Home Blog Page 1439

महाराष्ट्राची रीदमिक जिमनॅस्ट संयुक्ता काळेची स्पर्धा स्वतःसोबतच

 पंचकुला -महाराष्ट्राची जिमनॅस्ट संयुक्ता काळेने, पंचकुला इथे झालेल्या चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत रीदमिक जिमनॅस्टीकमध्ये पाच सुवर्णपदके जिंकली. संयुक्ता आता पुन्हा एकदा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत सहभागी होत आहे. जेव्हा, ती ग्वाल्हेरच्या लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेत -जिथे ही जिमनॅस्टीक स्पर्धा होत आहे- त्यासाठी पाऊल ठेवेल, त्या क्षणापासून स्वतःची कामगिरी उत्तम दर्जाची ठेवण्यासाठी, किंवा त्याहीपेक्षा अधिक सरस कामगिरी करण्यासाठी, तिचा स्वतःशीच संघर्ष सुरू राहणार आहे.पंचकुला मध्ये तिने जे यश मिळवले ते तात्पुरते नव्हते, त्यात सातत्य आहे, हे सिद्ध करणारी कामगिरी करण्याचे तिचे लक्ष्य असेल.

संयुक्ता एका मध्यमवर्गीय कुटुंबातली असून तिने पाचव्या वर्षी जिमनॅस्टीकच्या मैदानावर पाऊल ठेवले. पंचकुला इथे झालेल्या स्पर्धेत, संयुक्ताने वैयक्तिक उपकरणे – हूप, बॉल, क्लब आणि रिबन यात चार सुवर्णपदके जिंकली होती. तसेच एक एकूण कामगिरीचे सुवर्णपदकही जिंकले. संयुक्ताने या स्पर्धेत एकूण पाच सुवर्णपदके पटकावत  नेत्रदीपक कामगिरी केली. त्यानंतर गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय खेळांमध्ये तिने वैयक्तिक अष्टपैलू खेळाडूचे सुवर्णपदक आणि याच महिन्यात बेंगळुरू येथे झालेल्या 25 व्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदके जिंकली. आता, मध्यप्रदेशांत होणाऱ्या  खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2022  मध्ये भाग घेण्यास ती सज्ज झाली आहे.

मध्यप्रदेशांतील  खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2022 साठी तिची तयारी आणि कामगिरी  याविषयी बोलतांना संयुक्ता म्हणाली, – “मी खूप चांगली तयारी केली आहे. महाराष्ट्रातून आम्ही जे सगळे जिमनॅस्ट ह्या स्पर्धेत सहभागी होणार आहोत, ते सगळेच खूप परिश्रम करत आहेत. माझ्या लहानपणापासूनच्या प्रशिक्षक, मानसी सुर्वे आणि पूजा सुर्वे, यांच्या देखरेखीखाली मी फिनिक्स अकॅडेमी इथे माझे प्रशिक्षण घेत आहे. मी दररोज सहा तास सराव करते. आणि माझे कुटुंब, माझ्या क्रीडाविषयक गरजांची काळजी घेतात. ग्वाल्हेरमधील माझी कामगिरी खूप महत्त्वाची ठरेल कारण त्यामुळे मला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक मान्यता मिळेल. या वर्षी मी माझ्याच अकादमीच्या कीमाया कार्लेशी स्पर्धा करत आहे पण तसे पाहिले तर माझी खरी लढत माझ्याशी आहे.”

आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स फेडरेशन (FIG) ने संयुक्ताच्या कामगिरीची दखल घेतली असून या संघटनेने जगभरातील सर्वोच्च जिम्नॅस्ट्सच्या यादीत तिचा समावेश केला आहे. हे तिच्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि तिच्या मेहनतीची आणि समर्पित कष्टाची दखल घेणारेही आहे. खेलो इंडिया युवा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा याव्यतिरिक्त संयुक्ताने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

संयुक्ताच्या प्रशिक्षक मानसी सुर्वे यांनीही तिच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. संयुक्ताने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत एकूण 130 पदके जिंकली आहेत, त्यापैकी 119 सुवर्णपदके आहेत, असे मानसी यांनी सांगितले. 2019 साली, संयुक्ता, थायलंड इथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सातव्या स्थानावर येत  तिने भारतासाठी इतिहास घडवला होता. भारत त्याआधी कधीच पहिल्या आठ जणांच्या  यादीत स्थान मिळवू शकला नव्हता. त्यानंतर ती फ्रान्समधील वर्ल्ड स्कूल गेम्स आणि 2022 साली थायलंडमधील आशियाई चॅम्पियनशिपमध्ये खेळायला गेली. तिथे तिला तीन ऐवजी दोन उपकरणे (apparatus) देण्यात आली. त्यातही तिने अव्वल स्थान पटकावले.”

पंचकुलातील जिम्नॅस्टिक्स मैदानावर आपल्या उत्कृष्ट  कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी संयुक्ता पुन्हा एकदा तिच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाली आहे. खेलो इंडिया युवा स्पर्धेत भाग घेतल्यानंतर तिचे आयुष्य कसे बदलले असे विचारले असता संयुक्ता म्हणाली, “खेलो इंडिया मध्ये सहभाग घेतल्यानंतर मला खूप ठिकाणी संधी मिळाली. तो स्पर्धांचा काळ होता, त्यामुळे मी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. माझ्या आयुष्यात खेळ आणि अभ्यास या शिवाय इतर काहीही नाही. त्यामुळे, मी यावर सतत लक्ष केंद्रित करत असते. आणि आज मी पुन्हा एकदा खेलो इंडिया स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे.”

यावेळी मध्यप्रदेशात ग्वाल्हेर इथे होणाऱ्या, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महाराष्ट्रातील विविध क्रीडाप्रकारातील, 450 अॅथलिट सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख खेळाडूमध्ये वेदांत माधवन (जलतरण), शारदा चोपडे (जुडो), आकांक्षा व्यवहारे (भारोत्तोलन; 40 किलो गट), भूमिका मोहिते आणि निकिता कामलकर (भारोत्तोलन; 55 किलो गट), बिशाल चांगमई (तिरंदाजी), विश्वनाथ सुरेश (मुष्टीयुद्ध 40 किलो गट), उस्मान अन्सारी  (मुष्टीयुद्ध 55 किलो गट) आणि देविका घोरपडे (मुष्टियुद्ध 52 किलो गट) यांचा समावेश आहे.

मध्यप्रदेशात पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये देशभरातील 5000 हून अधिक खेळाडू सहभागी होतील.  मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान भोपाळ इथं उद्या म्हणजेच, 30 जानेवारी रोजी या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करतील. ही स्पर्धा राज्यातल्या भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर, उज्जैन, बालाघाट, मंडला, खरगोन (महेश्वर) अशा आठ शहरांमध्ये आयोजित केली जाईल.  तर ट्रॅक सायकलिंग स्पर्धा दिल्लीत होणार आहे. यंदा 27 खेळांमधील स्पर्धा असतील. तसेच पहिल्यांदाच खेलो इंडिया मध्ये वॉटर स्पोर्ट्स देखील समाविष्ट करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम ;‘प्रधानमंत्री बॅनर’विजेत्याचा बहुमान

नवी दिल्ली : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) संचालनालयाने प्रतिष्ठेच्या ‘प्रधानमंत्री बॅनर’चे विजेते पद पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
येथील कॅन्टॉनमेंट भागातील करीअप्पा मैदानावर आयोजित एनसीसी रॅली मध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री बॅनर’ 2022-23 च्या विजेत्या व उपविजेत्यासह एनसीसीच्या बेस्ट कॅडेट्सला सन्मानित करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्यासह गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास प्राप्त विजेतेपदाचा चषक महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट सुकन्या राणा दिवे, सिनियर अंडर ऑफिसर देवेंद्र बडगुजर, संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय.पी.खंडुरी यांनी प्रधानमंत्री बॅनर स्विकारले.देशातील एकूण 17 एनसीसी महासंचालनालयाच्या डिसेंबर 2021 ते नोव्हेंबर 2022 मधील विविध स्तरावरील मुल्यांकन तसेच यावर्षी 1 ते 28 जानेवारी दरम्यान दिल्लीत आयोजित प्रजासत्ताक दिन शिबिरातील विविध स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर आज ‘प्रधानमंत्री बॅनर’चा बहुमान विजेत्या व उपविजेत्या संचालनालयास प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्राला विजेत्याचा तर तामिळनाडू ,पुद्दूचेरी आणि अंदमान एनसीसी संचालनालयास उपविजेतेपदाचा बहुमान प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्राला सात वर्षानंतर सलग दुसऱ्यांदा प्रधानमंत्री बॅनर

महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला यापूर्वी एकूण 18 वेळा प्रधानमंत्री बॅनरचा बहुमान मिळाला आहे. मात्र,गेल्या सात वर्षांपासून महाराष्ट्र उपविजेता किंवा पहिल्या तीन क्रमांकात असायचा. मात्र राज्याने मुसंडी घेत मागील वर्षी हा प्रधानमंत्री बॅनरचा मान पटकाविला होता. यावर्षीही महाराष्ट्राने हा बहुमान मिळविल्याने राज्याला तब्बल सात वर्षाने सलग दोन वर्ष प्रधानमंत्रीबॅनर पटकावून उत्तम कामगिरी केली आहे.

पहिला दिवस पुणे आणि कोल्हापूरच्या खेळाडूंनी गाजवला

शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

पुणे ता. २९: क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे २९ ते ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन ऑलिम्पिक खेळाडू बाळकृष्ण अकोटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

शालेय स्पर्धेमधून दर्जेदार खेळाडू निर्माण होण्याची प्रक्रीया होत असून यामधून भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू घडणार आहेत. स्पर्धेत सहभागी होताना खेळाडूंनी आत्मविश्वासाने स्पर्धेत उतरावे. सातत्यपूर्ण सराव केल्यास स्पर्धेत निश्चितपणे यश मिळेल, असे श्री.अकोटकर यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाला महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या तांत्रिक समितीचे चेअरमन किशोर शिंदे, पंच प्रमुख चंद्रकांत पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, तालुका क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर उपस्थित होते.

स्पर्धेच्या प्रारंभी श्री. अकोटकर यांच्या हस्ते स्पर्धेचा ध्वज फडकविण्यात आला. पुणे विभागाच्या राष्ट्रीय खेळाडू दिव्यांका लांडे व साक्षी सलगर यांनी खेळाडूंना शपथ दिली. यांनी उपस्थितांचे आभार मानले.

स्पर्धेमध्ये राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातुर, मुंबई, पुणे कोल्हापूर व शिवछत्रपती क्रीडापीठ पुणे अशा एकुण नऊ विभागातून १७ व १९ वर्षाखालील मुले व मुली वयोगटात ११०० खेळाडू, संघव्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी सहभागी झाले आहेत.

आजचे निकालः-
१७ वर्षाखालील मुलेः-
३ हजार मी. धावणे-१) स्वराज जोशी, कोल्हापूर २) हर्षित कदम, कोल्हापूर ३) सचिन भारद्वाज, पुणे

उंचउडी- १) सार्थक निंबाळकर, शिवछत्रपती क्रीडापीठ २) आदेश धंडाळे, शिवछत्रपती क्रीडापीठ ३) आल्हाद राउत, नागपूर

थाळीफेक- १) स्वराज गायकवाड, पुणे २) पुष्कर माळी, कोल्हापूर ३) सोहम थोरात, कोल्हापूर

१७ वर्षाखालील मुलीः-
थाळीफेक- १) भक्ती गावडे, पुणे २) वेदिका जगताप, पुणे ३) सुनिता दगडे, औरंगाबाद

उंचउडी- १) प्रतिक्षा अडसुळे, कोल्हापूर २) आंचल पाटील, मुंबई ३) दर्शना जाधव, कोल्हापूर

३ हजार मी. धावणे- १) जान्हवी हिरुडकर, नागपूर २) शकीला वसाळे, नाशिक ३) साक्षी भंडारी, पुणे

१९ वर्षाखालील मुलेः-
लांबउडी- १) शहानवाझ खान, मुंबई २) ऋषीकेश देठे, पुणे ३) शुभम गोंडे, पुणे

गोळाफेक- १) सुभाष चव्हाण, अमरावती २) शरद बागडी, कोल्हापूर ३) आर्यन आघाव, औरंगाबाद

३ हजार मी. धावणे- १) सुजित तिकोडे, कोल्हापूर २) आदित्य पाटील, कोल्हापूर ३) कुमार जाधव, पुणे

१९ वर्षाखालील मुलीः-
गोळाफेक- १) राजनंदिनी सोनवणे, कोल्हापूर २) किरन नायर, पुणे ३) सुर्याश्री धोंडरकर, नागपूर

३ हजार मी. धावणे- १) सानिका रुपनर, सांगली २) गायत्री पाटील, मुंबई ३) आरती पावरा, नाशिक

लांबउडी- १) कल्पना माडकामी, औरंगाबाद २) गायत्री कासुल्ला, मुंबई ३) मधुरा खांबे, पुणे

राहुल गांधींनी लाल चौकात फडकवला तिरंगा, अशी कामगिरी करणारे ठरले दुसरे काँग्रेस नेते

श्रीनगर-राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता अंतिम टप्प्यात आहे. सोमवारी ही यात्रा श्रीनगरमध्ये संपेल. याआधी आज (रविवारी) दुपारी राहुल गांधी यांनी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवला. लाल चौकात तिरंगा फडकवणारे राहुल गांधी हे आतापर्यंतचे पंडित जवाहरलाल नेहरुंनंतरचे दुसरे काँग्रेस नेते ठरले आहेत. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत सकाळी काही किलोमीटर चालल्यानंतर दुपारी १२ वाजता लाल चौकात पोहोचले. यावेळी राहुल यांच्यासोबत त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा आणि इतर कांग्रेस नेते देखील उपस्थित होते.

लाल चौकात तिरंगा फडकवण्यापूर्वी काँग्रेस नेत्यांनी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गायलं. त्यानंतर राहुल गांधी पुढच्या प्रवासाला निघाले. राहुल गांधी पुढे गेल्यानंतरही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी लाल चौकात सेलिब्रेशन केलं.

त्यानंतर काही वेळाने राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नाना उत्तरे दिली .

संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी मारहाण करायची:बागेश्वर बाबा बरळला -भाजप अध्यात्मिक आघाडीसह,राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला संताप व्यक्त

भाजपा राजवटीत बाबागिरी वाढलीय काय ?

अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या आव्हानामुळे बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री चर्चेत आलेत. या बागेश्वर बाबांनी आता जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांचा यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.संत तुकारामांना त्यांच्या पत्नी दररोज मारहाण करत होत्या. त्यामुळे त्यांनी देवाचा धावा केला, अशी मुक्ताफळे त्यांनी या व्हिडिओत उधळली आहेत. त्यांच्या या विधानावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध केला आहे. तसेच भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनीही या प्रकरणी माफीची मागणी केली आहे.पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आपल्या व्हिडिओत म्हणतात – ‘संत तुकाराम महाराष्ट्रातील एक संत होते. त्यांची पत्नी त्यांना दररोज काठीने मारहाण करत होती. एका व्यक्तीने त्यांना याविषयी विचारणा केली. तुम्ही दररोज बायकोचा मार खाता, तुम्हाला त्याची लाज वाटत नाही का?, असे तो म्हणाला. त्यावर तुकाराम त्या ग्रहस्थाला म्हणाले, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे.’धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुढे म्हणाले की, ‘त्यावर ती व्यक्ती म्हणाली, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, अरे वा! प्रेम करणारी पत्नी मिळाली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. भक्तीत लीन झालोच नसतो. पत्नीच्याच प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्यानेच मला देवाची सेवा करण्याची संधी मिळाली.’

 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत म्हटले की,“बागेश्वर बाबाने जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते मात्र शांत आहेत. या बाबाची बडबड एकवेळ मध्यप्रदेशात खपेल पण भक्ती-प्रेमाची शिकवण देणाऱ्या संतांबाबत आणि वारकरी संप्रदायाबद्दल बोललेलं महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही. अशा माणसाला सरकारने तुकोबारायांच्याच शब्दांत उत्तर द्यावं. तुका म्हणे ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजरा!”

वारकरी संप्रदायाचा नाही तर संबंध महाराष्ट्राचा अपमान –

भाजपाच्य अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनीही बागेश्वर बाबांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. “बागेश्वर धाम तथा पंडीत धीरेंद्रशास्त्री यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांबद्दल बोलताना एक चुकीचा संदर्भ दिला आहे. ज्यातून संत तुकाराम आणि त्यांच्या धर्मपत्नींच्या प्रतिमेला ठेच पोहचली आहे. यामधून केवळ वारकरी संप्रदायाचा नाही तर संबंध महाराष्ट्राचा अपमान झाला आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतो, की त्यांनी लवकरात लवकर जगद्गुरू तुकाराम महाराजांची माफी मागावी.”

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या या विधानाचा निषेध आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्या आज (२९ जानेवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या.“धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या विधानाचा जाहीर निषेधच झाला पाहिजे. जे लोक असे बोलतात ते अर्थातच चुकीच आहे. मी अध्यात्माकडे वळलेले आहे. मी अध्यात्म करते म्हणजे माझ्या घरात वाईट आहे असे नाही. हे भारतीय संस्कार आहेत. हे संस्कार आपल्या मुलांवर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तुकाराम महाराजांचा अंधश्रद्धापमान केला जात असेल तर एक समाज म्हणून आपण त्याचा निषेध केला पाहिजे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अमर मूलचंदानी ईडीच्या ताब्यात; कुटुंबीयांवरही गुन्हा दाखल

अंदाज होता दक्षिण पुण्यातील तिघांवर कारवाईचा :प्रत्यक्षात कारवाई झाली पिंपरीत ..

पुणे -ईडीच्या तपासात अडथळा आणणाऱ्या तिघांना पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानीची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी आले तेव्हा त्यांच्या तपासात अमर मूलचंदानीच्या दोन्ही भावाने आणि मुलाने सहकार्य केले नाही. उलट पुरावा नष्ट केला. तपासात अडथळे आणल्याचा ठपका ठेवत रात्री पिंपरी पोलिसांनी अमर मूलचंदानीच्या दोन्ही भावाला आणि भावाच्या एका मुलाला ताब्यात घेतले आहे. तसेच, आणखी दोन महिलांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यांना रात्री नोटीस बजावून सोडून देण्यात आले होते.

दरम्यान सुमारे २ महिन्यापूर्वीच इडी ची कारवाई पुण्यात होईल असे वाटत असताना दक्षिण पुण्यावर इडी च्या नजरेत तीन नेते आले असल्याची माहिती समजत होती परंतु प्रत्यक्षात आता पिंपरीत कारवाई झाली आहे त्यामुळे यापुढे पुन्हा दक्षिण पुण्यात कारवाई होणार कि नाही ? याबाबत साशंकता असल्याचे सूत्रांकडून समजते आहे .

शुक्रवारी पिंपरी-चिंचवड मधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानींच्या घरावर ईडीने रेड टाकली. मूलचंदानींसह संचालकांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे १२४ कर्ज वाटप केल्याचे आणि यातून ४०० कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. पिंपरी- चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी अमर मूलचंदानी सह पाच जणांना अटक ही केली होती. काही महिन्यांपूर्वी मूलचंदानी जामिनावर बाहेर आले आणि शुक्रवारी ईडी ने छापा टाकला. आरबीआयने प्रशासक नेमलेल्या या बँकेत हजारो ठेविदारांच्या कोट्यवधींचा पैसा अडकून आहे. सध्या अमर मूलचंदानी हे पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत असून ते ईडी ने त्यांना ताब्यात घेतलेले आहे. 

पिंपरीतील दी सेवा विकास सहकारी बँकेत बेकायदा कर्जवाटप आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कारवाई केली होती. आरबीआयने दोन महिन्यांपूर्वी सेवा बँकेचा परवाना रद्द केला होता. बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने कारवाई करण्याची मागणी ठेवीदारांकडून करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी (२८ जानेवारी) ईडीच्या पथकाने पिंपरीतील अमर मूलचंदानींचे गणेश हाॅटेल; तसेच तपोवन मंदिराजवळील मिस्ट्री पॅलेस या इमारतीतील मूलचंदानी यांच्या निवासस्थानी कारवाई केली. ईडीचे अधिकारी आणि पथक सकाळी साडेसहाच्या सुमारास मूलचंदानी यांच्या निवासस्थानी पाेहचले. तेव्हा सदनिकेचा दरवाजा बंद होता. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दरवाजा वाजविला. तेव्हा सदनिकेतून प्रतिसाद देण्यात आला नाही. दरवाजा वाजविण्यात आल्यानंतर उघडण्यात आला नाही. अखेर सकाळी सव्वा आठच्या सुमारास पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्याशी ईडीच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधला. तेव्हा पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. त्यानंतर मूलचंदानी कुटुंबीयांनी दरवाजा उघडला.

ईडीचे अधिकारी तसेच पथक दोन तास मूलचंदानी यांच्या निवासस्थानसमोर थांबले होते. या काळात मूलचंदानी कुटुंबीयांनी पुरावे नष्ट करुन तपासात असहकार्य केल्याचे ईडीचे अधिकारी श्रीवास्तव यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

जुहू येथे रोजगार मेळाव्यात ५७२ नोकरी इच्छुक उमेदवारांचा सहभाग

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आज जुहू येथील विद्यानिधी हायस्कूल प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात ५७२ नोकरी इच्छुक उमेदवारांनी सहभाग घेतला. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले.

मेळाव्यात ४३ कंपन्या, उद्योग तथा आस्थापनांनी सहभाग घेत त्यांच्याकडील ९ हजार १६१ रिक्त जागा नोकरीसाठी उपलब्ध करून दिल्या. कॉसमॉस इंटिग्रेटेड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन ग्रुप ऑफ कंपनी, जीएस जॉब सोल्युशन, एस टेक्नॉलॉजी, डुआर्ज एच आर सर्व्हिसेस, हिंदू रोजगार डॉट कॉम, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, स्मार्टस्टार्ट जॉब सोल्युशन्स, कोटक महिंद्रा, रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स, आयसीआयसीआय बँक, कल्पवृक्ष, एलआयसी ऑफ इंडिया, आदित्य बिर्ला कॅपिटल आदी कंपन्यांनी आज या मेळाव्यात सहभाग घेत त्यांच्याकडील रिक्त जागा नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी उपलब्ध केल्या. आज मेळाव्यामध्ये साधारण ३०४ उमेदवारांची प्राथमिक निवड विविध कंपन्यांनी केली, तर पंधरा उमेदवारांची नोकरीसाठी अंतिम निवड करण्यात आली. उर्वरित उमेदवारांची निवडप्रक्रिया पुढील काही दिवस सुरू राहील. राज्य शासनाच्या विविध आर्थिक विकास मंडळांनी मेळाव्यात सहभाग घेत त्यांच्याकडील रोजगार आणि स्वयंरोजगाराविषयी विविध कर्ज योजनांची माहिती उमेदवारांना दिली.

५ लाख रोजगार देण्याचे उद्दीष्ट – मंत्री मंगलप्रभात लोढा

मंत्री श्री. लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. राज्य शासनाने ७५ हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात ५ लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात ३०० रोजगार मेळावे घेण्याचे नियोजित आहे, असे त्यांनी सांगितले.

मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अमित साटम, नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य, विद्यानिधी शाळेचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री, उपाध्यक्ष रमेशभाई मेहता, मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, आशिष वाजपेयी, मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र.वा. खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.

ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांवर पोलिस अधिकाऱ्यानेच झाडल्या गोळ्या

भुवनेश्वर-ओडिशाचे आरोग्य मंत्री नबा दास यांच्यावर रविवारी प्राणघातक हल्ला झाला. ब्रजराजनगर येथे एका पोलिस अधिकाऱ्याने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात त्यांच्या छातीत 4 ते 5 गोळ्या शिरल्या आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या ASI गोपालदास याला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी दुपारी 12.15 च्या सुमारास हा हल्ला झाला. नबा दास ब्रजराजनगर येथे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. कारमधून उतरताच ASI गोपालदास यांनी त्यांना गोळ्या घातल्या. सध्या नबा दास यांना पुढील उपचारांसाठी हवाई रुग्णवाहिकेद्वारे भुवनेश्वरला हलवण्यात आले आहे.

मंत्री नाबा दास यांच्यावर रविवारी सुरक्षेत तैनात असिस्टंट सब इन्स्पेक्टरने (एएसआय) हल्ला केला. एएसआयने ओडिशा सरकारचे मंत्री नाबा दास यांच्या छातीत गोळ्या झाडल्या. नाबा दास यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. ही घटना झारसुगुडा जिल्ह्यातील आहे.

ओडिशा सरकारच्या सर्वात श्रीमंत मंत्र्यांत समावेश

नबा किशोर ओडिशा सरकारच्या सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे 15 कोटींहून अधिकच्या किंमतीची जवळपास 70 वाहने आहेत. त्यात एका मर्सिडीज बेंझचाही समावेश आहे. या कारची किंमत जवळपास 1.14 कोटी रुपये आहे.

नाबा किशोर दास यांची गणना झारसुगुडा जिल्ह्यातील प्रभावशाली नेत्यांमध्ये केली जाते. ते पूर्वी काँग्रेस पक्षात होते. ओडिशा काँग्रेसच्या बड्या नेत्यांमध्ये नाबा दास यांची गणना होते. नंतर नाबा यांनी काँग्रेस पक्ष सोडला. नाबा दास यांनी काँग्रेसपासून फारकत घेत राज्याच्या सत्ताधारी बिजू जनता दलात (बीजेडी) प्रवेश केला.मग मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्यांच्या सरकारमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागासारखे मोठे खाते नाबा दास यांच्याकडे सोपवले. नाबा दास यांची ओळख तळागाळातील नेते म्हणून झाली आहे. नाबा दास हे नवीन पटनायक मंत्रिमंडळातील मजबूत नेत्यांपैकी एक आहेत.

ओडिशा सरकारचे मंत्री नाबा दास नुकतेच मोठ्या प्रमाणात देणगी देऊन चर्चेत आले होते. नाबा दास यांनी शनि शिंगणापुरातील मंदिराला एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचा सोन्याचा कलश दान केला होता. नाबा दास यांनी देशातील प्रसिद्ध शनि मंदिरांपैकी एक असलेल्या शनी शिंगणापूर मंदिराला 1.7 किलो सोने आणि 5 किलो चांदीचे कलश दान केले.नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील ओडिशा सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्र्यांमध्ये नाबा दास यांची गणना केली जाते. त्यांना आलिशान वाहनांची आवड आहे. त्यांच्याकडे सुमारे 16 कोटी रुपयांची 80 वाहने आहेत. नाबा दास यांच्या सोबत असलेल्या 80 वाहनांच्या प्रचंड ताफ्यात 1 कोटी 14 लाख रुपयांची मर्सिडीझ बेंझ कारही आहे.

नाबा दास यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची रोकड आणि गुंतवणूक आहे, तर त्यांची पत्नीही संपत्तीच्या बाबतीत मागे नाही. नाबा दास यांच्या पत्नीकडेही कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. नाबा दास यांच्या पत्नीकडे 30 कोटी रुपयांहून अधिक चल-अचल संपत्ती असल्याचे सांगितले जाते. रिपोर्ट्सनुसार, नाबा दास यांच्या पत्नीच्या नावावर संबलपूरच्या वेगवेगळ्या बँकांमध्ये तीन कोटींहून अधिक रुपये जमा आहेत. नाबा दास यांच्या पत्नीच्या नावे शेअर्समध्येही मोठी गुंतवणूक आहे.7 वर्षांपूर्वी तत्कालीन काँग्रेस आमदार नाबा दास यांनी ओडिशाच्या विधानसभेत कथितरीत्या स्मार्टफोनवर पॉर्न क्लिप पाहिल्याचा आरोप करण्यात आला होता. माध्यमांमध्ये तेव्हा ते पहिल्यांदा चर्चेत आले होते. तेव्हा बीजेडीच्या आमदार आणि महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रमिला मलिक यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. प्रश्नोत्तराच्या तासात केलेल्या या कृत्यावरून दास चांगलेच वादात सापडले होते. या सर्व घटनेवर स्पष्टीकरण देताना दास म्हणाले होते की, ते आपल्या स्मार्टफोनवर काहीतरी महत्त्वाची माहिती शोधत होते. यादरम्यान अचानक पॉर्न क्लिप ओपन झाली. त्यांनी म्हटले होते की, त्यांनी आपल्या आयुष्यात कधीही पॉर्न पाहिले नाही.

मॉडर्न हायस्कूल गणेशखिंड शाळेचा चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल उल्लेखनीय

पुणे-महाराष्ट्र राज्य कला संचलनालया तर्फे सन २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंट्री ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल आजच जाहीर झाला असून गणेशखिंड रोडवरील मॉडर्न हायस्कूल या शाळेचा निकाल शाळेचा  एलिमेंट्री ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल  ९४.६४% इतका लागला आहे.कु. वावरे अनुष्का-९अ व सावंत प्रसाद-९अ हे दोघे A ग्रेड मिळवून उत्तीर्ण झाले असून  अस्वले राजनंदिनी–९अ, बटवाल अवनी- ८अ, गायकवाड कार्तिकी-९अ, जाधव अस्मिता-९अ, काळे स्नेहल-९अ,रानवडे सई-८अ,देशमुख वेदांत-९अ,दहीभाते आकाश-९क,खंडागळे हर्षवर्धन- ९अ,उंडे सत्यजित-८अ हे विद्यार्थी B ग्रेड मिळून उत्तीर्ण झाले आहेत ४१ विद्यार्थी C ग्रेड मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.      इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचा निकाल १००% इतका लागला असून कुमारी बराटे ईश्वरी-९अ, कुमारी सोनवणे सिद्धी -१०ड, कुमारी शिंदे प्रीती-१०ड, यादव महेश-१०ड हे विद्यार्थी A ग्रेड मिळवून उत्तीर्ण झाले असून उबाळे शुभम हा विद्यार्थी बी ग्रेड मिळवून उत्तीर्ण झाला आहे. १० विद्यार्थी C ग्रेड मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.      विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अधिक मार्गदर्शन  मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा कामथे, शाळेतील कलाशिक्षक तथा पर्यवेक्षक शीलरतन बंगाळे यांचे लाभले.  प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी चे कार्याध्यक्ष गजानन एकबोटे , कार्यवाह शामकांत देशमुख , शाळा समिती अध्यक्ष दीपक मराठे , प्र मुख्याध्यापक चित्तरंजन कांबळे ,मॉडर्न हायस्कूल गणेशखिंड चे समन्वयक उद्धव खरे , उपमुख्याध्यापिका सौ शारदा साबळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

राष्ट्रपती भवनाच्या मुघल गार्डनचे नाव आता ‘अमृत उद्यान’

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनाच्या मुघल गार्डनचे नाव बदलण्यात आले आहे. आता ते ‘अमृत उद्यान’ म्हणून ओळखले जाणार आहे. वास्तविक, राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन आपल्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. ते पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. 138 प्रकारचे गुलाब, 10,000 पेक्षा जास्त ट्यूलिप बल्ब आणि 70 विविध प्रजातींच्या सुमारे 5,000 हंगामी फुलांच्या प्रजाती आहेत. हे उद्यान देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सर्वसामान्यांसाठी खुले केले होते, तेव्हापासून दरवर्षी वसंत ऋतूमध्ये हे उद्यान जनतेसाठी खुले केले जाते.

15 एकरात पसरलेल्या या उद्यानाची निर्मिती ब्रिटिश राजवटीत करण्यात आली होती. मुघल गार्डन हा देशाच्या राष्ट्रपती भवनाचा आत्मा आहे, अशी एक म्हण आहे. मुघल गार्डन्सचा एक भाग गुलाबांच्या विशेष प्रकारांसाठी ओळखला जातो. इंग्लिश आर्किटेक्ट सर राष्ट्रपती भवन आणि मुघल गार्डन्सची रचना एडवर्ड लुटियन्सने केली होती.

माहिती देताना राष्ट्रपतींच्या उपप्रेस सचिव नाविका गुप्ता म्हणाल्या की, मुघल गार्डनमध्ये येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी सर्व झाडांजवळ क्यूआर कोड लावण्यात येणार आहेत. यासोबतच आणखी एक बदल करण्यात आला आहे. त्यानुसार दररोज सुमारे 20 व्यावसायिक येथे मार्गदर्शक म्हणून काम करतील. येथे येणाऱ्या लोकांना वनस्पती आणि फुलांशी संबंधित माहिती दिली जाईल.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर लिखित ‘भारत मार्ग’ पुस्तकाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

सुस्पष्ट परराष्ट्र धोरणामुळे भारताची खंबीरता जगात पोहोचली-उपमुख्यमंत्री

पुणे दि.२८: भारत मार्ग हा आपल्या शाश्वत विचारांवर उभा राहिला असून त्यावर आधारीत सुस्पष्ट आणि कोणाच्याही दबावात नसलेले परराष्ट्र धोरण राबवण्यात येत असल्याने भारताची खंबीरता आणि क्षमता जगात पोहोचली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विचार साधना पुणे आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर लिखित ‘द इंडिया वे : स्ट्रॅटेजीस फॉर ॲन अनसर्टेन वर्ल्ड’ या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘भारत मार्ग: जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला पुस्तकाचे लेखक परराष्ट्रमंत्री डॉ. एस.जयशंकर, विजय चौथाईवाले, भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष डॉ.गिरीश आफळे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे आदी उपस्थित होते.

युरोपचा विचार म्हणजे जगाचा विचार नाही हे सुनावण्याचे काम परराष्ट्रमंत्री डॉ.जयशंकर यांनी केले, ही खंबीरता भारताच्या परराष्ट्र मंत्र्यात अनेक वर्षांनी पहायला मिळाली असे नमूद करून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे धोरण देशाहिताचा विचार करणारे असून कोणाच्याही दबावात येणारे नाही हे जगाला दाखवून दिले. भारत जगाच्या पाठीवर मजबूत देश म्हणून उभा राहिला आहे आणि त्याचवेळी अमेरिका किंवा रशिया यांच्या दबावात ज्यांना यायचे नाही असे सगळे देश मोदींजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारताच्या पाठीशी उभे आहेत. हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे यश आहे.

जगातील देशांचा विश्वास हेच आपले यश
जी-२० पूर्वी सव्वाशेपेक्षा अधिक देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चर्चा करून आपली भूमिका भारताने मांडावी असे सांगतात तेव्हा आपल्या परराष्ट्र धोरणाने प्राप्त केलेली शक्ती लक्षात येते. कोविडच्या काळातही अमेरिकेने केवळ भारतासाठी आपले धोरण बदलून भारताला आवश्यक कच्ची सामुग्री दिली. यावरून भारताने मिळवलेले यश लक्षात येते. आजच्या परिस्थितीत मजबूत देश म्हणून भारत पुढे येत असताना पंतप्रधानांसोबत आपली क्षमता पणाला लावणाऱ्या डॉ.जयशंकर यांचे विचार पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर येणे ही पर्वणी आहे, असे त्यांनी सांगितले.

परराष्ट्र धोरणासंदर्भात भारतीय विचार दर्शविणारे पुस्तक
उपमुख्यमंत्री म्हणाले, पुस्तकात परराष्ट्र धोरणावरील तीन ओझी सांगितली आहेत. पहिले फाळणीचे, दुसरे उशिरा सुरू करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचे आणि तिसरे आण्विकदृष्टया आपण सक्षम असतानाही त्याला पुढे नेण्यात आपण गमावलेला काळ. त्यामुळे परराष्ट्र धोरणावर परिणाम झाल्याचे पुस्तकात मांडण्यात आले आहे. त्यासोबत चीनने रशिया आणि अमेरिकेच्या मदतीने प्रगती साधली असताना आपण का मागे पडलो याचा उल्लेखही पुस्तकात आहे. आत्ताची भूराजकीय परिस्थिती, तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा यांचा देशावर काय परिणाम होणार आहे याची माहिती पुस्तकात आहे.

अत्यंत सोप्या भाषेत आणि प्रभावीपणे लेखन झालेल्या पुस्तकाचा तितक्याच सोप्या आणि सुंदर भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. विविध समूहांना भारताचा विचार या पुस्तकातून समजेल. जागतिकीकरणाच्या संपूर्ण परिस्थितीत भारताची भूमिका स्पष्टपणे कळली पाहिजे. परराष्ट्र धोरणाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होतो म्हणून त्याची माहिती प्रत्येकाला मिळणे आवश्यक आहे. यादृष्टीने हे पुस्तक महत्वाचे असून ते अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येईल, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

क्षमता आणि सहकार्याचा भारत मार्गच देशासाठी उपयुक्त-डॉ.एस.जयशंकर
परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर म्हणाले, जागतिकीकरण हे आजची वास्तविकता असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासोबत त्यातील संधींचाही विचार करावा लागेल. पुरवठा साखळी आणि डेटा व्यवस्थापन हे जगात मोठे आव्हान आहे. उद्योगाला प्रोत्साहन देऊन देशात तंत्रज्ञान आणि उत्पादनाची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत मार्ग जगाच्या आजच्या परिस्थितीत इतरांसाठी उपयुक्त असणारा विचार आहे. प्रगती, क्षमता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विचार अनुसरणारा आणि विकसनशील देशांचा आवाज बनणारा भारतमार्ग देशासाठी उपयुक्त ठरणार आहे. या मार्गावर पुढे गेल्यास भारत जगाचे नेतृत्व करू शकेल.

परराष्ट्र धोरणासाठी सहा महत्वाची सूत्रे
स्वावलंबन, आत्मविश्वास, विषयानुसार सहकार्य, राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक अजेंडा, इतर देशातील भारतीयांचा विचार ही परराष्ट्र धोरणाची सहा प्रमुख सूत्रे आहेत. ‘मेक इन इंडिया’ हे देशाच्या प्रगतीचे मुख्य सूत्र आहे. देशांतर्गत पुरवठा साखळीही मजबूत करून जागतिक बाजाराशी जोडले जायला हवे. त्यासाठी सूक्ष्म व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन द्यावे लागेल. आव्हानात्मक परिस्थितीत देशाच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील. युक्रेन युद्धाच्या परिस्थितीत भारताने हेच केले. विविध क्षेत्रात सामंजस्य प्रस्थापित करताना आपल्या आणि जगाच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय विचारनुसार जगाच्या कल्याणाचा विचार योग्य ठरतो, हा विचार भारत मार्ग दर्शवतो.

सर्व राज्यांच्या कल्याणाच्या विचार करणारे परराष्ट्र धोरण हवे
चांगले परराष्ट्र धोरणासाठी देशातील राज्यांचाही सहभाग आणि सर्व राज्यांच्या कल्याणाचा विचार असायला हवा. परराष्ट्र धोरण ठरवतानाही सामान्य जनांच्या भावनादेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. इतिहासापासून आपल्याला शिकायला हवे, लक्षात ठेवायला हवे, त्याची समीक्षा व्हायला हवी. भविष्यात जगाच्या बाबतीत जागरूक रहायला हवे. जग आज आपल्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. जगात होणाऱ्या घटनांचे परिणाम आपल्या देशावरही होतात. जग बदलत असताना आपल्यालाही त्या वेगाने बदलावे लागेल आणि या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पिढीला जगाच्या बाबतीत अधिक माहिती असणे आवश्यक आहे.

चीन जागतिक शक्ती असून भविष्यात महाशक्ती बनण्याची शक्यता लक्षात घेता त्या देशासंबंधातील रणनिती तयार करावी लागेल. जपानचे तंत्रज्ञान आणि सुरक्षा व संरक्षण तंत्रज्ञानाचा लाभही घ्यायला हवा. भारताचा प्रभाव आज हिंद महासागराच्या पुढे जावून प्रशांत महासागरापर्यंत पोहोचला आहे. या सर्व बाबींचा विचार करता भारताला आपल्या विचारांवर आधारीत धोरण ठरवावे लागेल असे पुस्तकात मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.चौथाईवाले यांनी यावेळी ‘भारत मार्ग’ या पुस्तकाविषयी माहिती दिली. पररराष्ट्र धोरणाविषयी अत्यंत सोप्या शब्दात मांडणी पुस्तकात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ.आफळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. भारतीय विचार साधनाने आतापर्यंत ६३० पुस्तके प्रकाशित केल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट प्रकाशन संस्थेसाठी असलेला श्री. पु. भागवत पुरस्कार मिळाला असल्याची माहिती त्यांनी दिली.

तत्पूर्वी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाचा मराठीत अनुवाद करणाऱ्या सविता आठवले यांचा परराष्ट्र मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
000

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

जे.एस.डब्ल्यू., बॅंक ऑफ बडोदा, पश्चिम रेल्वेला विविध गटांत विजेतेपद

मुंबई, दि. २८ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या औद्योगिक व व्यावसायिक पुरुष कामगारांसाठीच्या २६ व्या तर महिलांसाठीच्या २१ व्या राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा पार पडल्या.  पुरुष विभागात जे.एस.डब्ल्यू. संघाने ग्रामीण विभागात सलग चौथे जेतेपद पटकावले तर बँक ऑफ बडोदाने शहरी विभागात बाजी मारली. पश्चिम रेल्वे महिला विभागात अजिंक्य ठरले.

हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन सेनापती बापट मार्ग प्रभादेवी मुंबई येथे दिनांक २४ ते २७ जानेवारी २०२३ या कालावधीत स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, कामगार विभागाचे उपसचिव दादासाहेब खताळ, कल्याण आयुक्त रविराज इळवे, ओएनजीसीचे महाप्रबंधक विवेक झिने, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाहक  विश्वास मोरे, सुप्रसिद्ध कबड्डीपटू रिशांक देवडिगा, स्पर्धा निरीक्षक सदानंद माजलकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

ग्रामीण विभागात जे.एस.डब्ल्यू.चा अदिल पाटील, महिला विभागात सोनाली शिंगटे, तर शहरी विभागात बँक ऑफ बडोदाचा प्रणव राणे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. विजेत्या संघाना कामगार कल्याण चषक आणि रोख ५० हजार रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तर उपविजेत्या संघास चषक आणि रोख ३५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

ग्रामीण विभागाच्या अंतिम सामन्यात जे. एस. डब्ल्यू. ने क्रांती अग्रणीचा ३७-३६ असा निसटता पराभव केला. महिलांच्या अंतिम सामन्यात पश्चिम रेल्वेने बँक ऑफ बडोदाला २९-२७ असे हरवले तर शहरी विभागात पुरुषांच्या अंतिम सामन्यात बँक ऑफ बडोदाने न्यू इंडिया इन्शुरन्सचा ३७-२४ असा पराभव केला.

ग्लॅडिएटर, माव्हरिक्स गटात अव्वल

न्याती माहेश्वरी फुटबॉल लीग, महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजन

पुणे : एमजेएम ग्लॅडिएटर, श्री माव्हरिक्स या संघांनी महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित न्याती माहेश्वरी सिक्स-अ-साइड फुटबॉल लीगमध्ये चमकदार कामगिरी करून आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावला.

गरवारे महाविद्यालयाजवळील सेंट्रल मॉलमधील फुटबॉल ग्राउंडवर ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे उद्धाटन  महाराष्ट्र विद्या प्रचारक मंडलच्या सचिव सुशीला राठी यांच्या हस्ते झाले. यावेळी महेश सेवा संघ युवा समिती अध्यक्ष विशाल राठी, सचिव केतन जाजू,प्रोजेक्ट चेअरमन आकाश झंवर,प्रोजेक्ट सेक्रेटरी ऋषी भुतडा, वेदांत करवा, महेश सेवा संघ सचिव ओमप्रकाश गट्टानी, उद्योजक गिरिधर काळे, डाॅ. प्राजक्ता काळे उपस्थित होते. 

अ गटात ग्लॅडिएटर संघाने पाच पैकी चार लढती जिंकल्या, तर एक लढत गमावली. ग्लॅडिएटर संघ १२ गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. पीपी रॉयल्स संघ दोन लढती जिंकल्या, तर तीन लढती बरोबरीत सोडविल्या. नऊ गुणांसह हा संघ दुस-या क्रमांकावर आहे. रेडिएन्ट रोबेल्स हा संघ ८ गुणांसह तिस-या क्रमांकावर राहिला. 

ब गटात श्री माव्हरिक्स संघाने पाच लढतींपैकी तीन लढती जिंकल्या, तर दोन लढती बरोबरीत सोडविल्या. ११ गुणांसह माव्हरिक्स संघ अव्वल क्रमांकावर आहे. तपाडियाज थंडर संघाने पाच पैकी दोन लढती जिंकल्या, तर दोन लढती बरोबरीत सोडविल्या, एक लढतीत या संघाला पराभव पत्करावा लागला. थंडर संघ आठ गुणांसह दुस-या क्रमांकावर आहे. साई मिरॅकल डिस्ट्रॉयर्स संघ सहा गुणांसह तिस-या क्रमांकावर आहे.निकाल – एनपीएव्ही निंजाज – १ (निराज सोमानी) वि. वि. साई मिरॅकल डिस्ट्रॉयर्स – ०; व्हाइटफिल्ड  वारलॉर्ड्स – ६ (रोहित राठी ४, अभिनंदन बी. १) वि. वि. व्हरटेक्स अससिन्स – १ (यश दरक); 

श्री माव्हरिक्स – २ (मानस दरक १, अक्षत १) वि. वि. तपाडियाज थंडर – ०; पीपी रॉयल्स – ० बरोबरी वि. सीएनजी राठी रॉयल्स – ०; एमजीएम ग्लॅडिएटर्स – ३ (नवल मालपाणी १, निहार झंवर १, श्लोक झंवर १) वि. वि. रेडिएंट रेबेल्स – १ (नीरज डार्गा १); श्री माव्हरिक्स – २ (पवन १, अंकित मुंदडा १) वि. वि. एनपीएव्ही निंजाज – ०; एमजीएम ग्लॅडिएटर्स – १ (यश तोष्णीवाल १) बरोबरी वि. व्हरटेक्स अससिन्स – १ (निहार झंवर १) ; रेडिएंट रेबेल्स – २ (नीरज डार्गा १, हृषीकेश १) वि. वि. व्हाइटफिल्ड – १ (अभिनंदन बी. १) ; पी. पी. रॉयल्स – १ (धीर मंत्री १) वि. वि. एमजीएम ग्लॅडिएटर्स – ०; श्री माव्हरिक्स – ४ (सर्वेश २, अक्षत २) वि. वि. फँटम -०; पी. पी. रॉयल्स – २ (सागर कारवा १, भाग्येश १) बरोबरी वि. व्हाइटफिल्ड – २ (अभिनंदन बी. १, जय कारवा १) ; तपाडिया थंडर्ज – ३ (वरुण पोरवाल २, वेदांत मालू १) वि. वि. फँटम – ०.   

महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी खेळण्याचे ध्येय ठेवावे

पुणे,
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया गेम्स मध्ये अधिकाधिक पदके मिळवावी, पण आपल्याला भारतासाठी खेळावयाचे आहे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत आपल्या क्षमतेच्या शंभर टक्के इतकी कामगिरी करावी, असे आवाहन आंतरराष्ट्रीय खेळाडू शकुंतला खटावकर, शांताराम जाधव व निखिल कानेटकर यांनी केले.
मध्यप्रदेश मध्ये होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022-23 साठी महाराष्ट्राच्या खेळाडूंचे बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा नगरीत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातील सहभागी खेळाडूंना खटावकर, जाधव व कानेटकर यांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जेष्ठ कबड्डी प्रशिक्षक सचिन भोसले, महाराष्ट्राचे पथक प्रमुख चंद्रकांत कांबळे, नोडल अधिकारी अनिल चोरमले तसेच वरिष्ठ अधिकारी सुहास पाटील, व्यवस्थापक अरुण पाटील व श्रीमती अडसूळ आदी यावेळी उपस्थित होते.
खेलो इंडिया गेम्स हे नवीन खेळाडूंसाठी आपले कौशल्य दाखविण्याची हुकमी संधी आहे या संधीचा खेळाडूंनी मनापासून फायदा घेतला पाहिजे. असे सांगून अजून पुरस्कार विजेते कबड्डीपटू व प्रशिक्षक शांताराम जाधव म्हणाले,” क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी आता भरपूर संधी उपलब्ध आहेत, हे लक्षात घेऊन खेळाडूंनी या क्षेत्रात सर्वोत्तम करिअर कसे करता येईल हे लक्षात ठेवले पाहिजे. चांगल्या करिअर बरोबरच स्वतःला आदर्श व्यक्ती म्हणून घडवण्यासाठी क्रीडाक्षेत्र हे उत्तम व्यासपीठ आहे याचीही जाणीव खेळाडूंनी ठेवली पाहिजे.”
अर्जुन पुरस्कार विजेत्या कबड्डीपटू व प्रशिक्षिका शकुंतला खटावकर यांनी सांगितले,” खेळाडूंना अतिशय अनुभवी व ज्येष्ठ प्रशिक्षकांकडून सर्वोत्तम प्रशिक्षण मिळाले आहे. स्वतःकडे असलेले कौशल्य पणाला लावून महाराष्ट्राला अधिकाधिक सुवर्णपदके कशी मिळतील असा प्रयत्न खेळाडूंनी केला पाहिजे.”
खेळाडूंनी फक्त महाराष्ट्राला पदके कशी मिळवता येतील याचा विचार न करता आपल्याला येथील पदकांचा फायदा घेत जागतिक स्तरावर करिअर करायचे आहे असे ध्येय डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. खेळाडूंनी अल्प संतुष्ट न राहता सतत सर्वोच्च यश मिळवण्याची महत्त्वाकांक्षा ठेवली पाहिजे असे आवाहन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक निखिल कानेटकर यांनी केले.
खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचा शुभेच्छा समारंभाप्रसंगी सहसंचालक चंद्रकांत कांबळे व नोडल अधिकारी अनिल चोरमले यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांचा आत्मविश्वास वाढविला. या कार्यक्रमाचे अरुण पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर श्रीमती अडसूळ यांनी आभार मानले.

जबलपूरमध्ये सुवर्ण क्रांतीने झगमगणार महाराष्ट्र खेळाडूंचे यश

महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खो-खो संघाचे जबलपूर मध्ये आगमन; सोमवारपासून विजयी मोहीम

पुणे
निर्विवाद वर्चस्वासाठी उत्सुक असलेले महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खो खो संघांचे शनिवारी मोठ्या उत्साहात जबलपूर मध्ये आगमन झाले.
प्रचंड मेहनत आणि जिद्दीचे बळावर सुवर्ण क्रांती घडवून जबलपूर मध्ये आपल्या संघाचे यश झगमगण्यासाठी युवा खेळाडू सज्ज झाले आहेत. सोमवार पासून पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्स ला सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील खो-खो इव्हेंटचे जबलपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे संघ दमदार सलामी देत आपल्या किताबाच्या मोहिमेला शानदार सुरुवात करण्यासाठी उद्यापासून मैदानावर उतरणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीचा अनुभव असलेले महाराष्ट्राचे युवा खेळाडू यंदा किताबाची प्रभाव दावेदार मानली जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र संघाला सोनेरी यशाची आपली परंपरा कायम ठेवण्याची संधी आहे.
घरच्या मैदानावर कसून सराव
तज्ञ प्रशिक्षक आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या बालेवाडी मध्ये महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खो-खो संघांनी कसून सराव केला आहे. त्यामुळे किताबावरचे आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या इराद्याने दोन्ही संघांनी जय्यत तयारी केली आहे.

राष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव सरस
महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष संघामध्ये यंदा सहभागी असलेल्या युवा खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीचा प्रचंड अनुभव आहे. याच अनुभवाच्या बळावर खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धा गाजवण्याचा खेळाडूंनी निर्धार केला आहे. त्यामुळे यंदाही महाराष्ट्राला आपला दबदबा कायम ठेवता येणार आहे. नुकत्याच झालेल्या युवा गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र खेळाडूंची कामगिरी लक्षवेधी ठरली. यात सोनेरी यशाच्या कामगिरीला उजाळा देण्यासाठी महाराष्ट्राचे संघ उत्सुक आहेत.

विमान वारीने गाठली जबलपूर नगरी
महाराष्ट्र महिला आणि पुरुष खो खो संघांनी खास विमान वारीतून मध्य प्रदेश मधील जबलपूरची नगरी गाठली आहे. दोन्ही संघातील 30 खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्यासह 29 जणांना विमानाने जबलपूर मध्ये आगमन करता आले. पुण्यातील कसून सरावानंतर दोन्ही संघ खास बसने मुंबई येथे दाखल झाला होता. त्यानंतर दुपारी एक वाजता मुंबईतून जबलपूर कडे संघाने उड्डाण घेतली.