Home Blog Page 1298

क्रीडा मंत्रालयाने कुस्ती संघाला केले निलंबित:बजरंग म्हणाला- पद्मश्री परत घेणार; साक्षी मलिक संन्यासाच्या निर्णयावर फेरविचार करणार

0

क्रीडा मंत्रालयाने रविवारी 24 डिसेंबर रोजी निलंबित केले. 3 दिवसांपूर्वी 21 डिसेंबर रोजी WFI निवडणुका झाल्या, ज्यामध्ये भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह नवीन अध्यक्ष झाले होते.

नवीन अध्यक्षांच्या विजयानंतर, WFI ने 28 डिसेंबरपासून उत्तर प्रदेशातील गोंडा येथे ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा केली होती. गोंडा हा भाजप खासदार बृजभूषण यांचा लोकसभा मतदारसंघ आहे. कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. नवीन WFI संघाविरुद्ध क्रीडा मंत्रालयाच्या कारवाईमागे हे कारण असल्याचे मानले जात आहे.

क्रीडा मंत्रालयाच्या या निर्णयावर साक्षी मलिकची आई कृष्णा मलिक यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या- माझी मुलगी कुस्तीतून निवृत्ती घेण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करेल. याशिवाय कुस्तीपटू बजरंग पुनिया, ज्यांनी पंतप्रधानांच्या घराबाहेर पद्मश्री पुरस्कार ठेवला होता, त्यांनीही हा सन्मान परत घेणार असल्याचे म्हटले आहे.

ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिकने बृजभूषण यांच्या जवळच्या मित्राच्या विजयाच्या निषेधार्थ कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली होती. कुस्तीपटू बजरंग पुनियानेही पद्मश्री परत केला होता. यानंतर गुंगा पहिलवाननेही पद्मश्री परत करण्याची घोषणाही केली होती.

बृजभूषण अध्यक्ष असताना संजय सिंह WFI च्या पूर्वीच्या बॉडीमध्ये सहसचिव होते. निवडणुकीत कॉमनवेल्थ चॅम्पियन अनिता सिंग शेओरन यांचा पराभव करून संजय सिंह नवे अध्यक्ष बनले. संजय यांच्या विजयानंतर बृजभूषण यांच्या मुलाने सांगितले होते की, आमचे वर्चस्व पूर्वीही होते आणि यापुढेही राहील.

संजय सिंह म्हणाले- निर्णयामुळे आश्चर्य, क्रीडा मंत्रालयाला याबाबत विचारणार
संजय सिंह यांनी क्रीडा मंत्रालयाच्या कारवाईवर आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की- क्रीडा मंत्रालयाने जो काही निर्णय घेतला आहे. मी त्याचे स्वागत करतो. पण या निर्णयाचे मला आश्चर्य वाटते. याबाबत मी क्रीडा मंत्रालयाला विचारणार आहे.

संजय सिंह म्हणाले- मी कुठेही कुस्तीपटूंचा अपमान केलेला नाही. मी गोंडा जिल्ह्यातील नंदनी नगर स्पोर्ट्स स्टेडियम येथे 3 दिवसीय राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते, जेणेकरून 15 वर्षांखालील आणि 20 वर्षांखालील मुलांचे वर्ष वाया जाऊ नये आणि ते कुस्ती स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.

त्याच वेळी भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणाबाबत सध्या त्यांच्याकडे कोणतीही प्रतिक्रिया नाही. मला क्रीडा मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. क्रीडा मंत्रालयाशी बोलताच तुम्हा लोकांना माहिती दिली जाईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बृजभूषण भाजप अध्यक्ष नड्डा यांच्या घरी पोहोचले आहेत.

अलीकडेच WFI ने ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिपची घोषणा केली होती, ज्यामध्ये ही स्पर्धा 28 डिसेंबरपासून गोंडा, UP येथे सुरू होणार होती. कुस्ती सोडलेल्या साक्षी मलिकने याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

ती म्हणाली की, ‘मी कुस्ती सोडली आहे, पण मला काल रात्रीपासून काळजी वाटत आहे, त्या ज्युनियर महिला कुस्तीपटूंनी काय करावे जे मला फोन करून सांगत आहेत की 28 तारखेपासून ज्युनियर नॅशनल स्पर्धा होणार आहे, आणि नवीन कुस्ती महासंघाने नंदनी नगर, गोंडा येथे आयोजित केले आहे. यानंतर क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या नवनिर्वाचित मंडळाला निलंबित केले आहे.

संजय सिंह अध्यक्ष झाल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने 22 डिसेंबर रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. बजरंग पुनियाने लिहिले की, मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत आहे. हेच माझे पत्र आहे, माझे स्टेटमेंट आहे.

या पत्रात बजरंग पुनियाने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) वर ब्रजभूषणचे निकटवर्तीय संजय सिंह यांच्या विजयाला विरोध दर्शवला आहे. बजरंग हा पुरस्कार परत करण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेला होता, मात्र आत जाण्याची परवानगी न मिळाल्याने त्याने पुरस्कार तिथेच फूटपाथवर ठेवला.

केदारांची आमदारकी कायद्याप्रमाणे रद्द:ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार – देवेंद्र फडणवीस

मुंबई-मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर असून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार असल्याचा पुनरुच्चार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच राम मंदिराच्या निर्मितीने देशात नवा अध्याय सुरु होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तर काँग्रेस आमदार सुनील केदार यांची आमदारकी ही कायद्याप्रमाणे रद्द केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही पूर्ण शक्तीने हे सगळं काम करत आहोत, कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कार्यवाही हे राज्य सरकारच्या वतीने सुरू आहे. इंडिया अलायन्स किंवा इंडिया आघाडी ही कुठलीही आघाडी नाही, ज्या लोकांना असे वाटते की मोदीजींमुळे त्यांच्या भ्रष्टाचाराचे दुकान आणि त्यांच्या परिवारवादाचे दुकान बंद होणार आहे. ​​​​​​

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊत रोज वेगवेगळे आरोप करतात. त्यांच्या आरोपांना उत्तर देणे मी आता बंद केले आहे. त्यांच्या आरोपांना देण्याइतकी माझी पातळी खाली गेलेली नाही, असा पलटवार फडणवीस यांनी केला आहे. सलीम कुत्ता सोबतची पार्टी भाजपच्या पदाधिकाऱ्याने आयोजित केली होती. व्यंकटेश मोरे असे त्याचे नाव आहे. आजही मोरे हा भाजपचा पदाधिकारी आहे. आता चौकशी करा, असे म्हणत राऊत यांनी व्यंकटेश मोरेचे उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबतचे फोटोही दाखवले होते. यावर फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मकतेने काम करत आहे. सरकारची ही सकारात्मकता लक्षात घेता मनोज जरांगे यांनी उपोषणाचे निर्णय घेऊ नये असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा पुनरुच्चारही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मकतेने काम करत आहे. मुख्यमंत्री शिंदे स्वतः याप्रकरणी जातीने लक्ष देत आहेत. राज्य मागासवर्गीय आयोगाने वेगाने काम सुरु केले. तर शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला असून तिसरा अहवालही येणे अपेक्षित आहे. त्यामुळे राज्य सरकारची सकारात्मकता पाहता जरांगे यांनीही असा निर्णय घेऊ नये.

स्वच्छतेचा मुंबई पॅटर्न राज्यातील सर्व शहरांमध्ये राबवणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई, दि. २४ – विशेष मुलांना विशेष काळजीची गरज असते. अशा मुलांसाठी सुरू झालेल्या प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून मोफत उपचार केले जाणार असून मुंबईत पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एक केंद्र सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ठाणे येथे देखील एक केंद्र सुरू करण्यात येईल, असे ते म्हणाले. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘संपूर्ण स्वच्छता मोहिमे’ला लोकचळवळीचे स्वरूप आले असून लवकरच स्वच्छतेचा हा मुंबई पॅटर्न राज्यातील सर्व शहरांमध्ये टप्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते नायर रुग्णालयांतर्गत नव्याने सुरू झालेल्या मुलांसाठी प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन (ईआयआरसीसी) केंद्राचे रविवारी उद्घाटन झाले. याप्रसंगी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक आमदार रईस शेख, आमदार श्रीमती यामिनी जाधव, आमदार कालिदास कोळंबकर, ॲड.मनीषा कायंदे, माजी नगरसेवक दत्ता नरवणकर, यशवंत जाधव, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.अश्विनी जोशी, डॉ.सुधाकर शिंदे, उपायुक्त रमाकांत बिरादार आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील ‘संपूर्ण स्वच्छता मोहिमे’अंतर्गत आज वरळी येथील डॉ.हेडगेवार चौक, आचार्य अत्रे चौक, माता रमाई आंबेडकर चौक, नायगाव येथील महाराणा प्रताप चौक, तसेच नायगाव बीडीडी चाळ परिसरातील गांधी चौक येथे स्वच्छतेच्या सुरू असलेल्या कामाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी करून त्यात स्वतः सहभाग घेतला.

प्रारंभिक उपचार केंद्र सुरू केल्याचे वेगळे समाधान

मुलांसाठी प्रारंभिक उपचार केंद्राच्या उद्घाटनानंतर मुख्यमंत्री म्हणाले, हे केंद्र खाजगी उपचार केंद्रापेक्षा चांगले असून महानगरपालिका किती चांगले काम करू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. विशेष मुलांच्या गरजाही विशेष असतात, त्यांची पालकांना काळजी असते. तथापि या केंद्राच्या माध्यमातून अशा मुलांवर मोफत उपचार करण्यात येणार असून अशी दोन केंद्रे मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात तर एक केंद्र ठाण्यामध्येही सुरू करण्यात येईल. प्रारंभिक उपचार केंद्र सुरू केल्याचे वेगळे समाधान असल्याचे सांगून येथे मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.

स्वच्छता हा आरोग्याचा मूलमंत्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेअंतर्गत आता दर आठवड्याला विविध प्रशासकीय विभागांमध्ये (वॉर्ड) स्वच्छता केली जात आहे. मुख्यमंत्री स्वत: या मोहिमेत सहभागी होत आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, स्वच्छता हा आरोग्याचा मूलमंत्र आहे. यामुळे मुंबईतील संपूर्ण स्वच्छता मोहीम ही आता लोकचळवळ बनली असून स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी, अशासकीय संस्था यात सक्रीय सहभाग घेत आहेत. या माध्यमातून आजुबाजूच्या प्रशासकीय विभागांतील मनुष्यबळ तसेच सक्शन मशीन, एअर प्युरिफायर, मिस्ट मशीन अशा आधुनिक साधनसामग्रीचा वापर करून रस्त्यांची सफाई, रत्यांवरील माती काढणे, पुनर्वापर केलेल्या पाण्याद्वारे रस्त्यांची धुलाई करणे, अंतर्गत रस्ते, पदपथ, नाले, सार्वजनिक शौचालये आदी स्वच्छ करणे ही कामे केली जात आहेत. यासाठी एक हजार टँकर भाड्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेमुळे नियमित सफाईची कामे करणे सोयीचे होत असून याचे दृश्य परिणाम येत्या काळात दिसून येणार आहेत. मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यात येत असून सुशोभिकरणाची कामे वेगाने होत आहेत. प्रत्येक चौकात झाडे लावणे, अर्बन फॉरेस्टच्या माध्यमातून हरीत क्षेत्र वाढविणे ही कामे केली जात आहेत. प्रदूषणमुक्त मुंबईसाठी याचा मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वच्छता कर्मचारी हे खरे हिरो

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई स्वच्छ, सुंदर, निरोगी आणि प्रदूषण मुक्त करण्यात येत आहे. स्वच्छता हा विषय नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असल्याने स्वच्छतेला प्राधान्य दिले जात आहे. मुंबई हे जागतिक दर्जाचे शहर आहे, त्यामुळे जगात सर्वांना अपेक्षित अशी स्वच्छ आणि सुंदर मुंबई करण्यावर भर दिला जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. बस थांबे स्वच्छ ठेवावेत, दुभाजकांमधील झाडे व्यवस्थित लावावीत, रस्ते एक दिवसाआड धुतले जावेत, धूळ उडू नये यासाठी बांधकाम सुरू असलेल्या इमारती झाकल्या जाव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. या मोहिमेत अधिकाऱ्यांबरोबरच स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा असून ते या मोहिमेचे खरे हिरो आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वसाहती स्वच्छ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्यांच्या इतर अडचणी देखील दूर करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

नायगाव येथील बीडीडी चाळ परिसरातील नायगाव नवरात्रौत्सव मंडळाच्या भवानी माता मंदिराला मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी भेट दिली. यावेळी नागरिकांशी संवाद साधताना ते म्हणाले, पोलिसांच्या निवासस्थानाबाबत तसेच बीडीडी चाळीसंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल. तसेच अनेक वर्षे प्रलंबित असलेले प्रकल्प शासनाच्या वतीने पूर्ण करण्यात येतील. मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत आणू, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शरद पवार यांच्याकडून गौतम अदाणींचे तोंडभरून कौतुक

बारामती-धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन एकीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचे राहुल गांधी यांचेही अदानींविरोधात मत काही वेगळंच असल्याचे दिसत आहे.असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांचे पुन्हा एकदा तोंडभरुन कौतुक केले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन तंत्रज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल शरद पवार यांनी शनिवारी उद्योगपती गौतम अदानी यांचे आभार मानले आणि त्यांचे कौतुकही केले.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी विभागातील रोबोटिक लॅबच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना शरद पवार यांनी गौतम अदांनींचे आभार मानले आहेत. या कार्यक्रमाला फिनोलेक्स जे पॉवर सिस्टम्स लिमिटेडचे ​​अध्यक्ष दीपक छाब्रिया देखील उपस्थित होते. 

शरद पवार नेमके काय म्हणाले …

भारतातले पहिलेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची उभारणी आपण करत आहोत, त्याचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पाला पंचवीस कोटी रुपये लागणार आहेत, या पंचवीस कोटींची उभारणी करून आम्ही या कामात उडी टाकली आहे. सुदैवाने आमच्या दोन सहकाऱ्यांना यासाठी मदत करण्याची विनंती मी केल्यानंतर त्यांनी तातडीने त्याला होकार दिला. सिफोटेक ही कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील देशातील अत्यंत महत्वाची कंपनी आहे त्यांनी दहा कोटी रुपयांची मदत यामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांचे मी अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो. या प्रकल्पासाठी आणखी एका सहकार्‍याने मदत करण्याचा निर्णय घेतला व रक्कमही पाठवली त्यामध्ये गौतम अडाणी यांचे नाव या ठिकाणी घ्यावे लागेल. त्यांनी पंचवीस कोटी रुपयांचा धनादेश संस्थेकडे पाठवलेला आहे, या दोघांच्या मदतीने हे दोन्ही प्रकल्प आज आम्ही या ठिकाणी उभे करणार आहोत व प्रत्यक्ष त्याचे कामही सुरू झालेले आहे. मी सांगितले होते की IBN या संस्थेची आम्ही मदत घेत आहोत, या ठिकाणी प्रशिक्षण चालू करा अशी विनंती आम्ही त्यांना केली. मला आनंद या ठिकाणी आहे की IBN चा प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आपण सुरू केले त्यात १२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यातून प्रशिक्षित झाल्यानंतर नोकरीची एक प्रकारची खात्री त्या कंपनीने दिलेली आहे, तेही काम आपण या ठिकाणी सुरू करत आहोत…….

तेव्हाही अदानीना दिला होता पाठींबा ..

दरम्यान, अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण उघडकीस आल्यानंतर विरोधी पक्षांनी याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यावेळीही शरद पवारांनी अदानींना पाठिंबा दिला होता. दुसरीकडे राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसकडून अदानींना जोरदार विरोध झाला होता.महाविकास आघाडीतील शिवसेना गटानेही नुकताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत गौतम अदानी यांच्याविरोधात निषेध मोर्चा काढला होता. इंडिया अलायन्सचे अनेक नेते केंद्र सरकारवर निशाणा साधत अदानींवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे खासदार शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांचे कौतुक केले यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

भारतात येणाऱ्या जहाजावर इराणच्या ड्रोनने हल्ला केला:US संरक्षण मंत्रालयाचा दावा,इराणने अमेरिकेचे आरोप फेटाळले

0

शनिवारी हिंदी महासागरात भारतात येणाऱ्या मालवाहू जहाजावर इराणच्या ड्रोनने हल्ला केला. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने हा दावा केला आहे. अमेरिकन रिपोर्ट्सनुसार, शनिवारी सकाळी 10 वाजता केम प्लूटो नावाच्या जहाजावर हल्ला करण्यात आला. त्यावेळी हे जहाज अमेरिकेच्या संपर्कात होते.सौदी अरेबियातून तेल घेऊन भारतात येणारे हे जहाज जपानचे असून ते लायबेरियाच्या झेंड्याखाली कार्यरत होते. जहाजावर हल्ला झाला तेव्हा ते भारतीय किनारपट्टीपासून 370 किलोमीटर दूर होते.

इराणने अमेरिकेचे आरोप फेटाळून लावले आहेत. इराणचे उप परराष्ट्र मंत्री अली बगेरी म्हणाले- हुथी बंडखोरांकडे स्वतःची शस्त्रे आहेत, ते स्वतःचे निर्णय घेतात. यात आमची भूमिका नाही. हुथी बंडखोर लाल समुद्र आणि आसपासच्या भागात वारंवार जहाजांवर हल्ले करतात.

लाल समुद्र आणि आसपासच्या भागात हुथी बंडखोर हल्ले करत आहेत

वास्तविक, इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यानंतर, हुथी बंडखोर लाल समुद्र आणि त्याच्या आसपासच्या भागात जहाजांवर सातत्याने हल्ले करत आहेत. हुथी बंडखोरांचे म्हणणे आहे की जोपर्यंत इस्रायल गाझामधील हल्ले थांबवत नाही तोपर्यंत ते इस्रायल किंवा त्याच्या सहयोगी जहाजांवर हल्ले करत राहतील. शनिवारी भारतात येणारे जहाजही इस्रायलचे असल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते.

भारतीय नौदलाच्या विमानाचा या जहाजाशी संपर्क होता
एएनआय वृत्तसंस्थेनुसार, भारतीय नौदलाच्या P-8I पाळत ठेवणाऱ्या विमानाने MV Chem Pluto शी संपर्क स्थापित केला होता. ड्रोन हल्ल्याची बातमी समोर आल्यानंतर लगेचच P-8I टेहळणी विमानाने गोव्यातील INS हंसा नौदल हवाई तळावरून उड्डाण केले.

हे जहाज सौदीहून हिंदी महासागरात भारतातील मंगळुरूला जात होते. भारतीय नौदलानुसार, या जहाजावर 20 भारतीय क्रू मेंबर्स होते. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात कोणालाही इजा झाली नाही, मात्र जहाजाला आग लागली. ही आग आटोक्यात आणण्यात आली. सध्या या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही.

अध्यक्षांसह कुस्ती संघटनेचे निलंबन:3 दिवसांपूर्वी बृजभूषण यांच्या निकटवर्तीयाने जिंकली होती निवडणूक; साक्षी,बजरंगच्या नाराजीची क्रांती

0

गेल्या 11 महिन्यांपासून वादांच्या भोवऱ्यात सापडलेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) नव्या संस्थेला क्रीडा मंत्रालयाने रविवारी निलंबित केले. 3 दिवसांपूर्वी 21 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह हे WFI चे अध्यक्ष झाले. याच्या निषेधार्थ ऑलिम्पिक पदक विजेती साक्षीने कुस्तीतून निवृत्ती घेतली होती. बजरंग पुनिया यांनी पद्मश्री परत केला होता.वीरेंद्र सिंग (गुंगा पैलवान) यांनीही पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती.

डब्ल्यूएफआय निवडणुकीत संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने बृजभूषण यांच्या विरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू नाराज होते. कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी गुरुवारी संध्याकाळी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान साक्षी मलिक भावुक झाली आणि तिने कुस्ती सोडण्याची घोषणा केली. तिने शूज काढून टेबलावर ठेवले आणि तिथून उठली.

अलीकडेच WFI ने ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिपची घोषणा केली होती, ज्यामध्ये ही स्पर्धा 28 डिसेंबरपासून गोंडा, UP येथे सुरू होणार होती. कुस्ती सोडलेल्या साक्षी मलिकने याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

ती म्हणाली की, ‘मी कुस्ती सोडली आहे, पण मला काल रात्रीपासून काळजी वाटत आहे, त्या ज्युनियर महिला कुस्तीपटूंनी काय करावे जे मला फोन करून सांगत आहेत की 28 तारखेपासून ज्युनियर नॅशनल स्पर्धा होणार आहे, आणि नवीन कुस्ती महासंघाने नंदनी नगर, गोंडा येथे आयोजित केले आहे. यानंतर क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या नवनिर्वाचित मंडळाला निलंबित केले आहे.

संजय सिंह अध्यक्ष झाल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनियाने 22 डिसेंबर रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. बजरंग पुनियाने लिहिले की, मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत आहे. हेच माझे पत्र आहे, माझे स्टेटमेंट आहे.

या पत्रात बजरंग पुनियाने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) वर ब्रजभूषणचे निकटवर्तीय संजय सिंह यांच्या विजयाला विरोध दर्शवला आहे. बजरंग हा पुरस्कार परत करण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेला होता, मात्र आत जाण्याची परवानगी न मिळाल्याने त्याने पुरस्कार तिथेच फूटपाथवर ठेवला.23 डिसेंबर रोजी वीरेंद्र सिंग (गुंगा पैलवान) यांनीही पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती. वीरेंद्र सिंह यांना 2021 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला. या मुक्या कुस्तीपटूने सोशल मीडियावर लिहिले मला माझी बहीण साक्षी मलिकचा अभिमान आहे. सचिन तेंडुलकर आणि नीरज चोप्रा यांना टॅग करत त्यांनी लिहिले – मी देशातील सर्वोत्तम खेळाडूंनाही त्यांचा निर्णय घेण्याची विनंती करेन.

पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई: पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ओळखली जाते तसेच पार्ले ही मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जात असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते आज पार्ले महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार पूनम महाजन, आमदार पराग अळवणी, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, अभिनेत्री सुधा चंद्रन, अभिनेते शैलेश दातार, साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, ज्योती अळवणी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईतील मोठा महोत्सव अशी पार्ले महोत्सवाने ओळख निर्माण केली आहे. संस्कृती (Culture), खाद्य संस्कृती (Cusine) आणि कलाकार (Celebrity) यामुळे पार्लेची विशेष ओळख असून या महोत्सवात सहभागी झाल्याचा आनंद झाला.

पार्ले महोत्सवाचे दरवर्षी उत्कृष्ट आयोजन करण्यात येत असल्याने या महोत्सवाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात आणि हा महोत्सव त्यांना आपला वाटतो. येणाऱ्या काळात येथील फॅनेल झोन आणि विमानतळ जवळील झोपडपट्टी पुनवर्सन विषय मार्गी लावण्यावर भर देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

खासदार श्रीमती महाजन म्हणाल्या की, उत्तम आयोजन, उत्तम परीक्षक, उत्तम स्पर्धक यामुळे पार्लेकर यांना हा महोत्सव आपला वाटतो यातच याचे यश आहे.

विलेपार्ले कल्चर सेंटरकडून पार्ले महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या महोत्सवाचे 23 वे वर्ष आहे. यावर्षी या महोत्सवादरम्यान वेगवेगळया 32 स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये 30 हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. 30 डिसेंबरपर्यंत चालणारा हा महोत्सव विलेपार्ले येथील वामन मंगेश दुभाषी मैदानात आयोजित करण्यात आला आहे.

पार्ले महोत्सवाचे उद्घाटन प्रास्ताविक आमदार पराग अळवणी यांनी केले. तसेच यावेळी पार्ले महोत्सवासाठी तयार करण्यात आलेले गाणे कार्यक्रमादरम्यान वाजविण्यात आले.

साठ्ये महाविद्यालयास प्रसिद्ध अभिनेते कै. के. डी. चंद्रन नगर तर नृत्य स्पर्धा संपन्न होणाऱ्या पार्ले टिळक शाळा परिसरात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी नगर असे नाव देण्यात आले आहे.

निवृत्त SSPची गोळ्या झाडून हत्या:बारामुल्लामध्ये नमाज अदा करत असताना दहशतवाद्यांचा गोळीबार

0

बारामुल्ला-

रविवारी (24 डिसेंबर) सकाळी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथील जेंटमुल्ला येथील मशिदीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. निवृत्त एसएसपी मोहम्मद शफी यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, निवृत्त एसएसपी मशिदीत नमाज अदा करत होते. दरम्यान, दहशतवाद्यांनी मशिदीच्या आत घुसून त्यांच्यावर गोळीबार केला. घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर दहशतवादी पळून गेले. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. जम्मूमध्ये गेल्या 4 दिवसांतील ही तिसरी मोठी दहशतवादी घटना आहे.

यापूर्वी 23 डिसेंबर रोजी अखनूरमध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. 21 डिसेंबर रोजी राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला होता. यामध्ये पाच जवान शहीद झाले. दोन जवान जखमी झाले आहेत.

शनिवारी (23 डिसेंबर) अखनूरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर 4 दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. यावेळी एक दहशतवादी मारला गेला. भारतीय लष्कराच्या व्हाइट नाइट कॉर्प्सने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली.

पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांमध्ये चार दहशतवादी दिसल्याचे लष्कराने सांगितले. यावेळी सुरक्षा दलांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर तीन दहशतवादी एक मृतदेह आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडे ओढताना दिसले. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने त्याचे फुटेजही जारी केले होते.

21 डिसेंबर रोजी पुंछ आणि राजौरी दरम्यानच्या डेरा गल्लीत लष्कराच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. यामध्ये पाच जवान शहीद झाले. दोन जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट (PAFF) या दहशतवादी गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतवाद्यांनी अमेरिकन एम-4 कार्बाइन असॉल्ट रायफलने लष्करावर हल्ला केला.

हल्ल्याच्या दिवशी थानमंडी-सुरनकोट रस्त्यावरील डेरा की गली भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दुपारी 3 वाजेच्या सुमारास लष्कराची मारुती जिप्सी आणि ट्रक जवळून जाताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला.

नाईक बिरेंद्र सिंह, नाईक करण कुमार, रायफलमॅन चंदन कुमार, रायफलमन गौतम कुमार अशी शहीद जवानांची नावे आहेत. लष्कराने पाचव्या शहीद जवानाचे नाव जाहीर केलेले नाही. सध्या शोधमोहीम सुरू आहे.

गोव्याचा झुआरी पूल पूर्णपणे कार्यान्वित झाल्याबद्दल पंतप्रधानांनी गोवेकरांचे केले अभिनंदन

0

नवी दिल्ली-

गोव्यातला झुआरी पूल पूर्णपणे कार्यान्वित झाल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवेकरांचे अभिनंदन केले आहे.

या पूलामुळे दळणवळण व्यवस्था सुधारून गोव्यात पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळेल, असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:

“झुआरी पूल पूर्णपणे कार्यरत झाल्याबद्दल, गोवेकरांचे अभिनंदन! ह्या महत्वाच्या प्रकल्पामुळे, उत्तर आणि दक्षिण गोव्यातील दळणवळण व्यवस्था सुधारेल, पर्यायाने, येत्या काळात या प्रदेशातील वाणिज्य आणि पर्यटनाला चालना मिळेल.” 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची तरंग उत्सवाला भेट

नागरिकांना उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन

पुणे दि.२३- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात आयोजित तरंग उत्सवाला भेट दिली. हा उत्सव खऱ्या अर्थाने ‘मैत्रीचा उत्सव’ असून पोलीस आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण करणारा असल्याने नागरिकांनी उत्सवात आवर्जून सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री.पाटील यांनी यावेळी केले.

यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त संदीप गिल आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील यांनी उत्सवातील विविध दालनांना भेट दिली आणि दहशतवाद विरोधी पथकाचे प्रात्यक्षिक पाहिले. ते म्हणाले, या उत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कला, संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यासोबत पोलीस दलाविषयी माहितीदेखील मिळते. पोलीस हा आपला खऱ्या अर्थाने मित्र आहे ही भावना दृढ होऊन परस्पर सहकार्याला चालना मिळते. यातूनच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले विश्वासाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. नागरिकांनी आवर्जून या उत्सवात सहभागी होत सुट्टीच्या दिवसाचा आनंद घ्यावा आणि पोलीस दलाविषयी जाणून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

दामिनी पथकाचे कौतुक

मंत्री श्री.पाटील यांनी दामिनी दलविषयीच्या दालनाला भेट देऊन माहिती घेतली. या पथकाची कामगिरी मोलाची असून अशी पथके वाढविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. दुसऱ्या महायुद्धातील विविध शस्त्राविषयीदेखील त्यांनी जाणून घेतले. हा उपक्रम मनोरंजनासोबत लोकशिक्षण करणारा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

असा आहे ‘तरंग-२०२३’ उत्सव
पोलीस दलातील विविध शाखा, घटक यांची परिपूर्ण माहिती उत्सवात देण्यात आली आहे. ‘तरंग -२०२३’ कार्यक्रम २४ डिसेंबर पर्यंत सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुला राहणार आहे.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण हे पोलीस घटकांचे प्रदर्शन असून त्यामध्ये पोलीस दलातील विविध शाखा व त्या शाखांमधील चालणारे कामकाज याविषयी ऑडीयो, व्हिडीओच्या माध्यमांतुन माहिती सांगण्यात येत आहे.

सांस्कृतिक कलेचा वारसा असलेल्या पुणे शहरातील स्थानिक कलाकार यांची कलाकृती (आर्टिसन गॅलरी) या शिर्षकाखाली सर्व सामान्यांसाठी प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामध्ये पुण्यातील स्थानिक कलाकारांची मातीची भांडी कलाकृती, पर्यावरणपूरक प्लास्टिक पदार्थाचे पुर्नप्रकल्पाने तयार केलेल्या उपयोगी वस्तु, तांबे पितळ या भांड्याचे प्रदर्शन, फुलझाडे, रोपवाटीका यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

नविन पिढी, लहान बालके यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणुन विज्ञात प्रदर्शन, मुलांसाठी खेळप्रकार, व्हिडीओचे माध्यमांतुन लहान बालकांसाठी गुड टच, बॅड टच यासारखे प्रबोधनपर प्रदर्शन ‘किड्स झोन’ चे माध्यमांतुन प्रदर्शित करण्यात आले आहे. विविध मनोरंजनाचे कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात येत आहेत. खाद्य संस्कृतीचेही स्टॉल प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. भारतातील विविध कलाकुसर, खादी, दाग-दागिने, देशी पदार्थ, कपड्यांसह विविध वस्तू प्रदर्शनात आहेत.

एनएचआयचा दुमजली उड्डाणपूल थेट रामवाडीपर्यंत

शास्त्रीनगर चौकात उड्डाणपुल आणि ग्रेड सेपरेटर होणार
पालकमंत्री अजित पवार अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय

मेट्रो मार्गिका विमानतळापर्यंत करा – पवारांच्या सूचना
नगर रस्त्यावर रामवाडीपर्यंत असलेला मेट्रो मार्ग थेट पुणे विमानतळापर्यंत जोडा असे आदेश पालकमंत्री पवार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्याना दिले. याबाबत तातडीने कार्यवाही करावी असेही त्यांनी सांगितले.

पुणे –एनएच आयच्या माध्यमातून शिरूर ते वाघोलीपर्यंत जो दुमजली उड्डाणपुल प्रस्तावित आहे. तो थेट विमाननगर- रामवाडीपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला.नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. नगर रस्त्यावर एनएचआयच्या माध्यमातून होणारा दुमजली उड्डाणपूल आता वाघोलीऐवजी थेट रामवाडीपर्यंत करण्याचा आणि त्यापुढे शास्त्रीनगर चौकात महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर करण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
नागपुर हिवाळी अधिवेशनात पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरील लक्षवेधीत वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी नगर रस्ता सिग्नल फ्री करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली होती. मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात ही बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवार पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सुनिल टिंगरे, आयुक्त विक्रम कुमार, पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, एनएचआयचे वरिष्ठ अधिकारी अभिजित आवटे, वाहतूक पोलिस सहआयुक्त श्री खाडे उपस्थित होते. या बैठकीत नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी एनएच आयच्या माध्यमातून शिरूर ते वाघोलीपर्यंत जो दुमजली उड्डाणपुल प्रस्तावित आहे. तो थेट विमाननगर- रामवाडीपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आलाय अशा सूचना एनएच आयला करण्यात आले. तसेच शास्त्रीनगर चौकातील कोंडी सोडविण्यासाठी याठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग ( ग्रेड सेपरेटर) उभारण्यात येणार असून त्यासंबंधीची निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी असे आदेश पालकमंत्री पवार यांनी महापालिका आयुक्तांना दिले.
यावेळी रखडलेल्या शिवणे- खराडी रस्ताबाबतही चर्चा झाली. हा रस्ता तातडीने मार्गी लावण्यासाठी तातडीने भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करावी आणि या रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी सुचना पवार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्याना दिल्या. तसेच वडगाव शेरी विधान सभा मतदार संघातील धानोरी, संतनगर, फाईव्ह नाईन चौक ते धानोरी, विश्रांतवाडी येथील पर्यायी रस्ते मार्गी लावण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी जागेवर जाऊन पाहणी करावी आणि त्यासंदर्भात कार्यवाही करावी अशा सूचनाही पवार यांनी बैठकीत केल्या.

मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका सुनावणीच्या निर्णयाचा प्रचंड आनंद! मंत्री चंद्रकांतदादा पाटील

महाविकास आघाडीला मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई लढण्यात स्वारस्य नव्हतेमविआवर घणाघाती टीका

पुणे-मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका ऐकण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मराठा आरक्षणासाठी काम करणारा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून प्रचंड आनंद होत आहे. महाविकास आघाडीने मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई लढण्यात स्वारस्य नव्हते. त्यामुळे मराठा समाजाचे प्रचंड नुकसान झाले, अशी घणाघाती टीका नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. तसेच, महायुती सरकार मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका पूर्ण ताकदीनिशी लढवेल, असा विश्वास ही यावेळी व्यक्त केला.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिका ऐकण्याचा निर्णय प्रचंड आनंद देणारा आहे. या याचिकेमुळे मराठा समाजाचे विविध कारणाने झालेले मागासलेपण सिद्ध करुन, त्यांना आरक्षण मिळवून देण्याची आशा निर्माण झाली आहे. राज्य सरकार आता वकिलांची मोठी फौज उभी करुन ही याचिका पूर्ण ताकदीनिशी लढवेल, अन् मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून देईल.

नामदार पाटील पुढे म्हणाले की, माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीच्या अहवालाच्या आधारे आरक्षण मिळवून दिले होते. माननीय उच्च न्यायालयात मराठा समाज मागास असल्याची बाजू तत्कालीन राज्य सरकारने प्रभावी पणे मांडून माननीय न्यायालयाला पटवून दिले. त्यामुळे उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर मोहोर उमटवली.

ते पुढे म्हणाले की, दुर्दैवाने राज्यात मविआ सरकार स्थापन झाल्यानंतर, या सरकारला मराठा आरक्षणासाठीची सुप्रीम कोर्टातील लढाई लढण्यात कोणतेही स्वारस्य नव्हते. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडत असताना जर राज्यात असाधारण स्थिती असेल, तर आरक्षण देता येतं; हे न्यायालयाला पटवून देता आलं नाही. त्यामुळे सुप्रिम कोर्टाने हे आरक्षण फेटाळले. यामुळे मराठा समाजाचे प्रचंड नुकसान झाले.

नामदार पाटील पुढे म्हणाले की, माननीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण कायदेतज्ज्ञांची फौज उभी करु‌; अन् सुप्रिम कोर्टाच्या निदर्शनास काही बाबी आणून देऊ. यात प्रामुख्याने जमिनीच्या विभागणीमुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणे अवघड झाले. त्यामुळे मराठा समाज कालांतराने मागास होत गेला. त्यामुळे पुनर्विचार याचिकेमुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या संधीचे महायुती सरकार सोनं करुन, मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळवून देऊ, असा विश्वास व्यक्त केला.

भोईर नगर कामगार कल्याण मैदानावर नाट्य संमेलनाच्या मंडपाचे पूजन

पुणे (दि.२३ डिसेंबर २०२३) शतकोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सहा आणि सात जानेवारी रोजी २०२४ ला पिंपरी चिंचवड शहरात होत आहे. राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही सर्वपक्षीय या नाट्यसंमेलनाचे नियोजन करीत आहोत. नाट्य संमेलन ही एक सांस्कृतिक चळवळ आहे; अशा भावनेतून आम्ही याकडे पाहतो. हे नाट्य संमेलन यशस्वी करण्यासाठी पिंपरी चिंचवडकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन उद्योग मंत्री आणि मुख्य निमंत्रक उदय सामंत यांनी केले.
चिंचवड भोईर नगर येथील कामगार कल्याण मैदानावर नाट्य संमेलनाच्या मंडपाचे पूजन शनिवारी करण्यात आले. यावेळी सामंत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. तत्पूर्वी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी सामंत यांच्या उपस्थितीत नाट्य परिषदेचे पदाधिकारी व प्रतिनिधी यांची आढावा बैठक झाली. यावेळी भाऊसाहेब भोईर, आमदार उमा खापरे, बांधकाम व्यावसायिक राजेश साकला, चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज भोसले, नियामक मंडळाचे सदस्य सतीश लोटके, तळेगाव नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, शिरूर नाट्य परिषदेचे अध्यक्ष दिपाली शेळके, सचिन इटकर, माजी नगरसेवक राहुल कलाटे, अजित गव्हाणे, मयूर कलाटे, अनंत कोऱ्हाळे तसेच संतोष पाटील, राजेंद्र शिंदे, सुदाम परब, संतोष रासने, राजू बंग, आकाश थिटे, प्रणव जोशी आदी उपस्थित होते.
नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध चित्रपट निर्माते डॉ. जब्बार पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार स्वागताध्यक्ष तर स्वागत समिती अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, प्रमुख निमंत्रक म्हणून उद्योग मंत्री उदय सामंत काम पाहणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील महासाधू मोरया गोसावी क्रीडांगणावर मुख्य नाट्य संमेलन होईल. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, ग. दि. माडगूळकर सभागृह, आचार्य अत्रे रंगमंदिर, नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह तसेच भोईर नगर कामगार कल्याण मैदानावर बालनाट्य आयोजित केली जाणार आहेत. या नाट्य संमेलनात १६ व्यवसायिक पेक्षा अधिक नाटके, सुमारे एक हजार अधिक कलाकार सहभागी होतील आणि स्थानिक कलाकारांनाही संधी मिळेल, असे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.

अर्थव्यवस्थेच्या सक्षमीकरणात सनदी लेखापालांचे मोलाचे योगदान-डॉ. अजित रानडे 

आयसीएआय’तर्फे सीए विद्यार्थ्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पुणे : “सनदी लेखापाल ज्ञान आणि सत्य याचा संगम आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला सक्षम बनवण्यात आपण मोलाचे योगदान देत आहात. युवाशक्तीचा सदुपयोग, शहरीकरणाचा विस्तार, अक्षय ऊर्जेचा वाढता वापर, डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना आणि चांगल्या पायाभूत सुविधांची उभारणी यातून भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट्य गाठेल,” असे प्रतिपादन गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी केले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) बोर्ड ऑफ स्टडीज ऑपरेशन्स, आयसीएआय पुणे शाखा आणि ‘विकासा’ पुणे शाखेच्या वतीने आयोजित ‘ज्ञानगम्य : सीए विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद’चे उद्घाटन डॉ. अजित रानडे यांच्या हस्ते झाले. या परिषदेत देशभरातून जवळपास २००० सीए विद्यार्थी सहभागी झाले होते.
वर्धमान सांस्कृतिक केंद्रात झालेल्या सोहळ्यात ‘आयसीएआय’चे केंद्रीय समिती सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीए मंगेश किनरे, सीए दयानिवास शर्मा, विभागीय समिती सदस्य सीए यशवंत कासार, सीए ऋता चितळे, आयसीएआय पुणेचे अध्यक्ष सीए राजेश अग्रवाल, उपाध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, ‘विकासा’ पुणेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार, उपाध्यक्ष साईराम खोंड, कार्यकारिणी सदस्य सीए प्रणव आपटे, सीए काशिनाथ पठारे, सीए प्रितेश मुनोत, ‘विकासा’ पुणेचे सचिव माधविक शहा, खजिनदार समीक्षा सिरसाठ, सहसचिव ओंकार फाफळ, सहखजिनदार सुहास सावंत, संपादकीय प्रमुख स्नेहा वेदपाठक आदी उपस्थित होते.
डॉ. अजित रानडे म्हणाले, “सनदी लेखापाल हा अर्थव्यवस्थेचा महत्वाचा दुवा आहे. उद्योगांसह अन्य आर्थिक व्यवहारांना शिस्त लावण्याचे काम आपण करत असतो. सध्याचे युग हे ज्ञान अर्थव्यवस्थेचे (नॉलेज इकॉनॉमी) आहे. भारतीय उत्पादन व सेवा निर्यातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विकासाच्या मार्गावर झपाट्याने चाललेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला ज्ञानक्रांतीमुळे चालना मिळेल. तंत्रज्ञानयुक्त या नव्या युगात सीए होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा लाभ घेत अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ बनावे. प्रामाणिकपणा व सखोल ज्ञानाच्या आधारे हा व्यवसाय वृद्धिंगत करावा.”
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “सनदी लेखापाल बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वांगीण ज्ञान देण्यासाठी सीए इन्स्टिट्यूट नेहमीच अग्रेसर आहे. पाठ्यक्रमासह अवांतर उपक्रमातून सीए करणारा विद्यार्थी सर्वार्थाने घडतो. सीए देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देणारे शिल्पकार आहेत.”
सीए मंगेश किनरे म्हणाले, “सीए अभ्यासक्रम डिस्टन्स लर्निंग नसून, तो रोजच्या अनुभवातून शिकण्याचा आहे. अधिकाधिक ज्ञान, बदलते तंत्रज्ञान आत्मसात करा. पुणे शाखेच्या वतीने राष्ट्रीय परिषदांचे उत्तम आयोजन होत आहे. देशभरातील २००० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत.” सीए दयानिवास शर्मा म्हणाले, “कोणत्याही क्षेत्रात काम करताना यशस्वितेचा आत्मविश्वास बाळगला पाहिजे. विपुल ज्ञानग्रहण करून उत्तीर्ण होण्याला महत्व आहे. यशस्वी झाल्यानंतर अपयशाला कोणी विचारत नाही. परंतु, अपयशातून चुका सुधारत यशाकडे वाटचाल करणे महत्वाचे असते.”

सीए ऋता चितळे यांनी पुनर्वापर व प्रदूषण कमी करण्याविषयी मार्गदर्शन केले. उपलब्ध संसाधनांचा वापर जपून करण्यासह पाणी व अन्य गोष्टींसाठी प्लास्टिकचा वापर टाळायला हवा, असे आवाहन केले. शाश्वत मानकांचा अवलंब करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

सीए यशवंत कासार म्हणाले, “तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. त्याचा अंतर्भाव सीए व्यवसायात होत आहे. त्यामुळे सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे नवे बदल, तंत्रज्ञान आत्मसात करावे. सतत नवीन गोष्टी शिकत राहाव्यात. शिकण्यात प्रामाणिकपणा जपावा.”
सीए राजेश अग्रवाल म्हणाले, “यशासाठी सातत्य, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी आणि त्याला स्वयंप्रेरणेची जोड हवी. आयसीएआय भवनमध्ये सीए सभासद व विद्यार्थ्यांकरिता कार्यशाळा, चर्चासत्रे, परिषदा सातत्याने आयोजित करण्यात येतात.”
सीए सचिन मिणियार यांनी स्वागत केले. सांची होनराव व अभिषेक पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. सीए अमृता कुलकर्णी यांनी आभार मानले.

सामान्यांना आर्थिक साक्षर बनवण्यात ‘आयसीएआय’चा पुढाकार

0

सीए अर्पित काबरा यांची पत्रकार परिषदेत माहिती; ‘प्रोजेक्ट सप्तर्षी’मधून वाणिज्य शाखेचे विद्यार्थी होणार ‘इंडस्ट्री रेडी’
पुणे : “प्रगत तंत्रज्ञानामुळे आर्थिक व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. डिजिटल माध्यमातून आर्थिक व्यवहार करताना अनेकदा फसवणूक, तसेच सायबर चोरट्यांकडून लूट होते. हे टाळण्यासाठी सामान्य नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करण्यासाठी ‘आयसीएआय’ने पुढाकार घेतला असून, देशभरात आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. तसेच वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘इंडस्ट्री रेडी’ बनवण्यासाठी ‘प्रोजेक्ट सप्तर्षी’मधून ३६ तासांचे कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे,” अशी माहिती दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) अध्यक्ष सीए अर्पित काबरा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बिबवेवाडी येथील आयसीएआय भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समिती सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, ‘डब्ल्यूआयआरसी’चे सचिव सौरभ अजमेरा, खजिनदार सीए केतन सैय्या, आयसीएआय पुणेचे चेअरमन सीए राजेश अग्रवाल, व्हाईस चेअरमन सीए अमृता कुलकर्णी, खजिनदार सीए ऋषिकेश बडवे, कार्यकारणी सदस्य सीए काशिनाथ पठारे, सीए मौशमी शहा, सीए प्रणव आपटे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, सीए काबरा व सहकाऱ्यांनी पुण्यातील जीएसटी आयुक्तालय, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, गरवारे वाणिज्य महाविद्यालय, पूना मर्चंट चेंबर, कॉसमॉस बँक, श्रीमंत दगडूशेठ गणपती आदी ठिकाणी भेट दिली.

सीए अर्पित काबरा म्हणाले, “नागरिकांमधील अर्थसाक्षरतेसाठी आर्थिक साक्षरता अभियान राबविण्यात येत आहे. लेखापालन पुरातन काळापासून अस्तित्वात असून, त्याच्या बदलत्या स्वरूपाचे दर्शन घडवणारे संग्रहालय विविध महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. विदेशात जाणाऱ्या सीएची संख्या वाढत आहे. नवतंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. या सर्व गोष्टीना जुळवून घेता यावे, यासाठी सीए सभासदांकरिता नियमित उपक्रम राबवले जात आहेत.”

सीए केतन सैय्या म्हणाले, “आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये गृहिणी महिला सर्वाधिक बळी पडतात. त्यामुळे आर्थिक साक्षर होण्याची गरज आहे. सीए सभासदांसाठी आचारसंहितेचे पालन यावर मार्गदर्शन सत्रे आयोजिली जातात. देशाच्या अर्थव्यवस्थेला, उद्योग क्षेत्राला सक्षम करण्यासाठी सीए अधिक क्रियाशील व्हावेत, या दृष्टीने विविध चर्चासत्रे, परिषदा, कार्यशाळा नियमित घेण्यात येतात.”

सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “बदलत्या काळानुसार सीए अभ्यासक्रमात बदल होत आहेत. विषयांची संख्या सहा, तर मे २०२४ पासून सीए आर्टिकलपशीपचा कालावधी तीन वर्षांऐवजी दोन वर्षांचा करण्यात आला आहे. यामुळे कमी वयात विद्यार्थ्यांना सीए होता येईल. उद्योग क्षेत्राचा विस्तार पाहता मोठ्या प्रमाणात लेखापाल व सनदी लेखापाल लागणार आहेत.”
सीए राजेश अग्रवाल, सीए अमृता कुलकर्णी यांनीही विविध विषयांची माहिती दिली.