Home Blog Page 1571

क्रिएटिव्ह रायटिंग विषयावरील स्पर्धेला प्रतिसाद 

पुणे :

‘द ऑरबिस स्कूल’ (मुंढवा) आणि रोटरी क्लब ऑफ पूना एअरपोर्ट यांनी आयोजित केलेल्या ‘इमॅजिन’ या क्रिएटिव्ह रायटिंग स्पर्धेला शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला.रोटरी क्लबच्या नियोजित प्रांतपाल मंजू फडके या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.मंजू फडके,डॉ अमिता राज गर्गे, होषनार कायकोबाद यांनी परीक्षण केले.रोटरी क्लब ऑफ पूना एअरपोर्ट चे अध्यक्ष मोहनिश थडानी, ऋषिकेश दांडेकर,हबील हंडी,कुमार कृपलानी,संजय मोटवानी हे उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी ‘वर्ल्ड ऑफ फँटसी,’फ्युचर स्कुल,’वर्ल्ड ऑफ इमॅजिनेशन’ असे विषय या स्पर्धेसाठी देण्यात आले.पहिली ते आठवी इयत्तेतील विद्यार्थी सहभागी झाले.  

बीपीसीएलने दक्षिण भारतात ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा दुसरा टप्पा केला सुरू

 बेंगळुरू-चेन्नई आणि बेंगळुरू-म्हैसूर-कूर्ग महामार्गावर उभारले ईव्ही फास्ट-चार्जिंग कॉरिडॉर

·         दक्षिण भारतातील दोन कॉरिडॉरवर 25 KW जलद चार्जिंग स्टेशन स्थापित केले गेले आहेत

·         CCS-2 जलद चार्जर ९ इंधन केंद्रांवर स्थापित केले गेले आहेत

·         चेन्नई-त्रिची-मदुराई महामार्गाचा भाग पहिल्या टप्प्यात  

·         विविध इंधन पर्याय पुरविताना ७,००० पारंपरिक रिटेल आऊटलेट्सचे ऊर्जा स्थानकांत  परिवर्तन करण्याचे बीपीसीएलचे ध्येय

बंगळुरू, १४ ऑक्टोबर २०२२: ‘महारत्न’ आणि एक फॉर्च्यून ग्लोबल ५०० कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)ने आज भारताच्या दक्षिणेकडील प्रदेशात बंगळुरू-चेन्नई आणि  बेंगळुरू-म्हैसूर-कूर्ग महामार्ग या दोन कॉरिडॉरवर ईव्ही फास्ट-चार्जिंग स्टेशन सुरू करण्याची घोषणा  बंगळुरू येथील एका कार्यक्रमात केली.

जलद चार्जर CCS-2 प्रोटोकॉलचे पालन करतात आणि मार्गांच्या दोन्ही बाजूंना अंदाजे १०० किमी अंतरावर त्याच्या नऊ इंधन स्टेशनवर व्यवस्थितपणे उभारण्यात आले आहेत.

देशातील प्रमुख शहरे आणि आर्थिक केंद्रांना जोडणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांवर सर्व प्रमुख पंपांवर ठराविक अंतराने CCS-2 EV चार्जिंग स्टेशन्स पुरवण्याची बीपीसीएलची योजना आहे. चेन्नई-त्रिची मदुराई महामार्ग हा पहिल्या टप्प्याचा भाग होता.

25 KW फास्ट चार्जरच्या जोडणीमुळे ग्राहकांना ३० मिनिटांत त्यांची ईव्ही चार्ज करणे शक्य होईल आणि बीपीसीएलच्या HelloBPCL या युजर फ्रेंडली पेमेंट मोबाईल अॅप्लिकेशनच्या सुविधेसह १२५  किमी प्रवासाचा आनंद घेता येईल. फास्ट चार्जर कोणत्याही मॅन्युअल सहाय्याशिवाय स्वयंचलित पद्धतीने काम करू शकते. तथापि, आवश्यकता असल्यास सपोर्ट स्टाफची मदत उपलब्ध असेल.

ईव्ही फास्ट चार्जिंग कॉरिडॉर सादरीकरणाच्या वेळी बोलताना बीपीसीएलचे कार्यकारी संचालक इन-चार्ज (रिटेल) पी. एस. रवी म्हणाले, “भारतीय इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेची वाढ गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीय आहे आणि बेंगळुरू-चेन्नई महामार्ग आणि बेंगळुरू-म्हैसूर कूर्ग महामार्गावर आमचे ईव्ही फास्ट-चार्जिंग कॉरिडॉर सुरू करणे हे स्वच्छ पर्यावरणाच्या पर्यायांकडे जाण्याच्या भारताच्या ईव्ही  स्वप्नाशी सुसंगत आहे. “उत्कृष्ट” सुविधा आणि अनुभव प्रदान करण्यात आमची गुणवत्ता आमच्या ईव्ही ग्राहकांना दोन नवीन कॉरिडॉरमध्ये सेवा देईल आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या या रोमांचक प्रवासात प्यूअर फॉर शुअर असा निश्चित अनुभव देईल.”

या सादरीकरणाच्या घोषणेसह बीपीसीएलचे उद्दिष्ट नवीन व्यवसाय विभागांवर लक्ष द्यायला चालना देण्याकडे असून विविध इंधन पर्याय पुरविताना ७,००० पारंपरिक रिटेल आऊटलेट्सचे ऊर्जा स्थानकांत परिवर्तन करण्याचे बीपीसीएलचे ध्येय आहे. त्यामध्ये मध्यम ते दीर्घ काळासाठी ईव्ही चार्जिंग सुविधाही समाविष्ट आहे.

भारत पेट्रोलियम इंधन केंद्रे ग्राहकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी स्वच्छतागृहे, रोख पैसे काढणे, चार्जिंग करताना सुरक्षित पार्किंग, मोफत डिजिटल एअर सुविधा, 24 तास कामकाज आणि अशा बऱ्याच गोष्टी पुरवितात. निवडक इंधन केंद्रे नायट्रोजन भरण्याची सुविधा देखील देतात. भारत पेट्रोलियमची महामार्गावरील अनेक  इंधन स्थानके मॅकडोनाल्ड्स, A2B, क्यूब स्टॉप, कॅफे कॉफी डे आणि इतर स्थानिक आउटलेट्स यांसारख्या आघाडीच्या ब्रँड्ससोबतच्या धोरणात्मक सहयोगाद्वारे आरोग्यपूर्ण खाद्यपदार्थ पुरविण्याची सुविधा देखील देतात. भारत पेट्रोलियमने आपल्या ग्राहकांच्या अधिक सोयीसाठी महामार्गावरील प्रमुख इंधन केंद्रांवर आपल्या इन अँड आउट सुविधा स्टोअरची साखळी सुरू करण्याची योजना आखली आहे.

गौरी इंदुलकर लिखित ‘देवाच्या शोधात…’ पुस्तकाचे २० रोजी गोविंदगिरी महाराज, डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रकाशन

डॉ. पी. डी. पाटील यांचीही उपस्थिती; विश्वकर्मा पब्लिकेशनतर्फे अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजन
पुणे : महाराष्ट्राचे आराद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे बांधकाम प्रमुख, रायगडाचे शिल्पकार हिरोजी इंदुलकर यांच्या वंशज लेखिका गौरी इंदुलकर लिखित ‘देवाच्या शोधात…’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजिला आहे. विश्वकर्मा पब्लिकेशनच्या वतीने येत्या गुरुवारी (दि. २० ऑक्टोबर) सायंकाळी ५.३० वाजता सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे सभागृहात प्रख्यात भागवत निरुपणकार आणि अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष प. पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या अध्यक्षस्तेखाली हा सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती लेखिका गौरी इंदुलकर, विश्वकर्मा पब्लिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. विश्वकर्मा पब्लिकेशनचे सहसंपादक संदीप तापकीर, गौरी यांचे पती अनिल इंदुलकर आदी उपस्थित होते.
गौरी इंदुलकर म्हणाल्या, लहानपणापासून वाचनाची गोडी होती. त्यातून कुतूहल वाढत होते. स्वत्वाचा शोध घेण्याचा ध्यास लागला होता. त्यातच परमहंस योगानंद यांचे पुस्तक वाचनात आले आणि माझ्या मनाची कवाडे उघडली. ध्यानधारणा करू लागले. त्यातून मला अद्भुत अनुभव येत होते. या अनुभवांची नोंद ठेवत गेले. डायरी लिहीत गेले. ध्यान करताना जे दिसे ते मी डायरीत चित्ररूपात काढून ठेवत असे. चेन्नईच्या भगवती स्वामींच्या सान्निध्यामुळे मला दिव्यत्वाची अनुभूती येऊ लागली. ‘नर्मदे हर हर’ व हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन’ ही पुस्तके वाचल्यानंतर आपल्याला आलेल्या दैवी अनुभवांचे पुस्तक लिहावे, अशी प्रेरणा मिळाली. विश्वकर्मा पब्लिकेशनने प्रकाशनाची जबाबदारी घेतली. माझे पती अनिल यांनी पाठिंबा दिला आणि त्यातून हे पुस्तक साकार झाले.”
विशाल सोनी म्हणाले, “उच्चविद्याविभूषित, बांधकाम क्षेत्रात अमेरिकेत १० वर्षे आणि नंतर भारतात उद्योजिका म्हणून काम केलेल्या गौरी इंदुलकर यांना वाचनाची, अध्यात्माची आवड आहे. या काळात त्यांना आलेल्या अद्भुत अनुभवांच्या नोंदी त्यांनी डायरीमध्ये केल्या होत्या. परंतु सर्वच वाचकांना त्यांचे हे अनुभव अध्यात्माची, ध्यानधारणेची अनुभूति देणारे आहेत. त्यामुळे याचे सुंदर पुस्तक करण्याचा निर्णय झाला. इंदुलकर यांनी प्रत्यक्ष अनुभवांतून हे पुस्तक साकारले आहे. हे पुस्तक आपल्या प्रत्येकाला आपलेसे करणारे ठरेल. कारण प्रत्येकाला आयुष्यात असे अद्भुत अनुभव येत असतात.”

नेत्रदानाचा संकल्प करु या ,अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश आणू या..

‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरीततृणांच्या मखमलाची, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती’ बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची ही कविता लहानपणी आपण वाचली अथवा ऐकली असेलच. पावसाने न्हावून निघालेली हिरवीगार सृष्टी तुम्ही पाहिली असेल. तुफान पाऊस अंगावर खेळवत गावामध्ये, रानावनात खेळत, सप्तरंगी इंद्रधनुष्यही पाहिले असालच. हे सर्व आपण बघू शकतो कारण आपल्याकडे दृष्टी आहे. परंतु जरा विचार करा ज्यांच्याकडे ही पाहण्याची दृष्टीच नाही त्यांचे काय?… आपण मरणोत्तर नेत्रदानाने नवी दृष्टी देऊन त्यांच्या जीवनात प्रकाश आणू शकतो !

डोळ्यांच्या अनुवंशिक आजारांमुळे, जंतुसंसर्गामुळे, अपघातामुळे व डोळ्यांची योग्य निगा न राखल्यामुळे अकाली अंधत्व येऊ शकते. यापैकी जवळपास ८० टक्के अंधत्व टाळता येऊ शकते अथवा उपचाराने बरे होण्यासारखे असते. आपल्या देशातील अंध ५ व्यक्तींपैकी १ म्हणजे साधारणत: ३ लाख लोक हे बुबुळाच्या आजाराने ग्रस्त आहेत. दरवर्षी त्यामध्ये नव्याने ४० हजार ते ५० हजार रुग्णांची भर पडत असते. यापैकी बहुसंख्य रुग्णांना बुबुळरोपण (नेत्ररोपण) शस्त्रक्रियेने दृष्टी प्राप्त होऊ शकते. दरवर्षी १ लाख नेत्राची आवश्यकता आहे. परंतु जवळपास २६ हजार बुबुळांचे नेत्रदान होते. अंध बांधवासाठी लागणारे नेत्र व नेत्रदातांकडून गोळा होणारे नेत्र यांची तफावत भरून काढण्यासाठी जवळपास ७४ ते ७५ हजार बुबुळांची आवश्यकता आहे.

त्यामुळे नेत्रदानाचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे. मरणोत्तर नेत्रदान आपल्या परिवाराची परंपरा बनवूया व आपल्या नातेवाईकांना देखील आपल्या संकल्पात सहभागी करुया.

अंधत्व येण्याची कारणे:
अंधत्व वेगवेगळ्या प्रकारचे असते. दृष्टीदोष काचबिंदू, बुबुळांचे आजार, मोतिबिंदू, मागील पडद्याचे आजार असतात. त्यामध्ये बुबुळाच्या आजारामुळे भारतात २ लाखांवर अंध आहेत. बुबुळाच्या आजारामुळे येणारे अंधत्व मुख्यतः कॉर्निअल अल्सर, डोळ्याला होणाऱ्या इजा, ‘अ’ जीवनसत्वाचा अभाव, केमिकल बर्न्स, अनुवंशिकतेमुळे होणारे बुबुळाचे आजार, शस्त्रक्रियेनंतर बुबुळाला येणारी सूज आदी कारणामुळे होते. या सर्व कारणामुळे येणाऱ्या अंधत्वावर बुबुळरोपण शस्त्रक्रिया हा एक आशेचा किरण आहे.

नेत्रदान कोणी करावे?
मरणोत्तर नेत्रदानास वयाची अट नाही. नेत्रदान कोणत्याही जातीच्या, धर्माच्या, वंशाच्या, पंथाच्या व्यक्तीला करता येते. कोणताही रक्तगट असलेल्या व्यक्ती नेत्रदान करु शकतात. मोतीबिंदू, काचबिंदुच्या शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांनाही नेत्रदान करता येते. नेत्रदानाची शस्त्रक्रिया केलेले रुग्णही मरणोत्तर नेत्रदान करु शकतात.

नेत्रदान करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी:

मरणोत्तर नेत्रदान सहा तासांच्या आत करावयास हवे, त्याकरीता त्वरीत नेत्रपेढीशी संपर्क साधावा. नेत्रदात्याच्या खोलीतील पंखे बंद करावेत. डोळ्यामध्ये (अँटिबायोटिक्स) औषध घालावे. अथवा पाण्याची पट्टी ठेवावी. जवळच्या नेत्रपेढीशी संपर्क साधावा. पुणे शहरात ससून सर्वोपचार रुग्णालयाबरोबरच अन्य नेत्रपेढ्या आहेत. नेत्ररोपण शस्त्रक्रिया (किरॅटोप्लास्टी) ससून रुग्णालयाच्या नेत्र विभागात मोफत केली जाते.

नेत्रदानाविषयी वस्तुनिष्ठता:
नेत्रदान केल्यानंतर चेहऱ्यास विद्रुपता येते असा गैरसमज आहे. डोळ्याच्या खोबणीत मऊ कापूस किंवा प्लास्टिकचा डोळा ठेऊन पापण्या व्यवस्थित बंद करता येतात. शरिरातील एखादा अवयव काढल्याने पाप लागते हा गैरसमज असून उलट नेत्रदानाद्वारे दोन व्यक्तीचे संपूर्ण जीवन उभे करण्याचे किती तरी मोठे पुंण्याचे काम होते. म्हणूनच म्हणतात ‘मरावे परि नेत्ररुपी उरावे’.

नेत्रशस्त्रक्रियेत बकरीचा डोळा बसवता येतो हा गैरसमज आहे. बकरीच्या डोळ्याची रचना व मानवाच्या डोळ्याच्या रचनेत मुलभूत फरक असतो. शस्त्रक्रियेदरम्यान कॉर्निया फक्त बदलला जातो. तेव्हा तो डोळा बसवला जात नाही. नेत्रदानाकरीता भरावयाचे नेत्रदान संकल्प पत्र नेत्र विभागात विनामूल्य उपलब्ध आहेत. आधिक माहितीसाठी नेत्रशल्यचिकीत्साशास्त्र विभागाशी संपर्क साधावा.

शरीरकी अंधता नही मनकी अंधता बडा मर्ज है..
उजाला लाने के लिए नेत्रदान हम सब का फर्ज है..
चिता में जायेगी राख बन जायेगी.. कब्र में जायेगी मिट्टी बन जायेगी..
नेत्रोंका कर दो दान.. किसी की जिंदगी गुलजार बन जायेगी..


डॉ. सतीश शितोळे, नेत्रतज्ज्ञ, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे: लोकशिक्षणाद्वारे लोकांना बुबुळाच्या आजाराची माहिती देऊन बुबुळाचे आजार अथवा त्यामुळे येणारे अंधत्व नेत्ररोपणाने बरे करता येते हे नागरिकांना पटवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्याचा सहभाग घेत आहोत. अंधजनांना दृष्टीच्या माध्यमातून प्रकाशमय जीवन प्राप्त करून देण्यासाठी फक्त नेत्रदानाची प्रतिज्ञा न करता मृत्यूपश्चात नेत्रदान करणे आवश्यक आहे व नातेवाईकांनीही ते कृतीत आणणे आवश्यक आहे.

संकलन: जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

महापालिकेतील आयएएस ‘गंगाजल’ मुंबईतून दिल्लीच्या दिशेने…?

२०० इलेक्ट्रिक बसेस घेण्यासाठी आकांड तांडव: अतिरिक्त आयुक्तांसह pmpml च्या महिला अधिकाऱ्यावर दबाव:कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा देखील सहभाग

दिल्लीतील युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन कडे तक्रारीसाठी काही जण रवाना….

पुणे- महापालिकेतील आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांमध्ये सुरु असलेले ‘गंगाजल’कोंबडे कितीही झाकले तरी सूर्य उगवायचा राहत नाही या म्हणी प्रमाणे उघडे पडलेले असून आयुक्तांनी ते दडपून ठ्वेण्याचा प्रयत्न सुरूच ठेवलेला आहे. तब्बल २०० इलेक्ट्रिक बसेसच्या घेण्याचा हा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांनी नाकारल्याने आयुक्तांनी त्यांना फैलावर घेणे सुरु ठेवलेले आहे, येताना हा प्रस्ताव घेऊनच येथे या असा हि आवाज त्यांना टाकलेला आहे. दोन आय ए एस आधीकार्यांमधील हे भांडण अनेकांना माहिती असून हि यावर मौन धारण केलेलं आहे.मात्र माजी विरोधी पक्ष नेते उज्वल केसकर यांनी दिल्लीतील पब्लिक सर्व्हिस कमिशन कडे तक्रार करण्याचा पवित्रा घेतल्याचे वृत्त समजले आहे. त्यांच्या शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असताना त्यांचा संपर्क मात्र होऊ शकलेला नाही.कॉंग्रेसच्या एका जुन्या जाणत्या माजी नगरसेवकाने,आणि सध्या वरिष्ठ कार्यकारिणीत असलेल्या पुढाऱ्याने या बसेस ७२ रुपये किमी दराने घेण्यासाठी आग्रह चालविला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे आणि नेहमीप्रमाणे त्यास हे आयुक्त देखील बळी पडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान पुण्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या प्रकरणी मौन का धारण केलेय हा सुद्धा प्रश्न या वरिष्ठ अधिकाऱ्याच्याच कार्यालयातून विचारला जातोय.

केवळ लोकप्रतिनिधींच्या काळातच महापालिकेत गंगाजल होत होते ही धारणा आता या प्रकारामुळे हाणून पाडण्यात आली आहे. इलेक्ट्रिक बसेस मध्ये ६, ९ आणि १२ मीटर लांबीच्या बसेस असतात,राज्य आणि केंद्राचे त्यास अनुदान असते.यापूर्वी पुण्यात इलेक्ट्रिक बसेस घेण्यात आलेल्या आहेत.आता आणखी काही म्हणजे सुमारे २०० बसेस घेण्याचा प्रस्ताव असल्याचे समजते आयुक्तांच्या धोरणानुसार याबाबतची माहिती सर्वच प्रसार माध्यमांना देण्यात आलेली नाही.यामध्ये लांबी वरून आणि किलोमीटर च्या दरावरून आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्यात मतभेद आहेत.या बसेस २७ रुपयांपासून ३२ रुपये आणि ४२ व ६० रुपये प्रती किमी दराने देखील घेतलेल्या असल्याची उदाहरणे आहेत. आता मात्र त्या ७२ रुपये दराने घेण्याचा सुमारे २०० कोटीचा प्रस्ताव आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे.एकाच विशिष्ट ठेकेदाराकडूनच या बसेस घेता येतील या दृष्टीने कार्यवाही झाल्याचाही आरोप होतो आहे.

दरम्यान यावर काल आणि आज pmpml च्या सहव्यवस्थापकीय संचालिका तसेच,अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही.अगर कसलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.मात्र सूत्रांनी सांगितले कि, या दोन्ही आयएएस मधील वादाचा हा प्रकार सीएमओ पर्यंत पोहोचल्याने आज सकाळी मुंबईतून त्यांना मिटवून घ्या चा सल्ला देण्यात आल्याचे ही सांगितले जाते आहे.

‘मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा विचार’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क दरात तसेच अधिमूल्यात कपात करण्याचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विकासकांना दिले. ‘क्रेडाई-एमसीएचआय’च्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर भरविण्यात आलेल्या मालमत्ताविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. करोना साथीच्या दोन वर्षांच्या काळानंतर ‘क्रेडाई-एमसीएचआय’तर्फे मालमत्ताविषयक प्रदर्शन भरविण्यात आले आहे. १६ ऑक्टोबपर्यंत भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात १०० हून अधिक विकासक आपल्या मालमत्तांसह सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास आणि अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्यमंत्री कार्यालय भूषण गगराणी उपस्थित होते.

करोना काळात मुद्रांक शुल्क दरात कपात केल्याचा मोठा फायदा बांधकाम क्षेत्राला आणि सरकारला झाला होता. सरकारला मोठय़ा प्रमाणावर महसूल मिळाला होता, तर घरविक्रीत प्रचंड वाढ झाली होती. त्याचवेळी अधिमूल्य कमी केल्याने रखडलेले २०० प्रकल्प मार्गी लागले होते. या पार्श्वभूमीवर या सवलती पुन्हा देण्याची मागणी असून गुरुवारी ती मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांनी सरकारकडून विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले.

बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क दरात ३ टक्क्यांनी कपात करण्याची मागणी मागील काही महिन्यांपासून विकासकांकडून केली जात आहे. त्याच वेळी बांधकामासाठी विकासकांकडून अधिमूल्य आकारले जाते. ते चेन्नई, हैदराबाद, बंगळूरु, दिल्ली या शहरांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक आहे. त्यामुळे यातही कपात करण्याची विकासकांची मागणी आहे.

कुठे फेडाल ही पापं? अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांचां टाहो

7/8हजार कोटींचे बजेट असलेल्या महापालिकेत चतुर्थश्रेणी कंत्राटी कर्मचाऱ्यांची 6वर्षे सातत्याने पिळवणूक

पुणे – शेकडो,हजारो कोटींच्या प्रकल्पांच्या प्रस्तावावर अमाप जाहिरातबाजी करत लॉबी बनाके खाओ धोरण राबविणाऱ्या पुणे महापालिकेत सुरक्षा रक्षक, शिपाई,आरोग्य सेवक अशा चतुर्थ श्रेणी कंत्राटी कामगारांची गेल्या सहा वर्षांपासून आर्थिक पिळवणूक होत आली आहे याबाबत कोणी इडी,सीबीआय चौकशी करेल काय? पदाधिकारयांनी नुसतीच वरवर सहानभुती का दाखविली,प्रत्यक्षात न्याय का मिळवून दिला नाही ?असे प्रश्न अन्याय ग्रस्त कर्मचारी विचारत आहेत. या लोकांना अगदी शिपाई,आरोग्य सेवक च नव्हे तर शिक्षक,डॉकटर यांना महापालिका किती पगार देते हे समजले तर निश्चित आश्चर्य वाटेल अशी स्थिती आहे,यांना नोकरीची कुठलीही हमी शाश्वती देखील नाही.पण कामे मिळत नसल्यानं हे कर्मचारी नाईलाजाने आशेवर इथे नोकऱ्या करत असल्याचे स्पष्ट आहे.महापालिकेची कंत्राटी सुरक्षा रक्षकांची निविदा आॅगस्ट महिन्यात संपली आहे.त्यामुळे आता नवीन निविदा काढली आहे.पण ही निविदा काढताना बहुउद्देशीय मनुष्यबळ याच नावाखाली सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याचा घाट घातला आहे.सुरक्षा रक्षकांसाठी सुमारे ४२ कोटी रुपये दरवर्षी खर्च केले जात असले तरी प्रत्यक्षात यातील किती रक्कम कुठे कुठे जाते आणि पगार कामगाराला किती मिळतो यावर विचार कोणी करत नाही त्यांना वेळेवर वेतन,पीएफ दिला जात नसल्याने नुकतेच सुरक्षा रक्षकांनी आंदोलन केले होते.

पुणे महापालिकेत सुरक्षा रक्षक नेमायचा असल्याच पुणे जिल्हा सुरक्षा मंडळाच्या नियमाप्रमाणे वेतन देणे व मंडळाला लेव्ही भरणे आवश्‍यक असते.

मात्र,महापालिका कायद्यातील पळवाटा शोधून बहुउद्देशीय मनुष्यबळाच्या नावाखाली थेट कंत्राटी सुरक्षा रक्षकांची भरती करत आहे. त्यामुळे खासगी ठेकेदारांचे लाड होत आहे. कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरू आहेच,पण सुरक्षा मंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

पुणे महापालिकेच्या शहरातील विविध इमारती,उद्याने, नाट्यगृह,जलकेंद्र,मैलाशुद्धीकरण केंद्र येथे कंत्राटी सुरक्षा रक्षकांची भरती केली जाते.महाराष्ट्र राज्य खासगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन आणि कल्याण अधिनियम १९८१ व त्यासंदर्भातील कायदा २००३ मध्ये लागू आहे.२००३ मध्ये पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापनाही करण्यात आली असून,मंडळाला वेतन भत्ते ठरविण्याचे अधिकार दिले आहेत.पुणे महापालिकेत १५८० कंत्राटी सुरक्षा रक्षक खासगी कंपनीकडून घेतले जातात.त्यामुळे सुरक्षा मंडळाच्या परवानगी,मंडळाच्या नियमानुसार पगार देण्याची व मंडळाला ३ टक्के लेव्ही भरण्याची गरज राहत नाही.महापालिकेत सुरक्षा रक्षकांना कमी वेतनात राबवून घेतले जाते.त्यामुळे अशा प्रकारे शासनाची फसवणूक करणाऱ्या एजन्सीवर कारवाई करा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

आनंद नगर झोपडपट्टीवासीयांना अधिकृत घरे देणार: राष्ट्रवादीच्या शिष्टमंळाला नगर अभियंता यांचे आश्वासन

पुणे – भाजप आमदारांनी बिल्डरच्या हितासाठी झोपड्या उठविण्याकरता प्रत्यक्षात सहभाग घेत केलेली दमदाटी प्रकरण गाजलेले असताना आता उपोषण आंदोलन झाल्यावर राष्ट्रवादी चे नितीन कदम ,संजय दामोदर यांच्या नेतृत्वाखाली एका शिषटमंडळाने महापालिकेतील नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांची भेट घेऊन आनंद नगर झोपडपट्टीवासीयांना अधिकृत घरे मिळण्यासाठी सकारात्मक आश्वासन मिळविले

या संदर्भात नितीन कदम यांनी सांगितले की,’ पुणे मनपा बांधकाम विभागाने बघ्याची भूमिका घेऊ नये.. आनंद नगर झोपडपट्टीवासीयांना अधिकृत घरे मिळण्यासाठी ठोस भूमिका घेण्याची आम्ही मागणी केली . पर्वती विधानसभा मतदारसंघातील आनंदनगर झोपडपट्टीतील रहिवाशांच्या न्याय हक्कासाठी आमचे सहकारी श् संजयभाऊ दामोदरे यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलन घेण्यात आले होते व जो पर्यंत तुम्हाला तुमच्या हक्काची घरे मिळत नाही तो पर्यंत आम्ही आपल्या या लढ्यात सोबत आहोत असे जाहीर आश्वासन त्यावेळी आम्ही दिले होते. त्याचाच एक पाठ पुरावा म्हणून आज पुणे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या बरोबर बैठक घेतली त्यावर वरिष्ठांबरोबर याविषयी बैठक घेण्यात आली आहे व लवकरच आपल्या लोकांना न्याय मिळेल अशी ग्वाही आम्हास वाघमारे यांनी दिली. यावेळी माझ्या सह संजय भाऊ दामोदरे , श्वेता होनराव कामठे दिनेश आण्णा खराडे, राहूल दादा गुंड,अमोघ ढमाले, संग्राम होनराव आदी राष्ट्रवादी पदाधिकरी उपस्थित होते.असे त्यांनी सांगितले.

महापालिका निवडणुका का नाहीत, ३वर्षात राजकारण बदलत चाललेय _आ.रोहित पवार

पुणे – महापालिका ,नगरपालिका निवडणुका आतापर्यंत व्ह्यायला हव्या होत्या ,त्या झालेल्या नाहीत ,गेल्या ३ वर्षात वेगळे राजकारण सुरू झाले आहे, संजय राऊतांचे पत्र सांगते ,’ अन्याया विरोधात लढा द्यावा लागेल ,युवा वर्ग या लढ्यात निश्चित उतरेल .गेल्या 3 वर्षात वेगळं समीकरण पाहत आहोत. पक्ष फोडणे, आमदार फोडणे अश्या पद्धतीचं समीकरण सुरू आहे. आत्ता लोकांनी अनेक गोष्टी गेल्या काही दिवसांपासून बघितल्या आहेत. आज नेत्यांचा आवाज दाबल्या जातोय, उद्या लोकांचा आवाज दाबला जाईल, असे आमदार रोहित पवार यांनी म्हंटले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यापीठ विद्यार्थी कृती समितीच्या माध्यमातून विद्यापीठाकडून वाढवण्यात आलेल्या शुल्कवाढी विरोधात सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आमदार रोहित पवार आले होते, यावेळी ते बोलत होते
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो या कारखान्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे आमदार राम शिंदे यांनी केली आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की राम शिंदे कधी गेले, कधी पत्र दिलं मला माहित नाही. त्यात त्यांनी म्हटल आहे की, शेतकऱ्यांचं ऊस गाळू नये. हे शेतकऱ्यांना देखील पटलेलं नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की, शेतकऱ्यांच्या हिताचं जर कोणी निर्णय घेत असेल, तर तुम्ही विरोधात का जात आहे. त्यांना जर एवढं कळत नसेल तर मी काय उत्तर द्यायचं. आणि त्यांना किती वेळा उत्तर द्यायचं असे यावेळी रोहित पवार म्हणाले आहेत. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यंतरी आई- वडिलांना शिव्या द्या, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना शिव्या देऊ नका, असे म्हटले आहे. यावर रोहित पवार म्हणाले की हे संस्कृतीचा विषय आहे. मी ज्या ज्या सामान्य लोकांशी बोललो, त्यांना ते पटलेलं नाही. आई वडिलांना आपण देव मानतो, पण राजकीय लोकांना खुश करण्यासाठी जर ते अस बोलत असतील तर ते चुकीचं आहे. नेत्यांनी बोलताना नियंत्रण ठेवायला हवे, जर नेत्यांना खुश करायचे असेल तर ते बंद खोलीत जाऊन करावं, असे देखील यावेळी रोहित पवार म्हणाले आहेत.
. यावेळी त्यांना संजय राऊत यांनी त्यांच्या आईला लिहिलेल्या पत्रात आमदार रोहित पवार यांचा उल्लेख केला आहे. यावर रोहित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, मी पत्र वाचलेलं नाही. त्यात एका व्यक्तीवर झालेल्या अन्याय, पक्षावर झालेलं अन्याय आणि आई आणि मुलाचं संभाषण त्या पत्रात झाला आहे. आवाज दाबण्याचा प्रयत्न विविध ताकत्यांच्या मदतीने सुरू आहे. पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की, कितीही आवाज जरी दाबण्याचा प्रयत्न झाला. तरी संघर्ष हा करावा लागणार आहे.विद्यापीठाकडून फी वाढ करणे हे चुकीच संघर्ष करत असताना मोठ्या ताकत विरोधात लढावं लागणार आहे. हे त्या पत्रात दिलं आहे. या पत्रामधून एक गोष्ट घेतो की, अन्याय आणि दुसरा संघर्ष. आणि संघर्ष हा करावा लागणार आहे. आमच्यासारखे युवक हे संघर्ष करतील, असे देखील यावेळी रोहित पवार म्हणाले आहेत.विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या उपोषण बाबत पवार म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या फी वाढीचा विषय मी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना सांगणार आहे. विद्यापीठाकडून फी वाढ करणे हे चुकीच आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत हा विद्यार्थ्यांचा विषय आम्ही नेणार आहोत. विद्यापीठात शिकणारे मुलं ही साध्या घरातील विद्यार्थी आहेत. हे सरकारी विद्यापीठ आहे. राज्य सरकारने गरज लागली, तर पैसे द्यावेत. पण फी वाढ करू नये, अस यावेळी रोहित पवार म्हणाले आहेत.
ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत राजकारण सिनेटच्या यादीत भाजपचा हस्तक्षेप वाढला आहे. यावर पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की भाजपच काम करण्याची पद्धत म्हणजे ते यादी बघून काम करतात. विद्यार्थ्यांची परिस्थिती ते बघत नाही. सीनेट बद्दल याद्या पारदर्शक व्हायला हवे, असे देखील यावेळी रोहित पवार म्हणाले. अंधेरी निवडणुकीत शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत जे राजकारण सुरू आहे. त्यावर पवार देखील यांना विचारलं असता, ते म्हणाले की राजीनामा त्यांनी दिला पण ते का सोडत नाही. हे माहीत नाही, पण त्यात वेगळं राजकारण असावं.

महिला व बालविकास विभागाच्या तत्पर मदतीने एका दिव्यांग मुलीला मिळाला कायमस्वरूपी निवारा

मुंबई,दि. 13 – महिला व बालविकास विभागाच्या फेसबुक पेजवर पुण्यातील सजग नागरिकाने एका अनाथ दिव्यांग मुलीचा सांभाळ करणारे कोणीही नसून ती सध्या रस्त्यावर राहत आहे, हे निदर्शनास आणून दिले. याबाबत एकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांना माहिती दिली असता त्यांनी यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून अवघ्या 6 तासात संबंधित मुलीच्या कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था केली आहे.

दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास पुण्यातील सजग नागरिक राहुल जाधव यांनी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या फेसबुक पेज वर मेसेज केला. त्यात पुण्यातील एक वीस वर्षीय दिव्यांग रस्त्यावर राहत असून तिच्या आईचे 3 महिन्यापूर्वी निधन झाले असून तिचा सांभाळ करणारे कोणीही नसल्याचा उल्लेख केला. तसेच तिला सर्वतोपरी मदत करण्यासाठी तो तयार असून त्यांनी त्याकामी शासकीय यंत्रणेच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. ही माहिती महिला व बाल विकास विभागाचे सोशल मीडिया प्रमुखांनी दि. 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.45 वा. एकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांना दिली. त्यावर त्यांनी तातडीने ही माहिती पुणे महिला व बाल विकास आयुक्त आर.विमला यांना देत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणात तत्काळ कार्यवाही करत श्रीमती विमला यांनी त्या मुलीला मुंढवा येथील महिला वसतिगृहात दाखल करत तिच्या राहण्याची व्यवस्था केली.

सजग नागरिक आणि सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणारे अधिकारी असतील तर सामान्य नागरिकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लागतात एवढे मात्र नक्की.

प्रतिक्रिया 

मी महिला व बाल विकास विभागाच्या फेसबुक पेजवर संबंधित मुलीबाबत माहिती दिली असता मला विभागाकडून तत्काळ रिप्लाय आला. विशेषतः काही तासांमध्ये विभागाने या मतिमंद मुलीच्या कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था केली. शासकीय विभागाकडून इतक्या लवकर आणि सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मी महिला व बालविकास विभागाच्या सोशल मीडिया टीम आणि सर्व अधिकारी – कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

– राहुल जाधव, सजग नागरिक, पुणे.

00000

एक महिला अधिकारी म्हणून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून हा विषय संवेदनशीलतेने हाताळत मार्गी लावून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले. अवघ्या 6 तासात कागदोपत्री कारवाई पूर्ण करत आम्ही त्या मुलीला शासकीय संस्थेत दाखल केले याचा मला आनंद आहे.

– रुबल अग्रवाल, एकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक

वैभव आणि पूजा म्हणतायेत ‘चल अब वहाँ’

हिंदी अल्बममध्ये दिसणार वैभव आणि पूजाचा रोमँटिक अंदाज

गेल्या काही दिवसांपासून  वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत ही प्रेक्षकांची आवडती जोडी एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र हे दोघे नेमके कशासाठी एकत्र येणार याचा खुलासा मात्र झाला नव्हता. नुकतीच या दोघांनी ‘चल अब वहाँ’ या आपल्या आगामी रोमँटिक हिंदी सॉंग अल्बमची घोषणा करत आपल्या चाहत्यांना ‘सरप्राइज’ दिलं आहे. नुकताच या अल्बमचा प्रकाशन  सोहळा दिमाखात संपन्न झाला. मराठी रुपेरी पडद्यावरची ही हिट जोडी आता ‘चल अब वहाँ’ या ‘व्हिडीओ पॅलेस’ निर्मित पहिल्या हिंदी अल्बममध्ये आपल्याला रोमँटिक अंदाजात दिसणार आहे.

‘चल अब वहाँ’ मीठी जहाँ बोलिंया’ !

‘चल अब जहाँ’ राते दिवाली हो, दिन हो होलिया’!

असे बोल असणाऱ्या या गाण्यातून वैभव आणि पूजा यांच्या प्रेमाचा सदाबहार रंग दिसणार आहे. आपल्या या नव्या अल्बमबद्दल बोलताना हे दोघं सांगतात, ‘काश्मीरमधील निसर्गरम्य ठिकाणी शूट करण्याचा आनंद तर होताच पण या गाण्याच्या निमित्ताने आम्हाला पुन्हा एकत्र काम करता आलं हे आमच्यासाठी जास्त ख़ास होतं. आम्ही हे गाणं खूप एन्जॉय केलं. प्रेक्षकही हे गाणं तितकच एन्जॉय करतील असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला. व्हिडीओ पॅलेस’ या नावाजलेल्या म्युझिक कंपनीच्या पहिल्या हिंदी अल्बममध्ये काम करायला मिळणं ही आमच्यासाठी अमूल्य भेट  असल्याचंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. ‘व्हिडीओ पॅलेस’चे हिंदी निर्मितीतलं पदार्पणही यशस्वी होईल असा विश्वास ‘व्हिडीओ पॅलेस’च्या नानूभाई जयसिंघानिया यांनी व्यक्त केला.

‘चल अब वहाँ’ अल्बम मधील गाणं काश्मीरच्या निसर्गरम्य लोकेशन्सवर चित्रीत केलं आहे. या गाण्याचे दिग्दर्शन फुलवा खामकर हिने केले आहे तर काश्मीरचे नेत्रसुखद सौंदर्य दाखवण्याचे काम राष्ट्रीय पारितोषिक विजेते छायालेखक अमोल गोळे यांनी केले आहे. विदुर आनंद यांनी लिहिलेल्या व संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला अब्दुल शेख यांचा स्वरसाज लाभला आहे.

महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूल ला पुन्हा एकदा ‘अ’ दर्जा गुणवत्ता मानांकन 


पुणे : राज्याच्या परिवहन विभागाच्या आदेशानुसार नुकतेच राज्यातील मोटर ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी करून त्यांचे मूल्यांकन करण्यात आले. या मध्ये  पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालया ( आरटीओ) तर्फे नुकत्याच झालेल्या मोटार ड्रायव्हिंग स्कूल च्या तपासणी मध्ये महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूल ला पुन्हा एकदा ‘अ’ दर्जा गुणवत्ता मानांकन मिळाले आहे. 

“अ”दर्जा प्राप्त मोटार ड्राईविंग स्कूल संचालकांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंद यांचे मार्गदर्शनाखाली कार्यालयात प्रशस्तीपत्रक व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक शशांक शिळीमकर व महेश शिळीमकर यांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर ,सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी  राजेंद्र पाटील, युवराज पाटील, अनंत भोसले, सुजित डोंगरजाळ व सहायक मोटार वाहन निरीक्षक सुचित्रा पाटील आदि उपस्थित होते. 

या विषयी बोलताना महेश मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक महेश शिळीमकर म्हणाले, प्रादेशिक परिवहन कार्यालय ,पुणे अंतर्गत नोंद असलेल्या मोटार ड्राईविंग स्कूलची गुणांकन तपासणी करण्यात आली या तपासणी मध्ये मोजक्याच मोटार ड्रायव्हिंग स्कूल ‘अ’ दर्जा मानांकन प्राप्त करू शकल्या. यापूर्वी झालेल्या गुणवत्ता तपासणी मध्ये ही महेश मोटर ड्रायव्हिंग स्कूलला ‘अ’ दर्जा मानांकन मिळाले होते.  मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीने चालकांना दिले जाणारे प्रशिक्षण, स्कूल मधील उपलब्ध वाहने आणि इतर साधनांचा दर्जा, जागेची उपलब्धता, प्रशिक्षणातील आधुनिकता, प्रशिक्षक, विद्यार्थ्यांचा फीडबॅक, रस्ता सुरक्षा जनजागृती आदि बाबतची तपासणी केल्या नंतर परिवहन विभागाने सदरील ‘अ’ दर्जा मानांकन आम्हाला दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील विषमता समाप्त करण्यासाठी कार्ययोजना आखून काम करत आहेत – केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर

नवी दिल्ली, 13  ऑक्टोबर  2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार गावे , गरीब आणि शेतकरी यांचा विकास आणि त्यांचे जीवनमान सुधारण्याच्या दृष्टीने काम करत आहे असे प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले. जगाच्या राजकीय  पटलावर देशाची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी, मेक इन इंडियाचा विस्तार करण्यासाठी, देशाच्या समृद्ध वारशाचे जतन करण्यासाठी आणि भारत मातेला वैभवाच्या सर्वोच्च  शिखरावर पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी निरंतर प्रयत्नशील आहेत असे ते म्हणाले. गरिबांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी आणि विषमता समाप्त करण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली योजनाबद्ध रीतीने ऐतिहासिक कार्य झाले आहे असे त्यांनी सांगितले.

आज पुणे येथे झालेल्या महा एफपीसीच्या आठव्या सर्वसाधारण बैठकीत तोमर बोलत होते. जोवर एखाद्या देशात प्रत्येक गरीबाला  विषमतेपासून मुक्ती मिळत नाही तोवर त्या देशाची विकास यात्रा पूर्ण होऊ शकत नाही, असे मत तोमर यांनी व्यक्त केले. देशात पूर्वी हीच परिस्थिती होती. देशातल्या जवळपास निम्म्या लोकसंख्येकडे बँक खाते नव्हते, कोट्यवधी  कुटुंबाना शौचालयाची सोय उपलब्ध नव्हती, वीज  जोडणी नव्हती, स्वयंपाक करण्यासाठी गॅस सिलेंडर नव्हते, राहण्यासाठी घर  नव्हते.  ही विषमता दूर करण्याचे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले असे तोमर यांनी सांगितले. पीएम आवास योजनेअंतर्गत गरीबांसाठी घरे बांधली जात आहेत, घरोघरी शौचालय, जनधन खाते, सौभाग्य योजना अंतर्गत वीज जोडणी आणि उज्वला योजनेअंतर्गत प्रत्येक घराला गॅस सिलेंडर तसेच प्रत्येक गावात धान्य पोहोचवले जात आहे. त्याचबरोबर, गरीब कुटुंबातील लाखो भगिनींना बचत गटांमार्फत रोजगार उपलब्ध करून देऊन विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही ते म्हणाले.

2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट असले पाहिजे असे म्हटले होते. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांसोबत शेतकरी उत्पादक संघटना  तसेच कृषी संबंधित अन्य संस्थांनी परस्पर सहकार्याने काम केले. आज देशातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीपेक्षा जास्त होऊन पाच ते दहा पटीने वाढले, असे तोमर यांनी सांगितले. देशात प्रथमच अशी योजना राबवण्यात आली ज्यामध्ये शेतकऱ्यांचे नाव सन्मानाशी  जोडले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आजवर साडेअकरा कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 2 लाख कोटी रुपयाहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 22.5 कोटी रुपये मिळाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. पिक विमा योजनेचा लाभ सर्वच शेतकऱ्यांना मिळत नव्हता. म्हणूनच, पंतप्रधान पिक विमा योजना लागू केली. या योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी  शेतकरी जोडले गेले आहेत. महाराष्ट्रात 50 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना या विमा योजनेचे कवच उपलब्ध झाले आहे. या योजनेअंतर्गत देशभरात 1.22 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दाव्याच्या रूपात देण्यात आले आहेत, असेही तोमर यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने एक लाख कोटी रुपये रकमेचा कृषी पायाभूत निधी स्थापन केला आहे. यासोबतच, छोट्या गावांमध्ये शेती आणि संबंधित कार्यासाठी दीड लाख कोटी रुपये निधीची व्यवस्था  करण्यात आली आहे. कृषी पायाभूत निधी मधून 14 हजार कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. नजीकच्या काळात याचा लाभ शेतकऱ्यांना होईल अशी माहिती तोमर यांनी दिली. देशात 86% छोटे शेतकरी असून त्यांना सक्षम बनवण्यासाठी दहा हजार नवीन शेतकरी उत्पादक संघटना  स्थापन केल्या जात आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक असलेली प्रत्येक सुविधा मिळावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असे तोमर यांनी सांगितले. शेतकऱ्यांना वाहतूक सुविधा आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळावा यासाठी काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. डिजिटल शेतीवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हे काम पूर्ण होईल तेव्हा कृषी क्षेत्रातील विषमता दूर होऊन पारदर्शकता येईल तसेच शेतीमालाच्या दरांमधील तफावत कमी होईल. यासोबतच, शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान, हवामान बदल यासारख्या विषयांबाबत अधिक माहिती दिली जाईल  असे तोमर यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महा एफपीसीचे व्यवस्थापकीय संचालक योगेश थोरात यांनी सर्वांचे स्वागत केले.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर – सहकार मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. 13 : सन २०१७ ते २०२० या कालावधीत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी आज जाहीर करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली.

ही यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या यादीतील शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, कर्जखाते पासबुक व बचतखाते पासबुक घेऊन नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ किंवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन श्री. सावे यांनी केले.

सन २०१७ – १८, २०१८ – १९ व २०१९ – २० या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षांमध्ये पीक कर्जाची उचल करुन शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विहित कालावधीत परतफेड केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना शासनाकडून 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

यामध्ये प्राथमिकदृष्ट्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्धीसाठी बँकांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या यादीमधील संबंधित शेतकऱ्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या विशिष्ट क्रमांकासह शेतकऱ्यांनी बँक कर्ज पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरणासाठी जावयाचे आहे. त्याठिकाणी संगणकावर दिसत असलेल्या कर्जखात्यांचा तपशील, आधार क्रमांक इत्यादी बाबींची खातरजमा करुन शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे. आधार प्रमाणीकरणानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक बचत खात्यामध्ये थेट प्रोत्साहनपर लाभाची रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही  करण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी बँक कर्ज खात्यास आधार क्रमांक उपलब्ध करुन दिलेला नाही. अशा शेतकऱ्यांची नावे पूर्तता झाल्यानंतर समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये निवडणूक आचारसंहिता लागू आहे अशा गावातील पात्र शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये आचार संहिता संपल्यानंतर समाविष्ट केली जाणार आहेत, असेही सहकार मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

फेरफार अदालतीला चांगला प्रतिसाद; ३ हजार २२४ नोंदी निर्गत

पुणे दि.१३: सप्टेंबर महिन्यात झालेल्या फेरफार अदालतीला जिल्हयात चांगला प्रतिसाद मिळाला असून एका दिवसात ३ हजार २२४ नोंदी फेरफार अदालतीमध्ये निर्गत करण्यात आल्या.

राज्य शासन महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. ई- फेरफार प्रणालीमध्ये एक महिन्याच्या वरील प्रलंबित नोंदी निर्गत करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालती घेण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत.

त्यानुसार बुधवार १२ ऑक्टोबर रोजी आयोजित फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद मिळाला असून या फेरफार अदालतीमध्ये साध्या २ हजार ५८७ , वारस ४८७ आणि तक्रारी १५० अशा एकूण ३ हजार २२४ फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या आहेत.

बारामती तालुक्यात सर्वाधिक फेरफार नोंदी निर्गत
बारामती तालुक्यात सर्वाधिक ६४६ तर शिरूर तालुक्यात ४१७ नोंदी निर्गत करण्यात आल्या. हवेली तालुक्यात २६७, पिंपरी चिंचवड १५७, आंबेगाव २४६, जुन्नर २३९, इंदापूर ३४४, मावळ १९६, मुळशी १३४, भोर १०८, वेल्हा ७०, दौंड ६९, पुरंदर ११४ आणि खेड तालुक्यात २२६ फेरफार नोंदी निर्गतीचे काम पुर्ण करण्यात आले, अशी माहिती तहसीलदार निलप्रसाद चव्हाण यांनी दिली आहे.