Home Blog Page 1526

‘One8 कम्यून बार’ व ‘मिलर्स लक्झरी क्लब’वर पोलिसांच्या क्राईम ब्रांचची कारवाई

पुणे-बंडगार्डन परिसरात रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात साऊंड सिस्टिम लावून संगीत वाजवणाऱ्या ‘One8 कम्यून बार’ व ‘मिलर्स लक्झरी क्लब’वर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागानेकारवाई केली आहे.

पोलिसांनी हॉटेलमधून साऊंड सिस्टीम, डिजे मिक्सर जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.19) केली.सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक बंडगार्डन परिसरातील राजा बहादुर मिल येथील ‘One8 कम्यून बार’ व ‘मिलर्स लक्झरी क्लब’ येथे मोठ्या आवाजात सांउड सिस्टिमवर संगीत वाजवले जात असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याठिकाणी छापा टाकला असता रात्री दहा नंतर मोठ्या आवाजात संगीत सुरु असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोन्ही हॉटेलमधील एक लाख 70 हजार रुपये किमतीचे सांउड सिस्टिम जप्त केले आहे. पोलिसांनी हॉटेलवर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत ध्वनी प्रदुषण अधिनियमानुसार कारवाई केली. जप्त केलेला मुद्देमाल बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार , सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे , पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाब कर्पे, मनिषा पुकाळे, इरफान पठाण, संदीप कोळगे यांच्या पथकाने केली.

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण

0

मुंबई दि,२१:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे लोकार्पण आज करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्या वतीने हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालयासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा,मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर, मातृभक्त शिवराम हरी राजगुरु स्मारकाचे सदस्य सत्यशील राजगुरू, उमा संजीव महादेकर, स्मारक निर्मिती ग्रुपचे ऍड प्रथमेश पाडेकर आदी उपस्थित होते.
0000

सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच दुप्पट निवृत्तीवेतन-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई, दि. २१: महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहे. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असून त्यासाठी वरिष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन याची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगत महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ सीमा भागातील बांधवांना प्रभावीपणे होण्यासाठी सीमा प्रश्न हाताळणाऱ्या विशेष कक्षाचे बळकटीकरण करावे, मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ पूर्वीप्रमाणे सीमा भागात देण्याचा तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देखील सीमा भागातील बांधवांना देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.

आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात उच्चाधिकारी समितीची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, समितीचे सदस्य मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील, डॉ. तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार पृथ्वीराज चव्हाण, राजेश क्षीरसागर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ज्येष्ठ संपादक किरण ठाकूर आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी प्रस्ताविक केले. ॲड. शिवाजी जाधव यांनी सीमा प्रश्नासंदर्भात सुरू असलेल्या न्यायालयीन लढाई संदर्भात माहिती दिली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सीमा प्रश्नी त्याभागातील बांधवांच्या नेहमी पाठीशी राहिले आहेत, असे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की सीमा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन गांभीर्याने लक्ष घालत आहे. त्यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ श्री. वैद्यनाथन यांची नेमणूक करण्यात आली आहे. गरज भासल्यास अधिक विधीज्ञांची संख्या वाढविण्यात येईल. राज्य शासनाने संपूर्ण लक्ष याप्रश्नावर केंद्रीत केले आहे. त्याचबरोबर मी, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आम्ही याप्रश्नासंदर्भात पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांची लवकरच भेट घेऊ, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. न्यायालयीन प्रक्रियेसाठी राज्य शासनकडून समन्वयक म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोघांची नियुक्ती करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

सीमा भागातील बांधवांना महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सीमाप्रश्न हा विषय हाताळणाऱ्या विशेष कक्षाचे बळकटीकरण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असली तरी सीमा भागात मराठी भाषेचा वापर, त्या भागातील बांधवांना आवश्यक त्या सुविधा याबाबत कर्नाटक सरकार सोबत संवाद सुरू ठेवावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सीमा भागात पूर्वीप्रमाणे मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्याचबरोबर सीमा भागात महाराष्ट्र शासनाची महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्यात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांना स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच निवृत्तीवेतन देण्याच निर्णय याबैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्याचबरोबर न्यायालयीन लढाईसाठी एकीकरण समितीने अदा केलेल्या शुल्काच्या प्रतिपूर्तीचा निर्णयही घेण्यात आला.

सनदशीर मार्गाने सीमा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध- उपमुख्यमंत्री

सीमा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. याप्रश्नी महाराष्ट्रातील सर्व राजकिय पक्ष एकत्र आहेत. सनदशीर, लोकशाही मार्गाने हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही सर्व जण सीमावासीयांबरोबर आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रकाश मरगाळे, दिनेश ओऊळकर, विनोद आंबेवाडकर यांनी सीमा भागातील विविध समस्यांची माहिती यावेळी दिली. सीमा प्रश्नाच्या न्यायालयीन लढाईसाठी ज्येष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन यांची नियुक्ती केल्याबद्दल समितीच्या सदस्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. यावेळी श्री. दानवे, श्री. चव्हाण, श्री. ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले.

हरित ऊर्जा वापराच्या क्षेत्रात गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र उत्तम पर्याय -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई, दि. 21 :”सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महाराष्ट्रात मोठे जाळे आहे. येणाऱ्या काळात सार्वजनिक वाहतूक सुविधा प्रदूषण विरहित होण्यासाठी हरित ऊर्जा वापरावर अधिकाधिक भर देण्यात येणार आहे. त्यामुळेच अमेरिकेसारख्या देशाने महाराष्ट्रात हरित ऊर्जा वापराच्या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी ”, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी यांच्या सदिच्छा भेटीवेळी केले.

माईक हँकी यांनी अमेरिका – महाराष्ट्र द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आपल्या योजना व प्राधान्यक्रम याबाबत आज उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या मेघदूत निवासस्थानी भेट घेवून माहिती दिली.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील शहरे, गावे आणि तालुके सार्वजनिक वाहतूकीने जोडलेले आहेत. ही वाहतूक व्यवस्था प्रदूषण विरहित करुन पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी येत्या काळात राज्यात हरित ऊर्जा वापरावर भर देऊन हरित ऊर्जा उद्योगवाढीला चालना देण्यात येणार आहे. अमेरिकेने यासाठी पुढाकार घेऊन राज्यात या क्षेत्रात तसेच कौशल्य आधारित उद्योगांमध्ये गुंतवणूक करावी, असे आवाहन श्री.फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र हरित ऊर्जा वापरावर भर देत असल्याचे उदाहरण सांगताना उपमुख्यमंत्री यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाने ई- बसेस सुरु केल्याचे सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचामृत संकल्पनेअंतर्गत देशात 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उपययोजनांवर भर दिला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेतही कार्बनवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. देशाला हरित ऊर्जेच्या दृष्टीने समर्थ करण्यासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी महाराष्ट्र पावले उचलत असून, यासाठी अमेरिकेसारख्या देशांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.

राज्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना शासन आवश्यक सुविधांसह सर्व सहकार्य करण्यावर भर देत आहे. भारत आणि अमेरिका यांचे संबंध नेहमीच मैत्रीपूर्ण राहिले असून, येणाऱ्या काळात अमेरिकेतून महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यासाठी पोषक वातारण तयार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाने कौशल्य विद्यापीठ राज्यात स्थापन केले असून, या विद्यापीठाअंतर्गत कौशल्य आधारित उद्योगांचे जाळे वाढविण्याच्या दृष्टीने अमेरिकन कंपन्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी माईक हँकी म्हणाले की, महाराष्ट्रातील वास्तव्य आपणास आवडत असून गेल्या काही काळात राज्याच्या विविध भागांना आपण भेटी दिल्या आहेत. उद्योग, पायाभूत सुविधा, पॅकेजिंग, कृषी, हरित ऊर्जा यासारख्या अनेक क्षेत्रांत अमेरिकन उद्योजक आपला व्यवसाय करत असून येणाऱ्या काळात अमेरिकेतील विविध कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असल्याही ते म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मुंबईचे वाणिज्यदूत यांचे राजकीय व आर्थिक सल्लागार क्रिस्टॉफर ब्राऊन, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, अमेरिकेच्या मुंबई वाणिज्य दूतावासातील राजकीय सल्लागार प्रियांका विसारिया – नायक, डॉ. मनिष मल्के उपस्थित होते.

अपघातामध्ये संपूर्णपणे जळालेली पीएमपीएमएल बसचे रूपडे पालटले..आता पुन्हा मार्गावर

कर्मचारी, अधिकारी यांच्या कल्पकता व मेहनतीचे फळ

पुणे-कोथरूड डेपो कडील सीएनजी बस क्र. ८६८ दि. २२/०२/२०२१ रोजी मार्गावर असताना अपघातामध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी पडून संपूर्णपणे जळाली होती. त्यामुळे बसचे मोठे नुकसान झाले होते. कोथरूड डेपो वर्कशॉप व सेंट्रल वर्कशॉप मध्ये या अपघातग्रस्त बसचे काम पूर्ण करून सदरची बस संचलनात आणणेसाठी कर्मचारी व अधिकारी वर्गाने अथक परिश्रम घेतले.
तत्कालीन कोथरूड डेपो मॅनेजर चंद्रशेखर कदम, सध्याचे डेपो मॅनेजर यशवंत हिंगे व डेपो मेन्टेनन्स
इंजिनिअर विलास मते यांचे मार्गदर्शनाखाली कोथरूड डेपो वर्कशॉप व सेन्ट्रल वर्कशॉप कडील कर्मचाऱ्यांनी कल्पकता व मेहनतीने वायरींग व इंजिनचे काम केले. तसेच बसच्या बॉडीचे काम, बसचे दरवाजे व बसच्या आतील काम करण्यासाठी स्क्रॅप बसेसचे मटेरीयल वापरून कर्मचाऱ्यांनी जळीतग्रस्त बसचे रूपडे पालटले. सदर बसचे आरटीओ पासिंगचे कामकाज दिनांक १९/११/२०२२ रोजी पूर्ण करून बस संचलनकामी उपलब्ध झाली आहे.
राजेश रूपनवर, मनोहर पिसाळ, रमेश चव्हाण, राजेश कुदळे आदी अधिकाऱ्यांनी सदर बससाठी
आवश्यक स्पेअरपार्ट व युनिट उपलब्ध करून दिले. वर्कशॉप कडील कर्मचारी सुनिल वाडकर, निखील बागुल, राजेंद्र पायगुडे, सुनिल मारणे, अजय मारणे, सागर जाधव,अरविंद दुपटे, इंद्रजित मोहिरे, नवनाथ
राठोड, राजू गाडे,अश्विन बळगे, देविदास बोगाणे, प्रदिप टिळेकर, डी. जी. महाजन, शेंडगे,
लादे व इतर कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त बस पूर्ववत करण्यासाठी परिश्रम घेतले.
पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया व सहव्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा पोतदार-पवार यांनी अपघातग्रस्त बसचे काम करून बस संचलनात आणण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांचे अभिनंदन केले.

नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअपसाठी स्वीडनने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई, दि. 21: “स्वीडन हे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि स्टार्टअप उद्योगांसाठी आघाडीवर असलेले एक प्रमुख राष्ट्र आहे. सध्या महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबरोबर स्टार्टअप धोरण राबविण्यात येत असून स्वीडनने महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक करावी”, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल यांना केले.

स्वीडनच्या कौन्सुलेट जनरल ॲना लॅकवॉल यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची त्यांच्या मेघदूत या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी प्रज्ञेश देसाई, डॉ. मनीष मल्के उपस्थित होते. ॲना लॅकवॉल यांनी स्वीडन देशामार्फत उद्योगवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना दिली.

श्री. फडणवीस यावेळी म्हणाले की, स्वीडन आणि भारताचे संबंध नेहमीच सौहार्दपूर्ण राहिले आहेत. आज अनेक स्वीडीश कंपन्या महाराष्ट्रात उद्योग स्थापन करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळेच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी स्वीडनने पुढाकार घ्यावा. स्वीडीश गुंतवणूकदारांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्राकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

श्रीमती लॅकवॉल म्हणाल्या की, येणाऱ्या काळात स्वीडीश आणि महाराष्ट्रातील उद्योजकांची परिषद मुंबईत आयोजित करुन त्यांच्यात एक संवाद घडविण्यात यावा. स्वीडन देखील महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. महाराष्ट्रात चांगले स्टार्टअप आणि उद्योग सुरु करण्यासाठी स्वीडनचे संपूर्ण सहकार्य महाराष्ट्राला मिळेल.

श्री.दशानेमिय वैष्णव गुजराथी,वार्ता जाहिरात, व्हॉट्सअँप समूहाचा ५वा वर्धापनदिन सोहळा संपन्न

पुणे- येथील श्री.दशानेमिय वैष्णव गुजराथी,वार्ता जाहिरात, व्हॉट्सअँप समूहाचा ५वा वर्धापनदिन सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यातील कार्यक्रमाची सुरुवात सौ.विद्या मेहता,सौ. प्रज्ञा शेठ यांच्या स्वागत गीताने करण्यात आली..विठ्ठल मेहता,यांनी प्रास्ताविक, तर सौ.सुषमा मेहता यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
वर्धापदिनानिमित्त रमेश गुजराथी,अशोक मेहता.सौ.सुनीता शेठ अनिल गांधी. डॉ.दिलीप शेठ, डॉ.सतिश देसाईआदी मान्यवरांनी प्रमुख अतिथी म्हणून आपले मनोगत व्यक्त केले.
या पद्धतीचे असे समूह चालवताना समाजातील ,व्यक्ती आप्तस्वकीय यांना एक संघ ठेवण्याचे या समूहाचे कार्य कौतुकास्पद असून,आजच्या धकाधकीच्या जीवनात एकमेकाच्या गाठी भेटी होणे,विचार अदान प्रदान होणे दुर्मिळ होत चालले असून प्रत्येक समाजाने,व्यावसायिकांनी,आप्त स्वकीयांनी,कुटुंबीयांनी ,मित्र परिवाराने अशा प्रकारे समूह स्थापन करून एकमेकाच्या संपर्कात राहणे गरजेचे असून,या मुळे निकटर्तीयांच्या खुशाली ई. वृत्त तत्काळ समजण्यास निश्चितच मदत होईल. अशा शब्दात या मान्यवरांनी या समूहाबद्दल समाधान व्यक्त केले .
सौ.वृषाली धारिया व बंडू नल्के यांना विशेष सहकार्याबद्दल सन्मानित करण्यात आले
विवेक बुटाला यांनी आभार प्रदर्शन,तर सौ. प्रज्ञा शेठ व सौ.स्वाती धारिया यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.


आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत अत्याधुनिक औषधोपचार पद्धती देशभरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवली जात आहे-  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ . भारती पवार

पुणे –

आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत अत्याधुनिक औषधोपचार पद्धती देशभरातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवली जात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ . भारती पवार यांनी आज पुण्यात दिली. इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्री तर्फे आयोजित तीन दिवसांच्या आंतर राष्ट्रीय परिषदेत दुसऱ्या दिवशी त्यांनी उपस्थित प्रतिनिधीना मार्गदर्शन केले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

जगभरातील बहुतेक भागात मौखिक आरोग्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे प्रारंभीच स्पष्ट करून डॉ . पवार पुढे म्हणाल्या की शरीराच्या एकूण आरोग्याच्या दृष्टीने मौखिक आरोग्य अतिशय महत्व पूर्ण मानले पाहिजे. त्यासाठीच केंद्र सरकारने संपूर्ण देश भरात राष्ट्रीय मौखिक आरोग्य अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. अन्य गंभीर आजारांप्रमानेच मौखिक आरोग्याशी संबंधित व्याधींवर प्रगत उपचार केले जावेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे देशवासीयांना घरपोच अत्याधुनिक उपचार मिळावेत हा मुख्य उद्देश असून गेल्या 8 वर्षांच्या कालावधीत वैद्यकीय व्यवसायासाठी अनुकूल वातावरण देशात निर्माण झाल्याचे त्या म्हणाल्या . आयुष्यमान भारत या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत देशाच्या ग्रामीण भागात आणि गाव खेड्यांपर्यंत अत्याधुनिक वैद्यकीय सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत आणि आता कोरोना पश्चात काळात अत्यावश्यक पायाभूत वैद्यकीय सुविधा सर्वदूर पोचवण्यासाठी आयुष्यमान भारत पायाभूत सेवा उपक्रम राबवला जात आहे त्यातून आगामी पाच वर्षात सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना साकार होईल असा विश्वास डॉ. पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

डिजिटल देंतिस्ट्री ही रुग्णांसाठी कमी वेदना देणारी आणि अधिक अचूक उपचार पद्धती असल्यानेच भविष्यात ती क्रांतिकारी उपचार पद्धती ठरेल, व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी देखील त्याचा उपयोग होत असल्याने हे उपचार करून घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे डॉ . पवार यांनी सांगितले .

इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्री च्या ॲप चे उद्घाटन यावेळी डॉ . पवार यांच्या हस्ते करण्यात आले

 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत प्रगत आणि अत्याधुनिक दंतोपचार यावर विचार मंथन होत आहे.

माफी मागेपर्यंत राज्यपालांना पुणे शहर बंदी : शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरेंची घोषणा

पुणे-राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आजही शहरात उमटत असून राष्ट्रवादीच्या पाठोपाठ शिवसेनेने देखील आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निदर्शने केली . यावेळी शहरप्रमुख संजय मोरे यांनी जोपर्यंत राज्यपाल माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना पुण्यात येऊ दिले जाणार नाही अशी घोषणा केली आहे.

ना..लायक राज्यपाल ..यांचे धोतर कुठे फिटले तर सरकार जबाबदार राहील – राष्ट्रवादी शहर अध्यक्षांचा इशारा

पुणे- ना …लायक राज्यपाल .. तातडीने हटवा.. अन्यथा यांचे धोतर कुठे फिटले तर सरकार जबाबदार राहील अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी येथे इशारा दिला आहे. तर …छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटलेल्या सुरतेचा बदला ..भाजपावाले मराठी माणसाचा कायम अवमान करत असल्याचा प्रदीप देशमुख यांनी आरोप केला आहे .

आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सारसबागेजवळील पुतळ्याजवळ जमून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अध्यक्ष जगताप यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांच्या विरोधात निदर्शने केली यावेळी बोलताना नेमके काय म्हणाले जगताप आणि देशमुख ते ऐका प्रत्यक्ष त्यांच्याच तोंडून ….

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”राज्यपाल पदावर असणाऱ्या व्यक्तीने त्या संबंधित राज्याची संस्कृती, लोकभावना यांबाबत आदर बाळगणे अपेक्षित असते. परंतु विद्यमान राज्यपाल वारंवार महाराष्ट्र व महाराष्ट्रातील आदरणीय व्यक्तीमत्त्वांबाबत अवमानास्पद वक्तव्ये करीत आहेत. ही अतिशय गंभीर व संतापजनक बाब आहे.छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराष्ट्रातील थोर व्यक्तींवर वारंवार गरळ ओकण्याचे काम राज्यपाल करीत
आहेत. यातून त्यांच्या पुर्वाश्रमीच्या पक्षाचा महाराष्ट्र द्वेषी अजेंडा ते राबवित आहे. किंबहुना ते महाराष्ट्र भाजपाचे कार्यकर्ते म्हणूनच काम करीत आहेत. ” ते पुढे म्हणाले की, “राज्यपाल महाराष्ट्राचा वारंवार अपमान करीत आहेत व त्याला भाजप प्रोत्साहन देत आहेत.”
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी तर एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपतींनी ओरंगजेबाची पाच वेळा माफी मागीतली होते असे अवमानकारक वक्तव्य केले. या वक्तव्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठराखण केली. सत्तेसाठी साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांचे तळवे चाटण्याची ही अतिशय लाचार प्रवृत्ती असून कोणताही स्वाभिमानी मराठी माणूस हे सहन करणार नाही. आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा यांचा निषेध करीत आहे.शिवरायांचा अवमान ही भाजपाची मॅच फिक्सिंग असा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केला.‌
या आंदोलनात यावेळी
“छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा गांधींचा जयजयकार करण्यात आला ”
“भगतसिंग कोशियारी
नही चलेंगी होषीयारी”
“काळी टोपी
“काळे मन हेच भाजप चे अंतरमन”
“भाज्यपाल हटावो महाराष्ट्र बचावो”
“सुधांशु त्रिवेदीचा धिक्कार असो “अश्या धोषणा देण्यात आल्या
सदर प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, संतोष नांगरे ,प्रिया गदादे , किशोर कांबळे , वनराज आंदेकर , महेश शिंदे ,बाबा पटील , मुणालीनी वाणी, श्वेता होनराव , पार्थ मिठकरी , गणेश मोहीते, मनाली भिलारे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवले पूल परिसरात पुन्हा दोन अपघात,दुचाकीस्वाराचा मृत्यू; सातजण जखमी

0

पुणे-रविवारी रात्री नवले पुलाजवळ झालेल्या अपघातात तब्बल २४ वाहनांचे नुकसान झाले असून काही वाहनचालक जखमी झालेले आहेत.अशातच मध्यरात्री नवले पूल परिसरात स्वामी नारायण मंदिराजवळ भरघाव टेम्पोने सात वाहनांना धडक दिली. अन्य एका अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

संजय राऊत यांना राहुल गांधींचा फोन, भारत जोडो यात्रेत जपला माणुसकीचा ओलावा

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नुकताच शिवसेना खासदार व नेते संजय राऊत यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. संजय राऊत यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

राहुल गांधी भारत जोडो यात्रेत खूप व्यस्त आहेत. तरीही राहुल गांधी यांनी मला फोन केला व माझ्या तब्येतीची विचारपूस केली. खूप प्रेमाने ते बोलत होते. आम्हाला कायमच तुमची काळजी राहिली. आता तुम्ही बाहेर आला आहात तर तब्येतीची काळजी घ्य़ा. आपण पुन्हा एकदा काम करू. राजनितीत एकप्रकारची कटुता आली आहे. मित्र देखील दूर पळतायत. राहुल असे व्यक्ती आहेत जे राजकीय मतभेद असतानाही. मैत्रीचे प्रेमाचे संबंध कायम ठेवतात. त्यामुळेच भारत जोडो यात्रेला पाठिंबा मिळत आहे. राहुल गांधी यांच्या बोलण्यात प्रेम आणि गोडवा दिसतोय. त्यामुळे लोकांना ते आपलेसे वाटतायत. माझे इतर पक्षातही मित्र आहेत. आम्ही एकत्र काम केलं आहे. पण त्यातल्या किती जणांनी विचारलं की तुम्ही कसे आहात? किती लोकांनी माझ्या कुटुंबीयांची विचारपूस केली? आमच्या पक्षातील नेते, ठाकरे कुटुंबीय, पवार साहेब, राष्ट्रवादी व काँग्रेसमधील काही मित्रांनी चौकशी केली.आमचे मित्र भाजपातही आहेत. पण ते तर खूष होते मी तुरुंगात गेल्यावर. एका खोट्या प्रकरणात अडकवून आपल्या राजकारणातील सहकाऱ्याला तुरुंगात टाकलंय, असं किती जणांना वाटलं. असं असतानाही राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी माझी चौकशी केली. ही आपली परंपरा आहे राजकारणाची’, असे संजय राऊत यांनी सांगितले

‘भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे.यात्रेत तो दिसतोय.’ असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

“फडणवीसांकडून त्रिवेदींच्या विधानाची पाठराखण का?” संभाजीराजेंचा संतप्त सवाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांच्या विधानाचे समर्थन केले होते. दरम्यान, यावरून आता संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांकडून सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्याची पाठराखण का? असा प्रश्न त्यांनी फडणवीसांना विचारला आहे.

“देवेंद्र फडणवीस हे सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्याची पाठराखण का करत आहे? हे मला कळलं नाही. सुधांशू त्रिवेदींनी महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे. किंबहूना सर्वच शिवप्रेमींची माफी मागायला पाहिजे. फडणवीसांनी त्यांचे समर्थन केल्यापेक्षा ते माफी कशी मागतील, याकडे लक्ष द्यायला पाहिजे”, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

वीर सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितल्याच्या मुद्द्यावर बोलताना एका वृत्तावाहिनीच्या कार्यक्रमात भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली, असं वादग्रस्त विधान केलं असे वृत्त काल सांगितले जात होते. यासंदर्भातला व्हिडिओ जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केला होता. यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारले असताना “सुधांशु त्रिवेदींचं वक्तव्य मी नीट ऐकलं आहे आणि कुठल्याही वक्तव्यात त्यांनी महाराजांनी माफी मागितली असं म्हटलेलं नाही.” असे फडणवीस म्हणाले होते.

तब्बल 24वाहने धडकली,ब्रेक फेल कंटेनर मुळे नवले पुलावर मोठ्ठा अपघात

0

पुणे-नवले पूल येथे अपघाताची मालिका अद्यापही सुरू असून आज पुन्हा कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला यात 24 गाड्या एकमेकावर आदळल्या आणि सुमारे 15/16 जण जखमी झाले आहेत. अशीमाहिती आहे अपघातप्रकरणी ट्रकच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालक मनीलाल यादव याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा चालक उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे, तो सद्या फरार असून काल रात्री झालेल्या अपघातप्रकरणी त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताला कारण ठरलेल्या AP 02 TE 5858 ट्रकचा चालक मणीराम छोटेलाल यादव रा. मध्य प्रदेश हा सध्या फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

हा अपघात कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला तेही तपासण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. अपघातामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर झालेली वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही हे पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत

साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर पंचवीस गाड्यांना उडवत वाडगाव पुलाजवळ आदळला. यात सुमारे 15/16 जण जखमी झाले आहेत. दरम्यान सुमारे पावणे नऊ च्या सुमारास हा अपघात झाला. अपघाता दरम्यान रस्त्यावर ऑइल सांडल्याने रस्ता अधिकच निसरडा झाला त्यामुळे गाड्यांची संख्या अधिकाधिक वाढत गेली.दरम्यान या अपघातात जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत. अपघातस्थळी सिंहगड तसेच दत्तवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित झाले आहेत सुमारे 12 ते 15 रुग्णवाहिका देखील अपघातस्थळी आलेल्या आहेत. अग्निशामक दलाचे पथके येथे कार्यरत आहेत, 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला

साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाताना सुमारे दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा लागले आहेत परिणामी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे.

तर या अपघातामध्ये 13 जण जखमी झाले आहेत.

1) राहुल भाऊराव जाधव रा.वारजे

2) शुभम विलास डांबळे रा. सदर

3) तुषार बाळासाहेब जाधव रा. सदर

तिघेही उपचार कामी नवले हॉस्पिटल येथे

4)आनंद गोपाळ चव्हाण रा. सहयोग नगर, पुणे

5) राजेंद्र देवराम दाभाडे रा. माणिकबाग पुणे

मोरया हॉस्पिटल येथे उपचारकामी

6) साहू जुनेल रा.कोंढवा पुणे

7)ऑस्कर लोबो रा. कोंढवा पुणे

रुबी हॉल हॉस्पिटल येथे उपचारकामी

8) मधुरा संतोष कारखानीस वय 42 वर्ष रा. वनाज

9)चित्रांक संतोष कारखानीस वय 8 वर्ष

10) तनीषा संतोष कारखानीस वय 16 वर्ष

11)विदुला राहुल उतेकर वय 45 वर्ष रा. सदर

सर्व उपचारकामी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे

12) अनघा अजित पभुले वय 51 वर्ष रा. वडगाव पुणे

13)अनिता अरुण चौधरी वय 54 वर्ष रा. राहटणी चौक, पुणे( उपचार: जगताप हॉस्पिटल पुणे )

शरद पोंक्षे यांचे प्रमुख कार्यवाह पदाचे सर्व अधिकार काढून घेतले:नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर

0

मुंबई- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने आज अभिनेता शरद पोंक्षे यांच्याकडील प्रमुख कार्यवाह पदाचे अधिकार काढून घेत परिषदेची पंचवार्षिक निवडणूक घेण्याचे निश्चित केले आहे. अशी माहिती परिषदेचे प्रवक्ता भाऊसाहेब भोईर यांनी येथे दिली.

ते म्हणाले कि,’ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद , मुंबईची तातडीची नियामक मंडळ सभा आज रविवार दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी चार वाजता शाहू सभागृह, तिसरा माळा , शिवाजी मंदिर, दादर , मुंबई येथे प्रभारी अध्यक्ष श्री. नरेश गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर सभेस बहुसंख्य नियामक मंडळ सदस्य महाराष्ट्रातून उपस्थित होते. प्रभारी अध्यक्ष श्री. नरेश गडेकर यांची सन 2018 ते 2023 या कालावधीतील उर्वरित कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे हे परिषदेच्या घटनेप्रमाणे कामकाज करीत नसल्याने त्यांचे प्रमुख कार्यवाह या पदाचे सर्व अधिकार सभेने काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. व त्यांचे सर्व अधिकार सहकार्यवाह यांना देण्यात आले.
मागील नियामक मंडळाची मुदत मार्च 2023 मध्ये संपत आहे. पंचवार्षिक निवडणूक सन २०२३ – २०२८ घेण्याचे नियामक मंडळ सभेत ठरविण्यात आले. यासाठीची मतदार यादी व घटनेप्रमाणे निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. प्रमुख निवडणूक अधिकारी नियुक्तीबाबत सभेत चर्चा करण्यात आली. निवडणूक अधिकारी निवडीसाठी पाच सदस्यसीय समिती गठीत करण्यात आली आहे. यात श्री. भाऊसाहेब भोईर, सविता मालपेकर, सुनील महाजन, विजय कदम, शामनाथ पुंडे, असून सदर समिती पाच दिवसात निवडणूक अधिकाराचे नाव जाहीर करेल. तसेच येत्या काही दिवसात सर्वसाधारण सभा घेण्यात येईल असे सर्वानुमते ठरले. अध्यक्ष नरेश गडेकर सभेची तारीख व वेळ निश्चित करणार आहेत.
कोरोना काळात सभासद केलेल्या सर्व सभासदांची माहिती घेऊन त्यांना सभासदत्व देण्याबाबत पुढील सभेत निर्णय घेण्यात येणार आहे.