Home Blog Page 1478

भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ परिसरात स्वच्छतेचा उपक्रम राबविला

१ जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त राज्यासह देशभरातून सुमारे १५ लाख भीम अनुयायी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 जानेवारी रोजी विजयस्तंभ परिसरामधे स्वच्छता रहावी व स्थानिक रहिवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या परिसराचा इतिहास, त्याची शौर्यगाथा अबाधीत रहावे, या करिता गेल्या सहा वर्षांपासून स्वच्छतेच्या उपक्रमासाठी मी पुढाकार घेत आहे. त्याला यश फाउंडेशन, क्रिस्टल संस्था, आयुष आंबेडकरी युवा संघ, स्वच्छ संस्था, आधार पुनावाला संस्था, पेरणे ग्रामपंचायतचे स्वच्छता कर्मचारी या सामाजिक संघटनांची देखील मोलाची साथ मिळत आहे.

या वेळी सुनिल माने, जितेंद्र गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी, निर्भय प्रतीष्ठानचे निखिल गायकवाड, आयुष आंबेडकरी युवा मंचचे सुनिल धतराज व सहकारी, स्वच्छ संस्थाचे चेतन हरनामे व कर्मचारी, आधार पुनावालाचे मल्हार करवंदे, नागेश पवार व सहकारी, पथारी संघटनेचे विजय कांबळे, संदीप चाबुकस्वार तसेच पेरणे ग्रामपंचायतचे सरपंच रुपेश ठोंबरे यांची मोलाची साथ लाभली.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.

बालरंजन केंद्राला यंदाचा ‘बाल कार्य सन्मान’ जाहीर 

0

श्री शिवाजी कुल संस्थेचा १०५ वा वर्धापनदिन ; कुलरंग महोत्सवाचे आयोजन
पुणे :’मुलांनी मुलांसाठी चालविलेली चळवळ’ असे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या भारतातील सर्वात जुन्या स्काऊट-गाईड खुल्या पथकांपैकी एक असलेल्या सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाचे १०५ वे वर्ष आहे. त्यानिमित्ताने श्री शिवाजी कुल व माजी कुलवीर संघातर्फे दिनांक ७ व ८ जानेवारी २०२३ रोजी साहित्यसम्राट विजय तेंडूलकर नाटयगृह, राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल, शिवदर्शन येथे कुलरंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात यंदाचा बाल कार्य सन्मान कर्वे रस्ता भारती निवास सोसायटी येथील बालरंजन केंद्राला प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलाच्या कार्यकारी कुलमुख्य श्रावणी कदम यांनी दिली.  
शनिवार, दिनांक ७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता कुलरंग महोत्सवाचे उद््घाटन होणार आहे. यावेळी प्रसिद्ध साहित्यिका व लेखिका डॉ.संगीता बर्वे, प्रख्यात चित्रकार राहुल देशपांडे यांसह अनेक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात संस्थेच्या कुलवार्ता या त्रैमासिक अंकाचे प्रकाशन देखील होणार आहे. 
सहाय्यक कुलमुख्य यश गुजराथी म्हणाले, रविवार, दिनांक ८ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता बाल कार्य सन्मान प्रदान समारंभ होणार आहे. पुण्यात ३५ वर्षे मुलांच्या शारिरीक, मानसिक विकासासाठी काम करणा-या बालरंजन केंद्र, भारती निवास सोसायटी, कर्वे रस्ता या संस्थेला यंदाचा बाल कार्य सन्मान देण्यात येणार असून सन्मान सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष आहे. 
समितीप्रमुख सानिका काकडे म्हणाल्या, पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला कर्नल सदानंद साळुंके (निवृत्त), अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष व श्री शिवाजी मराठा सोसायटीचे सेक्रेटरी अण्णा थोरात उपस्थित राहणार आहेत. सन्मानचिन्ह, भेटवस्तू असे सन्मानाचे स्वरुप आहे. बालरंजन केंद्राच्या माधुरी सहस्त्रबुद्धे व सहकारी सन्मान स्विकारणार आहेत. 
दोन्ही दिवशी सायंकाळी ५ ते ८  या वेळेत कुलवीरांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होणार आहेत. दोन दिवसीय महोत्सवाला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी व श्री शिवाजी कुलाच्या आजी-माजी कुलवीरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा ५० दिवसाचा काउन्ट डाऊन सुरु होणार

पुणे : पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) आणि पुणे महानगरपालिका यांच्या वतीने ८४ व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या काउन्ट डाऊन ५० आज पासून सुरु होणार आहे. मंगळवार  दिनांक ३ जानेवारी रोजी शिवाजीनगरमधील पीडीएमबीए स्पोर्टस काॅम्प्लेक्स येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप उपस्थित राहणार आहे. अशी माहिती पीडीएमबीएचे सचिव रणजीत नातु यांनी दिली.
यावेळी कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिरीष बोरालकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह, पी   डीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रणजीत नातु म्हणाले, १९९७ मध्ये ही स्पर्धा पुण्यात झाली होती त्या नंतर २५ वर्षांनी हा मान पुन्हा पुण्याला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स, थॉमस चषक आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील पदक विजेते भारतीय संघ सदस्य स्पर्धेत घेणे अपेक्षित आहे, यामुळे स्पर्धेची उंची वाढेल. पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, लक्ष्य सेन, सात्विक साईराज, चिराग शेट्टी, एच.एस. प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत, यासह अनेक नामांकित खेळाडू या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवणार आहेत. पीडीएमबीए यंदा अमृत महोत्सव साजरा करत आहे. पीडीएमबीए ला २०२१ मध्ये ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. 

जयस्तंभ अभिवादन सोहळा : उत्तम नियोजन आणि समन्वय

पेरणे येथील जयस्तंभ अभिवादन सोहळ्यात यावर्षी लाखो अनुयायी सहभागी झाले होते. नेहमीच्या तुलनेत अधिक प्रमाणात अनुयायी येऊनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने उत्तम नियोजन,अनुयायांची शिस्त, त्यांनी प्रशासनाला केलेले सहकार्य यामुळे सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सोहळ्यासाठी सहकार्य करणारे अनुयायी, विविध संस्था-संघटना आणि ग्रामस्थांना त्यासाठी विशेष धन्यवाद दिले.

सोहळ्याची तयारी गेल्या महिन्याभरापासून सुरू होती. कोरोनाचे निर्बंध दूर झाल्याने यावर्षी अधिक प्रमाणात अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोहळ्यासाठी अधिकच्या सुविधा देण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय आणि कार्यक्रमस्थळी विविध पातळ्यांवर बैठका घेण्यात आल्या. पूर्वतयारी करताना विविध संघटनांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले.

पोलीस दलाची चांगली कामगिरी

सोहळ्यासाठी ८ हजारपेक्षा अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी, ७४६ होमगार्ड्स आणि राज्य राखील दलाच्या ७ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पुणे शहरचे साडेपाच हजार तर पुणे ग्रामीणचे २ हजार ७०६ पोलीस अधिकारी- कर्मचारी तैनात होते.

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे १८५ सीसीटीव्ही आणि ३५० वॉकीटॉकी, ६ व्हिडीओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्व हालचालींवर पोलीसांचे लक्ष होते. एवढा मोठ्या जनसमुदायाचे नियंत्रण करताना पोलीस काही ठिकाणी अनुयायाना सहकार्य करतांनाही दिसत होते.

पुणे पोलिस आयुक्तालयातर्फे १०० सीसीटीव्ही, १० ड्रोन कॅमेरे, शंभर दुचाकीस्वार, १० दहशतवाद विरोधी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. सलग ३० तास बंदोबस्त तैनात करण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाहनतळाची तत्परतेने व्यवस्था

सार्वजनिक बांधकाम विभागाने जयस्तंभाची सजावट, परिसरातील नियोजन उत्तमरितीने केले. रस्त्याची दुरुस्ती, परिसरातील जमिनीचे सपाटीकरण अशी कामे अत्यंत कमी वेळात त्यांनी पूर्ण केली. चार ठिकाणी हायमास्ट, पीए सिस्टीम, २७ ठिकाणी स्वतंत्र जनित्राची व्यवस्था करण्यात आली. पूर्व विभागातर्फे सुमारे २ लाख चौरस मीटरचे ८ वाहनतळ तयार करण्यात आले होते. विविध विभागांसाठी आश्यक सुविधाही निर्माण करण्यात आल्या. दक्षिण विभागातर्फे ६० एकर परिसरात १४ वाहनतळ तयार करण्यात आले.

स्वच्छ आणि आरोग्यदायी सोहळा

जिल्हा परिषदेची आयोजनातली भूमिकाही तेवढीच महत्वाची होती. गेल्या वर्षापेक्षा अधिक स्वच्छता हे यावेळचे वैशिष्ठ्य होते. सोहळ्यानंतरही रात्रीतून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. ८० घंटागाड्यांच्या माध्यमातून ३ टन ओला आणि ८ टन कोरडा कचरा संकलीत करण्यात आला. १७५ ठिकाणी तात्पुरत्या कचाकुंड्या उभारण्यात आल्या होत्या. त्यासाठी २२५ स्वच्छता कर्मचारी २४ तास प्रयत्न करत होते.

विशेषत: जयस्तंभ व वाहनतळ परिसरातील १ हजार ५०० शौचालय सातत्याने स्वच्छ ठेवण्याचे काम आव्हानात्मक होते, ते स्वच्छता कर्मचाऱ्यांनी चांगल्यारितीने केले. ५ झेटींग यंत्र व मैला बाहेर काढण्यासाठी १५ सक्शन यंत्राचाही उपयोग करण्यात आला. शौचालयाचे ठिकाण नागरिकांना कळावे यासाठी आकाशात बलून सोडण्यात आले होते. हात धुण्यासाठी १५ हॅण्डवॉश स्टेशन बसविण्यात आले.

महिलांसाठी विशेष व्यवस्था

स्तंभ परिसर आणि वहानतळाच्या ठिकाणी महिलांसाठी चेंजिंग रुम उभारण्यात आल्या होत्या. स्तनदा मातांसाठी तीन ठिकाणी उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षांचा १६८ महिलांनी लाभ घेतला. कक्षात माता व बालकांसाठी आवश्यक सुविधा देण्यात आल्या. कक्षासाठी ३१ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

बीएसएनएलतर्फे माध्यम कक्ष व पोलीस नियंत्रण कक्षासाठी इंटरनेटची व्यवस्था करण्यात आली. सर्व मोबाईल कंपन्यांनी प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने यावर्षी कॉलड्रॉपच्या तक्रारी आल्या नाहीत. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून सकाळी ६ ते १२ या वेळेत सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. समाज माध्यमाद्वारेदेखील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण झाल्याने येथे येऊ न शकलेल्यांना घरबसल्या सोहळा पाहता आला.


सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार

बार्टी आणि सामाजिक न्याय विभागाने हा संपूर्ण सोहळा योग्यरितीने पार पाडण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली. विविध संघटनांशी समन्वय साधल्याने सोहळ्याचे योग्य नियोजन करणे शक्य झाले. एसडीआरएफ, एनडीआरएफ सारख्या संस्थांचेही आपत्तीव्यवस्थापनासाठी सहकार्य लाभले. महावितरणने अखंडीत वीज मिळावी यासाठी विशेष पथक नियुक्त केले होते.

अनुयायांसाठी बसेसची सोय

पीएमपीएलतर्फे ३१ जानेवारी रोजी तोरणा पार्किंग ( शिक्रापूर ते कोरेगाव) ३५ बसेस व इनामदार हॉस्पिटल पार्किंग ते वढु या मार्गावर ५ मिडी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. लोणीकंद कुस्ती मैदान ते पेरणे टोलनाका ४० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. १ जानेवारी रोजी तोरणा पार्किंग ते कोरेगाव ११५ बसेस व इनामदार हॉस्पिटल पार्कींग ते वढु २५ बसेस द्वारे रात्री ११ पर्यंत सेवा देण्यात आली. दुपारी गर्दी वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २२ अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या.

लोणीकंद ते पेरणे टोलनाका मार्गावर १४० बसेस विविध वाहनतळावरून उलपब्ध करून देण्यात आल्या. पुणे ते लोणीकंद करीता सुमारे ९० बसेस पुणे स्टेशन, मनपा भवन, पिंपरी, अप्पर इंदिरानगर आदी ठिकाणाहून उपलब्ध करून देण्यात आल्या. पीएमपीएमएलचे सुमारे ८५० चालक, वाहक व पर्यवेक्षकीय कर्मचारी व २५ डेपो मॅनेजर, इंजिनिअर अधिकारी नेमण्यात आले होते. बसेच्या सुमारे १० हजार फेऱ्याद्वारे ५ लाख अनुयायांनी लाभ घेतला.

वाहनतळावरील नियोजनही उत्तम होते. सर्व वाहनांची शिस्तीत ये-जा सुरू असल्याने वाहतूकीसाठी कोणतीही अडचण आली नाही. वाहतूक शाखेनेदेखील या मार्गावरील वाहतूक वळवून योग्य नियोजन केले.

आरोग्य सुविधा आणि तत्पर उपचार

आलेल्या अनुयायांना आरोग्यसुविधेचाही चांगला लाभ झाला. ४८ रुग्णवाहिका, ७ कार्डीयाक रुग्णवाहिका, १० आरोग्यदूत आणि २१ पथकांनी उत्तम आरोग्य सुविधा दिली. सुमारे २७ हजार बाह्यरुग्ण, २३०० स्क्रीनिंग, ४१ संदर्भित (सर्वांची प्रकृती स्थिर) रुग्णांची तपासणी व आवश्यकतेनुसार उपचार करण्यात आले.

यावर्षी पिण्याच्या पाण्याचीही चांगली व्यवस्था करण्यात आली. जिल्हा परिषदेने १५० टँकर्सची व्यवस्था केली होती. त्यापैकी साधारण ६० ते ७० टक्के पाणी वापरले गेले. पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती केली होती.

समूह भावनेमुळे सोहळा यशस्वी

प्रशासनातील विविध यंत्रणा, विविध संस्था आणि अनुयायांनी संवेदनशीलतेने आपले कर्तव्य पार पाडताना समूहभावनेचा उत्तम परिचय दिल्याने हा सोहळा यशस्वी झाला असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यांनी सर्वांना धन्यवाद देताना हा सोहळा समन्वयाचे आणि परस्पर सहकार्याचे उत्तम उदाहरण ठरेल अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

विविध सामाजिक संस्था व संघटनांनी अनुयायांसाठी स्वयंस्फुर्तीने भोजन, पिण्याचे पाणी, नाश्ता, चहा आदी व्यवस्था केली होती. स्थानिक नागरिकांनी आपल्या अंतिथ्यशिलतेचा परिचय देत अनुयायांचे स्वागत केले. एस्कॉनसारख्या संस्थेने पोलीसांच्या भोजनाची व्यवस्था केली. या सर्वांचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत.

मराठी भाषेच्या वैश्विक स्तरावर प्रचार व प्रसारासाठी मुंबईत “मराठी तितुका मेळवावा” विश्व मराठी संमेलन

0

मुंबई, दि. २ : मराठी भाषेचा सर्वांगीण प्रचार व प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी तसेच, सर्वांमध्ये मराठीतून संवाद करण्याची रुची निर्माण करण्यासाठी, दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करण्याकरिता “मराठी तितुका मेळवावा” या उदात्त हेतूने मराठी भाषा विभागामार्फत एक विश्व मराठी संमेलन मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. मुंबईतील वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडीया (NSCI) येथे दि. ४ ते ५ जानेवारी, २०२३ या कालावधीत हे विश्व मराठी संमेलन होणार असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

मंत्रालयातील वार्ताहर कक्षात मंत्री दीपक केसरकर यांनी “मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलनाच्या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकारांशी आज संवाद साधला.

मंत्री श्री.  केसरकर म्हणाले की, हे संमेलन म्हणजे मराठी संस्कृती, मराठी भाषा, मराठी परंपरा यांचा वैश्विक पातळीवर होणारा भव्य दिव्य उत्सव असणार आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि एकूणच मराठीवर प्रेम करणाऱ्या, महाराष्ट्राबाहेर  असणाऱ्या सर्व मराठी भाषिकांनी या संमेलनाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहनही  मंत्री श्री. केसरकर यांनी केले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील अन्य विभागाचे मंत्री तसेच केंद्रीय मंत्री हे संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.

या संमेलनाच्या निमित्ताने विविध उद्योग महाराष्ट्रामध्ये यावेत याकरिता गुंतवणूकदार व उद्योजक यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी दि. ६ जानेवारी रोजी महाराष्ट्रात गुंतवणूक करणारे मराठी उद्योजक व गुंतवणूकदार यांचा परस्पर संवाद सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे. संमेलनाच्या तीनही दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, परिसंवाद, परदेशातील मराठी जनांचे अनुभवकथन, वाद्यमहोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहित  मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.

जगभरातील विविध देशांमध्ये तसेच विविध राज्यांमध्ये वास्तव्य करत असणाऱ्या मराठी भाषिकांनी एकमेकांमध्ये संवाद साधावा, विचारांचे व कल्पनांचे आदान – प्रदान व्हावे. सक्षम, संपन्न आणि समृद्ध वैश्विक मराठी प्रतिमा निर्माण करण्यासाठी या संमेलनाच्या माध्यमातून वैश्विक मराठी व्यासपीठ मिळेल. लुप्त होत चाललेली वाद्य संस्कृती, खाद्य संस्कृती, वस्त्र संस्कृती यांचे सादरीकरण तसेच मराठी साहित्य, कला, संगीत या सर्व सांस्कृतिक अंगांचा परामर्ष घेणे हा सुध्दा या संमेलनाच्या आयोजनाचा हेतू आहे. यामध्ये लेझीम, ढोल, ताशांसारखे मराठी पारंपरिक खेळ, नाटक, लावणी, लोकसंगीत आदी मराठी पारंपरिक मनोरंजन, ग्रंथ प्रदर्शन, बचत गटांचे स्टॉल अशी मेजवानी उपस्थितांना मिळणार आहे. संमेलनाच्या तीनही दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे चर्चासत्रे, परिसंवाद, परदेशातील मराठी जनांचे अनुभवकथन, वाद्यमहोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विश्व मराठी संमेलनात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची विस्तृत माहिती मराठी तितुका मेळवावा https://www.marathititukamelvava.com या संकेतस्थळावर  पाहता येईल आणि संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी  या संकेतस्थळावर नाव नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी ९१ ९३०९४६२६२७ आणि ९१ ९६७३९९८६०० या मोबाईल क्रमांकावर संपर्क करता येईल.

संमेलनातील कार्यक्रमाची रूपरेषा

संमेलनाच्या तीनही दिवशी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी 4 जानेवारी रोजी लेझीम पथक, ढोलताशा पथक, मर्दानी खेळ यांच्या साथीने संमेलनाचे उदघाटन होणार आहे. उपस्थित मंत्री महोदय, मान्यवर मंडळी आणि निमंत्रितांचं स्वागत मराठमोळ्या पद्धतीने करण्यात येणार आहे. या सत्रात नचिकेत देसाई, केतकी भावे – जोशी, माधुरी करमरकर, मंगेश बोरगावकर, श्रीरंग भावे हे गायक कलाकार काही अजरामर मराठी गाणी सादर करतील. त्यानंतर रंग कलेचे हा वंदना गुप्ते, नीना कुळकर्णी, शिवाजी साटम, अशोक पत्की अशा सिने-नाट्य सृष्टीतील कलाकारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम होणार आहेत.तसेच लेखिका संजीवनी खेर, प्रकाशक हर्ष भटकळ, लेखक ऋषिकेश गुप्ते या साहित्यिकांच्या सहभागात मराठी भाषा काल आज उद्या हा परिसंवाद होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे या परिसंवाद सत्राच्या अध्यक्ष असून याप्रसंगी त्या साहित्याविषयी आपल मनोगत व्यक्त करणार आहेत. या सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे करणार आहे.

दुपारच्या सत्रात १० विविध क्षेत्रातील नामवंत महिलांचा मराठमोळा फॅशन शो होणार आहे. यात लेखिका, पटकथाकार मनीषा कोरडे, भाषा तज्ञ अमृता जोशी, झी स्टुडियोच्या क्रिएटिव्ह हेड वैष्णवी कानविंदे, क्रीडा प्रशिक्षक नीता ताटके, दिग्दर्शिका समृद्धी पोरे, लँडस्केप डिझायनर असीम गोकर्ण, अॅड. दिव्या चव्हाण, व्यावसायिक सुप्रिया बडवे, चित्रकार शुभांगी सामंत, पहिली कॅमेरा वूमन अपर्णा धर्माधिकारी या मान्यवर महिला सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन अभिनेत्री समिधा गुरु करणार आहे. संध्याकाळी लोकसंगीताचा कार्यक्रम होईल ज्यात नंदेश उमप, गणेश चंदनशिवे, उर्मिला धनगर, वैशाली भैसने माडे हे कलाकार असतील व त्यानंतर चला हसुया या विनोदी कार्यक्रमाचं सादारीकरण होईल. या कार्यक्रमात चला हवा येऊ द्या फेम सर्व कलाकारांचा सहभाग असणार आहे.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात स्वर अमृताचा ही मराठी भावगीत, भक्तीगीत आणि नाट्यसंगीताची मैफल सादर होणार आहे. यात ज्येष्ठ गायक श्रीधर फडके, आशा खाडिलकर आणि उत्तरा केळकर हे दिग्गज सहभागी असणार आहेत. त्यानंतर मराठी पाऊल पडते पुढे हे परिसंवाद सत्र होईल. या सत्रात चितळे डेरीचे गिरीश चितळे आणि हावरे इंजिनिअर्स आणि बिल्डर्सच्या उज्ज्वला हावरे हे भारतातील २ नामवंत उद्योजक आणि “जर्मनीतील ओंकार कलवडे, सॅनफ्रान्सिस्कोतील प्रकाश भालेराव हे भारताबाहेरील २ उद्योजक सहभागी होतील. तसेच विविध क्षेत्रात आकाशझेप घेतलेल्या आणि मराठी माणूस हा प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे हे दाखवून देणाऱ्या काही मराठी मान्यवरांच्या मुलाखती होणार आहेत. या कार्यक्रमात BMM अध्यक्ष संदीप दिक्षित, पूर्णब्रम्हच्या जयंती कठाळे, सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अॅड गुरु भरत दाभोलकर हे मान्यवर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी करणार आहेत.

दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ‘साहित्य आणि संस्कृती’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. त्यानंतर विविध लोकवाद्यांची मैफल, वाद्यमहोत्सव महाताल सादर होईल. तसंच रसिकांना आपल्या चिंता विसरून हास्याच्या विश्वात नेणारे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकार काही विनोदी प्रहसन सादर करणार आहेत. या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन दिप्ती भागवत करणार आहेत. संध्याकाळच्या सत्रात कृष्णा मुसळे आणि निलेश परब यांची अनोखी वाद्य जुगलबंदी सादर होणार आहे. तसंच २०० ते २५० कलाकारांच्या साथीने महासंस्कृती लोकोत्सव हा भव्य कार्यक्रम सादर होणार आहे.

संमेलनाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवसाची सुरुवात पारंपरिक वारकरी संप्रदायाचं दर्शन घडवणाऱ्या वारकरी दिंडीने होईल. त्यांनतर मराठी खाद्यसंस्कृती लोकांसमोर यावी आपले विविध पारंपरिक पदार्थ उपस्थितांना पाहता यावे या दृष्टीने एक पाककला स्पर्धा पार पडणार आहे. यानंतर इन्व्हेस्टर मीट हे अगदी महत्त्वपूर्ण सत्र पार पडणार आहे. भारतातील आणि भारताबाहेरील उद्योजक यावेळी एकत्र येणार आहेत आणि उद्योग क्षेत्राची प्रगती, गुंतवणुकीच्या संधी अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या सत्रात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री अशा अनेक मान्यवरांचा सहभाग असणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत आलेल्या सर्व उद्योजकांशी आणि गुंतवणूकदारांशी विशेष संवाद साधणार आहेत. दुपारच्या सत्रात आनंदयात्री हा कविता वाचन, अभिवाचन आणि गाण्यांचा कार्यक्रम सादर होईल. या कार्यक्रमातून प्रसिद्ध कलाकार ऐश्वर्या नारकर, पुष्कर श्रोत्री आणि आनंद इंगळे मराठी साहित्यातील काही अजरामर कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करतील तर सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी गाजलेली मराठी गाणी सादर करतील. या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक करणार आहेत.

विकासकामे वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्नशील राहण्याची गरज – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. २ : जिल्ह्यातील लोकहिताची विकासकामे दर्जेदार व्हावीत, यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची तरतूद केली जाते. या योजना यशस्वीपणे विहित मुदतीत कार्यरत व्हाव्यात यासाठी संबंधित विभागांनी व यंत्रणा प्रमुखांनी दक्षता घ्यावी व मुंबई शहराच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असावे, असे आवाहन मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

पालकमंत्री श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ चा आढावा घेण्यात येऊन लोकहिताच्या विविध कामांना निधी मंजूर करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रामुख्याने पोलीस वसाहतीसाठी शासनाने मान्यता दिलेल्या ३१.५० कोटींच्या निधीतून वाडी बंदर पोलीस वसाहतीच्या देखभाल दुरूस्तीसाठी ६.१९ कोटी रुपये, शिवडी पोलीस वसाहतीसाठी ४.९९ कोटी, ताडदेव पोलीस वसाहतीसाठी २.४६ कोटी, बॉडीगार्ड पोलीस वसाहतीसाठी २.५० कोटी, भायखळा पोलीस वसाहतीसाठी २.६० कोटी, काळाचौकी पोलीस वसाहतीसाठी ५.१० कोटी तर डोंगरी पोलीस वसाहतीसाठी १.९२ कोटी असे एकूण २५.७६ कोटी रूपये मंजूर करण्यात आले असून या निधी अंतर्गत तातडीने कामे सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

शासकीय रुग्णालयांना यंत्र सामग्री व इतर सुविधा

या योजनेअंतर्गत जे. जे. हॉस्पिटलला कॅथलॅबसाठी ५.७८ कोटी रूपये, गोकुळदास तेजपाल रूग्णालयाला एमआरआय, एक्स-रे मशीन व सिटीस्कॅन मशीनसाठी १३.५७ कोटी, कामा व अल्ब्लेस रूग्णालय येथे आयव्हीएफ केंद्रासाठी ४.६३ कोटी, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाला डेंटल व्हॅन व यंत्रसामग्री साठी २.०४ कोटी तर सेंट जॉर्ज रुग्णालयाला यंत्रसामग्री व औषधीसाठी ४.१५ कोटी असा एकूण ३५.९५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. म.आ. पोद्दार रुग्णालय येथील केंद्रीयकृत रोग निदान प्रयोगशाळेची स्थापना करणे तसेच रक्त तपासणी प्रयोगशाळेची स्थापना करण्यासाठी एक कोटी व बांधकामासाठी २.८२ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

कामगार कल्याण मंडळाच्या इमारतीमधील बॅडमिंटन कोर्ट, जिम्नॅशियम हॉल व व्यायाम शाळा, आर्ट गॅलरी, लायब्ररी, ओपन बाल्कनी, स्टोअर रूम, स्विमिंग पूल, चेंजिंग रूम या बाबी अद्ययावत तयार करण्यासाठी ३.८५ कोटी रुपयांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात आला.

नागरी दलितेतर पायाभूत सुविधांसाठी ९६.११ कोटी, अंगणवाडी येथील सोयी सुविधा अंतर्गत २० अंगणवाड्या स्मार्ट करणे व ८० अंगणवाड्यांना जादुई किलबिल खुर्ची उपलब्ध करून देण्यासाठी २.४८ कोटी, महिला व बाल सशक्तीकरण योजनेअंतर्गत उमरखाडी येथील बालसुधारगृहात नुतनीकरणासाठी ४.७० कोटी तसेच डेव्हिड ससून येथील बालसुधारगृहास ३.३१ कोटी रूपये मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्यात आला.

किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी २.५० कोटींच्या निधीस मंजुरी देऊन १.५० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. तर राज्य ग्रंथालय एशियाटिक लायब्ररीच्या नुतनीकरणासाठी ४० लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. मत्स्य विकास कार्यक्रमअंतर्गत सागरी मच्छीमारांना शीतपेटीसाठी ३४ लक्ष तसेच माहीम नाखवा मच्छीमार सहकारी संस्था, माहीम कोळीवाडा येथे जेट्टीचा प्लॅटफॉर्म वाढवण्यासाठी २.३१ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

शासकीय महाविद्यालयांचा विकास या योजनेअंतर्गत एल्फिन्स्टन महाविद्यालयासाठी २.६३ कोटी, शासकीय विज्ञान संस्थेसाठी २.७८ कोटी, न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेसाठी ४४ लक्ष, सिडनहॅम व्यावसायिक उद्योग शिक्षण व संशोधन संस्थेसाठी ४७ लक्ष, सिडेनहॅम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयासाठी २० लक्ष, राज्य प्रशासकीय संस्थेसाठी २९ लक्ष तर शासकीय अध्यापक महाविद्यालयासाठी ३५ लक्ष असा एकूण ७.१४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये यंत्रसामग्री पुरवणे व आधुनिकीकरण करणे यासाठी एक कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या वर्कशॉप इमारतीसाठी ७८ लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती, पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिली.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे धान्य मोफत; लाभ घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असणारे अन्नधान्य १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत पात्र लाभार्थ्यांना मोफत वितरीत करण्याचा निर्णय केंद्र शासनाने जाहीर केला आहे. डिसेंबर २०२२ चे धान्य घेतले नाही अशा लाभार्थ्यांनी जानेवारी २०२३ मध्ये या दोन्ही महिन्यांचे धान्य मोफत प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ, २ रुपये दराने गहू आणि १ रुपये प्रतिकिलो दराने भरडधान्य वितरीत करण्यात येते. तथापि, केंद्र शासनाने २८ डिसेंबर रोजीच्या पत्राने सदर अन्नधान्य सन २०२३ मध्ये मोफत वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे, असे श्रीमती माने यांनी कळवले आहे.
0000

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक – 2023

विद्यापीठ प्राधिकरण निवडणूकीच्या प्राथमिक मतदार याद्या जाहिर

नाशिक: (दि. 02) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विविध प्राधिकरण व अभ्यासमंडळावरील सदस्य निवडीकरीता निवडणूकीच्या अनुषंगाने ‘प्राथमिक मतदार’ याद्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहिर करण्यात आल्या आहेत.
विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठ अधिनियमात निर्देशित केल्यानुसार विद्यापीठ अधिसभा, विद्यापरिषद व अभ्यासमंडळावरील सदस्य यांच्या निवडीकरीता प्रत्येक पाच वर्षानंतर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येते. त्याव्दारा विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील मान्यताप्राप्त शिक्षकांतून विद्यापीठ प्राधिकरण सदस्यांची निवडणूक प्रक्रियेव्दारे निवड करण्यात येते. यासाठी निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने प्राथमिक मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. सदर मतदार याद्या विद्यापीठाचे www.muhs.ac.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाकडून प्रसिध्द प्राथमिक मतदार यादीतील हरकती असल्यास दि. 03 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यापीठाकडे ई-मेलव्दारा अथवा विद्यापीठाचे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर व लातूर येथील विभागीय केंद्रात लेखी स्वरुपात पुराव्याचे कागदपत्रांसह नोंदवू शकतात. याबाबत अधिक माहिती व सूचना विद्यापीठाचे निदेश क्र. 10/2017 मध्ये नमुद करण्यात आले आहेत. विहित वेळेत प्राप्त हरकतींवर मा. कुलगुरु यांचे समक्ष सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीचा निर्णय विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यसात येईल. मा. कुलगुरु यांनी घेतलेला निर्णय अंतीम व बंधनकारक राहिल.
विद्यापीठ प्राधिकरण निवडणूक वेळापत्रक व अंतीम मतदार याद्या मा. कुलगुरु महोदया यांच्या सुनवणीनंतर स्वतंत्र्यरित्या जाहिर करण्यात येईल. निवडणूक प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यापीठ निवडणूक कक्षास 0253-2539151 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

जिल्हा प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे जयस्तंभ अभिवादन सोहळा शांततेत आणि उत्साहात संपन्न

सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या अनुयायांना धन्यवाद-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे दि.२: पेरणे येथील जयस्तंभ अभिवादन सोहळ्यात यावर्षी लाखो अनुयायी सहभागी झाले होते. नेहमीच्या तुलनेत अधिक प्रमाणात अनुयायी येऊनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने उत्तम नियोजन करण्यात आल्याने सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पडला. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सोहळ्यासाठी सहकार्य करणारे अनुयायी, विविध संस्था-संघटना आणि ग्रामस्थांना धन्यवाद दिले आहेत.

सोहळ्याची तयारी गेल्या महिन्याभरापासून सुरू होती. कोरोनाचे निर्बंध दूर झाल्याने यावर्षी अधिक प्रमाणात अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेता पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोहळ्यासाठी अधिकच्या सुविधा देण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस आयुक्तालय आणि कार्यक्रमस्थळी विविध पातळ्यांवर बैठका घेण्यात आल्या. पूर्वतयारी करताना विविध संघटनांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले.

सोहळ्यासाठी ८ हजारपेक्षा अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी, ७४६ होमगार्ड्स आणि राज्य राखील दलाच्या ७ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पुणे शहरचे साडेपाच हजार तर पुणे ग्रामीणचे २ हजार ७०६ पोलीस अधिकारी- कर्मचारी तैनात होते.

पुणे ग्रामीण पोलीस दलाचे १८५ सीसीटीव्ही आणि ३५० वॉकीटॉकी, ६ व्हिडीओ कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्व हालचालींवर पोलीसांचे लक्ष होते. एवढा मोठ्या जनसमुदायाचे नियंत्रण करताना पोलीस काही ठिकाणी अनुयायाना सहकार्य करतांनाही दिसत होते.

पुणे पोलिस आयुक्तालयातर्फे १०० सीसीटीव्ही, १० ड्रोन कॅमेरे, शंभर दुचाकीस्वार, १० दहशतवाद विरोधी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. सलग ३० तास बंदोबस्त तैनात करण्यात आला.

सार्वजनिक बांधकाम विभागाने जयस्तंभाची सजावट, परिसरातील नियोजन उत्तमरितीने केले. रस्त्याची दुरुस्ती, परिसरातील जमिनीचे सपाटीकरण अशी कामे अत्यंत कमी वेळात त्यांनी पूर्ण केली. चार ठिकाणी हायमास्ट, पीए सिस्टीम, २७ ठिकाणी स्वतंत्र जनित्राची व्यवस्था करण्यात आली. पूर्व विभागातर्फे सुमारे २ लाख चौरस मीटरचे ८ वाहनतळ तयार करण्यात आले होते. विविध विभागांसाठी आश्यक सुविधाही निर्माण करण्यात आल्या. दक्षिण विभागातर्फे ६० एकर परिसरात १४ वाहनतळ तयार करण्यात आले.

जिल्हा परिषदेची आयोजनातली भूमिकाही तेवढीच महत्वाची होती. गेल्या वर्षापेक्षा अधिक स्वच्छता हे यावेळचे वैशिष्ठ्य होते. सोहळ्यानंतरही रात्रीतून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. ८० घंटागाड्यांच्या माध्यमातून ३ टन ओला आणि ८ टन कोरडा कचरा संकलीत करण्यात आला. १७५ ठिकाणी तात्पुरत्या कचाकुंड्या उभारण्यात आल्या होत्या. त्यासाठी २२५ स्वच्छता कर्मचारी २४ तास प्रयत्न करत होते.

विशेषत: जयस्तंभ व वाहनतळ परिसरातील १ हजार ५०० शौचालय सातत्याने स्वच्छ ठेवण्याचे काम आव्हानात्मक होते, ते स्वच्छता कर्मचाऱ्यांनी चांगल्यारितीने केले. ५ झेटींग यंत्र व मैला बाहेर काढण्यासाठी १५ सक्शन यंत्राचाही उपयोग करण्यात आला. शौचालयाचे ठिकाण नागरिकांना कळावे यासाठी आकाशात बलून सोडण्यात आले होते. हात धुण्यासाठी १५ हॅण्डवॉश स्टेशन बसविण्यात आले.

स्तंभ परिसर आणि वहानतळाच्या ठिकाणी महिलांसाठी चेंजिंग रुम उभारण्यात आल्या होत्या. स्तनदा मातांसाठी तीन ठिकाणी उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षांचा १६८ महिलांनी लाभ घेतला. कक्षात माता व बालकांसाठी आवश्यक सुविधा देण्यात आल्या. कक्षासाठी ३१ महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

बीएसएनएलतर्फे माध्यम कक्ष व पोलीस नियंत्रण कक्षासाठी इंटरनेटची व्यवस्था करण्यात आली. सर्व मोबाईल कंपन्यांनी प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने यावर्षी कॉलड्रॉपच्या तक्रारी आल्या नाहीत. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून सकाळी ६ ते १२ या वेळेत सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. समाज माध्यमाद्वारेदेखील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण झाल्याने येथे येऊ न शकलेल्यांना घरबसल्या सोहळा पाहता आला.

बार्टी आणि सामाजिक न्याय विभागाने हा संपूर्ण सोहळा योग्यरितीने पार पाडण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली. विविध संघटनांशी समन्वय साधल्याने सोहळ्याचे योग्य नियोजन करणे शक्य झाले. एसडीआरएफ, एनडीआरएफ सारख्या संस्थांचेही आपत्तीव्यवस्थापनासाठी सहकार्य लाभले. महावितरणने अखंडीत वीज मिळावी यासाठी विशेष पथक नियुक्त केले होते.

पीएमपीएलतर्फे ३१ जानेवारी रोजी तोरणा पार्किंग ( शिक्रापूर ते कोरेगाव) ३५ बसेस व इनामदार हॉस्पिटल पार्किंग ते वढु या मार्गावर ५ मिडी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. लोणीकंद कुस्ती मैदान ते पेरणे टोलनाका ४० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. १ जानेवारी रोजी तोरणा पार्किंग ते कोरेगाव ११५ बसेस व इनामदार हॉस्पिटल पार्कींग ते वढु २५ बसेस द्वारे रात्री ११ पर्यंत सेवा देण्यात आली. दुपारी गर्दी वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २२ अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या.

लोणीकंद ते पेरणे टोलनाका मार्गावर 1१४० बसेस विविध वाहनतळावरून उलपब्ध करून देण्यात आल्या. पुणे ते लोणीकंद करीता सुमारे ९० बसेस पुणे स्टेशन, मनपा भवन, पिंपरी, अप्पर इंदिरानगर आदी ठिकाणाहून उपलब्ध करून देण्यात आल्या. पीएमपीएमएलचे सुमारे ८५० चालक, वाहक व पर्यवेक्षकीय कर्मचारी व २५ डेपो मॅनेजर, इंजिनिअर अधिकारी नेमण्यात आले होते. बसेच्या सुमारे १० हजार फेऱ्याद्वारे ५ लाख अनुयायांनी लाभ घेतला.

वाहनतळावरील नियोजनही उत्तम होते. सर्व वाहनांची शिस्तीत ये-जा सुरू असल्याने वाहतूकीसाठी कोणतीही अडचण आली नाही. वाहतूक शाखेनेदेखील या मार्गावरील वाहतूक वळवून योग्य नियोजन केले.

आलेल्या अनुयायांना आरोग्यसुविधेचाही चांगला लाभ झाला. ४८ रुग्णवाहिका, ७ कार्डीयाक रुग्णवाहिका, १० आरोग्यदूत आणि २१ पथकांनी उत्तम आरोग्य सुविधा दिली. सुमारे २७ हजार बाह्यरुग्ण, २३०० स्क्रीनिंग, ४१ संदर्भित (सर्वांची प्रकृती स्थिर) रुग्णांची तपासणी व आवश्यकतेनुसार उपचार करण्यात आले.

यावर्षी पिण्याच्या पाण्याचीही चांगली व्यवस्था करण्यात आली. जिल्हा परिषदेने १५० टँकर्सची व्यवस्था केली होती. त्यापैकी साधारण ६० ते ७० टक्के पाणी वापरले गेले. पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती केली होती.

प्रशासनातील विविध यंत्रणा, विविध संस्था आणि अनुयायांनी संवेदनशीलतेने आपले कर्तव्य पार पाडताना समूहभावनेचा उत्तम परिचय दिल्याने हा सोहळा यशस्वी झाला असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यांनी सर्वांना धन्यवाद देताना हा सोहळा समन्वयाचे आणि परस्पर सहकार्याचे उत्तम उदाहरण ठरेल अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

विविध सामाजिक संस्था व संघटनांनी अनुयायांसाठी स्वयंस्फुर्तीने भोजन, पिण्याचे पाणी, नाश्ता, चहा आदी व्यवस्था केली होती. स्थानिक नागरिकांनी आपल्या अंतिथ्यशिलतेचा परिचय देत अनुयायांचे स्वागत केले. एस्कॉनसारख्या संस्थेने पोलीसांच्या भोजनाची व्यवस्था केली. या सर्वांचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष आभार व्यक्त केले आहेत.
0000

श्री क्षेत्र भिमाशंकर विकास आराखड्यातील ०.२८७ हेक्टर वन जमीन वळतीकरणास मान्यता

पुणे, दि. २: श्री क्षेत्र भिमाशंकर विकास आराखड्यातील पायरी मार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी खेड तालुक्यातील मौजे भोरगिरी व आंबेगाव तालुक्यातील मौजे निगडाळे येथील एकूण ०.२८७ हेक्टर वन जमीन वळतीकरण करण्यासाठी केंद्र शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता रा. य. पाटील यांनी दिली आहे.

राखीव वन क्षेत्राअंतर्गत भोरगिरी येथील गट क्रमांक १३० (सी. नं. २०१- क्षेत्र ०.०८४ हेक्टर) निगडाळे येथील गट क्रमांक २४४ (सी.नं. २०० ए- क्षेत्र ०.१६८, ०.०२० व ०.०१५ हेक्टर ) अशी एकूण ०.२८७ हेक्टर वन जमीन वळतीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

वन जमीन वळतीकरणास मान्यता देतांना पुढील अटी व शर्तीचे अधीन राहून मान्यता दिली आहे. प्रकल्प यंत्रणा वन (संवर्धन) अधिनियम, १९८० अंतर्गत केंद्र शासनाने तत्वत: मान्यता दिलेल्या आदेशातील सर्व अटींचे पालन केल्याची उप वनसंरक्षक (वन्यजीव) पुणे यांनी खात्री करावी. अधिनियमातील अटींचे अनुपालन न करणाऱ्यांवर वैधानिक कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करण्यात येऊ नये. मजुरांचे वास्तव्यासाठी वनक्षेत्रात तात्पुरते निवारा केंद्र उभारण्यात येऊ नये. हे मान्यता आदेश १ वर्षापर्यंत वैध राहतील, असेही श्री. पाटील यांनी कळवले आहे.

मोदींनी युक्रेन युध्द थांबविले-पण इकडे उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला- जे. पी. नड्डा

चंद्रपूर -युक्रेन युध्द सुरू असताना पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी बोलून युक्रेन युध्द थांबविले होते. त्यानंतर भारतातील ३२ हजार विद्यार्थ्यांना युध्द भूमितून भारतात आणले. जोवर विद्यार्थी भारतात परतले नाही तोवर युध्द थांबवून ठेवले. अमेरिका, ब्रिटेन, पाकिस्तान यांनाही जे करता आले नाही असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात यश मिळावे यासाठी नड्डा यांनी न्यू इंग्लिश हायस्कूलच्या क्रीडांगणावर ‘विजय संकल्प’ जाहीर सभेच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी ते बोलत होते.शौर्य व विरतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप त्याबरोबर त्यांनी केला. यावेळी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यपालन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष  हंसराज अहिर, खासदार अशोक नेते, खा. रामदास तडस, आमदार संजीव रेड्डी, आ.डॉ.रामदास आंबटकर व आ. बंटी भंगाडिया, ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे उपस्थित होते.

नड्डा म्हणाले, महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी अशी भ्रष्टाचाराची तीन दुकाने उघडली. सत्तेसाठी विचारांशी तडजोड करणाऱ्या अशा लोकांना माफी नाही. राजकारणात सत्याचा नेहमीच विजय होतो. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समोर माथा टेकता टेकता  ठाकरे यांचा माथाच झुकला आहे. भाजपने जनाधार, जनधन, आधार व मोबाईल असा एकत्रित जॅम केला.  तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मात्र ज्वाईन्टली एक्वायर मनी अशा पध्दतीने केवळ पैसा ओरबाडण्याचे काम केले. याच भ्रष्टाचारामुळे राज्यातील दोन मंत्री कारागृहात गेले. त्यातील एक माजी मंत्री नुकतेच कारागृहातून सुटून बाहेर आले तर एक कारागृहात अजूनही शिक्षा भोगत आहेत.काँग्रेसच्या काळात मेंदूज्वर, पोलिओ, जापनीज ताप यावर लस येण्यास अनेक वर्ष गेली. मात्र करोना संकटात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अवघ्या नऊ महिन्यात भारतात दोन करोना लसींची निर्मिती केली. कधीकाळी मोबाईल आयात करावे लागत होते. आज ९७ टक्के मोबाईलचे उत्पादन भारतात होते. प्रधानमंत्र्यांच्या पाच किलो गहू, तांदूळ, दाळ या मोफत धान्य योजनेचा लाभ ८० कोटी नागरिकांना होत आहे. परिणामी, भारतात अतिगरीबी एक टक्क्यापेक्षा अधिकने कमी झाली आहे. याप्रसंगी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष,माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांचीही भाषणे झाली. संचालन ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी तर आभार डॉ. मंगेश गुलवाडे यांनी मानले.

चित्रा वाघ कडाडल्या; उघड्या-नागड्या मुली चालणार नाहीत, उर्फीला थोबडवून काढणार

*धर्मवीर संभाजीनगर* हे नामकरण करा-अजितदादा माफी मागा !

नाशिक -या अशा उघड्यानागड्या मुली महाराष्ट्रात चालणार नाही. ज्यादिवशी ती मला भेटेल तिला मी थोबडवून काढेल. मात्र महाराष्ट्रात हे चालू देणार नाही., हे आम्ही खपवून घेणार नाही.असे उर्फी प्रकरणात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.भाजपा महिला मोर्चाच्या वतीने नाशिक येथे अजित पवारांविरोधात भाजप महिलामोर्चा नाशिक यांनी आंदोलन करून निषेध नोंदवला यावेळी चित्रा वाघ आमदार सीमाताई हिरे उपस्थित होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना उर्फिच्या प्रश्नावर त्या बोलत होत्या. ,’चित्रा वाघ यांनी कालच उर्फी जावेद विरोधात तक्रार दाखल केली आहे. तिनेही वाघ यांच्यावर प्रतिउत्तरात टीका केली आहे. उर्फी जावेदला प्रत्युत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या, आम्ही काय काम करतोय याबाबत मला उर्फीसारख्या उर्फट बाईला सांगायची गरज वाटत नाही. ज्या पद्धतीने नंगानाच याठिकाणी चालू आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. मला या उर्फटबाई विषयी माहितही नव्हते मात्र एका 9 वर्षीय मुलीच्या आईने जिच्या मुलीवर अत्याचार झाला होता त्या आईने मला याविषयी सांगितले की मुंबईच्या रस्त्यांवर काय सुरुय बघा.

*धर्मवीर संभाजीनगर* हे नामकरण करा-अजितदादा माफी मागा !

कुठलाही विषय नसताना अजितदादा छत्रपती संभाजी महाराजांवर का बोलले? याला मुद्दाम समाजातील वातावरण गढूळ करणे म्हणतात. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. त्यांना मी मागणी करणार आहे की, औरंगाबादचे नाव आता धर्मवीर संभाजीनगर करा. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यावर टीका करताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते. ते धर्मवीर नव्हते, असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं होत. त्यावरून त्यांच्यावर सर्वबाजूने टीका होत आहे. अजित पवार यांनी माफी मागावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा भाजपच्या अध्यात्मिक आघाडीने दिला आहे. राष्ट्रवादीकडून अजित पवारांची पाठराखण केली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, मागे राहुल गांधीच्या सद्भावना प्रेमाच्या कुठल्या यात्रेसाठी ते आले होते आणि सावरकरांबद्दल बोलून त्यांचा अपमान करुन निघून गेले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी धर्माच्या रक्षणासाठी आपल्या अतुलनीय पराक्रमाने ते मुघलांना कसे सामोरे गेले त्यांनी काय काय भोगलं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. आणि अशावेळेला अजितदादांसारख्या प्रगल्भ नेत्याने ते धर्मवीर नव्हते असं म्हणण दुर्दैवी आहे.

पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, आता औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर होत आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आहे. त्यांना मी मागणी करणार आहे की, औरंगाबादचे नाव आता धर्मवीर संभाजीनगर करा. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा विरोध म्हणून भाजप 2 दिवस संपूर्ण राज्यात आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नवीन मराठी शाळेचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण

पुणे -डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा उद्घाटन समारंभ बुधवारी (4 जानेवारी) सकाळी 11.00 वाजता शाळेच्या प्रांगणात होणार असल्याची माहिती शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर आणि ज्येष्ठ माजी विद्यार्थी प्रभाकर भावे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून उद्योजिका स्मिता घैसास कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असल्याचे साठे यांनी सांगितले.

मुख्याध्यापिका कल्पना वाघ, शिक्षक धनंजय तळपे, तनुजा तिकोने, भाग्यश्री हजारे, प्रिया इंदूलकर, अर्चना देव, वंदना कदम यांची पत्रकार परिषदेला प्रमुख उपस्थिती होती.

वाघ म्हणाल्या, ‘सर्व 22 वर्गांमध्ये स्मार्ट टीव्हीसह ई-लर्निंगची सुविधा, कायम स्वरूपी विज्ञान प्रदर्शन, संगीत, चित्रकला, मातीकाम यासाठी सुसज्ज वर्ग, 50 संगणकासह सुसज्ज संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालयाचे अधुनिकीकरण, शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण, सौरऊर्जा प्रकल्प, ठिबक सिंचन योजना, बगिचाचे सुशोभिकरण, पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहे, पाण्याच्या टाक्यांची क्षमता वाढविणे आदी योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून समाजातील दानशूर व्यक्ती आणि माजी विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन करीत आहे. अधिक माहितीसाठी 020-67656820 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.’

नवीन मराठी शाळेची स्थापना 4 जानेवारी 1899 मध्ये झाली. महर्षी धोंडो केशव कर्वे शाळेचे पहिले शालाप्रमुख होते. इंग्रजी संभाषण, संगणकाचे शिक्षण, मौखिक संस्कृत, गणित प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, स्वतंत्र ग्रंथालय आणि वैशिष्टयपूर्ण उपक्रमांमुळे ही मराठी माध्यमाची शाळा आपला दर्जा आणि गुणवत्ता टिकवून आहे. नव्या-जुन्याची सांगड घालत परंपरांचे जतन आणि आधुनिकतेची कास धरून विद्यार्थी घडवत आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांतून विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत असताना, या शाळेत प्रवेशासाठी प्रतिक्षा यादी लावावी लागत आहे.

बीआरटीलेन भ्रष्टाचारासाठी कि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ?

पुणे-केंद्राकडून शेकडो कोटींचा निधी लाटून आणलेल्या बीआरटी ला ती येण्यापूर्वी पासूनच विरोध होता होता . रस्ते रुंद करा , वाहतूक सुरळीत करा असे सर्वांचेच म्हणणे होते , बीआरटी ने त्याच काळात माध्यमांची पानेच्या पाने रंगविली , अचाट सुंदरतेचे स्वप्न दाखविले प्रत्येक स्थानकावर फोन, वेळापत्रक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासह बाजूचा खाजगी वाहनांसाठीचा रस्ता , सायकल मार्ग आणि विशेष म्हणजे प्रत्येक दुभाजकावर हिरवळ ,असे सुंदर चित्रे रंगवून दाखविली गेली ,पण या चित्रांत वाहने मात्र तुरळक दिसत होती .आणि सारे कसे एखाद्या देशातील सुंदर तैलचित्रा प्रमाणे होते .पण याच बीआरटी च्या प्रश्नावरून तत्कालीन महापालिकेतील सत्ता उलथवून पाडली गेली . बीआरटी आल्यावर ९ दिवसात तिचे कौतुक गायब झाले होते . आणि स्पष्ट जाणवू लागला भ्रष्ट कारभार.. … बी आर टी आणल्याने बीआरटी ची लेन तर झाली पण शहरात बहुसंख्य असलेल्या वाहनांची याच लेन ने कोंडी करून त्यांना जेरीस आणले . तेव्हा महापालिकेतील वाहतूक नियोजक यांचे वाक्य होते , हेच तर पाहिजे आपल्याला .. यांची कोंडी वाढली कि हेच लोक बीआरटी कडे आपसूक वळतील आणि शहरात खाजगी वाहने वापरण्याचा वेग आपोआप कमी होईल . सुरुवातीला या बीआरटीच्या लेन मधून एसटी ला हि बंदी होती , चुकून जरी घुसली तरी दंड होता. एकीकडे कोणीही वापरत नाही असा सायकल मार्ग बाजूला धूळ खात पडला होता , पोलीसही या मार्गावर येणाऱ्या खाजगी वाहन चालकांचे गळे धरत होते . आणि बीआरटी लेन मध्ये घुसणाऱ्या खाजगी वाहनांना हि पकडण्याची शर्यत लागली होती.चारही बाजूंनी खाजगी वाहनांची अशी कोंडी होत असतानाही आश्चर्य म्हणजे पुण्यातील खाजगी वाहनांच्या खरेदीत दिवसेंदिवस वाढच होत गेली. हे का होतेय ? याची जराही दाखल कोणाला घ्यावी का वाटली नाही . कारण तो प्रश्न अगदी सामान्य स्तरावरील आम माणसाचा प्रश्न होता . पुण्यात काम करायचे , नौकरी करायची तर स्वतःची दुचाकी हवीच हि अट खुद्द बीआरटी वर नाराज कशाला ? असा प्रश्न कायम उपस्थित करणाऱ्यांच्या कंपनीत देखील होतीच . वारंवार बाहेर ये जा कराव्या लागणाऱ्याना नौकरी , व्यवसायात खाजगी वाहन असणे अजूनही पुण्यात गरजेचे आहेच. बीआरटी आणि सार्वजनिक बस किंवा ऑटो वर अवलंबून राहून या पुण्यात कामधंदा करणे किंवा पोट भरणे निव्वळ अगदी ठराविक लोकांनाच शक्य होते तेच अजूनही याच सेवेचा वापर करत आहेत. पण त्यांनाही नंतर नंतर हि सेवा बाईक पेक्षाही महाग, किचकट वाटू लागते . एकीकडे लाखो लोक बीआरटी आणि बसने ने प्रवास करतात , बसेस तुडुंब भरून वाहतात असे चित्र असताना दुसरीकडे पीएमटी /पीएमपीएमएल सातत्याने तोट्यात जात होतीच . याच पुणेकरांकडून अन्य मार्गे कर वसूल करून जमा केलेली शेकडो कोटीची रक्कम हा तोटा भरून काढण्यासाठी पीएमटी/पीएमपीएमएल यांना देण्यात येत होती आणि अजूनही देण्यात येत आहे. अगदी हीच सेवा फुकट ठेवली तरीही तिचा खर्च लोकांच्याच पैशातून वसूल केला जाणार आहे .पण तरीही हि बस सेवा सर्वाना सोयीची होऊ शकेल काय ? हा प्रश्न बीआरटी वर नाराज कशाला? असा प्रश्न करणारांना विचारला गेला पाहिजे. बीआरटी ला तसा विरोध का होतो हेच हि मंडळी समजून घ्यायला तयार नाही हे खरे शल्य आहे. शहरात वाहने किती आहेत , खाजगी किती ? कोणत्या प्रकारची किती ? त्यांचा वापर का होतो ? अजूनही लोक खाजगी वाहनांच्या खरेदीकडे का वळतात ? अशा कोणत्याच प्रश्नाचे मुळ न शोधता बीआरटी वर नाराज कशाला ? असा प्रश्न उपस्थित करणे अतार्किक वाटत नाही काय ? .बीआरटी कल्पना म्हणून नक्कीच चांगली होती व आहे. पण गेली कित्येक वर्षात बीआरटीची मूळ कल्पना साकारण्यात ज्यांना यश आले नाही त्यांनी बीआरटीचा आग्रह कायम रेटत ठेवला आहे. त्यांना साथ देण्यापेक्षा या बीआरटी प्रकल्पावर झालेल्या आजवरच्या अब्जावधी च्या खर्चाची चौकशीची मागणी केली आणि यशस्वीपणे तिच्या मुळात शिरून पाहिले तर त्यांना बीआरटी पुण्यात अयशस्वी का झाली, आणि तेच बीआरटी चा विरोध कसा मोडून काढतात याचे उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. बीआरटी च्या एका स्थानकावर , दुभाजकावर किती खर्च होतो प्रत्यक्षात किती व्हायला हवा , बस खरेदी चे दर काय आहेत हे पाहिले तर यात पुणेकरांची लुट झाली कि नाही हे ते सांगू शकतील . म्हणजेच इथे पहिला प्रश्न असा निर्माण होतो कि तुम्हाला बीआरटी हवी कशाला ? वाह्तुक सुरळीत करायलाच हवी असेल तर प्रामाणिकता त्यासाठी अत्यंत गरजेची आहे,मग स्वतंत्र लेन जरूर घ्या , पण ती किमान 70 टक्के पुणेकरांना सोयीची ठरेल ,कामाची ठरेल, वापरता येईल अशी बीआरटी बनली तर कोण कशाला खाजगी वाहने वापरतील? पण तसे नाही .हे वास्तव आहे.

तेव्हा आता बीआरटी चे समर्थन जरूर करा पण त्या आधी या बीआरटीच्या नावाने झालेला आर्थिक गैरकारभार चव्हाट्यावर मांडा, आणि यापुढे तो होणार नाही , आणि नाही झाला तर तो बीआरटी च्या विकासावर खर्च होऊन बीआरटी सदृढ होईल ,७० टक्के लोकांच्या ती कामी येईल त्यांच्या नौकरी- व्यवसायाला ती आवश्यक बनेल अशी बनली तर खचितच कोणीही बीआरटी तळी उचलतील अन्यथा.. तळी उचलणाऱ्यांना प्रश्न विचारतील बीआरटीलेन हवी कशाला रे भाऊ ?

सर्वोच्च न्यायालयात 69,598, उच्च न्यायालयात 59,57,704 तर अधीनस्थ न्यायालयांत 4,28,21,378 खटले प्रलंबित-सरकारची अधिकृत माहिती वाचा

वर्ष अखेर आढावा 2022 : न्याय विभाग, कायदा आणि न्याय मंत्रालय

न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली:

उच्च न्यायालयांमध्ये 165 न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली, जी एका वर्षातील सर्वाधिक नियुक्ती आहे – अलाहाबाद उच्च न्यायालय (13), आंध्र प्रदेश (14), मुंबई (19), कलकत्ता (16), छत्तीसगड (3), दिल्ली (17), गुवाहाटी (2), हिमाचल प्रदेश (2), जम्मू आणि काश्मीर आणि लडाख (4), झारखंड (1), कर्नाटक (6), केरळ (1), मध्य प्रदेश (6), मद्रास (4), ओरिसा (6), पाटणा (11), पंजाब आणि हरियाणा (21), राजस्थान (2), तेलंगणा (17).

उच्च न्यायालयांमध्ये ३८ अतिरिक्त न्यायाधीशांना सेवेत कायम करण्यात आले – अलाहाबाद उच्च न्यायालय (10), मुंबई (4), कलकत्ता (6), हिमाचल प्रदेश (1), कर्नाटक (3), केरळ (4), मद्रास (9), मणिपूर (1).

02 अतिरिक्त न्यायाधीशांचा कार्यकाळ वाढवण्यात आला – मुंबई उच्च न्यायालय (1) आणि मद्रास (1).

08 मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली – गुवाहाटी (1), हिमाचल प्रदेश (1), जम्मू आणि काश्मीर आणि लडाख (1) कर्नाटक (1), मद्रास (1), तेलंगणा (1), राजस्थान (1), उत्तराखंड (1) उच्च न्यायालये 1).

02 मुख्य न्यायमूर्तींची एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली करण्यात आली.

06 उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या उच्च न्यायालयात बदली करण्यात आली.

टेलि-लॉ :

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवांतर्गत, न्याय विभागाने 8-14 नोव्हेंबर या नियोजित आठवड्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

विभागाने त्यांच्या टेलि-लॉ अंतर्गत लॉगिन सप्ताह मोहीम सुरू केली: तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या हक्कासंबंधी दावा करण्यासाठी तसेच त्यांच्या अडचणींचे वेळेवर निराकरण करण्यासाठी खटला पूर्व सल्ल्यासाठी अधिक प्रोत्साहन देणे. 4200 जागरुकता सत्रांद्वारे 52000 हून अधिक लाभार्थ्यांपर्यंत ही सेवा पोहोचवण्यात आली आणि सुमारे 17000 लोकांना टेलि-लॉ अंतर्गत व्हिडिओ/ टेलिकॉन्फरन्सिंग सुविधेद्वारे वकीलांच्या समर्पित पूलद्वारे कायदेशीर सल्ला प्रदान करण्यात आला. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी टेली-लॉ ऑन व्हील्स मोहीम देखील सुरू करण्यात आली होती ज्यात व्हिडिओ, रेडिओ जिंगल आणि टेली-लॉ पत्रकांच्या वितरणाद्वारे टेलि-लॉचा संदेश प्रसारित करण्यासाठी विशेष टेलि-लॉ ब्रँडेड मोबाइल व्हॅन देशाच्या विविध भागात फिरल्या.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA):

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने (NALSA) लोकअदालतच्या फ्लोटसह प्रजासत्ताक दिन परेड, 2022 मध्ये भाग घेतला. लोकअदालतच्या माध्यमातून सर्वसमावेशक कायदेशीर व्यवस्थेचे प्रदर्शन करणारी NALSA च्या चित्ररथाची संकल्पना “एकमुठी आस्मान” होती. चित्ररथाच्या पुढच्या भागात ‘न्याय सबकेलिये’, निर्भयता, हमी आणि संरक्षणाचा भाव दाखवणारा हात तर मागील बाजूस, लोकअदालतीची पाच मार्गदर्शक तत्त्वे – सुलभ, निश्चित, परवडणारे, न्याय्य आणि वेळेवर – सर्वांसाठी न्याय दर्शवणारा एक हात आपली पाच बोटे एक-एक करून उघडताना दिसतो.

ई – कोर्टस (eCourts) प्रकल्प:

ई-कोर्ट इंटिग्रेटेड मिशन मोड प्रकल्प हा तंत्रज्ञानाचा वापर करून न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला. प्रकल्पाचा दुसरा टप्पा 2015 मध्ये सुमारे 1,670 कोटी रुपये खर्चासह सुरू करण्यात आला असून त्यापैकी सुमारे 1668.43 कोटी रुपये सरकारने प्रदान केले आहेत. टप्पा II अंतर्गत, आतापर्यंत 18,735 जिल्हा आणि अधीनस्थ न्यायालये संगणकीकृत करण्यात आली आहेत.

WAN प्रकल्पाचा एक भाग म्हणून, OFC, RF, VSAT इत्यादी विविध तंत्रज्ञानाचा वापर करून 2992 न्यायालयीन संकुलांपैकी 2973 (99.3% साइट्स) ना 10 Mbps ते 100 Mbps बँडविड्थ गतीने कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यात आली आहे.

शोध तंत्रज्ञानासह विकसित नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिड (NJDG) चा वापर करून, वकील आणि याचिकाकर्ते 21.44 कोटी केसेस आणि 19.40 कोटी पेक्षा जास्त आदेश/ निर्णयांची सद्य स्थितीची माहिती मिळवू शकतात.

हितधारकांच्या सुविधेसाठी नवीन ‘जजमेंट अँड ऑर्डर सर्च’ पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले आहे. https://judgments.ecourts.gov.in वर संपर्क साधता येईल. ई-कोर्ट प्रकल्पाने ई-गव्हर्नन्ससाठी गेल्या तीन वर्षांपासून सलग राष्ट्रीय पुरस्कारासह विविध पुरस्कार पटकावले आहेत.

जिल्हा आणि अधीनस्थ न्यायालयांमधील रिक्त पदे भरणे

घटनात्मक चौकटीनुसार, दुय्यम न्यायालयांमध्ये न्यायाधीशांची निवड आणि नियुक्ती ही उच्च न्यायालये आणि राज्य सरकारांची जबाबदारी आहे. सर्वोच्च न्यायालयाने, मलिक मजहर प्रकरणात न्यायालयीन आदेशाद्वारे, दुय्यम न्यायव्यवस्थेतील रिक्त पदे भरण्यासाठी अनुसरण करण्याची प्रक्रिया आणि कालमर्यादा तयार केली आहे. न्याय विभाग राज्य आणि उच्च न्यायालयांसह जिल्हा आणि अधीनस्थ न्यायालयांमधील रिक्त पदे भरण्याची जबाबदारी घेत आहे. न्याय विभाग मासिक आधारावर जिल्हा आणि अधीनस्थ न्यायालयातील न्यायिक अधिकार्‍यांच्या रिक्त पदांचा अहवाल आणि देखरेख करण्यासाठी त्यांची वेबसाइटवर MIS वेब पोर्टलची पाहणी करतो.

न्यायालयांमध्ये प्रलंबित खटले

खटले निकाली काढणे हे न्यायव्यवस्थेच्या कक्षेत आहे. तथापि, राज्यघटनेच्या कलम 39A अन्वये दिलेल्या आदेशानुसार न्याय मिळवून देण्यासाठी, खटले जलद निकाली काढण्यासाठी आणि प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या न्याय वितरण आणि कायदेशीर सुधारणांसाठी राष्ट्रीय मिशनने जिल्हा आणि अधीनस्थ न्यायालयांच्या न्यायिक अधिकार्‍यांसाठी पायाभूत सुविधांची [कोर्ट हॉल आणि निवासी युनिट्स] सुधारणा, माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानाचा (ICT) लाभ घेणे, उत्तम न्याय वितरण, उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची रिक्त पदे भरणे, जिल्हा, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय स्तरावरील थकबाकी समित्यांकडून पाठपुरावा करून प्रलंबिततेचे प्रमाण कमी करणे, वैकल्पिक विवाद निराकरणावर (एडीआर) भर आणि विशेष प्रकारच्या प्रकरणांसाठी जलदगती न्यायालय यासह अनेक धोरणात्मक उपक्रमांचा स्वीकार केला आहे. 6 डिसेंबर 2022 पर्यंत सर्वोच्च न्यायालयात 69,598 खटले प्रलंबित आहेत. 6 डिसेंबर 2022 पर्यंत उच्च न्यायालये आणि जिल्हा तसेच अधीनस्थ न्यायालयांमधील प्रलंबित खटल्यांची संख्या अनुक्रमे 59,57,704 आणि 4,28,21,378 आहे.

संविधान दिन सोहळा

1949 मध्ये संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली आणि या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी दरवर्षी संविधान दिन साजरा केला जातो. राज्यघटना हा एक मजबूत पाया आहे ज्यावर भारतीय राष्ट्र उभे आहे आणि येणाऱ्या प्रत्येक वर्षाने नवी उंची गाठत आहे.

26.11.2022 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात संविधान दिन साजरा करण्यात आला. उद्घाटन सत्रात भारताचे पंतप्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि भारताचे माननीय राष्ट्रपती समापन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमादरम्यान, माननीय पंतप्रधानांनी व्हर्च्युअल जस्टिस क्लॉक, जस्टीस मोबाईल ॲप 2.0, डिजिटल कोर्ट आणि जिल्हा न्यायालयांच्या s3WaaS वेबसाइट्स हे चार ई-उपक्रमांचा आरंभ करण्यात आला.

26.11.2022 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात संविधान दिनाच्या समारंभात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई-कोर्ट प्रकल्पाशी संबंधित 4 नवीन उपक्रम सुरू करण्यात आले. पंतप्रधानांनी पुढील गोष्टींचा परिचय करून दिला.

(a) व्हर्च्युअल जस्टिस क्लॉक

व्हर्च्युअल जस्टिस क्लॉक हा न्यायालय स्तरावरील न्याय वितरण प्रणालीची महत्त्वाची आकडेवारी प्रदर्शित करण्याचा उपक्रम आहे ज्यामध्ये न्यायालय स्तरावर दिवस/ आठवडा/ महिना आधारावर स्थापित प्रकरणे, निकाली काढण्यात आलेली प्रकरणे आणि प्रलंबित प्रकरणांची माहिती दिली जाते. न्यायालयाद्वारे खटल्यांच्या निकालाची स्थिती लोकांसोबत शेअर करून न्यायालयांचे कामकाज उत्तरदायी आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न आहे. जनता जिल्हा न्यायालयाच्या वेबसाइटवर कोणत्याही न्यायालयीन आस्थापनाच्या व्हर्च्युअल जस्टिस क्लॉकमध्ये प्रवेश करू शकते.

(b) JustIS मोबाइल ॲप 2.0

JustIS मोबाइल ॲप 2.0 हे एक प्रभावी साधन आहे ज्याचा वापर न्यायाधीश त्यांच्या न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या खटल्यांचा तसेच त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या न्यायाधीशांचा मागोवा ठेवून त्यांची न्यायालये आणि खटले प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी वापरू शकतात. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आता त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक राज्याच्या आणि जिल्ह्याच्या स्थितीचे या ॲपचा वापर करून निरीक्षण करू शकतात, जे त्यांनाही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

(c) डिजिटल कोर्ट

डिजिटल कोर्ट उपक्रमाचा उद्देश न्यायाधिशांना डिजिटल स्वरूपात न्यायालयीन नोंदी उपलब्ध करून देऊन पेपरलेस न्यायालयात रुपांतरण सक्षम करणे हाच आहे.

(d) जिल्हा न्यायपालिकेसाठी S3WaaS वेबसाइट्स

S3WaaS (सुरक्षित, मानीत आणि सुगम्य वेबसाईट सेवा) ही सरकारी संस्थांसाठी विकसित केलेली प्रणाली आहे ज्याचा वापर करून सानुकूल वेबसाइट तयार केल्या जाऊ शकतात, ज्या सहज संपादितही केल्या जाऊ शकतात. त्याद्वारे, पारदर्शकता, सुलभता आणि लोकांपर्यंत माहितीचा अखंड प्रसार सुनिश्चित केला जातो. हे संकेतस्थळ दिव्यांग-अनुकूल, बहुभाषिक आणि नागरिकांसाठी अनुकूल आहे.