Home Blog Page 132

सर्वोच्च न्यायालयाची वनताराला क्लीनचिट:म्हणाले- प्राण्यांची खरेदी-विक्री कायदेशीर

0

नवी दिल्ली-अंबानी कुटुंबाच्या रिलायन्स फाउंडेशनद्वारे चालवल्या जामनगरमधील वनतारा वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्रात प्राण्यांची खरेदी आणि विक्री नियमांच्या चौकटीतच झाली, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले.विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अहवालात कोणतीही अनियमितता आढळली नाही, असे न्यायालयाने म्हटले. न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि न्यायमूर्ती पी.बी. वरळे यांच्या खंडपीठाने म्हटले की,


यापूर्वी, २६ ऑगस्ट रोजी, सर्वोच्च न्यायालयाने दोन जनहित याचिकांवर (पीआयएल) एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. कोल्हापूरमधील एका मंदिरातून ‘माधुरी’ हत्ती वनतारा येथे हलवल्याच्या वादानंतर जुलैमध्ये वकील सीआर जया सुकिन यांनी एक आणि देव शर्मा यांनी दुसरी याचिका दाखल केली होती.वनताराचे वकील हरीश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, तपास अहवाल सार्वजनिक करू नये. त्यांनी असा युक्तिवाद केला की जर अहवाल बाहेर आला तर न्यूयॉर्क टाईम्स सारखी वर्तमानपत्रे त्याचा फक्त एक भाग छापून खोटी कथन तयार करतील. यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, अहवाल सार्वजनिक केला जाणार नाही.

४ सदस्यीय एसआयटीचे नेतृत्व माजी न्यायाधीश न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांनी केले होते आणि या पथकात न्यायमूर्ती राघवेंद्र चौहान (माजी मुख्य न्यायाधीश, उत्तराखंड आणि तेलंगणा उच्च न्यायालय), मुंबईचे माजी पोलिस आयुक्त हेमंत नागराळे आणि कस्टम अधिकारी अनिश गुप्ता यांचा समावेश होता.एसआयटीने १२ सप्टेंबर रोजी आपला अहवाल सादर केला. न्यायालयाने एसआयटीचे कौतुक केले आणि समितीला मानधनही दिले पाहिजे असे म्हटले.

एसआयटीने ५ मुद्द्यांवर चौकशी केली

विशेषतः भारत आणि परदेशातून हत्तींच्या खरेदीमध्ये वन्यजीव संरक्षण कायदा, प्राणीसंग्रहालय नियम, आंतरराष्ट्रीय प्रजातींच्या व्यापारावरील करार (CITES), आयात-निर्यात कायदे आणि इतर वैधानिक आवश्यकतांचे पालन केले गेले का?
पशुसंवर्धन मानके, पशुवैद्यकीय काळजी, प्राणी कल्याण, मृत्युदर आणि त्यांची कारणे, हवामान आणि स्थान यासंबंधी तक्रारी.
खाजगी संग्रह तयार करणे, प्रजनन आणि संवर्धन कार्यक्रम, जैवविविधता संसाधनांचा वापर, कायदेशीर उल्लंघन, वन्यजीव तस्करी आणि प्राणी उत्पादनांचा व्यापार इत्यादी आरोप.
आर्थिक अनुपालन, मनी लॉन्ड्रिंग आणि इतर संबंधित समस्यांबद्दल तक्रारी.
याशिवाय, आवश्यकतेनुसार, याचिकाकर्ते, अधिकारी, नियामक, हस्तक्षेप करणारे आणि पत्रकारांकडून देखील माहिती घेण्यात आली.
पेटा इंडियाने हत्तीणीच्या आरोग्याबद्दल, संधिवाताबद्दल आणि मानसिक ताणाबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर, १६ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हत्तीणी माधुरीला वनतारा येथे हलवण्याचा आदेश दिला.

डिसेंबर २०२४ मध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने हत्तीणीच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी तिला गुजरातमधील वनतारा प्राणी अभयारण्यात हलवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर २९ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयानेही हा आदेश कायम ठेवला. हा खटला २०२३ पासून सुरू आहे.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात माधुरीला वनतारा येथे हलवण्यात आले तेव्हा कोल्हापुरात निदर्शने झाली. तिला परत आणण्यासाठी लोकांनी सह्या गोळा केल्या. धार्मिक परंपरा आणि भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला.

१४ ऑगस्ट: न्यायालयाने वनताराला याचिकेत पक्षकार बनवण्यास सांगितले

माधुरीला परत आणण्याच्या याचिकेवरील पहिली सुनावणी १४ ऑगस्ट रोजी झाली. यादरम्यान, न्यायमूर्ती पंकज मित्तल आणि पी.बी. वराले यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याचे वकील सी.आर. जया सुकिन यांना सांगितले की, ते वनतारा यांच्यावर आरोप करत आहेत. तर याचिकेत त्यांना पक्षकार म्हणून समाविष्ट करण्यात आलेले नाही.

न्यायालयाने त्यांना वनताराला दोषी ठरवून पुन्हा खटल्यात सहभागी होण्यास सांगितले आणि २५ ऑगस्ट ही सुनावणीची तारीख निश्चित केली. यापूर्वी, सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ११ ऑगस्ट रोजी हत्तीला वनताराला पाठविण्याविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्याचे मान्य केले होते.

अनेक गावात शिरले पाणी, ग्रामस्थांना हेलिकॉप्टरने केले एअरलिफ्ट

0

ग्रामस्थांना एअरलिफ्ट करण्याचे शिंदेंचे निर्देश

अहिल्यानगर | बीड- अहिल्यानगर जिल्ह्याच्या पूर्व भागात आणि बीड जिल्ह्याच्या पश्चिम भागात रविवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. नद्यांना पूर आल्याने अनेक गावांत पाणी शिरले असून ग्रामस्थ पुराच्या पाण्यात अडकले. बीड जिल्ह्यातील कडा येथे पूरस्थिती गंभीर बनल्याने लष्काराला पाचारण करण्यात आले आहे. पुरात अडकलेल्या अनेकांना हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्यात पूर स्थिती गंभीर बनली आहे. कडा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावात पाणी शिरले असून, ग्रामस्थ जीव वाचवण्यासाठी इमारतींच्या छतावर चढले होते आणि मदतीची वाट पाहत होते. पुरात अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले. लष्कराच्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. स्थानिक आपत्ती निवारण पथकेही जेसीबी आणि इतर साधनांच्या सहाय्याने बचावकार्य करत आहेत. आतापर्यंत अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी झालेली नाही. मात्र, अनेक शेतकऱ्यांची जनावरे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

दुपारी पाऊस थांबल्याने बचावकार्य वेगाने सुरू झाले आहे. लष्करी पथकाने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी, जवखेडे, तिसगाव आणि मढी या गावांना ढगफुटीसदृश पावसाचा मोठा फटका बसला आहे. पुलांवरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. विशेषतः करंजी आणि जवखेडे येथे सुमारे 70 ते 80 लोक पुरात अडकले होते, ज्यांना स्थानिक आणि आपत्ती निवारण पथकांनी सुरक्षित बाहेर काढले. करंजी गावातील प्रसिद्ध उत्तरेश्वर मंदिरालाही पुराचा वेढा बसला आहे. या भागातील ग्रामस्थांनी अनेक वर्षांनंतर असा पूर पाहिल्याचे सांगितले. अहिल्यानगर-जामखेड रस्त्यावरील सारोळाबद्धी येथील पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचबरोबर, कडा येथेही पूर आल्यामुळे नगर ते जामखेड वाहतूक थांबली होती, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील पावसाचा आढावा घेतला. आष्टी पाथर्डी तालुक्यातील काही गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने त्यात 40 गावकरी अडकून पडले होते. त्यांना एनडीआरएफच्या मदतीने एअरलिफ्ट करून काढावे लागेल, असे संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार नाशिक वरून हेलिकॉप्टर बोलवून या अडकलेल्या लोकांना तत्काळ एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवावे असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्तांशी देखील त्यांनी या कक्षातून संवाद साधला.

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा:उघड्या मॅनहोलजवळ बसले कर्मचारी

0

हवामान खात्याने पुढील तीन तास मुंबईत पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो. पुढील ३ दिवस ईशान्येकडील राज्ये आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई आणि उपनगर परिसरात काल रात्रीपासूनच तुफान पावसाने जोर धरला असून आज पहाटेपासून त्याचा तीव्रतेने जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळे निर्माण झाले असून वाहनचालकांसाठी दृश्यमानता कमी झाली आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चाकरमान्यांसाठी घराबाहेर पडणे अवघड झाले असून ‘कामावर जायचे की नाही’ या संभ्रमात अनेकजण अडकले आहेत.


बीड तालुक्यातील नागझरी बेलखंडी बिंदुसरा नदीवर खूप पाणी आले आहे, दोन्ही गावाचा संपर्क तुटला आहे. या पावसाने आता बिंदुसरा नदी पात्रात पाणी आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

नागपुरात आज मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून, वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. दरम्यान, हवामान विभागाने यापूर्वी नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला होता. आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरीत ढगफुटी सदृश्य पावस पडला आहे. मुसळधार पावसामुळे येथील दगडी नदीला पूर आल्याने उपकेंद्र, घरे आणि शेती पाण्याखाली गेली आहेत.

थेऊरमध्ये पुरात अडकलेल्या ७० ग्रामस्थांना पीएमआरडीएच्या बचाव पथकाकडून सुरक्षित स्थळी हलवले

रूपे वस्तीतील घटना : पीडीआरएफ पथकाकडूनही शर्तीचे प्रयत्न

पुणे (दि.१५) : पुणे शहर आणि जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे बहुतांश ठिकाणच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूर परिस्थिती उद्भवत आहे. सोमवारी पहाटे ३ वाजता थेऊर (ता. हवेली) गावातील रुपे वस्ती परिसरातील ओढ्याला पूर आल्याने यात अडकलेल्या ग्रामस्थांना पीएमआरडीए व पीडीआरएफ पथकातील जवानांनी मदतकार्य करून सुमारे ७० पेक्षा अधिक जणांना सुखरूप बाहेर काढले.

हवेली तालुक्यातील थेऊर गावातील रूपे वस्ती परिसरात ओढ्याला पूर आल्याने जवळपास १५० लोकांच्या वस्तीत सोमवारी पहाटे ३ वाजता पाणी शिरले होते. या घटनेची माहिती मिळतात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वाघोली अग्निशमन केंद्रातील जवान आणि पीडीआरफ पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून घरांमध्ये अडकलेल्या सुमारे ७० पेक्षा अधिक ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलव‍िण्यात आले.

या पुरामध्ये म्हशी, शेळ्या, कोंबड्या हे पाळीव प्राणी काही प्रमाणात वाचवण्यात आले. तर काही वाहून गेले आणि काहींचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र, जीवितहानी झाली नाही, अशी माहिती पीएमआरडीएकडून देण्यात आली. या बचाव पथकात अग्निशमन केंद्र आध‍िकारी विजय महाजन, जितेंद्र तळेले, महेश आव्हाड, शुभम बढे, शुभम चौधरी, उमेश फाळके, सुरज इंगवले, साईनाथ मोरे, किरण राठोड, अभिषेक पावर, प्रकाश मदने, तेजस डांगरे, सिद्धांत जाधव, शुभम पोटे, दिग्विजय नलावडे, सागर जानकर, करण पाडुळे, राजेंद्र फुंदे, प्राणिल दराडे, लहू मुंडे, राहुल शिंदे आदी जवानांचा समावेश होता.

  • डॉ. ज्ञानेश्वर भाले, जनसंपर्क अधिकारी, पीएमआरडीए

केरळच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि एकतेच्या भावनेचे भव्य प्रदर्शन.

पुणे-रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्क आणि रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल यांनी आयोजित केलेला ‘‘पुणे ओणम महोत्सव २०२५’’ आज कोरेगाव पार्क येथील रोही व्हिला पॅलेस येथे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमाने केरळच्या सर्वात प्रिय उत्सवाच्या उत्साही भावनेचा अनुभव घेण्यासाठी पुण्यातील विविध प्रेक्षकांना एकत्र आणले.  हा कार्यक्रम रोटरी क्लब, कोरेगाव पार्क अध्यक्षा श्रीमती. शानी नौशाद आणि रोटरी क्लब, पुणे सेंट्रल अध्यक्षा श्रीमती. लेखा नायर यांच्या नियोजनाने कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन बिशप नरेश अंबाला, गुरूजी बाळकृष्ण जोशी, ज्ञानी अमरजीत सिंग, मौलाना डॉ. शबीह अहसान काझमी, पुजारी बालचंद बठीजा या पाच वेगवेगळ्या समुदायातील मान्यवर धार्मिक प्रमुखांच्या हस्ते करण्यात आले. जे धर्मनिरपेक्षता, सौहार्द आणि परस्पर आदराचे प्रतीक आहेत. विशेष म्हणजे रोटरीच्या शांतीच्या प्रोत्साहनाच्या मार्गावर वाढत्या विभाजनाचा सामना करत असलेल्या जगात, या उत्सहाच्या उद्घाटनाने एकता आणि सहअस्तित्वाचे महत्त्व अधोरेखित केले.

दिवसभर, पाहुण्यांनी केरळच्या समृद्ध वारशाचे सुंदरपणे प्रदर्शन करणाऱ्या रंगीत सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला – ज्यामध्ये पारंपारिक नृत्य प्रकार, संगीत आणि पूकलम प्रदर्शनांचा समावेश होता. केरळच्या शेफनी विचारपूर्वक तयार केलेला प्रामाणिक ओणम साध्या हा मुख्य आकर्षण होता, ज्यामध्ये सर्व उपस्थितांना आनंद झाला.

 या कार्यक्रमाने केवळ ओणमच्या परंपरा यशस्वीरित्या साजरे केल्या नाहीत तर हा सण एकता आणि समावेशकतेचे एक अद्वितीय प्रतीक आहे हा संदेशही बळकट केला. उपस्थितांनी उबदार वातावरण, उत्सवाची भावना आणि समुदायांमध्ये जोडण्याची संधी यांचे कौतुक केले.

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी मर्सिडीज कंपनीचे योगदान मोलाचे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

पुणे, दि. १५ : समृद्धी महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीने घेतलेला पुढाकार हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून इतर संस्थांनी देखील त्यांचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते आज चाकण येथे मर्सिडीज कंपनीच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर बोलत होते.

मंत्री सरनाईक म्हणाले की, “रोड हिप्नोसिस” (रोड संमोहन) ही अवस्था अनेकदा अपघातास कारणीभूत ठरते. ही अवस्था टाळून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी मर्सिडीज कंपनीने समृद्धी महामार्ग पुढील तीन वर्षांसाठी दत्तक घेतला आहे. या उपक्रमांतर्गत चालकांना प्रशिक्षण देणे, अपघात प्रवण क्षेत्रांवर दिशादर्शक लावणे, अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळण्यासाठी जवळपासच्या ट्रॉमा सेंटरची साखळी निर्माण करणे, तसेच चालकांना मार्गदर्शन करणे या उपाययोजना करण्यात येत आहेत. या माध्यमातून कंपनीने राज्याच्या रस्ता सुरक्षा अभियानात मोलाचे योगदान दिले आहे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी मंत्री सरनाईक यांनी मर्सिडीज कंपनीच्या प्रतिनिधींशी राज्याच्या ई-वाहन धोरणाबाबत चर्चा केली. भविष्यात कंपनीने ई-वाहन क्षेत्रामध्ये भरारी घ्यावी, अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.

कालच्या मॅच फिक्सिंग मधून 25000 कोटी रुपये पाकिस्तानात गेले,दीड लाख कोटींचा जुगार, सरकारवर संजय राऊतांचा गंभीर आरोप

पाकिस्तानला हरवल्यामुळे 26 महिलांचे कुंकू परत आले का?:संजय राऊत संतापले

मुंबई-भारत – पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा फिक्सिंग मॅच असून यातून दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळाला गेला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यातील किमान 25000 कोटी रुपये पाकिस्तानत गेले आहेत. हा पैसा आता पाकिस्तान भारताविरुद्ध वापरणार आहे. हे नरेंद्र मोदी, अमित शहा, जय शहा आणि भारतीय क्रिकेट बोर्डाला कळत नाही का? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.

पाकिस्तान सोबत विजय किंवा पराजय हा मुद्दाच नाही. कोणी जर असे म्हणत असेल तर तो मूर्खपणा आहे. पाकिस्तान सोबत क्रिकेटची मॅच न खेळण्याचा मुद्दा आहे. पाकिस्तानला हरवल्यामुळे पहलगाम मधील 26 महिलांचे कुंकू परत आले का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. पाकिस्तानला घरात घुसून मारण्याची संधी असताना देखील भारताने माघार घेतली. बलुचिस्तान पर्यंत जाणार होते, त्यांचे कंबरडे मोडणार होते ना? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कालच्या मॅचवर दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळला गेला. यातील काही पैसे पाकिस्तानला देखील मिळाले असतील. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला किमान 1000 कोटी रुपये कालच्या मॅचने मिळाले असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

पाकिस्तानला जागतिक बँकेकडून कर्ज मिळू नये, आयएमएफ, आशिया डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज मिळू नये, म्हणून आपण प्रयत्न करत होतात. कारण हा पैसा पाकिस्तानला मिळाला असता तर तो पैसा पाक दहशतवादामध्ये गुंतवणूक करेल. ही भारताची भूमिका होती. ही मोदींची भूमिका होती. तर दुसरीकडे काल भारताने पाकिस्तान क्रिकेट बोर्डला 1000 कोटी रुपये मिळवून दिले. हे पैसे कुठे जाणार आहेत? असा प्रश्नही त्यांनी विचारला. पाकिस्तानला आर्थिक दृष्ट लढण्यासाठी आणि भारतीय महिलांचे कुंकू पुसण्यासाठी सरकार मदत करत आहे. अशा मॅचवर आम्ही थुंकतो. 26 महिलांचे कुंकू उजाड करून त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळतात? तुम्हाला लाजा वाटत नाही का? असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांत त्यांनी तब्बल चार वेळा चर्चा केल्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये युती जवळपास निश्चित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक असल्याने ही युती शक्य होईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी शरद पवारांच्या भूमिकेविषयी मोठे विधान केले आहे. “राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास पवारांना काहीच अडचण नाही. महाराष्ट्राच्या भावना त्यांना ठाऊक आहेत,” असे राऊत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पवार अडथळा ठरणार नाहीत, उलट त्यांनी अशा युतीला अनुकूलतेची भूमिका घेतल्याचे संकेत राऊत यांनी दिले.

दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वीच या विषयावर काँग्रेस हायकमांड निर्णय घेईल, असे सांगितले होते. यावर बोलताना राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात काय चाललं आहे याची माहिती आम्ही काँग्रेसच्या नेतृत्वाला देत असतो. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातील काँग्रेस नेत्यांनाही याची कल्पना असते.” त्यामुळे शिवसेना-मनसे युतीवर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी आडकाठी करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यपाल शपथविधी प्रसंगी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपालांचे सत्कार करून व्यक्त केल्या सदिच्छा

मुंबई, दि. १५ सप्टेंबर २०२५ : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल मा. आचार्य देवव्रत यांचा शपथविधी सोहळा आज राजभवन, मुंबई येथील दरबार हॉलमध्ये पार पडला. सकाळी ११.०० वाजता झालेल्या या शपथविधी प्रसंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री माणिकराव कोकाटे आणि राज्यातील मान्यवर उपस्थित होते.

या वेळी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना डॉ. जयसिंगराव पवार लिखित राजर्षी शाहू छत्रपती पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले. नव्या जबाबदारीसाठी त्यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांचे कार्य फलदायी ठरो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

राज्यपाल शपथविधी सोहळा ही घटना लोकशाही परंपरेतील एक महत्त्वाची पायरी असल्याचे प्रतिपादन करताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या नेतृत्वामुळे राज्याच्या शासनव्यवस्थेत नवी ऊर्जा आणि दिशा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.

भारत फोर्जचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांचा प्रतिष्ठेचे हॉले मेडल देऊन सन्मान

पुणे-भारत फोर्ज लिमिटेड अभिमानाने जाहीर करत आहे की त्यांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. बाबा कल्याणी यांना अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स (ASME) कडून अत्यंत प्रतिष्ठेचे हॉले मेडल प्रदान करण्यात आले आहे. सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी अभियांत्रिकी नाविन्यपूर्णता क्षेत्रातील सर्वाधिक सन्माननीय जागतिक मान्यतापैकी एक असा हा सन्मान आहे.

ASME हॉले अवार्डला 1924 मध्ये सुरुवात झाली. या सन्मानाद्वारे एक किंवा अधिक व्यक्तींनी एकाच कामगिरीतून लक्षणीय आणि समयोचित अशा सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी केलेल्या उत्कृष्ट आणि अद्वितीय अभियांत्रिकी कार्याची दखल घेतली जाते.

सध्याच्या वाढलेल्या अमेरिकन टॅरीफच्या परिस्थितीत या सन्मानाला विशेष महत्त्व आहे. भारत फोर्ज अमेरिकेत आणि जागतिक स्तरावर अभियांत्रिकी-आधारित मूल्यनिर्मितीद्वारे व्यापारातील बदलत्या घडामोडींना कसे सामोरे जात आहे हे यातून अधोरेखित होते. प्रगत उत्पादनाचे स्थानिकीकरण करून आणि स्थानिक उद्योगांच्या गरजा पूर्ण करून भारत फोर्ज श्री. कल्याणी यांचा  मजबूत पुरवठा साखळी निर्माण करण्याचा आणि राष्ट्रीय कार्यक्षमतेत योगदान देण्याचा दृष्टीकोन प्रतिबिंबीत करत आहे.

हा सन्मान केवळ श्री. कल्याणींच्या नेतृत्वाचा गौरव करत नाही तर अमेरिकेच्या औद्योगिक परिसंस्थेला बळकटी देण्यात मूळच्या भारतीय अभियांत्रिकी उत्कृष्टतेची भूमिकाही अधोरेखित करतो. यातून भारत फोर्जच्या अमेरिकेशी असलेल्या दीर्घकालीन संबंधांना अधोरेखित केले जात असून आव्हानात्मक कठीण व्यापारचक्रात देखील सीमापार सहयोग कसा फुलू शकतो याचे हे द्योतक आहे.

मी कुठलाही ‘सामना’ पाहत नाही – एका द्विअर्थी वाक्यात CM फडणविसांनी भारत-पाक सामन्याला होणारा विरोध लावला उडवून

पुणे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज होणाऱ्या भारत -पाक क्रिकेट सामन्याबद्दल पुण्यात पत्रकारांनी छेडले असता ‘ मी कुठलाही सामना पाहत नाही , त्यामुळे मला माहिती नाही. अशा एका द्विअर्थी वाक्यात भारत -पाक संदर्भातील लोकभावना आणि विरोधकांचा विरोध फडणवीस यांनी उडवून लावला .

ते पुढे म्हणाले कि ,राज्यातील ओबीसी समाजाला कुठलाही धोका नाही. एकही नकली व्यक्ती ओबीसींमध्ये समाविष्ट होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “नकली म्हणजे जो ओबीसी नाही, तो कधीच या प्रवर्गात समाविष्ट होणार नाही. त्यासाठी सरकारने जारी केलेल्या जीआरमध्ये स्पष्ट तरतूद केली आहे,” असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांवर उत्तर देताना केला.

राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणसाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंदर्भातील जीआर देखील काढला आहे. या जीआरमुळे कुणबी नोंदी असणाऱ्या मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र भेटणार असून, ओबीसीतून आरक्षणाचा लाभ भेटणार आहे. या जीआरविरोधात ओबीसी संघटना आक्रमक झाल्या असून, यामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण होणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपरोक्त पुनरुच्चार केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “२०१४ ते २०२५ या काळात ओबीसी समाजासाठी जितके निर्णय झाले, ते केवळ आमच्या सरकारकडूनच झाले आहेत. ओबीसी वेगळे मंत्रालय आणणारे आम्ही, ओबीसींसाठी योजना आखणारे आम्ही, ‘महाज्योती’ स्थापन करणारे आम्हीच. ओबीसींसाठी ४२ नवीन वसतिगृहे देणारे आणि उद्धव ठाकरे सरकारने घालवलेले २७ टक्के राजकीय आरक्षण परत आणणारे आमचे सरकार आहे. मग ओबीसींचे खरे हित पाहणारे कोण, हे समाजाला उत्तम ठाऊक आहे.”

यापूर्वीच्या कोणत्या सरकारने ओबीसींचे हित केले? अशी विचारणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ओबीसी हिताच्या संदर्भात आम्ही केलेले काम आणि इतर सरकारांनी केले काम, यावर माझ्याशी खुली चर्चा करावी, असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले. ते म्हणाले, विरोधकांना केवळ राजकारण करता येते. पण आम्हाला ओबीसी समाजाचे हित पाहायचे आहे, आणि आम्ही ते करणारच आहोत. सगळ्या समाजांचे हित आमचेच सरकार करू शकते, असा दावाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ओबीसी समाजातील दोन तरुणांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आत्महत्या केली आहे. यावही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, जो पर्यंत दोन्ही समाजाचे नेते खरी वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवणार नाहीत, तोपर्यंत हे तेढ कमी होणार नाही. ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार आहे. विना नोंदीचे कुणालाही प्रमाणपत्र मिळणार नाहीत. त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची आवश्यकता नाहीये, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

कुठेतरी आरक्षण गेलेल्याचे वातावरण तयार केले जात आहे. अशा प्रकारचे वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो. दुसरीकडेही, टोकाचेच राजकारण चाललेले आहे. अशा राजकारणाने कधीच समाजाचे भले होऊ शकत नाही. समाजापर्यंत वास्तविकता पोहोचवली तरच समाजाचे भले होऊ शकते. आम्ही ती वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवत आहोत. समाजाची काळजी आम्ही घेत आहोत. त्यामुळे नेत्यांनी कितीही राजकारण केले, तरी समाज वास्तविकता समजून घेतो, हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

पवारांनी एक्स म्हटले की, वाय समजायचे-राज्याची एकतेची वीण उसवली जात असल्याचे शरद पवार म्हणाले होते. वाट्टेल ते प्रयत्न करून आम्ही ते होऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शरद पवार साहेब कशासाठी प्रसिद्ध आहेत, हे आपल्याला माहीत आहे. पवार साहेबांनी एक्स म्हटले की, वाय समजायचे. ते मोठे नेते असल्यामुळे त्यांच्यावर आणखी काय बोलणार.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन_

नव संशोधनासाठी उच्च व तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला स्वायतत्ता देणे ही काळाची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️ सीओईपी जीवन गौरव व अभिमान पुरस्कारांचे वितरण

पुणे, दि. १४ सप्टेंबर: देशातील उच्च व तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना नव संशोधन आणि सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी स्वायतत्ता देणे ही काळाची गरज असून त्यादृष्टीने केंद्र व राज्य पातळीवर शासनातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व अभियांत्रिकी दिनानिमित्त आयोजित ‘सीओईपी अभिमान पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू सुनील भरुड, कुलसचिव डॉ. दयाराम सोनवणे, माजी संचालक शैलेश सहस्त्रबुद्धे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते, सचिव सुजीत परदेशी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वायतत्ता मिळाल्यामुळे सीओईपीसारख्या संस्था जागतिक स्तरावर भागीदारी करू शकतील, तंत्रज्ञान देवाण-घेवाण व सहयोगी संशोधन करू शकतील. यामुळे महाराष्ट्राची ३ ट्रिलियन आणि भारताची ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करताना सक्षम मानव संसाधनाचा सेतू उभा राहील. आगामी काळात अधिकाधिक संस्थांना स्वायतत्ता देण्याचा राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे,असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विस्तारासाठी चिखली येथे २८ एकर जागा दिली आहे. अशा संस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी शासन स्तरावरून मदत केली जाईल. तसेच संशोधन उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. भारतातील प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ संस्था म्हणून सीओईपीकडे बघितले जाते. या संस्थेला १७२ वर्षांचा इतिहास असून २०२८ मध्ये संस्थेला १७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. हा भारताच्या शैक्षणिक इतिहासातील विलक्षण प्रवास आहे. सीओईपीमधून शिक्षण घेऊन आज विविध क्षेत्रात माजी विद्यार्थी कार्यरत असून समाजातील सर्व क्षेत्रांना समृद्ध करण्याचे कार्य ते करत आहेत.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, १९९० च्या संगणकीकरणाच्या काळात अनेक शंका-कुशंका निर्माण झाल्या होत्या, मात्र हळूहळू मानव संसाधनाची निर्मिती होत गेली, भारतीय तरुणांनी सिलीकॉन व्हॅली व्यापली. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपली क्षमता दाखवून दिल्यामुळे भारताकडे जागतिक पातळीवर बघण्याचा दृष्टीकोन बदलला. त्याचे सर्व श्रेय अभियंत्यांनाच जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कम्प्युटिंगमुळे आज जगात वेगाने बदल होत आहेत. या बदलांसोबतच नवनवीन संधी निर्माण होत असून हॅकेथॉनसारख्या उपक्रमांतून त्याची झलक दिसते. पुण्यातील कृषी हॅकेथॉनमध्ये बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या नव्या किडींवर मात करण्यासाठी एआयच्या साहाय्याने अंदाज दर्शविणारे मॉडेल विकसित झाले असून हे निश्चितच आशादायक आहे.

तांत्रिक संस्था व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी बदलत्या तंत्रज्ञानानुसार मानव संसाधन तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. नवीन शैक्षणिक धोरण पारंपरिक विषयांना आधुनिकतेसह नव्या संधी उपलब्ध करून देत असल्याने तरुणाई हा बदल स्वीकारेल अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञानपरंपरेचा समावेश झाला आहे. यामध्ये संशोधन, पेटंट व रॉयल्टी यावर भर देण्यात आला आहे. २०४७ मध्ये विकसित भारतामध्ये या बाबींचे योगदान महत्त्वाचे राहील. सीओईपीसारख्या संस्थांचे बळकटीकरण करण्यास शासन सहकार्य करेल.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीवन गौरव व सीओईपी गौरव पुरस्कार वितरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ए.आर.डी.ई.च्या माजी शास्त्रज्ञ श्रीमती वसंथा रामास्वामी यांना देण्यात आला. सीओईपी अभिमान पुरस्कार विलास जावडेकर डेव्हलपर्स, पुणेचे संस्थापक व अध्यक्ष विलास जावडेकर, एएसएमईचे माजी अध्यक्ष डॉ. महांतश हिरेमठ, स्ट्रडकॉम कन्सल्टंट्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक जयंत इनामदार, जेएनपीएचे अध्यक्ष उमेश वाघ , इलेक्ट्रोमेक मटेरियल हँडलिंग सिस्टीम्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक तुषार मेहेंदळे आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्डीकर यांना प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते यांनी केले. कुलगुरू सुनील भरुड यांनी विद्यापीठाची माहिती दिली.

ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील नव्याने बांधलेल्या ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकी विभागाच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
१५० वर्षांचा अभिमानास्पद वारसा असलेले केंद्रीय ग्रंथालय आता आधुनिक, विशेष उद्देशाने उभारलेल्या इमारतीत स्थलांतरित झाले आहे. हे ग्रंथालय ४ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाची गरज भागवेल. येथे गेल्या शतकातील मौल्यवान साहित्य, संदर्भग्रंथांचे जतन, आधुनिक डिजिटल साधने, सहयोगी अध्ययन व संशोधनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नवीन संगणक अभियांत्रिकी विभाग अत्याधुनिक प्रयोगशाळा व पायाभूत सुविधांनी सुसज्ज असून नाविन्यपूर्ण संशोधन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील नवकल्पनांचे केंद्र ठरणार आहे.

अबब ..पुणेकरांनी दिले ६६५ कोटी ४४ लाख ८१ हजार ६२१ रुपये

राष्ट्रीय लोकअदालतीत एकाच दिवशी सुमारे दीड लाख प्रकरणे निकालीपुणे जिल्हा राष्ट्रीय लोकअदालतमध्ये राज्यात अव्वल

एकूण १३५ पॅनेलच्या माध्यमातून कामकाज

पुणे, १४ सप्टेंबर: प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एम.के. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (१३ सप्टेंबर) जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अशोका सभागृहामध्ये आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये तडजोडीसाठी दाखल २ लाख ४३ हजार ४२४ प्रकरणांपैकी १ लाख २७ हजार ५४१ प्रकरणे आणि विशेष मोहिमेत १७ हजार ५६० याप्रमाणे १ लाख ४५ हजार १०१ प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढत पुणे जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे, या माध्यमातून ६६५ कोटी ४४ लाख ८१ हजार ६२१ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांच्या हस्ते लोकअदालतचे उद्धघाटन करण्यात आले. या उपक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रेवती डेरे-मोहिते आणि संदीप मारणे यांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या.

दाखल-पूर्व प्रकरणाला मोठे यश
लोकअदालतमध्ये दाखल-पूर्व प्रकरणाला मोठे यश प्राप्त झाले असून एकूण ९८ कोटी २५ लाख ६२ हजार ३९४ रक्कम तडजोडीपोटी जमा झाले आहेत. यामध्ये दाखल पूर्व (प्रि-लिटिगेशन) १ लाख ८४ हजार ७४४ दाखल प्रकरणांपैकी १ लाख ३ हजार ६६ प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली आहेत. याशिवाय तडजोडीसाठी घेण्यात आलेल्या एकूण ५८ हजार ६८० दाखल दाव्यापैकी (पोस्ट लिटिगेशन) २४ हजार ४७५ प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यासह विशेष मोहिमेंतर्गत १७ हजार ५६० प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये ५६७ कोटी १९ लाख १९ हजार २२७ रुपये तडजाेड वसूल शुल्क करण्यात आले आहे.

लोक अदालतीमध्ये बँकेचे कर्जवसूली ५० हजार ३८०, तडजोड पात्र फौजदारी १८ हजार ३७४, वीज देयक १६२, कामगार विवाद खटले ७, भुसंपादन ३७, मोटार अपघात दावे न्यायाधिकरण ३५, वैवाहिक विवाद ६८, निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्ट २ हजार ४, इतर दिवाणी ४६३, महसूल १ हजार ३७६, पाणी कर ४८ हजार १६७, ग्राहक विवाद ५ आणि इतर ६ हजार ४६३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत.एकूण १३५ पॅनेलच्या माध्यमातून कामकाज करण्यात आले.

एम.के. महाजन, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश: लोक अदालत ही केवळ वाद निपटाऱ्याची पद्धत नसून ती एक लोकाभिमुख चळवळ आहे. लोक अदालत ही न्यायव्यवस्थेवरचा विश्वास दृढ करते. लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणांचा विक्रमी निपटारा हा सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.

श्रीमती सोनल पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण: या ऐतिहासिक यशामागे सर्व न्यायमूर्ती, वकीलवृंद, न्यायालयीन कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे अथक योगदान आहे. लोक अदालतीत एकाच दिवशी सुमारे एक लाख ४५ हजार प्रकरणांचा निपटारा होणे ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड महानगर पालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह न्यायमूर्ती, वकीलगण, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी, बँक, इतर वित्तीय संस्था आदींचे सहकार्य लाभल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने आभार व्यक्त करते.

जनरल प्रॅक्टिशनर्स हे मल्टीस्पेशालिस्ट डाॅक्टर्स-आरोग्यप्रमुख डाॅ. नीना बोराडे 

पुणे :  जनरल प्रॅक्टिशनर्स बहुतेक वेळा मल्टीस्पेशालिस्ट असतात. त्यांचे काम सगळ्यात जास्त अवघड असते. आयुर्वेदापासून सुरुवात करत ते अॅलोपथी च्या पुढे आज आले आहेत. अॅलोपथी आणि आयुर्वेद अशी एकात्मक औषधोपचार प्रणाली आपल्याला हवी आहे. जनरल प्रॅक्टिशनर्स हे शक्य करतील, असे मत पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डाॅ. नीना बोराडे यांनी व्यक्त केले.

जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन व जनरल प्रॅक्टिशनर्स प्रियदर्शिनी यांच्या वतीने महिला परिषद व लेडी जीपी ऑफ द इयर पुरस्कार समारंभा चे आयोजन टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात करण्यात आले होते. डॉ. रूपा अगरवाल यांना लेडी जीपी ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पहिल्या महिला लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील भुजबळ, असोसिएशनच्या सचिव डॉ. भाग्यश्री मुनोत-मेहता, प्रियदर्शिनीच्या अध्यक्षा डॉ. मनीषा खेडकर, सह-अध्यक्षा डॉ. रश्मी खैरनार व डॉ. अमृता महाजन, सचिव डॉ. सीमा पाटील व डॉ. हर्षला बाबर तसेच संयुक्त सचिव डॉ. सयानी गांधी व डॉ. तेजश्री गुरव उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. अमोल लुंकड यांनी पीसीओएस विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. मधुसूदन असावा यांनी हृदय व महिला आरोग्य या विषयावर माहिती दिली. सीए रोहन गुप्ता यांनी आर्थिक साक्षरता व महिला यावर मार्गदर्शन केले. डॉ. अमोल लुंकड यांनी शेवटी वंध्यत्वावरील प्रकरणाधारित चर्चा केली.

डॉ. नीना बोराडे म्हणाल्या की, वैद्यकीय क्षेत्रात महिला डॉक्टरांची वाढ फक्त संख्यात्मक नाही तर गुणात्मकही आहे. महिलांचे योगदान मोठे असून संवेदनशीलतेची जोड मिळाल्यास वैद्यकीय सेवा अधिक सुंदर होते. महिला डॉक्टरांमध्ये बाईपणाबरोबर आईपण देखील महत्त्वाचा गुण आहे, आईपण हा विचार, वृत्ती आणि सेवाभाव आहे.  

आज काही डॉक्टर १२ तासांपेक्षा जास्त काम करतात, ज्यामुळे कामाचे तास वाढतात आणि तणावही येतो. त्यामुळे स्वतःची आरोग्य काळजी घेणे आवश्यक आहे. मेंटल हेल्थसाठी डॉक्टरांनी एकत्र येणे गरजेचे आहे. समाजाचे आरोग्य अबाधित ठेवणाऱ्या डॉक्टरांनी स्वतःची देखील काळजी घ्यावी.

डॉ. ज्योत्स्ना कुलकर्णी म्हणाल्या की, ओपन सर्जरीपासून लेप्रोस्कोपीकडे जाणे रुग्णांसाठी मोठा बदल ठरला. आताच्या काळात रोबोटिक शस्त्रक्रियेच्या सहाय्याने अत्यंत अचूकता आणि कौशल्यामुळे क्लिष्ट लेप्रोस्कोपी शस्त्रक्रिया शक्य झाल्या आहेत. रोबोटिक उपकरणांवर खर्च येतो कारण प्रत्येक उपकरणाची ठरलेली जीवनमर्यादा असते. काही खर्च रुग्णाला पास करावा लागतो, पण काळानुसार हा खर्च कमी होईल. सध्या या तंत्रज्ञानामुळे आधी अशक्य वाटणाऱ्या क्लिष्ट शस्त्रक्रिया आता शक्य झाल्या आहेत.

डॉ. सुनील भुजबळ, डॉ. मनीषा खेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. भाग्यश्री मुनोत-मेहता व डॉ. राजेश दोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. डॉ.राजेश दोषी यांनी आभार मानले.

जीएसटीमुळं महाराष्ट्रात 20 लाख कोटींची पाकीट मारी:देवा भाऊंची जाहिरात मेघा इंजिनिअरिंगने दिली का?– रोहित पवार

मुंबई- PM मोदी साहेबांचा फोटो जरूर लावा, पण सोबतच ‘गेली सात वर्षे अव्वाच्या सव्वा GST वसूल करून देशातील जनतेची लाखो कोटी रुपयांची पाकीट मारी केल्याबद्दल माफी असावी’, अशी तळटीप ही फोटोखाली देणार आहात का? असा सवाल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी X वर पोस्ट करत विचारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोंच्या वापरावरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदींचा फोटो लावण्यासोबतच जीएसटीमुळे जनतेची आर्थिक फसवणूक झाल्याची ‘तळटीप’ही लावावी, असे त्यांनी म्हटले आहे.

रोहित पवार म्हणाले की, राज्यातील प्रत्येक तालुक्यातील आमदाराला सांगण्यात आलं होतं देवाभाऊ जाहिरात लावा. मात्र नाव कुठेच छापलं नव्हतं. आमची जाहिरात बघा, आम्ही आमच नाव छापलं आहे. त्यांनी नाव छापलेले नाही, याचा अर्थ मेघा इंजिनियरिंग कंपनीने जाहिरात दिली का? असा सवालही त्यांनी केला आहे.

नेमके काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार यांनी ‘X’ वर पोस्ट करत म्हटले आहे की, मोदी साहेबांचा फोटो जरूर लावा, पण सोबतच ‘गेली सात वर्षे अव्वाच्या सव्वा जी एसटी (GST) वसूल करून देशातील जनतेची लाखो कोटी रुपयांची पाकीट मारी केल्याबद्दल माफी असावी’, अशी तळटीपही फोटोखाली देणार आहात का? जीएसटीमुळे सर्वात मोठी पाकीट मारी (20 लाख कोटी) महाराष्ट्रात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तर प्रत्येक घरात ही तळटीप असलेले फोटोच लावावे लागतील.कदाचित हे फोटो लावण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना कल्पनाही नसेल, पण नेत्यांना खूश करण्यासाठी आजूबाजूचे काही नेते अशा करामती करतात.

मेघा इंजिनिअरिंगने जाहिरात केली का?

रोहित पवार म्हणाले की, राज्यातील प्रत्येक तालुक्यातील आमदाराला सांगण्यात आलं होतं देवाभाऊ जाहिरात लावा. मात्र नाव कुठेच छापल नव्हतं. आमची जाहिरात बघा, आम्ही आमच नाव छापलं आहे. त्यांनी नाव छापलेले नाही, याचा अर्थ मेघा इंजिनियरिंग कंपनीने जाहिरात दिली का? कारण 190 रुपये त्यांचे माफ झाले आहेत. कोकणात अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्याने जाहिरात लावली आहे. भविष्यात ते त्यांच्या सोबत राहणार नाहीत. महिला आणि बालकल्याण खात्याचा संबंध असू शकतो. कारण दादांच्या पक्षाचे कोकणातील नेते यांची भाजप सोबत जास्त जवळीक झाली आहे. दादांचे पोस्टर कमी देवा भाऊचे पोस्टर त्यांनी जास्त लावले, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

पाकिस्तानविरुद्ध काळ्या पट्ट्या बांधून खेळणार टीम इंडिया

0

आजच्या आशिया कपमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडू काळ्या पट्ट्या बांधतील. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी टीम इंडियाच्या व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला. स्टेडियममध्ये बॅनर आणि पोस्टर्स घेऊन जाण्यासही बंदी आहे.

भारत आणि पाकिस्तान दोघांनीही त्यांचे पहिले सामने जिंकले आहेत. आजचा सामना जिंकणारा संघ सुपर-४ मध्ये पोहोचेल हे जवळजवळ निश्चित आहे.फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात भारतीय संघ आघाडीवर आहे. पाकिस्तानचा संघ फॉर्मच्या बाबतीत भारताच्या जवळपासही नाही. मग सामन्यापूर्वी असे गृहीत धरावे का की भारत जिंकेल?

पाकिस्तानला सामन्यात आणणारा एकच घटक आहे. तो घटक म्हणजे दुबईची खेळपट्टी. या खेळपट्टीत काय खास आहे आणि ती गेम चेंजर का ठरू शकते, हे आपण नंतर जाणून घेऊ. सर्वप्रथम, टी-२० स्वरूपात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यांचा सारांश काय आहे ते पाहा.

या दोन्ही संघांमधील शेवटचा सामना अमेरिकेत झालेल्या टी-२० विश्वचषकात झाला होता. त्यानंतर भारतीय संघाने केवळ ११९ धावा करूनही ६ धावांनी सामना जिंकला. या विश्वचषकानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांसारखे अनुभवी भारतीय खेळाडू निवृत्त झाले. तरीही, भारतीय संघाची कामगिरी आणखी चांगली झाली. तेव्हापासून संघाने ८६% टी-२० सामने जिंकले आहेत.

दुसरीकडे, कामगिरी सुधारण्याच्या आशेने पाकिस्तानने बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान सारख्या खेळाडूंना संघातून वगळले. तरीही, संघाची पातळी घसरतच राहिली. गेल्या टी-२० विश्वचषकापासून पाकिस्तानने फक्त ५०% सामने जिंकले आहेत.

जेव्हा भारतीय संघ इतका चांगला आहे तेव्हा खेळपट्टी सामना कसा खराब करू शकते?

दुबई क्रिकेट ग्राउंडवर आतापर्यंत ९५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ४६ मध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. ४८ मध्ये लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. १ सामना बरोबरीत सुटला आहे.

या रेकॉर्डमध्ये असे काही खास नाही जे भारतीय संघासाठी तणावाचे कारण ठरेल, परंतु दुबई रेकॉर्डचे अधिक बारकाईने विश्लेषण केल्यास चित्र बदलते.

२०२० पासून आतापर्यंत गेल्या पाच वर्षांत कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये झालेल्या सर्व टी-२० सामन्यांमध्ये, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाला मोठा फायदा झाला आहे. या काळात, असे १८ सामने झाले आहेत ज्यात दोन्ही संघ कसोटी खेळणारे देश होते. या १८ सामन्यांमध्ये, लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने १६ सामने जिंकले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने फक्त २ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

म्हणजेच, जर आजच्या सामन्यात भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली, तर पाकिस्तानला जोरदार टक्कर देता येईल. अलिकडच्या काळात असे दोनदा घडले आहे. पहिल्यांदा २०२१ च्या टी-२० विश्वचषकात आणि दुसऱ्यांदा २०२२ च्या टी-२० आशिया कपमध्ये. गेल्या १३ वर्षांत, हे एकमेव दोन टी-२० सामने आहेत ज्यात पाकिस्तानचा संघ भारताला हरवू शकला आहे.

शेवटी दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-११

भारत- अभिषेक शर्मा, शुभमन गिल, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.

पाकिस्तान : सैम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हरीस (यष्टीरक्षक), सलमान आगा (कर्णधार), फखर जमान, हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद आणि सुफयान मुकीम.