Home Blog Page 1386

‘आष्टी’ च्या सहायक पोलिस निरीक्षकांच्या चौकशीसाठी विशेष अधिकारी -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ३ : आष्टी पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

कोकाटे हादगाव ता.परतूर, जि. जालना जिल्ह्यातील शेतीच्या वादातून गावातील दोन समुदायांमध्ये वाद झाला. काही लोकांच्या घरावर हल्ला करण्यात आल्याने जखमी झाल्याची तक्रार देण्यासाठी तक्रारदार आष्टी पोलिस चौकीला गेले असता त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आष्टी चे पोलीस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी जात, धर्म या पलीकडे जावून काम करावे. या प्रकरणात मारहाणीची ध्वनिचित्रफितीची 15 दिवसांत पडताळणी केली जाईल. जालना पोलिस ठाण्याकडून हे प्रकरण काढून सीआयडीकडे देण्यात येईल. त्यासाठी विशेष तपास अधिकारी नेमण्यात येईल. तसेच ध्वनिचित्रफितीची पडताळणी झाल्यानंतर त्यामध्ये संबधित दोषी आढळले, तर अधिक कडक कारवाई करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.

दहेली धरणाचे काम जलदगतीने पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील दहेली धरणाचे काम जलदगतीने व्हावे, यासाठी प्राधान्य देण्यात येईल. या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अक्कलकुवा  तालुक्यातील दहेली धरणाचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याबद्दल विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या धरणाची घळभरणी मे २०२२ अखेर पूर्ण करण्यात आल्याने प्रकल्पात १०० टक्के जलसाठा निर्माण झालेला आहे. प्रकल्पावर सिंचन क्षमता ३ हजार १६५ हेक्टर प्रस्तावित असून त्याकरिता बंदिस्त नलिकांद्वारे वितरण प्रणाली नियोजित आहे. या प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

इरई नदी स्वच्छतेसाठी त्वरित पावले उचलणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर शहरातून वाहणाऱ्या इरई नदीच्या स्वच्छतेसाठी नदीतील गाळ व झुडपे पावसाळ्यापूर्वी काढण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील इरई नदीचे पुनरूज्जीवन आणि खोलीकरणाबाबत सदस्य अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यापूर्वी २०१६ ते २०१८ मध्ये शहरास समांतर वाहणाऱ्या इरई नदीतील ७ किमी अंतरामध्ये ६०० स.घ.मी. गाळ व झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली आहे. अधिकचा गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी गतीने करण्यात येईल. तसेच, यापूर्वी झालेल्या कामांमध्ये अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. वेस्टन कोलफिल्ड लिमिटेड च्या माध्यमातून निधी वापरण्यात येईल. कामाचा दर्जा व गुणवत्ता तपासणी केल्यानंतरच देयके अदा करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुधाकर आडबाले, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केले.

गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत संपूर्ण कालव्याची कामे २०२४ पर्यंत

पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोसीखुर्द प्रकल्पात पाणीसाठा निर्माण झाल्यामुळे आवश्यक निधीची तरतूद करुन कालबद्ध पद्धतीने कालवे व वितरण प्रणालीची कामे २०२४ पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी कालव्याच्या कामांसंदर्भात सदस्य रामदास आंबटकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, घोडाझरी कालव्यांसंदर्भात नलिका वितरण प्रणालीचा (पीडीएन) तसेच ठिबक सिंचनाचा वापर करण्यात येईल. यापूर्वीच्या सर्व निविदा रद्द करण्यात आल्या असून फेरनिविदा काढण्यात येणार आहे. तसेच कोरोनामुळे काम बंद होते. भूसंपादन, मोबदला यांसह अन्य कारणाने विलंब झाला होता. तथापि यापुढे गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत कालवे व वितरण प्रणालीची कामे पुरेसा निधी देवून प्राधान्याने हाताळण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

खून करून रस्त्यावर टाकला बालिकेचा मृतदेह;पुण्यातला संतापजनक प्रकार

पुणे- गुन्हेगारी जगताने आता गंभीर रूप धरण केलेले असून अवघ्या अडीच ते तीन वर्षाच्या मुलीचा खून करून टाकलेला मृतदेह खडकीत आढळून आला आहे. या मुलीची ओळख अजून पटली नसल्याने पोलीस हैराण झाले आहेत . काल हा मृतदेह खडकी रेल्वे स्टेशन ते खडकी बाजार रस्त्याच्या दक्षिण बाजूस सी ए एफ व्ही डी ग्राउंड च्या उत्तरेस चिकूच्या झाडाखाली मिळून आला . गळा दाबून या बालिकेची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. अण्णा गुंजाळ नावाच्या फौजदार यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील याप्रकरणी अधिक तपास करत आहेत .

आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार

– सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत

मुंबई-राज्यातील आरोग्य सेवा – सुविधांच्या बळकटीकरणासाठी विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. तसेच आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक हजेरी प्रणालीसाठी मुंबई, पुणे येथे मध्यवर्ती बायोमेट्रिक हजेरी पडताळणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानसभेत सांगितले.

 पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आरोग्य सेवा सुधारण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत विधानसभा सदस्य सर्वश्री सुभाष थोपटे, राजेश टोपे, अनिल देशमुख, रवी राणा यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.

आरोग्य मंत्री श्री. सावंत म्हणाले, हृदयविकाराने झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा रुग्णांना गोल्डन अवरमध्ये आरोग्य सेवा – सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी ‘स्टेमी’ प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही श्री. सावंत यांनी यावेळी सांगितले.

अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढीचा निर्णय

– महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. 3 : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्के तर मदतनीस यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत सांगितले.

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री कुणाल पाटील, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, अतुल भातखळकर, आदिती तटकरे यांनी उपस्थित केला होता.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, अंगणवाड्यांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच नवीन मोबाईल खरेदीही करण्यात येत आहे. या मोबाईल ॲप मध्ये ‘ट्रॅक ॲप’ आहे त्यामध्ये माहिती अद्ययावत करत असताना नाव इंग्रजीत भरले असले, तरीही उर्वरित सर्व माहिती मराठीमध्ये भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.

पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षकांना एका वर्षात 20 दिवस नैमित्तिक रजा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य पोलिस दलातील पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक या पदावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना एका कॅलेंडर वर्षात देय असलेल्या १२ दिवसांच्या नैमित्तिक रजांऐवजी जास्तीत जास्त २० (वीस) दिवस नैमित्तिक रजा विशेष बाब म्हणून अनुज्ञेय करण्यात आली आहे. याबाबत  ३ ऑक्टोबर २०२२ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

पोटनिवडणुकीत हरतो अन् अख्खे राज्य जिंकतो:मुख्यमंत्र्यांची विधानसभेत फटकेबाजी; ठाकरेंना टोले, पवारांना चिमटे!

दादा,तुम्ही गाडी बदलून कुठे – कुठे गेलात? हे सगळे माहिती आहे. रात्री तीन वाजता आमच्याकडे फोटो आला होता

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जोरदार फटकेबाजी केली. अजित पवारांंच्या आक्षेपांवर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे विरोधकांना कोपरखळ्या मारल्या आहेत. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना पहाटेच्या शपथविधीवरुन डिवचलं आहे.मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसाठी देशद्रोही असा शब्द वापरल्यावरुन मोठा गदारोळ माजला होता. त्यांच्याविरोधात हक्कभंगही आणला होता. त्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “देशद्रोहाची मी सुरुवात केली नव्हती. पण अजित पवार मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही. ज्यांनी मुंबईत बॉम्ब स्फोट केला, त्यांच्यासोबत नवाब मलिकांनी व्यवहार केला. त्या नवाब मलिकांना तुम्ही मंत्रिमंडळात ठेवलं. आणि तुम्ही आम्हाला म्हणाला महाराष्ट्र द्रोही. तुम्ही म्हणता की हे घटनाबाह्य सरकार आहे, मग तुम्ही देखील घटनाबाह्य विरोधीपक्षनेता आहात का?शिंदे- फडणवीस सरकारने जाहिरातींवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवार सध्या शिवसेनेचे प्रवक्ते असल्यासारखे बोलतात. दादा आपली मैत्री आहे पण तुम्ही कडवट शिवसैनिक बनू नका. दादा अडीच वर्षे वर्षावर कुणी जात नव्हते. फेसबुक लाईव्हवर सर्व सुरू होतं. 6 कोटी पर्सनल पीआर करायला खर्च केल्यात. आम्ही सकाळ आणि सामनासकट सर्वांना जाहिराती दिल्यात. घटनाबाह्य सरकार आहे पण जाहिराती चालतात. 70 हजार कोटी इरिगेशनवर खर्च केले पण एकही सिचन झाले नाही. तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, जबाबदार आहात. लोकशाहीत आम्ही कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही.आमचं सरकार सकारात्मक निर्णय घेतयं. समृद्धा रोजगाराला मोठी चालना मिळीली. सरकारनं अनेक कामांना चालना दिली आहे. १२ हजार कोटींची शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे. नियमात बदल करुन शेतकऱ्यांन दुप्पट मदत करण्यात आली आहे. नाफेडकडून कांदयाची खरेदी सुरु आहे. कांदा उत्पादकांच्या पाठीशी आमचं सरकार उभं आहे.ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सुरु केला. मविआ सरकारच्या काळात मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिली. पण आम्ही हा लढा ताकदीनिशी लढतोय.

गेल्या सरकारमध्ये दावोसमधून १० हजार कोटींचीही गुंतवणुक नाही. दावोसमध्ये ३०-३५ कोटींचा खर्च झाला. करार झालेल्या कंपन्यांना जागा देण्यास सुरुवात केली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात दिली. करारामुळे १ लाखाहून अधिक रोजगार निर्मिती.सत्तेतून पायउतार झाल्यावर विरोधकांच्या डोळ्यासमोर अंधारी आली आहे. त्यामुळे त्यांना सरकारची काम दिसत नाहीत. विरोधकांनी फक्त राजकीय भाष्य केलं.सहकार क्षेत्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मदत करतायत.

गाडी बदलून कुठे गेलात?

एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मोकळ्या-ढाकळ्या शैलीत जोरदार भाषण ठोकले. ते म्हणाले, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. सीएम रोडशो करतात, असे अजित पवार म्हणाले. मात्र, शरद पवारांनी सभा घेतल्या. ग्रुपला बोलावले. तुम्ही गाडी बदलून कुठे – कुठे गेलात? हे सगळे माहिती आहे. रात्री तीन वाजता आमच्याकडे फोटो आला होता.

तिन्ही राज्य गेले

एकनाथ शिंदे म्हणाले, मोदींनी रोड शो केला आणि राज्य जिंकले. राहुल गांधींनी रोड शो केला आणि तिन्ही राज्य गेले. आठवले यांच्या पक्षाचे दोन आमदार आले. तुमचे मात्र, बेगाने शादी में अब्दुला दिवाना सुरू आहे. कसबा येथे चुका झाल्या आहेत. त्या आम्ही येणाऱ्या काळात दुरुस्त करू. आमच्या कामाने मते जिंकू. मात्र, येणाऱ्या काळात निवडणुकात आहेत. तुम्ही तिघे आहात. एकाची पार्टी उभी राहिली, तर दुसरा भजन करत बसेल का?

कामांची यादीच वाचली

एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या सरकारमध्ये दावोसमधून दहा हजार कोटींचीही गुंतवणूक नाही. मात्र, या वर्षी दावोसमध्ये महाराष्ट्राचा उदो उदो सुरू होता. सरकारने अनेक कामांना चालना दिली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत. कांद्याची नाफेडच्या माध्यमातून खरेदी सुरू झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सुरू केला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या जनतेला फायदा होतो आहे. मेट्रोच्या दोन प्रकल्पांचा शुभारंभ केला. शेतकऱ्यांना मदत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.

बालविवाह रोखण्यासाठी समाजाने आपली मानसिकता बदलणे गरजेचे – रुपाली चाकणकर

जालना,: बालविवाह रोखण्यासाठी कठोर कायदे तयार करण्यात आले आहेत. मात्र तरीही बालविवाह होत आहेत. ही शोकांतिका आहे. समाजाने यासाठी जागरुक होणे आवश्यक असून मुलींचे उज्ज्वल भविष्य आणि निरोगी आरोग्याकरीता समाजाने आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. विशेषत: पालकांनीच बालविवाहासाठी पुढाकार घेऊ नये, असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमातंर्गत

जनसुनावणी घेण्यात आली.  त्यावेळी त्या बोलत होत्या. मंचावर महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारीअंकुश पिनाटे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर.एन. चिमिंद्रे आदींसह विविध विभागांचे अधिकारी,संरक्षण अधिकारी, पॅनलचे सदस्य, तक्रारदार महिला व नातेवाईक उपस्थित होते. श्रीमती चाकणकर म्हणाल्या की, शहरी व ग्रामीण तसेच दुर्गम भागातील महिलांना मुंबई येथील महिला आयोगाच्या कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नसल्यामुळे “महिला आयोग आपल्या दारी” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत वीसपेक्षा जास्त जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. जागेवर महिलांच्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येतो. महिलांच्या अनेक तक्रारी असतात. कुटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार, बालविवाह, हुंड्यासाठी छळ अशा अनेक समस्या सुनावणीतून समोर येत आहेत. आई-वडील, पालकांनी वयाच्या  १८ वर्षापूर्वी मुलीचे लग्न करु नये, कारण ती शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम झालेली नसते. तिच्या लग्नासाठी हुंडाही दिला जातो.  हुंडा देणे कायद्याने गुन्हा आहे. हुंड्याचा हाच पैसा मुलीच्या शिक्षणासाठी उपयोगात आणल्यास मुलगी खऱ्या अर्थाने स्वावलंबी होईल. तसेच मुलींवर अत्याचारही होणार नाहीत. बालविवाह होऊ नये यासाठी समाजाने मानसिकता बदलणे खूप गरजेचे आहे. महिला आयोग तुमच्यासाठीच आहे. पिडीतांना न्याय देण्याची आयोगाची भूमिका आहे. यासाठीच “महिला आयोग आपल्या दारी” हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

जिल्हा अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी मुली व महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनीही मनोगत व्यक्त केले. यानंतर श्रीमती चाकणकर यांच्या उपस्थितीत जनसुनावणी घेण्यात आली. आयोगाच्या सदस्यांचा समावेश असलेल्या तीन पॅनलने उपस्थित महिलांच्या समस्या व त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. पॅनलमध्ये संरक्षण अधिकारी, वकील व समुपदेशन अधिकारीही होते. एकूण १२६ तक्रारी जनसुनावणीत प्राप्त झाल्या.

सर्व आस्थापनांमध्ये अंतर्गत निवारण तक्रार समिती असणे आवश्यक

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागप्रमुखांची आढावा बैठक पार पडली. बैठकीत त्यांनी कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत निवारण तक्रार समिती असणे आवश्यक आहे. सर्व आस्थापनांची तपासणी करण्यात येऊन प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारची समिती स्थापन झालेली आहे का याची खात्री करण्यात यावी.  महिलांनी केलेल्या तक्रारींवर या समितीमार्फत तातडीने कार्यवाही होईल, यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. अवैध गर्भपात रोखण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. खाजगी रुग्णालयांना अचानक भेट देऊन तपासणी करावी. येत्या पंधरा दिवसांत केलेल्या कार्यवाईचा अहवाल आयोगास सादर करण्यात यावा. बालविवाहाच्या तक्रारी, ऊसतोड कामगार महिलांची प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी. यावेळी मिशन वात्सल्य योजना,

मनोधैर्य योजना, माझी कन्या भाग्यश्री, गृह स्वाधार योजना, शुभमंगल सामुहिक/नोंदणीकृत योजना, विशाखा समिती, महिलांसाठी शासकीय वसतीगृहे यासह जिल्हा कामगार अधिकारी, पोलीस विभाग, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, महिला आर्थिक विकास महामंडळ, कौशल्य विकास, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाशी संबंधित महिलांच्या योजना व उपक्रमांचा सविस्तर आढावाही श्रीमती चाकणकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतला.

बैठकीस सदस्या संगीता चव्हाण, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अपर पोलीस अधीक्षक राहूल खाडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती पी. पी. बारस्कर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर.एन. चिमिंद्रे, जिल्हा महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक  ॲड. पी. जे. गवारे, ॲड. अश्वीनी धन्नावत आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

कर्नाटकातील सत्ताधारी भाजपा आमदार पुत्राला ४० लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक; घरात सापडलं ६ कोटींचं घबाड!

प्रशांतचे वडील म्हणाले – माझा कोणत्याही टेंडरमध्ये सहभाग नाही

कर्नाटकात भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांचा मुलगा प्रशांत कुमार यांना 40 लाख रुपयांची लाच घेताना गुरुवारी अटक करण्यात आली. वडिलांच्या बंगळुरू येथील कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेड (KSDL) कार्यालयातून ही अटक करण्यात आली. कर्नाटक लोकायुक्तांनी त्यांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे. यानंतर लोकायुक्त अधिकारी प्रशांत यांच्या घरी पोहोचले. येथे त्यांना 6 कोटी रोख मिळाले. मोजणी झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी नोटांचे बंडल बेडवर ठेवले होते.

भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांनी KSDL च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुलाने ज्या टेंडरमध्ये लाच घेतली त्यात माझा सहभाग नसल्याचे त्यांनी सांगितले. विरुपक्षप्पा यांच्या राजीनाम्यापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले होते की, लोकायुक्त पुन्हा आणण्याचे उद्दिष्ट राज्यातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करणे आहे.

प्रशांतचे वडील मदल विरुपक्षप्पा हे कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरीचे आमदार आहेत. ते म्हणाले- मला याबाबत कोणतीही माहिती नाही. याची माहिती मला प्रसारमाध्यमांद्वारे मिळाली. माझा मुलगा आता लोकायुक्तांच्या ताब्यात असल्याने मी याबाबत त्यांच्याशी बोललो नाही. माझा कोणत्याही टेंडरमध्ये सहभाग नाही.

प्रशांत हे बंगळुरू पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण ​​मंडळ (BWSSB) चे मुख्य लेखा अधिकारी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून रोखीने भरलेल्या तीन बॅगा जप्त करण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी लोकायुक्तांनी भाजप आमदारालाही आरोपी केले आहे. मात्र, भाजपचे आमदार विरुपक्षप्पा यांनी कोणत्याही टेंडरमध्ये सहभाग असल्याचा इन्कार केला आहे.

प्रशांत यांनी 80 लाख रुपयांची लाच मागितली
लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत हे कर्नाटक प्रशासकीय सेवेतील 2008 च्या बॅचचे अधिकारी आहेत. साबण आणि इतर डिटर्जंट बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करण्यासाठी त्यांनी एका कंत्राटदाराकडून 80 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर ठेकेदाराने लोकायुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर प्रशांत यांना रंगेहात पकडण्याची योजना आखण्यात आली.

ही रक्कम KSDL चे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांच्याकडून घेण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लाच घेणारे आरोपी पिता-पुत्र आहेत.

भारतात लोकशाही संकटात:राहुल गांधी केंब्रिजमध्ये म्हणाले – तुमचा फोन रेकॉर्ड होत असल्याने सावधपणे बोला असे अधिकारी सांगायचे

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले – ‘राहुल परदेशात भारताला बदनाम करत आहेत.’

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ब्रिटनच्या केंब्रिज विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमात राहुल यांनी भारतातील विरोधी पक्ष व नेत्यांना येणाऱ्या अडचणींचा उल्लेख केला. यासंबंधीचा एक व्हिडिओ काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी शेअर केला आहे.राहुल यांच्या या विधानावर भाजपने हरकत नोंदवली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले – ‘राहुल परदेशात भारताला बदनाम करत आहेत.’

राहुल यांनी केंब्रिजमध्ये केली 3 मोठी विधाने

1. माझा फोन रेकॉर्ड केला जात होता
“माझ्या फोनची हेरगिरी केली जाते. विरोधकांवर गुन्हे दाखल केले जातात. भारतातील विरोधी पक्षनेता म्हणून असा दबाव मला नेहमीच सहन करावा लागतो. बहुतांश राजकीय नेत्यांच्या फोनमध्ये पेगासस आहे. माझ्या फोनमध्येही पेगासस होते. मला गुप्तहेर अधिकाऱ्यांनी बोलावून सांगितले होते की, तुम्ही फोनवर बोलताना सावधगिरी बाळगा. कारण आम्ही ते रेकॉर्ड करत आहोत. हा एक असा दबाव आहे, जो आम्हाला नेहमीच जाणवतो. “

2. भारतात मीडिया व लोकशाही संरचनेवर हल्ला

“विरोधकांवर गुन्हे दाखल केले जातात. माझ्याविरोधातही अनेक फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेत. यातील अनेक गुन्हे चुकीच्या कारणांसाठी दाखल करण्यात आलेत. देशातील मीडिया व लोकशाही व्यवस्थेवर अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर विरोधक म्हणून तुमच्यासाठी बोलणे अवघड होते. “

3. विरोधक मुद्यांवर बोलत असताना, तुरुंगात डांबले

“लोकशाहीसाठी आवश्यक असलेली संसद, स्वतंत्र प्रेस, न्यायपालिका या सर्वच संरचना विवश झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही भारतीय लोकशाहीच्या मूळ संरचनेवरील हल्ल्याचा सामना करत आहोत. भारतीय संविधानात भारताला राज्यांचा संघ म्हटले आहे. त्या संघाशी चर्चा गरजेची आहे. आता ही बातचितच संकटात सापडली आहे. हे छायाचित्र संसदेसमोरील आहे. विरोधी पक्षांचे नेते काही मुद्यांवर चर्चा करत होते. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. असे 3 ते 4 वेळा झाले. ते अत्यंत हिंसक होते. “

अनुराग ठाकूर पेगासस मुद्यावर म्हणाले – ‘हे कुठेही नाही तर राहुल यांच्या डोक्यात आहे. त्यांनी कोणत्या भीतीने आपला फोन जमा केला नाही. त्या फोनमध्ये असे काय होते. सततचे पराभव त्यांना पचत नाहीयत. राहुल परदेशात जाणून आपल्या परदेशी मित्रांच्या मदतीने भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. अखेरीस काँग्रेसचा अजेंडा काय आहे?’

राहुल गांधी यांनी यापूर्वी गतवर्षी मे महिन्यात केंब्रिज विद्यापीठात गेले होते. ते तिथे आयडियाज फॉर इंडिया या विषयावर बोलणार होते. पण त्यात त्यांनी मोदी सरकावर तिखट टीका केली होती. ते म्हणाले होते की, मोदी सरकार संसद व निवडणूक आयोगासारख्या देशाच्या घटनात्मक संस्थांना आपले काम करू देत नसल्याचा आरोप केला होता. भाजपने त्यांच्या या विधानावर हरकत नोंदवली होती. देशाच्या पंतप्रधानावर परदेशात असा आरोप का करण्यात आला, असा सवाल भाजपने या प्रकरणी केला होता.

राहुल गांधींनी फोन तपासणीसाठी का दिला नाही -ठाकूर

अनुराग ठाकूर पत्रकारांना म्हणाले – “राहुल गांधी परदेशात जाऊन वाद घालत आहेत. पेगासस त्यांच्या डोक्यात आहे. त्यांनी त्यांचा फोन तपासणीसाठी का दिला नाही हे त्यांना विचारा. पीएम मोदींच्या नेतृत्वात जगभरात भारताचा सन्मान वाढला आहे. हे मोठ-मोठे नेते म्हणत आहेत. इटलीच्या पंतप्रधान मोदींविषयी काय म्हणाल्या हे राहुल गांधींनी ऐकले पाहिजे.”

लर्निंग टू लिसन म्हणजे ऐकण्याच्या कलेवर बोलले राहुल

राहुल यांच्या 7 दिवसीय ब्रिटन दौऱ्याला मंगळवारपासून सुरुवात झाली. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातील बिझनेस स्कुलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आम्ही लोकशाही मूल्यांचा अभाव असणारे जग तयार होताना पाहू शकत नाही. त्यामुळे आम्हाला याविषयी नव्याने विचार करण्याची गरज आहे. ऐकण्याची कला खूप पॉवरफूल असते

के. जे. सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थी मारहाण प्रकरणी कारवाई करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 2 :  “के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनांच्या शिबिरासाठी गेले असता प्राध्यापकाने मारहाण केली असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची चौकशी तातडीने चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करण्यात येईल,” असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

विधानसभा सदस्य सर्वश्री छगन भुजबळ, ॲड. आशिष शेलार, धनंजय मुंडे यांनी याबाबत विधानसभेत  प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.पाटील बोलत होते.

श्री. पाटील म्हणाले की, सदर  प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाच्या तीन सदस्यांची समिती गठित करण्यात आली आहे. तसेच या प्राध्यापकावर व्यवस्थापन समितीची चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई यापूर्वीच करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून विद्यापीठाने केलेल्या कारवाईचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. 2 : पुणे जिल्ह्यातील हवेली व वेल्हे तालुक्यातील पुणे-खडकवासला, डोणजे- रोजणे रस्ता आणि डोणजे- कोंढणपूर खेड शिवापूर रस्त्यांची अपूर्ण कामे काँक्रिटीकरण करून लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ला आणि पानशेतकडे जाणाऱ्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जांच्या कामाबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानसभा सदस्य सर्वश्री भीमराव तापकीर, प्रकाश आबिटकर, योगेश सागर, सुभाष धोटे, हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत  मांडला होता.

श्री. चव्हाण म्हणाले की, पुण्यातील रस्त्यांची कामे अधिक दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी  नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. रस्त्याचे काम सुरू असताना वेळोवेळी ऑडिटसुद्धा करण्यात येईल. या कामाला अधिक गती देण्यासाठी आणि अडचणी समजून घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची लवकरच एकत्र बैठक घेऊन आवश्यक त्या सुधारणा करून कालमर्यादित काम पूर्ण करण्यात येईल.

लाईनमन : महावितरणचे ‘प्रकाशदूत’!

विजेचे बटण दाबले की साधा बल्ब प्रकाशमान होतो तशीच कारखान्यातील अजस्त्र यंत्रणा देखील सुरु होते. मात्र या विजेच्या एका बटणामागे विस्तारलेली प्रचंड मोठी वीजयंत्रणा असते. या यंत्रणेत अदृश्य असलेल्या विजेला सुरळीत ठेवण्याचे कार्य प्रत्यक्षपणे करतात ते लाईनमन. जे खऱ्या अर्थाने सुरळीत वीजपुरवठ्याचे आधारस्तंभ आहेत. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि. ४ मार्च हा दिवस ‘लाईनमन दिन’ म्हणून देशभरात साजरा करण्यात येत आहे. या लाईनमनच्या कार्यांबाबत म्हणजेच महावितरणचे जनमित्रांवर आधारित हा लेख.

वीजपुरवठा खंडित झाला की तक्रारकर्ते वीज कधी येईल याची प्रतीक्षा करतात. पण या प्रतीक्षाकाळात महावितरणचे अभियंते आणि जनमित्र यांना कोणत्या परिस्थितीत व विविध अडथळ्यांना तोंड देत रात्रीबेरात्री कशी कामे करावी लागतात याची माहिती फारशी कोणाला नसते. परंतु अभियंते आणि जनमित्र यांची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वीजसेवा देण्याची धडपड आणि अविश्रांत प्रयत्न समजून घेतले तर त्यांच्या कर्तव्य बजावण्याच्या प्रयत्नांना खरा न्याय दिल्यासारखे होईल.

विजेच्या निर्मितीनंतर पारेषण, वितरण अशा टप्प्यांमध्ये ग्राहकांच्या दारापर्यंत वीजपुरवठा केला जातो. दाटवस्तीच्या महानगरापासून ते अतिदुर्गम दऱ्याखोऱ्यातील सर्व प्रकारच्या वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणचे अभियंते व जनमित्रांना दक्ष राहावे लागते. वीज दिसत नाही. वीजयंत्रणेत काम करण्याचा कितीही वर्षांचा अनुभव असला तरी विजेशी मैत्री होऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या क्षणी अनावधानाने झालेली चूकही जीवावर बेतू शकते. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रात्री-बेरात्री अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व धोकादायक आव्हाने पेलून अभियंता व जनमित्रांना वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कर्तव्य बजवावे लागते. वीजपुरवठा खंडित झाला की तो पूर्ववत होईपर्यंतचा प्रतीक्षा काळ हा वीजग्राहकांना नकोसा असतो, एवढी विजेची गरज प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात निर्माण झाली आहे.

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी साधारणतः उन्हाळा ते पावसाळ्यातील ८ ते ९ महिन्यांचा कालावधी अतिशय आव्हानात्मक व खडतर असतो. उन्हाचा तडाखा, तापलेली वीजयंत्रणा, वाढलेली विजेची मागणी त्यानंतर वादळे, मान्सूनपूर्व धुव्वाधार पाऊस व त्यानंतरचा पावसाळी संततधार पाऊस, पुरस्थिती अशा नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे प्रकाशदूत सज्ज असतात. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रात धडकलेले ‘निसर्ग’ व ‘तौक्ते’ चक्रीवादळे, राज्यातील विविध ठिकाणची पूरस्थिती आणि महाभयंकर कोविड-१९ च्या साथीच्या रोगामुळे वीजक्षेत्रासमोर अत्यंत कठीण परिस्थिती होती. अशाही स्थितीत महावितरणच्या प्रत्येक जनमित्राने वीजग्राहकांना प्रकाशात ठेवण्यासाठी अविरत, अविश्रांत कर्तव्य बजावले आहे.

खरे पाहता महावितरणच्या पुरुष व महिला तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांवर २४ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासह इतर विविध ग्राहकसेवा देण्याची जबाबदारी आहे. यासोबतच थकीत वीजबिलांची वसूली करणे, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे, वीजचोरीविरोधात कारवाई करणे आदी महत्वाची कामे करावी लागतात. महावितरणच्या ग्राहकसंख्येत दरवर्षी सुमारे १० लाखांची भर पडत आहे. सोबतच विजेची मागणीही सुमारे १० टक्क्यांनी वाढत आहे. सुमारे ११ लाख ३१ हजार किलोमीटर उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या अन्‌ सुमारे ८ लाख २२ हजार वितरण रोहित्रांच्या यंत्रणेतून राज्यातील २ कोटी ९२ लाखांवर वीजग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येत आहे.

सन १९९३ मध्ये मराठवाड्यात किल्लारी परिसरात झालेला भूकंप असो की सन २००९ मध्ये कोकणात धडकलेले ‘फयान’ चक्रीवादळ असो अशा अनेक नैसर्गिक भयंकर आपत्तीमध्ये महावितरणच्या प्रकाशदूतांनी काळोखात गेलेल्या लाखो वीजग्राहकांना प्रकाशमान करण्यासाठी जीवाचे रान केले आहे. सन २०१४ मध्ये महाराष्ट्रभर झालेल्या प्रचंड गारपिटीने तर वीजयंत्रणेचे अभूतपूर्व नुकसान झाले होते. परंतु अहोरात्र काम करून ही यंत्रणा उभारण्याचे व वीजपुरवठा सुरळीत करण्याची कामगिरी प्रकाशदूतांनी यशस्वी केली. प्रसंगी महापुरात बोटीने जाऊन किंवा नदीमध्ये पोहत जाऊन वीजयंत्रणेची दुरुस्ती करण्याचे धैर्य दाखवत वीजपुरवठा सुरु करण्याचे कर्तव्य प्रकाशदूत दरवर्षी बजावतात याचा प्रत्यय अनेक जिल्ह्यांमध्ये आला आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्याची जिगरबाज धडपड जशी करावी लागते तशीच धडपड दऱ्याखोऱ्यातील डोंगराळ भागात नवीन वीजजोडणी देण्यासाठी ‘प्रकाशदूतां’ना करावी लागते. पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या अतिदुर्गम चांदर (ता. वेल्हे) व लगतच्या दोन वस्त्यांमधील वीजपुरवठ्यासाठी सन २०१८ मध्ये मे महिन्यातील तळपत्या उन्हात अवघ्या ७ दिवसांत ६५ वीजखांब व एक वितरण रोहित्र उभारण्यात आले. नैसर्गिक प्रतिकुलतेला आव्हान देत महावितरणच्या ‘प्रकाशदूतां’नी अतिदुर्गम ४६ कुटुंबांसाठी डोंगरदऱ्यातून अक्षरशः प्रकाश खेचून आणला.  

केवळ महावितरणच्या ग्राहकांसाठी नव्हे तर मुंबई शहरातील सन २००६ च्या प्रलयात जाऊन वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या प्रकाशदूतांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यानंतर गेल्या दोन-तीन वर्षांमधील ‘निसर्ग’, ‘तौक्ते’ चक्रीवादळांनी जमीनदोस्त केलेली वीजयंत्रणा विक्रमी कालावधीत पूर्ववत केली. तसेच कोविड-१९ मध्ये संचारबंदीमुळे घरात असलेल्या प्रत्येक ग्राहकाला प्रकाशात ठेवण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जनमित्रांनी मोठे योगदान दिले आहे. वीज यंत्रणेचा भलामोठा पसारा असल्याने जनमित्र यांना वेळी-अवेळी, रात्र असो की दिवस, उन असो, वादळ असो की पाऊस या सर्वच परिस्थितीमध्ये खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी संभाव्य धोके टाळून कर्तव्य पणाला लावावे लागते. धोकेही असे की, जाणते किंवा अजाणतेपणी झालेली चूक वीज माफ करीत नाही आणि थेट मृत्यूच्या दारात नेते. त्यामुळे अशा वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करण्याची कामे तसे जिकिरीचे व प्रसंगी जोखमीचे सुद्धा असते. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रकाशदूतांना मानाचा मुजरा.

लेखक – निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण पुणे.

महापालिकेतील कारभाराचा मतदारांनी काढला वचपा …

पुणे- तब्बल ३ वेळा स्थायी समिती अध्यक्ष पद मिळाले, पण या काळात सामान्य जनतेसाठी काय केले? लॉबीत रमला ..खासदार असूनही बापटांना कसब्याच्या पाणी प्रश्नावर वारंवार आयुक्तांशी भांडावे लागले.महापौर ,आपला चेअरमन आपला तरीही खासदार अधिवेशनाला गेले कि कसब्यात पाणी गायब .. खेचाखेची ..तीही ज्येष्ठांची ..आणि बढाया मारणाऱ्या बड्या म्हणविणाऱ्या लॉबी च्या नादाला लागून सामन्यांची फरफट केली तर कितीही मोठा बालेकिल्ला असो तो ढासळणार हे विसरलेल्या उमेदवाराला अखेरीस मतदारांनी असमान दाखविले आहे. खासदार बापट प्रचाराला आले, मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांनी फौज उतरविली एवढी नशिबाची साथ मिळाली म्हणून अकरा हजाराने पराभव झाला अन्यथा हाच पराभव आणखी मोठ्या मताधिक्याने झाला असता. या साठी आत्मचिंतन नव्हे तर सत्ता असताना आपण खोट्या बढाया खोरांच्या वर्तुळात वावरून आम जनतेशी कसे वागलो याचे स्मरण केले तरी आपल्या पराभवाची करणे लक्षात येतील .

कसबापेठ विधानसभा मतदारसंघ मतमोजणीतील टप्पे निहाय मते-

CandidatePartyRound 1Round 2Round 3Round 4Round 5Round 6Round 7Round 8Round 9
Dhangekar Ravindra HemrajINC584427512526438941313431277446234232
Hemant Narayan RasaneBJP286340953709311126413930427025543085
Tukaram Namdeo DaphalSSP13335377511
Baljeet Singh KochharPRP602142111
Ravindra Vitthalrao VedpathakRMP051011352
Anil HatagaleIND545414324
Abhijit Wamanrao Awade-BichukaleIND400271231
Amol S. TujareIND011013211
Anand Kanhaiyalal DaveIND1231321142330225
Ingale Ajit PandurangIND001200204
Oswal Suresh BabulalIND232341651
Khisal Jalal Jafri (Laddu)IND430021012
Mote Chandrakant RambhajiIND020302133
Riyaz Sayyadali SayyadIND900231243
Santosh ChoudaryIND412362423
Husen Nasaruddin ShaikhIND5441913561414
NOTANOTA8684959752801136456
Total885769876383765268737494722673097428
Round 10Round 11Round 12Round 13Round 14Round 15Round 16Round 17Round 18Round 19Round 20Total Votes% of Votes
358529253885348238453666416037014139409310127319453.00
37643919286332333382294427402757278928457506224445.07
10410712810186911520.11
31772352110500.04
11352313120400.03
136741414221311080.08
47340233010470.03
10222423122310.02
3320891524142822960.21
10501252100260.02
103055214210600.04
031112519102480.03
12531234201380.03
31475036540620.04
133106655231720.05
111123201391522121532380.17
9081761046043524149561813971.01
75196984690469067356671270286595702470731793138103100%

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या कसबापेठ पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा दारूण पराभव केला. तब्बल २८ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या गडाला रवींद्र धंगेकर यांनी सुरुंग लावला आहे. या मतदारसंघात २८ वर्षांनंतर कसब्यात निकालाची पुनरावृत्ती झाली आहे. पराभवाची चाहूल लागताच विशिष्ट समाजाला गुलाबी गोडी लावण्याचा भाजपचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने पदाधिकारी तोंडघशी पडले आहेत. दरम्यान पहिल्या फेरीपासून अगदी शेवटच्या २१ व्या फेरीपर्यंत रवींद्र धंगेकर यांनी आघाडी कायम ठेवली. दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीचा अपवाद वगळता प्रत्येक फेरीत धंगेकर रासनेंना वरचढ ठरले. शनिवार-सदाशिव आणि नारायण पेठ जो भाजपचा बालेकिल्ला मानला जायचा त्यातही जनेतने धंगेकरांना साथ दिली. अपेक्षेप्रमाणे रविवार-शुक्रवार पेठ तसेच लोहियानगर आणि मोमिनपुरा भागातून रवींद्र धंगेकर यांच्यावर जनतेने विश्वास ठेऊन त्यांना भरघोस मतदान केले. अखेर रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांना 10 हजार 915 मतांनी पराभवाची धूळ चारत विधानसभेत पाऊल ठेवले आहे.मतदारांना गृहित धरणे भाजपला महागात पडले आहे. कसबापेठ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचा विजय आगामी काळातील निवडणुकांसाठी अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपचे अनेक दिग्गज नेते मैदानात असताना आणि दुसरीकडे स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली संपूर्ण ताकद झोकून दिल्यानंतरही रविंद्र धंगेकर यांनी ही किमया नेमकी कशी साधली, याबाबत आता राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.      पुणे महापालिकेत तब्बल ५ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या रविंद्र धंगेकर यांचा जनसंपर्क कमालीचा आहे. अगदी रात्री १२ वाजताही एखाद्या नागरिकाने मदतीसाठी फोन केला तर धंगेकर यांच्याकडून त्याला प्रतिसाद दिला जातो, अशी त्यांची मतदारसंघात ख्याती आहे. तसंच इतक्या वर्ष नगरसेवक म्हणून काम करूनही चारचाकी गाडीचा वापर न करता ते दुचाकीनेच मतदारसंघात फिरणे पसंत करतात. त्यामुळे नागरिकांचे नेमके काय प्रश्न आहेत, हे जाणून घेत त्याची सोडवणूक करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या धंगेकर यांची लोकांची असलेली नाळ अधिकच घट्ट झाली त्यामुळे त्यांना पराभूत करणे भाजपला जिकरीचे गेले. तीन दशकांपूर्वी म्हणजे १९९१ मध्ये पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचा पराभव काँग्रेसचे वसंत थोरात यांनी केला होता. आता त्याची पुनरावृत्ती झाली आहे. मात्र यावेळी कारणे वेगळी आहेत. पोटनिवडणुकीत सत्ताधारी जिंकतात असे सर्वसाधारणपणे मानले जाते. मात्र कसब्यातील हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागणार आहे.      जनतेने माझ्यावर मतांचा पाऊस पाडला. खरंतर पहिल्या दिवसांपासून जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती. कामाचा माणूस निवडून द्यायचा हे जनतेने ठरवलं होतं. जनतेने माझ्यावर आता मोठी जबाबदारी टाकलीये. जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी इथून पुढच्या सव्वा वर्षात १८-१८ तास काम करेन, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे. तर जनतेचा कौल मला मान्य आहे. मी कुठे कमी पडलो, याचे मी आत्मचिंतन करेल. भाजप नेतृत्वाने मला उमेदवारी दिली. माझ्यावर विश्वास टाकला, याबद्दल नेतृत्वाचे मी आभार मानतो. धंगेकरांना विजयासाठी शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रिया भाजपचे पराभूत उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केली.

चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप विजयी

पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे वर्चस्व कायम ठेवत अश्विनी जगताप विजयी झाल्या. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होती.अश्विनी जगताप यांनी बाजी मारत महाविकास आघाडीचे नाना काटे यांचा 36 हजार 770 एवढ्या मतांनी पराभव केला.अश्विनी जगताप यांना १ लाख ३५ हजार ४३४ मते मिळाली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मते मिळाली. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४४ हजार ०८२ मते मिळाली.

या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देखील प्रचारात उतरले होते. दरम्यान चिंचवडमध्ये ५०.४७ टक्के मतदान पार पडलं होतं.मात्र मविआला राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा मोठा फटका बसला त्यामुळेच नाना काटे यांचा पराभव झाला अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी देखील दिली आहे. जर ही बंडखोरी थोपवण्यास मविआला यश आलं असतं तर या जागेवर मविआचा उमेदवार नक्कीच विजयी झाला असता.

मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच अश्विनी जगताप यांनी आपली आघाडी कायम ठेवली होती. कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला पण, चिंचवडची जागा राखण्यात भाजपला यश आले आहे.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जाण्याने पिंपरी चिंचवड शहराचे मोठे नुकसान झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. परंतु, आता अश्विनी जगताप यांच्या विजयाने पुन्हा एकदा नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

‘मी हा विजय सर्वसामान्य जनतेला आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित करते. भाजपाचे नेते, कार्यकर्ते आणि जनतेला माझ्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद देते. अशा पद्धतीने निवडणूक लढवावी लागेल, असा विचार मी कधीच केला नव्हता. लोकांसाठीची लक्ष्मण जगताप यांची अपुरी राहिलेली कामं आहेत, ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे’, अशी प्रतिक्रिया अश्विनी जगताप यांनी विजयानंतर दिली आहे.

संजय राऊत यांच्यावरील हक्कभंग प्रस्ताव अयोग्य : शरद पवार पाठीशी राहणार

पुणे- खासदार संजय राउत नेमके म्हणाले काय आणि त्याचा अर्थ घेतला काय ? संजय राऊत हे कोणते विधिमंडळ हे चोरमंडळ आहे असे म्हणालेत याबद्दल त्यांचे विधान आणि मागची पुढची विधाने व्यवस्थित तपासणे गरजेचे आहे . ४० जण, डुप्लिकेट बनावट शिवसेना ,आमची पदे गेली,काढली .. अशा आशयाच्या विधानांचा व्यवस्थित विचार केला तर ते कोणत्या विधिमंडळ विषयात बोललेत त्यांचा रोख कुठे होता ? हे स्पष्ट होते . याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ३ ट्वीट करत आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे.

लोकशाही व्यवस्थेतील विधिमंडळ हे जनतेचे सर्वोच्च प्रतिनिधी मंडळ आहे. आणि त्याची मान-प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे. यात दुमत असण्याचे कारण नाही. मात्र संजय राऊतांवरील प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत नव्याने गठीत केलेली हक्कभंग समिती स्वायत्त व तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित होते असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करत व्यक्त केले आहे.

कोल्हापुरात खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ‘ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लीकेट, चोरांचे मंडळ, चोरमंडळ, हे विधिमंडळ नाही चोरमंडळ आहे.’ हे विधान केले. यावर विधिमंडळाला चोरमंडळ म्हटल्याबद्दल हक्कभंग प्रस्ताव मांडला गेला आहे. तसेच गठीत केलेल्या समितीत ठाकरे गटातील आमदारांचा समावेश नाही. हे योग्य नाही. संजय राऊत यांचे विधान ऐकले असता त्यांच्या म्हणण्याचा रोख दिसून येतो असेही शरद पवार म्हणाले.

अन्वयार्थ स्पष्ट होतो

संजय राऊत यांचे हे विधान मूलत: विशिष्ट गटाविषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया आहे. संजय राऊत यांनी जे विधान केले त्या विधानाचा विग्रह न करता ते एकत्रितरित्या ऐकले असता विधानाचा अन्वयार्थ स्पष्ट होतो. असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

संयमाने हाताळायला हवे

शरद पवार म्हणाले, यापूर्वी वसंतदादांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील सरकारवर ‘अलीबाबा-चाळीस चोरांचे सरकार’ अशी टीका-टिप्पणी विरोधकांकडून झाली होती. अशा प्रकारची टीका विधिमंडळाबाबत कधीही समर्थनीय नाही. परंतु प्रकरण संयमाने हाताळायला हवे.

सदस्य नि:पक्षपाती, ज्येष्ठ असावे

शरद पवार म्हणाले, संजय राऊत यांनी केलेले विधान विधिमंडळाबाबत होते की विशिष्ट गटाबद्दल होते याचा त्यांनी केलेल्या विधानाचा एकत्रितरित्या विचार व्हावा याकरता हक्कभंग समितीतील सदस्य नि:पक्षपाती, ज्येष्ठ असावेत. याबाबत आवश्यक काळजी घ्यायला हवी होती. अशी नाराजीही शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.

न्यायाची अपेक्षा कशी करता येईल?

शरद पवार म्हणाले, ज्या सदस्यांनी सभागृहात हक्कभंगाची मागणी केली एवढेच नव्हे तर संजय राऊत यांच्यावर कडक कारवाईची आग्रही मागणी केली त्या तक्रारदार सदस्यांचा हक्कभंग समितीत समावेश झाला. हे म्हणजे तक्रारदारासच न्यायाधीश म्हणून नियुक्त केले. तर न्यायाची अपेक्षा कशी करता येईल? असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.

मार्गदर्शक सूचना तपासून घ्या

शरद पवार म्हणाले, संजय राऊत हे देशातील सर्वोच्च विधिमंडळ अर्थात भारतीय संसदेतील राज्यसभेचे ज्येष्ठ व सन्माननीय सदस्य आहेत. त्यांवरील कोणत्याही प्रस्तावित कारवाईपूर्वी भारतीय संसदेतील सदस्यांवर अशी कारवाई करण्याबाबतची विधिग्राह्यता तसेच मार्गदर्शक सूचना या बाबी बारकाईने तपासून घ्यावयास हव्या असेही शरद पवार म्हणाले आहेत.