी केलेचा दाखला. (पत्नी तालुक्याच्या बाहेरची असेल तर नाव कमी केलेचा दाखला किंवा पत्नी तालुक्यातील असेल तर माहेरचे रेशनकार्ड) आधारकार्ड झेरॉक्स व स्वत:चे रेशनकार्ड.

जातीचा दाखला : तलाठी रहिवाशी व जातीचा दाखला, अर्जदार शाळा सोडलेचा दाखला, जन्म नोंद दाखला किंवा बोनाफाईड, वडील, आजोबा, पणजोबा, चुलत आजोबा, चुलत पणजोबा, यांचा शाळा सोडलेचा दाखला, जन्म नोंद दाखला किंवा बोनाफाईड (मयत असल्यास मृतयुनोंद) सदर दाखल्यावर जातीचा उल्लेख असणे आवश्यक आहे, ओबीसी साठी 1967 पूर्वीचा जात पुरावा, एसबीसीसाठी 1961 पूर्वीचा जात पुरावा, व्हीजेएनटीसाठी 1961 पूर्वीचा जात पुरावा, एस.सी. साठी 1950 पूर्वीचा जात पुरावा, कुणबीसाठी 1920 ते 1930 मधील पुरावा, पोलीस पाटील व सरपंच यांचे सहीने वंशावळ, सरळ वंशावळ नसल्यास महसूली पुरावे, रेशनकार्ड झेरॉक्स, आधारकार्ड झेरॉक्स, फोटो.

आधारकार्ड : नवीन -18 वर्षावरील : मतदान ओळखपत्र व रेशनकार्ड 5 ते 18 वर्षामधील : जन्म नोंद दाखला/ बोनाफाईड, ग्रामपंचायत रहिवाशी दाखला व रेशनकार्ड.5 वर्षाखालील : जन्म नोंद दाखला किंवा बोनाफाईड, आई/वडिलांचे आधारकार्ड

दुरुस्ती – विवाहानंतर असेलतर : जुने आधारकार्ड फोटो लावून ग्रामपंचायत रहिवाशी दाखला (फोटोवर गोल शिक्का मारुन व रेशनकार्ड) नाव, पत्ता किंवा जन्मतारीख : फोटोलावून ग्रामपंचायत रहिवाशी दाखला, पॅनकार्ड, बोनाफाईड/ जन्म दाखला व रेशनकार्ड.

पॅनकार्ड : 2 फोटो, आधारकार्ड झेरॉक्स, जन्मतारखेचा पुरावा, (जन्मनोंद/ दहावी बोर्ड सर्टिफिकेट/ॲफिडेव्हीट) (टिप : आधारकार्डवर संपूर्ण जन्मतारीख असलेस जन्मतारखेचा पुरावा लागत नाही)

नविन किंवा विभक्त रेशनकार्ड : स्वत:चे नावे घरठाण उतारा, स्वत:चे नावे घरपटटी पावती, स्वत:चे नावे लाईट बील, तहसिलदार यांच्या सहीचा उत्पन्न दाखला, धान्य दुकानदार यांचा विभक्त असलेला दाखला, पोलीस पाटील यांचा विभक्त असलेला दाखला, जुन्या रेशनकार्डची झेरॉक्स, 100 रु. स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र (आई-वडीलांच्या रेशनकार्डमध्ये किमान एक मुलगा तरी राहिला पाहिजे, जर मुलगा विभक्त किंवा नविन रेशनकार्ड दिले जाणार नाही.)

रेशनकार्डवरील नाव कमी करणे : मयत नाव कमी करणेसाठी मृत्यु नोंद दाखला व मूळ रेशनकार्ड, विवाह झालेले नाव कमी करणेसाठी विवाह नोंद दाखला व मूळ रेशनकार्ड, नोकरी किंवा इतर कारणास्तव नाव कमी करणेसाठी तेथील तलाठी रहिवाशी दाखला किंवा नोकरीचे पत्र व मूळ रेशनकार्ड.

शासनाने नागीरकांना त्रास होऊ नये यासाठी विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. ई-सेवाकेंद्र, आपले सरकार, सेतु या सारख्या सुविधा नागरिकांच्या उपयोगासाठी आहेत. या सुविधा केंद्रांवर काही अडचणी आल्या तर त्यासाठी तक्रार केंद्र देखील आहेत. नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा. विनाकारण दलालांकडे पैसे घालवू नये अशा सुचना शासन वारंवार देत असते. वर नमूद दाखल्यांसाठी लागणारी कागदपत्रे (चेकलीस्ट) तयार ठेवली तर, भविष्यात दाखले मिळवताना वेळेची व पैशाची बचत होईल, आवश्यक असणारी कागदपत्रे अगोदरच तयार करुन ठेवणे अधिक हिताचे आहे.

विभागीय माहिती कार्यालय,

कोकण भवन, नवी मुंबई

भारताने ‘वेलनेस’ क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

0

मुंबई, दि. 16 : आज ‘वेलनेस’ अर्थात निरामय जीवन हा मोठा जागतिक उद्योग झाला आहे. ‘वेलनेस’ म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्य नसून ते शारीरिक, मानसिक व भावनिक संतुलित स्वास्थ्य आहे.  ‘वेलनेस’च्या क्षेत्रात भारत पूर्वीपासूनच सामर्थ्यवान असून देशाने या क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि. १५) राजभवन येथे फिटनेस व वेलनेस उद्योग क्षेत्रातील ४० व्यक्तींना ‘ग्लोबल वेलनेस डे’ पुरस्कार  प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रेखा’ज झेप फाउंडेशन व वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाला ‘वेलनेस’ राजदूत रेखा चौधरी, चित्रपट निर्मात्या स्मिता ठाकरे व अभिनेते विद्युत जामवाल प्रामुख्याने उपस्थित होते.

निरोगी जीवनासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या संपन्न असणे पुरेसे नाही तर मानसिक स्वास्थ्य देखील विशेष महत्त्वाचे आहे. आज अमेरिकेत संपन्नता असली तरीही मानसिक अस्वास्थ्यामुळे लहान मुले व युवक बंदुकीच्या मदतीने हिंसाचार करीत असल्याच्या घटना घडत आहेत.

निरोगी जीवनासाठी योग, ध्यानधारणा, शांती, संगीत  व संतुष्टी आवश्यक असल्याचे मत राज्यपालांनी व्यक्त केले. या दृष्टीने एकाग्रता व तितिक्षा देखील आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आज योगामुळे जग भारताकडे अपेक्षेने पाहत आहे. त्यामुळे भारताने निरामय जीवन जगण्यासाठी जगाला मार्गदर्शन करावे असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी अभिनेते विद्युत जामवाल, स्मिता ठाकरे, फारुख कबीर, सोनाली सेहगल, दारासिंह खुराणा, आकांक्षा सिंह, दर्शन कुमार, मानव मंगलानी, अब्दुल कादर, रेणू कांत, शिला अय्यर आदींचा सत्कार करण्यात आला.

प्रत्येक जिल्ह्यात विज्ञान आणि नाविन्यता केंद्र उभारणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे दि.१६: विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विज्ञान आणि नाविन्यता केंद्र अत्यंत उपयुक्त असून प्रत्येक जिल्ह्यात असे केंद्र उभारण्यासाठी पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र परिसरात उभारण्यात आलेल्या सायन्स ॲण्ड इनोव्हेशन ॲक्टिव्हीटी सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र शासन, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग आणि टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र उभारण्यात आले आहे.

कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर, उद्योगपती गौतम अदानी, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक सावंत, डॉ. सी. डी.माई, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, प्रीती अदानी, होमी भाभा विज्ञान आणि संशोधन केंद्राचे डॉ.अर्णव भट्टाचार्य, नेहरु विज्ञान केंद्राचे डॉ.सुब्रत चौधरी, तरुण वैज्ञानिक गोपाली जी., ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, राज्यात ६ ठिकाणी असे केंद्र उभारण्यात येत आहे. अशा केंद्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण होईल. जागतिक पातळीवर शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल होत असून आनंदाचा निर्देशांक अधिक असलेली राष्ट्रे प्रभावशाली तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मुलांना देतात. अशी नाविन्यपूर्ण आणि कौशल्याधारीत शिक्षण प्रणाली अनुकूल बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे शिक्षण देण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांनी या केंद्राचा स्वतःच्या प्रगतीसाठी उपयोग करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

कौशल्य विकास आणि उत्तम तंत्रज्ञानावर भर
उद्याचे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये विविध आव्हानांवर मात करण्याचे सामर्थ्य निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य शासनातर्फे कौशल्य विकासावर भर देण्यात येत असून ‘स्वजीवी महाराष्ट्र’ उपक्रम सुरू केला आहे. युवकांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे वातावरण देण्याचा प्रयत्न आहे. उत्तम दर्जाचे व्यवसाय शिक्षण विद्यार्थ्यांना देणे आवश्यक असून त्यासाठी शिक्षकांचेही प्रशिक्षण महत्वाचे आहे , असे त्यांनी सांगितले.

वैज्ञानिक मनोभूमिका यशासाठी महत्वाची-खासदार शरद पवार
ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार म्हणाले, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात विज्ञानाविषयी आस्था निर्माण करणारा हा प्रकल्प आहे. या केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि उत्सुकतेत भर पडेल.  जीवनात पुढे जाण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा लागेल.  विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक मनोभूमिका तयार केल्यास जीवनात यश नक्की मिळेल.  विज्ञान आणि नाविन्यता केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञानाची झेप लक्षात येईल आणि त्यातून वैज्ञानिकदृष्टी विकसित होईल, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल, विज्ञानाविषयी आकर्षण कायम राहून प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वैज्ञानिकदृष्टी निर्माण होणे गरजेचे-अनिल काकोडकर
विज्ञान केंद्राचे सर्वात पुढारलेले स्वरूप बारामतीला साकारत आहे. एक लाख विद्यार्थ्यांनी केंद्राला आतापर्यंत भेट दिली आहे. विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वैज्ञानिकदृष्टी निर्माण होणे गरजेचे असून त्यासाठी केंद्र उपयुक्त ठरेल. प्रत्येक विद्यार्थ्याला वर्षातून एकदा या केंद्रात जाता यावे असा प्रयत्न आहे.

वैज्ञानिक प्रक्रियेचा आनंद अनुभवण्याची संधी या केंद्रात आहे.  स्वतः नवीन काहीतरी शोधण्यासाठी सुविधादेखील आहेत. प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांचा एक वर्ग केंद्रात घ्यावा आणि त्यांना तज्ज्ञांनी माहिती द्यावी.  ग्रामीण भागापर्यंत विज्ञान पोहोचविण्यासाठी नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझिअमच्या माध्यमातून ‘सायन्स ऑन व्हील्स’ सारख्या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न व्हावा आणि विद्यार्थ्यानी नवनिर्मितीकडे वळावे असे आवाहन त्यांनी केले.

खासदार श्रीमती सुळे म्हणाल्या, देशातील अत्यंत आधुनिक विज्ञान केंद्र बारामतीत उभे राहत आहे. याचा उपयोग परिसरातील विद्यार्थ्यांना होईल. भविष्यातील यशासाठी विज्ञान आणि नाविन्यतेशिवाय दुसरा पर्याय नाही.

प्रास्ताविकात ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी विज्ञान आणि नाविन्यता उपक्रम केंद्राविषयी माहिती दिली.  केंद्रामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच वैज्ञानिक वृत्ती वाढीस लागेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधनाची संधी मिळेल आणि त्यातून चांगले उद्योजक तयार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सारंग साठे यांनीदेखील यावेळी विचार व्यक्त केले. शारदा संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीस विज्ञानगीत सादर केले. ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आणि रयत शिक्षण संस्था सातारा यांच्यात यावेळी सामंजस्य कराराचे आदानप्रदान करण्यात आले. तसेच, नेहरु विज्ञान केंद्र आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने तयार केलेल्या प्रकल्पाचे ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टला हस्तांतरण करण्यात आले.

शिष्यवृत्तीधारक युवकांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समाजाला उपयोग व्हावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

0

पुणे दि.16: शरद पवार इन्स्पायर फेलोशीप शिबिरात सहभागी युवकांनी आपल्या नव्या संकल्पनांचा समाजाला उपयोग करून देण्याचे ध्येय समोर ठेवताना सातत्यपूर्ण प्रयत्नांवर भर द्यावा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

बारामती येथे आयोजित शरद पवार इन्स्पायर फे‍लोशिप उन्हाळी शिबिराच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ.अनिल काकोडकर, उद्योगपती गौतम अदानी, खासदार सुप्रिया सुळे, एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.विवेक सावंत, डॉ.सी.डी. माई, प्रीती अदानी, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, शिबिरात सहभागी युवकांची राज्यभरातून निवड झाली असल्याने त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण आणि कृषी, कला, साहित्य, संरक्षण, क्रीडा आदी विविध क्षेत्रात योगदान असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार अशा दोन मोठ्या व्यक्तिमत्वांची नावे शिष्यवृत्तीशी जोडली गेली असल्याने त्याला साजेसे कार्य करण्याची जबाबदारी शिबिरात सहभागी युवकांवर आहे. शिबिराच्या माध्यमातून समाजाला उपयुक्त असणारा वेगळा विचार करणारे तरुण पुढे यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, समाजासाठी आवश्यक कृषी आणि कृषीपुरक व्यवसायाशी निगडित नव्या कल्पना तरुणांनी पुढे आणाव्यात. आज शेतीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. कृषी क्षेत्रात जागतिकस्तरावर नवे संशोधन होत आहे. हे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी नव्या संकल्पना समोर आणाव्यात, आपल्या प्रयत्नात आणि संशोधनात सातत्य ठेवावे. समाजाला उपयुक्त असणारा हा उपक्रम पुढे जायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

सामाजिक जाणीव असलेला नागरिक घडविण्यासाठी उपयुक्त उपक्रम-डॉ.अनिल काकोडकर

डॉ.काकोडकर म्हणाले, नवे संशोधन, नव्या कल्पनांना मूर्त रुपात आणणे आणि  व्यवसाय सुरू करण्यासोबत सामाजिक जाणीव असलेला आदर्श नागरिक घडविण्यासाठी शरद पवार इन्स्पायर फे‍लोशिप उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. या उपक्रमातून तरुणांना आत्मविश्वास मिळेल. या माध्यमातून नेतृत्वाची शृंखला तयार व्हावी आणि वैयक्तिक जीवनात प्रगती करताना तरुणांनी समाजात मोठ्या क्रांतीसाठी आपले कर्तव्य पार पाडावे.

मोठे ध्येय गाठताना क्षमतेसोबत निवडलेल्या क्षेत्राशी संबंधित वातावरणात असणाऱ्या समस्यांचा अभ्यासही महत्वाचा आहे. या समस्येतून मार्ग काढणे हेच उद्योजकांचे खरे कौशल्य असून परस्पर संवादातून हे शक्य आहे. त्यासाठी आत्मसात केलेल्या नव्या संकल्पनांचे परस्पर आदानप्रदान व्हावे. शिबिरातील युवकांनी एकमेकांशी जोडलेले राहून येणाऱ्या युवकांनाही मार्गदर्शन करावे, असे त्यांनी सांगितले.

श्री. सावंत म्हणाले, प्रेरणेतून उत्तमतेकडे हे ब्रीद घेऊन शिष्यवृत्तीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. जीवनात यशासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि दीर्घ प्रयत्न आवश्यक आहेत. मानवजात, पृथ्वी आणि अपेक्षित लाभ या गोष्टींमध्ये संतुलन साधत उत्तम उद्दिष्ट समोर ठेवावे. बुद्धिमत्ता आणि क्षमतेच्या बळावर सर्व साध्य करता येते.

प्रास्ताविक खासदार श्रीमती सुळे यांनी केले. फेलोशिपच्या माध्यमातून युवकांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात कारकीर्द घडविण्यासाठी त्यांना एक वर्ष मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यात येते.  हे विद्यार्थी देशाचा गौरव वाढवतील आणि त्यातून उत्तम उद्योजक घडतील आणि कृषी क्षेत्रालाही योगदान देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उत्तम उद्दिष्ट सादर करणाऱ्या तीन शिष्यवृत्तीधारकाना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उन्हाळी आणि हिवाळी शिबिरातील युवकांना प्रातिनिधिक स्वरुपात शिष्यवृत्ती धनादेशाचे वितरणही यावेळी करण्यात आले. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी आपले अनुभव मांडले.

एअरएशिया इंडियाच्या नेटवर्कचा उत्तर प्रदेशात विस्तार

११२ साप्ताहिक थेट उड्डाणांसह लखनौ आहे एअरएशियाचे नवे डेस्टिनेशन

पुणे १६ जून२०२२: एअरएशिया इंडियाने लखनौमध्ये आपल्या नेटवर्कचा विस्तार करण्याची घोषणा केली आहे. लखनौ ते बंगलोरदिल्लीगोवाकोलकाता आणि मुंबई या शहरांपर्यंतची थेट उड्डाणे एअरएशिया सुरु करत आहेज्यांचे शुल्क ४०६४ रुपयांपासून पुढे आहे. या उड्डाणांचे संचालन ५ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होईल. या उड्डाणांच्या शुभारंभाच्या निमित्ताने ठेवण्यात आलेल्या शुल्कांसह सर्व प्रमुख बुकिंग चॅनेल्सवर बुकिंग सुरु झाले आहे. नेउ पास टाटा नेउचा रिवॉर्ड्स प्रोग्राम आहेज्यामध्ये सदस्यांना अतिरिक्त सूट५% अश्यूअर्ड नेउ कॉईन्स आणि निःशुल्क रेड कार्पेट प्रायॉरिटी सर्व्हिस मिळते.

नेउ पास सदस्यांबरोबरीनेच विद्यार्थीज्येष्ठ नागरिकलघु व मध्यम व्यावसायिकडिपेन्डन्ट्स आणि सशस्त्र बलांचे कर्मचारी देखील airasia.co.in वर विशेष शुल्काचे लाभ मिळवू शकतात. आपल्या प्रवाशांना आकर्षक डील्सअनोखे लाभ आणि उत्कृष्ट मूल्य प्रस्तुत करत ही एअरलाईन प्रवाशांना मिळणाऱ्या अनुभवांमध्ये सातत्याने वाढ करण्यासाठी प्रयत्नशील आहे. बंगलोरदिल्लीगोवाकोलकाता आणि मुंबईसाठी नॉनस्टॉप कनेक्टिविटी देण्याबरोबरीनेच एअरएशिया इंडिया लखनौला आपल्या नेटवर्कमधील श्रीनगरकोचीनहैदराबादगुवाहाटी आणि इतर शहरांसोबत सुविधाजनक वन-स्टॉप आयटीनरीजमार्फत जोडणार आहे.

या घोषणेबाबत एअरएशिया इंडियाचे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री अंकुर गर्ग यांनी सांगितलेआमच्या नेटवर्कमध्ये लखनौचा समावेश करून आम्हाला अतिशय आनंद होत आहे. उत्तर प्रदेशात आम्ही ऑगस्ट २०२२ पासून सुरुवात करत आहोत. भविष्यात प्रवास क्षेत्रात दिसून येत असलेल्या प्रचंड संधी लक्षात घेऊन आम्ही नवे डेस्टिनेशन म्हणून लखनौची निवड केली.  लखनौहुन बंगलोरदिल्लीगोवाकोलकाता आणि मुंबईपर्यंत ११२ साप्ताहिक थेट उड्डाणे आमच्या प्रवाशांना सुविधाजनक आणि आनंददायी हवाईप्रवासाचा अनुभव प्रदान करतील. आमच्या कुशन्ड व आरामदायी सीट्सआमच्या पुरस्कार विजेत्या गौरमैर‘ मेन्यूतील ओव्हन-हॉट मील्सची विशाल श्रेणी आणि नेउ पासचे लाभ उत्तर प्रदेशातील प्रवाशांना अनोखा अनुभव प्रदान करतील.”

युजर्स त्यांच्या फ्लाईट्सचे बुकिंग airasia.co.in आणि एअरएशिया इंडिया मोबाईल ऍपवर करू शकतात.

पासूनपर्यंतनिर्गमनआगमनफ्रिक्वेन्सीपासून सुरु होणार
दिल्लीलखनौ७:२०८:२०दररोज५ ऑगस्ट २०२२
लखनौदिल्ली९:०५१०:०५दररोज५ ऑगस्ट २०२२
दिल्लीलखनौ२२:१५२३:१५दररोज५ ऑगस्ट २०२२
लखनौदिल्ली२३:४५०:४५दररोज५ ऑगस्ट २०२२
दिल्लीलखनौ१३:००१४:१०दररोज५ ऑगस्ट २०२२
लखनौदिल्ली२०:४०२१:४०दररोज५ ऑगस्ट २०२२
लखनौगोवा१४:५०१७:१५दररोज५ ऑगस्ट २०२२
गोवालखनौ१७:४५२०:१०दररोज५ ऑगस्ट २०२२
बंगलोरलखनौ१४:००१६:२५दररोज५ ऑगस्ट २०२२
लखनौबंगलोर१६:५५१८:५५दररोज५ ऑगस्ट २०२२
बंगलोरलखनौ६:५०९:१५दररोज१ सप्टेंबर २०२२
लखनौबंगलोर९:४५१२:१०दररोज१ सप्टेंबर २०२२
कोलकातालखनौ८:४०१०:१५दररोज१ सप्टेंबर २०२२
लखनौकोलकाता१०:५०१२:४०दररोज१ सप्टेंबर २०२२
मुंबईलखनौ१३:२०१५:३५दररोज१ सप्टेंबर २०२२
लखनौमुंबई१६:०५१७:५५सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार१ सप्टेंबर २०२२
लखनौमुंबई१६:०५१८:२०गुरुवार१ सप्टेंबर २०२२

पालखीनिमित्त पीएमपीएमएल च्या जादा बसेस ची व्यवस्था

0

पुणे-संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखीनिमित्त प्रस्थान सोहळ्यास पुणे शहर/उपनगरे
व संपूर्ण राज्यभरातून आळंदी व देहू येथे उपस्थित राहणाऱ्या असंख्य भाविक नागरिकांचे वाहतुकीची व्यवस्था नेहमीच्या
बसेसशिवाय जादा बसेस देवून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात येत आहे. भाविक व
नागरिकांच्या सोयीसाठी दिनांक 18/06/2022 पासून दिनांक 22/06/2022 पर्यंत आळंदी करिता स्वारगेट, म.न.पा.,
हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणावरून सद्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस
अशा प्रतिदिनी एकुण 130 बसेस संचलनात राहणार आहेत. दिनांक 21/06/2022 रोजी रात्रौ 12:00 वा. पर्यंत आळंदी
करिता बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय देहूकरिता पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी, या ठिकाणावरून
सद्याच्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा एकुण 22 बसेस महामंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय
देहू ते आळंदी अशा 10 बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत.
दिनांक 22/06/2022 रोजी पालखी प्रस्थान आळंदीमधून होत असल्यामुळे पहाटे 03:00 वा. पासून स्वारगेट, पुणे
स्टेशन, हडपसर, म.न.पा. या ठिकाणावरून आळंदीला जाणेकरिता जादा 18 बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या व्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणाऱ्या बसेस सकाळी 05:30 वाजले पासून पुणे व पिंपरी चिंचवड
परिसरातील बस स्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील 101 बसेस आळंदीसाठी भोसरी व विश्रांतवाडी पर्यंत भाविकांच्या
सेवेसाठी संचलनात राहणार आहेत. याशिवाय जादा बसेसची व्यवस्था ही प्रवाशांच्या गरजेनुसार (प्रवासी संख्या किमान 40
आवश्यक) देण्यात येईल.
तसेच पुण्याहून पालख्या प्रस्थानाच्या वेळेस दिनांक 24/06/2022 रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी
12:00 ते 1:00 दरम्यान थांबणार असल्याने अशा वेळेस महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी कोथरूड
डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी इ. ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच कात्रज
कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा देण्याची
व्यवस्था करण्यात आली आहे.

तदनंतर पालखी प्रस्थान सोहळा सोलापूर व सासवड रोडने मार्गस्थ होईल. अशा वेळी सोलापूर/उरूळीकांचन मार्ग
जसा जसा वाहतुकीसाठी खुला होईल तसतशी बसवाहतुक चालू ठेवण्यात येईल.
हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पुर्णत: बंद राहणार आहे. तथापि, प्रवासी/भाविकांच्या
वाहतुकीच्या सोईसाठी म्हणून सदर मार्गांची बसवाहतुक पर्यायी मार्गाने म्हणजेच दिवेघाट ऐवजी बोपदेव घाट मार्गे अशीचालू ठेवण्यात येणार असून सदर बसेसचे संचलन स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर असे राहणार असून अशा 60 जादा बसेसचे
नियोजन करण्यात आलेले आहे.
तरी सदर बस वाहतुकीबाबतची नोंद सर्व संबंधित भाविक व इतर प्रवासी नागरिकांनी घेवुन त्याचा लाभ घ्यावा
आणि सहकार्य करावे असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

सशस्त्र दलांमध्ये युवावर्गाच्या भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजना

0

पुणे, 15 जून 2022

सशस्त्र दलांमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘अग्निपथ’ योजनेची माहिती, दक्षिण कमांड मुख्यालयाचे  चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल अरविंद वालिया यांनी आज पुण्यात दिली.  युवकांना  सशस्त्र दलांमध्ये  सेवा बजावता यावी यासाठीच्या  या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने 14 जून 2022 रोजी  मंजुरी दिली. या योजनेअंतर्गत निवडलेल्या युवकांना अग्निवीर म्हणून ओळखले जाईल.

“अग्निपथ योजना ही लष्कर आणि देशासाठी  एक परिवर्तनात्मक सुधारणा असून भारतीय लष्कराच्या मनुष्यबळ व्यवस्थापनात आदर्श बदल घडवून आणण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेची संकल्पना युवा पिढीमध्ये राष्ट्रभक्तीला चालना देणे, समाजाला कुशल मनुष्यबळ पुरवणे  आणि लष्करात अधिकाधिक तरुणांचा सहभाग  सुनिश्चित करणे, ही आहे. राष्ट्रभक्तीने  प्रेरित तरुणांना 4 वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलांमध्ये  सेवा बजावण्याची अनुमती अग्निपथ योजना देते. ”असे  जनरल वालिया यांनी सांगितले.

“युवावर्गाच्या अधिक समावेशामुळे लष्करात नवे चैतन्य निर्माण होईल आणि सशस्त्र दले अधिक तंत्रस्नेही होऊन   परिवर्तन घडेल, जी  काळाची गरज आहे”, असे त्यांनी सांगितले.

जनरल ऑफिसरनी आश्वासन दिले की नव्या  भरतीमध्ये  किमान शारीरिक, वैद्यकीय आणि व्यावसायिक निकष  सुनिश्चित करण्यासाठी सशस्त्र दल लागू असलेल्या मानकांशी कोणतीही तडजोड करणार नाही, हे जनरल वालिया यांनी स्पष्ट केले.  योजनेची  अंमलबजावणी आणि स्थायीकरणादरम्यान लष्कराची परिचालन क्षमता आणि सुसज्जता पूर्णपणे राखली जाईल, असेही त्यांनी आश्वस्त केले.

“मी ठामपणे सांगू इच्छितो की लष्कर आपली संस्कृती टिकवून ठेवेल –  ‘नाम, नमक और  निशान’  या आपल्या धर्मावर आणि  एकसंधता, सौहार्द व संघभावना यावर आधारित तत्त्वांवरची आपली संस्कृती आणि लष्करी मूल्ये, आपला समृद्ध वारसा, इतिहास, परंपरा यांची जोपासना लष्कर कायम करेल, ” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.

या योजनेच्या अंमलबजावणीमुळे भारतीय सशस्त्र दले सरासरी 4-5  वर्ष तरुण होतील, असा अंदाज आहे. देशाला, समाजाला आणि देशातील युवा वर्गाला अल्प लष्करी सेवेचा मोठा लाभ होईल. यामध्ये देशभक्ती, सांघिक कार्य, शारीरिक तंदुरुस्ती वाढवणे, देशाप्रती दृढ निष्ठा आणि बाह्य धोके, अंतर्गत धोके आणि नैसर्गिक आपत्तींच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा वाढवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची उपलब्धता यांचा समावेश होतो.

अग्निवीरांना तिन्ही सेवांमध्ये लागू असलेल्या जोखीम आणि हालअपेष्टांसाठी दिल्या जाणाऱ्या   भत्त्यांसह आकर्षक मासिक पॅकेज दिले जाईल. “चार वर्षांचा प्रतिबद्धता कालावधी पूर्ण झाल्यावर, अग्निवीरांना एककालिक ‘सेवा निधी’ पॅकेज दिले जाईल ज्यात त्यांचे योगदान त्यावरील जमा व्याज आणि व्याजासह त्यांच्या योगदानाच्या जमा झालेल्या रकमेशी  सरकारकडून जुळणारे योगदान समाविष्ट असेल” अशी माहिती चीफ ऑफ स्टाफ जनरल वालिया यांनी दिली.

या योजनेमुळे सशस्त्र दलांमध्ये युवा वर्ग  आणि अनुभवी कर्मचारी यांच्यात उत्तम  संतुलन राखले जाऊन  अधिक तरुण आणि तांत्रिकदृष्ट्या निपुण लढाऊ दलाला चालना मिळेल.

पुण्यातील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेडला संसदीय कामकाज समितीची भेट

0

पुणे, 15 जून 2022

रसायने आणि खते विषयक संसदीय कामकाज समितीने दि. 13 व 14 जून 2022 रोजी पुण्यातील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेडला भेट दिली. समितीच्या अध्यक्षा कणीमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वातील या समितीच्या सदस्यांमध्ये लोकसभा आणि राज्यसभेच्या पुढील सदस्यांचा समावेश होता- दीपक बैज, प्रतापराव पाटील चिखलीकर, कृपानाथ मल्लाह, प्रभुभाई वसावा, सत्यदेव पचौरी, अरुणकुमार सागर, अयोध्या रामी रेड्डी अल्ला, जयप्रकाश निषाद आणि विजयपालसिंग तोमर. त्याबरोबरच, औषध विभागाचे आर्थिक सल्लागार एच.के.हजोंग आणि लोकसभा सचिवालयाचे अन्य वरिष्ठ अधिकारीही या दौऱ्यावर आले होते.

या संसदीय समितीने पिंपरी येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेडच्या कारखान्याला भेट दिली आणि तेथे उपलब्ध उत्पादन सुविधांची व उत्पादनांची प्रत्यक्ष पाहणी केली. कंपनीच्या भविष्यकालीन नियोजनाची माहितीही यावेळी त्यांना देण्यात आली. या स्थायी समितीच्या सदस्यांसमोर एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करण्यात आले. कंपनीच्या अडचणींवर सकारात्मक रीतीने विचार करण्याचे आणि तिच्या पुनरुज्जीवनासाठी उपायांची शिफारस करण्याचे आश्वासन या समितीच्या सदस्यांनी कंपनीला दिले.

 विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत

0

पुणे :  स्वातंत्र्यपूर्व काळातील शिक्षणाचे अध्वर्यू आणि शिक्षण प्रसारक मंडळीेच्या स्थापनेमागील प्रणेते विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या वेशातील कलाकाराने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना लाडू भरवून आणि औक्षण करून मंगलमय वातावरणात विद्यार्थ्यांनी ज्ञानमंदिरात प्रवेश केला. काहींनी हसत हसत तर काहींनी रडत आपला शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय केला.

शि.प्र. मंडळीच्या लोकमान्य नगर येथील एसपीएम इंग्लिश स्कूलच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे स्वागत  करण्यात आले. यावेळी  संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, शाळा समितीचे सदस्य सुधीर काळकर, मुख्याध्यापिका रमा कुलकर्णी आणि शिक्षक उपस्थित होते. रांगोळीने सजविलेले प्रवेशद्वार आणि ढोल ताशांच्या आणि तूतारीचा निनादात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तुतारी व शंख वादनाची माहिती व प्रात्यक्षिक तसेच ढोल-ताशा चे स्थिर वादन हे माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.

रमा कुलकर्णी म्हणाल्या, तब्बल २  वर्षांनी शाळा सुरू झालेल्या आहेत. एसपीएम इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाळा पुन्हा गजबजल्या आहेत, त्यांना शाळेत बघून शिक्षकांना खूप आनंद झाला आहे. २ वर्षांच्या कालावधीनंतर शाळेत आल्यामुळे  शिकण्याच्या प्रक्रियेत थोडा विलंब होऊ शकतो. त्यामुळे विविध शैक्षणिक साहित्यासह विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक सज्ज आहेत, असेही त्यांनी सांगितले.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या भेटीला चक्क पोलीस अन दिल्या शुभेच्छ्या…

0

पुणे :  पोलिसांची भीती मनात बाळगू नका. तुम्हाला कोणत्याही अडचणी आल्या तर पोलीस काकांशी किंवा पोलीस ताईंबरोबर तुम्ही बिनधास्त बोलू शकता. कोणती अडचण आली तर तात्काळ पोलिसांशी कसा संवाद साधायचा अशा गप्पा गोष्टींमधून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी पोलीस काका व पोलीस ताईंबरोबर मैत्री केली. यावेळी बंदुक, वॉकी टॉकीचा वापर कसा व कोणत्या प्रसंगी केला जातो याची माहिती पोलिसांनी दिली.

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही वसंतदादा पाटील हायस्कूल मनपा शाळा क्रमांक १ मध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, शिक्षण उपसंचालक प्रसाद काळंगावकर, शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल भरेकर, मुख्याध्यापिका शालिनी सोनावणे, पोलीस कर्मचारी दिलीप मोहिते, सोमनाथ ढगे, सचिन माळी, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, सेवा मित्र मंडळ ट्रस्टचे शिरीष मोहिते, विक्रांत मोहिते, अमर लांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन उमेश कांबळे, रोहन जाधव, अॅड. हेमंत झंझाड यांनी केले. विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल, रेवडी व शालेय पुस्तकांचा संच देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच दामिनी पथकाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

सतीश गोवेकर म्हणाले, शाळा शिकताना जीवनाचा आनंद देखील तुम्ही घ्या. प्रत्येकाने मोठा अधिकारी किंवा डॉक्टर, इंजिनियर झाले पाहिजे असे नाही. तर, तुम्ही चांगले नागरिक झालात तरी देखील देशाला पुढे नेऊ शकता. नेहमी तुम्हाला यश मिळतेच असे नाही,  अपयश पचवण्याची ताकत देखील तुमच्याकडे असली पाहिजे. अपयश आले म्हणून खचून न जाता त्यातून प्रेरणा घेऊन पुढे जाता आले पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले.

श्रीहरी बहिरट म्हणाले, शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो. शिक्षणाचा पाया मजबूत झाला, तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात मजबूतपणे उभे राहू शकता. पोलीस हे तुमच्या सुरक्षेसाठी आहेत, त्यामुळे कोणतीही अडचण आली तर न घाबरता त्यांच्याशी संवाद साधा. हल्ली मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती कमकुवत होत आहे. त्यामुळे मोबाईलच्या वापराची जिज्ञासा ही चांगली आहे का, की आपला पाल्य वाईट मार्गाला जात आहे याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. प्रसाद काळंगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विक्रांत मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. शिरीष मोहिते यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल भरेकर यांनी आभार मानले.            

आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाच्या ४ हजार ७०० विशेष गाड्या – परिवहन मंत्री अनिल परब 

0

मुंबई, दि. १५ : आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या सुमारे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केली.

श्री.परब म्हणाले, दिनांक ६ जुलै ते १४ जुलै, २०२२ दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी दि.८ जुलै रोजी २०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती येथून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून पंढरपूर येथे जाणारे वारकरी तसेच भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. परब यांनी केले.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या पालख्यांचा सोहळा साधेपणाने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील मानाच्या पालख्या बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एसटी महामंडळाने विशेष बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. दोन वर्षांनंतर यंदा वारी सोहळा होणार आहे. यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. त्यामुळे भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे गावी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटी महामंडळावर आहे म्हणून पंढरपूर यात्रेसाठी सुमारे ४ हजार ७०० गाड्या सोडण्यात येणार असल्याचे श्री. परब यांनी यावेळी सांगितले.

विशेष गाड्यांचे नियोजन

औरंगाबाद -१२००, मुंबई -५००, नागपूर- १००, पुणे -१२००, नाशिक -१००० तर अमरावती येथून ७०० अशा प्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

चार तात्पूरर्ती बस स्थानके उभारणार

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पूर्ती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक… अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी, एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बसस्थानकांचे नियोजन

पंढरपूर येथे यात्रेसाठी येणाऱ्या व जाणाऱ्या भाविकांसाठी पुढीलप्रमाणे बस स्थानके व जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

बस स्थानक आणि जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बसेस खालीलप्रमाणे

१. चंद्रभागा बसस्थानक – मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार
२. भीमा यात्रा देगाव – औरंगाबाद, नागपूर व अमरावती प्रदेश
३. विठ्ठल कारखाना – नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर
४. पांडुरंग बसस्थानक – सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग

याप्रमाणे बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.

ममतांनी गोपाल गांधी आणि फारुख अब्दुल्लांची नावे सुचवली

काँग्रेस-शिवसेनेसह 16 पक्षांचा सहभाग

नवी दिल्ली-एनडीएच्या उमेदवाराविरोधात विरोधकांनी सहमतीनं एक उमेदवार द्यायचा, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. पवारांनीच राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी, असा आग्रह बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वच नेत्यांनी धरला. मात्र पवारांनी त्यास नकार दिला. ममता बॅनर्जींनी ही माहिती दिली. राष्ट्रपतीपदासाठीचा उमेदवार ठरवण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी विरोधकांची बैठक बोलावली होती. या बैठकीला १७ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते.सुमारे दोन तासांच्या बैठकीनंतर त्यांनी गोपाल गांधी आणि फारुख अब्दुल्ला यांच्या नावांचा प्रस्ताव मांडला. यानंतर शरद पवार यांनीही आम्ही नावांवर सर्वांशी चर्चा करत असल्याचे सांगितले.

या बैठकीत शिवसेना आणि काँग्रेससह 16 पक्षांचा सहभाग होता. संपूर्ण विरोधी पक्षाकडे एकच उमेदवार असावा, असे सर्वांचे मत होते. या बैठकीत आम आदमी पक्ष सहभागी झाला नाही. तर दुसरीकडे असदुद्दीन ओवैसीही निमंत्रण न मिळाल्याने नाराज झाले.

काँग्रेस, सीपीआय, सीपीआय(एम), सीपीआयएमएल, आरएसपी, शिवसेना, एनसीपी, आरजेडी, एसपी, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, जेडी(एस), डीएमके, आरएलडी, आययूएमएल आणि जेएमएमचे नेते या बैठकीला उपस्थित होते.

विविध शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध उपक्रमांचे आयोजन

0

पुणे -डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) विविध शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व शाळांमध्ये फुलांच्या माळा, तोरणे, फुगे, रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या अशी सजावट करण्यात आली होती. मिकी माऊस, डोरेमॅन, छोटा भिम, फ्रेंड  गणेशा असे विद्यार्थ्यांना आवडणारे कार्टून्स स्वागतासाठी सज्ज होते. सनई, चौघडा व तुतारींचे स्वर आणि बालगीते उत्साहात भर घालत होती. विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. गुलाबाची फुले देण्यात आली.
रानडे बालक मंदीरात ‘स्वच्छतेच्या सवयी’चे प्रबोधन करणारे कटआऊटस् लावण्यात आले होते. नवीन मराठी शाळेत सेवा-सहयोग संस्थेच्या सहकार्याने चारशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. मा. स. गोळवलकर गुरुजी शाळेत आजपासूून योग सप्ताह सुरु करण्यात आला. योगासनाची प्रात्याक्षिके करुन घेण्यात आली. ‘ओमकार आणि योगाभ्यास यांचे अभ्यासाशी नाते’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. संगीताच्या माध्यमातून सूर्य नमस्कार आणि योगासने या ‘संगीत योग’ विशेष कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी डीईएसच्या संस्थापकांच्या वेशभूषा साकारल्या. 
डीईएस, पूर्व-प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत रंगीबेरंगी फुग्यांची सजावट करण्यात आली होती. स्वागतास उभे असलेले आवडते कार्टून्स पाहून विद्यार्थ्यांना आनंद झाला. विद्यार्थ्यांसाठी पपेट शोचे आयोजन करण्यात आले होते. वर्गामध्ये गप्पा-गोष्टी आणि गाणी झाली. न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये (एनईएमएस) शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण जतन करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला होता. अवनी उकिरडे आणि तिचे वडील प्रमोद उकिरडे या दोघांचा आज शाळेचा पहिला दिवस ठरला. अवनीने एनईएमएसमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतला, तर तिचे वडील प्रमोद आज त्याच शाळेत कि‘डा शिक्षक म्हणून रुजू झाले.    

अहिल्यादेवी प्रशालेत दहावीच्या विद्यार्थिनींनी पुष्पवृष्टी आणि औक्षण करून पाचवीच्या विद्यार्थिनींचे स्वागत केले. विद्यार्थिनींनी सरस्वती पूजन केले. स्वागतासाठी नृत्य आणि संगीताच्या कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले होते. न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी तारांगणाची सफर केली. प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगीत शाळा आदींचा परिचय करुन देण्यात आला. छत्रपती शिवाजी महराजांच्या जीवनातील बोधकथा सांगितली. न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेचे ब्रीदवाक्य असणार्‍या ‘एकी हेच बळ’ या विषयावर आधारित नाट्यछंद वर्गाच्या विद्यार्थ्यांनी नाट्य सादर केले. विद्यार्थ्यांना पेढे, अक्षरपाटी, पुस्तके भेट देण्यात आली.

पवारांनी राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवावी,शिवसेनेचा आग्रह-इतिहासातील सर्वात वाईट सरकार;बैठकीत सूर

केंद्रातील सत्ताधारी भाजपने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली – सुभाष देसाई

केंद्रातील सत्ताधारी भाजपाने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली असून सर्व विरोधकांनी राष्ट्रपतीपदासाठी सक्षम उमेदवार ठरवावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे. पवार यांनी नकार दिल्यास राजकीय परिघाबाहेरील सर्वमान्य उमेदवार निवडावा, अशी भूमिका शिवसेनेच्यावतीने सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरविण्यासाठी नवी दिल्ली येथे आज पार पडलेल्या विरोधीपक्षांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भूषविले. या बैठकीला माजी पंतप्रधान देवगौडा, ममता बॅनर्जी( पश्चिम बंगाल), मल्लिकार्जून खरगे( काँग्रेस), अखिलेस यादव ( उत्तर प्रदेश), मेहबुबा मुफ्ती( काश्मीर), सुभाष देसाई( महाराष्ट्र), ई करीम( केरळ), जयराम रमेश( काँग्रेस), प्रफुल्ल पटेल( राष्ट्रवादी), टी. आर. बालू( तामिळनाडू), यशवंत सिन्हा( बिहार), रणदीप सुरजेवाला( काँग्रेस), प्रियंका चतुर्वेदी( शिवसेना), उमर अब्दुल्ला( नॅशनल कॉन्फरन्स), राजा ( तामिळनाडू) आदी 18 नेते उपस्थित होते.

चर्चेतील मुद्दे

  • भाजपने घटनेची चौकट मोडण्यास सुरुवात केली आहे. देशाने 75 वर्षांत जपलेली मूल्ये पायदळी तुडवली आहेत. संविधानिक यंत्रणांचा गैरवापर चालवला आहे. अशावेळी सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येऊन राष्ट्रपतीपदासाठी एकमुखाने उमेदवार ठरवावा व निवडून आणावा.
  • भाजप विरोधातील पक्षांना एकत्र आणण्याची सुरुवात महाराष्ट्राने केली. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी ही सुरुवात केली. केवळ राष्ट्रपती निवडीसाठी नव्हे तर सर्व विरोधी पक्षांनी एकजूट मजबूत केली पाहीजे.
  • शरद पवार यांनी ही निवडणूक लढवावी, असा शिवसेनेचा आग्रह आहे. त्यांचा नकार कायम राहिल्यास सर्वसामान्य, उज्वल प्रतिमेचा शक्य झाल्यास राजकीय परिघाबाहेरचा उमेदवार निवडावा.
  • हे देशासाठी प्रतिष्ठेचे पद आहे म्हणून ही निवडणूक महत्वाची असल्याची भूमिका शिवसेना नेते तसेच राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केली.
  • विरोधकांचे संयुक्त निवेदन

केंद्राने मूल्ये पायदळी तुडवली

यावेळी सर्व विरोधी पक्षाच्यावतीने संयुक्त निवेदन सादर करण्यात आले. केंद्रातील मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील आठ वर्षांपासून लोकशाही मूल्ये पायदळी तुडवत आहे. नागरिकांना दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. राज्यघटनेची चौकट मोडण्याची वारंवार प्रयत्न होत आहे.

इतिहासातील सर्वात वाईट सरकार

आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात वाईट सरकार असल्याची भावना यावेळी विरोध गटांतील नेत्यांनी व्यक्त केली. सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, तरुणांच्या हाताला रोजगार देण्यात हे सरकार अपयशी ठरले असा सूरही बैठकीत निघाला.

राज्यपाल कार्यालयाचा वापर होतोय

केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील दरी वाढत चालली आहे, असे यापूर्वी कधीही घडले नाही. राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी राज्यपाल कार्यालयांचा वापर केला जात आहे. याला विरोध दर्शविण्यासाठी सर्व विरोधी राज्यातील मुख्यमंत्र्यांची ऑगस्ट महिन्यात परिषद घेण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.