Home Blog Page 1517

राहुल गांधीना गधड्या म्हणून त्यांची लायकी काढली राज ठाकरेंनी … (व्हिडीओ)

मुंबई- ज्या घराण्याला देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे,देशासाठी बलिदानाचा इतिहास आहे, त्या घराण्यातील वारसदार असलेल्या राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली आहे , या यात्रे दरम्यान त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी इंग्रजांची माफी मागितली होती , आणि त्याबाबतचे कागदपत्रे दाखवीत वक्तव्ये केली होती त्यावर राज ठाकरे यांनी काल आपल्या भाषणातून राहुल गांधींचे नाव घेऊन थेट हल्ला चढविला ,ते म्हणाले , अरे गधड्या तुझी लायकी आहे काय ? सावरकरांवर बोलायची ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी (ता.२७) मनसे गटाध्यक्षांच्या मेळाव्यात काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्यासदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. राहुल हे म्हैसूर सँडल सोपप्रमाणे गुळगुळीत मेंदूचे असल्याचा टोला त्यांनी लगावला. महापुरुषांची बदनामी थांबवण्याचे आवाहन त्यांनी सर्वपक्षीयांना केले. तब्येतीची कारणे सांगून घरात बसणारे राज्य गेल्यावर सर्वत्र फिरत आहेत, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

गोरेगावमधील नेस्को सभागृहात आज मनसेच्या गट अध्यक्षांच्या मेळाव्यात राज बोलत होते. राहुल यांच्यावर टीका करताना राज म्हणाले, ‘राहुल गांधी यांची सावरकरांवर बोलायची लायकी नाही. ५० वर्षांची शिक्षा झालेला माणूस बाहेर येण्यासाठी अर्ज करतो. बाहेर आल्यावर हंगामा करू ही रणनीती होती. ही रणनीती ज्याला समजत नाही तो गुळगुळीत मेंदूचा असतो,’ असा आरोप त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केला. यासाठी राज यांनी कृष्णनीती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंगसोबत केलेल्या कराराचा दाखला दिला. ‘पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी कशा वाईट होत्या हे सांगणे बंद करा. ज्यांनी देशासाठी लढा दिला त्यांची बदनामी करून हाताला काय लागणार आहे,’ असा सवाल त्यांनी काँग्रेस आणि भाजपला केला. ‘प्रत्येक माणूस हा गुणदोषांसह स्वीकारावा लागतो. ज्याच्याकडे जे गुण आहेत ते हेरा आणि महाराष्ट्र समृद्ध करा,’ असे आवाहन त्यांनी राजकीय पक्षांना केले.

पदाधिकाऱ्यांचे कान टोचले राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संपूर्ण ताकदीने उतरा, मुंबई महापालिका तुमच्या हातात आणून देतो, असा शब्द दिला. जे काम सांगितले ते करा, लोकांशी नम्रतेने बोला. शाखाध्यक्ष, विभाग अध्यक्ष काम व्यवस्थितपणे करत नसेल तर माझ्यापर्यंत कळवा. हुजरे निर्माण करणारे पदाधिकारी नको आहेत, या शब्दांत त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. राज यांची आजची सभा मुंबई महापालिका निवडणुकीचे फुंकलेले रणशिंग असल्याचे मानले जाते. २२७ नगरसेवकांच्या मुंबई पालिकेत मनसेचा एकच नगरसेवक आहे.

एकनाथ शिंदेंनी रात्रीतून कांडी फिरवली ‘काल-परवा मुख्यमंत्रिपदावर असलेले तब्येतीची कारणे सांगून बाहेर पडत नव्हते. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवल्यानंतर ते सगळीकडे फिरत आहेत. स्वत:चा स्वार्थ आणि पैशांसाठी दिसेल त्याचा हात धरायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचे, असले धंदे मी करत नाही, या शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे वाभाडे काढले.

 इफ्फी मध्ये ‘इन-कन्वर्सेशन’ या सत्रात दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या आशा पारेख सहभागी

गोवा/मुंबई, 27 नोव्‍हेंबर 2022

वर्ष 2020 च्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित झाल्याचा अनुभव सांगताना ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख म्हणाल्या की, प्रदीर्घ काळानंतर एका महिलेला हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल आश्चर्य आणि आनंद व्यक्त करत त्या म्हणाल्या , “हा पुरस्कार मिळवणारी मी पहिली गुजराती देखील आहे. ही माझ्यासाठी ही खूप चांगली गोष्ट होती, मात्र  2 दिवस माझे मन ते मानायला तयार नव्हते. मी सर्वप्रथम देवाचे आभार मानले कारण माझ्यासाठी हा खूप मोठा सुखद धक्का होता”. गोव्यात 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इन-कन्वर्सेशन’ या सत्रात आशा पारेख आज बोलत होत्या.

आशा पारेख यांना  भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल 2020 वर्षासाठीचा  दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. 30 सप्टेंबर 2022 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते  भारतातील  चित्रपट क्षेत्रातील हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

गोव्यात 53 व्या इफ्फीमध्ये “इन-कन्वर्सेशन’ या सत्रात चित्रपट अभिनेत्री आशा पारेख बोलत आहेत

या सत्रामध्ये , आशा पारेख यांनी ‘कटि पतंग’, ‘तीसरी मंझिल’, ‘दो बदन’, ‘मैं तुलसी तेरे आंगन की’, ‘बहारों के सपने’ यासारख्या विविध चित्रपटांमध्ये काम करतानाचा  अनुभव सांगितला.

अभिनयाव्यतिरिक्त,  टीव्ही मालिकांचे दिग्दर्शन आणि निर्मितीमधील कारकीर्द  याबद्दल देखील त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की ज्योती ही गुजराती मालिका  यशस्वी ठरल्यामुळे त्यांना  आत्मविश्वास मिळाला. यातूनच त्यांना  आणखी टीव्ही मालिका करायला प्रेरणा मिळाली. कोरा कागज या लोकप्रिय मालिकेव्यतिरिक्त आशा पारेख यांनी निर्मिती केलेल्या छोट्या पडद्यावरील अन्य मालिकांमध्ये ‘बाजे पायल’, ‘दाल में काला’ आणि ‘कुछ पल’ साथ तुम्हारा यांचा समावेश आहे.

गोव्यात 53 व्या इफ्फीमध्ये “इन-कन्वर्सेशन’ या सत्रात अभिनेत्री आशा पारेख आणि सूत्रसंचालक भावना सोमय्या

आशा पारेख यांनी चित्रपट उद्योगाशी संबंधित विविध संस्था आणि संघटनांशी असलेल्या त्यांच्या संबंधांबद्दल सांगितले. 1994 ते 2000 या काळात त्या सिने आर्टिस्ट असोसिएशनच्या अध्यक्ष होत्या. 1998-2001 या काळात  सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सेन्सॉर बोर्ड) च्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या,  त्यांनी सिने आणि टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन (CINTAA) च्या खजिनदार म्हणून देखील काम केले आहे.

आशा पारेख एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शक आणि निर्माती आणि एक कुशल भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहेत. बाल कलाकार म्हणून आपल्या  कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर त्यांनी ‘दिल देके देखो’ चित्रपटातून  मुख्य नायिका म्हणून पदार्पण केले आणि 95 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.  ‘कटी पतंग’, ‘तीसरी मंझिल’, ‘लव्ह इन टोकियो’, ‘आया सावन झूम के’, ‘आन मिलो सजना’, ‘मेरा गाव मेरा देश’ यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

राजकारण म्हणजे मिमिक्री नाही,जॉनी लिव्हर असताना यांना कशाला पाहू -संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

दुसऱ्या नेत्यांचे आवाज किती काळ काढणार ?

मुंबई- राजकारण म्हणजे मिमिक्री नाही, असा खोचक टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसेप्रमुख राज ठाकरेंना लगावला आहे.

तसेच, मिमिक्री पाहायचीच असेल तर आम्ही ओरिजनल जॉनी लिव्हरची मिमिक्री पाहू. तुमची का पाहू, अशी टीका राऊतांनी केली. काल मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. त्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले.राज ठाकरेंना उद्देशून संजय राऊत म्हणाले, केवळ मिमिक्री करून, आमच्यावर टीका करून किती काळ राजकारण करणार आहात. हे आता खूप झाल. तुम्ही आता बऱ्याच वेळापासून राजकारणात आहात. केवळ टीका करण्यापेक्षा राजकारणात काही तरी विधायक काम करून दाखवा. दुसऱ्या नेत्यांचे आवाज किती काळ काढणार. संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला पाहत आहे.

4 दिवस राहुल गांधींसारखे चालून दाखवा

राज ठाकरे यांनी काल भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मिमिक्री करून त्यांच्यावर टीका केली होती. यांचा उल्लेख करून राऊत म्हणाले, भारत जोडो यात्रेसाठी राहुल गांधी प्रचंड कष्ट घेत आहेत. ते जेवढे कष्ट घेत आहेत, तेवढे कष्ट तुम्ही चार दिवस तरी घेऊन दाखवा. तसेच, उद्धव ठाकरे आता बाहेर पडले, असे म्हणणाऱ्यांनी त्यांची नुकतीच झालेली बुलढाण्यातील सभा पाहायला हवी होती. ठाकरेंचे स्वागत करायला संपूर्ण बुलढाणा रस्त्यावर उतरला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यपालांची हकालपट्टी करावी, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. त्यांचा अल्टीमेटम आता संपला आहे. याबाबत राऊत म्हणाले, राज्यपालांविरोधात अ‌ॅक्शन प्लॅन बनवण्याचे काम सुरू आहे. राज्यपालांविरोधात महाविकास आघाडीत एकजूट आहे. उद्धव ठाकरे मविआताल इतर नेत्यांशी बोलून लवकरच याबाबत माहिती देतील.

संजय राऊत म्हणाले, भाजपच्या आराध्य दैवतांकडून महाराष्ट्रातील आराध्य दैवतांचा अपमान होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी हे भाजपचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे शिवरायांच्या अपमानाचा विषय आपण नेहमीच्या राजकारणाने बाजूला करू, असे भाजपला वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. कोणत्याही क्षणी आम्ही राज्यपालांविरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा राऊतांनी दिला

विमानतळावर 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे 7.9 किलो हेरॉईन जप्त

0

मुंबई-आदिस अबाबाहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांकडून काही अंमली पदार्थांची  भारतात तस्करी होत असल्याच्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाला मिळालेल्या (DRI MZU) माहितीच्या आधारे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल विभागाच्या गुप्तचर  अधिकाऱ्यांच्या पथकाने(डीआरआय)पाळत ठेवली होती.

संशयित प्रवाशांना डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाने ओळखले आणि त्यांना रोखून धरत त्यांच्या सामानाची कसून झडती घेतली असता, त्यांच्या ट्रॉली बॅगमध्ये अतिशय चतुराईने लपवून ठेवलेली हलकी तपकिरी पावडर असलेली काही पाकिटे सापडली.या पावडरची चाचणी केल्यावर त्यात हेरॉईन असल्याचे आढळले.

Directorate of Revenue Intelligence, Mumbai Zonal Unit seizes 7.9 kg of Heroin at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport, Mumbai

एकूण 7.9 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. आंतरराष्‍ट्रीय बाजारातील यांची किंमत 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.या  प्रवाशांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

यामागे असलेल्या, अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

फ्रान्सच्या सशस्त्र दलाच्या मंत्र्यांची आयएनएस विक्रांतला भेट

0

नवी दिल्ली-

फ्रान्सच्या सशस्त्र दलाचे मंत्री  सेबॅस्टिन लेकोर्नू यांच्या नेतृत्वाखालील फ्रेंच उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाने आज स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस (INS) विक्रांतला भेट दिली.  या प्रतिनिधीमंडळाने दक्षिणी नौदल  कमांड  फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाईस ॲडमिरल एमए हम्पीहोली यांच्याशी विक्रांत जहाजावर संवाद साधला. फ्रान्सच्या मंत्र्यांनी भारताची स्वदेशी निर्मितीची क्षमता आणि आत्मनिर्भरतेची प्रशंसा केली.  यावेळी परस्पर हिताच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यापासून ते हिंद महासागर क्षेत्रामधली आव्हाने यांसह विविध मुद्यांवर चर्चा झाली. या भेटीमुळे दोन्ही देशांमधील धोरणात्मक द्विपक्षीय संबंध अधिक दृढ व्हायला मदत मिळणार आहे.

इफ्फीच्या भारतीय पॅनोरामा मधील चित्रपट ‘मेजर’ मध्ये 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्यांना आणि एनएसजीच्या विशेष पथकाच्या कमांडोना भावपूर्ण श्रद्धांजली

गोवा/मुंबई, 27 नोव्‍हेंबर 2022

26 नोव्हेंबर 2008. हा दिवस कोणीही भारतीय कधीही विसरू शकत नाही. भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर याच दिवशी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, आणि संपूर्ण देशाला त्यांनी हादरवून टाकले. याच दुर्दैवी दिवशी,  आपल्या देशाच्या नागरिकांचे जीव वाचवतांना, दहशतवाद्यांशी झालेल्या लढाईत, मेजर संदीप उन्नीकृष्णन, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विजय साळसकर यांच्यासह अनेक सुरक्षा रक्षक या लढ्यात शाहिद झाले होते.

सगळा देश ह्या हल्ल्याला 14 वर्षे झाल्याचे स्मरण करत असतांना, शहीद संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावरील हिन्दी चित्रपट 53 व्या इफ्फी मध्ये दाखवण्यात आला. 

देशावर आलेल्या ह्या दु:खद संकटाच्या प्रसंगी दहशतवाद्यांशी लढा देतांना आपल्या जवानांनी आणि पोलिसांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य आणि आपल्या बांधवांना वाचवण्यासाठी त्यांनी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा, या सगळ्याचे प्रभावी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.  तेलुगू दिग्दर्शक शशी किरण टिक्का यांचा ‘मेजर’हा चित्रपट, 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्यांना आणि एनएसजी च्या विशेष पथकाच्या कमांडोना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारा आहे. आज हा चित्रपट इफ्फीच्या भारतीय पॅनोरामा विभागात दाखवण्यात आला.

पत्रसूचना कार्यालयाद्वारे आयोजित इफ्फीच्या ‘टेबल टॉक्स’मध्ये मीडिया आणि प्रतिनिधींशी संवाद साधताना, दिग्दर्शकाने सांगितले की या चित्रपटातून, केवळ जवान संदीपची नाही, तर त्यामागच्या एका उत्तम व्यक्तीची कथा सांगण्याचा त्यांचा मानस आहे. “या चित्रपटासाठी, आम्ही खूप संशोधन, अभ्यास केला. आम्ही राष्ट्रीय सुरक्षा पथकातील तसेच सातव्या बिहार रेजिमेंटच्या संदीपच्या सहकाऱ्यांना भेटलो. संदीप जिथे शिकला त्या शाळेतही आम्ही गेलो, जिथे तो बसायचा तो बेंचही पाहिला. संदीपच्या आयुष्याचे जेवढे पैलू मी उलगडत गेलो, तेवढा मी संदीप या व्यक्तीशी अधिकाधिक जोडला जात गेलो.”

एखाद्या दिग्दर्शकासाठी आणि त्याच्या चमूसाठी, सर्वात कठीण गोष्ट ही होती, की  जिथे आम्ही या चित्रपटाचे चित्रीकरण करत होतो, तिथेच, म्हणजे बंगळुरूमध्ये मेजर संदीप यांचे पालक होते. “आमच्यासाठी तो अत्यंत भावनिक क्षण होता. संदीपचे पालक आमच्या या चित्रपटाचे पहिले प्रेक्षक होते. त्यांची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची होती. हा चित्रपट बघून ते खरोखरच हेलावून गेले होते.”

चित्रपटाचे पटकथा लेखक आणि मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारणारे आदिवी शेष यांनी ही भूमिका आपण का स्वीकारली याचे कारण सांगितले. ते म्हणाले  की मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या चेहऱ्याशी आणि एकूण व्यक्तिमत्वाशी असलेले साधर्म्य हे ही भूमिका स्वीकारण्यामागील एक कारण होते,म्हणूनच, संदीपच्या पालकांनी मला या भूमिका साकारण्यासाठी होकार दिला.

“या महान जवानाला श्रद्धांजली वाहण्याचा यापेक्षा चांगला मार्ग नव्हता. मल्याळम भाषेत डब केलेला सिनेमा व्यावसायिक कारणांऐवजी केवळ संदीपच्या कुटुंबाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी म्हणून करण्यात आला आहे.”

प्रश्नांना उत्तर देताना, आदिवी शेष यांनी स्पष्ट केले की हा चित्रपट 26/11 च्या घटनेवर नाही, तर मेजर संदीपच्या कथेवर आहे, त्याच्या जीवनातील विविध पैलू समोर आणतो.

“आम्ही मेजर संदीपच्या प्रवासावर लक्ष केंद्रित केले, कारण एनएसजी कमांडो हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांनी सहकारी नागरिकांचे प्राण वाचवल्याची खरी कहाणी सांगायची होती. अनेक चित्रपटांनी युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करण्याच्या नादात दहशतवाद्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे; त्यांना काय वाटते ते चर्चा करतात.”

हॉटेल मुंबई सारख्या चित्रपटात, एनएसजीचे लोक हल्ल्याच्या शेवटी येतात, असे दाखवले आहे, त्याच्याशी आम्ही सहमत नाही, असेही दिग्दर्शकानी स्पष्ट केले.

आदिवी शेष यांनी पुढे स्पष्ट केले की मेजर संदीप यांचे बलिदान दाखवून प्रेक्षकांना दुःखी करणे हे त्यांचे उद्दिष्ट नाही, तर आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी, जेव्हा त्यांनी दहशतवाद्यांविरुद्ध देशाचे रक्षण केले तेव्हा त्यांना जाणवलेल्या भावनांचे चित्र जगणे आणि अनुभवणे हे होते.

कथासार:  

मेजर हा मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे, ज्यांनी 2008 मध्ये मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना प्राण गमावले. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) च्या उच्चभ्रू स्पेशल ऍक्शन ग्रुपमध्ये काम केले आणि त्यांचे प्राण वाचवले. ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये झालेल्या हल्ल्यादरम्यान अनेक नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले होते.

या चित्रपटात मुंबईवर झालेला भयंकर दहशतवादी हल्ला आणि दुर्दैवाने या प्रक्रियेत स्वत:चा जीव गमावून त्याने वीरतेने कसे जीव वाचवले हे दाखवले आहे. 

दिग्दर्शक आणि निर्माते यांच्याविषयी

शशी किरण टिक्का हे  एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आहेत, मुख्यतः तेलुगु चित्रपट उद्योगातील. त्याचे दिग्दर्शनातील पदार्पण थ्रिलर गुडचारी (2018) या चित्रपटाद्वारे झाले होते.

सोनी पिक्चर्स इंटरनॅशनल प्रोडक्शन ही सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंटच्या मोशन पिक्चर ग्रुपची स्थानिक-भाषेतील निर्मिती शाखा आहे जी जगभरातील 13 जागतिक प्रदेशांमध्ये दरवर्षी 30 हून अधिक चित्रपट प्रदर्शित करते. 

महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारे शिक्षक व विद्यार्थी निर्माण व्हावेत; मा.खा.राजू शेट्टी यांचे प्रतिपादन

पुणे- स्त्रियांना शिक्षणाची द्वारे खुली करुन देशात शैक्षणिक क्रांती करणारे महात्मा फुले यांना अभिप्रेत असणारे शिक्षक व विद्यार्थी निर्माण व्हावेत. जसा शेतकरी शेतीची मशागत करतो व मग चांगलं पीक येतं, तसे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विचारांची मशागत करावी व चांगला समाज, विद्यार्थ्यांचे भवितव्य व पर्यायाने देश घडवावा असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी जगदीशब्द फाउंडेशन आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात व्यक्त केले.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिक्षक दिन म्हणून जगदीशब्द फाउंडेशन व परिवर्तन सामाजिक संस्था यांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय क्रांतीसुर्य व क्रांतीज्योती पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विशेष उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख, पत्रकार श्रीरंग गायकवाड, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, ज्येष्ठ विधीज्ञ विजय कुरले, साहित्यिक नारायण सुमंत, व्याख्याते जगदीश ओहोळ, परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यातील सर्व जिल्ह्यातून पुरस्कारार्थी निवडण्यात आले होते. शैक्षणिक, सामाजिक, उद्योग, आरोग्य, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश ओहोळ व सूत्रसंचालन जालिंदर राऊत यांनी केले तर आभार महादेव वाघमारे यांनी मानले.

मला वेगळं का टाकतात ? मला काय शिंगे आली कि शेपटी आली ? मनसेच्या वसंत मोरेंची खंत

पुणे- “मी पुण्यात नेतृत्व करतोय आणि यशस्वी नेतृत्व केलंय. कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणाचा विषय असेल तर ज्या लोकप्रतिनिधींनी यशस्वी राजकारण केलंय त्यांचा सल्ला घ्यायचा असतो. परंतु जो विषय झाला त्यात तुम्ही बोलणार आहे का हे विचारलंच गेलं नाही.मला वेगळं का टाकतात ? मला काय शिंगे आली कि शेपटी आली ? असे प्रश्न उपस्थित करत मनसेचे कात्रज येथील नेते,माजी नगरसेवक वसंत मोरेंनी आपली खंत व्यक्त केली आहे. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी हे भाष्य केलं आहे.

मनसे ने गेल्या गुरुवारी एका मेळाव्याचे आयोजन केले होते, यानंतर बोलताना ते म्हणाले,सगळ्यांना विषय दिले, मला एखादा विषय दिला असता तर मी भाषण केलं असतं. मेळावा उशिरा सुरू झाला, त्यात १०-१५ मिनिटं मला भाषण करायला दिली असती तर मी देखील मार्गदर्शन केलं असतं. परंतु असं काही झालं नाही,” असं मनसे नेते वसंत मोरे म्हणाले. मला पक्षात असं वेगळं का टाकतात हे समजत नाही. मी खाली आल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी विचारलं तुम्ही का बोलले नाहीत, असंही ते म्हणाले.”किती तक्रारी करायच्या आणि कोणाकोणाच्या करायच्या? माझं असं काही इंप्रेशन झालंय की मी फक्त तक्रारी करतो. आता मी फक्त सहन करायचं असं ठरवलं आहे. एक दिवस माझ्या विठ्ठलालाही माझ्या यातना कार्यकर्त्यांना माध्यमातून कळतील. त्या साहेबांपर्यंत पोहोचल्याही असतील. हे जे लोक करतायत त्यांनी आत्मपरिक्षण केलं पाहिजे,” असं वसंत मोरे म्हणाले. “या सर्व गोष्टींमध्ये किती वेळा राज ठाकरेंकडे जाणार. आपणच का या गोष्टी बोलू शकत नाही का? केवळ ऑफिसमध्ये बसूनच बोलायचं का? मी सर्व ठिकाणी जातो, माझं पक्षावर, राज ठाकरेंवर प्रेम आहे. १५ वर्ष मी पक्षाच्या तिकिटावर निवडून येतोय. मनसेतून असा एकही लोकप्रतिनिधी झाला नाही. मनसेतून असं का डावललं जातंय, हा माझ्यावर रोष आहे का? पुणे शहरातला पक्षातला मी दहशतवादी आहे का असं वाटतंय. कार्यकर्ते एकमेकांना सांगतात तात्यांकडे जाऊ नको, तुझं तिकीट कट होईल. एक प्रकारची दहशत कार्यकर्त्यांच्या मनात का भरवली जाते हे समजत नाही,” असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली.

१५ वर्षे वयाची लेखिका मोक्षदा चौधरीचे ” द मूसिंग्स ऑफ छिमेरा ” पुस्तकाचे प्रकाशन

पुणे- -पुण्यातील वयाने सर्वात छोटी असलेली लेखिका मोक्षदा चौधरी हीचे बालगंधर्व येथे डेक्कन लिटरेचर फेस्टिवल येथे ” The Musings of Chimera ” ” द मूसिंग्स ऑफ छिमेरा ” पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित सर्व लेखकांच्या हस्ते करण्यात आले. सर्वात लहान वयात अवघ्या १३ व्या वर्षात पुस्तक लिहिण्यास सुरवात केली. आज ती १५ वर्षाची आहे. करोना च्या काळात घरी बसून तिने अनेक विषयांवर पुस्तक लिहिण्यास सुरवात केली. मुलींच्या भावना व विचारांवर आधारित हे पुस्तक आज प्रकाशित करण्यात आले.
रेडिओ जॉकी आर. जे. तरुण ( Radio Jockey R.J.Tarun ) यांनी मोक्षदा चौधरी हीची मुलाखत घेतली. या प्रसंगी लेखिका तेजस्विनी नाईक, उर्मी रुम्मी, लेखक धीरज सिंग उपस्थित होते.
मोक्षदा चौधरी लिखित ” The Musings of Chimera ” या पुस्तकाचे प्रकाशन लेखिका तेजस्विनी नाईक, उर्मी रुम्मी, लेखक धीरज सिंग यांच्या उपस्थितीत करण्यात आले. लेफ्टनंट कर्नल रवी चौधरी यांची कन्या मोक्षदा चौधरी एवढ्या लहान वयात झाली लेखिका व या पुढे ती अनेक विषयांवर लिखाण करणार आहे असे तिने व्यक्त केले. या प्रसंगी तिची आई सिम्पल चौधरी, बहीण आराध्या चौधरी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

सरकारी नोकरीमध्ये रोलबॉल खेळाडूना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

छत व फ्लड लाईट्सची मागणी ताताडीने मंजूर : उद्यापासून लढतींना सुरुवात

पुणे : राज्य आणि राष्ट्रीय रोलबॉल खेळाडूना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून यासाठीच्या योग्य त्या सुचना प्रशासनाला दिल्या असल्याचे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

जिल्हा रोलबॉल मैदानावर भारतीय रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने, महाराष्ट्र रोलबॉल संघटना व जिल्हा रोलबॉल संघटना यांच्यावतीने एक भारत श्रेष्ठ भारत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी रोलबॉल खेळाचे जनक राजू दाभाडे, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचे नोडल अधिकारी लेफ्ट. कर्नल अमरबीर सिंग, काकडे बिल्डर्सचे सुर्यकांत काकडे, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेवक अमोल बालवडकर, लहू बालवडकर, राज्य रोलबॉलचे उपाध्यक्ष अमोल काजळेपाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सध्याच्या घडीला रोलबॉल हा खेळ शासकीय खेळाच्या यादीमध्ये आला असला तरी देखील या खेळाडूना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळालेले नाही. यामुळे अनेक दर्जेदार खेळाडू असून देखील या खेळाडूना इतर खेळाच्या खेलाडूप्रमाणे सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळालेले नाही. मात्र, पालकमंत्री चंद्राकांतदादा पाटील यांनी या खेळातील खेळाडूना नोकरीमध्ये सरकारी आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगून योग्य त्या सुचना प्रशासनाला दिल्या असल्याचे यावेळी सांगितले.

सध्याच्या घडीला हे मैदान खुल्या स्वरूपात आहे. मैदानाला छत बांधण्यासाठी तसेच फ्लड लाईट्स बसविण्यासाठी निधीची मागणी महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्यावतीने करण्यात आली होती. या मागणीला पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देताना मैदनाला छत बांधणी, फ्लड लाईट्स बसविण्यासाठीच्या सुचना स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांना दिल्या. याबरोबरीने मैदानावर कायमस्वरूपी खुर्च्या देखील देण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्य केले. यामुळे मैदानाचे रूप पालटून याला रोलबॉल अंतरराष्ट्रीय मैदानामध्ये रुपांतरीत होवू शकेल.

एक भारत श्रेष्ठ भारत या स्पर्धेचे उद्घाटन आज करण्यात आले. ही स्पर्धा दोन टप्प्यात घेण्यात येणार असून स्पर्धा पहिल्या टप्प्यातील लढती जिल्हा रोलबॉल मैदनावर घेण्यात येणार आहेत. ही स्पर्धा मुले व मुली अशा दोन्ही विभागात होणार असून हिमाचल प्रदेश, केरळ, उत्तराखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश,मणिपूर, नागालँड, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्र व ओडिसा हे संघ सहभागी होणार आहेत. उद्यापासून सर्व संघाच्या लढती सुरु होणार आहेत.

घोरात्कष्टात स्तोत्रपठणातून शेकडो भक्तांचा दत्तचरणी मंत्रघोष

दत्तजयंती उत्सवानिमित्त श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवारतर्फे आयोजन ; मंदिराचे १२५ वे वर्ष  
पुणे : श्रीपाद वल्लभ दिगंबरा….च्या जयघोषाने आणि नर्मदे हर हर… च्या निनादात सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प.पू.वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी रचित घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण पुणे व जिल्ह्यातील शेकडो दत्तभक्तांनी एकत्रितपणे केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त… च्या नामघोषाने लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिराचा परिसर दुमदुमून गेला. त्याचवेळी दत्तचरणी हजारो भाविक मनोभावे नतमस्तक होत होता. 

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवार तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात दत्तजयंती उत्सवाचे शुभारंभानिमित्ताने करण्यात आले होते. मंदिराचे यंदा १२५ वे स्थापना वर्ष आहे. यावेळी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख प.पू.बाबा महाराज तराणेकर (इंदोर), जगत् गुरू श्री तुकारम महाराज संस्थान देहूचे विश्वस्त ह भ प शिवाजी महाराज मोरे तसेच दत्तमंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त डॉ. पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. घोरात्कष्टात मंत्र पठणातून लोकमंगल व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. 

प.पू.बाबा महाराज तराणेकर म्हणाले, दत्त संप्रदायाची मंदिरे देशभरात आहेत. परंतु श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर हे एकमेव मंदिर आहे जिथे दत्त जयंतीची सुरुवात  लोकमंगलवर्धक घोरात्कष्टातच्या सहस्त्र आवर्तनाने होते. घोरात्कष्टातचे स्तोत्रपठण हे केवळ आपल्यासाठी नाही, तर आपल्या आजूबाजूच्या परिसराच्या शुद्धीकरणासाठीची ही दैवी चिकित्सा आहे. घोरात्कष्टात स्तोत्र हे स्वांत:सुखाय नाही, पर्यावरण शुद्धीकारक अशी ही थेरपी आहे.
एखादी संस्था १२५ व्या वर्षात पदार्पण करते हे त्या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. त्या संस्थेचे महात्म्य यशस्वीपणे टिकून ठेवणे हे देखील महत्त्वाचे आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यकारी विश्वस्त ॲड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, घोरात्कष्टात हे लोकमंगल वर्धक स्तोत्र अत्यंत लोकप्रिय असून अनेक दत्तभक्तांच्या नित्य उपासनेत याचा अंतर्भाव असतो. दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्व देवता उपासक एकत्र यावे आणि सामुहिक उपासना व्हावी, याकरीता स्तोत्र पठण करण्यात आले. त्रिपदी परिवार पुणे शाखेचे तेजसदादा तराणेकर, हरी मुस्तीकर, सुभाष कुलकर्णी, श्रीरंग लोंढे यांनी आयोजनात सहकार्य केले. उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे यांनी आभारप्रदर्शन केले.

हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू

0

मुंबई : मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तू याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट येथे हेरिटेज वॉक सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात आज २७ नोव्हेंबर पासून करण्यात येत आहे. हा वॉक आठवड्याच्या शेवटी प्रत्येक शनिवार व रविवार असेल. प्रत्येक हेरिटेज वॉकचा कालावधी जास्तीत जास्त एक तासचा असेल. या टूरची तिकिटे bookmyshow.com वर बुक करता येतील अशी माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त हेरिटेज वॉक सुरु करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला होता. हेरिटेज चाहत्यांसाठी पहिली हेरिटेज टूर २७ नोव्हेंबर २०२२ पासून सुरु करण्यात आला.हा वॉक सकाळी १०, ११ आणि दुपारी १२ वाजून 54 मिनिटांनी करण्यात आला होता.या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त अभ्यासक आणि पर्यटन प्रेमी याचा लाभ घेतील अशी आशा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली.

प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणीसाठी हाफकिन संस्था ही भारतातील सर्वात जुन्या बायोमेडिकल संशोधन संस्थांपैकी एक आहे आणि त्याची स्थापना १८९९ मध्ये झाली. प्लेगच्या लसीचा शोध लावणाऱ्या डॉ. वाल्डेमार माईकाय हाफकिनच्या नावावरून ह्या संस्थेला ‘हाफकिन इन्स्टिटयूट” असे नाव देण्यात आले. सांसर्गिक रोगांच्या विविध पैलूंचे प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी यामध्ये अग्रेसर असलेली एक बहुविद्याशाखीय संस्था म्हणून ही संस्था विकसित झाली आहे. ही संस्था राज्य आणि केंद्रीय सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणांसोबत काम करते. या संस्थेला जागतिक आरोग्य संघटनेने प्लेगसाठी संदर्भ प्रयोगशाळा म्हणून काम करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ.बी.एन.पाटील म्हणाले, “या हेरिटेज टूरचा एकमेव उद्देश लोकांना विज्ञान आणि कला यांची सांगड असलेल्या वास्तूचे दर्शन घडवणे हा आहे. येथे लोकांना संस्थेच्या वैभवकालीन दिवसाचे दर्शन घडविणरे व्हिटेज फोटो गॅलरी तसेच बॉम्बे गव्हर्नर यांचे निवासस्थान असलेल्या स्थापत्यकलेच्या उत्कृष्ट इमारतीचे दर्शन घेता येईल. ह्या संस्थेकडे विविध सूक्ष्मजंतूंच्या प्रतिकृति आहेत तसेच प्लेगची लस कशी विकसित झाली ह्याची प्रतिकृति देखील येथे पहायला मिळेल.”

आर्थिक विषमता देशाच्या विकासाला बाधक-  कुलगुरू डॉ. अजित रानडे

पुणेर:“आर्थिक विषमता देशाच्या विकासाला बाधक आहे. देशातील सर्वसाधारण व्यक्तीना मुख्य प्रवाहात आणून ही विषमता दूर केली जाऊ शकतो. या साठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची खूप मोठी गरज आहे. त्यातूनच ही विषमता दूर होऊ शकते. असे मत पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित २७वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेत ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ या विषयावर आयोजित तिसरे पुष्प गुंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, डॉ. मिलिंद पात्रे, डॉ. अंजली साने व डॉ. शालिनी शर्मा उपस्थित होते.
डॉ. अजित रानडे म्हणाले,“जागतिक स्तरावर पाहता इंग्लंड, जर्मन या सारख्या देशात आर्थिक विषमता दूर झालेली आहे. पण भारतात पाहता आज ही ८२ टक्के लोक हे दारिद्र रेषेखाली जीवन व्यतीत करतांना दिसत आहेत. देशातील २० टक्के श्रीमंत लोक सत्ता चालवितांना दिसत आहे. त्यामुळे अशी विषमता घालविणे गरजेचे असून व्यक्तींचा आर्थिक स्तर उंचाविणे गरजेचे आहे. लोकांना सामाजिक व आर्थिक प्रवाहाच्या मुख्यधारेत आणावयाचे असेल तर गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच एकमेव शस्त्र आहे.”
“राष्ट्रीय उत्पन्नाचा सर्व समाजाला उपयोग होतो. समाजामध्ये वाढत्य विषमतेमुळे अस्थिरता निर्माण होते. परंतू आपला समाज अध्यात्म, मूल्य आणि नैतिकता यामुळे टिकून आहे. राजकीय समानतेमध्ये सर्वांना एक समान मतदानाचा अधिकार आहे. परंतू सामाजिक आणि आर्थिक विषमतेमध्ये अशी समानता दिसून येत नाही. परंतू राष्ट्रीय उत्पन्न वाढले तर समानता येऊ शकेल.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ मानवाने स्वतःचे खरे स्वरूप ओळखण्याचा प्रयत्न करावा. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा काही वैज्ञानिक शब्दांचा उल्लेख आहे. त्याचा अर्थ समझून घेऊन आपले जीवन व्यतीत करावे. वर्तमानकाळात कुटुंब पद्धत ही हळूहळू विस्कळीत होतांना दिसत आहे. त्यासाठी मुलांना आई वडिलांचे प्रेम मिळणे हे अत्यंत महत्वाचे आहे. देह, बुद्धि, आत्मा आणि मनाचे गणित समजून घेणे आवश्यक आहे.”
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात प्रेरणादायी वक्ता डॉ. संजय उपाध्ये व डीआरडीओचे रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंटचे संचालक प्रदिप कुरळकर यांनी आपले विचार मांडले.
प्रदिप कुरळकर म्हणाले,“देशातील प्रगत शस्त्रांमुळेच आज येथील सैनिकांन शारीरिक आणि मानसिक बळ मिळते. या शस्त्रसाठ्यांमुळेच कोणत्याही देशाची वाईट नजर आपल्याकडे वळत नाही. वर्तमान काळात डीआरडीओच्या माध्यमातून आर्मिसाठी वेगवेगळे वेपन्स आणि त्यांना वेगवेगळ्या वातावरणात राहण्यासाठीचे साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. डीआरडीओच्या माध्यमातून आवाजा पेक्षा ६ पट गतिेचे मिसाइल, सॅटेलाइट, सूपर सॉनिक मिसाइल, ब्रह्मास्त्र मिसाइल, आकाश मिसाइल आणि समुद्रापासून केवळ ७ फूट उंचीवरून जाणरे मिसाइल हे आपली शक्ती आहे. यामुळे जगभरात आपला दबदबा असल्याचे ही त्यांनी सांगितले.”
प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस यांनी स्वागत पर भाषण केले.
प्रा. डॉ.पोर्णिमा बागची यांनी सूत्रसंचालन केल. प्रा.डॉ. अंजली साने यांनी आभार मानले.

बिबट्याच्या हल्ल्यातील मृत महिलेच्या वारसांना दहा लाख देण्याचे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

0

मुंबई :  नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा मालीआंबा येथील मोगराबाई रुमा तडवी या महिलेचा १९ नोव्हेंबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. श्रीमती तडवी यांच्या कायदेशीर वारसांना दहा लाख रु. रक्कम लवकरात लवकर द्यावे, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वन विभागास दिले आहेत.

या महिलेच्या कुटुंबियांना वन विभागाकडून दिली जाणारे आर्थिक सहाय्य मिळण्याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा वन अधिकारी यांच्याकडून या प्रकरणाबाबत दूरध्वनीद्वारे सविस्तर माहिती घेतली. सर्व शासकीय स्तरावरील यंत्रणेला आदेशित करुन सर्व प्रक्रिया पूर्ण करुन जिल्हा वन अधिकारी लक्ष्मण पाटील यांना अहवाल प्राप्त करुन पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशित केले.

 या अहवालानुसार जिल्हा वन अधिकारी लक्ष्मण पाटील यांनी श्रीमती मोगराबाई रुमा तडवी यांच्या कायदेशीर वारसांना रू १० लाख तत्काळ मंजूरीचे आदेश पारित केले.

नवीन अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे धडे समाविष्ट करण्याचा निर्णय घेणार – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे :  शाळेतील मुलांना छत्रपती शिवाजी महाराज अवगत व्हावेत, त्यांचे कर्तृत्व समजावे यासाठी नवीन अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे धडे समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊ, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले.

पुणे महानगरपालिका आणि श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्य्राहून किल्ले राजगड येथे सुखरुप परतल्याच्या ३५६ व्या सुटका स्मृतीदिनानिमित्त पुण्यातील लाल महाल येथे लाक्षणिक पालखीचे प्रस्थान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या लाक्षणिक पालखीचा   प्रस्थान शुभारंभ लाल महालातून पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाला महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त माधव जगताप, व्याख्याते डॉ. अजित आपटे, शिवसृष्टी पुणेचे जगदीश कदम, श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव प्रसादे, अध्यक्ष संजय दापोडीकर, सचिव अजित काळे, खजिनदार अनिरुद्ध हळदे, उपाध्यक्ष सुनील बालगुडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, नवीन अभ्यासक्रमात ७० टक्के व्यवसाय नोकरीसाठी ३० टक्के महापुरुषांची चरित्रे, योगा, कला इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थांना छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन व कार्य  कळण्यासाठी १०० गुणांचा पेपर  ठेवण्यात येईल.

छत्रपतींच्या काळातील विहिरी व तटबंदी अजूनही शाबूत असून त्या काळातील बांधकाम किती चांगले होते ते कळते. आग्र्याला ते जेव्हा अटकेमध्ये होते त्यावेळी स्वराज्यावर आर्थिक संकट आले होते.त्यावेळी त्यांनी तेथील सावकारांकडून अष्टप्रधानांकडे पैसे पुरविले होते. ते त्यांनी सुटकेनंतर व्याजासह परत केले. शिवाजी महाराज एक खरे आर्थिकतज्ञ आणि व्यवहारात चाणाक्ष होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्र्याहून सुटकेचा स्मृती सोहळा श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ हे सातत्याने ४२ वर्षापासून करीत आहे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

असे आहे विविध कार्यक्रमांचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज सन १६६६ रोजी किल्ले राजगड येथे पोहोचले. हा दिवस मागील ४१ वर्षांपासून दोन्ही संस्थांतर्फे साजरा करण्यात येतो. यंदा पालखी प्रस्थान सोहळ्याला उत्सवाचे ४२ वे वर्ष आहे. ३ डिसेंबर रोजी राजगड पायथा पाली गाव खंडोबाचा माळ येथे सायंकाळी गड जागरण कार्यक्रम होणार आहे. तसेच राजगडावर पद्मावती माता मंदिर येथे व्याख्याते योगेश पाटील यांचे व्याख्यान होणार आहे. रविवार ४ डिसेंबर रोजी किल्ले राजगड येथे वंशपरंपरेनुसार गडकरी असलेले सूर्यकांत भोसले यांच्या हस्ते सुर्योदयाच्यावेळी ध्वजारोहण होणार आहे. यानंतर सकाळी ९ वाजता पाली दरवाजा ते महाराजांच्या सदरेपर्यंत आणि त्यानंतर पद्मावती माता मंदिर येथे पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

000