Home Blog Page 1265

सोयरा, शरयूला दुहेरी मुकुटाची संधी

पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा

पुणे : सोयरा शेलार आणि शरयू रांजणे यांना पीवायसी एचटीबीए अमनोरा कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मुकुटाची संधी आहे. त्यांनी स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या आणि दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या उपांत्य फेरीत सोयराने स्नेहा भिसेवर २१-१४, २१-१२ अशी मात केली. सोयरासमोर अंतिम फेरीत शरयू रांजणेचे आव्हान असेल. शरयूने शर्वरी सुरवसेवर २१-४, २१-४ अशी मात केली. सोयरा आणि शरयू दुहेरीत एकत्र खेळत आहे. त्यांनी उपांत्य फेरीत सई कदम – शिप्रा कदम जोडीवर २१-७, २१-९ असा विजय मिळवून अंतिम फेरीत गाठली.

अभिक-अरहमलाही संधी

अभिक शर्मा आणि अरहम रेदासानी यांनीही दुहेरी आगेकूच कायम राखली आहे. अभिक आणि अरहमने १५ वर्षांखालील एकेरी आणि दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दोघेही एकेरीच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत. यात एकेरीच्या उपांत्य फेरीत अभिकने कपिल जगदाळेवर २२-२४, २१-१९, २१-१९ असा, तर अरहमने अभिज्ञान सिंघावर २१-१८, २१-९ असा विजय मिळवला. दुहेरीच्या उपांत्य फेरीत अरहमने तनीष्क काळेसह खेळताना चिन्मय फणसे-समीहन देशपांडे जोडीवर २२-२०, २१-९ अशी, तर अभिक वर्मा-स्वरीत सातपुते जोडीने कपिल जगदाळे – राघवेंद्र यादव जोडीवर २१-११, २५-२३ अशी मात केली.

सानिया-श्रेयात अंतिम लढत

स्पर्धेतील १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीची अंतिम लढत सानिका पाटणकर आणि श्रेया भोसले यांच्यात रंगणार आहे. उपांत्य फेरीत श्रेयाने संस्कृती जोशीवर २१-१, २१-१० असा, तर सानिकाने जिज्ञासा चौधरीवर २१-१७, २१-१८ असा विजय मिळवला.

हिमांश-आरुष अंतिम लढत

स्पर्धेतील ११ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीत हिमांश हरगुनानीने बुरहनुद्दीन अगाशीवालावर २१-१९, २२-२० अशी मात केली. हिमांशची जेतेपदासाठी आरुष सप्रेविरुद्ध लढत होईल. आरुषने दुसऱ्या उपांत्य फेरीत अद्वैत फेरेवर २२-२०, २२-२० असा विजय मिळवला. मुलींच्या गटातील पहिल्या उपांत्य लढतीत दिविशा सिंगने अग्रिमा राणावर २१-१७, २४-२२ अशी, तर वल्लारी वाटाणेने अन्वी बारवकरवर २१-४, २१-११ अशी मात केली.

निकाल – उपांत्य फेरी – १३ वर्षांखालील मुली – ख्याती कत्रे वि. वि. रुद्रानीराजे निंबाळकर २३-२१, २१-६, आराध्या ढेरे वि. वि. कायरा रैना २१-११, १४-२१, २१-१७.

१३ वर्षांखालील मुले – एस. सोमजी वि. वि. मिर शाहझार अली २१-६, २१-५, हृदान पाडवे वि. वि. शारव जाधव २१-११, २१-११.

१५ वर्षांखालील मुले – अभिक वर्मा वि. वि. कपिल जगदाळे २२-२४ २१-१९, २१-१९, अरहम रेदासानी वि, वि. अभिज्ञान सिंघा २१-१८, २१-९.

१७ वर्षांखालील मुली – युतिका चव्हाण वि. वि. भक्ती पाटील २१-१३, २१-१७, सफा शेख वि. वि. जुई जाधव १६-२१, २१-१६, २१-११.

१७ वर्षांखालील मुले – सार्थक पाटणकर वि. वि. अवधूत कदम २१-१८, २१-१७, २१-११, कविन पटेल वि. वि. विहान मूर्ती १३-२१, २१-१४, २१-१९.

१९ वर्षांखालील मुली – श्रेया भोसले वि. वि. संस्कृती जोशी २१-१, २१-१०, सानिका पाटणकर वि. वि. जिज्ञासा चौधरी २१-१७, २१-१८.

 स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराचा देशात 10 वा क्रमांक ! राष्ट्रपतींंच्या हस्ते दिल्लीतील कार्यक्रमात आयुक्त विक्रम कुमारांनी स्वीकारला पुरस्कार

पुणे-शहर स्वच्छतेसाठी गेल्या वर्षभरापासून राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. गेल्या वर्षी 20 वा क्रमांक असताना यावर्षी देशात 10 क्रमांक मिळाला आहे. हे सर्वेक्षण 40 निकषांवर घेण्यात आले. त्याचे ‘रँकिंग’ केंद्राने जाहीर केले असून पहिल्या दहा शहरांमध्ये नवी मुंबई महापालिका आणि पुणे शहराचा क्रमांक लागतो. मागील वर्षी पुण्याचा 20 वा क्रमांक होता.

पुणे शहर स्वच्छतेच्या बाबतीत देशात दहावे. एक लाख लोकसंख्येच्या वर 10 वे आणि दहा लाख लोक संख्येच्या वरील शहरात देशात नववा क्रमांक मिळवला आहे. पुणे मनपाला 5 स्टार रँक मिळाले आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, घन कचरा विभाग प्रमुख संदीप कदमयांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार स्वीकारला.

वर्षभरामध्ये शहर स्वछतेच्या बाबतीत विविध उपाययोजना केल्या आहेत. कचऱ्याचे क्रोनीक स्पॉट शोधून ते नष्ट करणे, रोजचा कचरा रोज गोळा करणे, 100 टक्के कचऱ्यावर प्रक्रिया, अतिरिक्त मनुष्यबळ, सार्वजनिक शैचालयाची नियमित स्वछता असे सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकांची साथ मिळत आहे. नागरिकांच्या सहकाऱ्याने येत्या काळात पहिला क्रमांक मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेस असे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांचे प्रयत्न, त्याला नागरिकांची साथ मिळत आहे. शहर स्वचतेसाठी येत्या काळात अनोखे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. तसेच जनजागृतीसाठी विविध संस्थांचा सहभाग देखील वाढवण्यात येणार आहे. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवून देशात पुणे महापालिका अग्रक्रमी राहावी यासाठी प्रशासन झोकून काम करेल, असा विश्वास घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी व्यक्त केला.

पुण्यात बनावट परदेशी स्कॉच बनवण्याचा कारखाना तर पकडला पण ..अवघ्या 34 बाटल्याच सापडल्याने आश्चर्य ..

 पुणे- राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाने बनावट परदेशी स्कॉच तयार करणाऱ्या कारखान्याचा (Fake Foreign Scotch Factory) पर्दाफाश करुन केवळ दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कात्रज परिसरातील देहुरोड बायपास रोड आंबेगाव बु. येथे बनावट परदेशी स्कॉचचा कारखाना सुरु होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. या कारवाईत महेशभाई हरिभाई कोळी (रा. बालाजी हाईट्स, मंगळवार पेठ, पुणे) याला अटक केली आहे.दरम्यान या कारवाईत परदेशी स्कॉच च्या सीलबंद अशा अवघ्या ३४ बाटल्याच कशा सापडल्या यावर छापे टाकणारेच चक्रावल्याचे वृत्त समजते आहे.

देहूरोड बायपास रोड से. नं. 3 आंबेगाव बुद्रुक येथे बनावट परदेशी स्कॉच बनवण्याचा कारखाना सुरु असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क सी विभाग, पुणे पथकाचे उपअधीक्षक संतोष जगदाळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने शुक्रवारी आंबेगाव बु. येथील कारखान्यावर दारुबंदी गुन्ह्यांतर्गत छापा टाकला. या ठिकाणावरुन बनावट परदेशी स्कॉचच्या एकूण 34 सिलबंद बाटल्या, दोन दुचाकी वाहने, 551 रिकाम्या बाटल्या, बाटल्यांचे बुचे, मोनोकार्टून, हिट गन (हेअर ड्रायर), इंडक्शन (शेगडी), प्लॉस्टिक पॅकिंग रोल, प्लॉस्टिक चिकटपट्टी आणि मोबाईल फोन असा एकूण 10 लाख 39 हजार 747 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारखान्यात परदेशी बनावटीचे मद्य वापरण्यात आलेल्या रिकाम्या बाटल्यातून पुन्हा भरून त्याची विक्री केली जात होती. हे मद्य पार्सलद्वारे मुंबई व इतर शहरामध्ये पाठविले जात होते तसेच दुचाकीचा वापर करून पुणे शहरात त्याची विक्री केली जात होती. अशी माहिती अटक करण्यात आलेल्या आरोपीने पथकाला दिली.

ही कामगिरी आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई विजय सूर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण यांच्या आदेशावरुन व विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर तसेच अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे चरणसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक संतोष जगदाळे, निरीक्षक आर.पी. शेवाळे, दुय्यम निरीक्षक एन.एन. मारकड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. एस. लोहकरे, एस.एस. इंदलकर, जवान व वाहनचालक जवान शरद भोर, गोपाल कानडे, व महिला जवान उज्वला भाबड यांच्या पथकाने केली. गुन्हयाचा तपास राज्य उत्पादन शुल्क, सी विभागाचे निरीक्षक राजाराम प्रभु शेवाळे करीत आहे.

पुण्यातील 15 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे : पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी काल शुक्रवारी रात्री उशिरा पुणे शहरातील पंधरा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्या झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कुठून कोठे बदली झाले हे पुढील प्रमाणे आहे.

दत्तात्रय विश्वनाथ भापकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा)

कांचन मोहन जाधव (पोलीस निरीक्षक (गुन्हे), येरवडा पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन)

विजय रघुनाथ पुराणिक (पोलीस निरीक्षक (गुन्हे) भारती विद्यापीठ, पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा)

अनिता रामचंद्र हिवरकर (पोलीस निरीक्षक (गुन्हे) फरासखाना पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अमली पदार्थ विरोधी पथक -1)

सुनील गजानन थोपटे (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, अमली पदार्थ विरोधी पथक एक ते नियंत्रण कक्ष)

संदीप देशमाने (पोलीस निरीक्षक, सहकारनगर पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलंकार पोलीस स्टेशन)

क्रांतीकुमार पाटील (पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक ते गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक 1)

विनायक दौलतराव गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ते गुन्हे शाखा दरोडा व वाहन चोरी प्रतिबंधक पथक 1)

दशरथ शिवाजी पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर पोलीस स्टेशन ते भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक)

संतोष उत्तमराव पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंडगार्डन पोलीस स्टेशन ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन)

बाळकृष्ण सीताराम कदम (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, येरवडा पोलीस स्टेशन ते आर्थिक गुन्हे शाखा)

राजेश रामचंद्र तटकरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अलंकार पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक कोर्ट कंपनी)

महेश गुंडप्पा बोळकोटगी (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट 5 ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुंडवा पोलीस स्टेशन)

विष्णू नाथा ताम्हणे ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस स्टेशन ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 5)

विजय गणपतराव कुंभार (पोलीस निरीक्षक, विशेष शाखा ते पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा, अभयोग कक्ष)

लष्कर आणि बंडगार्डन पोलीस स्टेशन येथील क्राईम पीआय हे पुढील आदेश होईपर्यंत सदर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहतील. सर्वच पोलीस निरीक्षकांनी पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरित कार्यभाग स्वीकारून अनुपालन अहवाल पोलीस आयुक्त कार्यालयास सादर करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत.

कॅॅम्पातील ताबूत स्ट्रीटवरही खून

पुणे-लष्कर परिसरातील कॅम्प भागात 30 ते 35 वर्षात वयोगटातील तरुणाचा खून झाला आहे. लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ताबूत स्ट्रीट येथे दिल्ली दरबार हॉटेलच्या पुढे 30 ते 35 वयोगटातील एका तरुणावर कोणत्याही धारदार कोयतेने वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आले आहे .याप्रकरणी पोलिसांनी सदर मृतदेह ताब्यात घेऊन शवाविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. अद्याप मयातची ओळख पटली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर खुनातील आरोपींचा शोध पोलिस घेत आहे .घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपींचा माग काढण्यात येत आहे .याप्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक प्रियांका शेळके.9527977977 याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी कोणते योगदान दिले?:नारायण राणे यांचा सवाल

मुंबई-केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्यास नकार देणाऱ्या शंकराचार्यांवरच थेट टीका केली आहे. शंकराचार्य पंतप्रधान मोदी यांच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहत आहेत. त्यांनी आपल्या जीवनात हिंदू धर्मासाठी कोणते योगदान दिले हे सांगावे, असे ते म्हणालेत.

राम मंदिर एवढ्या वर्षांनंतर होत आहे, त्याचे कौतूक नाही. हा विषय आतापर्यंत कोणी घेतला नव्हता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, भाजपनी हा विषय हाती घेतला. शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्यावर टीका करावी? शंकराचार्य हे आमच्या भाजपला व पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय दृष्टीकोनातून पाहत आहेत, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले की, राम मंदिर राजकीय दृष्टीकोनातून होत नसून धार्मिक दृष्टिकोनातून होत आहे. राम आमचा दैवत आहे. त्यासाठी मंदिर उभारले जात आहे. शंकराचार्यांनी त्यांच्या जीवनातले हिंदू धर्मासाठी दिलेले योगदान सांगावे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. 19 व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन आज येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी चार शंकराचार्यांनी नकार दिला आहे. यावर भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

डिजिटल मिडियाच्या कोल्हापूर अधिवेशनात अजितदादांची प्रकट मुलाखत होणार; २९ जानेवारीला कणेरी मठ, कोल्हापूर येथे अधिवेशन

मुंबई: डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे दुसरे अधिवेशन कोल्हापूर येथील सिध्दगिरी मठ येथे २९ जानेवारी रोजी होत आहे.अधिवेशनाच्या समारोप सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत होणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी येथे दिली.

उपमुख्यमंत्री अजितदादा यांची प्रकट मुलाखत मराठी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम कलाकार घेणार असून त्या कलावंताचे नाव लवकरच जाहीर केले जाईल. राजा माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवार यांची त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी भेट घेवून त्यांना निमंत्रण दिले. या शिष्टमंडळात मुंबईचे अध्यक्ष संजय भैरे व ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल वाघुले यांचा समावेश होता.उपमुख्यमंत्री पवार यांनी निमंत्रण स्वीकारले व प्रकट मुलाखतीसही अनुमती दिली आहे. कोल्हापूर येथील सिध्दगिरी कणेरी मठ येथे होत असलेल्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष तसेच “मित्र”या शासन अंगिकृत उपक्रमाचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर आहेत.संघटनेचे पहिले ऐतिहासिक अधिवेशन सातारा जिल्ह्यात जागतिक किर्तीचे पुस्तकांचे गाव भिलार महाबळेश्वर येथे पार पडले होते.

कात्रजच्या गजबजलेल्या भर चौकात खून…

पुणे- अनधिकृत बांधकामे , बेकायदा धंदे, दादागिरी, गुंडगिरी चे आगर बनत चाललेल्या दक्षिण पुण्यातील कात्रजच्या दिवस रात्र वर्दळ असलेल्या चौकात खून झाला आहे.. सीसी टीव्ही चे जाळे , नेहमीच्या व्यावसायिकांची वर्दळ , पोलीसांचे राउंड एवढे सारे असताना .. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत काहीही समजू शकलेले नव्हते .आज सकाळी ८ वाजता कात्रजच्या चौकातील भाजी मंडई पासून संतोषनगर कडे जाणाऱ्या चौकात मनोहर भीमराव बगल (वय ५५ ) यांचा मृतदेह पोलिसांना आढळला आहे.दगडाने किंवा कशाच्या तरी साह्याने त्यांना ठार मारण्यात आले आहे .याप्रकरणी त्यांचा मुलगा महादेव बगल (वय २९ रा. कात्रज ) यांनी फिर्याद नोंदविली आहे. एवढेच पोलिसांनी सांगितले .सहायक पोलीस निरीक्षक भाबड 8668449687 याप्रकरणी अधिक तपास करत आहेत .

अनाथांना महाराष्ट्रात कोणत्याही कोर्सला शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही- राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 तर्पण फाउंडेशन तर्फे  तर्पण युवा पुरस्कार प्रदान सोहळा

पुणे :  अनाथांना महाराष्ट्रात १ टक्का आरक्षण सुरु आहे. यामुळे अनेक अनाथ मुलांना नोक-या मिळायला लागल्या. स्पर्धा परीक्षांची फी देखील कमी केली आहे.  आता अनाथांना महाराष्ट्रात कोणत्याही कोर्सला शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. याचा निर्णय एक महिन्यापूर्वी झाला आहे. महिला बाल कल्याण विभागाकडे हे काम असून हा मोठा निर्णय झाला असल्याचे राज्याचे  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 
तर्पण फाउंडेशन तर्फे स्वामी विवेकानंदांच्या जयंतीचे औचित्य साधून तर्पण युवा पुरस्कार प्रदान सोहळा कात्रज कोंढवा रस्त्यावरील इस्कॉन मंदिराच्या कमलनयन बजाज अतिथी गृहात पार पडला. कार्यक्रमाला  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, तर्पण फाऊंडेशनचे संस्थापक आमदार श्रीकांत भारतीय, प्रकल्प संचालक ऊर्जा भारतीय, इस्कॉन पुणे चे उपाध्यक्ष रेवतीपती प्रभू, पुण्यातील संचालक संजय भोसले, अशोक गुंदेचा, जनार्दन चितोडे, राजेश मेहता, किशोर तळेकर, पुरुषोत्तम पाटील, शशिकांत जगदाळे, प्रविण पाटील, अनुप शहा आदी उपस्थित होते.
अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याचा गौरव तर्पण युवा पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या माध्यमातून दरवर्षी केला जातो. यावर्षी पुण्यातील विजय फळणीकर यांना ‘आपलं घरं’  संस्था, नाशिकमधील स्वामी नारायण मंदिराचे प.पू. माधव स्वामी महाराज आणि अमरावतीमधील गुंजन गोळे यांच्या ‘गोकुळाश्रम’ संस्थेला यंदाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, रोख रक्कम आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते. कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तर्पण फाउंडेशनचे संचालक उपस्थित होते. 
चंद्रकांत पाटील म्हणाले, परमेश्वराने भेदभाव निर्माण केला नाही. मात्र, आपण जाती, पंथ, भाषा, उपासना पद्धती यावर  भेदभाव निर्माण केला. हा समाज माझा आहे, दुस-याचे दु:ख आपले मानून तर्पण फ़ौउंडेशन सारख्या संस्था कार्यरत आहेत. हिंदू तत्वज्ञानात माणसाला कसे जगावे हे शिकविण्यात आले. माझ्या समाजाची काळजी मी करणे, हा धर्म आहे, हे स्वामी विवेकानंद यांनी शिकविले. हिंदवी स्वराज्य निर्माण करणा-या छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे योगदान आहे. त्यांना जिजामातांनी घडविले. त्यामुळे त्यांचे कार्य आपल्याला आदर्शवत आहे. 
डॉ.सुरेश गोसावी म्हणाले, बालसुधारगृहातून बाहेर पडल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न मुलांसमोर असतो. त्यांना योग्य दिशा मिळाली तर त्यांचे आयुष्य चांगले घडू शकते. त्यांच्यासाठी काम करणारी ही संस्था आहे. ही संस्था आणखी मोठी व्हावी अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.

श्रीकांत भारतीय म्हणाले, तर्पण फाउंडेशन हे १८ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या अनाथ मुलांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर काम करते. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात तर्पण फाउंडेशनचे संचालक आहेत. फाउंडेशन मार्फत अनाथ मुलांच्या शिक्षणाबरोबरच नोकरी मिळविण्यासाठी सुद्धा मदत केली जाते. शिक्षण आणि नोकरी झाल्यानंतर मुलांचे विवाह जुळविणे आणि थाटात लग्न लावून देण्याचे कार्यसुद्धा फाउंडेशन करते. त्यामुळे अश्याप्रकारे अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहित करण्याकरीता पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो, असेही त्यांनी सांगितले. 

शंकराचार्यांचा अपमान करणाऱ्या नारायण राणेंवर भाजपा काय कारवाई करणार? अतुल लोंढेंंचा सवाल

मुंबई, दि. १३ जानेवारी.
अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अजून पूर्ण झालेले नसतानाही भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई झाली आहे. हिंदू धर्मातील सर्वोच्च असलेल्या शंकराचार्यांनीही अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे आहे असे स्पष्ट केले आहे. परंतु भाजपाचे लोक शंकराचार्यांवरच तोंडसुख घेऊ लागले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यात एक पाऊल पुढे टाकत शंकराचार्यांचे योगदान काय? असा प्रश्न विचारून शंकराचार्य व हिंदू धर्माचा अपमान केला आहे. शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या श्रीमान नारायण राणे यांचे तरी काय योगदान? असा प्रतिप्रश्न करत राणेंचे वय पाहता त्यांनी आता वानप्रस्थाश्रमाचा मार्ग धरावा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे व भाजपाचा समाचार घेताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, नारायण राणे हे राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये व काँग्रेसमधून भाजपात गेले आहेत. भाजपात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याशिवाय गत्यंतर नाही म्हणूनच मोदींसाठी हिंदू धर्माच्या सर्वोच्च पदावरील शंकराचार्य यांनाच तुमचे योगदान काय? असा सवाल विचारून त्यांनी सर्व मर्यादा पार केल्या आहेत. प्रभू श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात कारण त्यांनी आयुष्यात कुठेही मर्यादेची उल्लंघन केले नाही, ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान केला नाही. श्रीराम यांना सत्ता चालून आली असतानाही त्यांनी त्या सत्तेचा त्याग करुन १४ वर्ष वनवासात घालवली. अशा मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मंदिरासाठी शंकराचार्यांवर तोंडसुख घेणारे नारायण राणे सारखे लोक हिंदू धर्म भ्रष्ट करत असून हे लोकच हिंदु धर्माला कलंक आहेत. हिंदु धर्माच्या परंपरेनुसार वयाच्या ५१ ते ७५ वर्षांचा कालखंड हा वानप्रस्थाश्रमात घालवायचा असतो. या कालखंडात सर्वच क्षेत्रातून बाहेर पडून समाजोपयोगी कामे करावीत असे अपेक्षित आहे. नारायण राणे यांचे वय ७१ वर्ष आहे त्यांनी आता वानप्रस्थाश्रमाचा मार्ग धरावा असा, टोला लगावून शंकराचार्यांचा अपमान करणाऱ्या नारायण राणेंवर भाजपा कधी व काय कारवाई करणार? असा प्रश्नही लोंढे यांनी विचारला आहे.

अयोध्येत राम मंदिर व्हावे हे सर्वांची इच्छा आहे, त्याला कोणाचाच विरोध नाही. धर्म हा आस्थेचा विषय आहे राजकारणाचा नाही परंतु भारतीय जनता पक्षाने राजकारणात धर्म आणून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अर्धवट मंदिरात प्राण प्रतिष्ठा करण्याची घाई चालवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्राणप्रतिष्ठा करुन मतांचा जोगवा मागण्यासाठी हे सर्व चालले आहे. मागील १० वर्षाताली कामांवर भाजपा मते मागू शकत नाही कारण त्यांनी लोकांना सांगावे असे काहीच केलेले नाही त्यामुळे रामाच्या नावावर मतं मागण्याचा हा खटाटोप आहे. राम मंदिरासाठी स्वतंत्र्य न्यास आहे परंतु भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा इव्हेंट बनवलेला आहे, असेही लोंढे म्हणाले.

उद्धव ठाकरे काळारामाचे नाही तर तळीरामाचे भक्त

उबाठाने आदित्य ठाकरे यांना लोकसभेला उतरवून निवडून आणून दाखवावे

मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांची जहरी टीका

मुंबई दि. १३ जानेवारी २०२५
कोरोना काळामध्ये मंदिरे बंद ठेवून मदिरालय उघडणारे उद्धव ठाकरे हे काळारामाचे नाही तर तळीरामाचे भक्त आहेत अशी खरमरी टीका करीत तुम्ही आदित्य ठाकरेंना लोकसभेच्या निवडणुकीत उतरून निवडून आणून दाखवा असे थेट आव्हान मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी उबाठा गटाला दिले.

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपतींना काळाराम मंदिरातील उपस्थितीबद्दल लिहलेल्या पत्राविषयी बोलताना मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले,
आज लवकर सकाळी उठल्यामुळे त्यांची डोळ्यावरची झोप आणि झडप गेली नसावी म्हणून उद्धव ठाकरे यांना काही घडलेल्या आणि सत्य घटनांचे ज्ञान नाही. संजय राऊत यांनी त्यांना दिलेली स्क्रिप्ट मुद्दाहून अडचणीत आणणारी आणि चुकीची दिलेली असावी. उद्धव ठाकरे आमच्या विश्व हिंदू परिषदेच्या ट्विटर हँडलवर जरी केले असते तरी त्यांना दिसले असते की, कालच देशाच्या राष्ट्रपतींना विश्व हिंदू परिषदेने निमंत्रण दिले आहे आणि हे २४ तासानंतर जागे झाले आहेत. त्यामुळे निमंत्रण राष्ट्रपतींना पोचले आहे. यांनी सांगण्याची काही गरज नाही. यांच्या सांगण्यावरून कुणाला आम्ही निमंत्रण देणार नाही आणि हे बोलले म्हणून यांनाही आम्ही निमंत्रण देणार नाही.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलेले टीकेला उत्तर देताना मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले,
एकनाथ खडसे यांना तिकडे गेल्यावर स्मृतिभ्रंश झाला असेल माझी त्यांना विनंती आहे, आपण टीका जरूर करा पण त्या टीकेला तथ्य असू द्या. कालच्या घटनेचा उल्लेख केला असता शेकडो कोटीच्या कामाचे उद्घाटन आणि भूमिपूजन विकासाला गती देणारे आहे आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अजित दादा यांच्या उपस्थितीत झाले आहे.
महायुतीचा मेळावा यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियलमध्ये होईल तर उपनगरातील दुसरा मेळावा रंग शारदातील वांद्रे येथे होईल. महायुतीतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा एकत्रितपणे होईल. मुंबईतील सहाही जागा निवडून आणू यासाठी आम्ही सर्व पक्षांनी कंबर कसली आहे असेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बोलण्याची पातळी उद्धव ठाकरे यांना अजून आली नाही. उद्धव ठाकरे स्वतःला घरंदाज, कुटुंबप्रमुख म्हणणार असतील त्यांना माझा सवाल आहे उद्धवजी जर तुमचा सख्खा भाऊ तुमच्या विरोधामध्ये न्यायालयात केस दाखल करतो, जर तुम्ही तुमच्या सख्ख्या बहिणीला घरातून बाहेर काढता, जर तुमचा चुलत भाऊ तुम्हाला घरात किंवा परिवारात चालत नाही, जर वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी तुम्हाला न्यायालयात जावे लागते तर तुम्ही कुटुंबप्रमुख आणि घरंदाज कसे? त्यामुळे तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका. मोदींचे कुटुंब आणि मोदींचे घर १४० कोटी जनता आहे. स्वतःच्या परिवारापेक्षा देश हापरिवार मानणे ही त्यांची भूमिका आणि माझे कुटुंब माझा परिवार ही तुमची भूमिका कोठे? यासाठी तुम्ही क्लासेस लावावी लागते मी चाटे क्लासेसला याबाबत जरूर विनंती करेन असेही मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले.

शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहेत. उद्धव ठाकरे यांचे भाषण त्यांना आलेले नैराश्य दाखवत आहे. कल्याण डोंबिवली शहरात उद्धव ठाकरे (उबाठा) यांच्या पक्षाची एक जागा निवडून आणून दाखवावी. मर्दांचा पक्ष उबाठा असेल तर त्यांनी स्वतः किंवा स्वतःच्या सुपुत्राला लोकसभेला निवडून आणून दाखवावे अशीही टीका मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केली.

गायिका नीती मोहन यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजावर गर्दी जमल्याने राष्ट्रीय युवा महोत्सव जिवंत झाला.

नाशिक, : प्रसिद्ध बॉलीवूड गायिका नीती मोहन यांच्या मंत्रमुग्ध करणा-या 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला सुरुवात झाली, पहिल्याच दिवशी नाशिकच्या तपोवन मैदानावर जमलेल्या तरुणांची मने जिंकली. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या मधुर आवाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या नीती मोहनने “स्टुडंट ऑफ द इयर” या ब्लॉकबस्टर चित्रपटातील “इश्क वाला लव्ह” या हिट ट्रॅकपासून सुरुवात करून तिच्या लोकप्रिय गाण्यांच्या सादरीकरणाने उत्साही जनसमुदायाला मंत्रमुग्ध केले. तिच्या उल्लेखनीय कारकिर्दीत “जब तक है जान,” “मैं तेरा हिरो,” “पद्मावत,” “हॅपी न्यू इयर,” “साहो,” “कलंक,” आणि “गंगुबाई काठियावाडी” यांसारख्या विविध यशस्वी चित्रपटांमध्ये योगदान समाविष्ट आहे.

यूथ फेस्टिव्हलमध्ये परफॉर्म केल्याबद्दल तिचा अभिमान व्यक्त करताना, नीती मोहनने संध्याकाळी लाइव्ह परफॉर्मन्समध्ये सांगितले की, “आपल्या देशाची ताकद त्याच्या तरुणांमध्ये आहे, आणि युवा दिनाच्या दिवशी परफॉर्म करण्याची संधी मिळाल्याचा मला सन्मान वाटतो. हा सण, जिथे तरुण प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आहेत, मला खूप अभिमान वाटतो.”

तरुणांना संदेश देताना, तिने त्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झटण्यासाठी प्रोत्साहन दिले, ज्यामुळे देश आणि त्यांच्या पालकांना अभिमान वाटेल. नीती मोहन यांनी नाशिकची प्रशंसा करत नाशिकची हवा, पाणी, मंदिरे, फळे, फुले आणि तेथील लोकांमध्ये सौंदर्य असलेली पवित्र भूमी असल्याचे वर्णन केले.

नाशिकमध्ये 12 जानेवारी ते 16 जानेवारी दरम्यान होणारा 27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव देशभरातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. हे एक व्यासपीठ म्हणून काम करते जेथे विविध क्षेत्रातील तरुण व्यक्ती कला, उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण कल्पनांमध्ये त्यांची प्रतिभा प्रदर्शित करतात.

पुढाऱ्यांची,अधिकाऱ्यांची अनधिकृत बांधकामे किती?सर्वे करा अन जाहीर करा… नंतर कारवाईला सुरुवात करा

नोटीसा देण्यापूर्वीच अन दिल्यावरही लाखोची वसुली करणाऱ्या पालिकेच्या कनिष्ठ अभियंते आणि निरीक्षकांच्या विरोधात वाढत्या तक्रारी

बेकायदेशीर,पक्षपाती  कारवाईविरुद्ध सोमवारी धरणे आंदोलन

‘पुणे शहर छोटे व्यावसायिक,गाळेधारक,भाडेकरू महासंघ’स्थापन 

मंत्री इस्टेट सोसायटीत टेरेसवरील  फ्लॅटसदृश  ८ बेकायदेशीर बांधकामांकडे  पालिकेचा काणा डोळा,तळमजल्यांवरील गाळ्यांच्या शेडवर मात्र कारवाई 
पुणे :
अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली पुणे शहरात चालू असलेल्या पालिकेच्या मनमानी ,पक्षपाती आणि बेकायदेशीर कारवाईच्या विरोधात दाद मागण्यासाठी ‘पुणे शहर छोटे व्यावसायिक,गाळेधारक,भाडेकरू महासंघ’स्थापन करण्यात आला असून मनमानी कारवाईच्या विरोधात सर्व पातळ्यांवर दाद मागणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली . महासंघाचे निमंत्रक हसीब कमलानी यांच्यासह ,डॉ.पायल शाह,हेमराम चौधरी,अशोक शिरवे हे प्रतिनिधी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. 
पुणे पालिकेच्या या संशयास्पद कारवाईची चौकशी व्हावी. मंत्री इस्टेस्ट सोसायटीसह सर्व अन्यायग्रस्त गाळे धारकांना न्याय मिळावा. बड्या धेंडांच्या बेकायदेशीर बांधकामांवर प्राधान्याने कारवाई करावी,या मागणीसाठी १५ तारखेपासून सॅलिसबरी पार्क येथे मांडव टाकून उपोषण केले जाणार आहे,अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

महासंघाच्या भूमिकेची पुष्टी करण्यासाठी सॅलिस्बरी पार्क येथील सोसायटीमधील हेतूपूरस्सर झालेल्या , दूजाभाव करणाऱ्या अतिक्रमण तोडणाऱ्या कारवाईची माहिती देखील या पत्रकार परिषदेत दिली गेली .सॅलिसबरी पार्क मधील मंत्री इस्टेट को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी मध्ये निवासी फ्लॅट आणि ४० व्यावसायिक गाळे आहेत.त्यात दुकाने,कॅफे,किराणा,सलून,दवाखाना असे व्यवसाय चालवले जातात. त्यांच्याकड़े सर्व आवश्यक परवाने आहेत. याच इमारतीच्या टेरेस वर काही रहिवाशांनी बेकायदेशीर बांधकाम करून शेड टाकून ८ फ्लॅट तयार करून वापर चालविला आहे.बाल्कनी बंद करून खोल्या करण्यात आल्या आहेत.त्याविरोधात गाळेधारकांनी पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे,बांधकाम विभागाकडे  लेखी तक्रारी केल्या.टेरेसवरील बेकायदेशीर फ्लॅट सदृश अवैध बांधकामाचेवर कारवाई होण्याऐवजी तक्रार करणाऱ्या गाळेधारकावर अतिक्रमण विभागाने नोटीस न देता,वेळ न देता  कारवाई केली.
टेरेस वरील फ्लॅट बांधकामाचे साहित्य खालच्या गाळ्यात येणाऱ्या ग्राहकांवर पडून जीवितहानी होऊ नये ,कचरा पडू नये म्हणून गाळे धारकांनी तात्पुरत्या शेड बांधल्या होत्या. त्या फुटपाथवर किंवा रस्त्यावर नसून गाळ्यासमोर इमारतीच्या जागेतच आहेत. मात्र,त्या पाडताना तेथील फ्रिज,मशिनरी,सामान देखील तोडण्यात आले. आणि शिवीगाळ करून लाखोंचे नुकसान करण्यात आले.त्यामागे या इमारतीत राहणारा  पुणे जिल्हा परिषदेतील एक   अधिकारी असून त्याने गाळे धारकांकडे अतिक्रमण विरोधी कारवाई नको असल्यास दरमहा १ लाख रुपये मला द्या,अशी मागणी करून धमक्याही देत असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.  
टेरेसवरील बेकायदा फ्लॅट बांधकाम वाचविण्यासाठी पालिकेतील अधिकाऱ्यांच्या साहाय्याने गाळेधारकांच्या शेडचे बळी देऊन कागद रंगविण्यात आल्याचा आरोप महासंघाने केला.   
अतिक्रमण विरोधी कारवाईच्या चौकशीची मागणी* 
पुणे शहरात सुरु असलेली अतिक्रमण विरोधी कारवाई शंकास्पद असून या मोहिमेचीच चौकशी करावी,अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली. जिथे ही कारवाई केली गेली आहे ,तिथे छोट्या व्यवसायिकांचा बळी देण्यात आला असून बड्यांची अतिक्रमणे त्यामागे हुशारीने लपवली आहेत,असा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला. अतिक्रमण विरोधी कारवाई ही दुबळ्यांवर होत नाही. जे लोक प्रभावीपणे दाद मागू शकणार नाहीत,अशाच ठिकाणी कारवाई होत आहे. शहरात असलेली रुफटॉप हॉटेले पालिकेच्या आणि उच्च पदस्थांशी संबंधित आहेत.तिथे मात्र कोणीही कारवाईला जात नाही,असा दाखला या पत्रकार परिषदेत देण्यात आला. 
मनमानी कारवाईच्या विरोधात धरणे आंदोलन*
पुणे पालिकेच्या या शंकास्पद कारवाईची चौकशी व्हावी. मंत्री इस्टेस्ट सोसायटीसह सर्व अन्यायग्रस्त गाळे धारकांना न्याय मिळावा. बड्या धेंडांच्या बेकायदेशीर बांधकामांवर प्राधान्याने कारवाई करावी,या मागणीसाठी १५ तारखेपासून सॅलिसबरी पार्क येथे मांडव टाकून उपोषण केले जाणार आहे,अशी माहिती  हसीब कमलानी यांनी दिली.  

कातकरी समाजातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ द्या- जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे: प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत कातकरी समाजातील पात्र व्यक्तींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.

जनमन योजनेचा आढावा घेण्यासाठी दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपजिल्हाधिकारी रोहिणी आखाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई, घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर आदी उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, केंद्र शासन स्तरावरून जनमन योजनेचे संनियंत्रण होत आहे. यामुळे योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियेाजन करावे. कातकरी समाजाला वैयक्तिक आणि सामुहिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी नियोजन करावे. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला सर्व योजनांचा लाभ मिळेल असे सुनिश्चित करावे. पात्र व्यक्ती लाभाशिवाय राहणार नाही याची दक्षता घ्यावी, त्यासाठी आवश्यक बाबींची पुर्तता करावी, असे त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चव्हाण यांनी लाभार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी आणि उज्वला गॅस जोडणीबाबत सूचना दिल्या.

यावेळी श्रीमती आखाडे आणि श्रीमती कडू यांनीदेखील योजनेच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले.

आंबेगाव तालुक्यात २६, भोर ३०, मावळ ९१, मुळशी २७, जुन्नर ८, खेड ३४ आणि वेल्हे तालुक्यात ११ गावे अशा एकूण २२६ गावात ही योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीला खेड, जुन्नर, आंबेगाव आणि भोरचे उपविभागीय अधिकारी, संबंधित तालुक्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

राजकीय गद्दारांविषयीचा राग “बाळकडू” व्यंगचित्र प्रदर्शनातून व्यक्त होणार


खा. संजय राऊत यांच्या हस्ते होणार बाळकडू व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
पुणे,- शिवसेना पक्षात झालेली गद्दारी, पक्ष फुटी आणि एकंदरीत शिवसेना आणि सत्तेसाठी लालची झालेल्या राजकारण्यांचे व्यंगचित्र “बाळकडू २” या राजकीय आणि सामाजिक व्यंगचित्र प्रदर्शनातून व्यक्त करण्यात येत आहे. “बाळकडू २” व्यंगचित्र प्रदर्शन हा महाराष्ट्रात मागील वर्षात राजकीय उलथापालथीवर कुंचल्याच्या माध्यमातून ओढलेला आसूड असून व्यंगचित्रकार अमित पापळ यांनी ही व्यंगचित्र रेखाटली आहेत. बालगंधर्व कलादालन येथे या व्यंगचित्रांचे प्रदर्शन दिनांक १६ ते १८ जानेवारी रोजी होणार असून याचे आयोजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख अंनत घरत यांनी केले आहे. याचे उद्घाटन दिनांक १६ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वा. शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या हस्ते होणार असून यावेळी शिवसेना पक्ष आणि महाविकास आघाडीतील शहर प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.