Home Blog Page 1360

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ड्रॅगन पॅलेस फेस्टिव्हल’चे उद्घाटन

0

नागपूर, दि. 27 – ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ड्रॅगन पॅलेस फेस्टीव्हलचे उद्घाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.  दोन दिवसीय फेस्टीव्हल दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत कानसेन मोजिदा होते. यावेळी ड्रॅगन पॅलेस टेंपलच्या प्रमुख तथा ओगावा सोसायटीच्या अध्यक्ष सुलेखा कुंभारे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ड्रॅगन पॅलेस टेम्पलला पुढच्या वर्षी 25 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त विकास कार्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल. ड्रॅगन पॅलेस टेम्पल ची जगभरात ओळख निर्माण होत असून अनेक सामाजिक  व विकास कार्य होत असल्याचा आनंद असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

जपानच्या कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे यावेळी अभिनंदन करीत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

‘फूड कोर्ट’ चा शुभारंभ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरातील ‘फूड कोर्ट’ चा शुभारंभ करण्यात आला परिसरात येणाऱ्या नागरिकांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यामुळे परिसरात उपलब्ध होणार  आहेत.

प्रदूषणमुक्त व शाश्वत शहरांसाठी ‘सर्कुलर इकॉनॉमी पार्क’ची गरज – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर, दि. २७ – प्रदूषणमुक्त आणि शाश्वत शहरांच्या निर्मितीसाठी आज कचऱ्यावर प्रक्रिया करीत मूल्य निर्मितीची गरज आहे. यासाठी सर्कुलर इकॉनॉमी हे उत्तम उदाहरण आहे. महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी या पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे. राज्यात विविध ठिकाणी सर्कुलर इकॉनॉमी पार्कची निर्मिती करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर महानगरपालिकेच्या एकीकृत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते.

कार्यक्रमाला आमदार कृष्णा खोपडे, आ. टेकचंद सावरकर, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, केदार वझे, मृणाल ठाकूर आदी उपस्थित होते.

नागपूर शहरात घराघरातून, दुकाने, आस्थापनांमधून निघणाऱ्या कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची पर्यावरणपूरकरित्या विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेने हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नेदरलँड येथील सस्टेनेबल बिझनेस डेव्हलपमेंट (SusBDe) कंपनी आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये करार करण्यात आला आहे.

अत्याधुनिक डच तंत्रज्ञान या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे. घनकचरा प्रकल्पाचे अनेक प्रयोग करण्यात आले. मात्र त्यात यश आले नाही. घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील अडचणी शासनस्तरावरून दूर करीत आज या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. गेल्या दहा वर्षात नागपूरचा वेगाने विकास झाला आहे. मात्र, घनकचरा प्रकल्प नसल्यामुळे स्वच्छ भारत व अन्य स्वच्छतेशी संबंधित अभियानात नागपूरची आता क्रमवारी नव्हती ती सुधारण्यास आता मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

शहरात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प यशस्वीरित्या सुरू करण्यात आला आहे. देशाच्या एकूण जीडीपी मध्ये 65 टक्के वाटा हा शहरांचा आहे. शहरांचे महत्त्व लक्षात घेता शहरे प्रदूषणमुक्त असावी यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी विविध उपाययोजना, प्रकल्प शासनस्तरावरून राबविण्यात येत असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले.

नागपुरासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन बायोगँस, कम्पोस्ट खत, आरडीएफ यासारखे बाय-प्रॉडक्ट तयार होणार असून, मनपाला रॉयल्टी प्राप्त होणार आहेत. प्रदूषणमुक्तीकडे नागपूरचे हे पाऊल असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले.

आ. कृष्णा खोपडे यांनीही यावेळी आपले विचार केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले. तर  उपस्थितांचे आभार अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी मानले.

निरक्षर आणि स्वयंसेवकांनी नोंदणी करावी – शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर

पुणे, दि. २७: देशात निरक्षरता ही एक प्रमुख सामाजिक समस्या असून तिच्या समूळ उच्चाटनासाठी शासन, प्रशासनाच्या प्रयत्नांना सर्व समाजघटकांनी साथ द्यावी; त्या अंतर्गत ‘नवभारत साक्षरता कार्यक्रमा’त निरक्षर आणि स्वयंसेवकांनी लगतच्या शाळेकडे नोंदणी करावी, असे आवाहन शिक्षण संचालक (योजना) डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

चालू वर्षी ८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिनापासून राज्यात नवभारत साक्षरता कार्यक्रमाची प्रत्यक्ष सुरुवात झाली. परंतु विविध कारणामुळे त्यास अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने या कार्यक्रमात आघाडी घेणे महाराष्ट्राला शक्य झाले नाही. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्रवासियांना शिक्षण विभागाने भावनिक आवाहन केले आहे. ही लोकचळवळ उभारुन राज्याला शंभर टक्के साक्षर करण्यासाठी संकल्प करण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील शिफारशीनुसार व संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांनुसार २०३० पर्यंत १०० टक्के साक्षरतेचे उद्दिष्ट प्राप्त करावयाचे आहे. महाराष्ट्रामध्ये १५ व त्या वरील वयोगटातील १ कोटी ६३ लाख निरक्षर व्यक्ती असल्याचे सन २०११ च्या जनगणनेतून निदर्शनास आले आहे.

केंद्र शासनाने राज्यांच्या मदतीने नव भारत साक्षरता कार्यक्रम एप्रिल २०२२ पासून सुरू केला आहे. यासाठी ‘उल्लास’ ॲपची निर्मिती करण्यात आली असून त्यामध्ये निरक्षर व्यक्ती, स्वयंसेवक व्यक्ती व सर्वेक्षक यांची नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यासाठी मागील व चालू वर्षांचे एकत्रित १२ लक्ष ४० हजार उद्दिष्ट आहे.

या कार्यक्रमासाठी उद्दिष्टांनुसार निरक्षर स्वयंसेवकांची नोंदणी झालेली नाही, तसेच अध्ययन-अध्यापन वर्गही अल्पप्रमाणात सुरू झाल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी सहकार्य केल्यास अधिकाधिक निरक्षर नागरिक या अभियानाद्वारे साक्षर होऊ शकतात.

स्वातंत्र्यानंतर देशामध्ये एकूण ९ साक्षरता मोहिमा राबविण्यात आल्या. भारतात २ ऑक्टोबर १९७८ रोजी केंद्र शासनाने राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम घोषित केला आणि त्याची अंमलबजावणी सन १९७९ पासून सुरू झाली. पुढे सन २०११ च्या जनगणनेनुसार देशात प्रौढ निरक्षरांची संख्या २५ कोटी ७८ लाख होती. आजही देशात १८ कोटी निरक्षर व्यक्ती आहेत.

डॉ.महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना), शिक्षण संचालनालय- राज्यातील नागरिकांनी कुटुंबातील असाक्षरांची नोंदणी लगतच्या शाळेकडे करावी. समाजातील शिक्षित असलेल्या घटकांपैकी जे वेळ देऊ शकतात, अशांनी लगतच्या शाळेकडे स्वयंस्फूर्तीने विनामोबदला काम करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून नोंदणी करावी. असाक्षरांना शिक्षित सदस्यांनी साक्षर करण्याचा संकल्प करावा. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शिक्षित घटकांनी सहभाग द्यावा.

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची आंबेगाव व शिरुर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील- सहकारमंत्री

पुणे, दि.२७: सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगाव व शिरुर तालुक्यात काल झालेल्या गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. महसूल यंत्रणेने नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी  माजी आमदार पोपटराव गावडे, आंबेगावचे तहसीलदार संजय नागटिळक, शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, भीमाशंकर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सोपान भाकरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

श्री. वळसे-पाटील म्हणाले, आंबेगाव व शिरुर तालुक्यात काल झालेल्या गारपिटीसह मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक असल्यामुळे संबंधित यंत्रणेने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करुन जिल्हा प्रशासनाकडे सादर करावे. शेतकऱ्यांना सामुग्रह अनुदान मिळवून देण्यासाठी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडण्यात येईल. शेतकऱ्यांना अधिकाधिक नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे श्री. वळसे पाटील म्हणाले.

यावेळी श्री. वळसे-पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी (सातगाव पठार), जारकरवाडी, धामणी, लोणी, वडगावपीर, वाळूंजनगर, रानमळा, खडकवाडी, पोंदेवाडी आणि शिरुर तालुक्यातील वडनेर,सविंदणे,कवठे येमाई, मलठण,माळवाडी,म्हसे,निमगाव दुडे व टाकळी हाजी परिसरातील होणेवाडी,साबळेवाडी, शिनगरवाडी,ऊचाळेवस्ती,डोंगरगण तामखरवाडी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात १०१ पदार्थांचा अन्नकोट 

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे आयोजन 
पुणे : विविध प्रकारची मिठाई, फळे, खाद्यपदार्थ, चॉकलेट, बिस्किटे, लाडू, जिलेबी, पेढे, काजूकतली अशा सुमारे १०१ पदार्थांचा अन्नकोट दत्तमहाराजांसमोर मांडण्यात आला. बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अन्नकोट व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 
यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिराच्या प्रवेशद्वारात आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती़.  तसेच गाभारा फुलांच्या माळांनी सजविण्यात आला होता.
दत्तमंदिरातील अन्नकोटामध्ये ठेवण्यात आलेले पदार्थ ट्रस्टतर्फे तसेच भाविकांनी दिलेल्या पदार्थांमधून मांडण्यात आले. मंदिरातील सेवेक-यांनी अन्नकोटाची मांडणी केली. अन्नकोटासाठी मांडण्यात आलेले पदार्थ सामाजिक संस्थांना देण्यात येणार असून उर्वरित पदार्थ मंदिरामध्ये भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे यांनी सांगितले.

अल्पवयीन मुलाने चोरल्या ८ दुचाक्या आणि १२ मोबाईल

पुणे-पुण्यात अल्पवयीनमुलांमध्ये वाढणारे गुन्हेगारीचे प्रमाण चिंताजनक असून काल भरती विद्यापीठ पोलिसांनी एका १६ वर्षीय मुलाला दक्षिण पुण्यात पकडले त्याच्याकडून चोरीच्या ८ दुचाक्या आणि १२ मोबाईल हस्तगत केले . हा मुलगा सराईत बाल गुन्हेगार वर्गवारीत मोडला जातो आहे. पोलिसांनी सांगितले कि,’भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरींच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याबाबत वरीष्ठ पोलीस अधिकारी यांना तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ७६८/२०२३, भादंवि कलम ३७९ या गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, अवधुत जमदाडे, आशिष गायकवाड यांना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील विधीसंघर्षीत बालकाने केला असल्याची बातमी मिळाली. त्याअनुशंगाने भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार सदर बालकाचा शोध घेत असताना, तो कात्रज कोंढवा रोड, गोकुळनगर, गल्ली नं.४, पुणे येथे दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.१२./एन.क्यु./४६७६ व १२ मोबाईल फोनसह मिळुन आल्याने त्याचेकडे त्याबाबत तपास करता, त्याने दुचाकी गाडी व मोबाईल फोन हे चोरी केल्याची कबुली दिल्याने ते जप्त केले आहेत.
सदर विधीसंघर्षीत बालकाकडे अधिक तपास करता, त्याने पुणे शहर व आजुबाजुच्या भागातुन आणखीन दुचाकी गाड्या चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याने सांगितल्या ठिकाणाहुन एकुण ०८ दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. वरीलप्रमाणे त्याचेकडुन एकुण ०८ दुचाकी वाहने व १२ मोबाईल फोन असा एकुण ४,१५,०००/- रुपये किचा ऐवज जप्त केला असुन, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील एकुण ०४ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
सदरची कामगिरीअपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, प्रविणकुमार पाटील,पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२, श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे, नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक, (गुन्हे), विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहा. पोलीस निरीक्षक, अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक, धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार, मितेश चोरमोले, अवधतु जमदाडे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.

एयर इंडिया दिल्ली आणि फुकेत दरम्यान विनाथांबा सेवा सुरू करण्यासाठी सज्ज

·         बँकॉकनंतरचे थायलंडमधील दुसरे ठिकाण

·         आग्नेय आशिया आणि अतीपूर्वेतील भागात आपले अस्तित्व आणि कनेक्टिव्हिटी विस्तारणार

गुरुग्राम,  – एयर इंडिया ही भारतातील आघाडीची विमानकंपनी दिल्ली आणि थायलंडमधील लोकप्रिय ठिकाण फुकेतला जोडण्यासाठी १५ डिसेंबर २०२३ पासून विनाथांबा सेवा सुरू करत आहे. या सेवेमुळे या दोन्ही शहरांतील पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळेल व आग्नेय आशिया आणि अतीपूर्वेकडील भागात सेवा विस्तार करण्याच्या कंपनीच्या योजनेला बळ मिळेल.

१६२ आसनी (इकॉनॉमीमध्ये १५० आणि बिझनेस क्लासमध्ये १२) A320निओ एयरक्राफ्ट एआय३७८ दिल्लीतून 0110 वाजता निघेल आणि त्याच दिवशी 0710 वाजता फुकेतमध्ये पोहोचेल. परतीचे विमान एआय३७९ फुकेतमधून 0810 वाजता निघेल आणि दिल्लीमध्ये 1050 वाजता (सर्व स्थानिक वेळेनुसार) पोहोचेल.

आठवड्यात चार फ्लाइट्ससह (सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार) ही सेवा सुरू होणार असून जानेवारी २०२४ मध्ये दररोज उपलब्ध होईल.

‘फुकेत हे लोकप्रिय जागतिक ठिकाण असून व्यवसाय आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आमच्या नेटवर्कमध्ये फुकेतचा समावेश करताना आनंद होत आहे. यापुढेही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आम्ही कनेक्टिव्हिटी तसेच वारंवारता वाढवून ग्राहकांना निवडीस जास्त वाव देण्यासाठी प्रयत्नशील राहू,’ असे एयर इंडियाचे प्रमुख व्यावसायिक आणि ट्रान्सफर्मेशन अधिकारी निपुण अगरवाल म्हणाले.

एयर इंडियाद्वारे सध्या दर आठवड्याला बँकॉकला २६ विमाने कार्यरत असून त्यात दिल्ली व मुंबईतून रोज विनाथांबा विमानसेवा आणि कोलकातामधून आठवड्यात सहा विमानसेवांचा समावेश आहे. त्याशिवाय एयर इंडियाच्या प्रवाशांना बँकाकवरून थायलंड, लाओस, कंबोडिया अशा एयर इंडियाच्या इंटरलाइन भागिदारीचा भाग असलेल्या बँकॉक नेटवर्कवरील लोकप्रिय दहा ठिकाणांपर्यंत सेवेचा लाभ घेता येणार आहे.

विमानसेवांचे बुकिंग्ज आजपासून सर्व चॅनेल्सवर खुले होत असून त्यात एयर इंडियाचे संकेतस्थळ (www.airindia.com), मोबाइल अप आणि ट्रॅव्हल एजंट्स (ऑनलाइन ट्रॅव्हल एजंट्ससह) यांचा समावेश आहे.

शिंदे समितीचे काम आता संपलेले आहे:अहवाल मान्य करणार नाही, सरसकट मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळांचा आक्रमक पवित्रा

पुणे-  मराठा आंदोलनकर्ते मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधात काल ओबीसी नेत्याची सभा पार पडली, सभा दरम्यान जरांगे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत शिंदे समिती बरखास्त करावी अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. आता पर्यंत मिळालेले कुणबी प्रमाणप्रत्र खोटे असल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी शिंदे समिती बरखास्त करावी अशी मागणी केली आहे.

जातीने कुणबी असलेल्या लोकांना कुणबी प्रमाण पत्र शोधून त्यांना कुणबी प्रमाण पत्र द्यावं अशी मूळ मागणी होती. सगळं तपास व्हावा यासाठी न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झाली. समितीच काम सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी जाहीर केलं की ५ हजार कुणबी प्रमाण पत्र मिळाली आणि तेलंगणामध्ये निवडणूक सुरू असल्यामुळे त्यांना जात येत नाही. काही लोकांनी आग्रह धरला की ते साडे अकरा हजार झाले. नंतर हे वाढत गेला, परंतु आम्ही त्यांना जिल्हा जिल्हात जाऊन कुणबी प्रमाणपत्र शोधायला नव्हत सांगितलं. महाराष्ट्रातल्या कुणबी लोकांनी या पूर्वीच प्रमाण पत्र काढले आहेत. निजामशाही आणि वंशावळ प्रमाणे पत्र मिळाली आहेत त्यामुळे आता समितीच काम संपलं आहे. आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी आम्ही कधी मान्य केली नाही आणि करणार ही नाही. छगन भुजबळ म्हणाले, कुणबीमधून सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. मराठवाड्यात निजामशाहीच्या वंशावळमध्ये कुणबी नोंद असेल आणि त्याची नोंद मिळाली तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल व त्यानुसार आरक्षणही मिळेल. त्यास आमचा विरोध नाहीच. मात्र, आता यात गैरप्रकार होत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आम्ही प्रकाश शेंडगे यांचे माध्यमातून काही कागदपत्रे पाठवली. पेनाने काही ठिकाणी कुणबी नोंदी करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे खाडाखोड करुन स्वत:ला कुणबी म्हणवले जात आहे. त्यास आमचा विरोध आहे. कारण एकदा का कुणबी प्रमाणपत्र मिळाले तर तुम्ही ओबीसी होता. मराठवाडा व्यतिरिक्त इतर ठिकाणी जे खरे कुणबी, ओबीसी आहेत, त्यांनी खस्ता खाऊन त्यांचे जातीचे प्रमाणपत्र आतापर्यंत मिळवलेले आहे. मराठवाड्यातील कुणबी नोंदी तपासणीचे काम झाले असून त्यांनाही आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबीमधून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. छगन भुजबळ म्हणाले, आंतरवाली सराटी येथील घटनेत अनेक पोलिस, महिला कर्मचारीही जखमी झाले. त्यांना विश्वास देणे गरजेचे आहे. सरकार त्यांच्या पाठीशी आहे, हे त्यांना पटवून दिले पाहिजे. मात्र, त्या घटनेनंतर पोलिस हतबल झाल्यासारखी परिस्थिती आहे. आंतरवाली सराटीत प्रथम पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. महिला पोलिसांना अमानुष वागणूक मिळाल्याने नंतर लाठीहल्ला केला गेला. पहिली बाजू प्रसारमाध्यमासमोर आली नाही. उलट पोलिसांचेच निलंबन करण्यात आले. पोलिसांचे मनोबल खच्चीकरण होईल, असे कोणते काम झाले नाही पाहिजे. छगन भुजबळ म्हणाले, पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची चाैकशी झाली पाहिजे. त्याची माहिती मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी दिली पाहिजे. बीडमध्ये लोकप्रतिनिधींची घरे पेटवली. या अन्यायाला कोण जबाबदार आहे? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. गुन्हा करणाऱ्यांना सोडले व माझ्यावर खापर फोडले. बीड नेमके कोणी पेटवले. कोण विदुषक आहे? हे टिका करणाऱ्यांनी विचार करावा. कारण पोलिस किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपसात मारामारी केल्या नाही, त्या कोणी केल्या व त्यांना कोण वाचवते हे तपासले जावे. बीडमध्ये ज्याप्रकारे जाळपोळ झाली ती चुकीची आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तुम्ही पळून जाताय काय ?:पत्रकाराच्या प्रश्नावर तानाजी सावंत भडकले; म्हणाले- शांत राहा, आगीत तेल टाकू नका!

पुणे-मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देईल असे आपण म्हणाला होता … असे विचारताच काढता पाय घेतलेल्या मंत्री तानाजी सावंतांना संबधित पत्रकाराने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून तुम्ही पळून जाताय काय ? असा मोठ्याने सवाल करताच तानाजी सावंत माघारी फिरले आणि….

तानाजी सावंत सोमवारी पुण्यातील एस एम जोशी हॉलमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी एका पत्रकाराने त्यांना त्यांच्या एका विधानाची आठवण करून दिली. काही महिन्यांपूर्वी तुम्ही 2024 पर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देईल असे विधान केले होते. त्यामुळे तुम्ही आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देणार का? असा प्रश्न या पत्रकाराने तानाजी सावंत यांना केला.पत्रकाराचा हा जिव्हारी लागणारा प्रश्न ऐकताच तानाजी सावंत यांनी ‘चला’ म्हणत तेथून काढता पाय घातला. त्यानंतर पत्रकाराने आपल्या प्रश्नाचा पिच्छा पुरवला. मराठा आरक्षणाच्या प्रश्नापासून तु्म्ही पळ काढत आहात का? असे तो म्हणाला. त्याचा हा प्रश्न ऐकताच संतापलेले तानाजी सावंत माघारी फिरले. त्यानंतर त्यांनी सदर पत्रकाराचा खांदा व गाल थोपटत मी पळत काढत नसल्याचे स्पष्ट केले.मी पळ काढत नाही. पण जे चालले आहे, ते तुम्हीही पाहत आहात. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पत्रकारांनी आगीत तेल ओतण्याचे का करू नये एवढेच मी सांगतो, असे तानाजी सावंत म्हणाले आणि परत निघून गेले.

‘क्रिकेटवर चित्रपट करणे हा माझ्या बकेट-लिस्टचा भाग आहे!’ : आयुष्मान खुराना


बॉलीवूड स्टार आयुष्मान खुराना याचे क्रिकेटवरील ज्ञान आणि गहन निरीक्षण या विश्वचषकात दिसून आले आहे! त्याने जगभरातील क्रिकेट चाहत्यांशी संपर्क साधला आणि दाखवून दिले आहे की तो या खेळाचा खुप मोठा फ़ॉलोवर आहे! त्याने हे देखील उघड केले आहे की तो पंजाबमधील अंडर-19 जिल्हास्तरीय टीम मध्ये क्रिकेटपटू होता आणि तो या खेळाला खूप आवडीने फॉलो करतो.

आयुष्मान लवकरच क्रिकेटवर चित्रपट करण्यास उत्सुक आहे. तो म्हणतो, “क्रिकेटवर चित्रपट करणे हा माझ्या बकेट-लिस्टचा एक भाग आहे आणि मला आशा आहे की ती लवकरच पूर्ण होईल! मला असे वाटते की जेव्हाही असा चित्रपट होईल तेव्हा माझे क्रिकेट कौशल्य खऱ्या अर्थाने उपयोगी पडेल.”

अनेक दिवसांपासून अशी अफवा पसरली आहे की आयुष्मान खुराना दिग्गज भारतीय क्रिकेट कॅप्टन   सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये अभिनय करणार आहे जे नक्कीच देशाचे लक्ष वेधून घेईल. त्यांच्या या विधानामुळे या अटकळांना आणखीच खतपाणी मिळते कारण या मोठ्या प्रोजेक्ट ची घोषणा लवकरच होण्याची अपेक्षा आहे!

भोसलेनगरमध्ये बांधकाम व्यावसायिकाचे घर फोडून साडेबत्तीस लाखाचा ऐवज लंपास केला.

पुणे- चतुःश्रृंगी पोलिसांच्या हद्दीतील बंगला नं.६२, मिथीला बंगला, अशोकनगर, रेंजहिल रोड, भोसलेनगर, पुणे येथे दिनांक २५/११/२०२३ रोजी रात्री १०/३० वा. ते दि.२६/११/२०२३ दुपारी १२/०० वा.चे दरम्यान साडेबत्तीस लाखाची घरफोडी झाली आहे. या संदर्भात येथील ५२ वर्षे वयाच्या रहिवाश्याने फिर्याद नोंदविली असून चतुःश्रृंगी पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
यातील फिर्यादी यांचा राहता बंगला कुलुप लावुन बंद असताना, कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे राहते बंगल्याच्या कीचनच्या खिडकीचे स्लायडींग कशाचे तरी सहाय्याने उघडुन, त्यावाटे आंत प्रवेश करून, दुस-या मजल्यावरील बेडरूम मधील वॉर्डरोब उचकटुन, दोन लॉकर मधील कपाटातील ९,००,०००/- रू रोख रक्कम डायमंड व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण ३२,५०,०००/- रूपये किमतीचा ऐवज घरफोडी चोरी करून नेला. सहायक पोलीस निरीक्षक, नरेंद्र पाटील ९०११७१९१०० याप्रकरणी पुढील तपास करत आहेत .

पुण्यात घरफोड्या आणि जबरी चोऱ्या:मध्यप्रदेशातील भुरिया टोळीला मोक्का

पुणे -येथे घरफोडी व जबरी चोरी करणारे परप्रांतीय सुंदरसिंग भायानसिंग भुरीया (टोळी प्रमुख) व त्यांचे इतर ०३ साथीदार यांचेवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.०६/१०/२०२३ रोजी आयोध्यानगरी, भाऊ पाटील रोड, बोपोडी, पुणे येथे फिर्यादी हे सिक्युरिटी गार्ड म्हणुन काम करीत असताना, यातील नमुद इसम१) सुंदरसिंग भयान सिंग भुरीया, वय-२५ वर्षे, रा. ग्राम पिपराणी, थाना तांडा, तहसिल कुक्षी, जि. धारा, मध्य प्रदेश (टोळी प्रमुख) २) मुकेश ग्यानसिंग भुरीया, वय-२७ वर्षे, रा. ग्राम पिपराणी, थाना तांडा तहसिल कुक्षी, जि. धारा, मध्य प्रदेश ३) सुनिल कमलसिंग आलावा, वय-२८ वर्षे, रा. ग्राम २२ वर्षे, रा. गांव तहसिल कुक्षी, थाना बागमेर, जि. धारा, मध्य प्रदेश राज्य ४) हरसिंग वालसिंग ओसनिया, वय-२२ वर्षे, रा. गांव तहसिल कुक्षी, थाना बागमेर, जि. धारा मध्य प्रदेश (टोळी सदस्य) यांनी संगनमत करुन, फिर्यादी यांना धक्का-बुक्की करुन जबरदस्तीने फिर्यादी यांचेकडील २१००/- रुपये रोख रक्कम चोरी करुन घेवुन गेले. त्याबाबत फिर्यादी यांनी खडकी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ३७४/२०२३ भा.द.वि. कलम ३९२,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्याचे तपासा दरम्यान अटक करण्यात आली आहे. सुंदरसिंग भयानसिंग भुरीया आणि त्याच्या साथीदारांची पुर्व रेकॉर्ड पाहणी करता त्याने चोरी करणे, घरफोडी करणे व जबरी चोरी करणे असे गंभीर गुन्हे केलेले असुन, त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली असुन बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिसांचाराचा वापर करुन किंवा हिंसाचार करण्याची धमकी देवुन किंवा धाकदपटशा दाखवुन किंवा जुलुम जबरदस्ती करुन किंवा अन्य अवैद्य मार्गाने आपले बेकायदेशीर कृत्य चालु ठेवुन संघटना किंवा टोळी म्हणुन संयुक्तपणे गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार केला असुन त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्याचे वर्तनात सुधारणा होत नसलेने त्यांनी पुन्हा-पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.दाखल गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपीनी संघटीतरित्या सदरचा गुन्हा केल्याचे निदर्शनास आल्याने प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३(२), ३ (४) चा अंतर्भाव करणे कामी खडकी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक,राजेंद्र सहाणे यांनी पोलीस उप- आयुक्त, परि-४, पुणे शहर, शशिकांत बोराटे यांचे मार्फतीने अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रदेशिक विभाग, पुणे रंजनकुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रकरणाची छाननी करुन खडकी पोलीस स्टेशन येथे गु.नं. ३७४/२०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३४ अन्वये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३(१) (ii)३ (२), ३ (४) प्रमाणेचा अंतर्भाव करण्याची अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे रंजनकुमार शर्मा यांनी मान्यता दिलेली आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर, श्रीमती. आरती बनसोडे ह्या करीत आहेत
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार, तत्कालीन पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, शशिकांत बोराटे, सहा. पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे, श्रीमती आरती बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री.मानसिंग पाटील, पोलीस उप-निरीक्षक, वैभव मगदुम, संतोष भांडवलकर, सर्वेलन्स पथकाचे पोलीस अंमलदार, रमेश जाधव, महिला पोलीस अमंलदार, किरण मिरकुटे व स्वाती म्हस्के यांनी केली आहे.
पोलीस आयुक्त, पुणे शहर, रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ९० वी कारवाई आहे.

मेडीबडी आणि आदित्य बिर्ला फायनान्सने हाऊसिंग फायनान्स ग्राहकांसाठी सुरु केला एक्सक्लुसिव्ह हेल्थकेयर प्लॅन

0

पुणे- 27 नोव्हेंबर2023:  भारतातील सर्वात मोठा डिजिटल हेल्थकेयर प्लॅटफॉर्म, मेडीबडी आणि हाऊसिंग फायनान्समधील एक आघाडीची कंपनी, आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने एकत्र मिळून एबीएचएफएलच्या ग्राहकांसाठी एक्सक्लुसिव्ह हेल्थकेयर प्लॅन सुरु केला आहे. मेडीबडीच्या एका विशेष प्लॅनमार्फत ग्राहकांना परवडण्याजोग्या आणि सहज उपलब्ध होऊ शकतील अशा आरोग्य देखभाल सेवा प्रस्तुत करणे या धोरणात्मक भागीदारीचे उद्दिष्ट आहे.

मेडीबडी आणि आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स यांच्या दरम्यानच्या सहयोगाने एक अफिनिटी पार्टनरशिप स्थापित केली आहे. या फ्रेमवर्कमध्ये एबीएचएफएलच्या ग्राहकांना पोर्टलवर साइन इन केल्यावर या विशेष प्लॅनचे लाभ मिळवता येतील. एबीएचएफएलच्या गृहकर्ज सेवांव्यतिरिक्त हा अजून एक अतिरिक्त लाभ ग्राहकांना मिळेल. मेडीबडी खूपच कमी किमतीत, फक्त २९९ रुपयांमध्ये, आरोग्य देखभालीच्या विशेष सेवा प्रदान करेल, ज्यामध्ये ओपीडी, लॅब टेस्ट्समध्ये १००० रुपयांचे लाभ, हेल्थ पॅकेजेस आणि फार्मसीवर होणाऱ्या खर्चावर ५०० रुपयांची सूट यांचा समावेश आहे. मेडीबडी एबीएचएफएलचे एकमेव आणि विशेष हेल्थकेयर पार्टनर आहेत. मेडीबडी प्लॅन सर्व एबीएचएफएल ग्राहकांना त्यांच्या पोर्टलवर एक डिफॉल्ट ऑफरिंग म्हणून अतिशय सहजपणे उपलब्ध करवून दिला जाईल. या भागीदारीच्या अटी व शर्ती एबीएचएफएलच्या ग्राहकांची सुविधा डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आल्या आहेत.

या भागीदारीबद्दल मेडीबडीचे सहसंस्थापक  सीईओ श्री सतीश कन्नन यांनी सांगितले, आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्ससोबत आमच्या भागीदारीने आम्हाला त्यांच्या ग्राहकांना आमचे अनोखे हेल्थकेयर लाभ प्रदान करण्यासाठी सक्षम बनवले आहेया भागीदारीच्या माध्यमातून आम्ही आमच्या सेवा अजून अनेक ग्राहकांपर्यंत घेऊन जाऊ इच्छितोत्यांना परवडण्याजोग्या दरामध्ये उच्च दर्जाच्या आरोग्य देखभाल सेवा देऊ इच्छितोही भागीदारी मेडीबडीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहेआघाडीच्या हाऊसिंग फायनान्स कंपनीसोबत हे आमचे पहिले व्हेंचर आहेआम्हाला खात्री आहे कीही भागीदारी दोन्ही कंपन्यांसाठी लाभदायक ठरेल.”

भारतात असे अनेक लोक आहेत ज्यांना उच्च दर्जाच्या आरोग्य देखभाल सेवा मिळू शकत नाहीत, त्यामुळे गरजा आणि त्या पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सेवांदरम्यान खूप मोठी दरी निर्माण झाली आहे. या विशेष प्लॅनसह, मेडीबडी आणि आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स परवडण्याजोग्या आरोग्य देखभाल सेवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बांधील आहेत. खासकरून ज्यांना महागड्या प्राथमिक आरोग्य देखभाल सेवा सहजपणे मिळू शकत नाहीत अशा ग्राहकांपर्यंत आपल्या सेवा पोहोचवणे त्यांचे उद्दिष्ट आहे.

महिंद्राने ऍग्रोव्हिजन नागपूर येथे CNG ट्रॅक्टरचे अनावरण केले

नागपूर, 27 नोव्हेंबर 2023: भारतातील आघाडीचा ट्रॅक्टर ब्रँड, महिंद्रा ट्रॅक्टर्सने त्याच्या लोकप्रिय युवो ट्रॅक्टर प्लॅटफॉर्मवर, नागपूर येथील ऍग्रोव्हिजन येथे आपल्या पहिल्या CNG मोनो इंधन ट्रॅक्टरचे अनावरण केले. मध्य भारतातील सर्वात मोठा ऍग्रो समिट नागपुरात सुरू आहे. या चार दिवसीय शिखर परिषदेच्या उद्घाटनाच्या दिवशी या ट्रॅक्टरचे अनावरण झाले. यावेळी भारत सरकारचे रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी उपस्थित होते.

CNG-चलित वाहने विकसित करण्यात आपल्या व्यापक कौशल्याचा लाभ घेत, महिंद्र उत्सर्जन नियंत्रण, कार्यप्रदर्शन आणि ऑपरेशनल खर्च कार्यक्षमतेला प्राधान्य देते. चेन्नई येथील महिंद्रा रिसर्च व्हॅली येथे विकसित आणि चाचणी केलेले, नवीन महिंद्रा सीएनजी ट्रॅक्टर डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरच्या बरोबरीने उर्जा आणि कार्यप्रदर्शन देते. तसेच शेतीसाठी पर्यायी इंजिन तंत्रज्ञानामध्ये नवीन बेंचमार्क सेट करते.

विशेष म्हणजे पर्यावरणपूरक CNG ट्रॅक्टर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत जवळजवळ 70% ने उत्सर्जन कमी करते. कमी इंजिन कंपने आवाज पातळी कमी करण्यात योगदान देतात. हे डिझेल ट्रॅक्टरपेक्षा 3.5db कमी मोजतात. ही सुधारणा केवळ विस्तारित कामाचे तास आणि इंजिनचे आयुष्य सुलभ करते असे नाही तर ऑपरेटरला आरामाची देखील खात्री देते, शेती आणि बिगरशेती दोन्ही अनुप्रयोगांची पूर्तता करते.

सीएनजी तंत्रज्ञान असलेला हा ट्रॅक्टर सध्याच्या डिझेल ट्रॅक्टरच्या क्षमतेशी जुळणारे विविध कृषी आणि वाहतूक अनुप्रयोग हाताळतो. महिंद्राच्या CNG ट्रॅक्टरमध्ये प्रत्येकी ४५ लिटर पाण्याची क्षमता असलेल्या चार टाक्या आहेत, किंवा २४ किलो गॅस ऑन-बोर्ड, 200-बार दाबाने भरलेले आहेत. डिझेल ट्रॅक्टरपेक्षा प्रति तास 100 रुपयांची अपेक्षित बचत त्याचे आर्थिक आकर्षण आणखी अधोरेखित करते.

बाजारातील तयारी आणि या अग्रगण्य तंत्रज्ञानाला मिळालेल्या प्रतिसादाचे सखोल मूल्यांकन केल्यानंतर महिंद्राने सीएनजी ट्रॅक्टर लॉन्च करण्याचे ठरवले.

– उच्चभ्रू ज्येष्ठांना ओढले जातेय जाळ्यात:परदेशातील ‘शुगर डॅडी’ची संकल्पना पुण्यात रुजू पाहतेय

पुण्यातही या शुगर डॅडीचा ट्रेंड वाढत आहे.
पुणे हे शिक्षणाचे आणि रोजगाराचे हब आहे. येथे मोठ्या प्रमाणात तरुणी शिक्षणसाठी येतात. यामध्ये त्या शुगर डॅडीचा अशा रिलेशनशिपमध्ये, शुगर बेबी बहुतेकदा अशा मुली असतात ज्यांना पैसा किंवा विलासी जीवन आवडते. पुण्यातील ज्येष्ठाना त्या जाळ्यात ओढू पाहत आहेत. त्यासाठी ज्येष्ठानी आणि घरातल्या सदस्यांनी सावध राहावे.

पुणे: शिक्षणासाठी पुण्यात आलेली पंचवीस वर्षीय करिना पुण्यातील एका उच्चभ्रू ज्येष्ठ जोडप्यांच्या घरात ‘पेयिंग गेस्ट’ म्हणून राहत होती. या ज्येष्ठ दांपत्याची मुले परदेशात सेटल झालेली. परंतु, करीना घरभाडे देत होती ना तिचा वैयक्तिक कुठला खर्च स्वतःच्या पैशातून करत होती. हा खर्च तिचा घरमालक असलेला 75 वर्षीय ज्येष्ठ (प्रियकर) करत होता. थोडक्यात दोघे रिलेशन मध्ये होते. याची कुणकुण लागताच पुरावे गोळा करण्यासाठी त्या ज्येष्ठाच्या पत्नीने स्विफ्ट डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत घेतली आणि सत्य समोर आले. प्रकरण पोलिसांत जाणार होते पण आपलीच इज्जत जाईल म्हणून घरातील सदस्यांनी या प्रकरणावर पडदा टाकला. पुण्यातील ही एक सत्य घटना असून हा सर्व प्रकार दुसरे तिसरे काही नसून ‘शुगर डॅडी’ हा आहे.

‘शुगर डॅडी’ म्हणजे आपली हौस – मौज (आर्थिक, शारीरिक) भूक भागवण्यासाठी ज्येष्ठ व्यक्तीच्या सोबत डेटिंग, शरीरसंबंध ठेवणाऱ्या तरुणी या जेष्ठांना शुगर डॅडी म्हणतात. आर्थिक मोबदला देऊन तरुणींकडून आपली भावनिक व शारीरिक गरज भागवनारे ज्येष्ठ नागरिक असतात. तसेच अशा तरुणींना शुगर बेबी असे म्हटले जाते. हे नाते ठराविक काळासाठी असते. ही संकल्पना खरी पाश्चात्य देशांमध्ये आहे. पण, सध्याच्या बदलत्या काळात, बदलत्या नातेसंबंधात ही संकल्पना पुण्यासारख्या शहरातही मूळ धरू पाहत आहे. परंतु यामध्ये शिक्षण किंवा कामाच्या निमित्ताने पुण्यात येणाऱ्या तरुणी अशा शुगर डॅडीच्या शोधात असून त्यांना जाळ्यात ओढू पाहत आहेत.

पुण्यातील स्विफ्ट डिटेक्टिव्ह एजन्सीकडे अशा शुगर डॅडींची माहिती काढण्यासाठी घरातील ज्येष्ठ महिला येत आहेत. काहींमध्ये तर या तरुणीचा उद्देश हा ज्येष्ठाना जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक तसेच त्यांची प्रॉपर्टी देखील हडपण्याचा डाव असल्याची माहिती स्विफ्ट डिटेक्टिव्ह एजन्सीच्या संचालिका प्रिया काकडे यांनी दिली. यावरून हा प्रकार किती गंभीर आहे याची माहिती कळते.

पुण्यात अशा श्रीमंत, सधन ज्येष्ठ जोडप्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बहुतेक जोडप्यांची मुले परदेशांत सेटल झाली आहेत. ही ज्येष्ठ जोडपे देखील नोकरीतून निवृत्त झालेली असतात. त्यांचे हक्काचे घर किंवा बंगला असतो. तसेच त्यांची अनेक घरे असतात. मग, अशा ज्येष्ठाच्या शिक्षण किंवा कामाच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या तरुणी शुगर बेबी बनतात. गडगंज संपत्ती पाहून अशा ज्येष्ठाना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते. यामागे त्यांचा हेतू हा पैसे काढण्याबरोबरच त्यांची संपत्ती हडप करण्याचाही असतो.

यामध्ये त्या त्यांच्यापेक्षा अनेक वर्षांनी मोठ्या पुरुषांसोबत (शुगर डॅडी) डेटवर जातात. त्या बदल्यात त्यांच्याकडून पैसे आणि विविध सुविधा घेतल्या जातात. ते त्यांच्या शुगर डॅडीसह इतर देशांच्या सहलीला देखील जातात, महागड्या भेटवस्तू मिळवतात, सुट्टीवर जातात आणि शारीरिक संबंध देखील ठेवतात.

या प्रकारचे नाते का तयार होते?
हे बहुतेक ते लोक असतात ज्यांचे वैयक्तिक जीवन एकाकी असते. शुगर डॅडी किंवा शुगर बेबी शोधण्यासाठी एक विशेष वेबसाइट आहे जी 2023 पासून अधिक लोकप्रिय होत आहे. अशा डेटिंग साइटला शुगर डॅडी साइट म्हणतात. अनेकदा या प्रकारच्या नातेसंबंधात, दोन्ही भागीदार त्यांच्या गरजेनुसार नाते तयार करतात, जे पारंपारिक डेटिंगपेक्षा पूर्णपणे वेगळे असते.

बनू पाहतोय व्यवसाय
अनेकदा अशे नाते जास्त काळ टिकत नाही. कधी कधी चांगल्या शुगर डॅडीच्या शोधात शुगर बेबी पहिल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते. याचा अर्थ हा संबंध एखाद्या व्यवसायाप्रमाणे केला जातो, जो अल्पकालीन असतो ज्यामध्ये नेहमी चांगल्या संधी आणि नातेसंबंधांचा शोध असतो.

(अधिक माहितीसाठी संपर्क – प्रिया काकडे 78418 77478)