Home Blog Page 1582

टीव्ही आणि डिजिटल माध्यमांवर अद्यापही दिसत असलेल्या सट्ट्यांच्या जाहिरातींविरोधात मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्‍ली-

ग्राहकांना निर्माण होत असलेले लक्षणीय अर्थसाहाय्यविषयक आणि सामाजिक आर्थिक धोके,विशेषतः युवा वर्ग आणि बालकांसाठी असलेले धोके विचारात घेऊन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज ऑनलाईन सट्टेबाजीच्या साईट्सच्या जाहिराती आणि या साईट्सच्या छुप्या(सरोगेट) जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी तशा प्रकारची सक्त ताकीद देणाऱ्या दोन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पहिली सूचना खाजगी टीव्ही वाहिन्यांसाठी आणि दुसरी सूचना ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी जारी करण्यात आली आहे. मंत्रालयाने यापूर्वी 13 जून 2022 रोजी ऑनलाईन सट्टेबाजी प्लॅटफॉर्म्सच्या जाहिरातींची प्रसिद्धी टाळण्याची मार्गदर्शक सूचना वृत्तपत्रे, खाजगी टीव्ही वाहिन्या आणि डिजिटल वृत्तवाहिन्यांना केली होती.

त्यानंतर सरकारच्या असे निदर्शनास आले की टीव्हीवरील अनेक क्रीडा  वाहिन्या, त्याचबरोबर ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरून परदेशी ऑनलाईन बेटींग प्लॅटफॉर्म्सच्या त्याचबरोबर त्यांच्या सरोगेट न्यूज वेबसाईट्सच्या जाहिराती प्रसारित करत आहेत. या मार्गदर्शक सूचना जारी करताना, या प्रकारांची पुष्टी करणारे फेयरप्ले, पारीमॅच, बेटवे, वुल्फ777 आणि  1xBet यांसारख्या परदेशी बेटिंग प्लॅटफॉर्म्सच्या प्रत्यक्ष आणि छुप्या जाहिरातींचे दाखले देण्यात आले आहेत.

या सूचनांमध्ये मंत्रालयाने अशी माहिती दिली आहे की परदेशी ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्म्स न्यूज वेबसाईट्सचा वापर डिजिटल मीडियावर बेटिंग प्लॅटफॉर्म्सची जाहिरात करण्यासाठी छुपे उत्पादन म्हणून करत आहेत. अशा प्रकारच्या सरोगेट न्यूज वेबसाईटसचे लोगो आणि या बेटिंग प्लॅटफॉर्म्समध्ये कमालीचे साधर्म्य असल्याचे अशा प्रकरणांमध्ये मंत्रालयाला आढळले आहे. या बेटिंग प्लॅटफॉर्म्सची किंवा या न्यूज वेबसाईट्सची भारतात कोणत्याही कायदेशीर प्राधिकरणाकडे नोंदणीदेखील झालेली नाही याकडे मंत्रालयाने लक्ष वेधले आहे. या वेबसाईट्स बातम्यांच्या आडून छुप्या जाहिरातींच्या माध्यमातून सट्टेबाजी आणि जुगाराला प्रोत्साहन देत आहेत.

देशाच्या बहुतांश  भागांमध्ये सट्टेबाजी आणि जुगार बेकायदेशीर असल्याने असे बेटिंग प्लॅटफॉर्म्स आणि त्यांची छुपी उत्पादने ही देखील बेकायदेशीर आहेत, असे मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये  म्हटले आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2019, केबल टीव्ही नेटवर्क नियामक कायदा 1995 आणि माहिती तंत्रज्ञान  नियम 2021 यातील तरतुदींवर या मार्गदर्शक सूचना आधारित आहेत. या जाहिराती संबंधित विविध कायद्यांशी सुसंगत नाहीत आणि टीव्ही वाहिन्या त्याचबरोबर डिजिटल न्यूज पब्लिशर्सना अशी सक्त ताकीद देण्यात येत आहे की अशा प्रकारे बेटिंग प्लॅटफॉर्म्स किंवा सरोगेट न्यूज वेबसाईट्सची जाहिरात करू नये आणि या निर्देशांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी आठवण देखील टीव्ही वाहिन्यांना करून देण्यात येत आहे. त्याच प्रकारे ऑनलाईन जाहिरातींच्या मध्यस्थांना देखील मंत्रालयाने भारतीय प्रेक्षकांना अशा जाहिरातींद्वारे लक्ष्य करू नका असा सल्ला दिला आहे. 

सट्टेबाजी आणि जुगारामुळे ग्राहकांसाठी लक्षणीय अर्थसाहाय्यविषयक आणि सामाजिक- आर्थिक धोके निर्माण झाले आहेत विशेषतः युवा वर्ग आणि बालकांना त्याचा धोका आहे, असे मंत्रालयाने सांगितले आहे. त्यामुळे सार्वजनिक हित विचारात घेऊन ऑफलाईन किंवा ऑनलाईन सट्टेबाजी/जुगार यांना जाहिरातींद्वारे प्रोत्साहन देऊ नये असे मंत्रालयाने सुचवले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या दोन मार्गदर्शक सूचनांसंदर्भात ग्राहक व्यवहार विभागाशी विशेष सल्लामसलत केली आहे.

खाली दिलेल्या लिंकवर या दोन्ही मार्गदर्शक सूचना वाचता येतील.

1) टीव्ही वाहिन्यांना मार्गदर्शक सूचना:

https://mib.gov.in/sites/default/files/Advisory%20to%20Private%20Satellite%20TV%20Channels%2003.10.2022.pdf

2) डिजिटल मीडियासाठी मार्गदर्शक सूचना Media:

https://mib.gov.in/sites/default/files/Advisory%20to%20Digital%20News%20Publishers%20and%20OTT%20Platforms%2003.10.2022%20%281%29.pd

नृत्यांगनेच्या घरी 8.25 लाखांची चोरी; कात्रज पोलिस ठाण्यासमोरीलच ‘पिझ्झा हट’ फोडले

पुणे-कात्रज जवळील आंबेगाव बुद्रुक येथे लक्ष्मी सोसायटीत राहणार्‍या नृंत्यांगणा असलेल्या तरूणीच्या घरी पाळत ठेऊन घरफोडी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घरफोडीच्या घटनेत सोन्याचे दागिने , रोकड आणि विदेशी चलन असा तब्बल 8 लाख 15 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.सोमवारी सायंकाळी सव्वा सात ते सव्वा आठ वाजण्याच्या दरम्यान एक तासाच्या कालावधीत ही घरफोडी झाली आहे अशी माहिती पोलिसांनी आज दिली आहे.

याप्रकरणी अद्यात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत एका लक्ष्मी सोसायटीत राहणार्‍या एका 24 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणीही आंबेगाव बुद्रुक येथे राहण्यास आहे. तर तीची आई धनकवडी परिसरात राहण्यात आहे. तरूणी ही नृत्यांगणा असून देशात आणि परदेशात स्टेज शो करते. रविवारी सायंकाळी सव्वा सात ते सव्वा आठच्या सुमारास ती काही कामानिमित्त बाहेर पडली असताना अज्ञात चोरट्यांनी तिच्या घराची कडी उघडून तिच्या घरात प्रवेश केला. यावेळी हॉलमधील पर्समधील सात हजारांची रोकड चोरली. तसेच बेडरूमधील कपाटातील 28.4 तोळ्यांचे दागिने आणि दुबईचे 40 हजार रूपये किंमतीचे विदेशी चलन चोरून नेले.

घटनेची माहिती कळताच सहायक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्यासह भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांनी यासंबधी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक धीरज गुप्ता करत आहेत.

पोलिस ठाण्यासमोरील पीझा हट दुकान फोडले

पुणे शहरात दिवसेंदिवस घरफोडीचे गुन्हे वाढत असताना आता चोरटे निर्ढावल्याचे दिसत आहे. त्यांनी पोलिस ठाण्यापासून 100 पावलांच्या अंतरावर असलेले पीझा हटचे शॉप फोडून 45 हजारांची रोकड लांबविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत समीर भिकाजी कोकणे (25, रा. गोंधळेनगर, हडपसर,पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.

दाखल गुन्ह्यानुसार, कात्रज परिसरात भारती विद्यापीठच्या समोरच पिझ्झा हटचे शॉप आहे. तर भारती विद्यापीठाला लागूनच स्वारगेट कात्रज रोडवर भारती विद्यापीठ पोलिस ठाणे आहे. रविवारी रात्री पिझ्झा हटचे शॉप बंद करून कामगार घरी गेले असताना बुधवारी पहाटे चोरट्यांनी शॉपचे शटर उचकटून आत प्रवेश केला. तसेच दुकानातील लॉकरमधील एकूण 44 हजार 775 रूपयांची रोकड चोरून नेली. महत्वाची बाब म्हणजे पोलिस ठाण्याच्या अगदी समोर शंभर पावलांच्या अंतरावरच हे पिझ्झा हटचे शॉप आहे. रस्त्याच्या अगदी कडेला असलेले दुकान चोरट्यांनी फोडून रोकड लांबवली आहे.

महिलाही करणार एसटीचे सारथ्य:चालक, वाहक भरतीमधील उमेदवारांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र

मुंबई, दि. ४ : एसटीतील २०१९ च्या भरती अंतर्गत चालक, वाहक पदाच्या भरतीतील पात्र पुरूष व महिला उमेदवारांना राज्य शासनाने दसऱ्याची भेट दिली आहे. या भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांपैकी २७ पुरूष उमदेवारांना नेमणुकीचे तर २२ महिलांना सेवापूर्व प्रशिक्षणाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले. एसटी महामंडळाच्या निर्णयामुळे या भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

            राज्य परिवहन महामंडळामध्ये २०१९ मध्ये चालक, वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतील १ हजार ४३१ पात्र उमेदवारांना यापूर्वीच नेमणूक देण्यात आली आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या उर्वरित पात्र उमेदवारांच्या नेमणुकीला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला होता. त्यानुसार मंत्रालयात आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासह एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने तसेच विविध विभागाचे महाव्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पात्र उमेदवारांपैकी आज २७ पुरूष उमेदवारांना नेमणुकीचे पत्र देण्यात आले असून उर्वरित उमेदवारांना लवकरच नेमणूक देण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. चन्ने यांनी दिली.

महिलाही करणार एसटीचे सारथ्य

            महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एसटी महामंडळाने राबविलेल्या भरती प्रक्रियेत चालक, वाहक पदासाठी महिलांकडूनही अर्ज मागविले होते. यामध्ये २०३ महिला उमेदवार लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या असून १४२ महिला उमेदवारांनी अवजड वाहन चालविण्याचा परवाना सादर केला आहे. यापैकी २२ महिला उमेदवारांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सेवापूर्व प्रशिक्षणाचे पत्र देण्यात आले. ८० दिवसांचे सेवापूर्व प्रशिक्षण घेतल्यानंतर या महिला एसटीचे सारथ्य करण्यास सज्ज होणार आहेत.

उत्सवांमध्ये मंदिरांमधून शासकीय योजनांची माहिती पोहोचवायला हवी- पुणे जिल्हा निवडणूक विभाग उपसंचालक मृणालिनी सावंत

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे शासकीय सेवेतील महिला अधिका-यांचा सन्मानसोहळा
पुणे :  श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरातील सकारात्मकतेमुळे सर्वांना उर्जा मिळते. श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी आणि श्री महाकाली अशी देवीची तिन्ही रुपे एकाच ठिकाणी आपल्याला पहायला मिळतात व दर्शन घेता येते. मंदिरामध्ये विविध ठिकाणचे, विविध वर्गातील भक्त येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी उपयुक्त अशा शासकीय योजनांची माहिती अशा उत्सवांमधून पोहोचवायला हवी, असे मत पुणे जिल्हा निवडणूक विभागाच्या उपसंचालक मृणालिनी सावंत यांनी व्यक्त केले. 
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात प्रशासकीय सेवेतील महिला अधिका-यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त तृप्ती अग्रवाल, अ‍ॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल आदी उपस्थित होते. 
पुणे जिल्हा निवडणूक विभागाच्या उपसंचालक मृणालिनी सावंत, उपजिल्हाधिकारी वनासी लाभसेटवार, पुणे तहसीलदार राधिका हवळ – बारटक्के, हवेली तहसीलदार तृप्ती कोलते या प्रशासकीय सेवेतील महिला अधिका-यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि महावस्त्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 
विश्वस्त तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, शासकीय कार्यालयामध्ये कार्यरत महिलांचे प्रमाण वाढत आहे. शासकीय स्तरावर उच्चपदस्थ महिला असून त्यांच्या कार्याचा गौरव व्हायला हवा. शासकीय योजना पोहोचविण्याकरिता उत्सव हे उत्तम माध्यम असल्याचे या अधिका-यांनी म्हटले असून श्री महालक्ष्मी मंदिर अशा शासकीय योजना पोहोचविण्याकरिता शासनाला कायम सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. विश्वस्त प्रविण चोरबेले यांनी आभार मानले.

इतिहास सांगताना सामाजिक व राजकीय पातळीवर आत्मपरीक्षण करण्याची गरज-ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी हुजूरपागेचा १३८ वा वर्धापनदिन सोहळा
पुणेः शाळा कोणतीही असो शिक्षक चांगले असतील तर विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी योग्य दिशा मिळते आणि त्यातून उत्तम विद्यार्थी घडतात. तसेच आजूबाजूचे वातावरणही मुलांच्या संगोपनासाठी महत्वाचे असते. आज समाजात ज्या चुकीच्या पद्धतीने इतिहास मुलांसमोर मांडला जात आहे त्यासाठी सामाजिक, राजकीय पातळीवर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ  पत्रकार अरुण खोरे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी हुजूरपागेच्या १३८ व्या वर्धापनदिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावरील संस्थेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा रेखा पळशीकर, उपाध्यक्षा हिमानी गोखले, सचिव वरदेंद्र कट्टी, संस्थेच्या प्रमुख विश्वस्त उषा वाघ, सहसचिव शालिनी पाटील, सर्व नियामक मंडळ सदस्य, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींना पारितोषिक देण्यात आले. तसेच सर्व विभागांनी तयार केलेल्या नियतकालिकांमधून पहिल्या तीन क्रमांकांच्या नियतकालिकांना बक्षीसे दिली गेली. यावेळी पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थिनींनी कथाकथन सादर केले.

वरदेंद्र कट्टी म्हणाले, विजयादशमीच्या दिवशी १३८ वर्षांपूर्वी स्त्री शिक्षणाचे उद्दिष्ट घेऊन ही संस्था सुरू करण्यात आली. अनेक अडचणींवर मात करत ही संस्था प्रगती करत राहिली. सुरूवातीला १८ विद्यार्थींनी पासून सुरू झालेल्या या संस्थेत आज १२ हजार विद्यार्थीनी शिकत आहेत. अशा संस्थेच्या संस्थापकांना मी आज नतमस्तक होऊन अभिवादन करतो. ही संस्था आज बदलांना आत्मसात करत काळाच्या सोबत चालत आहे, असे ही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीना शिंदे यांनी केले. वरदेंद्र कट्टी यांनी प्रास्ताविक व हिमानी गोखले यांनी आभार मानले.

लतादीदींची गाणी आणि नव्वदच्या दशकातील गाण्यांत प्रेक्षक रमले

पुणे –

पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त श्री गणेश कला क्रिडा रंगमंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत स्वरसम्राज्ञी लता दिदी ‘मेरी आवाज ही पहचान है’ हा कार्यक्रम रविवारी पार पडला. यावेळी लता दीदींचे अजरामर गीते सादर करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांनी गायलेल्या ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेंदीच्या पानावर’, ‘बिंदिया  चमकेगी’, ‘सोळा बरस कि बाली उमर को सलाम’, ‘दिल तो पागल है’, ‘जिया जले’ अशा हिंदी गीतासह ‘राजसा जवळी बसा’ ही बहारदार लावणी, ‘लटपट लटपट तुझं चालण’ मराठी गीतांसह प्रेमगीते, देशभक्‍तीपर गीतांच्या सादरीकरणाने पुणे नवरात्रौ महोत्सवातील सायंकाळ रंगली.  स्वरसम्राज्ञी लता दीदी ‘मेरी आवाज ही पचचान है’ या कार्यक्रमात गायिका कोमल कृष्णा, पल्लवी आनंद देव, वैजयंती मांडवे, जितेंद्र भुरुक यांनी लता दीदींचे अजरामर गीते सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. निवेदन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

कार्यक्रमाचा प्रारंभ गजानना श्री गणराया या गीताने कोमल कृष्णा, पल्लवी आनंद देव व वैजु चांडवले यांनी सादर करुन केले. देशासाठी बलीदान देणारे क्रांतीकारी,  सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लतादीदींनी गायिलेले ‘ए मेरे वतन के लोगो’ कोमल कृष्णा यांनी सादर करुन श्रोत्यांनी टाळ्यांची दाद मिळविली. बिंदिया चमकेगी, सोळा बरस कि बाली उमर, कोरा कागज था ये मन मेरा, तुम आ गये हो नूर आ गया या गीतांचे गायकांनी स्वरपुष्प सजविले.

यावेळी दर्शना जोग व रशिद खान (कि बोर्ड), बाबा खान (ट्रमपेट), सचिन वाघमारे (बासरी), विजय मूर्ती (बेस गिटार), मुकेश देढिया (गिटार), नितीन  शिंदे व जी विशाल  (तबला), केदार मोटे (ढोलक), नंदु डेव्हिड (रिदम मशीन), अनिल करमरकर (सॅक्सोफोन) सचिन वाघमारे (बासरी), अभिषेक भुरुक (ड्रम), सोमनाथ फटके  (थुंबा) यांनी साथसांगत केली.

याप्रसंगी आबा बागुल यांनी देखील मंचावर बहारदार गीत सादर केले व टाळ्या मिळवल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षेचे नेते दीपक मानकर यांनी यावेळी महोत्सवाला शुभेच्छा देतांना म्हणाले, पुणे नवरात्रौ महोत्सवाने गेली २८ वर्षे परंपरा जपली आहे. आईंच्या आशीर्वादाने आबा तळागाळापर्यंत पोहचून काम करीत आहे. पुण्यनगरीत माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हल सुरु केला. तसाच आबांनी पुणे नवरात्रौ महोत्सव सुरु करुन अनेकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळवून दिली. यावेळी त्यांनी गीत सादर करून टाळ्या मिळवल्या. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व खासदार वंदना चव्हाण यांनी महोत्सवाला शुभेच्छा देत उपक्रमांचे कौतूक केले.

कार्यक्रमाला विशेष उपस्थिती  पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षेचे नेते दीपक मानकर, माजी नगरसेवक दत्ता सागरे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेच्या डॉ. निवेदिता एकबोटे,  माजी नगरसेविका ज्योती पवार, उद्योगपती अमरनाथ महाशब्दे, बाळासाहेब कातुरे, अमिर शेख, अमित भगत, संजय बूब, कपिल बागुल, विजय रत्नपारखी, सागर बागूल, संदीप शिंदे, सागर आरोळे आदींची उपस्थिती होती.  या कार्यक्रमास रसिक पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.

पुणे नवरात्रौ महोत्सवात सोमवारी श्रीगणेश कला क्रीडा रंगमंच येथे कोयल सी तेरी बोली (सुपरहिट साँग ऑफ 90) हा कार्यक्रम पार पडला. तडप तडप के… आवरा भवरे… सासो की जरुरत है… कोयलसी तेरी बोली… सुनो गौर से दुनियावालो…ऐसी दिवानगी… मिले सुर मेरा… सुर है ना ताल अशी नव्वदच्या दशकातील सुपरहिट गीतांचा श्रोत्यांनी आनंद लुटला. गायिका पल्लवी ढोले, संजय हिरवाळे, संतोष गायकवाड, राज, विनोद सोनवणे यांनी  सुपरहिट गीतांचे सादरीकरण केल्याने कार्यक्रमात रंगत आली. कार्यक्रमाचे निवेदन आरजे अभय यांनी केले.

कार्यक्रमाचा प्रारंभ वादकांनी आपल्या वाद्याने सुरुवात केली. वाद्याला श्रोत्यांनी प्रचंड टाळ्यांनी दाद दिली. यातील काही गाण्यावर श्रोत्यांनी नृत्याचा ठेकाही धरला. त्याचबरोब राजेंद्र बागुल यांनी भोले ओ भोले हे गीत सादर करुन श्रोत्यांची दाद मिळविली.  चिंतन मोढा, रशिद शेख (सिंथेसायझर), अतुल गर्दे (गिटार),  सचिन वाघमारे (बासरी), प्रशांत साळवी ( कोरस ग्रुप), अभिजित भदे (ड्रम), संतोष हिवराळे (ड्रम मिशन), केदार मोरे (ढोलक), नितीन शिंदे (तबला), गौतम साऊंड (साऊंड) यांनी साथसंगत केली.

या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमातील कलाकारांचा सत्कार पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या हस्ते करण्यात आला. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उपाध्यक्ष घनःशाम सावंत, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे, सचिव नंदकुमार कोंढाळकर, सदस्य रमेश भंडारी, अमित बागुल, हेमंत बागुल, राजेंद्र बागुल, इम्तियाज तांबोळी, महेश ढवळे, सुनील भोसले व कुमार खटावकर यावेळी उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या उतरार्धात अप्प्पी आमची कलेक्टर या मालिकेतील शिवानी  नाईक (अप्पी), संतोष पाटील (बापू), निर्माती व दिग्दर्शिका श्वेता शिंदे महोत्सवाला भेट देत त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधत आपल्या मालिकेविषयी त्यांनी माहिती दिली. पुणे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त उपायुक्त ज्ञानेश्वर मुळक, मसापचे कार्यवाह प्रकाश पायगुडे यांचा सत्कार यावेळी आबा बागुले यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महोत्सवाचे उपाध्यक्ष घनःशाम सावंत यांनी केले.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात हजारो महिलांची महाआरती संपन्न

पुणे-

पुणे नवरात्रौ महिला महोत्सव अंतर्गत शिवदर्शन येथील श्रीलक्ष्मीमाता मंदिरात सोमवार सायं. हजारो महिलांनी देवीची महाआरती केली. याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला  महोत्सवाच्या अध्यक्ष सौ. जयश्री बागुल, प्रवीण मसाले उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल चोरडिया, सौ. श्वेता चोरडिया, सिनेअभिनेत्री श्वेता शिंदे यांनी देवीची पूजा केली. हजारहून अधिक महिलांनी केलेल्या या महाआरतीवेळी श्रीलक्ष्मीमाता मंदिरही आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने खुलून दिसत होते.

याप्रसंगी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी सर्वांचे स्वागत करून म्हंटले की, ‘या महाआरतीस हजारो महिला सहभागी झाले ही आनंदाची बाब आहे. यातून नारीशक्तीचे विराट दर्शन होत आहे.  अशा महाआरती उपक्रमातून संस्कार अधिक रुजण्यास मदत होते असे ते म्हणाले.

पुणे नवरात्रौ महिला  महोत्सवाच्या अध्यक्ष सौ. जयश्री बागुल म्हणाले की, ‘या वर्षी महिलांच्या विविध स्पर्धांमध्ये हजारो महिला सहभागी झाल्या यातून नवरात्रौतील अशा महिला महोत्सवाची गरज किती मोठी होती हे लक्षात येते.’ पुढील वर्षी अधिक स्पर्धा घेण्याचा मनोदय ही त्यांनी व्यक्त केला.

या नंतर सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले. तसेच लकी ड्रॉ देखील काढण्यात आला. यामध्ये पहिले बक्षीस वाशिंग मशीन, दुसरे बक्षीस ओव्हन, तिसरे बक्षीस मिक्सर आणि २० उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. या मांगल्याने भरलेल्या या महाआरती कार्यक्रमानंतर पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाची सांगता झाली.

हा कार्यक्रम यशवी होण्यासाठी शारदा माने, छाया कातुरे, निर्मला जगताप, नुपूर बागुल, विद्युलता साळी, रेखा झानपुरे, योगिता निकम व विजया बागुल यांचे विशेष सहाय्य लाभले. नम्रता जगताप यांनी सूत्रसंचालन केले.

महागाई बेरोजगारीच्या रावणाचे प्रतीकात्मक दहन

पुणे-विजयादशमीच्या पूर्वसंध्येला देशातील या दृष्ट प्रवृत्तींच्या रावणाचे दहन करण्यात आले. तसेच “महागाईचा रावण जाळलाच पाहिजे…,बेरोजगारीचा रावण जाळलाच पाहिजे….,धार्मिक द्वेष करणारा रावण जाळलाच पाहिजे….” अशा घोषणा देत केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. भारतीय नागरिकांवर या गोष्टी लादणाऱ्या भारतीय जनता पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निश्चय देखील युवकांनी यावेळी करण्यात आला हे आंदोलन राह्स्त्रावडीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले .या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख ,युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे,विशाल वाकडकर, मनोज पाचपुते,महेश हांडे, अजिंक्य पालकर,रोहन पायगुडे,कुणाल पोकळे, ॲड.निखिल मलानी,मंगेश मोरे,स्वप्निल जोशी,योगेश सुतार,गजानन लोंढे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,गेल्या आठ वर्षांमध्ये केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सातत्याने वाढणारी महागाई, सुशिक्षित तरुणांवर आलेले बेरोजगारीचे संकट, अन्नधान्यावरील जीएसटी, इंधन दरवाढ, विकास कामांमधील भ्रष्टाचार, सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण, सातत्याने देशातील विविध भागात सुरू असणाऱ्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना, शेतकरी बळीराजाच्या आत्महत्या, सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार, केंद्र सरकारची लोकशाही विरोधी धोरणे या सर्व अन्यायकारक व जुलूमकारक गोष्टींमुळे भारतातील जनता त्रस्त झाली आहे. अनेक वेळा आंदोलने, मोर्चे, निवेदने देत लोकशाहीच्या मार्गाने केलेल्या विरोधाने देखील केंद्र सरकारला जाग येत नाही, “देशातील युवक हा देशाच्या विकासाचा प्रमुख शिलेदार असतो परंतु हाच युवक आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशाच्या राजसत्तेच्या विरोधात बंड पुकारत आहे. केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपने बेरोजगारीमुळे युवकांवर ही वेळ आणली आहे.राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने देखील ज्या दृष्ट प्रवृत्तीचे रावण दहन झाले आहे, त्या दृष्ट प्रवृत्ती देशातील युवक,युवती, महिला यांसह समाजातील प्रत्येक घटकासाठी अतिशय घातक आहेत. या सर्व गोष्टी आपल्या जनतेवर लादण्याचे काम भारतीय जनता पार्टीने केले आहे. आज या महागाईमुळे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरातून बचत ही जवळपास हद्दपार झाली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने केवळ आपली नोकरी, व्यवसाय, छोटा मोठा काम- धंदा करणे व त्यातून जमा झालेल्या पैशात आपल्या कुटुंबाच्या उदर निर्वाहासाठी ज्या काही जीवनावश्यक गोष्टी खरेदी करतील, त्या प्रत्येक गोष्टीवर भरमसाठ टॅक्स भरणे केवळ हेच कालचक्र सध्या सुरू आहे. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यकाळात भारतीय नागरिकांची परिस्थिती श्रीलंकेतील नागरिकांसारखी होण्याची दाट शक्यता आहे. ही परिस्थिती जर उद्भवू द्यायची नसेल तर गल्लीपासून -दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी नावाच्या दृष्ट राक्षसाचा वध करणे हे ही काळाची गरज बनली आहे.

महापालिकेच्या तिजोरीला शंभर कोटींचा खड्डा

पुणे- खड्डे दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने आत्तापर्यंत तब्बल वीस कोटी रुपयांचा खर्च केला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही पावसाने रस्त्यांची चाळण झाल्याने हा खर्च पाण्यात गेल्याने उधळपट्टीच ठरला आहे. दरम्यान, रस्त्यांची चाळण झाल्याने रस्ते दुरुस्तीसाठी पुन्हा नव्याने शंभर कोटींचा खर्च महापािलका प्रशासक करणार आहे.वास्तविक पाहता पूर्वीच रस्ते करणाऱ्या ठेकेदारांकडून दुरुस्ती ही विना मोबदला देता करून घेण्याची आत असताना हा शंभर कोटीचा खड्डा तिजोरीला का पाडला जातो आहे असा सवाल आता उपस्थित होतो आहे.

पावसाळ्यापूर्वीच सर्व दक्षता घेतल्याचा दावा करणारे , रस्ते सुस्थितीत असल्याचा आणि पावसामुळे पडलेले सर्व खड्डे तत्परतेने बुजविल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेने रस्ते दुरुस्तीसाठी तिजोरीतून शंभर कोटींच्या खर्चाचे नियोजन केले आहे. दुरवस्था झालेल्या रस्त्यांबरोबरच सुस्थितीतील रस्त्यांचीही दुरुस्ती आणि डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी शंभर कोटींच्या खर्चाला आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी मान्यता दिली आहे. रस्ते दुरुस्तीसाठी त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीला शंभर कोटींचा खड्डा पडणार असून रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली शंभर कोटींची केवळ उधळपट्टीच ठरणार आहे.

शहरातील रस्त्यांचे सुशोभीकरण करण्यासाठी १५ कोटी खर्च करण्यात येणार आहेत. शहराचे प्रवेशद्वार असलेले १२ रस्ते अतिमहत्त्वाचे म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. दुभाजक दुरुस्ती, पेंटींंग थर्मोप्लास्टिक पेंट, साइन बोर्ड, कब्र स्टोन, पेडस्ट्रीयन क्रॉसिंग अशी कामे सुशोभीकरणाअंतर्गत करण्यात येणार आहेत. या बारा रस्त्यांपैकी नेहरू रस्ता, खंडुजीबाबा चौक ते पौड फाटा, खडीमशीन चौक ते येवलेवाडी, शंकरशेठ रस्ता, नगर रस्ता, स्वारगेट ते कात्रज-सातारा रस्ता, बिबवेवाडी मुख्य रस्ता, बावधन मुख्य रस्ता या रस्त्यांच्या कामांसाठी प्रशासनाकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.

 नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोन्ही प्रकरणं भाजपाने जाणीवपूर्वक घडवून आणलेलं कटकारस्थान-अमोल मिटकरींची टीका

मुंबई-“न्यायव्यवस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण विश्वास आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोन्ही प्रकरणं भाजपाने जाणीवपूर्वक घडवून आणलेलं कटकारस्थान होतं. त्यामुळे आता केवळ एक जामीन मिळाला आहे, येत्या काही दिवसांत नवाब मलिकही बाहेर येतील”, असे देशमुखांना मिळालेल्या जामिनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.कथीत १०० कोटी वसुली प्रकरणी गेल्या ११ महिन्यांपासून ‘ईडी’ कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज अखेर जामीन मंजूर झाला आहे.“अनिल देशमुख यांना गेल्या ११ महिन्यांत शारीरिक व मानसिक त्रास झाला असेल. मात्र, उशीरा का होईना अनिल देशमुख यांना न्याय मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे या ११ महिन्यांच्या तपासांत काहीही निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, आज त्यांना जामीन मिळाला आहे, लवकरच ते या प्रकरणातून निर्दोष मुक्त होतील”, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

पोलिसांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज

मुंबई-राज्यातील पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

१० एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील पोलिसांना खाजगी बँकांकडून कर्ज घेऊन पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत योजना राबविण्यात येत होती. त्याप्रमाणे ५ हजार १७ पोलीस अधिकारी व अंमलदारांना मे २०१९ पर्यंत घरबांधणी अग्रीम देण्यात आले आहे. त्यानंतर ७ जून २०२२ च्या शासन निर्णयाप्रमाणे ही योजना खंडित करून पोलिसांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय नियमित घरबांधणी अग्रीम योजना देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, या घरबांधणी अग्रीमासाठी ७ हजार ९५० अर्ज प्राप्त झाले असून त्यासाठी २ हजार १२ कोटींची गरज भासणार आहे. मात्र इतकी मोठी रक्कम शासनाकडून एकरकमी उपलब्ध होणे शक्य नसल्याने पूर्वीप्रमाणेच बँकामार्फत कर्ज घेण्याची योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राहुल गांधी पायी फिरत गळाभेट घेतात, मोदींच्या कार्यक्रमाला कॅरेक्टर सर्टीफिकेट लागते-यावरून लक्षात घ्या लोकनेता आणि अहंकारी नेता कोण : पटोलेंंची टीका

मोदींचे दौरे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांकडून चारित्र्य प्रमाणपत्र मागणारी पद्धत सुरु ….

एकीकडे राहुल गांधी देशभर सामान्यांची गळाभेट घेत पायी फिरत आहेत. तर दुसरीकडे सामान्य माणसांना भेटणे तर सोडाच; पण आता पत्रकारांनासुद्धा पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी ‘कॅरेक्टर सर्टिफिकेट’ द्यावे लागणार! लोकनेता आणि अहंकारी नेता यांतील हा फरक आहे, अशी जोरदार टीका काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज ट्विटद्वारे केली.काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकदिवसीय हिमाचल प्रदेश दौऱ्याचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांकडून चारित्र्य प्रमाणपत्र मागणारी नोटीस प्रशासनाने जारी केले होते. यासह भारत जोडो यात्रेवर भाजप नेत्यांनी केलेल्या टीकेला नाना पटोले यांनी प्रखर प्रत्युत्तर दिले. त्यावर त्यांनी राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांचा जनतेतील समन्वयाबाबत तुलना करीत ट्विट करून जोरदार प्रत्त्युत्तर दिले.काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकदिवसीय हिमाचल प्रदेश दौऱ्याचे कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांकडून चारित्र्य प्रमाणपत्र मागणारी नोटीस प्रशासनाने जारी केले होते. आज मागे घेतली, त्यामुळे पत्रकारांमध्ये रोष निर्माण झाला. 29 सप्टेंबर रोजी लिहिलेल्या पत्रात सर्व पत्रकार, छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर यांची यादी मागवली होती. यासोबतच त्याचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रही मागविण्यात आले होते.सरकारी दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या पत्रकारांनाही त्याचे पालन करावे लागले. अधिसूचनेत म्हटले आहे की पत्रकारांना 1 ऑक्टोबरपर्यंत प्रमाणपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. “रॅली किंवा सभेत त्यांचा प्रवेश या कार्यालयाद्वारे निश्चित केला जाईल,” असे अधिसूचनेत म्हटले आहे.

अनिल देशमुखांना  11 महिन्यानंतर जामीन, ईडी सुप्रीम कोर्टात जाणार,जामिनानंतरही सुटका नाही

मुंबई-मनी लाँड्रिग प्रकरणात 11 महिन्यांपासून अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.मात्र, अनिल देशमुख लगेच तुरुंगाबाहेर येणार नाही, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे. ईडीने या जामिनास विरोध केला आहे. जामिनाविरोधात शासनाच्या महाधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे न्यायालयात सांगितले आहे.त्यामुळे उच्च न्यायालयाने जामिनास 13 ऑक्टोबरपर्यत स्थगिती दिली आहे. त्यामुळे जामिन मिळाला असला तरी देशमुख लगेच तुरुंगाबाहेर येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

ईडीने अनिल देशमुखांविरोधात मनी लाँड्रिगचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणीच आज उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुखांना जामीन मिळाला.

जामिनाबाबत अनिल देशमुखांच्या वकिलांनी सांगितले की, अनिल देशमुखांच्या म्हणण्यानुसार हप्ता किंवा वसुली झाली असे ईडीच्या तपासात कुठेही दिसून येत नव्हते. याप्रकरणात माफीचा साक्षीदार झालेला सचिन वाझे याने वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडे वेगवेगळे जबाब दिले आहेत. त्यामुळे त्याचा जबाब विश्वासार्ह्य नाही. अनिल देशमुखांच्या सांगण्यावरुन वसुली झाली, याचे कोणतेही सबळ पुरावे ईडी कोर्टात देऊ शकली नाही.

देशमुखांच्या वकिलांनी सांगितले की, कोणतेही पुरावे नसताना अनिल देशमुखांना तुरुंगात ठेवले जात आहे. अनिल देशमुख सध्या 73 वर्षांचे असून ते अनेक आजारांनी ग्रस्त आहेत. अशावेळी पीएमएलए कायद्याचा गैरवापर करुन त्यांना कोठडीत ठेवता येणार नाही. कोर्टाने हा युक्तिवाद मान्य करत 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर देशमुखांचा जामीन मंजूर केला. देशमुखांनी तपासात सहकार्य करावे, तपासासाठी जेव्हा बोलावले जाईल, तेव्हा सहकार्य करावे, अशा अटींसह कोर्टाने देशमुखांना जामीन मंजूर केला आहे.

CBI प्रकरणातही जामिनासाठी अर्ज करणार

अनिल देशमुखांविरोधात ईडीसोबतच सीबीआयनेही 100 कोटी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यावर देशमुखांच्या वकिलांनी सांगितले की, सीबीआयच्या प्रकरणातही लवकरच जामिनासाठी अर्ज दाखल करणार आहोत. आजच्या जामिनाला शासनातर्फे महाधिवक्त्यांनी विरोध केला. या जामिनाविरोधात ईडी सुप्रीम कोर्टात जाणार आहे. त्यामुळे कोर्टाने 13 ऑक्टोबरपर्यंत जामिनाला स्थगिती दिली आहे. म्हणजेच ईडीच्या केसमध्ये अनिल देशमुखांना जामीन मिळाला असला तरी सीबीआय प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार आहे.

शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट

मुंबई-दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रति १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे ७ कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण 513 कोटी 24 लाख खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

सदरहू शिधावस्तूंचा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा, त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

मनपा सेवकांसाठीअंशदायी आरोग्य योजना(CHS) रहावी.. खाजगी विम्याचा घाट नको.. राजीव गांधी स्मारक समितीची मागणी

पुणे दि ४ आक्टों- पुणे महापालिका सेवकांसाठी अस्तित्वातील अंशदायी सहाय्य योजना मोडीत काढून मेडिक्लेम अंतर्गत खाजगी विम्याचा घाट हे प्रशासक पुन्हा घालु पहात आहेत ही खेदाची बाब असून, पुणे मनपा प्रशासकांनी (अस्तित्वातील केंद्र व राज्य सरकार मान्य) अंशदायी आरोग्य सेवा योजना सूरू ठेवावी व “नविन लोकप्रतिनिधींची बॅाडी अस्तित्वात आल्यावरच नविन धोरणात्मक बाबींवर निर्णय घ्यावेत” अशी मागणी करणारे निवेदन आज मा विभागीय आयुक्तांना दिल्याचे काँग्रेस नेते व राजीव गांधी समिती संस्थापक गोपाळ तिवारी यांनी सांगितले..वास्तविक या बाबत पुर्वी देखील मनपा सेवक संघटनांनी खाजगी विमा योजनांचा घाट घालू नये’ या करीतां आंदोलन ही सूरू केले होते परंतू त्याच दिवशी मनपा सेवक संघटनेची समजुत काढून, मनपा प्रशासनाने ते रद्द करण्याचे आश्वासन देऊन, अंशदायी आरोग्य सेवा योजनाच पुर्ववत सुरू राहील असा भरवसा दिला मात्र  प्रत्यक्षात मात्र ऊलटे घडत असल्याचे निदर्शनास आले आहे..! सीएचएस विमा योजनेची मनपा पोर्टल वर विमा कपन्यांची टेंडर्स मागवण्यात आली आहेत व प्रशासकांचे समोर विमा कंपन्यांचे सादरीकरण देखील करण्यात आले.. ही खेदाची बाब असून या बाबत पुणे मनपा नक्की काय करू ईच्छीत आहे…? वास्तविक मनपा लोकप्रतिनिधींची मुदत संपलेमुळे मनपा-बरखास्त झाली असतांना.. मा आयुक्त प्रशासक या नात्याने कोणाच्या दबावाखाली निर्णय घेत आहेत..? राज्यातील सत्तापक्षाचा दबाव आहे काय..? अशी विचारणा देखील राजीव गांधी स्मारक समिती सदस्यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांना केली व निवेदन ही दिले…! तसेच, मनपाचे नविन लोकप्रतिनिधी (बॅाडी) निवडून येई पर्यंत (धोरणात्मक निर्णय न घेण्याते संकेत असतांना) मा प्रशासक विक्रम कुमार यांनी नवीन घोरणात्मक निर्णय घेऊ नयेत अशी विनंती करणारे निवेदन दीले.. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावयास लागेल, याचा ही ईशारा दिला.खाजगी मेडिक्लेम कंपन्याच्या दावणीला मनपा सेवकांना बांधणे अन्याय कारक असुन, कामगार बंधू च्या पाठीशी आम्ही सदैव राहू असे ही सुचित केले.. या शिष्टमंडळात, काँग्रेस नेते गोपाळ तिवारी, सर्वश्री सुर्यकांत ऊर्फ बाळासाहेब मारणे, सुभाष थोरवे, भोला वांजळे, संजय अभंग, लहू आण्णा निवंगुणे, ॲड फैयाज शेख, विकास दवे, अमर गायकवाड उपस्थित होते. सौरभ राव यांनी यामध्ये जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले..