Home Blog Page 1608

पंतप्रधानांना चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

पुणे-जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद येथील रानमळा येथील एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिठ्ठी लिहून जन्मदिनाच्या शुभेच्छा देत आत्महत्या केली.आत्महत्येआधी या शेतकऱ्याने एक चिठ्ठी लिहिली. त्यात त्यांनी आपल्या यातना व्यक्त केल्या. पंतप्रधान नरेंद मोदी यांचा शेतीवर कंट्रोल नाही. रिझर्व बँक ऑफ इंडियाने फायनान्स करणाऱ्या कंपन्यांवर अनेक निर्बंध घातले आहेत. मात्र, तरीही या कंपन्यांची दादागिरी कमी होत नाही. याच कंपन्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे या शेतकऱ्याने लिहिले आहे.फायनान्सवाले दमदाटी करतात. पतसंस्थावाले अपशब्द वापरतात. यामुळे आत्महत्या करत असल्याचे शेतकारी दशरथ केदारी यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. ते शेतकरी अल्पभूधारक असून त्याने शनिवारी आत्महत्या केली.

दशरथ लक्ष्मण केदारी असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबरला वाढदिवस झाला. एकीकडे त्यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 94 कोटी रुपये खर्चून भारतात आणलेल्या चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडत होते. तर त्याच्याच दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याने त्यांनाच शुभेच्छा देत आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केदारी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज होते. तसेच त्यांच्या शेतमालाला देखील बाजारभाव मिळत नव्हता. त्यात बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्जवसूलीसाठी त्यांच्या कडे तगादा लावला होता. तसेच त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी देखील केली जात होती. यामुळे केदारी यांनी शनिवारी शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली.

केदारी यांनी चिट्ठीत नमूद केले आहे की, रिझर्व बँक ऑफ इंडियाने फायनान्स करणाऱ्या कंपन्यांवर अनेक निर्बंध घातले आहेत. मात्र, तरीही या कंपन्यांची दादागिरी कमी होत नाही. याच कंपन्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत आहे.

दुर्गम भागातील रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांनी सॅटेलाइट केंद्रांच्या माध्यमातून दूर-दृश्य प्रणालीद्वारे टेलीमेडिसिन सेवा उपलब्ध करून द्याव्यात –नितीन गडकरी

0

नागपूर/मुंबई, 19 सप्टेंबर 2022


नागपूरच्या एम्स अर्थात अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचा चौथा स्थापनादिन आज साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संबोधित केले. एम्सच्या संचालक डॉ विभा दत्ता यांची याप्रसंगी उपस्थिती होती.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, की आता आरोग्य विषयक संस्थांमध्ये रुग्णांना भरती करून घेण्याची सुविधा 24 तास उपलब्ध करण्याबाबत विचार व्हायला हवा कारण आरोग्यविषयक समस्या कुठल्याही क्षणी उद्भवत असतात. ते म्हणाले की नागपूरच्या आसपासच्या भागात  मूत्रपिंड प्रत्यारोपण, विशेष करून सिकल सेल अॅनिमिया तसेच थॅलेसेमिया यांसारख्या समस्या असलेले  रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या भागांमधील अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या दोन समुदायांमध्ये 70% प्रमाणात सिकल सेल अॅनिमिया, थॅलेसेमिया यांची समस्या दिसून येते. यावर संशोधन व्हायला हवे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या एम्सचा उपयोग येथील लोकांना व्हावा, अवयव प्रत्यारोपणासारख्या सोयी सामान्य लोकांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न व्हायला हवे असे ते म्हणाले. या संस्थेत शस्त्रक्रियेसाठी उत्तम सुविधा आहेत, उत्तमोत्तम  तज्ञ डॉक्टर आहेत त्यामुळे  ज्या आजारांसाठी येथील गरीब रुग्णांना मुंबई, दिल्लीला जावे लागते त्यासंदर्भातील सुविधा रुग्णांना येथे उपलब्ध झाल्या तर त्यांचा मोठा फायदा होईल असे मत त्यांनी नोंदविले.

केंद्रीय मंत्री  म्हणाले की, “नागपूर आज मेडिकल हब म्हणून विकसित होत आहे, मध्य प्रदेश तसेच आजूबाजूच्या भागातून उपचारासाठी गरीब रुग्ण येथे येतात. गडचिरोली हा आकांक्षी जिल्हा आहे, तेथे आरोग्य सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे अशा दुर्गम भागातील गरीब, गरजू रुग्णांना  सॅटेलाईट केंद्रांच्या माध्यमातून या संस्थेतील डॉक्टर्स दूर-दृश्य प्रणालीद्वारे टेलीमेडिसिन सेवा उपलब्ध करून दिल्या तर त्या सामाजिक तसेच आर्थिकदृष्ट्या मागास भागातील रुग्णांना त्याचा मोठा लाभ मिळेल.”

नागपूर हे औषध निर्माणाच्या बाबतीत देखील पुढारलेले शहर आहे. एम्स संस्थेच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य लोकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी पातळीवर जी कामे करणे किंवा निर्णय घेणे आवश्यक असेल त्याची माहिती आपल्याला द्यावी,  अशी सूचना नितीन गडकरी यांनी एम्स प्रशासनाला केली.

कोविड काळात या संस्थेने उत्तम कार्य केले आहे. जसे वैद्यकीय विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळणे आवश्यक आहे तसेच सामान्य रुग्णांना देखील उत्तम प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

संस्थेच्या अद्ययावत इमारतीच्या कामाची केंद्रीय मंत्र्यांनी प्रशंसा केली. येणाऱ्या काळात ही संस्था जगातील सर्वोत्तम अशा प्रकारची संस्था असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एम्स संस्थेमध्ये येणारा रस्ता दुमजली पद्धतीने विकसित करण्याचे काम लवकरच सुरु होईल अशी माहिती त्यांनी दिली.

ऊर्जानिर्मितीसाठी सांडपाण्याचा वापर करून वर्षाला 300 कोटी रुपयांचा महसूल मिळविणारे नागपूर हे देशातील पहिले शहर आहे. येथे आता एम्स, आयआयएम, ट्रिपलआयआयएम, आयआयटी, सिंबायोसिस विद्यापीठ, उत्तमोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत, कायदेविषयक अशा उत्तमोत्तमशिक्षण संस्था आहेत, मिहान आहे. 11 सीटर फाल्कन जेट विमान निर्मितीचे काम या वर्षीच्या अखेरीस सुरु होईल असे त्यांनी सांगितले. येत्या 2-3 महिन्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम देखील सुरु होईल. एम्स संस्थेच्या नजीक नवे रेल्वे स्थानक उभारण्यावर विचारविनिमय सुरु आहे असे त्यांनी सांगितले. हा परिसर उत्तम प्रकारे विकसित झाला आहे. या संस्थेत येण्यासाठी आवश्यक बस सेवेच्या विकासात असेलल्या समस्या लवकरच सोडविल्या जातील असे ते म्हणाले. ही संस्था देशात पहिल्या क्रमांकाची संस्था व्हावी यासाठी आपण सर्व प्रयत्न करत आहोत. 

‘जेम’वर आतापर्यंत 3 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक सार्वजनिक खरेदी

0

मुंबई, 19 सप्‍टेंबर 2022

“मी 2017 पासून जेम (GeM- Government e-Marketplace) वर नोंदणी केल्यापासून माझा व्यवसाय वाढला आहे. पूर्वी, मी फक्त फोर्ट परिसरातील माझ्या दुकानाच्या परिसरात आणि फक्त मुंबईतच वस्तू पुरवू शकत होतो. आता, मी माझी उत्पादने सर्वत्र पाठवतो ! इंडिया पोस्ट आणि तीन खाजगी कुरिअर सेवा प्रदात्यांशी करार केला असून ते  माझ्या दुकानात वस्तू न्यायलाही येतात  आणि वेळेत त्या वितरितही  करतात”, हितेश पटेल सांगत होते. जेमवर नोंदणीकृत असलेल्या  मिलन स्टेशनर्स अँड प्रिंटर्स या फर्मचे ते मालक आहेत. 

जोसेफ लेस्ली डायनॅमिक्स मॅन्युफॅक्चरिंग प्रा.लि. या अग्निसुरक्षा उपकरणे पुरवठादार कंपनीचे व्यवस्थापक  उमेश नई सांगत होते की त्यांना जेमच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 30 कोटींच्या ऑर्डर मिळाल्या आहेत!  “जेममुळे व्यवसाय करण्याच्या खर्चात लक्षणीय घट झाली आहे.  विशेषत: यामुळे संभाव्य खरेदीदारांना भेटण्यासाठी प्रवासाची गरज कमी झाली आहे. आमची एमएसएमई कंपनी आहे,त्यामुळे  पोर्टलद्वारे प्रदान करण्यात येणारे   एमएसएमई विक्रेत्यांसाठी लाभ आमच्या कंपनीला  मिळतात. जेम हे खूप चांगले व्यासपीठ आहे. आमच्यासारख्या छोट्या कंपनीसाठी अत्यंत फायदेशीर आहे.”

एमएसएमई फर्म ओंकार एंटरप्राइझचे केतन चौधरी यांनी सांगितले की जेममुळे  त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत झाली. त्यांनी 2020 मध्ये जेमवर नोंदणी करून  प्रिंटर आणि टोनरची विक्री सुरू केली. आता ते संगणक आणि लॅपटॉपही विकत आहेत! “जेम आमच्यासारख्या लहान व्यवसायांना विस्तार करण्यात मदत करते”, असे त्यांनी सांगितले. 

सरकारी ई-मार्केटप्लेस जेम वरील अनेक  विक्रेत्यांनी आज मुंबई येथे आयोजित(विक्रेत्यांशी संवाद)मध्ये त्यांचे अनुभव सांगितले. यात  विक्रेत्यांना जेमची  नवीन वैशिष्ट्ये  आणि कार्यक्षमतेबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली.  यामुळे  त्यांना पोर्टलचा उपयोग अधिक सुलभतेने करता येतो. जेमचे महाराष्ट्र व  दमण आणि दीवसाठीचे बिझनेस फॅसिलिटेटर( व्यवसाय सुलभकर्ते) निखिल पाटील यांनी माहिती दिली की जेम  पोर्टल फक्त केंद्र सरकारच्या कार्यालयांपुरते मर्यादित नाही. हे केंद्र/राज्य सरकारी मंत्रालये, विभाग, संस्था आणि सार्वजनिक उपक्रमांसह सर्व सरकारी खरेदीदारांसाठी वन-स्टॉप ऑनलाइन खरेदी पोर्टल प्रदान करते.

आपल्या सादरीकरणात पाटील यांनी लघु आणि मध्यम उद्योगांना जेम पोर्टलच्या माध्यमातून  व्यवसाय करण्याचे लाभ सांगितले. सूक्ष्म आणि लघुउद्योगांना  विशेषत: एकच मालक असलेल्या उद्योगांना  आता जेम मंचावर  ऑर्डर स्वीकारण्याच्या वेळेस  कर्ज मिळू शकते. व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी गेल्या 24 महिन्यांत जेमवर अंदाजे 2,000 किरकोळ आणि 460 हून अधिक कार्यावली  सादर करण्यात आल्या आहेत.

या कार्यक्रमाला जेमचे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश संचालक आणि महाराष्ट्रातील जेमचे  नोडल अधिकारी निशांत दीनगवाल देखील उपस्थित होते. यावेळी पत्र सूचना कार्यालयाच्या  मुंबई प्रदेश  कार्यालयाचे उपसंचालक  दीपजॉय मामपल्ली हेही उपस्थित होते.

गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (जेम) :

राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी पोर्टल -गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (जेम ), ही  वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी अथपासून इतिपर्यंत सेवा पुरवणारी  ऑनलाइन बाजारपेठ आहे. सार्वजनिक खरेदीची पुनर्व्याख्या प्रस्थापित करण्याच्या  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेचा एक भाग म्हणून 9 ऑगस्ट 2016 रोजी या पोर्टलचा प्रारंभ करण्यात आला.  जेम संपर्कविरहित, कागदविरहित आणि कॅशलेस असून  कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सर्वसमावेशकता या तीन स्तंभांवर उभारलेले आहे. 

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या सुवर्णजडीत मंदीर निर्मितीसाठी खुल्या हृदयाने दान करावेः खासदार श्रीनिवास पाटील

श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट

पुणे, दिः19, सप्टेंबरः जगतगुरू संत श्री तुकाराम महाराज यांचे भंडारा डोंगरवर सुवर्णजडीत मंदीर निर्मितीसाठी १-१ रूपया जमा करू. आजच्या या संकल्पाला कल्प वृक्षात बदलू. त्यासाठी समस्त वारकरी, भाविक भक्त आणि महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनी खुल्या हृदयाने दान करण्याचे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट, मावळ, जि. पुणेचे यांच्यावतीने भंडारा डोंगर येथे जवळपास १५० कोटी रूपये खर्च करून सुवर्णजडित मंंदिराची निर्मिती करण्याचे कार्य सुरू झाले आहे. यासाठी लागणार्‍या निधी संकलनासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती, आळंदी देवाची, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट, अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांनी केलेल्या आवाहानानंतर खासदार श्रीनिवास पाटील यांनी १ महिन्याची १ लाख ११ हजार रूपये पेन्शन दिली. तसेच विविध शैक्षणिक संस्थांनी एक दिवसाचे वेतन, कारखानदार, उद्योगपती, भाविक भक्तांनी आपल्या यथाशक्ती नुसार दान राशीचे चेक दिले. तसेच, डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी स्व.उर्मिला कराड यांच्या सोन्याचे १०० तोळे दागिणे आणि संस्थेच्या कर्मचार्‍यांच्या एक दिवसाचे वेतन दिले. त्याच प्रमाणे समाजातील अन्य दानशुर व्यक्तिंनी यथाशक्ती दान दिले आहे.
यावेळी खासदार श्रीरंग अप्पा बारणे, शांती ब्रह्म मारूतीबाबा कुर्‍हेकर, माजी खासदार नानासाहेब नवले, माजी मंत्री कमलकिशोर कदम, श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती, आळंदी देवाची, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, बापूसाहेब मोरे, समाजसेवक उल्हासदादा पवार, मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्र कराड नागरे, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड, मदनमहाराज गोसावी, आळंदी देवस्थानाचो डॉ. अभय टिळक, आमदार सुनील शेळके, बाळा भेगडे, कृष्णराव भेगडे, डॉ.यू.म.पठाण, नितीन महाराज मोरे, राहुल कलाटे, बापूसाहेब देहूकर, संजोग वाघेरे, बाळासाहेब काशीद, भाऊसाहेब भेगडे यांच्यासह अनेक भक्तगण मोठया संख्येत उपस्थित होते.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, मंदिराच्या कार्याला योग्य दिशा देण्यासाठी आणि उभारणीसाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. मावळची भूमी ही भक्ती शक्तीची परंपरा असणारी आहे. येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना अभंग सुचले. तुकोबारायांचे चिंतनस्थळ असणार्‍या भंडारा डोंगरावर साकारलेले मंदिर जगाला प्रेरणा देईल.येथे मुख्यमंत्री, खासदार, भाविक भक्त, शेतकरी, प्रतिनिधी यांनी भेटे देऊन आपला सहयोग दयावा.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मंदिर निर्मितीचा संकल्प घेऊन जे कार्य सुरू केले आहे. त्याला प्रत्येकांनी हातभार लावला. येथे उभारण्यात येणार्‍या भव्य शिल्पामुळे जगद्गुरूंचे कार्य संपूर्ण जगभरात पोहचण्याचे कार्य लवकर होईल.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ज्ञानाचे तीर्थ क्षेत्र म्हणून हे उदयास येणार आहे. स्वामी विवेकानंद म्हणत असे की आपले हात हे घेण्यासाठी नाही देण्यासाठी सुध्दा असतात. याच न्यायानुसार उदार अंतःकरणाने मदत करून आपल्या घराण्याच्या नावलौकिकात व वैभवात भर पाडा. या सुवर्णजडित मंदिराच्या माध्यमातून भारताच्या वैभवात भर पडेल. याच अर्थाने भारत विश्वगुरू म्हणून संपूर्ण जगासमोर उदयास येईल.
उल्हास पवार म्हणाले, गाथेच्या जन्मभूमीत मंदिर उभारले जात आहे, हा सुवर्ण पर्वत आहे. येथील मंदिर सुवर्णमय करण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे.
या प्रसंगी नानासाहेब नवले व माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी आपले मनोगत मांडून जनतेस आवाहन केले.
प्रास्ताविक बाळासाहेब काशिद यांनी केले.
बापूसाहेब भेगडे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

विद्यार्थ्यांनी देशविकासाचा आणि विश्वकल्याणाचा मंत्र जपावा- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे, दि.१९: अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अभ्यास करताना देशविकासाचा, मानवतेचा आणि पर्यायाने विश्वकल्याणाचा मंत्र जपावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे अभियंता दिनानिमित्त आयोजित ‘सीओईपी अभिमान अवॉर्ड्स’ वितरण सोहळ्यात राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. कार्यक्रमास राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, सीओईपीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, सीओईपी संचालक प्रा. डॉ. मुकुल सुतावने, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भारत गीते, मानद सचिव प्रा. एस.एस. परदेशी आदी उपस्थित होते.

सीओईपीच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करताना राज्यपाल म्हणाले, येथून विश्वविख्यात अभियंता भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांच्यासह आपल्या क्षेत्रातील उच्च व्यक्तिमत्वे घडली. त्यांनी आपल्या मातृभूमीसाठी केलेले कार्य विद्यार्थ्यांसमोर ठेवले पाहिजे. आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे जात असताना त्या माध्यमातून देशासाठी काम करावे. आज आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना संपूर्ण जग भारताकडे आशेने पहात आहे. जगामध्ये आपापसात सहयोगाचे युग आले असून त्याचा लाभ अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असेही श्री. कोश्यारी म्हणाले.

श्री. कोश्यारी पुढे म्हणाले, सध्याचे युग हे कृत्रिम प्रज्ञा (एआय), इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आणि सायबर क्षेत्राचे असल्याने या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी काम करावे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक तरतुदी आहेत. आंतर विद्याशाखीय अभ्यास रचना केल्यामुळे विद्यार्थ्यांना एका क्षेत्रात शिक्षण सुरू असताना मध्येच त्याच्या आवडीप्रमाणे वेगळ्या क्षेत्रातील शिक्षणाकडे वळता येईल. या तरतुदींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले.

सामाजिक दायित्व जपत संस्थेसाठी व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याची भूमिका ठेवल्याबद्दल सीओईपीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे कौतुक करत भविष्यातही संस्थेच्या विकासासाठी माजी विद्यार्थी भरीव निधीद्वारे योगदान देतील, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

प्रतापराव पवार म्हणाले, या संस्थेचा मोठा इतिहास असून येथील विद्यार्थी शिक्षण घेत असताना ज्ञानाची निर्मिती करतात. महाविद्यालयाचे विद्यापीठामध्ये रूपांतर झाल्यामुळे ते ज्ञाननिर्मितीचे विद्यापीठ बनणार आहे. आपण देशातील नव्हे तर जगातील उत्तमोत्तम विद्यापीठाशी स्पर्धा करायला हवी. संस्थेला शासनानेही मोठे सहकार्य लाभत असून १५० कोटी रुपयांचा निधी तसेच नवीन कॅम्पस साठी ३० एकर जागा दिली आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत अभ्यासरचनेद्वारे भविष्य घडवावे, असेही त्यांनी आवाहन केले.

भारत गीते यांनी प्रास्तविकात कार्यक्रमाविषयी माहिती दिली.  माजी विद्यार्थी संस्थेच्या विकासासाठी तसेच शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भरीव आर्थिक मदत जमा करतात. १५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी १ कोटी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे, असे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा या कार्यक्रमासाठीच्या शुभेच्छा संदेशाची चित्रफीत दाखवण्यात आली. गौर गोपाल दास यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय जीवनविद्या प्रशिक्षक गौर गोपाल दास, राज पथ इन्फ्राकॉन प्रा. लि. चे संस्थापक अध्यक्ष व संचालक जगदीश कदम, लडाख केंद्रशासित प्रदेशाचे पोलीस प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक सतीश खंदारे, टाटा प्रोजेक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक पै, ‘एस्सार ऑइल अँड गॅस’चे माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी विलास तावडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी  या प्रसंगी सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेच्या स्मरणिकेचे प्रकाशन, तसेच संस्थेच्या इतिहास व घडामोडींवर आधारित चित्रफितीचे अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमास संस्थेचे माजी विद्यार्थी, प्राध्यापक, विविध विद्याशाखांचे प्रमुख, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा

मुंबई, दि. १९ : राज्याचा यंदाचा गाळप हंगाम दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा ऊसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे मंत्री दादाजी  भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, साखर संघाचे सदस्य व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, आमदार बाळासाहेब पाटील, संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे, श्रीराम शेटे, धनंजय महाडीक आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सादरीकरण केले.

गेल्या हंगामात सुमारे २०० साखर कारखान्यांनी गाळप घेतले असून शेतकऱ्यांना ४२ हजार ६५० कोटी रुपयांची एफआरपी (रास्त व किफायतशीर भाव) अदा करण्यात आली आहे. राज्याने देशात सर्वाधिक ९८ टक्के एफआरपी अदा केली आहे. या कामगिरीबद्दल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले.

यंदाच्या हंगामासाठी ऊस लागवड सुमारे १४ लाख ८७ हजार हेक्टरवर असून राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. यंदा सरासरी ९५ टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे. या हंगामात सुमारे २०३ कारखाने सुरू होणार असून यंदा १३८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. महाराष्ट्राने गेल्या हंगामात १३७.३६ लाख मेट्रीक टन साखर उत्पादन केले असून उत्तर प्रदेशला मागे टाकले आहे.

यंदाचा गाळप हंगाम सरासरी १६० दिवस अपेक्षित असून यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी १०.२५ टक्के बेसिक उताऱ्यासाठी प्रति मेट्रीक टन ३०५० रुपये एफआरपी देण्यात येणार आहे.

देशात सध्या ६० लाख मेट्रीक टन साखरेचा साठा असून महाराष्ट्रात ३० लाख मेट्रीक टन साठा आहे. यंदा देशातून १०० लाख मेट्रीक टन साखर भारतातून निर्यात होण्याचा अंदाज असून त्यात महाराष्ट्राचा वाटा ६० लाख मेट्रीक टन आहे.

इथेनॉल निर्मितीत देशामध्ये महाराष्ट्राचा वाटा ३५ टक्के आहे. पुढील वर्षी ३२५ कोटी लीटर इथेनॉलची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सादरीकरणादरम्यान सांगण्यात आले. साखर निर्यातीबाबत खुला सर्वसाधारण परवान्याबाबत (ओपन जनरल लायसन्स) गेल्या वर्षीचे धोरण कायम ठेवण्याबाबत केंद्र शासनाला पत्र पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी ऊस तोडणीसाठी यांत्रिकीकरणावर भर, सहवीज निर्मिती आदीबाबत चर्चा करण्यात आली.

‘राइड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह’ एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये ५ दिवसीय कॉन्क्लेव्ह संशोधन,नाविन्य, डिझाइन आणि उद्योजकतावर केंद्रित १००पेक्षा अधिक स्टार्टअप्स, १० हजारांपेक्षा अधिक उपस्थिती

पुणे, दिः१९, सप्टेंबरः एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या इनोव्हेशन कॉन्क्लेव्हतर्फे संशोधन, नवकल्पना, डिझाइन आणि उद्योजकता (आरआयडीई) या थीम वर आधारीत ‘राइड इनोवेेशन कॉन्क्लेव्ह २०२२’ हा पाच दिवसीय कार्यक्रम २० ते २४ सप्टेंबर या कालावधित स्वामी विवेकानंद सभामंडप एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड, पुणे येथे होणार आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन २० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वा. होणार आहे. आयआयएम, लखनौचे मार्केटिंग डायरेक्टर डॉ. सत्यभूषण दास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तसेच एमक्योर फार्मास्युटिकल्स लि.च्या कार्यकारी संचालिका नमिता थापर या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. राहणार आहे. तसेच २४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वा. होणार्‍या समारोप समारंभाच्या प्रसंगी थॉयोकेयरचे सहसंस्थापिका संचालक वेलुमणी हे सन्माननीय पाहुणे आणि लेफ्टनंट जनरल. ए अरूण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
आपल्या क्षितिजांचा विस्तार करण्यावर जे विद्यार्थी विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांसाठी संधी आणि उद्योजकतेचा मार्ग खुला करण्यास मदत मिळेल. संशोधन, नवकल्पना, डिझाइन आणि उद्योजकता या चार स्तंभाच्या थीमवर आधारित कॉन्क्लेव्हमध्ये पाच दिवसांत १००पेक्षा अधिक स्टार्टअप्स, वक्त्ये आणि उद्यम भांडवल उद्योगातील ५० हून अधिक तज्ञांसह दहा हजारापेक्षा अधिक लोक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
प्रत्येक दिवशी विषय तज्ञांचा समावेश असेल जे वरील थीमच्या आधारावर विद्यार्थ्यांना संबोधित करतील. त्यांच्यात अद्वितीय दृष्टीकोन तयार करतील आणि वास्तविक जगातील वातावरणाचे अनुकरण करून  बाहेरच्या जगाचा विचारांना प्रोत्साहन देतील. हा कार्यक्रम तंत्रज्ञान, डिझाइन, हेल्थकेयर, अ‍ॅग्री टेक, शाश्वत ऊर्जा आणि किरकोळ क्षेत्र यासारख्या क्षेत्रातील स्टार्टअप्सवर लक्ष केंद्रित करेल.
कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले, आरआयडीई २२ ही विद्यार्थ्यांसाठी संशोधन, नाविन्य, डिझाइन आणि उद्योजकतेसाठी नवीन दृष्टिकोन समजून घेण्याची आणि एक्सप्लोर करण्याची एक मोठी संधी आहे. हे तंत्रज्ञान, व्यवस्थापन, विज्ञान आणि सामाजिक विज्ञान, ललित कला, शाश्वत अभ्यास आणि सार्वजनिक आरोग्यामधील भविष्यातील ट्रेंडमध्ये एक अद्वितीय आहे. मला पूर्ण विश्वास आहे की एमआयटी डब्ल्यूपीयू राईड २२ आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. ज्यांना त्यांच्या मोठ्या कल्पनांवर उभारण्याची आवड आहे. कॉन्क्लेव्ह विचार करण्यासाठी डिझाइन केले आहे. मौल्यवान उद्योग अंतर्दृष्टी, ट्रेंड आणि अनन्य नेटवर्किंग संधीमध्ये खोल डोकावणारे आहे.
डॉ. मिलिंद पांडे म्हणाले, राईड २२ चा मुख्य उद्देश एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी मध्ये स्टार्टअप्सची एक मजबूत इकोसिस्टम तयार करणे आणि सर्वांना समजून घेऊन सुलभ करणे आहे. तसेच विद्यार्थ्यांसोबत मनापासून बाजारापर्यंत व्यवसाय चालवणे आहे.
प्रवीण पाटील म्हणाले, प्रत्येक विद्यार्थी ज्ञानाने परिपूर्ण असून त्यात अमर्याद शक्यता असतात. आज आपण ज्या लहान अडथळ्यांना समोर जात आहोत त्या विचारांचे अन्वेषण, प्रज्वलित आणि पुन्हा प्रज्वलन करण्याच्या माध्यामातून छोट्या मोठ्या समस्यांतून समाधान शोधले जाते.
या मेगा कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून एमआयटी डब्ल्यूपीयू डीजेम्बेमध्ये जागतिक विक्रम निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवणार आहे. डिजेम्बे हा हातांनी वाजवला जाणारा ड्रम आहे. यापूर्वी हा विक्रम ११९७ जणांनी मिळून वाजविला होता.परंतू या कार्यक्रमाच्या माध्यमातून २ हजार विद्यार्थी विद्यापीठाच्या मैदानात वाद्य वाजवण्याचा विक्रम मोडीत काढतील.
या परिषदेला एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, सेंटर फॉर इंडस्ट्री अ‍ॅकेडमिया पार्टनरशिप्सचे वरिष्ठ संचालक प्रवीण पाटील, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे आणि डॉ. तपन पांडे उपस्थित होते.  

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस ची राज्य सरकार विरोधात सह्यांची मोहीम

पुणे:राज्यातील ईडी सरकारच्या नाकर्तेपनामुळे वेदांता फॅक्सकॉन प्रकल्प गुजरात राज्यामध्ये गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने पुणे शहरातील सर्व महाविद्यालयांच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या सह्यांच्या मोहीमेचा शुभारंभ आज फर्ग्युसन महाविद्यालयाच्या बाहेर करण्यात आला मोदींनी मागील काही वर्षांपूर्वी बेरोजगारांनी पकोडे तळा असा सल्ला दिलेला होता त्यालाच अनुसरून विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेले पकोडे नागरीकांना वाटण्यात आले .
‘पन्नास खोके विदयार्थ्यांना धोके’
‘महाराष्ट्राला पॉपकॉर्न गुजरातला फोकस्कॉन ‘ अश्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले. सदर प्रसंगी विध्यार्थांचा खूप मोठेया प्रमानावर प्रतिसाद होता .
या प्रसंगी बोलताना प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले महाराष्ट्राच्या विदयार्थ्यांना व तरुणांना दोन लाख रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प या ED सरकारने दुर्लक्षित केला आणि परराज्याच्या दावणीला नेऊन बांधला. आपल्या राज्यातील तब्बल दोन ते तिन लाख कुटुंबाची प्रगती यामुळे थांबणार आहे या सर्व तरुणाच्या आशा ह्या ED सरकारने धुळीस मिळवण्याचे पाप केलेलं आहे ज्या महाराष्ट्राने आजपर्यंत संपूर्ण देशाला नोक-या दिल्या त्या महाराष्ट्रातील बेरोजगारांना पुढील काळात नोक-यांकरीता कुटुंबाला सोडून परराज्यात जावे लागण्याची परीस्थीती निर्माण होण्याचा खुप मोठा धोका आहे त्यांना जनता नक्कीच योग्यवेळी उत्तर देईल.
सदर प्रसंगी प्रवक्ते प्रदीप देशमुख, विक्रम जाघव, संध्या सोनवणे, शुभम माताळे, कार्तिक थोटे, ओम पोकळे, ऋषीकेश शिंदे,अद्वैत कुऱ्हाडे, श्रीकांत बालघरे,ऋषीकेश कडू, चैतन्य पडघन, पियूष मोहिते, सत्यम पासलकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला भेट

पुणे दि.१९: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला भेट दिली. त्यांनी भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या समाधी स्थळाला अभिवादन केले आणि महर्षी कर्वे स्मारकालाही भेट दिली.राज्यपाल कोश्यारी यांनी संस्थेच्या परिसराची पाहणी करताना प्रथम संस्थेतील वास्तुरचना महाविद्यालय, ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत चालविली जात असलेली संपदा बेकरी आणि संस्थेची प्रथम वास्तु असलेली ‘कर्वे यांची झोपडी’ या ठिकाणी भेट देऊन माहिती जाणून घेतली. त्यांनी कर्वे शिक्षण संस्था परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास, उपाध्यक्ष सागर ढोले पाटील, कार्याध्यक्ष रवींद्र देव, उपकार्याध्यक्षा विद्या कुलकर्णी, आजन्म सेवक मंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधुरी खांबेटे उपस्थित होते.

आम्ही अमेठी जिंकू शकतो, तर बारामती का नाही : राम शिंदे

पुणे : आम्ही अमेठी जिंकू शकतो,तर बारामती का नाही असा पवित्रा आज येथे भाजपचे नेते आमदार राम शिंदे पत्रकार परिषदेतून व्यक्त केला आहे,केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन येण्याच्या आधी सुप्रिया सुळे घाबरल्या,त्या येणार म्हणून घरोघरी फिरत आहेत, शिवाय हर्षवर्धन पाटील आल्याने आमची ताकद वाढली आहे,हर्षवर्धन पाटील यांचा योग्य सन्मान होईल असेही ते म्हणाले. निर्मला सीतारामन यांची भाषा बारामतीकरांना समजेल का त्या प्रश्नावर राम शिंदे म्हणाले की,,’मी आहे ना,माझी तर अस्सल मराठी भाषा आहे.ती समजेल ना,अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती दौर्‍यावर येत असून बारामती लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रभारी आमदार राम शिंदे यांच्याकडे जबाबदारी आहे. या दौर्‍याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत राम शिंदे यांनी अनेक राजकीय प्रश्नावर त्यांनी उत्तर दिली. तर यावेळी राम शिंदे म्हणाले की,कोणाचा तरी बालेकिल्ला वाटत असेल पण आम्ही जो देशात बालेकिल्ला (अमेठी) होता.तो आम्ही खेचून आणला. त्यामुळे हा बालेकिल्ला नाही.आम्ही अमेठी जिंकू शकतो,तर बारामती का नाही अशी भूमिका भाजपचे नेते आमदार राम शिंदे मांडत सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. तर पंरतु कोणी जर असा दावा करीत असेल की, इथे आमचाच बालेकिल्ला आहे आणि आम्हीच जिंकू,तर तो दावा स्पेशल फेल ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राम शिंदे म्हणाले की,बारामतीचा विकास झालेला नाही. बारामती तालुक्यात अद्यापही ४० गावे पाण्यापासून दूर आहेत. तसेच काही ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानामुळे थोडा फरक पडलेला आहे. रस्त्यांची वाईट अवस्था आहे. या परिस्थितीमध्ये ते विकासाचा दावा करीत आहेत. तो स्पेशल फेल ठरलेला असून कोणत्या पद्धतीच ते राजकारण करतात.

यावेळी राम शिंदे म्हणाले की,बारामतीचा विकास झालेला नाही. बारामती तालुक्यात अद्यापही ४० गावे पाण्यापासून दूर आहेत. तसेच काही ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानामुळे थोडा फरक पडलेला आहे. रस्त्यांची वाईट अवस्था आहे. या परिस्थितीमध्ये ते विकासाचा दावा करीत आहेत. तो स्पेशल फेल ठरलेला असून कोणत्या पद्धतीच ते राजकारण करतात. यंदाच्या वर्षी आपण स्वातंत्र्याची ७५ वर्ष साजरी करीत असून सर्व सामान्य जनतेला जाऊन विचारले.तर समजेल की,झालेला विकास पाहण्यास येत आहोत की, भकास झालेला पाहण्यास येत आहे. हे येणाऱ्या काळात निश्चित त्यांना कळेल,असा टोला अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांना त्यांनी लगावला. तसेच ते पुढे म्हणाले की,मागील अडीच वर्षात स्वतः च्या मतदार संघात फिरल्या नाहीत. पण आता निर्मला सीतारामन येणार असे समजताच घरोघरी जाऊन फिरत आहे. त्यामुळे येण्या अगोदर त्या घाबरल्या आहेत हे स्पष्ट होतं असल्याचे सांगात सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांनी टीका केली.आता लक्ष बारामती आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या समोर कार्यक्रम ठरलेला आहे. आता आम्ही कार्यक्रम करणार असल्याच त्यांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले , अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांना काहीही कारण नसताना भाजपाने जेलमध्ये टाकले.

सोलापूर-शिवाजी पार्क म्हटल की शिवसेना हेच समीकरण आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केले. शिवाय कारण नसताना भाजपने संजय राऊतांना जेलमध्ये टाकल्याचा आरोप त्यांनी केला. ते आज सोलापुरात बोलत होते.दसरा मेळाव्यावरून शिंदे आणि ठाकरे यांच्यात वाद सुरू असताना त्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. शिंदे गटाला मेळावासाठी बीकेसीचे मैदान देण्यात आले आहे.शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यांकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजपचे नेतेमंडळी करत आहेत. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांना काहीही कारण नसताना जेलमध्ये टाकण्यात आले. भाजपवाल्यांनी त्यांना जेलमध्ये टाकले आणि आता आम्हाला सांगतायेत की, आम्ही वाऱ्यावर सोडले. भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे.पुढे पत्रकारांनी अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी यांचा पराभव झाला मात्र, मोदींचा पराभव होणार नाही, मोदींना जनतेचा आत्मा आहे असे भाजपचे नेते म्हणतात असे विचारले. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, मी काही ज्योतिषी नाही. हा निर्णय घेण्याचा अधिकार जनतेचा आहे. जनतेचा यावर निर्णय घेईल.

50 दिवसांनंतरही संजय राऊतांना पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 4 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच

मुंबई-पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली असून, त्यांना 4 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वीच त्यांच्या विरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. 1039 कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात राऊत यांचा थेट सहभाग असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. राऊत सध्या याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असून आज (ता. 19) त्यांच्या जामीन अर्जावर तसेच कोठडीबाबतही एकत्रित सुनावणी पार पडली.

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी ‘ईडी’ने खासदार संजय राऊत यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या पुनर्विकासाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांचा प्रत्यक्ष सहभाग नसून त्यांनी पडद्याआड राहून काम केल्याचे पुरावे सापडल्याचे ‘ईडी’ने या आरोपपत्रात नमूद केले आहे.

राऊत यांनी जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकेवर न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली असता सोमवारी राऊतांची पुढच्या रिमांड व जामीन अर्जावर एकत्रित सुनावणी होईल. त्यामुळे संजय राऊत यांना दीड महिन्यानंतर आता जामीन मिळतो का? हे आज कळेल.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी रात्री अटक करण्यात आली होती. त्यानंतर राऊतांना प्रथम ‘ईडी’ आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सध्या ते ऑर्थर रोड कारागृहात आहेत. संजय राऊत यांच्यावर राजकीय सूडबुद्धी किंवा द्वेषातून कारवाई करण्यात आली नाही असे स्पष्टीकरण ‘ईडी’ने कोर्टासमोर दिले.

राऊत हे राजकारणातील प्रभावशाली व्यक्ती आहेत. त्यामुळे ते जामिनावर सुटल्यास पुराव्यांशी छेडछाड करू शकतात. तपास महत्त्वाच्या टप्प्यावर असताना त्यांना जामीन देणे योग्य ठरणार नाही असे सांगत ‘ईडी’ने जामिनाला विरोध केला

संजय राऊतांनी प्रवीण राऊतांसह याप्रकरणी मुख्य भूमिका बजावताना पडद्याआडून काम केले आहे. असा युक्तिवादही ‘ईडी’ने यापूर्वी केला होता. राऊत यांच्याविरुद्ध प्रथम दोषारोपपत्र 1 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते.

विविध जिल्ह्यांतील ५४७ ग्रामपंचायतींसाठी प्राथमिक अंदाजानुसार ७६ टक्के मतदान

0

मुंबई, दि. 18 : राज्यातील विविध 16 जिल्ह्यांमधील 547 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांत प्राथमिक अंदाजानुसार आज सरासरी सुमारे 76 टक्के मतदान झाले. यात सदस्य पदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.

राज्य निवडणूक आयोगाने 608 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची 12 ऑगस्ट 2022 रोजी घोषणा केली होती. त्यातील 51 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आज प्रत्यक्षात 547 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत सरासरी 66.10 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळ उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. या सर्व संबंधित ठिकाणी मतमोजणी उद्या (ता. 19 सप्टेंबर) होईल.

चालू आर्थिक वर्षात रु. 1,35,556 कोटींचा एकूण परतावा, गेल्या वर्षीच्या तुलनेत 83% वाढ

0

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सकल प्रत्यक्ष कर संकलनात 30% वाढ

प्रत्यक्ष कर संकलनात वेगाने वाढ होत असून ही बाब महामारीनंतर अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन झाल्याचे संकेत देत आहे, त्याचबरोबर सरकारच्या धोरणातील स्थैर्य, प्रक्रिया सुलभ आणि अडथळाविरहित करण्यावर दिलेला भर आणि प्रभावी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कर गळती रोखण्यामुळे त्याचेही परिणाम दिसत आहेत.

17 सप्टेंबर 2022 पर्यंतच्या प्रत्यक्ष कर संकलनाच्या आकडेवारीतून असे दिसून येत आहे की आर्थिक वर्ष 2021-22 मधील रु. 5,68,147 कोटींच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये रु. 7,00,669 कोटी करसंकलन झाले आहे. यामुळे करसंकलनात 23% वाढ झाली आहे. निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन रु. 7,00,669 कोटी( नेट ऑफ रिफंड) करसंकलनात रु. 3,68,484 कोटी कॉर्पोरेशन कराचा(CIT) आणि रु. 3,30,490 कोटींच्या सिक्युरिटिज व्यवहार करासह वैयक्तिक प्राप्तिकराचा समावेश आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्रत्यक्ष  करांचे( परताव्यासाठी समायोजित करण्यापूर्वी) सकल संकलन आर्थिक वर्ष 2021-22 मधील रु. 6,42,287 कोटींच्या तुलनेत रु. 8,36,225 कोटी झाले आहे. 2021-22च्या करसंकलनाच्या तुलनेत करसंकलनात 30% वाढ झाली आहे.

रु.8,36,225 कोटीच्या सकल  संकलनात रु. 4,36,020 कोटींच्या कॉर्पोरेशन कराचा(CIT) आणि रु. 3,98,440 कोटी सिक्युरिटीज व्यवहार करासह(STT) वैयक्तिक प्राप्तिकराचा(PIT) समावेश आहे.

किरकोळ शीर्षक निहाय संकलनामध्ये रु. 2,95,308  कोटी अग्रिम कर संकलन,  उद्गम कर रु. 4,34,740 कोटी , रु.77,164 कोटी  स्व-मूल्यांकन कर,  नियमित मूल्यांकन कर रु. 20,080 कोटी  आणि 8933 कोटी रुपये इतर किरकोळ शीर्षकाखालील  कर समाविष्ट आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत 17 सप्टेंबर 2022 पर्यंत  अग्रिम  कर संकलन रु. 2,95,308 कोटी रुपये झाले असून मागील वर्षाच्या याच कालावधीतील रु. 2,52,077 कोटी रुपये आगाऊ कर संकलनाच्या तुलनेत  17% पेक्षा जास्त आहे. यामध्ये रु. 2,29,132 कोटी कॉर्पोरेशन कर (CIT) आणि रु.66176 कोटी वैयक्तिक प्राप्तिकर (पीआयटी) समाविष्ट आहे.

चालू आर्थिक वर्षात दाखल झालेल्या प्राप्तिकर विवरणपत्रांच्या निपटारा  प्रक्रियेच्या गतीमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे. 17-9-2022 पर्यंत जवळपास 93% विवरणपत्रांची पडताळणी करून निपटारा झाला आहे. यामुळे परतावे देण्याच्या वेगात मोठी वाढ झाली आहे आणि चालू आर्थिक वर्षात देण्यात आलेल्या परताव्यांच्या संख्येत सुमारे 468% वाढीची नोंद झाली आहे. आर्थिक वर्ष  2022-23 मध्ये 17 सप्टेंबर 2022 पर्यंत रु. 1,35,556 कोटींचे परतावे देण्यात आले आहेत. गेल्या वर्षी याच काळापर्यंत देण्यात आलेल्या रु. 74,120 कोटींच्या तुलनेत 83% वाढीची नोंद झाली आहे.

न्यायव्यवस्थेशी संबंधित वार्तांकन अधिक काळजीपूर्वक करण्याचे उपराष्ट्रपतींचे प्रसारमाध्यमांना आवाहन

0

नवी दिल्ली- न्यायव्यवस्थेशी संबंधित बातम्यांचे वार्तांकन करताना अतिरिक्त काळजी घेण्याचे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे.  न्यायमूर्तींचा सन्मान आणि न्यायव्यवस्थेविषयीचा आदर यांचा कोणत्याही परिस्थितीत भंग होऊ नये ही कायद्याचे राज्य आणि घटनावादाची मूलभूत तत्वे आहेत, असे त्यांनी सांगितले.

ते आज मध्य प्रदेशात जबलपूर येथे पहिल्या न्यायमूर्ती जे एस वर्मा स्मृती व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. भक्कम कणा असलेली, न्याय्य आणि स्वतंत्र अशी न्यायव्यवस्था, म्हणजे लोकशाही मूल्ये समृद्ध करण्याची आणि त्यांचा प्रसार करण्याची अतिशय सुरक्षित हमी आहे, असं त्यांनी सांगितलं. समाजावर दूरगामी परिणाम करणारे अनेक निर्णय दिल्याबद्दल त्यांनी न्यायमूर्ती वर्मा यांची प्रशंसा केली. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी आणि त्यांना पुरेसे संरक्षण पुरवण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा, विशाखा प्रकरणात त्यांनी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे निर्माण झाली, असे ते म्हणाले.

न्यायमूर्ती वर्मा यांनी संघवादापासून सर्वधर्मसमभावापर्यंत कायद्याच्या विविध पैलूंवर प्रभाव निर्माण केला आणि स्त्री-पुरुष समानताविषयक न्यायाला चालना दिली, असे जगदीप धनखड यांनी सांगितले. त्यांचे जीवन आणि विचार नेहमीच आपल्याला आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देतील, असे ते म्हणाले.