Home Blog Page 1308

बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग!!!

चित्रपटाला घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल निर्माते माधुरी भोसले, जिओ स्टुडिओज् आणि कलाकारांनी मानले मायबाप प्रेक्षकांचे आभार..!

केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट सरत्या वर्षातला बॉक्सऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेला मराठी चित्रपट ठरला आहे. ‘बाईपण भारी देवा’ प्रदर्शित होऊन आता अनेक महिने लोटले तरीदेखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नाही. अजूनही पुन्हा पुन्हा चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण उत्सुक दिसत आहेत. खरंतर प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांमध्ये ‘बाईपण भारी देवा’ विषयी कमालीची उत्सुकता पहायला मिळाली होती, बॉक्सऑफिसवर हा चित्रपट कमाल करेल अशी चर्चाही रंगली होती. आणि अगदी तसंच सगळं घडत गेलं. हे फक्त आणि फक्त शक्य झालं ते मायबाप प्रेक्षकांमुळेच!

आणि म्हणूनच चित्रपटाचे यश साजरं करत निर्माती माधुरी भोसले यांच्यातर्फे १६ डिसेंबर रोजी मुंबईत या सिनेमाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. चित्रपटाचे निर्माते, कलाकार आणि संपूर्ण क्रू यावेळेस उपस्थीत होते. विशेष म्हणजे मुंबईचे डब्बेवाले आपल्या धकाधकीच्या जीवनात थोडासा विरंगुळा म्हणून चित्रपट पाहण्यास आवर्जून उपस्थित होते. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आताही हा विशेष शो हाऊसफुल ठरला होता!

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटानं पहिल्या आठवड्यातच बाजी मारत १२.५ कोटींचा गल्ला जमवला होता. इतकंच नाही तर प्रदर्शनानंतर दुसऱ्या रविवारी एका दिवसांत ६.१० कोटींची कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला होता. प्रदर्शनानंतर अवघ्या काही दिवसातच ‘बाईपण भारी देवा’नं नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेत. ७६व्यां स्वातंत्र्यदिनी ७६.५ कोटीचा गल्ला २०२३ चा सुपरहीट चित्रपट ठरला आहे. आणि महत्वाचं म्हणजे मराठी चित्रपटाच्या इतिहासातील सर्वाधिक कलेक्शन करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे.

शनिवारी पार पडलेल्या स्पेशल स्क्रिनिंगला तसेच चित्रपटाला एकंदरीत मिळालेल्या यशाबद्दल निर्मात्या माधुरी भोसले म्हणतात की, ” एमव्हीबी मीडियाच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम आणि कौतुक मिळाले याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. त्याच बरोबर मला केदार शिंदे सारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक आणि या ६ अत्यंत प्रतिभावान आणि खास कलाकार महिलांशी जोडले जाण्याचा अभिमान आहे. या चित्रपटात काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांचे आणि क्रूचे मनापासून खूप खूप आभार. हे खरंच विशेष आहे की प्रचंड व्यावसायिक यशासोबतच आम्ही ज्यांच्यासाठी ही फिल्म बनवली आहे त्यांच्याकडूनही तितकेच कौतुक आणि प्रेम मिळाले आहे!! धन्यवाद.

जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची निर्मिती माधुरी भोसले यांच्या एमव्हीबी मिडिया या प्रोडक्शन अंतर्गत करण्यात आली असून, या चित्रपटाचे सह-निर्माते बेला शिंदे आणि अजित भुरे हे आहेत.

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते, सुकन्या मोने,शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी अभिनेत्रींची तगडी स्टारकास्ट पहायला मिळाली.

माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सैनिक दरबाराचे आयोजन

mपुणे, दि. १८ : जिल्ह्यातील सर्व सेवारत सैनिक, सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांच्या मागण्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २७ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सैनिक दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व सेवारत सैनिक, सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता, वीरपिता व वीरपत्नी यांनी २७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, ४ था मजला येथील सभागृहात उपस्थित राहवे, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे स. दे. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदवर विषप्रयोग?:मुंबई पोलिसांनी केली दाऊदचा भाचा अलीशाह अन् साजिद वागळेची चौकशी,विषप्रयोग झाल्याचे वृत्त फेटाळले, कराचीतील एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात उपचार मात्र सुरू

0

मुंबई-अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकच्या कराचीत विषप्रयोग झाल्याच्या बातमीने देशात मोठा हल्लकल्लोळ माजला आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, दाऊदला कराचीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या इस्पितळातील ज्या मजल्यावर त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तिथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यासंबंधीच्या बातम्यांवर अंकुश लावण्यासाठी इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांच्या मास्टरमाईंडवर कराचीत विषप्रयोग झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर भारतीय गुप्तचर संस्था व पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यांनी या प्रकरणी दाऊदशी संबंध असणाऱ्या लोकांसह त्याच्या नातेवाईकांची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी दाऊदवर विषप्रयोग झाल्याच्या वृत्ताची पुष्टी करण्यासाठी सोमवारी दाऊदचा भाचा अलीशाह पारकर व साजिद वागळे या दोघांची त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली. पण अद्याप दाऊदवर विषप्रयोग झाल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही. पण दाऊदला प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची महत्त्वाची माहिती आहे.

पोलिसांनी या प्रकरणी भूतकाळात दाऊदसोबत काम करणाऱ्या लोकांशीही संपर्क साधला आहे. त्यांनी पोलिसांना सांगितले की, दाऊदची प्रकृती खराब आहे. त्याच्यावर कराचीतील एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण या लोकांनी त्याच्यावर विषप्रयोग झाल्याचे वृत्त फेटाळले आहे.

पाकिस्तानी पत्रकाराने केला होता दावा

एका पाकिस्तानी महिला पत्रकाराने एका व्हिडिओद्वारे दाऊदवर विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा केला आहे. दाऊदला कराचीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आला आहे. यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हे वृत्त व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण पाकिस्तानातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे नक्कीच काहीतरी गडबड असल्याची शंका येते. अन्यथा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सेवा एकाचवेळी बंद कशी काय होऊ शकते?, असे या पत्रकाराने म्हटले आहे.

कोण आहे दाऊद इब्राहिम?

दाऊद इब्राहिमचा जन्म 1955 मध्ये मुंबईतील रत्नागिरी जिल्ह्यात झाला. त्याचे वडील इब्राहिम कासकर पोलिस हवालदार होते. कालांतराने दाऊदचे कुटुंब मुंबईतील डोंगरी येथे राहण्यास गेले. दाऊद पूर्वी हाजी मस्तान टोळीसाठी काम करत असे, त्यानंतर हळूहळू त्याचा प्रभाव संपूर्ण मुंबईत पसरला.

दाऊद मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी

दाऊद इब्राहिम 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे. या स्फोटांनंतर त्याने पाकिस्तानात पलायन केले. सध्या तो पाकमध्येच आहे. तेथूनच तो आपल्या जगभरातील काळ्या धंद्यांचे संचालन करतो. पण पाकने अद्याप दाऊद आपल्या देशात राहत असल्याचे मान्य केले नाही. काही वर्षांपूर्वी भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दाऊदच्या आवाजाचे नमुणे मिळवून तो कराचीत लपल्याचा दावा केला होता. 2003 मध्ये दाऊदला जागतिक अतिरेकी घोषित करम्यात आले. त्यानंतर 2011 मध्ये एफबीआय व फोर्ब्सच्या एका यादीत त्याचा उल्लेख जगातील तिसरा मोस्ट वाँटेड फरार अतिरेकी म्हणून करण्यात आला होता.

राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

नागपूर, दि. १८: दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. गेल्या दीड वर्षांत आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची आतापर्यंतची विक्रमी मदत केली असून राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन करण्याचा, धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी प्रति हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली.

महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन करण्यात आल्याचे जाहिर करतानाच ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये ४४ लाख शेतकऱ्यांना १८ हजार ७६२ कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. मात्र सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने ६ लाख ५६ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहीले. ६.५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली.

कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना तब्बल १५ हजार ४० कोटींचा लाभ

अवकाळी पाऊस, गारपीट आणि एकंदरच बळीराजाच्या समस्यांसंदर्भात विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अल्पकालिन चर्चा उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, कृषि विभागाच्या प्रमुख योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जुलै २०२२ पासून तब्बल १५ हजार ४० कोटींचा लाभ देण्यात आला आहे. शेतकरी हा विषय फक्त कृषि खात्याशी संबंधित नाही. तर, अनेक खात्यांशी समन्वय साधून बळीराजाला सर्वोतोपरी शाश्वत मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत १४ लाख ३१ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे ५ हजार १९० कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक

महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक स्थापन केली आहे. आजच या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे यासाठी मदत करत आहेत. न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरॅडिशनचा हा पथदर्शी प्रकल्प कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरुपी उपाय ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत समृद्धी महामार्गालगत १३ कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीचं काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कांदा निर्यातबंदीबाबत केंद्रीय वाणिज्यमंत्री श्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा झाली असून याबाबतही लवकरच तोडगा निघेल, असेही त्यांनी सांगितले.

‘सहकार से समृद्धी’ हा मंत्र वास्तवात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही देतानाच इथेनॉल निर्मितीवर घातलेले निर्बंध राज्याच्या मागणीला मान देऊन शिथील केले, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकारिता मंत्री अमित शहा यांचे आभारही मुख्यमंत्र्यांनी मानले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्यासाठी जुलै २०२२ पासून म्हणजे गेल्या फक्त १८ महिन्यांत शेतकऱ्यांसाठी जो भरीव निधी खर्च करीत आहोत त्यामध्ये मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून १४ हजार ८९१ कोटी रुपये, कृषि विभागाच्या माध्यमातून १५ हजार ४० कोटी रुपये, सहकार ५ हजार १९० कोटी, पणन ५ हजार ११४ कोटी, अन्न व नागरी पुरवठा ३ हजार ८०० कोटी,पशुसंवर्धन २४३ कोटी अशा रीतीनं तब्बल ४४ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी क्षेत्राचा विकास दर वाढविण्यासाठी प्रयत्न

कृषी क्षेत्राचा विकास दर वाढविण्यासाठी यापेक्षाही जास्त निधी लागला तरी त्याची तरतूद केली जाईल आणि तो खर्चही केला जाईल, याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. अशा विविध मार्गांनी शेतकऱ्यांना खंबीरपणं उभं करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे. शासनाच्या या प्रयत्नांना साथ द्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये राजकारण आणू नका. त्याऐवजी चर्चा करू, संवाद साधू समन्वय राखू यातून आपल्या राज्याचा कृषी विकास दर कसा वाढेल असे प्रयत्न करू यातच आपल्या बळीराजाचं आणि आपल्या राज्याचं हित आहे. तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊ. आपल्या शेतकऱ्यांचं घर सावरूया. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आहेच. तो जागा करण्याचा निर्धार करूया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना केले.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन

महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या हा अतिशय गंभीर विषय आहे. एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली तरी ती दुख:द असते, असे सांगत मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी नव्याने टास्क फोर्सचं पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीला शाश्वत शेतीकडे कसं नेता येईल, राज्यातील शेती उत्पादन वाढवण्यासाठी काय करता येईल, अवकाळी पाऊस आला किंवा दुष्काळ पडला तरी शेतीचं नुकसान होणार नाही, असं शेतीचं मॉडेल कसं विकसित करता येईल, यासाठी हा टास्क फोर्स काम करील. त्याचबरोबर कृषि पर्यटनाला चालना देऊन अधिकाधिक शेतकऱ्यांना कृषि पर्यटन विकसित करण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करण्याबाबतही हा टास्क फोर्स काम करील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन अधिक सक्षम करणार

कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनला अधिक सक्षम करण्याचाही निर्णय घेतला आहे. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, कर्ज परतफेडीचा तगादा त्यामुळे निर्माण होणारा ताण-तणाव आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करतात. त्यासाठी याविषयावर काम करणारे समुपदेशक, ज्येष्ठ संपादक, निवृत्त पोलिस अधिकारी, कृषी विद्यापीठांचे प्राध्यापक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, कीर्तनकार अशा सर्वांची मदत घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकरी बांधवांनो धीर सोडू नका.. खचून जाऊ नका.. शासन सदैव तुमच्या पाठीशीच नव्हे, तर तुमच्या सोबत आहे.. आत्महत्या करून आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू नका, असे भावनिक आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

केंद्राच्या पथकाकडून दुष्काळग्रस्तभागाची पाहणी
राज्यात यंदा सरासरीच्या ९० टक्के असमान पाऊस झाल्यामुळे पाण्याचं संकट निर्माण झाले आहे. केंद्राच्या पथकाने नुकतेच दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या तालुक्यांना भेटी देऊन पाहाणी केली आहे. ४० तालुक्यांमधील शेतकऱ्यांना २ हजार ५८७ कोटी इतक्या रकमेची मदत देण्याबाबत केंद्र सरकारला मागणी पत्र पाठवलं आहे.केंद्राच्या इंटरमिनिस्ट्रीअल को-आर्डिनेशन टीमने १५ पैकी नऊ जिल्ह्यांना भेटी दिल्या. शासनाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांच्यासोबत बैठकही झाली. ही मदत लवकर प्राप्त करून घेण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे बैठक होणार आहे त्यामुळे केंद्राकडून लवकरात लवकर निधी मिळेल, असा विश्वास असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्राच्या निकषात न बसलेल्या, परंतु कमी पाऊस झालेल्या १ हजार २१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या मंडळांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन, चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आदी सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. रोजगार हमीच्या निकषांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासह ८ वेगवेगळ्या सवलती लागू केल्या गेल्या आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता एनडीआरएफच्या दराच्या दुप्पट दरानं शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला, २ हेक्टरची मर्यादा ३ हेक्टर केली. एनडीआरएफने आता दर काही प्रमाणात वाढवले आहेत तरीही त्यांच्यापेक्षा अधिक दराने आपण नुकसान भरपाई देणार आहोत. गेल्या वेळेस शेतकरी बांधवांना जितकी नुकसान भरपाई मिळाली त्यापेक्षा अधिकच मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

जानेवारी ते ऑक्टोबर २०२३ या काळात झालेली अतिवृष्टी, अवकाळी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता १७५७ कोटी रुपये वितरित करण्यात येणार असून त्यापैकी ३०० कोटीपेक्षा जास्तीचे वाटप देखील झालं आहे.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या सहा हजार रुपयांसोबत आपल्याकडील ६ हजार रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेतला. ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात राज्याच्या हिश्श्याचा पहिला टप्पा म्हणून १ हजार ७२० कोटी रुपये जमा देखील झाले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केवळ एक रुपयात पीक विमा योजना राज्य शासनाने तयार केली. त्यामुळे पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत तब्बल १७७ टक्के वाढ झाली, हे अभिमानाने नमीद करतो असे सांगत २०२३ च्या खरीप हंगामात राज्यातील १ कोटी ७० लाख व रब्बी हंगामात ६६ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

एक रुपयात पीक विमा देऊन थांबलो नाही तर पूर्वी शेतकऱ्यांची जी तक्रार असायची की, विमा कंपन्या नुकसान भरपाई देत नाहीत, त्याबाबतीतही कठोर भूमिका घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची मी बैठक घेऊन त्यांना नुकसान भरपाईपोटी योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना देण्यास सांगितलं. त्यामुळे या खरीपात झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपन्यांकडून २ हजार १२१ कोटी इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. या कंपन्यांकडून १ हजार २१७ कोटी रुपये एवढं अग्रीम वाटप झालं आहे.

भूविकास बँकांकडून ३४ हजार ७८८ शेतकऱ्यांनी घेतलेलं ९६४ कोटी १५ लाख रुपयांचं कर्ज आम्ही माफ केलं ते यापूर्वी कधी झालं नव्हते यामुळे सुमारे ६९ हजार हेक्टर जमिनीवरील भूविकास बँकांच्या कर्जाचा बोजा कमी झाला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. २०२१ मध्ये पीक कर्ज वाटपाचं जे प्रमाण ७३ टक्के होतं, ते आता ८५ टक्क्यांपर्यंत गेले आहे. २०२३ च्या खरीप हंगामात सप्टेंबरअखेर ४१ हजार २२१ कोटी रुपयांचं कर्ज वाटप झाले असून रब्बी हंगामासाठीही ३.५५ लाख शेतकऱ्यांना ३५१६ कोटींचं पीक कर्ज वाटप सुरू आहे. बँकांनी ६४ टक्के टार्गेट पूर्ण केलं आहे.

पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत ३ लाखांपर्यंत पीक कर्जाची संपूर्ण परतफेड केली तर शेतकऱ्यास ३ टक्के व्याज सवलत अनुदान दिलं जातं. या वर्षासाठी ७२ कोटी खर्च करण्यात आले आहेत. अटल अर्थ सहाय्य योजनेस मुदतवाढ दिली असून ४२८ प्रस्तावांना कर्ज आणि अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी ७२ कोटी ४२ लाख रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. बुलडाणा, परळी-वैजनाथ, तसंच नांदेड आणि सोयगांव येथे शासकीय कृषि महाविद्यालये स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. नागपूर येथे शेती व कृषि उद्योग आणि कृषि संलग्न उद्योगासाठी आंतरराष्ट्रीय कृषि सुविधा केंद्र स्थापन करण्याचा निर्णयही घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतीच्या शाश्वत प्रगतीसाठी काही महत्वाच्या योजनांना वेग दिला आहे. त्यामध्ये नदीजोड प्रकल्प आणि जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा राबवून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा साडे पाच हजार गावांत सुरू केला आहे.

कोकणातील विशिष्ट परिस्थिती व आव्हाने विचारात घेता या पूर्ण क्षेत्राचा एकत्रित विकास विकास होण्यासाठी सर्व यंत्रणांच्या कामांमध्ये एकसुत्रता आणण्यासाठी कोकण क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा आमचा मानस आहे. याकरिता यावर्षी पुरवणी मागण्यांमध्ये ५०० कोटी रुपयांची तरतूद ठेवण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनामार्फत शेती आणि शेतकऱ्यांसाठी राबविण्य़ात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली आणि त्यासाठी करण्यात आलेल्या निधींच्या तरतुदींची माहितीही त्यांनी दिली.

सभागृहात गेल्या आठवड्यात ३ दिवस सविस्तर झालेल्या या चर्चेत सदस्य सर्वश्री जयंत पाटील, रणधीर सावरकर, संजय सावकारे, बालाजी कल्याणकर, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, भास्कर जाधव, नारायण कुचे, बच्चू कडू, प्रकाश सोळंकी, विश्वजीत कदम,समीर कुणावार, आशिष जयस्वाल, राजेश टोपे, प्रशांत बंब, श्रीमती सुमनताई पाटील, उदयसिंह राजपूत, विनोद अग्रवाल, अशोक चव्हाण,हरिभाऊ बागडे, दिपक चव्हाण, रमेश बोरनारे, सुरेश वरपुरकर, श्रीमती श्वेता महाले, प्राजक्त तनपुरे, सुहास कांदे, अमित झनक, बबनराव लोणीकर, दिलीप बनकर, कैलाश पाटील, जितेश अंतापूरकर, श्रीमती प्रणिती शिंदे आदी सदस्यांनी भाग घेतला

यशाची गुरुकिल्ली ही आपल्या हातात असते-  स्कायडायव्हर पद्मश्री शीतल महाजन

पुणे : प्रोफेशनल स्कायडायव्हर म्हणून करिअरची सुरुवात करताना मुलगी म्हणून थांबवले जात होते. स्पॉन्सर मिळत नव्हते, एवढेच नाही तर भारतात याला खेळ म्हणून मान्यता देखील नव्हती. असे अनेक अडथळे पार करून स्कायडायव्हिंग मधील अनेक विक्रम भारतीय म्हणून स्वतःच्या नावावर केले आहेत, याचा अभिमान वाटतो. यशाची गुरुकिल्ली ही आपल्या हातात असते एका दिवसात कोणतेही यश मिळत नाही प्रत्येक यशामागे एक गोष्ट असते. असे मत स्कायडायव्हर पद्मश्री शीतल महाजन यांनी व्यक्त केले. 
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या यशवंतराव मोहिते काॅलेज आॅफ आर्टस, काॅमर्स अॅन्ड सायन्सच्या वतीने क्रीडा क्षेत्रात जागतिक विक्रम करणाऱ्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुणे ते तिरुपती हे सुमारे १०९३ किमी अंतर ६ दिवसात सायकल वर पूर्ण करणारे भारती विद्यापीठाच्या वाय एम कॉलेज मधील प्राध्यापक डॉ. सुहास मोहिते, प्रा. अरुण पवार , उल्हास पवार आणि बुद्धिबळ पटू १६ वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियन आकांक्षा हगवणे यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी भारती विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ.विवेक सावजी, प्रभारी प्राचार्य डाॅ. विवेक रणखांबे, लॉ कॉलेजच्या प्राचार्य उज्ज्वला बेंदाळे, ललितकला विभागाचे संचालक प्रा. शारंगधर साठे आदी मान्यवर उपस्थित होते.
शितल महाजन म्हणाल्या, एव्हरेस्ट समोरील जागतिक विक्रमानंतर माझा पहिला सन्मान आहे. पालकांनी मुलांना सहकार्य करणे आणि स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. भारतीय स्त्रीला फक्त एका संधीची गरज असते जर ती मिळाली तर ती स्त्री काहीही करू शकते. परंतु संधी देण्याची ही सुरुवात घरापासून व्हायला हवी, असेही त्यांनी सांगितले. 
विवेक सावजी म्हणाले, आपल्या महाविद्यालयातील मुलांनी केलेले जागतिक विक्रम पाहून त्यांचा अभिमान वाटतो. आई वडिलांनी मुलांना ध्येयपूर्तीसाठी आधार देणे आवश्यक आहे.  मुलांमध्ये परिश्रम करणे आणि ध्येयासक्ती असणे गरजेचे आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी इच्छाशक्ती असणे देखील गरजेचे आहे.
डॉ. विवेक रणखांबे म्हणाले, बौद्धिक, मानसिक, शारिरीक अशा विविध क्षमतांचा एका अधिभौतिक क्षमतेच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सदाशिव पाटील यांनी तर प्रा. एन. एम. कुंभार यांनी आभार मानले. 

लता मंगेशकर हॉस्पीटलमधील रणजीत देशमुख सुपरस्पेशालिटी विस्तारित इमारतीचे उद्घाटन

0

नागपूर दि. 18 : वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विद्या शिक्षण प्रसारक मंडळांतर्गत लता मंगेशकर हॉस्पीटल परिसरातील भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पुतळ्याचे अनावरण, रणजीत देशमुख सुपरस्पेशालिटी हॉस्पीटल विस्तारित इमारतीचे उद्घाटन, फिजिओथेरपी म्युझियम व रिसोर्स लर्निंग सेंटरचा शुभारंभ उपमुख्यमंत्र श्री फडणवीस यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी श्री फडणवीस बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री रणजीत देशमुख, कार्यकारी अध्यक्ष आशिष देशमुख, आमदार समीर मेघे, अधिष्ठाता डॉ. काजल मित्रा, उपअधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन देवतळे यावेळी उपस्थित होते.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आरोग्य सुविधा तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमुळे पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागातील जनतेला या सुविधेचा लाभ पोहचविण्याचे आवाहन यावेळी श्री.फडणवीस यांनी केले. 

फिजिओथेरपी म्युझियमबाबत बोलताना सामान्यातील सामान्य माणसालाही कला व आधुनिकतेच्या संगमातून आरोग्य शिक्षण देणारे म्युझियम येथे तयार झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. लता मंगेशकर यांच्या नावाने देशातील पहिले वैद्यकीय हॉस्पिटल व शिक्षण संस्था नागपूर येथे रणजित देशमुख यांच्या पुढाकाराने सुरू केल्याबद्दलचा विशेष उल्लेख  श्री. फडणवीस यांनी केला.

याप्रसंगी लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच संस्थेच्या कामात महत्वाचे योगदान देणाऱ्या डॉ. आयुषी देशमुख्य, विजय सालनकर, प्रशांत सातपुते, डॉ. सुधीर देशमुख, संजय कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.

आशिष देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले तर आभार अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी मानले.

कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक डॉ. भाऊसाहेब भोगे तसेच डॉ. राजीव पोतदार,  डॉ. निशांत धोडसे, रूपाली देशमुख, युवराज चालखोर, सुधीर देशमुख, डॉ. विलास ठोंबरे, डॉ. विकास धानोरकर, डॉ. अभय कोलते, डॉ. मनिषा देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे स्वर्वेद महामंदिराचे केले उद्घाटन

0

“आज काळाची चक्रे पुन्हा फिरली आहेत आणि भारत आपल्या वारशाचा अभिमान बाळगत आहे आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्तीची घोषणा करत आहे”

“काशीचा कायापालट करण्यासाठी सरकार, समाज आणि संत समाज सर्वजण एकत्रितपणे काम करत आहेत”

“स्वर्वेद महामंदिर हे भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक सामर्थ्याचे आधुनिक प्रतीक आहे”

“भारताची वास्तुकला, विज्ञान, योग अध्यात्मिक संरचनांमधूनच अकल्पनीय उंचीवर पोहोचली आहे “

“आता बनारस म्हणजे – विकास, आधुनिक सुविधा याबरोबरच विश्वास आणि स्वच्छता आणि परिवर्तन”

नऊ संकल्प मांडले

नवी दिल्‍ली, 18 डिसेंबर 2023-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी मधील उमराहा येथे स्वर्वेद महामंदिराचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी महर्षी सदाफल देवजी महाराज यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली आणि मंदिर परिसराला फेरफटका देखील मारला.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान म्हणाले की आज त्यांच्या काशी भेटीचा दुसरा दिवस आहे आणि काशीमध्ये घालवलेला प्रत्येक क्षण अभूतपूर्व अनुभवांनी भरलेला आहे. दोन वर्षांपूर्वी अखिल भारतीय विहंगम योग संस्थेच्या वार्षिक सोहळ्याची आठवण सांगून, यावर्षीच्या शताब्दी सोहळ्याचा भाग बनण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले  की, विहंगम योग साधनेने शंभर वर्षांचा अविस्मरणीय प्रवास पूर्ण केला आहे.

त्यांनी महर्षी सदाफल देव जी यांचे मागील शतकात ज्ञान आणि योगासाठी दिलेले योगदान अधोरेखित केले आणि सांगितले की त्यांच्या दिव्य प्रकाशाने जगभरातील कोट्यवधी लोकांच्या जीवनात परिवर्तन घडून आले आहे. या शुभ प्रसंगी पंतप्रधानांनी 25,000 कुंडिया स्वर्वेद ज्ञान महायज्ञाच्या आयोजनाचा उल्लेख केला. महायज्ञातील प्रत्येक आहुती विकसित भारताचा संकल्प अधिक दृढ करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी महर्षी सदाफल देवजींसमोर मस्तक टेकवले आणि त्यांचे विचार पुढे नेणार्‍या सर्व संतांना अभिवादन केले.

काशीचा कायापालट करण्यात सरकार, समाज आणि संत समाज यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. पंतप्रधानांनी स्वर्वेद महामंदिर हे या सामूहिक भावनेचे प्रतीक असल्याचे नमूद केले. हे मंदिर दिव्यतेचे तसेच भव्यतेचे मनमोहक उदाहरण आहे असे पंतप्रधान म्हणाले. “स्वर्वेद महामंदिर हे भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक सामर्थ्याचे आधुनिक प्रतीक आहे” असे ते म्हणाले. मंदिराच्या सौंदर्याचे आणि आध्यात्मिक वैभवाचे वर्णन करताना पंतप्रधानांनी हे ‘योग आणि ज्ञान तीर्थ’ असल्याचे सांगितले.

भारताच्या आर्थिक समृद्धी आणि भौतिक विकासाचे स्मरण करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने कधीही भौतिक प्रगतीला भौगोलिक विस्तार किंवा शोषणाचे माध्यम बनू दिले नाही. “आम्ही आध्यात्मिक आणि मानवी प्रतीकांद्वारे भौतिक प्रगतीचा पाठपुरावा केला” असे ते म्हणाले. त्यांनी काशी, कोणार्क मंदिर, सारनाथ, गया स्तूप आणि नालंदा आणि तक्षशिलासारख्या विद्यापीठांची उदाहरणे दिली. “या अध्यात्मिक संरचनांमधूनच भारताची वास्तुकला अकल्पनीय उंचीवर पोहोचली आहे” याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले.

हे भारताच्या विश्वासाचे प्रतीक होते ज्याला परकीय आक्रमणकर्त्यांनी लक्ष्य केले होते हे अधोरेखित करत स्वातंत्र्यानंतर त्यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या गरजेचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. एखाद्या वारशाचा अभिमान न बाळगण्यामागील विचार प्रक्रियेबद्दल दुःख व्यक्त करत, स्वातंत्र्यानंतर अनेक दशके दुर्लक्षित राहिलेल्या सोमनाथ मंदिराचे उदाहरण देताना अशा प्रतीकांचे पुनरुज्जीवन केल्याने देशाची एकात्मता अधिक दृढ  झाली असती, असे पंतप्रधान म्हणाले. याने देशाला न्यूनगंडाच्या भावनेत नेले, असे मोदी म्हणाले. “आता कालचक्र पुन्हा फिरली आहेत आणि भारत आपल्या वारशाचा अभिमान बाळगत आहे आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतून स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा करत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. सोमनाथमध्ये सुरू झालेल्या कामाचे आता संपूर्ण मोहिमेत रूपांतर झाल्याचे सांगून त्यांनी काशी विश्वनाथ मंदिर, महाकाल महालोक, केदारनाथ धाम आणि बुद्ध सर्किटचे उदाहरण दिले. पंतप्रधान मोदी यांनी राम सर्किटवर सुरू असलेल्या कामाचा आणि लवकरच अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाचाही उल्लेख केला.

जेव्हा एखादं राष्ट्र सामाजिक वास्तव आणि सांस्कृतिक ओळख समाविष्ट करते तेव्हाच सर्वांगीण विकास शक्य होतो यावर पंतप्रधानांनी भर दिला. “म्हणूनच, आज आपल्या ‘तीर्थां’ ना नवसंजीवनी मिळत आहे आणि भारत आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीचे नवे विक्रम रचत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. काशीचे उदाहरण देत त्यांनी हा मुद्दा स्पष्ट केला. गेल्या आठवड्यात दोन वर्षे पूर्ण झालेल्या नवीन काशी विश्वनाथ धाम परिसराने शहरातील अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराला नवी गती दिली आहे.”, असे त्यांनी सांगितले. “आता बनारसचा अर्थ आहे – विकास, आधुनिक सुविधांसह विश्वास आणि स्वच्छता आणि परिवर्तन”, असे पंतप्रधानांनी सुधारित संपर्क सुविधांची माहिती देताना सांगितले. रस्त्यांचे चौपदरीकरण – सहापदरीकरण, रिंग रोड, रेल्वे स्थानकाचे अपग्रेडेशन, नवीन गाड्या, समर्पित मालवाहतूक मार्गिका, गंगा घाटांचे नूतनीकरण, गंगा क्रूझ, आधुनिक रुग्णालये, नवीन आणि आधुनिक दुग्धव्यवसाय, गंगा नदीकाठी नैसर्गिक शेती, तरुणांसाठी प्रशिक्षण संस्था आणि सांसद रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार या गोष्टी त्यांनी नमूद केल्या.

अध्यात्मिक प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी आधुनिक विकासाची भूमिका अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी वाराणसी शहराबाहेर असलेल्या स्वर्वेद मंदिराशी असलेल्या उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीचा उल्लेख केला. बनारसला येणाऱ्या भाविकांसाठी ते एक प्रमुख केंद्र म्हणून उदयाला येईल, ज्यामुळे आसपासच्या गावांमध्ये व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.

“विहंगम योग संस्थान समाजाच्या सेवेइतकेच आध्यात्मिक कल्याणासाठीही समर्पित आहे”, महर्षी सदाफल देवजी हे योगनिष्ठ संत तसेच स्वातंत्र्यासाठी लढलेले स्वातंत्र्य सैनिक होते, असे पंतप्रधान म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृतकाळामध्ये त्यांचे संकल्प पुढे नेण्याच्या गरजेवर भर देत पंतप्रधानांनी 9 संकल्प मांडले आणि त्यांची पूर्तता करण्याचे आवाहन केले. प्रथम, पंतप्रधानांनी पाण्याची बचत आणि जलसंधारणाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या संकल्पाचा उल्लेख केला, दुसरा संकल्प  – डिजिटल व्यवहारांबद्दल जागरूकता निर्माण करणे, तिसरा संकल्प – गावे, परिसर आणि शहरांमध्ये स्वच्छतेचे प्रयत्न वाढवणे, चौथा संकल्प – स्वदेशी बनावटीच्या उत्पादनांचा प्रचार करणे आणि वापर करणे, पाचवा – भारतातील प्रवास आणि शोध, सहावा- शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक शेतीबद्दल जागरुकता वाढवणे,  सातवा संकल्प – तुमच्या दैनंदिन जीवनात भरडधान्य किंवा श्रीअन्न  यांचा समावेश, आठवा – खेळ, तंदुरुस्ती किंवा योग हा जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे आणि शेवचा संकल्प – भारतातील गरिबी हटवण्यासाठी किमान एका गरीब कुटुंबाला आधार देणे. हे संकल्प पंतप्रधानांनी यावेळी मांडले.

विकसित भारत संकल्प यात्रेवर प्रकाश टाकताना, काल संध्याकाळी आणि आजही पंतप्रधानांचा सहभाग असलेल्या या यात्रेविषयी प्रत्येक धर्मगुरूंनी जनजागृती करावी असे आवाहन त्यांनी  केले. “हा आपला वैयक्तिक संकल्प झाला पाहिजे”, असे पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप करताना सांगितले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नरेंद्रनाथ पांडे, सद्गुरु आचार्य श्री स्वतंत्रदेव जी महाराज आणि संत प्रवर श्री विज्ञानदेव जी महाराज उपस्थित होते.

एमआयटी एडीटी- ओकायामा प्रेफेक्चर यांच्यात सामंजस्य करार

पुणे: एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ पुणे व जपानमधील ओकायामा प्रीफेक्चरमधील स्पेशलाइज्ड कॉलेजेसचे असोसिएशन यांच्यात सामंजस्य करार (एमओयू) झाला आहे. भारत आणि जपान या दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.  एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश टी. कराड, प्र-कुलगुरू प्रा.डॉ. अनंत चक्रदेव आणि ओकायामा स्पेशलाइज्ड कॉलेजेसच्या असोसिएशनचे समन्वयक तनाका जुनिची यांनी करारावर स्वाक्षरी केली.

ही भागीदारी ओकायामा प्रीफेक्चर आणि एमआयटी एडीटीयु च्या संबंधित महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या देवाण घेवाणीला प्रोत्साहन देण्यासाठी, परदेशातील प्रशिक्षण आणि शैक्षणिक कार्यक्रमांच्या विकासास सुलभ करण्यासाठी, दोन क्षेत्रांमधील कौशल्य-आधारित कार्यक्रमांमध्ये सहयोगी उपक्रमांसाठी उपयोगी ठरणार आहे.

यावेळी आलेल्या या जपानी पाहुण्यांचे स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. अतुल पाटील, कुलगुरूंचे सल्लागार शिवशरण माळी यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. या कराराविषयी बोलताना प्रा. डॉ. चक्रदेव म्हणाले, हा करार एक महत्त्वाचे पाऊल आहे. ज्यामुळे, जागतिकीकरण, शिक्षण आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. तर, आम्ही आमच्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी या भागीदारीतील संभाव्यतेबद्दल उत्साहित आहोत, असा आशावाद तानाका जुनिची यांनी व्यक्त केला.

जुनिची यांच्यासह तेत्सुओ ताडोकोरो, इनू शिनिची, मितानिहारा त्सुनेयोशी, शिहो मियाजिमा, नबिन सुबेदी, प्रा.पल्लवी डांगे, डॉ. नंदकुमार शिंदे, डॉ. अशोक घुगे, प्रा. वृषाली गोडबोले, प्रा. सुषमा पवार या सर्वांनी कराराच्या अटींची अंमलबजावणी करण्याची वचनबद्धता दर्शवून या कार्यक्रमाला हजेरी लावली. डॉ. पाटील यांनी सर्वांचे आभार मानून हा करार योग्य रीतीने राबवला जाईल असे आश्वासन कार्यक्रमाची सांगता करताना केले.

एकाच दिवसात 78 खासदार निलंबित:लोकसभेच्या 33, राज्यसभेच्या 45 सदस्यांवर कारवाई

0

नवी दिल्ली-संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (18 डिसेंबर) 11 वा दिवस आहे. लोकसभेत सलग चौथ्या दिवशी सुरक्षेच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला. सभापती ओम बिर्ला यांनी गोंधळ घालणाऱ्या 33 खासदारांना निलंबित केले. यामध्ये नेते अधीर रंजन चौधरी, काँग्रेसचे 11 खासदार, तृणमूल काँग्रेसचे 9, द्रमुकचे 9 आणि इतर पक्षांच्या 4 खासदारांचा समावेश आहे.

यानंतर राज्यसभेतही गदारोळ झाला. त्यामुळे सभापती जगदीप धनखर यांनी 45 विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी (22 डिसेंबरपर्यंत) निलंबित केले.

यापूर्वी 14 डिसेंबर रोजी लोकसभेतून 13 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. यामध्ये काँग्रेसचे 9, माकपचे 2, द्रमुक आणि सीपीआयच्या प्रत्येकी एक खासदारांचा समावेश होता. आत्तापर्यंत एकूण 46 लोकसभा खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनाही 14 डिसेंबर रोजी निलंबित करण्यात आले होते.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज कामकाज सुरू होताच सभागृहात 15 मिनिटांचे भाषण केले. या घटनेवरून राजकारण होणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. गोंधळ वाढल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. नंतर ते दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले. खासदारांच्या निलंबनानंतर सभागृह उद्यापर्यंत (मंगळवार) तहकूब करण्यात आले.

खरगे म्हणाले – मोदी सरकार संसदेवर हल्ला करत आहे

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी खासदारांचे निलंबन लोकशाहीवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले- आधी घुसखोरांनी संसदेवर हल्ला केला. आता मोदी सरकार संसद आणि लोकशाहीवर हल्ला करत आहे. निरंकुश मोदी सरकारमध्ये 47 खासदारांचे निलंबन करून लोकशाही मानके कचऱ्याच्या डब्यात फेकली जात आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी या विषयावर दोन्ही सभागृहात निवेदन द्यावे आणि त्यावर चर्चा व्हावी, अशी आमची मागणी आहे.

राज्यसभेचे कामकाज साडेचार वाजेपर्यंत तहकूब

लोकसभेचे कामकाज 12 वाजता सुरू झाले. राजेंद्र अग्रवाल हे प्रमुख होते. दरम्यान, दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संप्रेषण विधेयक 2023 सादर केले. यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी पुन्हा घोषणाबाजी आणि फलक फडकावले. अग्रवाल यांनी विरोधी खासदारांना बसण्यास सांगितले. गोंधळ वाढल्याने सभागृहाचे कामकाज साडेचार वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

त्याचवेळी लोकसभेत घुसखोरीच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ झाला. सर्वप्रथम सभागृहाचे कामकाज सकाळी 11.30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. यानंतर कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी करत गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली.

.N.D.I.A आघाडीच्या वतीने खरगे यांचे पत्र

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, असे म्हटले आहे. असे करणे संसदीय परंपरेचे उल्लंघन आहे. डेरेकसह 14 खासदार (13 लोकसभा आणि एक राज्यसभा) यांना 14 डिसेंबर रोजी संपूर्ण अधिवेशनातून निलंबित करण्यात आले.

घोषणाबाजी आणि फलक सभागृहात आणणे योग्य नाही – सभापती

संसदेच्या सुरक्षेबाबत उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याचे सभापती ओम बिर्ला यांनी सांगितले. याप्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या तेव्हा माजी वक्त्यांच्या माध्यमातूनच तपासाची प्रक्रिया सुरू होती. या घटनेबाबत राजकारण होत आहे हे दुर्दैवी आहे. लोकशाही व्यवस्थेतच सभागृहात चर्चा व्हायला हवी.

सभागृहात घोषणाबाजी करणे, फलक आणणे, निषेधार्थ वेलमध्ये येणे, आसंदीजवळ येणे योग्य नाही. देशातील जनतेलाही हे वर्तन आवडत नाही. लोकसभेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचा सुरक्षेतील त्रुटींशी संबंध नाही.

शेवटच्या कामकाजात (15 डिसेंबर) संसदेत सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. विरोधकांना या मुद्द्यावर गृहमंत्र्यांचे उत्तर हवे आहे. काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर चर्चेपासून पळ काढल्याचा आरोप केला आहे.

त्याच वेळी, रविवारी 17 डिसेंबर रोजी प्रकाशित झालेल्या एका मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी संसदेतील घुसखोरी चिंताजनक असल्याचे वर्णन केले होते. या मुद्द्यावर वाद नाही तर चौकशी झाली पाहिजे, असे मोदी म्हणाले होते. याबाबत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर माहिती दिली पंतप्रधान मोदी या वादापासून दूर पळत आहेत. घुसखोरांना संसदेत घुसण्यास मदत करणारे म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत राहतील.

निलंबित खासदारांनी निदर्शने केली

गुरुवारी 14 डिसेंबर रोजी संसदेच्या सुरक्षेबाबत दिवसभर गदारोळ झाला. लोकसभा आणि राज्यसभेतील 14 विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले. काँग्रेसचे 9, सीपीआय (एम) 2, डीएमके आणि सीपीआयचे प्रत्येकी एक असे एकूण 13 लोकसभा खासदार होते. टीएमसीचे राज्यसभेतील खासदार डेरेक ओब्रायन यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले. या निलंबित खासदारांनी 15 डिसेंबर रोजी सभागृहाबाहेर गांधी पुतळ्यासमोर निदर्शने केली होती. दोन्ही सभागृहात विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचे ते म्हणाले.

विषमुक्त जेवणाच्या ताटाबद्दल जागृत व्हा- बीजमाता राहीबाई पोपेरे

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा : लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा १२६ वा दत्त जयंती सोहळा
पुणे : आजारांपासून लांब राहण्यासाठी रसायनमुक्त  शेतीकडे वळले पाहिजे. रासायनिक खतांमुळे एकदा माती खराब झाली तर कोणताही डॉक्टर ती चांगली करू शकत नाही. आज पैसे देऊन आपण आजार विकत घेतो. विषमुक्त जेवणाचे ताट याबद्दल आपण आज जागृत झालो नाही तर पुढच्या पिढीसाठी काहीही शिल्लक राहणार नाही. आपण बदललो तर निसर्ग देखील बदलेल. त्यामुळे निसर्गाला धरून चालले पाहिजे. निसर्ग हा माझा गुरु आणि तोच माझा तारु आहे,असे मत बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केले. 

बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे १२६ व्या वर्षी दत्त जयंती सोहळ्यांतर्गत लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

पुरस्कार वितरण सोहळ्याला खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार उल्हास पवार, भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे,  कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, उत्सव उप प्रमुख सुनील रुकारी, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे उपस्थित होते.

लोकसभेच्या १६ व्या अध्यक्षा पद्मभूषण सुमित्रा महाजन, पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे आणि पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या व ज्येष्ठ शिक्षिका शुभांगी भालेराव यांना लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. दत्त महाराजांची प्रतिकृती, रुपये २५ हजार रोख, महावस्त्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. याशिवाय प.पू. बाबामहाराज तराणेकर यांचा मानपत्र व आचार्य पगडी देऊन विशेष गौरव करण्यात आला. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी निवड झाल्याबद्दल डॉ.पराग काळकर यांचा देखील सत्कार यावेळी झाला.

राहीबाई पोपेरे म्हणाल्या, पैसा कितीही कमवला तरी तो आपण खाऊ शकत नाही, मातीच आपल्याला अन्न देते.  प्रत्येक गावात बीज बँक झाली पाहिजे. निसर्गाला धरून आपली वाटचाल असली पाहिजे, आपण बदललो तर निसर्ग देखील बदलेल. निसर्ग हा माझा गुरु आणि तोच माझा तारु आहे, असेही त्यांनी सांगितले. 

सुमित्रा महाजन म्हणाल्या,  संस्कार करणे आणि ते जपण्याचे काम माता आणि गृहिणीच करू शकते. याची जागृती करणे आवश्यक आहे. मी काय करू शकते आणि समाजाला काय देऊ शकते याचा विचार करण्याची प्रेरणा आपल्याला आपल्या धर्मात आणि संस्कृतीत मिळते. संत मंडळी आपल्या देशात आहेत त्यांचे विचार आपल्याकडे आहेत तो पर्यंत कोणीही आपले काहीही बिघडवू शकत नाही. दगडुशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट मध्ये अनेक चांगले उपक्रम होतात. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

श्रीनिवास पाटील म्हणाले, पुणे हे शहर समानतेचे, लोकमान्य टिळकांचे, महात्मा फुले, सावित्री बाईंचे आणि जिथे फातिमाबी या फुले वाड्यात शिकवत होत्या यांचे आहे. दगडूशेठ दत्त मंदिराच्या वतीने लोकमाता, बीज माता यांचा सन्मान होत आहे. लक्ष्मी मातेने सरस्वती मातेचा केलेला हा सन्मान आहे.

बाबासाहेब तराणेकर म्हणाले, विज्ञाननिष्ठ असताना अध्यात्माकडे कसे वळलो असे मला विचारले जाते, परंतु माझ्या अनेक थीसिसच्या वेळी मला दोन हजार वर्षांपूर्वीच्या ग्रंथाचा आधार मिळाला. ही आपल्या अध्यात्म आणि संस्कृतीची महानता आहे.  दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टची वाटचाल मागील अनेक वर्षांपासून पाहत आहे. त्यांचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्रिपदी परिवार यापुढेही ट्रस्ट सोबत राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मोरेश्वर घैसास म्हणाले, समाजातील चांगले काम करणाऱ्या व्यक्तींची योग्य निवड करून त्यांचा सन्मान करण्याचे काम ट्रस्ट च्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने ते आपले काम करीत आहेत.

सुनील देवधर म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्यामुळे समाजातील योग्य व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात येत आहेत. यापूर्वी प्रोफाइल, फाईल्स यामुळे पुरस्कारांसाठी पैशांचे व्यवहार व्हायचे. परंतु मोदी सरकार मुळे खरे पद्म मानकरी पुढे आले. १२ जानेवारीला विवेकानंद जयंतीच्या दिवशी राजमाता जिजाऊ यांचा देखील मोठा कार्यक्रम पुण्यात करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. विश्वस्त ॲड शिवराज कदम जहागीरदार यांनी आभार मानले.

 आगामी फायटर हा हृतिक रोशनचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदसोबतचा तिसरा प्रोजेक्ट ठरणार !

 सिद्धार्थ आनंदचा एरियल अॅक्शन ड्रामा फायटर हा 2024 चा सर्वात अपेक्षित चित्रपट ठरणार आहे. सिद्धार्थ आनंद आणि हृतिक रोशन ही डायनॅमिक जोडी तिसऱ्यांदा पुन्हा एकदा या चित्रपटात दिसणार आहे. एक उत्तम दिग्दर्शक-अभिनेता असलेली ही जोडी आता काय नवीन घेऊन येणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे. सिद्धार्थ आनंद आणि हृतिक रोशन ने या आधी अनेक अफलातून प्रोजेक्ट्स केले.

 Bang Bang (2014) आणि वॉर (2019) या दोन ब्लॉकबस्टर नंतर आता फायटर येणार आहे. ही डायनॅमिक जोडी कायम एकत्र काम करून धमाकेदार प्रोजेक्ट करते आणि प्रत्येक वेळी ते एकत्र येतात तेव्हा मोठ्या पडद्यावर जादू निर्माण करतात. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ अभिनीत 2019 मध्ये रिलीज झालेल्या वॉरने बॉक्स ऑफिसवर 475 कोटींहून अधिक कमाई केली तर हृतिक रोशन आणि कतरिना कैफ अभिनीत बँग बँगने 330 कोटींहून अधिक कमाई केली. 

त्यांच्यात काय साम्य आहे ते म्हणजे या दोघांचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले होते. फायटर बद्दल देखील व्यापार विश्लेषक तसेच नेटिझन्स हॅट्रिकची अपेक्षा करत आहेत. सिद्धार्थ आनंदने फायटरमधील त्याच्या पात्रांसाठी बिग बँग प्लॅन केला आहे आणि फायटर 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज होत आहे.

कौशिकी चक्रवर्ती यांच्या स्वरांचे अद्भुत गारूड,पूरिया कल्याणचे सूर ठरले अविस्मरणीय

पुणे, दि. १७ डिसेंबर २०२३ : सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सांगतेची सायंकाळ लोकप्रिय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या अद्भुत स्वराविष्काराने अविस्मरणीय ठरली. ‘सवाई’च्या विस्तीर्ण मंडपात कणभरही जागा राहू नये, अशी रसिकांची विक्रमी गर्दी रविवारी झाली होती. कौशिकी यांनीही आपल्या स्वरांच्या जादूने रसिकांना भारावून टाकले.

सायंकाळी सहाच्या सुमारास कौशिकी यांचे स्वरमंचावर आगमन होताच, रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. त्यांच्या आगमनाने रसिकांमध्ये उसळलेली चैतन्य आणि उत्साहाची लहर अवर्णनीय होती. रसिकांमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांपासून, तरूणाई, प्रौढ आणि बुजुर्गांपर्यंत सर्व प्रकारच्या श्रोत्यांचा समावेश होता.

कौशिकी यांनी समयोचित अशा ‘पूरिया कल्याण ‘ रागात ‘होवन लगी सांज’ हा पारंपरिक ख्याल झुमरा तालात सादर केला. पाठोपाठ तीन तालात ‘सुनलीनो मोरी शाम’ ही द्रुत बंदिश सादर केली.‌तिन्ही सप्तकांत लीलया फिरणारा अतिशय मधुर आवाज, प्रसन्न मुद्रेने स्वतः आनंद घेत केलेले सादरीकरण, साथीदारांना वेळोवेळी दिलेली दाद आणि हे सारे सांभाळून रागभाव आणि बंदिशीमधून व्यक्त होणारा मूड नेमकेपणाने कायम ठेवण्याचे कौशल्य… यामुळे त्यांच्या गायनाने अल्पवयीन रसिकांच्या मनाची पकड घेतली. द्रुत लयीतील गायनात सरगमचे विविध पॅटर्न, वैविध्यपूर्ण लयकारी यामुळे त्यांनी वेगळा आनंद दिला.

आदीदेव महादेव, ही यमन रागातील शिवस्वरूपाचे वर्णन करणारी रचना, पहाडी ठुमरी सादर करताना कौशिकी यांचे भावदर्शन उल्लेखनीय होते. ‘रंगी सारी गुलाबी चुनरिया रे’ या रचनेत कौशिकी यांनी अत्यंत नजाकतदार स्वराकृतींनी मांडणी केली. लगेच अतिशय वेगळ्या भावावस्थेचे वर्णन करणारी ‘हरी ओम् तत्सद्’ ही रचना सादर करून कौशिकी यांनी आपल्या गायनाची सांगता केली.

त्यांना ओजस अढिया (तबला), तन्मय देवचके (हार्मोनियम), उस्ताद मुराद खान (सारंगी) यांनी रंगतीत भर घालणारी साथ केली. अनुजा क्षीरसागर आणि आलापिनी निसळ यांनी तानपुरा साथ केली.

जयप्रकाश नारायण यांच्या विचारांची देशाला गरज: डॉ. कुमार सप्तर्षी

पुणे:लोकनायक जयप्रकाश नारायण पुरस्कार सोहळा २०२३ चे आयोजन गांधी भवन , कोथरूड येथे आयोजित करण्यात आले होते.अभिनेते किरण माने, प्राज इंडस्ट्रीज चे राजेंद्र सखाराम मोरे, दिग्दर्शक सागर वंजारी, लेखक विनायक होगाडे यांना हा पुरस्कार देण्यात आला. पुष्पगुच्छ, शाल, आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांची प्रतिमा असे पुरस्काराचे स्वरूप होते.

भोसले ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे प्रमुख किसन भोसले यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी होते.महाराष्ट्र बिझनेस क्लबचे आदित्य बर्वे यांनी मनोगत व्यक्त केले. बाबा धुमाळ, यांनी पुरस्कारर्थीना शुभेच्छा दािल्या .

प्रदिप (बाबा) धुमाळ, लोकनायक जयप्रकाश नारायण पुरस्कार समिती प्रमुख आयोजक राहुल शेलार, सुनील कदम , धनंजय भावलेकर , संदिप बर्वे , जांबुवंत मनोहर ,सचिन पांडुळे, सौ. दिपाली धुमाळ , संतोष मेढेकर, सतिश शेलार ,अरविंद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद चव्हाण यांनी आभार मानले.

डॉ. सप्तर्षी म्हणाले, लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नावाचा पुरस्कार म्हणजे खूप़ मोठा ठेवा आहे. हे सर्व पुरस्कारार्थी त्याला पात्र आहेत. जयप्रकाश नारायण विवेकशील आणि सद्सद्विवेकबुद्धी जपणारे आणि हळवे होते. जयप्रकाश नारायण, एस. एम. जोशी माझे गुरू होते.

आज देशात हुकुमशाहीचं सावट आहे. आता काही हालचाल केली नाही तर देशाचे काही खरे नाही.पंतप्रधान म्हणून एकही कर्तव्य नीट पार पाडले गेले नाही. अर्थव्यवस्था, एकात्मता, शेजारील राष्ट्रांशी संबंध नीट ठेवले नाही. ही हुकुमशाही घालवली पाहिजे. इंदिरा गांधीच्या काळात जयप्रकाश नारायण यांच्यासारखे सद्सद्व विवेक बुद्धी असणारे नेते होते. आत्ता ते नाहीत. त्यांची उणीव भासते आहे.त्यांचें विचार आताच्या परिस्थितीत दिशा दर्शक असून पुढे नेले पाहिजेत. प्रत्येकाने नैतिकता वापरली पाहिजे. यावेळी कमळाला मतदान करू नका. चुकीचं मतदान केलं तर पुढील पिढीला आपण सजा दिल्यासारखे होईल.

अभिनेते किरण माने यांनी पुरस्काराबद्दल आभार व्यक्त केले. ते म्हणाले, ‘ तुम्हाला अभिमान वाटेल असे काम आम्ही करू. कला आणि सामाजिक जाणीवा एकजीव झालं तर त्यातून कला आधिक प्रभावी होते. कलाकार विद्रोही असला पाहिजे. कलाकाराला समाज भान असणं गरजेचे आहे ‘.

भोसले ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे प्रमुख किसन भोसले, यांनी पुरस्कार समितीचे आणि पुरस्कारार्थांचे अभिनंदन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीट्रॅव्ह एक्सपर्ट डेस्टिनेशन यांनी सहकार्य केले.

बेवड्या, तु तुझी तब्येत सांभाळ!:छगन भुजबळांची मनोज जरांगेंवर जहरी टीका; महाराष्ट्रात दादागिरी चालणार नाही

ओबीसीतून आरक्षणाचा अट्टहास का करता?

भिवंडी-मी छगन भुजबळांचा कार्यक्रम करणार अशी धमकी काय देतो जरांगे. जे-जे ओबीसीविरोधात बोलतात त्यांचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये कार्यक्रम करा, ठिकठिकाणी मोर्चे काढा, कॅंडल मार्च काढा. लढाईसाठी सज्ज व्हा. असे आवाहन छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजबांधवांना केले. भिवंडी येथे आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी जरांगे यांच्यावर जहरी टीका केली.भुजबळ म्हणाले, कुणीतरी जरांगेला जाऊ सांगा की, दादागिरी करणे चूक आहे. जाळपोळ करणं चुकीचं आहे, गुन्हे मागे घ्या, असा दबाव टाकणे चूक आहे. सरकारला इशारा देणे चुकीचे आहे. कुणीतरी याला सांगा की, तुझी तब्येत सांभाळ, बेवड्या पिऊन पिऊन खराब झालेल्या किडण्या आधी सांभाळ, असे म्हणत भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.भुजबळ पुढे म्हणाले की, ‘आधीच माकड त्याच्यात बेवडा प्याला’ असा उल्लेख करत त्यांनी जरांगेंवर पुन्हा निशाणा साधला. माझा कार्यक्रम करणार, 24 तारखेनंतर बघू, अश्या धमक्या चालणार नाही. महाराष्ट्रात अजिबात दादागिरी चालणार नाही.भुजबळ पुढे म्हणाले की, आमची लायकी काढता अन् ओबीसीमधून आरक्षण मागत आहात. एकीकडे बाळासाहेब सराटे न्यायालयात याचिका टाकून आम्हाला ओबीसीतून हाकलून लावत आहे. तर दुसरीकडे दादागिरी करून बळजबरी ओबीसी प्रमाणपत्र दिले जात आहेत. जस्टीस शिंदे समिती एकप्रकारे चुकीचे काम करु लागली आहे. आमची मुलं हुशार आहेत. त्यामुळे त्यांना सगळं मिळत आहे. त्यांच्या कतृत्वाने ते मिळवत आहेत.आज काल काय चाललंय छत्रपती शिवाजी, महाराज की जय म्हणायचे आणि आमच्यावर हल्ले करायचे. छत्रपतींचा इतिहास हा मावळे म्हणून लिहला जातोय मराठा म्हणून केला जात नाही. मावळ्यांमध्ये सर्वच होते. मांग, माळी, महार, न्हावी, कोळी, मुस्लिम या समाजातील अनेक लोकांनी महाराजांना साथ दिली. आमचं म्हणणे एवढंच आहे. सारथीला देता ते आम्हाला द्या, 54 टक्के म्हटले तर साडे सात कोटी लोक हे ओबीसी आहेत. काहीही करायचं आणि काहीही बोलायचं. मराठा समाजाला आरक्षण द्या पण खोटी प्रमाणपत्र घेतली त्यात बाजूला काढून टाका.

पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या उद्दिष्टपूर्तीचे महाराष्ट्र प्रवेशद्वार ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०३० पर्यंत देशाच्या ५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या उद्दिष्टपूर्तीचे लक्ष्य ठेवले आहे. हे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा राहणार असून या आर्थिक सामर्थ्याचे महाराष्ट्र हे प्रवेशद्वार ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

मिहानमधील भारतीय व्यवस्थापन संस्थेतर्फे झिरो माईल संवाद या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते. भारताचे ५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे उद्दिष्ट हा विषय केंद्रस्थानी ठेवून विविध चर्चासत्र, व्याख्यानाचे आयोजन दोन दिवसात करण्यात आले. या संवाद कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री बोलत होते.

नागपूरच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी, संचालक भिमराया मैत्री, बिझनेस टुडे टीव्हीचे व्यवस्थापकीय संपादक सिद्धार्थ झराबी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, व्यवस्थापन संस्थेचे विद्यार्थी- विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेविषयी उपमुख्यमंत्री म्हणाले की, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा सुमारे १५ टक्के आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई असून हे शहर देशाची आर्थिक, मनोरंजन आणि व्यावसायिक राजधानी आहे. देशाच्या एकूण निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 25 टक्क्यांपर्यंत आहे. 29 टक्क्यांपर्यंत एफडीआयची गुंतवणूक राज्यात आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 57 टक्के लोकसंख्या ही 27 वर्षाआतील आहे. देशातील सर्वाधिक विद्यापीठे राज्यात आहेत. सर्वाधिक विजेची निर्मिती आणि वापर हा आपल्या राज्यात होतो. देशाच्या एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राची ही बलस्थाने लक्षात घेता देशाच्या 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या स्वप्नपूर्तीमध्ये महाराष्ट्राचा मोलाचा वाटा राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

कुठल्याही देशाच्या विकासामध्ये तंत्रज्ञानाचा वाटा महत्वपूर्ण असतो. अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणामध्ये तंत्रज्ञानाचा वाटा मोलाचा असणार आहे. पारदर्शकता आणि गतिमानता  तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येण्यास मदत होत असून अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण ठरेल, असे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे स्वप्न साकार करण्यात असमतोलता हे एक मोठे आव्हान आहे. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी सात जिल्ह्यांचे योगदान जीडीपीमध्ये 55 टक्के असून उर्वरित 80 टक्के जिल्ह्याचे योगदान हे 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या जिल्ह्याच्या विकासाकडे नियोजनबद्ध लक्ष दिल्यास निश्चितच आर्थिक विकास साधून अर्थव्यवस्थेला गती मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

नागपूरच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेचे कॅम्पस पुणे येथे सुरू करण्याचे संस्थेचे नियोजन असल्यास निश्चितपणे शासनातर्फे सहकार्य करण्यात येईल, असे यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आयआयएमच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी आणि संचालक भिमराया मैत्री यांनी झिरो माईल संवाद कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका तसेच आपले विचार व्यक्त केले.

०००