Home Blog Page 1469

‘पीएमआरडीए’च्या घरांच्या वीजजोडणीसाठी भोसरी शाखा कार्यालयात मदत कक्ष सुरू

पुणे, दि. ३० जून २०२३पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणकडून (पीएमआरडीए)जाधववाडी, सेक्टर १२ येथील प्रकल्पात लाभार्थ्यांना परवडणाऱ्या घरांचा ताबा देण्यात आला आहे. या लाभार्थ्यांना नवीन वीजजोडणी देण्यासाठी महावितरणकडून वेगाने कार्यवाही सुरू असून भोसरी गाव येथील शाखा कार्यालयामध्ये विशेष मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीने वीजजोडणीचे आमिष दाखवून आर्थिक मागणी केल्यास त्यास लाभार्थ्यांनी कोणताही प्रतिसाद देऊ नये. तसेच नवीन वीजजोडणीच्या संदर्भात काही तक्रारी असल्यास शाखा अभियंता, भोसरी गाव व अतिरिक्त कार्यकारी अभियंता, भोसरी उपविभाग यांच्याशी थेट संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.  

भोसरी गाव येथील शाखा कार्यालयात नवीन वीजजोडणीच्या कामासाठी ग्राहक सुविधा केंद्राचे आणखी दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांना वीजजोडणीसाठी ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल, त्यांनी केवळ आवश्यक कागदपत्रांसह भोसरी गाव शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा. या ठिकाणी ऑनलाइन अर्ज भरणे, कागदपत्रांची तपासणी करून त्याची पूर्तता करून घेणे, कोटेशन देणे व त्याचा भरणा केल्यानंतर क्रमवारीनुसार नवीन मीटर उपलब्ध करून वीजजोडणी कार्यान्वित करणे आदी कार्यवाही करण्यात येत आहे.

महावितरणकडे मुबलक प्रमाणात नवीन वीजमीटर उपलब्ध असून पीएमआरडीच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सर्वच सुमारे ३ हजार १०० घरांना नवीन वीजमीटर देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत नवीन वीजजोडणीचे १९१९ अर्ज प्राप्त झाले असून १५०९ ग्राहकांना कोटेशन देण्यात आले आहे. यात कोटेशनचा भरणा केलेल्या १३६७ ग्राहकांकडे नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्यांना ऑनलाइन अर्ज भरता येत नाही त्या लाभार्थ्यांनी घराचे ताबापत्र (अलॉटमेंट लेटर), ताबापत्रावरील व्यक्तीचे आधारकार्ड आदी आवश्यक कागदपत्रांसह भोसरी गाव शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयाचे नवीन जागेत स्थलांतर

मुंबई, दि. 30 :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयाचे तात्पुरत्या स्वरूपात नवीन जागेत स्थलांतर होत आहे. नवीन कार्यालय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) भांबुर्डा, आगरकर रोड, आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटरच्या मागे, शिवाजीनगर, पुणे-411004 येथे कार्यरत राहील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागांतर्गत शासन अंगीकृत राज्यस्तरीय शैक्षणिक स्वायत्त संस्था आहे. परिषदेमार्फत विभागीय परीक्षा, व्यावसायिक परीक्षा, शिष्यवृत्ती विषयक परीक्षा इत्यादीबाबत आयोजन करण्यात येते. परिषदेचे कार्यालय 17, डॉ.आंबेडकर मार्ग, लाल देवळासमोर, कॅम्प, पुणे-411001 येथे कार्यरत होते. सद्यस्थितीत परिषदेच्या राज्यस्तरीय कार्यालयासाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम करण्याचे प्रयोजन असल्याने तात्पुरत्या स्वरूपात परिषदेच्या कार्यालयाचे सोमवार दि. 3 जुलै 2023 पासून नवीन जागेत स्थलांतर करण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांमार्फत देण्यात आली आहे.

शरद पवारांचे स्टेटमेंट गुगली नाही; ती गाजराची पुंगी

मुंबई भाजपा अध्यक्ष आ ॲड. आशिष शेलार

मुंबई: दिनांक ३० जून २०२३
शरद पवार यांचे स्टेटमेंट म्हणजे गुगली वगैरे काही नाही ती गाजराची पुंगी आहे. वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली असे आहे, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर केली.

ते पुढे म्हणाले की, पवारांची ती पुंगी शिवसेनेबरोबर वाजेल की, आमच्याबरोबर येऊन वाजेल यासाठी वाजवलेली आहे. जिथे वाजली तिथे वाजवली. नाही वाजली तिथे खावून टाकली. याला आम्ही गुगली वगैरे मानत नाही. ही सत्तेची वखवख आहे. सत्तेसाठी काय पण हा उद्योगधंदा म्हणजे शरद पवारांची त्या काळातील वेगवेगळ्या पक्षांशी केलेली चर्चा आहे. या विषयावर देवेंद्रजीं बोलल्यानंतर अर्धसत्य बाहेर आलं. या विषयावर जाहीर चर्चेला आम्ही तयार आहोत. संपूर्ण सत्य समोर येईल. या गाजराच्या पुंगी वाजवण्यात त्रिफळाचीत कोण झाला असेल तर तो उद्धवजी यांचा पक्ष आहे. ते अजूनही भुल दिल्यासारखे आहेत. शरद पवारांच्या या गाजारांच्या पुंगीमुळे उद्धवजींचा पक्ष, नाव, सत्ता, हिंदुत्व, वंदनीय बाळासाहेबांचे विचार गेले. ‘कहीपर निगाहे कही पर निशाना’ यामुळे उद्धवजी यांचा पक्ष संपला. एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव किती योग्य होता हे शरद पवार यांच्यामुळे आज कळले. मा. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी पहिल्या दिवसापासून हेच उध्दव ठाकरे यांना सांगत होते की, राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला संपवायला चालले आहे. ते आपल्याशी डबल गेम खेळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसवर भरोसा ठेवू नका. ते कधी बदलतील सांगता येत नाही असे सांगत होते. आज शरद पवार साहेबांनी स्पष्ट केले आहे की, ते आमच्याशी बोलायला तयार झाले. बोलत होते; बोलले… याचा अर्थ ते शिवसेनेची प्रामाणिक नव्हते. पहिल्याही दिवशी नव्हते आजही नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव हा किती योग्य आणि त्याला वैचारिक अधिष्ठान होते याचे पुरावे शरद पवार साहेबांनी आज दिले असे आ. ॲड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत यांना चेहऱ्यावर थुंकी उडवून घ्यायची सवय

संजय राऊत यांनी उडवलेली खिल्ली स्वपक्षाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला अपमानित करणारी आहे. त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारची उडवलेली खिल्ली याचा अर्थ ते महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख समजतात काय? असा प्रश्न जनतेच्या मनात आहे. जनतेचा कौल भाजपा- शिवसेनेला होता. जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले. त्याची खिल्ली उडवणे म्हणजे जनतेला मूर्ख समजून स्वतःचा टेंबा मिरवणे असे आहे. स्वतःचा टेंबा त्यांनी कितीही मिरवला तरी कोंबडा आरवायचा थांबणार नाही. सूर्य उगवायचा थांबणार नाही. सूर्यावर थुंकणारे स्वतःच्या चेहऱ्यावर थुंकी उडवून घेतील. संजय राऊत यांना स्वतःच्या चेहऱ्यावर थुंकी उडवून घ्यायची सवय आहे हे काही नवीन नाही अशी टीका आ. ॲड. आशिष शेलार यांनी केली.

“हॅकिंगच्या विळख्यात “चॅट-जीपीटी” चे वापरकर्ते “

कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधरित “चॅट जीपीटी” सारख्या सुविधा तुम्ही वापरत असाल तर तुमचे अकाउंट हॅक होऊन त्यातून सर्व गोपनीय माहिती विकली जात असल्याच्या घटना अलीकडे घडल्या आहेत. भारतासह जगभरातील किमान १ लाख व्यक्तींची खाती “हॅक ” झाल्याची धक्कादायक माहिती आहे. जागतिक हॅकर्सने “चॅट जीपी टी ” द्वारे घातलेल्या गोंधळाचा घेतलेला हा आढावा. त्याच्या वापरकर्त्यांसाठी हा सावधगिरीचा इशारा ठरावा.

गेल्या काही महिन्यांमध्ये भारतातील संगणक आणि इंटरनेट यांचा वापर करणाऱ्या व्यक्तींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असलेल्या सारख्या “चॅट जीपीटी” सारख्या सुविधांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. जी मंडळी या चॅट जीपीटी चा राजरोसपणे किंवा बिनधास्तपणे वापर करत आहेत त्यांची संगणकातील गोपनीय, व्यक्तिगत माहिती चोरून अन्य कोणाला विकली जात असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे.

नोव्हेंबर 2022 मध्ये संपूर्ण जगाला आश्चर्याच्या धक्का देणारी घटना घडली. ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून “ओपन ए आय” कंपनीने चॅटबॉट सुविधा विकसित करून “चॅट जीपीटी” तंत्रज्ञान व्यापारी तत्वावरील वापरासाठी बाजारात सादर केले. या चॅट जीपीटीचे वैशिष्ट्य असे आहे की त्याचा वापर करणाऱ्याला कोणत्याही विषयावरील माहिती संभाषण केल्यासारखी उपलब्ध होते. त्याला कोणतीही मर्यादा नाही, जगातील कोणत्याही विषयाचे वावडे नाही. तसेच त्यात उपलब्ध होणारे तपशील, त्याची पद्धती, भाषा याचे कोणतेही बंधन नाही. कोणत्याही विषयावरील लेख, संवाद, काव्यरुप तेथे उपलब्ध होते. मानवी बुद्धिला विचार किंवा आपल्या सर्जन शीलतेला मागे टाकणाऱ्या कोणत्याही गोष्टी या कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून विनाविलंब सहजगत्या उपलब्ध होतात. अभ्यासातील अवघड गणिते, कोडी, त्यांची उत्तरे, निबंध, लेख या सुविधा यात मिळतात. अगदी संगणक प्रणाली म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगही येथे क्षणार्धात मिळते. त्यामुळे जानेवारी 2023 मध्ये चॅट जीपीटी ही जगभरातील ग्राहकांनी सर्वाधिक वापरलेले, सर्वाधिक लोकप्रिय ठरलेले ‘सॉफ्टवेअर’ ठरले होते. यावेळी जगातील किमान १० कोटी व्यक्ति त्याचा दररोज मुक्तपणे वापर करीत होते. तर दररोज किमान वीस लाख व्यक्ति त्यास भेट देत होते. त्याच्या विक्रीमुळे ओपन एआय चे बाजारमूल्य तब्बल 29 बिलीयन डॉलर्सवर गेले. हे अभूतपूर्व यश पाहिल्यावर त्याला अनेक स्पर्धकही बाजासत आले. त्यात गुगल, मेटाव्हर्स यांनी त्यांच्या स्पर्धक सुविधा बाजारात आणल्या. फेब्रुवारी 2023 मध्ये दरमहा केवळ वीस डॉलर इतकी रक्कम देऊन ( म्हणने आपले 1700 रुपये ) खर्च करून त्याचा सुलभ वापर करता येऊ लागला. त्यात सतत विविध मूल्यवर्धित भर पडत गेली. अनेक भाषात ही सुविधा उपलब्ध झाली.

हे तंत्रज्ञान नवीन असल्यामुळे ग्राहकांना नादास लावण्यासाठी प्रारंभी मोफत सेवा देण्यास प्रारंभ केला. नंतर थोडे शुल्क घेऊन त्याचे ग्राहक जगभर भराभर वाढत राहिले, त्यामुळे आज जगात अक्षरशः कित्येक लाख लोक या चॅट जीपीटी चॅट बॉट चा मनसोक्त वापर करत आहेत. ग्रुप आयबीने याबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे की एशिया पॅसिफिक, मध्यपूर्व आफ्रिका आणि युरोपातील अनेक देशांमध्ये चॅट जीपीटीची सुविधा वापरली जात आहे. मात्र संगणकावरील वापरकर्त्यांची संगणकावरील माहिती चोरण्यात आली असून ती डार्क वेब वर विकण्यासारखी उपलब्ध करण्यात आली. यामध्ये चॅट जीपीटी वापरणाऱ्या व्यक्तींचे ईमेल, वेब ब्राउझर , मेसेजेस गेमिंग सर्विसेस, क्रिप्टो करन्सी बॅलन्स व अन्य माहिती चोरण्यात आलेली आहे. या माहितीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान किंवा फटका बसण्याची शक्यता वाढली आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून जी मंडळी व्यवसायातील अत्यंत गोपनीय माहिती बँकांची खाती किंवा पैशांचे व्यवहार याबाबत माहिती( विदा) (डेटा) ठेवत असतील त्यांना याचा नक्की मोठा धोका निर्माण झालेला आहे.

सिंगापूर मधील “ग्रुप आयबी” या संस्थेने अलीकडेच या हॅकिंग बाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. जागतिक पातळीवर “चॅट जीपीटी ” सुविधेचा वापर करणाऱ्या एक लाख पेक्षा जास्त व्यक्तींची खाती हॅक करण्यात आली असून त्यांची सर्व माहिती व्यक्तिगत माहिती, तपशील चोरून त्याची विक्री करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामध्ये भारतातील किमान 12 हजार पेक्षा जास्त व्यक्तिंची खाती हॅक करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भारता खालोखाल पाकिस्तान मधील 9 हजार खाती हॅक करण्यात आली. या हॅकिंग साठी रॅकून ( Raccoon), विदार ( Vidar) आणि रेड लाईन (Red line) अशी चोऱ्या करणारी मालवेअर म्हणजे संगणक प्रणाली प्रामुख्याने वापरण्यात आली आहेत. साधारणपणे जून 2022 ते मार्च 2023 दरम्यान हे हॅकिंग राजरोसपणे झाले. मात्र चॅट जीपीटीचा वापर करणाऱ्या कोणालाही याची कल्पना आली नाही . भारतीयांनाच या चोरीचा मोठा फटका बसलेला आहे. अन्य देशांचा विचार करता पाकिस्तानात 6 हजार 500; इजिप्त 4 हजार 500; अमेरिका जवळपास 3 हजार; फ्रान्स 2 हजार 900; इंडोनेशिया 2 हजार 555; बांगला देश 2 हजार 463 इतकी खाती हॅक करण्यात आली. मध्यपूर्व, आफ्रिका व युरोपातील हजारो व्यक्तींची खाती हॅक करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे चेक पॉईंट रिसर्च
( सीपीआर) या संस्थेनेही या हॅकिंग बाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात येऊन त्यात हॅकिंग ची महिती देण्यात आली.

एका ज्येष्ठ संगणक तज्ञाने याबाबत आणखी माहिती देताना असे सांगितले की चॅट जीपीटी बरोबर संवादातून माहिती गोळा करत असतानाच हॅकर्सनी अनेक व्यक्तींची किंवा त्यांच्या कंपनीची गोपनीय संवेदनशीत माहिती चोरली असून त्याची विक्री केली आहे. चॅट बॉट द्वारे दिली जाणारी माहिती अचूक नाही व नसते. मात्र कोणतेही निर्बंध या प्रणालीवर नाहीत. एकंदरीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्याच्या विविध सुविधा वापरणे हे जास्तीत जास्त धोकादायक बनत चालले आहे. त्यामुळेच त्याचा वापर करणे हे सुरक्षित राहीलेले नाही याची गंभीर नोंद सर्व वापरकर्त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे.

(लेखक: प्रा. नंदकुमार काकिर्डे)

*(लेखक पुणेस्थित ज्येष्ठ अर्थविषयक पत्रकार आहेत)

जुलैमध्ये राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार होणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर-जुलै महिन्यात राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतचा निर्णय घेतील, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे अखेर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लवकरच निश्चित होणार असल्याचे दिसत आहे.

देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री उशिरा दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचे सूत्र ठरल्याची माहिती आहे.

बैठकीबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठीच काल दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. याशिवाय आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील. जुलैमध्ये आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू.

दरम्यान, भाजपश्रेष्ठी शिवसेनेच्या काही मंत्र्यांच्या कारभारावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तार करताना या मंत्र्यांची हकालपट्टी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनीही शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाईल, असा दावा केला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यांना कोणतीही बातमी मिळाली नाही, तेच लोक अशा बातम्या पेरतात. यात कोणतीही विश्वासार्हता नाही.

शिंदे गटाच्या दोन नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही शिवसेनेच्या दोन मंत्र्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत, असे वक्तव्य केले. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्राचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, हे आम्हाला माहिती नाही. केंद्राच्या व राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. आम्हाला राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात जास्त इंटरेस्ट आहे.

‘मोदी@9’लोकांपर्यंत स्वहस्ते पोहोचविण्याच्या संजय काकडे यांच्या कामाचे पालकमंत्र्यांकडून कौतुक

पुणे-माजी खासदार संजय काकडे हे रस्त्यावर फिरून ,घरोघरी, दुकानोदुकानी , हॉटेलात फिरून नागरिकांच्या पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाची पुस्तिका स्वहस्ते पोहोचवीत आहेत त्यांचे हे कार्य निश्चित कौतुकास्पद आहे असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे . दरम्यान शिवाजीनगर मतदार संघ काकडे यांनी ढवळून काढला , काल सकाळपासून या मतदारसंघात त्यांनी रात्री उशिरापर्यंत नागरिकांशी संपर्क साधला आणि पुस्तिकेचे वाटप केले .

राहुल गांधींनी मणिपूर हिंसाचार पीडितांची घेतली भेट; मोइरांगच्या मदत शिबिरात पोहोचले

हिंसाचारात 131 जणांना आपला जीव गमवावा लागला
मणिपूरमध्ये 3 मेपासून कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 131 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 419 जण जखमी झाले आहेत. 65,000 हून अधिक लोकांनी आपली घरे सोडली आहेत. जाळपोळीच्या 5 हजारांहून अधिक घटना घडल्या आहेत. 6 हजार गुन्हे दाखल करण्यात आले असून 144 जणांना अटक करण्यात आली आहे.हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंटरनेट बंदी 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यात 36 हजार सुरक्षा कर्मचारी आणि 40 आयपीएस तैनात करण्यात आले आहेत.

इंफाळ-मणिपूर दौऱ्यावर आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी मोइरांग येथील मदत शिबिरात हिंसाचारग्रस्तांची भेट घेतली. राहुल आज सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांचीही भेट घेणार आहेत. याशिवाय ते 10 राजकारण्यांचीही भेट घेणार आहेत.राहुल गुरुवारी मणिपूरला पोहोचले. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राहुल यांनी चुराचांदपूर येथील मदत शिबिरात पीडितांची भेट घेतली. मात्र, चुराचांदपूरला पोहोचण्यापूर्वी राहुल यांचा ताफा बिष्णुपूर येथे थांबवण्यात आला. हिंसाचाराच्या भीतीने हा ताफा थांबवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते.यानंतर राहुल गांधी हेलिकॉप्टरने चुराचंदपूरला पोहोचले. येथे ते म्हणाले- मी माझ्या मणिपूरच्या सर्व बंधू-भगिनींना ऐकण्यासाठी आलो आहे. सर्व समाजातील लोक खूप प्रेमळ आहेत. सरकार मला रोखत आहे हे दुर्दैवी आहे.याआधी गुरुवारी राहुलला हिंसाचारग्रस्त चुरचंदपूर रिलीफ कॅम्पमध्ये जायचे होते, परंतु पोलिसांनी त्याच्या ताफ्याला सुमारे 34 किमी आधी विष्णुपूर येथे रोखले. पोलिसांनी सांगितले होते – वाटेत हिंसाचार होऊ शकतो. यानंतर ते इंफाळला परतले.

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बिष्णुपूर जिल्ह्यात महामार्गावर टायर जाळण्यात आले आणि ताफ्यावर काही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे खबरदारी घेत हा ताफा विष्णुपूर येथे थांबवण्यात आला. राहुल यांचा ताफा थांबल्यानंतर येथील एक गट त्यांच्या समर्थनार्थ निदर्शने करत आहे, तर दुसरा त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. त्यांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

उद्धव ठाकरे कफनचोर, जम्बो कोविड सेंटरमध्येही घोटाळा; देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र

मुंबई-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे यांनी जम्बो कोविड सेंटर मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यांना तर कफन चोर म्हणावे लागेल, असे म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदर्शन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली. आघाडी सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांची संपूर्ण चौकशी समोर आल्यानंतर सत्य सर्वांसमोर येईल, असा दावा देखील त्यांनी केला.

कॅगच्या वतीने अद्याप कोविड काळातील घोटाळ्यांचे ऑडिट करण्यात आलेले नाही. नॉन कोविड ऑडिटमध्येच बारा हजार कोटींचे घोटाळे समोर आले असल्याचा दावा, फडणवीस यांनी केला आहे. कोव्हिडच्या ऑडिटमध्ये आणखी किती घोटाळे समोर येतील असे देखील ते म्हणाले. त्यांच्यावर कारवाई करावीच लागणार आहे. हा जनतेचा पैसा होता, त्यांच्यावर आम्ही नक्कीच कारवाई करू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेपासून आम्ही 2017 मध्येच दूर झाले आहोत. त्यांच्या गोरख -धंद्यांमध्ये आम्ही त्यांची साथ देणार नसल्याचे आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं होते. आम्ही राज्यात सोबत असतो तरी महानगरपालिकेमध्ये आम्ही विरोधात नसलो तरी त्यांच्यासोबतही नव्हतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भ्रष्टाचार हा मुद्दा कायम राहणार आहे. कधी कधी इतर मुद्दे देखील समोर येतात. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना मनापासून भ्रष्टाचार दूर होण्याची अपेक्षा आहे. आणि त्यामुळेच सर्वसामान्य नागरिकाचे नरेंद्र मोदी यांना समर्थन आहे. नरेंद्र मोदी यांच्या योजनेमध्ये भ्रष्टाचार होत नाही, त्यामुळेच सर्वसामान्य नागरिक त्यांना पाठिंबा देत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. घोटाळ्यांची चौकशी होणारच असे देखील ते म्हणाले.असे 35 डॉक्टर समोर आले आहेत, त्यांनी कोविड सेंटर मध्ये कामासाठी केवळ अर्ज केले होते. मात्र, सेवा दिली नाही. तरी देखील त्यांच्या नावाने पूर्ण बिल काढण्यात आले आहे. म्हणजेच कोविड सेंटरमध्ये कोण होते? असा प्रश्न उपस्थित होतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. अशी अनेक प्रकरण समोर येत असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा अचानक रात्री उशिरा दिल्ली दौरा; मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्मुला ठरला

मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा अचानक दिल्ली दौरा केला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्मुला ठरला असून केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दोघांना स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षपूर्ती निमित्त राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या वाट्याला एक कॅबिनेट अनेक राज्यमंत्री पद येण्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र, शिंदे गटातील कोणाला मंत्री करायचे, याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात असल्याचे समजते.

शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये अस्वस्थ दिसून येत आहे. या संदर्भात अनेक खासदार आणि आमदारांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर मध्ये होते. पंढरपूर येथे सर्व विधी आणि पूजा संपवून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी थेट दिल्ली गाठली. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रात्री उशिरा भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार या नेत्यांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा झाली आहे.

आगामी काळात लोकसभा निवडणूक आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी मंत्रिमंडळ विस्तार महत्वाचा मानला जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला स्थान मिळाल्याने शिंदे गटातील नेत्यांमधील असलेली अस्वस्थता कमी होईल. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना शिंदे गटाला महत्त्वाची ताकद देखील मिळणार आहे. त्यातच भाजपच्या मिशन- 45 ला लाभदायक ठरतील अशाच खासदाराची केंद्रात मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संपन्न भारतासाठी शिक्षणात भविष्यातील तंत्रज्ञानाचा समावेश गरजेचा-नितीन गडकरी

0

बीएमसीसीच्या नूतन इमारतीचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : भविष्यातील संपन्न भारताचा विचार करताना शिक्षणाच्या माध्यमातून स्वदेशी, स्वावलंबनाच्या संस्कारासोबत शिक्षणात भविष्यातील तंत्रज्ञानाचा समावेश करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या श्री मुकुंददास लोहिया शैक्षणिक संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योजक पुरुषोत्तम लोहिया, डेक्क्न एज्युकेशन सोसायटीच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष शरद कुंटे, उपाध्यक्ष डॉ.रविंद्र आचार्य, प्राचार्य डॉ.जगदीश लांजेकर, जगदीश कदम, धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री.गडकरी म्हणाले, तंत्रज्ञान आपले जीवन सुसह्य करणार आहे, शेतकऱ्यांनाही संपन्न करणार आहे. त्यामुळे शिक्षणसंस्थांना भविष्यात विविध क्षेत्रात नव्याने येणाऱ्या तंत्रज्ञानाचा विचार करावा लागेल. भारताला विश्वगुरू बनविताना ज्ञान-विज्ञानाचा उपयोग करून ज्ञानाचे रुपांतर संपत्तीत करण्यासाठी असे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे लागेल. गरजा आणि साधनस्त्रोताच्या उपलब्धतेवर आधारीत संशोधनाकडे वळावे लागेल. उद्योगांशी समन्वय साधून भविष्यातील तंत्रज्ञान आपल्या महाविद्यालयात शिकविण्याचा विचार केल्यास देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल.

नैतिकता, अर्थशास्त्र आणि पर्यावरण असे समाजाचे तीन महत्वाचे स्तंभ आहेत आणि समाजाच्या शाश्वत विकासासाठी शिक्षणाला सर्वाधिक महत्व आहे. शिक्षणातून मिळणाऱ्या संस्काराच्या आधारे आपली आर्थिक स्थिती सुदृढ करण्यासोबत प्रगल्भ समाज निर्माण करता येतो. ज्ञात प्राप्त झाल्याशिवाय भविष्यातील इतर क्षेत्रात विस्तार करता येणार नाही.

मोठ्या लोकसंख्येला शिक्षण देताना त्याची गुणवत्ता कायम ठेवून संस्काराधिष्ठित उत्तम नागरिक देशात तयार करण्याचा विचार भारताच्या शिक्षणपद्धतीत केला जातो. इतिहास, संस्कृती आणि वारसा या माध्यमातून आपला समाज प्रगल्भ झाला आहे. मात्र त्यासोबत नाविन्यता, उद्योजकता, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन कौशल्य आणि जगातील यशस्वी शिक्षण पद्धतीचा अभ्यासही आहे.

शिक्षण, संताच्या दिलेल्या विचारांच्या माध्यमातून होणारे प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्कारामुळे भारतीय समाज सुसंस्कृत आहे. आपली अर्थव्यवस्था जगातली वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. माहिती तंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञान क्षेत्रात आपल्या युवकांनी नाव कमावले आहे. त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात मिळालेले ज्ञानामुळे परिपूर्ण बनल्याने जगभरात ते आपले कार्य करू शकले. याचे श्रेय इथल्या शिक्षण संस्था, शिक्षक आणि कुटुंबाला आहे, असेही श्री.गडकरी म्हणाले.

सव्वाशे वर्षापूर्वी स्थापन झालेल्या डेक्क्न एज्युकेशन सोसायटीने शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासोबत गुणवत्तेचाही विचार केला. अनेक गायक, कलाकार, साहित्यिक, समाजसुधारक, देशभक्त, राजकीय नेते या संस्थेने देशाला दिले. त्यामुळे सामाजिक परिवर्तनात आणि राष्ट्रीय पुर्ननिर्माणात या संस्थेचे योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

श्री.पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणानुसार डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्वायत्त विद्यापीठ होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. विविध अभ्यासक्रम सुरू करता यावे यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठाना स्वायत्तता देण्यात येत आहे. असे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करून समाजाची गरज पूर्ण करणारे हे विद्यापीठ व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

नवीन इमारतीत बीबीएचे ८ अभ्यासक्रम आणि नाट्य व चित्रपटाचे प्रशिक्षण केंद्र होणार असल्याचे श्री.कुंटे यांनी प्रास्ताविकात सांगितले. श्री.गडकरी यांच्या हस्ते नारायण राठी अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा आणि भरतसृष्टी स्टुडीओचे उद्घाटन करण्यात आले.
0000

एमएनजीएलची जास्तीत जास्त कनेक्शन देण्यासाठी प्रयत्नशील-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामधील नागरिकांना पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा होण्यासाठी एमएनजीएलची (महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड)जास्तीत जास्त गॅस कनेक्शन उपलब्ध व्हावीत यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी येथे सांगितले.

बाणेर येथील एमएनजीएल कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामधील पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्याबद्दल सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली. छत्रपती शिवाजीनगर मतदार संघामध्ये आत्तापर्यंत किती नागरिकांना कनेक्शन दिली गेली? नवीन कनेक्शन देण्यासाठी काय अडचणी येत आहेत? सन २०२३ – २०२४ मध्ये नवीन कनेक्शन देण्याबाबतचा प्लॅन काय आहे? याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. खोदाई परवानगीसाठी अडचणी येत असतील तर त्या सोडविण्यासाठी पुणे महापालिका, वाहतूक पोलीस विभाग यांचेशी संपर्क साधला जाईल, असे आश्वासन आमदार शिरोळे यांनी दिले.

यावेळी एमएनजीएल चे व्यवस्थापकीय संचालक कुमार शंकर, रवींद्र साळेगावकर, गणेश बगाडे, संजय शर्मा, एस.के.सिंग, रितेश इंगवले आदि उपस्थित होते.

मंत्रिमंडळ विस्तारात ‘रिपाइं’ला मंत्रिपद मिळावे; रामदास आठवले यांची मागणी


आझाद यांच्यावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी

पुणे : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेश मध्ये झालेला हल्ला दुर्दैवी आहे. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. या हल्ल्याचा निषेध करतो. राजकीय नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने याची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करायला हवी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.यावेळी त्आयांनी गामी मंत्रिमंडळ विस्तारत ‘रिपाइं’ला एक मंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. तसेच जागा वाटपात विधान परिषदेची एक आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकीत योग्य वाटा मागितला आहे.
नवीन विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी रिपाइं प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, चंद्रकांता सोनकांबळे, परशुराम वाडेकर, असीत गांगुर्डे, संजय सोनवणे, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, अॅड. आयुब शेख, महिपाल वाघमारे, मोहन जगताप आदी उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, “भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत मित्र पक्षांची मुंबईत बैठक झाली असून, आगामी मंत्रिमंडळ विस्तारत ‘रिपाइं’ला एक मंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. तसेच जागा वाटपात विधान परिषदेची एक आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकीत योग्य वाटा मागितला आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षण रोटेशन पद्धतीने होत आहे. मात्र, जिथे दलित वस्ती नाही, तिथे आमचा माणूस निवडून येत नाही. म्हणून आरक्षणाची रोटेशन बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करत आहोत.”
विरोधकांची एकजूटदेशातील विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एकवटले आहेत. मात्र, त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. मोदी लोकप्रिय आणि सक्षम नेते आहेत. आगामी निवडणुकीत ३५० च्या वर जागा निवडून येतील आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. जितके विरोधक एकत्र येतील, मोदींची तितकीच ताकद वाढेल, असे आठवले यांनी सांगितले.
सरकारची कामगिरी चांगलीवेगवेगळ्या क्षेत्रात भारताने आघाडी घेतली असून, रोजगार निर्मितीस प्राधान्य दिले जात आहे. लाखो लोकांना सरकारी नोकरीत सामावून घेतले जात आहे. खासगी उद्योगास प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यातही उद्योग वाढवले जात असून, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. विरोधकांनी प्रत्येक गोष्टीला विरोध करणे चुकीचे आहे. सरकारला सहकार्य करणे ही लोकशाही आहे.
मराठा आरक्षणाला विरोध नाहीमराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, आमच्या आरक्षणाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण त्यांना द्यावे, असे आमचे म्हणणे आहे. भटक्या विमुक्त, ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्याबाबत अभ्यास सुरु आहे. त्याचा फायदा सर्व समाजाला होईल. जातीनिहाय जनगणना झाली, तर सर्वांना कोणत्या जातीचे किती प्रमाण आहे, ते समजेल. याबाबत सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे.
शिंदे-फडणवीस दमदारएकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार चांगले चालले असून, वर्षपूर्तीच्या त्यांना शुभेच्छा देतो. या सरकारला कोणताही धोका नाही. शिंदे-फडणवीस आपला कार्यकाळ पूर्ण करतील आणि पुढील पाच वर्षे त्यांचीच सत्ता येईल. प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाचे दर्शन घ्यायला जाणे योग्य नव्हते. दर्शन घ्यायचेच असेल, तर चैत्यभूमीत जाऊन बाबासाहेबांचे व रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांचे दर्शन घ्यावे.
गुलाबी रंग चालणार नाहीतेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) यांचा गुलाबी रंग महाराष्ट्रात चालणार नाही. नाराज नेत्यांना घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. छगन भुजबळ यांची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारी नाही. भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांचे आमच्या पक्षात स्वागतच आहे. पंकजा मुंडे यांना पक्षात येण्याचे आमंत्रण देणार नाही, मात्र मिटवून घेण्याचा सल्ला देईन.

देशातील पहिला खासदार असेल जो मोदी सरकारच्या योजना घरोघरी पोहचवतोय!गडकरींची संजय काकडेंना शाबासकीची थाप!

संजय काकडेंच्या ६० हजारांहून अधिक ‘मोदी@9’ पुस्तिका वाटपाचे गडकरींनी केले कौतुक

पुणे – “देशातील पहिला आणि एकमेव असा खासदार आहे जो इतक्या मोठ्या संख्येने पुस्तिका छापून मोदी सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवतोय. लोकांकडे स्वतः जाऊन ती पुस्तिका त्यांना देतोय,” अशा शब्दांत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी माजी खासदार संजय काकडे यांच्या ‘मोदी@9’ पुस्तिका वाटपाच्या उपक्रमाचे कौतुक करून त्यांना शाबासकीची थाप दिली आहे.

भाजपाचे नेते व माजी खासदार संजय काकडे गेली सलग पाच दिवस ‘मोदी@9’ ही पुस्तिका पुणे लोकसभा मतदार संघात वाटत आहेत. मोदी सरकारच्या गेल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या महत्वपूर्ण योजनांची माहिती असलेली ही पुस्तिका आहे. काकडेंनी ६० हजारांहून अधिक या पुस्तिका छापल्या आहेत. आणि ते स्वतः त्यांच्या कार्यकर्त्यांसह या पुस्तिकेचे वाटप करीत आहेत.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते रविवारी २५ जून रोजी उद्घाटन होऊन या मोहिमेस प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी वडगाव शेरी विधानसभा मतदार संघ, त्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा पेठ, पर्वती विधानसभा मतदार संघात या पुस्तिकेचे वाटप संजय काकडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या समवेत जाऊन केले आहे. आज पाचव्या दिवशी शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात ही पुस्तिका नागरिकांना दिली जात आहे. गेली पाच दिवस पुणे शहरात पाऊस पडत आहे. पाऊस पडत असताना देखील संजय काकडे यांनी पुस्तिका नागरिकांना भेट देण्याची मोहिम थांबवली नाही. अनेकदा पावसात भिजत ते पुस्तिका वाटत फिरताना दिसत आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमानिमित्त आज पुणे शहरात आले असताना संजय काकडे यांनी त्यांची जेडब्ल्यु मेरिएट हॉटेलमध्ये भेट घेतली व त्यांना मोदी@9 ही पुस्तिका भेट दिली. शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातच हे हॉटेल असल्यामुळे संजय काकडे केंद्रीय मंत्री गडकरींना भेटले आणि गेली पाच दिवस सुरु असलेल्या या उपक्रमाची त्यांनी गडकरी यांना माहिती दिली.

पुणे लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात ही पुस्तिका प्रत्येकी १० हजार प्रमाणे वाटण्यात येत आहे. त्या त्या विधानसभा मतदार संघातील २५ ते ३० कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या समवेत काकडे स्वतः या पुस्तिकेचं वाटप करीत आहेत.

त्या काळात मग फडणवीसांनी काय केलं ? ७० हजाराच्या घोटाळ्यावर मोदींना पवारांचा सवाल

पुणे-“शिखर बँकेबाबतच्या आरोपांची चौकशी करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर होती. त्या सर्व काळात राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपाकडे होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्या काळात फडणवीसांनी काय केलं हे मला माहिती नाही. मोदींनी अशाप्रकारे शिखर बँकेचा उल्लेख करण्याची गरज नव्हती,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.शिखर बँक तर सोडाच, पण मी कुठल्याही सहकारी बँकेचा सदस्य नाही. या सहकारी बँकांकडून मी कधी कर्जही घेतलेलं नाही. शिखर बँकेबाबत मागे एकदा तक्रार झाली होती. चौकशीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि भाजपाच्या काही लोकांची नावं आली.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी यांचे आणखी घोटाळे बाहेर काढावेत, असं आवाहन केलं. यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं. ते गुरुवारी (२९ जून) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.“मोदींनी निराशेतून असा हल्ला केला असावा. अमेरिकेचा दौरा आणि भारतातील स्थिती पाहून ते निराश झाले आणि त्या निराशेतूनच त्यांनी असा हल्ला केला असावा,” असं म्हणत शरद पवारांनी मोदींना टोला लगावला.

भोपाळ या ठिकाणी भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. असं एकही क्षेत्र नाही जिथे काँग्रेसने घोटाळा केला नसेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरही घोटाळ्यांचा आरोप आहे. आता भाजपा कार्यकर्त्यांनी थोडे प्रयत्न करायला हवेत आणि यांच्या घोटाळ्यांचा मीटर वाढवायला हवा (इतर घोटाळे बाहेर काढावे).

बापजाद्यांची पुण्याई एखाद्यावेळी उपयोगी पडते,माझी मुलगी स्व:कर्तृत्वाने तीनवेळा संसदेत गेली-घराणेशाहीच्या आरोपावर मोदींना पवारांचा टोला

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्षावर घराणेशाहीचा गंभीर आरोप केला होता. तर शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या, असा हल्लाबोल केला होता. यावर शरद पवारांनी देखील आज मोदींवर घणाघात करत त्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. ते पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझ्या पक्षाविषयी मत व्यक्त केले. ते मत व्यक्त करताना त्यांनी मुलीला प्रोत्साहन द्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या असं म्हटले आहे. ते अगदी खरं आहे, माझी मुलगी स्वतःच्या कर्तुत्वावर तीनवेळा संसदेत निवडून गेली आहे. एखाद्यावेळी बापजाद्यांची पुण्याई उपयोगी पडते, पण दुसऱ्या, तिसऱ्या निवडणुकीत ही पुण्याई उपयोगी पडत नाही, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, सगळ्या राज्यातील चित्र हेच स्पष्ट करतं की, भाजपा त्यांची सत्ता असलेली राज्ये संभाळू शकली नाही आणि बहुतांश राज्ये त्यांच्या हातात नाहीत. अशा परिस्थितीत उद्या देशाच्या निवडणुकीत काय निकाल लागेल याची खात्री नसल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पदाला शोभणार नाही अशी वक्तव्ये करू लागले आहेत.

शरद पवार पुढे म्हणाले, संसदेतील कामगिरीत सुप्रिया सुळेंनी 98-99 टक्के हजेरी लावली आणि अधिकाधिक सहभाग नोंदवला. त्यात त्यांचा पहिला क्रमांक आहे, संसदेच्या कामाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने सुप्रिया सुळेंना आठ वेळा पुरस्कार दिला. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी काहीही सांगितलं तरी स्व: कर्तुत्व असल्याशिवाय या देशातील मतदार नेहमी मत देत नाही. एखाद्यावेळी मत देऊ शकतात, ज्याच आईवडीलांची पुण्याची उपयुक्त ठरू शकते.

मोदींनी असं वक्तव्य करणं अशोभनीय आहे. संसदेच्या सदस्याविषयी पंतप्रधानांनी असं मत व्यक्त करणं योग्य नाही. कारण या संस्था आहेत. मी पंतप्रधानांवर व्यक्तिगत टीका करत नाही, कारण ती संस्था आहे. संस्थांची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे. अशावेळी संसदीय सदस्य ही देखील संस्था आहे, हे लक्षात घेऊन सन्मान ठेवला पाहिजे.