Home Blog Page 1913

शिंदे गटाला शिवसेनेचे नाव वापरता येणार नाही-नीलम गोऱ्हेंनी दिला घटनात्मक तरतुदींचा दाखला

0

मुंबई-जर एकनाथ शिंदेंचा गट कोणत्या पक्षात विलीन झाला नाही, तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात येईल. यामुळे एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव वापरता येणार नाही. शिंदे गटाला भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन व्हावे लागेल असे नीलम गोऱ्हे यांनी घटनात्मक तरतुदीचा दाखला देत म्हटले आहे. हा राज्य घटनेच्या परिषिष्ठाप्रमाणे तो कायदा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निष्ठा महत्त्वाची असते, मी पुन्हा एकदा शिवसेना फुलवण्यासाठी प्रयत्न करतो.ज्यांना माझ्यासोबत रहायचे आहे, त्यांनी रहावे ज्यांना जायचे त्यांनी जावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रमुख नेत्यांशी बोलताना सांगितले अशी माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली.

मुळ पक्षांचे नाव हे शिंदे गटाला वापरता येत नाही. त्यामुळे ते सर्व आमदारांना प्रहार किंवा भाजपमध्ये प्रवेश करावा लागेल. महाराष्ट्रात गैरसमज पसरवल्या जात आहे, की शिवसेना नाव हे शिंदे गटाला मिळणार यावर स्पष्टीकरण देत नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे. निवडणूक आयोगाचा जो नियम आहे. त्यावर निर्णय घेण्यात येईल. शिवसेनेची एक राज्यघटना आहे. त्यानुसार शिवसेनेची ही राज्यघटना आहे ती कायदेशीर प्रकिया पार पाडावी लागेल.

जर एकनाथ शिंदेंनी प्रहार किंवा भाजपमध्ये आपला गट विलीन केला, तर त्यांनी खांद्यावरून शिवसेनेचा भगवा उतरवला असे म्हणावे लागेल. असे म्हणत त्यांनी बंडखोर एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.

ठाकरे, शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा; बंडखोर एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंचे आव्हान

0

एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं? शिवसेना सोडली नाही तर पळून का गेलात ..?

मुंबई-ठाकरे, शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, असे आव्हान मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांना दिले. उद्धव यांनी शिवसेना भवनातील जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत ऑनलाइन मार्गदर्शन केले. जे सोडून गेले त्यांचे वाईट का वाटावं. मी जिद्द सोडली नाही, असा इशाराही त्यांनी दिला.शिवसेनाभवनात एक बैठक झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांना मार्गदर्शन केले. आदित्य म्हणाले, कुटुंबप्रमुखाला धोका देता याचे वाईट वाटते. धोका मित्रपक्षांनी दिला असता, तर समजू शकलो असतो. राज्यातील सर्व जनता उद्धव ठाकरेंसोबत असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

काही जण म्हणत होते, मेलो तरी शिवसेना सोडणार नाही. आज तेच पळून गेले. ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा, असे थेट आव्हान शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

मुंबईत राज्यातील प्रमुख जिल्हाप्रमुखांची बैठक झाली. यावेळी त्यांनी आपल्या सगळ्यांना पुन्हा जिद्दीने पक्ष उभा करण्याचे आवाहन केले. ठाकरे आणि शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा. माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरुन दाखवा, जे सोडून गेले त्यांचं मला वाईट का वाटावं, झाडीची फुलं न्या, फांद्या न्या, मुळं नेऊ शकत नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यानी बंडखोरांवर घणाघाती हल्ला चढवला.

एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थक आमदारांच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरुन हकालपट्टी केली. आता ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं? नगरविकास खातं दिलं, माझ्याकडील दोन खाती शिंदेंना दिली, असे सांगत मला सत्तेचा लोभ नाही, वर्षा सोडून मातोश्रीवर आलो, कोण कसं वागलं यात जायचं नाही, बंडखोरांकडून शिवसेना फोडण्याचं पाप, माझे मुख्यमंत्रीपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वकांक्षा आहे , असा घणाघात केला.

तुम्हाला भविष्य दिसत असेल तर खुशाल जा, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्याचवेळी त्यांनी बंडखोरी मागे भाजपचे कारस्थान असल्याचा आरोप केला आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेना नेत्यांच्या बैठकीत बोलत होते. मी वर्षा सोडली म्हणजे मोह सोडला, जिद्द सोडलेली नाही. स्वप्नातसुद्धा मी विचार केला नव्हता की मी यापदावर जाईन, त्या पदाचा मला कधीच मोह नव्हता. माझ्या मानेत ताण आला. खांद्यापासून पायापर्यंत हालचाल बंद झाली होती. काहींना वाटलं हा बरा होत नाही. काही लोक अभिषेक करत होते. काही देव पाण्यात बुडवून होते. बरा झाला नाही पाहिजे. माझी बोटं सुद्धा उघडत नव्हती . मला त्याची परवा नाही, मला आई जगदंबाने ताकद दिली जबाबदारी दिली, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 एकनाथ शिंदे दिल्लीला निघाले पण मधूनच माघारी पुन्हा परतले

0

मुंबई, 24 जून : एकनाथ  शिंदे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली पण काही वेळातच ते पुन्हा हॉटेल रेडिसनमध्ये परतले देखील..मग एकनाथ शिंदे मधूनच का परतले, का दिल्लीला जाणे रद्द झाले , कि एकनाथ शिंदे अन्यत्र कुठे गेले होते याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही .

काही वेळापूर्वी पोलीस बंदोबस्तात दोन-तीन आमदारांसोबत हॉटेल रेडिसनमधून बाहेर पडले होते.मात्र, आता एक तास उलटूनही एकनाथ शिंदे हॉटेलमध्ये परतलेले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित होत होता. नंतर शिंदे यांचे नवे लोकेशन उघड झाले होते..एकनाथ शिंदे सकाळपासून राजकीय नेत्यांच्या संपर्कात होते. सुरुवातीला असं सांगितलं गेली की गुवाहाटीमध्येच काहीतरी कामासाठी गेले आहेत, पण ते गुवाहाटीला नसून दिल्लीला रवाना झाल्याचं उघड झालं . आतापर्यंत हॉटेलमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक आमदाराच्या स्वागतासाठी एकनाथ शिंदे स्वतः हजर राहायचे.

मात्र, नुकतंच दिलीप लांडे यांनी हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे इथे उपस्थित नव्हते. त्याचवेळी शिंदे गुवाहाटीमध्ये आहेत की अन्य ठिकाणी रवाना झालेत असा प्रश्न विचारला जात होता. राज्याच्या राजकारणाला नवे वळण विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळच नॉट रिचेबल राज्यात वेळकाढूपणाला छेद देण्यासाठी एकनाथ शिंदे गटानं मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. आपल्यामागे दोन तृतीयांश शिवसेना आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. या गटाच्या मान्यतेसाठी त्यांनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

‘कर्मयोगी नमो’ लघुपट स्पर्धेचा रविवारी पुण्यात पारितोषिक वितरण समारंभ

0

पुणे -भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित कर्मयोगी नमो लघुपट स्पर्धेचा रविवार दिनांक २६ जून २०२२ रोजी कोथरुडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार असून, स्पर्धेतील विजेत्यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, प्रशांत दामले, मृणाल कुलकर्णी या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठचे ॲड. शैलेश गोजमगुंडे यांनी दिली.

भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक ॲड. शैलेश गोजममुंडे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीवर ‘कर्मयोगी नमो’ लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला राज्य व देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशभरातून एकूण १३५ स्पर्धेकांनी या स्पर्धेतून सहभाग घेत, एक ते बारा मिनिटाचे लघुपट सादर केले होते. यापैकी, काही निवडक लघुपट मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: पाहून विशेष पसंती दर्शवली होती. त्यापैकी, उत्कृष्ट लघुपटांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

येत्या रविवारी (दिनांक २६ जून २०२२) रोजी सकाळी ९ वाजता कोथरुडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मानसी मागीकर, युवा नाट्य सिनेअभिनेता आरोह वेलणकर हे देखील उपस्थित राहणार आहेत. या समारंभास पुणेकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकोष्ठच्या वतीने करण्यात आले आहे.

एक नाथ आणि त्याचे 40 आमदार पापी- बाळासाहेबांचा जयजयकार करून त्यांनाच देतात धोका

0

औरंगाबाद-बाळासाहेबांना ते बाप किंवा देव मानतात,त्यांचा जयजयकार करतात, आणि बाळासाहेबांच्याच मुलाशी गद्दारी करतात, कुठे फेडतील हे एक नाथ आणि त्यांची 40 सहकारी आमदार आशा स्वरूपाच्या वाक्यात ज्येष्ठ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भावूक होऊन आपली प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीवर दिली आहे .

ते म्हणाले, सरसेनापती बाळासाहेबांनी त्यांना ताकद दिली, पद दिले, आमदार केले. परंतु, त्याच्या मुलाला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाजूला करून स्वतः पद घ्यायचे. बंडखोरी करून आमदारांनी पाप केले आहे. हा बाळासाहेबांना धोका देणे आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ज्यांना शिवसेनेने मोठे केले, सर्वकाही दिले त्यांचे असे वागणे चुकीचे असे सांगताना खैरे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदारांनी पाठिंबा दिला आहे. यात एक कॅबिनेट, एक राज्यमंत्री आणि तीन आमदारांचा समावेश आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अशी वाताहत झाल्याने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे भावूक झाले आहेत. मुंबईवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट देऊन परत आल्यानंतर खैरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोरांनी केलेले कृत्य म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना धोका देण्यासारखे आहे. बंडखोर आमदार संजय शिरसाट रिक्षाचालक तर मंत्री संदीपान भुमरे कारखान्यात कामगार होते. अशा सामान्य शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी मोठे केलं.आमदार केले. अशा शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्राला बाजूला करून स्वतः पद घ्यायचे हे पाप आहे. महाविकास आघाडीच्या आग्रहावरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारले. अडीच वर्षांच्या कालावधीत त्यांनी अनेक कामे केली. शिरसाट, भुमरे यांनी सर्वात जास्त निधी मिळवला. त्यांना काय कमी केले. त्यांना काय कमी पडले, असा सवालही खैरे यांनी बंडखोरांना केला.

चुकले कुठे ? नितीमत्ता नाही राहिली
असे बंडखोरी करून काय मिळणार. ऐवढे सगळे मिळूनही त्यांनी बंडखोरी केली. पक्षाने त्यांना खूप काही दिले. आयुष्य बदले. मतदारसंघात मोठा विकास निधी मिळाला. महाविकास आघाडी अडीच वर्ष केवळ उद्धव ठाकरे यांच्यामुळे टिकली. त्यांना धोका देणे चुकीचे आहे. या लोकांकडे नितीमत्ता राहिली नाही, अशी खंतही खैरे यांनी व्यक्त केली.

ट्विटरवर राजकीय वॉर :धमक्याना भिक घालत नाही -एकनाथ शिंदे

0

शिवसेनेने 12 आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवले आहे. यानंतर बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे यांनी नवं ट्वीट करत याला  प्रत्युत्तर दिलं आहे.एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? असा थेट सवाल केला आहे, ते पुढे म्हणाले आहेत की, तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.

12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे, असे शिंदे म्हणाले आहेत.

नको त्या वयात धमक्या देणे शोभत नाही,..तर घर गाठणे कठीण होईल- नारायण राणेंची थेट शरद पवारांना धमकी

0

मुंबई-

 एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांना बहुमत सिध्द करण्यासाठी इकडे यावेच लागेल असे शरद पवारांनी म्हटले, यावर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत थेट शरद पवारांना इशारा दिलाय. राणे म्हणालेत की, माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल, असे नारायण राणे म्हणाले आहेत.


नारायण राणे म्हणाले आहेत की, आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही. तसेच त्यांनी संजय राऊतांवर देखील निशाणा साधला, संजय राऊत तुमचे (शिवसेना) किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा, अशी खोचक टीका केली आहे.

वारकऱ्यांची सेवा करण्याचे व्रत निशब्द करणारे : डॉ. श्रीपाल सबनीस

0

पिंपरी / प्रतिनिधी

वारकऱ्यांना जात – पात, धर्म नसतो. पंढरीला जाणारी वारी म्हणजे माणसाच्या सद्भावनेची वारी आहे. या मध्ये सर्व धर्मातील लोकांचा सहभाग असतो. माणसातल्या सत्य व अध्यात्म निष्ठेची ही वारी आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत व कष्टकरी जनता आघाडीने मानवता, विठ्ठलाच्या सेवेचा ध्यास घेतला आहे. त्यांनी वारकऱ्यांची सेवा करण्याचे घेतलेले व्रत निशब्द करणारे असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष जेष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत व कष्टकरी जनता आघाडीच्या वतीने वारकऱ्यांना विविध प्रकारच्या १८ सेवा मोफत दिल्या जात आहेत. त्या उपक्रमाचे व त्या वेळेस हेल्पलाईनचे उदघाटन डॉ. सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सबनीस बोलत होते.

पिंपरी चिंचवड मधील निगडी, पिंपरी येथून तर पुणे येथे संत देवाजी मंदीरा समोर वारकऱ्यांची सेवा हा उपक्रम सुरू करण्यात आला. महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे‌‌ यांच्या नेतृत्वाखाली पुणे महाराष्ट्र पंचायतचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी
डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते 18 सेवा हेल्पलाईनचे उदघाटन करण्यात आले.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, नगरसेवक रवींद्र धंगेकर, ग्राहक समितीचे अध्यक्ष सूर्यकांत गवळी, रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे, माता रमाई स्मारक समितीचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, रूग्ण हक्क परिषदेचे उमेश चव्हाण, आनंद तांबे, दत्तात्रय शिंदे, राजू पोटे आदी उपस्थित होते.

या वेळी बाबा कांबळे म्हणाले की, वारकऱ्यांच्या सेवेतच विठुमाऊलीचे दर्शन आम्हाला मिळत आहे. त्यामुळे वारकऱ्यांची सेवा करण्याचा ध्यास आम्ही घेतला. त्यांना विविध प्रकारच्या १८ सेवा दिल्या जात आहेत. संघटनेचे पदाधिकारी या मध्ये सहभागी आहेत.निगडी, पिंपरी बोपोडी आता पुणे शहरात हि सेवा देण्यात आली, उद्या हडपसर येथे हि सेवा दिली जाणार आहे, पंढरपूर पर्यंत ही सेवा आम्ही देणार आहोत. वारकऱ्यांना सेवा देणे हे समाधान देणारे, असल्याचे प्रतिपादन बाबा कांबळे यांनी केले.
आरोग्य सेने तर्फे एक लाखांपेक्षा अधिक रकमेची औषधे उपलब्ध करून देण्यात आली, डॉ. समीर शेख यांनी वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली,
महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष शफिक भाई पटेल, सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष मुराद काजी, अरशद अन्सारी, अविनाश वाडेकर, विलास केमसे,आयाज शेख, किरण एरंडे, स्वामी महालिंग, कुमार शेट्टी, मोहम्मद शेख, संजू शिंदे, संजय गुजलेकर, हुसेन शेख, अकबर शेख, तौफिक कुरेशी, सलीम सय्यद, सलमान तांबोळी, मुक्तार कोतवाल यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. डॉक्टर समीर शेख मोफत यांनी आरोग्य सेवा दिली.

शाळाबाह्य बालकांसाठी ५ ते २० जुलै दरम्यान ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’

0

मुंबई, दि. 23 :- शाळेत दाखल होण्यास पात्र शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेशित करणे तसेच बालकांची शाळेतील गळती शून्यावर आणण्यासाठी येत्या ५ जुलै ते २० जुलै २०२२ या कालावधीत ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’ व्यापक स्वरूपात राबविण्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.

बालकांना मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम राज्यात लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, बालकांनी नियमित शाळेत येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळणे हा हक्क प्राप्त झाला आहे.

राज्याच्या या महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रमात महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्याक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य व गृह या विभागातील अधिकाऱ्यांच्या सहभागाने हे ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’ राबविण्यात येणार आहे.

मिशन झिरो ड्रॉपआऊट ची कार्यपद्धती

मिशन झिरो ड्रॉपआऊट मध्ये बालकांचा शोध घेताना ग्रामपंचायत/ नगरपरिषद/ महानगरपालिकातील जन्म मृत्यू अभिलेख्यामधील नोंदी, कुटुंब सर्वेक्षण, तात्पुरते स्थलांतरित कुटुंबात असणाऱ्या बालकांची माहिती, शाळाबाह्य, अनियमित बालके यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची कार्यवाही करण्यात येईल. ही मोहीम वस्ती, वाडी, गाव, वॉर्ड या स्तरावर पूर्ण करण्यात येईल. तर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक)/ जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास), बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण व नागरी) यांच्याकडून गाव, केंद्र, बीट, विभाग व शाळा स्तरानुसार नियोजन करण्यात येईल.

या अभियानात एकही शाळाबाह्य/ स्थलांतरित बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात यावी, असे या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले असून यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर विविध नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांनी पुणे मेट्रोमध्ये केला विठुनामाचा जयघोष

0

१००  वारकऱ्यांना मेट्रोची सफर
पुणे : टाळ मृदूंगाचा गजर आणि वारकऱ्यांनी विठुनामाचा केलेला जयघोष अशा भक्तीमय वातावरणात वारकऱ्यांनी पुणे मेट्रोची सफर केली. पांडुरंग पांडुरंगच्या जयघोषाने निनादलेला हा भक्तीचा सोहळा पुणेकरांनी मेट्रोमध्ये देखील अनुभविला.


विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि सारथी कट्टा यांच्यावतीने  १००  वारकऱ्यांना मेट्रोची सफर घडविण्यात आली. गरवारे मेट्रो स्टेशन ते वनाजपर्यंत वारकरी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात विठूनामाचा जयघोष करीत मेट्रोची सफर केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर,अखिल कर्वे रोड गणेशोत्सव मंडळाचे चित्रसेन खिलारे, सारथी ग्रुपचे पराग ओझा, राजेश राठोड, निलेश लाटे, भारतीय जनता पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष सुनील पांडे, पुणे मेट्रोचे अतुल गाडगीळ, हेमंत सोनवणे, राजेश जैन, विनायक नवयुग मित्र  मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय फंड, सरचिटणीस वरूण जकातदार, उपाध्यक्ष समीर हळंदे, अभिजीत मोडक, खजिनदार गुणेश साने, रमेश गिरमकर उपस्थित होते. 

सुनील पांडे म्हणाले, पुण्यात विसाव्यासाठी पालखी थांबलेली असते. यावेळी खेडोपाड्यातून असंख्य वारकरी पुण्यात येतात. त्यांना पुणे मेट्रोची सफर घडवावी, आणि नवीन पुण्याची ओळख करुन द्यावी या उद्देशाने या मेट्रो सफरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  १०० पेक्षा अधिक वारकऱ्यांनी गरवारे मेट्रो स्टेशन ते वनाझ पर्यंत मेट्रो प्रवास केला. 

बंडखोरांना इथं यावंच लागेल ,विधानसभेच्या प्रांगणात यावंच लागेल- शरद पवारांचे सूचक विधान

0

अजित पवारांना बाहेरची स्थिती माहिती नसल्याने त्यांनी भाजपा यामागे नसावे असे म्हटले असेल

मुंबई-राज्याच्या बाहेर गेलेले नेते परत येतील त्यावेळी ते शिवसेनेला मतदान करतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. सरकार अल्पमतात आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेला आहे. विधानसभेत हे सरकार बहुमतात आहे, हे स्पष्ट होईल, असं शरद पवार म्हणाले. बंडखोरांना इथं यावंच लागेल ,विधानसभेच्या प्रांगणात यावंच लागेल,सूरत आणि आसामला जी व्यवस्था करणारी लोक दिसली ती अजित पवारांच्या परिचयाचे आहेत असं मला वाटत नाहीत. पण ते माझ्या परिचयाचे आहेत.आज जे हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत आहेत, त्यांना अडीच वर्षांपूर्वी हे समजलं नव्हतं का, असं शरद पवार म्हणाले.

अडीच वर्ष महाविकास आघाडीनं उत्तम कारभार केला, अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. करोना संकटाच्या काळात आरोग्य खात्यानं चांगलं काम केलं, असं असताना महाविकास आघाडीचा प्रयोग फसलाय असं म्हणतात हे राजकीय अज्ञान आहे, असं शरद पवार म्हणाले,त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर आता थेट भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला कुणाचा पाठिंबा आहे हे शरद पवारांनी त्यांच्या खास शैलीत उघड केलं आहे. अजित पवारांनी यामागे भाजप नाही असे म्हटल्याचे त्यांना सांगताच , अजित पवारांना याबाबत बाहेरची स्थिती ठाऊक नाही त्यामुळे त्यांनी तसे विधान केले असावे असे म्हटलेय. .प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या गोष्टी खऱ्या आहेत. सरकार बहुमतात आहे हे सिद्ध होईल, ठाकरे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल,असं शरद पवार म्हणाले. तिथं गेले त्या नेत्यांचं मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सोबत नको,त्यामुळं संजय राऊत असं म्हणाले. आसाममधून बसून नको , इथं येऊन बोला असं कालचं उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचं शरद पवार म्हणाले. गुप्तचर यंत्रणांचं यश अपयश आता चर्चा करण्याची वेळ नाही, असं शरद पवार म्हणाले.एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ टेलिव्हिजनवर पाहिला आहे. त्यामध्ये ते राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे असं म्हणाले. शरद पवारांनी थेट देशातील राष्ट्रीय पक्षांची यादी वाचून दाखवली. सीपीएम, सीपीआय, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचा पाठिबा त्यांना नाही, तर आहेत कोण हे सांगायची गरज नाही.

आपल्या बंडाला भाजपचा पाठिंबा -एकनाथ शिंदेंनी केले मान्य …

0

आपल्या बंडाला भाजपचा पाठिंबा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी आमदारांसमोर जाहीरपणे सांगितल्याचे वृत्त एबीपी माझा ने दिले आहे. तसेच आपल्याला काहीही कमी पडणार नसल्याचा दावा केला. दुसरीकडे दुपारी शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यास तयार आहे. मात्र, त्यासाठी चोवीस तासांच्या आत येऊन उद्धव ठाकरेंसमोर आपली भूमिका मांडा, असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. यावर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक झाली. त्यानंतर महाविकास आघाडीसोबत काँग्रेस असल्याची भूमिका अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांनी मांंडली. नाना पाटोळे यांनी राज्यातील राजकीय महाभारत मागे भाजपच असल्याचा आरोप केला आहे तर दुसरीकडे भाजप नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याचे समजते.

बंडाळी मागे भाजपचा रोल दिसत नाही असे अजित पवार म्हणतात

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात नसल्याचे सांगत पाठराखण केली आहे. यामागे अजून कोणताही मोठा नेता भाजप दिसत नसल्याचेही अजित पवार म्हणाले. दरम्यान, बंडखोरांना शिवसैनिक पराभूत केल्याशिवाय राहणार नाहीत, असेही पवार म्हणाले. 

महाविकास आघाडी सरकार संकटात आल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीला सर्व आमदार, खासदार, मंत्री उपस्थित होते. काही व्हीसीवरुन, तर काही प्रत्यक्ष हजर होते. अजित पवार यांनी सांगितले की, महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरेंना आमचा खंबीर पाठिंबा राहिल. शेवटपर्यंत संघर्ष करत राहू, सरकार टिकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी दुपारीही मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे.  यापेक्षा दुसरी कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही. शिवसेनेबाबत जे काही निर्माण झालं आहे ते त्यांचे प्रवक्ते सांगतील.

बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल- शरद पवारांचा इशारा …

0

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसह आघाडीतील सर्व पक्षांच्या आमदारांना इशारा देत बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल असे म्हटले आहे. 

“महाविकास आघाडीचे सरकार टीकवण्यासाठी सगळे प्रयत्न करू. परंतु, बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल, असा थेट इशाराच शरद पवार यांनी दिलाय. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर शरद पवार लक्ष ठेवून आहेत. काल सांयकाळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. त्याआधी शरद पवार यांनी सरकार कोसळलं तर आम्ही विरोधी बाकावर बसू असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं. 

राज्यातील वेगवान घडामोडींमुळे मागच्या तीन दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या नेत्यांच्या देखील बैठका होत आहेत. आजही मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. सरकार गेलं तर संघर्षाची तयारी ठेवा, अशा सूचना शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदारांना  दिल्याची माहिती पुढे येत आहे. आज झालेल्या बैठकीला राज्याचे ग्रृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते  उपस्थित होते.  

दरम्यान, शरद पवार हे राज्यातील ग्रृह खात्यावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीच्या नेृत्वाला शिवसेनेचे आमदार बंड पुकारुन भाजपाची सत्ता असणाऱ्या गुजरातमध्ये जाणार असल्याची माहिती देण्यात राज्याच्या गृहखात्याबरोबरच गुप्तचर यंत्रणांना अपयश आल्याचं शरद पवार यांचं मत असून त्यांनी उघडपणे दिलीप वळसे-पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यातील महाभारतामागे भाजपच; पुरेसे संख्याबळ नसल्याने फडणवीस गप्प – नाना पटोले

0

मुंबई-राज्यात सुरू असलेल्या राजकीय महाभारतामागे भाजपच असून, त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही; त्यामुळे ते गप्प आहेत. मात्र, आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. गरज पडल्यास त्यांना बाहेरून पाठिंबाही देण्याची आमची तयारी आहे. महाविकास आघाडीत आम्ही आहोत आणि राहणारच अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका जाहीर केली.पटोले म्हणाले, काँग्रेस महाविकास आघाडीत राहणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे. भाजपने राज्यात सत्तासंघर्ष सुरु केला पण ते आजही समोर येत नाही. अजूनही आम्ही उद्धव ठाकरे सरकारच्या मागे आहे असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.पटोले म्हणाले, इडीचा धाक दाखवण्याचे काम भाजप करीत आहे. महाभारतामागे भाजप आहे, अजूनही भाजप शांत आहे त्यांच्याकडे संख्याबळ नसल्यानेच ते गप्प आहेत. राज्यात अस्थिरता असेल तर जनतेचे नूकसान होत आहे हे होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे.

नाना पटोले म्हणाले, राजकीय महाभारत शमायला हवे, अस्थिर व्यवस्थेत जनतेचे नूकसान होत आहे हे थांबावे ही काँग्रेसची भूमिका आहे. संजय राऊतांच्या वक्तव्यावरही चर्चा झाली. शिवसेनेत फुट पाडण्यासाठी भाजपचे कारस्थान सुरु आहे, हे वादळ शमवण्यासाठी संजय राऊत यांनी तसे वक्तव्य त्यांनी केले ते त्यांचे अंतर्गत वक्तव्य आहे असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले

काय म्हणाले अशोक चव्हाण?

भाजपला रोखण्यासाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष एकत्र आले. त्यानंतर किमान समान कार्यक्रमानुसार या तीन पक्षांनी सत्ता स्थापन केली. त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये असून पुढेही राहील अशी स्पष्टोक्ती काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आज दिली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.सह्याद्रीवर काँग्रेसची बैठक सुरु आहे, बैठक झाल्यावर अशोक चव्हाण बाहेर आले तेव्हा त्यांना माध्यमांनी प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी आपण महाविकास आघाडी सरकारमध्येच सहभागी आहोत आणि राहणारच अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.