Home Blog Page 1461

वारज्यातील कार्तिक इंगवले गँगवर मोक्का कारवाई

पुणे-दुचाकीवरुन जाणाऱ्या तरुणाला अडवून त्याच्याकडे 600 रुपयांची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच्या दुचाकीचा पाठलाग करुन रामनगर येथील वेताळ बुवा चौकात तरुणावर बंदुकीतून फायरिंग करण्यात . ही घटना 16 डिसेंबर 2022 रोजी घडली होती. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात चार जणांवर आयपीसी 341, 387, 307, 506, 506(2), आर्म अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील चार आरोपींवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून 6 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काकारवाई केली आहे.

१ ) टोळी प्रमुख कार्तिक संजय इंगवले, वय २० वर्षे, रा. पिठाची गिरणीजवळ,रामनगर,वारजे, पुणे ( टोळी प्रमुख) २ ) सनी बाळू शिंदे, वय २१ वर्षे, रा. बापुजी बुवा चौक, रामनगर, वारजे, पुणे ३) वैभव दत्तात्रय भाग्यवंत, वय २४ वर्षे, रा. बापुजी बुवा चौक, रामनगर, वारजे, पुणे(टोळी सदस्य)यांच्यावर जबरी चोरी, खंडणी , जीवे मारण्याचा प्रयत्न, गुन्ह्याचा कट रचणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, तोडफोड करणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, दहशत निर्माण करणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यांच्यात सुधारणा झाली नाही. त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे पुन्हा केले आहेत. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. हाके
यांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 सुहेल शर्मा यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे यांना सादर केला. कागदपत्रांची पडताळणी करुन आरोपींवर मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले.
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलंडे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सहेल शर्मा,सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.एस. हाके,पोलीस निरीक्षक गुन्हे दत्ताराम बागवे ,तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल,पोलीस अंमलदार सचिन कुदळे, अमोल भिसे, नितीन कातुर्डे, गोविंद कपाटे, महिला पोलीस अंमलदार प्रियांका कोल्हे यांनी केली.

तौसिफ मोमीन ठरला “पुणे श्री” स्पर्धेचा मानकरी

पुणे – फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स पुणे व वाइब्रंस इंटरप्रायझेस यांच्या वतीने आयोजित केलेल्या “पुणे श्री” स्पर्धेत तौसिफ मोमीन विजेता ठरला तर उपविजेता दिव्यांक आरु झाला. बेस्ट पोजर चा किताब विनोद कागडे याने पटकावला. मेन्स फिजिकचा गोकुळ वाकुडे तर महिलांमध्ये शितल वाडेकर विजयी झाले. पुण्यातील शरीरसौष्ठव स्पर्धेतील मानाची “पुणे श्री” हि स्पर्धा अतिशय दिमाखात व भव्य दिव्य स्पर्धा गणेश कला क्रीडा रंगमंच येथे नुकतीच पार पडली.“पुणे श्री” च्या माजी विजयी खेळाडूंचे सत्कार मिस्टर युनिव्हर्स संग्राम चौगुले व माजी शिक्षणमंडळ अध्यक्ष प्रदिप उर्फ बाबा धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आला. माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, अविनाश बागवे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांतजगताप, दिपालीताई धुमाळ अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू उपस्थित होते.

संगिताच्या तालावर उत्कृष्ठ पोजींगचे प्रात्यक्षिक दाखवून स्पर्धकांनी प्रक्षेकांची मने जिंकली. पुणे स्पोर्टस् फिटनेस कार्निवल ही संकल्पना पुण्यात पहिल्यांदाच पुण्यात यानिमिताने झाली. त्यामुळे अनेक देशी-विदेशी फीटनेस क्षेत्रातील कंपनी या कार्निवलमध्ये सहभागी झाल्या होत्या. या कर्निव्हलचे उद्घाटन अभिनेते केतन कारंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसे शारीरीक संघटनेचे अध्यक्ष निलेश काळे व वायब्रस इन्टरप्रायझेसचे संचालक प्रसाद जायगुडे, फेडरेशनचे सचिव दिलीप धुमाळ व खजिनदार मयूर मेहेर, विल्यम अब्राहम उपस्थितीत होते. मिस्टर यूनिवर्स संग्राम चौगुले व फीटनेस आयकॉन साहील खान या दोघांच्या उपस्थितीने संपूर्ण प्रेक्षागृहात व खेळांडूमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

४० वर्षावरील वयोगटासाठी पहिल्यांदाच स्पर्धा घेण्यात आली होती. महिलांसाठी फिजिक व पुरुषांसाठी फीजिक व बॉडी बिल्डींगची स्पर्धा अशा स्वरुपात ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत विजेत्यांना रोख रक्कम, आकर्षक चषक, प्रमाणपत्र व गिफ्ट हॅम्पर देण्यात आले होते.या स्पर्धेदरम्यान दरवर्षी प्रमाणे फेडरेशनच्या वतीने बेस्ट ऑफीशियल अवॉर्ड आरती माळवदे यांना देण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण नंदू कलमकर, दिलीप धुमाळ, महेश गणगे, राजेश वाईकर, मयुर मेहेर, नेहा धुमाळ, बंटी निढाळकर यांनी तर सूत्रसंचलन सानिका निर्मल व साहिल धुमाळ यांनी केले. मोहसीन शेख यांनी स्टेज मार्शल म्हणून काम पहिले. 

फेडरेशनच्यावतीने बॉडीबिल्डींग विश्वात पहिल्यांदाच बॉडीबिल्डरचे नाव व्यासपीठाला व गॅलरीला देण्याची प्रथा सुरुवात करण्यात आली. यामध्ये मि. वर्ल्ड महेंद्र चव्हाण यांचे नाव व्यासपीठाला तर इंटरनॅशनल अॅथलिट तुषार गायकवाड यांचे नाव गॅलरीला देण्यात आले होते. त्याचप्रमाणे या मानाच्या ट्रॉफीची पालखी मधून मिरवणूक काढण्यात आली. उत्तम नियोजन, नाविन्यपूर्ण शिस्तबद्ध आयोजन, अचूक परिक्षण, खेळाडूंचा मानसन्मान व मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमुळे ही स्पर्धा आकर्षक ठरली. 

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा मध्य भारतात विस्तार -ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते जया बच्चन यांच्या उपस्थितीत इंदौर रुग्णालयाचे उद्घाटन 

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह नवीन वैद्यकीय केंद्र आता इंदौर मध्ये सुरू

इंदौर (शरद लोणकर )18 जानेवारी २०२३: भारतातील अग्रगण्य मल्टीस्पेशालिटी हेल्थकेअर इन्स्टिट्यूट असलेल्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल (कोकिलाबेन हॉस्पिटल)ने आज मध्यप्रदेश मधील इंदौर येथे एक अत्याधुनिक  सेवा रुग्णालय सुरू करून मध्य भारतातील रुग्णांना सेवा देण्यासाठी आपल्या विस्ताराची घोषणा केली. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या अध्यक्षा टीना अंबानी यांच्या उपस्थितीत प्रख्यात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि श्रीमती कोकिलाबेन धीरूभाई अंबानी व्हर्च्युअली या सोहळ्याला उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेत्री आणि राजकारणी नेत्या जया बच्चन यादेखील उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

कोकिलाबेन हॉस्पिटल इंदौरचे उद्घाटन ही भारतातील आरोग्य सेवांची पुनरव्याख्या करण्याच्या ब्रँडच्या कटीबद्धतेची पावती आहे. या वैद्यकीय केंद्रामुळे मध्य भारतातील लोकांना समर्पित वैद्यकीय व्यावसायिकांची टीम आणि जागतिक स्तरावर मापदंड ठरलेल्या क्लिनिकल परिणामांची खात्री देणारे सर्वोत्कृष्ट श्रेणीतील प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानासह उच्च दर्जाची आरोग्य सेवा पुरविली जाईल.

विस्ताराबाबत कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या अध्यक्षा टीना अंबानी म्हणाल्या, “गेल्या १४ वर्षांपासून आम्ही सिद्धहस्त जागतिक पद्धती आणि उपचार प्रोटोकॉलचे पालन करून अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करत भारतातील आरोग्यसेवेमध्ये परिवर्तन करण्यासाठी वचनबद्ध आहोत. इंदौर येथील नवीन कोकिलाबेन हॉस्पिटलही याला अपवाद नाही. लोकांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सेवा येथे सुलभपणे मिळतील. प्रत्येक रुग्णाला शक्य तितकी सर्वोत्तम वैद्यकीय सेवा आणि आधार प्रत्येक टप्प्यावर मिळेल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

अत्यंत प्रेमाने स्वागत केल्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी इंदौरच्या जनतेचे आभार मानले आणि रुग्णालयाचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल श्रीमती टीना अनिल अंबानी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “मी कोकिलाबेन हॉस्पिटलच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा एक भाग आहे आणि या नवीन टप्प्याचा भाग झाल्याचा मला आनंद होत आहे. इंदौर हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर आहे आणि आज कोकिलाबेन हॉस्पिटल इंदौरच्या उद्घाटनसोबत मी हे अभिमानाने सांगतो की इंदौर हे भारतातील सर्वात आरोग्यदायी शहरांपैकीही एक असेल.”

आरोग्यसेवेतील पायाभूत सुविधांचे जागतिक मापदंड प्रस्थापित करण्यात कशा पद्धतीने योगदान दिले जात आहे हे बघता त्यांनी भारतातील उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा सुविधा, वैद्यकीय कौशल्य आणि देशातील वैद्यकीय प्रतिभा यांचे कौतुक केले.

कोकिलाबेन हॉस्पिटल समूहाचे उद्दिष्ट जगातील सर्वोत्कृष्ट सेवांच्या बरोबरीने उच्च पातळीची आरोग्यसेवा प्रदान करून आरोग्यसेवा क्षेत्रात महत्त्वाचे स्थान निर्माण करणे हे आहे. सर्व कोकिलाबेन हॉस्पिटल्सचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे FTSS (फुल टाइम स्पेशालिस्ट सिस्टम) मॉडेल असून ते आघाडीच्या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय केंद्रांमध्ये प्रचलित असलेल्या पद्धतींशी सुसंगत आहे. ते चोवीस तास उपलब्धता आणि समर्पित तज्ञांपर्यंत सहज पोहोचता येणे  सुनिश्चित करते. हे रुग्णांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी एकाच छताखाली संसाधने, कौशल्य आणि क्षमता एकत्र आणते.

सुमारे १४ वर्षे आपल्या उच्च दर्जाच्या क्लिनिकल एक्सलन्ससाठी ओळखले जाणाऱ्या कोकिलाबेन हॉस्पिटल समूहाने गेल्या काही वर्षांत लाखो रुग्णांचा विश्वास जिंकला आहे. कोकिलाबेन हॉस्पिटल ग्रुपने मुंबईत आपले पहिले रुग्णालय स्थापन केले आणि त्यानंतर नवी मुंबई विभागात दुसरे हॉस्पिटल तसेच महाराष्ट्रातील अकोला, गोंदिया आणि सोलापूर येथे केअर सेंटर्स आणि गुजरातमध्ये विविध क्लिनिक आणि पॉइंट-ऑफ-केअर सेंटर्स उभारली. देशातील वैद्यकीय संशोधन पुढे नेत संस्थेने २५० हून अधिक संशोधन प्रकल्प, १०० आंतरराष्ट्रीय बहुकेंद्रित औषधांच्या चाचण्या केल्या असून आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नल्समध्ये ३०० शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. इंदौर सुपर स्पेशालिटी हे मध्य भारतातील पहिले फ्युचरिस्टिक पायाभूत सुविधा असलेले केंद्र असून या औपचारिक उद्घाटनानंतर सर्व सेवा सुविधांसह कार्यान्वित होईल.

पालकमंत्र्यांची भिडे वाडा येथील राष्ट्रीय स्मारकाबाबत पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरेंसोबत सकारात्मक चर्चा

पुणे दि. १८: भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मूळ जागा मालक असलेल्या पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्यासोबत चर्चा केली. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होणे ही लोकभावना असल्याने हे स्मारक होणारच, असा विश्वास श्री.पाटील यांनी बैठकीनंतर व्यक्त केला. बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन, स्मारकासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही विजय ढेरे यांनी दिली.

भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे यासाठी पालकमंत्री पाटील हे आग्रही आहेत. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी भिडे वाड्यासंदर्भातील शासनाच्या भूमिकेसंदर्भात महाधिवक्त्यांना अवगत केले होते. तसेच, उच्च न्यायालयात यासंदर्भात शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंतीही पालकमंत्र्यांनी महाधिवक्त्यांना केली होती.

त्यानंतर त्यांनी भिडे वाड्यासंदर्भातील वाद लवकर निकाली निघावा यासाठी मूळ जागा मालक असलेल्या पुना मर्चंट बॅंकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्यासमवेत पुण्यातील निवासस्थानी बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. भिडे वाड्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता तेथे राष्ट्रीय स्मारक होणे महत्वाचे आहे. हे स्मारक राज्यातील नव्हे तर देशातील महिलांचे प्रेरणास्थान ठरणार असल्याने पुना मर्चंट बॅंकेने सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. पालकमंत्र्यांच्या आवाहनास ढेरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, बॅंकेचे सर्व सभासद आणि भाडेकरू यांच्याशी चर्चा करून सहकार्याची भूमिका घेण्याबाबत आश्वस्त केले. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी राजेंद्र मुठे उपस्थित होते.

पालिका निवडणुकांचं चांगभलं:तीन आठवडे पुन्हा पुढची तारीख …

लोकनियुक्त प्रतिनिधींचे राज्य येण्याची वाटच पहा …..

मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी महत्वाची बातमी समोर येत आहे. या निवडणूकीसंदर्भातील सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे.या प्रकरणाची सुनावणी आता तीन आठवड्यांनी म्हणजेच पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडणार आहे.

आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील हे प्रकरण मेन्शन करण्यात आले होते. त्यानंतर सरन्यायाधीशांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही सुनावणी करण्यास सांगितले आहे. महापालिका निवडणुका नेमक्या कधी होणार याचे उत्तर या सुनावणीवर अवलंबून आहे. 92 नगरपरिषदांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही याच याचिकेत समाविष्ठ आहे. गेल्या बऱ्याच काळापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील सुनावणी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने लांबणीवर जात आहे. या प्रकरणावरील शेवटचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी 28 जुलै 2022 रोजी दिला होता. याच सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला परवानगी देण्यात आली होती. पण, त्यानंतर 92 नगरपरिषदांचा प्रश्न कोर्टात प्रलंबित होता. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. नवं सरकार स्थापन झाल्यानंतर 4 ऑगस्ट 2022 रोजी निवडणुका आणि प्रभाग रचना यासंदर्भातील नवा अध्यादेश काढण्यात आला, त्यानंतर हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला.

याप्रकरणी डिसेंबरमध्ये शेवटची सुनावणी पार पडली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण 17 जानेवारी 2023 रोजी प्राधान्याने ऐकले जाईल, असे सांगितले होते. मात्र मंगळवारी ही सुनावणी झाली नाही. काल घटनापीठाचे कामकाज खूप लांबल्यामुळे या सुनावणीवर त्याचा परिणाम दिसून आला. त्यानंतर आज या प्रकरणाचा न्यायालयाच्या कामकाजात समावेश करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील महापालिका निवडणूक ह्या लांबणीवर पडल्या असल्याचे दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळावर पेस्टच्या स्वरूपातील 8 किलो सोने जप्त केले

मुंबई-

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांच्या पथकाने, 17 जानेवारी 2023 रोजी दुबईहून मुंबईला येणारा प्रवाशांचा गट,  भारतात पेस्टच्या स्वरुपात सोन्याची तस्करी करत असल्याच्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाळत ठेवली होती. या संशयित प्रवाशांची ओळख पटली आणि पथकाने त्यांना विमानतळावर अडवले. प्रवाशांची कसून तपासणी केल्यावर त्यांच्याकडून पेस्टच्या स्वरूपातील 8.230 किलो सोने हस्तगत करण्यात आले. या सोन्याची किंमत अंदाजे 4.54 कोटी रुपये इतकी आहे.    

जप्त करण्यात आलेले बहुतेक सोने प्रवाशांच्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते, त्यामुळे ते शोधणे अत्यंत कठीण होते. देशात विविध स्वरुपात सोन्याची तस्करी करणाऱ्यांना   आळा घालण्याच्या आव्हानात्मक कामगिरीसाठी डीआरआयचे अधिकारी अवलंबत असलेली अनोखी कार्यपद्धती यामधून सूचित होते.  

या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. देशात अवैध मार्गाने सोन्याची तस्करी करणाऱ्या व्यक्तींची संपूर्ण साखळी उलगडून काढण्याच्या दृष्टीने, या प्रकरणाचा पुढील तपास प्रगतीपथावर आहे.

तीन राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर:त्रिपुरात 16 फेब्रुवारीला, मेघालय-नागालॅंडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान, निकाल 2 मार्चला

नवी दिल्ली-

केंद्रीय निवडणुक आयोगाने बुधवारी त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडच्या विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्या. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारीला तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सर्व राज्यांचे निकाल 2 मार्च रोजी जाहीर होतील.

या निवडणुकांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही राज्यांमध्ये बहुमताचा आकडा 31 आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, तिन्ही राज्यांमध्ये महिला मतदारांचा सहभाग जास्त आहे, येथे निवडणूक काळात हिंसाचाराच्या घटना आजपोवेतो कमीच राहल्या. निष्पक्ष निवडणुकांसाठी आम्ही व आमची यंत्रणा या ठिकाणी कटिबद्ध आहोत. .

नॉमिनेशन :

  • त्रिपुरा – 21 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत.
  • मेघालय-नागालॅंड – 31 जानेवारी ते 7 फेब्रुवारी.

नाव मागे घेण्याची तारीख

  • त्रिपुरा – 2 फेब्रुवारी.
  • मेघालय-नागालॅंड- 10 फेब्रुवारी

1. मेघालय विधानसभा, जागा- 60, बहुमत- 31
मेघालयात 2018 मध्ये 59 जागांवर निवडणूक झाली. काँग्रेसला सर्वाधिक २१ जागा मिळाल्या होत्या. भाजपला येथे केवळ 2 जागा मिळू शकल्या. नॅशनल पीपल्स पार्टीला (एनपीईपी) 19 जागा मिळाल्या. पीडीएफ आणि एचएसपीडीपीने मिळून सरकार स्थापन केले. त्यांनी मेघालय डेमोक्रेटिक अलायन्स (MDA) ची स्थापना केली. गेल्या तीन महिन्यांपासून येथील पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काँग्रेसने 40 आणि एनपीपीने 58 उमेदवारांची यादी आधीच जाहीर केली आहे.

2. त्रिपुरा विधानसभा, जागा- 60, बहुमत- 31

राज्यात 2018 मध्ये 59 जागांवर निवडणुका झाल्या. भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. 35 जागा मिळाल्या. डाव्यांचा 25 वर्षांचा बालेकिल्ला भाजपने उद्ध्वस्त केला होता. यापूर्वी बिप्लब देव यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते, परंतु मे 2022 मध्ये माणिक साहा यांना मुख्यमंत्री करण्यात आले. आगामी निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी सीपीएम आणि काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. ममता बॅनर्जींचा TMC हा आणखी एक मोठा पक्ष आहे, जो भाजपला टक्कर देऊ शकतो.

3. नागालँड विधानसभा, जागा-60, बहुमत-31

नागालँडमध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे सरकार आहे. नेफियू रिओ हे मुख्यमंत्री आहेत. NDPP 2017 मध्ये अस्तित्वात आला. 2018 मध्ये दोन्ही पक्षांनी निवडणूकपूर्व युती केली होती. त्यानंतर एनडीपीपीने 18 तर भाजपने 12 जागा जिंकल्या. यानंतर NDPP ने NPP आणि JDU सोबत सरकार स्थापन केले. गेल्या वर्षी दोन्ही पक्षांनी संयुक्त निवेदनात एनडीपीपी 40 आणि भाजप 20 जागांवर एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते.

कसबा पेठ अन् पिंपरी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर

0

मुक्ता टिळक-लक्ष्मण जगताप यांच्या मृत्यूनंतर रिक्त जागांवर निवडणूक

पुणे-कसबा पेठ अन् पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. तर 2 मार्च निकाल जाहीर होणार आहेत.

पुण्यातील कसबा पेठच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर या जागा रिक्त होत्या. आता या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

निवडणुकीची अधिसूचना जाहीर : 31 जानेवारी 2023

अर्ज दाखल करण्याची मुदत : 7 फेब्रुवारी 2023

अर्जांची छाननी : 8 फेब्रुवारी

अर्ज मागं घेण्याची मुदत : 10 फेब्रुवारी

मतदान : 27 फेब्रुवारी

निकाल : 2 मार्च

टिळक आणि जगतापांच्या निधनामुळे निवडणूक

भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे माजी शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (59) यांचे बाणेरमधील खासगी रुग्णालयात निधन झाले. या मतदारसंघातून सलग तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले हाेते. नुकतेच पुण्यातील कसबा मतदारसंघातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले होते.

जगताप तीन वर्षांपासून कर्करोगाने आजारी होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालवत गेली. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबीयांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते. एप्रिल 2022 मध्ये ते पुन्हा मायदेशी परतले. काही दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नंतरच्या काळात त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाली. डॉक्टरांनी अगदी शर्थीचे प्रयत्न केले, पण अखेर सर्व उपाय संपले आणि त्यांची प्राणज्योत मालवली. पिंपरी चिंचवड आणि कसबा मतदारसंघात कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांचे 22 नोव्हेंबर 2022 रोजी निधन झाले होते. मुक्ता टिळक या आमदार होण्यापूर्वी पुण्याच्या सन 2017 ते 19 या दरम्यान महापौर होत्या. कसबा विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्ष आमदार राहिलेले पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांच्या रिक्त जागेवर मुक्ता टिळक यांची वर्णी लागली होती. त्यानंतर बापट यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी टिळक यांना कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते. त्यांच्या निधनानंतर आता या मतदारसंघातून भाजप कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दावोस जागतिक आर्थिक परिषदेत गुंतवणुकीचे १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार

मुंबई दि. १८ : दावोस येथे गेल्या दोन दिवसांत विविध उद्योगांशी १ लाख ३७ हजार कोटीं गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. प्रथमच दावोस इथे महाराष्ट्राचे इतक्या मोठ्या संख्येने करार झाल्यामुळे देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांचा राज्यावर विश्वास असल्याचे दिसते असे सांगून या गुंतवणूकदारांचे प्रकल्प लवकरात लवकर सुरु होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण असून उत्तम पायाभूत सुविधा आणि कुशल मनुष्यबळ आहे. त्यामुळे उद्योजकांना मॅग्नेटीक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची संधी असून दावोस मध्ये महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी पसंती दर्शवली आहे. त्यांचे मी आभार मानतो.

हायटेक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात ५४ हजार २७६ कोटी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाची आणि महाराष्ट्राची छाप या आर्थिक परिषदेत दिसून आली. महाराष्ट्राच्या विविध औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक झाली असून त्यामध्ये हायटेक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात सहा कंपन्यांसोबत ५४ हजार २७६ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले आहे. त्याद्वारे ४३०० रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

ऊर्जा आणि इलेक्ट्रीकल व्हेईकल क्षेत्रात ४६ हजार ८०० कोटी

ऊर्जा क्षेत्रातील नविनीकरणीय ऊर्जा आणि इलेक्ट्रीकल व्हेईकल क्षेत्रात ४६ हजार ८०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामाध्यमातून ४५ हजार रोजगार निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आयटी, फिनटेक, डेटा सेंटर या क्षेत्रामध्ये ३२ हजार ४१४ कोटी

माहिती तंत्रज्ञान (आयटी), फिनटेक, डेटा सेंटर या क्षेत्रामध्ये ३२ हजार ४१४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले असून ८७०० जणांना रोजगार मिळणार आहे. लोह उत्पादन क्षेत्रात २२०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून ३००० जणांना रोजगार मिळणार आहे. कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रामध्ये १९०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले असून त्यामुळे सुमारे ६०० जणांना रोजगार मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांनी विश्वास दाखविल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांचे आभार मानत त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.

उद्योग वाढीला चालना देण्यासाठी नवीन धोरण

राज्य शासनामार्फत जनतेच्या हिताच्या निर्णयासोबतच उद्योग वाढीला चालना मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सदस्यांनी उद्योजकांसाठी नवीन धोरण ठरविण्यात आले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नविन धोरणामध्ये एक खिडकी योजना, भांडवली अनुदान, जीएसटी कर अनुदान त्याच बरोबर नविन तंत्रज्ञान आणि मोठ्या उद्योगांना विशेष पॅकेज देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

सामंजस्य करारांची एकत्रित माहिती

पुणे – रुखी फूड्स – ग्रीन फिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प – 250 कोटी गुंतवणूक
पुणे – निप्रो कार्पोरेशन (जपान) – ग्लास ट्युबिंग प्रकल्प – 1,650 कोटी गुंतवणूक – (2000 रोजगार)
पुणे-पिंपरी – एलाईट प्लास्ट अँटो सिस्टीम्स (पोर्तुगाल) – प्लास्टिक ऑटोमोटिव्ह प्रकल्प – 400 कोटी गुंतवणूक – (2000 रोजगार)

मुंबई – इंड्स कॅपिटल पार्टनर्स – आरोग्य, तंत्रज्ञान, संरक्षण सेवा – 16000 कोटी गुंतवणूक
औरंगाबाद – ग्रीनको – नवीनीकरण ऊर्जा (रिन्युएबल एनर्जी) प्रकल्प – 12,000 कोटी गुंतवणूक – (6,300 रोजगार)
चंद्रपूर- भद्रावती – न्यू एरा क्लीनटेक सोल्युशन (अमेरिका) – कोल गॅसिफिकेशन प्रकल्प – 20,000 कोटी गुंतवणूक – (15,000 रोजगार)
चंद्रपूर -मूल – राजुरी स्टील अँड अलाईज (इस्राईल) – स्टील प्रकल्प – 600 कोटी गुंतवणूक – (1000 रोजगार निर्मिती)
गडचिरोली – चार्मिशी – वरद फेरो अलाईज – स्टील प्रकल्प – 1,520 कोटी गुंतवणूक – (2000 रोजगार निर्मिती)
महाराष्ट्र – गोगोरो इंजिनीअरिंग & बडवे इंजिनीअरिंग – ऑटो प्रकल्प – 20,000 कोटी गुंतवणूक – (30,000 रोजगार)
महाराष्ट्र – बर्कशायर-हाथवे – नागरी पायाभूत सुविधा – 16,000 कोटी गुंतवणूक
महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल, 10,000 कोटी गुंतवणूक – (3000 रोजगार)
लक्झम्बर्ग इन्व्हेस्टमेंट कंपनी – 12000 कोटी गुंतवणूक – (1,200 रोजगार)
हंस इन्फ्रोसोल्युशन प्रा. लि. वूडवीन -4000 कोटी गुंतवणूक – (800 रोजगार)
नुंबई, पुणे, ठाणे, नागपूर येथे – जपानच्या निप्पॉन टेलेग्राफ एंड टेलिफोन – डेटा सेंटर्स- 20,414 कोटी गुंतवणूक – (1525 रोजगार )

नॉलेज पार्टनरशिपसाठी करार

दावोस येथे महाराष्ट्रात नॉलेज पार्टनरशिपसाठी देखील खालील सामंजस्य करार करण्यात आले.
मुंबई महानगर- कॅलिफॉर्निया विद्यापीठ (बर्कले)समवेत स्मार्ट सिटी सामंजस्य करार
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसमवेत नागरी परिवर्तनासाठी सामंजस्य करार
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसमवेत न्यू इकॉनॉमी एंड सोसायटी साठी सामंजस्य करार
स्विस इंडिया चेंबर ऑफ कॉमर्ससमवेत गुंतवणूक आणि व्यापारविषयक सहकार्यासाठी सामंजस्य करार

व्यक्तिगत हेवे – दावे काढण्याचे हेतूने, ‘माध्यमां समोर पक्षाचे जाहीर धिंडवडे काढणाऱ्यांवर’ काँग्रेस पक्षाध्यक्षांनी प्रथम कारवाई करावी… काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी.


पुणे दि १८ –
राज्यातील काही असंतुष्ट नेते, व्यक्तिगत राजकीय – अस्तित्वा साठी सत्यजित तांबे व हंडोरे प्रकरणीचे निमित्ताने व्यक्तिगत हेवे-दावे काढण्या करीता पुढे सरसावली असून, ‘माध्यमां समोर पक्षाचे जाहीर धिंडवडे काढुन, पक्षाचीच बदनामी करत आहेत’ त्यामुळे त्यांचेवर प्रथम पक्षश्रेष्ठींनी त्वरित कडक कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली..!
माध्यमांसमोर न जाता ही त्यांना आपली बाजू पक्षाध्यक्षां समोर मांडता आली असती, मात्र एकीकडे सर्व विचारांती पक्षाध्यक्ष खरगे यांनी ‘सत्यजित तांबे प्रकरणी शिस्तभंग समितीचा निर्णय’ जाहीर केला असतां, पुन्हा पक्षाध्यक्षांच्या निर्णयावरच् एक प्रकारे आक्षेप घेणे हा कोणता प्रकार आहे..(?) पक्ष-विरोधी भुमिकेतुन, पक्षाचे जाहीर धिंडवडे काढणे हेच पक्ष विरोघी कृत्य असुन, याची गंभीर दखल घेऊन माध्यमां समोर आरोप करणाऱ्यांवरच(माजी आमदार देशमुख) पक्षाध्यक्षांनी प्रथम कारवाई करणेच गरजेचे आहे.
आरोप करणारे नेते, राज्यात तब्बल १६ दिवस मा राहुल गांधीजींची भारत जोडो यात्र चाललेली असतांना फारसे कुठेच दिसले नाहीत. चंद्रकांत हंडोरे पराभव प्रकरणी त्याच् वेळी केंद्रीय निरीक्षक येऊन चौकशी करून तत्कालीन अध्यक्षा मा सोनियाजीं कडे अहवाल सोपवला आहे.. या प्रकरणी माजी आमदार देशमुख वेगळे काय सांगत आहेत.. महाराष्ट्रासह इतर ही प्रदेश अध्यक्षांच्या नियुक्त्यांची (प्रोसीजर) प्रक्रीया चालू आहे.. असे असतांना माध्यमांसमोक पक्ष ५ व्या क्रमांकावर जाईल अशी पक्षास खच्ची करणारी निंदनीय वक्तव्ये करण्यात कोणती धन्यता मानीत आहेत.,(?) असा सवाल ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला…!
राज्यात प्रदेशाध्यक्ष व विधीमंडळ पक्षनेते व माजी मुख्यमंत्र्या सह, सर्व नेते मा राहुजींच्या पदयात्रेसाठी व जाहीर सभांसाठी मार्गावरील जिल्ह्यांमध्ये जाऊन झटत होते. पक्षाध्यक्ष व इतर ही नेते सतत राहुलजीं सोबत चालत होते, पदाधिकारी व सामान्य कार्यकर्त्यांच्या भेटी घालत होते. व त्यामुळे ‘राज्यात काँग्रेस पक्षास पोषक झालेले वातावरण’ काही नेते स्वअस्तित्वासाठी, अहंभाव व संकुचित हेतुने वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते राज्यातील काँग्रेसजन खपवुन घेणार नाहीत असा संतप्त ईशारा देखील गोपाळ तिवारी यांनी दिला..व पक्षश्रेष्टींनी पक्षाची लक्तरे माध्यमांसमोर टांगणाऱ्यांवर त्वरीत शिस्त भंगाची कडक कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात केली..

पुण्यात जी20 पायाभूत सुविधा कार्यगटाची पहिली बैठक संपन्न

पुणे, 17 जानेवारी 2023

भारताच्या जी 20 अध्यक्षतेअंतर्गत जी20 पायाभूत सुविधा कार्यगटाच्या पहिल्या बैठकीचा 17 जानेवारी 2023 रोजी पुण्यात समारोप झाला. या बैठकीला 18 सदस्य देश, 8 अतिथी देश आणि 8 आंतरराष्ट्रीय संघटनांचे  64 प्रतिनिधी उपस्थित होते. जी20 पायाभूत सुविधा कार्यगटाने  भारताच्या जी 20 अध्यक्षतेअंतर्गत 2023 वर्षासाठीच्या  पायाभूत सुविधा कार्यक्रमावर  चर्चा केली.

भारताच्या  अध्यक्षतेखाली  आयोजित या  दोन दिवसीय बैठकीत, अन्य मुद्द्यांसह  “उद्याच्या शहरांना वित्तपुरवठा : समावेशक, लवचिक  आणि शाश्वत” या प्रमुख संकल्पनेवर चर्चा करण्यात आली. शहरांना आर्थिक विकासाचे केंद्र बनवणे, शहरी पायाभूत सुविधांना वित्तपुरवठा, भविष्यासाठी सज्ज  शहरी पायाभूत सुविधांची उभारणी, शाश्वत उद्दिष्टे पूर्ण करण्यात शहरांची भूमिका, ऊर्जा-कार्यक्षम आणि पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ पायाभूत सुविधांसाठी खाजगी वित्तपुरवठा उपलब्ध करण्यासाठी वित्तीय गुंतवणुक वळवणे आणि सामाजिक असंतुलन कमी करणे  अशा विविध पैलूंवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

पायाभूत सुविधांवरील खर्चासंबंधी माहिती संकलित करण्याचे मार्ग शोधणे आणि खाजगी क्षेत्रासाठी ही माहिती उपयुक्त बनवणे यासारख्या इतर महत्त्वाच्या विषयांवरही या बैठकीत चर्चा झाली.

पुण्यातील  बैठकीच्या निमित्ताने “उद्याच्या शहरांना वित्तपुरवठा” यावर  उच्चस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली, ज्यामध्ये 15 हून अधिक आंतरराष्ट्रीय तज्ञांनी शहरांच्या वित्तपुरवठ्याशी संबंधित समस्यांवर चर्चा केली.  खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यासाठी उद्याच्या शहरांनी  त्यांचे नियोजन, निधी पुरवठा  आणि वित्तसहाय्य सारख्या प्रमुख प्रशासकीय कार्यांची कशा प्रकारे सांगड घालावी यावर कार्यशाळेत चर्चा झाली. तीन आंतर-संबंधित सत्रांमध्ये विभाजित या  कार्यशाळेमध्ये पायाभूत सुविधांवर तसेच उद्याची शहरे उभारण्यासाठी संबंधित तांत्रिक आणि व्यवस्थापकीय क्षमता यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. उद्याच्या शहरांसाठी खाजगी वित्तपुरवठा वाढवण्यासाठी  शहरे आणि प्रशासन स्वतःला कसे तयार करू शकतात यावर कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.

पायाभूत सुविधा कार्यगटाच्या बैठकीदरम्यान, प्रतिनिधींना पुण्याच्या समृद्ध पाककृतींचा आस्वाद घेण्याची तसेच इतिहास आणि संस्कृती जाणून घेण्याची संधी देखील मिळाली. एकूणच, प्रतिनिधींनी केवळ फलदायी बैठकाच घेतल्या नाहीत तर पुण्याचा सांस्कृतिक अनुभव देखील घेतला.

पायाभूत सुविधा कार्यगटाची दुसरी बैठक 28 आणि 29 मार्च 2023 रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे होणार आहे.

कॉंग्रेस भवनाच्यामागे नाचविले कोयते अन तलवारी -सर्व ४ आरोपी गजाआड,हडपसरच्या नावाला लागतोय कलंक

पुणे- कॉंग्रेस भवनाच्यामागे एकाच्या खुनाचा प्रयत्न करून कोयते अन तलवारी नाचवून दहशत निर्माण करणाऱ्या चारही हडपसरवासीय असलेल्या आरोपींना २४ तासाच्या आत पोलिसांनी पकडले असून त्यातील ए क विधीसंघार्षित बालक असल्याचे तपास अधिकारी फौजदार एस.व्ही तरडे यांनी सांगितले

ते म्हणाले,’काल दीपक काकाराम शर्मा (रा. मगर पट्टा ,हडपसर ) यास याप्रकरणी अटक केली होती आज आणखी तिघांना पकडले आहे. अनिकेत उर्फ दाद्या लक्ष्मण बगाडे (वय २२, रा. एस आर ए बिल्डींग ,शिंदे वस्ती हडपसर ),तुषार कैलास काकडे (वय १९ रा. सदर ) आणि एक विधीसंघार्षित बालक यांचा त्यात समावेश आहे.

त्यांच्या प्रकरणात सतीश काळे (वय ४१ रा. जुना तोफखाना ,शिवाजीनगर) यांनी पोलिसात फिर्याद नोंदविली आहे.फिर्यादीचे घर कॉंग्रेस भवनाच्या बाजूला असून काल रात्री ते घरासमोर झोपले असतना आज ००.४५ वाजता हा प्रकार घडला .पूर्वीच्या भांडणाचा राग धरून शर्मा आपल्या ३ साथीदारासह तिथे आला आणि फिर्यादी यांच्या डोक्यावर डाव्या हाताच्या दंडावर वार केले .आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.फिर्यादी यांची पत्नी आणि मुलगी पुढे आली तेव्हा त्यांनाही ठार मारण्याची धमकी दिली .आणि हवेत चौघांनी कोयते ,तलवारी नाचवून आरडाओरडा करत या परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला

राष्ट्रीय गिर्यारोहण आणि साहसी क्रीडा संस्थेचे पथक 6 देशांच्या सायकलिंग मोहिमेवर

या मोहिमेत हे पथक 50 दिवसात 6 देशांमध्ये 5,300 किमी प्रवास करणार

नवी दिल्‍ली, 17 जानेवारी 2023

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव”  निमित्ताने  दिरांग-स्थित राष्ट्रीय गिर्यारोहण आणि साहसी क्रीडा संस्था (निमास) चे 4 सदस्यीय पथक उद्या 18 जानेवारी 2023 रोजी व्हिएतनाममधील हनोई येथून 6 देशांच्या सायकलिंग मोहिमेला सुरुवात करण्यासाठी सज्ज झाले आहे. व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, थायलंड आणि मलेशियामार्गे 50 दिवसांत सुमारे 5300 किमी अंतराचा प्रवास करून 8 मार्च 2023 रोजी सिंगापूरमधील एस्प्लनेड पार्क (आयएनए युद्ध स्मारक ) येथे या मोहिमेचा समारोप होईल. वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी 16 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्ली येथून हा चमू हनोईमध्ये दाखल झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्या वर्षी 18 एप्रिल 2022 रोजी  त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या संस्थेच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत या मोहिमेला मान्यता दिली होती.

16 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथून या मोहिमेला संरक्षण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांनी  निमासच्या  सचिवांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवला. चार सदस्यीय पथकाचे नेतृत्व कर्नल आर.एस. जामवाल करत आहेत.

6 दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्रांना भेट देणारी ही अशा प्रकारची पहिली सायकलिंग मोहीम आहे. सिंगापूर मधील  आयएनए स्मारक येथे हे पथक, ब्रिटीश वसाहतवादी  राजवटीतून  देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली, त्या  सर्व योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण करतील.

राष्ट्रीय गिर्यारोहण आणि साहसी क्रीडा संस्थेच्या पथकाने अलिकडेच  ईशान्येकडील सातही राज्यांचा सायकलने प्रवास करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद केली आहे. त्यांनी ईशान्य प्रदेशातील सर्व 7 राज्यांमधील सर्वात उंच शिखर सायकलने  प्रवास करत सर केले. या पथकाने अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड, मिझोराम आणि त्रिपुरामधून  1098  किलोमीटर अंतर सायकलने पार केले आणि या राज्यांमधील  युवा संघटनांशी संवाद साधला.

मोदी सरकार आर्थिक विषमता रोखण्यात सपशेल फेल !: अतुल लोंढे

देशातील आर्थिक, सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठीच काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’.

मुंबई, दि. १७ जानेवारी
केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार मागील ९ वर्षात सर्वच आघाड्यांवर फेल ठरले आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांची मोठी किंमत देशातील गरिब जनतेला मोजावी लागत असून श्रीमंत अधिक श्रीमंत होत असल्याचे ‘ऑक्सफॅम’ संस्थेच्या अहवालाने स्पष्ट झाले आहे. देशातील ४० टक्के संपत्ती केवळ १ टक्के गर्भश्रीमंतांकडे तर ५० टक्के जनतेकडे केवळ ३ टक्के संपत्ती आहे. ही आकडेवारीच मोदी सरकार देशातील आर्थिक विषमता रोखण्यात अपयशी झाल्याचे सिद्ध करत आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, मोदी सरकारने सामान्य जनतेच्या हिताची धोरणे न राबवता भांडवलदारांचे हित जोपासले आहे. मागील एका वर्षात भारतातील अब्जाधीशांची संख्या १०२ वरून १६६ झाली आहे. याच्या उलट गरिबाला जगण्यासाठी मूलभूत गरजाही परवडत नाहीत. नरेंद्र मोदींचे उद्योगपती मित्र गौतम अदानी यांची संपत्ती २०२२ या एका वर्षात तब्बल ४६ टक्क्याने वाढली आहे. देशातील गरीब आणि मध्यम वर्गावर श्रीमंतांपेक्षा जास्त कर लावण्यात आला आहे. देशातील एकूण जीएसटीच्या अंदाजे ६४% तळाच्या ५०% लोकांकडून आले आहेत तर फक्त ४% वरच्या १०% लोकांकडून आले आहेत असे अहवालात म्हटले आहे. मोदी सरकारच्या काळात गरिब अधिक गरिब होत चालला आहे. मोदी सरकारच देशातील ८० कोटी जनतेला रेशनवरील मोफत धान्य देत असल्याचे सांगत आहे, ही अभिमानाची बाब नसून दुर्दैव आहे. महागाई, बरोजगारीवर नियंत्रण मिळवण्यात मोदी सरकार अपयशी ठरले असून महागाईच्या दराशी तुलना करता लोकांचे उत्पन्न त्या प्रमाणात वाढलेले नाही.
देशातील वाढती आर्थिक, सामाजिक विषमता हा चिंतेचा विषय असून केंद्रातील मोदी सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही. देशात महागाई नाही असे निखालस खोटे विधान केंद्रीय अर्थमंत्रीच करतात यातूनच हे सरकार किती असंवेदनशील आहे हे दिसते. काँग्रेस पक्ष जनतेच्या हिताचे प्रश्न घेऊन सातत्याने संघर्ष करत आहे. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली कन्याकुमारी ते काश्मीर ही ३५०० किमी ची पदयात्रा सुद्धा देशातील महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कष्टकरी लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीच आहे. सामाजिक, आर्थिक विषमतेचा मुद्दाही या पदयात्रेतीत महत्वाचा मुद्दा आहे. भाजपची मातृसंस्था आसणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही तीन महिन्यापूर्वी देशातील वाढत्या सामाजिक, आर्थिक विषमतेवर चिंता व्यक्त केली होती पण मोदी सरकारने त्यातूनही काही बोध घेतल्याचे दिसत नाही, असेही लोंढे म्हणाले.

१८ कोटीच्या कर चोरी प्रकरणी व्यापारी विजय मोतीरमानीला अटक

मुंबई, दि. १७ :- बनावट देयक देणाऱ्या करदात्यांसंदर्भात महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मेसर्स हीर ट्रेडर्सच्या मालकाने बनावट कागदपत्रे वापरून फसव्या पद्धतीने नोंदणी करुन १० कोटींची बनावट वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) मिळवली, तसेच रू. ८ कोटीची बनावट विक्री देयके दिली असल्याचे आढळून आले. या १८ कोटींच्या करचोरी प्रकरणी संबंधित व्यापाऱ्यास अटक करण्यात आली असल्याची माहिती, अन्वेषण विभागाचे राज्यकर सह-आयुक्त यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

या प्रकरणात मे. हीर ट्रेडर्सचे व्यापारी विजय अनिल मोतीरमानी याने कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला विशेष मोहिमेअंतर्गत अटक केली आहे. तसेच त्याला या प्रकरणात १२ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

खोटी देयके देऊन तसेच कोणत्याही वस्तू व सेवांचा प्रत्यक्ष पुरवठा न करता, खोटे व्यवहार, विवरणपत्रात नमूद करून करचोरी करणाऱ्या तसेच पुढील खरेदीदार व्यापाऱ्यांना खोटी कर वजावट (इनपुट टॅक्स क्रेडिट) हस्तांतरित करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवणे व अशा व्यवहारास प्रतिबंध घालण्याच्या सदर मोहिमे अंतर्गत सन २०२२- २३ मधील आतापर्यंतची ही ५९ वी अटक आहे.

सदर प्रकरणात सहाय्यक राज्यकर आयुक्त, मुंबई अन्वेषण ड ०४४, प्रशांत खराडे यांनी ही धडक कारवाई केली व या प्रकरणी अटकेची कारवाई करण्यासाठी त्यांना सहाय्यक राज्यकर आयुक्त, श्रीकांत पवार, विद्याधर जगताप, सुमेधकुमार गायकवाड आणि राज्यकर निरिक्षक व कर सहायक यांनी मदत केली. सदर मोहिम, राज्यकर सह-आयुक्त, अन्वेषण-क विभाग, मुंबई अनिल भंडारी (भा.प्र.से.) व राज्यकर उपायुक्त, अन्वेषण- क विभाग, मुंबई मोहन प्र. चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली.