Home Blog Page 1422

या भिडेचा बंदोबस्त करा : बाळासाहेब थोरात,यशोमती ठाकूर

मुंबई : संभाजी भिडे नावाचा इसम राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतो, संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारने त्याचा आजच बंदोबस्त करावा आणि त्या संदर्भात सभागृहात निवेदन करावे, मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरातआणि यशोमती ठाकूर यांनी केली.

थोरात पुढे म्हणाले, संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे वारंवार असं बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो? आम्ही सभागृहात संभाजी भिडेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने आजच या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही.

थोरात म्हणाले, पुरोगामी विचार संपवण्यासाठी एक यंत्रणा काम करते, असे आमचे स्पष्ट मत आहे. महापुरुष हे सर्वकालीन असतात, त्यांच्या विचारांचे आणि कृतीचे समाजाच्या उभारणीत मोठे योगदान असते. असे असताना हा सततचा खोडसाळपणा सरकारने सहन करू नये. कालही आम्ही क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासंदर्भात बदनामीकारक लिखाण करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती.

थोरात यांनी सरकारवर आरोप करताना सांगितले, एकूणच या संपूर्ण प्रकरणात सरकार गंभीर दिसत नाही. भिडे सारख्या विकृतीवर वेळीच कारवाई केली तर सरकारचा हेतू शुद्ध आहे असे म्हटले जाईल.

गिरणी कामगारांच्या घराचे प्रश्न सोडवण्याची कालमर्यादा निश्चित करा

  • काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची सभागृहात मागणी

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कामाच्या निमित्ताने मुंबईत आलेले गिरणी कामगार हे मुंबईचे खरे निर्माते आहे, त्यांच्या हक्काच्या घराचा प्रश्न सुटावा यासाठी शासनाने कालमर्यादा निश्चित करावी आणि सकारात्मक रित्या हा प्रश्न सोडवावा असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केले.

थोरात म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाच्या काळात हा प्रश्न प्रामुख्याने समोर आला होता. महसूल मंत्री या नात्याने हा प्रश्न हाताळायची जबाबदारी माझ्याकडे होती, आम्ही या प्रश्नात खूप काम केले, पुढे गेलो आणि अनेक प्रश्न मार्गी लावले. गिरणी कामगारांच्या प्रश्नाकडे केवळ राजकारण म्हणून बघू नये. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कामा धंद्याच्या निमित्ताने ही लोक मुंबईत आली, स्थिरस्थावर झाली, त्यांनी मुंबई उभी करण्यात हातभार लावला. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी कालमर्यादा निश्चित केली पाहिजे.

मंत्र्यांचे सकारात्मक उत्तर
मंत्री अतुल सावे यांनी, हा प्रश्न महत्त्वाचा असून तो सोडविण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे निश्चित कालमर्यादेतला कार्यक्रम आखला जाईल, या संदर्भातील बैठक घेऊ. त्या बैठकीलाही बाळासाहेब थोरात आपल्याला बोलावून घेतले जाईल आणि हा प्रश्न मार्गी लावू, असे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

राजपूत भामटा जमातीच्या नावातील भामटा शब्द वगळला जाणार नाही

– इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. 28 : राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीमध्ये समावेश असलेल्या राजपूत भामटा या जमातीतील ‘भामटा’हा शब्द वगळला जाणार नाही, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. त्याचप्रमाणे खोट्या जात प्रमाणपत्रांबाबत एसआयटी नेमली जाईल आणि सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राजपूत भामटा जमातीच्या नावातील भामटा शब्द वगळण्यासंदर्भात शासनाच्या भूमिकेबाबत सदस्य राजेश राठोड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री.सावे म्हणाले की, 1961 मधील शासन निर्णयात तसेच त्यानंतर 1993 मध्येही राजपूत भामटा जमातीचा उल्लेख आहे. त्यानंतर सन 2008 आणि 2010 मध्ये मागासवर्ग आयोगानेदेखील यातील भामटा शब्द काढता येणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे हा शब्द वगळला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विभागामार्फत मॅट्रिकपूर्व, मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांसाठी तसेच परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या 50 वरून 75 करण्याचा शासनाचा विचार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, भाई जगताप, नीलय नाईक आदींनी सहभाग घेतला.

पर्वती विधानसभा मतदार संघातील गृहनिर्माण संस्थांमध्ये शनिवार, रविवारी मतदार नोंदणी अभियान

पुणे, दि. २८: मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत २१२ पर्वती विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील गृहनिर्माण संस्थांमध्ये शनिवार २९ व रविवार ३० जुलै रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) गृहनिर्माण संस्थांमध्ये प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करणार आहेत. त्यामध्ये ज्या मतदारांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट नाहीत त्यांची नावे नमुना क्रमांक ६ मध्ये भरुन घेणे, कायमस्वरुपी स्थलांतरीत व मयत झालेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७ तर मतदार यादी किंवा मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी नमुना क्रमांक ८ भरुन घेतला जाणार आहे.

मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे: नमुना क्रमांक ६ भरण्यासाठी अर्हता दिनांकाला वय वर्षे १८ पूर्ण होत असावे. निवासाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, भारतीय पासपोर्ट किंवा राष्ट्रीयकृत बँकेच्या खातेपुरस्तकाची पहिल्या पानाची छायांकित प्रत यापैकी एकाची आवश्यकता आहे. वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, भारतीय पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला किंवा पॅन कार्ड यापैकी एकाची आवश्यकता आहे. नजीकच्या काळातील पासपोर्ट आकाराचे पांढऱ्या रंगाची पार्श्वभूमी (बॅकग्राऊंड) असलेले एक रंगीत छायाचित्र, मतदार भाडेकरू असेल तर नोंदणीकृत भाडे करार आवश्यक आहे.

मतदार यादीतून नाव वगळणेबाबत नमुना क्रमांक ७ साठी- मयत मतदार असेल तर मयताचा दाखला, लग्न होऊन सासरी गेलेल्या महिला व इतर मतदार संघात कायमस्वरूपी वास्तव्यास गेले असल्यास त्याचा पुरावा आवश्यक आहे.

मतदार यादीतील दुरुस्त्यांबाबत नमुना क्रमांक ८ साठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, भारतीय पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत यापैकी एक की ज्यामध्ये बदल करावयाचा उल्लेख असेल अशा कागदपत्राची आवश्यकता आहे.

ज्या नवमतदारांना ऑनलाईन नावनोंदणी करावयाची असेल त्यांनी https://voters.eci.gov.in या वोटर्स सर्व्हिस पोर्टल व वोटर हेल्पलाईन ॲप या माध्यमांचा वापर करुन नवीन नाव नोंदणी करावी. या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि नवमतदारांनी नोंदणी करून घ्यावी, असे आवाहनही २१२ पर्वती मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकारी यांनी केले आहे.
0000

महिला काँग्रेसच्यावतीने केंद्रीय महिला बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या बेताल वक्तव्यावर जाहीर निषेध आंदोलन

पुणे- केंद्रिय मंत्री स्मृती इराणी या पवित्र लोकसभेला सुद्धा आपले कला श्रेत्र समजुन आपला अभिनय सादर करत दोन महिन्यांपासुन जळत असलेल्या मनिपुर मध्ये घडलेल्या दुर्देव्यी घटनेबद्दल भ्र शब्द न काढता इतर गोष्टींमध्ये विषयांतर करत देशातील जनतेची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करित आहेत.
जनता अश्या या भुलथापांना बळी न पडता मनिपुर दुर्घटनेतील आमच्या भगिनींना न्याय मिळवुन देण्यासाठी व एक स्त्री असुन सुद्धा नेहमीच स्त्री विरोधात कारवाई करणार्‍या केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांचा व केंद्र सरकारचा निषेध मा. पुजा मनिष आनंद यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला आहे. गुडलक चूक, कलाकार कट्टा इथे हे निषेध आंदोलन आज दिनांक २८/०७/२३ रोजी सकाळी ११:०० वा पार पडले.
कलाकारांचा आम्ही नेहमी आदर करतो. संविधानिक पदावर असणाऱ्या मंत्री स्मृती इराणी यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध बोलणं अपेक्षित होत. परंतु सवयीप्रमाणे नौटंकी करून दिशाभूल केली. यामुळे समस्त महिलांमधे नाराजी आहे. तसेच, पंतप्रधान मोदी हे क्राईम मिनिस्टर आहेत. भाजपा भगाव, संविधान बचावचा नारा देत आपले मत मोहन दादा जोशी यांनी व्यक्त केले.
ज्या देशाचा स्वातंत्र्य लढा महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाने महिला एकत्र येवून लढल्या. आज त्याच भारतात भाजपाचे नेते, पदाधिकारी महिलांवर अत्याचार करतं आहेत. या संवेदनशील विषयावर पंतप्रधान बघ्याची भूमिका घेत आहे.
इराणी या मनुस्मृती इराणी आहेत. महिला विरोधी धरण त्या राबवत आहेत. महिला बालविकास मंत्री म्हणून त्यांना त्याचे कर्तव्य आठवतं नाही. महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार हा राजकीय मुद्दा म्हणून इराणी या कडे पहातात. महिलांच्या सन्मानाखातर समस्त काँग्रेस पक्ष हा लढा देत आहे. मणिपूर मधील महिलांवर झालेला अत्याचार, हिंसा व बळी हे आरएसएस प्रणित भाजपाच्या भ्रष्ट व हिंसक कृतीला काँग्रेस प्रेम व शांती प्रस्थापित करून उत्तरं देईल. संविधान हटवून मनुस्मृती लागू करण्याचे भाजपचे प्रयत्न हाणून पाडू. असे मत प्राची दुधाने यांनी व्यक्त केले.
राजश्री अडसूळ यांनी प्रास्ताविक केले तर प्रियांका रणपिसे यांनी आभार व्यक्त केले.
मोहन जोशी (उपाध्यक्ष महा.प्रदेश काँग्रेस),प्राची दुधाने (उपाध्यक्ष पुणे शहर महिला काँ.), स्वाती शिंदे(सरचिटणीस महा. महिला काँ.),प्रियांका रणपिसे(एस.सि. उपाध्यक्ष प्रदेश), अश्विनी गवारे, रेश्मा शिलेगावकर, राजश्री अडसूळ, प्रियांका मंदाळे, अंजली सोलापूर, ज्योती चंदेवळ, ज्योती परदेशी, पपिता सोनावणे, शिवानी माने, मंदाकिनी नलावडे, मनीषा करपे, सुरेखा मारणे, पौर्णिमा भगत, सारिका मुंडावरे, मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्या महिला उपस्थित होत्या.

नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन महसूल सप्ताह साजरा करावा – विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि. २८ :- महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती मिळावी आणि त्यांना योग्य लाभ घेता यावा तसेच शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा या उद्देशाने आयोजित केलेल्या महसूल सप्ताहात नागरिकांना सहभागी करुन घ्यावे आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करुन सप्ताह यशस्वी करावा असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले.

राज्य शासनाच्यावतीने १ ऑगस्टपासून राज्यात महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा विभागीय आयुक्तालयातून पुणे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून आढावा घेताना ते बोलत होते. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, उपायुक्त सामान्य प्रशासन वर्षा लड्डा ऊंटवाल, उपायुक्त महसूल रामचंद्र शिंदे व अन्य विभागीय प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

विविध कार्यक्रमाचे आयोजन

१ ते ७ ऑगस्ट,२०२३ या कालावधीत सातही दिवसांत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे शासनाने निर्देशित केले आहे. या कालावधीत मसहूल दिन साजरा करण्यासह महसूल सप्ताह शुभारंभ, युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसूल संवर्गातील कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा संवाद तसेच महसूल सप्ताह सांगता समारंभ इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करुन यामध्ये नागरिकांना मोठया प्रमाणावर सहभागी करुन घ्यावे, यासाठी विशेष कार्यक्रमांचे कल्पकतेने आयोजन करावे असे श्री.राव यांनी सांगितले. शासनाच्या सर्वच उपक्रमांमध्ये पुणे विभाग नेहमीच अग्रेसर राहिला असून, महसूल सप्ताह आयोजनातही विभागाने आपला नावलौकिक टिकवावा‌. यासाठी विभागातील सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच महसूल कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा आणि उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन श्री.राव यांनी केले.

प्रसिध्दी माध्यमांचे सहकार्य घ्यावे

माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने शासनाच्या विविध योजनांची, ध्येय धोरणांची सकारात्मक प्रसिध्दी करण्यात येते. महसूल सप्ताहाच्या ठळक आणि प्रभावी प्रसिध्दीसाठी जिल्हा माहिती अधिकारी आणि प्रसिध्दी माध्यमांचे सहकार्य घ्यावे, सप्ताहात आयोजित कार्यक्रमांची माहिती नागरिकांनी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांनी पत्रकार परिषदा घ्यावी. सर्व तालुका, उपविभागीय आणि जिल्हयाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती फ्लेक्स बॅनर्सद्वारे ठळकपणे प्रदर्शित करावी अशी सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केली.

अभिनेता अनिल कपूरचा उल्लेखनीय प्रवास ” भारतातील पहिल्या  सुपरहिरोपासून ते हॉटस्टारचा सुपरहिट  खलनायक ! ” 

भारतातील पहिल्या अदृश्य सुपरहिरोपासून ते हॉटस्टारच्या सर्वाधिक आवडत्या खलनायका पर्यंत अभिनेता अनिल कपूर यांच्या अतुलनीय अष्टपैलुत्वाचा प्रवास ! 
भारतीय चित्रपटसृष्टीच्या क्षेत्रात असे काही कलाकार असतात जे इतर कलाकारा पेक्षा अधिक चमकतात आणि पिढ्यानपिढ्या टिकून राहणारा वारसा चालवतात. नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा सदैव मोहक अभिनेता म्हणजे अनिल कपूर ! हा एक खरा आयकॉन आहे ज्याने कायम प्रेक्षकांच्या मनात आपल अनोखं स्थान निर्माण केलं आहे. भारतातील पहिल्या अदृश्य सुपरहिरोच्या भूमिकेपासून ते छोट्या पडद्यावर एक खलनायक म्हणून प्रेक्षकांना भुरळ घालण्यापर्यंत अनिल कपूरचा प्रवास हा नेहमीच लक्षवेधी ठरला आहे.
भारतीय सिनेमाच्या सुवर्णकाळा मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट निर्माता शेखर कपूर दिग्दर्शित मिस्टर इंडिया या अविस्मरणीय चित्रपटातून अनिल ने पदार्पण केलं. 1987 मध्ये रिलीज झालेल्या या कल्ट क्लासिकने अनिल कपूरला एक अनोखं स्थान निर्माण करून दिलं. अरुण वर्माच्या रूपात अनिल कपूरने आपल्या करिष्मा आणि अनोख्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मन जिंकली. 
अनिल कपूर याने आपल्या सिनेमॅटिक प्रवासाने नेहमीच सगळ्यांना भुरळ घातली आहे. हॉटस्टार च्या द नाईट मॅनेजरमध्ये अनिल कपूरने शेली रुंगटाची भूमिका साकारली आणि पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची जादू दाखवली.
पण अनिल कपूरचा प्रवास एवढ्यावरच थांबत नाही तर अभिनयाच्या त्याच्या प्रवासात अनिल कपूर पुन्हा एकदा बहुप्रतिक्षित ” फायटर ” या भारतातील पहिला एरियल अॅक्शन चित्रपटात दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात तो हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

कालबध्द वेळापत्रकाद्वारे अनुकंपा भरती प्रक्रिया राबवावी – विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि.२८ :- शासकीय सेवेत कार्यरत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर ओढावणाऱ्या आर्थिक आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी मदत म्हणून शासकीय कार्यालयातील रिक्त पदांवर अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येते. अनुकंपा नियुक्तीचे शासनाचे हे प्रयोजन लक्षात घेता अशाप्रकरणी नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी सहानुभूतीपूर्वक दृष्टीकोन ठेवून जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने प्रलंबीत प्रकरणे मार्गी लावावीत. जिल्हा प्रशासनानेसुध्दा कालबध्द वेळापत्रकाद्वारे विभागातील अनुकंपा भरती प्रक्रिया राबवून प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना त्वरीत नियुक्ती द्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले.

विभागीय आयुक्तालयातून पुणे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून अनुकंपा भरती प्रक्रियेचा आढावा घेताना ते बोलत होते. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, उपायुक्त सामान्य प्रशासन वर्षा लड्डा ऊंटवाल, उपायुक्त महसूल रामचंद्र शिंदे व अन्य विभागीय प्रमुख अधिकारी  यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
पुणे विभागातील अनुकंपा तत्वावरील नियुक्ती प्रकरणे कालबध्द पध्दतीने व जलद गतीने पूर्ण होण्यासाठीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. अनुकंपा नियुक्तीच्या अनुषंगाने सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांशी संपर्क साधून सध्या अस्तित्वात असलेल्या प्रतीक्षा यादीनुसार गट क व ड संवर्गातील रिक्त पदांवर भरती प्रक्रिया तातडीने राबवावी, प्रत्येक वर्षी त्या-त्या संवर्गातील रिक्त पदांपैकी वीस टक्के पदांवर उमेदवारांना अनुकंपा नियुक्ती द्यावी, तांत्रिक पदावर नियुक्तीसाठी तांत्रिक अर्हता धारण करणाऱ्या उमेवारांना प्राधान्याने नियुक्ती द्यावी असे निर्देश त्यांनी यावेळी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले. शासन स्तरावर जलदगतीने अनुकंपा नियुक्तीसंदर्भात नियमित आढावा घेण्यात येत असल्याने विभागातील प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना शंभर टक्के नियुक्ती देण्यात यावी अशी सूचना श्री.राव यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आढावा

राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणीशिवाय शेतीसाठी वीज उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. विभागातील या योजनेचा आज विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी महावितरणचे विभागातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

महिला स्वयं सहायता गटांना दुपटीने अर्थसहाय,६० लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई दि. २८: उमेद अभियानातील महिलांच्या स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक गटांना देण्याचा तसेच कर्मचारी व चळवळीतील संसाधन व्यक्तींना देखील मानधनात भरीव वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात निवेदन केले.
महिलांची देशाच्या विकासात महत्वाची भूमिका आहे.

फिरता निधी दुप्पट

आपल्या निवेदनात मुख्यमंत्री म्हणतात की, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयं सहाय्यता गटांना प्रती गट रु 15 हजार फ़िरता निधी देण्यात येतो. त्यामध्ये वाढ करुन प्रती समुह रु 30 हजार फ़िरता निधी देण्यात येईल. या वाढीमुळे अतिरिक्त रु 913 कोटी एवढ्या निधीची तरतुद राज्य शासनामार्फ़त करण्यात येणार आहे.

मानधनात दुपटीने वाढ

स्वयं सहाय्यता गटांना दैनंदिन मार्गदर्शन करण्यासाठी गावपातळीवर एकूण ४६ हजार ९५६ समुदाय संसाधन व्यक्ती (CRP) कार्यरत आहेत. त्यांना सर्वसाधारणपणे दरमहा रु ३ हजार एवढे मानधन अदा करण्यात येते. बचत गट चळवळीतील त्यांचे योगदान व मागणी लक्षात घेऊन त्यांच्या मानधनात वाढ करून ते प्रति महा ६ हजार रुपये एवढे करण्यात येणार आहे. या करिता १६३ कोटी रुपये एवढ्या अतिरिक्त निधीची तरतुद करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. या अभियानात राज्यस्तरापासून ते क्लस्टर स्तरापर्यत स्वतंत्र, समर्पित व संवेदनशील यंत्रणा तयार करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत अभियानांतर्गत एकूण २७४१ कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या मासिक मानधनामध्ये २० टक्के वाढ करण्यात येणार आहे तसेच त्यांच्या इतरही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

स्वयं सहाय्यता गटातील महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुचे मूल्यवर्धन करणे ,गुणवत्तेत वाढ करणे , आधुनिक पॅकेजिंग व ब्रॅन्डींग करिता प्रोत्साहन देणे व उत्पादनांना हक्काची बाजारेपठ मिळवून देणे इत्यादी उपक्रम राबवून ग्रामीण महिलांचे सर्वार्थाने सक्षमीकरण करण्यासाठी शासन भविष्यात देखील कटीबध्द असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश देखील महिला स्वयं सहायता गटांमार्फत देण्यात येतील असे मुख्यमंत्री म्हणाले.

बँक कर्जाची नियमित परतफेड

मुख्यमंत्री आपल्या निवेदनात म्हणाले की, उमेद अभियानांतर्गत आतापर्यत सुमारे ६ लाख स्वयं सहाय्यता समूह स्थापित करण्यात आले असून यामध्ये ६० लाखांपेक्षा अधिक महिलांचा समावेश आहे. तसेच ३० हजार ८५४ ग्रामसंघ व १ हजार ७८८ प्रभागसंघ आहेत. या महिलांना उत्पन्न मिळावे म्हणून उमेद अभियान तसेच बॅकामार्फ़त अर्थसहाय्य देण्यात येते. स्वयं सहाय्यता गट स्थापन झाल्यानंतर ३ महिन्यानंतर त्यांना अंतर्गत कर्ज व्यवहाराला अर्थसहाय्य म्हणून रु.१० हजार ते रु १५ हजार याप्रमाणे फिरता निधी वितरीत करण्यात येतो.

आतापर्यत ३ लाख ९१ हजार ४७६ गटांना रु. ५८४ कोटीचा फिरता निधी देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत ८० हजार ३४८ समूहांना रु.५७७ कोटीचा समुदाय गुंतवणूक निधी देण्यात आला आहे.

आतापर्यत बॅकामार्फ़त राज्यातील ४.७५ लाख स्वयं सहाय्यता गटांना रु. १९ हजार ७७१ कोटीचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामध्ये २०२२-२३ या एकाच वर्षात २ लाख ३८ हजार ३६८ स्वयं सहाय्यता गटांना तब्बल रु. ५ हजार ८६० कोटीचे बँक कर्ज देण्यात आले आहे.

अभियानाअंतर्गत ९६% बँक कर्जाची परतफेड वेळेवर होत असून सध्यस्थितीत NPA चे प्रमाण फ़क्त ४.३१% आहे त्यामुळे स्वयं सहाय्यता समूहांना कर्ज देण्यामध्ये बँका पुढे येत असून या गटातील महिलांना पतपुरवठा करण्यासाठी बॅका मोठ्या प्रमाणात सहकार्य करीत आहेत.

भाजप आमदार राहुल कुल यांना क्लिन चीट,कोणताही घोटाळा,गैरव्यवहार नाही

मुंबई-भाजप आमदार राहुल कुल यांना राज्य सरकारने दिली क्लिन चीट दिली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या प्रकरणी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखील तक्रार देखील केली होती.पुणे जिल्ह्यातील दौंड येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यांतील भ्रष्टाचाराबाबत सरकारने आमदार राहुल कुल यांना ही क्लिन चीट दिली आहे. साखर कारखान्यात कोणताही घोटाळा झाला नाही, असे या संदर्भात दिलेल्या उत्तरात सांगण्यात आले आहे.

2022-23 चा लेखा परीक्षण अहवाल प्राप्त झाला नसला तरी 2021-22 चा लेखा परीक्षण अहवालात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे राज्य सरकारने लेखी उत्तरात म्हटले आहे. विधान परिषदेतील तारांकित प्रश्नोत्तरात राज्य सरकारने हे उत्तर दिले आहे.

खासदार संजय राऊत यांचे वारंवार आरोप

या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे आमदार राहुल कुल यांच्यावर वारंवार आरोप करत आहेत. तसेच संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देखील लिहिले होते. राहुल कुल यांनी भीमा पाटस साखर कारखान्यात शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी आपल्या पत्रात केला होता.

चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक

या प्रकरणी सरकारने क्लिन चीट दिलेली असली तरी 2021-22 व्यतिरीकत इतर आर्थिक वर्षांच्या अहवालांची चौकशी करण्यासाठी सरकारने चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या अहवालात जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई करण्याचे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहे.

मणिपूर प्रकरणी आज सुनावणी होणार नाही, निर्वस्त्र महिलांचे व्हिडिओ शूट करणारा अटकेत

नवी दिल्ली-मणिपूर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर होणार होती, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते आज न्यायालयात आले नाहीत. त्यामुळे न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर प्रलंबित असलेल्या प्रकरणांची आज सुनावणी होणार नाही.मणिपूरमध्ये महिलांची नग्न परेड केल्याच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी मणिपूरबाहेर हलवण्याची विनंती गृह मंत्रालयाने न्यायालयाला केली आहे.याप्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. ज्या मोबाईलवरून या घटनेचा व्हिडीओ बनवला होता तोही जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी मोबाईल सीबीआयकडे सुपूर्द केला आहे. व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.मणिपूर प्रकरणासंदर्भात 27 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर खंडपीठाने याचिकाकर्त्याला विचारले की, हा मुद्दा न्यायालयात आधीच पाहिला जात आहे, त्यामुळे आणखी एका याचिकेची काय गरज आहे. तसेच, त्यांनी आपली याचिका सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर मांडण्यास सांगितले.याचिका दाखल करणारे वकील विशाल तिवारी यांनी खंडपीठाला सांगितले की, मणिपूर हिंसाचाराशी संबंधित प्रलंबित याचिका 28 जुलै रोजी सुनावणीसाठी सूचीबद्ध आहेत. तिवारी यांनी विनंती केली की संबंधित प्रकरणासह त्यांची याचिका शुक्रवारी सुनावणीसाठी सूचीबद्ध केली जाईल.

मणिपूर हिंसाचाराचे कारण काय आहे जाणून घ्या…

मणिपूरची लोकसंख्या सुमारे 38 लाख आहे. येथे तीन प्रमुख समुदाय आहेत – मेईतेई, नागा आणि कुकी. मेईतेई बहुतेक हिंदू आहेत. नगा-कुकी ख्रिश्चन धर्माचे पालन करतात. एसटी प्रवर्गातील आहे. त्यांची लोकसंख्या सुमारे 50% आहे. राज्याच्या सुमारे 10% क्षेत्रफळ असलेल्या इंफाळ खोऱ्यात मेईतेई समुदायाचे वर्चस्व आहे. नागा-कुकीची लोकसंख्या सुमारे 34 टक्के आहे. हे लोक राज्याच्या सुमारे 90% भागात राहतात.

कसा सुरू झाला वाद : मेईतेई समुदायाकडून जमातीचा दर्जा देण्याची मागणी केली जात आहे. समाजाने यासाठी मणिपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 1949 मध्ये मणिपूर भारतात विलीन झाल्याचे या समुदायाचे म्हणणे होते. त्यापूर्वी त्यांना जमातीचा दर्जा मिळाला होता. यानंतर हायकोर्टाने राज्य सरकारला मेईतेईंचा अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) समावेश करण्याची शिफारस केली.

मेईतेईंचे तर्क काय आहे: मेईतेई आदिवासींचा असा विश्वास आहे की काही वर्षांपूर्वी त्यांच्या राजांनी कुकींना म्यानमारमधून युद्धासाठी बोलावले होते. त्यानंतर ते कायमचे रहिवासी झाले. या लोकांनी रोजगारासाठी जंगल तोडून अफूची शेती सुरू केली. यामुळे मणिपूर हे अमली पदार्थांच्या तस्करीचा त्रिकोण बनले आहे. हे सर्व उघडपणे होत आहे. नागा लोकांशी लढण्यासाठी त्यांनी शस्त्रास्त्र गट तयार केला.

नागा-कुकी का विरोधात आहेत: इतर दोन जमाती मेईतेई समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात आहेत. त्यांचे म्हणणे आहे की राज्याच्या 60 पैकी विधानसभेच्या 40 जागा या आधीच मेईतेईंचे वर्चस्व असलेल्या इंफाळ खोऱ्यात आहेत. अशा स्थितीत एसटी प्रवर्गात त्यांना आरक्षण मिळाल्याने त्यांच्या हक्काचे विभाजन होणार आहे.

काय आहेत राजकीय समीकरणे: मणिपूरच्या 60 आमदारांपैकी 40 आमदार मेईतेई आणि 20 आमदार नागा-कुकी जमातीचे आहेत. आतापर्यंत 12 पैकी फक्त दोनच मुख्यमंत्री जमातीतील आहेत.

राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्डसाठी नोंदणी करावी – सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई, दि. 27 : आयुष्मान भारत डिजिटल मिशन (आभा) चा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते) हा उपक्रम सुरु केला आहे. राज्यातील सर्व नागरिकांसाठी हे हेल्थ कार्ड आवश्यक आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या आभा कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

रुग्णांची सर्व माहिती एकाच ठिकाणी आणि ती ही डिजिटल स्वरूपात मिळावी, म्हणून आभा कार्ड सुरू करण्यात आले आहे. सामान्यतः रुग्ण आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये कागदी फाईल दिली जाते. दरवेळी तपासणीसाठी रुग्णांना फाईल सोबत बाळगावी लागते. त्याचप्रमाणे डॉक्टरांनासुद्धा मागील सर्व रिपोर्ट्स तपासून पहावे लागतात. या सर्व बाबीचा विचार करता शासनाकडून आता नागरिकांना आभा आरोग्य कार्ड दिले जाणार आहे. आभा आरोग्य कार्ड म्हणजेच आयुष्मान भारत आरोग्य खाते होय. आभा कार्ड नावाने डिजिटल स्वरूपातील हेल्थ आयडी मिळणार असून, या कार्डवर तुमचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या, केलेले उपचार इत्यादी माहिती साठविली जाणार आहे. ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात आभा कार्डवर साठविली जाणार असल्यामुळे नागरिकांना तसेच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांना रुग्णांची पार्श्वभूमी म्हणजेच मागील आजार, निदान, उपचार आदींची माहिती  जलद आणि सोयीस्करपणे समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे.

आभा हेल्थ कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड बनविले जाणार आहे. या हेल्थ कार्डचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी नोंदणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

आभा कार्डसाठी आधार कार्ड आणि आधार संलग्न असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. आभा कार्ड मुळे उपचार  करण्यासाठी प्रत्येक जागी रिपोर्ट आणि कागदपत्र घेऊन जाण्याची गरज नाही. आभा कार्डमध्ये तुमचा ब्लड ग्रुप, आजार, मेडिकल इत्यादीबदलची संपूर्ण माहिती असेल. ऑनलाईन उपचार, टेलिमेडिसिन, ई- फार्मसी, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड इत्यादी सुविधा यामध्ये नागरिकांना मिळतील. आपला मेडिकल रिपोर्ट किंवा रेकॉर्ड सहजरित्या तुम्ही हॉस्पिटल, मेडिकल, इन्शुरन्स यांना शेअर करू शकाल, असे अनेक फायदे आभा कार्डचे आहे.

असे काढाल आभा आरोग्य कार्ड

तुम्ही भारतात कुठेही राहत असाल, तरी ही तुमच्या मोबाईल द्वारे ऑनलाईन पध्दतीने हेल्थ कार्ड काढू शकता. कार्ड बनविण्यासाठी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या अधिकृत संकेतस्थळ healthid.ndhm.gov.in  वर जावे लागेल. नंतर होम पेज वर ‘Create ABHA Number’ असे बटन असेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुढच्या पेजवर तुमच्या समोर आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (ABHA) तयार करण्यासाठी दोन पर्याय दिसतील. म्हणजेच तुम्ही तुमच्या 1) आधार कार्ड, 2) ड्रायव्हिंग लायसन्सचा वापर करून तुमचे हेल्थ कार्ड तयार करू शकता.

जर तुमच्या आधार कार्डला मोबाइल क्रमांक लिंक नसेल, तर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स पर्याय निवडा. कारण पुढे जेव्हा तुम्ही आधार कार्ड क्रमांक टाकणार आहात तेव्हा तुम्हाला आधार लिंक मोबाइल क्रमांकावर  ओटीपी येईल.

पुढील पेजवर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर आणि ‘I Agree’ वर क्लिक करून ‘i am not robot’ वर क्लिक करायचे आहे व कॅप्चा व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर ‘Submit’ या बटनवर क्लिक करायचे आहे. नंतर आधार लिंक मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. तो बॉक्स मध्ये टाकून ‘Next’ बटनवर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला ‘Aadhaar Authentication Successful’ असा मेसेज दिसेल, आणि आधारमध्ये फिड असलेली तुमची वैयक्तिक माहिती खाली दिसेल. ती एकदा तपासून नंतर तुम्हाला Next बटनवर क्लिक करायचे आहे. आता आपला मोबाइल क्रमांक टाकायचा आहे, जो ‘ABHA’ कार्डला लिंक होईल व पुढे जाऊन तो लॉगिन करताना कामी येईल. पुढच्या पेज वर तुमचा ‘ABHA’ क्रमांक तयार झाल्याचा मेसेज दिसेल. हा क्रमांक ऑटोमॅटिक तयार होतो, जसा आधार क्रमांक असतो तसा. हा 14 अंकी क्रमांक लक्षात ठेवणे कठीण जाते. त्यामुळे ‘आभा’ने आभा ऍड्रेस ही सुविधा चालू केली आहे. यामध्ये आपण आपले आवडते नाव ऍड्रेस म्हणून वापरू शकतो जसे, name1234@abdm त्यासाठी तुम्ही आधी ‘Link ABHA Address’ बटनवर क्लिक करा. नंतर ‘No’ वर टिक करून ‘Sign Up for ABHA Address’ बटनवर क्लिक करायचे आहे.

आता आपल्याला आवडते नाव ABHA ऍड्रेस म्हणून तयार करायचे आहे, त्यासाठी खाली बॉक्स मध्ये ते टाईप करून Create And Link बटन वर क्लिक करायचे आहे. नंतर तुमच्यासमोर ABHA क्रमांक, ABHA ऍड्रेसला यशस्वीपणे लिंक झाल्याचा मेसेज दिसेल. नंतर Go Back to your ABHA… बटनवर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर लॉगिन करण्यासाठी तुम्हाला, ABHA क्रमांक किंवा तुमचा मोबाइल क्रमांक आणि जन्म वर्ष टाकून Continue बटन वर क्लिक करायचे आहे. पुढे OTP साठी कोणत्या मोबाइल क्रमांकावर OTP पाठवावा ते विचारले जाईल  आधार लिंक मोबाइल नंबर किंवा ABHA नंबर लिंक मोबाइल क्रमांक. योग्य तो पर्याय निवडून Continue बटन वर क्लिक करायचे आहे. पुढच्या पेज वर तुमचे ABHA क्रमांक कार्ड/हेल्थ कार्ड तयार होऊन येईल. तुम्ही ते Download ABHA number Card बटन वर क्लिक करून डाउनलोड करू शकता.

जर कार्डमध्ये काही माहिती चुकलेली असेल, तर वरती My Account मेनू वर क्लिक करून Edit Details ऑप्शनवर क्लिक करा. उघडलेल्या पेजवर तुम्ही तुमची नवीन माहिती टाकून Submit बटन वर क्लिक करा. तसेच तुम्ही Set Password ऑपशन वर क्लिक करून आभा अकाउंटचा पासवर्ड सेट करू शकता.

या डिजिटल आभा आरोग्य कार्डचा लाभ घेण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी आपले ‘आभा’ कार्ड बनवून घ्यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

डिजिटल इंडियाचे सक्षमीकरण : आधारची नवीन आणि सुधारित वैशिष्ट्ये

मुंबई, 27 जुलै 2023

भारताची वैशिष्ठ्यपूर्ण  बायोमेट्रिक ओळख प्रणाली ‘आधार’, नवीन वैशिष्ठ्यांसह  अद्ययावत करण्यात आली असल्याचे,भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरण (युआयडीएआय) ने म्हटले आहे. या सुधारणांची संरचना नागरिकांना अधिक सक्षम करण्यासाठी, सेवांमध्ये अखंड प्रवेश सुलभ करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने डिजिटल इंडियाच्या दिशेने देशाच्या प्रवासाला बळकटी देण्यासाठी करण्यात आली आहे. ही वैशिष्ठ्ये  माहितीची गोपनीयता आणि सुरक्षिततेला प्राधान्याने विचारात घेऊन, सर्व लागू नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, विकसित करण्यात आली आहेत असेही भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने सांगितले आहे.

आम्ही ओळख प्रमाणीकृत करणे, सरकारी लाभ मिळवणे आणि विविध सेवांशी संलग्न कसे आहोत हे परिवर्तन घडवण्यात आधारने आधीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या नवीन वैशिष्ठयांच्या समावेशासह, आधार व्यक्तींच्या डिजिटल परिसंस्था हाताळण्याच्या  पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे.

मुख्य वैशिष्ठ्ये  आणि फायदे:

  • बायोमेट्रिक लॉकिंग/अनलॉकिंग: बायोमेट्रिक लॉकिंग/अनलॉकिंग वैशिष्ट्याचा फायदा घेऊन वापरकर्ते आता त्यांच्या बायोमेट्रिक माहितीवर अधिक नियंत्रण ठेवू शकतात. हे नागरिकांना त्यांचा बायोमेट्रिक डेटा लॉक करण्यास, अनधिकृत प्रवेशास प्रतिबंध करण्यास आणि डेटाची गोपनीयता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यास सक्षम करते.
  • ऑफलाइन आधार पडताळणी: पडताळणी प्रक्रियेदरम्यान लागणारी निरंतर इंटरनेट कनेक्टिव्हिटीची आवश्यकता टाळून, आधार कार्डधारक आता ऑफलाइन आधार पडताळणी पद्धत वापरू शकतात. हे वैशिष्ट्य मर्यादित इंटरनेट सुलभता  असलेल्या भागातही रिअल-टाइम प्रमाणीकरण सुनिश्चित करते.
  • व्हर्च्युअल आधार आयडी (व्हीआयडी): व्हीआयडीचा वापर वापरकर्त्यांना प्रमाणीकरणाच्या उद्देशाने त्यांचा वास्तविक आधार क्रमांक सामायिक करण्याऐवजी तात्पुरते 16-अंकी व्हीआयडी क्रमांक तयार करण्याची परवानगी देऊन गोपनीयता वाढवतो. व्हीआयडी विविध सेवांसाठी वापरला जाऊ शकतो, ज्यामुळे ओळख उघड होऊन त्याचा गैरवापर होण्याची  जोखीम कमी होते.
  • वेळ-आधारित वन-टाइम पासवर्ड (TOTP): आधार वापरकर्ते आता mAadhar मोबाइल अॅपद्वारे वेळ-आधारित ओटीपी (TOTP) व्युत्पन्न करू शकतात, जे  प्रमाणीकरणादरम्यान सुरक्षिततेचा अतिरिक्त स्तर प्रदान करते.
  • चेहरा प्रमाणीकरण: अधिक समावेशी प्रमाणीकरण यंत्रणा प्रदान करण्यासाठी, चेहरा प्रमाणीकरण हे आधार प्लॅटफॉर्ममध्ये अंतर्भूत केले गेले आहे. फिंगरप्रिंट-संबंधित आव्हाने असलेल्यांसाठी सोयी आणि प्रवेशयोग्यता जोडून, वापरकर्ते आता त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या चेहऱ्याचे बायोमेट्रिक्स वापरू शकतात.
  • आधार QR कोड: नवीन आधार QR कोड वापरकर्त्यांना त्यांचे आधार तपशील सुरक्षितपणे आणि सोयीस्करपणे सामायिक करण्यास अनुमती देतो, विविध सेवांसाठी त्वरित ओळख पडताळणी सक्षम करतो. 
  • आधार प्रमाणीकरण इतिहास: हे वैशिष्ठ्य  वापरकर्त्यांना त्यांच्या आधार प्रमाणीकरण इतिहासाचा मागोवा घेण्यास आणि त्यांचे परीक्षण करण्यास अनुमती देते, त्यांची आधार माहिती केव्हा आणि कुठे वापरली जाते याबाबत  पारदर्शकता आणि नियंत्रण प्रदान करते.

ही नवीन वैशिष्ठ्ये  जाणून घेण्यासाठी आणि सुधारित आधार परिसंस्थेचा अनुभव घेण्यासाठी, अधिकृत आधार संकेतस्थळाला भेट द्या किंवा तुमच्या भ्रमणध्वनीवर तुमचे mAadhar अॅप अद्ययावत करा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोटमध्ये नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन

1405 कोटी रुपये खर्च करून 2534 एकर जमिनीवर नवीन टर्मिनल इमारत आणि हवाई पायाभूत सुविधांचा विकास

नवी दिल्‍ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र रजनीकांत पटेल, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत राजकोट येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले.

नवीन टर्मिनल इमारत आणि हवाई पायाभूत सुविधा एकूण 2534 एकर क्षेत्रफळात 1405 कोटी रुपये खर्चून विकसित केल्या आहेत.

आपल्या भाषणात ज्योतिरादित्य एम सिंधिया म्हणाले की या विमानतळाची संकल्पना आपल्या पंतप्रधानांनी सुमारे सात वर्षांपूर्वी मांडली होती. ही ऐतिहासिक भेट राजकोटच्या जनतेला समर्पित करण्यासाठी आज ते येथे उपस्थित आहेत.

सन 2014 मध्ये राजकोटहून दर आठवड्याला फक्त 56 विमानांचे उड्डाण होत होते, जे आता दुपटीहून अधिक झाले असून  दर आठवड्याला 130 विमानांचे उड्डाण होते असेही सिंधिया म्हणाले. 

स्वयंपाकाच्या गॅसवर अनुदान

नवी दिल्‍ली-घरगुती गॅसच्या ग्राहकांना लागू होणाऱ्या दरामध्ये सरकार बदल करत असते. थेट लाभ हस्तांतरण योजने अंतर्गत लागू असलेले अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. त्याशिवाय 21 मे 2022 पासून अतिजास्त गरीब कुटुंबांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत(पीएमयूवाय) 2022-23 आणि 2023-24 या वर्षांसाठी 14.2 किलो वजनाच्या सिलेंडरसाठी  एका वर्षात 12 रिफिल सिलेंडर पर्यंत प्रतिसिलेंडर 200 रुपयांचे अनुदान सरकार देत आहे.

वर्ष 2020-21 ते 2022-23 या कालवधीत सरासरी सौदी सीपी(एलपीजी दरांसाठी आंतरराष्ट्रीय मानक) प्रति मेट्रिक टन 415 डॉलरवरून प्रति मेट्रिक टन 712 डॉलरवर गेला होता. मात्र, आंतरराष्ट्रीय दरांमधील वाढीचा प्रभाव भारतीय नागरिकांवर पूर्णपणे पडू देण्यात आला नाही ज्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना घरगुती एलपीजीच्या विक्रीवर रिकव्हरी अंतर्गत सुमारे 28,000 कोटी रुपयांचा भार सहन करावा लागला. याची भरपाई  देण्यासाठी सरकारने 2022-23 या वर्षासाठी तेल कंपन्याना 22,000 कोटी रुपयांचा एका वेळचा भरपाईनिधी मंजूर केला. कोविड महामारीच्या काळात सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत 2020 मध्ये पीएमयूवाय कुटुंबांना 14.17 कोटी मोफत एलपीजी रिफिल पुरवले.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री रामेश्वर तेली यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.