Home Blog Page 1381

ऑटो टॅक्सी बस ट्रक टेम्पो चालक मालकांचे दिल्ली जंतरमंतरवर आंदोलन

सरकार आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा बाबा कांबळेंचा आरोप,

केंद्र सरकारच्या भांडवल चार्जिंग धोरणाच्या विरोधात देशातील पन्नास कोटी असंघटित कामगार कष्टकरी जनता त्रस्त आहेत जनतेच्या मनामध्ये रोश आहे.

दिल्ली/पुणे

6 मार्च 2023 रोजी दिल्लीत ऑटो टॅक्सी बस ट्रक ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे! फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजन करण्यात आले आहे.
आंदोलनामध्ये देशातील सर्व राज्यातून पाठिंबा मिळत आहे. ऑटो टॅक्सी बस ट्रक चालक ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाम निर्धार केला आहे!
हे आंदोलन मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आंदोलनातून भाजपप्रणीत संघटना अलिप्त! पण तरीही हा लढा सुरूच राहील, असे बाबा कांबळे म्हणाले!

आम्ही कोणत्याही परिस्थितीत आंदोलन मागे घेणार नसल्याचे बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी आम्हाला अटक करून तुरुंगात टाकले तरी आम्ही मागे हटणार नाही! भारतातील 25 कोटी चालक-मालक आपल्या हक्कासाठी मैदानात उतरले आहेत, देशातील पन्नास कोटी असंघटित कामगार मजूर ऑटो टॅक्सी बस ट्रक चालक सरकारच्या गरीब विरोधी धोरणांमुळे त्रस्त आहेत, पण केंद्र आणि राज्य सरकार लक्ष देत नाही! त्यामुळे सर्वांच्या मनात सरकारविरोधात रोष! ज्याप्रमाणे देशातील शेतकऱ्यांनी दिल्लीत केंद्र सरकारच्या धोरणांना कडाडून विरोध केला.
त्याच पद्धतीने देशभरातील ऑटो टॅक्सी बस टेम्पो चालक-मालक प्रतिनिधी सरकारचा निषेध करत आहेत! याची सरकारला धास्ती आहे.
त्यामुळे आंदोलनाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत! भाजपप्रणित संघटना आधी आमच्या आंदोलनाला पाठिंबा देत होत्या पण भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या माहितीनुसार ही संघटना धरणे आंदोलनात भाग घेत नाही! पण तरीही आपण सर्वजण एकजुटीने आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या जाहीर करत आहोत!

तेलंगणा येथील फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बी विनय भूषणजी म्हणाले सरकारच्या या कानाच्या विरोधामध्ये आम्ही सर्व एकजुटीने लढा देऊ देशातील श्रमिक कष्टकरी ड्रायव्हर हितासाठी आम्ही प्रयत्न करत आहो

राजस्थान येथील राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख सूरज नाईकजी म्हणाले की, ऑटो टॅक्सी बस आणि ट्रक चालकांसह देशातील सर्व चालक प्रचंड नाराज आहेत. त्यांच्याकडे कोणतीही सुविधा नाही! आणि त्या वरती भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर होत आहे!
पोलीस वसुली करत आहेत वाहतूक विभागही विनाकारण दंड भरून! यामुळे चालक-मालक नाराज!
पंजाब बॉर्डर येथील फेडरेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष के.डी.गिल यांनी म्हटले आहे की, सरकार बाबांना घाबरते, 2013 मध्ये महाराष्ट्रातील अण्णा हजारे यांनी मनमोहन सिंग सरकारच्या विरोधात दिल्लीत प्रचंड आंदोलन केले, तेव्हापासून बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत अण्णांची बरीच चर्चा आहे. पन्नास कोटी ऑटो टॅक्सी बस व श्रमिक कष्टकऱ्यांचे बाबा कांबळे नेतृत्व करत आहेत, सरकार बाबांना घाबरत आहे, म्हणून ते आंदोलन तोडण्याचा प्रयत्न का करत आहेत, देशात आंदोलन सुरूच राहणार आहे. बाबाजींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आम्ही पुढे घेऊन जाऊ,
दिल्ली येथील अडवोकेट चिरंजीत म्हणाले दिल्लीमध्ये आंदोलनाला चांगला प्रतिसाद असून दिल्लीतील सर्व आठवड्याची पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी होतील बाबा कांबळे यांचे नेतृत्व देशभर मान्य होत असून त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आम्ही दिल्लीमध्ये पुढे घेऊन जाऊ.

16 वर्षीय मुलाचे अपहरण करून नग्न फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार

पुणे-पुण्यात ‘भांडणातील मुलांची नावे सांग’ असे म्हणत अल्पवयीन गुडांच्या टोळक्याने 16 वर्षीय मुलाचे अपहरण करत त्याला धमकावले व त्याचे नग्न करत फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार आरोपींवर दत्तवाडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर पीडित मुलाच्या 40 वर्षीय वडीलांनी पाेलिसांकडे आराेपी मुलांविराेधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना गुरूवारी (2 मार्च) दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शाहू काॅलेज परिसराजवळ घडला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी लक्ष्मीनगर परिसरातील शाहू काॅलेज जवळून पिडित मुलास आराेपींनी जबरदस्तीने गाडीवर वसवून साई सिध्दी चाैकापासून सुर्या चाैकात नेले. तेथून आंबेगाव तळजाई पठारावरील मोकळया मैदानात नेले व ‘कालच्या भांडणातील मुलांना घेऊन ये’ असे म्हणत धारदार शस्त्र गळयास लावले व खल्लास करुन टाकण्याची धमकी दिली.पीडित मुलास नग्न करुन आरोपींनी त्याचे फाेटाे काढले.

घडलेला सर्व प्रकार मुलाने घाबरलेल्या अवस्थेत कुटुंबियांना सांगितल्यावर याप्रकरणी दत्तवाडी पाेलिस ठाण्यात आराेपींविराेधात तक्रार दाखल करण्यात आली. पाेलिसांनी चारही अल्पवयीन आरोपींना नोटीस बजावली आहे. याबाबत पुढील तपास पाेलिस उपनिरीक्षक एस.कामे करत आहेत.

बस प्रवासात ओळख झालेल्या तरुणीवर अत्याचार करून 16 लाख रुपये उकळणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केली अटक

पुणे-बस प्रवासात ओळख झाल्यानंतर पुण्यात पुस्तके खरेदीसाठी आलेल्या तरुणीला शीतपेयातून गुंगीचे ओैषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीवर अत्याचार केल्यानंतर व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करुन तिच्याकडून 16 लाख रुपये उकळणाऱ्या एकास अटक करण्यात आली.

तरुणी मूळगावी गेल्यानंतर फईमने तरुणीशी संपर्क साधला. समाजमाध्यमावर व्हिडिओ तसेच फोटो पोस्ट करण्याची धमकी दिली. तरुणीला धमकावून त्याने तिच्याकडे पैशांची मागणी केली. घाबरलेल्या तरुणीने एका बँकेकडून कर्ज काढून त्याला 16 लाख 86 हजार रुपये दिले. त्यानंतर तो तरुणीला धमकावत होता. त्याच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. फईमला अटक करण्यात आली असून सहायक पोलिस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे तपास करत आहेत.

या प्रकरणी फईम नईम सय्यद याला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका 27 वर्षीय तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिडित तरुणी मूळची परगावची आहे. ती पुण्यात पुस्तके खरेदीसाठी बसने येत होती. बस प्रवासात तिची आरोपी फईम याच्याशी ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे मोबाइल क्रमांक दिले. मोबाइलवरुन दोघांमधील संपर्क वाढला. गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर रोजी ती पुण्यात आली होती. तिने पुस्तके खरेदी केली. त्यानंतर तिने फईमशी संपर्क साधला. तेव्हा फईमने तिला जेवायला जाऊ असे सांगून जंगली महाराज रस्त्यावरील एका उपहारगृहात नेले. तेथे तिला शीतपेयातून गुंगीचे ओैषध दिले. त्यानंतर तरुणीला एका लाॅजमध्ये नेऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला. तरुणीचे फोटो काढले तसेच व्हिडिओ तयार केली.

हॉटेल चालवण्यासाठी उधारी:दूध, भाजीपाला व किराणा तब्बल 73 लाख 66 हजार रूपयांची फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे- पुण्यात एका व्यावसायिक दांपत्याने हॉटेल चालवण्यासाठी उधारीवर दूध, भाजीपाला व किराणा घेऊन तब्बल 73 लाख 66 हजार रूपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आरोपी दाम्पत्यावर चंदननगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी शनिवारी दिली.

शाैकत अली खान, रेणुरतन शाैकतअली खान (रा. खराडी, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत व्यावसायिक अवधेश कुमार रामलुलारक उपाध्याय (वय-३९,रा.मुंढवा, पुणे) यांनी पाेलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. ही घटना 2016 वर्षांपासून डिसेंबर 2022 पर्यंत घडली आहे.

याबाबत चंदननगर पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे म्हणाले, आराेपी शाैकत अली खान व रेणुरतन खान यांची हिंजवडी, औंध, खराडी, मगरपट्टा- हडपसर या ठिकाणी स्काय हाय, स्काय फ्लाय नावाची तीन ते चार हाॅटेल आहेत. या हॉटेलकरता या दाम्पत्याने वेगवेगळया व्यावसायिकांकडून सामान उधारीवर घेतले. उधारीचे पैसे वेळाेवेळी पैसे परत करू असे सांगून पैसे न देता फसवणुक केली आहे. सदर जाेडप्याचा पाेलिस शाेध घेत आहेत.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी शाैकत खान व त्यांची पत्नी रेणुरतन खान यांनी हाॅटेल चालविण्याकरता तक्रारदार अवधेश कुमार उपाध्याय यांच्याकडून वेळाेवेळी दूध व दुधाचे पदार्थ उधारीवर नेले. ही उधारी न देता त्यांची 39 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.

सिमरजित जसबिरसिंग अराेरा (वय-29) यांच्याकडून काेळसा घेऊन त्यांची 6 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अश्विन अनिल परदेशी (वय-40) यांच्याकडून मासे घेऊन त्यांची 6 लाख 82 हजार 800 रुपयांची फसवणूक केली गेली. विजय कृष्णा शिवले (36 ,रा. गणेश पेठ, पुणे) यांना भाजीपाला घेऊन त्यांची 19 लाख 23 हजार 772 रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

श्रीकांत विजय कापसे (40,रा.महंमदवाडी,, पुणे) यांचेकडून एक लाख 74 हजार रुपयांचा किराणा घेऊन त्यांची ही फसवणूक आराेपींनी केली आहे. अशाप्रकारे विविध व्यवसायिकांकडून एकूण 73 लाख 66 हजार रुपयांचा माल घेऊन आराेपींनी त्यांचे पैसे न देता आर्थिक फसवणुक केलेली आहे. याबाबत चंदननगर पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक एस खांडेकर पुढील तपास करत आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या- राज्याची विधानसभा कॉमेडी शो आहे का? महागाईवर बोलतील असे वाटले होते..उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली

पुणे-खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील हा काय कॉमेडी शो आहे का? ही राज्याची विधानसभा आहे, मुख्यमंत्री अधिवेशनात महागाईशी संबंधित विषयावर बोलतील अशी अपेक्षा होती. पण टीका आणि इतर गोष्टींवर बोलण्यातच त्यांनी वेळ घालवला. अशी खोचक टीका करत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली आहे. . हांडेवाडीतील सुप्रियाताई लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुप्रिया सुळे बोलत होत्या.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत ‘मविआ’ सरकारची कुंडलीच काढली. रवी राणांच्या पत्नीला आत घातले. कंगना राणावतचे घर तोडले. गिरीश महाजन, नारायण राणे, देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबाची चौकशी लावली. आशिष शेलारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला. आपण असे केले. काय? जयंतराव मला माहिती आहे. दादांनाही माहिती आहे. असे प्रकार केले. हे जास्त काळ चालत नसल्याचे शिंदेंनी सुनावले.आम्हाला महाराष्ट्र द्रोही म्हणता. आमचे सरकार घटनाबाह्य म्हणता. मग तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना विचारला. घटनाबाह्य सरकारच्या जाहिराती, सगळ्या सुविधा तुम्हाला चालतात, हे कसे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण चांगलेच गाजले. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणती गोष्ट मिळाली नाही असे झाले नाही. कोरोना काळात कोणी उपाशी झोपले नाही. इंदापूर तालुक्यातील भांडगावमध्ये दारू बंदी झाली नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या ऑफिस समोर आंदोलनाला बसणार असल्याचा इशाराही सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिला आहे.

शाळांमधून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : शाळांमधील स्वच्छतागृहांमध्ये वाढ करण्याबरोबरच शाळांमधून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा करावी. त्यासाठी एक प्रमाणित संचालन प्रक्रिया (standard operating procedure- SOP) तयार करावी, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

अनुदानित शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा आणि विवक्षित शाळांशी संबधित काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी विधान भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

या बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, उपसचिव समीर सावंत उपस्थित होते.

शालेय शिक्षण विभागाशी संबधित अनेक मुद्दे विधान परिषदेत उपस्थित होत असतात, असे सांगून डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, अनुदानित शाळांमधून विद्यार्थी संख्येनुसार स्वच्छतागृहे, मुलींसाठी स्वच्छता गृहात सॅनिटरी पॅड टाकण्यासाठी कचरा पेटीची व्यवस्था यासारख्या प्राथमिक बाबींची काळजी घेतली जावी. त्याच बरोबर विद्यार्थी मनावर संस्कार करणारे शारीरिक शिक्षण, गीताई, कथामाला, श्लोकपठनासारखे पूर्वी राबविले जात असलेले इतर संस्कारक्षम उपक्रम राबविण्यास सुरुवात करावी.

शिक्षणाची गुणवत्ता राखली जावी यासाठी कार्यरत असलेल्या ‘गुणवत्ता शिक्षण समिती‘च्या सूचनांचा नियमितपणे अहवाल मागवून त्यावर अंमलबजावणी व्हावी. संवेदनशील किशोरवयीन मनावर होणारे परिणाम लक्षात घेता प्रशिक्षित समुपदेशक नेमणे आवश्यक आहे.

क्रीडा प्रशिक्षक, संगीत शिक्षक या शाळांमध्ये असले पाहिजेत. काही उपक्रम ऑनलाईन घेता येतील. निधीची अडचण दूर करण्यासाठी उद्योगमंत्री यांच्या समन्वयाने उद्योग क्षेत्राला आवाहन करुन त्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

स्वयंअर्थसहाय्यित शाळा कायदा लागू होण्यापूर्वी सुरु असलेल्या 107 शाळांपैकी आता 24 विवक्षित शाळा सुरु आहेत. या शाळांच्या बाबतीतील अहवाल शिक्षण आयुक्तांकडून मागवून घेऊन तपासून बघावा. या शाळांना अनुदान देण्याबाबत सकारात्मक विचार करण्याच्या सूचनाही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मटा’ सन्मान पुरस्कारांचे वितरण

मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मटा’ सन्मान पुरस्कारांचे वितरण झाले.

  विलेपार्ले येथे ‘मटा सन्मान’ २०२३ हा सोहळा झाला. मराठी चित्रपट, नाटक, संगीत, टीव्ही मालिका, वेब सीरिज या विश्वातील गुणवंतांचा सत्कार या सोहळ्यात करण्यात आला. गुंतवणूक तज्ज्ञ रचना रानडे यांना युथ आयकाॅन पुरस्कार, स्वच्छतादूतांसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या पुण्यातील ‘स्वच्छ’ संस्थेस ‘वसुंधरा साथी’ पुरस्कार, संगीतकार अशोक पत्की यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार, तर दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणाऱ्यांचा सन्मान झालाच पाहिजे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मटा सन्मान’ सोहळा ही एक चांगली परंपरा आहे. अशा पुरस्कारांची समाजासाठी आवश्यकता आहे. सामाजिक उपक्रमांमध्ये महाराष्ट्र टाईम्स नेहमीच अग्रेसर असतो. प्रसिद्धीपासून दूर राहून सामाजिक बांधिलकी जपत जनहिताचे कार्य करणाऱ्यांचा सन्मान झालाच पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, समाजातील सर्व घटकांच्या हिताचे निर्णय शासन घेत आहे. चित्रपट सृष्टीला अधिकाधिक पाठबळ देण्यासाठी सहकार्याच्या भावनेतून निर्णय घेण्यात येत आहेत. या क्षेत्राच्या अडीअडचणी सोडविण्यात येतील. स्वच्छतेच्या क्षेत्रात काम करणारे स्वच्छतादूत तसेच संस्था यांना देखील सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.

भारतरत्न लता मंगेशकर संगीत अकादमी, आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येत आहे. तसेच संगीतकार अशोक पत्की यांनी संगीत क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे, असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले.

जीवनात संगीताच्या गुंतवणुकीने मनं स्वच्छच होतात- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘मटा सन्मान’ सोहळा हा रसिक आणि कलाकारांना आपलासा वाटणारा सन्मान आहे. आपापल्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नामवंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. संगीतकार अशोक पत्की यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे. अशोक पत्की यांच्या संगीताची जादू अनोखी आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी रसिकांना आजही निखळ आनंद  देत आहेत. माणसाच्या जीवनात जर संगीताची गुंतवणूक केली तर मन स्वच्छच होतं, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ग्राहकसेवा देणारे जनमित्र महावितरणचे खरे आधारस्तंभ-मुख्य अभियंता राजेंद्र पवार 

पुणे, दि. ०४ मार्च २०२३:अतिशय जोखमीच्या व धकाधकीच्या वीज क्षेत्रात २४ तास सुरळीत वीजपुवरठ्यासाठी ग्राहकांना अविश्रांत सेवा देणारे जनमित्र हे महावितरणचे आधारस्तंभ आहेत. ग्राहकांशी थेट संपर्क व संवाद साधून त्यांना तत्पर सेवा देणारे जनमित्र खरे ‘प्रकाशदूत’ आहेत’ अशा शब्दांत पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी जनमित्रांचा शनिवारी (दि. ४) गौरव केला.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि. ४ मार्च हा दिवस ‘लाईनमन दिन’ म्हणून महावितरणसह देशभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित पुणे परिमंडलाच्या कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. पवार बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत यांची उपस्थिती होती.

मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले की, देशभरात ‘लाईनमन दिन’ साजरा होत असल्याचा एक सहकारी म्हणून विशेष आनंद झाला आहे. लाईनमन म्हणजेच जनमित्र हा वीज वितरण यंत्रणा तसेच ग्राहकसेवेचा अविभाज्य घटक आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत होईपर्यंत जनमित्रांना कोणत्या दिव्यातून जावे लागते याची फारशी माहिती कोणाला नसते. परंतु ‘निसर्ग’, ‘तौक्ते’ ही मोठी चक्रीवादळे तसेच कोरोना संसर्गाचा कालावधीमध्ये शहरी भागांसह दऱ्याखोऱ्यातील अतिदुर्गम भागातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अभियंत्यांसह जनमित्रांनी केलेली कामगिरी हा उत्कृष्ट ग्राहकसेवेचा मानदंड आहे, असे श्री. पवार यांनी सांगितले. अत्यावश्यक असलेल्या सार्वजनिक सेवा क्षेत्रात काम करताना थोडा ताणतणाव येणे स्वाभाविक आहे. परंतु वीजयंत्रणेमध्ये काम करताना जनमित्रांनी सुरक्षा साधनांचा वापर करून शांतचित्ताने व एकाग्रतेने काम करावे. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये असे आवाहन मुख्य अभियंता श्री. पवार यांनी केले.

यावेळी अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत यांनी सांगितले की, विविध सेवा देण्यासाठी थेट ग्राहकांशी संपर्क साधणारे जनमित्र हे महावितरण व ग्राहक यांच्यामध्ये महत्वाचा दुवा आहे. जनमित्रांनी दिलेल्या ग्राहकसेवेवरच महावितरणची प्रतिमा अवलंबून आहे. ते करीत असलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावरच महावितरणची मोठी प्रगती झाली आहे. त्यामुळे महावितरणसह एकूणच वीज क्षेत्रात जनमित्रांचे योगदान मोलाचे आहे असे गौरवोद्गार श्री. राऊत यांनी काढले. कार्यक्रमात अनेक जनमित्रांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.

अतिशय उत्साहात झालेल्या या कार्यक्रमामध्ये प्रातिनिधिक स्वरुपात महिला व पुरुष जनमित्रांचा गौरव करण्यात आला. यावेळी वीजसुरक्षेची शपथ घेण्यात आली तसेच सुरक्षेसंदर्भात प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पटनी यांनी केले व आभार मानले. अतिशय उत्साहात झालेल्या या कार्यक्रमाला सहायक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर (मानव संसाधन) व माधुरी राऊत (वित्त व लेखा), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, कार्यकारी अभियंता भाऊसाहेब सावंत, मधुकर घुमे, बाळासाहेब हळनोर, मनीष सूर्यवंशी, भागवत थेटे, संजय वाघमारे, माणिक राठोड आदींसह अभियंते, अधिकारी व जनमित्रांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.

न्यायालयातील निरीक्षणातून विकसित होणारी वकिली ही कला- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक

 श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयातर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराज राज्यस्तरीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे उद्घाटन
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि शाहू महाराजांनी केलेल्या न्यायनिवाडयाची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. न्यायालयासमोर सत्य सांगणे आणि मांडणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे ते कर्तव्य पार पाडत, वकिलीचा अभ्यास व वकिली व्यवसाय करणा-या प्रत्येकाने प्रत्यक्ष न्यायालयातील कामकाजाचे निरीक्षण करणे गरजेचे आहे. वकिली ही उत्तम निरीक्षणातून विकसित होणारी वेगळी कला आहे, असे मत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी व्यक्त केले. 
श्री शिवाजी मराठा सोसायटी विधी महाविद्यालयाच्या वतीने ‘छत्रपती श्री शिवाजी महाराज राज्यस्तरीय अभिरुप न्यायालय स्पर्धेचे’ आयोजन शुक्रवार पेठेतील संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. स्पर्धेचे उद््घाटन अभय ओक यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे विभागाचे सह धमार्दाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के, कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे मानद सचिव अण्णा थोरात, प्राचार्य विश्वनाथ पाटील,संस्थेचे सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष  सत्येंद्र  कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष पद्माकर पवार व नियामक व कारभारी मंडळ सदस्य उपस्थित होते. स्पर्धेचे हे ४ थे वर्ष आहे. 
अभय ओक म्हणाले, न्यायालयात बाजू मांडत असताना मानवी वर्तनाचा प्रत्येक वकिलाचा अभ्यास असायला हवा. समोरच्या व्यक्तीचे मन जाणून घेतल्यास त्याच्याकडून आवश्यक माहिती समजून घेणे वकिलांना सोपे जाते. त्यामुळे लक्षपूर्वक निरीक्षण व त्याद्वारे अभ्यास केल्यास उत्तम वकिल होता येईल. भारतामध्ये महिला वकिलांचे प्रमाण देखील वाढत आहे. केवळ शहरी भागातूनच नव्हे, तर ग्रामिण भागातून या क्षेत्रात येणा-या तरुणांची संख्या अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. 
सुधीरकुमार बुक्के म्हणाले, वकिली व्यवसायात, न्यायालयीने पद्धतीमध्ये मोठया प्रमाणात बदल झाला आहे. या बदललेल्या गोष्टी स्विकारुन आपण पुढे जायला हवे. प्रामाणिकपणा हा गुण वकिली व्यवसायात असणे गरजेचे आहे. माणसाच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंत प्रत्येक गोष्ट ही कायद्याने बांधलेली आहे. त्यामुळे मानवी आयुष्यात प्रत्येक वेळी वकिली आणि न्यायालयीन प्रक्रियेचा समावेश असल्याचे दिसून येते. 
अण्णा थोरात म्हणाले, न्यायालयीन कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी अभिरुप न्यायालय स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. प्रत्यक्ष न्यायालयात आपली बाजू मांडताना करावा लागणारा युक्तिवाद आणि चांगला वकील होण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये याची प्रत्यक्ष माहिती अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना मिळते, असेही त्यांनी सांगितले. प्राचार्य विश्वनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. सिद्धकला भावसार यांनी सूत्रसंचालन केले. आनंद बोकेफोडे यांनी आभार मानले.

आंतरविद्यापीठ युवा महोत्सवात ‘भारती विद्यापीठाने’ केली पदकांची लयलूट

बंगलोरमधील जैन युनिव्हर्सिटीच्या वतीने आंतरविद्यापीठ युवा महोत्सव

पुणे : भारतीय विद्यापीठांची संघटना आणि भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालयतर्फे बंगलोरमधील जैन युनिव्हर्सिटीच्या वतीने आंतरविद्यापीठ युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करित भारती विद्यापीठ  स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी पदकांची लयलूट केली. शास्त्रीय वाद्य वादन स्पर्धेत धवल जोशी याने सुवर्णपदक पटकाविले.  भारतीय संगीत प्रकारात नंदिनी गायकवाड रौप्य पदक, शास्त्रिय नृत्यात कीर्ती कुरंडे हिने कांस्यपदक पटकाविले. लोक वाद्यवृंदासाठी देखील महाविद्यालयाने  कांस्यपदकाची कामगिरी केली.
बंगलोर येथे झालेल्या ३६ व्या युवा महोत्सवात भारतातील १०६  विद्यापीठे, २ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. आपापल्या राज्यातील कला विद्यार्थ्यांनी महोत्सवात सादर केल्या.

स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे  संचालक प्रा. शारंगधर साठे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्राध्यापक प्रविण कासलीकर आणि डॉ. देविका बोरठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
प्रा.शारंगधर साठे म्हणाले, युवा महोत्सवात भारतातील विविध भागातील विद्यापीठे सहभागी झाली होती. त्यामुळे भारताच्या विविध भागातील संस्कृती, तेथील लोकनृत्य, संगीत, वेशभूषा आणि उत्तोमत्तम कलाप्रकार पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी देखील युवा महोत्सवात आपले कौशल्य दाखविले.

मेटावर्स तंत्रज्ञानामुळे वास्तव आणि आभासी जग यांच्यातील दरी कमी होईल… धैर्यशील वंडेकर

पुणे-अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे महाविद्यालयात संगणक विभागाच्या वतीने मेटाव्हर्स : इंट्रोडक्शन अँड इंटरडीसिप्लीनरी ॲप्लीकेशन या विषयावर दोन दिवशीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे संयुक्त चिटणीस ॲड. भगवानराव साळुंखे, खजिनदार विजयसिंह जेधे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य धैर्यशील वंडेकर, अक्षय पासलकर फाऊडर स्प्रे डिजिटल, सुभाष बाल, प्राचार्य डॉ.सुनील ठाकरे यांचे उपस्थितीत झाले.या प्रसंगी बोलताना धैर्यशील वंडेकर यांनी गेमिंग, मनोरंजन (एंटरटेनमेंट), प्रॉडक्शन, शॉपिंग, शिक्षण (एज्युकेशन), वैद्यकीय क्षेत्र (मेडिकल सेक्टर), संरक्षण क्षेत्र, सायबर विश्व अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मेटावर्सचा वापर कसा करावा या दृष्टीने सुरु असलेल्या संशोधनाची माहिती दिली.  भविष्यात माणूस एका सुरक्षित ठिकाणी बसून मेटावर्स तंत्रज्ञानाचा वापर करून त्याची कामं सहजरित्या करू शकेल. हे करताना त्याला संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित असल्याचा अनुभव तंत्रज्ञानाच्या मदतीने घेता येईल. मेटावर्स तंत्रज्ञानामुळे वास्तव आणि आभासी जग  यांच्यातील  दरी कमी होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांनी या बदलत्या तांत्रिक प्रवाहाबरोबर आपण स्वतःला देखील नवीन कौशल्य आत्मसात करून स्वतःला अपडेट केले पाहिजे असे आवाहन या प्रसंगी केले. अक्षय पासलकर यांनी    मेटाव्हर्स च्या माध्यमातून केवळ संप्रेषण नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधांचा लाभ आपण घेऊ शकतो. त्यामध्ये वस्तुंची खरेदी विक्री, आपल्या मित्रांना भेटण्याची संधी, व्ही आर अर्थात व्हर्च्युअल रिअॅलिटी सारख्या वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्याला लाभ घेता येणार आहे. यासगळ्या गोष्टी सुरळीत व्हाव्यात म्हणून त्याला आर्टिफिशयल इंटेलिजिन्सची जोडही देण्यात आली आहे असे मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेसाठी  ॲड. भगवानराव साळुंखे, विजयसिंह जेधे, धैर्यशील वंडेकर, अक्षय पासलकर प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे, प्रा.रमा गायकवाड, कार्यशाळेचे समन्वयक प्रा.प्रांजल मोरे, प्रा.जितेंद्र मुसळे, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेचे  आयोजन  प्रा.रमा गायकवाड  यांनी प्राचार्य डॉ.सुनिल ठाकरे यांचे मार्गदर्शनाखाली केले. सूत्रसंचालन प्रा.प्रांजल मोरे यांनी केले तर प्रा.अनिल लोहार यांनी आभार मानले. महाविद्यालयाने नाविन्यपूर्ण विषयावर कार्यशाळेचे  आयोजन केल्याबद्दल अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस मा.सौ.प्रमिला गायकवाड यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनेच्या सोडतीला हजर राहण्याचे आवाहन

0

पुणे, दि. ३: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजनेअंतर्गत पात्र प्रस्तावातून १० मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा, पुणे येथे सोडत काढण्यात येणार असून अर्जदारांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महामंडळामार्फत नव्याने थेट कर्ज योजनेअंतर्गत प्रती लाभार्थी १ लाख रुपये प्रमाणे ७० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनेअंतर्गत २० डिसेंबर २०२२ अखेर ३६१ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी ३२८ प्रस्ताव सोडतीसाठी पात्र ठरले असून ३३ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले आहेत.

पात्र ठरविण्यात आलेल्या अर्जाची सोडत १० मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नंबर १०३/१०४, मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, येरवडा, पुणे येथे काढण्यात येणार आहे. पात्र अर्जदारांची यादी जिल्हा कार्यालयात लावण्यात आलेली असून त्यांनी सोडतीदिवशी हजर राहण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शि. लि. मांजरे यांनी केले आहे.
०००

शिवाजी नगर व विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत पार्कींगबाबत आदेश निर्गमित

पुणे, दि. ३ : पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्याच्यादृष्टीने शिवाजीनगर वाहतूक विभाग आणि विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत पार्किंगबाबत काही अंतिम आदेश तर काही तात्पुरते आदेश पुणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने निर्गमित केले आहेत.

यापूर्वी मागविण्यात आलेल्या सूचना व हरकतींचा विचार करुन शिवाजीनगर वाहतूक विभागांतर्गत केदारनाथ मंदीराच्या संरक्षणभिंतीच्या उत्तरेकडील दरवाजा येथे ५० मीटर परिसर नो-पार्किंग करण्याबाबतचे अंतिम आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत गोविंद खरे चौक ते रमणबाग चौक दरम्यान पी-०१, पी-०२ पार्किंग तसेच भिडे पूल ते झेड पूल जंक्शन दरम्यान नो-पार्किंग करण्यात येत असल्याचे अंतिम आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

विश्रामबाग वाहतूक विभागाअंतर्गत गोगटे प्रशाला चौक ते सत्यभामा सोसायटी लगतच्या रोडला १५ मीटर पर्यंत नो-पार्किंग करण्याबाबतचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या तात्पुरत्या आदेशाबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे १५ मार्चपर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील, असेही कळवण्यात आले आहे.
000

अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात तात्काळ वाढ करा!: बाळासाहेब थोरात

*मातंग समाजाच्या तरुणांच्या कल्याणासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा. *

मुंबई, दि. ३ मार्च २०२३-
अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशासेविका यांनी दुर्गम ग्रामीण भागात अत्यंत चांगले काम करत आहेत. कोरोना काळात त्यांनी आरोग्य सेवा सांभाळण्याचे काम केले. पण त्यांना कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. सरकारने तात्काळ त्यांच्या मानधनात वाढ केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडताना थोरात म्हणाले की, राज्यातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतनीस गावात, वाडी-वस्तीवर, दुर्गम भागातील तळागळात आरोग्याबाबत चांगले काम करीत आहेत. कोरोना सारख्या भयावह परिस्थितीतही त्यांनी आपला जीव धोक्यात घालून समाजाप्रती आपला समर्पण भाव दाखविला आहे. त्यांचे हे सामाजिक कार्य अत्यंत मोलाचे व कौतुकास्पद आहे.
सरकारकडे सातत्याने अनेक नोकरदारांचे प्रश्‍न येत असतात मात्र त्यातील अंगणवाडी सेविकांचा प्रश्‍न हा अत्यंत ज्वलंत व महत्वाचा आहे. अंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतनीस यांचे प्रश्न सुटावेत ही राज्यातील जनतेचीही सातत्याने मागणी आहे. सभागृहाचीही याबाबत सकारात्मक व अनुकुल अशी भूमिका आहे. सरकारने, मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांना गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांची अंगणवाडी सेविकांबाबतची भूमिका योग्य नसून सरकारने याबाबत तातडीने निर्णय जाहीर केला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडायला हवी. गंभीर स्वरुपाच्या प्रश्‍नांनबाबत उडवा उडवीची उत्तरे न देता ठोस निर्णय घ्यायला हवा.
अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत मागील आठवड्यात पुरोगामी संघटनांचा कॉ. मिलींद रानडे यांच्या नेतृत्वात महामोर्चा झाला, सरकारकडून त्यांच्या अपेक्षा आहेत. अडचणी आहेत त्या सोडवणे हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य व जबाबदारी आहे. गावात व दुर्गम भागात अंगणवाडी सेविकांचे चांगले काम व अत्यावश्यक सेवा असून त्यांच्या या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही ही शोकांतिका आहे. सरकारने तात्काळ अंगणवाडी सेविका, आशा सेविका व मदतणीस यांच्या मानधनात वाढ केली पाहिजे. मुख्यमंत्री व सरकारने संवेदनशीलतेची भूमिका घेवून तात्काळ योग्य निर्णय जाहीर केला पाहिजे.

मातंग समाजाच्या तरुणांच्या कल्याणासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा.

बाळासाहेब थोरात यांनी मातंग समाजासंदर्भातही लक्षवेधी उपस्थित केली होती, मातंग समाज हा मागासवर्गीय समाजातील अत्यंत महत्वाचा असा घटक आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या शौर्याची व देशभक्तीची परंपरा सांगणारा हा समाज आहे. या समाजातील घटकांच्या विकासासाठी सरकारने काही महत्वाचे ठोस निर्णय घ्यायला हवेत. अशी माझी व सर्व सभागृह सदस्यांची मागणी आहे. या नेत्यांची स्मारके व्हावीत, त्यांना आमचा विरोध नाही. मात्र त्या स्मारकांकडून प्रेरणा घेणे गरजेचे आहे.
मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सरकारने लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मूलभूत शिक्षण हा प्रत्येक समाजातील बालकाचा महत्वाचा हक्क असून हे मूलभूत शिक्षण सर्व समाजातील घटकांना देणे सरकारचे प्रमुख कर्तव्य आहे. मातंग समाजाबाबतचा जो अहवाल सरकारने सादर केला आहे त्यात, या अहवालावर काय कार्यवाही झाली अथवा झाली नाही याबाबत निष्कर्ष हवेत. किती कालखंडात ही तपासणी सरकार करणार आहे व तपासणीनंतर काय कार्यवाही, कृती करणार आहे हे सांगणारा कालबद्ध कार्यक्रम असायला हवा. सरकारने या सर्व गोष्टींवर आपली प्रमुख भूमिका मांडणे महत्वाचे आहे, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

पीएमपी बस मधून विनातिकीट ३०० नाही आता ५०० दंड

दिनांक १० मार्च २०२३ पासून होणार कार्यवाही संचालक मंडळाची मान्यता

पुणे- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोटार वाहन कायदा
१९८८ मधील कलम क्रमांक १७८ अन्वये दंडात्मक कारवाई करण्याच्या तरतुदीस अनुसरून रक्कम रु. ३००/- दंड वसूल
करण्यात येतो. तसेच प्रवाशांनी कोणत्याही प्रकारच्या सवलतीच्या प्रवासी पासमध्ये खाडाखोड, दुरुपयोग अशा प्रकारे
गैरप्रकारे जे प्रवासी पासचा गैरवापर करून प्रवास करताना आढळल्यास त्या प्रवाशांकडून रक्कम रु. ५००/- दंड वसूल
करण्यात येतो.
दिनांक १०/०३/२०२३ पासून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आळा व महामंडळाचे आर्थिक नुकसान होऊ
नये याकरिता मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम क्रमांक १७८ अन्वये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रक्कम
रु. ३००/- ऐवजी रक्कम रु.५००/- इतका दंड आकारणी करण्यास संचालक मंडळाने दिनांक १६/०२/२०२३ रोजीमान्यता दिली असून विनातिकीट प्रवासी रक्कम रु.५००/- दंड आकारणी दिनांक १०/०३/२०२३ पासून करण्यात येणार आहे.