Home Blog Page 130

पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. १५ – पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळाली असून पुणेकरांनी मेट्रो सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सध्या दररोज सुमारे अडीच लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. भविष्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास २०० किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारण्याचे नियोजन असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वेगाने विकसित होणाऱ्या नागरी विकासाचा विचार करून पुणे मेट्रो आणि नगर विकास विभागाने या संपूर्ण नेटवर्कचे सविस्तर नियोजन तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीदेखील श्री. फडणवीस यांनी दिली.

पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे,सभागृहनेते गणेश बिडकर , स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले , खासदार मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, हेमंत रासने, बापू पठारे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार तसेच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरुवातीला काही अडचणींमुळे उशिरा सुरू झाले असले तरी एकदा गती मिळाल्यानंतर अत्यंत वेगाने हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. देशातील सर्वाधिक गतिमानतेने पूर्ण होणाऱ्या मेट्रो प्रकल्पांमध्ये पुणे मेट्रोचा उल्लेख केला जातो. मेट्रो स्थानकांचे आधुनिक डिझाइन, मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी, प्रवासी सुविधा तसेच अत्याधुनिक तांत्रिक प्रणाली या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे.

सध्या पुणे शहरात सुमारे ३३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग कार्यान्वित झाला आहे. टाटा समूहाच्या सहकार्याने देशातील पहिल्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) असलेल्या २३ किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाचे कामही अंतिम टप्प्यात असून त्यापैकी १२ किलोमीटर मार्गाचे उद्घाटन मे महिन्यात, तर उर्वरित ११ किलोमीटर मार्ग जुलै महिन्यात सुरू करण्याचे नियोजनआहे. या दोन्ही प्रकल्पांसह पुण्यातील मेट्रोचे एकूण जाळे सुमारे ५६ किलोमीटरपर्यंत पोहोचणार आहे. याशिवाय आणखी ५५ किलोमीटरचे काम सुरू असून सुमारे ८० किलोमीटरचा विस्तार प्रस्तावित आहे. भविष्यात पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए क्षेत्राचा समावेश असलेले जवळपास २०० किलोमीटरचे मेट्रो नेटवर्क उभारण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुण्याचा वेगाने होणारा नागरी विकास लक्षात घेता या संपूर्ण २०० किलोमीटर नेटवर्कचे सविस्तर नियोजन तातडीने पूर्ण करावे, सर्व मार्गांचे डीपीआर एकत्रितपणे तयार करावेत तसेच भविष्यातील ग्रोथ सेंटर्स, नवीन विमानतळ, औद्योगिक क्षेत्रे आणि वाढती उपनगरे यांचा विचार करून मेट्रोचे जाळे विकसित करावे, अशा सूचना त्यांनी महामेट्रो प्रशासनाला दिल्या. पुढील काळात जमिनीवर, आकाशात आणि भुयारी मार्गांद्वारे वाहतूक व्यवस्था विकसित करून पुणे शहर वाहतूक कोंडीरहित आणि शाश्वत शहर बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

पुणे मेट्रो भवन अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, पुणे मेट्रो भवन केवळ प्रशासकीय मुख्यालय नसून आधुनिक पुण्याच्या प्रगतीचे प्रतीक आहे. अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि सुयोग्य नियोजनाचा उत्कृष्ट नमुना असलेली ही इमारत पुण्याच्या प्रशासकीय वैभवात महत्त्वाची भर घालणारी ठरेल. पुणे मेट्रोसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या कामाचेही त्यांनी स्मरण केले.

मुळा-मुठा नदीकाठावर उभारलेले हे भवन पर्यावरणाशी सुसंगत अशा पद्धतीने विकसित करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही राज्याच्या विकासाची महत्त्वाची केंद्रे असल्याने येथे वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने रिंग रोड, रुंद रस्ते, सेवा रस्ते, भुयारी मार्ग, पूल तसेच मेट्रोसारखे मोठे प्रकल्प राबवून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली असल्याचेही श्रीमती पवार यांनी नमूद केले.

स्वारगेट–कात्रज, पिंपरी-चिंचवड–भक्तीशक्ती चौक, वनाज–चांदणी चौक, रामवाडी–वाघोली, खडकवासला–खराडी, वारजे–नळस्टॉप तसेच हडपसर–सासवड आणि हडपसर–लोणी काळभोर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गांना गती देण्यात आली आहे. भविष्यात पुणे विमानतळ आणि चाकण एमआयडीसी यांनाही मेट्रोने जोडण्याचा विचार पुढे नेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी प्रास्ताविकात पुणे मेट्रो प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. मेट्रो भवनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध सुविधांची माहितीदेखील त्यांनी दिली. आता पुणे मेट्रोला सुसज्ज असं मेट्रो भवन मिळालं आहे, निश्चितपणे अधिक गतीने आम्ही काम करु.

मेट्रो भवन, पुणे – ठळक वैशिष्ट्ये

▪️एकूण क्षेत्रफळ सुमारे ८,१५० चौ. मीटर.
▪️भव्य स्वागत कक्ष व पुण्याच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारी कला स्थापना.
▪️अनुभव केंद्रात पुणे मेट्रोचे जाळे व प्रकल्पाची मॉडेल्स.
▪️३१२ आसनक्षमतेचे सभागृह व बॅकअप संचालन नियंत्रण केंद्र, सिग्नलिंग व दूरसंचार सुविधा.
▪️काच दर्शनी भागामुळे नैसर्गिक प्रकाश, ऊर्जा कार्यक्षम व पर्यावरणपूरक रचना.

बंगालमध्ये 23 व 29 एप्रिलला मतदान:तामिळनाडूत 23 एप्रिल, आसाम-केरळ-पुद्दुचेरीत 9 एप्रिलला मतदान, सर्वांचे निकाल 4 मे रोजी

नवी दिल्ली-निवडणूक आयोगाने रविवारी आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल. दरम्यान, बंगालमध्ये मतदान दोन टप्प्यांत—२३ एप्रिल आणि २९ एप्रिल रोजी—पार पडेल. केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या तीन राज्यांमध्ये ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येईल. या निवडणुकांचे निकाल ४ मे रोजी जाहीर केले जातील.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, या पाच राज्यांमध्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात मिळून एकूण १७.४ कोटी मतदार आणि ८२४ जागांचा समावेश आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी पुढे नमूद केले की, गेल्या १२ महिन्यांत निवडणूक आयोगाने पारदर्शकता वाढवण्यासाठी अनेक नवीन उपक्रम राबवले आहेत. यातील पहिला उपक्रम ‘SIR’ हा होता; ही एक अशी उपाययोजना आहे जी मतदार यादीमध्ये कोणताही अपात्र व्यक्ती समाविष्ट राहणार नाही, याची खात्री करते. दुसऱ्या उपक्रमांतर्गत, मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल फोन जमा करणे अनिवार्य करण्यात आले आहे; मतदार आपले मतदान पूर्ण केल्यानंतर ते फोन परत घेऊ शकतात.

या घोषणेसह, या पाचही राज्यांमध्ये ‘आचारसंहिता’ (Model Code of Conduct) तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. २०२१ मध्ये, या पाचही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. त्यावेळी, बंगालमधील निवडणुका आठ टप्प्यांत पार पडल्या होत्या, तर आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान झाले होते; तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये मात्र एकाच टप्प्यात मतदान घेण्यात आले होते. या पाचही राज्यांच्या विधानसभांची मुदत मे महिन्यात संपुष्टात येत आहे.

पुण्यात ‘टकटक गँग’, सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांमधून मोबाईल आणि दागिने लांबवणारे उत्तर प्रदेशातील दोन भामटे पकडले

पुणे-शहरातील वाहनचालकांचे लक्ष विचलित करून मोबाईल आणि सोन्याचे दागिने चोरणाऱ्या ‘टकटक गँग’मधील २ भामट्यांना पोलिसांनी पकडले आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे ओमप्रकाश कोहली (वय ३८) आणि अफझल अब्बासी (वय ३८) अशी असून, दोघेही उत्तर प्रदेशातील मेरठ येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक करण्यात यश मिळवले.फरासखाना पोलीस ठाणे आणि विमाननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या टोळीची हालचाल अधिक असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ही टोळी प्रामुख्याने शहरातील गर्दीच्या रस्त्यांवर आणि चौकांमध्ये सक्रिय होती. सिग्नलवर थांबलेल्या वाहनांमध्ये डोकावून पाहत ते वाहनचालकांचा अंदाज घेत असत. त्यानंतर एखाद्या वाहनाने धडक दिल्याचा बनाव करून चालकाला गाडीतून बाहेर काढण्याचा किंवा वाद घालण्याचा प्रयत्न केला जात असे. या गोंधळाचा फायदा घेत दुसरा साथीदार वाहनातील मोबाईल, पर्स किंवा सोन्याचे दागिने चोरी लंपास करायचा. त्यामुळे अनेक वाहनचालकांना आपली मौल्यवान वस्तू कधी चोरीला गेली हेही लक्षात येत नसे.
फरासखाना पोलीस ठाणे आणि विमाननगर पोलीस ठाण्याच्या भागात अशा प्रकारच्या चोरीच्या अनेक घटना घडल्याची नोंद पोलिसांकडे आहे. चौकशीदरम्यान त्यांनी अशाच प्रकारे वाहनचालकांचे लक्ष विचलित करून चोरी केल्याची कबुली दिली. सध्या पोलिसांकडून या दोघांकडून आणखी कोणत्या भागात चोरी करण्यात आली आहे का, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात समोर आलेले सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले असून, त्याआधारे आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. शहरात बाहेरून येणाऱ्या अशा टोळ्या वाहनचालकांना लक्ष्य करत असल्याने पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सिग्नलवर किंवा रस्त्यावर अनोळखी व्यक्तीने धडक दिल्याचा किंवा इतर कारणाने वाद घालण्याचा प्रयत्न केला, तर शांत राहून परिस्थितीची खात्री करून घ्यावी.

सिनेमागृहांमध्ये येणार ‘लाडकी बहीण’

काही चित्रपट घोषणेपासूनच रसिकांच्या मनात कुतूहल जागविण्याचे काम करतात. समाजात घडणाऱ्या घटनांवर वेध घेत, त्यावर भाष्य करणाऱ्या अशाच एका चित्रपटाची सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत सर्वच ठिकाणी जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या बहुचर्चित ‘लाडकी बहिण योजने’चे समाजात विविध प्रकारे पडसाद उमटले. सरकारी योजनेतील ‘लाडकी बहीण’ चहूबाजूला चर्चेचा विषय ठरली. आता हिच ‘लाडकी बहीण’ रुपेरी पडद्यावरही झळकणार आहे. ‘१५०० रुपये हप्ता आमच्या संसारात लाखापेक्षा भारी’ असे म्हणत ‘लाडकी बहीण’ हा आगामी चित्रपट १७ एप्रिल रोजी महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘लाडकी बहीण’ चित्रपटाच्या दिग्दर्शिका शितल शिंदे असून, त्यांनी शनिदेव फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मितीही केली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद गणेश शिंदे यांनी लिहिले आहेत. बाबासाहेब पाटील या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. लेखक प्रताप गंगावणे चित्रपटाचे मार्गदर्शक असून, शेखर मते, पंकज चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, लहू साळुंखे यांचे ‘लाडकी बहीण’ला विशेष सहकार्य लाभले आहे. चित्रपटाचे ‘लाडकी बहीण’ हे शीर्षक खूप विचार करायला लावणारे आहे. या चित्रपटात काय पाहायला मिळणार याचे संकेत पोस्टरवर दिलेल्या टॅगलाईनवरून मिळतात. हा चित्रपट फक्त शासकीय योजनेवर भाष्य करणारा आहे की, यात आणखी काही नाट्यमय घडामोडी दडलेल्या आहेत याबाबतही कुतूहल वाटते. या चित्रपटात स्मिता तांबे मुख्य भूमिकेत झळकणार असून, तिच्या जोडीला सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, उषा नाईंक, गौतमी पाटील, रुक्मिणी सुतार (सरू आजी), सारिका जाधव, पूनम कापसे, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुरेश विशावकर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, गणेश शिंदे, दर्शना जोकरे, मेगा शिंदे आदी कलाकार आहेत. एखाादी सरकारी योजना सर्वसामान्य गृहिणीच्या संसाराला कशा प्रकारे हातभार लावू शकते याचे चित्रण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ…’ या उक्तीचा अवलंब करीत गोरगरीब महिला एकत्र येतात आणि कशा प्रकारे आपला उत्कर्ष साधतात हा एक महत्त्वपूर्ण पैलू ‘लाडकी बहीण’मध्ये आहे. सरकारी कार्यालयांपासून सर्वसामान्यांच्या घरांपर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला एक महत्त्वपूर्ण विषय हसत-खेळत या चित्रपटात मांडण्यात आला आहे. आशयघन गोष्ट, उत्कंठावर्धक घडामोडी, सर्वसामान्यांच्या भावना, सुमधूर गीत-संगीत, बहारदार नृत्य, लक्षवेधी अभिनय आणि एक सशक्त संदेश देत हा चित्रपट संपूर्ण कुटुंबाचे परिपूर्ण मनोरंजन करेल असा ठाम विश्वास दिग्दर्शक शितल शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

सामाजिक विषयावर विनोदी अंगाने भाष्य करताना विषयातील गांभीर्य कायम राखण्याचे काम ‘लाडकी बहीण’ चित्रपटात करण्यात आले आहे. मराठीतील नामवंत कलाकारांचा अभिनय रसिकांना अखेरपर्यत खिळवून ठेवणारा ठरणार असून, लावणी क्वीन गौतमी पाटीलची गवळण रसिकांवर मोहिनी घालणार आहे. चिनू चेतन यांनी या चित्रपटातील गीतांची कोरिओग्राफी केली असून, संगीत विनीत देशपांडे यांनी दिले आहे. बाबा लाड, चैतन्य साळुंखे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, गायक-संगीतकार उमेश गवळी. तसेच आनंद शिंदे व गायत्री शेलार यांच्या आवाजात ‘लाडकी बहीण’मधील गाणी संगीतबद्ध करण्यात आली आहेत.

पुण्यातील गॅस एजन्सी ताब्यात घ्या आणि सरकारच्या वतीने चालवा: आमदार रासनेंची मागणी

कृत्रिम टंचाई तसेच काळाबाजार रोखण्यासाठी उपाय

पुणे : जगभरातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील गॅस एजन्सी ताब्यात घेऊन प्रशासनाच्या मार्फत चालवाव्यात अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली आहे. जिल्हाधिकारी डूडी यांनी यावर तातडीने निर्णय घ्यायला हवा असेही त्यांनी म्हटल आहे .
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रकात रासने यांनी म्हटले आहे कि,’ सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून देशभरात इंधनाच्या संभाव्य टंचाईबाबत नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरामध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या उपलब्धतेबाबत देखील नागरिकांकडून विविध तक्रारी प्राप्त होत आहेत. काही गॅस एजन्सीकडून कृत्रिम टंचाई निर्माण करणे, सिलिंडर वितरणात जाणूनबुजून विलंब करणे, साठेबाजी करणे तसेच घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापरासाठी किंवा जास्त दराने विक्री करून काळाबाजार केल्याच्या बाबी नागरिकांकडून निदर्शनास येत आहेत. अशा प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसून त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
वरील परिस्थिती लक्षात घेता पुणे शहरातील सर्व गॅस एजन्सींची तात्काळ तपासणी करून, त्या तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात घेऊन प्रशासनाच्या निगराणीखाली गॅस वितरण व्यवस्था चालविण्यात यावी, अशी नम्र विनंती आहे. यामुळे गॅस पुरवठा व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येईल व कृत्रिम टंचाई तसेच काळाबाजार रोखण्यास मदत होईल.
तसेच या संपूर्ण प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण राहावे व गॅस सिलिंडरचे साठा, वितरण व दर यावर नियमित देखरेख ठेवता यावी यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती पुणे शहरातील सर्व गॅस एजन्सींवर निरीक्षणासाठी करण्यात यावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा काळाबाजार होऊ नये.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर व योग्य दरात गॅस सिलिंडर उपलब्ध व्हावेत यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने आवश्यक ती उपाययोजना कराव्यात, अशी विनंती.रासने यांनी केली आहे.

लाडक्या बहिणींना सरकार फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाचवेळी देणार; 15 एप्रिलपर्यंत पैसे वर्ग होण्याची शक्यता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी पात्र महिलांचा फेब्रुवारी व मार्च महिन्याचा रखडलेला हप्ता सरकारने एकाचवेळी देण्याचे संकेत दिलेत. त्यानुसार, हा हप्ता पुढील महिन्याच्या 15 तारखेच्या आत मिळण्याची शक्यता आहे. पण याचवेळी ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना या योजनेच्या लाभापासून मुकावे लागण्याचीही शक्यता आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. राज्यातील लक्षावधी महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात या योजनेसाठी भरीव तरतूद केली आहे. तसेच ही योजना आहे तशीच अव्याहत सुरू राहण्याचीही शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या हप्त्याचा लाभ पात्र महिलांच्या खात्यावर लवकरच वर्ग होण्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने नव्या आर्थिक वर्षात फेब्रुवारी व मार्च या 2 महिन्यांचे पैसे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, हे पैसे एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अथवा 15 एप्रिलपूर्वी बँक खात्यांत वर्ग केले जाण्याची शक्यता आहे. महिलांना या योजनेचा शेवटचा हप्ता जानेवारी महिन्यात मिळाला होता. तेव्हापासून लाडक्या बहिणी फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत होत्या. पण महिना संपला तरी त्यांना तो लाभ मिळाला नव्हता. पण आता त्यांना फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे एकाचवेळी मिळणार आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे यावेळी काही महिलांचा या योजनेंतर्गत मिळणारा लाभही बंद होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदतवाढ दिली होती. त्यात अनेक महिलांनी ई-केवायसी केली. पण त्यातही चुका झाल्या. त्यामुळे या महिलांचा लाभ बंद झाला होता. त्यामुळे सरकारने चुका दुरुस्त करण्याची अखेरची संधी दिली आहे. त्यानुसार या महिलांना 31 मार्चपर्यंत आपली ई-केवायसी करावी लागणार आहे. यावेळी चूक होणाऱ्या महिलांचा या योजनेचा लाभ कायमस्वरुपी बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ५०वे हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वी

0

ठाणे ते पुणे अवघ्या दोन तास २५ मिनिटांत जीवनदायी धाव

ग्रीन कॉरिडॉरमध्ये डॉक्टरपोलिस आणि प्रशासनाची उत्कृष्ट कामगिरी

एका दात्याच्या उदात्त निर्णयामुळे गंभीर रुग्णाला मिळाली नव्या आयुष्याची संधी

अवयवदानातून आशेचा किरण; ग्रीन कॉरिडॉरमुळे जीवन वाचवणारे ५०वे प्रत्यारोपण शक्य

पुणे : उत्कृष्ट समन्वयतत्परता आणि मानवतेचा सुंदर संदेश देत डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलपिंपरीपुणे आणि महाराष्ट्र पोलिस विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ठाण्यातील किम्स हॉस्पिटलमधून दात्याचे फुफ्फुस पुण्यातील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ग्रीन कॉरिडॉरद्वारे सुरक्षितपणे आणि वेळेत पोहोचवण्यात आले. एखाद्या रुग्णाला नवजीवन देणाऱ्या या अमूल्य अवयवाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी ही वाहतूक निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आली असून त्यामुळे रुग्णालयातील ५०वे हृदयफुफ्फुस प्रत्यारोपण शक्य झाले आहे.

१२ मार्च रोजी काटेकोर नियोजन आणि अचूक समन्वयातून दात्याच्या फुफ्फुसांची सुरक्षित वाहतूक करण्यात आली. किम्स हॉस्पिटल, ठाणे येथून डॉक्टर आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची टीम सकाळी १०.१५ वाजता निघाली आणि अवघ्या दोन तास २५ मिनिटांत म्हणजेच दुपारी १२.४० वाजता ही फुफ्फुसे डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. वेळेशी सुरू असलेल्या या शर्यतीत मिळालेल्या यशामुळे अत्यंत गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णावर जीव वाचवणारे फुफ्फुस प्रत्यारोपण करणे शक्य झाले असून त्याला नव्या आयुष्याची आशादायी संधी मिळाली आहे.

पिंपरीचिंचवडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप चव्हाणउपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधवठाण्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित कटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण अवयवाच्या जलद वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडॉर यशस्वीपणे तयार करण्यात आला.

ठाणे आणि पिंपरीचिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच पिंपरीचिंचवड पोलिस विभाग यांच्या समन्वयातून हा अवयव नियोजित वेळेत पुण्यात पोहोचवण्यात आला. त्यामुळे अत्यावश्यक प्रत्यारोपण प्रक्रिया पार पडून एका रुग्णाला नवजीवन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

या संपूर्ण मोहिमेत सहभागी पोलिस कर्मचारीवैद्यकीय पथक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट समन्वय आणि तत्परता दाखवत दात्याच्या फुफ्फुसांची सुरक्षित  वेळेत वाहतूक सुनिश्चित केली. डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या समर्पित टीमने ग्रीन कॉरिडॉर आणि अवयव समन्वयाची जबाबदारी सांभाळली. या टीममध्ये डॉआशिष डोळसडॉराहुल केद्रेवाल्मिक (ओटी नर्स)निखिल लाकी (परफ्युजनिस्ट)अरुण

(ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटरआणि विशाल पाटील (तंत्रज्ञ) यांचा समावेश होता. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही जीवन वाचवणारी आणि आशेचा किरण देणारी मोहीम यशस्वी ठरली.

डॉडीवायपाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ)पिंपरीपुणे चे कुलपती डॉपीडीपाटील म्हणाले, अशा जटिल अवयव प्रत्यारोपण आणि प्रगत शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आमचे रुग्णालय आघाडीवर आहेही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहेआमच्या डॉक्टरांच्या उत्कृष्ट टीमने दाखवलेले समर्पण आणि उल्लेखनीय प्रयत्नांबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतोडीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिकाधिक जीव वाचवणाऱ्या प्रक्रिया राबवण्याचा आमचा निर्धार कायम आहे.”

तसेच डॉडीवायपाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ)पिंपरीपुणे चे प्रकुलपती  डॉभाग्यश्री पीपाटील, म्हणाल्या, अवयवदानाबाबत समाजात अधिक जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यातून अनेकांचे जीव वाचू शकतात हा संदेश लोकांपर्यंत पोहोचावाही माझी नेहमीच भूमिका आणि दृष्टी राहिली आहेआमच्या डॉक्टरांच्या टीमने त्यांच्या अथक परिश्रमकठोर मेहनत आणि रुग्णसेवेप्रती असलेल्या निष्ठेमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहेत्यांच्या कार्याचा मला मनापासून अभिमान आहे आणि येत्या काळातही अशाच प्रकारे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची आम्हाला आशा आहे.”

सायबर सुरक्षेबाबत सर्वांनी दक्षता बाळगणे आवश्यक – डॉ. रोहन न्यायाधीश

सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठ  व आयबीएमआर,वाकड  यांच्यावतीने आयोजित सायबर सुरक्षा विषयावरील  कार्यशाळा  संपन्न

पुणे : दिनांक १४ मार्च २०२६ : डिजिटल साधनांचा वापर करताना सायबर सुरक्षेबाबत सर्वांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे,असे मत सायबर तज्ञ् डॉ.रोहन न्यायाधीश यांनी व्यक्त  केले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत  इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स   पुनाजच्या इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेन्ट अँड रिसर्च अर्थात आयबीएमआर यांच्यावतीने  वाकड येथील शैक्षणिक संकुलात आयोजित सायबर सुरक्षा विषयावरील  कार्यशाळेत  ते  बोलत होते.

यावेळी बोलताना  ते  पुढे  म्हणाले  की, समाजमाध्यमांचा  वापर करताना  कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती देऊ नये,तसेच कायम सजग राहून कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असे सांगत मोबाईलचा वापर करताना  गरजेपुरत्या ऍप्सचाच वापर करावा आणि सायबर गुन्हा घडल्यास पोलिसांशी  तात्काळ संपर्क  साधावा असेही न्यायाधीश यांनी सांगितले.

तर यावेळी बोलताना यशस्वी  एज्युकेशन सोसायटीच्या  आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे  यांनीही  त्यांच्या  मनोगतात सांगितले की, देशात सायबर गुन्ह्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत असून लाखो  करोडो रुपयांची फसवणूक झाल्याची  प्रकरणे सामोरे येत आहेत.

तर   पिंपरी चिंचवड सायबर पोलीस विभागातील तपास अधिकाऱ्यांनी  सायबर गुन्हे  नेमके कसे घडतात  याची उदाहरणे  सांगत त्यापासून  बचाव करण्यासाठी कशा प्रकारे  उपाययोजना  करून सावधगिरी  बाळगावी  याबाबत सविस्तर  मार्गदर्शन  केले.

यावेळी डिजिटल टास्क  फोर्सचे सायबर  तज्ञ्  अमित  कांबळे यांनी  एखाद्या क्यू आर कोडद्वारे कशाप्रकारे मोबाईल  हॅक  होतो याचे  प्रात्यक्षिक  दाखवत मार्गदर्शन  केले.

तर यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सचे संचालक  राजेश नागरे यांनी त्यांच्या मनोगतातून सायबर गुन्ह्यांपासून  सावध राहण्यासाठी बँक  खात्याबाबत  कशा प्रकारे सावधगिरी  बाळगावी याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  आयबीएमआरच्या  संचालकांनी  केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरुषी  पाटील  व सानिका  गायकवाड  या विद्यार्थिनींनी  केले.तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. संपदा  गुपचूप  यांनी केले.या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अन्य  विद्यापिठांशी  संलग्न असलेल्या  व्यवस्थापनशास्त्र संस्थांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी  आणि प्राध्यापक वर्ग सहभागी झाले होते.

देशात २० टक्के उद्योग क्षेत्रात महिला-खासदार डॉ.मेधा कुलकर्णी

: गौरी जोशी, डॉ.अमृता चांदोरकर यांना यंदाचे महिला उद्योजिका पुरस्कार प्रदान : याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान तर्फे आयोजन
पुणे : देशाच्या जीडीपीमध्ये घरामध्ये काम करणाऱ्या महिलेचे योगदान आपण मोजत नाही. भारतात उद्योग क्षेत्रात २० टक्के महिला कार्यरत असून जीडीपी च्या १७ टक्के महिलांचे योगदान आहे. महिला अनेक अडचणींचा सामना करून उद्योग क्षेत्रात स्थान निर्माण करतात. त्यामुळे महिलांनी एकमेकींना आधार देऊन पुढे जायला हवे. तसेच स्वतःमधील संवेदनशीलतेला आपली ताकद बनवावी, असे मत खासदार डॉ.मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचा उपक्रम असलेल्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) तर्फे महिला उद्योजिका पुरस्कार २०२६ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सुमंत मुळगावकर सभागृहात आयोजित कार्यक्रमाला संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, दिलीप कुंभोजकर आदी उपस्थित होते.

सोहळ्यांतर्गत स्वयंसिद्धा पुरस्कार जी.आर. इंजिनिअरींगच्या संचालिका गौरी जोशी यांना आणि युवा उद्योजिका पुरस्कार निरामय वेलनेस च्या संचालिका डॉ.अमृता चांदोरकर यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

युवा उपक्रमांतर्गत कै.सौ.सावित्रीबाई नारायण जोशी स्मरणार्थ स्वयंसिद्धा पुरस्कार आणि कै.मनोरमा शामराव कुंभोजकर स्मरणार्थ युवा उद्योजिका पुरस्कार दिला जातो. संस्थेच्या माणिक सुपेकर, प्रतिभा संगमनेरकर, डॉ.स्वाती कुलकर्णी, श्रीकांत जोशी, उपेंद्र केळकर, मंजुषा वैद्य आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

पुरस्काराला उत्तर देताना गौरी जोशी म्हणाल्या, विश्वास, दर्जा आणि मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर आम्ही यशस्वी होत आहोत. राज्याच्या कानाकोपऱ्यात उद्योजकता वाढावी, याकरिता प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अमृता चांदोरकर म्हणाल्या, ‘निरामय’ वेलनेस मध्ये आलेल्यांच्या विचारांवर आम्ही काम करतो. एखाद्या व्याधीतून बरे व्हायचे असेल, तर चांगला विचार करायला हवा. विना औषध, विना स्पर्श उपचार ही संकल्पना घेऊन आम्ही कार्यरत आहोत. ऊर्जेच्या प्राचीन शास्त्रात आमचे काम सुरु असले तरी देखील आधुनिक युगात ते उपयोगी पडत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विश्राम कुलकर्णी म्हणाले, सन १९४० साली संस्थेची स्थापना झाली. संस्थेला आता ८५ वर्षे पूर्ण होत आहेत. संस्थेचे विविध उपक्रम सुरु आहेत. त्यामध्ये विद्यार्थांना खाद्य सबसिडी, वेद विद्या संवर्धन, वधू वर सूचक मंडळ, उद्योजकता विकास असे अनेक उपक्रम संस्था राबवीत आहे.

पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर व्यवसायिक व नोकरदार महिलांसाठी ‘व्यावसायिक कार्यामध्ये शिष्टाचार’ या एका महत्त्वाच्या सत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डॉ. जयश्री फडणवीस मार्गदर्शन केले. युवा उपक्रमाबद्दल श्रीकांत जोशी यांनी माहिती दिली. माणिक सुपेकर यांनी सूत्रसंचालन केले.प्रतिभा संगमनेरकर यांनी आभार मानले.

LPG वाहून नेणाऱ्या 2 भारतीय जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी पार केली: 2-3 दिवसांत भारतात पोहोचणार

जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा म्हणाले , "पर्शियन आखाती प्रदेशातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित आहेत आणि गेल्या २४ तासांत त्यांच्याशी संबंधित कोणत्याही अनुचित घटनेची नोंद झालेली नाही. होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेस असलेल्या पर्शियन आखातात २४ भारतीय ध्वजांकित जहाजे होती. त्यापैकी शिवालिक आणि नंदा देवी ही भारतीय ध्वजांकित जहाजे, दोन्ही एलपीजी वाहक. त्यांनी काल रात्री उशिरा/आज सकाळी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास केला आणि आता भारताकडे वाटचाल करत आहेत. ही जहाजे अंदाजे ९२,७०० मेट्रिक टन #एलपीजी वाहून नेत आहेत; त्यांची आगमनाची बंदरे मुंद्रा आणि कांडला असतील, ज्यांच्या आगमनाची तारीख अनुक्रमे १६ मार्च आणि १७ मार्च अपेक्षित आहे. परिणामी, आता पर्शियन आखातात २२ भारतीय ध्वजांकित जहाजे शिल्लक आहेत, ज्यात एकूण ६११ खलाशी आहेत..."

आज अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा १५ वा दिवस आहे. आखाती देशांमधून एलपीजी वाहून नेणाऱ्या दोन भारतीय जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे ओलांडली आहे. इराणने त्यांना एक दिवस आधी मार्ग दिला होता आणि ते आता भारताच्या पश्चिम किनाऱ्याकडे जात आहेत.जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांच्या मते, भारतीय ध्वजधारी एलपीजी वाहक शिवालिक आणि नंदा देवी यांनी शनिवारी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली. दोन्ही जहाजे एकूण ९२,७०० टन एलपीजी वाहून नेत आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही जहाजे गुजरातमधील मुंद्रा आणि कांडला बंदरांकडे जात आहेत आणि पुढील दोन ते तीन दिवसांत ती भारतात पोहोचण्याची अपेक्षा आहे. मध्य पूर्वेतील युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिम भागात अडकलेल्या २४ जहाजांपैकी ही जहाजे होती.

यापूर्वी, भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी शुक्रवारी सांगितले होते की, इराणने अनेक भारतीय जहाजांना या जलमार्गावरून जाण्याची परवानगी दिली आहे, जरी त्यांनी परवानगी असलेल्या जहाजांची एकूण संख्या जाहीर केली नाही.
इराणने दोन भारतीय गॅस टँकरना होर्मुज स्ट्रेटमधून जाण्याची परवानगी दिली आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सने आपल्या अहवालात हा दावा केला आहे. अहवालात सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, दोन भारतीय एलपीजी टँकर लवकरच होर्मुज स्ट्रेटमार्गे भारताकडे रवाना होतील.

यामुळे देशांतर्गत गॅस पुरवठ्यावर पडणारा दबाव कमी होण्यास मदत मिळण्याची अपेक्षा आहे. अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, कच्च्या तेलाचा एक टँकरही 1 मार्चच्या आसपास होर्मुज स्ट्रेट पार करून आला आहे आणि सौदी अरेबियाचे तेल घेऊन शनिवारपर्यंत भारतात येऊ शकतो.

यापूर्वी गुरुवारी संध्याकाळीच भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहाली यांनी सांगितले होते की, इराण होर्मुज स्ट्रेटमध्ये भारताला सुरक्षित मार्ग देईल. ते म्हणाले- भारत आणि इराण यांच्यात दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण संबंध आणि परस्पर विश्वास आहे.

LPG वाहून नेणाऱ्या 2 भारतीय जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी पार केली:इराणने कालच परवानगी दिली होती, 2-3 दिवसांत भारतात पोहोचणार

आज अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा १५ वा दिवस आहे. आखाती देशांमधून एलपीजी वाहून नेणाऱ्या दोन भारतीय जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे ओलांडली आहे. इराणने त्यांना एक दिवस आधी मार्ग दिला होता आणि ते आता भारताच्या पश्चिम किनाऱ्याकडे जात आहेत.

जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांच्या मते, भारतीय ध्वजधारी एलपीजी वाहक शिवालिक आणि नंदा देवी यांनी शनिवारी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली. दोन्ही जहाजे एकूण ९२,७०० टन एलपीजी वाहून नेत आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही जहाजे गुजरातमधील मुंद्रा आणि कांडला बंदरांकडे जात आहेत आणि पुढील दोन ते तीन दिवसांत ती भारतात पोहोचण्याची अपेक्षा आहे. मध्य पूर्वेतील युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिम भागात अडकलेल्या २४ जहाजांपैकी ही जहाजे होती.

यापूर्वी, भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी शुक्रवारी सांगितले होते की, इराणने अनेक भारतीय जहाजांना या जलमार्गावरून जाण्याची परवानगी दिली आहे, जरी त्यांनी परवानगी असलेल्या जहाजांची एकूण संख्या जाहीर केली नाही.
इराणने दोन भारतीय गॅस टँकरना होर्मुज स्ट्रेटमधून जाण्याची परवानगी दिली आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सने आपल्या अहवालात हा दावा केला आहे. अहवालात सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, दोन भारतीय एलपीजी टँकर लवकरच होर्मुज स्ट्रेटमार्गे भारताकडे रवाना होतील.

यामुळे देशांतर्गत गॅस पुरवठ्यावर पडणारा दबाव कमी होण्यास मदत मिळण्याची अपेक्षा आहे. अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, कच्च्या तेलाचा एक टँकरही 1 मार्चच्या आसपास होर्मुज स्ट्रेट पार करून आला आहे आणि सौदी अरेबियाचे तेल घेऊन शनिवारपर्यंत भारतात येऊ शकतो.

यापूर्वी गुरुवारी संध्याकाळीच भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फतहाली यांनी सांगितले होते की, इराण होर्मुज स्ट्रेटमध्ये भारताला सुरक्षित मार्ग देईल. ते म्हणाले- भारत आणि इराण यांच्यात दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण संबंध आणि परस्पर विश्वास आहे.

 देव आनंद आणि विजय आनंद या दोन दिग्गज बंधू मधील सर्जनशील आणि वैयक्तिक बंध उलगडणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन

हम दोनो: कहानी देव और गोल्डी की

तनुजा चतुर्वेदी लिखित, हम दोनो : कहानी देव और गोल्डी की या पुस्तकाचे आज मुंबईत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभाग संचालनालयाच्या वतीने समारंभपूर्वक प्रकाशन केले गेले. मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या आवारातील, भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्थेच्या संकुलात या पुस्तक प्रकाशनाचा समारंभ आयोजित केला गेला होता. या पुस्तकातून देव आनंद आणि विजय आनंद या भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज बंधूद्वयीमधील कलात्मक भागीदारी आणि त्यांच्या चित्रपटीय वारशाचा गौरव केला आहे. यासोबतच त्यांच्यातील परस्पर सर्जनशील सहकार्य आणि भारतीय चित्रपट उद्योगातील त्यांच्या चिरस्थायी योगदानाची मांडणीही या पुस्तकात  केलेली आहे.


प्रसिद्ध पटकथा लेखक आणि अभिनेते अमोल गुप्ते हे या प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. गोल्डी आनंद यांच्याशी झालेल्या आपल्या पहिल्या भेटीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. आनंद बंधूंनी त्या काळातील चित्रपट क्षेत्रामधील इतर दिग्गज व्यक्तिमत्त्वांसोबत मिळून अजरामर चित्रपटांची निर्मिती केल्याचे अमोल गुप्ते यांनी नमूद केले.
प्रकाशन विभागाचे प्रधान महासंचालक भूपेंद्र कैथोला यांनीही उपस्थितांना संबोधित केले.  या पुस्तकाचे प्रकाशन म्हणजे केंद्र सरकारने देव आनंद आणि विजय आनंद या चित्रपट क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांना अनोखी पद्धतीने वाहिलेली श्रद्धांजली असल्याचे ते म्हणाले. प्रकाशन विभाग भारतीय संस्कृतीवरील महत्त्वाच्या पुस्तकांच्या प्रकाशिन करत आला आहे, आणि चित्रपटसृष्टी हा देशाच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असल्याने विभागाने हे पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.


भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास देवसकर यांनीही उपस्थितांसमोर आपले विचार मांडले एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रातील उदयोन्मुख प्रतिभेसाठी औपचारिक प्रशिक्षणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था अशाच प्रकारचे प्रशिक्षण देत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
लेखिका तनुजा चतुर्वेदी यांनी आपल्या पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त गेले. पुस्तकाच्या औपचारिक प्रकाशनाचा हा क्षण भारावून टाकणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.  आपण नवकेतन प्रॉडक्शनशी जोडलेलो होतो याबद्दल त्यांनी सांगितले. आपल्यावर देव साहेब आणि गोल्डी साहेब यांचा आशीर्वाद असल्याचे आत्ताही जाणवते अशी भावना त्यांनी व्यक्त केली. भारतीय चित्रपटसृष्टीतील या दिग्गज बंधूच्या जोडीसोबतच्या अनेक संस्मरणीय क्षणांना त्यांनी उजाळा दिला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने  भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रकाशन विभागाचे प्रधान महासंचालक यांच्यात सामंजस्य कराराची देवाणघेवाणही झाली. या कराराअंतर्गत, प्रकाशन विभागाच्या वतीने  एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रावरील भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्थेची सर्व पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. ऑरेंज इकोनॉमी अर्थात सर्जनशील क्षेत्रविषयक अर्थव्यवस्थेतील वेगाने उदयाला येत असलेल्या  क्षेत्रांची विश्वासार्ह   माहिती देशभरातील शाळांपर्यंत पोहोचवता यावी हा या सामंजस्य करारामागचा उद्देश आहे.


या कार्यक्रमाला इतर मान्यवरांसह  राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम आणि प्रकाशन विभागाचे मुख्य संपादक कुलश्रेष्ठ कमल हे देखील उपस्थित होते.
हम दोनो : कहानी देव और गोल्डी की
या पुस्तकात लेखिका तनुजा चतुर्वेदी यांनी दुर्मिळ संदर्भ, असंख्य आठवणी आणि ऐतिहासिक तपशिलांचा मांडला असून, त्याद्वारे त्यांनी आयकॉनिक स्टार देव आनंद आणि ख्यातनाम चित्रपटकार विजय आनंद यांचे व्यक्तिमत्त्व आणि सर्जनशील क्षेत्रातील वाटचाल  अत्यंत संवेदनशीलतेने आणि तपशीलवार शब्दबद्ध केली आहे. या जोडीने एक विशिष्ट चित्रपट शैली आणि कथात्मक मांडणीची पद्धत रूढ केल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या सर्जनशील टप्प्याचा मागोवा या पुस्तकातील प्रकरणांमधून घेतला गेला आहे.
हम दोनो : कहानी देव और गोल्डी की हे पुस्तक भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचे एक महत्त्वाचे दस्तऐवजीकरण ठरले आहे. हे पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावे तसेच या पुस्तकातील संशोधनपर आशय – मजकूर व्यापक हिंदी वाचकवर्गासाठी उपलब्ध व्हावा या उद्देशाने, प्रकाशन विभागाने हे पुस्तक हिंदी भाषेत प्रकाशित केले आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासासंबंधीचे हे महत्त्वाचे काम व्यापक प्रमाणात  वाचकवर्गापर्यंत पोहचावे आणि वाचकांना या दोन दिग्गज चित्रपटकारांच्या योगदानाबद्दल अधिक चांगल्या रितीने समजून घेता यावे, या उद्देशाने ही हिंदी आवृत्ती प्रकाशित केली गेली आहे.

वाघोलीत भव्य कष्टकरी शेतकरी महिला परिषद संपन्न

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत विविध मागण्या; शेतकरी महिलांना जमिनीच्या अधिकारासाठी शासन प्रयत्नशील

पुणे.दि.१४: महिला दिनाच्या औचित्याने संतुलन संस्था महाराष्ट्रतर्फे वाघोली येथे २८व्या ‘भव्य कष्टकरी शेतकरी महिला परिषद’चे आयोजन करण्यात आले. या परिषदेला महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

डॉ. गोऱ्हे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, महिलांची सामाजिक सक्षमता पूर्वीपेक्षा वाढली आहे. ‘लाडक्या बहिणी’ योजनेअंतर्गत दिला जाणारा भत्ता महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहे. अनेक महिलांनी या योजनेचा योग्य वापर केल्याची उदाहरणे समोर आली आहेत. अर्थसंकल्पात एकल महिलांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महिलांच्या नावाने घर देण्याचा आणि आदिवासी जमिनीचे पट्टे पती-पत्नी दोघांच्या नावाने करण्याचा मुद्दा विधानभवनात उपस्थित झाला असून, सरकारने याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे. एकटी पत्नी असल्यास तिच्या नावाने जमीन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात आणखी कोणते मुद्दे असावेत, याबाबत महिलांनी आपले मत कळवावे, असे आवाहन त्यांनी केले.

वृद्ध महिलांसाठी पेन्शन, गरिबांसाठी घरे उपलब्ध करणे, वृद्धपकाळीन योजनांचे एकत्रीकरण आदी मुद्द्यांवर शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल तसेच कष्टकरी आणि दगडखाण कामगार महिलांचा दक्षता समितीत समावेश करण्याचा विचार करण्यात येईल. दगडखाण कामगारांच्या कार्यक्रमांसाठी निशुल्क सभागृह उपलब्ध करून देण्यात येईल. बचत गटातील महिलांनी नवीन कर्जाऐवजी बँकेतील ठेवींवर कर्ज घेण्यास प्राधान्य द्यावे आणि व्याजाच्या आमिषाला बळी पडू नये, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. बांधकाम विकास महामंडळाची समिती नसेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी त्यासंदर्भात चर्चा केली जाईल असे त्यांनी नमूद केले.

दगडखाण कामगार विकास परिषद महाराष्ट्र अध्यक्ष ऍड. बी. एम. रेगे यांनी, डॉ. गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनामुळे खाण कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळत असल्याचे सांगितले. त्या कष्टकरी महिलांचा खरा आवाज आहेत, असे त्यांनी नमूद केले.

या परिषदेत शेतकरी महिलांच्या नावे जमिनीवर प्रथम नोंदणी, शाळकरी मुलींसाठी मोफत बस पास व सायकल योजना, वृद्ध महिलांसाठी दरमहा १० हजार रुपये पेन्शन, दगडखाण कामगारांच्या गायरान जमिनीवर घरे, बांधकाम विकास महामंडळात प्रतिनिधित्व आदी मागण्यांसह ठराव जाहीर करण्यात आला. हा ठराव डॉ. गोऱ्हे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

कार्यक्रमात ‘आपला विकास आपल्या हाती’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते झाले.

यावेळी संतुलन संस्थेच्या अध्यक्षा वंदना भुजबळ, परिषद अध्यक्षा ऍड. पल्लवी रेगे, एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष वारे, नगरसेवक रामभाऊ दाभाडे, शैलेंद्र बनसोडे, हेमंत बत्ते, पुणे बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष प्रीती परदेशी, ऍड. अंजली बांदल, रिंकू मोरे, अनिता परदेशी आदी उपस्थित होते.

इंधन दरवाढ आणि टंचाई विरोधात महिला कॉंग्रेसचे आंदोलन

पुणे : घरगुती गॅस सिलेंडर ची दरवाढ रद्द करून, गॅस पुरवठा सुरळीत करा, अशा मागणीसाठी पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने बालगंधर्व चौकात रस्त्यावर चूल पेटवून आज (शनिवारी) संध्याकाळी आंदोलन करण्यात आले.

पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वातीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. चौकात पारंपरिक पद्धतीने शेणाने सारवून शेणाच्या गोवऱ्यांचा ढीग रचून चूल मांडण्यात आली आणि त्यावर महिला कार्यकर्त्यांनी स्वयंपाक केला.

महागाईमुळे गरीब, मध्यमवर्गीय, कष्टकरी महिला वर्ग आधीच पिचला आहे. त्यातच अचानकपणे घरगुती गॅस सिलेंडर चे दर ६० रुपयांनी वाढविण्यात आले. सरकारचा हा निर्णय अनाकलनीय आहे. गॅस सिलेंडर अभावी हॉटेल्स बंद पडत आहेत. घरगुती गॅस सिलेंडर महाग झाला असून तो वेळेवर मिळणेही अवघड झाले आहे. सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे हे घडत आहे., त्याचा आम्ही निषेध करत आहोत, असे स्वातीताई शिंदे यांनी आंदोलकांसमोर बोलताना सांगितले.

गॅस दरवाढीच्या विरोधात महिला कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन आंंदोलन केले. ‘महागाईला आळा घाला, गॅस सिलेंडर स्वस्त करा’, ‘जनतेची लूट थांबवा, गॅस दर कमी करा’, गॅसच्या किंमती कमी करा, नाहीतर खुर्ची खाली करा’ अशा घोषणा फलकांवर लिहीलेल्या होत्या.

आंदोलनात स्वातीताई शिंदे यांच्या समवेत नगरसेविका अश्विनी लांडगे, अनिता मकवाना, रेखा जैन, ॲड.अंजली देसाई, ॲड.राजश्री दामले-चव्हाण, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे, गितांजली प्रकाश, दिपाली पवार, मनोरमा चौधरी, वर्षा सपकाळ आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

विमानतळाच्या आवारात रिक्षा आणि कॅब चालकांकडून प्रवाश्यांची लुबाडणूक,स्वारगेटला २ दिवसात ३७५ रिक्षांवर कारवाई

पुणे- लोहगाव विमानतळाच्या परिसरात रिक्षा आणि कॅब चालक हे प्रशासकीय संगनमताने प्रवाश्यांची बेसुमार लुबाडणूक करताना दिसत असून इथे कारवाईस अक्षम असल्याचे RTO आणि वाहतूक पोलीस सांगतात ,दरम्यान पोलिसांच्या वाहतूक शाखेने स्वारगेट परिसरात अवैध प्रवासी रिक्षांविरुद्ध विशेष मोहीम राबवली. आणि २ दिवसात ३७५ रिक्षांवर कारवाई केली . तुम्ही तुमच्या घरून लोहगाव येथील विमानतळावर जर रिक्षा मीटर ने २०० रुपयात पोहोचत असाल तर परत येताना मात्र रिक्षा मीटरवर येत नाही तेथून परत यायला तुम्हाला किमान ५०० ते १००० रुपये मोजावे लागतात अशी स्थिती लोहगाव विमानतळावर आहे . विशेष म्हणजे प्रीपेड रिक्षा कॅब येथून उपलब्ध असूनही त्यांच्याही मार्फत प्रवाश्यांची अशी लुबाडणूक होत आहे . पार्किंग साठी एरोमोल ला भाडे द्यावे लागते हे कारण देऊन प्रीपेड रिक्षा कॅब चे दर येथून मीटरपेक्षा दुप्पट अडीचपट आकारण्यात येतात.मीटर वर येथून रिक्षा येतच नाही . RTO आणि वाहतूक पोलीस हे विमान प्राधिकरणाच्या अंतर्गत होत असल्याचे कारण सांगून अक्षम असल्याचे दर्शवित आहेत . आणि विमान प्राधिकरण आमच्याकडून प्रीपेड केंद्रापर्यंत जाण्यासाठी फ्री सेवा ठेवण्यात आल्याचे सांगून याकडे दुर्लक्ष करत आल्याचे दिसत आहे. PMPML च्या बस स्थानकापर्यंत पोहोचणे प्रवाश्यांना अडचणीचे कसे होईल या दृष्टीने येथून सारा कारभार चालतो आहे . आणि मेट्रो यायला अवधी आहे तोवर हि लुबाडणूक अशीच चालू राहील असे दिसते आहे.

दरम्यान पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने स्वारगेट परिसरात अवैध प्रवासी रिक्षांविरुद्ध विशेष मोहीम राबवली. वाहतूक शिस्त राखण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये एकूण ३७५ केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. जादा प्रवासी घेणे, भाडे नाकारणे, युनिफॉर्म न घालणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणे अशा विविध नियमभंगांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली.

ही मोहीम स्वारगेट वाहतूक विभागामार्फत स्वारगेट जेधे चौक, स्वारगेट बसस्थानकाचे इनगेट-आउटगेट तसेच स्वारगेट महामेट्रो समोर या प्रमुख ठिकाणी राबवण्यात आली. १० मार्च २०२६ रोजी झालेल्या पहिल्या कारवाईत एकूण १४६ रिक्षांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये जादा प्रवासी घेणाऱ्या १११ रिक्षाचालकांवर आणि भाडे नाकारणाऱ्या ३२ चालकांवर कारवाई झाली. तसेच, नियमभंग करणाऱ्या तीन फॉल्टी रिक्षा जप्त करण्यात आल्या.

यानंतर, १२ मार्च २०२६ रोजी स्वारगेट वाहतूक विभाग आणि पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) यांच्या संयुक्त पथकाने पुन्हा विशेष मोहीम राबवली. या कारवाईत स्वारगेट वाहतूक विभागाने एकूण १८६ केसेस नोंद केल्या. यामध्ये जादा प्रवासी घेणाऱ्या ९२ रिक्षा, भाडे नाकारणाऱ्या २१, युनिफॉर्म नसलेल्या ४८ तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या १८ रिक्षाचालकांचा समावेश होता. यावेळी सात फॉल्टी रिक्षा जप्त करण्यात आल्या. याव्यतिरिक्त, आरटीओ पुणे यांनी ४३ प्रकरणांवर स्वतंत्र कारवाई केली.

या दोन्ही दिवसांच्या कारवाईत स्वारगेट वाहतूक विभाग आणि आरटीओ पुणे यांच्या संयुक्त मोहिमेत एकूण ३७५ केसेस नोंदवण्यात आल्या.

ही कारवाई पोलिस उपायुक्त (वाहतूक) यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट वाहतूक विभागाच्या प्रभारी अधिकारी एपीआय शोभा क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांच्या पथकातील अंमलदारांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

पुणे शहर वाहतूक शाखेकडून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहतूक शिस्त राखण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष कारवाया पुढेही सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, सर्व रिक्षाचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.

धर्मांतराच्या विवाहातून जन्मलेल्या मुलाचा धर्म ठरणार आईच्या मूळ धर्मानुसार

धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मधील तरतुदींवर मोठी चर्चा

मुंबई-महाराष्ट्रात बेकायदेशीर धर्मांतराच्या घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेत मांडले आहे. या विधेयकात अनेक कठोर तरतुदी करण्यात आल्या असून विशेषतः बेकायदेशीर धर्मांतरातून झालेल्या विवाहातून जन्मलेल्या मुलांच्या धर्माबाबत स्पष्ट नियम प्रस्तावित करण्यात आला आहे. या विधेयकानुसार अशा विवाहातून जन्मलेल्या मुलाचा धर्म आईने विवाहापूर्वी स्वीकारलेला मूळ धर्म मानला जाईल. या तरतुदीमुळे इतर राज्यांतील धर्मांतरविरोधी कायद्यांपेक्षा महाराष्ट्रातील प्रस्तावित कायदा काही बाबतीत अधिक वेगळा ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

या विधेयकात असे नमूद करण्यात आले आहे की, जर एखाद्या व्यक्तीचे धर्मांतर बेकायदेशीर पद्धतीने घडवून आणले गेले आणि त्या धर्मांतराच्या आधारे विवाह किंवा विवाहासारखा संबंध निर्माण झाला, तर त्या संबंधातून जन्मलेल्या मुलाचा धर्म आईच्या मूळ धर्मानुसार ठरवला जाईल. यामुळे मुलाच्या धार्मिक ओळखीबाबत स्पष्टता राहील, असे सरकारचे मत आहे. काही राज्यांमध्ये अशा विवाहातून जन्मलेल्या मुलांना मालमत्तेतील हक्क दिले जातात, मात्र मुलाच्या धर्माबाबत स्पष्ट तरतूद अनेक कायद्यांमध्ये नसल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्रातील या विधेयकात मात्र हा मुद्दा स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे.

या विधेयकात मुलांच्या हक्कांबाबतही विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. बेकायदेशीर धर्मांतरातून झालेल्या विवाहातून जन्मलेल्या मुलाला दोन्ही पालकांच्या मालमत्तेवर वारसाहक्क मिळेल. हा वारसाहक्क संबंधित वारसा कायद्यांनुसार लागू राहील. त्याचबरोबर अशा मुलांना भारतीय नागरी सुरक्षा संहितेतील कलम 144 नुसार देखभाल मिळण्याचा हक्कही असेल. पत्नी, मुले आणि पालकांच्या देखभालीसंबंधी असलेल्या या तरतुदींचा लाभ त्यांना मिळू शकतो. मुलांच्या संगोपनाचा अधिकार मात्र आईकडे राहील, असेही या विधेयकात नमूद करण्यात आले आहे. तथापि, आवश्यक असल्यास न्यायालय वेगळा निर्णय देऊ शकते.

धर्मांतराच्या प्रक्रियेबाबतही या विधेयकात स्पष्ट नियम ठरवले आहेत. कोणत्याही व्यक्तीला आपला धर्म बदलायचा असल्यास त्या व्यक्तीने किमान साठ दिवस आधी जिल्हाधिकारी यांना लेखी सूचना देणे बंधनकारक असेल. या सूचनेमध्ये संबंधित व्यक्तीची वय, व्यवसाय, पत्ता, सध्याचा धर्म, स्वीकारू इच्छित असलेला धर्म आणि धर्मांतराच्या विधीची माहिती देणे आवश्यक राहील. या सूचनेनंतर जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या अधिकृत अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाऊ शकते. धर्मांतर स्वेच्छेने होत आहे की त्यामागे कोणताही दबाव किंवा फसवणूक आहे का, याची खात्री करण्यासाठी ही चौकशी केली जाईल.
जिल्हा प्रशासनाला आवश्यक वाटल्यास पोलिसांकडूनही तपास करून घेतला जाऊ शकतो. तसेच प्रस्तावित धर्मांतराबाबत आक्षेप नोंदवण्यासाठी स्थानिक पातळीवर माहिती दिली जाऊ शकते. या प्रक्रियेचा उद्देश धर्मांतर स्वेच्छेने होत आहे की नाही याची खात्री करणे हा आहे. सरकारच्या मते, बेकायदेशीर धर्मांतर रोखण्यासाठी अशी पूर्वसूचना व्यवस्था आवश्यक आहे.

धर्मांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही काही नियम पाळणे आवश्यक राहील. धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीने आणि धर्मांतराचा विधी पार पाडणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेने साठ दिवसांच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणा सादर करणे बंधनकारक असेल. या घोषणेत धर्मांतर करणाऱ्या व्यक्तीचे नाव, वय, व्यवसाय, पत्ता, पालकांची नावे, पूर्वीचा धर्म, स्वीकारलेला धर्म, धर्मांतराची तारीख आणि स्थळ तसेच त्या विधीची माहिती नमूद करावी लागेल. जिल्हाधिकारी कार्यालयात अशा सर्व घोषणांची नोंद ठेवली जाईल.

जर ही घोषणा ठरावीक कालावधीत सादर केली नाही, तर संबंधित धर्मांतर कायद्याने अमान्य ठरवले जाऊ शकते. अशा प्रकारे धर्मांतराच्या संपूर्ण प्रक्रियेवर प्रशासनाची नजर राहणार आहे. या तरतुदीमुळे बेकायदेशीर पद्धतीने होणारे धर्मांतर थांबवण्यास मदत होईल, असे सरकारचे म्हणणे आहे.

धर्मांतराची व्याख्याही विस्ताराने

या विधेयकात बेकायदेशीर धर्मांतराची व्याख्याही विस्ताराने करण्यात आली आहे. लालूच, फसवणूक, दबाव, चुकीची माहिती देणे किंवा प्रभाव टाकणे अशा मार्गांनी धर्मांतर घडवून आणणे बेकायदेशीर मानले जाईल. यामध्ये एखाद्या धर्माची अतिशयोक्तीपूर्ण स्तुती करणे किंवा दुसऱ्या धर्माच्या प्रथा व परंपरांना कमी लेखून धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे याचाही समावेश करण्यात आला आहे.
लालूच या संकल्पनेची व्याप्तीही या विधेयकात वाढवण्यात आली आहे. पैसे, भेटवस्तू, रोजगार, चांगले जीवनमान देण्याचे आश्वासन, मोफत शिक्षण, दैवी उपचार किंवा विवाहाचे आश्वासन देऊन धर्मांतर घडवून आणल्यास ते बेकायदेशीर ठरेल. अशा प्रकारच्या प्रलोभनांद्वारे धर्मांतर करण्याच्या घटनांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
दबाव टाकून धर्मांतर करण्यालाही या विधेयकात गंभीर गुन्हा मानले गेले आहे. देवाचा कोप होईल अशी भीती दाखवणे, सामाजिक बहिष्काराची धमकी देणे, जीवित किंवा मालमत्तेला धोका निर्माण करण्याची धमकी देणे किंवा मानसिक दबाव आणणे याला दबावाच्या स्वरूपात गणले जाईल. अशा प्रकारच्या कोणत्याही दबावाखाली केलेले धर्मांतर बेकायदेशीर मानले जाईल.
फसवणूक किंवा चुकीची माहिती देऊन धर्मांतर केल्यासही ते गुन्हा ठरेल. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने आपली धार्मिक ओळख लपवणे, धार्मिक प्रथा किंवा श्रद्धांबाबत चुकीची माहिती देणे किंवा धार्मिक कार्यक्रमाचा खरा उद्देश लपवणे यासारख्या घटनांना बेकायदेशीर धर्मांतर मानले जाईल.
या विधेयकात काही संवेदनशील घटकांबाबत विशेष संरक्षण देण्यात आले आहे. महिला, अल्पवयीन मुले तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील व्यक्तींना फसवून किंवा दबाव टाकून धर्मांतर घडवून आणल्यास अधिक कठोर शिक्षा होईल. अशा प्रकरणांमध्ये दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे.
धर्मांतरासाठी विवाहाचा वापर केल्यासही तो गुन्हा मानला जाईल. जर एखाद्या व्यक्तीने केवळ धर्मांतर घडवून आणण्यासाठी विवाह केला असेल, तर न्यायालय त्या विवाहाला अवैध घोषित करू शकते. यामुळे विवाहाच्या नावाखाली होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या विधेयकात सामूहिक धर्मांतराचीही स्वतंत्र व्याख्या देण्यात आली आहे. एकाच वेळी दोन किंवा अधिक व्यक्तींचे धर्मांतर झाल्यास त्याला सामूहिक धर्मांतर मानले जाईल. अशा प्रकरणांमध्ये अधिक कठोर शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यानुसार गुन्हे नोंदवले गेल्यास ते जामीन न मिळणाऱ्या प्रकारातील असतील आणि त्यांची चौकशी किमान उपनिरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाईल.
या कायद्यानुसार तक्रार नोंदवण्याचा अधिकारही विस्तृत ठेवण्यात आला आहे. धर्मांतर केलेल्या व्यक्तीशिवाय त्यांचे आई-वडील, भाऊ, बहीण किंवा रक्तसंबंध, विवाह किंवा दत्तक नात्याने संबंधित असलेली व्यक्तीही तक्रार दाखल करू शकते. पोलिसांना अशा तक्रारींची नोंद करणे बंधनकारक असेल. जर पोलिस अधिकाऱ्यांना कायद्याचे उल्लंघन झाल्याचा संशय वाटला, तर ते स्वतःहूनही कारवाई सुरू करू शकतात.
या विधेयकात शिक्षेचीही स्पष्ट तरतूद आहे. बेकायदेशीर धर्मांतर केल्यास सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. जर हा गुन्हा महिला, अल्पवयीन किंवा अनुसूचित जाती-जमातीतील व्यक्तींसंबंधी असेल, तर दंडाची रक्कम पाच लाख रुपयांपर्यंत वाढू शकते. सामूहिक धर्मांतराच्या प्रकरणातही सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
याशिवाय, एखादी व्यक्ती किंवा संस्था पुन्हा असा गुन्हा करताना आढळल्यास अधिक कठोर शिक्षा देण्यात येईल. अशा पुनरावृत्तीच्या प्रकरणांमध्ये दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि सात लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. जर एखादी संस्था बेकायदेशीर धर्मांतरास मदत करत असल्याचे आढळले, तर सरकार त्या संस्थेची नोंदणी रद्द करू शकते आणि तिला मिळणारी आर्थिक मदत किंवा अनुदानही बंद केले जाऊ शकते.
या कायद्यानुसार धर्मांतराची प्रक्रिया स्वेच्छेने झाली आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी धर्मांतर करणाऱ्या किंवा धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्तीवर असेल. याशिवाय जबरदस्तीने किंवा फसवणुकीने धर्मांतर झालेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनासाठीही तरतुदी करण्यात आल्या आहेत. अशा पीडितांना पुनर्वसन, आर्थिक मदत आणि मुलांच्या संगोपनासंबंधी संरक्षण देण्याची व्यवस्था या प्रस्तावित कायद्यात करण्यात आली आहे.