Home Blog Page 1555

सुरळीत वाहतुकीसाठी प्रथम हे रस्ते दुरुस्त करा,पोलीस आयुक्तांच्या महापालिकेला पत्र

पुणे – शहरात वाहतूक कोंडीची समस्या उग्र झाल्याने आता पोलीस ही सरसावले असून, पोलीस आयुक्तांनी तर महापालिका आयुक्तांना आरसा दाखविण्यासाठी एक पत्र पाठविले आहे,त्यात ७५ ठिकाणच्या रस्ते दुरुस्तीची मागणी खुद्द पोलीस आयुक्तांनी लेखी केली आहे.

असे आहेत खराब रस्ते व खड्डे पडलेले रस्ते

• कोथरूड विभाग

– वेदभवन चौक ते कोथरूड डेपो चौक

– नळस्टॉप चौक ते पौड फाटा चौक

– आठवले चौक ते नळ स्टॉप चौक

• डेक्कन विभाग

– गरवारे पूल ते खंडूजीबाबा चौक

– स्वातंत्र्य चौक ते रसशाळा

– लकडीपुल

• चतु:शृंगी विभाग

– बालेवाडी चौक ते पॅन कार्ड

– राजवाडा हॉटेल ते बाणेर फाटा

– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौक ते एस.बी.जंक्शन

• शिवाजीनगर

– सुभाषचंद्र बोस चौक ( संचेती रुग्णालय) ते शिवाजीनगर

– वीर चाफेकर चौक ते शिवाजीनगर

• खडकी

– किर्लोस्कर कंपनी ते गुरुद्वारा

– पाचवड चौक ते आरगडे कॉर्नर

– सीएफडी डेपो ते फॅक्टरी हॉस्पिटल

• येरवडा विभाग

– गुंजन चौक ते गोल्फ क्लब चौक

– पूर्णकुटी चौक ते गुंजन चौक

– सादलबाबा चौक

• बंडगार्डन विभाग

– आरटीओ चौक ते शाहीर अमर शेख चौक

-शाहीर अमर शेख चौक ते मालधक्का स्टेशन

– बोलाई चौक ते साधू वासवानी चौक

– पुणे स्टेशन ते अलंकार चौक

– आयबी चौक ते सर्किट हाऊस चौक

• भारती विद्यापीठ विभाग :

– कात्रज चौक ते जुना बोगदा

– कात्रज चौक ते नवले पुल

– कात्रज चौक ते गोकुळ नगर बस्थांबा (कात्रज कोंढवा रस्ता)

– पद्मावती चौक

• सहकार नगर विभाग

– महेश सोसायटी चौक ते पासलकर चौक

– स्वामी विवेकानंद रस्ता

• स्वारगेट विभाग

– जेधे चौक ते गोळीबार मैदान चौक

– सेवन लव्हज चौक ते आईमाता मंदिर

• नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता )

– भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौक

• वारजे विभाग

– वारजे ते एन डी ए रस्ता

– ढोणे रस्ता

– उत्तमनगर रस्ता

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागातील खराब रस्ते व मोठ्या प्रमाणत खड्डे असलेल्या 75 ठिकाणांची नावे देण्यात आली आहेत. त्यानुसार, संबंधित रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावेत. रस्ते दुरुस्त झाल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यासह गंभीर स्वरूपाचे अपघात हि कमी होतील असे संबधित पत्रात नमूद केले आहे.

“महाराष्ट्रच गुजरातमध्ये विलीन करा”:ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांची टीका

मुंबई:एअरबस सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राप्ट प्रकल्प महाराष्ट्राऐवजी बडोद्यात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑक्टोबर रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहे. यावर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी थेट “महाराष्ट्रच गुजरातमध्ये विलीन करा अशी खोचक टीका केली आहे. आनंद दवे म्हणाले, एक नंबरवरील महाराष्ट्र 5व्या नंबरवर चालला आहे. मात्र सगळे राजकारण करण्यातच दंग आहेत. त्यामुळे बाकरवडी आणि ढोकळा एकत्र करा असही दवे म्हणाले

सुमारे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला वेदांता-फॉक्सकॉन हा मेगा प्रकल्प महाराष्ट्रातून आधीच गुजरातमध्ये गेला आहे. त्यानंतर आता एअरबस हा प्रकल्प देखील गुजरातमध्ये गेला आहे.तब्बल २२ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प होता. यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर चहुबाजूने टीका होत आहे. त्यातच आता ब्राह्मण महासंघाने जोरदार टीका केली आहे. वास्तविक पाहता, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महिनाभरापूर्वीच म्हटलं होतं की, एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहे. टाटाच्या कोलॅब्रेशनसोबत हा प्रकल्प येणार आहे. मात्र तरी हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

.

आदित्य ठाकरे यांच्याकडून निम्हण माय लेकाचे सांत्वन

पुणे – शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांच्या निधनानंतर आज त्यांच्या घरी जाऊन निम्हण यांच्या पत्नी स्वाती आणि पुत्र सनी व कुटुंबीयांचे सांत्वन आदित्य ठाकरे यांनी केले. डॉ. नीलम गोऱ्हे,सचिन आहिर यावेळी त्यांच्या समवेत होते.

युवासेना प्रमुख श्री. आदित्य ठाकरे जी यांनी आज शिवसेनेचे दिवंगत शहरप्रमुख माजी आमदार विनायकराव निम्हण यांच्या प्रतिमेला अभिवादन केले आणि त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. निम्हण हे पुण्यातील आक्रमक आणि धडाडीचे नेते होते. त्यांची उणीव नेहमीच शिवसेनेला जाणवत राहील असे ते म्हणाले.

केदारी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी सहाय्य करणार – ठाकरे

जून्नर:वडगाव आनंद येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी दशरथ केदारी यांच्या घरी आज शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. या कुटुंबीयांची आस्थेने चौकशी करीत त्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे असल्याचे सांगितले.या

कुटुंबियांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे ते म्हणाले ,या सदर कुटुंबीयांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी, ‘सदर कुटुंबीयांना भविष्यात शिवसेनेच्या वतीने संपूर्ण मदत केली जाईल. . आणखी काही स्वरूपाची मदत लागल्यास अवश्य केली जाणार आहे’, असे सांगितले.यावेळी भाऊबीजेच्या निमित्ताने या कुटुंबियांच्या वतीने आदित्यना ओवाळण्यात आले.

त्यांच्या समवेत विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शेतकरी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पुणे संपर्कप्रमुख आ. सचिन अहिर होते.विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांचेकडे शेतकरी महिलांनी मत व्यक्त केले की, शेतीमालाला हमीभाव मिळणे आवश्यक आहेया कुटुंबीयांचे राज्य शासनाकडे पाठविलेले घरकुल, संजय

गांधी निराधार योजना आणि इतर प्रस्तावांची माहिती देण्यासाठी यावेळी डॉ. नीलम गोर्हे यांना उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या प्रस्तावांचा पाठपुरावा डॉ. गोऱ्हे येत्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात करणार आहेत या कुटुंबीयांनी डॉ. गोऱ्हे यांनी सदर घटनेनंतर तात्काळ केलेल्या मदतीचा यावेळी आवर्जून उल्लेख केला.

स्थानिक शिवसेना पदाधिकारी सुरेश भोर, प्रसन्ना डोके, माऊली खंडागळे, ज्योत्स्ना महांबरे, युवती सेना अधिकारी नीलम गावडे आणि शिवसेना कार्यकर्ते, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकार फक्त स्वतःसाठी काम करतेय:आदित्य ठाकरे

पुणे:फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्रातून गुरजारतला गेलाय. सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राप्ट प्रकल्प बडोद्यात होणार आहे.22 हजार कोटी रूपयांचा हा प्रकल्प असून 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोनशिलेचं उद्घाटन होणार आहे.या

प्रकल्पावरून आता विरोधकांनी शिंदे सरकारला घेरलं आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रक्लप महाराष्ट्रातून गेला त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं की, एअरक्राप्ट प्रकल्प तरी खेचून आणा. त्यावेळी राज्याचे उद्योग मंत्री म्हणाले होते आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात आणू. पण एवढा मोठा प्रकल्प राज्यातून बाहेर गेला. त्यामुळं हे सरकार फक्त स्वत:साठी काम करत असल्याचं दिसतंय.असा आरोप आदित्य ठाकरे पत्रकारांशी संवाद साधताना केलाय.
आदित्य ठाकरे म्हणाले,वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेला त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं की, एअरक्राप्ट प्रकल्प तरी खेचून आणा. त्यावेळी राज्याचे उद्योग मंत्री म्हणाले होते आम्ही हा प्रकल्प महाराष्ट्रात आणू. परंतु, त्यांना हे जमलं नाही. हे सरकार स्वत:साठी काम करत आहे. महाविकास आघाडी सरकार असताना कोरोनाच्या काळात देखील साडे सहाशे कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात आणली होती. परंतु, आता दोन्ही सरकारं त्यांचीच असताना महाराष्ट्रातून मोठे प्रकल्प बाहेर जात आहेत. दिल्लीला अनेकवेळा आपल्या स्वत:साठी जातात त्यावेळी याबाबत बोललं पाहिजे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

लष्कराच्या दक्षिण विभागाने पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारक स्थळी साजरा केला ‘पायदळ दिवस’

पुणे, 27 ऑक्‍टोबर 2022

देशरक्षणासाठी त्याग व बलिदान करणाऱ्या पायदळातील सर्व जवानांना 76 व्या ‘पायदळ दिवसा’निमित्त लष्कराच्या दक्षिण विभागाने पुणे इथे राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, सेना पदक या पदकांनी सन्मानित, लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जय सिंह नयन यांनी स्मारकावर पुष्पचक्र वाहिले. या वेळी  पायदळाचे विद्यमान आणि निवृत्त जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक या पदकांनी सन्मानित निवृत्त लेफ्टनंट जनरल आर. व्ही. कुलकर्णी यांनी निवृत्त जवानांच्या वतीने पुष्पचक्र वाहिले.

1947 साली 27 ऑक्टोबर रोजी भारतीय लष्करातील पायदळाच्या शीख रेजिमेंटचे जवान प्रथमच श्रीनगर विमानतळावर उतरले. त्यामुळे श्रीनगरच्या वेशीवर आलेले पाकिस्तानातील कबैली घुसखोर मागे वळले आणि जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानाच्या पाठिंब्याने होत असलेली घुसखोरी रोखणे शक्य झाले. पायदळातील त्या जवानांच्या शौर्याची आठवण म्हणून दरवर्षी 27 ऑक्टोबर रोजी ‘पायदळ दिवस’ किंवा ‘शौर्य दिवस’ साजरा केला जातो.

थकवून टाकणाऱ्या अवघड परिस्थितीतही देशाची सेवा करताना दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगून शौर्य गाजवणाऱ्या पायदळातील जवानांचे लेफ्टनंट जनरल जय सिंह नयन यांनी आपल्या संदेशात कौतुक केले. देशाचे प्रादेशिक अखंडत्व आणि सार्वभौमत्व राखण्यासाठी सर्वच श्रेणीच्या जवानांनी आपल्या आधीच्या शूरवीरांच्या कृतींमधून प्रेरणा घ्यावी व आपल्या देशाप्रती कर्तव्याबाबत ठाम राहावे, असे प्रोत्साहन त्यांनी जवानांना आपल्या संदेशातून दिले.

महापालिका निवडणुका:सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग घेणार निर्णय

नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन

मुंबई, दि. २७- राज्यातील
नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम निकालानंतर राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

मुदत संपलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये प्रशासक नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा विषय राज्य निवडणूक आयोगाचा आहे. त्यामुळे राज्य शासन जानेवारी महिन्यात या निवडणुका घेणार आहे असे काही प्रसारमाध्यमांनी दिलेले वृत्त तथ्यहीन आहे, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

पायदळ दिनानिमित्त 27 ऑक्टोबर, 2022 रोजी वीर नारींना ई-स्कूटींचे वितरण

पुणे, 27 ऑक्‍टोबर 2022

महिला सशक्तीकरणाच्या  उद्दिष्टाला अधिक बळकटी देण्‍यासाठी , पायदळ दिनानिमित्‍त, दि. 27 ऑक्टोबर 2022 रोजी दक्षिण कमांडच्या वतीने पुणे येथे पंधरा वीर नारींना एका कार्यक्रमामध्‍ये  ‘एडब्ल्यूडब्ल्यूए’  च्या प्रादेशिक अध्यक्ष अनिता नैन यांच्या हस्ते ई-स्कूटी प्रदान करण्यात आल्या . ई-स्कूटी प्रदान करण्याचा समारंभ  दक्षिण कमांड अंतर्गत येणा-या पुणे, जैसलमेर, बेळगाव, सिकंदराबाद आणि भोपाळ या पाच विभागांमध्‍ये एकाचवेळी पार पडला.  स्कूटीमुळे  या वीर नारींना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या परिवाराला गतिशीलता  मिळेल . तसेच त्या  स्वावलंबी  बनतील. 

राजकारणातला सिंघम गेला….!!

माझे अत्यंत जवळचे मित्र, वडीलबंधू माजी आमदार विनायकशेठ निम्हण यांच्या निधनाची बातमी ऐकून मन अगदी सुन्न झालं; अजूनही यावर विश्वास बसत नाही. त्यांचं असं जाणं सर्वांनाच व्यथित करणारं आहे. शिवसेनेत असताना मी भवानीपेठ विधानसभा मतदारसंघाचा तर विनायकशेठ हे शिवाजीनगर मतदारसंघांचे आमदार होते. शिवसेनेच्या ‘जय भवानी जय शिवाजी…!’ या घोषणेशी जवळीक साधणारे असे हे आमचे मतदारसंघ असल्यानं वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आम्हां दोघांना उद्देशून मतदार संघाच्या नावावरूनच माझा जय भवानी आणि विनायकशेठ यांचा जय शिवाजी… असं संबोधित असत. शिवसेनाप्रमुखांच्या या उल्लेखानं शेठ खूप खुश होत असत. त्यांची एकूण कार्यशैली पाहता, त्यांना राजकारणातले खऱ्या अर्थानं ‘सिंघम’ म्हणता येईल असेच ते होते. कोणत्याही Action ला तात्काळ Reaction हा त्यांचा मुळ स्वभाव होता. त्यांची राजकारणातली एन्ट्री आणि पावलापावलावर त्यांच्यात होत गेलेला सकारात्मक बदल हा पाषाणातून जशी मूर्ती घडवली जाते ना, अगदी तसंच त्यांनी स्वतःची राजकीय कारकिर्द स्वतः घडविली होती. एकदा एखाद्याला शब्द दिला की मग तो शब्द पूर्ण करण्यासाठी मग ते स्वतःचं देखील ऐकायचं नाहीत; त्याचा काहीही परिणाम होवो, मागे फिरणं त्यांना ठाऊकच नव्हतं. एकदोन नाही तर अशी शेकडो उदाहरणं आहेत. हाच विनायकशेठ यांचा प्लस पॉईंट होता. त्यामुळं सध्या सक्रिय राजकारणातून थोडंसं बाजूला असतानाही त्यांचा मोठा मित्रपरिवार सर्व पक्षात आणि संस्थामध्ये होता. त्यांच्याशी ते सतत संपर्कात असायचे. आमदार असताना आमचं मुंबईला एकत्र जाणं असो किंवा नागपूरच्या विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर हल्दीराम मधून मतदार संघातले शिवसैनिक, मित्रपरिवारासाठी संत्राबर्फीची हजारो रुपयांची खरेदी असो. ते मनापासून करायचे. त्यांना दुसऱ्यांना भरवणं खूप आवडायचे. त्यांचं वागणं हे ‘शेठ’सारखं असायचं; म्हणूनच त्यांना सारे ‘शेठ’ असंच संबोधित असत. कारण ते ‘स्वभावाचेही शेठ’ होते. अत्यंत मनमोकळ्या स्वभावाचे शेठ हे आपला मित्र परिवार हाच आपला कुटुंबकबिला आहे असं ते म्हणत! कुटुंबातले सदस्य, नातेवाईक, शिवसैनिक आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते यात त्यांनी कधीच अंतर राखलं नव्हतं. माझ्या अडचणीच्या काळात विनायकशेठकडून येणारे फोनवरील शब्द हे आधार वाटायचे, त्या अडचणीतून पार पडण्यासाठी सहाय्यभूत ठरायचे. काही महिन्यांपूर्वीच आमच्या एका कॉमन मित्राच्या मुलाच्या लग्नानिमित्तानं गोव्याला गेलो असताना आमच्या भरभरून गप्पा झाल्या. सुखदुःखाचे क्षण आम्ही एकत्रच अनुभवले. अशा माझ्या स्वभावाने शेठ असणाऱ्या मित्राला श्रद्धांजली वाहणं खूप जड जातंय; पण नियती पुढं कुणाचंच काही चालत नाही! दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच त्यांना श्रद्धांजली वाहावी लागतेय हे मोठं क्लेशकारल आहे. माझ्या या ‘सिंघम’ मित्राला, ‘पाषाणा’तल्या ‘विनायक’मूर्तीला माझं विनम्र अभिवादन….!

भावपूर्ण श्रद्धांजली….!!!
शोकाकुल

दीपक पायगुडे आणि लोकसेवा परिवार.

साप्ताहिक सुटीच्या दिवशी  वीजबिल भरणा केंद्र सुरुवीजबिल भरण्याचे महावितरणचे आवाहन

पुणे : वीज ग्राहकांना वेळेत चालू वीजबिल व थकबाकी भरणे सोईचे व्हावे यासाठी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २९) व रविवारी (दि. ३०)  या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात महावितरणची थकबाकी वाढलेली असून थकबाकी वसूल करण्याची  मोहीम सुरु आहे. थकबाकीदार ग्राहकांचा थकबाकीपोटी वीज खंडित करण्यात येत आहे. चालू वीजबिल व थकबाकी भरणे सोईचे व्हावे म्हणून साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी वीजबिल भरणा केंद्रे चालू असणार आहे.
थकबाकीदार वीजग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तसेच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या बिलांचा भरणा करण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अँपद्वारे ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.
सोबतच लघुदाब वर्गवारीतील औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल  ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे थेट  भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी संबंधीत वीजबिलांवर महावितरणच्या बँक खात्याचातपशील देखील देण्यात येत आहे.

अग्नीशामक दलाच्या जवानां सोबत दिवाळी  साजरी

लोकसेवा फाऊंडेशनचा पुढाकार
पुणे :
मुस्लीम समाजातील कार्यकर्ते तसेच लोकसेवा फाऊंडेशन यांच्या वतीने  अग्नीशामक दलाच्या  कोंढव्यातील २ केंद्रांमध्ये   दिवाळी  उत्साहात साजरी करण्यात आली.    लोकसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सलिम पटेकरी यांनी यासाठी पुढाकार घेतला.
 जिवाची पर्वा न करता निस्वार्थीपणे अविरत सेवा देणाऱ्या , दिवाळीच्या दिवशीही आपल्या परीवारापासून दूर राहून नागरीकांच्या सुरक्षेकरीता झटणाऱ्या अग्नीशामक दलाच्या  जवानांसोबत   दिवाळी साजरी करण्यात आली.पाडव्याच्या दिवशी कोंढवा येथे झालेल्या या कार्यक्रमात  सिकंदर पठाण अध्यक्षस्थानी होते.  चांद बलहटटी यांनी   सूत्रसंचालन  केले.  समीर पठाण,असलम इसाक बागवान,आसमा खान , हाफिज शेख , गणेश भोईटे, अबुल कलाम उपस्थित होते.
लोकसेवा फाऊंडेशन ही सामाजिक संस्था आहे. अपंग, विधवा व दारिद्रय रेषेखालील नागरीकांना वर्षभर शुगर ,डायबेटिस सारख्या आजाराकरीता मोफत औषध पुरवठा केला जातो.  वर्षभर १५०  कुटुंबाना रेशन किट तसेच गरीब विद्यार्थी यांना मोफत वही पुस्तके दिली जातात.  दररोज ७०  विद्यार्थ्यांना दररोज  भोजन दिले जाते.
 दिवाळी,ईद, ख्रिसमस, बुध्द जयंती,नानक जयंती  हे सण या संस्थेतर्फे साजरे  केले जातात.

वऱ्हाडी वाजंत्रीची भन्नाट टायटल्स!

चित्रपट ही एक मनोरंजनाची अद्भुत कला तर ती पाहणं हा विलक्षण अनुभव. आजपर्यंत विविध जातकुळीच्या चित्रपटातून प्रबोधनापासून मनोरंजनापर्यंत आणि इतिहासापासून वर्तमानापर्यंत अनेकविध आशय विषयाने प्रतिभावंतांच्या प्रतिभा उजळल्या आहेत. आपल्या चित्रपटाला रसिकांच्या हृदयात स्थान मिळावे यासाठी ते नानाविविध प्रयत्न करताना दिसतात. असंच काहीतरी वेगळं अफलातून मनोरंजन करण्यासाठी अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर सज्ज झाले आहेत. त्यांच्या ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या वऱ्हाडी वाजंत्री या धम्माल विनोदी चित्रपटासोबत.

अनेक चित्रपटांची टायटल्स रसिक प्रेक्षकांच्या आकर्षणाचा विषय ठरलेली आहेत. विषयाला अनुसरून आपल्या चित्रपटाची टायटल्स करण्यासाठी निर्माते दिग्दर्शक जंगजंग पछाडत असतात. विशेष टॅलेंटचा वापरून करून आकर्षक टायटल्स निर्मितीवर भर दिला जातो. अश्याच काहीश्या भन्नाट कल्पनांमध्ये आपल्या चित्रपटाचं नाव रसिकांच्या मनःपटलावर कोरण्यासाठी अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर सध्या गुंतले आहेत. त्यांच्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटाचे टायटल्स तयार करण्याचे काम जोमात सुरु आहे. प्रख्यात पब्लिसिटी डिझायनर मिलिंद मटकर भन्नाट कल्पना रेखाटण्यात गुंग झाले आहेत. दिग्दर्शक विजय पाटकर आणि निर्माते कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्या संगनमताने या चित्रपटाची धम्माल उडवणारी श्रेयनामावली मिश्किल विनोदी हावभावांसह अनोख्या स्टाईलने पडद्यावर आणण्यासाठी त्यांची घालमेल सुरु आहे.

नावाप्रमाणेच या चित्रपटात एकापेक्षा अवखळ विनोदवीरांना घेऊन दंगा करण्यासाठी विनोदाचा बादशहा मकरंद अनासपुरे ‘वऱ्हाडी वाजंत्र्यां’सह येत असून. त्याच्यासह २१ नमुनेदार विनोदवीरांची वेगळी छटा मिश्किल विनोदी ढंगात टायटल्समध्ये उमटविण्याचे अवघड काम ही त्रयी सध्या समरसून करीत आहे. मकरंद अनासपुरे यांचे भन्नाट कार्टून लहान थोरांना गुदगुल्या करणारे असून त्यांच्या या छबीचे ‘मिम्स’ चित्रपट आल्यावर होतील हे नक्की. त्यासोबतच पॅडी आणि हेमांगीचीही कार्टून्स लयभारी झाली असून तीही सगळ्यांना प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाहीत. याहून जबरदस्त म्हणजे मोहन जोशी, रीमा यांचे बुलेटराजा – राणी दर्शन आहे. त्यासोबतच प्रिया बेर्डे – विजय कदम यांचा ठुमक्याचा ठेका कमाल झाला आहे. तर जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, प्रशांत तपस्वी, राजेश चिटणीस, जयवंत भालेकर, विनीत बोंडे, शिवाजी रेडेकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे आदी कलाकारांच्याही इरसाल नमुनेबाज व्यक्तिरेखा या चित्रपटाच्या कथेसोबतच ‘टायटल्समधेही धम्माल’ करणार असल्याने हे ‘वऱ्हाडी वाजंत्री’ प्रेक्षागृहात हशाच हशा पिकणार हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तर वाट पाहुयात ११ नोव्हेंबरची.

विद्युत सहाय्यकांच्या कागदपत्रांची पडताळणी दि. २९ व ३० ऑक्टोबर रोजी महावितरणच्या परिमंडल कार्यालयांत होणार

पुणेदि२७ :- . उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्णयानुसार प्रसिध्द केलेल्या सुधारित निवड यादीमध्ये नव्याने निवड झालेल्या विद्युत सहाय्यक या संवर्गातील उमेदवारांची तसेच प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी परिमंडलनिहाय दि. २९ व ३० ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यात येणार आहे.

महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता ३ वर्षांच्या निश्चित कालावधीकरिता कंत्राटी पध्दतीने उमेदवारांची निवड करण्यासाठी एप्रिल व जुलै २०१९ मध्ये विद्युत सहाय्यक या पदांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.

परिमंडलनिहाय यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूदकेलेल्या परिमंडल कार्यालयांमध्ये दि. २९ व ३० ऑक्टोबर २०२२ रोजी आपल्या कागदपत्रांची पडताळणी स्वत: उपस्थित राहून करणे अनिवार्य आहे. नव्याने निवड झालेल्या उमेवारांची तसेच प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांची परिमंडलनिहाय यादी महावितरणच्या संकेतस्थळावर (www.mahadiscom.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरिता हजर राहणार नाहीत, अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल.असे महावितरण ने कळविले आहे .

‘समुपदेशक’ पुष्कर श्रोत्री

अभिनेता पुष्कर श्रोत्री त्याच्या ‘हॅप्पी गो लकी’ स्वभामुळे प्रत्येकाला जवळचा वाटतो. मालिका, चित्रपट, नाटक, वेबसीरीज या साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणारा हा अभिनेता आता ‘समुपदेशक’ म्हणून काम करणार आहे. गैरसमजामुळे विस्कटलेल्या नात्यांमध्ये सुसंवाद घडवून आणण्याच्या कामासाठी पुष्करने पुढाकार घेतला आहे. समुपदेशक म्हणून त्याची नवी इनिंग यशस्वी होते का? हे पाहण्यासाठी तुम्हाला आगामी ‘३६ गुण’ हा मराठी चित्रपट पहावा लागेल. या चित्रपटात तो समुपदेशकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पुष्करचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना यात पहायला मिळेल. समित कक्कड दिग्दर्शित ३६ गुण चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना पुष्कर सांगतो की, ‘समुपदेशक’ सुसंवादासाठी प्रयत्न करतोच पण त्याच्या या प्रयत्नाला समोरच्याचा प्रतिसादही तितकाच महत्त्वाचा असतो. कोणत्याही नात्यामध्ये मनं जुळायला हवीत. ती जुळली की, नात्याचा समतोल साधला जातो, हे अधोरेखित करणारा हा चित्रपट आहे. लग्न झालेल्या व न झालेल्या प्रत्येकाने हा चित्रपट पहायला हवा.

या चित्रपटात संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार मध्यवर्ती भूमिकेत असून त्यांच्यासोबत पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार आहेत. ‘द प्रॉडक्शन हेडक्वार्टर्स लि’ व ‘समित कक्कड फिल्म्स निर्मित ‘३६ गुण’ चित्रपटाची निर्मिती मोहन नाडार, समित कक्कड, संतोष जुवेकर आणि सावित्री विनोद गायकवाड यांनी केली असून निखिल रायबोले, भूपेंद्रकुमार नंदन यांच्या कॅफे मराठीने या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा समित कक्कड आणि हृषिकेश कोळी यांची आहे. संवाद हृषिकेश कोळी यांचे आहेत. छायाचित्रण प्रसाद भेंडे तर संकलन आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले-सहाय यांचे आहे. मंगेश कांगणे यांच्या गीतांना अजित परब यांचे संगीत लाभले आहे.

चिन्मय मांडलेकर ‘सनी’मध्ये दिसणार अत्यंत वेगळ्या आणि फ्रेश भूमिकेत!

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ या चित्रपटातील एक एक व्यक्तिरेखा आता गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या आहेत. विश्वजित मोहिते पाटील या कार्यसम्राट आमदाराची व्यक्तिरेखा समोर आली असून चिन्मय मांडलेकर यांनी ही भूमिका साकारली आहे.

व्यक्तिरेखेची झलक पाहता विश्वजित अतिशय करारी, शिस्तप्रिय दिसत आहेत. घरात असलेला त्यांचा दबदबाही यातून अधोरेखित होत असून सनी आणि त्यांच्या नात्यात कटुता असल्याचे भासतेय. आता विश्वजित आणि सनीमध्ये नेमका कशावरून हा दुरावा आलाय, हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल. चिन्मय यांचा फ्रेश आणि वेगळा लुक लक्ष वेधुन घेतोय, त्यामुळे उत्सुकता अजुन वाढली आहे. सुपरहिट चित्रपट झिम्माच्या टिमची ‘सनी’ ही पुढील भेट आहे.

क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित ‘सनी’ हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. इरावती कर्णिक लिखित या चित्रपटात ‘सनी’ची भूमिका ललित प्रभाकरने साकारली आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.