Home Blog Page 1376

‘एमआयटी एडीटी’ महिला संघाची रौप्य कामगिरी:राष्ट्रीय रोईंग स्पर्धा

पुणेः तेलंगणा रोईंग संघटनेच्या हैदराबाद बोट क्लब येथे भारतीय रोईंग संघटना (आरएफआय) च्या वतीने आयोजित २४ व्या सब ज्युनियर आणि ७व्या आंतरराज्य चॅलेंजर राष्ट्रीय रोईंग चॅम्पियनशिपमध्ये येथील एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या डाॅ.विश्वनाथ कराड क्रीडा अकादमीच्या महिला संघाने रौप्य पदकाची कमाई केली आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत देशभरातील २० राज्यांच्या संघांनी सहभाग नोंदविला होता. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या महिला रोईंग संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनुष्का अर्जून गर्जे, भाग्यश्री केशव घुले, स्नेहा योगेशसिंग सोळंकी आणि नेहा गजानन बधे यांच्या संघाने ५०० मीटर स्प्रिंट प्रकारात १ :५१.३९ अशा वेळेची नोंद करताना रौप्य पदकाची कमाई केली. तर याच प्रकारात हरियाणा संघाने १:५०.५६ अशी वेळ नोंदविताना सुवर्णपदक पटकावले तर केरळ संघाला(१:५२.०५) कांस्यपदक मिळाले. राष्ट्रीय रोईंग प्रशिक्षक संदीप भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एमआयटी एडीटी’च्या महिला रोईंग संघाच्या रौप्य कामगिरीनंतर विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, प्रा.डाॅ.सुनिता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक पद्माकर फड यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

रोजगार मेळाव्यात २६२ उमेदवारांची निवड

पुणे दि. २५: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग पुणे व सिम्बायोसिस स्किल ॲण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिम्बायोसिस भवन येथे आयोजित पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात २६२ उमेदवारांची निवड करण्यात आली.

रोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील एकूण २० पेक्षा जास्त उद्योजकांनी त्यांच्याकडील विविध प्रकारची एकूण ३ हजार ६६ रिक्तपदे कळवून सहभाग दर्शविला. या पदांसाठी एक हजारापेक्षा अधिक बेरोजगार युवक-युवतींनी सहभाग नोंदविला. उपस्थित उद्योजकांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन २६२ उमेदवारांची निवड केली.

रोजगार मेळाव्याचे उद्घाटन सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलपती तथा संस्थापक अध्यक्ष डॉ. एस.बी.मुजुमदार यांच्या हस्ते झाले. मेळाव्याच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी प्रास्ताविकात मेळाव्या विषयी माहिती दिली. उद्योजक आणि उमेदवार यांच्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देत उमेदवारांना उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी मिळवून देणे हा रोजगार मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. मेळाव्यात विविध शैक्षणिक पात्रतेसाठी अधिकच्या जागा असून अनेक नामांकित उद्योजक उपस्थित असल्याची माहितीही त्यांनी दिली.
***

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

सातारा दि. २५ :- राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गिय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पर्णकुटी या समाधी स्थळावरील आयोजित भजनकार्यक्रमास उपस्थिती लावली.

यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले , विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एकोपा निर्माण करून समाजकारण आणि राजकारण कसे करायचे याची आदर्श मुहूर्तमेढ व शिकवण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतात. त्यांचे विचार , त्यांचे साहित्य हे आजही आपणा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे.
00000

बृहन्मुंबई हद्दीत ४ डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश जारी

0

मुंबई, दि. 24 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत 4 डिसेंबर 2023 पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध, मिरवणूक काढणे, मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, वाद्य बँड आणि फटाके फोडण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ, अंत्यविधी कार्यक्रम, कंपन्या, सहकारी संस्था आणि अन्य संस्था व संघटनांच्या कायदेशीर बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सामाजिक मेळावे, सहकारी संस्था तसेच अन्य संघटना यांच्या बैठका यांना या बंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार, व्यवसाय या कारणांनी होणाऱ्या जमावास यातून वगळण्यात आले आहे. तसेच जमाव करण्यात तसेच शांततापूर्ण मार्गाने मोर्चास पोलिसांनी परवानगी दिलेली असल्यास त्यासही या जमावबंदीतून वगळण्यात आले आहे, असे  पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी आदेशान्वये कळविले आहे.

नव्या लोधासह तिघांवर मोक्काची कारवाई

पुणे- घरात घुसून गोळ्या झाडून खून केल्या प्रकरणी नव्या लोधा व त्याच्या 3 साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही घटना 30 ऑक्टोबर रोजी घडली होती.

टोळी प्रमुख नवनाथ ऊर्फ नव्या सुरेश लोधा (वय 37 रा. घोरपडे पेठ), गणेश उल्हासराव शिंदे (वय 41, रा., धनकवडी), रोहीत संपत कोमकर, (वय 33 रा. गुरूवार पेठ, पुणे), अमन दिपक परदेशी (वय 29 वर्षे, रा. घोरपडे पेठ) यांना अटक करून मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घरी झोपले असताना त्यांचा घराचा दरवाजा वाजवल्यामुळे फिर्यादी यांनी घराचा दरवाजा उघडला. दरवाज्या बाहेर उभा असलेल्या नवनाथ ऊर्फ नव्या याने फिर्यादीस ‘तेरा भाई किधर हैं’ असे विचारून उसको बुला असे सांगितले.

फिर्यादी यांनी त्यांचा चुलत भाऊ अनिल यास बाहर कोई आपको बुला रहा है असे सांगितले. त्यावेळी फिर्यादी हे किचनमध्ये पाणी पिण्यास गेले.. त्यावेळी त्यांनी पाहिले की लोधा याने अनिलला काहीतरी विचारले. त्याचे उत्तर अनिलने मान हलवून नाही असे सांगितले. त्याच क्षणी नव्याने बंदुक काढून फिर्यादीचा चुलत भाऊ अनिल याच्या कपाळावर लावून गोळी झाडून त्याचा खून केला.आरोपी लोधा याच्यावर संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करून टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्यासाठी व अवैध मार्गाने जबरी चोरी किंवा दरोडा टाकणे, धमकी देणे किंवा धाक दाखवून जबरदस्ती करून बेकायदेशीर कृत्ये करणे, इतर साथीदारांसोबत खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, दुखापत करणे, घातक शस्त्र जवळ बाळगणे अशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत.त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांच्या गुन्हेगारी वर्तनामध्ये सुधारणा होत नसल्याचे दिसून आल्याने त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा-पुन्हा गुन्हेगारी केल्याने त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

दुबईला नेले नाही म्हणून पत्नीने तोंडावर मारला ठोसा ,बांधकाम व्यावसायिक पतीचा मृत्यू

पुणे पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पत्नीने केलेल्या मारहाणीत बांधकाम व्यावसायिक असलेल्या पतीचा मृत्यू झाला. घरगुती भांडणातून वाद झाल्यानंतर पत्नीने पतीच्या तोंडावर ठोसा मारला. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वानवडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला.

निखिल पुष्पराज खन्ना (वय 36) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची पत्नी रेणुका निखिल खन्ना (वय 38) यांना वानवडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, निखिल आणि त्यांची पत्नी रेणुका यांचा सहा वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. दरम्यान आज दुपारच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात रेणुकाने पतीच्या तोंडावर ठोसा मारला.

त्यानंतर तिने फोन करून सासरे असलेल्या डॉक्टर खन्ना यांना याची माहिती दिली. डॉक्टर खन्ना घरी आले आणि त्यांनी निखिल यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. आणि निखिल यांचा मृत्यू झाला होता.मयत निखिल हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आहेत. वानवडी परिसरातील एका उच्चभूमी सोसायटीत आई-वडील पत्नी असे चार जण ते राहतात. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी  रेणुकाला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे.

भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे  ‘सत्रिय ‘नृत्यपर्व’ महोत्सवात सादरीकरण

भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स : संगीत नाटक अकादमी तर्फे कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : आसाम मधील सत्रीय या शास्त्रीय नृत्य शैलीला प्रोत्साहन देण्यासाठी संगीत नाटक अकादमीतर्फे दरवर्षी शास्त्रीय ‘नृत्यपर्व’ महोत्सव गुवाहाटी आसाम येथे आयोजित करण्यात  येतो. या वर्षीच्या सत्रीय नृत्यपर्व’ महोत्सवात पुण्यातील  भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी आसाम मधील नृत्य प्रकार शिकून अतिशय सुंदर पद्धतीने सत्रीय नृत्यशैली सादर केली. 
तीन दिवस चाललेल्या या  महोत्सवात भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांच्या सादरीकरण्याला आसाम येथील अनेक मान्यवर सत्रीय नृत्यगुरु उपस्थित होते.  या सादरीकरणाला संगीत नाटक अकादमीचे सेक्रेटरी राजूदास  उपस्थित होते. आसाम मधील काही निवडक संस्था आणि आसाम मधील दोन विश्वविद्यालये यांच्या बरोबरीने आसाम बाहेरील एकमेव विद्यापीठ म्हणजे भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 
यावेळी भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थी आणि शिक्षक कलाकार यांचा सांस्कृतिक आदान-प्रदान कार्य्रक्रम तेझपूर केंद्रीय विश्वविद्यालय येथे झाला.

या सर्व कार्यक्रमात भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांबरोबर सत्रीय नृत्य शिक्षिका डॉ. देविका बोरठाकूर यांचा सहभाग आणि मार्गदर्शन होते. तसेच या प्रकल्पात   भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले.

याच बरोबर प्रगज्योतिषपूर विश्वविद्यालय गुवाहाटी आसाम येथे ‘ललित कलांचे महत्त्व आणि उपयोग’ या विषयावर  भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे यांचे विषयतज्ज्ञ म्हणून मार्दर्शनपर व्याख्यान झाले. या व्याख्यानाला प्रगज्योतिषपूर विश्वविद्यालयाचे कुलगुरु, कुलसचिव, प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

‘जागतिक कौशल्य स्पर्धा – २०२४’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. 24 : जागतिक कौशल्य स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. दर दोन वर्षांनी आयोजित होणारी ही स्पर्धा ‘जागतिक कौशल्य स्पर्धा – 2024’ यावेळी फ्रान्स (ल्योन) येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर करण्यात येणार असून स्पर्धेत निवड झालेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येतील.

23 वर्षांखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ऑलिम्पिक खेळासारखीच ही स्पर्धा आहे. या स्पर्धा पुढील अभ्यासक्रमाकरिता / क्षेत्राकरिता आयोजित केली जाणार आहे :

थ्री डी डीजिटल गेम आर्ट, ॲटो बॉडी रिपेअर, ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजी, बेकरी, ब्युटी थेरपी, ब्रिकलायींग, कॅबिनेट मेकिंग, कार पेंटींग, कार्पेंन्ट्री, सीएनसी मिलींग, सीएनसी टर्निंग, कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन वर्क, कूकिंग, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॅड (CAD), मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, मोबाईल रोबोटिक्स, पेंटिंग ॲन्ड डेकोरेटिंग, पेस्ट्रिज ॲन्ड कन्फेक्शनरी, प्लास्टरिंग ॲन्ड ड्रायवॉल सिस्टिम, प्लंबिंग ॲन्ड हिटिंग, प्रिंट मीडिया टेक्नॉलॉजी, प्रोटोटाईप मॉडेलिंग, रिफ्रिजरेशन ॲन्ड एअर कंन्डिशनिग, रिनिव्हिबल एनर्जी.

या स्पर्धेसाठीचे पात्रता निकष – जागतिक कौशल्य स्पर्धा – 2024 करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठवण्यात आला आहे. स्पर्धेमध्ये सहभागी उमेदवारांचा जन्म दि. 1 जानेवारी 2002 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच ॲडिटीव्ह मॅनिफॅक्च्युरिंग, क्लाऊड कंम्प्युटिंग, सायबर सेक्युरिटी, डिजिटल कंन्स्ट्रक्शन, इंडस्ट्रिअल डिजाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0, इन्फॉर्मेशन नेटवर्क केबलिंग, मेकाट्रॉनिक्स, रोबोट सिस्टीम इन्टीग्रेशन ॲन्ड वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 1999 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे.

फ्रान्स (ल्योन) येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 करिता इच्छुक पात्र उमेदवारांनी https://kaushalya.mahaswayam.gov.in/ या लिंकवर नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रविंद्र सुरवसे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर, 175 श्रेयस चेंबर, 1 ला मजला, डॉ. डी.एन.रोड, फोर्ट मुंबई 400001 येथे प्रत्यक्ष अथवा (022) 22626303 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

सैनिकी मुलांच्या वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात अशासकीय पदभरती

पुणे, दि.२४: पुणे शहरात पर्वती येथील सैनिकी मुलांच्या वसतिगृहात सहायक वसतिगृह अधीक्षक, सफाई कर्मचारी, माळी या पदांसाठी इच्छुक व पात्र माजी सैनिक व इतर नागरीक यांनी ५ डिसेंबर २०२३ पर्यंत आपले अर्ज सैनिकी मुलांचे वसतिगृह पर्वती पायथा, पुणे येथे सादर करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.

या तात्पुरत्या अशासकीय पदासाठी प्रत्येकी एक जागा भरण्यात येणार आहे. सहायक वसतिगृह अधीक्षक पदासाठी २४ हजार ७९ रुपये तर सफाई कर्मचारी व माळी पदावर निवड होणाऱ्या उमेदवाराला प्रत्येकी १२ हजार ४६५ रुपये मानधन देण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक शेख अब्दुल यांना भ्रमणध्वनी क्रमांक ७०२०४१०९५४ वर उमेदवारांनी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे एस. डी. (निवृत्त) यांनी केले आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या मोहिमेत आज पुन्हा ८ लाख ५७ हजार रूपयांचे प्रतिबंधित पदार्थ जप्त

पुणे, दि. २४ : अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने पुणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात ९ ठिकाणी विविध छापे टाकून ८ लाख ५७ हजार ३५५ रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी आदींचा साठा जप्त करण्यात आला असून पदार्थ साठवणूक करणाऱ्या आस्थापना सील व वाहतूक करणारे एक वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.

गेल्या तीन दिवसात पुणे विभागात ३८ ठिकाणी विविध छापे टाकुन ९ लाख ३२ हजार ३८२ रुपये किमतीचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात ८ आस्थापना सिल करण्यात आल्या असून ९ गुन्हे दाखल केले आहेत. पुणे विभागात ३६ आस्थापना सिल करण्यात आल्या असून २४ गुन्हे दाखल केले आहेत.

नागरिकांचे जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून १८ जुलै २०२३ च्या आदेशानुसार राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाकु, सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखु जन्य पदार्थावर उत्पादक, साठा, वितरण व विक्री यावर १ वर्षाकरिता बंदी घातलेली आहे.

प्रतिबंधीत गुटखा, पान मसाला इत्यादीच्या विक्रीबाबतची माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन सह आयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांनी केले आहे.

सफाई  आणि विद्युत कर्मचारी यांची सार्वजनिक उत्सवातील  भूमिका महत्त्वाची

मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग गणपती मंडळ आणि हुतात्मा बाबूगेनु मंडळ
यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई कर्मचारी आणि विद्युत कर्मचारी यांचा दिवाळीनिमित्त कृतज्ञता सन्मान
पुणे :पुण्यात सार्वजनिक उत्सव साजरे होताना काही कार्यकर्ते समोर दिसतात आणि काही पडद्यामागून काम करत असतात. जे कार्यकर्ते दिसत नाहीत त्यांचे काम मोठे आहे. उत्सव यशस्वी होतो तेव्हा सफाई कर्मचारी आणि विद्युत कर्मचारी यांची भूमिका महत्त्वाची असते.  त्यांचा सन्मान करून तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाने मोठे काम केले आहे, असे मत अप्पर पोलीस आयुक्त प्रविण कुमार पाटील यांनी व्यक्त केले.
मानाचा चौथा महागणपती श्री तुळशीबाग गणपती मंडळ आणि हुतात्मा बाबूगेनु मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महापालिकेच्या सफाई कर्मचारी,आणि  विद्युत कर्मचारी यांचा दिवाळीनिमित्त कृतज्ञता सन्मान आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार,  परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने, श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, हुतात्मा बाबूगेनु मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ पवार, नितीन पंडित विनायक कदम,दुर्गेश नवले,नितीन खेडेकर, मिलिंद होनराव गणेश घम, प्रदीप इंगळे, चकोर सुबंध, साई डोंगरे उपस्थित होते. हुतात्मा बाबुगेनू वाहनतळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, सफाई कर्मचारी आणि विद्युत विभागातील कर्मचारी हे केवळ कर्तव्य म्हणून आपले काम करत नाहीत, तर हे आपले काम आहे असे समजून मनापासून त्यांचे काम करतात. त्यांचा सन्मान आणि कौतुक केल्यामुळे कामाला उत्साह येतो.

संदीप सिंह गिल म्हणाले, सार्वजनिक रस्त्यावर आपली जबाबदारी विसरून जो कचरा आपण टाकतो, तो कचरा सफाई कर्मचाऱ्याद्वारे उचलला जातो. त्यामुळे रस्ते स्वच्छ दिसतात आणि आपल्या सर्वांचे आरोग्य देखील चांगले राहते. आपण विचार करतो की चांगला आहार आणि व्यायामामुळे आपले आरोग्य चांगले राहते, परंतु आपले आरोग्य चांगले राहण्यास सफाई कर्मचाऱ्यांचे खूप मोठे योगदान आहे. सफाई कर्मचाऱ्यांनी जर कचरा उचलला नाही तर सामाजिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे त्यांच्या कार्याचा आपण योग्य सन्मान केला पाहिजे.

हेमंत रासने म्हणाले, गणेशोत्सव कार्यकर्त्यांमुळे उत्सव चांगला होतो परंतु त्याही पेक्षा महत्वाचे सफाई कर्मचारी, विद्युत विभागातील कर्मचारी यांच्यामुळे सर्वांनाच उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करता येतो. कर्मचाऱ्यांच्या भूमिकेतून ते काम करत नाहीत, तर कार्यकर्त्यांसारखे आपले काम पार पडतात. आज त्यांचा केलेला सन्मान हा कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांचा केलेला सन्मान आहे.  नितीन पंडित यांनी प्रास्ताविक दुर्गेश नवले यांनी आभार व्यक्त केले. मिलिंद होनराव यांनी सूत्रसंचालन केले

 महिला स्टार्ट-अप्सना समर्थन देण्यासाठी बिट्स पिलानी व आदित्य बिर्ला कॅपिटल फाऊंडेशन यांचा नीती आयोगाच्या महिला उद्योजकता प्लॅटफॉर्मशी सहयोग

नीती आयोगाने प्रकाशित केलेल्या एका संशोधन अहवालानुसार, भारतात ६.३ कोटी इतके सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) आहेत. त्यांपैकी सुमारे २० टक्के उद्योग महिलांच्या मालकीचे आहेत आणि त्यांतून सुमारे २.२ ते २.७ कोटी लोकांना रोजगार मिळतो. एका अंदाजानुसार, महिलांच्या उद्योजकतेला गती दिल्यास, भारतात महिलांच्या मालकीचे आणखी तीन कोटींहून अधिक उद्योग निर्माण होऊ शकतात आणि त्यांमधून सुमारे १५ ते १७ कोटी जणांना नोकऱ्या निर्माण होऊ शकतात.

ईशान्येकडील राज्ये, राजस्थानहरयाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये ‘भारत १.० साठी महिला नवउद्योजक’ हा स्टार्ट-अप उपक्रम सुरू ~

मुंबई२४ नोव्हेंबर २०२३ : ‘पिलानी इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सोसायटी या बिट्स पिलानीच्या टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्यूबेटरने महिला उद्योजक मंचाच्या (विमेन एंटरप्रेन्योर प्लॅटफॉर्मच्या – डब्ल्यूईपी) संयुक्त विद्यमाने ‘वुमनप्रेन्योर फॉर भारत . (भारत १.० साठी महिला नवउद्योजक)हा स्टार्ट-अप उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा उपक्रम नीती आयोगाशी संबंधित आहे आणि आदित्य बिर्ला कॅपिटल फाऊंडेशन या आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या सीएसआर विभागाने याकरीता सहकार्य केले आहे. आदित्य बिर्ला कॅपिटलच्या सर्व विकास प्रकल्पांसाठी धोरणात्मक दिशा ठरविणारी आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन ही सर्वोच्च संस्था आहे. राजश्री बिर्ला या फाउंडेशनच्या मार्गदर्शक आहेत, तसेच विशाखा मुळ्येडॉ. प्रज्ञा राम आणि सुभ्रो भादुरी हे फाउंडेशनचे संचालक आहेत.

अरुणाचल प्रदेशातील इटानगरमधील दोरजी खांडू स्टेट कन्व्हेन्शन सेंटर येथे २४ नोव्हेंबर रोजी उद्योजकतेच्या माध्यमातून महिलांच्या नेतृत्वाखाली विकास साधणे‘ या विषयावर राज्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तीत या भागीदारीची घोषणा करण्यात आली. ही कार्यशाळा नीती आयोगाच्या राज्यांना मदत या अभियानाच्या अंतर्गत आणि अरुणाचल प्रदेश सरकार व महिला उद्योजक मंच यांच्यातर्फे संयुक्तपणे आयोजित करण्यात आली होती. विविध व्यवसायसरकार आणि नागरी समाजामध्ये नवकल्पनाउद्योजकता आणि सर्वसमावेशक विकास यांच्या परिसंस्था एकत्र आणून महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योजकतेद्वारे विकास साधणे या विषयावर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.

ईशान्येकडील राज्ये, राजस्थानहरयाणा आणि जम्मू-काश्मीर या प्रदेशांतील मध्यम व लहान शहरांसाठी काम करणाऱ्या किंवा खुद्द तेथील स्थानिक महिला उद्योजकांना निधी आणि इतर मदत पुरविणे हे वुमनप्रेन्योर फॉर भारत १.० या स्टार्टअपचे उद्दिष्ट आहे. यूएन-एसडीजी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या आणि त्या प्रदेशांतील व्यावसायिक वा सामाजिक आव्हाने सोडविणाऱ्या महिलांच्या नेतृत्वाखालील नफा कमावणाऱ्या व ना-नफा तत्त्वावरील स्वयंसेवी संस्थांना या उपकमाचा लाभ मिळू शकेल.

या घोषणेविषयी अधिक माहिती देताना दित्य बिर्ला कॅपिटल फाऊंडेशनच्या संचालिका  आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या सीईओ विशाखा मुळ्ये म्हणाल्या, आम्ही देशासाठी समानसर्वसमावेशक व दीर्घकालीन अशी सामाजिक व आर्थिक प्रगती साधण्यासाठी कटिबद्ध आहोत. ‘वुमनप्रेन्योर्स फॉर भारत १.० या उपक्रमाच्या माध्यमातूनदेशातील महिला उद्योजकांच्या प्रगतीला चालना देणारे एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे. संधी मिळत नसलेल्या प्रदेशांतील भारतीयांना नाविन्यपूर्ण उपायांद्वारे सेवा पुरविण्याची क्षमता बाळगणाऱ्या उद्योजकांसाठी हा उपक्रम आहे.”

बिट्स पिलानीचे कुलगुरु प्राव्हीरामगोपाल राव म्हणाले, “भारताच्या कानाकोपऱ्यातील विविधांगी लोकसंख्येला स्थानिक उद्योजकांकडून स्थानिक उपाय पुरविले जाण्याची आवश्यकता आहे. मला ठाम विश्वास आहे की नवकल्पनांच्या पुढच्या लाटेचे नेतृत्व महिला नवउद्योजिका, विशेषत: ईशान्येकडील राज्यांत राहणाऱ्या नवउद्योजिका करतील आणि त्या प्रदेशातील असाधारण स्वरुपाच्या समस्या त्याच सोडवतील. यातील काही नवकल्पना समाजासमोर आणण्यात आणि त्यांना वाढीसाठी मदत करण्यात महिला उद्योजक मंच आणि आदित्य बिर्ला कॅपिटल फाऊंडेशन यांच्याशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे.”

या घडामोडींविषयी बोलताना डब्ल्यूईपीच्या मोहीम संचालिका ॅना रॉय म्हणाल्या, “टेक-फॉर-गुड क्षेत्रात महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प धोरणात्मक स्वरुपाचा आहेउत्तम बाजारपेठ असलेल्या, प्रभाव पाडण्याची क्षमता असणाऱ्या, लैंगिक समानतेच्या राष्ट्रीय उद्दिष्टांशी अनुरुप आणि महिलांच्या माध्यमातून विकास होणाऱ्या डिजिटल स्वरुपाच्या तांत्रिक क्षेत्राशी संबंधित हा प्रकल्प आहे. विशेष विकास क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून नवकल्पनांचे नेतृत्व करणाऱ्या महिला उद्योजिका या उद्योग आणि समाज या दोन्हींसाठी लक्षणीय लाभ मिळवून देऊ शकतात, हे सिद्ध झालेले आहे.

या उपक्रमामध्ये पात्र ठरलेल्या स्टार्ट-अप्सना १० लाख रुपयांपर्यंतचा निधी उपलब्ध होईल. त्याचबरोबर पीआयईडीएसकडून इन्क्युबेशनसाठी सहकार्य, एकास एक स्वरुपाचे प्रत्यक्ष मार्गदर्शन, बाजारपेठ मिळविण्यासाठीची मदत आणि भविष्यात गुंतवणूक वाढवण्याच्या संधी, असे साह्यही या स्टार्टअप्सना दिले जाणार आहे. यामध्ये स्वारस्य असलेल्या नवोन्मेषक महिलांनी पुढील वेबसाईटवर अर्ज करावेत : https://www.f6s.com/womenpreneurs-for-bharat-1.0/apply

पुणे एसएफए चॅम्पियनशीपच्या चौथ्या दिवशी अथलेटिक्स आणि बुद्धीबळ स्पर्धांचा जोश

 अथलेटिक्स स्पर्धांच्या पहिल्या दिवशी एकूण २०७४ सहभागींनी असामान्य कौशल्य दाखवले. त्यामध्ये १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर, लांब उडी आणि मेडले रिले यांचा समावेश होता.

●   चौथ्या दिवशी बुद्धीबळ स्पर्धेत २०५ खेळाडूंचा सहभाग

●   पुण्याला लवकरच मिळणार क्रीडा क्षेत्रात पहिल्या क्रमांकाची शाळा

पुणे, २४ नोव्हेंबर २०२३ – एसएफए चॅम्पियनशीपच्या चौथ्या दिवशी श्री शिव छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अथलेटिक्स आणि बुद्धीबळाची उत्सुकता अनुभवण्यास मिळाली. आज मैदानावर सात खेळांमध्ये मिळून २०७४ खेळाडूंनी भाग घेतला. बॅडमिंटन, बास्केटबॉल, कबड्डी, कराटे, थ्रोबॉल, अथलेटिक्स आणि बुद्धीबळ या खेळांचा त्यात समावेश होता. वैविध्यपूर्म खेळांच्या या पार्श्वभूमीवर अनुभवी बास्केटबॉल प्रशिक्षक फैझान शेख यांनी एसएफए चॅम्पियनशीपचा लक्षणीय प्रभाव पडत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, एसएफएने क्रीडा क्षेत्रासाठी उत्तम प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे, जो शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आणि आवड निर्माण करेल. लहान वयातच खेळाची आवड निर्माण करून, झोनल, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी त्यांचा विकास केला जाईल.

पाचवा दिवस #SheisGold चं स्पिरीट साजरा करणारा आहे. #SheisGold हा एसएफए चॅम्पियनशीप्सचा खास उपक्रम असून त्याअंतर्गत क्रीडा क्षेत्रातील कुशल मुलींना उद्याचे (२५ नोव्हेंबर जी) चॅम्पियन्स बनवण्यासाठी सक्षम केले जाणार आहे. क्रीडा स्पर्धा नव्या उंचीवर पोहोतत असतानाच जिमनॅस्टिक आणि व्हॉलीबॉल स्पर्धांनाही सुरुवात झाली, तर बुद्धीबळप्रेमी अंतिम फेरीच्या उत्सुकतेमध्ये आहेत.

एसएफए चॅम्पियनशीप्स देशातील तरुण खेळाडूंसाठी खेळ सहजपणे उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील असून आजच्या गुणवत्तेचे उद्याच्या विजेत्यांमध्ये रुपांतर करण्याचे ध्येय आहे. स्पोर्ट्स फॉर ऑल (एसएफए) आणि व्हायकॉम१८ यांनी देशभरातील क्रीडा चाहत्यांसाठी शालेय क्रीडा स्पर्धा सहज उपलब्ध करून देण्यासाठी भागिदारी केली आहे. व्हायकॉम१८ एसएफए चॅम्पियनशीपमधील सर्वात चांगले क्षण ३ डिसेंबरपासून जिओसिनेमा, स्पोर्ट्स१८-२ आणि स्पोर्ट्स१८ खेळ वर दाखवणार आहे.

दैनंदिन वेळापत्रक, पुण्याच्या दुसऱ्या एसएफए चॅम्पियनशीपमधील प्रत्येक क्रीडा स्पर्धेचा तपशीलवार निकाल आमच्या www.sfaplay.com अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. रियल टाइम अपडेट्स, हायलाइट्स आणि एक्सक्लुसिव्ह बिहाइंड द सीन्स क्षणांसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरील आमची सोशल मीडिया चॅनेल्स फॉलो करा.

चौथ्या दिवसाचे निकाल

क्रीडा आणि क्रीडाप्रकारपदकविजेतेशाळा
 (अंडर-१७ मुले) कराटे कुमिते ४३-४८ किलो   सुवर्णवीर भोसलेसंत तुकाराम माध्यमिक विद्यालय
(अंडर-१५ मुले) कराटे कुमिते ४३-४८ किलोसुवर्णअदित हरिप्रसाद शेट्टीद ऑर्किड स्कूल
रौप्यश्लोक दिगंबर कंदगिरेपोदारइंटरनॅशनल स्कूल, चिंचवड
 ब्राँझपार्थराकेश गरियालीक्रिमसन अनिशआ ग्लोबल स्कूल, मारूंजी
ब्राँझशौर्य प्रीतम नाईकडीईएस शाळा, टिळक रोड
(अंडर-१६ मुले अथलीट्स) २००० मीटरसुवर्णअवनीश मुळेसरहद स्कूल, कात्रज
रौप्यअविनाश लोंढेकेंद्रीय विद्यालय कमांड कॅम्प
ब्राँझअथर्व शिंदेएस. व्ही. सी. एस. हायस्कूल सोलापूर
(अंडर- १६ मुली अथलेटिक्स ४०० मीटर)  GoldIngrid ManuelSt. Joseph High School, Pashan
रौप्यभूमिका सचिन मुत्यालू 
ब्राँझवैष्णवी इंगातीलोकसेवा ई स्कूल पाषाण
 (अंडर-७ मुले, बुद्धीबळ)सुवर्णतनय माहेश्वरीध्रुव ग्लोबल स्कूल, सूस गाव
रौप्यशिवांश महाजनएडयुकॉन इंटरनॅशनल स्कूल, बी
ब्राँझबन्सीकृष्णन साहूएडयुकॉन इंटरनॅशनल स्कूल, बी
(अंडर-१७  मुली) कबड्डीसुवर्ण न्यू पुणे पब्लिक स्कूल, निगडी
(अंडर-१४ मुले) कबड्डीब्राँझ आर्यन्स वर्ल्ड स्कूल भिलारेवाडी
(अंडर-१४) कबड्डीब्राँझ पीएमसी स्कूल ८३ बी मालवाडी हडपसर
(अंडर- १६ मुली) थ्रोबॉलसुवर्ण आरएमडी सिंहगड स्प्रिंग डेल स्कूल, वारजे
(अंडर- १६ मुली) थ्रोबॉलरौप्य सिंहगड शहर शाळा, कोंढवा बुद्रुक
(अंडर- १४ मुले) थ्रोबॉलसुवर्ण सिंहगड शहर शाळा, कोंढवा बुद्रुक
(अंडर- १४ मुले) थ्रोबॉलरौप्य आरएमडी सिंहगड स्प्रिंग डेल स्कूल, वारजे
(अंडर- १८ मुले) थ्रोबॉलसुवर्ण सिंहगड शहर शाळा, कोंढवा बुद्रुक
(अंडर-७) मुली स्केटिंग ४०० मीटर इनलाइनसुवर्णविदुषी पांडेद लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूल, वाघोली
रौप्यगार्गी महाजनएल्प्रो इंटरनॅशनल स्कूल, चिंचवड
ब्राँझइरा खोतविस्डम वर्ल्ड स्कूल, हडपसर
(अंडर-७ मुले) स्केटिंग ४०० मीटर इनलाइनसुवर्णअरिश कदमविद्याशिल्प पब्लिक स्कूल, कोंढवा
रौप्यध्रुव चोरडियासेंट मेरीज स्कूल, पुणे कँटोनमेंट
ब्राँझरिवांश घुलेपवार पब्लिक स्कूल
(अंडर-९ मुली) स्केटिंग ५०० मीटर इनलाइनसुवर्ण

वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या चालक – वाहक सेवकांवर होणार कारवाई

पुणे-पुणे-वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या चालक – वाहक सेवकांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा आज येथे PMPML च्या व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे. यासंदर्भात PMPML प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,’परिवहन महामंडळाकडुन पुणे, पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या ग्रामीण भागात व पी.एम.आर.डी.ए.कार्यक्षेत्रा पर्यंत
बससेवा पुरविली जात आहे. त्यामध्ये पी.एम.पी.एम.एल. व खाजगी ठेकेदाराच्या बसेसवरील चालक सेवक हे वाहतुकीच्या
नियमांचे पालन करीत नसल्याबाबत प्रवाशी नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांचेकडुन तक्रारी व सुचना प्राप्त
होत असतात या तक्रारीमध्ये प्रामुख्याने मोबाईलवर बोलुन बसेस चालविणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबविणे, धुम्रपान करणे,
रूट बोर्ड न बदलणे, लेनच्या शिस्तीचे पालन न करणे, सिग्नल तोडणे इ. तक्रारीचा समावेश आहे.
महामंडळाकडील चालक-वाहक सेवकांच्या गैरवर्तनाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारीचे निराकरण होणाच्या द्दष्टीने
महामंडळाने कार्यालय परिपत्रकाद्वारे चालक-वाहकांना सुचना दिल्या आहेत कि, बस संचलन करतांना मोबाईल फोनचा वापर
करू नये, वाहतुकीच्या नियमांचे पालन योग्यरित्या करणे, धुम्रपान करण्यात येऊ नये, बसेस बस स्टॉपवर लगत उभ्या
करण्यात याव्यात, लेनच्या शिस्तीचे पालन करणे, भरधाव वेगाने बसेस संचलन करू नये अशा विविध प्रकारच्या सुचना
दिलेल्या आहेत.तरी यापुढे वरील नियमांचे पालन न केल्यास सदरील तक्रारीचे शहानिशा करून संबंधित चालक-वाहकांवर
निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे महामंडळाकडुन कर्मचाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत.

निरोगी, आनंदी जीवनासाठी शरीर, मन व चेतनेचा विकास गरजेचा-आचार्य परम आलय 

पुणे : “शरीर व मनाची शक्ती सदासचेतन ठेवण्यासाठी साधना महत्वाची आहे. समतोल आहार, योग्य व्यायाम व ध्यानधारणा, स्वतःच्या शरीरसंपत्तीचे रक्षण करत मन आणि मेंदूचा विकास झाला, तर निरोगी व आनंदी जीवनाचा मार्ग सापडतो. त्यातून आपले जीवन अधिक सुंदर होते. आपल्या जगण्याचे नेमके ध्येय काय, याचा शोध आपण घेतला पाहिजे,” असे प्रतिपादन पूज्य आचार्य परम आलय जी यांनी केले.
सन टू ह्युमन फाउंडेशनच्या वतीने वर्धमान सांस्कृतिक भवन येथे सहा दिवसीय ‘नए दृष्टीकोन वाला शिबीर’ आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात हजारो पुणेकरांनी सहभाग घेत गुरुजींच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. या शिबिराच्या समारोपाप्रसंगी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने पूज्य परम आलय यांना ‘दी सेंट ऑफ मॉडर्न इंडिया-२०२३’ प्रदान करण्यात आला. प्राचीन संस्कृती आणि आधुनिक शास्त्राचा मेळ घालत समाजपरिवर्तन, मनःशक्तीचा प्रसार करण्यासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी परम आलाय गुरुजींचा सन्मान करत त्यांचे आशीर्वाद घेतले. प्रसंगी माँ मैत्रेयी, उद्योजक राजकुमार सांकला, रमेश गांधी, साधक तारिणी दीदी आदी उपस्थित होते.
परम आलय जी म्हणाले, “सूर्यकिरणे, पृथ्वीची प्रदक्षिणा, सौरमंडळात होणारे विविध बदल आपल्या जीवनाला दिशा व ऊर्जा देणारे आहेत. आपल्या नाश्त्यात, जेवणात स्वयंशिस्त असायला हवी. मुलाच्या बालपणापासूनच आपण त्यांना ऐहिक सुखाचें शिक्षण देतो व भरमसाठ संपत्ती गोळा करतो. हा हव्यास कशासाठी, हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. सुविधा आणि साधना यातला फरक समजून घ्यायला हवा. मन आणि मेंदू यांच्यातील संबंध उलगडून दोन्हीचा विकास करण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी साधना करणे गरजेचे आहे. तणाव, दडपण, चिडचिड, भय, कामवासना, क्रोध, शारीरिक व्याधी, झोपमोड, विचारमग्नता यापासून सुरू राहण्यास साधना उपयोगी ठरते.”

माँ मैत्रेयी म्हणाल्या, “भगवान कृष्ण, ऋषी पतंजली यांनी जीवनाचे मूलाधार सूत्र दिले आहे. मात्र, आपण भौतिक सुखांच्या मागे लागून जीवनाचा मूळ उद्देश विसरलो आहोत. आपण केवळ पैसे कमवण्याच्या मागे लागलो असून, स्वतःच्या शरीरसंपत्तीचा विसर पडला आहे. संसाराच्या गाड्यात इतके बुडत चाललोय की, आपल्याला स्वतःसाठी जगायला वेळ नाही. बदलती व चुकीची जीवनशैली अंगीकारल्याने देहरूपी संपत्तीला अनेक आजार, व्याधी व समस्यांनी ग्रासले आहे. यातून सुटका करून व्याधीमुक्त, आनंदी जीवन जगण्यासाठी स्वतःला वेळ देण्यासह ऊर्जादायी आहार घेण्याची गरज आहे.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टी परम आलयजी यांनी दिली आहे. त्यांच्या शिबीरात सहभागी झाल्यापासून माझ्या शारीरिक व मानसिकतेत आमूलाग्र बदल झाला आहे. ‘सूर्यदत्त’ यंदा रौप्य महोत्सव साजरा करत आहे. गेल्या २५ वर्षांत ‘सूर्यदत्त’ने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे, सकारात्मक जीवनाचे शिक्षण दिले आहे. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमासह जीवनमूल्यांचे, परिवर्तनाचे शिक्षण देण्याची दिशा मिळाली आहे. भविष्यात विद्यार्थ्यांचा वेळ वाया न घालवता, त्यांना त्यांचा आत्मपरिचय करून देत त्यांचे शरीर व मन चांगल्या रीतीने विकसित करण्यासाठी विविध प्रकारची सत्रे आयोजिली जाणार आहेत.”
“गुरुजींचे मार्गदर्शन हे प्रवचन नव्हे, तर प्रयोगातून सिद्ध केलेला विचार आहे. व्यवहार्य मार्गात शारीरिक आणि मानसिक समस्यांवर मात देण्यासाठी काय काय करावे, यासाठी हे शिबीर उपयुक्त ठरले. निवासी शिबिरात स्वतः सहभागी होणार असून, इतरांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. सत्रानंतर दिलेल्या साध्या आरोग्यदायी अल्पोपहारातून शरीराला आवश्यक प्रथिने, कर्बोदके, ऊर्जा आदी घटक मिळतात. प्रेम व आनंदमय वातावरणात झालेल्या या शिबिरातून जीवनाला सकारात्मक ऊर्जा मिळाली आहे. तसेच विद्यार्थ्यांना घडवताना कोणत्या गोष्टी कराव्यात, याचाही मार्ग सापडला आहे. त्यासाठी सन टू ह्युमन फाउंडेशनसोबत सामंजस्य करण्यात आला आहे. ५० मुलांना घेऊन गुरुजींच्या आश्रमात निवासी शिबिरासाठी जाणार आहोत,” असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.————————–आजवरचे ‘दी सेंट ऑफ मॉडर्न इंडिया-२०२३’ 
यापूर्वी ‘दी सेंट ऑफ मॉडर्न इंडिया-२०२३’ हा पुरस्कार राजयोगिनी दीदी जानकीजी, राजयोगिनी दिदी हरिदया मोहिनीजी, स्वामी दयानंद सरस्वतीजी, परमपूज्य श्री ऋषीप्रभाकर गुरुजी, योगगुरू डॉ. बीकेएस अय्यंगार, आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, सद्गुरू जगदीश वासुदेवजी, अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकरजी, योगगुरू बाबा रामदेव, पूज्य गुरूदेव श्री राकेश भाई, गुरुदेव श्री नयपरमसागरजी महाराज, ब्रह्मर्षी गुरुवानंद स्वामीजी, सुधांशु महाराज जी, परमपूज्य डॉ. विष्णू महाराज पारनेरकरजी, स्वामी चिदानंद सरस्वतीजी, पूज्य आचार्य चंदना जी माँ, आचार्य स्वामी श्री शिव मुनीजी, सुंदरलाल बहुगुणा, डॉ. मोहन धारियाजी, मधू पंडित दासजी, बाबा आमटे, शिव शाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. सत्यवृत शास्त्री, गुरुजी ज्ञानवत्सल स्वामीजी यांना प्रदान करण्यात आला आहे.