Home Blog Page 1516

इलेक्ट्रिक मोटर सायकल उत्पादक टॉर्क मोटर्सच्या आपल्या पहिल्या केंद्राचे पुण्यात उद्घाटन

पुण्याच्या विधी महाविद्यालयाच्या जवळ स्थित हे टच पॉइंट ग्राहकांच्या विक्रीच्यावेळी आणि विक्रीच्या नंतरच्या आवश्यकतांसाठी एकाच ठिकाणी सर्व सेवा देणारे केंद्र (वन स्टॉप शॉप) म्हणून काम करेल.

  हे अनुभव केंद्र चालू केल्यामुळे ग्राहकांना टॉर्क मोटर्स च्या ‘क्रेटोस’ चा संपूर्ण सर्वसमावेशक मालकी अनुभव देण्याच्या टॉर्क मोटर्स च्या लक्ष्याला बळकटी येईल.

पुणे, २९ नोव्हेंबर, २०२२: भारतातील पहिली आणि वेगाने वाढणारी इलेक्ट्रिक मोटर सायकल उत्पादक टॉर्क मोटर्स ने आज भारतात आपले पहिले वहिले अनुभव केंद्र सुरू केले. हे नवीन केंद्र क्रांतिकारी ‘क्रेटोस’च्या एक पेक्षा जास्त चाचणी राइड च्या पर्यायांसह सर्व उपलब्ध रंग प्रदर्शित करेल. पुण्यातील विधी महाविद्यालयाजवळ स्थित हे केंद्र अतुलनीय विक्री आणि विक्रीनंतरच्या अनुभवाच्या वाढत्या आवश्यकतांची पूर्तता करेल.

आमच्या मौल्यवान ग्राहकांनाएक भिन्न मालकीअनुभव देण्याच्या आमच्या ध्येयसाठी हे नवीन केंद्र डिजिटल आणि भौतिक दोन्हीचे उत्कृष्ट एकीकरण प्रदान करेल. हे आधुनिक स्वरूप ग्राहकांसाठी अत्याधुनिक संकल्पना आणि डिझाईनसह, प्रतिभावान कामगारांच्या टीमसह, एक समृद्ध मालकी अनुभव निर्माण करेल.

यावेळी टॉर्क मोटर्स चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सी.इ.ओ) श्री. कपिल शेळके म्हणाले की, आम्ही आमच्या ग्राहकांना पुण्यातील पहिल्या वहिल्या  टॉर्क अनुभव केंद्राची ओळख करून देताना खूप उत्सुक आहोत. पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरातील टॉर्क च्या ग्राहकांना एक अनोखा अनुभव देण्यासाठी या  केंद्राची रचना करण्यात आली आहे. हे शोरूम आपल्या ग्राहकांना समकालीन वैशिष्ट्यांसह डिजिटल आणि भौतिक या दोन्हींच्या परिपूर्ण मिश्रणाचा अनुभव देईल. हे उद्घाटन आमचे धोरणात्मक दृष्टिकोन साध्य करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे; कारण ते व्यवसायाच्या भविष्यासाठी आउटलेट चा एक उत्तम नमूना म्हणून देखील काम करेल. भविष्यात, देशातील ‘क्रेटोस’ची वाढती लोकप्रियता आणि मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही असे अनुभव केंद्र इतर शहरांमध्ये सुद्धा चालू करू.

टॉर्क मोटर्स ने त्यांचे पहिले उत्पादन – ‘‘क्रेटोस’ आणि ‘‘क्रेटोस-आर’या वर्षी जानेवारी मध्ये बाजारात आले. ‘‘क्रेटोस’ची किंमत रू. १,२२,४९९ (आधीच्या शोरूम मध्ये महाराष्ट्रात सबसीडी नंतर) आणि ‘‘‘क्रेटोस-आर’ची किंमत रू. १,३७,४९९  (आधीच्या शोरूम मध्ये महाराष्ट्रात सबसीडी नंतर) आहे. ग्राहक ‘क्रेटोस’ आणि ‘‘क्रेटोस-आर’ आमच्या कंपनी च्या अधिकृत वेबसाइट – www.booking.torkmotors.com  वरून बूक करू शकतात.

सरस्वती देवीने किती शाळा काढल्या? सरस्वती देवीने किती लोकांना शिकवले? शाळांमध्ये सरस्वतीचे पूजन कशासाठी? छगन भुजबळांनी उपस्थित केला पुन्हा प्रश्न (व्हिडीओ)

पुणे- शाळांमध्ये सरस्वतीचे पूजन कशासाठी? पूजा जर करायचीच असेल तर ज्यांनी राज्यक्रांती घडवली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे करा, ज्यांनी सामाजिक क्रांती घडवली त्या महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शाहू महाराज, तसेच ज्यांनी तुम्हाला कायदा दिला त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे करा, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.पुण्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात भुजबळ बोलत होते.भुजबळ पुढे म्हणाले, ‘ज्यांनी १५० वर्षांपूर्वी महिलांच्या शिक्षणाचा पुरस्कार केला त्यांची पूजा करा. कर्मवीर भाऊराव पाटील यांची पूजा करा. आज लाखो लोक शिकून मोठे होत आहेत. अण्णासाहेब कर्वे यांची पूजा करा. देवी सरस्वती कुठून आली? सरस्वती देवीने किती शाळा काढल्या? सरस्वती देवीने किती लोकांना शिकवले? सरस्वतींनी जर शिक्षण दिले असे आपण मानतो तर मग महात्मा फुल्यांना हे पाऊल का उचलावे लागले?, फुल्यांच्या अगोदर शिक्षण सर्व समाजाला का मिळाले नाही? ब्राह्मण समाजातील महिलांनाही का मग शिक्षण मिळत नव्हते?, असे एकावर एक सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केले.

सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. त्यांना आम्ही काही पाहिले नाही. त्यांनी आम्हाला काही शिकवले नाही. त्यांनी ‘तीन टक्के’ लोकांना शिकवले. आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची,’ असा प्रश्न भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईत ‘अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे’तर्फे सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांचा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित केला होता .

भुजबळांच्या या पवित्र्यावर या पूर्वीच फडणवीसांनी भुजबळांना उत्तर दिलेले होते
शाळांमधील सरस्वती देवीचे छायाचित्र कोणत्याही परिस्थितीत हे सरकार हटविणार नाही. महापुरूषांचे फोटो लावा ही मागणी करताना सरस्वतीचे छायाचित्र हटविण्याची मागणी करण्याचे कारण काय, असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छायाचित्र काढण्याची मागणी फेटाळून लावली. सरस्वती ही विद्येची,कलेची देवता आहे. आमच्या संस्कृतीत सरस्वतीचा मान आहे. ज्याला भारतीय संस्कृती,परंपरा मान्य नाहीत, हिंदुत्व मान्य नाही अशीच व्यक्ती असे बोलू शकते. महापुरुषांचे फोटो तर लावलेच पाहिजेत. प्रत्येक शाळेत तर ते लावले जातातच. मात्र आमचे सरकार कोणत्याही परिस्थितीत सरस्वती देवीचे फोटो हटविणार नाही, असे फडणवीस यांनी ठणकावून सांगितले होते .

शिंदे गटात येऊन पश्चाताप ,इथेही काही मोठा सन्मान होत नाही तर उलट सवतीचीच वागणूक

पुणे-: उद्धव ठाकरे गटात आणि इथे‌ काहीच फरक नाही. पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडं इथंही दुर्लक्षच केले जात आहे. त्यामुळे शिंदे गटात येऊन पश्चाताप होत असल्याच्या भावना काही जिल्हाप्रमुख आणि शिवसैनिकांनी खाजगीत बोलून दाखवू लागले आहेत. आम्ही अस्वस्थ असून आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा यांचाही आता वेळ मिळत नाही , आमच्या भागातील कामे सांगायची कोणाला हा प्रश्न आमच्या समोर असून याच काळात पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याची गरज असतानाही त्यांना ताकद दिली जात नाही अशा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.ज्या कारणासाठी आम्ही एकनाथ शिंदेंसोबत आलो तेच इथे घडत असल्याच्या दु:ख, नाराजी पदाधिकारी बोलून दाखवत आहेत.भाजपा आणि फडणवीस यांचे समर्थक यांच्याकडून सवतीचीच वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत .

शिवसेनेच्या नेतृत्वानं अनैसर्गिक युती केली. त्यामुळेच आमदार नाराज होऊन सत्तेतून बाहेर पडल्याचं एकनाथ शिंदेंनी गेल्या ४ महिन्यांत अनेकदा सांगितले आहे. आमदारांना दिली जाणारी अयोग्य वागणूक, मातोश्रीवर सातत्याने होणारा अपमान, स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीशी करावा लागणारा संघर्ष, तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांकडून मिळणारा अपुरा निधी अशी समस्यांची यादी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांनी अनेकदा वाचून दाखवली. शिंदे-फडणवीस सरकारला ४ महिने झाले आहेत. आता शिंदे गटातील नाराजीच्या चर्चा समोर येऊ लागल्या आहेत.

शिंदे सरकारवर पकड बसवण्याचा प्रयत्न करत असताना प्रत्येक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या गटातून शिंदे गटात प्रवेशाचा धुमधडाका सुरु झाला आणि बघता बघता हजारो शिवसैनिक एकनाथ शिंदेंचा जयजयकार करत शिंदेंच्या गोटात सामील झाले. हे सगळे होत असताना शिंदे आणि फडणवीस यांच्यात खलबतं होऊन खाते वाटपदेखील झाले. इच्छा असणाऱ्यांना इच्छेप्रमाणे खातं मिळालं, तर काही आमदारांना आश्वासन मिळाले. सरकारचे ४ महिने उलटलेत. मात्र आता इनकमींग करुन शिंदे गटात आलेले शिवसैनिक अस्वस्थ असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

सत्तेत असूनही पदाधिकाऱ्यांची कामे होत नाहीत. भागांना निधी मिळत नाही अशा तक्रारी आता शिंदे गटाचे पदाधिकारी करत आहेत. यामुळे आता एकनाथ शिंदे गटाला मोठं भगदाड पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काही दिवसात आम्ही सगळे मिळून निर्णय घेण्याच्या मनस्थितीत असल्याच्या भावना पदाधिकारी यांनी खाजगीत बोलून दाखवल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील नेतृत्वाने वेळीच पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास एकनाथ शिंदे गट फुटण्याची आणि शिंदे गटात भूकंप होऊ शकतो.

‘डाऊन सिंड्रोम’ असलेले लोक हे देवदूत असतात, त्यांच्या आयुष्याविषयी अनेक सुंदर कथा असतात, त्या ऐकल्या पाहिजेत: दिग्दर्शक पायम इस्कंदरी

‘नर्गिसी’ या डाऊन सिंड्रोम असलेल्या व्यक्तीच्या संघर्षावरील इराणी चित्रपटाने 53 व्या इफ्फीमध्ये जिंकला आयसीएफटी -युनेस्कोचा गांधी पदक पुरस्कार

गोवा/मुंबई, 28 नोव्‍हेंबर 2022

दिग्दर्शक पायम एस्कंदरी यांचा इराणी चित्रपट ‘नर्गिसी’ने 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  आयसीएफटी -यूनेस्कोचे गांधी पदक जिंकले आहे, महात्मा गांधींच्या शांतता, सहिष्णुता आणि अहिंसेचे आदर्श प्रतिबिंबित करणाऱ्या या चित्रपटाची यासाठी निवड करण्यात आली आहे.

डाऊन सिंड्रोम असलेल्या एका व्यक्तीची आणि त्यामुळे त्याच्या जीवनात निर्माण झालेले ओझे आणि त्याचे परिणाम याची कथा या चित्रपटात आहे. करुणा आणि मार्दव हे दोन गुण या पुरस्कार विजेत्या चित्रपटात दाखवले आहेत.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल दिग्दर्शक पायम एस्कंदरी यांनी एका आभासी संदेशाद्वारे, इफ्फीच्या ज्यूरी सदस्यांचे आभार मानले. “हा पुरस्कार मिळणे म्हणजे मोठा सन्मान आहे. हा चित्रपट मी निर्माण करुन शकेन, असा विश्वास ज्यांनी माझ्यावर ठेवला, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. विशेषतः माझे कुटुंब- माझी प्रिय पत्नी आणि ‘नर्गिसी’या चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांना धन्यवाद!”

डाऊन सिंड्रोम हा आजार असलेले लोक, देवदूत असतात, असा मला विश्वास आहे. त्यांच्याकडे सांगण्यासारख्या अनेक कथा असतात, त्या कथा आपण ऐकल्या पाहिजेत, असे ते पुढे म्हणाले.

यावर्षी, जगभरातल्या नऊ चित्रपटांची, आयसीएफटी -यूनेस्कोचे गांधी पदक पुरस्कार स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. या स्पर्धेत असलेले चित्रपट खालीलप्रमाणे:

  • दोन बहिणींची कथा (बांगलादेश | २०२२)
  • भाग्य (ताजिकिस्तान | 2022)
  • आई (बल्गेरिया | 2022)
  • नानू कुसुमा (भारत | २०२२)
  • नर्गिसी (इराण | २०२१)
  • पालोमा (ब्राझील, पोर्तुगाल | 2022)
  • सौदी वेल्लाक्का (भारत | २०२२)
  • द काश्मीर फाइल्स (भारत | 2021)
  • व्हाईट डॉग (कॅनडा | २०२२)

दरवर्षी इफ्फी, आयसीएफटी पॅरिस आणि युनेस्को एकत्र येऊन एका चित्रपटाला गांधी पदक देतात. आयसीएफटी-युनेस्को गांधी पुरस्कारासाठी स्पर्धा करणारे चित्रपट प्रथम इफ्फी मध्ये प्रदर्शित केले जातात आणि नंतर, आयसीएफटी ज्युरी युनेस्कोच्या आदर्शांवर आधारित चित्रपटांचे मूल्यांकन करते.

1994 साली, युनेस्कोने महात्मा गांधींच्या 125 व्या जयंतीनिमित्त हे गांधी स्मृति पदक जाहीर केले. तेव्हापासून दरवर्षी ICFT UNESCO गांधी पुरस्कार महात्मा गांधींच्या शांतता, सहिष्णुता आणि अहिंसेचे आदर्श प्रतिबिंबित करणाऱ्या चित्रपटाला दिला जातो.

चित्रपटाबद्दल: नर्गिसी

इराण | 2021 | पर्शियन | 84 मिनिटे | रंगीत

कलाकार आणि तंत्रज्ञ :

दिग्दर्शक आणि पटकथा लेखक: पायम इसकंदरी

निर्माता: शहाब होसेनी

डीओपी: मोहम्मद नामदार

कलाकार: हुसेन इसकंदरी, शहाब होसेनी, गझल नजर

कथासार :

या चित्रपटात डाऊन सिंड्रोम असलेल्या माणसाच्या आयुष्यातील संघर्षाचे चित्रण केले आहे. त्याची  ज्याची सर्वात मोठी इच्छा स्वत:साठी प्रेम शोधणे आणि लग्न करणे ही आहे. त्या शोधात तो काहीही करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, दुर्दैवाने, त्याला असे दिसते की सध्याच्या व्यवहारी जगात त्याला आणि त्याच्या प्रेमाला काहीही स्थान नाही. मात्र, एका भेटवस्तूने, त्याचे निराश आयुष्य पूर्णपणे बदलून जाते.

दिग्दर्शकाविषयी :

पायम एस्कंदरी हे एक तरुण इराणी दिग्दर्शक आहेत.  त्यांच्या ‘ नर्गिसी’, ‘द गुड, द बॅड, द कॉर्नी’ (2017) आणि ‘मोहे’ (2016) या चित्रपटांसाठी ते ओळखले जातात. त्यांची  अभिनेता आणि लेखक अशीही त्यांची ओळख आहे. 

विजय दिन- 16 डिसेंबर 2022 रोजी लष्कराकडून विजय दौड 22 चे आयोजन

पुणे आणि इतर 15 मुख्य शहरांमध्ये एकाच वेळी दौड सुरू होणार

पुणे –

पाकिस्तानवर 1971 च्या युद्धात मिळवलेला ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी लष्कराच्या दक्षिण कमांड मुख्यालयाने 16 डिसेंबर 2022 या विजय दिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवशी सदर्न स्टार विजय दौड -22 ही धावस्पर्धी आयोजित केली आहे. दक्षिण कमांडच्या अखत्यारीत येणाऱ्या पुणे तसंच इतर पंधरा प्रमुख शहरांमध्ये या धावस्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला जाईल. ‘सैनिकांसाठी धावा – सैनिकांबरोबर धावा” या संकल्पनेवर आधारित असलेले हे भव्य आयोजन भारतीय लष्कर आणि जनता, खास करून युवावर्ग यांच्यामधील धागा दृढ करण्यासाठी आहे. शहीदांना आदरांजली वाहण्यासोबतच विजय दौड-22 मधील सहभागी आपल्या देशातील धैर्य, क्षमता आणि उत्साहाचे दर्शन घडवतील. देशसेवेसाठी सर्वोच्च त्याग केलेल्या शूर सैनिकांना आदरांजली देण्यासाठी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. एकाच वेळी विविध ठिकाणी म्हणजेच पुणे, सिकंदराबाद, चेन्नई, बंगळुरू, जोधपुर, जैसलमेर आणि इतर मुख्य शहरांमध्ये एकाच वेळी होत असलेल्या या कार्यक्रमाला समाजातील सर्व  स्तरातील जनतेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण आहे. या समारंभात शहिदांना पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर सर्व निवडक ठिकाणी विजय दौड-22 ला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं जाईल.

पुणे येथे 16 डिसेंबर 2022 रोजी विजय दौड 22 ला आरंभ होईल.  दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल ए.के. सिंग (अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक) हे सकाळी सात वाजता दक्षिण कमांड युद्ध स्मृती स्थळी पुष्पचक्र अर्पण करण्याचा कार्यक्रम करतील. त्यानंतर विजय दौड 2022 ला पुणे येथे हिरवा झेंडा दाखवून रवाना केले जाईल. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपासून समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांनी यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन भारतीय लष्कराने केले आहे. राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट आणि इतर सर्व लोकांनी विजय दौड 2022 मध्ये सहभागी होऊन विजय दिन 2022 च्या विजय सोहळ्याचा भाग व्हावे असे आवाहन लष्कराने केले आहे.

विजय दौड- २२ ही ३ श्रेणीमध्ये घेतली जाणार आहे, त्यापैकी पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळी 12.5 किलोमीटर दौड असेल तर शालेय विद्यार्थ्यांसाठी 5 किलोमीटरची दौंड आणि फक्त महिलांसाठी असलेली 4 किलोमीटरचे दौड अशा तीन श्रेणीमध्ये विजय दौड 22 चे आयोजन केले आहे. 12.5 किलोमीटरच्या श्रेणीसाठी एकूण 50 हजार रुपये तर शालेय विद्यार्थी तसेच महिलांसाठी असलेल्या श्रेणीसाठी प्रत्येकी 22 हजार रुपये अशी बक्षिसांची रक्कम असेल.

पुणे येथे होणाऱ्या दौड मध्ये भाग घेण्यासाठी विनामूल्य ऑनलाईन नोंदणी www.runbuddies.club   या संकेतस्थळावर करता येईल. नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 10 डिसेंबर 2022 आहे. सदर्न स्टार विजय दौड-22 मध्ये सर्व नागरिकांचा मनापासून आणि उत्साहाने घेतलेला सहभाग हा त्यांचा देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्र उभारणीप्रती बांधिलकी यांचे दर्शन घडवून जाईल.

दक्षिणात्य मेगास्टार चिरंजीवी यांना 53 व्या इफ्फीच्या सांगता समारंभात ‘भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय चेहरा-2022’ चा पुरस्कार प्रदान

गोवा/मुंबई-

दक्षिणात्य तेलगु चित्रपटसृष्टी-टॉलिवूडचे मेगास्टार, पद्मभूषण चिरंजीवी म्हणून प्रसिद्ध असलेले,  कोनिडेला शिव शंकरा वारा प्रसाद यांना आज गोव्यातील 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोप समारंभात ‘भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय चेहरा-2022’ चा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मला हा पुरस्कार दिल्याबद्दल मी, इफ्फी आणि भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे, अशा भावना चिरंजीवी यांनी यावेळी व्यक्त केल्या. “चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी माझं नाव, कोनिडेला शिव शंकर वारा प्रसाद असं होतं, तेलुगु  चित्रपट सृष्टीत, ‘चिरंजीवी’ म्हणून माझा पुनर्जन्म झाला. आणि आता माझी कीर्ती, माझे नाव, करिश्मा, सर्व माझ्या चाहत्यांचे अनमोल प्रेम आणि आपुलकी हे सगळं मला तुमच्याकडून मिळालं. कोनिडेला शिव शंकर वरा प्रसाद म्हणून मला जन्म देणार्‍या माझ्या आई-वडिलांचा आणि चिरंजीवी म्हणून मला जन्म देणार्‍या चित्रपटसृष्टीचा मी कायम आभारी असेन. या इंडस्ट्रीचा मी आयुष्यभर ऋणी आहे.” असे ते म्हणाले.

हा सन्मान स्वीकारतांना चिरंजीवी यांनी, राजकारणातून परत चित्रपटसृष्टीत आल्यानंतर तेवढेच प्रेम देणाऱ्या आपल्या चाहत्यांचेही आभार मानले. “मला मिळालेलं प्रेम आणि आपुलकी, शब्दातीत आहे. मी या चित्रपट सृष्टीत, 45 वर्षांपासून आहे, आणि त्यापैकी एक दशक, मी राजकारणात होतो,त्यानंतर मी जेव्हा परत चित्रपटांकडे वळलो तेव्हा मला जरा शंका होती की प्रेक्षक मला कसे स्वीकरतील. मला पूर्वीसारखंच प्रेम आणि आपुलकी मिळेल का? मात्र, लोकांचं माझ्यावरचं प्रेम आणि आपुलकी जराही कमी झाली नव्हती. ती व्दिगुणित झाली होती. त्यांच्या हृदयात असलेलं माझं स्थान अढळ होतं. मी तुम्हाला वचन देतो, की माझ्या या भावना कधीही बदलणार नाहीत, मी कायम इथे तुमच्यासोबत असेन.” असे ते पुढे म्हणाले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर चिरंजीवी यांनी सरकार आणि चित्रपट उद्योगाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल तसेच, आयुष्यभर शिदोरी म्हणून उपयुक्त ठरेल असा अनुभव दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ‘मी तुमच्यासमोर नतमस्तक आहे . मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि सर्वांना हेच सांगेन, की चित्रपटसृष्टीत येण्याची कोणाला इच्छा असेल तर कृपया या, हा कमी भ्रष्टाचार असलेला व्यवसाय आहे, तुम्हाला इथे आल्याचा पश्चात्ताप होणार नाही, तुमच्यात प्रतिभा असेल तर तुमची कीर्ती गगनाला भिडेल’, असा सल्ला त्यांनी दिला.

चार दशकांहून अधिक काळाच्या यशस्वी चित्रपट कारकिर्दीत, चिरंजीवी यांनी तेलुगूमधील 150 हून अधिक चित्रपटांमध्ये तसेच हिंदी, तमिळ आणि कन्नडमधील काही चित्रपटांमध्ये काम केले.

गोव्यात झालेल्या 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट पुरस्कार-इफ्फीची शानदार सोहळ्याने सांगता

गोवा/मुंबई, 28 नोव्‍हेंबर 2022

गेले नऊ दिवस देशविदेशातील चित्रपट रसिकांना अनेक दर्जेदार आणि विविधांगी चित्रपटांची मेजवानी देणाऱ्या 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट पुरस्कार-इफ्फीची आज गोव्यात पणजी इथे, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोर स्टेडियमवर झालेल्या शानदार सोहळ्याने सांगता झाली. या कार्यक्रमाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, राज्यमंत्री एल. मुरुगन यांच्यासह, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि चित्रपट क्षेत्रातले नामवंत कलाकार उपस्थित होते. सर्जनशिलतेचा तरल अनुभव देणाऱ्या या महोत्सवातल्या सिनेमांपैकी, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कोणी बाजी मारली याची उत्सुकताही आता संपुष्टात आली आहे. पुरस्कारासाठी परीक्षकांनी केलेली निवड म्हणजे केवळ कलेचा सन्मान नाही, तर ही निवड आपल्या सगळ्यांसाठी निश्चितच प्रेरणा देखील आहे.

“प्रादेशिक चित्रपट आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहचले आहेत.  चित्रपटांमध्ये सशक्त आशय असेल तर, ते सहजपणे सर्वदूर पोहचतात आणि त्यांचं भरपूर कौतुकही होतं,” असं माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले. या चित्रपट महोत्सवात विविध भाषांमधले उत्तमोत्तम चित्रपट दाखवण्यात आले. त्यामुळे या विविधांगी कलेच्या क्षेत्रातल्या प्रतिभाशाली व्यक्तींच्या कलेचा अविष्कार आपल्याला अनुभवता आला. भारत आज तंत्रज्ञानाचे केंद्र बनले आहे, या  उच्च तंत्रज्ञानाच्या आधारावर भारतीय चित्रपटांना जगभरात पोहचवण्यासाठी पुढेही प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही अनुराग ठाकूर यांनी यावेळी दिली.

”आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ या स्पॅनिश चित्रपटाला 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयुर पुरस्कार

यंदाच्या 53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात / इफ्फीमध्ये टेंगो सुएनोस इलेक्ट्रिकोस /’आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ या स्पॅनिश चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा प्रतिष्ठित सूवर्ण मयुर पुरस्कार जाहीर झाला आहे. या चित्रपटातून सिने जगताच्या वर्तमान आणि भविष्याचं प्रतिबींद पडद्यावर उमटलेलं दिसतं असं मत परीक्षकांनी व्यक्त केलं आहे. या सिनेमातून दिग्दर्शकानं इव्हा या 13 वर्षांच्या मुलीच्या प्रौढावस्थेत जाण्याचा प्रवास मांडला आहे. पडद्यावर मांडलेला हा प्रवास म्हणजे निव्वळ वय वाढण्याची प्रक्रिया नाही, तर तो बदलांच्यादृष्टीनं अत्यंत तपशीलवार मांडला असल्यानं, चित्रपटातली अनेक दृश्य पाहतांना प्रेक्षकांच्या मनालाही चटका लावून जातात असंही परीक्षकांनी म्हटलं आहे. या चित्रपटातून मानवी जीवनातली गुंतागुंत अत्यंत प्रामाणिकपणे साकारली असून, हिंसा आणि चैतन्य, भिती आणि जवळीक या भावना एकसमान वाटू लागतात, या सिनेमातूेन मानवी जीवनाचे पैलू इतक्या तरलतेनं मांडले आहेत, की त्यामुळे हा सिनेमा पाहताना आम्हाला स्वतःलाही अनेकदा कंप फुटल्याचा अनुभव आल्याचंही परीक्षकांनी म्हटलं आहे.

हा चित्रपट, जो लोकांना जगाच्या दुसर्‍या बाजूच्या कथांसह ओळखण्यात मदत करू शकतो आणि त्याच वेळी कौटुंबिक मूल्ये किंवा सार्वत्रिक असलेल्या भावनांशी जोडू शकतो, बेनोइट रोलँड आणि ग्रेगोअर डेबॅली यांनी निर्मित केला आहे.

इराणमधल्या प्रतिगामी सामाजिक-राजकीय व्यवस्थेचं जादुई आणि मार्मिक चित्रण असलेल्या ‘नो एंड’ या चित्रपटासाठी इराणचे प्रख्यात लेखक दिग्दर्शक  इराणी लेखक आणि दिग्दर्शक नादेर साईवार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार

नो एंड / बाई पायन हा तुर्कीश सिनेमा असून यात इराणच्या गुप्त पोलिसांकडून केली जाणारी हेराफेरी आणि कारस्थानांचं दिग्दर्शक नादेर सैवर यांनी प्रभावी चित्रण केलं आहे. या सर्जनशीलतेनंच त्यांना 53व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार मिळवून दिला आहे. नादेर यांनी या चित्रपटातून अयाज या शांत संयमी आणि प्रामाणिक व्यक्तीची कथा मांडली आहे. काही एका कारणामुळे आपलं घर सुरक्षित राखण्याच्या आर्जवी प्रयत्नातून गुप्त पोलीसांसमोर खोटी कथा रचतो. मात्र प्रत्यक्षात जेव्हा या सगळ्या प्रकरणात खऱ्या गुप्त पोलीसांचा प्रवेश होतो, तेव्हा कथेतली गुंतागुंत अधिक वाढत जाते. या चित्रपटासाठी नादेर यांना पुरस्कार जाहीर करताना सर्व परीक्षकांचं एकमत होतं ही बाब परीक्षकांनी आवर्जून नमूद केली. इराणमधल्या घटनाचं संदर्भानं मांडलेल्या या कथानकातून प्रतिगामी सामाजिक-राजकीय व्यवस्थेचं दिग्दर्शक नादेर यांनी अंत्यत जादुई आणि मार्मिक चित्रण केलं आहे, हा सिनेमा तसा संथ असला तरी डोळ्यात अंजन घालणारा आणि संवेदनशील असल्याचं मतही परीक्षकांनी व्यक्त केलं आहे.

नो एंड या चित्रपटातील  मुख्य अभिनेता वाहिद मोबस्सेरी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार, रौप्य मयुर पुरस्कारानं भावनांच्या गुंतागुंतीतून यातनांच्या गर्तेत सापडलेल्या नायकाचं पात्र जिवंत करणाऱ्या अभिनयाचा गौरव.

नादेर साईवार दिग्दर्शित नो एंड या सिनेमातलं मुख्य पात्र साकारणाऱ्या वाहिद मोबस्सेरी यांची परीक्षकांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा रौप्य मयूर पुरस्कारासाठी एकमतानं निवड केली. या चित्रपटातल्या अयाज या मूख्य पात्राची, भावनांच्या गुंतागुंतीतून यातनांच्या गर्तेत सापडलेल्या नायकाची भूमिका साकारताना, त्या नायकाचे विविध पैलू, नायकात घडणारं स्थित्यंतर कोणत्याही शब्दांशिवाय केवळ आपला चेहरा आणि देहबोलीतून साकारलं आहे असं कोतुकास्पद निरीक्षण परीक्षकांनी नोंदवलं आहे. ही भूमिका साकारताना वाहिद यांनी उभ्या केलेल्या पात्रातून सामान्य माणसानं निषेध नोंदवण्याचा केलेला प्रयत्न प्रेक्षकांच्या मनात रुजतो, हताश, असुरक्षिततेनं ग्रासलेला सामान्य इराणी माणूस त्यांच्यासमोर उभा राहतो असं मतही परीक्षकांनी नोंदवलं आहे.

‘आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ या सर्वोत्कृष्ट चित्रपटाची मुख्य अभिनेत्री डॅनिएला मारिन नवारो सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या रौप्य मयूर (सिल्व्हर पिकॉक) पुरस्काराने सन्मानित

डॅनिएला मारिन नवारो या 19 वर्षांच्या युवा अभिनेत्रीची, आपल्या पदार्पणातच, स्पॅनिश चित्रपट, ‘’आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम्स’ मधल्या 16 वर्षांच्या मुलीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या रौप्य मयूर (सिल्व्हर पिकॉक) पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तिच्या प्रशस्तीपत्रावर, ज्यूरी सदस्यांनी लिहिले आहे,की या पुरस्कारासाठी डॅनिएलाची निवड करण्यात आली कारण, तिच्या अभिनयातील सहजता, ताजेपणा आणि विश्वासार्हता, यामुळे,तिने ही व्यक्तिरेखा जिवंत केली आहे. तिच्या अनवट किशोरवयात असलेलं नैसर्गिक अबोधपण, या भूमिकेत उतरलं आहे.”

विशेष म्हणजे, याच चित्रपटातील भूमिकेसाठी डॅनिएला ला लोकार्नो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.

फिलिपिनो चित्रपट निर्माते लव्ह डियाझ यांना व्हेन द वेव्हज आर गॉन / (Kapag wala nang mga alon) साठी विशेष ज्युरी पुरस्कार

53 व्या इफ्फीमध्ये स्पेशल ज्युरी पुरस्कार, “व्हेन द वेव्हज गॉन” या फिलिपिनो चित्रपटाचे निर्माते लव्ह डियाझ यांना मिळाला आहे. त्यांच्या प्रशस्तीपत्रावर, चित्रपटाचे वैशिष्ट्य लिहितांना ज्यूरी सदस्यांनी म्हटलं आहे- “हा चित्रपट, केवळ दृश्य माध्यमातून प्रत्यक्ष कथा सांगण्याच्या ताकदीची प्रभावी प्रचिती देतो. यात कमीतकमी शब्द आहेत, तरीही, क्रोधासारखी भावनाही अत्यंत परिणामकारक रित्या अभिव्यक्त झाली आहे.”

हा चित्रपट फिलीपिन्समधील एका शोधकर्त्याची कथा आहे, जो स्वतःच नैतिक-अनैतिकच्या खोल विवरात अडकला आहे. हा शोधकर्ता, स्वतःची अस्वस्थता आणि अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो.  मात्र, त्याच्या गडद भूतकाळाची सावली त्याच्यावर पडली आहे, जी त्याला त्रास देत आहे. लव्ह डायझ हे ‘सिनेमॅटिक टाइम’चे स्वतःचे स्वरूप विकसित करण्यासाठी ओळखले जातात.

बिहाइंड द हेस्टॅक्स’ साठी असिमिना प्रोड्रू यांना सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाचा पुरस्कार

इफ्फीने अथेन्सच्या दिग्दर्शक असिमिना प्रोड्रू यांना ‘बिहाइंड द हेस्टॅक्स’ या चित्रपटासाठी सर्वोत्तम पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकाचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. या महोत्सवात या चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय प्रिमियर झाला होता. हा चित्रपट म्हणजे अनावश्यक नैतिकतेच्या तीव्र मानसशास्त्रीय दृष्टीकोनावरील एक शोधनिबंध आहे, वांशिक निर्वासितांच्या समस्येविषयी असलेला तिटकारा आणि पौगंडावस्थेतील सजगता याकडे लक्ष वेधणारा आहे, असे मत परीक्षकांनी व्यक्त केले. एक माणूस, त्याची पत्नी आणि त्याची मुलगी यांना पहिल्यांदाच एका समस्येला तोंड द्यावे लागत आहे आणि त्या दरम्यान त्यांच्या प्रत्येक कृतीची किंमत त्यांना मोजावी लागत आहे. त्यांच्या या प्रवासाकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधणारे कथानक या चित्रपटात आहे.   

प्रवीण कांड्रेगुला यांना  ‘’सिनेमाबंदी’ ‘ या तेलुगु  चित्रपटासाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार

दिग्दर्शक, लेखक आणि सिनेमॅटोग्राफर प्रवीण कांड्रेगुला यांना बंदी या चित्रपटासाठी परीक्षकांच्या विशेष उल्लेखनीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे ज्यामध्ये एका अतिशय गरीब आणि जगण्याचा संघर्ष करणाऱ्या रिक्षा चालकाची कथा आहे. ज्या रिक्षा चालकाला एक अतिशय महागडा कॅमेरा बेवारस स्थितीत सापडतो, जो त्याला रिक्षा चालकापासून चित्रपट निर्माता बनण्याच्या प्रवासाकडे घेऊन जातो. भारतामध्ये चित्रपटाविषयी असलेलं कमालीचं वेड आणि आकांक्षांची कहाणी हा चित्रपट सांगत असल्याचं परीक्षकांचं मत आहे.  

सर्वोत्तम भारतीय आणि जागतिक चित्रपटाची निवड करण्याचे  आव्हान ज्युरींनी  पेलले

या चित्रमय पर्वणीचा आस्वाद घेण्याचे आणि त्यातून सर्वोत्तम भारतीय आणि जागतिक चित्रपटाची निवड करण्याचे आव्हान कोणी पेलले? आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी असलेल्या परीक्षक मंडळाचे नेतृत्व इस्राएली लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक नादाव लॅपिड यांनी केले आहे तर या परीक्षकांमध्ये अमेरिकन निर्माते जिंको गोटोह, फ्रेंच चित्रपट संकलक पास्कल शेवान्स, फ्रेंच माहितीपट निर्माते, चित्रपट समीक्षक आणि पत्रकार झेवियर अँग्युलो बार्टुरेन आणि भारतीय चित्रपट दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचा समावेश होता .

अभिनेते चिरंजीवी यांना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द ईयर पुरस्कार प्रदान

अभिनेते चिरंजीवी यांना इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द ईयर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. काही सन्मान माझ्यासाठी विशेष मौल्यवान आहेत, मला हा पुरस्कार दिल्याबद्दल इफ्फी आणि भारत सरकारचे आभार मानतो असे  चिरंजीवी  यांनी सांगितले.चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी माझं नाव, कोनिडेला शिव शंकर वारा प्रसाद असं होतं, चित्रपट सृष्टीत, ‘चिरंजीवी’ म्हणून माझा पुनर्जन्म झाला. आणि आता माझी कीर्ती, माझे नाव, करिश्मा, सर्व माझ्या चाहत्यांचे अनमोल प्रेम आणि आपुलकी हे सगळं मला तुमच्याकडून मिळालं. कोनिडेला शिव शंकर वरा प्रसाद म्हणून मला जन्म देणार्‍या माझ्या आई-वडिलांचा आणि चिरंजीवी म्हणून मला जन्म देणार्‍या चित्रपटसृष्टीचा मी आयुष्यभर ऋणी आहे असे  चिरंजीवी  यांनी सांगितले.  

‘फाऊदा’ या वेब मालिकेचे निर्माते- लिओर राझ आणि अॅव्ही इसाशेरॉफ हे देखील इफ्फीच्या सांगता सोहळ्याला उपस्थित होते. 53व्या इफ्फीमध्ये काल रविवारी फाऊदा या वेब मालिकेच्या चौथ्या पर्वाचा प्रिमिअर होणं हा एक मोठा सन्मान असल्याची भावना अॅव्ही इसाशेरॉफ यांनी व्यक्त केली. तर भारतातील लोकांसोबत आपलं वेगळं नातं जोडलं गेलं आहे, ‘फाऊदा’ ही आपली बेव मालिकेला भारतात मोठा प्रेक्षक आणि त्यांचं प्रेमही लाभलं ही गोष्ट भारावून टाकणारी आहे अशी भावना लिओर राझ यांनी बोलून दाखवली.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून चार महिन्यात १ हजार ०६२ रुग्णांना ६ कोटी ४० लाखांची मदत

0

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आर्थिक मदतीसाठी मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने व्हावी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई, दि. २८: वैद्यकीय उपचारासाठी गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्यात येणारी आर्थिक मदत तातडीने उपलब्ध होण्यासाठी मंजुरीची प्रक्रिया जलदगतीने करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या कार्यालयास मुख्यमंत्र्यांनी दुपारच्या सुमारस अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी कार्यालयात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधत नक्कीच मदत मिळेल, अशी ग्वाही देत त्यांना दिलासा दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.

नियोजीत बैठका आटोपून मुख्यमंत्री श्री. शिंदे दुपारी तीनच्या सुमारास अचानक मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर आले. त्यांनी याठिकाणी मुख्यमंत्री डॅशबोर्डसाठी असलेल्या कार्यालयाची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधीच्या कार्यलायाकडे आले. त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आर्थिक मदतीच्या प्रकरणांना किती दिवसात मंजुरी मिळते, मंजुरीचा कालावधी आदीबाबत त्यांनी माहिती घेतली.

राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मदत पोहचवण्यासाठी प्रयत्न करा, रुग्णांच्या नातेवाईकांच्या समस्या सोडविण्याकरिता त्याच्या समन्वयासाठी विशेष कर्मचाऱ्याची नेमणूक करा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा देताना उपचारासाठी मदत नक्की मिळेल, काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून अवघ्या चार महिन्यात १ हजार ०६२ रुग्णांना ६ कोटी ४० लाखांची मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या देखरेखीखाली या कक्षाच्या कामाच्या पद्धतीत, मदतीचे निकष यात अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या माध्यमातून कक्षाचे काम अधिक लोकाभिमुख करण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करत गरजूंना मदतीसाठी अर्ज करणे सोपे व्हावे यासाठी mahacmmrf.com हे संकेत स्थळ सुरु करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री सहायता निधीच्या निकषात यापूर्वी समावेश नसलेल्या अनेक खर्चिक आजारांचा समावेश करण्यात आला आहे. यात फुफ्फुसाची शस्त्रक्रिया, गुडघे बदल, खुबा बदल शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. तसेच अपघातामधील रुग्णांनाही या योजनेतून आर्थिक मदत दिली जाणार आहे.

महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय ‘शिल्प’ पुरस्कार प्रदान

0

नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय ‘शिल्प’ पुरस्काराने केंद्रीय वस्त्र मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले.

येथील विज्ञान भवनात केंद्रीय वस्त्र मंत्रालयाच्यावतीने वर्ष 2017, 2018, आणि 2019 साठीचे ‘शिल्प गुरू पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपराष्ट्रपती जगदीप धनखड़, केंद्रीय वस्त्र मंत्री श्री गोयल, केंद्रीय वस्त्र सचिव रचना शहा, हस्तकला विकास आयुक्त व्यासपीठावर उपस्थित होते. उपराष्ट्रपती यांच्या हस्ते ‘शिल्प गुरू’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय ‘शिल्प’ पुरस्कार केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

‘शिल्प गुरू’ पुरस्काराचे स्वरूप सुवर्ण पदक ताम्रपत्र आणि दोन लाख रूपये रोख असे आहे. तर, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हस्त शिल्पकारांना ताम्रपत्र आणि 1 लाख रूपये रोख असे पुरस्कारास्वरूप प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकार सन्मानित

कोल्हापूरचे अमर सातपुते यांना चामडयापासून कोल्हापूरी चपला हाताने बनविण्याच्या कारीगिरीसाठी आज राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. श्री. सातपुते यांना वर्ष 2019 साठीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री. सातपुतेंचा चामडयापासून चपला बनविण्याचा वड‍िलोपार्जित व्यवसाय आहे.

श्री अमर सातपुते हे या व्यवसायात वर्ष 2005 पासून स्वच्छेने काम करीत आहेत. वडीलांकडून त्यांनी चपला बनविण्याचे बारकावे शिकल्याचे श्री. अमर यांनी पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर सांगितले. हस्तकला विभागाकडून महाराष्ट्राबाहेर अनेक‍ ठिकाणी प्रदर्शन निमित्त स्टॉल लावण्याची संधी मिळते. यातून आणखी काही कल्पना सुचत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यवतमाळच्या रजनी शिर्के यांना भरतकाम हस्तकलेसाठी वर्ष 2019 च्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती शिर्के यांनी 32 वर्षांपूर्वी मध्यप्रदेशातून विशेष भरतकामाचे प्रशिक्षण घेतले. सध्या त्या यवतमाळ आणि परिसरात बचत गटांतील मुलींना- महिलांना भरतकाम शिकवित असल्याचे पुरस्कार प्राप्त केल्यानंतर सांगितले.

अभय पंड‍ित यांना कुंभार कामांसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री पंड‍ित यांना वर्ष 2018 च्या राष्ट्रीय हस्त शिल्प पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे शहरात १ लाख ५५ हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त

पुणे, दि. 28: अन्न व औषध प्रशासन पुणे कार्यालयाने लोहिया नगर येथील समीर जमीर शेख यांच्या राहत्या घरी छापा टाकून सुमारे १ लाख ५५ हजार ८७४ रुपये प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्याची कारवाई केली आहे.

पुणे विभागातील सर्व किराणा, पान टपरी अशा अन्न पदार्थाच्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानातून प्रतिबंधित पदार्थाची विक्री करु नये. अन्न किंवा औषध संबंधात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त अर्जुन भुजबळ यांनी केले आहे.

युनिपार्ट्स इंडिया लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) ३० नोव्हेंबर २०२२ पासून खुली होणार

·         युनिपार्ट्स इंडिया लिमिटेडच्या दर्शनी मूल्य १० रुपये असणाऱ्या प्रत्येक समभागासाठी (इक्विटी शेअर) रु.५४८ ते रु.५७७ किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.

·         ही ऑफर शुक्रवार ०२ डिसेंबर २०२२ रोजी बंद होईल.

·         बोली किमान २५ इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर २५ च्या पटीत लावता येणार आहे.

`पुणे- नोव्हेंबर २८, २०२२: युनिपार्ट्स इंडिया लिमिटेड (“UIL” किंवा “कंपनी”)ने प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याच्या १४,४८१,९४२ पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची (“इक्विटी शेअर्स”) प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) बुधवार ३० नोव्हेंबर २०२२ पासून खुलीकरण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये करण सोनी २०१८ सीजी-एनजी नेवाडा ट्रस्टतर्फे १,१००,००० इक्विटी शेअर्स, मेहेर सोनी २०१८ सीजी-एनजी नेवाडा ट्रस्टतर्फे १,१००,००० इक्विटी शेअर्स आणि पामेला सोनी (एकत्रितपणे “प्रवर्तक समूह विक्री समभागधारक”) द्वारे २,२००,००० इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत. अशोका इन्वेस्टमेंट होल्डिंग्ज लिमिटेड (“अशोका”) तर्फे ७,१८०,६४२ इक्विटी शेअर्स आणि अंबादेवी मॉरिटियस होल्डिंग्ज लिमिटेड (“अंबादेवी”) तर्फे २,१५४,१९२ इक्विटी शेअर्स (“अंबादेवी” आणि “अशोका” एकत्रितपणे “गुंतवणूकदार विक्री समभागधारक) आणि अँड्रू वारेन कोड तर्फे १७७,३७८ इक्विटी शेअर्स; जेम्स नॉर्मन हेलेन तर्फे १७७,३७८ इक्विटी शेअर्स, केविन जॉन कोड तर्फे १७७,३७८ इक्विटी शेअर्स; डेनिस फ्रान्सिस डेडेकर तर्फे ५७,४२० इक्विटी शेअर्स; मेलविन किथ गिब्ज तर्फे ४१,७३० इक्विटी शेअर्स; वॉल्टर जेम्स ग्रूबर तर्फे २४,७०६ इक्विटी शेअर्स; वेंडी रिचर्ड हमेन तर्फे २१,५५६ इक्विटी शेअर्स; मार्क लुईस डॉसन तर्फे २०,८७० इक्विटी शेअर्स; ब्रॅंडली लॉरेझ मिलर तर्फे १६,३६६ इक्विटी शेअर्स; मेरी लुईस आर्प तर्फे १०,४४० इक्विटी शेअर्स; डायना लीन क्रेग तर्फे ८,३४० इक्विटी शेअर्स; मार्क ख्रिस्तोफर दोराऊ तर्फे ७,७१० इक्विटी शेअर्स; क्रेग ए. जॉन्सन तर्फे ५,०१० इक्विटी शेअर्स; आणि मिस्टी मेरी गर्सीया तर्फे ८२६ इक्विटी शेअर्स (एकत्रितपणे “वैयक्तिक विक्री समभागधारक” आणि प्रवर्तक समूह विक्री समभागधारक समवेत आणि गुंतवणूकदार विक्री समभागधारक एकत्रितपणे “विक्री समभागधारक”) (“ऑफर फॉर सेल” किंवा “ऑफर”). ऑफर मध्ये पेड अप इक्विटी शेअर भांडवलाच्या ३२.०९% समाविष्ट आहे. ऑफर शुक्रवार ०२ डिसेंबर २०२२ रोजी बंद होईल.

प्रत्येक समभागासाठी(इक्विटी समभाग) रु.५४८ ते रु. ५७७ किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान २५ इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर २५ च्या पटीत लावता येणार आहे.

सेबी आयसीडीआर नियामकांच्या ६(१) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी नेट ऑफरच्या किमान ५०% पेक्षा जास्त नसलेल्याना समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील ६० टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (Anchor Investors) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत”)  राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. जर प्राथमिक समभाग विक्रीमध्ये प्रस्तावित पेक्षा कमी समभागांना मागणी आली किंवा प्रमुख गुंतवणूकदारांच्या हिश्शामध्ये वाटप झाले नाही तर असे सर्व शिल्लक समभाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या (“QIBs”) हिश्शामध्ये वर्ग करण्यात येतील. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी ५ % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. ऑफर प्राईस इतक्या किंवा QIB भागाच्या ५% हून कमी किमतीला बोली मिळाल्यास QIB मध्ये सुयोग्य वाटपासाठी म्युच्युअल फंड भागात वाटणीसाठी उपलब्ध झालेले राहिलेले इक्विटी समभाग उर्वरित QIB भागात वर्ग होतील. तसेच, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या १५ टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा प्रमाणित तत्वावर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि बिगर संस्थात्मक भागांतर्गत बिगर संस्थात्मक बोलीदारांना वाटप करण्यासाठी उपलब्ध असलेले इक्विटी शेअर्स, खालील गोष्टींच्या अधीन असतील. त्यापैकी एक तृतीयांश भाग २००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि १,०००,०००  रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग १,०००,०००  रुपयांपेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल, अर्थात वर उल्लेख केलेल्या कोणत्याही उपविभागातील सबस्क्राईब न झालेल्या भागाची वाटणी बिगर -संस्थात्मक बोलीदारांच्या इतर उप-श्रेणीमधील अर्जदारांमध्ये होऊ शकेल. सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार योजनेच्या ३५ टक्क्यांपेक्षा कमी नसलेला हिस्सा किरकोळ (रिटेल) गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या बँक खात्यांचा तपशील (युपीए आयडीसह) जाहीर करून अर्जाची विहित रक्कम ब्लॉक (“ASBA”) करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या एससीएसबीतर्फे  ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.  

इक्विटी शेअर्स कंपनीच्या २२ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस द्वारे दिल्ली मध्ये (“RHP”) दिल्ली आणि हरयाणा रजिस्ट्रार ऑफ कंपनीज कडे सादर केले जात असून बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सेज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर नोंदणीकृत करण्याचा प्रस्ताव आहे.

अॅक्सीस कॅपिटल लिमिटेड, डीएएम कॅपिटल अडव्हायझर्स लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

येथे वापरण्यात आलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व भांडवलीकृत संकल्पनांचा अर्थ आरएचपी मध्ये निर्देशित केल्यानुसारच आहे.

स्विच मोबिलिटीची कर्मचारी वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून देण्यासाठी जेएसडब्ल्यूशी भागिदारी

 कर्मचारी वाहतुकीसाठी पहिली लक्षणीय आणि सर्वात मोठी इलेक्ट्रिक बस ऑर्डर-स्विच मोबिलिटीकडे १२ वर्षांसाठी बसेस मालकी आणि हाताळणी, चार्जिंग सुविधा आणि देखभालीचे काम-जेएसडब्ल्यू विजयनगर येथे कर्मचारी वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेसचा वापर केला जाणार

चेन्नई– २८ नोव्हेंबर २०२२ – स्विच मोबिलिटी लि. (स्विच) या अत्याधुनिक कार्बन न्युट्रल इलेक्ट्रिक बस आणि हलक्या व्यवसायिक वाहन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपनीने जेएसडब्ल्यूशी भागिदारी केली असून त्याअंतर्गत भारतात कर्मचारी वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून दिल्या जातील. देशात कर्मचारी वाहतुकीसाठी मिळालेली ही इतकी मोठी पहिलीच ऑर्डर असून जेएसडब्ल्यू स्टीलच्या विजयनगर कारखान्यात ७१ बसेस वितरित केल्या जातील. या बसेसचे मालकी आणि सर्व कामकाज १२ वर्षांसाठी स्विच मोबिलिटीकडे राहाणार असून त्यात चार्जिंग पायाभूत सुविधा स्थापन करणे, देखभाल करणे यांचा समावेश असेल. इलेक्ट्रिक बसेसच्या पहिल्या ताफ्याला जेएसडब्ल्यू समूह कंपन्यांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल आणि स्विच मोबिलिटी लि. चे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू यांनी झेंडा दाखवला.

स्विच मोबिलिटी लिचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू म्हणाले, भारतातील खासगी बसेसची बाजारपेठ देशातील महत्त्वाच्या वाहतूक बाजारपेठांपैकी एक असून त्याचा हिस्सा ७० टक्के आहे. त्यापैकी खासगी इलेक्ट्रिक बस बाजारपेठ पुढील पाच वर्षांत ६० अब्ज रुपयांवर पोहोचेल असा अंदाज आहे. स्विच ईआयव्ही१२ला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर कर्मचारी वाहतूक क्षेत्रात प्रवेश करताना आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या शाश्वत प्रवासात सहभागी होताना आम्हाला आनंद होत आहे. जेएसडब्ल्यूसह केलेली ही भागिदारी स्विच मोबिलिटीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, कारण याअंतर्गत आम्ही देशातील आमची पहिली व सर्वात मोठी खासगी बसेसची ऑर्डर पूर्ण करत आहोत. आमच्या स्विच उत्पादनांमध्ये विश्वास दाखवल्याबद्दल मी जेएसडब्ल्यूच्या व्यवस्थापनाचे आभार मानतो. या शाश्वत प्रवासात सहभागी होण्याची उत्सुकता दाखवलेल्या देशातील इतर काही कॉर्पोरेट्सबरोबरही आमची बोलणी सुरू आहेत.

एयर कंडिशन्ड बसेसमध्ये स्विच ईआयव्ही१२ चा समावेश असून ग्राहकस्नेही तंत्रज्ञान, आरामदायीपणा आणि अत्याधुनिक स्वरूप ही तिची वैशिष्ट्ये आहेत. स्विच ईआयव्ही१२मध्ये कनेक्टेड तंत्रज्ञान सुविधा स्विच ऑन देण्यात आले आहे जे रिमोट अनेबल करते, रियल टाइम डायग्नोस्टिक आणि देखरेख सुविधा तसेच जागतिक दर्जाच्या डिजिटल बॅटरी व्यवस्थापन साधन सुविधा देते. ईआयव्ही प्लॅटफॉर्मचे ईव्ही आर्किटेक्चर हे युरोपियन स्विच ई१ बसेसमध्ये पाहायला मिळते.

बसेसमध्ये उच्च कार्यक्षमता असलेल्या मॉड्युलर बॅटरीजचा आधुनिक लिथियम- इयॉन केमिस्ट्रीसह समावेश करण्यात आला असून या बॅटरीज भारतीय हवामान लक्षात घेऊन खास तयार करण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रिक ड्राइव्हट्रेन्स आणि बॅटरीज अधिक चांगली कार्यक्षमता, दीर्घकाळ टिकाऊपणा आणि बाजारपेठेत मालकीहक्काचा कमी खर्च यांसह तयार करण्यात आल्या आहेत.

या इलेक्ट्रिक बसेसचे कामकाज व सेवा सुरळीतपणे चालण्यासाठी स्विच आपल्या कर्मचारी वर्गाचा विस्तार करत असून पुढील पाच वर्षात मनुष्यबळ ३० टक्के वाढवण्याच्या धोरणाशी सुसंगत राहात कंपनीने २०० कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे ठरवले आहे.

नॅनो सॅटेलाईट निर्मितीवर इस्त्रोचे प्रयत्न -डॉ.भानू पंत

२७व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे चौथे पुष्प
पुणे, दि. २८ नोव्हेंबर:“  भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मटेरियल बॉयोटेक्नोलॉजीचा उपयोग करून  नॅनो सॅटेलाईटची निर्मिती करत आहे. ज्यामुळे सृष्टीवरील मानवाचे जीवनमान उंचविण्यास मदत होईल. तसेच भारतीय राष्ट्रीय उपग्रह याचे लघुरूप इन्सॅटचा वापर दळणवळण, उपग्रह प्रसारण, हवामानशास्त्र, शोध व इतर कार्याकरिता केला जातो.” असे विचार इस्त्रोचे माजी शास्त्रज्ञ डॉ. भानू पंत यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित २७वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेत ‘ इस्त्रोः आज आणि उदया’ या विषयावर आयोजित चौथे पुष्प गुंफतांना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
तसेच बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक राहुल भन्ते बोधी ,एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस,  प्र कुलगुरू डॉ. तपन पांडा व डॉ. मंदार लेले  उपस्थित होते.डॉ.भानू पंत म्हणाले,“ १९६३ पासून सुरू झालेली इस्त्रोची यात्रा २०२२ पर्यंत येऊन पोहचली आहे. इस्त्रोचा मुळ उद्देश अवकाश तंत्रज्ञानाचा विकास करणे व त्याचा उपयोग विविध राष्ट्रीय कार्यात करणे हा आहे. १९६० ते ७० च्या दशकात अग्णिबाण विकास कार्यक्रम पूर्ण केला. १९९८० च्या दशकात उपग्रह प्रेक्षपण यान ३ बनविले आणि अतिप्रगत ध्रुवीय उपग्रह प्रेक्षपण व भूस्थिर उपग्रह यान बनविले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वात भारतीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे काम १९७० पासून सुरू झाले.  ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान हे इस्त्रोच्या कामगिरीतला मानाचा तुरा आहे.”
“ इस्त्रोचे गगनयान ही एक उंच भरारी आहे.  भारताचा सुदूर संवेदन उपग्रह ही पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाशी संपर्क करणार्‍या उपग्रहाची मालिका आहे.  ओशनसॅट मालिका ही प्रामुख्याने समुद्राचा अभ्यास करण्यासाठी विकसीत करण्यात आला. जी सॅट मालिके अंतर्गत भारताने प्रयोगक्षम भूस्थिर उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. तसेच भारताची पृथ्वीकडील पहिली मोहिम ही चांद्रयान १ होती, त्यानंतर चांदयान २ ही पूर्ण झाले. ”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ मानवाने स्वतःचे खरे स्वरूप ओळखण्याचा प्रयत्न करावा. देह, बुद्धि, आत्मा आणि मनाचे गणित समजून घेणे आवश्यक आहे. ज्या पद्धतीने विज्ञान नॅनो सॅटेलाइटचे  संशोधन करीत आहे. त्याच पद्धतीने अति सुक्ष्म आत्म्याचा शोध घेऊन मानवाने सुख, समाधान आणि शांतीसाठी अध्यात्माकडे वाटचाल करावी.”
तत्पूर्वी सकाळच्या सत्रात मुंबई येथील प्रसिद्ध शिक्षणतज्ञ रमेश पानसे यांनी ‘शिक्षणात बदल होतोय’ ’ या विषयावर त्यांनी विचार व्यक्त केले. पुणे येथील प्रसिद्ध हदय रोग तज्ञ  डॉ. जगदीश हिरेमठ म्हणाले,“जीवन हे साप शिडीच्या खेळासारखे आहे. म्हणजेच हातात आलेली गोष्ट अचानक निघून जाणे किंवा ज्या गोष्टीची कल्पनाही केली नव्हती ती अचानक मिळणे यालाच आपण नसिबाचे फासे पलटणे किंवा लक असे म्हणून शकतो. कर्मयोग, अ‍ॅक्शन आणि दैव योग या सर्व गोष्टी एक मेकांवर अवलंबून आहेत. लक स्वतःच्या बाजूने ओढण्यासाठी खूप परिश्रम करा आणि वेळेचे पालन केल्यास ते शक्य होते.”
प्रा. अरुण माळी यांनी सूत्रसंचालन केले.  प्रा.डॉ. तपन पांडा यांनी आभार मानले.

आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला..तरीही क्षमा मागतो-रामदेवबाबांचे महिला आयोगाला पत्र

0

पुणे-माझ्या भाषणातील काही सेकंदाचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर प्रसारित करून चुकीच्या पद्धतीने अर्थ काढला गेला आहे.माझ्या एक तासाच्या भाषणात मातृशक्तीच्या गौरव संदर्भात भाषण झाले. सदर भाषण दरम्यान वस्त्र संदर्भात एक वक्तव्य माझ्याकडून करण्यात आले. मात्र, त्याचा अर्थ हा माझ्याप्रमाणे साधे वस्त्र असा होता. माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावला असतील तर मी त्या संदर्भात जाहीर माफी मागतो असे स्पष्टीकरण रामदेवबाबा यांनी दिले आहे.

बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा तीन दिवसाच्या आत सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याबाबतीत त्यांचा खुलासा राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला असून त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज ट्वीट करून दिली आहे.

पंतांजली योगपीठचे बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी महाराष्ट्रातील ठाणे येथे एका कार्यक्रमा दरम्यान महिलांच्या संदर्भात आक्षेपार्य वक्तव्य केले होते. याबाबतची तक्रार राज्य महिला आयोगाकडे आली होती. त्यानुसार राज्य महिला आयोगाने बाबा रामदेव यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, 1993 चे कलम दहा (1) (एफ) (एक) आणि (2) के नुसार वक्तव्याचा खुलासा करावा अशी नोटीस बजावली होती. बाबा रामदेव यांचे वक्तव्य महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठा यांना धक्का पोहोचवणारे होते. तसेच या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर बाबा रामदेव यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली अशी तक्रार राज्य महिला आयोगाकडे आली होती. त्यानुसार महिला आयोगाने रामदेव बाबा यांना तीन दिवसात आपला खुलासा लेखी स्वरूपात पाठवावा अशी नोटीस पाठवलेली होती. त्यावर बाबा रामदेव यांनी स्वतःची बाजू मांडत स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. मी कोणताही अपराध केलेला नसून समाजात महिलांना समानतेचा हक्क मिळावा या दृष्टीने महिला सक्षमीकरणासाठी आतापर्यंत प्रयत्न केलेले आहे.केंद्र सरकार द्वारे ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अभियानत सक्रिय सहभाग झालो आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध योजनात स्वयंसेवी संघटना सोबत ही सहभागी सहभागी झालो आहे. महिलांचा अपमान करण्याचा माझा कधीही कोणताही हेतू नव्हता. ठाणे येथील कार्यक्रमात महिला सक्षमीकरणच्या दृष्टीने मी सहभागी झालो होतो. मात्र, माझ्या भाषणातील काही सेकंदाचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर प्रसारित करून चुकीच्या पद्धतीने अर्थ काढला गेला आहे.असे रामदेवबाबा यांनी म्हटले आहे.

संपात पिंपरी चिंचवड मधील 20 हजार तर पुणे येथील 80 हजार रिक्षा चालकांचा सहभाग ः बाबा कांबळे

रिक्षा बंदला पिंपरी-चिंचवड शहरात शंभर टक्‍के प्रतिसाद

पुणे/पिंपरी-रिक्षा चालकांच्या मागण्या केंद्र व राज्य सरकारने वेळीच मान्य करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सरकारनेच रिक्षा चालकांना संप करायला भाग पाडले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 20 हजार रिक्षा चालक-मालकांनी संपात सहभाग घेऊन आंदोलनाचे हत्यार उपासले आहे. शहरात रिक्षा बंदला शंभर टक्‍के प्रतिसाद मिळाला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने पिंपरी ते पुणे आरटीओ कार्यालयापर्यंत रॅली काढली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरूवात करण्यात आली. या वेळी बाबा कांबळे बोलत होते.

या वेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे शहराध्यक्ष सोमनाथ कलाटे, लक्ष्मण शेलार, बाळासाहेब ढवळे, रवींद्र लंके, सुरेश सोनवणे, दिनेश तापकीर, तुषार लोंढे, निलेश लंके, अविनाश जोगदंड, हिरामण गवारे आदीसह रिक्षा चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रॅलीच्या सुरूवातीला पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन अधिकारी अतुल आदे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर पुणे येथील आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन सुरू असूनही जोपर्यंत मागण्या मान्य होते नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे, लोकशाही व शांततेच्या मार्ग सुरू ठेवावे असे आव्हान देखिल बाबा कांबळे यांनी केले.

रॅपीडो बाईक बंद होईपर्यंत बेमुदत आंदोलन – बाबा कांबळे

खाजगी कंपन्यांचा प्रवासी वाहतूकीमध्ये सहभाग वाढल्याने रिक्षा, टॅक्‍सी चालकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. त्यात भरीस भर म्हणून रॅपीडो बाईक प्रवासी वाहतूक करत आहेत. या बाबत वारंवार तक्रार करूनही आरटीओ कार्यालय, शासनाचे अधिकारी व नेतेमंडळी दखल घेत नाहीत. त्यामुळे रॅपीडो बाईक पुर्ण बंद होत नाहीत, तो पर्यंत आंदोलन चालूच ठेवणार असल्याचा इशारा बाबा कांबळे यांनी दिला.