Home Blog Page 135

15 सप्टेंबरपासून मान्सून परतण्याची शक्यता

0

हिमाचल प्रदेशात पाऊस आणि पुरामुळे मृतांचा आकडा ३८६ वर पोहोचला आहे. या हंगामात राज्यात सामान्यपेक्षा ४३% जास्त पाऊस पडला आहे. १ जून ते १२ सप्टेंबर दरम्यान ६७८.४ मिमी पाऊस पडला, यावेळी ९६७.२ मिमी पाऊस पडला आहे

नवी दिल्ली-हवामान खात्याच्या मते, यावर्षी नैऋत्य मान्सूनची माघार १५ सप्टेंबरच्या सुमारास पश्चिम राजस्थानमधून सुरू होऊ शकते. साधारणपणे १७ सप्टेंबरच्या सुमारास मान्सून वायव्य भारतातून परतण्यास सुरुवात करतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे परततो.

या वर्षी मान्सून २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला, जो २००९ नंतरचा सर्वात पहिला, ८ दिवस आधी होता. त्यानंतर, तो ९ दिवस आधी म्हणजेच २९ जूनपर्यंत देशभर पसरला, साधारणपणे ८ जुलैपर्यंत तो संपूर्ण देश व्यापतो. आतापर्यंत देशात ८३६.२ मिमी पाऊस पडला आहे, तर सामान्य पाऊस ७७८.६ मिमी मानला जातो. म्हणजेच, यावेळी ७% जास्त पाऊस पडला आहे.

वायव्य भारतात ७२०.४ मिमी पाऊस पडला आहे, जो सामान्यपेक्षा ३४% जास्त आहे. एका अभ्यासानुसार, गेल्या ५० वर्षांत, मान्सूनचा कालावधी प्रत्येक दशकात सुमारे १.६ दिवसांनी वाढला आहे. म्हणजेच, प्रत्येक दशकात माघार थोडी उशिरा होत आहे.

येथे, उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे गंगेची पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा २३ सेंटीमीटर वर आहे. येथे ८० गावे पुराच्या विळख्यात आहेत. १०० हून अधिक कुटुंबे बेघर झाली आहेत. फारुखाबादमध्ये गंगा काठाची धूप वाढली आहे. गावकरी स्वतःच त्यांची घरे तोडत आहेत. ते विटा आणि लोखंडी सळ्या वाहून नेत आहेत.

ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपुलाचे लोकार्पण – नागपूरच्या विकासाला नवी गती!

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूर येथे ‘ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार उड्डाणपुला’चे लोकार्पण करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, हा पूल नागपूरकरांसाठी मोठा दिलासा ठरणार असून, यामुळे 20 मिनिटांचा प्रवास आता फक्त 3 मिनिटांत होणार आहे. बोले पेट्रोल पंप चौकापासून सुरु होणारा हा उड्डाणपुल आरटीओ कार्यालयापुढे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा फुले परिसर, फुटाळा चौकापर्यंत 2.85 किमी लांबीचा आहे. नागपूर शहरातील सर्वात वर्दळीचा हा उड्डाणपूल असून वाडी पोलीस ठाणे ते गुरुद्वारा हा पहिला उ्डडाणपूल 1.95 किमी लांबीचा आहे. उड्डाणपुलाचे नामकरण ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाने करण्यात आले असून, यामार्फत त्यांच्या अद्वितीय ज्ञानसाधनेचे आणि भविष्यवेधी कार्याचे स्मरण अधिक दृढ होईल.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर आणि विदर्भातील पायाभूत सुविधांच्या प्रगतीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला. कामठी रोडवरील डबल डेकर पूल हा जगातील सर्वात लांब पूल ठरून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचेही त्यांनी सांगितले. तिसरा रिंग रोड आणि ‘नवीन नागपूर’ प्रकल्पांच्या जमीन अधिग्रहणासाठी ₹17,000 कोटींच्या तरतुदीसह मोठ्या गुंतवणुकीचे मार्ग खुले होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपूर हे तंत्रज्ञान आणि फिनटेक हब म्हणून विकसित होत आहे. तसेच येथे संत्रा प्रक्रिया उद्योग, राज्यातील सर्वात मोठा फूड पार्क, ₹30,000 कोटींच्या गुंतवणुकीसह कोल गॅसिफिकेशन प्रकल्प, सौर मॉड्युल निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या गुंतवणुकीतून लाखो रोजगार निर्माण होणार असून, नागपूर स्मार्ट सिटी म्हणून उदयास येईल.

फ्लॅश बससारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वाहतूक सुविधा रिंगरोडवर सुरू होणार असून, नागपूरच्या प्रगतीला वेग देणार आहेत. गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास आणि मजबूत पायाभूत सुविधा नागपूरला औद्योगिक, तांत्रिक आणि आर्थिक विकासाचे केंद्रस्थान बनवत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल व इतर मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र-आयोवा(USA) भागीदारी : समृद्धीचा नवा सेतू!

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमेरिकेतील आयोवा राज्याच्या गव्हर्नर किम रेनॉल्ड्स यांनी मुंबई येथे ‘महाराष्ट्र सरकार आणि अमेरिकेतील आयोवा राज्य’ यांच्यातील ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

या कराराद्वारे कृषी व कृषी तंत्रज्ञान, डिजिटलायझेशन, आरोग्य, पर्यटन, क्रीडा, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, अक्षय ऊर्जा, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये दोन्ही राज्य एकत्रित काम करणार आहेत. विशेषतः कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), यांत्रिकीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आयोवा विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ एकत्र संशोधन करतील.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आयोवा हे अमेरिकेचे ‘फुड बास्केट’ म्हणून ओळखले जाते आणि या सहकार्यातून महाराष्ट्रातील शेती आणि अन्नप्रक्रिया उद्योगाला मोठा फायदा होणार आहे. क्लायमेट-रेझिलियंट ॲग्रीकल्चर, बायोफ्युएल्स आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रांत दोन्ही राज्ये सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करतील.

तसेच, नवी मुंबईतील एड्यु सिटी प्रकल्प, व्यावसायिक प्रशिक्षण, इनोव्हेशन आणि स्टार्टअप्ससाठी निर्माण होणारे वातावरण या करारामुळे अधिक बळकट होईल. आयोवाचे शिष्टमंडळ भारतात येईल तर महाराष्ट्राचे शिष्टमंडळ आयोवाला भेट देऊन परस्पर राज्यातील विविध क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग दोन्ही राज्याच्या विकासासाठी होणार असून, यामुळे दीर्घकालीन भागीदारीला गती मिळेल.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, जगभरातील गुंतवणूकदार महाराष्ट्राकडे आकर्षित होत आहेत. ‘इज ऑफ डूइंग बिझनेस’च्या अनुषंगाने गुंतवणूकदारांसाठी सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही विविध सुधारणा व नवनवीन धोरणे सातत्याने राबवत आहोत.

यावेळी आयोवा राज्याचे शिष्टमंडळ, मुंबई येथील अमेरिकन दूतावासाचे अधिकारी व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासन आणि टाटा टेक्नॉलॉजीज् यांच्या संयुक्त भागीदारीतून विकसित महाराष्ट्राच्या दिशेने मोठे पाऊल!

नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रामटेक, नागपूर येथे महाराष्ट्र शासन आणि टाटा टेक्नॉलॉजीज् लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत रामटेक, नागपूर येथे ‘सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्व्हेन्शन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर (CIIIT)’ उभारण्यात येणार आहे.

खासगी सहभागातून उभारण्यात येणारे हे CIIIT केंद्र विद्यार्थ्यांना अत्याधुनिक नवउपक्रमांवर आधारित प्रशिक्षण देणार असून, औद्योगिक उत्पादन व रोजगाराला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. दरवर्षी 3000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा येथे उपलब्ध होईल. कौशल्यवर्धन केंद्र इमारत बांधकाम व प्रशिक्षण सुविधासह ₹115 कोटींचा प्रकल्प असून टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडतर्फे ₹98 कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

नवउपक्रम व संशोधन प्रशिक्षण सुविधा असलेल्या रामटेक येथील प्रकल्प टाटा टेक्नॉलॉजीज् लिमिटेड व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणार आहे. या कौशल्यवर्धन केंद्रात इनोव्हेशन, डिझाईन, इन्क्युबेशन यासह 9 प्रकारच्या प्रशिक्षण सुविधा राहणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नागरिकांनी आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा

0

मुंबई, दि. १२: महाराष्ट्रात ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ आणि ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ एकत्रित राबविण्यात येत असून राज्यातील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.एकत्रित योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष ५ लाख रुपयांच्या मर्यादेत १३५६ उपचार पद्धतींवर शासकीय तसेच खासगी अंगीकृत रुग्णालयांमध्ये विनामूल्य उपचार मिळणार आहेत. पिवळे, केशरी, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना किंवा पांढरे रेशनकार्ड धारक कुटुंब तसेच सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय या योजनेत समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही.

सर्व लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड राज्यातील आशा कर्मचारी, आपले सरकार सेवा केंद्रातील कर्मचारी तसेच स्वस्त धान्य दुकान चालक यांच्या मार्फत तयार केले जात आहेत. लाभार्थी स्वतःही आयुष्मान ॲप किंवा https://beneficiary.nha.gov.in/ या संकेतस्थळावरील बेनिफिशरी पर्यायाद्वारे आपले कार्ड तयार करू शकतात. कार्ड निर्मितीसाठी अद्ययावत शिधापत्रिका, आधार क्रमांक आणि आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे, असे राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी कळविले आहे.

सणासुदीच्या काळात नागरिकांना शुद्ध पदार्थ मिळण्याच्यादृष्टीने कार्यवाही करा-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

पुणे , दि. १२: सणासुदीच्या काळात खवा व दुग्धजन्य पदार्थाचे अधिकाधिक नमुने तपासणीकरिता घेवून आवश्यकत्या ठिकाणी जप्ती करावी, यामाध्यमातून नागरिकांना शुद्ध पदार्थ मिळेल याबाबत दक्षता घ्यावी, नवीन प्रयोगशाळेच्या बांधकामाची पाहणी करुन हे बांधकाम गतीने पूर्ण करुन प्रयोगशाळा सुरु करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.

मोशी येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयास भेट देवून विभागाच्यावतीने चालू वर्षातील कामकाजाचा आढावा कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी सहआयुक्त अन्न गिरीश हुकरे, सहआयुक्त सुरेश अन्नपुरे,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री झिरवाळ यांच्या हस्ते विभागाच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या औषध निरीक्षक श्रुतिका जाधव व विजय नांगरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अन्न विभागात नव्याने रुजू झालेल्या अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासोबंत संवाद साधून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

श्री. झिरवाळ यांच्या हस्ते कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

आढावा बैठकीत औषध विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची सद्यस्थिती, विभागाच्यावतीने करण्यात येणाऱ्या कारवाया आदीबाबत माहिती देण्यात आली.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणींना दिला उजाळा

0

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा वाढदिवस संपन्न

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा वाढदिवस आज (१२ सप्टेंबर) उत्साहात साजरा झाला.यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. सामाजिक, राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रांतून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव झाला. या शुभेच्छांना प्रतिसाद देताना डॉ. गोऱ्हे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

त्यांनी सांगितले की, “माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर जनतेचे, शिवसैनिकांचे आणि विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांचे प्रेम व आशीर्वाद मिळत आले आहेत. आज वाढदिवसाच्या निमित्ताने मिळालेल्या शुभेच्छांनी माझा उत्साह आणखी वाढवला आहे. या सर्वांच्या प्रेमामुळेच माझ्या कार्याला नेहमी नवी दिशा मिळते.”

आभार प्रदर्शन करताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या नात्याच्या आणि आठवणींच्या काही खास गोष्टींनाही उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, “राजकारणात प्रवेश केल्यावर मला बाळासाहेबांचा आशीर्वाद लाभला. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे एक वेगळी शाळा होती. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी दिलेल्या सूचनांमधून आणि मार्गदर्शनातून मी अनेक गोष्टी शिकले. समाजातील वंचित, उपेक्षित आणि महिला वर्गासाठी काम करताना नेहमीच त्यांचा प्रेरणादायी विचार माझ्यासोबत असतो.”

त्यांनी पुढे नमूद केले की, बाळासाहेबांसोबतच्या भेटीगाठी नेहमीच साध्या पण प्रेरणादायी असत. त्यांच्या सहजसुंदर व्यक्तिमत्त्वामुळे प्रत्येकाला जवळीक वाटे. “ते केवळ पक्षप्रमुख नव्हते, तर एक मार्गदर्शक होते. समाजातील सामान्य माणसाचा आवाज बनण्याची ताकद त्यांनी आम्हाला शिकवली,” असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.

डॉ. गोऱ्हे यांनी या प्रसंगी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आपल्या आगामी कार्याचा आराखडाही अधोरेखित केला. “महिला सक्षमीकरण, श्रमिकांचे प्रश्न, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवणे हे माझे प्राधान्यक्रम आहेत. बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे लोकांशी जोडलेले राहणे आणि त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करणे हेच माझे ध्येय आहे,” असे त्या म्हणाल्या.

डॉ. नीलम गोऱ्हे यांचे सामाजिक व राजकीय आयुष्य आजवर अनेक चढ-उतारांमधून गेलेले आहे. त्यांनी महिलांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा दिला, शेतकरी व श्रमिकांच्या समस्या मांडल्या आणि विविध जनकल्याणकारी उपक्रम घडवले. त्यांच्या कामाची दखल घेऊनच आज विविध क्षेत्रांतून त्यांना शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार श्रीकांत शिंदे, सत्यजित देशमुख, मनीषा कायंदे, बाळासाहेब थोरात, सचिन अहिर, विजया रहाटकर, रूपाली चाकणकर, मीना कांबळी, अर्जुन खोतकर, माधुरी मिसाळ आणि अनिता बिरजे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी दूरध्वनी व विविध समाज माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या.

कोंढव्यात अनधिकृत इमारतींवर कारवाई, अनधिकृत बांधकामे विकत घेऊ नका अन्यथा … महापालिकेचा इशारा

पुणे- कात्रज,धनकवडी,कोंढवा,वारजे, आंबेगाव पठार , आदी भागात अनधिकृत इमारती बेसुमार आणि अत्यंत वेगाने वाढत असताना PMC चा बांधकाम परवाना नसलेली अनधिकृत बांधकामे नागरिकांनी खरेदी करू नयेत , तसेच रीडेव्हलपमेंट च्या नावाने केलेली विनापरवाना बांधकामे खरेदी करू नयेत अन्यथा एक न एक दिवस महापालिकेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देत महापालिकेने आज कोंढव्यात अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरु केली .

कोंढवा खुर्द परिसरामध्ये अनाधिकृत बांधकाम कारवाई साठी नियुक्त केलेल्या विशेष पथकामार्फत आज दि.12/9/2025 रोजी कोंढवा खुर्द , शिवनेरी नगर गल्ली क्र. 1, मध्ये P+5  व P+4  मजला दोन इमारती सुमारे 15000 चौ. फुट आर सी सी बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे.
सदर कारवाई साठी 10 बिगारी, 5 पोलीस, 1 jcb , 4 brekar, 2 गॅस cutter,  6 कनिष्ठ अभियंता, 3 उपअभियंता उपस्थित होते.
त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम हे कारवाई झाल्यामुळे धोकादायक झालेले आहे.त्याचा वापर करण्यात येऊ नये व सदर इमारतीत सदनिका विकत घेऊ नये.असेही आवाहन पुणे महानगरपालिकेने केले आहे.

मंगळवारी १६ सप्टेंबरला टिळक भवनमध्ये काँग्रेसचा रोजगार मेळावा.

0

४० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार, बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी.

मुंबई, दि. १२ सप्टेंबर २०२५
राज्यात बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढलेली असून शिक्षण असूनही रोजगार मिळत नाही अशी परिस्थिती आहे. सरकार नोकर भरती करत नसल्याने लाखो पात्र मुले-मुली रोजगारापासून वंचित आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळावे या भूमिकेतून काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला असून मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे आयोजित या रोजगार मेळाव्यात आयटी, बँकिंग, रिटेल, हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस अशा विविध क्षेत्रांतील ४० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या माध्यमातून तरुणांना शेकडो नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यातील इयत्ता ८ वी पासपासून उच्च शिक्षित गरीब व मध्यम वर्गीय तरुणांसाठी ही विशेष संधी आहे. बेरोजगार तरुणांनी https://forms.gle/1Y7mScKgSAc9tY1E8 या लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी व या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

जागतिक आयात शुल्क बदलाबाबत राज्याच्या निर्यातक्षम उद्योगांवर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चासत्र संपन्न

पुणे , दि. १२: जागतिक आयात शुल्क बदलांचा राज्याच्या निर्यातक्षम उद्योगांवर होणाऱ्या परिणामांबाबत अभ्यास करुन उपाययोजना सुचविण्यासाठी विभागस्तरीय समिती आणि जिल्हा, विभागातील विविध उत्पादने निर्यात करणारे उपक्रम, औद्योगिक संघटना, उद्योजक यांचे चर्चासत्र जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे आयोजित करण्यात आले.

यावेळी केंद्रीय संरक्षण विभागाचे प्रमूख सल्लागार अपूर्व चंद्रा, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी,विदेश व्यापार संचालनालयाचे सहसंचालक बी. एन. विश्वास, सांगलीचे अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, पुणे विभागाचे उद्योग सह संचालक संदीप रोकडे आदी उपस्थित होते.

यावेळी राज्यातील उद्योजकांद्वारे निर्मित विविध उत्पादनांचे निर्यात उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, करसवलती आणि विविध शासकीय सवलती देण्याची मागणी उद्योग प्रतिनिधींनी केली आहे. दागिने तसेच इतर निर्यातदार युनिट्सना मुद्रांक शुल्कामध्ये (स्टॅम्प ड्युटी) सवलत मिळावी, किमान १५ वर्षांसाठी वीज करमाफी जाहीर करावी, मंजूर उपकरामुळे लहान उद्योगांवर पडणारा ताण कमी करावा, अग्निशमन विभागाकडून मिळणाऱ्या नाहरकत प्रमाणपत्राकरिता आकारले जाणारे शुल्क कमी करावे, अशा ठोस मागण्या करण्यात आल्या. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘Consent to Establish’ व ‘Consent to Operate’ या परवानग्यांसाठी मागविण्यात येणाऱ्या बँक हमीवरही पुनर्विचार करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले. विद्यमान युनिट्सनादेखील एफआयईओमार्फत आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा उद्योगांकडून व्यक्त झाली.

उद्योगांच्या वाढीसाठी हरित ऊर्जा धोरण राबविणे, निर्यात प्रोत्साहनासाठी विशेष सवलती जाहीर करणे, बहुविध वाहतूक उद्याने उभारणे, निर्यातदारांना कायदेशीर मार्गदर्शन उपलब्ध करून देणे व निर्यात प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या खर्चाची भरपाई शासनाने करावी, या मागण्यांचाही बैठकीत समावेश होता.

नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान : लाखो नागरिकांना मिळणार नवदृष्टीचा लाभ

0

मुंबई, दि. १२ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर पासून ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ महाराष्ट्रभर राबविले जाणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी २ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येणार आहेत.

या विशेष मोहिमेतून मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना मोफत चष्मेवाटप केले जाणार असून काचबिंदूसह इतर नेत्रविकारांवरील निदान, सल्ला आणि उपचार देखील मोफत केले जाणार आहेत.

जिल्हा व तालुका स्तरावर शिबिरे

राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये, तालुका व गावपातळीवर नेत्र तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. गाव, वस्ती, तांडे, पाडे यांसह दुर्गम भागातील नागरिकांना या शिबिरांचा थेट लाभ होईल. शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालये व संलग्न वैद्यकीय संस्थांकडे पाठवून संपूर्ण मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचार करण्यात येतील.

उपक्रमातील संस्थांचा व्यापक सहभाग

या अभियानात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, सार्वजनिक आरोग्य विभाग, महानगरपालिका, वैद्यकीय शिक्षण विभाग, नगरपालिका, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, धर्मादाय रुग्णालये, महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, ईएसआयसी रुग्णालये तसेच खासगी नेत्र रुग्णालये व विविध सामाजिक संस्था या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. या सर्व संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम अधिक व्यापक आणि यशस्वी होणार आहे.

तळागाळातील नागरिकांसाठी मोठा दिलासा

नेत्ररोग उपचाराचा खर्च गरीब नागरिकांच्या खिशाला परवडणारा नसतो. अशा परिस्थितीत ही मोफत शिबिरे गरजू व वंचित घटकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील वृद्ध, शेतकरी, मजूर, महिला व ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी मिळण्याचा मार्ग या उपक्रमातून खुला होणार आहे.

या उपक्रमाचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशातूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. प्रत्येक गरजू नागरिकांपर्यंत पोहचण्याकरिता सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे. यामुळे लाखो रूग्णांवर मोफत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रियेसह औषधोपचार केले जाणार आहेत. या शिबिराचा लाभ राज्यातील गरजू रूग्णांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

कर्णकर्कश्श.. डी जे ला करा हद्दपार’, कलावंत ढोल ताशा पथकाची मागणी

पुणे-गणेशोत्सव झाला, नवरात्र येईल, नंतर दिवाळीतले फटाके, वर्षभर महापुरुषांच्या होणाऱ्या जयंती मिरवणुका, दांडगे विवाह सोहळे असे बरेच काही रस्त्यावर, सार्वजनिक जागेवर सुरू असते. त्यात आपण सारे उत्साहाने, आनंदाने सहभागी होतो. फक्त आक्षेप येतो तो गोंगाट, कर्णकर्कश आवाजावर. कायदा आहे, नियम आहे, त्यावर न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानंतरही ध्वनी प्रदूषण प्रत्येक वर्षी होते, प्रत्येक गावात होते. यंत्रणा कारवाईसुद्धा करतात. यावर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यात तसेच सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर शहरांत डीजे वाजला नाही. त्यामुळे या शहराचे कौतुक सर्वत्र होत आहे. दरम्यान, कलावंत ढोल ताशा पथकाने मोठी मागणी केली आहे. सर्व उत्सव डी जे मुक्त झाले पाहिजेत. असे कलावंत पथकाने म्हटले आहे.

सार्वजनिक उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये वाढत्या डॉल्बी आणि साउंड सिस्टिम्सच्या वापरा विरोधात कलावंत ढोल ताशा पथकाच्या कलाकारांकडून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. “डीजेवर बंदी घालावी” या मागणीसाठी रविवारी पुण्यात स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली असून, या मोहिमेत अनेक मराठी कलाकार सहभागी होणार आहेत. या मोहिमेतून गोळा करण्यात येणाऱ्या स्वाक्षऱ्या व निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द केले जाणार असल्याची माहिती अभिनेते सौरभ गोखले यांनी दिली आहे.
कलावंत ढोल पथकाच्या नेमक्य मागण्या काय?
धार्मिक व सांस्कृतिक उत्सवांतील मिरवणुका, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी निमित्त शोभायात्रांमध्ये डीजे/डॉल्बी व तत्सम मोठ्या ध्वनीप्रणालींना सक्त मनाई करावी.
आवाजामुळे स्थानिक रहिवाश्यांना होणारा त्रास, शारीरिक हानी (जसे की बहिरेपणा) तसेच वाहतूक कोंडीस आळा घालावा.
मिरवणुकांमध्ये पारंपरिक वाद्य व कलाप्रकारांना प्रोत्साहन द्यावे. ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी स्वतंत्र नियमावली तयार करावी.

कलावंत ट्रस्टकडून नागरिकांना आवाहन
प्रत्यक्ष येऊन स्वाक्षरी करून किंवा डिजिटल पिटीशन साइन करून या मोहिमेला पाठिंबा द्यावा. डिजिटल पिटीशनसाठीची लिंक कार्यक्रमाच्या दिवशी उपलब्ध करून देण्यात येईल. परंपरागत वाद्यांचा गजर आणि संस्कृतीचे जतन या उद्देशाने ही मोहीम राबवली जात असल्याचे कलावंतांनी स्पष्ट केले.


कलावंत पथकाला मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाने विसर्जन मिरवणुकीसाठी आमंत्रित केलं… त्याप्रमाणे पूर्ण पथक ठरल्यावेळी सायंकाळी 6 वाजता वादनासाठी तयार असून आणि मंडळाने सर्वतोपरी प्रयत्न करू नये टिळक रोडवरील विसर्जन मिरवणूक एक इंचही पुढे न सरकल्याने ठीक रात्री 9 वाजता असलेल्या जागी एक गजर करून, ध्वजवंदन करून वादनास विराम देण्याचा निर्णय घ्यावा लागला. याबद्दल पथकाने पोस्ट करत चाहत्यांची माफी मागत खंत व्यक्त केली होती.

वस्तू आणि सेवाकर – (जीएसटी) सुसूत्रीकरणामुळे रस्ते वाहतूक आणि ऑटो क्षेत्राला मोठी चालना


परवडणारी वाहने: दुचाकी, कार आणि बसवरील जीएसटी कमी करून 18% ; ट्रॅक्टरसाठी 5%

ऑटो-साहित्य लाभांमुळे बळकट पुरवठा साखळी आणि एमएसएमईत वाढ

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2025-केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी परिषदेच्या 56 व्या बैठकीत रस्ते वाहतूक  आणि ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी जीएसटी दरांमध्ये  मोठी सुधारणा करण्यात आली. या सुधारणा दुचाकी, कार, ट्रॅक्टर, बस, व्यावसायिक वाहने आणि ऑटो-साहित्य यांना कर सवलत देत आहेत.

या सुधारणांमुळे वाहने अधिक परवडणारी ठरतील, लॉजिस्टिक्स कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि शहरी आणि ग्रामीण बाजारपेठेत मागणी वाढविण्यासाठी या सुधारणा महत्वाच्या ठरतील. यामुळे ऑटो-साहित्य  पुरवठा साखळीत एमएसएमईंना बळकटी मिळेल, रोजगार निर्माण होईल आणि स्वच्छ, अधिक कार्यक्षम गतिशीलता वाढेल. करप्रणाली सुलभ आणि स्थिर केल्यामुळे, उत्पादन स्पर्धात्मकता वाढेल, शेतकऱ्यांना व वाहतूक ऑपरेटरांना सहाय्य करते आणि मेक इन इंडिया आणि पीएम गती शक्ती सारख्या राष्ट्रीय उपक्रमांना बळकटी मिळेल.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील वाढीला चालना

वाहने आणि ऑटो साहित्याच्या श्रेणींमध्ये जीएसटी दरांमध्ये अलिकडेच केलेली कपात ही एक परिवर्तनकारी पाऊल आहे,  जी उत्पादक, सहाय्यक उद्योग, एमएसएमई, शेतकरी, वाहतूक ऑपरेटर आणि औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही क्षेत्रातील लाखो कामगारांना लाभदायक ठरेल.

ठळक परिणाम:

• दुचाकी, लहान कार, ट्रॅक्टर, बस आणि ट्रक यांचे कमी दर
• मागणी वाढून उत्पादन, विक्री, लॉजिस्टिक्स आणि सेवांमध्ये रोजगार निर्मिती
• एनबीएफसी, बँका व फिनटेक्सद्वारे क्रेडिटवर आधारित वाहन खरेदीत वाढ
• मेक इन इंडिया मध्ये प्रोत्साहन, स्पर्धात्मकता सुधारणा आणि स्वच्छ गतिशीलता

क्षेत्रनिहाय जीएसटी दरात बदल

वाहन/उत्पादन श्रेणीपूर्वीचा GST दरनवा GST दरप्रमुख फायदे
दुचाकी (<350 cc)28%18%युवक, ग्रामीण कुटुंबे व गिग कामगारांसाठी सहज उपलब्ध गतिशीलता
लहान कार28%18%प्रथमच खरेदी करणाऱ्यांना प्रोत्साहन, छोट्या शहरांतील विक्रीत वाढ
मोठ्या कार28% + उपकर40% (Flat)करप्रणाली सोपी, पूर्ण आयटीसी  पात्रता, आकांक्षी खरेदीदारांसाठी परवडणारी किंमत
ट्रॅक्टर (<1800 cc)12%5%भारताच्या जागतिक ट्रॅक्टर हब दर्जाला बळकटी, शेती यांत्रिकीकरणाला चालना
बस (10+ आसन)28%18%परवडणारी सार्वजनिक वाहतूक, फ्लीट विस्तारास सहाय्य
व्यावसायिक मालवाहतूक28%18%वाहतूक खर्चात घट, महागाईचा भार कमी, पुरवठा साखळी अधिक सक्षम
ऑटो साहित्य28%18%पूरक एमएसएमई चालना, देशांतर्गत उत्पादन वाढ
मालवाहतूक विमा12%5% (आयटीसी सह)लॉजिस्टिक्सला सहाय्य, वाहतूकदारांचा खर्च कमी

परिसंस्थेतील फायदे
1. रोजगार आणि एमएसएमई
• ऑटो आणि संबंधित क्षेत्रातील 3.5 कोटींहून अधिक जास्त रोजगार निर्मिती
• टायर, बॅटरी, काच, स्टील, प्लास्टिक आणि इलेक्ट्रॉनिक्समधील लहान व्यवसायांवर बहुगुणित परिणाम
• चालक, मेकॅनिक, गिग वर्कर्स व सेवा प्रदात्यांसाठी अधिक संधी

2. स्वच्छ व सुरक्षित वाहतूक
• जुन्या, प्रदूषित वाहनांच्या जागी इंधन कार्यक्षम मॉडेल्स वापरण्यास प्रोत्साहन
• बस व सार्वजनिक वाहतुकीच्या वापरास चालना, गर्दी व प्रदूषण कमी

3. लॉजिस्टिक्स व निर्यात वाढ
• कमी भाडे दरामुळे शेती, एफएमसीजी, ई-कॉमर्स व औद्योगिक पुरवठा साखळी बळकट
• पी एम गती शक्ती व राष्ट्रीय लॉजिस्टिक्स धोरणांतर्गत भारताची निर्यात स्पर्धात्मकता सुधारते

ही जीएसटी सुधारणा भारताला परवडणारी, कार्यक्षम व टिकाऊ गतिशीलतेच्या दिशेतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. वाहन व ऑटो-साहित्यावर कर भार कमी झाल्याने ग्राहकांना फायदा, ऑटो परिसंस्था बळकट, एमएसएमई ला सहाय्य व शहर व ग्रामीण भागात रोजगार वाढणार आहे.

22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणारे जीएसटी सुधार नागरिकांचे जीवनमान आणि उद्योगांसाठी व्यवसाय सुलभ करण्यासोबतच भारताच्या अधिक सोप्या, न्याय्य आणि विकासाभिमुख जीएसटी आराखड्यासाठी भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी करतात.

२ देशी पिस्टल बाळगून फिरणाऱ्या २२ वर्षीय ओमकार जाधवला पकडले

पुणे- २ देशी पिस्टल बाळगून फिरणाऱ्या आंबेगाव पठारावर राहणाऱ्या २२ वर्षीय ओमकार जाधवला पोलिसांनी पकडले,तो दहशत माजविण्यासाठी जवळ देशी पिस्टल बाळगून फिरत होता . या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक १०/०९/२०२५ रोजी पर्वती पोलीस स्टेशन हद्दित वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक श्री. किरण पवार व तपास पथकातील पोलीस अंमलदारासह पोलीस स्टेशन हद्दित पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलिक व सद्दाम शेख यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन सापळा रचुन आरोपी ओंमकार दिपक जाधव वय २२ वर्षे रा. साई सिध्दी चौक स.नं. १६, दुसरा मजला आंबेगाव पठार पुणे यास अत्यंत शिताफीने पकडुन त्याचे ताब्यातुन एकुण ७१,४००/-रु.किं.चे २ देशी बनावटीचे पिस्टल, ४ मॅगझिन व २ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले असुन सदर आरोपी विरुध्द पर्वती पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २८८/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधि. कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त परि-३ संभाजी कदम, सहा. पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सद्दाम शेख, सुर्या जाधव, अमित चिव्हे, अमोल दबडे, श्रीकांत शिंदे, मनोज बनसोडे, नानासो खाडे, राकेश सुर्वे, स्वप्निल घुगे व किर्ती भोसले यांनी केली आहे.

सोनी इंडियातर्फे नवीन फुल-फ्रेम FX2 सिनेमा लाईन कॅमेरा सादर


शक्तिशाली सिनेमॅटिक फीचर्स, सहज वापरता येणारी डिझाईन रचना आणि वाजवी किंमत यामुळे प्रत्येकासाठी वापरायला सुलभ कॅमेरा

·  33MP फुल फ्रेम बॅक इल्यूमिनीटेड CMOS सेन्सर, QFHD 4K 60p (S35mm) पर्यंत, FX2 मुळे उच्च दर्जाचे सिनेमॅटिक व्ह्यूज सादर

·15 हून अधिक स्टॉप वाईड लॅटीट्युड आणि ड्युअल बेस ISO (800/4000), यामुळे कमी उजेडात देखील अप्रतिम दर्जाचे पिक्चर मिळते

·16 User LUTs मुळे प्रॉडक्शन दरम्यान क्रिएटिव्ह लुक्सचा रिअल-टाईम प्रीव्ह्यू करता येतो

· S-Cinetone™ फीचरमुळे, तो सोनीच्या फ्लॅगशिप VENICE कॅमेर्‍यांच्या टोनशी जुळतो आणि प्रत्येक कथेसाठी हाय-एंड व्हिज्युअल्स सुनिश्चित करतो

·स्लो अँड  क्विक मोशन फीचर वापरकर्त्यांना 4K मध्ये 60 fps आणि Full HD मध्ये 120 fps पर्यंत रेकॉर्ड करण्याची परवानगी देते. त्यामुळे नाट्यपूर्ण स्लो-मोशन इफेक्ट्स तयार होतात.

·Venice कलरिमेट्रीशी जुळवण्यासाठी 4:2:2 10-bit रेकॉर्डिंग सिनेमा लुक

· न्यू लॉग शुटींग मोड सारखी नवीन वैशिष्ट्ये स्थिर चित्रे कॅप्चर करण्यासाठी समाविष्ट केली गेली आहेत आणि NEW Tiltable 3.68M-dot EVF फीचर हायब्रिड बहुउपयोगिता खुली करते

·अनोखे BIG6 (Home) Screen वैशिष्ट्य सर्वाधिक वापरले जाणारे सेटिंग्ज सहज उपलब्ध करून देते

· समान फॉर्म फॅक्टर आणि सोपे कंट्रोल्स यामुळे तो सोलो शूटर्ससाठी परिपूर्ण पर्याय ठरतो

·पर्यायी XLR Handle आणि मल्टी- ॲप्लिकेशन सपोर्टमुळे FX2 कोणत्याही प्रॉडक्शन स्टाईलसाठी तयार आहे

नवी दिल्ली – सोनी इंडियाने नव्या पिढीतील निर्मात्यांसाठी डिझाईन करण्यात आलेला आटोपशीर फुल-फ्रेम सिनेमा लाईन हायब्रिड नवीन FX2 कॅमेरा सादर केला आहे.  प्रगत सिनेमॅटिक तंत्रज्ञानासह FX2 कॅमेरा उदयोन्मुख चित्रपट निर्माते, विद्यार्थी, स्वतंत्र व्हिडिओग्राफर्स आणि कंटेंट क्रिएटर्सना म्हणजेच आशय निर्मात्यांना त्यांचा अनुभव किंवा क्रू साईज काहीही असला तरी त्यांची सर्जनशील दृष्टी वाढवण्यासाठी सक्षम करतो. FX2 प्रगत वैशिष्ट्ये आणि सोनीच्या अद्वितीय कलर सायन्स यांचे मिश्रण करून, वापरकर्त्यांना त्यांचा प्रकल्प आकाराने लहान किंवा गुंतागुंतीचा असला तरी त्यांची सर्जनशील क्षमता मुक्त करण्यास सक्षम करतो.

सोनी इंडियाच्या इमेजिंग बिझनेसचे प्रमुख श्री. मुकेश श्रीवास्तव म्हणाले, “FX2 कॅमेरा पुढील पिढीच्या स्टोरीटेलर्ससाठी म्हणजेच विशेषतः विद्यार्थी आणि सोलो क्रिएटर्ससाठी त्यांना त्यांच्या सर्वात महत्त्वाकांक्षी कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी गेम-चेंजर ठरणार आहे. हा केवळ एक कॅमेरा नाही; तर एक क्रिएटिव्ह पार्टनर आहे. तो त्यांच्या फिल्ममेकिंग प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासोबत वाढेल आणि आम्ही या कॅमेर्‍यामुळे तयार होणाऱ्या अप्रतिम कथांना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहोत.”

·         33MP फुल फ्रेम बॅक इल्यूमिनीटेड CMOS सेन्सर, QFHD 4K 60p (S35mm) पर्यंत, FX2 मुळे उच्च दर्जाचे सिनेमॅटिक व्ह्यूज सादर

सोनी FX2 कॅमेरा हा हाय-परफॉर्मन्स सिनेमा लाईन कॅमेरा असून तो फुल-फ्रेम 33.0MP बॅक-इल्युमिनेटेड CMOS सेन्सरद्वारे अप्रतिम सिनेमॅटिक इमेजरी देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा कॅमेरा QFHD 4K 60p पर्यंत ऑफर करतो ज्यामुळे उच्च रिझोल्यूशन आणि बोकेह इफेक्टसह अप्रतिम सिनेमॅटिक इमेजेस मिळतात. यामध्ये नवीन सिस्टम आर्किटेक्चर, BIONZ XR इमेज प्रोसेसिंग आणि एआय प्रोसेसिंग युनिट आहे. त्यामुळे FX2 बारीकसारीक समृद्ध तपशीलांसह प्रतिमा कॅप्चर करू शकतो आणि ऑब्जेक्टला स्पष्टपणे उठाव देतो.

·         15 हून अधिक स्टॉप वाईड लॅटीट्युड आणि ड्युअल बेस ISO (800/4000), यामुळे कमी उजेडात देखील अप्रतिम दर्जाचे पिक्चर मिळते

हा कॅमेरा 15 हून अधिक स्टॉप्सपर्यंत वाइड डायनॅमिक रेंज, Dual Base ISO (800/4000) आणि ISO 102400 पर्यंत विस्तारित सेंसिटिव्हिटी सादर करतो. त्यायोगे उच्च दर्जाचा सिनेमॅटिक व्हिडिओ घेता येतो. या वैशिष्ट्यामुळे FX2 मधून अप्रतिम चांगल्या प्रतिमा घेता येतात, अगदी कमी उजेड असतानाही दृश्य अचूकपणे टिपता येते. त्यामुळे तो व्हिडिओग्राफीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरतो.

·         16 User LUTs मुळे प्रॉडक्शन दरम्यान क्रिएटिव्ह लुक्सचा रिअल-टाईम प्रीव्ह्यू करता येतो

16 User LUTs सह हा कॅमेरा इमेजेस आणि व्हिडिओ सहजपणे इम्पोर्ट करण्याची खात्री देतो. त्यामुळे सिनेमॅटोग्राफर्स आणि DOPs त्यांचा क्रिएटिव्ह ग्रेड सेटवर लाईव्ह प्रीव्ह्यू करू शकतात. त्यातून अंतिम लुकवर अचूक नियंत्रण मिळते.

·         S-Cinetone™ फीचरमुळे, तो सोनीच्या फ्लॅगशिप VENICE कॅमेर्‍यांच्या टोनशी जुळतो आणि प्रत्येक कथेसाठी हाय-एंड व्हिज्युअल्स सुनिश्चित करतो

सोनीच्या फ्लॅगशिप VENICE कॅमेर्‍यांचा सिग्नेचर टोनशी सुसंगत हे उत्पादन  सोनीच्या प्रसिद्ध S-Cinetone™ कलर तंत्रज्ञानासह येते. या वैशिष्ट्यामुळे FX2 प्रत्येकासाठी हाय-एंड सिनेमॅटिक व्हिज्युअल्स देण्यासाठी डिझाईन केला आहे. जोडीला या वैशिष्ट्यामुळे DOPs शूटिंग दरम्यानच कलर अ‍ॅडजस्टमेंट करू शकतात.

·         स्लो अँड  क्विक मोशन फीचर वापरकर्त्यांना 4K मध्ये 60 fps आणि Full HD मध्ये 120 fps पर्यंत रेकॉर्ड करण्याची परवानगी देते. त्यामुळे नाट्यपूर्ण स्लो-मोशन इफेक्ट्स तयार होतात.

या कॅमेर्‍यामध्ये प्रगत स्लो आणि क्विक मोशन फीचर आहे. त्यामुळे वापरकर्ते 4K मध्ये प्रति सेकंद 60 फ्रेम्स आणि Full HD मध्ये प्रति सेकंद 120 फ्रेम्स शूट करू शकतात. यामुळे नाट्यमय स्टोरीटेलिंग आणि क्रिएटिव्ह फ्लेक्सिबिलिटीसाठी अप्रतिम स्लो-मोशन इफेक्ट्स मिळतात.

·         सखोल रंग आणि स्पष्टता सुनिश्चित करत 4:2:2 10-bit रेकॉर्डिंग सिनेमा लुक

FX2 4K व्हिडिओ 4:2:2 10-bit मध्ये कॅप्चर करून अप्रतिम डिटेल, कलर डेप्थ आणि टोनल रेंज सुनिश्चित करतो. त्यामुळे पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये निर्दोष परिणाम मिळतात.

·         न्यू लॉग शुटींग मोड सारखी नवीन वैशिष्ट्ये स्थिर चित्रे कॅप्चर करण्यासाठी समाविष्ट केली गेली आहेत आणि NEW Tiltable 3.68M-dot EVF फीचर हायब्रिड बहुउपयोगिता खुली करते

नवीन लॉग शुटींग मोड मेन्यूद्वारे पोस्ट-प्रॉडक्शन प्रक्रियेत कलर ग्रेडिंगसाठी 33MP रिझोल्यूशनपर्यंत स्टिल्स शूट करता येतात. यामुळे वापरकर्ते रेकॉर्ड केलेल्या चित्रपटांमधूनच कॅमेरा मध्येच स्टिल इमेजेस (स्थिर प्रतिमा) कॅप्चर करू शकतात. याशिवाय, उच्च-परिभाषा Tiltable EVF कोणत्याही शूटिंग परिस्थितीशी जुळवून घेतो. त्यामुळे पाहणे सोपे होते. या दोन्ही वैशिष्ट्यामुळे वापरकर्ते सर्वोत्तम सिनेमॅटिक इमेजेस तयार करू शकतात.

·         अनोखे BIG6 (Home) Screen वैशिष्ट्य सर्वाधिक वापरले जाणारे सेटिंग्ज सहज उपलब्ध करून देते

सोनी FX2 वरील BIG6 (Home) Screen हे एक अनोखे, सुलभ युजर इंटरफेस असून मुव्ही मोड मध्ये एका सिंगल पेजवर फ्रेम रेट (FPS), ISO, शटर स्पीड किंवा अँगल, ॲपेचर किंवा एनडी फिल्टर, लुक प्रेसेंट आणि व्हाईट बॅलन्स अशा सहा महत्त्वाच्या शूटिंग पॅरामिटर्स यांना जलद ॲक्सेस देते. हे स्क्रीन फिल्ममेकर्सना हे सेटिंग्ज त्वरित मॉनिटर आणि अ‍ॅडजस्ट करण्यास सक्षम  करते. त्यामुळे व्हेरीएबल आणि फिक्स्ड कॉन्फिगरेशन दोन्हीला सपोर्ट मिळतो. यामुळे कार्यक्षमता वाढते आणि ऑन-सेट उत्पादकता सुधारते. सतत वापरल्या जाणाऱ्या या कंट्रोल्सच्या केंद्रीकरणामुळे सोलो शूटर्स तसेच प्रोफेशनल्ससाठी सर्जनशील नियंत्रण राखणे आणि वेळ वाचवणे अधिक सुलभ होते.

·         समान फॉर्म फॅक्टर आणि सोपे कंट्रोल्स यामुळे तो सोलो शूटर्ससाठी परिपूर्ण पर्याय ठरतो

FX2 चे एर्गोनॉमिक डिझाईन विशेषतः सोलो शूटर्ससाठी तयार केले आहे. यात आटोपशीर, हलक्या वजनाचे बॉडी स्टाईल आणि intuitive कंट्रोल लेआउट असून सोनीच्या प्रसिद्ध FX3 आणि FX30 कॅमेर्‍यांमधून घेतले गेले आहे.

·         पर्यायी XLR Handle आणि मल्टी- ॲप्लिकेशन सपोर्टमुळे FX2 कोणत्याही प्रॉडक्शन स्टाईलसाठी तयार आहे

FX2 मध्ये प्रगत ऑडिओसाठी पर्यायो XLR Handle सपोर्ट आहे आणि विविध सोनी ॲप्लिकेशन्ससाठी सपोर्ट आहे. त्यामध्ये रिमोट मॉनीटरिंग आणि नियंत्रण यांचा समावेश आहे. त्यामुळे तो प्रत्येक प्रॉडक्शन स्टाईल आणि आवश्यकतेशी जुळवून घेण्यास सक्षम आहे.

किंमत आणि उपलब्धता

FX2 फुल-फ्रेम सिनेमा लाईन कॅमेरा 11 सप्टेंबर 2025 पासून भारतभरातील सर्व सोनी अधिकृत रिटेल आउटलेट्स, सोनी कॅमेरा लाऊंज, अल्फा फ्लॅगशिप स्टोअर्स, सोनी सेंटर, www.ShopatSC.com पोर्टल, प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स आणि ई-कॉमर्स वेबसाईट्स (ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट) वर उपलब्ध असेल. FX2 आणि FX2B सोबत मर्यादित कालावधीसाठी 5,890/-रु. किमतीची अतिरिक्त रिचार्जेबल बॅटरी मोफत मिळेल.

मॉडेल नावएमआरपीउपलब्धता
ILME-FX2309,990/- रु.11 सप्टेंबर 2025 पासून
ILME-FX2B289,990/- रु.11 सप्टेंबर 2025 पासून