Home Blog Page 1300

अकस्मात मयत साडेतीन वर्षानंतर खून झाल्याचे निष्पन्न होताच १५ दिवसात खुन्याला अटक

पुणे : पर्वती टेकडीवर पाण्याच्या टाकीजवळ मृतावस्थेत एका अनोळखी 30 ते 35 वर्षीय महिलेचा मृतदेह (Dead Body) आढळून आला होता. महिलेची ओळख पटली नाही, ना तिच्या मृत्यूचे कारण पोलिसांनासमजले होते. अखेर या खुनाचे रहस्य उलगडण्यात पर्वती पोलिसांना यश आले असून खून करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार 17 ऑगस्ट 2020 रोजी उघडकीस आला होता.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक १७/०८/२०२० रोजी निखील माने वय १९ वर्षे रा. जनता वसाहत गल्ली नंबर ८८ पर्वती, पुणे यांनी समक्ष पोलीस ठाण्यात येवून कळविले की, पर्वती टेकडीच्या वरील बाजूस जंगलामध्ये पडक्या पाण्याच्या टाकीजवळ तळजाई टेकडीकडे जाणा-या रस्त्याच्या खालच्या बाजूस एका महिलेचे प्रेत पडलेले दिसत आहे. ते प्रेत कुजलेले असून त्या ठिकाणी भयंकर दुर्गंधी येत आहे. खबर मिळताच त्याठिकाणी तात्कालीन पोलीस पथक रवाना झाले. नमूद ठिकाणी अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या एका महिलेचा कुजलेला मृतदेह मिळून आला. पोलीसांनी तात्काळ दखल घेवून अकस्मात मयत दाखल करून तपास सुरु केला. प्रेताचे पोस्टमार्टम केल्यावर मृत महिलेचा मृत्यू चेह-यावर व छातीवर गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले होते.
मृत महिला वर्णन एक अनोळखी महिला वय अंदाजे ३० ते ३५ अंगावर काळया रंगाचा ब्लाउज व नारंगी रंगाचा परकर हातात काचेच्या बांगड्या व पायाच्या बोटांमध्ये जोडव्या तसेच डाव्या हातावर सुरेखा असे मराठीत गोंदलेले.
याबाबत तात्कालीन पोलीसांनी अकस्मात मयत दाखल करुन तपास सुरु ठेवला होता. परंतू नमूद महिलेची ओळख त्यांना पटू शकली नाही. दिनांक ०७/१२/२०२३ रोजी याबाबत पर्वती पोलीस ठाण्यात रितसर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याचा तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. पायगुडे हे करीत होते. त्यानंतर वपोनि पायगुडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदशानाखाली पर्वती पोलीसांची चार पथके तयार करुन संपूर्ण महाराष्ट्रातील मिसिंग महिलांचे रेकॉर्ड अत्यंत बारकाईने तसेच प्रत्यक्ष जावून शहर तसेच ग्रामीण हद्दीतील पोलीस स्टेशन्स येथे तपासले असता या वर्णनाची महिला हि दिनांक १२/०८/२०२० रोजी घरातून निघून गेली व परत आली नाही म्हणून रोहन संतोष चव्हाण यांनी राजगड पोलीस ठाणे अंकित खेड-शिवापूर
पोलीस आऊटपोस्ट येथे मिसींग तक्रार दाखल केल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलीस निरीक्षक खोमणे व तपास पथकातील अंमलदार यांनी त्यानंतर रात्रंदिवस पाठपुरावा करुन रोहन चव्हाण यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व बातमीदारांच्या सहाय्याने कोणत्याही प्रकारचा तांत्रिक पुरावा उपलब्ध नसताना पारंपारिक पध्दतीने तपास करुन एका संशयीत इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अत्यंत हुशारीने चौकशी करता त्याने त्याचे नाव सागर दादाहरी साठे वय २६ वर्षे रा. सुतारदरा, कोथरूड, पुणे मुळ रा. पाटील इस्टेट, गल्ली नंबर ०५, शिवाजीनगर, पुणे असे असल्याचे सांगून त्याने त्याच्या ओळखीची महिला नामे
सुरेखा संतोष चव्हाण वय ३६ वर्षे रा. वेताळनगर, शिवापूरवाडा ता. हवेली. जि. पुणे हिचा तत्कालीन वादातून व पैशासाठी खून
केल्याचे कबूल केल्याने पर्वती पोलीस स्टेशन गु.र. नं ३६८/२०२३ भादंवि कलम ३०२ मध्ये अटक करण्यात आली आहे.
नमूद गुन्हयात सर्वप्रथम तिची ओळख पटणे हे महत्वाचे होते तसेच मयत महिला तसेच आरोपी यांचेबाबत काहीएक माहिती उपलब्ध नसताना पारंपारिक पध्दतीने पोलीस तपास करुन दोनच दिवसात पर्वती पोलीस ठाण्याच्या पथकाने वरील गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वपोनि पायगुडे हे करीत आहेत.
सदरची कामगीरी ही अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ ३, श्री सुहेल शर्मा, मा. सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड विभाग श्री. आप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व.पो.नि जयराम पायगुडे, पो. नि. (गुन्हे) विजय खोमणे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलीस अंमलदार राजू जाधव, कुंदन शिंदे, नवनाथ भोसले, प्रशांत शिंदे, दयानंद तेलंगे, अंनिस तांबोळी, अमित सुर्वे, सद्याम शेख, ज्ञानेश्वर शिंदे, सुर्या जाधव यांनी
केलेली आहे.

कुस्तीपटू बजरंग पुनियाने पद्मश्री परत केला:पंतप्रधानांच्या घराबाहेर फुटपाथवर ठेवला पुरस्कार; म्हणाला- आता या सन्मानाच्या ओझ्याखाली जगू शकत नाही

0

नवी दिल्ली-कुस्तीपटू बजरंग पुनियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. बजरंग पुनियाने लिहिले की, मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत आहे. हेच माझे पत्र म्हणायचे आहे. हेच माझे स्टेटमेंट आहे. अडीच पानांच्या या पत्रात बजरंग पुनियाने भारतीय कुस्ती महासंघावर (डब्ल्यूएफआय) ब्रिजभूषणच्या निकटवर्तीय संजय सिंह यांच्या विजयाला विरोध केला आहे. बजरंग हा पुरस्कार परत करण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेला होता, पण आत जाण्याची परवानगी न मिळाल्याने त्याने तो पुरस्कार तिथेच फूटपाथवर ठेवला.

स्वत:ला ‘अपमानित पैलवान’ म्हणवून घेणारा बजरंग म्हणाला की, महिला कुस्तीपटूंचा अपमान केल्यानंतर तो सन्माननीय जीवन जगू शकणार नाही, म्हणून तो त्याचा सन्मान परत करत आहे. आता तो या सन्मानाच्या ओझ्याखाली जगू शकत नाही. बजरंग पुनियाला 12 मार्च 2019 रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

महापारेषणचे खराडी उपकेंद्र दुरुस्तीसाठी बंद; मात्र वीजपुरवठ्यावर परिणाम नाही

पुणे, दि२२ डिसेंबर २०२३: महापारेषण कंपनीचे खराडी १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र अत्यावश्यक पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी शनिवारी (दि. २३) सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. मात्र या कालावधीत पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याने नगर रोड परिसरातील वीजपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही. 

महापारेषणच्या खराडी १३२ केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातून महावितरणच्या २२ केव्हीच्या पाच वीजवाहिन्यांद्वारे खुळेवाडी, विमाननगर परिसर, सोपाननगर, कोलते पाटील फेज १ ते ४, येरवडा, शास्त्रीनगर, लक्ष्मीनगर, संजय पार्क, आळंदी रस्ता, संभाजीनगर, न्याती, लोहगाव, वडगाव शिंदे, वडगाव गावठाण, पाटीलमळा, खांदवेनगर, खराडी बायपास, वडगाव शेरी परिसर, धानोरी परिसर, श्री पार्क सोसायटी, श्रीराम सोसायटी, खुळेवाडी गाव, गिगा स्पेस बिल्डिंग आदी परिसराला वीजपुरवठा केला जातो. मात्र महापारेषणच्या उपकेंद्रातील काही यंत्रणेची दुरुस्ती सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अतिशय आवश्यक झाली आहे. त्यामुळे शनिवारी (दि. २३) सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम होणार आहे. या कालावधीत महावितरण व महापारेषणकडून ३४ मेगावॅट विजेचे भारव्यवस्थापन करून पर्यायी स्वरुपात सर्व पाचही वीजवाहिन्यांना वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

महावितरणकडून पर्यायी वीजपुरवठ्यासाठी तांत्रिक नियोजन पूर्ण झाले आहे. मात्र ऐनवेळी पाचपैकी एखाद्या वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्यास पर्यायी सोय उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे संबंधित वाहिनीवरील भागात वीज खंडित होऊ शकते. त्यासंबंधीची माहिती संबंधित वीजग्राहकांना एसएमएसद्वारे ताबडतोब दिली जाणार आहे. या कालावधीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरण व महापारेषणने केले आहे.

महापालिकेचे विकास आराखडे न जुमानता महामेट्रोची मनमानी बांधकामे:आयुक्तांच्या आदेशांना केराची टोपली

पुणे-महापालिकेचे विकास आराखडे न जुमानता महामेट्रोची मनमानी बांधकामे सुरु असून महापालिका आयुक्तांच्या आदेशांना महामेट्रो केराची टोपली दाखवीत असल्याचा आरोप आप ने केला असून हि बाब अत्यंत गंभीर असल्याचे म्हटले आहे आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी असे म्हटले आहे कि,’पुण्यामध्ये महामेट्रो आपलीच मनमानी करत महानगरपालिकेचे विकास आराखडे न जुमानता बांधकाम करत असल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. महा मेट्रो ला बांधकाम थांबवण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. पुन्हा एकदा जनतेच्या पैशाचा चुराडा होणार आहे असा आरोप आप ने केला असून याला महा मेट्रो सोबत मनपा ची दिरंगाई पण कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.
पुण्यामध्ये सर्वात रहदारीच्या पुणे युनिव्हर्सिटी गणेश खिंड रोडवरती शिवाजीनगर सिमला ऑफिस चौकाजवळ महा मेट्रो ने ४५ मीटर रस्ता रुंदीने बाधित जागे मध्ये बांधकाम केले आहे. तसेच शिवाजीनगर चौका कडून जुन्या एसटी स्टँड कडे जाणारा प्रस्तावित तीस मीटर रस्ता रुंदीतही बांधकाम केले असल्याचे आढळून आल्याने बांधकाम विभागाने जुलै मध्येच या बाबत मेट्रो ला कळवले होते. परंतु त्यास केराची टोपली दाखवली गेली.आता महानगरपालिका आयुक्तांनी महामेट्रो ला हे काम तातडीने थांबवण्याचे आदेश दिले आहेत.आम आदमी पार्टीचे सह सचिव शंकर थोरात तब्बल सहा महिने याचा पाठपुरावा करत असून, ही कारवाई तेव्हाच तातडीने झाली असती तर जनतेचे नुकसान झाले नसते. परंतु यामध्ये महानगरपालिकेने दिरंगाई करत आता सहा महिन्यानंतर हे आदेश काढले आहेत.
वाकडेवाडी येथील खडकी च्या दिशेचा डीपी रोडवर मेट्रोने रूळ टाकल्याचे आढळून आले आहे. कृषी महाविद्यालयाचा नतावाडी येथील वाहीवाटीचा रस्त्यावर बांधकाम केल्याने रस्ता बंद झाला आहे. येरवडा येथे मेट्रोचा जिना रस्त्यामध्ये आला होता. अश्या अशा अनेक चुकांमुळे जनतेचा पैसा वाया जात आहे. मेट्रो हे पुणे मनपा बांधकाम विभागाकडून नकशे मंजूर करून घेत नसल्याने या चुका होत आहेत. या मनमानीमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानाला जबाबदार कोण असा सवाल आम आदमी पार्टीचे प्रवक्ता मुकुंद किर्दत यांनी केला आहे.

भारत संकल्प यात्रेमध्ये 1 कोटीहून अधिक आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली

0


नवी दिल्ली 22 डिसेंबर 2023

भारतातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांचे झालेले बळकटीकरण आणि आरोग्य सुविधा क्षेत्राच्या उत्कृष्टतेला चालना यांचे दर्शन घडवणाऱ्या महत्त्वाच्या टप्प्यामध्ये देशाने एक प्रशंसनीय कामगिरी करून दाखवली आहे. विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान 1,02,23,619 आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली आहेत.


सध्या देशभर सुरु असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान 3,462 ग्राम पंचायती आणि शहरी संस्थामध्ये आयोजित 79,487 आरोग्य शिबिरांमध्ये सहभागी झालेल्यांची एकूण संख्या आता 1,31,66,365 पर्यंत पोहोचली आहे.

या आरोग्य शिबिरांमध्ये खालील उपक्रम राबवण्यात येत आहेत:


आयुष्मान भारत – पंतप्रधान जन आरोग्य योजना(एबी-पीएमजेएवाय) : विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्त केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राबवण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या सरकारी कार्यक्रमाअंतर्गत, आयुष्मान अॅपचा वापर करून नागरिकांची आयुष्मान कार्डे तयार करण्यात येत आहेत. तसेच या भौतिक स्वरूपातील कार्डांचे लाभार्थ्यांना प्रत्यक्षात वितरण करण्यात येत आहे. आतापर्यंत 23,83,473 कार्डांचे प्रत्यक्षात वाटप करण्यात आले आहे. काल दिवसभरात या आरोग्य शिबिरांमध्ये एकूण 6,34,168 आयुष्मान कार्डे तयार करण्यात आली.

क्षयरोग (टीबी): या शिबिरांना भेट देणाऱ्यांपैकी कोणाला क्षयरोगाची लागण झाली आहे का हे तपासण्यासाठी, त्यांची लक्षणे, थुंकीची तपासणी तसेच जेथे एनएएटी यंत्रे उपलब्ध आहेत तेथे या यंत्रांच्या सहाय्याने चाचण्या करण्यात येत आहेत. संशयित क्षयरोग रुग्णांना अधिक उच्च स्तरावरील आरोग्य सुविधा केंद्रांकडे वर्ग करण्यात आले आहे. 36 व्या दिवसाच्या अखेरीस, क्षयरोगाची शक्यता तपासण्यासाठी 49,17,356 लोकांची तपासणी करण्यात आली आणि त्यापैकी 3,41,499 लोकांना पुढील उपचारासाठी अधिक उच्च स्तरावरील सुविधा असणाऱ्या सार्वजनिक आरोग्य केंद्रांकडे पाठवण्यात आले.
 
पंतप्रधान क्षयरोगमुक्त भारत अभियाना(पीएमटीबीएमबीए)अंतर्गत, निक्षय मित्रांकडून मदत स्वीकारण्याच्या संदर्भात क्षयरोग झालेल्या रुग्णांकडून संमती घेण्यात येत आहे. आरोग्य शिबिरांमध्ये सहभागी झालेल्यांपैकी ज्यांना निक्षय मित्र म्हणून काम करण्याची इच्छा असेल त्यांची त्याच शिबिरांमध्ये नोंदणी करून घेण्यात येत आहे. आतापर्यंत या शिबिरांमध्ये 1,17,734 रुग्णांनी पीएमटीबीएमबीए अंतर्गत उपचारांसाठी संमती दिली आहे आणि 39,819 हून अधिक नव्या निक्षय मित्रांची नोंदणी करण्यात आली आहे.
 
निक्षय पोषण योजने(एनपीवाय)अंतर्गत, थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून क्षयरोगाच्या रुग्णांना आर्थिक मदत देण्यात येत आहे. यासाठी, मदतीपासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्याचे तपशील संकलित करण्यात येत आहेत आणि त्यांच्या बँक खात्यांना आधार क्रमांकांशी जोडण्यात येत आहे. अशा 30,093 लाभार्थ्यांचे तपशील संकलित करण्यात आले आहेत.


सिकल सेल आजार: आदिवासीबहुल लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये, सिकल सेल आजारासाठीची पॉईंट ऑफ केअर (पीओसी) किंवा विद्राव्यता चाचणी यांच्या माध्यमातून हा आजार होण्याची अधिक शक्यता असणाऱ्या लोकसंख्येमध्ये (40 वर्षांपर्यंत वय असलेले नागरिक) सिकल सेल आजारासाठी (एससीडी) चाचण्या करण्यात येत आहेत. या चाचण्यांतून एससीडी आहे असे निदान झालेल्यांना आजाराच्या व्यवस्थापनासाठी वरच्या पातळीवरील आरोग्य केंद्रांकडे वर्ग करण्यात आले आहे. आतापर्यंत, 5,08,701 हून अधिक व्यक्तींची एससीडीसाठी तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 21,793 जणांना एससीडी आहे असे निदान झाल्याने या लोकांना उच्च स्तरावरील सार्वजनिक आरोग्य सुविधा केंद्रांकडे वर्ग करण्यात आले आहे.  


अ-संसर्गजन्य आजार (एनसीडीज): रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार होऊ शकणाऱ्या (वय वर्षे 30 आणि त्याहून अधिक वय असलेल्या) लोकांची या रोगांच्या शक्यतेसाठी चाचणी करण्यात आली आणि यापैकी एखादा आजार झाला आहे असा संशय असलेल्या रुग्णांना अधिक सुविधा असणाऱ्या आरोग्य केंद्रांकडे पाठवण्यात आले. रक्तदाब आणि मधुमेह या रोगांची शक्यता तपासण्यासाठी सुमारे 10,297,809 लोकांची चाचणी करण्यात आली. यापैकी 4,82,667 हून अधिक व्यक्तींना रक्तदाबाचा आजार असल्याची तसेच 3,45,898 हून अधिक व्यक्तींना मधुमेह असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आणि 7,59,451 व्यक्तींना उच्च स्तरावरील सार्वजनिक आरोग्य सुविधा केंद्रांकडे वर्ग करण्यात आले.

लेक वाचवायची हाक देणारं हे नवं कोर गाणं आलं भेटीला ! पहा ‘Y’ सिनेमा फ़क्त झी टॉकीज वर

‘मुलीच्या जन्माचे स्वागत करा, त्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेऊ नका, त्यांना शिक्षण द्या, सक्षम बनवा’ याची जनजागृती करण्यासाठी देशभर मोहीम राबवली जात आहे. हाच विचार पडद्यावर मांडणाऱ्या ‘वाय’ या सिनेमाने प्रेक्षकांना अंतर्मुख केलं होतं. याच निमित्ताने एक खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात “मुलीला जन्म द्या” हा सुंदर संदेश अगदी प्रभावीपणे देण्यात आला आहे. ‘वाय’ हा सिनेमा स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर बेतला आहे. झी टॉकीज वाहिनीच्या प्रेक्षकांना हा सिनेमा रविवारी २४ डिसेंबरला दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता पाहता येणार आहे. या सिनेमाच्या खास प्रमोशनसाठी हे नवं गाणं तयार करण्यात आलं आहे.

“मुलगी झाली हो” असं सांगताना अनेक पालकांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हे तर दुःख असते. पहिली मुलगी असेल तर दुसऱ्यावेळी छुप्या पद्धतीने गर्भलिंग निदान केलं जातं आणि मुलीचा गर्भ असल्याचं कळलं की गर्भातच तिचा जीव घेतला जातो. जर दुसरी मुलगी जन्माला आली तर तो तान्हा जीव अनाथाश्रमाच्या पायरीशी ठेवला जातो किंवा रेल्वे रुळावर टाकला जातो. समाजात ही मानसिकता इतकी खोलवर रुजली आहे की ‘मुलगी वाचवा’ असा जागरच देशभर करावा लागत आहे .स्त्रीभ्रूण हत्या हा आजच्या काळात गंभीर प्रश्न बनला आहे. अनेक महिला यामध्ये भरडल्या जात आहेत . त्यांचे मानसिक व शारीरिक शोषण होत आहे .काही डॉक्टर गर्भलिंग निदान करून या प्रश्नात अधिकच भर घालत आहेत . याचे सामाजिक फटकेही बसत आहेत .मुलांच्या जन्मदरामागे मुलींचा जन्मदर कमी होत आहे; परिणामी मुलींचे समाजातील प्रमाण घटत चालले आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी तसेच अभिनेता नंदू माधव, संदीप पाठक यांच्या सशक्त अभिनयाने साकारलेल्या ‘वाय’ या सिनेमात स्त्रीभ्रूण हत्या, गर्भलिंग निदान करणारी वैद्यकीय यंत्रणा, वैद्यकीय क्षेत्रातील होणारे आर्थिक गैरव्यवहार आणि सांकेतिक भाषा यावर सणसणीत भाष्य करण्यात आले आहे.

तर हे खास गाणं मुलगी म्हणजे काय असते, हे सांगणारं गाणं आहे. डोळ्यात पाणी आणणारे आणि सध्याच्या परिस्थितीचा आलेख मांडणारे हे गाणे प्रेक्षकांच्या काळजाला नक्कीच भिडेल. “तुझा माझा, माझा तुझा श्वास ग एक .. गोजिरी किती माय साजिरी लेक” असे या गाण्याचे शब्द आहेत. सायली खरे यांच्या संगीतातून आणि आवाजातून हे गाणं साकारले आहे. अतिशय सहज आणि हळवे शब्द ही या गाण्याची खासियत आहे. माणुसकीला हाक देणारं हे खास गाणं आणि “वाय” चित्रपट झी टॉकीजवर बघायला

बेरोजगारीबाबत त्यांचा राग समजून घ्या; त्यांच्यावर अतिरेक्याचा शिक्का मारू नका :हिंदू महासंघाची मागणी

अमोल शिंदे प्रकरणावर हिंदू महासंघाची भूमिका
पुणे  :’ धूर निघणारे फटाके संसदेत फोडणाऱ्या लातूरच्या अमोल शिंदे सारख्या हिंदू  युवकांवर अतिरेकी असल्याचा ठपका ठेवू नका,बेरोजगारीबाबत त्यांचा राग समजून घ्या,या प्रकरणातून धडा घेऊन दहशत वादाची व्याख्याच नव्याने ठरवा’,अशी मागणी आज हिंदू महासंघने पत्रकाद्वारे व्यक्त केली. 

दरम्यान,दवे यांनी  लातूर येथे अमोल शिंदे यांचे बंधु संतोष शिंदे यांची भेट महासंघच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली.संघटनेचे प्रदेश पदाधिकारी मनोज तारे,विवेक परदेशी,सूर्यकांत कुंभार,उमेश कुलकर्णी आणि राहुल आवटी यावेळी उपस्थित होते. हिंदू महासंघ चे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी  या प्रकरणाच्या विविध पैलूंवर मत प्रदर्शित करून सत्ताधारी भाजपवर कडक टीका केली. 
मराठा आरक्षण मिळून देखील भवितव्य घडेल यावर विश्वास नसल्याने,नोकऱ्यांचा बॅकलॉग भरला जात नसल्याने युवक अस्वस्थ आहे,हे या प्रकरणातून दिसून येते.त्यावर कोणताच नेता बोलताना दिसत नाही.त्याचा राग कुठेतरी व्यक्त होणार,तो चुकीच्या पद्धतीनेही व्यक्त होऊ शकतो.हा राग समजून बेरोजगारीवर उपाययोजना केली पाहिजे,असे आनंद दवे यांनी यावेळी सांगितले. 
अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन एक्ट (यु ए पी ए )मध्ये पकडल्यानंतर शिक्षा होण्याचे प्रमाण ३ टक्केही नाही,इतके या कायद्याचे अपयश आहे.तरीही या कायद्याचा वापर सर्रास सुरु आहे. मग,दहशतवादाची व्याख्याच नव्याने करायची गरज निर्माण झाली आहे.सभागृहात बॉम्ब घेऊन जाणारा अतिरेकी असतो की फटाका घेऊन जाणारा अतिरेकी हे ठरवायला हवे,असेही दवे म्हणाले. 
‘आज पर्यंत काँग्रेस सारखे पक्ष हिंदू अतिरेकी हा शब्द प्रयोग वापरत होते.भाजप हा पक्ष या शब्द प्रयोगाला विरोध करीत होता.पण आता सत्ताधारी भाजपच हिंदू युवकांना पकडून अतिरेकी असल्याचा ठपका ठेवत आहे. हिंदूंना अतिरेकी ठरविण्याचे काम होत असून त्यामुळे विरोधकांच्या हातात कोलीत मिळेल’. १३ डिसेंबर २००१ चा लोकसभेवरील हल्ला आणि १३ डिसेंबर २०२३ चे प्रकरण यातील फरक भाजपने स्पष्ट केले पाहिजे. २००१ चा हा हल्लाच होता ,पण आताचे आहे ते केवळ एक प्रकरण आहे. शिवाय भाजपच्या सत्तेच्या काळातच अक्षरधाम,संसद गोळीबार,पुलवामा अशी प्रकरणे घडतात ? असाही प्रश्न यावेळी पत्रकार परिषदेत विचारला. 
‘या प्रकरणातील युवकांनी ज्यांना ज्यांना फोन केले त्या सर्वाना कटातील सहभागी म्हणून आरोपी केले आहे . मग,ज्या सुरक्षा सैनिकांनी आत सोडले,त्यांना का या कटातील आरोपी मानून अटक करीत नाही ?’ असा प्रश्न या पत्रकार परिषदेत विचारण्यात आला.

ओबीसी विद्यार्थींच्या वसतिगृहासाठी भाडे तत्त्वावर इमारतीसाठी इमारत मालकांकडून अर्ज आमंत्रित 

0

मुंबई, दि. २२ : इतर मागासवर्ग  प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये मुलांचे एक व मुलींचे एक शासकीय वसतिगृह सुरु करावयाचे आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या  30 जानेवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये मुंबई उपनगर जिल्ह्यात दोन शासकीय वसतिगृह सुरु करण्यात येणार आहेत. या परिसरातील बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, सिडको तसेच खासगी इमारत मालक, बांधकाम विकासक यांचेकडून इमारत भाडेतत्वावर घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

इतर मागास प्रवर्गातील मुलांकरिता १०० मुलांच्या क्षमतेचे  एक शासकीय वसतिगृह आणि इतर मागास प्रवर्गातील मुलींकरिता १०० मुलींची क्षमता असलेले एक शासकीय वसतिगृह अशा दोन वसतिगृहाकरीता इमारत तपशिल असा आहे. इमारत मुंबई उपनगर परिसरात असणे आवश्यक आहे. किमान क्षेत्रफळ दहा हजार चौ. फुट असावे. या इमारतीमध्ये १० स्वच्छतागृह व १० स्नानगृहाची सुविधा असावी. इमारत अधिकृत असावी व पूर्णत्वाचा दाखला असावा. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठरवून दिलेल्या दरानुसार इमारत मालक देण्यास तयार असलेबाबत संमतीपत्र देणे आवश्यक राहील. प्रत्येक वसतिगृहाकरिता स्वतंत्र दोन इमारती आवश्यक आहेत.

इच्छूक म्हाडा, सिडको, बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच खासगी इमारत मालक, बांधकाम विकासक यांनी नमूद अटी व शर्तीच्या अधिन राहून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, आर सी चेंबुरकर मार्ग, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, चेंबुर (पूर्व), मुंबई ७१, (दूरध्वनी क्रमांक ०२२ २५२२२०२३) या कार्यालयामध्ये लेखी स्वरूपात अर्ज करावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.

प्रत्येक अडचणीचे निवारण गुरूचरित्रात – डॉ. गजानन एकबोटे 

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे श्री गुरू चरित्र ग्रंथ प्रकाशन : लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराचा १२६ वा दत्त जयंती सोहळा

पुणे :  दैनंदिन जीवनात प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणींवर मात करण्याचा प्रय़त्न प्रत्येक व्यक्ती आपल्यापरीने करीत असतो. अशा अनेक अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य तुम्हाल गुरू चरित्रात मिळते. ज्ञान, कर्म आणि भक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या या ग्रंथात प्रत्येक अडचणीचे निवारण आहे, असे मत प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डाॅ. गजानन एकबोटे यांनी व्यक्त केले. 
बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे १२६ व्या वर्षी दत्त जयंती सोहळ्यांतर्गत महिलांसह सर्वांना पद्य स्वरूपात वाचता येईल असा पं. गजानन वासुदेव वाईकर रचित श्री गुरू चरित्र ग्रंथ प्रकाशन समारंभ मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री वासुदेव निवास प्रधान विश्वस्त डॉ. शरद जोशी, पं. गजानन वाईकर, प्रमुख जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रमोद बोंबटकर, गायिका सावनी रविंद्र, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे आदी उपस्थित होते. 
या कार्यक्रमात ख्यातनाम पार्श्वगायिका सावनी रविंद्र यांनी स्वरांकित केलेल्या प.पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज रचित श्री दत्तपदांचा ‘गुरू माझा मोक्षदाता’ या सांगीतिक ध्वनीफितीच प्रकाशन करण्यात आले. यावेळी सावनी रविंद्र यांनी दत्त महाराजांची करुणात्रिपदी गायली.  
शरद जोशी म्हणाले, गुरू चरित्र हा एक राष्ट्रीय ग्रंथ आहे. जात, धर्म, पंथ या पलीकडे जावून या ग्रंथाचे भाषांतर अनेक भाषेत झाले आहे. आज फक्त महाराष्ट्रातच नाही तर विविध प्रांतात याचे पारायण केले जाते. गुरुचरित्र या ग्रंथात एकूण ५२ अध्याय असून त्यात ७४९१ ओव्या आहेत. मंगलाचरण, गुरुभक्ती आणि गुरुप्रसाद हे या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत. कलियुगात संपूर्ण गुरू चरित्राचे पारायण हे अत्यंत कठीण आहे तरी देखील आज ते केले जात आहे. या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्त भक्तांच्या हृदयात आहे, असेही त्यांनी सांगितले. 
अनंत गजानन वाईकर म्हणाले, गुरू चरित्र पारायणा बद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यातील एक म्हणजे स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे की नाही ह्या बाबतीत अनेकांचे मतभेद आहेत. परंतु गुरुचरित्रामध्ये ३१ व्या अध्यायात गृहस्थाश्रमात राहून महिलांनी कसे करावे वर्तन करावे याचा उल्लेख आहे. त्यामुळे महिलांना देखील गुरू चरित्राचे वाचन करता येईल, असेही त्यांनी सांगितले. 

मतदार यादीमधील नाव अद्यावत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

0

मुंबई, दि. २२ :  मतदार यादीत नाव तपासणे आणि नवीन नाव नोंदविणे यासाठी राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींनी लोकांना साक्षर करण्यासाठी निवडणूक अधिकारी यांना सहकार्य करावे  असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी  श्रीकांत देशपांडे यांनी केले.

मंत्रालय येथे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नाव नोंदणी संदर्भात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समवेत झालेल्या बैठकीत अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी  श्रीकांत देशपांडे  बोलत होते.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवीण महाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरीष सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रवींद्र पवार, आम आदमी पार्टीचे धनंजय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) दिनकर तावडे, दीपक पारडीवाला, काँग्रेस पक्षाचे डॉ. गजानन देसाई, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, विशेष संक्षिप्त पुनरिक्षण- २०२४ कार्यक्रमांतर्गत मतदार ओळखपत्रातील त्रृटी दुर करणे,  भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे मतदार यादीत सुधारणा करणे, अस्पष्ट तसेच  अंधुक  छायाचित्र बदलुन त्याऐवजी संबंधित मतदाराकडून  योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करण्याचे काम सुरु आहे. प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यासोबत एक Booth Level Agent (BLA) राजकीय पक्षाने नियुक्त करुन सहकार्य करावे, अशी विनंतीही यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना केली.

मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम-2024 अंतर्गत राज्यामध्ये दि.27 ऑक्टोंबर, 2023 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. यानंतर दि.27 ऑक्टोंबर, 2023 ते 9 डिसेंबर, 2023 या कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जांनुसार दि.21डिसेंबर, 2023 पर्यत मतदार यादीमध्ये 8 लाख 50हजार 816 एवढी निव्वळ नाव नोंदणी झालेली आहे. यामुळे दि. 21 डिसेंबर,2023 रोजी राज्याच्या मतदार यादीतील एकुण मतदारांची संख्या 9 कोटी 16 लाख 83 हजार 79 एवढी झालेली आहे. यामध्ये महिला मतदार ४ कोटी ३९ लाख ३८ हजार ३१६ ,पुरुष मतदार ४ कोटी ७७ लाख ३९ हजार ३८८ इतके असून तृतीय पंथी ५३७५ इतके मतदारांची नोंद झाली आहे. मतदार नोंदणी बाबत राजकीय पक्षांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.मतदार संघ निहाय असलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  यांची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असेही असेही मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी यावेळी सांगितले

पदवीधर विधानपरिषद मतदार नाव नोंदणीमध्ये प्रारुप मतदार यादीमध्ये मुंबईसाठी एकूण 61 हजार 390, कोकणसाठी 85 हजार 667 इतकी नोंदणी झाली आहे. तसेच दि.21 डिसेंबर पर्यत मुंबईसाठी 29 हजार 446 व कोकणसाठी 1 लाख 8हजार 76 एवढे आणखी अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे शिक्षक विधानपरिषद मतदारांच्या नाव नोंदणीमध्ये प्रारुप मतदार यादीमध्ये मुंबईसाठी 11 हजार 155 व नाशिकसाठी 53 हजार 518 एवढी नोंदणी झाली आहे. दि.21 डिसेंबर पर्यत मुंबई साठी 2हजार 820 व नाशिकसाठी 11 हजार 268 एवढे आणखी अर्ज प्राप्त झालेले आहेत. मतदार नोंदणीची प्रक्रिया ही निवडणूकीमध्ये उमेदवाराच्या नामनिर्देशनाच्या दिनांकाच्या 10 दिवस अगोदर पर्यत सुरु असते, अशीही  माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी यावेळी दिली.

‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ च्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी समन्वयाने काम करा – पर्यटन मंत्री गिरीश महाजन

0

मुंबई, दि. २२ : मुंबईत २० ते २८ जानेवारी दरम्यान ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ आयोजित करण्यात आला आहे. हा फेस्टिव्हल यशस्वी करण्यासाठी मुंबई फेस्टिव्हल समितीसह सर्व सहभागी संस्थांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत २० ते २८ जानेवारी दरम्यान आयोजित होणाऱ्या ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ पूर्वतयारीबाबत झालेल्या आढावा बैठकीत पर्यटनमंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी – शर्मा, ड्रीम स्पोर्ट्सचे सिध्देश्वर मिश्रा यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री.महाजन म्हणाले की, देशातील आणि विविध परदेशातील नागरिकांना मुंबईचे आकर्षण आहे. फेस्टिव्हलच्या माध्यमातून महाराष्टाची संस्कृती पर्यटकांना सांगण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या महोत्सवामध्ये व्यावसायिक, भागधारक, शॉपिंग मॉल, कला दालने, सिनेमा गृह, हॉटेल, फूड कोर्ट, साहसी क्रीडा केंद्रे, मनोरंजन केंद्रे, गाईडेड सीटी टूर, सीटी टूर यांचा समावेश असणार आहे. मुंबई फेस्टिवलची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध समाज माध्यमांचा प्रभावी वापर करुन या महोत्सवात लोकांचा सहभाग वाढविण्यात यावा.

मुंबई महोत्सवाच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे. महोत्सवासाठी कमी कालावधी राहिला असल्याने महोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी लागणा-या विविध परवानग्या, महोत्सवाचे नियोजन, वेळापत्रक व कार्यक्रमाची रूपरेषा याबाबतचे सविस्तर सादरीकरण संबंधित संस्थेने तयार करावे. मुंबईचे डबेवाले, मुंबईची सांस्कृतिक कोळी बांधव, मुंबईचे शेअर मार्केट, मुंबईचे हॉलीवुड स्टार, मुंबई चौपाटी या सर्वांना मुंबई फेस्टिवल मध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे. शासनाच्या सर्व यंत्रणा आणि अशासकीय संस्थांनी समन्वयाने काम करावे, असेही आवाहन मंत्री श्री.महाजन यांनी केले.

कलोपासनेतून मिळतो स्वानंद – वैशाली पळसुले

शिक्षण प्रसारक मंडळीच्या निगडी शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात, रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिनदर्शिकेचे प्रकाशन

पुणे (दि.२२ डिसेंबर २०२३) पालकांनी शाळेची निवड करताना जशी चिकित्सा केली जाते त्याचप्रमाणे कला, क्रीडा प्रशिक्षण घेण्यासाठी चांगल्या गुरूची निवड करणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृती हीच खरी संस्कृती आहे. कलोपासनेतून स्वानंद मिळतो, त्यामुळे मनाची एकाग्रता साधता येते. कलाक्षेत्रात विद्यार्थ्यांना भरपूर संधी आहेत. रियाजाने कला समृद्ध होत जाते असे मार्गदर्शन ज्येष्ठ नृत्य कलाकार व मार्गदर्शिका वैशाली पळसुले यांनी केले.
शिक्षण प्रसारक मंडळीच्या यमुनानगर, निगडी शाळेचे स्नेहसंमेलन आणि रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तयार केलेल्या २०२४ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळीचे नियामक मंडळ सदस्य सुधीर काळकर, शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी, मुख्याध्यापिका ज्योती बक्षी, लीना वर्तक, उमा घोळे, रविंद्र मुंगसे, सविता बिराजदार, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
आपला देश प्रगतीपथावर आहे. आर्थिक, विज्ञान तंत्रज्ञान, संस्कृती, परंपरा, सामाजिक विकास यामध्ये प्रगती करत आहे. भारताचा येथून पुढील काळ सुवर्णकाळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण झाली आणि या नवीन वर्षाच्या प्रारंभी अयोध्येत श्रीराम लल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे. हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. युवकांचा देश अशी आपली ओळख निर्माण झाली असून, आजची तरुण पिढी अत्यंत हुशार आहे. वसुधैव कुटुंबकम या आपल्या संस्कृतीतून संपूर्ण विश्वाचे कल्याण होईल. यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आयुष्याचे उद्दीष्ट, कठोर परिश्रम, चिकीत्सक वृत्ती, अभ्यासातील अष्टपैलूत्व, संघटीत शक्ती या पाच गोष्टी लक्षात ठेवाव्यात असे सुधीर काळकर यांनी सांगितले.
चार दिवस चाललेल्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध राज्यातील लोकनृत्ये आणि राष्ट्रभक्ती नृत्य सादर केली. तसेच ऐतिहासिक व्यक्ती, नद्या, ऋतू आणि क्रीडांगणा वरील खेळ सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कलाकार पूजा डोळस, सचिन काळभोर आणि सुवर्णा बाग यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम झाले.
अमृता कर्नेल यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन श्रुती पंडित तसेच विद्यार्थी मानसी गवंडगावे, गायत्री काळे, निहाल सिंग, चिन्मयी अमीन, निशांत सरदेशमुख आणि अनुष्का भोर यांनी केले. दिनदर्शिका प्रकाशन कमिटी मध्ये सुषमा तागरे, वैभवी फडके, हेमा रामराज, उमा कुलकर्णी, स्वाती देशपांडे आणि स्मृती पंडित, मोनिका बोरसे, सोनाली देशमुख, अमृता दरेकर यांनी काम पाहिले.
स्वागत, आभार सुनीता बालसुनी, कविता फापाळे, ज्योती मोरे व पूजा कुलकर्णी यांनी मानले.
शाळा समिती अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी यांच्या संकल्पनेतून तसेच शाळेचे सर्व मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका ज्योती बक्षी, लीना वर्तक, उमा घोळे, रविंद्र मुंगसे, सविता बिराजदार, शिक्षिका श्रुती पंडित, रुचिका भट, सुजाता भोंगे, वैभवी फडके, उमा कुलकर्णी, पूजा कुलकर्णी, ज्योती मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे महापालिकेच्या ९३ बदली शिक्षकांना ३१ डिसेंबर पूर्वीच नियुक्ती पत्र देणार- आयुक्त विक्रम कुमार

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून शिंदेशाही पगडी देऊन आयुक्तांचे विशेष अभिनंदन

पुणे- महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ३१ डिसेंबर पूर्वी सर्व ९३ रजा मुदत शिक्षकांना(बदली तात्पुरते सेवक यांना )कायम सेवेची नियुक्ती पत्र देण्याची ग्वाही दिल्याने या रजा मुदत शिक्षकांचा दिवाळी प्रमाणे ३१ डिसेंबरचा आनंद द्विगुणित होणार आहे. त्याबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही आयुक्त विक्रम कुमार यांचे शिंदेशाही पगडी देऊन अभिनंदन केले. तसेच सर्व ९३ रजा मुदत शिक्षकांचे अभिनंदन करुन, त्यांना शुभेच्छा दिल्या.

पुणे महापालिकेच्या ९३ रजा मुदत शिक्षकांना सेवेत कायम करण्यासाठी मंत्री श्री. पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शिक्षण सेवकांना सेवेत कायम करण्यासाठी शासन आदेश नुकताच जारी झाला. त्याबद्दल शिक्षण सेवकांच्यावतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन घोले रोड येथील क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी आयुक्त विक्रम कुमार डिसेंबर अखेरपर्यंत नियुक्ती पत्र देण्याची ग्वाही दिली.

यावेळी आयुक्त विक्रम कुमार, उपायुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, शिक्षण विभागाचे राजू नंदकर, संतोष वारुळे, चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे यांच्या सह सर्व ९३ रजा मुदत शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, राज्य सरकार हे सर्व सामान्यांप्रती समर्पित सरकार आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात भरीव वाढ करुन १६ हजार करण्याचा निर्णय घेतला. याचा लाभ पुणे महापालिकेच्या सर्व रजा मुदत शिक्षकांनाही मिळाला. त्यांना सेवेत कायम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीही सकारात्मक भूमिका घेऊन निर्णय घेत दिलासा दिला. या सर्वांनाही यापूर्वीच थकबाकी आधीच मिळाली आहे. नियुक्ती पत्र डिसेंबरपूर्वीच मिळणार असल्याने वर्षाखेरचा आनंद देखील द्विगुणित होणार आहे.

शासनाने अतिशय जलदगतीने निर्णय घेऊन आपली भूमिका चोख बजावली आहे. त्यामुळे शिक्षकदेखील आपल्या कर्तव्यात कसूर बाकी न ठेवता, सुशिक्षित आणि सदृढ समाज निर्मितीत आपली मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आयुक्त विक्रम कुमार म्हणाले की, शासनाने शिक्षकांचा न्याय देण्यासाठी जलदगतीने निर्णय घेतला. पुणे महापालिका देखील ९३ शिक्षकांप्रती अनुकूल असून, सर्वांना डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत नियुक्ती पत्र देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, सर्व शिक्षकांनी कायम झाल्यानंतर उत्तम समाजासाठी चांगला व्यक्ती घडविण्यात मोलाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यात येईल- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि.२२: पुणे शहरात विविध ऐतिहासिक वास्तू असून त्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधींच्यामाध्यमातून (सीएसआर) जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, याकरीता समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

नाना वाडा येथील क्रांतीकारक संग्रहालयाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिका सांस्कृतिक कला केंद्राच्या उपायुक्त डॉ. चेतना केरुरे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर, सुनील देवधर, धीरज घाटे, शैलेश टिळक, कुणाल टिळक, अभिनेता क्षितिज दाते आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी ‘सीएसआर बँक’ विकसित करण्यात येणार आहे. स्व. आमदार मुक्ताताई टिळक यांचे अकाली निधनानंतर त्यांच्या संकल्पनेतील पुणे शहर अस्तित्वात आणण्यासाठी आणि त्यांनी सुरू केलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुणे शहराचा सर्वांगिण विकास हीच स्व. मुक्ताताईंना खरी श्रद्धांजली ठरेल,असे श्री. पाटील म्हणाले.

स्व. आमदार मुक्ताताई टिळक यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रुग्णालय येथे कर्करोगांवर उपचार करण्यात आले. या रुग्णालयात सामान्य नागरिकांना कर्करोगांचे मोफत उपचार मिळावेत, याकरीता त्यांच्या नावाने ‘पेटस्कॅन केंद्र’ सुरु करण्यात येणार आहे. रेडिएशन उपचार पद्धतीदेखील उपलब्ध करुन देण्यात येईल, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कर्करोगावरील महागडे उपचार मोफत मिळण्यास मदत होणार आहे.

श्री. ठाकूर म्हणाले, पुणे शहरात विविध क्रांतीकारक होऊन गेलेत. या क्रांतिकारकांची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी संग्रहालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचे बलिदान लक्षात घेता आपल्याला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे. नागरिकांच्या मनात देशप्रेम निर्माण करण्यासाठी अशा वास्तूचे जतन करण्याची गरज आहे, असेही श्री. ठाकूर म्हणाले.

श्री. मोहोळ, श्री. देवधर, श्री. घाटे यांनीही विचार व्यक्त केले.

शैलेश टिळक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. क्रांतीकारकारकाचे संग्रहालय ही मुक्ता टिळक यांची संकल्पना होती; आज त्याचे लोकार्पण होत असल्याचा आनंद होत आहे. पुणे शहरातील वास्तूचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी श्री. पाटील यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेकडून नाना वाडा येथील क्रांतीकारक संग्रहालयाच्या देखभालीबाबत करण्यात आलेल्या करारनाम्याची प्रत श्री. ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

धंगेकरांना बोलू दिले नाही ? नीलम गोऱ्हे म्हणाल्या ,’ हा मूर्खपणाचा प्रश्न..तुम्ही मागे घ्या

पुणे-विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना जेव्हा आज पत्रकार परिषदेत..विधान परिषदेत रवी धंगेकरांना बोलू दिले नाही असा प्रश्न उपस्थित केला गेला तेव्हा नीलमताई म्हणाल्या ,’ या पत्रकार परिषदेची बातमी न्यूयॉर्क टाईम्स ला का आली नाही ? असा प्रश्न करणे जेवढे मूर्खपणाचे ठरेल तेवढाच हा प्रश्न मूर्खपणाचा आहे. मला हा शब्द दुर्दैवाने वापरावा लागतोय तुम्ही हे वाक्यच मागे घ्या.तुम्ही सांगा धंगेकर विधानसभेवर निवडून आलेत कि विधान परिषदेवर ? त्यांनी कुठे बोलायला पाहिजे ? जिथे त्यांनी बोलायला पाहिजे तिथे ते काय बोलले किंवा का नाही बोलले याबाबत माझ्याकडे माहिती नाही.पण विधानसभा आणि विधान परिषद याबाबतचे वृत्तांकन करताना संबधितांनी या दोहोंची व्यवस्थित माहिती ठेवायला हवी.पहा नेमक्या त्या काय म्हणाल्या त्यांच्याच शब्दात.