Home Blog Page 1464

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जी-२० बैठकस्थळी प्रदर्शनाला भेट

पुणे दि.१६: केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी जी-२० बैठकस्थळी प्रदर्शन दालनांना भेट दिली. त्यांनी विविध दालनात प्रदर्शित विषयांची माहिती घेतली.

‘जागतिक भरड धान्य वर्ष- २०२३’ च्या निमित्ताने अधिक पौष्टिक तत्वे असलेले बाजरी, ज्वारी, नाचणी आदी भरड धान्यांचे महत्व जागतिक स्तरावर वाढेल यासाठी शासन प्रयत्न करत आहे. त्याअनुषंगाने जी-२० बैठक स्थळीदेखील भरड धान्याचे महत्व सांगणारी माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. भरड धान्य आणि त्यापासून बनवलेल्या प्रक्रिया पदार्थांची श्री.राणे यांनी विशेष माहिती घेतली.

महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आखलेल्या पर्यटन उपक्रम, सहलींचे पॅकेजेस आदीविषयी सादरीकरणदेखील त्यांनी पाहिले.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा दावा :महागाई कमी झाली

डिसेंबर 2022 मध्ये प्रामुख्याने, अन्न पदार्थ, खनिज तेले, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, अन्न उत्पादने, वस्त्रे आणि रसायने तसेच रासायनिक उत्पादने यांच्या किंमतीमधील घसरणीमुळे महागाई कमी झाली.

नवी दिल्ली 16 जानेवारी 2023

अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा वार्षिक दर डिसेंबर 2021 च्या तुलनेत डिसेंबर 2022 या महिन्यात 4.95% (प्राथमिक) इतका राहिला, नोव्हेंबर 2022 मध्ये हा दर 5.85% इतका नोंदला गेला होता. डिसेंबर 2022 मध्ये महागाई कमी होण्यासाठी प्रामुख्याने, अन्न पदार्थ, खनिज तेले, कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, अन्न उत्पादने, वस्त्रे आणि रसायने तसेच रासायनिक उत्पादने यांच्या किंमतीमधील घसरण कारणीभूत आहे. सर्व वस्तूंचे निर्देशांक आणि महागाईचे दर तसेच घाऊक किंमत निर्देशांकाचे घटक यांच्यात गेल्या तीन महिन्यांत झालेले बदल खाली दिले आहेत:

Index Numbers & Annual Rate of Inflation (Y-o-Y in %)*
All Commodities/Major GroupsWeight (%)Oct-22 (F)Nov-22 (P)Dec-22 (P)
IndexInflationIndexInflationIndexInflation
All Commodities100.0152.98.67152.15.85150.44.95
I. Primary Articles22.6181.211.17177.75.52172.42.38
II. Fuel & Power13.2158.025.40159.617.35158.018.09
III. Manufactured Products64.2141.94.42141.53.59141.13.37
Food Index24.4177.76.60174.32.17170.30.65

Note: P: Provisional, F: Final, *Annual rate of WPI inflation calculated over the corresponding month of previous year

2. डिसेंबर 2022 या महिन्यासाठीच्या घाऊक किंमतीवर आधारित निर्देशांकात नोव्हेंबर 2022 मधील दरांच्या तुलनेत मासिक स्तरावर (-)1.12%  इतका बदल झाला आहे.  घाऊक किंमत निर्देशांकात मासिक पातळीवर झालेले गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीतील बदल समग्रपणे खाली मांडले आहेत:

Month Over Month (M-o-M in %) change in WPI Index#
All Commodities/Major GroupsWeightJul-22Aug-22Sep-22Oct-22Nov-22 (P)Dec-22 (P)
All Commodities100.00-0.90-0.52-0.850.66-0.52-1.12
I. Primary Articles22.62-2.420.68-1.353.01-1.93-2.98
II. Fuel & Power13.15-0.30-4.44-0.50-0.251.01-1.00
III. Manufactured Products64.23-0.490.00-0.70-0.21-0.28-0.28
Food Index24.38-1.801.15-0.621.48-1.91-2.29

Note: P: Provisional, #Monthly rate of change, based on month over month (M-o-M) WPI calculated over the preceding month

3. घाऊक उत्पादनांच्या किंमतीवर आधारित निर्देशांकाच्या प्रमुख गटांमध्ये मासिक स्तरावरील झालेले बदल:

  • 1. प्राथमिक वस्तू (भार22.62%):- या महत्त्वाच्या गटासाठीचा निर्देशांक 2.98% च्या घसरणीसह डिसेंबर 2022 मध्ये 172.4 (प्राथमिक) झाला. नोव्हेंबर 2022 मध्ये हा निर्देशांक 177.6 इतका (प्राथमिक) होता. नोव्हेंबर 2022 मधील दरांच्या तुलनेत डिसेंबर 2022 मध्ये खाद्य पदार्थांखेरीज इतर वस्तूंच्या किंमतीत 1.49% आणि  खनिजांच्या किंमतीत  1.02% इतकी वाढ झाली आहे. नोव्हेंबर  2022 मधील दरांच्या तुलनेत डिसेंबर 2022 मध्ये खाद्यपदार्थ (3.16%) आणि कच्चे पेट्रोलियम तेल आणि नैसर्गिक वायू यांच्या (10.81%) किमतीत घसरण झाली आहे.
  •  
  • इंधन आणि उर्जा (भार 13.15%):- या मुख्य गटासाठीचा निर्देशांक नोव्हेंबर 2022 मध्ये 159.6 (प्राथमिक) इतका होता, त्यात 1%ची घसरण होऊन तो डिसेंबर 2022 मध्ये 158 (प्राथमिक) झाला आहे. नोव्हेंबर 2022 च्या तुलनेत डिसेंबर 2022 मध्ये विजेच्या किमती (9.51%) वाढल्या. नोव्हेंबर 2022 च्या तुलनेत डिसेंबर 2022 मध्ये खनिज तेलांच्या किमती (4.64%) कमी झाल्या.
  • उत्पादित वस्तू (भार 64.23%):- या महत्त्वाच्या गटासाठीचा निर्देशांक नोव्हेंबर 2022 मध्ये 141.5 (प्राथमिक) होता, त्यात 0.28% नी घट होऊन तो डिसेंबर 2022 मध्ये 141.1 (प्राथमिक) झाला आहे. या 22 एनआयसी दोन अंकी गटातील उत्पादित प्रकारच्या वस्तूंपैकी,  बारा गटातल्या वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे तर नऊ गटांतील वस्तूंच्या किमतीत घसरण झाली आहे. एका गटातल्या वस्तूंच्या किमती स्थिर आहेत.
  • किमतीतील वाढ मुख्यतः ध्वनीमुद्रित माध्यमांचे मुद्रण आणि पुनरुत्पादन; विद्युत उपकरणे; इतर अधातू -नॉन-मेटलिक खनिज उत्पादने; फर्निचर आणि पेये यांच्या किंमती वाढल्यामुळे महागाईत वाढ झाल्याचे दिसते आहे. नोव्हेंबर, 2022 च्या तुलनेत डिसेंबर, 2022 मध्ये किमतीत घट झालेल्या काही गटांमध्ये खाद्यपदार्थ कापड; रसायने आणि रासायनिक उत्पादने; मूलभूत धातू; कागद आणि कागद उत्पादने; मोटार वाहने, ट्रेलर आणि सेमी -ट्रेलर इत्यादींचा समावेश आहे.

4. घाऊक किमत निर्देशांकावर आधारित खाद्यान्न निर्देशांक (भार 24.38%): प्राथमिक वस्तू गटातील ‘खाद्यपदार्थ’ आणि उत्पादित उत्पादने गटातील ‘खाद्य उत्पादन’ यांचा समावेश असलेला खाद्य निर्देशांक नोव्हेंबर, 2022 मधील 173 वरून डिसेंबर, 2022 मध्ये 170.3 वर घसरला आहे. घाऊक किमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर नोव्हेंबर 2022 मध्ये 2.17% वरून डिसेंबर 2022 मध्ये 0.65% पर्यंत कमी झाला.

5. ऑक्टोबर महिन्यासाठी अंतिम निर्देशांक, 2022 (आधारभूत वर्ष: 2011-12=100): ऑक्टोबर, 2022 या महिन्यासाठी अंतिम घाऊक किंमत निर्देशांक आणि ‘सर्व वस्तूंसाठी’साठी महागाई दर (आधार: 2011-12=100) अनुक्रमे 152.9 आणि 8.67% होता. डिसेंबर, 2022 साठी अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक आणि विविध वस्तू गटांसाठी महागाई दरांचे तपशील परिशिष्ट I मध्ये दिले आहेत. मागील सहा महिन्यांतील विविध वस्तू गटांसाठी घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा वार्षिक दर (Y-o-Y) परिशिष्ट II मध्ये  आहे. मागील सहा महिन्यांतील विविध वस्तू गटांसाठी घाऊक किंमत निर्देशांक परिशिष्ट III मध्ये आहे.

6. प्रतिसाद दर: डिसेंबर 2022 साठी घाऊक किंमत निर्देशांक 85.2 टक्के भारित प्रतिसाद दराने संकलित करण्यात आला आहे, तर ऑक्टोबर 2022 साठीची अंतिम टक्केवारी 93.1 टक्के ही भारित प्रतिसाद दरावर आधारित आहे. घाऊक किंमत निर्देशांकाच्या अंतिम पुनरावृत्ती धोरणानुसार डब्लूपीआय च्या तात्पुरत्या आकडेवारीत सुधारणा केली जाईल. हे प्रसिद्धी पत्रक, विशिष्ट वस्तू निर्देशांक आणि चलनवाढ क्रमांक आमच्या होम पेजवर उपलब्ध आहेत: http://eaindustry.nic.in.

7. प्रसिद्धी पत्रकाची पुढील तारीख: जानेवारी, 2023 महिन्यासाठी घाऊक किंमत निर्देशांक 14/02/2023 रोजी जाहीर केला जाईल.

टीप: डीपीआयआयटीने दर महिन्याच्या 14 तारखेला (किंवा पुढील कामकाजाच्या दिवशी) भारतातील घाऊक किमतीचे निर्देशांक क्रमांक, संदर्भ महिन्याच्या दोन आठवड्यांच्या अंतराने जारी केले आहेत. निर्देशांक क्रमांक संस्थात्मक स्त्रोत आणि देशभरातील निवडक उत्पादन युनिट्सकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीसह संकलित केले आहेत. या प्रसिद्धी पत्रकात डिसेंबर, 2022 (तात्पुरती), ऑक्टोबर, 2022 (अंतिम) आणि इतर महिने/वर्षांसाठी डब्लूपीआय (आधारभूत वर्ष 2011-12=100) समाविष्ट आहे.  डब्लूपीआयची तात्पुरती आकडेवारी 10 आठवड्यांनंतर अंतिम केली जाते आणि त्यानंतर ती कायमस्वरूपी म्हणून नोंदवली जाते.

परिशिष्ट-I

डिसेंबर 2022 साठी अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांक आणि महागाईचे दर (आधारभूत वर्ष: 2011-12=100)  

Commodities/Major Groups/Groups/Sub-Groups/ItemsWeightIndex(Dec-22)*Latest month over monthCumulative Inflation (YoY)WPI Based rate of Inflation (YoY)
2021-20222022-2023*2021-20222022-2023*Dec-21Dec-22*
ALL COMMODITIES100150.4-0.28-1.1212.6711.5214.274.95
I. PRIMARY ARTICLES22.62172.40.00-2.988.6112.3213.782.38
A. Food Articles15.26174.5-0.90-3.162.558.329.68-1.25
Cereals2.82185.70.621.640.0710.745.1614.00
Paddy1.43173.7-0.120.23-1.164.310.256.83
Wheat1.03198.10.742.962.4314.9511.4120.72
Pulses0.64177.8-1.24-0.348.05-0.033.911.48
Vegetables1.87180.1-3.47-22.64-6.6513.1731.46-35.95
Potato0.28256.5-17.64-11.40-40.8535.15-42.4822.38
Onion0.16198.1-7.79-15.52-2.24-23.31-19.08-25.97
Fruits1.60165.5-2.62-0.2411.3210.3815.161.35
Milk4.44168.3-0.130.782.135.902.086.99
Eggs, Meat & Fish2.40166.9-0.920.128.214.816.813.34
B. Non-Food Articles4.12170.75.181.4920.4312.0519.283.71
Oil Seeds1.12200.03.860.1536.28-2.6727.80-4.81
C. Minerals0.83198.73.071.0217.726.2418.87-2.93
D. Crude Petroleum & Natural gas2.41152.7-5.37-10.8156.2657.6947.5039.71
Crude Petroleum1.95126.8-6.81-15.1383.0948.3651.3821.92
II. FUEL & POWER13.15158.0-1.62-1.0032.6233.8338.0818.09
LPG0.64116.73.091.4847.9216.9260.30-14.76
Petrol1.60155.5-4.18-1.8964.8541.9475.1316.83
HSD3.10184.4-3.54-8.0360.9760.8270.5535.49
III. MANUFACTURED PRODUCTS64.23141.1-0.07-0.2811.357.0910.713.37
Mf/o Food Products9.12163.3-0.63-0.7912.526.058.754.28
Vegetable And Animal Oils and Fats2.64169.2-2.23-3.2036.461.4016.19-6.05
Mf/o Beverages0.91129.5-0.080.541.711.503.411.81
Mf/o Tobacco Products0.51164.31.76-0.671.952.872.991.48
Mf/o Textiles4.88138.40.80-1.3515.428.9816.88-0.57
Mf/o Wearing Apparel0.81149.90.350.333.104.113.953.59
Mf/o Leather and Related Products0.54121.70.93-0.730.473.191.011.59
Mf/o Wood and of Products of Wood and Cork0.77143.70.280.284.802.155.320.84
Mf/o Paper and Paper Products1.11148.21.15-1.9812.5713.5516.414.96
Mf/o Chemicals and Chemical Products6.47144.20.29-0.7612.7411.3514.295.41
Mf/o Pharmaceuticals, Medicinal Chemical and Botanical Products1.99141.70.290.073.813.773.563.73
Mf/o Rubber and Plastics Products2.30128.5-0.390.0013.225.2111.101.10
Mf/o other Non-Metallic Mineral Products3.20134.7-0.160.374.578.636.567.67
Cement, Lime and Plaster1.64137.6-1.400.224.048.776.188.26
Mf/o Basic Metals9.65143.0-1.18-0.3527.299.1822.540.78
Mild Steel – Semi Finished Steel1.27122.1-0.92-1.3720.599.0114.533.30
Mf/o Fabricated Metal Products, Except Machinery and Equipment3.15137.90.53-0.2913.087.5912.893.61

Note: * = Provisional, Mf/o = Manufacture of

Annex-II

Commodities/Major Groups/Groups/Sub-Groups/ItemsWeightWPI based inflation figures for last 6 months
Jul-22Aug-22Sep-22Oct-22Nov-22*Dec-22*
ALL COMMODITIES100.014.0712.4810.558.675.854.95
I. PRIMARY ARTICLES22.6214.7814.7411.5411.175.522.38
A. Food Articles15.2610.7712.5511.038.451.07-1.25
Cereals2.829.7611.7711.9112.0912.8514.00
Paddy1.433.104.335.796.636.456.83
Wheat1.0313.6117.3516.0916.2518.1120.72
Pulses0.641.332.58-0.340.450.561.48
Vegetables1.8718.4622.4539.6617.44-20.08-35.95
Potato0.2854.5144.4049.7944.9213.7522.38
Onion0.16-25.93-24.76-20.96-30.02-19.19-25.97
Fruits1.629.6431.494.510.29-1.071.35
Milk4.445.455.415.555.986.036.99
Eggs, Meat & Fish2.45.557.883.633.972.273.34
B. Non-Food Articles4.1212.888.424.348.007.483.71
Oil Seeds1.12-4.06-13.48-16.55-5.36-1.29-4.81
C. Minerals0.835.507.41-2.4210.13-0.96-2.93
D. Crude Petroleum & Natural gas2.4165.9459.9444.7243.5748.2339.71
Crude Petroleum1.9558.7750.5732.1830.6933.8721.92
II. FUEL & POWER13.1544.6235.0333.1125.4017.3518.09
LPG0.6432.0019.758.454.82-13.40-14.76
Petrol1.6055.3038.6840.3825.0214.1116.83
HSD3.1072.4161.3165.9643.0542.1035.49
III. MANUFACTURED PRODUCTS64.238.247.516.124.423.593.37
Mf/o Food Products9.126.745.772.833.284.444.28
Vegetable and Animal Oils and Fats2.642.53-1.22-8.22-7.47-5.10-6.05
Mf/o Beverages0.911.190.861.181.331.181.81
Mf/o Tobacco Products0.512.982.242.812.503.961.48
Mf/o Textiles4.8812.6110.488.405.711.59-0.57
Mf/o Wearing Apparel0.814.235.143.753.543.613.59
Mf/o Leather and Related Products0.545.034.143.962.693.291.59
Mf/o Wood and of Products of Wood and Cork0.772.142.341.921.060.840.84
Mf/o Paper and Paper Products1.1115.6616.6015.1611.378.314.96
Mf/o Chemicals and Chemical Products6.4714.3112.5111.378.946.525.41
Mf/o Pharmaceuticals, Medicinal Chemical and Botanical Products1.994.244.854.313.823.963.73
Mf/o Rubber and Plastics Products2.307.995.634.521.970.711.10
Mf/o other Non-Metallic Mineral Products3.209.059.349.627.847.107.67
Cement, Lime and Plaster1.648.879.249.728.066.528.26
Mf/o Basic Metals9.6511.499.576.391.18-0.070.78
Mild Steel – Semi Finished Steel1.2711.378.648.134.303.773.30
Mf/o Fabricated Metal Products, Except Machinery and Equipment3.157.817.206.515.194.463.61

Note: * = Provisional, Mf/o = Manufacture of

Annex-III

Commodities/Major Groups/Groups/Sub-Groups/ItemsWeightWPI Index for last 6 months
Jul-22Aug-22Sep-22Oct-22Nov-22*Dec-22*
ALL COMMODITIES100.0154.0153.2151.9152.9152.1150.4
I. PRIMARY ARTICLES22.62177.1178.3175.9181.2177.7172.4
A. Food Articles15.26178.9182.0182.2186.1180.2174.5
Cereals2.82172.1176.6178.5179.8182.7185.7
Paddy1.43166.2168.8171.7173.6173.3173.7
Wheat1.03173.6180.6181.8185.3192.4198.1
Pulses0.64175.1179.0178.1179.1178.4177.8
Vegetables1.87226.5226.9249.3279.5232.8180.1
Potato0.28291.4291.4284.9296.5289.5256.5
Onion0.16172.5174.4174.2205.1234.5198.1
Fruits1.6188.5204.2176.2173.8165.9165.5
Milk4.44164.4165.5165.5166.7167.0168.3
Eggs, Meat & Fish2.4173.1171.2171.3167.8166.7166.9
B. Non-Food Articles4.12171.8175.1168.2166.0168.2170.7
Oil Seeds1.12208.1207.3196.1189.0199.7200.0
C. Minerals0.83197.7192.9185.7196.8196.7198.7
D. Crude Petroleum & Natural gas2.41167.6155.3145.3170.7171.2152.7
Crude Petroleum1.95162.1146.2133.9151.6149.4126.8
II. FUEL & POWER13.15166.6159.2158.4158.0159.6158.0
LPG0.64135.3131.6124.5121.7115.0116.7
Petrol1.60180.3164.2161.3156.4158.5155.5
HSD3.10210.0194.7196.0188.4200.5184.4
III. MANUFACTURED PRODUCTS64.23143.2143.2142.2141.9141.5141.1
Mf/o Food Products9.12166.3166.7163.3163.7164.6163.3
Vegetable and Animal Oils and Fats2.64190.3186.4173.1173.3174.8169.2
Mf/o Beverages0.91128.0128.3128.4129.1128.8129.5
Mf/o Tobacco Products0.51165.9164.2164.4164.2165.4164.3
Mf/o Textiles4.88147.3146.5144.5142.5140.3138.4
Mf/o Wearing Apparel0.81147.8149.3149.4149.3149.4149.9
Mf/o Leather and Related Products0.54123.2123.3123.4122.2122.6121.7
Mf/o Wood and of Products of Wood and Cork0.77143.2144.1143.4142.9143.3143.7
Mf/o Paper and Paper Products1.11154.4154.5154.2152.8151.2148.2
Mf/o Chemicals and Chemical Products6.47147.8146.6146.0146.3145.3144.2
Mf/o Pharmaceuticals, Medicinal Chemical and Botanical Products1.99140.0140.6140.3141.2141.6141.7
Mf/o Rubber and Plastics Products2.30131.1129.4129.5129.2128.5128.5
Mf/o other Non-Metallic Mineral Products3.20133.7133.5133.3133.5134.2134.7
Cement, Lime and Plaster1.64137.4137.1136.6136.7137.3137.6
Mf/o Basic Metals9.65149.4148.9146.6145.6143.5143.0
Mild Steel – Semi Finished Steel1.27128.3127.0126.3126.1123.8122.1
Mf/o Fabricated Metal Products, Except Machinery and Equipment3.15139.4140.0139.1137.7138.3137.9

Note: * = Provisional, Mf/o = Manufacture of

भारतीय उत्पादने आणि परदेशी पाहुण्यांचे मराठमोळे स्वागत

पुणे, दि. १६: जी-२० परिषदेच्या निमित्ताने हॉटेल जे. डब्ल्यु. मेरीयट येथे आयोजित बैठकीच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या प्रदर्शनातील स्टॉल्सना परदेशी पाहुण्यांनी आवर्जून भेट दिली. या भेटीच्यावेळी आलेल्या प्रतिनिधींनी भारतीय पारंपरिक उत्पादने आणि महाराष्ट्राच्या पर्यंटनस्थळात रुची दाखवली.

महाराष्ट्र पर्यटन महामंडळ, खादी ग्रामोद्योग, तृणधान्य विषयक, बांबू उत्पादने, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, केंद्र शासनाचे आदिवासी सहकारी पणन विकास महासंघ, पुणे महानगर पालिकेच्या मुळा, मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आदी प्रदर्शन दालनांना कुतूहलाने परदेशी पाहुण्यांनी भेट दिली. बांबू उत्पादने आणि हस्तकलेच्या वस्तूंमध्ये रुची दाखवून आस्थेने माहिती घेतली. तृणधान्य पासून बनवलेली उत्पादने आरोग्यदायी असून ही उत्पादने आमच्या देशात उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करा असे स्टॉल धारकांना जी-२० सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

‘जी – २०’ मधील ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी बाजरी तृणधान्यापासून बनवलेल्या चिप्सची चव घेऊन वाहवा केली. ‘नमस्ते महाराष्ट्र’ म्हणत यावेळी पाहुण्यांचे पुणेरी आतिथ्य आणि मराठमोळे स्वागत करण्यात आले.

रॅपीडो विरोधातली लढाई जिंकलो ; रखडलेल्या मागण्यांसाठी संघर्ष करू : बाबा कांबळे

बोगस संघटना कडून रिक्षा आंदोलनाचे विद्रोपीकरण रिक्षा विश्वाची हानी करण्याचे प्रयत्न

पुणे –

लोकशाही मार्गाने लढा दिल्यास यश निश्चित मिळते. देशात अद्यापही कायदा सर्वसामान्य लोकांसाठी काम करत आहे. रॅपिडो कंपनी विरोधात रिक्षा चालकांनी कायदेशीर मार्गाने रस्त्यावर आणि न्यायालयात लढा दिला त्याला यश देखील मिळाले. मात्र आता आणखीन जबाबदारी वाढली असून उर्वरित रखडलेल्या मागण्या देखील सनदशीर मार्गाने आंदोलन करून सोडविण्यासाठी संघर्ष करू, असा विश्वास महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केला.

रॅपिडो कंपनी विरोधात न्यायालयीन लढ्यात यश मिळाल्याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुन्हा रिक्षा फेडरेशन व इतर रिक्ष सहकारी संघटनांच्या वतीने पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बाबा कांबळे बोलत होते.या पत्रकार परिषदेत ऑटो टॅक्सी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष कृती समिती व महाराष्ट्राच्या पंचायत प्रदेश अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे,आदी उपस्थित होते.

आज रिक्षा चालक मालकांच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉक्टर अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर कायदेशीर सल्लागार शारदा वाडेकर, सह्या परिवहन अधिकारी आनंद भोसले यांचा सत्कार करण्यात आला,

बाबा कांबळे म्हणाले की, रिक्षा चालकांच्या लढाईमध्ये रॅपिडो कंपनीच्या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीविरोधात दिलेला लढा हा एका टप्प्याचा भाग आहे. रिक्षा चालकांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. यामध्ये रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करणे, बोगस रिक्षा संघटना विरोधात कारवाई करणे आदीसह अनेक रिक्षा चालकांच्या कल्याण करणाऱ्या मागण्या आहेत. त्यासाठी देखील कायदेशीर मार्गाने लोकशाहीवर विश्वास ठेवून संघर्ष करणार आहे. चुकीच्या मार्गाला न जाता कायदेशीर मार्गाने संघर्ष करू अशी भूमिका वारंवार महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने घेण्यात आली. मात्र काही रिक्षा संघटनांनी रिक्षा चालकांना चुकीच्या मार्गाने आंदोलन करायला लावून अडचणीत टाकण्याचे काम केले होते. मात्र आपल्या मागण्या कायदेशीर मार्गाने देखील सोडविता येतात, ही भूमिका आम्ही घेतली. रॅपिडोच्या बेकायदेशीर प्रवासी वाहतूकीविरोधात न्यायालयात दाद मागितली. रस्त्यावरच्या लढाईबरोबर न्यायालयाची देखील लढाई आम्ही जिंकली आहे. हा ऐतिहासिक विजय असून लोकशाही मार्गाने न्याय मिळतो हे रिक्षा चालकांनी सिद्ध केले आहे.

रॅपिडो कंपनीने प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्यासाठी न्यायालयात दाद मागितली होती. त्याला आव्हान देणारी इंटरवेशन याचिका महाराष्ट्र रिक्षा पंचायत व इतर मित्र संघटनांनी केली. रस्त्यावरची लढाई जिंकली होती. न्यायालयातील लढाई जिंकण्याचे आव्हान होते. मात्र रिक्षा चालकांची वकिलांमार्फत योग्य भूमिका लावून धरली. अडचणी सांगितल्या. त्यामुळे न्यायालयाने देखील रिक्षा चालकांच्या बाजूने निर्णय देत रॅपिडोवर बंदी घातली. ही लढाई ऐतिहासिक आहे. या निर्णयामुळे रिक्षा चालक मालकांच्या आयुष्यात मोठा बदल आला असून या निर्णयाचा फायदा देशभरातील 15 कोटी रिक्षा, टॅक्‍सी, बस टू व्हीलर यांना होणार आहे. तर महाराष्ट्रातील 22 लाख रिक्षा चालक-मालकांना याचा फायदा होणार असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

आनंद तांबे म्हणाले सार्वजनिक वाहतूक व्यवसाय करण्याचा अधिकार कोणालाही नाही. रिक्षा व टॅक्‍सी सेवा या कायदेशीर आहेत असे महत्त्वाचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. पुढील सुनावणी 20 जानेवारी रोजी आहे. बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांच्या नोंदी नाहीत, परमीट नाही, परवाना नाही. मग प्रवासी वाहतूकीला परवानगी कोणी दिली असे न्यायालयाने संबंधीतांना फटकारले, असे आनंद तांबे यांनी सांगितले.

गडकरींना धमकी देणारा जयेश पुजारी कोण? मृत्यूदंडाची शिक्षा, तरीही कारवाया सुरूच

बंगळुरूकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नुकतीच फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. फोन करणाऱ्या व्यक्तीने गडकरींकडे तब्ल 100 कोटींची खंडणी मागितल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा वेगवान तपास केला. त्यात गडकरींना कर्नाटकच्या बेळगावातील हिंडलगा तुरुंगातून धमकावण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लागलीच कर्नाटक पोलिसांनी हिंडलगा तुरुंगाच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी गडकरींना धमकी देणाऱ्या कैद्याची चौकशी केली. तुरुंगातही दहशत अधिकाऱ्यांना नेहमीच धमक्या देऊन त्यांचा छळ करणाऱ्या आणि मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेल्या या कैद्याने आपली ओळख कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक म्हणून करवून दिली. आपले नाव जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी असे सांगितले. महाराष्ट्र पोलिसांचे एक पथकही या प्रकरणी बेळगावला पोहोचले आहे.

कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्याचा रहिवासी असणारा जयेश दुहेरी हत्याकांडातील आरोपी आहे. हे हत्याकांड 2 ऑगस्ट 2008 रोजी घडले होते. पुजारीने जी महिला व तिच्या मुलाला संपवले ते जयेशचा चुलत भाऊ लोहितची पत्नी सौम्या (23) व मुलगा जिष्णू होते. जयेशने त्यांची हत्या शिराडीच्या सिरीबगीलु पोलिट्टु स्थित त्यांच्या घरी केली होती. त्याने सौम्याचा गळा घोटला. तर जिष्णुची चाकू भोसकून हत्या केली. घटनास्थळावरून पसार होण्यापूर्वी जयेशने सौम्याची चेन व झुमकेही नेले होते.जयेश 2012 पर्यंत फरार होता. त्यानंतर केरळ पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी त्याला एका प्रकरणाच्या चौकशीसाठी ठाण्यात बोलावले होते. तेथून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण सतर्क नागरिकांनी त्याला पुत्तूर न्यायालय परिसरात पकडले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ऑगस्ट 2016 मध्ये जयेशला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ‘जयेशने तुरुंगातून अनेकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. 2016 मध्येही त्याने एकदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याला पकडण्यात यश आले.’ जयेश पुजारी एक कुख्यात गुंड आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याचे अंडरवर्ल्डसह महाराष्ट्रातीलही अनेकांशी संबंध आहेत..तुरुंग अधीक्षक कृष्ण कुमार यांनी काही माध्यम प्रतिनिधींना दिलेल्या माहितीनुसार त्याला (जयेश पुजारी) त्याच्या या कृत्याप्रकरणी स्वतंत्र बराकीत ठेवले आहे. त्याच्यावर करडी नजरही ठेवली जाते. तुरुंगात तो सर्वच अधिकाऱ्यांवर ओरडतो. त्यांना धमकावतो. सद्यस्थितीत तुरुंगातील मोबाइल फ्रीक्वेंसी बंद करण्यासाठी तुरुंग परिसरात जॅमर लावले जात आहेत.’

तुरुंगातून धमकीचे फोन करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही

हिंडलगा तुरुंगातून धमकीचे फोन करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2013 मध्ये मुंबईतील युसूफ बच्चन नामक एका गुन्हेगारानेही आपल्या सहकाऱ्यांना तुरुंगातून फोन केला होता. त्याच्या इशाऱ्यानुसार मुंबईतील एका बिल्डरला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर तुरुंग प्रशासनाने तुरुंगातील अशा काळ्या कारवाया रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. पण सद्यस्थिती पाहता सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याचे दिसून होत आहे.नितीन गडकरींना धमकी दिल्याप्रकरणी जयेश पुजारीची कसून चौकशी केली जात आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पुजारीने तुरुंगातून मोबाइलद्वारे फोन केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वातील नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एक पथकही बेळगावला पोहोचले आहे. या पथकाने तुरुंग प्रशासनाकडे पुजारीची चौकशी करण्याची परवानगी मागितली आहे.

पुण्यात थंडीची तीव्रता थोडी कमी झाली

पुणे – महाराष्ट्रात सर्वत्र थंडी आहे, पुण्यातही थंडी आहे परंतु गेल्या २/३ दिवसांच्या तुलनेत आजचे तापमान पाहता थंडीची तीव्रता आज कमी झाल्याचे आढळून आले आहे.

महाराष्ट्रात आज जळगाव -१० :कोल्हापूर १६.९,उदगीर १५, सातारा ,१२.७, नंदेस १५.४,जालना ,१४, नाशिक १०.५,औरंगाबाद १०, डहाणू १३.२,मालेगाव १३.८ ,पुणे १०.८ ,सोलापूर १५.५,रत्नागिरी १६ ,परभणी १३, माथेरान १३.८ ,बारामती १२.२ उस्मानाबाद १४.४ आणि सांगलीत १५. १ एवढे नीचांकी तापमान नोंदविले गेले.

पुणे विभागात आज सकाळी नोंदविले गेलेले तापमान

महाराष्ट्रात उद्योग येण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वित्झर्लंडला…

पुणे-महाराष्ट्रात उद्योग धंदे यावेत यां उद्देशाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंड देशातील डाव्होस शहराला भेट देत आहेत .या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे कि,; स्वित्झर्लंड देशातील डाव्होस येथे वर्ल्डईकोनिमिकफोरम च्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी आज प्रयाण करतोय. या आंतरराष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्राची भूमिका मांडताना २० उद्योगांसोबत १ लाख ४० हजार कोटींचे सामंजस्य करार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक व्हावी, यासाठी संपूर्णपणे प्रयत्नशील राहीन.असे शिंदे यांनी म्हटले आहे.

काठमांडू विमान अपघातात 68 प्रवाशांचा मृत्यू-संक्रांतीच्या दिवशी धडकी भरविणारी बातमी

नेपाळच्या पोखरामध्ये रविवारी सकाळी 11 वाजता यती एअरलाइन्सच्या 72 आसनी विमान अपघातात 68 जणांचा मृत्यू झाला. या विमानात 10 विदेशींसह 68 प्रवासी व 4 क्रू मेंबर होते. ज्यामध्ये 5 भारतीय देखील दगावले आहेत. जळत्या विमानातून दोघांना बाहेर काढण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. उर्वरित दोघांची माहिती मिळू शकली नाही.

नेपाळच्या पोखरामध्ये रविवारी सकाळी सुमारे ११ वाजता यती एअरलाइन्सचे ७२ आसनी विमान कोसळले. विमानात १० विदेशींसह ६८ प्रवासी व ४ क्रू मेंबर होते. पैकी ६८ जणांचा मृत्यू झाला. त्यात ५ भारतीय आहेत. जळत्या विमानातून दोघांना बाहेर काढण्यात आले. ते गंभीर आहेत. उर्वरित दोघांची माहिती मिळू शकली नाही. विमानाने काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाहून सकाळी १०:३२ वाजता उड्डाण केले. ते १०:५९ वाजता लँड होणार होते, पण २७ व्या मिनिटापूर्वीच क्रॅश झाले.

पोखरा विमानतळाच्या एटीसीनुसार, विमान धावपट्टीपासून १० सेकंदांच्या अंतरावर होते. ते लँड करण्यापूर्वीच सती नदी किनारी कोसळले. अभिषेक कुशवाह, विशाल शर्मा, अनिल राजभर, सोनू आणि संजय जायसवाल अशी भारतीय मृतांची नावे आहेत. नेपाळच्या एव्हिएशन अथॉरिटीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळले. पोखरा हे हिमालय क्षेत्राचे प्रमुख पर्यटनस्थळ आहे.

अंजूचे अखेरचे उड्डाण, पतीचा असाच मृत्यू झाला अंजू खतिवडा हिचे पायलट म्हणून हे अखेरचे उड्डाण ठरले आहे. यशस्वीरीत्या लँडिंग केल्यानंतर तिला प्रमुख पायलटचा परवाना मिळणार होता, पण असे होऊ शकले नाही. दुर्दैव म्हणजे अंजूचे पती दीपक पोखरेल हेही यती एअरलाइन्समध्ये को-पायलट होते. जून २००६ मध्ये विमान अपघातात त्यांचाही मृत्यू झाला होता.

सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट आणि अजितदादांची लिफ्ट धाडकन आली खाली :संक्रातीच्या दिवशी २ गंभीर बातम्यांची चर्चा..

पुणे- हिंजवडी भागामध्ये कराटे कोचिंग क्लासेसचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानक पेट घेतला, आणि बारामती येथील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली येतानाअजितदादा पवार येत असलेली लिफ्ट ने वेगाने धाडकन खाली आली

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या लिफ्टला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. परमेश्वराच्या कृपेने मी वाचलो. चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट धाडकन खाली आली होती. अन्यथा आज श्रद्धांजली वाहायचा कार्यक्रम घ्यावा लागला असता, अशी मिश्कील टिप्पणी करत अजित पवार यांनी आपल्या अपघाताची माहिती दिली

परमेश्वराच्या कृपेने मी वाचलो

पुढे अजित पवार म्हणाले, काल दिवसभरात मी दोन रूग्णालयांचे उद्घाटन केले. त्यातील दुसऱ्या रूग्णालयाच्या उद्घाटनानंतर आम्ही चौथ्या मजल्यावर जात होतो. परंतु, तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट थांबली. तिथेच बंद झाली. अंधार गुडूप. चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट धाडकन खाली आली. थोडक्यात वाचलो. अन्यथा आज श्रद्धांजली वाहायला लागली असती. माझ्यासोबत एक डॉक्टर आणि एक सुरक्षा रक्षक देखील होते. या घटनेनंतर लिफ्टचा दरवाजा तोडून आम्हाला बाहेर काढण्यात आले. परमेश्वराच्या कृपेने मी वाचलो. असे अजित पवार म्हणाले.

पुढे अजित पवार म्हणाले, बाहेर आल्यानंतर कुणाला काही सांगितले नाही. मी घरी पत्नीलापण बोललो नाही. काल माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती. आईला नमस्कार करायला गेलो होतो. नाहीतर कालच याची ब्रेकिंग न्यूज झाली असती. हार्डीकर डॉक्टर यांना थोडे लागले. मात्र, सर्व सुखरूप आहोत. असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.

सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेटनेमके झाले काय?

पुणे येथील हिंजवडी भागामध्ये कराटे कोचिंग क्लासेसचे उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी दीपप्रज्वलित केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालताना सुप्रिया सुळे यांच्या पुतळ्याजवळील दिव्याकडे लक्ष गेले नाही. त्यामुळे हार घालत असताना या दिव्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या साडीने अचानक पेट घेतला.

दैव बलवत्तर म्हणून…मी सुरक्षित – सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याचे समोर असलेल्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. सुप्रिया सुळे यांनी तातडीने हे सुप्रिया सुळे यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर तातडीने सुप्रिया सुळे यांनी आग विझवली. सुप्रिया सुळे यांना कोणतीही हानी झाली नाही.घटनेबाबत सुप्रिया सुळे यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कराटे स्पर्धेचे उद्घाटन करीत असताना अनवधानाने साडीने पेट घेतला. पण वेळीच ती आग आटोक्यात आणण्यात आली. आमचे हितचिंतक, नागरीक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी विनंती आहे, की मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करु नये. आपण दाखवित असलेले प्रेम, काळजी माझ्यासाठी मोलाचे आहे. आपणा सर्वांचे मनापासून आभार.

जर्मनीची ट्रम्प कंपनी करणार महाराष्ट्रात ३०० कोटींची गुंतवणूक

स्टुटगार्ट : राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार निर्मितीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीला भेट दिली व गुंतवणूक वाढीबाबत सकारात्मक चर्चा केली. ट्रम्प कंपनी पुढील दोन वर्षांत महाराष्ट्रात सुमारे तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे यावेळी सष्ट करण्यात आले.

जर्मनी दौऱ्यात श्री. सामंत यांनी स्टुटगार्ट येथील ट्रम्प कंपनीच्या उत्पादन निर्मिती केंद्राला भेट दिली. यावेळी ट्रम्प कंपनीचे सीईओ रिचर्ड बॅनम्युलर आणि ट्रम्प इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पाटील यांनी श्री. सामंत यांचे स्वागत केले. बॅनम्युलर यांनी कंपनीच्या अत्याधुनिक लेझर कटिंग मशीन्स आणि फोल्डिंग मशीन्सचे सादरीकरण केले. वीजेवर चालणाऱ्या वाहनांच्या (EV) बॅटरी आणि बॅटरी स्टोरेज युनिट्स तयार करण्यासाठी या मशीन्स वापरल्या जात आहेत. या मशीन्ससाठी ट्रम्प कंपनी महाराष्ट्रात निर्मिती प्रकल्प सुरू करण्यास उत्सुक आहे. यासाठी श्री. सामंत यांनी कंपनीला महाराष्ट्र भेटीचे निमंत्रिण दिले असून त्यासाठी महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन दिले. कंपनीचे प्रतिनिधी पुढील महिन्यात महाराष्ट्राला भेट देऊन स्थळ पाहणी करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. कंपनी सुमारे तीनशे कोटी रुपये गुंतवणूक करेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

लॅप केबल्स समूहाला भेट

       उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी स्टुटगार्ट येथील लॅप काबेल समूहाला भेट दिली. यावेळी बार्डनचे संचालक आणि भारताचे वाणिज्य दूत अँड्रियास लॅप यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी लॅप यांनी ईव्ही चार्जिंग केबल्समधील नवीन तंत्रज्ञान आणि पोर्टेबल ईव्ही अडॅप्टरचे सादरिकरण केले. समृद्धी महामार्गावर या तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्रणा उभारण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. उच्च दर्जाच्या तांब्याच्या धातुसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला भेट देण्याचे कंपनीला निमंत्रण देण्यात आले.

याचदरम्यान, इंडो जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने महाराष्ट्रात जर्मन कंपन्यांकडून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि महाराष्ट्र आणि बार्डन वुर्टेमबर्ग यांच्यातील द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी अँड्रियास लॅप (बार्डन वुर्टेमबर्गचे भारताचे वाणिज्यदूत), थॉमस फुरमन ( स्टुटगार्ट शहराचे उपमहापौर), जोहान्स जंग (आर्थिक व्यवहार मंत्रालयाचे विभाग प्रमुख), सिमोन गोहरिंग( सल्लागार. बार्डन वुर्टेमबर्ग राज्य मंत्रालय), थॉमस मॅथ्यू (मर्सिडीज बेंझ), बर्नहार्ड ग्रीब (स्टुटगार्ट शहराच्या आर्थिक विकासाचे प्रमुख), खैलाश भट्ट (जर्मनीतील भारतीय वाणिज्य दूत), ट्रम्प कंपनीचे सीईओ रिचर्ड बॅनम्युलर, गेरहार्ड कुबलर( फ्रिट्झ कुब्लरच्या व्यवस्थापकीय संचालक) बार्बरा एफेनबर्गर (स्टटगार्टच्या कॉमर्स आणि इंडस्ट्री चेंबर) आणि जोएल मिटनाच्ट( भारतीय वाणिज्य दूतावासाच्या प्रमुख) आदी उपस्थित होते.

दत्तमहाराजांना १२५ किलो तिळगूळ आणि हलव्याच्या दागिन्यांचा महानैवेद्य 

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मकरसंक्रांतीनिमित्त आयोजन

पुणे : तिळगूळ, गूळ पोळी, तिळ वडी, पापडी, गूळ मोदकाच्या तोरणांनी सजलेले दत्तमंदिर… हलव्याचा नयनरम्य तन्मणी,  मुकुट आणि सुबक असा हलव्याचा हार घातल्यानंतर दिसणारी दत्तमहाराजांची विलोभनीय मूर्ती पाहण्याकरीता दत्तमंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली. मकरसंक्रांतीनिमित्त श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमहाराजांना १२५ किलो गूळ, तिळगूळ आणि हलव्याच्या दागिन्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. 
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, खजिनदार महेंद्र पिसाळ, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनिल रुकारी, डॉ.पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई यांसह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. रेखा गाडगीळ यांनी दत्तमहाराजांसाठी हलव्याचे दागिने साकारले. काशी येथील पं.वेदमूर्ती गणेश्वर द्रविडशास्त्री यांच्या हस्ते माध्यान्ह आरती झाली.
अ‍ॅड.प्रताप परदेशी म्हणाले, मकरसंक्रातीनिमित्त १२१ किलो गूळ, ५ किलो तीळ, २५ किलो हलवा, गूळ पोळी, तिळ वडी, पापडी, मोदक, गुळाच्या ढेपी वापरुन सुभाष सरपाले यांनी ही आरास केली. ट्रस्टच्या १२५ व्या वर्षानिमित्त १२५ किलो साहित्य वापरुन ही आरास साकारण्यात आली आहे. मकरसंक्रांतीनिमित्त दाखविलेला तिळगूळ भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे. सोमवार, दिनांक १६ जानेवारी रात्रीपर्यंत ही आरास भाविकांना पाहण्याकरीता खुली राहणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

एनटीसी च्या सर्व मोडकळीस आलेल्या चाळींमधील सुमारे 2062 रहिवाशांचं महाराष्ट्र सरकारसोबत समन्वयानं जलद पुनर्वसन होणार

मुंबई, 15 जानेवारी 2023

केंद्रीय वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी आज (15.01.2023 रोजी) महाराष्ट्र सरकार (GoM), मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबत, चाळींच्या पुनर्विकासाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि MoT अंतर्गत CPSE, राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या हस्तांतरणीय विकास हक्क (TDR) च्या विक्रीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.

एनटीसीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्राजक्ता वर्मा यांनी एनटीसीच्या गिरण्यांची अवस्था आणि गिरण्यांच्या जमिनीवरील चाळींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या गंभीर समस्येबाबत, एनटीसीनं महाराष्ट्र सरकार, म्हाडा आणि  एमएमआरडीए यांच्या सहकार्यानं केलेले प्रयत्न विशद केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या बांधकामासाठी, महाराष्ट्र शासनाला करण्यात आलेल्या इंदू मिल क्रमांक 6 च्या जमिनीच्या हस्तांतरणाच्या बदल्यात, एनटीसीला सुपूर्द केलेल्या टीडीआरच्या मुद्रीकरणासंबंधीच्या घडामोडींचाही यात समावेश होता.

NTC ची स्थापना 1968 मध्ये, 1974, 1985 आणि 1995 च्या राष्ट्रीयीकरण कायद्याद्वारे, आजारी कापड गिरण्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी झाली होती. सध्या NTC कडे  सुमारे 10 हजार कर्मचाऱ्यांसह, 23 कार्यरत गिरण्या, 49 बंद गिरण्या (आयडी कायद्यांतर्गत), 16 जे व्ही गिरण्या आणि 2 बंद गिरण्या आहेत. मुंबईत 13.84 एकर क्षेत्रफळ व्यापलेल्या, एनटीसी गिरण्यांच्या 11 चाळी, मोडकळीस आल्या आहेत.  मुंबईतील कापड गिरण्यांच्या चाळींच्या इमारतीचा पुनर्विकास, DCPR 2034 तरतुदींनुसार जमीन मालक NTC साठी अनिवार्य आहे.

या चाळींमधील रहिवाशांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी आणि विकास नियमन आणि प्रोत्साहन नियमन (डीसीपीआर) तरतुदींचे पालन करण्यासाठी, एनटीसीने  संभाव्य विकास संकल्पना, कार्यपद्धतीची आखणी , विकासकाच्या नियुक्तीसाठी निविदा कागदपत्रे तयार करणे आणि एनटीसी चाळींच्या पुनर्विकासाच्या निविदा प्रक्रियेत सहाय्य  करण्यासाठी एक सल्लागार नेमला  आहे.

एनटीसी चाळींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या पॅनेलवरील वास्तुविशारदांशी सल्लामसलत करून योग्य पद्धत विकसित करण्याचे काम  सल्लागाराने सुरू केले आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला  बिगर उपकरप्राप्त 5 चाळींचे उपकरप्राप्त चाळींमध्ये रूपांतर करण्याची विनंती केली आहे, जेणेकरुन  म्हाडाद्वारे या चाळींची वेळेवर देखभाल केली जाईल.

चर्चेदरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकार , म्हाडा आणि एमएमआरडीएच्या  अधिकाऱ्यांना पुनर्विकास आणि पुनर्वसन प्रक्रियेला गती देण्याचे तसेच यासाठी एनटीसीला आवश्यक ते सर्व  सहाय्य प्रदान करण्याचे निर्देश दिले.

एनटीसीच्या टीडीआर  विक्रीच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली. एनटीसीने  25.03.2017 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या बांधकामासाठी महाराष्ट्र सरकारकडे इंदू मिल क्र.6 (डाय वर्क्स) ची 11.96 एकर जमीन  हस्तांतरित केली होती. त्या हस्तांतरणाच्या बदल्यात, महाराष्ट्र सरकारने 1413.48 कोटी रुपये किंमतीचे  विकास अधिकार हस्तांतरण म्हणून विकास हक्क प्रमाणपत्र जारी केले. एनटीसीला उपरोक्त जमिनीच्या मूल्याव्यतिरिक्त टीडीआर विकून मिळालेले पैसे महाराष्‍ट्र सरकारला स्‍मारक बांधण्‍यासाठी  दिले जातील आणि मिळालेले पैसे कमी असल्‍यास, महाराष्ट्र सरकार एनटीसीला उर्वरित रक्कम प्रदान करेल.

बाजारपेठ  संशोधन, निविदा दस्तावेज तयार करणे, संभाव्य खरेदीदारांना  शोधणे,  बाजारातील  कल बाबत एनटीसीला अवगत करणे , विक्रीसाठी टीडीआरचे प्रमाण, महसूल वाढवणे, अन्य पद्धतीसह एनटीसीच्या टीडीआर  विक्रीसाठी व्यवहार सल्लागार सेवा पुरवण्यासाठी  सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकार्‍यांना एनटीसी बरोबर समन्वयाने काम करण्याचे आणि एनटीसीला टीडीआरच्या मुद्रीकरण  प्रक्रियेत मदत करण्याचे निर्देश दिले.

गेल्या सात-आठ वर्षांत केलेल्या कामामुळे येत्या सात ते आठ वर्षांमध्ये भारतीय रेल्वेचा कायापालट झाल्याचे दिसेल

नवी दिल्‍ली-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिकंदराबाद ते विशाखापट्टणमला जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. भारतीय रेल्वेने सुरू केलेली ही आठवी वंदे भारत एक्सप्रेस आहे, तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन तेलुगू भाषिक राज्यांना जोडणारी ही पहिली रेल्वे असणार आहे. ही रेल्वे या भागातील 700 किलोमीटर भागातून धावेल. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, राजमुंद्री आणि विजयवाडा स्थानकांवर तसेच तेलंगणातील खम्मम, वारंगल आणि सिकंदराबाद स्थानकांवर ही गाडी थांबा घेईल.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सणासुदीच्या सुरू असलेल्या हंगामाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, या शुभ काळात तेलंगणा आणि आंध्र प्रदेशला एक अशी भव्य भेट मिळत आहे, ज्यामुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा परस्पर सामायिक वारसा एकमेकांशी जोडला जाणार आहे. यानिमीत्त त्यांनी दोन्ही राज्यातील जनतेचे अभिनंदनही केले. लष्कर दिनानिमित्त त्यांनी लष्कराला मानवंदनाही वाहिली. भारताचे लष्कर आपल्या शौर्य आणि व्यावसायिकतेसाठी ओळखले जाते, अशा शब्दांत त्यांनी लष्कराचा गौरवही केला.

देशाच्या सर्व भागांना जोडणाऱ्या सण उत्सवांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, भारतीय रेल्वे देखील देशाच्या कानाकोपऱ्यातून धावत अशाच रितीने सर्व भागांना जोडते. भारतीय रेल्वे एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेतून देशाच्या विविध भागांना समजून घेण्याची, जाणून घेण्याची आणि परस्परांसोबत जोडून घेण्याची संधी देते.

वंदे भारत एक्स्प्रेसमुळे यात्रेकरू आणि पर्यटक अशा दोन्ही घटकांना मोठा लाभ होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. यासोबतच वंदे भारत एक्स्प्रेसमुळे सिकंदराबाद ते विशाखापट्टणम दरम्यानच्या प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार असल्याची माहिती दिली.

“वंदे भारत हे नव भारताच्या क्षमता आणि संकल्पाचे प्रतीक आहे”, असं पंतप्रधान म्हणाले, ही रेल्वे वेगवान विकासाचा मार्ग निवडणाऱ्या भारताचे प्रतिनिधीत्व करणारी रेल्वे असल्यांचंही ते म्हणाले. आपल्या स्वप्ने आणि आकांक्षांच्या पुर्ततेसाठी उत्सुक असलेल्या, आपले ध्येय साध्य करू इच्छिणाऱ्या, उत्कृष्टतेसाठी झटणाऱ्या, तसेच आपल्या नागरिकांना सर्वोत्तम सेवा सुविधा देऊ इच्छिणाऱ्या आणि गुलामगिरीच्या मानसिकतेचे जोखड तोडून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणाऱ्या भारताचे ठळक प्रतिबींब या ट्रेनमध्ये दिसते, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. 

वंदे भारत गाड्यांच्या प्रकल्पाचे काम वेगाने होत असल्याचेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. यावर्षी केवळ 15 दिवसांच्या आत दुसरी वंदे भारत कार्यान्वित होत असल्याचे नमूद करत, यातून, प्रत्यक्ष जमिनीवर वेगाने बदल होत असल्याचं दिसतं असं ते म्हणाले. वंदे भारत रेल्वेचे स्वदेशी स्वरूप आणि त्यामुळेच या रेल्वेचा लोकांच्या मनावर पडलेला प्रभाव, त्यांना याचा वाटत असलेल्या अभिमानाचाही त्यांनी उल्लेख केला. आत्तापर्यंत देशातल्या 7 वंदे भारत रेल्वे गाड्यांनी, देशभारतले एकूण 23 लाख किलोमीटर इतके अंतर पार केले असून, ते पृथ्वीच्या 58 फेऱ्यांइतके असल्याची माहिती त्यांनी दिली. वंदे भारत ट्रेनमधून आतापर्यंत 40 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला असल्याचे त्यांनी सांगितले.

दळणवळणीय जोडणी आणि वेग तसेच त्यांचा ‘सबका विकास’ या संकल्पनेशी त्याचा असलेला थेट संबंध याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. दळणवळणीय जोडणी संबंधीत पायाभूत सुविधा केवळ दोन ठिकाणांना जोडत नाहीत तर त्या स्वप्नांना वास्तवाशी, उत्पादनाला बाजारपेठेशी, कौशल्याला योग्य व्यासपीठाशी जोडतात असं ते म्हणाले. दळणवळणीय जोडणीमुळे विकासाच्या शक्यता वाढतात असं ते म्हणाले. ‘जिथे गती आहे, तिथे प्रगती आहे, ज्यावेळी प्रगती होते तेव्हा समृद्धीचीही खात्री असते”, असं त्यांनी सांगितलं.

कधीकाळी आधुनिक दळणवळणीय जोडणीच्या सुविधांचे फायदे केवळ काही निवडक लोकांपुरते मर्यादित होते आणि लोकसंख्येचा एक मोठा भागाचा, महागड्या वाहतुक व्यवस्थेमुळे बराचसा वेळ वाया जात होता अशी आठवण त्यांनी करून दिली. याच विचारसरणीला मागे टाकत, प्रत्येकाला वेग आणि प्रगतीशी जोडण्याचा दृष्टीकोण म्हणजे काय, याचे वंदे भारत रेल्वेगाडी हे उदाहरण आहे अस ते म्हणाले. एक काळ असा होता जेव्हा केवळ बहाणे बनवले जात, रेल्वेची प्रतिमाही खराब झाली होती, रेल्वेबद्दलचा दृष्टीकोनही घातक होता, मात्र जेव्हापासून चांगल्या आणि प्रामाणिक हेतूने या समस्या सोडवल्या गेल्या, तेव्हापासून परिस्थितीकडे अशा निराशाजनक वृत्तीने पाहण्याचा  दृष्टीकोन बदलला आहे, आणि गेल्या आठ वर्षांत याच मंत्राने भारतीय रेल्वेचा कायापालट झाला आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

आज भारतीय रेल्वेने प्रवास करणे हा एक सुखद अनुभव ठरू लागला आहे असे पंतप्रधान म्हणाले. असंख्य रेल्वे स्थानकांमधून आधुनिक भारताचेच प्रतिबिंब दिसते असे त्यांनी सांगीतले. गेल्या सात-आठ वर्षांत केलेल्या कामामुळे येत्या सात ते आठ वर्षांमध्ये भारतीय रेल्वेचा कायापालट झाल्याचे दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर्यटनाला चालना देण्यासाठी व्हिस्टाडोम कोच आणि हेरिटेज रेल्वेगाडी, शेतमाल दूरवरच्या बाजारपेठांमध्ये नेण्यासाठी किसान रेल्वे, दोन डझनहून अधिक शहरांना मिळालेले मेट्रो रेल्वे तसेच वेगाने उदयाला येत असलेली भविष्यातील जलद रेल्वे वाहतूक व्यवस्था अशा उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांनी उपस्थितांना दिली. 

रेल्वे विभागाने तेलंगणात गेल्या 8 वर्षांत केलेल्या उत्तम कामगिरीकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. 8 वर्षांपूर्वी 2014 साली तेलंगणामध्ये रेल्वेसाठी 250 कोटी रुपयांहून कमी निधीचा अर्थसंकल्प होता, परंतु आज तो 3000 कोटी रुपये झाल्याचे त्यांनी सांगितले. तेलंगणातील मेदक सारखे अनेक भाग आता पहिल्यांदाच रेल्वे सेवेने जोडले गेल्याची माहिती त्यांनी दिली. 8 वर्षांपूर्वी 2014 च्या काळात तेलंगणामध्ये 125 किलोमीटरहून कमी नवीन रेल्वे मार्ग बांधण्यात आले होते, तर गेल्या वर्षांत तेलंगणात सुमारे 325 किलोमीटरच्या नवीन रेल्वे लाईन बांधण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. तेलंगणामध्ये 250 किलोमीटरहून अधिक लांबीच्या ‘ट्रॅक मल्टी ट्रॅकिंग’चे कामही करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आणि या विद्युतीकरणाच्या काळात राज्यातील रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण 3 पटीने वाढले आहे, असे त्यांनी सांगितले. “तेलंगणातील सर्व ब्रॉडगेज मार्गांच्या विद्युतीकरणाचे काम लवकरच पूर्ण करणार आहोत”, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

एकीकडे आंध्र प्रदेश वंदे भारत योजनेशी जोडलेला असून त्याचवेळी केंद्र सरकार देखील आंध्र प्रदेशातील रेल्वेचे जाळे मजबूत करण्यासाठी सतत काम करत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. आंध्र प्रदेशात गेल्या काही वर्षांत 350 किलोमीटर नवीन रेल्वे मार्ग आणि सुमारे 800 किलोमीटर मल्टी-ट्रॅकिंगचे बांधकाम करण्यात आले आहे, असे पंतप्रधानांनी इज ऑफ लिव्हिंग तसेच इज ऑफ डुइंग बिझनेसला चालना देण्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांना अधोरेखित करताना सांगितले. 2014 पूर्वी आंध्र प्रदेशात मागील सरकारच्या काळात केवळ 60 किलोमीटर रेल्वे मार्गाचे वार्षिक विद्युतीकरण केले जात होते, मात्र तुलनेने हा वेग वाढला असून तो वार्षिक 220 किलोमीटरहून अधिक झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. 

“वेग आणि प्रगतीची ही प्रक्रिया अशीच चालू राहील” असे आश्वासन देत तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेशला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनबद्दल सर्वांचे अभिनंदन करुन पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री आणि संसद सदस्य जी. किशन रेड्डी, यावेळी उपस्थित होते.

पार्श्वभूमी

भारतीय रेल्वेने सादर केलेली ही आठवी वंदे भारत एक्स्प्रेस आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन तेलुगू भाषिक राज्यांना जोडणारी ही पहिली एक्सप्रेस सुमारे 700 किमीचे अंतर पार करते. या एक्सप्रेसमुळे सिकंदराबाद ते विशाखापट्टणम प्रवासाचा वेळ साडेबारा तासांवरून कमी होऊन साडेआठ तासांवर येईल. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम, राजमुंद्री आणि विजयवाडा स्थानकांवर तर तेलंगणातील खम्मम, वारंगल आणि सिकंदराबाद स्थानकांवर या एक्सप्रेसचे थांबे असतील.

वंदे भारत एक्सप्रेस ही स्वदेशात संकल्पित आणि निर्मित रेल्वे अत्याधुनिक प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहे. प्रवाशांना ही रेल्वे जलद, अधिक आरामदायी आणि अधिक सोयीस्कर प्रवासाचा अनुभव देईल.

या सेवेच्या प्रारंभामुळे या प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल तसेच जनतेला प्रवासाचा आरामदायी आणि जलद मार्ग उपलब्ध होईल. देशात दाखल होणारी ही आठवी वंदे भारत ट्रेन असून पूर्वीच्या वंदे भारत ट्रेनच्या तुलनेत ही प्रगत आवृत्ती आहे. ही ट्रेन तुलनेत वजनाला खूपच हलकी असून कमी कालावधीत जास्त वेग पकडण्यास सक्षम आहे. वंदे भारत 2.0 ही अधिक प्रगत आणि सुधारित वैशिष्ट्यांसह सुसज्ज असून ती 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग फक्त 52 सेकंदात धारण करते आणि 180 किलोमीटर प्रति तासापर्यंतच्या कमाल वेगाने धावू शकते. सुधारित वंदे भारत एक्‍सप्रेसचे वजन 392 टन आहे. या आधीच्या वंदे भारत आवृत्तीचे वजन 430 टन होते. वंदे भारत 2.0 मध्ये मागणीनुसार वाय-फाय कंटेंट सुविधाही उपलब्ध असेल. प्रत्‍येक कोचमध्‍ये 32 इंची स्‍क्रीन आहेत यावर प्रवाशांना माहिती आणि इंफोटेनमेंट प्रदान केली जाईल. यापूर्वीच्या आवृत्तीत 24 इंची स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. नव्या वंदे भारत आवृत्ती मधील वातानुकूलन यंत्रे 15% जास्त ऊर्जा कार्यक्षम असल्यामुळे ही एक्स्प्रेस पर्यावरणपूरकही असेल. ट्रॅक्शन मोटरच्या धूळ-मुक्त स्वच्छ हवा कूलिंग प्रणालीमुळे प्रवास अधिक आरामदायक होईल. यापूर्वी फक्त एक्झिक्युटिव्ह क्लासच्या प्रवाशांना दिलेली साइड रिक्लायनर सीट सुविधा आता सर्व वर्गांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये 180 अंशात फिरणारी आसने हे याचे अतिरिक्त वैशिष्ट्य आहे.

वंदे भारत एक्सप्रेसच्या नवीन डिझाईनमध्ये, हवा शुद्धीकरणासाठी रूफ-माउंटेड पॅकेज युनिट (RMPU) मध्ये प्रकाश-उत्प्रेरक अल्ट्राव्हायोलेट वायु शुद्धीकरण प्रणाली कार्यान्वित केली आहे. सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स ऑर्गनायझेशन (CSIO) चंदीगडच्या शिफारसीनुसार रेल्वेमध्ये येणारी ताजी हवा तसेच बाहेर जाणारी हवा सुक्ष्म जंतू, जीवाणू, विषाणू इत्यादीपासून मुक्त करुन गाळलेली आणि स्वच्छ हवा पुरवण्यासाठी ही प्रणाली रूफ-माउंटेड पॅकेज युनिटच्या दोन्ही टोकांवर स्थापित केली आहे.

वंदे भारत एक्सप्रेस 2.0 विविध उत्कृष्ट सुविधा आणि विमानासारखा प्रवास अनुभव देणारी आहे. ही एक्सप्रेस प्रगत अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज असून रेल्वे गाड्यांची समोरासमोर धडक टाळण्यासाठी स्वदेशात विकसित प्रणाली ‘ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम – KAVACH’ यात समाविष्ट करण्यात आली आहे.

हवामानविषयक भाकिते अधिक अचूक वर्तवण्यासाठी 2025 पर्यंत संपूर्ण देश डॉप्लर वेदर रडार नेटवर्कच्या कक्षेत आणणार

गेल्या पाच वर्षात खराब हवामानविषयक तीव्र घटनांसाठी हवामानाच्या भाकिताच्या अचूकतेमध्ये 20 ते 40% वाढ झाल्याची मंत्र्यांची माहिती

नवी दिल्‍ली-

हवामानविषयक घटनांची भाकिते अधिक अचूक वर्तवण्यासाठी 2025 पर्यंत संपूर्ण देश डॉप्लर वेदर रडार नेटवर्कच्या कक्षेत आणणार असल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे.

ते आज येथे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या(आयएमडी) 148 व्या स्थापना दिवस कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात आयएमडीने सक्रिय पुढाकाराने पावले उचलत रडार नेटवर्कमध्ये वाढ करून त्यांची संख्या 2013 मधील 15 वरून 2023 मध्ये 37 केली आणि येत्या 2-3 वर्षात आणखी 25ची भर घालणार असल्याचे सांगायला अभिमान वाटत आहे, असे ते म्हणाले.    

डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या चार पश्चिम हिमालयन राज्यांसाठी 4 डॉप्लर रडारचे लोकार्पण केले. तसेच त्यांनी 200 स्वयंचलित कृषी हवामान स्थानकांचे देखील राष्ट्रार्पण केले. आयएमडीची 8 प्रकाशने देखील त्यांनी प्रकाशित केली आणि शालेय विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान केले. आयएमडीची सर्वोत्तम कामगिरी करणारी कार्यालये आणि अधिकारी यांना देखील त्यांनी पुरस्कार प्रदान केले.

कृषी हवामानशास्त्रीय सेवांतर्गत 2025 पर्यंत 660 जिल्हा कृषी हवामानशास्त्रीय केंद्र(DAMUs) स्थापन करण्याचे आयएमडीचे उद्दिष्ट असल्याची आणि 2023 मधील 3100 तालुक्यांवरून 2025 मध्ये 7000 पर्यंत वाढ करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

इशारा आणि सल्ला देणाऱ्या सेवांचा शेतकरी आणि मच्छिमारांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी फायदा होत असल्याचे नॅशनल सेंटर फॉर ऍप्लाईड इकॉनॉमिक रिसर्चच्या एका ताज्या सर्वेक्षणात आढळले असल्याकडे मंत्र्यांनी लक्ष वेधले.

शेतीच्या विविध टप्प्यांमध्ये कोट्यवधी शेतकऱ्यांकडून जिल्हा आणि तालुका पातळ्यांवर कृषीहवामानविषयक सल्ल्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना विशेषत्वाने त्यांना खूप जास्त प्रमाणात फायदे होत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

अल्प आणि दीर्घकालीन नियोजनासाठी आणि धोरण विकासासाठी हवामान सेवा अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि आयएमडीने यापूर्वीच कृषी, आरोग्य, जल, ऊर्जा आणि आपत्ती जोखीम कपात या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये या सेवांचा वापर सुरू केला आहे आणि उत्पादनांमध्ये सोयीनुरुप केलेल्या बदलांच्या माध्यमातून त्यांचा विस्तार करण्याचे नियोजन आहे, असे जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

आपले सकल देशांतर्गत उत्पादन अजूनही शेतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याने मान्सून आणि चक्रीवादळांसह हवामानाचे अचूक भाकित करण्यासाठी आयएमडी सातत्याने सुधारणा करण्यावर भर देत असल्याबद्दल त्यांनी आयएमडीचे आभार मानले. कटिबंधीय चक्रीवादळे, मुसळधार पाऊस, धुके, उष्णतेची लाट, थंडीची लाट, मेघगर्जनांसह पाऊस अतिजास्त खराब हवामानाची भाकिते करण्यामध्ये लक्षणीय सुधारणा होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आपल्या अन्नसुरक्षेची जीवनरेखा असलेल्या मान्सूनच्या भाकितामुळे केवळ आपल्या अर्थव्यवस्थेमध्येच सुधारणा होत नसून दक्षिण आशियायी भागात मान्सूनच्या काळात येणारे पूर आणि त्याच्या अभावी निर्माण होणारे दुष्काळ यामुळे जाणाऱ्या बळींची संख्या  कमी होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गेल्या पाच वर्षात अतिजास्त खराब हवामानविषयक घटनांसाठी हवामानाच्या भाकिताच्या अचूकतेमध्ये 20 ते 40% वाढ झाल्याची बाब डॉ. जितेंद्र सिंह यांनी उपस्थितांसमोर अधोरेखित केली. यावेळी हवामानाच्या भाकिताचा मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांवर भर देत जितेंद्र सिंह  म्हणाले की चक्रीवादळे, मुसळधार पाऊस, गडगडाटासह पाऊस, उष्णतेची लाट आणि थंडीची लाट इ. अतितीव्र खराब हवामानाच्या घटनांच्या काळात जीवितहानी कमी करण्यात अचूक भाकिते आणि वेळेवर दिले जाणारे इशारे यामुळे यश आले आहे.

देशातील सर्वाधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप महाराष्ट्रात

मुंबई : नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देऊन देशातील उद्योजकतेला चालना देणे व परिणामी देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेस बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. केंद्र शासनाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) यांच्यामार्फत मान्यताप्राप्त असलेल्या देशातील एकूण 88 हजार 136 स्टार्टअपपैकी सर्वाधिक 16 हजार 250 स्टार्टअप (18 टक्के) महाराष्ट्रातील आहेत.  त्याचप्रमाणे आज देशातील 108 युनिकॉर्नपैकी 25 युनिकॉर्न्स (23 टक्के) महाराष्ट्रातील आहेत. युनिकॉर्न म्हणजे अशी कंपनी जिचे मूल्यांकन 1 बिलियन अमेरिकन डॉलर्स (100 करोड़ डॉलर ) म्हणजेच 8 हजार कोटी रुपयापेक्षा जास्त आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 5 ते 7 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. अगदी दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये 12 मान्यताप्राप्त तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये 20 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. मुंबईमधे सुमारे 5 हजार 900, पुण्यामध्ये 4 हजार 535, औरंगाबादमध्ये 342, सिंधुदुर्गमध्ये 19 मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत.

स्टार्टअपना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

राष्ट्रीय स्टार्टअप दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी युवकांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी कौशल्य विकासाची सुरुवात केली. राज्यामध्येही त्यानंतर स्वतंत्र कौशल्य विकास विभाग सुरु करण्यात आला. स्टार्टअप आणि युनिकॉर्न्सना चालना देण्यासाठी राज्यात विविध सवलती, योजना यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात स्टार्टअपच्या विकासासाठी इकोसिस्टम तयार करण्यात येत आहे. महाराष्ट्र ही देशाची स्टार्टअप कॅपिटल ठरत आहे. राज्यातील अगदी दुर्गम भागातील युवक-युवतींकडूनही स्टार्टअप विकसीत केले जात आहेत. नुकत्यात राबविण्यात आलेल्या स्टार्टअप यात्रेला राज्यातील सर्वच भागातून चांगला प्रतिसाद मिळाला. या सर्व स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यात येईल. त्यांच्याकडील नवनवीन संकल्पनांचा शासनाच्या विविध विभागांच्या कामकाजामध्ये वापर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

स्टार्टअपना प्रोत्साहनासाठी राष्ट्रीय दिवस

नवउद्योजक आणि स्टार्टअपने नाविन्यतेचा घेतलेला ध्यास, त्यातून निर्माण होणाऱ्या नवीन रोजगाराच्या संधी व यामुळे देशाच्या आर्थिक विकासात योगदान देण्याच्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी 16 जानेवारी रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस दरवर्षी साजरा केला जातो.

भारत सरकारने 16 जानेवारी 2016 रोजी स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू केला. नवउद्योजक, स्टार्टअपला प्रोत्साहन देणे, रोजगार निर्मिती व एक मजबूत परिसंस्था तयार करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमासाठी भारत सरकारचा उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) हा नोडल विभाग आहे. सद्यस्थितीत भारतात सुमारे 2 लाख 44 हजार स्टार्टअपची नोंद झालेली आहे व यातील 88 हजार 136 स्टार्टअप उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागातर्फे (DPIIT) मान्यताप्राप्त आहेत.

स्टार्टअपसाठी राज्यात विविध धोरणेयोजना

स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात अनेक धोरणे, योजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्य देशातील सर्वाधिक औद्योगिकता असलेले राज्य आहे आणि औद्योगिकतेला नाविन्यतेची साथ देऊन, महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांना, उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018’ जाहीर केले. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व राज्यातील नाविन्यपूर्ण परिसंस्थेच्या अध्ययन आणि विकासासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी कार्यरत आहे. या धोरणातील मुख्य उद्दिष्टांतर्गत महाराष्ट्रामध्ये अनुकूल व्यावसायिक वातावरण निर्मिती करून नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणे,  स्टार्टअपना सक्षम करणे, नियामक रचना सुलभ करणे व पायाभूत सुविधांना चालना देऊन स्टार्टअप परिसंस्थेला विकसित करणे इ. चा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राज्यातील सर्व घटकांकरिता स्टार्टअप व नाविन्यता क्षेत्राशी संबधित विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. या धोरणांतर्गत स्टार्टअप सप्ताह, इनक्यूबेटर्सची स्थापना, स्टार्टअप यात्रा, ग्रँड चॅलेंज, हॅकॅथॉन, गुणवत्ता परीक्षण आणि प्रमाणन अर्थसहाय्य योजना, बौद्धिक संपदा हक्क अर्थसहाय्य योजना, महाराष्ट्र व्हर्चुअल इनक्युबेशन सेंटर व सीड फंड यांसारख्या अनेक उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांमुळे राज्यातील अनेक नवउद्योजकांना उद्योजकतेशी निगडीत विविध प्रकारचे सहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध होत आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी सन 2018 पासून कार्यरत आहे.

स्टार्टअप दिनानिमित्त सोमवारी विविध कार्यक्रम

राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे औचित्य साधून सोमवारी 16 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीद्वारे राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा करण्यात येणार आहे. या निमिताने नवउद्योजकांसाठी विशेष योजना, दिग्गज व्यक्तींचे मार्गदर्शक सत्र व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहितीसाठी अमित कोठावदे (सहाय्यक व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी 9420608942 यांच्याशी संपर्क साधता येईल. तसेच महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांविषयी अधिक माहितीसाठी वेबसाईट आणि सोशल माध्यमांवर संपर्क साधता येईल.