Home Blog Page 1497

आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमाराची घटना अत्यंत क्लेषदायक, वारकऱ्यांवरील लाठीमाराचा, तो करणाऱ्या सरकारचा निषेध – विरोधी पक्षनेते अजित पवार

पंढरपूर वारीच्या इतिहासात असं घडलं नव्हतं,
नियोजनाला वारकऱ्यांचं नेहमीच सहकार्य असतं,
योग्य नियोजनातून ही घटना टाळता आली असती…
– विरोधी पक्षनेते अजित पवार

मुंबई, दि. 11 :- “संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीं पालखीच्या आळंदीहून प्रस्थान सोहळ्यावेळी वारकरी बांधवांवर झालेल्या पोलिस लाठीमाराची घटना क्लेषदायक आहे. महाराष्ट्राच्या संत, भक्तीपरंपरेचं वैभव असलेल्या पंढरपूर वारीच्या इतिहासात असं यापूर्वी घडलं नव्हतं. आजची घटना मनाला दु:ख देणारी आहे. सोहळ्याचं योग्य नियोजन करुन हा प्रसंग टाळता आला असता, परंतु तसं घडलं नाही. वारकऱ्यांवरील पोलिस लाठीमाराचा आणि लाठीमार करणाऱ्या सरकारचा मी तीव्र शब्दात निषेध करतो,” अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राला पंढरपूरच्या आषाढीवारीची गौरवशाली परंपरा आहे. आषाढी वारी आणि आळंदीहून निघणारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हे आपल्या महाराष्ट्राच्या अध्यात्म, भक्तीपरंपरेचं वैभव आहे. दरवर्षी वारीसाठी हजारो वारकरी आळंदीत येतात. वारी आणि प्रस्थान सोहळ्याचं योग्य नियोजनही केलं जातं. वारकरीही या नियोजनाला सहकार्य करत असतात. परंतु, यंदा कुठेतरी चूक घडलेली दिसत आहे. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळे हे घडल्याचं दिसत आहे. ही संपूर्ण घटना दु:खदायक, तशीच मनाला चीड आणणारी आहे. अशी घटना यापुढे घडू नये, यासाठी पूर्ण काळजी घेण्यात यावी, अशी मागणीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.

कुठल्याही आध्यात्मिक कार्यात आणि पंढरपूरवारी सारख्या सोहळ्यात सहभागी होतांना, सर्वांनी राजकीय हेतू बाजूला ठेवावा. ईश्वरभक्ती आणि वारकऱ्यांची सेवा हाच हेतू मनात ठेवून, वारीत सहभागी व्हावं, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.

जी-२० डिजीटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकीसाठी रविवारी ५० प्रतिनिधींचे आगमन

प्रशासनातर्फे पारंपरिक पद्धतीने स्वागत

पुणे दि. ११- पुणे येथे १२ ते १४ जून या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या डिजीटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी विविध देशांच्या सुमारे ५० प्रतिनिधींचे रविवारी सायंकाळपर्यंत लोहगाव विमानतळावर आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्व प्रतिनिधीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.

आगमन झालेल्या प्रतिनिधींमधे ऑस्ट्रेलिया, केनिया, श्रीलंका, ओमान, नायजेरिया, सिंगापूर, इंडोनेशिया, रशिया, मॉरीशस, इंग्लंड, लाओस या देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तीय विकास आणि अर्थव्यवस्थेला स्थिरता देण्यासाठी महत्वाच्या असलेल्या जागतिक संस्थांच्या प्रतिनिधींचाही यात समावेश आहे.

आगमनप्रसंगी जिल्हा प्रशासनाच्यावतीने प्रतिनिधींचे पुणेरी पगडी घालून आणि शाल देऊन स्वागत करण्यात आले. ढोल ताशाच्या गजरात आणि तूतारीच्या निनादात पारंपरिक पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत करतांना खास महाराष्ट्राच्या संस्कृतीचेही पाहुण्यांना दर्शन घडविण्यात आले. स्वागतासाठी पुणे महानगरपालिका उपायुक्त डॉ.चेतना केरुरे, राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार उपस्थित होते.

बैठकीसाठी येणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी तयारी केली आहे. भरजरी पोशाखात ढोल ताशा पथक, तूतारी वादाक ठेवण्यात आले आहे. जी-२० परिषदेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचे आणि स्वागतपर संदेशाचे फलक सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहे.

नमस्ते इंडिया’म्हणून पाहुण्यांचा प्रतिसाद
आगमन झालेल्या प्रतिनिधींचे ‘अतिथी देवो भव:’ या संकल्पनेवर महाराष्ट्रीय संस्कृतीने स्वागत करताना त्यामागचा हेतू विषद केला असता, स्वागताने भारावलेल्या प्रतिनिधींनी उत्साहात आणि मोठ्या आवाजात ‘नमस्ते इंडिया’ असा प्रतिसाद देऊन आपला आनंद व्यक्त केला. आगमनाप्रसंगी झालेल्या अनोख्या पद्धतीच्या स्वागतामुळे प्रतिनिधींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचे आगमन

‘डिजीटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप’च्या बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांचे पुणे येथे आज सायंकाळी आगमन झाले. याप्रसंगी प्रशासनाच्यावतीने त्यांचे पुणेरी पगडी, शाल देऊन स्वागत करण्यात आले.
०००

श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनसाठी जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची नायब राज्यपालांना विनंती

मुंबई दि. ११: श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना प्रत्यक्ष भेटून केली. सध्या मुख्यमंत्री कश्मीर दौऱ्यावर असून यादरम्यान त्यांनी श्री. सिन्हा यांची भेट घेतली.

यावेळी नायब राज्यपालांना  दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढविणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे यासाठी महाराष्ट्र भवनला जागा मिळाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल. श्रीनगरमधील हे महाराष्ट्र भवन केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारे राहणार नाही तर या ठिकाणी  महाराष्ट्राची समृद्ध कला, खाद्य आणि संस्कृतीची झलक देखील पाहता येऊ शकेल. जम्मू आणि कश्मीर समवेत नाते अधिक दृढ करण्यासाठी या महाराष्ट्र भवनचा उपयोग विद्यार्थी, उद्योजक, वरिष्ठ अधिकारी यांना एक प्रमुख केंद्र म्हणून करता येईल.

महाराष्ट्र भवनसाठी योग्य ती जागा मिळाल्यास कश्मीरची संस्कृती, पर्यावरण लक्षात घेऊन एक चांगले भवन या ठिकाणी राज्य सरकारतर्फे बांधण्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी या पत्रात दिली आहे.

काही इच्छुक देशांसोबत भारत, डिजिटल उपाय सामायिक करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याची अपेक्षा

पुणे-जी 20 डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या संदर्भात प्रगती करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, 12-14 जून 2023 दरम्यान पुण्यात डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाची तिसरी प्रत्यक्ष  बैठक आयोजित करत आहे. या बैठकीची माहिती देणाऱ्या कर्टन रेझर कार्यक्रमाअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अल्केश कुमार शर्मा, यांनी सहसचिव सुशील पाल यांच्या उपस्थितीत, आज म्हणजे 11 जून 2023 रोजी माध्यमांना संबोधित केले.

डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या  तिसर्‍या बैठकीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात दोन दिवसीय ‘जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय)शिखर परिषद ‘ आणि ‘जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा(डीपीआय) प्रदर्शनाच्या’  उद्घाटनाने होईल. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आर्मेनिया प्रजासत्ताकाचे पहिले उच्च-तंत्र उद्योग उपमंत्री  गेव्हॉर्ग मंताशान, सिएरा लिओनचे स्थायी सचिव तांबा एडवर्ड जुआना, सुरीनामच्या माननीय मंत्री रिश्मा निमी कुलदीपसिंह आणि भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अल्केश कुमार शर्मा यावेळी उपस्थित राहतील. उद्घाटन सत्रात इंडिया स्टॅक अर्थात लोकसंख्येच्या प्रमाणात यशवीरित्या लागू केलेल्या

जी 20 डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या संदर्भात प्रगती करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, 12-14 जून 2023 दरम्यान पुण्यात डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाची तिसरी प्रत्यक्ष  बैठक आयोजित करत आहे. या बैठकीची माहिती देणाऱ्या कर्टन रेझर कार्यक्रमाअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अल्केश कुमार शर्मा, यांनी सहसचिव सुशील पाल यांच्या उपस्थितीत, आज म्हणजे 11 जून 2023 रोजी माध्यमांना संबोधित केले.

डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाच्या  तिसर्‍या बैठकीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात दोन दिवसीय ‘जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (डीपीआय)शिखर परिषद ‘ आणि ‘जागतिक डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा(डीपीआय) प्रदर्शनाच्या’  उद्घाटनाने होईल. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आर्मेनिया प्रजासत्ताकाचे पहिले उच्च-तंत्र उद्योग उपमंत्री  गेव्हॉर्ग मंताशान, सिएरा लिओनचे स्थायी सचिव तांबा एडवर्ड जुआना, सुरीनामच्या माननीय मंत्री रिश्मा निमी कुलदीपसिंह आणि भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अल्केश कुमार शर्मा यावेळी उपस्थित राहतील. उद्घाटन सत्रात इंडिया स्टॅक अर्थात लोकसंख्येच्या प्रमाणात यशवीरित्या लागू केलेल्या डिजिटल उपाययोजना सामायिक करण्यासाठी इच्छुक देशांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली जाईल.

दोन दिवसीय  जागतिक  डीपीआय शिखर परिषदेमध्ये  जागतिक तज्ञ आणि डिजिटल प्रमुखांमध्ये, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा (डीपीआय) आढावा’, ‘जनतेच्या सक्षमीकरणासाठी डिजिटल ओळख’, ‘डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय समावेशन’, ‘न्याय व्यवस्था आणि नियमांसाठी डीपीआय’, ‘कार्यक्षम सेवा वितरणासाठी डिजिटल दस्तऐवज विनिमय’, ‘सार्वजनिक प्रमुख डीपीआय’, ‘डिजिटल शिक्षण आणि कौशल्य’, ‘डिजिटल आरोग्य आणि हवामान बदलासंदर्भातील कृतीसाठी डीपीआय’, ‘डिजिटल कृषी व्यवस्था’, आणि ‘जागतिक डीपीआय व्यवस्था तयार करणे या विषयांवर चर्चा होईल.

या शिखर परिषदेत सुमारे 300 वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी होणार असून, त्यापैकी 46 देश आणि सुमारे 150  परदेशी प्रतिनिधी सहभागी होतील आणि 9  देशांचा मंत्रीस्तरीय सहभाग असेल. तसेच, 47 जागतिक डिजिटल प्रमुख त्यांच्या विषयातील कौशल्य आणि देशाचा अनुभव सामायिक करण्यासाठी सन्माननीय वक्ते म्हणून शिखर परिषदेत सहभागी होतील. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, युनेस्को, जागतिक आर्थिक मंच, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ, आशियायी विकास बँक, निम-शुष्क उष्णकटिबंधीय प्रदेशातील कृषिविषयक आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था, आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना, संयुक्त राष्ट्र भांडवल विकास निधी , आशिया सार्वजनिक प्रमुख पायाभूत सुविधा संघ, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्था या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

तसेच डिजिटल आयडेंटिटी, फास्ट पेमेंट, डिजीलॉकर, मृदा आरोग्य पटर , ई-नाम कृषीबाजार , युनिफाइड मोबाईल अॅप फॉर न्यू-एज गव्हर्नन्स, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स, अॅनामॉर्फिक एक्सपिरियन्स,सीमलेस ट्रॅव्हल एक्सपिरियन्स ऍट एयरपोर्ट, लँग्वेज ट्रान्सलेशन, लर्निंग सोल्यूशन, टेलि-मेडिकल कन्सल्टेशन एक्सपिरीयन्स आणि गेमिफिकेशन ऑफ डिजिटल इंडिया जर्नी हे 14 विविध कार्यक्रम दाखवण्यासाठी यावेळी जागतिक दर्जाचे प्रदर्शन आयोजित केले जाईल.  

बैठकीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी जी20 सदस्य, निमंत्रित अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था ‘डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर’, ‘सायबर सुरक्षा’ आणि ‘डिजिटल स्किलिंग’ यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील कृती करण्यायोग्य घटकांचे वितरण करण्यावर विस्तृत चर्चा करतील.

‘स्टे सेफ ऑनलाइन (SSO)’ मोहीम आणि ‘जी 20 डिजिटल इनोव्हेशन अलायन्स (DIA)’ हे उपक्रम जी 20 सदस्य राष्ट्रांमधील सामान्य लोक विशेषत: तरुण आणि उद्योजकांना जोडण्यासाठी भारताच्या अध्यक्षीय कारकिर्दीत सुरू करण्यात आले आहे.  आत्तापर्यंत, स्टे सेफ ऑनलाइन मोहिमेअंतर्गत, 2,19,00 पेक्षा जास्त व्यक्तींनी राष्ट्रीय स्तरावरील सायबर प्रश्न मंजुषेमध्ये भाग घेतला आहे.  डीआयए  अंतर्गत, 2460 पेक्षा जास्त स्टार्ट-अप्सनी स्पर्धेसाठी अर्ज केले आहेत.

केली जाईल.

दोन दिवसीय  जागतिक  डीपीआय शिखर परिषदेमध्ये  जागतिक तज्ञ आणि डिजिटल प्रमुखांमध्ये, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा (डीपीआय) आढावा’, ‘जनतेच्या सक्षमीकरणासाठी डिजिटल ओळख’, ‘डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय समावेशन’, ‘न्याय व्यवस्था आणि नियमांसाठी डीपीआय’, ‘कार्यक्षम सेवा वितरणासाठी डिजिटल दस्तऐवज विनिमय’, ‘सार्वजनिक प्रमुख डीपीआय’, ‘डिजिटल शिक्षण आणि कौशल्य’, ‘डिजिटल आरोग्य आणि हवामान बदलासंदर्भातील कृतीसाठी डीपीआय’, ‘डिजिटल कृषी व्यवस्था’, आणि ‘जागतिक डीपीआय व्यवस्था तयार करणे या विषयांवर चर्चा होईल.

या शिखर परिषदेत सुमारे 300 वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी होणार असून, त्यापैकी 46 देश आणि सुमारे 150  परदेशी प्रतिनिधी सहभागी होतील आणि 9  देशांचा मंत्रीस्तरीय सहभाग असेल. तसेच, 47 जागतिक डिजिटल प्रमुख त्यांच्या विषयातील कौशल्य आणि देशाचा अनुभव सामायिक करण्यासाठी सन्माननीय वक्ते म्हणून शिखर परिषदेत सहभागी होतील. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, युनेस्को, जागतिक आर्थिक मंच, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ, आशियायी विकास बँक, निम-शुष्क उष्णकटिबंधीय प्रदेशातील कृषिविषयक आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था, आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना, संयुक्त राष्ट्र भांडवल विकास निधी , आशिया सार्वजनिक प्रमुख पायाभूत सुविधा संघ, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्था या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

तसेच डिजिटल आयडेंटिटी, फास्ट पेमेंट, डिजीलॉकर, मृदा आरोग्य पटर , ई-नाम कृषीबाजार , युनिफाइड मोबाईल अॅप फॉर न्यू-एज गव्हर्नन्स, ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स, अॅनामॉर्फिक एक्सपिरियन्स,सीमलेस ट्रॅव्हल एक्सपिरियन्स ऍट एयरपोर्ट, लँग्वेज ट्रान्सलेशन, लर्निंग सोल्यूशन, टेलि-मेडिकल कन्सल्टेशन एक्सपिरीयन्स आणि गेमिफिकेशन ऑफ डिजिटल इंडिया जर्नी हे 14 विविध कार्यक्रम दाखवण्यासाठी यावेळी जागतिक दर्जाचे प्रदर्शन आयोजित केले जाईल.  

बैठकीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी जी20 सदस्य, निमंत्रित अतिथी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था ‘डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर’, ‘सायबर सुरक्षा’ आणि ‘डिजिटल स्किलिंग’ यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातील कृती करण्यायोग्य घटकांचे वितरण करण्यावर विस्तृत चर्चा करतील.

‘स्टे सेफ ऑनलाइन (SSO)’ मोहीम आणि ‘जी 20 डिजिटल इनोव्हेशन अलायन्स (DIA)’ हे उपक्रम जी 20 सदस्य राष्ट्रांमधील सामान्य लोक विशेषत: तरुण आणि उद्योजकांना जोडण्यासाठी भारताच्या अध्यक्षीय कारकिर्दीत सुरू करण्यात आले आहे.  आत्तापर्यंत, स्टे सेफ ऑनलाइन मोहिमेअंतर्गत, 2,19,00 पेक्षा जास्त व्यक्तींनी राष्ट्रीय स्तरावरील सायबर प्रश्न मंजुषेमध्ये भाग घेतला आहे.  डीआयए  अंतर्गत, 2460 पेक्षा जास्त स्टार्ट-अप्सनी स्पर्धेसाठी अर्ज केले आहेत.

‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान

आळंदीत लाठीमार झालेला नाही, तर किरकोळ झटापट: विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड

पुणे, दि.११ : ‘टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा वीणा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा… टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले…. ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी…अशा भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले.

आळंदी येथील समाधी मंदिरात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पालखीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार श्रीकांत भारतीय, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त ॲड. विकास ढगे, गुरु हैबतबाबा यांचे वंशज बाळासाहेब पवार – आरफळकर आदी उपस्थित होते.

मानाच्या पालखी प्रदक्षिणेनंतर आळंदी संस्थान येथील गांधीवाडा देवस्थानाकडे पालखी सोहळ्याचे मुक्कामासाठी प्रस्थान झाले. प्रस्थान सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.

वारकऱ्यांसाठी सुविधा
आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन, मंदीर संस्थान, पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाने तयारी केली आहे. आळंदीत पाण्याची सोय, विजेची सोय, वैद्यकीय पथके, पालखी मार्गाचे वेळापत्रक, मंदिराच्या प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्रणा, सुलभ शौचालय, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, नदी पात्रात बोटीची व्यवस्था, सूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून जागोजागी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच ध्वनीक्षेपणाद्वारे  सूचनाही देण्यात येत आहे.

आळंदीत लाठीमार झालेला नाही, तर किरकोळ झटापट: विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड

पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या 56 पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजन सुद्धा करण्यात आले. मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा तो मान्य केला. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आल्या. मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडी प्रत्येकी 75 जणांनाच पाठवित होते. मात्र आज अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार सुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते. बॅरिकेड तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, हे म्हणणे खोटे आहे. सर्व वारकरी, प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, ही माझी नम्र विनंती आहे.

विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे उद्योगनगरीत आगमन

पुणे संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड मध्ये रविवारी (दि. 11) सायंकाळी 4.55 वाजता आगमन झाले. आगमनासाठी महापालिका प्रशासन आणि विविध राजकीय पक्षांच्या तसेच संस्थांच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षातून दिंड्यांचे स्वागत करण्यात आले. शहरातील हजारो भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पालखीचा आजचा मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीने शनिवारी (दि. 10) देहू येथील शिळा मंदिरातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. पहिला मुक्काम देहू येथील इनामदार वाड्यात झाला. त्यानंतर रविवारी सकाळी पालखी पुढे निघाली. सायंकाळी 4.55 वाजता निगडी येथे तिचे आगमन झाले. भक्ती शक्ती चौकामध्ये विसावा घेतल्यानंतर पालखी पुढे आकुर्डी येथील विठ्ठल मंदिराकडे मुक्कामासाठी रवाना झाली.

निगडी येथील भक्ती शक्ती चौकात आकर्षक रांगोळ्यांनी पालखीचे स्वागत करण्यात आले. महापालिका प्रशासन आणि विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि कंपन्यांच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. दिंड्यांमधील वारकऱ्यांना विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले.

पालखी सोहळ्याबरोबर ‘बार्टी’ तर्फे संविधान दिंडीच्या माध्यमातून संविधानाचा जागर

पुणे दि. ११ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ‘संविधान दिंडी’ चे आयोजन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मुख्य संकल्पनेतून आणि समाज कल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे व बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली या ‘संविधान दिंडी’ चे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे रथाच्या माध्यमातून भाविकांमध्ये संविधानाची जनजागृती आणि प्रबोधन करण्यात येणार आहे.

वारकरी बांधवांना भारतीय संविधानाची माहिती व्हावी, आपले अधिकार, कर्तव्याची जाणीव व्हावी तसेच संतांच्या समतावादी विचारांचा प्रसार व्हावा हा या संविधान दिंडीचा हेतू आहे. भारतीय संविधानाबद्दल तीन प्रश्न विचारून विजेत्यांना भारतीय संविधानाची प्रत, संविधान प्रास्ताविका भेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. वारकरी बांधवांना भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाटप करून त्यांना भारतीय संविधानाबद्दल आपल्या मूलभूत अधिकार व कर्तव्याची माहिती देण्यात येत आहे.

वारकरी बांधव व नागरिकांना संविधानाच्या प्रास्ताविकाचे व बार्टी घडीपत्रिकेचे वाटप करून संविधान दिंडीचे महत्त्व विषद करण्यात येणार आहे. वारकरी दिंडीच्या मार्गाने वारकऱ्यांच्या विसाव्या ठिकाणी प्रबोधनात्मक, संविधान आधारित विविध उपक्रम, कार्यक्रम, शाहीरी जलसा यांचे आयोजन करण्यात येते. संविधान दिंडीमध्ये बार्टीचे अधिकारी व कर्मचारी, प्रकल्प अधिकारी व समतादूत यांचा समावेश असणार आहे.

पालखी सोहळ्यात संविधान दिंडीचा वारकरी बांधव व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) यांच्यावतीने करण्यात आले आहे.

दक्षिण पुण्यातून अफिमचा मोठा साठा जप्त !एकाला अटक

पुणे- शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथक-1 ने दक्षिण पुण्यातील कात्रज-आंबेगाव पठार परिसरात अफिमची विक्री करणार्‍या एकाला अटक केली असून त्याच्याकडील तब्बल 8 लाख 34 हजार 900 रूपये किंमतीचे 417 ग्रॅम 450 मिलीग्रॅम अफिम आणि इतर ऐवज असा एकुण 13 लाख 78 हजार 950 रूपयाचा ऐवज जप्त केला आहे.

जितेंद्र देवीलाल शर्मा(38, मुळ रा. मु.पो. चाबा, ता. शेरगड, जि. जोधपूर, राजस्थान. सध्या रा. गुरूदत्त कॉलनी, प्रेरणा शाळेजवळ, आंबेगाव पठार, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 9 जून 2023 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-1 मधील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार हे भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.आंबेगाव पठार येथील स्वामीनगरमधील तापकिर एसटीडी जवळील सार्वजनिक रस्त्यावर एकजण अफिमची विक्रीकरीत असल्याची माहिती पोलिस अंमलदार पांडुरंग पवार आणि सचिन माळवे यांना मिळाली. त्यांनी त्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांना कळविले. त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याची सूचना दिल्या.पोलिस पथकाने सापळा रचुन जितेंद्र देवीलाल शर्मा याला अटक केली. त्याच्या ताब्यातील 417 ग्रॅम 450 मिलीग्रॅम वजनाचे 8 लाख 34 हजार 900 रूपये किंमतीचे अफिम, 5 लाख रूपये किंमतीची मारूती सुझुकी एरटिका, मोबाईल, होंडा अ‍ॅक्टीव्हा असा एकुण 13 लाख 78 हजार 950 रूपयाचा ऐवज जप्त केले आहे. जितेंद्र शर्मा याच्याविरूध्द भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे ,
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे , सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे ,पोलिस अंमलदार मारूती पारधी, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, पांडुरंग पवार,संदिप शिर्के, सचिन माळवे, संदेश काकडे, नितेश जाधव, रेहाना शेख आणि योगेश मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

महाराष्ट्र जल पर्यटन, शोध व बचाव प्रशिक्षण राज्य सरकारचा उपक्रम,राज्यातील होतकरू तरुण -तरुणींना सुवर्णसंधी.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या तारकर्ली येथील इसदा या प्रशिक्षण संस्थेमध्ये जलपर्यटन व आपत्ती व्यवस्थापन मध्ये बोट चालविणे, जीवरक्षक, बचाव, स्कुबा डायव्हिंग चे महत्व ओळखून राज्यातील एकूण ३६० युवक व युवती यांना जीव रक्षक, पॉवर बोट हॅडलिंग व स्कुबा डायविंग याचे मोफत प्रशिक्षण राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत आयोजित केले आहे…
प्रत्येक जिल्ह्यामधील ५ जणांना जीवरक्षक व पॉवर बोट हॅडलिंग व ५ जणांना बचाव स्कुबा व यातील एक डाईवमास्टर असे रू. ६०,००० ते १,६०,००० पर्यंत चे अगदी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे… यात निवास व भोजन याची पण मोफत सोय केलेली आहे…
सदर प्रशिक्षण हे पूर्णपणे मोफत असून यासाठी वयोमर्यादा १८ते२५ वर्ष, कमीतकमी १०वी पास, व वजन ५५कीलोपेक्षा जास्त असावे असे निकष आहेत..
सदर साठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या खालील वेबसाईट वर आगावू अर्ज नोंदणी चालू आहे, अर्ज नोंदणी दिनांक १२ जून २०२३ ला संध्याकाळी ५ वाजेपर्यंत…सोबतच साईट वरती प्रशिक्षण निवडी साठी निवड तारीख व स्थळे यांची माहिती देण्यात आली आहे…
लिंक ⬇️
www.mtdc.co
अर्ज पुढील लिंक वर उपलब्ध असून ते online भरायचे आहेत: https://forms.gle/AmMsdMVtek5ZpEvW9


श्री. दिपक हरणे
प्रादेशिक व्यवस्थापक
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ…

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून शहर विकासाचा आराखडा तयार करा -पालकमंत्री

 
पुणे दि.११: तळेगाव दाभाडे शहरातील पदाधिकारी- अधिकारी यांनी शहराच्या विकासाचा एकात्म विचार करून आराखडा तयार करावा. गरजेनुसार कोणती कामे अगोदर करावयाची आहेत त्याचा प्राधान्य क्रम ठरवून प्रस्ताव सादर करा, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या.

प्रतीकनगर येथे तळेगाव दाभाडे शहरातील १२ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, मुख्याधिकारी एन.के. पाटील, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी लोकांच्या गरजा लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीचे वाटप केले जात आहे. यावर्षी पुणे जिल्ह्याला १३० कोटी रुपयांचा निधी वाढवून मिळाला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तळेगाव दाभाडे शहरातील विविध विकास कामांसाठी १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून विकासकामे दर्जेदार होतील याची दक्षता घ्यावी आणि ती वेळेत पूर्ण करावीत.

विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. विकासकामे अपूर्ण ठेवू नका. कामे रेंगाळल्याने खर्च वाढतो. त्यामुळे ती वेळेतच पूर्ण करावीत, असे सांगून या परिसरातील सोमेश्वर मंदिराला ‘ क ‘ वर्ग दर्जा देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

श्री. बारणे म्हणाले, जिल्ह्याचा विकास करण्यामध्ये जिल्हा नियोजन समितीचा खूप मोठा वाटा आहे. तळेगाव दाभाडे शहर पुणे मुंबई रस्त्यावर असल्याने या परीसरात स्थानिक होण्यासाठी नागरिकांनी पसंती दिली आहे. या परीसरात केंद्र शासनाची विविध कार्यालये आहेत. मावळ तालुक्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून ११४ गावामध्ये चांगले काम झाले असून त्यामध्ये ५० टक्के निधी केंद्र शासनाचा आहे. दीनदयाळ ग्राम ज्योती निधीच्या माध्यमातूनही खेडोपाड्यात वीज पुरवली जात आहे. शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्यांना दिला जात आहे, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे येथे सुरू असलेल्या आणि आज भूमिपूजन केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.

विविध विकास कामांचे भूमिपूजन

श्री. पाटील यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे शहरातील नाना भालेराव कॉलनी ते म्हाडा कॉलनी रस्ता डांबरीकरण करणे, प्लॉट नं. १ जय भवानी सुपर मार्केट ते श्री अपार्टमेंट प्लॉट नं. १७ श्री अपार्टमेंट रस्ता डांबरीकरण करणे, प्रतिकनगर ते श्री. दाभाडे यांचे शेत ते मुख्य नाल्यापर्यंत ९०० मी.मी. व्यासाची आर.सी.सी. पाईप गटर करणे, सिंडीकेट बँकेमागील व समोरील रस्ता तसेच नाना भालेराव कॉलनी मधील अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे व प्लॉट नं. २९५, कृष्णा निवास से मारुती मंदिरापर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

जात धर्माच्या सीमा ओलांडणारी कविता सर्वश्रेष्ठ

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत  :  वल्लरी प्रकाशनतर्फे व्यंकटेश कल्याणकर संपादित चाफा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन 

पुणे : आजच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण  लिहिलेला प्रत्येक शब्द, गोष्ट त्वरित सर्वसामान्यांपर्यंत पोहोचते. अशा वेळी लेखक आणि कवींची जबाबदारी मोठी आहे. कवीने समाजाला शहाणे करायचे असते, जात आणि धर्माच्या सीमा ओलांडून समाजासाठी मार्गदर्शक ठरणारी कविता ही सर्वश्रेष्ठ असते, असे मत ज्येष्ठ लेखक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केली.

वल्लरी प्रकाशनतर्फे व्यंकटेश कल्याणकर संपादित चाफा या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी उद्धव कानडे, अभिनेत्री गौरी रत्नपारखी, साहित्यिका मानसी चिटणीस, वल्लरी प्रकाशनाचे व्यंकटेश कल्याणकर, वक्ते डॉ. सुनील धनगर यावेळी उपस्थित होते. तर किरण इनामदार, प्रकाश तांबे, महेश कुलकर्णी कीर्ती देसाई, ज्योती इनामदार यावेळी उपस्थित होते.

लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, कवीने इतरांचे अनुकरण न करता शब्द आणि प्रतिभेचे जे वरदान आपल्याला मिळाले आहे त्याला साहित्याचे कोंदण देऊन समाजाला दृष्टिकोन आणि जगण्याची उमेद दिली पाहिजे.

कविता किंवा साहित्य हे केवळ मनोरंजन नव्हे तर त्या पलीकडे जाऊन जीवनाचा दृष्टिकोन देणारी एक तपस्या आहे. ही तपस्या सर्वांनाच प्राप्त होते असे नाही. इतरांच्या अनुभवाने किंवा दृष्टीने जग न पाहता कवीने आपल्या अनुभवातून कविता निर्माण करावी आणि त्यातून जग अनुभवण्याचा आनंद दिला पाहिजे.

उद्धव कानडे म्हणाले, कवींना विशेषतः ग्रामीण भागातील कवींना व्यासपीठ मिळवून देणे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. कवितेवर केवळ बोलू नये तर त्याचा आनंद घेतला पाहिजे कविता ही माणसाला आत्ममग्न करते. कवीने आपल्याला मिळालेल्या प्रतिभेला साधनेची जोड दिली तर त्यातून निश्चितच चांगल्या प्रकारची साहित्यकृती निर्माण होऊ शकते.

गौरी रत्नपारखी म्हणाल्या. कविता ही स्वतःच्या सुखासाठी नव्हे तर समाजासाठी असते. कविता समाजासमोर आली तर कवीच्या प्रतिभेला अधिक बहर येतो. त्यातून कवीचा आत्मविश्वास वाढतो.

नीता चिकारे, प्राची जोशी, शरद करमरकर, मुकुंद काजरेकर, गोपाल खंडारे, ज्योती मनोहर, अभिषेक मिटके, शिरीष पदकी, प्रवीण पाटील, पूर्वा पित्रे, अतुल सानप, शारदा शेंबवणेकर, रचना वसेकर, गिरीश वसेकर या प्रतिभावंत कवी कवयित्रींचा “चाफा” हा काव्यसंग्रह आहे. प्रज्ञा कल्याणकर यांनी सूत्रसंचालन केले. व्यंकटेश कल्याणकर यांनी प्रास्ताविक केले. मानसी चिटणीस यांनी आभार मानले.

मोदी सरकारविरोधात पुण्यात आपची निदर्शने

पुणे –दिल्लीतील लोकनियुक्त सरकारच्या प्रशासनातील अधिकारी नेमणे, बदली करण्याच्या अधिकारावर गदा आणणाऱ्या केंद्र सरकारच्या अध्यादेशाचा निषेध म्हणून आज आम आदमी पार्टी तर्फे देशभर विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. पुण्यात झाशीच्या राणीच्या पुतळ्यासमोर बालगंधर्व चौक येथे आज आम आदमी पार्टीतर्फे निदर्शने करण्यात आली .

आठ वर्षांपूर्वी केंद्र सरकारने एक नोटिफिकेशन काढून दिल्लीतील राज्य सरकारचे प्रशासकीय बदल्या व नियुक्ती करण्याचे अधिकार काढून घेत आपल्या ताब्यात घेतले होते. त्याला आम आदमी पार्टी सरकारने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. तब्बल आठ वर्ष ही लढाई चालू होती. सुप्रीम कोर्टाच्या बेंच ने हे सर्वाधिकार पुन्हा एकदा दिल्लीतील लोकनियुक्त केजरीवाल सरकारकडे राहतील असा ऐतिहासिक निर्णय दिला. परंतु केंद्रातील भाजप सरकारने सुप्रीम कोर्टाला सुट्टी लागल्या दिवशी एक अध्यादेश काढत हे अधिकार पुन्हा आपल्या हातात घेतले आहेत. हा अध्यादेश दिल्लीतील मतदारांचा अवमान करणारा असून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. त्याचा निषेध म्हणून आज निदर्शने करण्यात आल्याचे यावेळी आप च्या कार्यकर्त्यांनी भाषणातून सांगितले.

दिल्लीमध्ये 70 पैकी 62 विधानसभा जागा जिंकून आम आदमी पार्टीने जनतेची कामे सुरू केली. परंतु त्यात केंद्र सरकार नियुक्त राज्यपालांमार्फत सतत हस्तक्षेप केला जात असून लोकांची कामे अडवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

आता अध्यादेशाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आम आदमी पार्टी आणि भाजप सरकार एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. यासंदर्भात आम आदमी पार्टी राज्यसभेमध्ये इतर सर्व विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे.

सुप्रीम कोर्टाने आप सरकारच्या बाजूने निर्णय दिल्यानंतरही ह्या अध्यादेशाच्या मार्गे बदली, नियुक्तीचे अधिकार मोदी सरकारने आपल्याकडे घेतले आहेत याचा काळी फीत लावून निषेध केला गेला. याप्रसंगी विजय कुंभार , किशोर मुजुमदार, धनंजय बेनकर, इक्बाल तांबोळी, फाबियन अण्णा सॅमसन, चंद्रशेखर पानसे, मनोज शेट्टी, संजय कटारनवरे, चंद्रकांत गायकवाड, किरण कद्रे, सहील परदेशी, अनिल कोंढाळकर, समीर अरवडे, रशिदा सिद्दिकी, तहसीन देसाई, सुनीता काळे, वैशाली डोंगरे, सुरेखा भोसले, निलेश वांझळे, संदीप सोनावणे, सतीश यादव, राजेंद्र साळवे, गंगाधर खरात, सीमा गुट्टे, सय्यद अली, अजय पैठणकर, शिवाजी डोलारे, आनंद अंकुश, शमीम पठाण, संतोष राऊत, गणेश थरकुडे, शंकर थोरात, प्रशांत कांबळे, डॉ अभिजित मोरे, राजू परदेशी, धर्मेंद्र डोंगरे, समीर पुराणिक, श्रीकांत चांदणे, तानाजी शेरखाने, अमोल मोरे, योगेश इंगळे, शंकर पोटघन, अक्षय दावडिकर, घनश्याम मारणे, सर्फराज मोमीन, कुमार धोंगडे, शेखर ढगे, अल्ताफ शेख, अमित म्हस्के, अंजली इंगळे, रामभाऊ इंगळे, रुबिना काझमी, अक्षय सुतार, आसिफ मोमीन, मुकुंद किर्दत, विष्णू भोगे, ऋतिका इंगळे, अक्षय म्हस्के, गणेश ढमाले, प्रीती निकाळजे, सुनीता पोखरे, माया शिंदे, शोभा जात्वरकर, वैशाली साळवे, सुनीता डेकने, रेखा गायकवाड, परू बोकरे, कांचन शर्मा, दत्तात्रेय कदम, संजय कोणे, मनोज फुलावरे, उत्तम वडावराव, किरण कांबळे उपस्थित होते.

वारीतील प्रत्येक दिंडीला सरकारने ५० हजार रुपये द्यावेत:- नाना पटोले

अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीचे उच्चाटन करण्यात वारीचे मोठे योगदान

मुंबई, दि. ११ जून २०२३
पंढरपूरची आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. या वारीसाठी दरवर्षी लाखो वारकरी पायी चालत जात असतात. वारीमार्गाच्या या प्रवासात भजन, किर्तन, प्रवचन, भारुडांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीचे कार्यही होत असते. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने वारीतील दिंड्यांच्या माध्यमातून होत असलेल्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्या निधीतून प्रत्येक दिंडीला ५० हजार रुपये द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणीच्या भेटीची आस घेऊन दरवर्षी वारी निघते. पंढरपूर वारीची ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. जात, धर्म, पंथ असा कोणताच भेदभाव नसलेली समाजासमोर एक आदर्श निर्माण घालून देणारी ही वारी पंरपरा आहे. दरवर्षी जगतगुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताई, निवृत्तीनाथ, सोपानदेव, संत गजानन महाराज यांच्या पालख्यांसह इतर पालख्या पंढरपूरकडे जात असतात. या पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने अबाल-वृद्ध भक्तीरसात तल्लीन होत असतात.

वारीमध्ये भक्तीरसाबरोबर समाजप्रबोधनाचे महत्वाचे कार्य होत असते. समाजाला लागलेली अंधश्रद्धा व व्यसनाची कीड समूळ नष्ट करण्याचे काम या दिंड्यांच्या माध्यमातून होत असते. महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धा निर्मुलनाचा कायदाही केलेला आहे. व्यसमुक्तीसाठीही सरकारी पातळीवर प्रयत्न केले जातात पण हे काम केवळ कायद्याच्या माध्यमातून होत नाही त्याला समाजप्रबोधनाची जोडही असावे लागते, तेच काम वारीतील दिंड्या करत आहेत. आषाढी वारीचे औचित्य साधून व्यसमुक्ती दिंडी काढून विविध ठिकाणी प्रचार व प्रसार केला जातो. विठुनामाच्या गजरात व्यसनमुक्ती व अंद्धश्रद्धा निर्मूलनाचे मोठे सामाजिक कार्य होत असते. राज्य सरकारने या कार्याची दखल घेऊन प्रत्येक दिंडीला ५० हजार देऊन त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी द्यावे असे पटोले म्हणाले.

केजरीवाल यांनी सांगितली, चौथी पास राजाची कथा; म्हणाले- या कथेत राणी नाही, राजाला खूप अहंकार

नवी दिल्ली-केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात आम आदमी पक्षाने रविवारी दिल्लीत रॅली काढली. या रॅलीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाषण केलं. 2011 मध्ये केजरीवाल यांनी रामलीला मैदानावर जनतेला संबोधित केले होते. अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा हा काळ होता. बरोबर 12 वर्षे त्यांनी याच मैदानातून राजकीय सभेला संबोधित केले.केजरीवाल पंतप्रधानांना हुकूमशहा म्हणत म्हणाले- आज आपण देशातून हुकूमशाही सरकारला हाकलण्यासाठी रामलीला मैदानात आलो आहोत.ते म्हणाले- देशाचे पंतप्रधान म्हणतात की, माझा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास नाही. त्यांना खूप अहंकार आहे. देशातील लोकशाही नष्ट होत आहे. याला म्हणतात हुकूमशाही, हिटलरशाही.

केजरीवाल यांनी चौथी पासच्या राजाची कहाणी सांगितली. म्हणाले- या कथेत राणी नाही. कथा सांगताना केजरीवाल यांनी नोटाबंदी, बनावट पदवीचा उल्लेख केला. त्यांनी नाव न घेता अदानी आणि ब्रजभूषण प्रकरणावर भाष्य केले. म्हणाले-

  • महागाईवर केजरीवाल म्हणाले- चौथी पास राजाला काहीच कळत नाही : भाषणात केजरीवाल यांनी महागाईचा उल्लेख केला. ते म्हणाले – महागाई वाढत आहे. पेट्रोल, दूध, भाजीपाला महागला आहे. एलपीजी सिलिंडरची किंमत आता एक हजार रुपयांच्या पुढे गेली आहे. त्यावर नियंत्रण कसे ठेवावे हे त्यांना समजत नाही. चौथी पास राजाला देश कसा चालवायचा हेही कळत नाही.
  • नोटाबंदीवर म्हणाले – 2000 रुपयांची नोट टिकेल की जाईल हे पंतप्रधानांना माहीत नाही हे कसे पंतप्रधान आहेत, ज्यांना माहित नाही की 2000 रुपयांची नोट टिकेल की जाईल. तुम्ही समजूतदार पंतप्रधान निवडला असता तर असे झाले नसते.
  • केजरीवाल पुढे म्हणाले, सगळीकडे बेरोजगारी आहे, ती कशी सोडवायची ते समजत नाहीये. सर्वत्र भ्रष्टाचार आहे, तो कसा दुरुस्त करायचा हे त्यांना कळत नाही. जीएसटीमुळे व्यापारी त्रस्त आहेत, ते कसे सोडवायचे हे त्यांना माहिती नाही

केजरीवाल म्हणाले – भाजप नेते मला रोज शिवीगाळ करतात
दिल्लीचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, भाजप नेते मला रोज शिवीगाळ करतात. मला काही फरक पडत नाही. ते माझ्याबद्दल काय म्हणतात याने काही फरक पडत नाही. मला लोकांचा गैरवापर कसा करावा हे माहित नाही. मी दिवसभर कामात व्यस्त असतो. तुम्ही मला काम करण्याची संधी दिली आणि मी २४×७ काम करतो.

केजरीवाल यांच्याशिवाय कपिल सिब्बल यांनीही केंद्र सरकारवर संविधानाची थट्टा केल्याचा आरोप केला. सिब्बल म्हणाले, केंद्रात बसलेल्या सरकारला सर्व अधिकार नोकरशहांना द्यायचे आहेत, त्यांना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडे कोणतीही सत्ता ठेवायची नाही. हा कसला विनोद आहे.

केंद्राने दिल्लीत आणलेल्या अध्यादेशाबद्दल…

दिल्ली सरकार आणि लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या विरोधात अनेक वर्षे संघर्ष सुरू होता. अधिकारी कोणाच्या आदेशाने काम करायचे यावरून दोघांमध्ये भांडण सुरू होते. सीएम केजरीवाल म्हणाले की एलजी सरकारला काम करू देत नाही. त्याचवेळी राजधानीचे काही निर्णयही माझ्या अखत्यारीत येतात, असा दावा एलजीने केला. या लढ्याबाबत आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

‘आप’ सरकार सर्वोच्च न्यायालयात का पोहोचले?

प्रकरण 1: दिल्लीतील विधानसभा आणि सरकारचे कामकाज ठरवण्यासाठी राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार (GNCTD) कायदा, 1991 आहे. केंद्र सरकारने 2021 मध्ये त्यात बदल केला. असे म्हटले होते- विधानसभेने बनवलेल्या कोणत्याही कायद्यात सरकारचा अर्थ उपराज्यपाल असेल. सरकार कोणताही निर्णय घेताना एलजीचे मत नक्कीच घेईल.

प्रकरण 2: सहसचिव आणि त्याहून अधिक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या आणि पोस्टिंग अधिकारांच्या मुद्द्यावरून दिल्लीत सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यात भांडण झाले. दिल्ली सरकारला उपराज्यपालांचा हस्तक्षेप नको होता. या दोन्ही प्रकरणांवर आम आदमी पार्टी (AAP) सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

11 मे : सर्वोच्च न्यायालय दिल्ली सरकारच्या सल्ल्यानुसार LG काम करेल
सर्वोच्च न्यायालयाने 11 मे रोजी निर्णय दिला की दिल्लीतील सरकारी अधिकाऱ्यांवर केवळ निवडून आलेल्या सरकारचे नियंत्रण असेल. 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने एकमताने सांगितले – सार्वजनिक व्यवस्था, पोलिस आणि जमीन वगळता, लेफ्टनंट गव्हर्नर इतर सर्व बाबतीत दिल्ली सरकारच्या सल्ल्यानुसार आणि सहकार्याने काम करतील.

19 मे : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला
सात दिवसांनंतर 19 मे रोजी केंद्र सरकारने अध्यादेश आणून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. अध्यादेशानुसार, दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अंतिम निर्णय उपराज्यपालांचा असेल. यात मुख्यमंत्र्यांना कोणताही अधिकार राहणार नाही.

आजपासून सर्व महिलांना बस प्रवास मोफत..कर्नाटकात .

पुणे- आजपासून कर्नाटकात प्रत्येक महिलेला बस प्रवास मोफत केल्याचे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे .महिलांचे सशक्तीकरण , आर्थिक बचत , त्यांचा अधिकार याबाबतची जबाबदारी कॉंग्रेसचे सरकार पार पाडेल असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने आपल्या पाच मतदान हमीपैकी पहिली ‘शक्ती’ योजना सुरू करून रविवारी आणली, राज्यांतर्गत महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांसाठी राज्यांतर्गत परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये मोफत बस प्रवासाची सुविधा सुरु केली आहे .बेंगळुरूमधील केम्पेगौडा बस टर्मिनलवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांचे उप डीके शिवकुमार यांनी सुमित्रा, राधा, प्रेमा, कलावथी आणि पवित्रा या पाच महिला प्रवाशांना ‘शून्य-मूल्य’ तिकिटांचे वाटप केले आणि मंदिराच्या शहराला जाणाऱ्या बसला हिरवी झेंडी दाखवली.पुढील तीन महिन्यांत महिला प्रवाशांना स्मार्ट कार्डच्या प्रतिकृती देण्यात येणार आहेत तोवर लाभार्थी रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून कोणतेही सरकारी आयडी वापरू शकतात आणि विनामूल्य प्रवास करू शकतात, असे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी सांगितले. राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयात दुपारी 1 वाजता या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.शक्ती योजनेचा एकूण खर्च वार्षिक 4,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे आणि बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (BMTC) ला या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी 4,028 बसेस आपल्या ताफ्यात समाविष्ट कराव्या लागतील, असे सरकारला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. स्मार्ट कार्डचा वापर करून, कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ, BMTC, उत्तर पश्चिम कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळ आणि कल्याण कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन या परिवहन महामंडळे महिला प्रवाशांनी प्रवास केलेल्या एकूण अंतराची गणना करतील. लाभार्थ्यांनी प्रवास केलेल्या अंतराच्या आधारे सरकार या महामंडळांना परतफेड करेल.ही योजना वातानुकूलित आणि लक्झरी बसेसना लागू होत नाही आणि ती राज्यांतर्गत प्रवासापुरती मर्यादित आहे. त्यात BMTC वगळता तीन परिवहन महामंडळांमध्ये पुरुषांसाठी 50 टक्के जागा राखीव आहेत.