नागपूर- बॉलिवूडमध्ये मुस्लीम समाजाचे मोठे योगदान आहे. या योगदानाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. तसेच अल्पसंख्याकांनी सर्वच क्षेत्रात आपले योगदान दिलेले आहे, असेही पवार म्हणाले. ते नागपुरात बोलत होते.आजघडीला कला, लेखन किंवा कविता असो या सर्वच क्षेत्रात योगदान देण्याची मोठी क्षमता अल्पसंख्याकांमध्ये आहे. बॉलिवडूमध्ये आतापर्यंत सर्वाधिक योगदान कोणी दिलेले आहे? बॉलिवूडच्या प्रगतीसाठी मुस्लीम समाजाने सर्वाधिक योगदान दिलेले आहे. याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही,” असे शरद पवार म्हणाले.
सावरकरांना ब्रिटिशांकडून पेन्शन कशासाठी मिळत होती, हे फडणवीसांनी स्पष्ट करावे, नाना पटोलेंचं आव्हान
मुंबई – काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कर्नाकटमध्ये एका पत्रकार परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सावरकर यांच्याविषयी जे विधान केले त्यावर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आकांडतांडव करण्याची काही गरज नाही.
राहुल गांधी खरे तेच बोलले त्यात चुकीचे काय आहे? सावरकर व आरएसएसचे स्वातंत्र्य चळवळीत काडीचेही योगदान नाही. सावरकर यांना ब्रिटिशांकडून पेन्शन मिळत होती याचे अनेक दाखलेही आहेत. ही पेन्शन सावरकरांना कशासाठी मिळत होती हे फडणवीसांनी स्पष्ट करावे, असे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्व देश काँग्रेसच्या झेंड्याखाली जात, धर्म, प्रांत विसरून एक झाला होता. या लढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सावरकर यांचे काहीही योगदान नाही. उलट भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सावरकर व आरएसएसची भूमिका ब्रिटिशांना साथ देणारीच होती. ‘अंग्रेजो चले जाव, भारत छोडो’ चळवळीत सर्व देश एकवटला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठे होता? ब्रिटिश सत्तेच्या विरोधात सशस्त्र लढा देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली असताना सावरकर यांनी मात्र ब्रिटिश सैन्यात तरुणांनी भरती व्हावे असे आवाहन करत होते. काळ्या पाण्याची शिक्षा ही एकट्या सावरकर यांनाच झाली नव्हती तर त्यांच्याबरोबर १४९ स्वातंत्र्यसैनिकांनाही झाली होती पण या शिक्षेतून सावरकर यांनाच ब्रिटिशांनी नंतर मुक्त केले, हा इतिहास आहे.
पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सुद्धा ११ वर्षे तुरुंगवास भोगला, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्यासह लाखो स्वातंत्र्यसैनिकांनीही तुरुंगवास भोगला, लाठ्या काठ्या झेलल्या, हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी बलिदान दिले. भारताच्या फाळणीचे बीज सावरकरांनी मांडलेल्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतातच आहे हे ‘नव इतिहासकार’ फडणवीसांना माहित असेलच. खोटी व अपुरी माहिती देऊन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे, जनतेचा बुद्धीभेद करणे ही आरएसएस व भाजपची कार्यपद्धती आहे. अंदमानातील सेल्युलर जेलमध्ये असताना सावकर बुलबुल पक्षावर बसून भारतभ्रमण करत होते असा बनावही कर्नाटकातील भाजपच्या शासनाने शालेय पुस्तकात केला, यातून खोटी माहिती पसरवण्याचे कामच भाजपाकडून केले जात आहे हे स्पष्ट होते.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला केरळ, तामिळनाडू, कर्नाटकात जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने भाजपाने धास्ती घेतली आहे. त्यामुळे काहीतरी शोधून भारत जोडो यात्रा व राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याचे काम भाजपा करत आहे. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली यात्रा भारत जोडणारीच आहे, तोडण्याचे काम भाजपा व आरएसएसचे आहे म्हणूनच फडणवीसांच्या तोंडी ‘भारत जोडो की तोडो’ असे शब्द येणे आपसुकच आहे. फडणवीस यांना राहुल गांधी यांच्या वक्तव्याने मिरच्या झोंबण्याचे काही कारण नाही कारण राहुल सत्य तेच बोलले, असेही पटोले म्हणाले.
मातृसंस्थेने केलेला सत्कार भारावून टाकणारा-डॉ. संगीता बर्वे
विद्यार्थी साहाय्यक समितीतर्फे सत्कार व मुलाखत
पुणे : “साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यापासून अनेक सत्कार, कौतुक झाले. मात्र, ज्या विद्यार्थी साहाय्यक समितीने मला घडवले. त्या मातृसंस्थेने आज केलेला सत्कार भारावणारा आहे. माझ्या सख्या, मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबाने पाठीवर टाकलेली ही कौतुकाची थाप ऊर्जा देणारी आहे,” अशी भावना साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या, प्रसिद्ध बालसाहित्यिका व कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांनी व्यक्त केली.
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वतीने माजी विद्यार्थिनी असलेल्या डॉ. संगीता बर्वे यांचा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी समितीच्या माजी विद्यार्थिनी व लेखिका प्रार्थना सदावर्ते यांनी डॉ. बर्वे यांची मुलाखत घेतली.

समितीच्या आपटे वसतिगृहातील मोडक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात प्रा. तेज निवळीकर, डॉ. राजीव बर्वे, समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त तुषार रंजनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, माजी विद्यार्थी मंडळाचे सचिव सुनील चोरे, मनीषा गोसावी, अनिता देशपांडे, डॉ. मानसी अंबीकर, सुनंदा पाटील यांच्यासह कार्यकर्ते, माजी विद्यार्थी व समितीच्या वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, “ग्रामीण भागातून आल्याने परिस्थितीची जाण होती. वडिलांचे संस्कार होते. पुढे समितीत आल्यावर आयुष्याचा अर्थ उमगत गेला. सहज सुचलेले लिहीत गेले. गरिबीत जगणाऱ्यांसाठी डॉक्टरकी करू लागले. पण त्यातून जीवन समृद्ध झाले. आजच्या टेक्नोसॅव्ही जगात मुलांना समृद्ध बनविण्यासाठी पालकांनी त्यांच्याशी संवाद साधायला हवा. त्यांना वेळ द्यायला हवा. त्यांना समजून घेतले पाहिजे. ‘पियूची वही’ ही प्रत्येकाच्या आयुष्याला जोडणारी आहे. लहानपणापासून खेळ खेळत असल्याने या प्रवासातील कसरत सहजपणे करता आली.”
भाऊसाहेब जाधव म्हणाले, “डॉ. संगीता बर्वे यांना मिळालेला पुरस्कार हा समितीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. सहज, तरल व वास्तवदर्शी लेखनातून बर्वे यांनी मुलांचे बालपण, आई-बाबा यांच्यातील भावविश्व मांडले आहे. ‘पियूची वही’ ही संस्कार देणारी साहित्यकृती आहे. आपल्या प्रत्येकाच्या बालपणात डोकवायला लावणारे त्यांचे लेखन आहे.”
प्रास्ताविक प्रा. तेज निवळीकर यांनी केले. सूत्रसंचालन ऍड. पार्थना सदावर्ते यांनी केले. अनिता देशपांडे यांनी आभार मानले.
वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे वैभव: पंढरपूरसह देहू-आळंदीचाही विकास करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे दि.८: वारकरी संप्रदाय ही मोठी शक्ती असून या संप्रदायाने भजन व किर्तनाच्या माध्यमातून मानवकल्याण आणि विश्वशांतीचा संदेश दिला. मानवाला सद्विचार देणारा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचे वैभव आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मृदंग ज्ञान शिक्षण संस्था आळंदी आयोजित संत दासोपंत स्वामी आळंदीकर यांचा गुरुपूजन सोहळा, संस्थेचा रौप्य महोत्सव सोहळा आणि मृदंग दिंडी महोत्सव प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार दिलीप मोहिते, महेंद्र थोरवे, मारोती महाराज कुरेकर, दासोपंत स्वामी आळंदीकर, महंत पुरुषोत्तम दादा महाराज, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्राला महान संत परपरा आणि वारकरी परंपरा लाभली आहे. ज्ञानोबा माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराजांसारख्या महान संतांची परंपरा हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. अन्य कुठल्याही प्रांताला हे भाग्य लाभले नसेल. म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत. वारकरी परंपरेत भजन, किर्तनाला मोठे स्थान आहे, ही एक ज्ञान आराधना असून त्यात भक्ती आणि ज्ञानोपासनेचा संगम आहे. विश्वशांती आणि मानवकल्याणाचा संदेश दिला जातो.
वारकरी संप्रदायाकडून समाजात सकारात्मकता पेरण्याचे काम
भजन, किर्तनात अभंग, ओव्या, भारुड याचा अर्थ उलगडून सर्वसामान्य माणसाला कळेल अशा सोप्या भाषेत पोहोचवले जाते. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून मानसिक समाधान मिळते, चांगली ऊर्जा मिळते. मनातील राग, लोभ, द्वेष, मत्सर बाजूला सारला जाते. जीवनातील नकारात्मकता घालवून त्याठिकाणी सकारात्मकता पेरण्याचे, मन ताजेतवाने करण्याचे काम किर्तन-प्रवचनाने होते. समाजप्रबोधनाच्या माध्यमातून माणसाच्या मनात चांगले विचार बिंबविण्याचे कार्य वारकरी संप्रदाय करतो. आपल्या आयुष्यात पांडुरंगाची पूजा करण्याची संधी मिळाली तो दिवस आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस होता, असे त्यांनी सांगितले.
पंढरपूरसह देहू-आळंदीच्या विकासावरही भर
मुख्यमंत्री पद वारकरी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, शोषित- पिडीत लोकांच्या कल्याणासाठी वापरून राज्याचा सर्वांगिण विकास करायचा आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, पंढरपूरचा विशेष कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वारकऱ्यांना सर्व सुविधा मिळाव्यात आणि परिसर स्वच्छ रहावा यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. देहू-आळंदीचादेखील याच पद्धतीने विकास करायचा आहे. याठिकाणी लाखो भाविक येतात. येथे येणाऱ्या वारकऱ्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यात येतील. इंद्रायणी नदी स्वच्छ करण्यासाठी प्रशासनाला सुचना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
मृदंग ज्ञान शिक्षण संस्थेत अनेक शिष्य मृदंग वादनाचे शिक्षण घेत आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेशातही या संस्थेचे शिष्य भजन किर्तनाला साथसंगत करीत आहेत. ही कौतुकास्पद बाब असल्याचे श्री.शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संत दासोपंत स्वामी आळंदीकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मारुतीमहाराज कुरेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमापूर्वी श्री.शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांनी मृदंग दिंडीमध्ये पायी चालत सहभाग घेतला.
000
सरसंघचालकांच्या वक्तव्यावर शरद पवार: फक्त माफी मागून चालणार नाही, तर व्यवहारातही बदल हवा
नागपूर -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा बदल योग्य बदल आहे. पण फक्त माफी मागून चालणार नाही. तर आपण व्यवहारात या सगळ्या वर्गाच्या संबंधिची भूमिका कशी घेतोय, यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, असं शरद पवारांनी म्हटलं आहे. मोहन भागवत यांनी काल नागपुरात झालेल्या कार्यक्रमात ब्राम्हण समाजाने भूतकाळातील चुकांबद्दल पापक्षालन करायला हवे असं म्हटलं होतं. यावर शरद पवारांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
इतिहासात समाजात सामाजिक विषमतेला धरून जे काही घडले आहे, त्याबाबत आज आपण माफी मागितली पाहिजे, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान माझ्याही वाचनात आले. समाजातील एका मोठ्या वर्गाला काही पिढ्या ज्या यातना सहन कराव्या लागल्या. या यातनांची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्या घटकांना याची जाणीव व्हायला लागली. हा बदल योग्य आहे. नुसती माफी मागून चालणार नाही. आपण व्यवहारामध्ये या सर्व वर्गाच्याबाबत भूमिका कशी घेतो यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत.असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
जातिसंस्थेवर सरसंघचालकांचे वक्तव्य,आपल्या पूर्वजांनी चुका केल्या आहेत हे सत्य
नागपूर-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे जातीव्यवस्थेवरील वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे. शुक्रवारी नागपुरात एका पुस्तकाचे प्रकाशन करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी जात आणि वर्णव्यवस्था संपवण्याचे आवाहन केले आहे. भागवत म्हणाले – समाजाचे हित पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने वर्ण आणि जातिव्यवस्था ही जुनी विचारसरणी होती, ती आता विसरायला हवी, असे म्हणायला हवे. भागवत त्यांनी ब्राम्हण हा जन्माने नाही तर क्रमाने ठरत असतो. धर्मशास्त्रात देखील हेच सांगितलं आहे. मात्र मधल्या काळात जातीभेदाची चौकट घट्ट झाली आणि मानवाला मान खाली घालायला लावणारे कृत्य घडले . त्यामुळं आपण पापक्षालन करायला हवं असं भागवत म्हणालेत.
विदर्भ संशोधन मंडळाच्यावतीने ‘वज्रसूची-टंक’ या डॉ. मदन कुलकर्णी व डॉ. रेणुका बोकारे यांच्या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी वा.वि. मिराशी सभागृहात पार पडला. यावेळी बोलताना मोहन भागवत यांनी म्हटलं, “आपल्या धर्मशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. ब्राह्मण हा त्याच्या कर्मामुळे, गुणांमुळे होतो हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमूद आहे. मग ही विषमता आली कुठून? याला इतिहासाची पार्श्वभूमी आहे. जनुकीय शास्त्रानुसार ८० ते ९० पिढ्यांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाह पद्धती होती. नंतरच्या काळात हळूहळू ती लोप पावली. त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली.”
“वर्ण व जातीव्यवस्था आता भूतकाळ झाला आहे. कोणालाही विषमता नको. हीच सर्वाच्या मनातील गोष्ट डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेत समाविष्ट केली. ती आपण स्वीकारली आणि त्यानुसार आपण आचरण करण्याचा जोरकसपणे प्रयत्न करित आहोत”, असेही भागवत म्हणाले.
“ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होतो, त्या सर्व गोष्टी समाजातून हद्दपार व्हायला हव्यात. आपण आपल्याच लोकांना मान खाली घालावी लागेल अशा पद्धतीने वागवले. परिणामी, आपल्यातील दरी वाढत गेली. दुर्दैवाने हे पाप आपल्याकडून घडले. त्यामुळे आता याचे पापक्षालन केल्याशिवाय गत्यंतर नाही”, असंही त्यांनी नमूद केलं.
दसऱ्याच्या दिवशी रोजगारावरील वक्तव्यावरूनही झाला वाद
दसऱ्याच्या दिवशी नागपुरात कार्यकर्त्यांना संबोधित करताना भागवत म्हणाले होते, ‘भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात आर्थिक आणि विकासाचे धोरण रोजगाराभिमुख असावे ही अपेक्षा साहजिक असेल, पण रोजगार म्हणजे केवळ नोकऱ्या नाहीत, ही समज समाजात वाढवावी लागेल. कोणतेही काम प्रतिष्ठेच्या दृष्टीने लहान किंवा मोठे नसते; श्रम, भांडवल आणि बौद्धिक श्रम या सर्वांना समान महत्त्व आहे. उद्योजकीय प्रवृत्तींना प्रोत्साहन दिले पाहिजे. यामध्ये स्टार्टअप्स महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ते पुढे नेण्याची गरज आहे.
संघप्रमुखांच्या या वक्तव्यावर आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद म्हणाले होते की, ‘केवळ संघाच्या ठगांकडून प्रशिक्षण घेतलेले आणि संघाच्या महाखोट्या, महाकपटी शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देऊन मते गोळा करतात? जेव्हा-जेव्हा आरएसएस-भाजप स्वतःच्या वक्तव्यांत अडकतात तेव्हा द्वेष पसरवणारे सज्जन न मागता ज्ञान वाटायला येतात.”
रसिकांनी लुटला कोजागिरी मैफिलीचा आनंद !
भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
पुणे ः
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजित मराठी युगुलगीतांच्या ‘शब्दरूप आले मुक्या भावनांना ‘ या सुरेल मैफिलीला शनिवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला !’जतन, पुणे ‘ प्रस्तुत या कार्यक्रमात सचिन घनपाठी, गौरी कुंटे, पल्लवी आनिखिंडी यांनी गीते सादर केली. मिहिर भडकमकर ( की-बोर्ड), अक्षय पाटणकर(तबला),हेमंत पोटफोडे( साईड ऱ्हीदम) यांनी साथसंगत केली.
या कार्यक्रमाचे आयोजन शनीवार, ८ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे करण्यात आले होते. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. छाब्रिया शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा दास यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा प्रशस्तीपत्रक आणि ज्ञानेश्वरीची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात ‘तोच चंद्रमा नभात’, ‘उमलली एक नवी भावना’, ‘बघत राहू दे’, ‘रात चांदणी’, ‘चांदण्यात फिरताना’ , ‘तुझी माझी प्रीत’, ‘धुंद एकांत हा’, ‘पाठशिवा हो पाठशिवा’,’आज चांदणे उन्हात’, ‘शारद सुंदर’ , ‘धुंदी कळ्यांना’, ‘उगवली शुक्राची चांदणी’, ‘माझ्या प्रीतफुला’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘माझ्या रे प्रीत फुला’ अशा अनेक बहारदार युगुलगीतांची बरसात झाली . ‘फिटे अंधाराचे जाळे ‘या गाण्याने कार्यक्रमाचा समारोप झाला.हा कार्यक्रम विनामूल्य होता.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १४२ वा कार्यक्रम होता.
ससून रुग्णालयात न्युरोलॉजिस्ट नाहीत… वैद्यकीय मंडळाच्या दाखल्यासाठी मुंबईतील जे जे रुग्णालय येथे जावे लागते!!!
आम आदमी पक्षाच्या जाबानंतर अधिष्ठाता यांचे नेमणुकीचे व सुधारणेचे आश्वासन
पुणे-ससून रुग्णालयात न्युरोलॉजिस्ट नाहीत… वैद्यकीय मंडळाच्या दाखल्यासाठी मुंबईतील जे जे रुग्णालय येथे जावे लागते. याबद्दल काल बै जी वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय याचे अधिष्ठाता डॉ काळे यांची आम आदमी पक्षाचे बिबवेवाडी विभाग समन्वयक घनशाम मारणे व कुमार धोंगडे यांनी भेट घेतली. त्यांना यास्थिती बद्दल अवगत करून परिस्थिती तातडीने सुधारण्याचे आवाहन केले. ससून सारख्या अतिशय महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये नियमित स्वरूपाचे न्यूरोलॉजिस्ट नसणे ही अतिशय शरमेची बाब आहे हे वैद्यकीय अधिष्ठातांच्या निदर्शनास त्यांनी आणून दिले. त्यानंतर अधिष्ठाता डॉ काळे यांनी ही परिस्थिती तातडीने सुधारण्याचे आश्वासन दिले. लवकरच नियमित न्यूरोलॉजिस्ट ची नेमणूक केली जाईल तसेच दुर्धर आजार ग्रस्त रुग्णांना, शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय दाखला देण्याचे प्रलंबित काम वेगवान करण्यात येईल असेही आश्वासन दिले.
सरकारी कर्मचारी एखाद्या दुर्धर आजाराने ग्रस्त असल्यास त्याला ससूनच्या वैद्यकीय स्थायी मंडळाचा दाखला अनिवार्य आहे. त्याखेरीज त्याला रजा व वेतन अदा केले जात नाही. त्यातच मेंदूचा व मज्जासंस्थेचा आजाराचा दाखला पुण्यातील प्रतिष्ठित ससून रुग्णालयामध्ये न्यूरोलॉजिस्ट नसल्याने मुंबईतील जे जे रुग्णालय येथून घ्यावा लागतो. सदर प्रकरणी रुग्णांचे त्यांच्या कुटुंबियांचे प्रचंड हाल होतात. एकीकडे आजारात दुखाचा डोंगर, दुसरीकडे वेतन रोखल्याने घरात पैसा नाही, तिसरीकडे सरकारी रुग्णालये डॉक्टर, कर्मचारी यांची हे अतिरिक्त काम असल्याने त्याकडे बघण्याचा बेफिकीर दृष्टिकोन.
ह्यामुळे महिनोंमहिने सदर प्रकरणी रुग्णांना हेलपाटे मारावे लागतात. त्यातच दिव्यांग सेवकांचे हाल तर बघवत नाहीत.
परंतु संवेदना शुन्य प्रशासनाला याचे कोणतेही देणेघेणे नसते.
या व अश्या अनेक अर्थहीन कामाचा पाढा आम आदमी पक्षाच्या घनशाम मारणे यांनी अधिष्ठाता डॉ काळे यांच्यासमोर वाचला.
दिव्यांग सेवकांची ह्या पुढील काळात अशी गैरसोय होणार नाही तसेच प्रलंबित दाखले तातडीने दिले जातील असे आश्वासन त्यांनी आपच्या शिष्टमंडळाला दिले. याची अंमलबजावणी झाल्यास यापुढे सदर बाबीचा लाभ सर्व दिव्यांग सरकारी सेवक, त्यांचे कुंटुबिय, तसेच सर्व सरकारी सेवकांना होणार आहे.
महापालिकेच्या सुरक्षारक्षकांची पिळवणूक :क्रिस्टलवर कारवाई ची ‘आप ‘ची मागणी;आयुक्त विक्रमकुमार दबावाखाली असल्याचाही आरोप
पुणे-महापालिकेतील सुरक्षारक्षकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या आणि त्यांचे वेतन थकवणाऱ्या KRYSTAL INTEGRATED SERVICES PRIVATE LIMITED कंपनीवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी आप च्या वतीने करण्यात आली आहे.आप चे प्रवक्ते डॉ अभिजित मोरे यांनी सांगितले कि,’अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांना याबाबत चे लेखी निवेदन देण्यात आले आहे. भाजपचे विधान परिषदेतील सर्वात श्रीमंत आमदार प्रसाद लाड यांच्या कुटुंबाशी संबंधित असणाऱ्या KRYSTAL INTEGRATED SERVICES PRIVATE LIMITED या कंपनीवर सत्ताधारी भाजप – शिंदे सरकारचा राजकीय वरदहस्त असल्याने तिच्या विरोधात अद्यापही कोणतीही प्रशासकीय व फौजदारी कारवाई होत नाही. या कंपनीला काळ्या यादीत टाकावे असा अहवाल कामगार कल्याण विभाग व सुरक्षारक्षक विभागाने दिलेला आहे अशी आमची माहिती असून पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार हे राजकीय दबावापोटी कोणतीही कारवाई करत नाहीत, ही अतिशय खेदाची बाब आहे.असाही आरोप आपच्या वतीने करण्यात आला आहे असेही मोरे यांनी सांगितले आहे.

मोरे म्हणाले,’पुणे महानगरपालिकेच्या सेवेतील शेकडो कंत्राटी सुरक्षारक्षकांचे जून २०२२ पासून ते सप्टेंबर २०२२ पर्यंत चार महिन्यांचे वेतन तर काही कामगारांचे त्याहून अधिक महिन्यांचे वेतन क्रिस्टल कंपनीद्वारे थकीत झाले असल्याची बाब आम आदमी पार्टीच्या निदर्शनास आली आहे. ही अतिशय गंभीर बाब असून सुरक्षारक्षक कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल सुरु आहेत. कुटुंब कसे चालवावे हा प्रश्न कामगारांपुढे आहे. दिवाळी सण कसा साजरा करायचा हा यक्ष प्रश्न या कामगारांपुढे आहे. केलेल्या कामाचे वेतन न देणे हा फौजदारी गुन्हा आहे. तसेच ठेकेदाराने कामगारांचे वेतन दिले की नाही हे तपासणे आणि दिले नसल्यास त्यांना द्यायला लावणे व कामगार हिताच्या तरतुदीला हरताळ फासणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करणे ही पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे
तरी वारंवार सुरक्षा रक्षकांचे वेतन थकवणाऱ्या, कराराचा भंग करणाऱ्या KRYSTAL INTEGRATED SERVICES PRIVATE LIMITED या कंपनीवर दंडात्मक कारवाई करत तिला काळ्या यादीत टाकावे, ही विनंती. अन्यथा पालिकेतील कंत्राटी कामगारांना संघटीत करत आम आदमी पक्षाला आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. होणाऱ्या परिणामांची जबाबदारी सर्वस्वी महापालिका आयुक्त यांची असेल.असेही त्यांनी सांगितले.
नेहरु युवा केंद्र व नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्या वतीने बहारदार जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा
पुणे-नेहरू युवा केंद्र , क्रिडा मंत्रालय, भारत सरकार आणि नामवंत नृत्य संस्था डाॅ.नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा भारत देशाच्या अमृतमहोत्सव वर्षा निमित्त आयोजित करण्यात आल्या .शास्त्रीय नृत्य ( कथक नृत्य, भरतनाट्यम नृत्य, इ.)लोकनृत्य, या समुह नृत्य प्रकारात प्रथमच या नृत्य स्पर्धा झाल्या. नृत्य स्पर्धा या नंदकिशोर कल्चरल सभागृहात संपन्न झाल्या. स्पर्धेची सुरुवात नेहरू युवा केंद्राचे संचालक यशवंत मानखेडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.या वेळी नगरसेवक सचिन चिखले ,नगरसेवक उत्तम केंदळे, प्रसिद्ध कथक नर्तक डॉ.नंदकिशोर कपोते, कार्यकर्त्या मनिषा गटकळ, परीक्षक कांचन पालकर, वैशाली पळसुले आदि उपस्थित होते.या वेळी यशवंत मानखेडकरांनी स्पर्धेविषयी माहिती सांगुन सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.सचिन चिखले , उत्तम केंदळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पुणे जिल्ह्य़ातील विविध ठिकाणांहून एकुण १५ नृत्य संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. वंदना, अर्धांग, तिरवट, भरतनाट्यम, बंगाली नृत्य असे विविध सुंदर नृत्य प्रकार स्पर्धेत सादर करण्यात आले. नृत्यातील मनमोहक हालचाली , अंग संचालन, जोरदार पदसंचालन, अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक कथक समुह नृत्य-मनिषा नृत्यालय, द्वितीय क्रमांक भरतनाट्यम समुह नृत्य-नुपूर भरतनाट्यम अकादमी व तृतीय क्रमांक बंगाली लोकनृत्य – नृत्य शारदा या संघांना मिळाला. या जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिनांक १४ ला अण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे येथे आयोजित करण्यात आला असून स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शास्त्रीय नृत्य ( कथक नृत्य, भरतनाट्यम नृत्य, इ.)लोकनृत्य, या समुह नृत्य प्रकारात प्रथमच या नृत्य स्पर्धा झाल्या. नृत्य स्पर्धा या नंदकिशोर कल्चरल सभागृहात संपन्न झाल्या. स्पर्धेची सुरुवात नेहरू युवा केंद्राचे संचालक यशवंत मानखेडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.या वेळी नगरसेवक सचिन चिखले ,नगरसेवक उत्तम केंदळे, प्रसिद्ध कथक नर्तक डॉ.नंदकिशोर कपोते, कार्यकर्त्या मनिषा गटकळ, परीक्षक कांचन पालकर, वैशाली पळसुले आदि उपस्थित होते.या वेळी यशवंत मानखेडकरांनी स्पर्धेविषयी माहिती सांगुन सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.सचिन चिखले , उत्तम केंदळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पुणे जिल्ह्य़ातील विविध ठिकाणांहून एकुण १५ नृत्य संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. वंदना, अर्धांग, तिरवट, भरतनाट्यम, बंगाली नृत्य असे विविध सुंदर नृत्य प्रकार स्पर्धेत सादर करण्यात आले. नृत्यातील मनमोहक हालचाली , अंग संचालन, जोरदार पदसंचालन, अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक कथक समुह नृत्य-मनिषा नृत्यालय, द्वितीय क्रमांक भरतनाट्यम समुह नृत्य-नुपूर भरतनाट्यम अकादमी व तृतीय क्रमांक बंगाली लोकनृत्य – नृत्य शारदा या संघांना मिळाला. या जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिनांक १४ ला अण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे येथे आयोजित करण्यात आला असून स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे कर्तृत्ववान ‘नवदुर्गां’चा सन्मान
पुणे/फुलगाव | शारदीय नवरात्रोत्सव व लोकसेवा प्रतिष्ठान शैक्षणिक उपक्रमाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त लोकसेवा संकुल फुलगाव येथे ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यामध्ये पुणे शहर व परिसरातील सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, साहित्य, उद्योग, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, संगीत, प्रशासन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १३ कर्तृत्ववान ‘दुर्गांचा’ सन्मान करण्यात आला.
लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे व त्यांच्या पत्नी लोकसेवा प्रतिष्ठानच्या संचालिका सविता पायगुडे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला. खासदार वंदना चव्हाण या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
नवरात्र उत्सवानिमित्त सर्वत्र आदिशक्तीचा जागर केला जातो. त्यानिमित्ताने सतार वादक गौरी दीपक शिकारपुर, बचत गट उद्योजिका कमल परदेशी, व्यावसायिक शितल बाळासाहेब अमराळे, व्यावसायिक दीपाली मंगेश पायगुडे, भाग्यश्री निलेश पायगुडे, पोलिस उपनिरीक्षक प्रियांका रामेश्वर पवार, विद्युत अभियंता विदुला विजयकुमार देवकाते, नेत्रतज्ज्ञ डॉ. वंदना मोहिते, मुख्याध्यापिका काजल छतिजा, आदर्श सरपंच मंदानानी साकोरे, हॉटेल उद्योजिका कुसुमबाई गडधे, कुस्तीपटू कोमल गोळे यादव, हॉटेल व्यावसायिक अरुणा रामदास पायगुडे या १३ कर्तृत्ववान ‘दुर्गांचा’ खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते श्री महालक्ष्मीचे रजत नाणे, शाल व तुळशी वृक्ष देऊन गौरव करण्यात आला. हा सोहळा फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत पार पडला. खासदार वंदना चव्हाण यांचा संस्थेच्या वतीने निवृत्त शिक्षिका प्रतिभा भडसावळे, मुलींची सैनिकी शाळेच्या प्राचार्या लक्ष्मी कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
खासदार चव्हाण यांनी लोकसेवा शैक्षणिक संकुल, सैनिकी शाळा आणि याठिकाणी उपलब्ध सुविधांचे कौतुक करतानाच गौरव झालेल्या नवदुर्गांच्या कार्याचेही त्यांनी कौतुक केले. शिक्षण संस्थेत अशा प्रकारचे कार्यक्रम घेतल्याने मुला-मुलींवर चांगले संस्कार होतील व त्यातून ही मुले घडतील, असेही त्या म्हणाल्या.
लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल, टेन टी. इंटरनॅशनल स्कूल, लोकसेवा गर्ल्स मिलिटरी स्कूल, लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्र उत्सवा दरम्यान घटस्थापना, समूह गायन, नृत्य, वेशभूषा, कन्या पूजन आणि नवदुर्गा सन्मान सोहळा आदी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक व लोकसेवा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य नरहरी पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे संयोजन साधना शिंदे आणि मनीषा तिरखुंडे यांनी केले. पुनम भोसले, जयश्री जरे, संगीता देशमुख, योगेश्री शिवले, ज्योती वाळुंज, रूपाली आव्हाड, शुभांगी चव्हाण, रेश्मा मांढरे, रेखा जाधव, चंदा थापा, चैत्राली जगताप, मनाली सूर्यवंशी, माधवी कुरले, वैजयंती नायक, दिपाली शेवाळे, रेखा खरात, अर्चना मोरे, वनिता म्हस्के, दिपाली भंडारी, सादिया शेख, रोहिणी शिंदे, ऋतुजा कुलकर्णी यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी ढवळे यांनी केले.
कार्यक्रमास बाळासाहेब अमराळे, बंटी सिंग अरोरा, ज्येष्ठ पत्रकार दीपक दराडे, प्राचार्य शोपिमोन, प्राचार्य देणसिंग, उपसरपंच ज्योती गवारे, शिक्षक, पालक, परिसरातील महिला, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दस्तनोंदणी सुरु करण्याबाबत सरकार सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे- काही ठिकाणी घर खरेदी विक्रीची दस्तनोंदणी बंद असल्याने सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संदीप खर्डेकर आणि रमेश कोंडे यांनी गाऱ्हाणे मांडले होते तर संदीप खर्डेकर यांनी न्यायालयाचा कोणताहा स्थगिती आदेश नसताना महसूल खात्याने दस्तनोंदणी बंद ठेवली असून त्यामुळे छोटी घरं खरेदी केलेले सामान्य नागरिक अडचणीत आले असल्याचे सांगितले. यावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल व दस्तनोंदणी सुरु करण्याबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय करू असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
शिवसेना शिंदे गटाचे रमेश कोंडे यांनी आज दस्तनोंदणी सुरु करणे बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ठरविली होती. यावेळी भाजपा प्रवक्ता संदीप खर्डेकर, सुभाष नाणेकर, सारंग राडकर, दत्ता मारणे,सुभाष शिंदे,अतुल धावडे,किरण वांजळे,प्रमोद रायकर, राहुल घुले, निलेश काळभोर, निलेश घारे, काका खवले,
सतीश वांजळे,बागी धावडे,राहुल वांजळे,
यांच्यासह मोठ्या संख्येने त्रस्त नागरिक उपस्थित होते.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची कास महोत्सव व कास पठारास भेट
सातारा दि. 8 : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कास महोत्सव 2022 व कास पठारास सदिच्छा भेट दिली. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व उपवनसंरक्षक महादेव मोहिते उपस्थित होते.
यावेळी श्री. केसरकर म्हणाले, कास पठार हे जागतिक वारसास्थळ आहे, जैवविविधतचे भांडार असून महाराष्ट्राचे तसेच पश्चिम घाटाचे वैभव आहे. येथील निसर्गाचे संवर्धन करताना स्थानिक ग्रामस्थांच्या रोजगारासाठी पर्यटन व वन पर्यटनासारखे पर्याय उपलब्ध करुन देणे महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे रक्षण करत पर्यटनाला चालना देण्याचे काम शासनामार्फत करण्यात येईल. सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटन विकासाला खूप वाव आहे. यासाठी येथील पर्यटन विकास आराखडा तयार करावा तसेच शिवसृष्टीसारखा प्रकल्पही शासनामार्फत साकारण्यात येईल. साताऱ्याचा पर्यटन विकास करण्यासाठी कटिबध्द असून शालेय मुलांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती होण्यासाठी शालेय स्तरांवर ग्रीन आर्मी सारखे उपक्रम राबविण्यात येतील असेही श्री. केसरकर यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, कास महोत्सवाला पर्यटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. येथे स्थानिकांनी उभारलेल्या स्टॉललाही पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. येथे पर्यटन वाढीसाठी खूप वाव आहे. या ठिकाणी पर्यटनाला चालना देण्याबरोबरच पर्यावरणपूरक पर्यटन कसे वाढविता येईल यासाठी प्रयत्न केले जातील.
राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, वन विभाग आणि पर्यटन विभाग यांचे कास महोत्सव 2022 आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री श्री. केसरकर यांचा सत्कार केला.
फडणवीसांकडून राहुल गांधींच्या विधानाचा निषेध;उद्धव ठाकरे अजूनही त्यांना पाठिंबा देणार का?
मुंबई-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानाचा निषेध केला. आणि अजूनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहुल गांधींना , कॉंग्रेसला पाठिंबा देणार का?, असा सवाल त्यांनी यासंबंधी केला आहे. काँग्रेसकडून वारंवार सावरकरांचा अवमान सुरू आहे. राहुल गांधींना काँग्रेसच नाही तर भारतीयांचाही इतिहास माहिती नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
स्वा. सावरकरांबद्दल राहुल गांधी सात्यत्याने बोलत आहे. स्वा.सावरकरांना काँग्रेसने वारंवार अपमानीत करण्याचे काम केले. याचे कारण आहे की, सावरकरांच्या मागे देशातील जनता मोठ्या प्रमाणात होती. स्वातंत्र्यानंतरच्या राजकीसय परिस्थितीत जाणीवपूर्वक त्यांना अपमानित करण्यात आले. काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे अगदी कमी लोक होते. सावरकरांनी अनेक क्रांतीकारकांना मोठी प्रेरणा देत अनेक क्रांती कारकांना मोठे केले होते. मात्र राहुल गांधी त्यांचा अपमान करतात कारण त्यांना सावरकरांचा आणि देशाचा इतिहास माहिती नाही म्हणून त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
उद्धव ठाकरे राहूल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करणार की, भारत जोडो यात्रेला येणाऱ्या राहुल गांधींच्या स्वागतासाठी आपल्या कार्यकर्त्यांना पाठविणार असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. राहुल गांधींच्या वक्तव्याचे समर्थन उद्धव ठाकरे करणार का याचे उत्तर त्यांनी द्यावे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. भारतीयांच्या मनात सावरकरांकबद्दल असलेली प्रतिमा कधीच मिटू शकणार नाही, राहुल गांधींनी असे कितीही प्रयत्न केले तरी सावरकरांबद्दलचे विचार बदलू शकणरी नाही.
काय म्हणाले होते राहुल?
भारत जोडो यात्रेला 1 महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी कर्नाटकच्या तुमकुर येथे एका 34 मिनिटांच्या पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व PFI पासून काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणापर्यंत सर्वच मुद्यांवर उहापोह केला.भारताच्या फाळणीविषयीच्या एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल म्हणाले – स्वातंत्र्ययुद्धात सावरकर इंग्रजांसाठी काम करत होते. त्यांना इंग्रजांकडून त्याचा मोबदलाही मिळत होता. काँग्रेस खासदार म्हणाले -देशाची जनता भ्रष्टाचारामुळे त्रस्त असून, सरकार हे मॅनेज करण्यासाठी माध्यमांना नियंत्रित करत आहे.
माजी नगरसेवकावर १५ कोटींची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल
पुणे : जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात कंपनीच्या वतीने व्यवहार करताना कंपनीला पूर्वकल्पना न देता जमिनीची परस्पर विक्री करुन १५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरीतील माजी नगरसेवकावर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रामकृष्ण गोविंदस्वामी पिल्ले ऊर्फ राजेश पिल्ले (वय ५२, रा. पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे.याबाबत संजयदयानंद ओसरमल (वय ३९, रा. पिंपरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रम्हाकॉर्प लि. ही रामकुमार अगरवाल यांची कंपनी असून ते संचालक आहेत. त्यांच्यावतीने जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये राजेश पिल्ले विश्वस्त प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते. त्यांनी चर्होली येथील मिळकत कंपनीचे संचालक रामकुमार अगरवाल यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता परस्पर संतोष सोपानराव लांडगे आणि धनंजर हनंमत लांडगे (रा. पिंपरी) यांना खरेदी खताने विक्री केली. ब्रम्हाकॉर्प कंपनीचा विश्वासघात करुन १५ कोटी रुपयांचा अपहार करुन आर्थिक फसवणूक केली़. पोलीस उपनिरीक्षक पालवे तपास करीत आहेत.
