Home Blog Page 1465

संजय काकडेंच्या हस्ते हिंदकेसरी अभिजीत कटकेचा सत्कार

दीड किलो चांदीची गदा भेट; ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

पुणे – हिंदकेसरी चा किताब पटकावणाऱ्या अभिजीत कटके याचा आज भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार संजय काकडे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी अभिजीतला दीड किलो चांदीची गदा भेट देण्यात आली.

अभिजीत कटके याने हिंदकेसरी किताब मिळवून त्याच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. त्याने यापूर्वी महाराष्ट्र केसरीचा किताब देखील पटकावला आहे.

भारतीय शैली कुस्ती महासंघाने हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय ५१ वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. या मानाच्या स्पर्धेत अभिजीत कटके याने हिंदकेसरी चा किताब पटकवला. अंतिम सामन्यात पुण्याच्या जिगरबाज कुस्तीपटू अभिजीत कटके याने हरियाणाच्या सोमवीर वर विजय मिळवला.

आज पुणे शहरातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात हिंदकेसरी अभिजीत कटके याचा संजय काकडे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी अभिजीत कटकेची ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी नगरसेवक शंकर पवार, राहुल भंडारे, धीरज घाटे, हेमंत रासने, योगेश समेळ, तुषार पाटील, दिलीप काळोखे, ओंकार कदम, मनीष साळुंखे, समीर शेंडकर, केदार मानकर, महेश सकट, वसंत चौगुले, गणेश यादव, प्रशांत मते आणि मोठ्या संख्येने पुणेकर नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

जी20 पायाभूत सुविधा कार्यगटाच्या(IWG) दोन दिवसीय बैठकीचा आज महाराष्ट्रात पुण्यामध्ये होणार प्रारंभ

जी 20 पायाभूत सुविधा कार्यगटाचे भारतासोबत ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील भूषवणार सहअध्यक्षपद

पुणे-

भारताच्या जी 20 अध्यक्षते अंतर्गत जी20 पायाभूत सुविधा कार्यगटाच्या(IWG) पहिल्या बैठकीचे पुण्यामध्ये 16-17 जानेवारी 2023 रोजी आयोजन होणार आहे. या बैठकीमध्ये आयडब्लूजी सदस्य देश, अतिथी देश आणि भारताने निमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना भारताच्या जी20 अध्यक्षतेंर्गत 2023 पायाभूत सुविधा जाहीरनाम्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणार आहेत. सरकारच्या अर्थ मंत्रालयाचा आर्थिक व्यवहार विभाग या दोन दिवसीय बैठकांचे यजमानपद भूषवेल तर ऑस्ट्रेलिया आणि ब्राझिल बैठकांचे सहअध्यक्षपद भूषवतील. पुण्यामधील पहिल्या आयडब्लूजी बैठकीमध्ये जी20 सदस्य देश, निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे 65 प्रतिनिधी सहभागी होतील.

जी20 पायाभूत सुविधा कार्यगट मालमत्ता श्रेणी म्हणून विकसित होणाऱ्या पायाभूत सुविधांसह पायाभूत सुविधा गुंतवणुकीचे विविध पैलू, दर्जेदार पायाभूत सुविधा गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधा गुंतवणुकीसाठी आर्थिक संसाधने जमा करण्यासाठी नवोन्मेषी साधनांची निवड करणे या विषयांवर विचारमंथन करतो. पायाभूत सुविधा कार्यगटाची फलनिष्पत्ती जी20 फायनान्स ट्रॅक प्राधान्यक्रमांमध्ये आर्थिक वृद्धीच्या सामाईक उद्दिष्टाला प्रोत्साहन देण्यासाठी वापरली जाते.

गेल्या काही वर्षांमध्ये पायाभूत सुविधा कार्यगट मालमत्ता श्रेणी मालमत्ता श्रेणी म्हणून विकसित होणाऱ्या पायाभूत सुविधा, दर्जेदार पायाभूत सुविधा गुंतवणूक (QII) निर्देशांकांना प्रोत्साहन, पायाभूत सुविधा जाहीरनामा यांसारख्या प्रमुख संकल्पनांवर भर देत आहे.

भारताच्या जी20 अध्यक्षतेची ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही संकल्पना 2023च्या भारताच्या जी20 अध्यक्षतेअंतर्गत 2023च्या पायाभूत सुविधा जाहीरनाम्यासाठी पोषक वातावरण निर्माण करते. ही संकल्पना समन्यायी वृद्धीचा संदेश अधोरेखित करते आणि लवचिक , समावेशक आणि शाश्वत शहरी पायाभूत सुविधांची उभारणी करत असलेल्या चर्चेच्या केंद्रीय जाहीरनाम्यासोबत यथार्थाने जोडली जाते. ही संकल्पना यापूर्वीच्या अध्यक्षतांच्या अंतर्गत पायाभूत सुविधा जाहीरनाम्यावर झालेल्या कामासोबतही संलग्न आहे.

पुण्याच्या बैठकीत होणाऱ्या चर्चांमध्ये भारतीय अध्यक्षतेंर्गत पायाभूत सुविधा कार्यगटासाठीच्या जाहीरनाम्यावर भर दिला जाईल. ” उद्याच्या शहरांना अर्थसाहाय्य: समावेशक, लवचिक  आणि शाश्वत” हा या बैठकीत चर्चिला जाणारा प्राधान्यक्रमाचा अग्रणी विषय आहे. शहरांना वृद्धीचे आर्थिक केंद्र बनवणाऱ्या विविध पैलूंवर, शहरी पायाभूत सुविधांना अर्थसाहाय्य, भविष्यात उपयुक्त असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी, उर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणस्नेही शाश्वत पायाभूत सुविधांना खाजगी अर्थपुरवठा उपलब्ध करण्यासाठी वित्तीय गुंतवणुकीला दिशा देण्यावर आणि सामाजिक असंतुलन कमी करण्यावर ही संकल्पना भर देईल.

पुण्यातील जी-20 बैठकीदरम्यान, ‘भविष्यातील शहरांसाठी वित्तपुरवठा’ या विषयावर एक कार्यशाळाही होईल. या कार्यशाळेत,उद्याच्या म्हणजेच भविष्यातील शहरांच्या उभारणीसाठी, तांत्रिक आणि व्यवस्थापकीय क्षमतांच्या अनुषंगाने, काही संकल्पनांवर देखील चर्चा होईल. तसेच, खाजगी वित्तपुरवठा वाढवण्यासाठी, गुंतवणूकदारांचे प्रश्न समजून घेणे आणि भविष्यातील शहरांच्या वित्तीय क्षमता, यावरही चर्चा होईल.

या जी-20 बैठकीला, लोकसहभागाचीही जोड देण्यात आली आहे.  यासाठी, जी-20विषयी माहिती देणारी व्याख्याने,शहरांना भविष्यासाठी सज्ज करण्याविषयीचा परिसंवाद, नगरविकासाचे महत्त्व, अशा विविध विषयांवर कार्यक्रम झाले. तसेच, सर्वसामान्य लोकांमध्ये या विषयावर जनजागृती करण्यासाठी, जी-20 सायक्लोथॉन आणि शिक्षण संस्थांमध्ये मॉडेल जी-20 या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम झाले. या कार्यक्रमांचा भाग म्हणून, आंध्र प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश इत्यादी राज्यातील महापालिका आयुक्तांसह 300 हून अधिक लोक, शहरी तज्ञ आणि देशभरातील उद्योग प्रतिनिधी 13 जानेवारी 2023 रोजी पुण्यात शहरी पायाभूत सुविधांवर राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रात सहभागी झाले होते.या उपक्रमांचा उद्देश, जी-20 च्या सर्व संकल्पनांशी समाजातील सर्व स्तरातल्या लोकांना सामावून घेणे हा होता.

भारताच्या जी- 20 अध्यक्षपदाच्या काळात, जी-20 पायाभूत सुविधा कार्यगटाचा उपयोग, शहरांना भेडसावणारी आव्हाने आणि शहरांना नजीकच्या भविष्यात आणणाऱ्या संधींबद्दल चर्चा करण्यासाठी आणि शहरांना राहण्यायोग्य बनवण्यासाठी, भविष्यातील मार्ग तयार करण्यासाठीचे एक व्यासपीठ म्हणून वापरला जाईल.

येत्या दोन दिवसांत, पुणे शहरात जी-20 च्या विविध औपचारिक बैठका आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. 16 जानेवारीला, भारताच्या अध्यक्षपदाखाली, पायाभूत कार्यगटाची पहिली बैठक होईल. या बैठकीच्या पहिल्या भागात, आयडब्ल्यूजीचे प्रतिनिधी, अनेक औपचारिक बैठका घेतील, आणि 2023 च्या पायाभूत सुविधा अजेंडयावर चर्चा करतील.दुपारच्या सत्रात, हे प्रतिनिधी पुणे विद्यापीठाला वृक्षारोपणासाठी भेट देतील, त्यानंतर “उद्याच्या शहरांसाठी वित्तपुरवठा” या विषयावर उच्चस्तरीय कार्यशाळा होईल. दिवसाची सांगता रात्रीच्या मेजवानीने होईल आणि त्यासोबतच, पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमांची सांगता होईल.

17 जानेवारी 2023 रोजी, पायाभूत सुविधा कार्यगट चार सत्रांमध्ये चर्चा करेल, त्यानंतर आभारप्रदर्शन होऊन पुण्यातील या दोन दिवसीय बैठकीची सांगता, निरोप समारंभ आणि मेजवानीने होईल.

या औपचारिक चर्चेचा एक भाग, परदेशी प्रतिनिधींना शहरातील समृद्ध संस्कृती आणि प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवणे हा ही आहे. त्यादृष्टीने, पुणे हेरिटेज वॉक, शहर दर्शन आणि महाबळेश्वरची सहल अशा सहलींची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

जी-20 पायाभूत सुविधा कार्यगटाचे नेतृत्व, केंद्रीय वित्त मंत्रालय करत असून, नव्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तसेच, त्याबद्दल सामूहिक कृतीला गती दिली जाईल, हे वित्त मंत्रालय सुनिश्चित करेल.  

डिसेंबरमध्ये भरारी पथकाने पकडल्या 3 कोटी 68 लाखाच्या विजचोऱ्या

139 अनियमितता प्रकरणात 3 कोटी 86 लाखाची दिली बिले

पुणे : महावितरणच्या भरारी पथकाने डिसेंबरमध्ये भोसरी, उरुळीदेवाची व इस्लामपूर येथे धाड टाकून तीन कोटी 68 लाख रुपयांच्या 135 वीज चोरीच्या घटना उघडकीस आणल्या असून यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांचा समावेश आहे. तसेच इतर अनियमिततेच्या 139 प्रकरणात 3 कोटी 86 लाखाची बिले देण्यात आलेली आहे.

पुण्यातील भोसरी परिसरात भरारी पथकाने धाड टाकुन बेकरी प्रोडक्ट्स बनविणाऱ्या कंपनीची वीजचोरी उघडकीस आणलेली आहे. या औद्योगिक ग्राहकाने अतिरिक्त एल. टी. केबल टाकुन मीटर बायपास करून वीजचोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. या ग्राहकाने एक लाख 55 हजार युनिटची चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला 21 लाख, 89 हजार रूपयांचे वीजचोरीचे बील देण्यात आले आहे.

दुसऱ्या एका घटनेत उरुळीदेवाची परिसरातील पेट्रोल पंप व्यावसायिक ग्राहकांची वीजचोरी उघडकीस आलेली आहे. या ग्राहकांनी एल. टी. केबलला टॅपिंग करून मीटर बायपास करून वीजचोरी केल्याचे तपासात आढळून आले. सदर ग्राहकांनी 39 हजार 627 युनिट्सची वीजचोरी केल्याचे उघड झाले असून त्याला 16 लाख 18 हजार 420 रुपयांचे बिल देण्यात आले आहे.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे स्वीट मार्ट व्यावसायिकाने मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी केल्याने त्याला 76 हजार 504 युनिटचे रुपये 17 लाख 52 हजार रुपयांचे बिल देण्यात आलेले आहे. 

यासोबतच पुणे शहर व इस्लामपूर शहरातील इतर भागात धाडी टाकून एकूण 135 विजचोऱ्या पकडल्या तर इतर अनियमिततेची 139 प्रकरणे उघडकीस आणलेली आहेत. यामुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी मोठया प्रमाणात वीजचोरी शोध मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक प्रमोद शेवाळे व पुणे प्रादेशिक विभागाचे उपसंचालक सुमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वीज चोरीविरुद्ध भरारी पथक मोहिमा राबवित आहे.

जी-२० बैठकीसाठी ३८ प्रतिनिधींचे आज पुणे येथे आगमन

पुणे दि.१५- पुणे येथे १६ व १७ जानेवारी रोजी आयोजित बैठकीसाठी दिवसभरात विविध देशांच्या सुमारे ३८ प्रतिनिधींचे रविवारी सायंकाळपर्यंत लोहगाव विमानतळावर आज आगमन झाले.

आगमन झालेल्या प्रतिनिधींमधे जी-२० समूहाच्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, स्पेन, सिंगापूर, फ्रान्स, जपान, अर्जेंटिना, जर्मनी या सदस्य देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तीय विकास आणि अर्थव्यवस्थेला स्थिरता देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोएलीशन फॉर डिझास्टर रेझिलियंट इन्फ्रास्ट्रक्चर, इंटरनॅशनल फायनान्स कार्पोरेशन, युरोपियन युनियन, एशिअन डेव्हलपमेंट बँक या जागतिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

आगमनप्रसंगी या प्रतिनिधींचे पुणेरी पगडी घालून आणि शाल देऊन तसेच ढोल ताशांच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात पारंपरिक पद्धतीने प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

स्वागतासाठी राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, पुणे महानगरपालिका उपायुक्त किशोरी शिंदे, विमानतळ संचालक संतोष ढोके, सहायक संचालक संजय दुलारे उपस्थित होते.

बैठकीसाठी येणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी तयारी केली आहे. भरजरी पोशाखात ढोल ताशा वादक, तुतारी वादक पथक ठेवण्यात आले आहे. जी-२० परिषदेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेचे फलक सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहेत.

‘नमस्ते इंडिया’
जी-२० परिषदेसाठी आगमन झालेल्या प्रतिनिधींचे खास महाराष्ट्रीय संस्कृतीने स्वागत करताना त्यामागचा हेतू राजशिष्टाचार अधिकारी यांनी विषद केला असता स्वागताने भारावलेल्या प्रतिनिधींनी उत्साहात आणि मोठ्या आवाजात ‘नमस्ते इंडिया’ प्रतिसाद देऊन आपला आनंद व्यक्त केला.

नागरिकांना कमी वेळात व कमी खर्चात न्याय मिळणे गरजेचे – उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप शिंदे

सातारा दि. 14 : नागरिकांना जवळच्या जवळ, लवकर आणि कमी खर्चात न्याय मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सातारा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी केले. वाई येथे श्री. शिंदे यांच्या हस्ते जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या नूतन न्यायालयांच्या  उद्घाटनाचा सोहळा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सातारा जिल्हा पालक न्यायमूर्ती राजेश पाटील, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे, वाईचे नूतन जिल्हा न्यायाधीश एस.के. नंदीमठ, वाईच्या नूतन अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रिती तारू, वाई बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय खडसरे, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, वाईचे तहसिलदार रणजित भोसले आदींसह जिल्ह्यातील तालुका न्यायाधीश, जिल्हा व तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष, सदस्य, वकील उपस्थित होते.

            वाई येथील नवीन जिल्हा न्यायालयामुळे तीन तालुक्यातील पक्षकारांची सोय झाली असल्याचे सांगून श्री. शिंदे म्हणाले, न्याय आपल्या दारी हे मुंबई उच्च न्यायालयाचे तत्व आहे. त्या तत्वा नुसारच आता वाई येथे जिल्हा न्यायालय सुरू होत आहे. न्यायाचा हक्क सर्वांना आहे. त्याचबरोबर न्यायाचा हक्क सर्वांना मिळवून देणे ही तितकेच महत्वाचे आहे. न्यायाचा हक्क मिळवून देण्याचे हे तत्व वाई येथे आज सत्यात उतरले आहे. वाई शहराला पौराणिक, एतिहासिक पार्श्वभूमी लाभली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            न्यायालय हे एक मंदिर असल्याचे सांगून श्री. पाटील यावेळी म्हणाले, पक्षकार चप्पल काढून, नमस्कार करून न्यायालयाच्या कक्षात प्रवेश करतात. त्यामागे आपल्याला येथे न्याय मिळेल हा त्याला विश्वास असतो. त्याचा हा विश्वास वाई येथील या नवीन न्यायालयामुळे सार्थ होईल. न्यायालय जवळ आल्यामुळे लवकर न्याय मिळेल व खटल्यांचे प्रलंबित्व कमी होण्यास मदत होईल.

            न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर खटले प्रलंबित असणे हे चिंताजनक असल्याचे सांगून श्रीमती धोटे यावेळी  म्हणाल्या की, वाई न्यायालयाकडे आता या विभागातील खटले वर्ग करण्यात आले आहेत. या न्यायालयाचे कार्यक्षेत्र हे वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तीन तालुक्यांचे असणार आहे. सर्वांनी मिळून खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी प्रयत्न करू. सर्वांच्या समन्वयानेच हे शक्य होते. राष्ट्र सबळीकरणासाठी सर्वांनीच हातभार लावूया. त्यासाठी सेवाभाव जोपासूया. प्रलंबित खटले कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. त्यासाठी नियोजनही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते फित कापून व कोनशिलेचे आनावरण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ॲड्. श्री. कणसे यांनी आपल्या मनोगतामध्ये वाई न्यायालयाच्या स्थापनेसाठी केलेल्या प्रयत्नांचा तसेच वाई न्यायालयाचा इतिहास याची माहिती दिली. यावेळी वाई शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

कुस्तीत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि.१४: आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केले.

पुण्यातील स्व.मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीत आयोजित ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२२-२३ च्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलत होते. श्री.फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता पैलवान शिवराज राक्षे याला मानाची गदा प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाला क्रीडा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ब्रिजभुषण शरण सिंह, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, हिंदकेसरी पै.अभिजीत कटके आदी उपस्थित आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, सामान्य घरातील युवक कुस्ती खेळतात. ते चांगली मेहनत करतात आणि त्यांना तेवढाच चांगला खुराकही लागतो. अशा खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ऑलिम्पिक स्तरावर यशस्वी राज्यातील मल्लांना ६ हजार ऐवजी २० हजार रुपये मानधन देण्यात येईल. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम-ए-हिंद विजेत्या मल्लांचे मानधन ४ हजारावरून १५ हजार रुपये, अर्जुन पुरस्कार विजेत्यांना ६ हजार ऐवजी २० हजार रुपये, वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार ऐवजी साडेसात हजार रुपये मानधन देण्यात येईल. मागील काळात तीन खेळाडूंना थेट पोलीस उपअधीक्षक पदावर नोकरीची संधी दिली, तशी संधी देण्याचे काम यापुढेही निश्चितपणे करण्यात येईल.

मिशन ऑलिम्पिक सुरू करण्यात येईल
कै.खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविल्यानंतर महाराष्ट्र पदक मिळविणाऱ्या मल्लांना तयार करण्यात मागे राहिला. ही उणिव भरून काढण्यासाठी महाराष्ट्र मिशन ऑलिम्पिक सुरू करेल आणि भारतीय कुस्ती महासंघाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय स्तराव पदक जिंकणारा किमान एकतरी मल्ल महाराष्ट्राचा असेल अशी मोहिम सुरू करण्यात येईल. महिलांच्या कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने पुढाकार घेतल्यास शासन त्यालाही सहकार्य करेल.

कै.मामासाहेब मोहोळ यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्यांना मामासाहेबांचे सुपूत्र माजी खासदार अशोकराव मोहोळ यांच्याकडून मानाची गदा दिली जाते. हा मान मिळविण्याकरिता लाल मातीचे आणि मॅटवरील पैलवान मोठ्या प्रमाणात कुस्ती खेळतात, संघर्ष करतात आणि त्याचा आनंद सगळ्यांना अनुभवायला मिळतो. अत्यंत रंजक महाराष्ट्र केसरी स्पर्धा आपल्याला पहायला मिळाल्या असे सांगून त्यांनी यशस्वी पैलवान, कुस्तीप्रेमी नागरिकांचे अभिनंदन केले. मुरलीधर मोहोळ यांनी कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

मानधनात भरीव वाढ करून पैलवानांचा सन्मान-क्रीडामंत्री
डोळ्याचे पारणे फेडणारी स्पर्धा संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केल्याबद्दल कौतुक करून क्रीडामंत्री श्री.महाजन म्हणाले, कुस्ती हा खेळ मेहनतीचा आणि बुद्धीचातुर्याचा आहे. पैलवानांना खूप कष्ट करावे लागते. आयुष्यभर कष्ट करून देशाला नाव मिळवून देणाऱ्या पैलवानांना तुलनेत त्यांना मिळणारे मानधन कमी आहे. या मानधनात भरीव वाढ करून पैलवानांचा सन्मान केला जाईल. शासनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या रकमेत १० लाखावरून ५० लाखापर्यंत वाढ करण्यात आली आहे. पैलवानांचाही सन्मान करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे.

पालकमंत्री श्री.पाटील यशस्वी स्पर्धेच्या आयोजनाबबात मुरलीधर मोहोळ यांचे अभिनंदन केले. त्यांच्या प्रयत्नाने एक चांगली स्पर्धा कुस्ती प्रेमींना पहायला मिळाली असे त्यांनी सांगितले.

खासदार तडस आणि ब्रिजभुषण सिंह यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. महिलाही या क्षेत्रात ताकदीने पुढे येत असल्याने भविष्यात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात श्री.मोहोळ यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली. पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राला कुस्तीची परंपरा आहे. कुस्तीसाठी राजाश्रय महत्वाचा आहे. शासनाने कुस्तीपटूंना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. राज्यातला प्रत्येक कुस्तीप्रेमी महाराष्ट्र केसरीची आतुरतेने वाट पहात असतो. स्पर्धेच्या माध्यमातून कुस्तीच्या प्रती असलेली आत्मियता समोर आली असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माती गटातील अंतिम लढतीत सोलापूर महेंद्र गायकवाडने सोलापूरच्या सिकंदर शेखचा पराभव केला. गादी गटात पुण्याचा शिवराज राक्षेने नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा पराभव करून केला. दोन्ही गटातील विजेते महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यात महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढत झाली. यामध्ये निकाली कुस्ती करत शिवराज राक्षेने महेंद्र गायकवाडला चितपट करत ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावला. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते दोन्ही खेळाडूंना गदा प्रदान करण्यात आली.

श्री.फडणवीस यांच्या हस्ते कुस्तीपटू तयार करणाऱ्या पैलवान उत्तमराव पाटील यांना मानपत्रप्रदान करण्यात आले. या स्पर्धेनिमित्त ‘वेध महाराष्ट्राचा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
000

शिवराज राक्षे यंदाचा महाराष्ट्र केसरी

पुणे-शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांच्यात अंतिम सामना झाला. त्यात शिवराज राक्षेने अवघ्या काही सेकंदात महेंद्र गायकवाडला चितपट करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला व मानाची गदा जिंकली.

गत 4 दिवसांपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील भल्या भल्या पैलवानांना पराभवाचे पाणी पाजत महेंद्र गायकवाड व शिवराज राक्षे किताबी लढतीसाठी एकमेकांपुढे उभे ठाकले होते. अंतिम किताबी लढत कशी होणार? दोन्ही तुल्यबळ प्रतिस्पर्धी मल्ल एकमेकांना कसे झुंज देणार? आणि कोण होणार नवा महाराष्ट्र केसरी? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. अखेर शनिवारी सायंकाळी लाखो कुस्ती शौकिनांना या प्रश्नांची उत्तरे मिळाली.

तत्पूर्वी, माती विभागात झालेल्या लढतीत महेंद्र गायकवाडने सोलापूरच्या सिकंदर शेखला धूळ चारली. तर शिवराजने अहमदनगरच्या हर्षवर्धन सदगीर याला अस्मान दाखवले.

कुस्तीपटूंच्या मानधनात वाढ

राज्यातील कुस्तीपटूंना देण्यात येणाऱ्या मानधनात तिपटीहून अधिक वाढ करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना होण्यापूर्वी देवेंद्र फडणीसांनी ही महत्त्वाची घोषणा केली. फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील जे खेळाडू ऑलिम्पिक किंवा जागतिक कुस्ती स्पर्धेत खेळले आहेत, त्यांना आतापर्यंत केवळ 6 हजार रुपये मासिक मानधन दिले जात होते. आता यात वाढ करुन 20 हजार रुपये दिले जातील. याशिवाय हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तुमे हिंद स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंचे मानधन 4 हजार रुपयांवरुन 15 हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच, अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडूंचे मानधन 6 हजार रुपयांवरुन 20 हजार रुपये करण्यात आले आहे.

तिपटीहून अधिक वाढ

याशिवाय वयोवृद्ध खेळाडूंना आतापर्यंत केवळ अडीच हजार रुपये दिले जात होते. त्यांना आता महाराष्ट्र सरकारतर्फे साडेसात हजार रुपये दिले जातील. कुस्तीपटूंचे मानधन तिपटीपेक्षा अधिक वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी घोषणा महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आतापर्यंत अत्यंत तुटपूंजे मानधन

निर्णयाबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कुस्तीपटू प्रचंड मेहनत घेत असतात. त्याचप्रमाणे त्यांना खुराकही आवश्यक असतो. सामान्य घरांमधून तरुण मेहनतीने कुस्तीपटू होतात. आतापर्यंत त्यांना अतिशय तुटपूंजे मानधन दिले जात होते. त्यात त्यांचा खर्च भागणे शक्यच नव्हते. त्यामुळेच सरकारने कुस्तीपटूंच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कुस्तीपटूंना कोणतीही अडचण येऊ नये, त्यांना विविध स्पर्धांसाठी प्रोत्साहन देणे, हे यापुढे सरकारचे धोरण असेल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नोकरीत संधी दिली जाईल

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आतापर्यंत राज्य सरकारने तीन खेळाडू्ंना डीवायएसपीची नौकरी दिली आहे. अशाच प्रकारे कुस्तीत प्रावीण्य दाखवणाऱ्या खेळाडू्ंना नोकरीत संधी दिली जाईल.

महाराष्ट्र मिशन ऑलिम्पिक सुरू करणार

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, खाशाबा जाधव यांनी कुस्तीत देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. त्यानंतर मात्र महाराष्ट्रातून असे खेळाडू तयार झाले नाहीत. अशा ताकदीच्या मल्लांना घडवण्यात महाराष्ट्र मागे पडला. मात्र, आता महाराष्ट्र सरकार मिशन ऑलिम्पिक सुरू करेल. कुस्तीपटूंना प्रोत्साहन व आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जातील. त्यामुळे पुढील ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातील खेळाडू नक्कीच देशासाठी पदक जिंकतील, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

आम्हीदेखील कुस्ती करतो

आम्हीदेखील राजकारणात कुस्ती करतो, असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुस्ती स्पर्धा मॅटवर, मातीवर होतात. मात्र, आम्हीदेखील राजकारणात कुस्ती करतो. आमच्या कुस्ती या टीव्हीच्या स्क्रीनवर होतात. त्यातूनच कुणीतरी राजकारणातला केसरी बनतो.

महिलांसाठीही कुस्ती स्पर्धा भरवणार

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी प्रेक्षकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. याचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीस म्हणाले, आजच्या कुस्ती स्पर्धेत प्रेक्षकांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रेक्षक देशी खेळांचा मान वाढवत आहे. त्यामुळे पुढे महिलांसाठीही कुस्ती स्पर्धा भरवली जाईल.

गादीत शिवराज राक्षे

गादी विभागात शिवराज राक्षेने हर्षवर्धन सदगीरला अस्मान दाखवले. हे दोघेही काकासाहेब पवार आंतराष्ट्रीय कुस्ती संकुल या एकाच तालमीतील पैलवान आहेत. हर्षवर्धन सदगीरवर शिवराज राक्षेनं 8-1 असा एकतर्फी विजय मिळवला.

मातीत महेंद्रची बाजी

माती विभागात महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख यांच्यात सामना झाला. त्यात 3 मिनिटांच्या पहिल्या फेरीत दोन्ही पैलवानांनी आक्रमक खेळी केली. यावेळी पंचांनी त्यांना कुस्ती करून गुण मिळवण्याची वॉर्निंग दिली. त्यानंतर महेंद्र गायकवाडला 1, तर सिकंदर शेखला पहिल्या फेरीत 2 गुण मिळाले. त्यानंतर महेंद्रने चमकदार कामगिरी करत सिकंदरवर 5 विरुद्ध 4 अशा मतफरकाने विजय मिळवला.

एकाच गुरुचे चेले

शिवराज राक्षे हा राजगुरूनगरच्या राक्षेवाडी (जि. पुणे) येथील आहे. तो वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडे कात्रजच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सराव करतो. महेंद्र गायकवाड हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातल्या शिरसीचा (जि. सोलापूर) आहे. हा पठ्ठ्याही वस्ताद काका पवार आणि गोविंद पवारांचा शिष्य आहे. तो सुद्धा कात्रजच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सराव करतो.

वादन आणि नृत्याच्या संगमातून साकारला अनोखा कलाविष्कार

पुणे : वाद्य आणि नृत्यातील विविध रचनांचा मेळ घालत साकारलेला कलाविष्कार… पारंपरिक भरतनाट्यम नृत्यशैलीत सादर झालेली कृष्ण आणि कालिया नागाची कथा…आसामी भोरताल नृत्यातून सादर झालेली कंसवधाची गोष्ट…सुंदर पदन्यास आणि लयीतून साकारलेले कथक नृत्य…यासोबतच शास्त्रीय संगीत आणि कव्वालीचे अप्रतीम सादरीकरण अशा खिळवून ठेवणाऱ्या वादन आणि नृत्य सादरीकरणातून रसिकांना दर्जेदार कलेचा आस्वाद घेता आला.


निमित्त होते, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्यावतीने भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. एरंडवणे येथील संस्थेच्या मैदानावर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे, प्रवीण कासलीकर, देविका बोरठाकूर, स्वरदा कुलकर्णी तसेच व्यवस्थापन महाविद्यालय, विधी महाविद्यालय, वाय.एम. कॉलेज, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य उपस्थित होते.


कार्यक्रमात तेजस्विनी साठे, अरुंधती पटवर्धन, देविका बोरठाकूर यांनी रचलेल्या नृत्यांचे सादरीकरण झाले. तर नंदिनी गायकवाड, उज्जवल गजभर, शुभम खंडाळकर, अपूर्व पेटकर यांनी गीतांचे सादरीकरण केले. 


कार्यक्रमाची सुरूवात तेजस्विनी साठे यांनी रचलेल्या कथक नृत्यशैलीत ‘एकदंत प्रथम नमन, प्रातः समय पुण्यस्मरण’ या गणेश वंदनेने झाली. कलिंगनर्तन तिल्लाना या पारंपरिक भरतनाट्य नृत्यशैलीतून सादर झालेली कृष्ण आणि कालिया नागाच्या कथेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. ‘घेई छंद मकरंद’ हे नाट्यगीत सादर करीत नंदिनी गायकवाड यांनी रसिकांना खिळवून ठेवले. उज्वल गजभार यांनी उस्तादी शैलीत केलेल्या याच गीताचे सादरीकरण हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. 

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सादर झालेल्या ‘यार इलाही मेरे यार इलाही’  या मराठी कव्वालीला रसिकांनी भरभरून दाद दिली. शुभम खंडाळकर यांनी ‘अवघे गरजे पंढरपूर’ हा अभंग सादर केला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सह पखवाज वादन करत, रेला परन, दुर्गा स्तुतीपरन, गणेश स्तुतीपरन म्हणत कार्यक्रमाची बहारदार सांगता केली. 

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले ओमानच्या प्रतिनिधींचे स्वागत

पुणे दि.१४- पुणे येथे १६ व १७ जानेवारी रोजी आयोजित जी-२० बैठकीसाठी विविध देशांच्या प्रतिनिधींचे आज लोहगाव विमानतळावर आगमन झाले. यामध्ये रशिया, ओमान आणि ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अॅंड डेव्हलपमेंटच्या सदस्यांचा समावेश आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी ओमानच्या प्रॉडक्शन ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंटचे संचालक सलीम अहमद बाओमर आणि सलीम एम.अलबत्ताशी यांचे संध्याकाळी आगमनप्रसंगी पुणेरी पगडी घालून आणि शाल घालून स्वागत केले.

तत्पूर्वी सकाळी रशियाचे प्रतिनिधी वदीम आन्द्रेवीच टारकीन यांचे, दुपारच्या सत्रात रशियाचे दिमित्री अटापीन आणि ओईसीडीचे कोर्टनी व्हीलर यांचे पुणेरी पगडी घालून आणि शाल घ़ालून ढोल ताशाच्या गजरात आणि तूतारीच्या निनादात पारंपारिक पद्धतीने प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात आले.

स्वागतासाठी राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, पुणे महानगरपालिका उपायुक्त किशोरी शिंदे, विमानतळ संचालक संतोष ढोके, सहायक संचालक संजय दुलारे उपस्थित होते.

बैठकीसाठी येणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी तयारी केली आहे. भरजरी पोशाखात ढोल ताशा वादक, तूतारी वादक पथक ठेवण्यात आले आहे. जी-२० परिषदेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेचे फलक सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहे.

भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने आज ११ राज्यांत वृक्षारोपण मोहीम राबविली

0

पुणे-स्वातंत्र्य प्राप्तीचा अमृत महोत्सव आणि लष्कर दिन 2023 चे औचित्य साधून भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने आज ११ राज्यांत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबविली.

बंगळुरू इथे पहिल्यांदाच होत असलेल्या सैन्य दिन संचलन २०२३ च्या निमित्ताने ही मोहीम राबवण्यात आली. लष्कराच्या छावणी क्षेत्रासोबतच, सामान्य नागरिकांशी संबंधीत इतर नागरी क्षेत्रातही ही मोहीम राबवली गेली. लष्कराच्या स्थानिक बटालियन आणि वन विभाग यांनी समन्वयपूर्वक ही मोहीम राबवली. या मोहीमेअंतर्गत फळझाडे, सावली देणारी झाडे, औषधी वनस्पती आणि इतर अनेक जातींच्या रोपांची लागवड करण्यात आली.

दक्षिण कमांड मुख्यालयच्या अधिपत्याखाली असलेल्या दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा मुख्यालय उपक्षेत्राने पुण्यात दिघी टेकडी, खडकी आणि इतर अनेक नागरी तसेच शासकीय क्षेत्रात पुणे महानगरपालिका, वन विभाग आणि आर्मी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने वृक्षारोपण मोहीम राबविली, याअंतर्गत ३,००० हून अधिक झाडे लावण्यात आली. 

दक्षिण कमांडच्या जबाबदारीअंतर्गतच्या संपूर्ण क्षेत्रातातील शहरे, नगरे आणि गावांमध्ये हरित पट्टे निर्माण करण्यासोबतच, युवकांमध्ये निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच पर्यावरणीय समतोल राखण्याचा संदेश देण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली.  या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. यात समाजातील सर्वच घटक आणि क्षेत्रांतील लोक सहभागी झाले होते. या सगळ्यांनी यो मोहीमेच्या माध्यमातून आपल्या उज्वल भवितव्यासाठी योगदान दिले.

आठवड्यातून सातही दिवस कोल्हापूर-बेंगळुरू दरम्यानच्या थेट दैनंदिन विमान सेवा सुरू

नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल डॉ. विजय कुमार सिंह (निवृत्त) यांनी आज कोल्हापूर ते बेंगळुरू थेट विमान सेवेचे उद्घाटन केले.

ही विमान सेवा13 जानेवारीपासून खालील वेळापत्रकानुसार सुरू होईल:

Flight No.FromToDepartureArrivalFrequencyAircraft
6E – 7427BengaluruKolhapur14:5016:45Daily ATR
6E – 7436KolhapurBengaluru17:0518:50Daily

नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी उद्घाटन प्रसंगी केलेल्या आपल्या भाषणात सांगितले की, कोल्हापूरच्या विकासावर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करून नवीन विमानतळ टर्मिनल बांधणे, धावपट्टीचा विस्तार करणे आणि एटीसी टॉवरची स्थापना यासाठी 245 कोटींची गुंतवणूक निश्चित केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, भारतातील प्रत्येक कानाकोपरा जोडण्याचा दृष्टीकोन आणि ध्येय पुढे नेत, या मार्गाच्या उद्घाटनाने कोल्हापूर हे हैदराबाद, तिरुपती, मुंबई, अहमदाबाद आणि आज भारताची सिलिकॉन राजधानी बेंगळुरूशी जोडले गेले आहे.

मंत्री पुढे म्हणाले की, ही कनेक्टिव्हिटी सुरू झाल्यामुळे नवीन संधी निर्माण होतील आणि दोन्ही शहरांतील लोकांना त्याचा फायदा होईल.

Image

जनरल डॉ. विजय कुमार सिंग (निवृत्त) यांनी ही कनेक्टिव्हिटी मिळाल्याबद्दल कोल्हापूरच्या जनतेचे अभिनंदन केले, ज्यामुळे परिसरातील व्यवसाय, व्यापार आणि पर्यटन संधी वाढण्यास मदत होईल.

लोकसभेचे खासदार प्रा.संजय सदाशिवराव मंडलिक, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार रुतुराज संजय पाटील आदी मान्यवर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. याशिवाय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सहसचिव एस. के. मिश्रा, इंडिगोचे प्रधान सल्लागार आर.के. सिंग आणि नागरी हवाई मंत्रालयातले प्रतिनिधी (MoCA), भारतीय विमान प्राधिकरणाचे प्रतिनिधी (AAI), इंडिगो विमान कंपनीतले प्रतिनिधी(IndiGo) आणि कोल्हापूर येथील स्थानिक प्रशासनातील इतर मान्यवरही उपस्थित होते.

जी-२० च्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा युवकांशी संवाद

पुणे, दि.१४- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, भारताच्या नेतृत्वात जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. जी-२० परिषदेच्या माध्यमातून आपले भविष्य घडविण्यासाठी आपल्याला मिळालेली संधी आहे, असे त्यांनी सांगितले. जी-२० आणि भारत तसेच देशातील तरुण पिढीचा असणारा संबंध मांडून भारत देश कशा पद्धतीने जगाचे नेतृत्व करण्यास तयार झाला आहे याची माहिती त्यांनी दिली.

आविष्कार नगरीत सादर करण्यात आलेल्या संशोधन प्रकल्पांना भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यशस्वी संशोधन प्रकल्पांची उद्योग क्षेत्राशी सांगड घालून स्टार्टअपसाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, श्री. पाटील म्हणाले.

यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी एकूणच जी -२० च्या पार्श्वूमीवर विद्यापीठाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. नवनियुक्त अधिकार मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा देखील केली. तसेच स्पर्धेतील परिक्षकांशीदेखील संवाद साधला.

ग्राम विकासाचा ध्यास घेऊन काम कराः-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील


पुणे- जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपाचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत त्यांचा जाहीर सत्कार समारंभ, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ लॉन्स या ठिकाणी संपन्न झाला . यावेळी बोलतांना पुणे जिल्हयाचे पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नवनियुक्त सरपंच व त्यांच्या सहकार्यांनी ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन काम केले पाहीजे त्यासाठी पालकमंत्री म्हणुन मी सर्वोतोपरी सहकार्य करेल , चांगल्या कामाच्या मागे सरकार ऊभे राहील आसे सांगितले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष श्री गणेश भेगडे यांनी केले तर सुत्रसंचालन संघटन सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे यांनी केले यावेळी ऊपस्थितांना श्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल कुल ,माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे ,श्री.शरद बुट्टे पाटील यांनी केले यावेळी मा.कांचन कुल, मा.आशाताई बुचके, पृथ्वीराज जाचक,बाबाराजे जाधवराव, प्रदीप कंद , अविनाश मोटे, ई. प्रमुख मान्यवर ऊपस्थित होते तसेच-
भाजपाचे
सर्व नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच भाजपाचे जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी ऊपस्थित होते , श्री जालिंदर कामठे यांनी आभार मानुन कार्यक्रम संपला .

16 आणि 17 जानेवारीला जी20 परिषदेच्या पायाभूत सुविधा कार्यगटाची बैठक पुण्यामध्ये

पुणे-

भारताच्या जी20 अध्यक्षतेंर्गत जी20 पायाभूत सुविधा कार्यगटाची(IWG) पहिली बैठक पुण्यामध्ये 16-17 जानेवारी 2023 रोजी आयोजित होणार आहे. या मंचावर आयडब्लूजी सदस्य देश, अतिथी देश आणि भारताने निमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय संघटना भारताच्या जी20 अध्यक्षतेंर्गत 2023 पायाभूत सुविधा जाहीरनाम्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणार आहेत. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाचा आर्थिक व्यवहार विभाग या बैठकीचे यजमानपद भूषवेल तर ऑस्ट्रेलिया आणि ब्राझिल बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवतील.


जी20 पायाभूत सुविधा कार्यगट मालमत्ता श्रेणी म्हणून विकसित होणाऱ्या पायाभूत सुविधांसह पायाभूत सुविधा गुंतवणुकीचे विविध पैलू, दर्जेदार पायाभूत सुविधा गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधा गुंतवणुकीसाठी आर्थिक संसाधने जमा करण्यासाठी नवोन्मेषी साधनांची निवड करणे या विषयांवर विचारमंथन करतो.पायाभूत सुविधा कार्यगटाची फलनिष्पत्ती जी20 फायनान्स ट्रॅक प्राधान्यक्रमांमध्ये वापरली जाते आणि पायाभूत सुविधा विकासाला प्रोत्साहन दिले जाते.


भारताच्या जी20 अध्यक्षतेची ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही संकल्पना 2023च्या भारताच्या जी20 अध्यक्षतेअंतर्गत 2023च्या पायाभूत सुविधा जाहीरनाम्यासाठी पोषक वातावरण निर्माण करते. ही संकल्पना समन्यायी वृद्धीचा संदेश अधोरेखित करते आणि प्रतिरोधक, समावेशक आणि शाश्वत शहरी पायाभूत सुविधांची उभारणी करत असलेल्या चर्चेच्या केंद्रीय जाहीरनाम्यासोबत यथार्थाने जोडली जाते. पुण्याच्या बैठकीत होणाऱ्या चर्चांमध्ये भारतीय अध्यक्षतेंर्गत पायाभूत सुविधा कार्यगटासाठीच्या जाहीरनाम्यावर भर दिला जाईल.


 “उद्याच्या शहरांना अर्थसाहाय्य: समावेशक, प्रतिरोधक आणि शाश्वत” हा या बैठकीत चर्चिला जाणारा प्राधान्यक्रमाचा अग्रणी विषय आहे. शहरांना वृद्धीचे आर्थिक केंद्र बनवणाऱ्या विविध पैलूंवर, शहरी पायाभूत सुविधांना अर्थसाहाय्य, भविष्यात उपयुक्त असलेल्या पायाभूत सुविधांची उभारणी, उर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणस्नेही शाश्वत पायाभूत सुविधांना खाजगी अर्थपुरवठा उपलब्ध करण्यासाठी वित्तीय गुंतवणुकीला दिशा देण्यावर आणि सामाजिक असंतुलन कमी करण्यावर ही संकल्पना भर देईल. या बैठकीच्या जोडीने पुणे बैठकीत ‘उद्याच्या शहरांना अर्थसाहाय्य’ यावर एका उच्च स्तरीय कार्यशाळेचेही आयोजन होईल. या कार्यशाळेत उद्याच्या शहरांची उभारणी करण्यासाठी तांत्रिक आणि व्यवस्थापकीय गरजांशी संबंधित संकल्पना, खाजगी अर्थसाहाय्यात आणि उद्याच्या शहरांच्या अर्थसाहाय्याच्या क्षमतांच्या गरजांमध्ये वाढ करण्याबाबत गुंतवणूकदारांच्या धारणा यावर चर्चा होईल. जी20 बैठकीच्या आधी पुणे महानगरपालिका आणि पुणे शहरातील इतर हितधारकांच्या वतीने अनेक लोकसहभाग उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जी20 वरील व्याख्याने, शहरांना भविष्यासाठी सज्ज बनवणे आणि शहरी विकासाचे महत्त्व यावरील चर्चासत्र. सायक्लोथॉन, राष्ट्रीय युवा दिनी मोटरबाईक रॅली, स्वच्छता मोहीम आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मॉडेल जी20 चर्चा यांचा समावेश होता. जी20 बैठकीच्या जोडीने होणाऱ्या संपूर्ण विचारविनिमयांमध्ये जीवनातील सर्व स्तरांमधील लोकांना सहभागी करण्याचा या उपक्रमांचा उद्देश आहे. भारताच्या जी20 अध्यक्षतेच्या काळात जी20 पायाभूत सुविधा कार्यगटाचा वापर शहरांना भेडसावणाऱ्या समस्या आणि नजीकच्या भविष्यात शहरे निर्माण करणार असलेल्या संधी यावर चर्चा करण्यासाठी आणि शहरांना अधिकाधिक निवासयोग्य बनवणारा एक आराखडा तयार करण्यासाठी एक मंच म्हणून केला जाईल.


अर्थ मंत्रालय जी20 पायाभूत सुविधांच्या जाहीरनाम्याला दिशा देईल जेणेकरून जी20 नव्या संकल्पना निर्माण करणारा आणि एकत्रित कृतीला गतिमान करणारा एक जागतिक प्रमुख कारक बनेल.

लोकशाही मार्गाने न्याय मिळतो हे रिक्षा चालकांनी सिद्ध केले ः बाबा कांबळे

  • रॅपिडो बंदच्या निर्णयाचा भंडारा उधळून रिक्षा चालक मालकांनी केला आनंदोत्सव

पिंपरी / प्रतिनिधी

काही रिक्षा संघटनांनी रिक्षा चालकांना चुकीच्या मार्गाने आंदोलन करायला लावून अडचणीत टाकण्याचे काम केले. मात्र आपल्या मागण्या कायदेशीर मार्गाने देखील सोडविता येतात, ही भूमिका आम्ही घेतली. रॅपिडोच्या बेकायदेशीर प्रवासी वाहतूकीविरोधात न्यायालयात दाद मागितली. रस्त्यावरच्या लढाईबरोबर न्यायालयाची देखील लढाई आम्ही जिंकली आहे. हा ऐतिहासिक विजय असून लोकशाही मार्गाने न्याय मिळतो हे रिक्षा चालकांनी सिद्ध केले असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

रॅपिडो कंपनीच्या प्रवासी वाहतूकीवर बंदी घालण्याचा उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. या आदेशाचे स्वागत करत पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा चालक मालकांनी केले. या वेळी रिक्षा चालकांनी भंडाऱ्याची उधळण केली. तसेच पेढे वाटून, फटाक्‍यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. या वेळी रिक्षा चालकांना मार्गदर्शन करताना बाबा कांबळे बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला बाबा कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

बाबा कांबळे म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर पिंपरी चिंचवड, पुणे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलने झाली आहेत. काही रिक्षा संघटनांनी रिक्षा चालकांच्या अडचणींचा फायदा घेत आंदोलनाचा चुकीचा मार्ग अवलंबला होता. आक्रमक आंदोलनाचा मार्ग निवडला होता. त्यामुळे अनेक रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल होण्याची वेळ आली. परंतु महाराष्ट्र रिक्षा पंचायतने या चुकीच्या गोष्टीला विरोध केला. लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांचे गाऱ्हाणे शासनाकडे मांडण्याची भूमिका घेतली. संविधानिक मार्गाने आंदोलन करून देखील न्याय मिळतो ही भूमिका रिक्षा चालकांना पटवून दिली. कालांतराने ते सिद्ध देखील करून दाखवले.

रॅपिडो कंपनीने प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्यासाठी न्यायालयात दाद मागितली होती. त्याला आव्हान देणारी इंटरप्रिटेशन याचिका महाराष्ट्र रिक्षा पंचायत व इतर मित्र संघटनांनी केली. रस्त्यावरची लढाई जिंकली होती. न्यायालयातील लढाई जिंकण्याचे आव्हान होते. मात्र रिक्षा चालकांची वकिलांमार्फत योग्य भूमिका लावून धरली. अडचणी सांगितल्या. त्यामुळे न्यायालयाने देखील रिक्षा चालकांच्या बाजूने निर्णय देत रॅपिडोवर बंदी घातली. ही लढाई ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळे रिक्षा चालक मालकांच्या आयुष्यात मोठा बदल आला असून या निर्णयाचा फायदा देशभरातील 15 कोटी रिक्षा, टॅक्‍सी, बस टू व्हीलर यांना होणार आहे. तर महाराष्ट्रातील 22 लाख रिक्षा चालक-मालकांना याचा फायदा होणार असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

सार्वजनिक वाहतूक व्यवसाय करण्याचा अधिकार कोणालाही नाही. रिक्षा व टॅक्‍सी सेवा या कायदेशीर आहेत असे महत्त्वाचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. पुढील सुनावणी 20 जानेवारी रोजी आहे. बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांच्या नोंदी नाहीत, परमीट नाही, परवाना नाही. मग प्रवासी वाहतूकीला परवानगी कोणी दिली असे न्यायालयाने संबंधीतांना फटकारले, असे बाबा कांबळे यांनी सांगितले.

पुढील लढाई अधिक व्यापक असणार आहे. अनेक मागण्या रखडलेल्या आहेत. त्या देखील कायदेशीर मार्गानेच सोडवू, असे बाबा कांबळे म्हणाले.