Home Blog Page 133

धर्मसत्तेचा पराभव करणे हे खरे आव्हान :विजय दिवाण 

पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने २४ वे गांधी दर्शन शिबिर गांधी भवन, कोथरूड येथे यशस्वीपणे पार पडले. १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात विविध विषयांवर विचारप्रवर्तक मार्गदर्शन झाले.मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. दीपक पवार यांनी ‘भारतातील भाषेचा प्रश्न’ या विषयावर सखोल विचार मांडले. ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते विजय दिवाण यांनी ‘गांधी, विनोबा आणि सद्य-परिस्थिती’ या विषयावर प्रेरणादायी भाष्य केले. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी ‘शिवरायांची अष्टक्रांती’ या विषयावर उपस्थितांना ऐतिहासिक दृष्टिकोन दिला. 

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव अन्वर राजन यांनी प्रास्ताविक केले. शिबिराचे अध्यक्षस्थान डॉ. कुमार सप्तर्षी (अध्यक्ष, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी) यांनी भूषविले. या प्रसंगी  डॉ. मच्छिंद्रनाथ गोर्डे,डॉ.प्रकाश परब,डॉ.प्रवीण सप्तर्षी,अॅड. स्वप्नील तोंडे,अप्पा अनारसे,तेजस भालेराव,राजेश तोंडे,संदीप बर्वे  यांची विशेष उपस्थिती होती.शिबिरात विद्यार्थी, संशोधक, सर्वोदयी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

विजय दिवाण म्हणाले,’ विनोबा भावे यांच्यावर सरकारी संत असल्याचे आरोप झाले. परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कावा पुरेपूर ओळखल्याने त्यांनी संघासोबत जाण्याची भूमिका स्वीकारली नाही. आणीबाणीत ज्यांनी संघाला मोठे केले,त्यांनी ज्या चुका केल्या,त्या विनोबा भावे आणि सर्वोदयी कार्यकर्त्यांनी केल्या नाहीत. विनोबांची दूरदृष्टि आज मान्य करायला हरकत नाही. काँग्रेसला पाठिंबा देऊनच भाजपचा पराभव आगामी काळात होईल. 

‘आजची परिस्थिती उत्तर पेशवाईसारखी आहे.तेव्हाही धर्मसत्ता,अर्थसत्ता,राज्यसत्ता एकत्र होती आणि ती जाचक झाली होती.राज्यसत्ता,अर्थसत्ता यांचा पराभव करता येईल.मात्र, संघाचा आणि धर्मसत्तेचा पराभव करायला परिश्रम घ्यावे लागतील.कारण ती एकाच जातीच्या हातात आहे.धर्म न नाकारता, धर्मात सुधारणा करीत पुढे जावे लागणार आहे. फॅसिस्ट राजसत्ता, अर्थसत्ता उलथवून टाकता येईल, मात्र, धर्मसत्ता उलथवून टाकणे अवघड आहे. त्यामुळे खऱ्या  द्वेषरहित,मानवतावादी  धर्माच्या मार्गाने जाण्याचा आग्रह धरला पाहिजे. स्वामी विवेकानंद, केवलानंद सरस्वती, स्वामी रामानंद तीर्थ ही उदाहरणे डोळयासमोर ठेवली पाहिजेत’, असेही ते म्हणाले.

डॉ.दीपक पवार म्हणाले,’हिंदी ही राष्ट्रभाषा आहे,हा गैरसमज निर्माण करण्यात आला आहे.हिंदी भाषा सक्तीच्या आग्रहामागे हिंदी-हिंदुस्थान-हिंदुत्ववाद मानणाऱ्यांचे राजकारण असून मराठी माणसाने त्याला बळी पडू नये.भाषा टिकली नाही तर प्रदेश टिकणार नाही,बोली टिकणार नाही.महाराष्ट्रात मराठी भाषेलाच प्राधान्य मिळाले पाहिजे.त्यासाठी प्रत्यक्ष लढ्यात मराठी माणसाने उतरले पाहिजे.अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने मराठीच्या प्रसारासाठी ५०० कोटी मिळतील,असे समजणाऱ्यानी केंद्र सरकारने अशा कारणासाठी पूर्वी किती निधी दिला,याचा हिशेब काढून पाहिले पाहिजे.सकाळी मराठी आणि सायंकाळी हिंदुत्ववादी झाल्याने मराठी माणसाचे शिवसेना आणि मनसेचे झाले तसे नुकसान होणार आहे. 

‘इतिहासातील थरारक प्रसंग आपण आठवत राहतो मात्र त्याकाळातील भाषा व्यवहार आठवत नाही.मराठी माणसाने दिल्लीवर राज्य केले पण मराठी भाषेला मोठे केले नाही.मराठी शाळेत शिकणे,मराठीत बोलणे आवश्यक आहे,नोकरी-व्यवसायात प्रतिनिधित्वाचा आग्रह धरला पाहिजे.परप्रांतीयांनी मराठी बोलण्याचा आग्रह धरला पाहिजे.मराठी फक्त आडनावाचे मराठी राहून उपयोगी नाही.मराठी समाजाचे अघोषित हिंदीकरण होतेय,हिंदूकरण होते आहे,त्याला विरोध केला पाहिजे.हिंदी भाषेच्या पोटातून देशांतर्गत वसाहतवाद येत आहे.त्याबाबत सावध राहिले  पाहिजे’,असेही डॉ.पवार यांनी सांगितले. 

अन्वर राजन म्हणाले,’आणीबाणी आणि त्यापूर्वी जनसंघाला अनेक पक्षांनी तत्कालिन कारणांनी जवळ केले.काँग्रेसचा वैचारिक घसरण झाल्याने आणीबाणीत पराभव झाला.पण, त्यानंतर काँग्रेस मध्ये सुधारणा झाल्या. पराभवानंतर सुधारणा होत जातात’.

टाटा टेक्नॉलॉजीज ने जर्मनीतील ईएस-टेक ग्रुपचे धोरण केले अधिग्रहण


पुढील पिढीतील मोबिलिटी सोल्युशन्स बनवण्याच्या त्यांच्या जागतिक क्षमतांना बळकटी देण्याचा उद्देश  

  • अभियांत्रिकी संशोधन आणि विकास (ईआरअँडडी) वाढीला गती: हे अधिग्रहण टाटा टेक्नॉलॉजीजच्या (टीटीएल) उच्च-वाढीच्या क्षेत्रांमध्ये – एडीएएस, कनेक्टेड ड्रायव्हिंग आणि डिजिटल अभियांत्रिकी – क्षमतांना वाढवते, हे त्यांच्या ओईएम संशोधन आणि विकास प्राधान्यांना अनुरूप आहे.
  • युरोपातील स्थान अधिक मजबूत होणार: जर्मनीतील ईएस-टेकचे नेतृत्व जगातील सर्वात प्रगत ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये टीटीएलची उपस्थिती मजबूत करते.
  • प्रतिभा आणि कौशल्यांमध्ये वाढ: सिस्टम अभियांत्रिकीमध्ये तज्ञ असलेल्या ३०० हून अधिक अभियंत्यांचे एक मजबूत टॅलेंट पूल सामील झाले आहे.
  • व्यावसायिक सहकार्यामध्ये वाढ: क्रॉस-सेल संधी सक्षम करण्यासाठी पूरक ऑफरिंग आणि भिन्न ग्राहक आधार आणि ओईएम खात्यांमध्ये व्यापक प्रवेश.
  • ईपीएसमध्ये वाढ: या व्यवहारांमुळे ऑपरेशनच्या पहिल्या पूर्ण वर्षापासून ईपीएसमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा आहे.

पुणे, भारत / वुल्फ्सबर्ग, जर्मनी – १४ सप्टेंबर २०२५ – जागतिक स्तरावरील उत्पादन अभियांत्रिकी आणि डिजिटल सेवा कंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीज (बीएसई: ५४४०२८, एनएसई: TATATECH) ने आज घोषणा केली की त्यांनी ईएस-टेक जीएमबीएच आणि त्यांच्या उपकंपन्यांचे (एकत्रितपणे, ईएस-टेक ग्रुप) १००% इक्विटी शेअर्स खरेदी करण्यासाठी एक निश्चित समझोता करार केला आहे ज्याचे एकूण रोख मूल्य €७५ दशलक्ष आहे. ही रक्कम पुढील दोन वर्षांत दिली जाईल आणि त्यात कामगिरीवर आधारित फायदे समाविष्ट आहेत. ऑपरेशनच्या पहिल्या पूर्ण वर्षापासून हा व्यवहार ईपीएससाठी फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा आहे.

ईएस-टेक ग्रुपची स्थापना २००६ मध्ये करण्यात आली आणि याचे मुख्यालय जर्मनीतील वुल्फ्सबर्ग येथे आहे. हा एक प्रीमियम ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकी सेवा प्रदाता आहे जो ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (एडीएएस), कनेक्टेड ड्रायव्हिंग आणि डिजिटल अभियांत्रिकीमध्ये अतिशय कुशल आहे. ३०० हून अधिक कुशल व्यावसायिकांच्या प्रतिभा समूहासह, ईएस-टेकने आपल्या ग्राहकांना जटिल सिस्टम अभियांत्रिकी उपाय प्रदान करून प्रतिष्ठा मिळवली आहे.

या अधिग्रहणासह, टीटीएलने त्यांच्या जागतिक वृद्धी धोरणात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे, ज्यामुळे ऑटोमोटिव्ह उद्योगाला भविष्यासाठी तयार अभियांत्रिकी उपाय प्रदान करण्याची त्यांची वचनबद्धता आणखी दृढ झाली आहे. जगातील सर्वात प्रगत ऑटोमोटिव्ह इनोव्हेशन सेंटरपैकी एक असलेले ईएस-टेकने जर्मनीमध्ये एक स्थान निर्माण केले आहे, ज्यामुळे टाटा टेक्नॉलॉजीजना त्यांच्या ER&D ऑपरेशन्सचा विस्तार करण्यासाठी, उच्च-स्तरीय अभियांत्रिकी प्रतिभा उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रमुख ओईएमसोबत संबंध दृढ करण्यासाठी एक धोरणात्मक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

ऑटोमोटिव्ह उद्योगात मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे, युरोपियन OEMs ADAS/AD, विद्युतीकरण आणि सॉफ्टवेअर-परिभाषित वाहन प्लॅटफॉर्ममध्ये संशोधन आणि विकास गुंतवणूक वाढवत आहेत. परिणामी, युरोपमधील अभियांत्रिकी सेवा प्रदात्यांसाठी (ESPs) बाजारपेठ २०२० मध्ये €४.५ अब्ज वरून २०३० पर्यंत €११.७ अब्ज पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. हा ट्रेंड ES-Tech ला त्यांच्या क्षमतांचा विस्तार करण्यासाठी, त्यांच्या ग्राहक भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि उच्च-मूल्याच्या विकास कार्यक्रमांचा मोठा वाटा मिळविण्यासाठी महत्त्वपूर्ण संधी प्रदान करतो.

टाटा टेक्नॉलॉजीजचे एमडी आणि सीईओ वॉरेन हॅरिस म्हणाले, “ईएस-टेक ग्रुपचे अधिग्रहण ही एक मोठी धोरणात्मक भरारी आहे, जी ऑटोमोटिव्ह मूल्य साखळीमध्ये एंड-टू-एंड उत्पादन अभियांत्रिकी उपाय प्रदान करण्याची आमची क्षमता वाढवते आणि नाविन्यपूर्ण अभियांत्रिकी क्षमतांमध्ये प्रवेश करण्यासाठी आमची जागतिक उपस्थिती वाढविण्याची आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करते. ईएस-टेकची तांत्रिक खोली, ग्राहक-केंद्रितता आणि प्रादेशिक क्षमता बुद्धिमान, कनेक्टेड आणि शाश्वत गतिशीलतेकडे संक्रमण घडवून आणणाऱ्या जागतिक ओईएमसाठी भागीदारीसाठी पहिली पसंती बनण्यासाठी आमच्या धोरणात्मक दृष्टिकोनाशी पूर्णपणे जुळतात.

टीटीएल कुटुंबात ईएस-टेक टीमचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. ईएस-टेक ग्रुपचे एकत्रीकरण टाटा टेक्नॉलॉजीजच्या ईआर अँड डी क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करेल, विशेषतः एम्बेडेड सिस्टम्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि सिस्टम इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात. आम्ही क्रॉस-सेलिंग सिनर्जी वाढवण्यासाठी, पुढील पिढीतील गतिशीलता कार्यक्रमांचा विस्तार करण्यासाठी आणि संयुक्तपणे नवीन तंत्रज्ञानाचा पाठपुरावा करण्यासाठी चांगल्या स्थितीत असू.”

ईएस-टेकचे एमडी आणि सीईओ मार्क विली म्हणाले, “टाटा टेक्नॉलॉजीजसोबत सामील होणे हे ईएस-टेक ग्रुपसाठी क्षमतांची व्याप्ती आणि खोली वाढवण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. एकत्रितपणे, आम्ही ऑटोमोटिव्ह उद्योगाच्या भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी चांगल्या स्थितीत आहोत, जसे की स्पर्धात्मक किंमत, उत्कृष्ट गुणवत्ता आणि जलद विकास चक्रांद्वारे आमच्या ग्राहकांना वास्तविक मूल्य प्रदान करणे. आमचे ध्येय स्पष्ट आहे: जागतिक ऑटोमोटिव्ह उद्योगाला पुढे नेणे आणि टाटा टेक्नॉलॉजीजसह गतिशीलता क्षेत्रासाठी पसंतीचा भागीदार बनणे.”

हा व्यवहार कस्टमरी क्लोजिंग अटी आणि नियामक मंजुरींच्या अधीन आहे. टाटा टेक्नॉलॉजीज आपली जागतिक उपस्थिती वाढवत राहिल्याने आणि त्यांच्या भागीदारांना भिन्न मूल्य प्रदान करत असताना नवोपक्रम, प्रतिभा आणि ग्राहकांच्या यशात गुंतवणूक करण्यास वचनबद्ध आहे.

या व्यवहारासाठी युरोपमधील एमसीएफ कॉर्पोरेट फायनान्स, टाटा टेक्नॉलॉजीजचे सल्लागार होते.

येत्या बुधवारी महिलांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबिर

पिंपरी :ईशा नेत्रालय आणि वर्षा सातुर्डेकर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत सौ. वर्षा नंदकुमार सातुर्डेकर यांच्या स्मृतिप्रत्यर्थ येत्या बुधवार दि. 17 सप्टेंबर रोजी महिलांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संयोजक ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी ही माहिती दिली.

बुधवार दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत ईशा नेत्रालय, प्रीमियर प्लाझा, पहिला मजला,बिग बाजार, कार्निवल सिनेमाच्या बाजूला जुना पुणे मुंबई महामार्ग, चिंचवड स्टेशन पुणे येथे हे शिबिर होणार आहे.नेत्रचिकित्सा शिबिराचे उद्घाटन ईशा नेत्रालयाचे पुणे ब्रांच इन्चार्ज दीपक कदम यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आधुनिक पद्धतीने नेत्र तपासणी करण्यात येणार असून त्याबरोबरच डोळ्यांचे आजार तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याबाबत डॉ. वैभव अवताडे,डॉ. जयशील नाझरे मार्गदर्शन करणार आहेत. नेत्रालयाचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह यशवंत बो-हाडे यांचे शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभले असल्याची माहिती संयोजक नंदकुमार सातुर्डेकर यांनी दिली. शिबिराच्या आयोजनासाठी सौ. राधा सातुर्डेकर, सौ. कोमल माटे, सौ.रेश्मा बोबडे यांनी पुढाकार घेतला आहे.

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटलांची निवड:पुण्यातील कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय

पुणे-साताऱ्यात होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे. आज पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देणाऱ्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांची नावे चर्चेत होती, परंतु या सर्वांनी आधीच नकार दिल्याने विश्वास पाटील यांच्या नावाची निवड निश्चित मानली जात होती.

जानेवारीत पार पडणार साहित्य संमेलन

साताऱ्यात जानेवारी महिन्यात 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन पार पडेल. नुकतेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले होते.

मराठी साहित्यातील एक मोठे नाव

विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील मोठे नाव असून, ते एक प्रसिद्ध व लोकप्रिय कादंबरीकार आहेत. ते त्यांच्या संशोधनपूर्ण आणि प्रभावी लेखनशैलीसाठी ओळखले जातात. ‘पानिपत’ ही त्यांची गाजलेली ऐतिहासिक कादंबरी आहे. या कादंबरीसाठी त्यांनी केलेला सखोल अभ्यास, भाषेतील ओघवतेपण, आणि ऐतिहासिक घटनांचे नाट्यमय चित्रण यामुळे त्यांचे लेखन वाचकांना आकर्षित करते. त्यांच्या लेखनात मानवी भावनांचे आणि पात्रांच्या मानसिक संघर्षाचे जिवंत दर्शन घडते.

विश्वास पाटलांच्या उल्लेखनीय कांदबऱ्या

पानिपत – मराठ्यांच्या पानिपतवर झालेल्या पराभवावर ऐतिहासिक कादंबरी

झाडाझडती – राजकारण आणि समाज यामधील संघर्षाचे चित्रण.

सिंहासन – राजकीय सत्तासंघर्षावर आधारित.

चंद्रमुखी – समाजाच्या तळागाळातील वास्तव दाखवणारी प्रेमकहाणी.

महाड – अस्पृश्यता आणि सामाजिक अन्यायावर भाष्य करणारी कादंबरी.

स्मरणगंध – आत्मकथनात्मक आणि चिंतनशील लेखन.

पुणेकर महिलेने भर दौऱ्यात अजित पवारांना घेरले:म्हणाली,”इथल्या समस्या पाहता आम्ही इथे राहायचे की नाही?

पुणे – पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळपासून पुण्यातील हडपसर मुंढवा भागात पाहणी दौरा करत आहेत. हा पाहणी दौरा सुरू असताना, अजित पवारांना स्थानिक नागरिकांच्या तीव्र प्रश्नांचा सामना करावा लागला. मुंढवा आणि केशवनगरमधील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्यांची दुरवस्था आणि प्रचंड वाहतूक कोंडी यांसारख्या समस्या थेट त्यांच्यासमोर मांडल्या. एका स्थानिक महिलेने तर वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरून थेट गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासारखी ‘न सांगता’ पाहणी करण्याचा सल्ला अजित पवारांना दिला. त्यावर पर्रीकर कोण? असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी त्या महिलेला विचारला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केशवनगर-मुंढवा येथे नव्याने बांधल्या जाणाऱ्या पुलाची पाहणी करून त्यांनी कामाच्या गुणवत्तेची माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्याला आवश्यक सूचना दिल्या. पुलाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच या भागातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होण्याची शक्यता आहे. याशिवाय, त्यांनी कोंढवा आणि हडपसर येथील वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवर लक्ष घालून अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. सकाळी सकाळी विकासकामांची पाहणी करायला आलेल्या पवारांना आज पुणेकरांच्या प्रश्नांचा आणि रोषाचा चांगलाच अनुभव आला.

हा पाहणी दौरा सुरू असताना, अजित पवारांना स्थानिक नागरिकांच्या तीव्र प्रश्नांचा सामना करावा लागला. मुंढवा आणि केशवनगरमधील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्यांची दुरवस्था आणि प्रचंड वाहतूक कोंडी यांसारख्या समस्या थेट त्यांच्यासमोर मांडल्या. एका स्थानिक महिलेने तर ‘तुम्ही सांगून येऊ नका जसे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर न सांगता रहदारीचा आढावा घ्यायचे तसेच तुम्ही या, असा सल्ला अजित पवारांना दिला.

स्थानिक नागरिकांनी आपल्या व्यथा मांडताना, “इथल्या समस्या पाहता आम्ही इथे राहायचे की नाही?” असा संतप्त सवाल विचारला. यावर अजित पवारांनी हा भाग पीएमआरडीए आणि पुणे महानगरपालिकेच्या वादात अडकल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना फोन करून नागरिकांना सुविधा पुरवण्यासाठी काय उपाय करता येतील यावर चर्चा केली.

यावेळी एक स्थानिक महिला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेला संवाद

अजित पवार : तुम्ही येण्याआधीच आम्ही तुमच्या समस्या ऐकल्या आहेत. निवेदन मिळाले आहे. पीएमसी आणि पीएमआरडीए या वेगवेगळ्या एजन्सीज असल्या तरी, नागरिकांना त्यांच्या सुविधांशी देणेघेणे आहे आणि आम्ही त्यांच्या मागणीशी पूर्णपणे सहमत आहोत. यावर आमचे काम सुरू आहे. उशीर झाल्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही कामांना गती देण्यासाठी आणि प्राथमिकता देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

महिला : आम्हाला तुमच्याकडून खूप आशा आहेत. पर्रीकर ज्याप्रमाणे दिवसा वाहतूक कोंडी पाहण्यासाठी फिरायचे, त्याचप्रमाणे तुम्हीही कधीतरी अचानक येऊन पाहा.

अजित पवार : पर्रीकर कोण?

महिला : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर. ते जसे अचानक फिरायचे, तसेच तुम्हीही फिरून पाहा आणि न सांगता भेट द्या. आम्ही प्रश्न विचारू आणि तुम्ही उत्तर द्याल, असे नको.

अजित पवार : मी इथे प्रश्न विचारायला आलेलो नाही. इथला परिसर ठीक व्हावा आणि समस्या सुटाव्यात यासाठीच मी स्वतः प्रयत्न करत आहे.

महिला : असे नाही सर, इथल्या समस्या पाहता इथे राहायचे की नाही, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.

माऊंट आबू येथे राष्ट्रीय संमेलन २६ ते ३० सप्टेंबर रोजी आयोजन

0

‘ समाजात शांती, एकता आणि विश्वास वृद्धींगत करण्यासाठी माध्यमांची भूमिका` या विषयावर होतील संवाद

पुणे-राजयोग शोध आणि प्रतिष्ठानच्या मीडिया विंग तर्फे २६ ते ३० सप्टेंबर २०२५ रोजी ब्रह्माकुमारीज् मुख्यालय माऊंट आबू येथे राष्ट्रीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘समाजात शांती, एकता आणि विश्वास वृद्धींगत करण्यासाठी माध्यमांची भूमिका (Role of Media for Promoting Peace, Unity & Trust in Society)` या मुख्य विषयावर देशभरातील पत्रकार, मीडिया प्रतिनिधी यात सहभागी होतील. यात वृत्तपत्रे, टीव्ही, रेडिओ, केबल, शासकीय मीडिया संस्था, जनसंपर्क अधिकारी, जाहिरात संस्था, सायबर मीडियातील घटक, दूरसंचार आणि पोस्ट विभाग, मीडिया शिक्षण संस्था आदि क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी होतील.

संमेलनात सहभाग

संमेलनात सहभागासाठी स्थानिक ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रामार्फत नोंदणी होणार असून यासंदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्राशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी सोमनाथ म्हस्के, पुणे जिल्हा माध्यम समन्वयक, मीडिया प्रभाग यांच्याशी 9922251100 यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निसर्ग सौंदर्याने बहरलेले माऊंट आबू

अप्रतिम निसर्ग सौंदर्याने बहरलेले माऊंट आबू कडे जगातील नैसर्गीक आणि आध्यात्मिक उर्जेचे शक्तिपीठ म्हणून पाहिले जाते. सुंदर तलाव, धबधबे, बगीचे, डोंगर-द·या, नेत्रदिपक सुर्यास्त आदि नैसर्गीक पर्यटन स्थळाबरोबर स्थापत्यशास्त्राचा अद्वितीय देलवाडा, अचलगढ,गुरुशिखर, आबू अंबाजी, पीसपार्क, ज्ञानसरोवर, पांडवभवन,शांतीवन, ग्लोबल हॉस्पिटल आदि विविध विशाल आध्यात्मिक शक्तिस्थाने सुद्धा आहेत.

अजित पवारांच्या अंगात पाकिस्तानी रक्त– संजय राऊत

जय शहा आयोजक असल्याने भारत-पाक मॅचमागे ‘पैशाचा खेळ’-मोदी-शहा हे देशभक्तीचे केवळ ढोंग करतात
मुंबई-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्या मुलाला देशभक्ती शिकवता आली नाही त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये. तुमचा मुलगा दुबईत बसून भारत-पाकिस्तान मॅचचे आयोजन करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पदावरून जावे लागेल त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचे रक्त वाहत आहे. अजित पवार अर्धे पाकिस्तानी आहेत. महाराष्ट्राचा मंत्री जर भारत-पाकिस्तान सामना पाहण्याची भाषा वापरत असेल तर ती राष्ट्रभक्त नागरिकाची भाषा नाही. पहलगाम येथे मृत्यूमुखी पडलेल्या 26 लोकांमध्ये तुमच्या घरातील कुणी असते तर तुम्ही असे बोलला नसतात. जर त्या 26 लोकांमध्ये तुमचा एखादा ठेकेदार जरी असता, तरी तुम्ही हे बोलला नसता

खासदार संजय राऊत म्हणाले की, तुम्ही जनतेच्या भावनांशी खेळत आहात. म्हणून आपल्या देशात नेपाळ सारखी परिस्थिती होईल हे मी वारंवार सांगत आहे. अमित शहा आम्हाला बाळासाहेब शिकवत आहेत. बाळासाहेब असते तर हे झाले नसते ते झाले नसते असे म्हणणाऱ्या शहा यांना सांगतो की बाळासाहेब असते तर आजचा मॅच झाला नसता.

खासदार संजय राऊत म्हणाले की, भारत-पाकिस्तान सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने परवानगी देणं ही त्यांच्या राष्ट्रभक्तीची दिवाळखोरी आहे. पहलगाम हल्ल्यात आमचे 26 जण ठार झाले. त्यांच्या पत्नीच्या कपाळावरील पुसला गेलेला सिंदूर यावर मोदींनी खूप राजकीय ढोंग केले त्यांचे काय झाले. मोदी-शहा हे राष्ट्रवाद आणि देशभक्तीचे केवळ ढोंग करतात. यापूर्वी अशा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातून भारताने माघार घेतली आहे.

संजय राऊत म्हणाले की, जय शहा दुबईत आहे आणि ते सामन्याला जाणार नाही असे किती तरी मोठे उपकार त्यांनी केले आहेत.सामना तुम्ही आयोजित केला आहे, तुम्ही त्यांचे प्रमुख आहात. देशभक्ती संदर्भात नरेंद्र मोदी यांना कोणतीही नैतिकता राहिलेली नाही. भाजपचे पापा वॉर रुकवा सकते है पण भारत-पाकिस्तान सामना रोखू शकत नाही. रशिया-युक्रेनचे वॉर थांबवू शकतात, ट्रम्प च्या दबावाखाली भारत-पाकिस्तान युद्ध थांबवू शकतात, पण भारत-पाकिस्तान मॅच थांबवू शकत नाही. यात कोणता पैशाचा खेळ आहे, या खेळात नेमके कोण कोण गुंतलेले आहे. उद्धव ठाकरे यांनी काल ज्या आंदोलनाची घोषणा केली त्यांची व्याप्ती देशभरात गेली आहे. अनेक राजकीय पक्ष आंदोलन करत आहेत. दिल्लीत ही मॅच दाखवली जाईल त्या हॉटेलवर बहिष्कार टाकावे असे आवाहन आपने केले आहे.महाराष्ट्रात सुद्धा हेच होणार आहे.

संजय राऊत म्हणाले की, भारत-पाकिस्तान मॅचची तिकीट विक्री होत नाहीये. पण गॅमलिंग होणार कारण तिकडे जय शहा बसले आहेत. नरेंद्र मोदी यांची काय मजबुरी आहे की त्यांना भारत-पाकिस्तानची मॅच खेळवा-वी लागत आहे. नरेंद्र मोदी काल मणिपूरला गेले ते केवळ मॅचला होणाऱ्या विरोधावरुन लक्ष विचलित व्हावे म्हणून त्यांनी हा दौरा केला आहे. भाजपचा राष्ट्रवाद हा जगातील सर्वांत मोठे ढोंग आहे. मणिपूरच्या जनतेविषयी काही प्रेम आहे असे त्यात काही नाही. त्यांचा हिंदुत्ववाद म्हणजे ढोंग आहे.
..तर काय बिघडलं असते

संजय राऊत म्हणाले की, आजची मॅच खेळण्यासाठी अनेकांनी नकार दिला आहे. पण जे खेळाडू आज मॅच खेळतील त्यांना लाज वाटली पाहिजे. त्या खेळाची रक्कम घेताना त्यांनी ही लक्षात ठेवावे की आमच्या मारले गेलेल्या लोकांच्या रक्ताची ते किंमत घेत आहे हे लक्षात घेतले पाहिजे.त्यांच्या मनात राष्ट्रवाद नाही का? भारतीयांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या का? एक सामना खेळले नाही तर काय होणार होते? अमित शहा काय ईडी लावून जेलमध्ये टाकले असते का? जय शहा यांनी फाशी दिली असती का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
खेळाडूंनी सांगितले असते आम्ही खेळणार नाही तर काय झाले असते.

संजय राऊत म्हणाले की, पाकिस्तानी मोहसीन नकवीच्या हाताखाली भाजपचे आशिष शेलार काम करत आहेत, त्यांनी नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा द्यायला हवा होता त्या बोर्डाचा. मॅच रद्द करता येत नसेल तर जय शहा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता. अमित शहा आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणार. बाळासाहेब ठाकरे यांनी असा व्यापार केला नाही. मोदी, शहा, शिंदे यांना बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी फोटो वापरू नये.

भारत-पाक सामन्याचा निषेध:ओवैसींनी विचारले- 26 लोकांच्या जीवापेक्षा पैसा जास्त मौल्यवान आहे का?


आशिया कप २०२५ मध्ये आज दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याला देशभरातून विरोध होत आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर आणि ७ मे रोजी झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांचे क्रिकेट संघ एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांनी भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट सामन्याबद्दल सरकारवर टीका केली. हल्ल्यात वडील आणि भाऊ गमावलेले सावन परमार म्हणाले की ऑपरेशन सिंदूर आता निरुपयोगी वाटत आहे. सावन म्हणाले-जेव्हा आम्हाला कळले की भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आयोजित केला जात आहे, तेव्हा आम्ही खूप अस्वस्थ झालो. पाकिस्तानशी कोणताही संबंध नसावा… जर तुम्हाला सामना खेळायचा असेल तर माझ्या १६ वर्षांच्या भावाला परत आणा ज्याला इतक्या गोळ्या लागल्या होत्या.सावनची आई किरण यतिश परमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न केला की जर ऑपरेशन सिंदूर अजून पूर्ण झाले नाही तर सामना का होत आहे. मी देशातील सर्व लोकांना सांगू इच्छिते की पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या कुटुंबियांना भेटा आणि ते किती दुःखी आहेत ते पहा. आमच्या जखमा अजून बऱ्या झालेल्या नाहीत

भारत-पाकिस्तान सामन्याच्या निषेधार्थ कोण काय म्हटले…

असदुद्दीन ओवैसी- आसामचे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि सर्वांना माझा प्रश्न आहे की, पहलगाममध्ये आमच्या २६ नागरिकांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घालणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना खेळण्यास नकार देण्याचा अधिकार तुम्हाला नाही का?

अरविंद केजरीवाल – क्लब, पब आणि रेस्टॉरंट्सनी सामना दाखवू नये. जर असे झाले तर आम्ही निषेध करू. हा देशाशी विश्वासघात आहे.

बीसीसीआयचे सदस्य सामना पाहण्यासाठी दुबईला जाणार नाहीत

बीसीसीआय या स्पर्धेचे अधिकृत यजमान आहे, परंतु बोर्डाचे बहुतेक अधिकारी सामने पाहण्यासाठी जाणार नाहीत. तथापि, बोर्डाचे कार्यवाहक अध्यक्ष राजीव शुक्ला जाऊ शकतात, कारण ते आशियाई क्रिकेट परिषदेचे सदस्य देखील आहेत.फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून भारत-पाकिस्तान आशिया कप सामन्याचे प्रसारण थांबवण्याचे आवाहन केले आहे.

संरक्षण उत्पादनातील कुशल मनुष्यबळासाठी भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी ठरणार मार्गदर्शक!

0

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीच्या स्थापनेसंदर्भात आयोजित संवाद सत्रात प्रमुख उपस्थिती दर्शवली. भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीची निर्मिती तसेच भविष्यातील वाटचाल यासंदर्भात चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

संरक्षण उत्पादन क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योजकांकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असून, 3 मध्यवर्ती डिफेन्स कॉरिडॉर निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तज्ज्ञ व कुशल मनुष्यबळाची आवश्यकता वाढली आहे आणि भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीचे योगदान या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. भविष्यातील गरजा ओळखून विद्यापीठाने अभ्यासक्रम आखावेत, तसेच आयआयटी मुंबईप्रमाणे जागतिक दर्जाचे विद्यापीठ म्हणून विकसित व्हावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीची सुरुवात करतांना संरक्षण उत्पादन तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग घेण्यात येत असून विद्यापीठाचा अभ्यासक्रम तसेच नवसंशोधन, तज्ज्ञ मनुष्यबळ निर्मिती तसेच संरक्षण क्षेत्राची गरज लक्षात घेवून विविध अभ्यासक्रमांचा समावेश व्हावा. जागतिक स्तरावर संरक्षण क्षेत्रात नवतंत्रज्ञानाची मागणी वाढत आहे. या क्षेत्रातील उत्पादनाची गुणवत्ता तसेच प्रमाणीकरण यावर विशेष भर देण्याची आवश्यकता आहे. भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी ही संरक्षण उत्पादन क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान संस्था म्हणून विकसित होत असून, उद्योजकांसाठी ती मार्गदर्शक ठरणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे संरक्षण उत्पादन व निर्यातीला प्रोत्साहन मिळाल्याने नागपूर येथे संरक्षण उद्योगांचा विकास सुरू झाला असून, नागपूर हे संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे. या पार्श्वभूमीवर भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीचे महत्व आणखी वाढते, विद्यापीठामार्फत पदवी, पदविका आणि मास्टर प्रोग्राम सुरू होत असून त्यामध्ये संरक्षण उत्पादन व तंत्रज्ञान, लिडरशीप अँड मॅनेजमेंट, इनोव्हेशन अँड डिझाईन, आंतरराष्ट्रीय संबंध व पब्लिकपॉलिसी तसेच नॉन-कन्व्हेन्शनल डिफेन्स स्टडी यांसारखे अभ्यासक्रम असतील.

यावेळी भारतीय लष्कराचे निवृत्त लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, भारतीय हवाई दलाचे निवृत्त उपप्रमुख एअर मार्शल शिरीष देव व इतर मान्यवर उपस्थित होते.

हडपसरच्या वाहतूक कोंडीची अजितदादांना झाली आठवण,म्हणाले, अत्याधुनिक तंत्र वापरा,पण कोंडी सोडवा

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वाहतूक कोंडी सोडवा-उपमुख्यमंत्री

पुणे, दि.१४ सप्टेंबर : रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ती सोडवा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

श्री. पवार यांनी खराडी ते केशवनगर पुलाच्या कामांसह मुंढवा चौक आणि हडपसर गाडीतळ येथे वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता स्थळ पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
यावेळी आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, खराडी ते केशवनगर पुलाचे काम करतांना अत्याधुनिक, दर्जेदार साहित्य वापरावे. या पुलामुळे चंदननगर, केशव नगर, खराडी परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार असल्याने कामे गतीने पूर्ण करावे.

या भागातील नागरिकांनी पाणी, रस्ते, पथदिवे, कायदा व सुव्यवस्था, बसेस व्यवस्था आदींच्या अनुषंगाने विविध मागण्या केल्या असता त्या प्राधान्याने मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही श्री. पवार यांनी दिली.

मूढंवा चौक आणि हडपसर गाडीतळ येथील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता आवश्यक त्या सर्व पर्याय विचारात घेऊन पुणे महानगर पालिका, पोलीस प्रशासन, पीएमपीएल, लोकप्रतिनिधींनी मिळून बैठक आयोजित करुन योग्य ती कार्यवाही करावी, अशी सूचना श्री. पवार यांनी केली.

लंडन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाऊसला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट !!

0

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनकार्याचा साक्षात्कार घडवणाऱ्या संग्रहालयाचा देखील मनपूर्वक अभ्यास केला.

भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२१–२२ या काळात विद्यार्थीदशेत या वास्तूत वास्तव्यास होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाला आदराने पुष्पांजली अर्पण करत सपकाळ कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

भूतकाळातील दुर्मीळ छायाचित्रे, वैयक्तिक वस्तू, हस्तलिखिते व संविधानाच्या प्रतिकडे पाहताना त्यांनी भावना व्यक्त केल्या की, ही वास्तू केवळ एक स्मारक नसून प्रेरणास्थान आहे. बाबासाहेबांच्या अभ्यासाच्या खोलीत बसून त्यांनी नमूद केले की, “ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला.”

या प्रसंगी मा. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या ‘सकपाळ’ या आडनावाचा संदर्भ देत, बाबासाहेबांचे पूर्वीचे आडनाव ‘सकपाळ’ होते, याची आठवण करून दिली.

बाबासाहेबांच्या विचारांची आजही देशाला नितांत गरज असून, त्यांच्या मार्गाने चालण्याचे तेथील आंबेडकरी जनतेला आवाहन केले. माझी लंडनची भेट आता खरी सार्थक झाली असून मी ती कधीही विसरणार नाही असे प्रकर्षाने सांगितले. बाबासाहेब हे फक्त ऐका समाजाचे तसेच देशाचे नसून ते सर्व जगाचे मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या भेटीच्या निमित्ताने लंडनस्थित आंबेडकरी अनुयायांनी हर्षवर्धन सपकाळ यांचे पुष्पगुच्छ आणि “महामानव” हे पुस्तक देऊन हार्दिक स्वागत केले.

कोथरुडकरांनो मेट्रोला जायचंय… गाडी कशाला बस मोफत वापरा!

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा उपक्रम

लास्ट माईल कनेक्टिविटीसाठी बससेवेसोबतच रिक्षा सेवा देखील उपलब्ध करुन देणार!- ना. पाटील

पुणे:

कोथरुडकरांना मेट्रोने प्रवास करणं अजून सोपं आणि सुरक्षित होणार आहे. कारण कोथरुडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नातून कोथरुडकरांसाठी घर ते मेट्रो स्थानक विशेष बससेवा सुरु करण्यात आली आहे. ना. पाटील आणि मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत या बसचे लोकार्पण करण्यात आले. लास्ट माईल कनेक्टिविटीसाठी रिक्षा सेवा देखील उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याची घोषणाही ना. पाटील यांनी यावेळी केली.

यावेळी भाजप पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, विठ्ठलआण्णा बराटे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, भाजप कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, मतदारसंघ समन्वयक नवनाथ जाधव, माजी नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, वृशाली चौधरी, नगरसेवक जयंत भावे, रिक्षावाला संघटनेचे केशव क्षीरसागर यांच्यासह उपस्थित होते.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आधुनिक, सुरक्षित आणि आरामदायी सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवण्याच्या उद्देशाने 2022 पासून पुणे मेट्रोची सेवा शहरात कार्यरत आहे. सदर सेवा सुरु झाल्यापासून पुणेकरांचा वेळ आणि पैसा यामध्येही बचत होत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. तरीही वाढत्या लोकसंख्येमुळे आणि मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने, अनेकजण या सुविधेचा वापर करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वारंवार समोर आले आहे.

त्यामुळे कोथरुडकरांनी मेट्रोचा मोठ्या प्रमाणात वापर करावा; यासाठी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून मोफत शटल बससेवा सुरु करण्यात येत आहे. या सुविधेमुळे मेट्रोच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच, कोथरुड मधील वाहतूककोंडीवर मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे.

सदर सेवा सोमवार ते शनिवार सुरु राहणार असून, नागरिकांच्या मागणीनुसार, बसचे थांबे निश्चित करण्यात आले आहे. या सेवेमुळे सर्वसामान्य कोथरुडकरांना अधुनिक, सुरक्षित आणि आरमदायी सार्वजानिक वाहतूक सेवा पुरवण्याच्या पुणे मेट्रोच्या उद्देशास हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला.

ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, लोकप्रतिनिधी हा लोकाभिमुख काम करण्यासाठी नागरिकांना सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी निवडून दिला जातो. त्यामुळे लोकाभिमुख सेवेची शिकवण असल्याने जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. मेट्रोसाठी लास्ट माईल कनेक्टिविटी निर्माण करण्यासाठी आणि मेट्रो प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी रिक्षा सेवा देखील सुरु करण्याचा प्रयत्न असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

ना. पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु झालेली पहिली शटल बस सेवा राजाराम पूल- माळवे चौक, वनदेवी- कर्वेनगर, डहाणूकर- कर्वे पुतळा- करिश्मा चौक- एसएनडीटी मार्गावर रोज सकाळी ८.३० ते १ आणि सायंकाळी ४ ते ८ वेळेत सुरु असणार आहे. दरम्यान, सार्वजानिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त नागरिकांनी वापर करावा, यासाठी अशा पद्धतीने मोफत शटल बससेवा सुरु करण्याच्या ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपक्रमाचे कोथरुडमधून कौतुक होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात!

अजित दादा पवार यांच्या हस्ते झेंडा दाखवून पूरग्रस्तांना मदतीचा ट्रक रवाना
पुणे : पंजाब राज्यातील अनेक भागांत आलेल्या महापुरामुळे स्थानिक जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, असंख्य नागरिक बेघर आणि अन्न-पाण्याविना संकटात सापडले आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर “माणुसकी हीच खरी ताकद” या तत्त्वाधिष्ठित भूमिकेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पाणी, गहू, तांदूळ, कांदे, बटाटे, डाळी इत्यादी जीवनावश्यक वस्तूंची मदतगाडी पंजाबकडे रवाना करण्यात आली.

ही मदत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अजितदादा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आली.
राष्ट्रवादीचे पर्वती विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष नांगरे, सौ. शोभा नांगरे तसेच मार्केट यार्डमधील व्यापारी व आडत बांधवांच्या माध्यमातून ही मदत पाठविण्यात आली.

“लाडकी बहिण” योजनेतून महिलांचा मतदानातील सहभाग वाढला-डॉ. नीलम गोऱ्हे

बेंगळुरू-“लाडकी बहिण” योजनेतून राजकारणात महिलांचा मतदानातील सहभाग वाढलाच .त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा महिलांसाठी चार धोरणांचा प्रवास महिलांसाठी ठोस आणि दूरगामी धोरणात्मक वाटचाल करणारा ठरला असे मत येथे महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. बेंगळुरू येथे पार पडलेल्या ११ व्या राष्ट्रकुल संसदिय मंडळ अखिल भारतीय परिषदेच्या सत्रात आपल्या भाषणातून त्यांनी लोकशाहीची खरी ताकद ही विधायक, फलदायी आणि जनाभिमुख चर्चेत असल्याचे ठामपणे सांगत त्यांनी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक चौथ्या महिला धोरणाला तसेच नमो शक्ती विधेयकाला विशेष अधोरेखित केले.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, परिस्थिती आणि काळानुसार महिलांसाठी धोरणे तयार करून त्यांची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र विधीमंडळ हे देशात अग्रगण्य ठरले आहे. ही आतापर्यंतची मोठी उपलब्धी असून इतर राज्यांसाठी महाराष्ट्राने दिशादर्शक भूमिका बजावली आहे.त्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्राने गेल्या तीन दशकांत महिलांसाठी ठोस आणि दूरगामी धोरणात्मक वाटचाल केली आहे:१९९४ मध्ये मुलींना मुलांप्रमाणेच वारसाहक्क मिळावा याबाबतचा पहिला ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.२००२ मध्ये दुसऱ्या धोरणाद्वारे जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेट, महिलांचे आर्थिक सबलीकरण आणि सर्व क्षेत्रात समान संधी यावर निर्णय झाले.२०१३ मध्ये तिसऱ्या धोरणातून अव्यवस्थित क्षेत्रातील महिला, नव्या कायद्यांचा पाया आणि कौटुंबिक न्यायालये सर्वत्र करण्याचा निर्णय झाला.२०२३ मध्ये चौथ्या महिला धोरणातून संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) आणि बीजिंग प्लॅटफॉर्म ऑफ ऍक्शन स्थानिक संदर्भात समाविष्ट करून प्रत्येक खात्यासाठी ठोस निर्देशांक ठरविण्यात आले.”ही धोरणे केवळ कागदावर नाहीत, तर विधानपरिषद आणि विधानसभेत सखोल चर्चेनंतर लोकाभिमुख मार्गाने साकार झाली आहेत. मला २०१९ मध्ये महिलांच्या सबलीकरण आणि SDGs बाबत ठराव मांडण्याचा सन्मान मिळाला होता. दोन दिवस चर्चेचा समारोप तेव्हाच्या मुख्यमंत्री यांनी केला होता. हे महाराष्ट्राच्या लोकशाही वारशाचे उदाहरण आहे,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

“लाडकी बहिण” योजनेतून राजकारणात महिलांचा मतदानातील सहभाग वाढलाच .

महिलांसाठी आखलेल्या विविध योजनांचा उल्लेख करताना “मुलींना थेट आर्थिक मदत मिळावी, शिक्षण व सबलीकरणाचा पाया मजबूत व्हावा, हे धोरणात्मक चर्चेचे फळ आहे.”विधीमंडळातील चर्चा व त्यातुन राजकिय धोरण हा लोकशाहीचा पाया असल्याचे ना.नीलम गोर्हे यांनी नमुद केले.

डॉ. गोऱ्हे यांनी “नमो शक्ती वंदन विधेयक” या महिलांच्या रीजकिय निर्णय प्रक्रियेत ३३ टक्के आरक्षण देणार्र्या महत्त्वपूर्ण कायद्याचा उल्लेख केला.
“मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या या विधेयकामुळे देशभरातील महिला व मुलींच्या नेतृत्वाच्या संधीस अधिक बळकटी मिळणार आहे. अशा निर्णयांमुळे शासकिय चौकट बदलतेच, महिलांच्या मनात आत्मविश्वास आणि शक्ती निर्माण होते.”

महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्राने केलेले योगदान केवळ कायदेशीर चौकटीत मर्यादित नाही — विधानसभेबरोबर विधानपरिषदेतही महिलांनी मांडलेले प्रश्न, उपस्थित केलेल्या मागण्या, आणि सक्रिय भागीदारी हा खरी ताकद आहे. “महिलांच्या प्रश्नांसाठी वैधानिक समितीची स्थापना हा आपल्या राज्याचा संवेदनशील आणि विधायक दृष्टिकोन आहे.”
या परिषदेबद्दल ओमप्रकाश बिर्ला ,लोकसभा अध्यक्ष, श्री हरिवंशराय तसेच सिपीए चे जनरल सेक्रेटरी स्टिफन ट्विग, महाराष्ट्र विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे सहकार्याबद्दल अभिनंदन केले .
सत्रानंतर कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष श्री उ. त. खादर यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा व्यक्त केल्या. या प्रसंगी विविध राज्यांतील विधानपरिषद सभापती, उपसभापती तसेच विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष उपस्थित होते, ज्यांनी या दिवशीच्या आनंदात सहभागी होऊन या कार्यक्रमाचा गौरव वाढवला.

पाकबरोबर क्रिकेट खेळणे, म्हणजे शहिदांच्या टाळूवरचे लोणी खाणे – भाजपावर आप चा प्रहार

पुणे- ते भारतात घुसतात , आपले निष्पाप लोक मारतात , सीमेवर सैनिकांचे रक्त वाहते आणि आपणहि त्यांच्याविरोधात युध्द पुकारतो त्यांचे पाणी बंद करतो अन … दुसरीकडे .. दुसरीकडे काय त्यांच्याशी क्रिकेट खेळायचे ? कशासाठी ? हा कसला व्यापार ?हि कसली आणि कोणती व्यापारी वृत्ती? असे सवाल करत पाकबरोबर क्रिकेट खेळणे, म्हणजे शहिदांच्या टाळूवरचे लोणी खाणे अशा शब्दात आम आदमी पार्टीने येथे भाजपवर प्रहार केला आहे. आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील, सुदर्शन जगदाळे, अभिजीत मोरे, सुरेखा भोसले,अनिकेत शिंदे,सुभाष कारंडे, रवीराज काळे, शितल कांडगावकर, प्रशांत कांबळे, रितेश निकाळजे, सुरेश भिसे, वैभव टेमकर, संग्राम पाटील यांनी येथे तीव्र निदर्शने करत भाजपा सरकारचा जोरदार निषेध नोंदविला

मुकुंद किर्दत म्हणाले,’ रविवार १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियम येथे ‘एशिया कप’ या क्रिकेट सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर येथे पहलगाम घाटीत २६ निष्पाप लोकांची हत्या करण्यात केली होती.या पार्श्वभूमीवर आता राजकीय लढाई पण सुरू झाली आहे दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने सुद्धा हा शहिदांचा अपमान आहे ज्या देशाने पहेलगाम येथे भारतीय २६ महिलांचे कुंकू पुसले त्याच दहशतवादी देशासोबत क्रिकेट खेळण्या मागे भाजपच्या मोदी सरकारची कोणती हतबलता, मजबुरी आहे? काही ठराविक आर्थिक हितसंबंधासाठी देशप्रेमाला तिलांजली आम्ही स्वीकारणार नाही.
आम्ही सर्वांना याचा तीव्र निषेध आणि बहिष्कार करण्याचे आवाहन करतो!’ असे सांगत त्यांनी येथे आम आदमी पार्टी तर्फे पुण्यामध्ये शिवाजीनगर मेट्रो चौकामध्ये पाकिस्तानी क्रिकेट चा टी-शर्ट जाळला.