Home Blog Page 1369

‘क्रिकेटवर चित्रपट करणे हा माझ्या बकेट-लिस्टचा भाग आहे!’ : आयुष्मान खुराना


बॉलीवूड स्टार आयुष्मान खुराना याचे क्रिकेटवरील ज्ञान आणि गहन निरीक्षण या विश्वचषकात दिसून आले आहे! त्याने जगभरातील क्रिकेट चाहत्यांशी संपर्क साधला आणि दाखवून दिले आहे की तो या खेळाचा खुप मोठा फ़ॉलोवर आहे! त्याने हे देखील उघड केले आहे की तो पंजाबमधील अंडर-19 जिल्हास्तरीय टीम मध्ये क्रिकेटपटू होता आणि तो या खेळाला खूप आवडीने फॉलो करतो.

आयुष्मान लवकरच क्रिकेटवर चित्रपट करण्यास उत्सुक आहे. तो म्हणतो, “क्रिकेटवर चित्रपट करणे हा माझ्या बकेट-लिस्टचा एक भाग आहे आणि मला आशा आहे की ती लवकरच पूर्ण होईल! मला असे वाटते की जेव्हाही असा चित्रपट होईल तेव्हा माझे क्रिकेट कौशल्य खऱ्या अर्थाने उपयोगी पडेल.”

अनेक दिवसांपासून अशी अफवा पसरली आहे की आयुष्मान खुराना दिग्गज भारतीय क्रिकेट कॅप्टन   सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये अभिनय करणार आहे जे नक्कीच देशाचे लक्ष वेधून घेईल. त्यांच्या या विधानामुळे या अटकळांना आणखीच खतपाणी मिळते कारण या मोठ्या प्रोजेक्ट ची घोषणा लवकरच होण्याची अपेक्षा आहे!

भोसलेनगरमध्ये बांधकाम व्यावसायिकाचे घर फोडून साडेबत्तीस लाखाचा ऐवज लंपास केला.

पुणे- चतुःश्रृंगी पोलिसांच्या हद्दीतील बंगला नं.६२, मिथीला बंगला, अशोकनगर, रेंजहिल रोड, भोसलेनगर, पुणे येथे दिनांक २५/११/२०२३ रोजी रात्री १०/३० वा. ते दि.२६/११/२०२३ दुपारी १२/०० वा.चे दरम्यान साडेबत्तीस लाखाची घरफोडी झाली आहे. या संदर्भात येथील ५२ वर्षे वयाच्या रहिवाश्याने फिर्याद नोंदविली असून चतुःश्रृंगी पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
यातील फिर्यादी यांचा राहता बंगला कुलुप लावुन बंद असताना, कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे राहते बंगल्याच्या कीचनच्या खिडकीचे स्लायडींग कशाचे तरी सहाय्याने उघडुन, त्यावाटे आंत प्रवेश करून, दुस-या मजल्यावरील बेडरूम मधील वॉर्डरोब उचकटुन, दोन लॉकर मधील कपाटातील ९,००,०००/- रू रोख रक्कम डायमंड व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण ३२,५०,०००/- रूपये किमतीचा ऐवज घरफोडी चोरी करून नेला. सहायक पोलीस निरीक्षक, नरेंद्र पाटील ९०११७१९१०० याप्रकरणी पुढील तपास करत आहेत .

पुण्यात घरफोड्या आणि जबरी चोऱ्या:मध्यप्रदेशातील भुरिया टोळीला मोक्का

पुणे -येथे घरफोडी व जबरी चोरी करणारे परप्रांतीय सुंदरसिंग भायानसिंग भुरीया (टोळी प्रमुख) व त्यांचे इतर ०३ साथीदार यांचेवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.०६/१०/२०२३ रोजी आयोध्यानगरी, भाऊ पाटील रोड, बोपोडी, पुणे येथे फिर्यादी हे सिक्युरिटी गार्ड म्हणुन काम करीत असताना, यातील नमुद इसम१) सुंदरसिंग भयान सिंग भुरीया, वय-२५ वर्षे, रा. ग्राम पिपराणी, थाना तांडा, तहसिल कुक्षी, जि. धारा, मध्य प्रदेश (टोळी प्रमुख) २) मुकेश ग्यानसिंग भुरीया, वय-२७ वर्षे, रा. ग्राम पिपराणी, थाना तांडा तहसिल कुक्षी, जि. धारा, मध्य प्रदेश ३) सुनिल कमलसिंग आलावा, वय-२८ वर्षे, रा. ग्राम २२ वर्षे, रा. गांव तहसिल कुक्षी, थाना बागमेर, जि. धारा, मध्य प्रदेश राज्य ४) हरसिंग वालसिंग ओसनिया, वय-२२ वर्षे, रा. गांव तहसिल कुक्षी, थाना बागमेर, जि. धारा मध्य प्रदेश (टोळी सदस्य) यांनी संगनमत करुन, फिर्यादी यांना धक्का-बुक्की करुन जबरदस्तीने फिर्यादी यांचेकडील २१००/- रुपये रोख रक्कम चोरी करुन घेवुन गेले. त्याबाबत फिर्यादी यांनी खडकी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ३७४/२०२३ भा.द.वि. कलम ३९२,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्याचे तपासा दरम्यान अटक करण्यात आली आहे. सुंदरसिंग भयानसिंग भुरीया आणि त्याच्या साथीदारांची पुर्व रेकॉर्ड पाहणी करता त्याने चोरी करणे, घरफोडी करणे व जबरी चोरी करणे असे गंभीर गुन्हे केलेले असुन, त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असुन बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिसांचाराचा वापर करुन किंवा हिंसाचार करण्याची धमकी देवुन किंवा धाकदपटशा दाखवुन किंवा जुलुम जबरदस्ती करुन किंवा अन्य अवैद्य मार्गाने आपले बेकायदेशीर कृत्य चालु ठेवुन संघटना किंवा टोळी म्हणुन संयुक्तपणे गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला असुन त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्याचे वर्तनात सुधारणा होत नसलेने त्यांनी पुन्हा-पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.दाखल गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपीनी संघटीतरित्या सदरचा गुन्हा केल्याचे निदर्शनास आल्याने प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२), ३ (४) चा अंतर्भाव करणे कामी खडकी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,राजेंद्र सहाणे यांनी पोलीस उप- आयुक्त, परि-४, पुणे शहर, शशिकांत बोराटे यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रदेशिक विभाग, पुणे रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रकरणाची छाननी करुन खडकी पोलीस स्टेशन येथे गु.नं. ३७४/२०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३(१) (ii)३ (२), ३ (४) प्रमाणेचा अंतर्भाव करण्याची अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर, श्रीमती. आरती बनसोडे ह्या करीत आहेत
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, तत्कालीन पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, शशिकांत बोराटे, सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे, श्रीमती आरती बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री.मानसिंग पाटील, पोलीस उप-निरीक्षक, वैभव मगदुम, संतोष भांडवलकर, सर्वेलन्स पथकाचे पोलीस अंमलदार, रमेश जाधव, महिला पोलीस अमंलदार, किरण मिरकुटे व स्वाती म्हस्के यांनी केली आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ९० वी कारवाई आहे.

मेडीबडी आणि आदित्य बिर्ला फायनान्सने हाऊसिंग फायनान्स ग्राहकांसाठी सुरु केला एक्सक्लुसिव्ह हेल्थकेयर प्लॅन

0

पुणे- 27 नोव्हेंबर2023:  भारतातील सर्वात मोठा डिजिटल हेल्थकेयर प्लॅटफॉर्म, मेडीबडी आणि हाऊसिंग फायनान्समधील एक आघाडीची कंपनी, आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने एकत्र मिळून एबीएचएफएलच्या ग्राहकांसाठी एक्सक्लुसिव्ह हेल्थकेयर प्लॅन सुरु केला आहे. मेडीबडीच्या एका विशेष प्लॅनमार्फत ग्राहकांना परवडण्याजोग्या आणि सहज उपलब्ध होऊ शकतील अशा आरोग्य देखभाल सेवा प्रस्तुत करणे या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट आहे.

मेडीबडी आणि आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स यांच्या दरम्यानच्या सहयोगाने एक अफिनिटी पार्टनरशिप स्थापित केली आहे. या फ्रेमवर्कमध्ये एबीएचएफएलच्या ग्राहकांना पोर्टलवर साइन इन केल्यावर या विशेष प्लॅनचे लाभ मिळवता येतील. एबीएचएफएलच्या गृहकर्ज सेवांव्यतिरिक्त हा अजून एक अतिरिक्त लाभ ग्राहकांना मिळेल. मेडीबडी खूपच कमी किमतीत, फक्त २९९ रुपयांमध्ये, आरोग्य देखभालीच्या विशेष सेवा प्रदान करेल, ज्यामध्ये ओपीडी, लॅब टेस्ट्समध्ये १००० रुपयांचे लाभ, हेल्थ पॅकेजेस आणि फार्मसीवर होणाऱ्या खर्चावर ५०० रुपयांची सूट यांचा समावेश आहे. मेडीबडी एबीएचएफएलचे एकमेव आणि विशेष हेल्थकेयर पार्टनर आहेत. मेडीबडी प्लॅन सर्व एबीएचएफएल ग्राहकांना त्यांच्या पोर्टलवर एक डिफॉल्ट ऑफरिंग म्हणून अतिशय सहजपणे उपलब्ध करवून दिला जाईल. या भागीदारीच्या अटी व शर्ती एबीएचएफएलच्या ग्राहकांची सुविधा डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आल्या आहेत.

या भागीदारीबद्दल मेडीबडीचे सहसंस्थापक  सीईओ श्री सतीश कन्नन यांनी सांगितले, आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्ससोबत आमच्या भागीदारीने आम्हाला त्यांच्या ग्राहकांना आमचे अनोखे हेल्थकेयर लाभ प्रदान करण्यासाठी सक्षम बनवले आहेया भागीदारीच्या माध्यमातून आम्ही आमच्या सेवा अजून अनेक ग्राहकांपर्यंत घेऊन जाऊ इच्छितोत्यांना परवडण्याजोग्या दरामध्ये उच्च दर्जाच्या आरोग्य देखभाल सेवा देऊ इच्छितोही भागीदारी मेडीबडीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहेआघाडीच्या हाऊसिंग फायनान्स कंपनीसोबत हे आमचे पहिले व्हेंचर आहेआम्हाला खात्री आहे कीही भागीदारी दोन्ही कंपन्यांसाठी लाभदायक ठरेल.”

भारतात असे अनेक लोक आहेत ज्यांना उच्च दर्जाच्या आरोग्य देखभाल सेवा मिळू शकत नाहीत, त्यामुळे गरजा आणि त्या पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सेवांदरम्यान खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. या विशेष प्लॅनसह, मेडीबडी आणि आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स परवडण्याजोग्या आरोग्य देखभाल सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधील आहेत. खासकरून ज्यांना महागड्या प्राथमिक आरोग्य देखभाल सेवा सहजपणे मिळू शकत नाहीत अशा ग्राहकांपर्यंत आपल्या सेवा पोहोचवणे त्यांचे उद्दिष्ट आहे.

महिंद्राने ऍग्रोव्हिजन नागपूर येथे CNG ट्रॅक्टरचे अनावरण केले

नागपूर, 27 नोव्हेंबर 2023: भारतातील आघाडीचा ट्रॅक्टर ब्रँड, महिंद्रा ट्रॅक्टर्सने त्याच्या लोकप्रिय युवो ट्रॅक्टर प्लॅटफॉर्मवर, नागपूर येथील ऍग्रोव्हिजन येथे आपल्या पहिल्या CNG मोनो इंधन ट्रॅक्टरचे अनावरण केले. मध्य भारतातील सर्वात मोठा ऍग्रो समिट नागपुरात सुरू आहे. या चार दिवसीय शिखर परिषदेच्या उद्घाटनाच्या दिवशी या ट्रॅक्टरचे अनावरण झाले. यावेळी भारत सरकारचे रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी उपस्थित होते.

CNG-चलित वाहने विकसित करण्यात आपल्या व्यापक कौशल्याचा लाभ घेत, महिंद्र उत्सर्जन नियंत्रण, कार्यप्रदर्शन आणि ऑपरेशनल खर्च कार्यक्षमतेला प्राधान्य देते. चेन्नई येथील महिंद्रा रिसर्च व्हॅली येथे विकसित आणि चाचणी केलेले, नवीन महिंद्रा सीएनजी ट्रॅक्टर डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरच्या बरोबरीने उर्जा आणि कार्यप्रदर्शन देते. तसेच शेतीसाठी पर्यायी इंजिन तंत्रज्ञानामध्ये नवीन बेंचमार्क सेट करते.

विशेष म्हणजे पर्यावरणपूरक CNG ट्रॅक्टर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत जवळजवळ 70% ने उत्सर्जन कमी करते. कमी इंजिन कंपने आवाज पातळी कमी करण्यात योगदान देतात. हे डिझेल ट्रॅक्टरपेक्षा 3.5db कमी मोजतात. ही सुधारणा केवळ विस्तारित कामाचे तास आणि इंजिनचे आयुष्य सुलभ करते असे नाही तर ऑपरेटरला आरामाची देखील खात्री देते, शेती आणि बिगरशेती दोन्ही अनुप्रयोगांची पूर्तता करते.

सीएनजी तंत्रज्ञान असलेला हा ट्रॅक्टर सध्याच्या डिझेल ट्रॅक्टरच्या क्षमतेशी जुळणारे विविध कृषी आणि वाहतूक अनुप्रयोग हाताळतो. महिंद्राच्या CNG ट्रॅक्टरमध्ये प्रत्येकी ४५ लिटर पाण्याची क्षमता असलेल्या चार टाक्या आहेत, किंवा २४ किलो गॅस ऑन-बोर्ड, 200-बार दाबाने भरलेले आहेत. डिझेल ट्रॅक्टरपेक्षा प्रति तास 100 रुपयांची अपेक्षित बचत त्याचे आर्थिक आकर्षण आणखी अधोरेखित करते.

बाजारातील तयारी आणि या अग्रगण्य तंत्रज्ञानाला मिळालेल्या प्रतिसादाचे सखोल मूल्यांकन केल्यानंतर महिंद्राने सीएनजी ट्रॅक्टर लॉन्च करण्याचे ठरवले.

– उच्चभ्रू ज्येष्ठांना ओढले जातेय जाळ्यात:परदेशातील ‘शुगर डॅडी’ची संकल्पना पुण्यात रुजू पाहतेय

पुण्यातही या शुगर डॅडीचा ट्रेंड वाढत आहे.
पुणे हे शिक्षणाचे आणि रोजगाराचे हब आहे. येथे मोठ्या प्रमाणात तरुणी शिक्षणसाठी येतात. यामध्ये त्या शुगर डॅडीचा अशा रिलेशनशिपमध्ये, शुगर बेबी बहुतेकदा अशा मुली असतात ज्यांना पैसा किंवा विलासी जीवन आवडते. पुण्यातील ज्येष्ठाना त्या जाळ्यात ओढू पाहत आहेत. त्यासाठी ज्येष्ठानी आणि घरातल्या सदस्यांनी सावध राहावे.

पुणे: शिक्षणासाठी पुण्यात आलेली पंचवीस वर्षीय करिना पुण्यातील एका उच्चभ्रू ज्येष्ठ जोडप्यांच्या घरात ‘पेयिंग गेस्ट’ म्हणून राहत होती. या ज्येष्ठ दांपत्याची मुले परदेशात सेटल झालेली. परंतु, करीना घरभाडे देत होती ना तिचा वैयक्तिक कुठला खर्च स्वतःच्या पैशातून करत होती. हा खर्च तिचा घरमालक असलेला 75 वर्षीय ज्येष्ठ (प्रियकर) करत होता. थोडक्यात दोघे रिलेशन मध्ये होते. याची कुणकुण लागताच पुरावे गोळा करण्यासाठी त्या ज्येष्ठाच्या पत्नीने स्विफ्ट डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत घेतली आणि सत्य समोर आले. प्रकरण पोलिसांत जाणार होते पण आपलीच इज्जत जाईल म्हणून घरातील सदस्यांनी या प्रकरणावर पडदा टाकला. पुण्यातील ही एक सत्य घटना असून हा सर्व प्रकार दुसरे तिसरे काही नसून ‘शुगर डॅडी’ हा आहे.

‘शुगर डॅडी’ म्हणजे आपली हौस – मौज (आर्थिक, शारीरिक) भूक भागवण्यासाठी ज्येष्ठ व्यक्तीच्या सोबत डेटिंग, शरीरसंबंध ठेवणाऱ्या तरुणी या जेष्ठांना शुगर डॅडी म्हणतात. आर्थिक मोबदला देऊन तरुणींकडून आपली भावनिक व शारीरिक गरज भागवनारे ज्येष्ठ नागरिक असतात. तसेच अशा तरुणींना शुगर बेबी असे म्हटले जाते. हे नाते ठराविक काळासाठी असते. ही संकल्पना खरी पाश्चात्य देशांमध्ये आहे. पण, सध्याच्या बदलत्या काळात, बदलत्या नातेसंबंधात ही संकल्पना पुण्यासारख्या शहरातही मूळ धरू पाहत आहे. परंतु यामध्ये शिक्षण किंवा कामाच्या निमित्ताने पुण्यात येणाऱ्या तरुणी अशा शुगर डॅडीच्या शोधात असून त्यांना जाळ्यात ओढू पाहत आहेत.

पुण्यातील स्विफ्ट डिटेक्टिव्ह एजन्सीकडे अशा शुगर डॅडींची माहिती काढण्यासाठी घरातील ज्येष्ठ महिला येत आहेत. काहींमध्ये तर या तरुणीचा उद्देश हा ज्येष्ठाना जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक तसेच त्यांची प्रॉपर्टी देखील हडपण्याचा डाव असल्याची माहिती स्विफ्ट डिटेक्टिव्ह एजन्सीच्या संचालिका प्रिया काकडे यांनी दिली. यावरून हा प्रकार किती गंभीर आहे याची माहिती कळते.

पुण्यात अशा श्रीमंत, सधन ज्येष्ठ जोडप्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बहुतेक जोडप्यांची मुले परदेशांत सेटल झाली आहेत. ही ज्येष्ठ जोडपे देखील नोकरीतून निवृत्त झालेली असतात. त्यांचे हक्काचे घर किंवा बंगला असतो. तसेच त्यांची अनेक घरे असतात. मग, अशा ज्येष्ठाच्या शिक्षण किंवा कामाच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या तरुणी शुगर बेबी बनतात. गडगंज संपत्ती पाहून अशा ज्येष्ठाना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते. यामागे त्यांचा हेतू हा पैसे काढण्याबरोबरच त्यांची संपत्ती हडप करण्याचाही असतो.

यामध्ये त्या त्यांच्यापेक्षा अनेक वर्षांनी मोठ्या पुरुषांसोबत (शुगर डॅडी) डेटवर जातात. त्या बदल्यात त्यांच्याकडून पैसे आणि विविध सुविधा घेतल्या जातात. ते त्यांच्या शुगर डॅडीसह इतर देशांच्या सहलीला देखील जातात, महागड्या भेटवस्तू मिळवतात, सुट्टीवर जातात आणि शारीरिक संबंध देखील ठेवतात.

या प्रकारचे नाते का तयार होते?
हे बहुतेक ते लोक असतात ज्यांचे वैयक्तिक जीवन एकाकी असते. शुगर डॅडी किंवा शुगर बेबी शोधण्यासाठी एक विशेष वेबसाइट आहे जी 2023 पासून अधिक लोकप्रिय होत आहे. अशा डेटिंग साइटला शुगर डॅडी साइट म्हणतात. अनेकदा या प्रकारच्या नातेसंबंधात, दोन्ही भागीदार त्यांच्या गरजेनुसार नाते तयार करतात, जे पारंपारिक डेटिंगपेक्षा पूर्णपणे वेगळे असते.

बनू पाहतोय व्यवसाय
अनेकदा अशे नाते जास्त काळ टिकत नाही. कधी कधी चांगल्या शुगर डॅडीच्या शोधात शुगर बेबी पहिल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते. याचा अर्थ हा संबंध एखाद्या व्यवसायाप्रमाणे केला जातो, जो अल्पकालीन असतो ज्यामध्ये नेहमी चांगल्या संधी आणि नातेसंबंधांचा शोध असतो.

(अधिक माहितीसाठी संपर्क – प्रिया काकडे 78418 77478)

समाज कल्याण विभागामार्फत ‘वॉक फॉर संविधान’ चे उत्साहात आयोजन

पुणे, दि. २७: सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय पुणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थाम बार्टी व पुणे शहरातील विविध सामाजिक संघटनांमार्फत संविधान दिनानिमित्त ‘वॉक फॉर संविधान’ रॅलीचे रविवारी (दि. २६) उत्साहात आयोजन करण्यात आले.

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या‍ भारतातील पहिली मुलींची शाळा ही ऐतिहासिक वास्तू भिडेवाडा येथून संविधान रॅलीची सुरूवात करण्यात आली. यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या उपसचिव श्रीमती क्रांती खोब्रागडे, समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे, उपजिल्हाधिकारी तथा बार्टीच्या विभागप्रमुख श्रीमती स्ने्हल भोसले, राज्य शासनाचे माजी सचिव ओ.डी.तायडे आदी उपस्थित होते.

यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. रॅलीचा भिडेवाडा येथून प्रारंभ होऊन लाल महाल, फडके हौद, दारूवाला पूल, १५ ऑगस्ट चौक, जूनी जिल्हा परिषद मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान ससून रूग्णायलयासमोर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून समारोप करण्यात आला.

या रॅलीमध्ये समाज कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत वसतिगृहे, समाजकार्य महाविद्यालये, पुणे शहरातील महाविद्यालयांमधील विद्यार्थी, सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघटनांचे सदस्य, तृतीयपंथीयांसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था व तृतीयपंथी व्यक्ती आदींनी सहभाग घेतला.

यावेळी यशदाचे संशोधन अधिकारी बबन जोगदंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा विभागप्रमुख बार्टी श्रीमती शुभांगी पाटील, विशेष अधिकारी समाज कल्याण मल्लिनाथ हरसुरे, प्रकल्प अधिकारी बार्टी शितल बंडगर, सतीश गायकवाड, शहरातील महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते.
000

विभागीय आयुक्त सौरभ राव संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची पाहणी ३० नोव्हेंबर रोजी करणार

पुणे, दि. २७: छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२४ अंतर्गत भारत निवडणूक आयोगाने पुणे विभागासाठी मतदार यादी निरीक्षक (इलेक्टोरल रोल ऑब्झर्व्हर) म्हणून विभागीय आयुक्त सौरभ राव यांची नियुक्ती केली असून ते ३० नोव्हेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम कामकाजाची पाहणी करणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. या अनुषंगाने मतदार यादी निरीक्षक यांनी संपूर्ण मोहिमेदरम्यान अधिनस्त जिल्ह्यांना किमान ३ भेटी देणार आहेत.

या कार्यक्रमांतर्गत श्री. राव हे पुणे जिल्ह्यातील विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेणार असून जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना आणि नागरिकांना मतदार नोंदणीबाबत समस्या असल्यास त्यांनी गुरुवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पाचव्या मजल्यावरील सभागृहात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
0000

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर पुलाचे गर्डर बसविण्यासाठी पुणे वाहिनीवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार

पुणे, दि. २७: मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर कि.मी. ३३/८०० येथे खोपोली ते पालीफाटा (एन.एच.१६६ डी) या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाचे गर्डर बसविण्याचे काम २८ नोव्हेंबर रोजी करण्याचे नियोजन असून या लांबीत पुणे वाहिनीवरील वाहतूक दुपारी १२ ते ३ वा. या कालावधीत पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक द्रुतगती मार्गाच्या मुंबई वाहिनीमधून अंदाजे १ कि.मी. लांबीसाठी पुण्याच्या दिशेने प्रतिबंधित वेगाने वळविण्यात येणार आहे. तसेच याच कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सदर लांबीत नेहमीप्रमाणे मुंबईच्या दिशेने सुरु राहील. काम पूर्ण झाल्यावर दुपारी ३ वाजता मुंबईहुन पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा पुणे वाहिनीमधून सुरु करण्यात येईल.

या कालावधी दरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ९८२२४९८२२४ वर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर सपंर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
0000

सुनील महाजन यांची पुन्हा 5 वर्षासाठी अध्यक्षपदी निवड

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

पुणे:अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोथरूड शाखेची दिनांक 26 /11 /2023 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड कलादालन येथे वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेला मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर हे निवडणूक निरीक्षक म्हणून उपस्थित होते. कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वसाधारण सभा झाली. या सभेला बहुसंख्य सभासद उपस्थित होते. या सभेमध्ये सन 2023 ते 2028 ह्या कालावधी साठी कार्यकारणी आणि पदाधिकारी यांची नियुक्ती एकमताने करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकारी
अध्यक्ष – सुनील महाजन
उपाध्यक्ष -समीर हंपी
प्रमुख कार्यवाह -सत्यजीत धांडेकर
कोषाध्यक्ष -दीपक गुप्ते
कार्यकारणी सदस्य– प्रथमेश कदम ,डॉ.वासंती जोशी, अभिषेक महाजन, गिरीश गोडबोले, दीपक पवार ,केतकी बोरकर, मदन गायधने ह्या सर्वांची सन 2023 ते 2028 ह्या कालावधी साठी एकमताने निवड झाली.

‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात दीपोत्सव: तब्बल एक लाख दिव्यांनी सजले मंदिर

पुणे : मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत लावण्यात आलेल्या एक लाख दिव्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा परिसर उजळून गेला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लक्ष लक्ष दिव्यांनी मंदिर प्रकाशले होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिराचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दीपोत्सवाचे मनोहारी दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबतच मोबाईल कॅमे-यामध्ये कैद करण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली.

संविधान टिकवायचे असेल तर भाजपाचा संपूर्ण पराभव होणे गरजेचे- सुभाष वारे, संविधान अभ्यासक

पुणे– पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ७४ व्‍या संविधान दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन उपस्थित सर्वांनी केले व कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी ज्येष्ठ संविधान अभ्यासक प्रा. सुभाष वारे यांचे व्‍याख्यान आयोजित करण्यात आले होते.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत हालआपेष्ठा सहन करून शिक्षण पूर्ण करून बॅलिस्टर पदवी घेतली. त्यानंतर भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधानाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी दिली व त्यानुसार त्यांनी अहोरात्र कष्ट करून २ वर्षे ११ महिने व २६ दिवसांनी म्हणजे २६ नोव्‍हेंबर १९४९ रोजी संविधानाचा मसुदा राष्ट्रपतींना सुपूर्त केला.’’   

     यावेळी बोलताना प्रा. सुभाष वारे म्हणाले की, ‘‘आगामी २०२४ च्या निवडणुकीत संविधान टिकवायचे असेल तर भाजपाचा संपूर्ण पराभव होणे अत्यंत गरजेचे आहे. संविधान म्हणजे जीवंत काँग्रेस चळवळीचा आदर्श आहे. संविधान दिन साजरा करण्याचा खरा हक्क काँग्रेस पक्षाचाच आहे. भारतातील सरंजामशाही, जाती पाती, पुरोहित वाद यापासून स्वातंत्र्य हवेच होते परंतु इंग्रजांच्या गुलामगीरीतून मुक्तता व्‍हावी यासाठी प्रयत्न व्‍हायला हवे अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धारणा होती. अस्पृश्यतेच्या घटनेबाबत १७ वे कलम चवदार तळ्याच्या ठिकाणापासून सुरू झाले. शैक्षणिक आरक्षण, शासकीय नोकऱ्यांचे आरक्षण याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी योग्यरित्या आखणी केली आहे. सामान्य माणसाने आपल्याशी निगडीत प्रश्नांना प्राधान्य देवून उद्याच्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी लोकसहभाग

 वाढवला गेला पाहिजे. संविधानाचे वैशिष्ट म्हणजे रक्तपाताशिवाय क्रांती साकारणे हे आहे.’’

     यानंतर २६/११ मुंबईतील दहशतवादी हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन पटांगणात करण्यात आला. यावेळी मेणबत्त्या प्रज्वलीत करून सर्व उपस्थितांनी शहिदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर काल जम्मु खोऱ्यातील राजोरी येथे दहशतवादी हल्ल्यात लष्करी अधिकारी शहिद झाले त्यांनाही २ मिनिटे मौन बाळगून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

     यावेळी माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, दिप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, लता राजगुरू, रफिक शेख, अजित दरेकर, संगीता तिवारी, पुजा आनंद, नीता रजपूत, प्रियंका रणपिसे, ॲड. राजश्री अडसूळ, सतिश पवार, द. स. पोळेकर, सुजित यादव, रमेश सोनकांबळे, संतोष पाटोळे, अक्षय माने, हेमंत राजभोज, राजू ठोंबरे, अजित जाधव, रवि आरडे, हरिष यादव, भरत सुराणा, समिर शेख, नंदलाल धिवार, लतेंद्र भिंगारे, उमेश ठाकुर, ज्योती चंदवेळ, रजिया बल्लारी, छाया जाधव, नलिनी दोरगे, सचिन सुडगे, सुंदर ओव्हाळ, प्रकाश पवार, अभिजीत गोरे, समिर गांधी, सुरेश नांगरे, स्वप्निल नाईक, ज्ञानेश्वर निम्हण, सनी रणदिवे, मारूती माने, आशुतोष शिंदे, रवि ननावरे, विठ्ठल गायकवाड, संजय डोंगरे, राज अंबिके, मुन्ना खंडेलवाल, शिवा भोकरे, अनिल पवार, संजय मानकर  आदींसह असंख्य काँग्रेसजण उपस्थित होते.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित यादव यांनी केले तर आभार विनोद रणपिसे यांनी मानले. 

उत्तरकाशी बोगदा बचाव मोहीमेबाबत 26.11.2023 संध्याकाळी 4 वाजेपर्यंतची माहिती

0

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2023

सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या काटिबद्धतेसह, केंद्र सरकार सक्रियपणे, उत्तरकाशी मधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांच्या बचावाचे अभियान वेगाने राबवत आहे. या बोगद्यातील 2 किमी कॉक्रीटचे काम पूर्ण झाले असून कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे उद्दिष्ट  आहे.

विविध सरकारी यंत्रणा  त्यांना दिलेल्या विशिष्ट कार्यात  अथकपणे गुंतल्या असून, कामगारांच्या सुरक्षित सुटकेसाठी काम करत आहेत. या ठिकाणी बचाव कार्याबाबत सूचना करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञ उपस्थित आहेत. अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य कायम राखण्यासाठी, सरकार सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे.

बचाव कार्यातील महत्वाची अद्ययावत माहिती :

1. एनचआयडीसीएल लाईफलाईन चे प्रयत्न ::

  • ताजे शिजवलेले अन्न आणि ताजी फळे नियमित अंतराने दुसऱ्या लाईफ लाइन (150 मिमी व्यास) सेवेचा वापर करून बोगद्याच्या आत पोहोचवली जात आहेत.
  • संत्री, सफरचंद, केळी सारख्या पुरेशा फळांसह औषधे आणि क्षारांचाही या पाईपमधून नियमित अंतराने पुरवठा करण्यात येत आहे. भविष्यातील साठ्यासाठी अतिरिक्त सुक्या खाद्यपदार्थांचाही पुरवठा केला जात आहे.
  • एसडीआरएफ ने विकसित केलेली सुधारित संपर्क व्यवस्था स्थापन करून, अडकेल्या मंजुरांशी नियमित संपर्क ठेवला जात आहे. अडकलेले सर्व कामगार  सुरक्षित आहेत.

3.सतलज जल विद्युत निगम-SJVNL द्वारे बचावासाठी व्हर्टिकल ड्रिलिंग:

  • ड्रिलिंग मशिनरी घटनास्थळी दाखल झाल्या.
  • ड्रिलिंग मशिन सुरू करण्यासाठी प्लॅटफॉर्मचे काम  पूर्ण झाले आहे. बोगद्यावरील ड्रिलिंग पॉईंटचे मार्किंग Ch 300 L/S. या ठिकाणी जीएसआय , आरव्हीएनएल आणि ओएनजीसी यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम रूप देण्यात आले आहे.
  • मशीनची जोडणी सुरू झाली आहे.
  • मुख्य मशीन ड्रिलिंग साइटवर पोहोचले आहे.बोगद्याच्या पोर्टलवरून ड्रिलिंग साइटपर्यंत मशीनची ड्रिलिंग रिग पाठवली आहे.  26.11.2023 रोजी दुपारी 12 .05 वाजता ड्रिलिंग सुरू झाले.

4.टिहरी हाइड्रो विकास निगम लिमिटेड (टीएचडीसीएल) द्वारे बरकोटच्या  बाजूला हॉरीझॉन्टल  ड्रिलिंग:

  • टीएचडीसीएलने बरकोटच्या टोकापासून बचाव बोगद्याचे बांधकाम सुरू केले आहे, पाचवा स्फोट 26.11.2023 रोजी दुपारी 2. 25 वाजता करण्यात आला.
  • ड्रिफ्टची एकूण लांबी 10.6 m आहे. 13 क्रमांकाच्या रिब्सचे फॅब्रिकेशनचे काम पूर्ण झाले आहे.

5.आरव्हीएनएल द्वारे हॉरीझॉन्टल ड्रिलिंग

  • कामगारांना वाचवण्यासाठी हॉरीझॉन्टल ड्रिलिंग करण्यासाठी लागणारी सूक्ष्म बोगद्याची उपकरणे नाशिक आणि दिल्लीहून घटनास्थळी पोहोचली आहेत. प्लॅटफॉर्म उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.       

6.सिल्क्याराच्या बाजूने आरव्हीएनएल द्वारे व्हर्टिकल ड्रिलिंग (8 इंच व्यास)

  • बीआरओ ने 1150 मीटरचा प्रवेश रस्ता पूर्ण केला आहे आणिआरव्हीएनएलला सुपूर्द केला आहे. बीआरओ ने ड्रिलिंगसाठी उपकरणे कामाच्या ठिकाणी आणली आहेत.
  • 26.11.2023 रोजी पहाटे 4. 00 वाजता ड्रिलिंग सुरू झाले आणि 40 मीटर पूर्ण झाले.

7.ओएनजीसी द्वारे बरकोटच्या दिशेने व्हर्टिकल ड्रिलिंग (24 इंच व्यास )

  • ओएनजीसी च्या खोदकाम पथकाने 20.11.2023 रोजी साइटला भेट दिली.
  • इंदूर येथून एअर ड्रिलिंग रिग मशीन घटनास्थळी पोहोचले आहे.

8.THDCL/लष्कर/कोल इंडिया आणि NHIDCL च्या संयुक्त टीमकडून मॅन्युअल-सेमी मेकॅनाइज्ड पद्धतीने ड्रिफ्ट टनेलचे खोदकाम

  • ड्रिफ्ट डिझाइन पूर्ण झाले आहे (1.2 मी X 1.5 मी विभाग)
  • साहित्य घटना स्थळी पोहोचले.
  • 21.11.2023 रोजी लष्कराच्या वेल्डर्सनी फॅब्रिकेशन सुरू केले.
  • 22 फ्रेम्स तयार करण्यात आल्या आहेत.

9. बीआरओ द्वारे रोड कटिंग आणि सहाय्यक काम:

  • बीआरओ ने SJVNL आणि RVNL द्वारे व्हर्टिकल ड्रिलिंगसाठी अप्रोच रोडचे बांधकाम पूर्ण केले आहे.
  • ओएनजीसी द्वारे करण्यात आलेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या आधारावर बीआरओ,ओएनजीसी साठी अप्रोच रोड देखील बनवत आहे. 5000 मीटरपैकी 1050  मीटरचा अप्रोच रोड तयार करण्यात आला आहे.

पार्श्वभूमी:

12 नोव्हेंबर 2023 रोजी, सिल्क्यरा ते बरकोट दरम्यान बांधल्या जाणाऱ्या बोगद्यात सिल्क्यराच्या बाजूला 60 मीटर भागात  बोगद्याचा भाग कोसळला होता. त्यानंतर बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची सुटका करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने  तातडीने साधन सामुग्रीची जमवाजमव सुरु केली.

टीप: तांत्रिक त्रुटी, हिमालयातील खडतर भौगोलिक स्थिती आणि अनपेक्षित आपत्कालीन परिस्थितीमुळे बचाव कार्य लांबू शकते.

भारतीय स्त्रियांना कणखर व्यक्तिरेखा म्हणून साकारण्याचा सदैव प्रयत्न करत आले आहे: राणी मुखर्जी

गोवा, 26 नोव्‍हेंबर 2023

गोव्यात इफ्फीच्या 54 व्या महोत्सवादरम्यान आज हिंदी चित्रपट अभिनेत्री राणी मुखर्जी यांच्यासमवेत – ‘खिळवून ठेवणाऱ्या भूमिका करताना’ या विषयावरील  संवादसत्र चांगलेच रंगले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट समीक्षक आणि गलत्ता प्लस चे मुख्य संपादक बरद्वाज रंगन यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कार्यक्रमात  राणी  मुखर्जी यांचे जीवन  आणि यशस्वी कारकीर्द उलगडली.

आपल्या चित्रपटांच्या प्रवासाबद्दल बोलताना त्यांनी , भारतीय स्त्रियांना कणखर व्यक्तिरेखा म्हणून साकारण्याचा सदैव प्रयत्न केल्याचे सांगितले. “चित्रपट आणि त्यांतील व्यक्तिरेखा म्हणजे भारतीय संस्कृतीचे  अवलोकन  करण्याचा झरोका म्हणून  परदेशात त्यांचा विचार केला जातो” असेही त्यांनी सांगितले.

कलेशी इमान राखण्याच्या महत्त्वावर या यशस्वी अभिनेत्रीने भर दिला. “कणखर चित्रपटांच्या आणि भूमिकांच्या समर्थनासाठी उभे राहणे महत्त्वाचे आहे. कधीतरी असे होऊ शकते, की त्या त्या वेळी तुम्हाला प्रेक्षकांची पसंती मिळणारही नाही. परंतु चित्रपटांच्या इतिहासात मात्र अशा चित्रपटांना आणि भूमिकांना निश्चितपणे स्थान मिळेल.”, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

अभिनेत्याने वैविध्यपूर्ण भूमिका करण्याचे महत्त्व मुखर्जी यांनी अधोरेखित केले. “अभिनेते अष्टपैलू असतील तर ते जीवनाचे विभिन्न पैलू समर्थपणे साकारू  शकतात. मी माझ्या व्यक्तिरेखांमध्ये जेवढे वैविध्य आणेन तेवढे ते प्रेक्षकांसाठी आणि माझ्यासाठी रुचीपूर्ण ठरेल. व्यक्तिरेखांमधील या विविधतेतून मला स्फूर्तीही मिळते.” असे त्यांनी स्पष्ट केले.

व्यक्तिरेखा साकारतानाच्या बारकाव्यांबद्दलही त्यांनी आपले विचार मांडले. “काही विशिष्ट भूमिका करताना, वास्तव  लकबी  समजून घेण्यासाठी अभिनेते वास्तवातील व्यक्तींना भेटतात. परंतु त्याचबरोबर त्यांच्या खऱ्या-खुऱ्या भावभावनाही समजून घेणे महत्त्वाचे आहे. चित्रपटातील एखादा प्रसंग उठावदार ठरतो, तो त्यामागील भावनांमुळे. प्रेक्षकांच्या काळजापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने भावना चितारणे महत्त्वाचे असते”, असे त्या म्हणाल्या.

सिने-इंडस्ट्रीत वयपरत्वे मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्दल या ख्यातनाम अभिनेत्रीने, ‘अभिनेत्यांनी आपल्या वयाची जाण ठेवून त्यानुसार भूमिका स्वीकारल्या पाहिजेत, म्हणजे मग प्रेक्षक त्यांचा स्वीकार करतील’ असे मत मांडले. वयपरत्वे मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवर तसेच इतर अडथळ्यांवरही मात करण्यास प्रेक्षकांनी त्यांना वेळोवेळी मदत केल्याचेही त्या म्हणाल्या.

“मी वयाला फारसे महत्त्व देत नाही. माझ्या भूमिकांना न्याय देण्याचा मी नेहमी प्रयत्न करत आले आहे. प्रेक्षकांनी तुमच्या व्यक्तिरेखेवर विश्वास ठेवण्याची अर्धी लढाई, तुम्ही तसे दिसलात की जिंकली जाते”, असे सांगत राणी  मुखर्जी यांनी वया विषयी स्वतःचा दृष्टिकोन सांगितला.

सामुदायिकरीत्या संविधानाचे वाचन, आणि रक्षणाची शपथ

पुणे-मातंग एकता आंदोलन पुणे शहर यांच्या वतीने आज संविधान दिना निमित्त आध्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे क्रीडा संकुल भवानी पेठ या ठिकाणी संविधानाच्या प्रती वाटुन सामुदायिक रीत्या संविधानाचे वाचन करण्यात आले व २६/११ च्या मुंबई हल्यांत शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या वेळी उपस्थित माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे ,माजी नगरसेवकअविनाश बागवे , अंकलजी सोनावणे, मातंग समाजाचे जेष्ठ नेते ,विठ्ठल, थोरात, पुणे शहर अध्यक्ष, ,दयानंद अडागळे , सुनील बावकर, सुरेखाताई खंडाळे, विलास कांबळे ,डॉ . रमाकांत साठे, बुवा कांबळे, मधुकर चांदणे, दत्ताभाऊ झोबाडे , व इतर मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्खेने उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित पुणे मनपा भवानी पेठ वॉर्ड ऑफिस चे सह. आयुक्त सौ .अस्मिता धुमाळ, उपअभियंता वासुदेव कुर्बिट , अधिकारी लांडगे , सोनाळकर जी, महेश वाघमारे, आरोग्य विभागाचे, ईसाक शेख, निरीक्षक श्री. शिवाजी गायकवाड या सर्वांचे स्वागत करण्यात आले.