Home Blog Page 1278

खेडशिवापूर नाका पास करताच शिरवळ, आणेवाडी, महाबळेश्वर,वाईत नाकाबंदी लावून पकडले २ वकिलासह ८ आरोपी:मोहोळ हत्या

आरोपी वकील पुणे बार असोसिएशनचे सदस्य आरोपींना पाच दिवसांची, तर वकिलांना तीन दिवसांची पोलिस कोठडी

आरोपींची नावे-१) साहील उर्फ गुन्ना संतोष पोळेकर वय २० वर्ष, रा. शिवशक्ती नगर, गल्ली नं. २७/७ सुतारदरा कोथरुड पुणे, २) नामदेव महीपती कानगुडे वय ३५ वर्षे, रा. भुगाव ता. मुळशी जि. पुणे ३) अमित उर्फ अमर मारुती कानगुडे वय २४, रा. लेन नं. ९५ स्वराज्य मित्र मंडळ पर्वती पुणे, ४) चंद्रकांत शाहु शेळके वय २२ वर्ष, रा. लेन नं. ९४ जनता वसाहत पर्वती पुणे, ५) विनायक संतोष गाव्हणकर वय २० वर्ष, रा. पौड, ता. मुळशी जि. पुणे, ६) विठ्ठल किसन गांदले वय ३४ वर्ष, रा. शिवकल्याण नगर सुतारदरा कोथरुड पुणे, ७) अॅड. रविंद्र वसंतराव पवार, वय ४० वर्ष, रा. नांदेगाव ता. मुळशी जि. पुणे, ८) अॅड. संजय रामभाऊ उडान वय ४३ वर्ष, रा. मुसारी कॉलनी कोथरुड पुणे

पळून जाण्यासाठी वापरलेली वाहने – स्वीफ्ट गाडी क्र. एम.एच. १२ व्ही.क्यु ९५०० व महींद्रा एक्सयुव्ही ७०० एम.एच. १२ यु.एफ.८२८२

 शरद मोहोळ खून प्रकरणामधील संशयित आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण होते. विशेषतः या प्रकरणात पोलिसांनी दोन वकिलांना ताब्यात घेतल्याने वकीलांनी गर्दी केली होती. पोलिसांनी देखील कडक बंदोबस्त ठेवत पुरेपूर खबरदारी घेतल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. दरम्यान, न्यायालयाने सहा संशयित आरोपींना पाच दिवसांची, तर वकिलांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

https://youtu.be/RPsjjHF6GiA

पुणे- कुख्यात गुन्हेगार शरद हिरामण मोहोळ खुन प्रकरणी गुन्हे शाखेने ८ तासात आरोपींना केले जेरबंदकेले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिकृत रित्या दिलेली माहिती अशी कि ,’
कोथरुड मधील रेकॉर्डवरील गुन्हेगार शरद हिरामण मोहोळ वय ४० वर्ष रा. सुतारदरा कोथरुड पुणे याच्यावर शुक्रवार दि. ०५/०१/२०२४ रोजी सुतारदरा येथुन त्याचे स्वतःचे घरी जाताना त्याचे सोबतच असलेला त्याचाच साथीदार आरोपी नागे मुन्ना उर्फ साहील पोळेकर रा. सुतारदरा कोथरुड पुणे याने त्याचे दोन साथीदारांसह गोळीबार करुन शरद मोहोळ याचा निर्धन खुन केला होता. सदर बाबत कोथरुड पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. २/२०२४ भा.द.वि.कलम ३०२, ३०७, ३४ आर्म अॅक्ट कलम ३/७ (२५), महा. पोलीस अधिनियमचे कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याची संवेदनशीलता ओळखुन पोलीस आयुक्त रितेशकुमार पुणे शहर यांनी सह पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे व पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे गुन्हे शाखा, पुणे शहर यांना तात्काळ आरोपींचा शोध घेवुन कारवाई करण्याच्या सुचना गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस उप आयुक्त अमोल झेडे गुन्हे शाखा, पुणे शहर व सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १ सुनिल तांबे यांनी गुन्हे शाखेची ९ पथके तयार करुन आरोपीच्या शोधासाठी पुणे शहर परीसर, मुळशी, सातारा, पुणे ग्रामीण व
कोल्हापुरच्या दिशेने रवाना केली होती.
दरम्यान खंडणी विरोधी पथक-२ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहीती नुसार आरोपी गुन्हा केल्यानंतर चारचाकी वाहनातुन पळुन गेलेले आहेत. व प्राप्त सी.सी.टी.व्ही. विश्लेषणातुन सदरचे आरोपी मुंबई बेगलोर हायवे रोडने सातारा रोडच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय बातमीदार व सी.सी.टी.व्ही. फुटेजद्वारे आरोपी निष्पन्न करुन वापरलेल्या चारचाकी वाहन क्रमांकाचा शोध लावुन नमुद गुन्हयातील आरोपी हे खेड शिवापुर टोलनाका पास होवुन पुढे जात असल्याची माहीती प्राप्त झाली. त्यानुसार पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी खंडणी विरोधी पथक -१ च गुन्हे शाखा युनिट -१ चे अधिकारी व अंमलदार यांच्या पथकांना आरोपीच्या शोधाकरीता तात्काळ मुंबई बेंगलोर हायवेने साता-याच्या दिशेने रवाना केले. त्याच बरोबर पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी पोलीस अधिक्षक सातारा यांचेसी संपर्क साधुन सातारा मार्गावर व शिरवळ, आणेवाडी टोलनाका, महाबळेश्वर फाटा, वाई परीसरात नाकाबंदी लावण्यात आली. त्यानुसार नमुद पथकांनी आरोपींचा शोध घेत असताना पुणे सातारा रोडवर किकवी जवळ तपासात निष्पन्न झालेली संशयीत स्वीफ्ट गाडी क्र. एम.एच. १२ व्ही.क्यु ९५०० या गाडीचा तब्बल ५ कि. मी. पाठलाग करुन आरोपी नामे १) साहील उर्फ गुन्ना संतोष पोळेकर वय २० वर्ष, रा. शिवशक्ती नगर, गल्ली नं. २७/७ सुतारदरा कोथरुड पुणे, २) नामदेव महीपती कानगुडे वय ३५ वर्षे, रा. भुगाव ता. मुळशी जि. पुणे ३) अमित उर्फ अमर मारुती कानगुडे वय २४, रा. लेन नं. ९५ स्वराज्य मिन्त्र मंडळ पर्वती पुणे, ४) चंद्रकांत शाहु शेळके वय २२ वर्ष, रा. लेन नं. ९४ जनता वसाहत पर्वती पुणे, ५) विनायक संतोष गाव्हणकर वय २० वर्ष, रा. पौड, ता. मुळशी जि. पुणे, ६) विठ्ठल किसन गांदले वय ३४ वर्ष, रा. शिवकल्याण नगर सुतारदरा कोथरुड पुणे, ७) अॅड. रविंद्र वसंतराव पवार, वय ४० वर्ष, रा. नांदेगाव ता. मुळशी जि. पुणे, ८) अॅड. संजय रामभाऊ उडान वय ४३ वर्ष, रा. मुसारी कॉलनी कोथरुड पुणे यांना स्वीफ्ट गाडी क्र. एम.एच. १२ व्ही.क्यु ९५०० व महींद्रा एक्सयुव्ही ७०० एम.एच. १२ यु.एफ.८२८२ या वाहनांसह ताब्यात घेतले. सदर वेळी त्यांच्या ताब्यातुन गुन्हयात वापरलेले ३ गावठी पिस्टल, ३ मॅगझीन, ५ जिवंत काडतुसे ८ मोबाईल हॅन्डसेट, रोखरक्कम असा एकुण २२,३९,८१०/- रु.चा माल हस्तगत केला. नमुद आरोपींनी सदरचा गुन्हा हा शरद मोहोळ बरोबर असलेल्या जुन्या वादाच्या कारणावरुन केला असल्याचे प्रथमदर्शनी उघड झालेले आहे.
गुन्हे शाखा पुणे शहर यांनी तात्काळ कारवाई करुन घटनास्थळी गोळीबार करणा-या व त्यांना मदत करणा-या आरोपीना ८ तासाच्या आत ताब्यात घेवुन संवेदनशील खुनाचा गंभीर गुन्हा उघडकीस आणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी हीपोलीस आयुक्त, रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१ सुनिल तांबे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, अजय वाघमारे, शब्बीर सय्यद, श्रीहरी बहीरट, महेश बोलकोटगी, सोमनाथ जाधव, उल्हास कदम, सुनिल थोपटे, क्रांतीकुमार पाटील सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, राहुल पवार, राजेद्र पाटोळे, पोलीस अंमलदार चेतन शिरोळकर, सुरेन्द्र जगदाळे, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, अमोल पिलाणे, अमोल आव्हाड, राजेद्र लांडगे, रविंद्र फुलपगारे, दुर्योधन गुरव, सयाजी चव्हाण, विजय कांबळे, प्रविण ढमाल, विजय कांबळे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, अभिनव लडकत, शशिकांत दरेकरआदींनी केली.

 प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस.सी बिराजदार यांनी सहा संशयित आरोपींना पाच दिवसांची, तर वकिलांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमधील दोन वकील पुणे बार असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यामुळे वकिलांकडून नाराजी व्यक्त वकील न्यायालयाच्या आवारात मोठ्या संख्येने एकत्र जमले होते.दरम्यान, सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी, या पूर्वनियोजित कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे? त्यांना बेकायदा शस्त्रे कुणी पुरवली? त्यामागील उद्देश काय? याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद करत चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली, तर वकीलांच्यावतीने ॲड. एन. डी. पाटील, ॲड.एच.व्ही.निंबाळकर, ॲड. शहा व ॲड. विश्‍वजीत पाटील यांनी, वकील कोणत्याही आरोपींची केस घेऊ शकतात, त्यामुळे त्यांना आरोपींना भेटावे लागते, त्यांना सूचना, सल्ले द्यावे लागतात.या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमधील दोन वकील पुणे बार असोसिएशनचे सदस्य आहेत. त्यामुळे वकिलांकडून नाराजी व्यक्त वकील न्यायालयाच्या आवारात मोठ्या संख्येने एकत्र जमले होते.

दरम्यान, सरकारी वकील नीलिमा यादव-इथापे यांनी, या पूर्वनियोजित कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे? त्यांना बेकायदा शस्त्रे कुणी पुरवली? त्यामागील उद्देश काय? याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद करत चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली, तर वकीलांच्यावतीने ॲड. एन. डी. पाटील, ॲड.एच.व्ही.निंबाळकर, ॲड. शहा व ॲड. विश्‍वजीत पाटील यांनी, वकील कोणत्याही आरोपींची केस घेऊ शकतात, त्यामुळे त्यांना आरोपींना भेटावे लागते, त्यांना सूचना, सल्ले द्यावे लागतात.त्यासाठी त्यांना आरोपी करण्याची गरज नाही, ते तपासाचा भाग होत नाहीत, असा जोरदार युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने संबंधित गुन्ह्यातील वकिलांचा सहभाग सिद्ध होणे आवश्‍यक असल्याचे सांगत ॲड.रवींद्र पवार व ॲड.संजय उढाण या दोन वकिलांना ८ जानेवारीपर्यंत तर साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव कानगुडे, विठ्ठल गांदले, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर यांना १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

आमदार सुनील कांबळेवर कारवाई साठी राष्ट्रवादी ची निदर्शेने

पुणे-ससून रुग्णालयातील एका समारंभाच्या वेळी कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना भाजपचे आमदार सुनिल कांबळे यांनी मारहाण केली. सदर घटनेची चित्रफीत माध्यमांवर उपलब्ध आहे. या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात ससून रुग्णालय येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
“नुकताच आपण पोलिस दलाचा ६३ वा वर्धापन दिन साजरा केला, आपल्या रक्षणासाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
भाजप आमदार सुनिल कांबळे यांनी मात्र पोलिसांच्या श्रीमुखात मारून संपूर्ण पोलिस दलाचा, त्यांच्या त्यागाचा, बलिदानाचा अवमान केला. कायदा करणारेच कायदा मोडत असतील तर जगापुढे आपण आपली काय प्रतिमा तयार करत आहोत याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणून किमान जनाची नाही तर मनाची लाज वाटून महाराष्ट्र सरकारने आमदार सुनिल कांबळे यांना तातडीने पदमुक्त करावे.” अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.
भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे गृहमंत्री आहेत. स्वपक्षाच्या आमदाराचा राजीनामा त्यांना घेता येत नसेल तर त्यांनी स्वतः गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. या आंदोलन प्रसंगी प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, कणव चव्हाण, शेखर धावडे, नितीन पाटोळे, मीनाताई पवार, अजिंक्य पालकर, सुवर्णाताई माने, मृनालताई वाणी, रूपालीताई शिंदे, गणेश नलावडे, नीताताई गलाडे, दीपक कामठे आदि मोठ्या संखेने कार्यकर्ते उपस्तिथ होते.

आशयप्रधान आणि  वास्तवावर भाष्य करणारी नाटकं व्हायला हवीत – शरद पवार यांनी व्यक्त केली भावना

पिंपरी – चिंचवड: नाटक हे ज्ञान आणि मनोरंजनाचे साधन आहे. निखळ मनोरंजन करणारी, आशयप्रधान आणि  वास्तवावर भाष्य करणारी नाटकं  व्हायला हवीत. प्रायोगिक व व्यावसायिक, बाल रंगभूमीला विशेष अनुदान राज्य सरकारने दिले पाहिजे. तसेच ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, तिकीट दरात कपात व्हावी अशी अपेक्षा  १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. 

१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा आज पिंपरी- चिंचवड येथे पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, आमदार उमा खापरे, आमदार अण्णा बनसोडे, आमदार श्रीरंग बारणे, उद्योगमंत्री उदय सामंत, अभिनेते मोहन जोशी, अशोक हांडे, डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले. अ. भा. म. नाट्य परिषद पिंपरी शाखेचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष सुरेशकुमार साकला, उपाध्यक्ष नरेश गडेकर, अ. भा. म. नाट्य परिषद कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते. या सोहळ्यात मावळते ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांना संमेलनाअध्यक्षांची सूत्रे सुपूर्द केली. 

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, चित्रपटसृष्टी आधी हजारो वर्ष सर्वाधिक प्रभावी माध्यम ही रंगभूमी होती. मात्रा आता  जवळपास सर्व निर्माते कलाकार हे हिंदी चित्रपटाकडे वळत आहेत. त्यामुळे मराठी रंगभूमी ओस पडत आहे. तसेच हल्ली डिजिटल माध्यमातही नाटकं सादर होतात. मात्र त्यामध्ये रंगभूमीचा जीवंतपणा नसतो असेही पवार यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देशाला ज्याप्रमाणे पुरातन मंदिरं आणि शौर्याचा इतिहास आहे. तसाच नाट्य आणि नृत्य परंपरेचा देखील इतिहास आहे. त्यामुळेच मराठी प्रेक्षक ओटीटी आणि सोशल मीडिया असताना देखील नाटकांना गर्दी करतात. राजकारणी चांगले कलाकार आहेत असे बोलले जाते. मात्र तुमची कला आमच्या पेक्षा अवघड आहे. राजकारनात कधी कधी धाडसी निर्णय घेतले जातात. दीड वर्षांपूर्वी सत्ता बदलाचा पहिला अंक झाला आहे. आता दुसरं अंक सुरू आहे. तर निवडणुकीच्या निकाला नंतर तिसरा अंक पार पडणार आहे.  तसेच नाटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

उदय सामंत म्हणाले, १०० नाट्य संमेलन होताना भाऊसाहेब भोईर यांनी माजी संमेलनाअध्यक्षांची आठवण ठेवली ही कौतुकास्पद आहे. ज्या प्रमाणे उद्घाटन सोहळा होत आहे. त्याप्रमाणे उर्वरीत विभागीय संमेलनं व्हायला हवीत. मात्र संमेलन होत असताना त्यावेळी बॅक स्टेज कलाकार, तंत्रज्ञान यांचा देखील विचार व्हायला पाहिजे. 

प्रशांत दामले म्हणाले, आम्हा कलाकारांसाठी नाट्य संमेलन दिवाळी असते. प्रत्येक जण नाटक, ओटीटी, सिनेमा यामध्ये काम करत असतो. मात्र सगळे यामधून वेळ काढून या संमेलनासाठी येतात. आमचे विचार व्यक्त करण्यासाठी ही योग्य जागा आहे. रसिक प्रेक्षकांनी पुढच्या पिढीला नाटक पाहण्याची सवय लावावी, अशी अपेक्षा यावेळी प्रशांत दामले यांनी व्यक्त केली. तसेच राज्यातील नाटकांच्या दुरावस्थेवर व गैरसोईवर, भाडेवाढीवर भाष्य करीत त्यावर उपाय योजना करण्यासाठी दामले यांनी  मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली.

मावळते नाट्य संमेलनाअध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी यावेळी विविध मागण्या मांडल्या. तसेच, नाट्य संमेलनाअध्यक्षांना मिळणारा निधी कमी आहे. तो वाढून मिळावा, त्याचप्रमाणे नाट्य परिषदेच्या कार्यालयात नाट्य संमेलनाअध्यक्षांना वेगळे दालन व्हावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.  सध्या सामाजिक कुरूपता जी निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी सर्व कलाकारांनी पुढे यायला पाहिजे.  असेही त्यांनी सांगितले. 

१०० व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल म्हणाले,  माझ्या आजवरच्या प्रवासात अनेक दिग्गजांचे योगदान आहे. नाट्यसृष्टीचे  अनेक प्रश्न आहेत. आज प्रामुख्याने  मी  नाटकात येऊ इच्छित असलेल्या मुलांसाठीचा महत्वपूर्ण विषय मांडत आहे. राज्याच्या प्रत्येक विद्यापिठात नाट्य विभाग आहे मात्र त्यांना त्यासाठीचा खर्च  त्यांनीच उभा करायचा आहे, हा खर्च ५ ते ७ कोटी रुपयांचा आहे, प्रत्येक विद्यापीठाला तो झेपणारा नाही यामुळे राज्य सरकारने प्रत्येक विद्यापीठाच्या नाट्य विभागाला अनुदान दिले पाहिजे. तसेच इथे सादर होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नाटकांना सेन्सॉरशिप लावू नये असे सांगितले.   

नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले, मोरया गोसावींची ही भूमी आहे. २७ वर्ष काम केल्याचे १०० वे नाट्य संमेलन हे फळ आहे. पुणे ही सांस्कृतिक नगरी आहे पण पिंपरीला उप सांस्कृतिक राजधानी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. सर्वांच्या मदतीने हे नाट्य संमेलन होत आहे. यावेळी मी लोक कलावंतांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी भाऊसाहेब भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली. 

यावेळी नाट्य संमेलनाची स्मरणिका ‘नांदी’, नाट्य संमेलनाध्याक्ष प्रेमानंद गज्वी यांचे आत्मकथान ‘रंगनिरंग’ याचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अ. भा. म. नाट् परिषदेचे कार्याध्यक्ष प्रास्ताविक अजित भुरे यांनी केले.

रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचा विषय तत्काळ निकाली 

पिंपरी चिंचवड मधील प्रा. रामकृष्ण मोरे पूर्वी अतिशय चांगल होत. मात्र आता रात्री नाट्य प्रयोग संपल्यावर तेथे जेवण वाढण्यासाठी ५०० रुपये घेतले जातात. हे दुर्दैवी आहे. तसेच येथे लाईट बील आशिया खंडात सर्वाधिक घेतलं जातं, अशी खंत प्रशांत दामले यांनी व्यासपीठावर भाषण करताना बोलून दाखवली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ आयुक्तांना बोलावून हा प्रश्न मार्गी लावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन

मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध-मुख्यमंत्री

पुणे, दि.६: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल तसेच वृद्ध कलावंतांचे मानधन वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन यावेळी श्री. शिंदे यांनी केले.

मोरया गोसावी क्रीडा संकुल चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णुदास भावे रंगमंचावर आयोजित या कार्यक्रमाला उद्योगमंत्री तथा नाट्य संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत, ज्येष्ठ नेते तथा नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष खा.शरद पवार, खासदार श्रीरंग बारणे, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.

मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे १०० वर्षे ही गौरवशाली परंपरा लाभली असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, देशात नाट्य कलेला २ हजार वर्षांची दीर्घ परंपरा लाभली आहे. मराठी रंगभूमीची सुरुवात विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर नाटकाने झाल्यानंतर मराठी रंगभूमीने अनेक बदल पाहिले आहेत. अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमी बहरली.

नाटक रसिकांच्या पसंतीस उतरण्यासाठी आशय, विषय, सादरीकरण, नेपथ्य, संगीत याची चाकोरी मोडण्याची गरज असते, मराठी रंगभूमीने ते केल्याने या रंगभूमीचा उत्कर्ष होत आहे. आज समाजमाध्यमांच्या काळातही प्रेक्षक नाटकांना गर्दी करतात. व्यावसायिक सोबत प्रायोगिक रंगभूमीलाही चोखंदळ प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हजारो कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांनी यासाठी योगदान दिले आहे. गेल्या १०० वर्षात सुवर्णकाळ अनुभवताना अनेक अडचणींवर मात करीत रंगभूमी पुढे जात आहे. म्हणूनच या रंगभूमीचा आनंद सोहळा दिमाखात साजरा होत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

नाट्यसृष्टीच्या उत्कर्षासाठी एकत्रित प्रयत्न
मराठी रंगभूमीच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद करून श्री. शिंदे म्हणाले, १०० वे नाट्य संमेलन असल्याने नाट्य संमेलनासाठी ९ कोटी ८३ लाख आणि मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासाठी १० कोटींचा निधी देण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाकडून नवी नाट्यगृहे उभारण्यात येणार आहेत मात्र हे करतांना नाट्य कलावंतांच्या मागणीनुसार जुन्या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल.

मराठी नाट्य परिषदेसाठी मुंबईत भूखंड देण्याबाबत सहकार्य करण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नाट्यगृहात पूर्वीप्रमाणे विजेचा खर्च आकारला जाईल. ज्येष्ठ कलावंतांच्या घराबाबतही शासन सकारात्मक आहे. नाट्यसृष्टीच्या उत्कर्षासाठी एकत्रित प्रयत्न करताना मराठी रंगभूमीसाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.

मराठी नाटकाने मनोरंजन आणि प्रबोधनाचे कार्य केले-खासदार शरद पवार
चिंचवडच्या पावन भूमीत नाट्य संमेलन होत असल्याबाबत आनंद व्यक्त करून ज्येष्ठ नेते  खा.शरद पवार म्हणाले, सर्व कलांचा संगम असलेली रंगभूमी सर्वाधिक परिणामकारक माध्यम आहे. नाट्याचा मुख्य उद्देश मनोरंजन असल्याचे भरतमुनी यांनी म्हटले आहे, मात्र नाटकाच्या माध्यमातून प्रबोधन आणि ज्ञानदानाचे कार्य उत्तमरीतीने होते. रंगभूमीच्या माध्यमातून अनेक वर्षे लोकप्रबोधनाचे कार्य होत आहे. मराठी नाट्यसृष्टीद्वारे नवे विषय मांडले जात आहेत. नाट्य रसिकांना नाटकांकडे आकर्षित करणारी नाटके रंगभूमीवर यावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नाट्य संमेलनाच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागात कार्यक्रमांचे आयोजन होणार असल्याने नाट्यरसिकांना ही मोठी पर्वणी आहे, असेही श्री.पवार म्हणाले.

उद्योगमंत्री श्री.सामंत म्हणाले, पिंपरी चिंचवड येथे नाट्य संमेलनाचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या नाट्य संमेलनानंतर कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी  बैठकीचे आयोजन व्हावे आणि ज्येष्ठ कलाकारांच्या वृद्धाश्रमासाठी शासनाने निधी द्यावा,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शासनातर्फे नाट्य संमेलनासाठी प्राप्त निधीचा उपयोग कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांना मानधन आणि आरोग्य विमा काढण्यासाठी करण्यात येईल, असेही श्री. सामंत म्हणाले.

नाट्य प्रशिक्षणाद्वारे रंगभूमीचा विकास-जब्बार पटेल
नाट्य संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल म्हणाले, मराठी रंगभूमी प्रगल्भ आणि विविधतेने नटलेली आहे. नाट्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून  रंगभूमीचा अधिक विकास होईल. देशपातळीवरील उत्तम कलाकारांच्या माध्यमातून विद्यापीठातून नाट्यकलेचे प्रशिक्षण आणि संशोधन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

जगात सुंदरता निर्माण करण्यासाठी कलावंतांनी एकत्रित प्रयत्न करावा असे मावळते संमेलनाध्यक्ष श्री. गज्वी म्हणाले.

प्रशांत दामले यांनीदेखील यावेळी विचार व्यक्त केले. नाट्य संमेलन हे कलावंतांसाठी दिवाळी असून एकत्रित विचार करण्याची उत्तम जागा आहे, असे श्री. दामले म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वस्त अजित भुरे यांनी केले. श्री.भोईर यांनी स्वागतपर भाषणात नाट्य संमेलनाच्या आयोजनात सहकार्य करणाऱ्या सर्वांना धन्यवाद दिले.

यावेळी वामन पंडित संपादीत ‘रंगवाचा’ या नियतकालिकाचे आणि १०० मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शाखेतर्फे तयार करण्यात आलेल्या ‘नांदी’ या स्मरणिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते, तर प्रेमानंद गज्वी यांचे आत्मकथन ‘रंग निरंतर’चे प्रकाशन ज्येष्ठ नेते पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन आणि घंटेचे पूजन करून १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ नेते तथा नाट्य परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांच्या हस्ते रंगमंचाच्या पडद्याचे अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार उमा खापरे, अण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नाट्य परिषदेचे सर्व विश्वस्त, कृष्णकुमार गोयल, पी.डी. पाटील, नाट्य कलावंत आणि नाट्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

विशेष मुलांनी तयार केलेले राममंदिर हे राम भक्तीचे सर्वोच्च कलश – मंत्री चंद्रकांतदादा पाटील.

क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या साहाय्याने श्रीराम मंदिराचे लोकार्पण

पुणे-“अब नार्मल होम” संस्थेच्या विशेष मुलांनी उभारलेली अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती ही कण कण में राम ची प्रचिती देणारे असून हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण आहे, ह्या प्रतिकृतीचे लोकार्पण करताना मला मनस्वी आनंद होत आहे, मी ह्या विशेष मुलांना अभिवादन करतो असे गौरवोदगार ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रुप यांच्या वतीने अब नार्मल होम संस्थेच्या विशेष मुलांनी तयार केलेल्या श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचे आज लोकार्पण करण्यात आले त्या कार्यक्रमात मा. चंद्रकांतदादा पाटील बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, ग्लोबल ग्रुप चे संचालक राहुल बग्गा, शिक्षण समिती अध्यक्ष माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, संस्थेच्या संचालिका किशोरी पाठक, संस्थापक पंकज मिठभाकरे, युवा नेते मंदार बलकवडे,सरचिटणीस दीपक पवार, क्रीडा आघाडी संयोजक प्रतीक खर्डेकर, सौ. अनुभा वर्तक, जलतरंग वादक मिलिंद तुळणकर तसेच विशेष मुलं व विशेष मुलांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्वा अप्रतिम !! असे उद्गार सहजपणे दादांच्या तोंडून बाहेर पडले आणि मग विशेष मुलांच्या प्रतिभेचे कौतुक करताना संस्थेच्या कार्याला भरभरून मदत करण्याचे वचन ही मा. चंद्रकांतदादांनी दिले. राजकारण करत असताना समाजकारण मौल्यवान असते आणि त्यातून आत्मिक शांती आणि काम केल्याचे समाधान मिळते असे चंद्रकांतदादांनी सांगितले.आज संपूर्ण देश राममय झाला असताना विशेष मुलांनी देखील शिक्षकांच्या साहाय्याने राममंदिर उभारले हे वेगळेपण तर आहेच पण परमेश्वर देखील माणसात कुठे काही कमी दिले तर त्याची भर इतर कला गुण किंवा कौशल्याच्या माध्यमातून करत असतो हेच हे सुंदर मंदिर बघताना जाणवते असे ही ते म्हणाले.
क्रिएटिव्ह फाउंडेशनचे सदस्य वर्षभर सेवा कार्यात व्यग्र असतात आणि दान हे सत्पात्री असावे व ते योग्य ठिकाणी गरजूपर्यंत पोहोचावे यासाठी आम्ही काम करतो असे फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.समाजात दानशूर कमी नाहीत, आपणच त्यांच्या पर्यंत पोहोचण्यात कमी पडतो असे ही संदीप खर्डेकर म्हणाले.ह्या कॅलेंडर वर्षाची सुरुवात विशेष मुलांना मदतीचा हात देऊन करताना मनस्वी आनंद होत आहे असेही खर्डेकर म्हणाले. ग्लोबल ग्रुप सी एस आर आणि इतर माध्यमातून समाजोपयोगी कार्य करत असते असे ग्लोबल चे संचालक राहुल बग्गा म्हणाले. ज्या ज्या ठिकाणी गरज असेल तेथे आम्ही असू असेही त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेच्या संचालिका सौ.किशोरी पाठक यांनी संस्थेची माहिती देताना सध्या 45 विद्यार्थी असून आम्ही विशेष विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देताना त्यांच्यातील कलागुणांना विकसित करण्याचा प्रयत्न करतो असे सांगितले.हे मंदिर तयार करताना शुभम गायकवाड याने विशेष विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हे राममंदिर पुणेकरांना बघण्यासाठी आम्ही व्यवस्था करत आहोत व शक्य झाल्यास एका मोठ्या गाड्यावर हे मंदिर विविध चौकात दर्शनासाठी उपलब्ध करू असे सौ. मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. तसेच ह्या मंदिरात स्थापित केलेली प्रभू श्रीराम, सीतामाता व लक्ष्मणाची सुंदर मूर्ती व विद्युत व्यवस्था अत्यन्त प्रेक्षणीय असल्याचेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.

पुणे विमानतळ येथील नूतन टर्मिनल २ पंधरा तारखेपर्यंत सुरू न केल्यास 16 जानेवारी रोजी टर्मिनल उद्घाटन करू -मोहन जोशी

पुणे-माजी आमदार उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मोहन जोशी आमदार रवींद्र धंगेकर दत्ता बहिरट सुनील मलके यांनी पुणे विमानतळ प्राधिकरणाचे संचालकाना भेटून गुलाब पुष्प आणि निवेदन देऊन गांधीगिरी ने आंदोलन करण्यात आले.

यावेळी चेतन अग्रवाल सरचिटणीस संकेत गलांडे युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे रोहन सुरवसे उपस्थितीत होते

नवीन टर्मिनल लवकरच सुरू करण्यासंदर्भात विनंती केली असून ते टर्मिनल पंधरा तारखेला जानेवारीपर्यंत सुरू न केल्यास पुणेकरांसाठी 16 जानेवारी रोजी टर्मिनल चे उद्घाटन करून सर्वसामान्य पुणेकरांसाठी खुल्या करण्याच्या इशारा देण्यात आला आहे.

या संदर्भात एक मेल करून एक जानेवारी रोजी हे टर्मिनल सर्वसामान्य पुणेकरांसाठी खुले करावे अशी विनंती केली होती.

मात्र, आजतागायत याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

प्रवाशांचे हाल लक्षात घेऊन, पुढील 10 दिवसांत नवीन टर्मिनलचे उद्घाटन करा, असे न झाल्यास प्रवाशांच्या हितासाठी आम्हाला आमची पुढील कृती ठरवावी लागेल.
पुणे नूतन टर्मिनल चे सर्व काम पूर्ण झाले असून या संदर्भात योग्य ती कारवाई पूर्ण झालेली आहे या संदर्भात फक्त आणि फक्त उद्घाटन करण्याची तारीख बदलत असल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे

15 जानेवारीपर्यंत उद्घाटन न झाल्यास 16 जानेवारी रोजी उद्घाटन करून पुणेकरांसाठी एअरपोर्टचे नवीन टर्मिनल खुले करण्यात या इशारा देण्यात आलेला आहे

‘हे ‘ नेते ठरविणार पुणे लोकसभेचा उमेदवार –म्हणाले बावनकुळे

पुणे- पुणे लोकसभेची पोट निवडणूक हा विषय आता संपला असला तरी पंचवार्षिक लोकसभेच्या २०२४ ला होणाऱ्या निवडणुकीसाठी पुण्यातून भाजपा आणि एकनाथ शिंदे गट , अजित पवार गट अशा मह्युती तर्फे कोणाला उमेदव्री द्यायची याचा निर्णय केंद्रीय कार्ड कमिटी घेणार आहे. तो तुम्ही आम्ही घेणार नाही , मात्र देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे ,अजित पवार याबाबत योग्य त्या उमेदवारांची नावे दिल्लीश्वर यांच्याकडे पाठवतील नंतर त्यातील कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय दिल्लीतूनच होईल असे येथे भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले , पुण्यातून आम्ही ५१ टक्के मते घेऊन विजयी होऊ असे ते म्हणाले.

आमदार सुनील कांबळेंंचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय कारवाई नाही – भाजपा प्रदेश अध्यक्ष बावनकुळे

पुणे- आमदार सुनील कांबळे यांनी पोलिसाला आणि अजित पवारांच्या कार्यकर्त्याला कानाखाली लागल्यचे व्हिडीओसह बातम्या काल प्रसिध्द झाल्यानंतर आज त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून , गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकारची गंभीर दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे, पक्ष पातळीवर देखील या घात्नेही आम्ही गंभीर दाखल घेतली आहे , मात्र सुनील कांबळे यांचे म्हणणे ऐकून घेणार आहोत . त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्या शिवाय कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज म्हटले आहे.माजी महापौर मुरलीधर मोहोळ , माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, अमोल बालवडकर आदी कार्यकर्ते यावेळी बावनकुळे यांच्या समवेत होते.

शरद मोहोळच्या हत्येचा थरारक CCTV व्हिडिओ:हत्येत 2 नामांकित वकिलांचाही समावेश

पुणे-पुण्यातील कुख्यात गँगस्टर शरद मोहोळच्या हत्येचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये 2 हल्लेखोर त्याच्यावर गोळ्या झाडत असल्याचे दिसून येत आहे. शरदसोबत चालत असलेल्या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले. दरम्यान, शरदच्या इतर साथीदारांनी त्याला उचलून रुग्णलयात दाखल केले.

https://youtu.be/RPsjjHF6GiA

2 नामांकित वकिलांचा सहभाग
पुण्यातील कोथरूडच्या सुतारदरा परिसरातील गल्लीमध्ये त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यावेळी हल्ल्यानंतर तो खाली कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत आठ आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच याप्रकरणात 2 नामांकित वकिलांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही वकील या हल्ल्यात सहभागी असल्याचे बोलले जात आहे.

लग्नाच्या वाढदिवसादिवशीच अंत
हल्लेखोरांनी शरद मोहोळवर गोळीबार केला होता. यामध्ये त्याला तीन गोळ्या लागल्या होत्या. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरुडमधीलच खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पंरतु उपचारादरम्यान शरद मोहोळचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, लग्नाच्या वाढदिवसादिवशीच शरद मोहोळचा अंत झाला.

आरोपींकडून शस्रही जप्त
या प्रकरणात जो मुख्य आरोपी आहे त्याला पोलिसांनी पाठलाग करून शिरवळ जवळ ताब्यात घेतलं आहे.या आरोपींकडून 3 पिस्टल जप्त केली आहेत.ज्या पिस्टल मधून शरद मोहोळ याच्यावर हल्ला करण्यात आला होता ती पिस्टल देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या आरोपींकडून हल्ल्याच्या वेळेस वापरलेल्या 2 दुचाकी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार, यातील काही आरोपींचे शरद मोहोळशी जमिनीवरून आणि आर्थिक गोष्टीवरून वाद झाले होते आणि त्याचाच बदला घेण्यासाठी आज या आरोपींनी शरद मोहोळ याला जिवे मारण्याचा कट रचला. शरद मोहोळ खून प्रकरणात प्रमुख आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

भर गर्दीत पोलिसाला मुस्काडात लगावणाऱ्या आमदाराला मकोका का लावत नाही ?

पुणे- महाराष्ट्र पोलीस च भाजपच्या काही नेत्यांच्या दहशतीखाली आहेत काय ? असा प्रश्न उपस्थित होत असताना या पुर्विचेही काही गुन्हे दाखल असताना आणि उपमुख्यमंत्री यांच्याच सरकारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री यांच्याच कार्यकर्त्याला आणि पोलिसाला देखील मुस्काडात हाणणारा साधा सामान्य माणूस नाही तो चक्क आमदार आहे, महापालिकेच्या स्थायी समितीचा माजी अध्यक्ष आहे.एकीकडे १६/१७ / १८ /१९ वयाच्या मुलांना कुख्यात गुन्हेगार म्हणून त्यांना मकोका लावून त्यांचे आयुष्य बरबाद करण्यात जर येते आणि त्याची शंभरी साजरी केली जात असताना मात्र दुसरीकडे पोलीस या आमदाराच्या दहशतीखाली आहेत कि त्याच्या पक्षाच्या ? कि खुद्द गृहमंत्र्यांच्याच दहशतीखाली काम करत आहेत असाही प्रश्न कोणी उपस्थित केला तर तो वावगा ठरेल काय ? या आमदारावर मागे काही गुन्हे दाखल आहेत,भर गर्दीत सडाफटिंग आणि रोखठोक आणि प्रशासनावर पकड असलेले दादा म्हणून परिचित असलेल्या नेत्याच्याच कानाखाली आवाज काढला जातोय,एवढेच नव्हे तर पोलीसाच्याही मुस्काडात दिली जातेय…हे दहशतवादी कृत्य नाही तर काय आहे ? आज आमदारच जर असे वागत असेल तर नेहमीच त्यांच्या भोवताली घुटमळणारे कार्यकर्ते जनतेशी कसे वागत असतील ? या सर्व विचार मंथनाला सुरुवात झाल्याचे दिसू लागले आहे आणि त्यातच कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी किमान हि बातमी लिही पर्यंत साधलेली चुप्पी,भाजपच्या वर्तुळातून यावर काहीही न आलेली प्रतिक्रिया,आणि खुद्द अजित पवार सेफ असले तरी त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या समवेत सेफ आहेत काय ? या प्रश्नाचे हवे असलेले अजित पवारांच्या गटाकडून अद्याप न झालेला खुलासा..आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कडून मात्र तातडीने घेण्यात आलेले आंदोलन या राजकारणात आता उजवे कोण ? डावे कोण ? याचे उत्तर शोध्याची देखील वेळ आली आहे. बाकी त्या आमदारावर मकोका लावायचा नाही याबाबत त्याचे वकील आणि पोलीस आपापली बाजू मांडतीलच पण जनतेच्या मनात मात्र शंका निर्माण होत राहतील असे दिसते आहे.

नाट्य कलावंतांसोबत पारंपारिक लोककलांनी सजली नाट्य दिंडी

पिंपरी  : ढोल, ताशा, लेझीम, गुलाबी फेटे, रांगोळ्यांच्या पायघड्या अन् सर्व कलाकारांच्या उपस्थित १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची नाट्य दिंडी आज निघाली. नाट्य कलावंतांसोबत पारंपारीक लोक कला असलेल्या वासुदेव, पिंगळा, पोतराज, गोंधळी, दशावतार या लोककलाकारांच्या लोककलेने ही नाट्य दिंडी सजली होती. ही नाट्य दिंडी पाहण्यासाठी पिंपरी -चिंचवड करांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली. यावेळी नागरिकांना कलाकारांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. नाटक किंवा सिनेमात दिसणारे कलाकार नाट्य दिंडीत दिसल्याने नागरिकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. तसेच अनेकांनी हे सर्व क्षण आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले.नाट्यदिंडीमध्ये अभिनेत्री कविता लाड, तेजश्री प्रधान, सुरेखा कुडची, प्रतीक्षा लोणकर, निर्मिती सावंत,अमृता सुभाष,प्रिया बेर्डे, वर्षा उसगावकर, स्पुहा जोशी, कांचन अधिकारी, शुभांगी गोखले, सुकन्या मोने, सविता मालपेकर तसेच अभिनेता सुशांत शेलार, भारत जाधव, सिद्धार्थ जाधव, चेतन दळवी, संजय मोने, वैभव मांगले, उमेश कामत, संजय खापरे, सुयश टिळक, पुष्कर श्रोत्री, संदीप पाठक यांसह अनेक प्रसिद्ध कलावंत सहभागी झाले

मोरया गोसावी मंदिरा पासून या नाट्य दिंडीला सुरूवात झाली. गांधी पेठ, तानाजी नगर मार्गे ही दिंडी श्री मोरया गोसावी क्रिडा संकुलापर्यंत पोचली.

नाट्य दिंडीचे स्वागत लोकांनी खूप उत्साहात केले. नाट्य दिंडीच्या सुरूवातीला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा पिंपरी- चिंचवडचे उपाध्यक्ष कृष्णकांत गोयल, कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल आणि असंख्य नाट्य कलावंत सहभागी झाले होते.

पिंपरी – चिंचवडकरांची सकाळ ढोल, ताशा अंन लेझीम अन् जयघोषाच्या आवाजाने झाली. त्यात सकाळच्या वेळी वासुदेव, पिंगळा, गोंधळी, वाघ्या – मुरळी यांच्या सादरीकरणाने नागरिक भारावून गेले होते. ही दिमाखदार नाट्य दिंडी पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली. ठिकठिकाणी थांबून नागरिकांनी या नाट्य दिंडीचा नयनरम्य सोहळा अनुभवला. नाट्य दिंडी आपल्या दारी असा काहीसा अनुभव या रसिकांनी यावेळी अनुभवला.

.

सवंगडीचा ११ वा वर्धापनदिन होणार साजरा

मुंबई-मुलूंडची सवंगडी अशी वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी संशोधनाची जोड असलेला ११ वर्षाचा अविरत प्रवासच कारण आहे. ७ जानेवारीला सवंगडीचा वर्धापनदिन महाराष्ट्र सेवा संघ मुलूंड पश्चिम येथे साजरा होत आहे.मुलांचे बालपण व भावविश्वाचा अभ्यासपूर्ण विचार ही खरी सवंगडीची ओळख आहे. “मुलांना शिकवू नका,शिकू द्या” हे सवंगडीचे ब्रिद वाक्य श्रध्दा ताईंच्या विचाराचे वेगळेपण सवंगडीत घडणा-या मुलांमध्ये ही जाणवते. सवंगडीच्या संचालिका श्रध्दाताई सवंगडीच्या माध्यमातून मुलांच्या नैसर्गिक वाढीला पोषक वातावरण देऊन,मुलांच्या उपजत क्षमतांना संधी देणारे उपक्रम राबवत आहेत.
लहान वयात शाळा,स्पर्धा यांची शृंखला मुलांच्या आयुष्याला फुलण्यासाठी ,मोकळा श्वास घेण्यासाठी व सर्वात महत्वाचे स्वतःला ओळखण्यासाठी वेळ देतात का ? या प्रश्नाचे उत्तर सवंगडीच्या उपक्रमांना बघितल्यावर मिळते.

संपूर्णपणे मराठी भाषा,संस्कृती व वैज्ञानिक दृष्टीकोन यांचा सुरेख संगम सवंगडीत दिसतो.सवंगडीच्या माध्यमातून सुदृढ शरीर व संस्कारक्षम मन घडते.कुटूंबाचा व समाजाचा विचार करणारी पिढी घडावी ही इच्छा मनात ठेवूनच श्रध्दाताईंनी सवंगडी सुरू केली. आता हा सवंगडीचा वटवृक्ष बहरत राहो हि वर्धापन दिनाचे औचित्य साधुन शुभेच्छा देऊ या.

दीर्घ कालीन वैचारिक, सांस्कृतिक युद्ध जिंकावे लागेल : योगेंद्र यादव

पुण्यात ‘विचारवेध’ संमेलनास प्रारंभ’ लोकशाहीच्या संरक्षणासाठी लोकांचा जाहीरनामा ‘ विषयावर  चर्चा 
पुणे :
‘जर्मनीत , युरोपात अपयशी ठरलेले हुकूमशाहीचे मॉडेल भारतावर लादण्याचा प्रयत्न होत आहे.  वैचारिक, सांस्कृतिक युद्ध असून ते जिंकावे लागेल. राजकारण हे या युद्धातील अवजार आहे.ते टाळता येणार नाही.  काही वेळा आपण असमर्थ ठरलो आहोत. आपण काही लढाया हरल्या तरी युद्ध जिंकू, यात शंका नाही. विचारवेध संमेलनासारखे प्रयत्न त्यासाठी महत्वाचे आहे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी केले.

विचारवेध असोसिएशन, युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या वतीने आयोजित विचार वेध संमेलनास शनीवारी सकाळी गांधी भवन येथ प्रारंभ झाला. त्यावेळी उद्घाटन सत्रात योगेंद्र यादव बोलत होते. तुषार गांधी, डॉ.कुमार सप्तर्षी, आनंद करंदीकर, सुभाष लोमटे, श्रीरंजन आवटे , मुकुंद किर्दत , सुनीती सु.र., संदीप बर्वे,नीलम पंडित, सरिता आवाड , हरीश सदानी,गणेश विसपुते आदी मान्यवर उपस्थित होते.
दि.६ आणि ७ जानेवारी रोजी विचारवेध संमेलन – २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. गांधी भवन, कोथरूड येथे हे संमेलन होत आहे.’ लोकशाहीच्या संरक्षणासाठी लोकांचा जाहीरनामा ‘ ही या संमेलनाची संकल्पना असून विविध आंदोलनातील कार्यकर्ते तसेच विचारवंत सहभागी झाले आहेत.
शनिवारी ६ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा  वाजता योगेंद्र यादव यांच्या ‘लोकतंत्र की रक्षा के सामने चुनौतीया’ भाषणाने संमेलनाचा प्रारंभ झाला.

योगेंद्र यादव म्हणाले,’ लोकशाहीत फक्त संख्या महत्वाची नाही, तर समुदाय महत्वाचा आहे.या वेळच्या निवडणुका हातातून गेल्या तर संविधान शिल्लक राहणार नाही.  यावेळचे संकट आणीबाणी पेक्षा गंभीर आहे. संविधानातील मूलभूत विचारांवर सुनियोजित आणि अभूतपूर्व हल्ला आहे.
आत्ताच्या तथा कथित राष्ट्रवादाचा उगम न्यूनगंडातून आला आहे.शील, करुणा मानणाऱ्या भारताच्या स्वधर्मावर हल्ला झाला आहे.जर्मनीत , युरोपात अपयशी ठरलेले मॉडेल भारतावर लादण्याचा प्रयत्न होत आहे. आपण असमर्थ ठरलो आहोत. आपण काही लढाया हरल्या तरी युद्ध जिंकू, यात शंका नाही. वैचारिक, सांस्कृतिक युद्ध असून ते जिंकावे लागेल. राजकारण हे या युद्धातील अवजार आहे.ते टाळता येणार नाही. या पार्श्वभूमीवर विचार वेध संमेलनाचे आयोजन महत्वपूर्ण आहे. सत्तेत बसलेले लोकच प्रजासत्ताक तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आगामी ४ महिने फक्त निवडणुका जिंकण्याचे काम करावे लागेल. आपले भवितव्य पणाला लागले आहे. देश, संविधान वाचवले पाहिजे, असेही योगेंद्र यादव यांनी सांगीतले.
संस्कृती,राष्ट्रवाद, धर्म या गोष्टी संघ परिवाराच्या तावडीतून सोडवून खरा भारत घडवला पाहिजे. संविधानाला संसद, सर्वोच्च न्यायालय वाचविणार नाही, आपल्याला ते वाचवावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले 
*दोन दिवस विचार परामर्श,मुक्त संवाद,प्रश्नोत्तरे* 
यावर्षी लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना पुरेशा माहितीवर आधारित, विचारपूर्वक आणि निर्भय मतदान करता येणे ,हे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आवश्यक आहे. लोकशाही रक्षणाच्या तातडीच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी हे विचारवेध संमेलन आयोजित करण्यात आले आहे. योगेंद्र यादव, तुषार गांधी, डॉ. राम पुनियानी, डॉ.कुमार सप्तर्षी, निरंजन टकले, हरीष सदानी, सुनीती सु.र., अजित रानडे, संदीप बर्वे आणि अन्य मान्यवर दोन दिवस विविध सत्रात मार्गदर्शन करणार आहेत. 
शनिवारी ६ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा  वाजता योगेंद्र यादव यांच्या ‘लोकतंत्र की रक्षा के सामने चुनौतीया’ भाषणाने संमेलनाचा प्रारंभ झाला.  साडेअकरा वाजता ‘लोकशाही खच्चीकरणाचे जागतिक प्रयत्न’ या विषयावर अरविंद वैद्य यांचे व्याख्यान होईल. १२ वाजता सुनीती सु.र.यांचे ‘लोकशाही रक्षणासाठी लोकांचे धडे’ या विषयावर व्याख्यान होईल. पावणे दोन वाजता ‘माध्यमांचे स्वातंत्र्य आणि लोकशाही’ विषयावर अलका धुपकर संवाद साधतील. राही श्रुती गणेश या ‘शिक्षण संस्थांना फॅसिस्टांची मगरमिठी ‘ विषयावर माहिती देतील. साडे तीन वाजता ‘मुस्लिम मागासवर्गीय आणि लोकशाही रक्षण ‘या विषयावर तमन्ना इनामदार बोलणार आहेत. ४ वाजता  प्रियदर्शी तेलंग हे ‘लोकशाहीसाठी दलित संघटन’ विषयावर व्याख्यान देतील. पावणे पाच वाजता वसुधा सरदार या ‘दारूममुक्तीसाठी चळवळ उभारणी’ या विषयावर तर प्रभात सिन्हा हे ‘माणदेशी चॅम्पियन्स’ विषयावर माहिती देतील. सव्वा सहा वाजता ‘हू किल्ड गांधी’ माहितीपट दाखविला जाईल आणि तुषार गांधी यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. 
रविवार, ७ जानेवारी या संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सव्वादहा वाजता समूहगीतांनी प्रारंभ होईल. साडेदहा वाजता ‘सद्भावना मिशन’ या विषयावर डॉ.राम पुनियानी मार्गदर्शन करतील. ‘लोकशाही रक्षण’ या विषयावर निरंजन टकले यांचे व्याख्यान होईल. १२ वाजता ‘स्त्रीवादाच्या संदर्भांत लैंगिक हक्क संरक्षण’ या विषयावर हरीश सदानी हे संवाद साधतील. पाऊण वाजता ‘संविधान प्रचार चळवळीचा अनुभव’ विषयाची माहिती संदीप बर्वे देतील. दुपारी सव्वा दोन वाजता ‘स्थानिक स्वराज्य संस्थातील महिला प्रतिनिधींचे सक्षमीकरण’ या विषयावर भीम रासकर माहिती देतील. पावणे तीन वाजता याच विषयवार नीती दिवाण हिंदीतून माहिती देतील. सायंकाळी ४ वाजता ‘लोकशाही बळकटीकरणासाठी सामाजिक सलोखा’ या विषयावर अजित रानडे  यांचे व्याख्यान होईल. सव्वा पाच वाजता ‘लोकशाही रक्षणाच्या लढ्याची दिशा’ विषयावर डॉ.कुमार सप्तर्षी मार्गदर्शन करतील. सहा वाजता सरिता आवाड संमेलनाचा समारोप करतील. 

धमक्या कसल्या देता, समोर येऊन चर्चा करा:जितेंद्र आव्हाडांचे महंतांना आव्हान:मी जे बोललो ते चुकीचे, सिद्ध करा

मुंबई:
जितेंद्र आव्हाड यांचा वध करू असं म्हणणाऱ्या तसेच त्यांना धमकी देणाऱ्या महंत आणि राजकीय नेत्यांना आव्हाड यांनी समोरासमोर येऊन चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. महाराष्ट्राच्या शिवरायांच्या भूमीतून मला जन्म झाला असून मी मरणाला घाबरत नाही. पण मी जे बोलतोय ते चुकीचे आहे हे सिद्ध करा, असे आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. तुम्हीच सांगाल तोच राम, असं असू शकत नाही, असेही ते म्हणाले.

वाल्मिकी रामायणातील संदर्भ गुरुवारी दिल्यानंतर आज जितेंद्र आव्हाड यांनी ग. दि. माडगूळकर यांच्या गीत रामायणातील संदर्भ देऊन श्रीराम हे मांसाहारी असल्याचे दाखले दिले आहेत. ग.दि. माडगूळकर यांनी गीत रामायणाच्या आपल्या रचनेतही म्हटले होते. गदिमा यांनी गीत रामायण करताना त्यांनी अभ्यास केला असलेच ना, असा प्रश्नही आव्हाड यांनी केला.

धमकी देणारे राम भक्त असूच शकत नाही
आपल्याला जीवे मारण्याची धमकी देणारे महंत वगैरे राम भक्त असूच शकत नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले. राम म्हणजे प्रेमळ, सोज्वळ आहेत, मर्यादापुरुषोत्तम आहेत. शबरीला आपलं मानणारे राम होते…सर्वसामान्यांना आपलं मानणारं राम होते. धमकी देणाऱ्या महंतांना धर्मांचं, कर्माचं ज्ञान नसते असेही आव्हाड यांनी म्हटले.

खेद व्यक्त करतो असे म्हटले
जे वाल्मिकी म्हणतात, ग दि माडगूळकर म्हणतात.. लक्ष्मण जोशी आपल्या लेखात म्हणतात, त्याला तुम्ही कसे नाकारणार. समोरच्या बाजूचा मुद्दा त्यांना समजून घ्यायचा नाही का, असा प्रश्नही त्यांनी केला. आपल्याला विरोध करणाऱ्यांनी वाल्मिकी रामायण वाचले आहे का, वाल्मिकींना विरोध करणार का, असा उलट प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.

प्रभू श्रीराम यांनी वनवासात मांसाहार केल्याचे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. आव्हाडांविरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. तर, दुसरीकडे आव्हाड यांना धमकी देण्यात येत आहे. मात्र, आव्हाड यांनी धमक्या देणाऱ्यांना समोरासमोर बसून चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. मी काय चुकीचं बोललो आहे की तुम्ही माझी हत्या करण्याची भाषा बोलू लागला आहात, असा सवाल देखील आव्हाड यांनी उपस्थित केला.

मोहोळ हत्या:12 तासाच्या आत आठ जण गजाआड; प्राथमिक तपासात हत्येचं कारण उघड

पुणे:पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणी ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्याजवळील शिरवळ इथून या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच हल्ल्यावेळी वापरण्यात आलेली हत्यारं आणि दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

सविस्तर माहिती अशी, कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खूनप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक केली आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील किकवी- शिरवळदरम्यान ही कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून तीन पिस्तुलांसह तीन मॅगझीन, पाच जिवंत काडतुसे आणि दोन मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुतारदरा येक्षील गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेची नऊ तपास पथके पुणे शहर, ग्रामीण परिसर, सातारा आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली. सातारा रस्त्यावरील शिरवळजवळ संशयित मोटारीचा पाठलाग करून साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर (रा. सुतारदरा, कोथरुड) याच्यासह आठ आरोपींना ताब्यात घेतले.

दिनांक 5/1/24 रोजी शरद मोहोळ याच्या हत्येच्या संदर्भाने कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्रं 2/23 कलम 302,307,34 IPC सह भारतीय हत्यार कायदा कलम 3,25,महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1),(3)सह 135 प्रमाणे…दाखल गुन्ह्याच्या तपासात पुणे शहर गुन्हे शाखेची 9 तपास पथके पुणे शहराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा व कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आली होती .

त्या दरम्यान पुणे सातारा रोडवर किकवी – शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून 8 आरोपी, 3 पिस्टल, 3 मॅगझीन, 5 राउंड व 2 चार चाकी गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.

सदरचा गुन्हा हा शरद मोहोळ बरोबर असलेल्या जमिनीच्या /पैशाच्या जुन्या वादातुन आरोपीनी केला असल्याचे प्रथम दर्शी तपासात निष्पन्न झाले आहे

सदरची कामगिरी पुणे शहर गुन्हे शाखेने कारवाई करून घटनास्थळी गोळीबार करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्या आरोपीना ताब्यात घेण्यात आलेले आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी दिली