Home Blog Page 1203

महाराष्ट्र सूक्ष्म, लघुआणि मध्यम उद्यम रक्षा प्रदर्शनी 2024चे आयोजन

पुणे-देशाच्या निर्मितीत संरक्षण क्षेत्रांने दिलेल्या मुख्य योगदान ला औळख देण्याकरिता पुण्याच्या अन्तर्राष्ट्रीय प्रदर्शन कन्वेंशन केंद्र, मोशी येथे 24 फेब्रआरी पासून 26 फेब्रुवारी 24 पर्यत होणा-या महाराष्ट्र सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्यम रक्षा प्रदर्शनी 2024 मधे सहभागी होण्या करिता आणि आपली क्षमता व सामर्थ्य प्रदर्शित करण्याकरिता महाराष्ट्र सरकार ने भारतीय वायु सेने ला आमंत्रित केले आहे.
महाराष्ट्रात मोठ्या संख्येने सूक्षम, लघु आणि मध्यम उद्योग, प्रायव्हेट कंपन्या , रक्षा अनुसंधान आणि विकास प्रयोगशाळा आणि रक्षा लोक-हित यूनिटांची (डीपीएसयू) क्षमता आणि सामर्थ्य लोकांचा समोर प्रदर्शित करने हा या प्रदर्शनी चा एक मुख्य उद्देश्य आहे. सहभागी झालेल्या अभिकरणां सोबतच मोठ्या संख्येने ने विद्यालय आणि कॉलेज चे विद्यार्थ्यांना पण आमंत्रित करण्याच्या आयोजकां चा हेतु आहे.
आकाश आणि समर मिसाइल प्रणाली च्या व्यतिरिक्त नवीन अत्याधुनिक लाइट हेलीकॉप्टर एमके-IV आणि लाइट सामरिक हेलीकॉप्टर च्या स्थिर डिस्प्ले च्या माध्यमांतून भारतीय वायु सेने ची आपल्या देशी क्षमतां चे प्रदर्शन करण्याची योजना आहे. भारतीय वायु सेना आपल्या आंतरिक अभिकरणें आणि प्रायव्हेट कंपन्यांच्या भागिदारी आणि सहयोगातून निर्मित उत्पादकांचे प्रदर्शन आपल्या स्टॉल वर करणार आहे. भारत सरकार च्या आत्म-निर्भर भारत चे उद्देश्य प्राप्त करण्याकरिता भारतीय वायु सेना आत्म-निर्भरता कड़े अग्रसर होत भविष्यच्या गरजांना पूर्ण करण्या करिता आणि या संदर्भात जागरूकता आणण्या संदर्भात भारतीय वायु सेने चे वरिष्ठअधिकारी सहभागी होणा-या कंपन्यानंबरोबर संवाद साधणार आहेत.
तरूणांना भारतीय वायु सेने बद्दल आकर्षित करने आणि त्यांना सहभागी करून घेण्याकरिता भारतीय वायु सेना आपला प्रचाराचा स्टाल लावणार आहे. भारतीय वायु सेना कश्या प्रकारे कार्यरत आहे, कुठल्या पद्धति ने आपल्या कार्रवायांना ने मूर्त रूप देते या सगळ्यांची माहिती प्रदर्शन स्थळांवर समावेशन प्रचार आणि प्रदर्शन वाहन (आइपीईवी) च्या माध्यमांतून लोकांसमोर सादर करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या शैक्षणिक संगठनांतून सहभागी होणारे विद्यार्थ्यानां भारतीय वायु सेनेत उपलब्ध असलेले वेगवेगळ्या संधी बद्दल या उपक्रमातून माहिती पुरविण्यात येणार आहे जेणे करून ते एक उज्जवल भविष्य घडवू शकतील. अधिकारीच्या रूपात भारतीय वायु सेनेत आल्यावर मिळ्ण्या-या सुविधा आणि फायदां बद्दल सांगण्यात येईल सोबतच अग्निवीर (पुरूष आणि महिला) बद्दल ही माहिती देण्यात येणार आहे.

‘आयएमडीआर’मध्ये मानव संसाधन या विषयावऱ परिषद

पुणे-डीईएसच्या ‘आयएमडीआर’ने आयोजित केलेल्या मानव संसाधन या विषयावरील परिषदेचे उद्घाटन सिरम इन्स्टिट्यूटचे महेंद्र इंगे आणि पर्सिस्टंट सिस्टीम्सचे योगेश पाटगावकर यांच्या हस्ते करण्यात आले .पाटगावकर म्हणाले, तंत्रज्ञानामुळे कोणत्या समस्येचे निवारण झाले हे समजून घेतले पाहिजे.  कोणताही बदल करताना त्याचा उद्देश लक्षात घेतला पाहिजे. 
इंगे म्हणाले, मानव परिस्थितीनुसार बदल स्वीकारत असतो. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या बदलांना घाबरण्याची गरज नाही. त्याचा खुलेपणाने स्वीकार केला पाहिजे.
डीईएसचे विश्वस्त जगदीश कदम यांनी स्वागत केले. आयएमडीआरच्या संचालिका डॉ. शिखा जैन यावेळी उपस्थित होत्या.
कमिन्स जनरेटर टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक ( मानव संसाधन) यांना “आयएमडीआर उदयोन्मुख मानव संसाधन नेतृत्व” या पुरस्काराने गौरविण्यात आले.
कृत्रिम बुद्धिमत्ता व मनुष्यबळ – मित्र की शत्रू, उत्पादकक्षम कृत्रिम बुद्धिमत्तेचा मनुष्यबळासाठी उपयोग, मानव संसाधन – काल आणि आज या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले.
पीटीसीच्या वरिष्ठ संचालिका आकांशा साने, नियामोचे अशोक बिल्डीकर,  व्हेरितासच्या दिपाली देवाईकर, विप्रोचे समीर गाडगीळ, हरबिंगरचे डॉ. विकास जोशी, सायटेल इंडियाच्या अनघा चाफळकर आणि असीम इन्फ्रास्ट्रक्चरच्या श्रुती त्रिवेदी यांनी सहभाग घेतला.

‘आयसीएआय’ पुणे शाखेच्या अध्यक्षपदी सीए अमृता कुलकर्णी

सीए सचिन मिणियार उपाध्यक्षपदी, सीए ऋषिकेश बडवे सचिवपदी, सीए मोशमी शहा खजिनदारपदी, सीए प्रणव आपटे विकासा-अध्यक्षपदी
पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेच्या अध्यक्षपदी सीए अमृता कुलकर्णी यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी सीए सचिन मिणियार, सचिवपदी सीए हृषीकेश बडवे, खजिनदारपदी सीए मोशमी शहा यांची, तर ‘विकासा’ या विद्यार्थी शाखेच्या अध्यक्षपदी सीए प्रणव आपटे यांची निवड झाली आहे. २०२४-२०२५ या वर्षासाठी नवीन कार्यकारी मंडळाची निवड जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष सीए अमृता कुलकर्णी यांनी मावळते अध्यक्ष सीए राजेश अग्रवाल यांच्याकडून पदभार स्वीकारला. कार्यकारिणी सदस्य म्हणून सीए राजेश अग्रवाल, सीए काशिनाथ पठारे, सीए प्रितेश मुनोत, सीए अजिंक्य रणदिवे काम पाहतील.
यावेळी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य सीए यशवंत कासार, सीए ऋता चितळे आदी उपस्थित होते. आयसीएआय पुणे शाखेच्या वतीने तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले. सीए राजेश अग्रवाल यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामांविषयी तसेच राबविलेल्या योजनांविषयी माहिती दिली. आयसीएआय पुणे शाखेला विभागीय स्तरावर प्रथम, तर राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांकाचे आणि ‘विकासा’ विद्यार्थी शाखेला केंद्रीय आणि विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सर्व सहकारी व कर्मचारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
सीए अमृता कुलकर्णी म्हणाल्या, “देशाचा अमृतकाल व आयसीएआय संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षात पुणे शाखेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणे अभिमानास्पद गोष्ट आहे. सर्वात मोठ्या शाखांपैकी एक असलेल्या पुणे शाखेला यशाची मोठी परंपरा आहे. ही उज्वल परंपरा पुढे नेत पर्यावरणपूरक, विद्यार्थी व सीए सभासदांना उपयुक्त असे उपक्रम वर्षभर राबवणार आहे. येत्या काळात सामान्यांसाठी आर्थिक साक्षरता मोहिमेसह सीए सभासद व विद्यार्थ्यांसाठी अनेक चांगले उपक्रम राबविणार आहोत.”
आयसीएआय पुणे शाखेची सुरुवात १९६२ मध्ये झाली. आज पुणे शाखेचे ११,००० पेक्षा अधिक सभासद आहेत. तर २०००० पेक्षा जास्त विद्यार्थी पुणे शाखेशी संलग्नित आहेत. बिबवेवाडी येथील आयसीएआय भवन येथे अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असलेल्या संस्थेत सनदी लेखापालांसाठी अनेक उपक्रमांचे आयोजन वर्षभर केले जाते. त्यामध्ये कार्यशाळा, चर्चासत्रे आदी गोष्टींचा समावेश आहे, असे सीए चंद्रशेखर चितळे यांनी नमूद केले.

शिवसेनेचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात असल्याने महिला सुरक्षित… डॉ.नीलम गोऱ्हे

कोल्हापूर दि.१६ : शिवसेना ही सातत्याने महिलांच्या सक्षमीकरण आणि सुरक्षिततेसाठी काम करत आली आहे. सध्या शिवसेनाचा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या रुपाने असल्याने महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत असे प्रतिपादन शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. शिवसेनेचे दोन दिवसाचे महाअधिवेशन कोल्हापूर येथे संपन्न होत आहे यावेळी त्या महिला व युवा सक्षमीकरण या विषयावर बोलत होत्या. यावेळी शिवसेना मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व मंत्री, शिवसेना नेते, उपनेते, युवासेना पदाधिकारी, महिला पदाधिकारी मोठ्या संख्याने उपस्थित होते.

डॉ.गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे महिलांसाठी काम करणारे सरकार आहे. महिलांना बस मध्ये अर्धा तिकिट, उच्च शिक्षणात मुलींना मोफत शिक्षण, नवीन उद्योग उभारण्यासाठी महिलांना सवलत, महिला बचतगट यांना विविध योजनांच्या मार्फत मदत उपलब्ध करुन त्यांना सक्षमीकरण करणे सातत्याने महिलांना न्याय मिळविण्याचे काम होताना दिसत आहे. मुख्यमंत्री शिंदे हे कोणत्याही कामाला नकार देत नाहीत. पांढरे रेशनकार्ड धारक महिलांना देखील आनंदाचा शिधा देण्यासाठी सूचना शासकीय अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची आठवण डॉ.गोऱ्हे यांनी करुन दिली. त्यामुळे श्री शिंदे हे खरे लोकांसाठी काम करणारे नेते असून हिंदूहृदयसम्राट यांचे खरे वारसदार असल्याचे देखील डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

या अधिवशनातून महिलांनी जात असतांना पाच कलमी कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात राबविण्याचे काम सुरु करावे. या पाच कलमी कार्यक्रम हा महिलांची व अल्पवयीन मुलींची सुरक्षिता, आरोग्य सुरक्षिता, डीप क्लीन शहर (स्वछता), राष्ट्रहिताच्या मुद्दयांवर, स्थानिक नागरिक, कार्यकर्त्या, पदाधिकारी यांच्या सोबत प्रत्यक्ष संवाद यावर काम करण्यासाठी वचनबद्ध होऊन येथून जायचे आहे असे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

देशात 2 लाखांपेक्षा जास्त नागरिक ” करोडोपती”

गेल्या पाच वर्षात देशातील करोडपती व्यक्तींची संख्या ही जवळ जवळ दुप्पट झाली आहे. देशातील आर्थिक विषमता एका बाजूला  हळूहळू कमी होत असल्याचा दावा होत असताना दुसरीकडे व्यक्तिगत पातळीवर नागरिकांच्या वार्षिक उत्पन्नात लक्षणीय वाढ झालेलीही पहावयास मिळत आहे. याबाबत प्रसिद्ध झालेल्या अहवालाचा हा मनोरंजक धांडोळा.

स्टेट बँक ऑफ इंडिया या देशातील अग्रगण्य राष्ट्रीयकृत बँकेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालात गेल्या दहा वर्षातील करदात्यांनी भरलेल्या विवरण पत्रांचे ( वार्षिक रिटर्न्स) विश्लेषण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे  भारतीय  करदात्यांची तपशीलवार  माहिती केंद्रीय वित्त मंत्रालयाचे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी याबाबतची आकडेवारी नुकतीच  संसदेच्या सभागृहासमोर ठेवली. त्यानुसार गेल्या पाच वर्षांमध्ये देशातील करोडोपती प्राप्तीकरदात्यांची संख्या जवळजवळ दुप्पट झाली आहे. 2019-20 या कर निर्धारण वर्षात ( ॲसेसमेंट इयर) एक कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या करदात्यांची संख्या 1.09 लाख इतकी होती. 2018-19 या आर्थिक वर्षात देशात एक लाखापेक्षा जास्त व्यक्तींचे उत्पन्न कोटी रुपयांपेक्षा जास्त झालेले होते. त्याच्या पुढील वर्षात म्हणजे 2020-21 या कर निर्धारण वर्षात करोडपती लोकांची संख्या 1 लाख 19 हजार 232 इतकी झाली होती. 2021-22 या कर निर्धारण वर्षात म्हणजे करोना महामारीच्या काळात थोडी कमी होऊन एक लाख 27 हजार 256 वर पोचली होती. मात्र 2022-23 या करनिर्धारण वर्षात देशातील करोडपती करता त्यांची संख्या 1 लाख 87 हजार 905 वर गेली. मात्र त्यापुढील वर्षात म्हणजे 2023-24 या करनिर्धारण वर्षात एक कोटी रुपयांपेक्षा जास्त करपात्र उत्पन्न असलेल्या प्राप्तीकर करदात्यांची संख्या तब्बल 2 लाख 16 हजार 217 इतकी झाली आहे.

याचा अर्थ करोना महामारी असलेल्या दोन वर्षात म्हणजे 2019-20 व 2020-21 या दोन आर्थिक वर्षांमध्ये प्राप्तिकर विवरण भरणाऱ्यांच्या संख्येमध्ये समाधानकारक वाढ म्हणजे 6.70 टक्के वाढ झाली होती. त्या पुढील वर्षात म्हणजे 2021-22 आर्थिक वर्षात या करदात्यांची संख्या 47 टक्के वाढली. या वर्षात 7.51 कोटी करदात्यांनी प्राप्तिकर विवरणपत्रे भरलेली होती. 2023-24 या चालू कर निर्धारण वर्षात डिसेंबर 2023 अखेरपर्यंत तब्बल 8.18 कोटी कर दात्यांनी त्यांची  वार्षिक विवरणपत्रे भरलेली असून त्यात नऊ टक्के इतकी भरघोस वाढ झालेली आहे. मार्च 2024 पर्यंत हा आकडा आणखी काही कोटींनी वाढण्याची शक्यता आहे.

प्राप्तिकर खात्याने गेल्या काही वर्षात कर विवरणपत्र भरण्याच्या प्रक्रियेमध्ये लक्षणीय पारदर्शकता व सुटसुटीतपणा निर्माण केल्यामुळे करदात्यांच्या  संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसते. मात्र केंद्रीय मंत्रालयाने दरवर्षी विवरणपत्रे दाखल करणाऱ्यांच्या संख्येत म्हणजे करदात्यात कोणत्या कारणामुळे उत्पन्न वाढल्याचे कारण दिलेले नाही. तरीही आकडेवारी असे सांगते की गेल्या पाच वर्षात केवळ नागरिकांचे व्यक्तिगत पातळीवरील उत्पन्न कोटी रुपयांपेक्षा जास्त झालेले आहे व त्याचप्रमाणे विवरणपत्रे दाखल करणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ सातत्याने होताना दिसत आहे. दरवर्षी प्राप्तिकर विवरण पत्रे दाखल करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत असल्याने निम्न मध्यम उत्पन्न वर्गातील ( ज्याला  लोअर मिडल इन्कम क्लास) करदात्यांची संख्या  मध्यम व उच्च उत्पन्न वर्गात ( म्हणजे मिडल व अप्पर इन्कम क्लास)  संक्रमित झालेली आहे. त्याच प्रमाणे उच्च उत्पन्न मिळणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. पाच ते दहा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या करदात्यांची संख्या 8.10 टक्के वाढली आहे. दहा लाख ते वीस लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या करदात्यांच्या संख्येत 3.80 टक्के वाढ झालेली आहे तर वीस लाख ते पन्नास लाख या दरम्यान वार्षिक उत्पन्न असणाऱ्या प्राप्तिकर दात्यांच्या संख्येत 1.50 टक्के इतकी चांगली वाढ झालेली आहे. यातील आणखी चांगली गोष्ट म्हणजे पन्नास लाख ते एक कोटी रुपये या दरम्यान वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांच्या संख्येतही 0.20 टक्के झालेली आहे. त्याचप्रमाणे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करोडपती करदात्यांची संख्या 0.02 टक्यांनी वाढलेली आहे. यातील खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाच लाख ते दहा लाख रुपये या दरम्यान वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांची संख्या 2013-14 ते 2022-23 या कालावधीत तब्बल 295 टक्क्यांनी वाढली. तसेच दहा लाख ते पंचवीस लाख यादरम्यान वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांची संख्या तीन पट म्हणजे 291 टक्के वाढलेली आहे.कर निर्धारण वर्ष 2021-22 वर्षात देशात सात कोटी करदात्यांनी कर विवरणपत्रे भरलेली होती. ही संख्या 2022-23 या वर्षात 7.40 कोटींवर गेली. मात्र 2023-24 या करनिर्धारण वर्षात डिसेंबर 2023 अखेरपर्यंत 8.20 करदात्यांनी विवरण पत्रे दाखल केलेली आहेत. म्हणजे मार्च 2024 पर्येत त्यात लक्षणीय वाढ होणे अपेक्षित आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांच्या व काहीही उत्पन्न किंवा अल्प उत्पन्न असणाऱ्यांच्यातील तफावत कमी होत असल्याचा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे. या अहवालात देशातील मध्यमवर्गामध्ये लक्षणीय रित्या वाढ होत असून वाढते उत्पन्न होण्यामध्ये नागरिकांची संख्या वाढताना दिसत आहे.

त्याचप्रमाणे दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या करता त्यांची संख्या गेल्या दहा वर्षात 2.81 टक्क्यांवरून 2.50 टक्क्यांवर घटलेली आहे. तसेच वर्षाला 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या करदात्यांची संख्या गेल्या दहा वर्षात 1.64 टक्क्यांवरून लक्षणीयरित्या  कमी झाली असून ती 1.64 टक्क्यांवरून 0.77 टक्के इतकी खाली आलेली आहे.

देशातील नागरिकांमध्ये उत्पन्नातील असमानता मोजण्यासाठी एक ” गिनी को- इफिशियंट” पद्धती जगभर व्यापक प्रमाणावर वापरली जाते. त्या परिणामांचा वापर करून गेल्या दहा वर्षातील उत्पन्नातील असमानता 0.472 टक्के कमी झाल्याचा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे.

सध्या गेल्या पाच वर्षात ज्या वेगाने देशातील करदात्यांची व त्यांनी दाखल केलेल्या विवरण पत्रांच्या संख्येत वाढ होत आहे त्यानुसार 50 लाख रुपये ते एक कोटी रुपये यांच्या दरम्यान 2046-47 या करनिर्धारण वर्षात 0.50 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.त्याचप्रमाणे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या प्राप्तीकर दात्यांची संख्या 0.075 टक्क्यांनी वाढणार आहे असाही सकारात्मक उत्पन्न वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सर्वसामान्यांच्या माहितीसाठी आपले आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2023 ते 31मार्च 2024 असे असेल  तर त्याचे करनिर्धारण वर्ष म्हणजे ॲसेसमेंट इयर  हे 2024-25 असे असते.

लेखक-प्रा. नंदकुमार काकिर्डे

*( लेखक पुणेस्थित जेष्ठ अर्थविषयक पत्रकार व बँक संचालक आहेत)

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातून इंदिराजी आणि नर्गिस दत्त यांची नावे वगळल्याचा निषेध-माजी आमदार मोहन जोशी

पुणे – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातून दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी आणि दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त यांची नावे वगळल्याचा निषेध माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केला आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना मोहन जोशी यांनी निवेदन पाठविले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या समितीने ‘७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ नियमावली’मध्ये बदल केले आहेत. दिग्दर्शकाच्या पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या नावे आणि राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटासाठी दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त यांच्या नावे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिले जातात. नियमावलीत बदल करताना मंत्रालयाने ही दोन्हीही नावे बदलली आहेत, त्याचा आम्ही निषेध करीत आहोत, असे मोहन जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.

स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी पंतप्रधान पदाच्या काळात चित्रपट, नाटक आदी कलांना उत्तेजन दिले होते. याकरिता त्यांच्या स्मरणार्थ नवोदित दिग्दर्शकाला प्रोत्साहन मिळावे, याकरिता इंदिराजींच्या नावे पुरस्कार दिला जात होता. स्वर्गीय अभिनेत्री नर्गिस दत्त या त्यांच्या चित्रपटातील योगदानामुळे ‘मदर इंडिया’ म्हणून ओळखल्या जात होत्या. या दोन्हीं महनीय व्यक्तींची नावे पुन्हा दिली जावीत, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्याद्वारे करीत आहोत, असे मोहन जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.

जिल्ह्यातील गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम सुरू

पुणे, दि. १७ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्यावतीने पुणे जिल्ह्यातील शिवनेरी, सिंहगड, राजगड, तोरणा व इतर किल्ल्यावर व परिसरात १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सिंहगड किल्ला व परिसरातील स्वच्छता मोहिमेत २८५ किलो सुका कचरा (प्लास्टिक कचरा) संकलित केला असून पुणे महानगरपालिका कचरा प्रक्रिया प्रकल्पाकडे देण्यात आला.

यामध्ये ग्रा. पं. सोरतापवाडीचे संरपच, ग्रामसेवक तसेच नागरीकांनी पुणे जिल्हा परिषदेच्या आवाहनास प्रतिसाद देऊन सक्रिय सहभाग घेतला. मावळ तालुक्यातील लोहगड किल्ला येथेदेखील ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेवक तसेच नागरीकांनी स्वच्छता मोहिम राबवून कचरा संकलित केला.

जिल्ह्यातील सर्व गड किल्ल्यांना राज्य, देश विदेशातून मोठ्या प्रमाणात नागरीक, अभ्यासक, इतिहासकार दैनंदिन भेटी देत असतात. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यातून, देशभरातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त, जिल्ह्यातील किल्ल्यांना भेट देवून अभिवादन करत असतात. याकरिता ही स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी गट, समन्वयक, तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवक तरुण मंडळे सहभागी होत आहेत.

जिल्ह्यातील नागरीक, पर्यटक व भाविक तसेच विद्यार्थी यांच्यामध्ये कचऱ्याबाबत जागरूकता व जबाबदारी निर्माण करून जिल्हा कचरामुक्त करण्यात येत आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आप्पासाहेब गुजर यांनी दिली.

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण- जिल्ह्यातील सर्व किल्ले, ऐतिहासिक व पर्यटन स्थळी स्वच्छता ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आलेले असून सर्व गावे व परिसर कचरामुक्त रहावे याकरिता विशेष मोहिम राबविण्यात आलेली आहे.
००००

पुणे येथे २४ फेब्रुवारीपासून ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ चे आयोजन

पुणे,दि.१७: संरक्षण उत्पादन क्षेत्रात ‘आत्मनिर्भर भारता’च्या वाटचालीला आणखी बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन करणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान पुणे येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचे’ आयोजन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणारा महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिलाच डिफेन्स एक्स्पो असणार आहे.

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्राविण्य असणाऱ्या उद्योगातील समन्वयाला चालना देण्याचे उद्देशाने भारतीय नौसेना, लष्कर आणि वायुसेना या तिन्ही सुरक्षा दलांचा यात महत्वाचा सहभाग असणार आहे. यात २०० हून अधिक सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्ट-अप आणि २० हजारपेक्षा अधिक अभियांत्रिकी विद्यार्थी एकत्र येऊन ज्ञानाची देवाणघेवाण करतील.

भारताचे औद्योगिक शक्तिस्थान म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र हे आत्मनिर्भर भारताचे संवर्धन करण्यात आघाडीवर असलेले राज्य आहे. राज्यात ३९ लाख ८८ हजार एमएसएमई चे मजबूत जाळे आहे. ज्यात उद्यम पोर्टलवर १ कोटी ८ लाख रोजगार आहेत. एमएसएमई डिफेन्स एक्स्पो अशा उद्योगांना त्यांच्या क्षमतांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि संरक्षण उद्योगातील प्रमुख भागधारकांशी जोडण्यासाठी मोठे व्यासपीठ प्रदान करेल.

एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४ ची ठळक वैशिष्ट्ये:
प्रदर्शन: २०० हून अधिक एमएसएमई प्रदर्शक त्यांच्या एरोस्पेस, शस्त्रास्त्रे, इलेक्ट्रॉनिक्स, दळणवळण आणि लॉजिस्टिक्स आदी संरक्षण- संबंधित उत्पादने, तंत्रज्ञान आणि सेवांचे प्रदर्शन करतील.

• बी २ बी मीटिंग्ज: एमएसएमई आणि प्रमुख संरक्षण खरेदी संस्था, उद्योग क्षेत्रातील मोठ्या संस्था आणि संभाव्य गुंतवणूकदार यांच्यात संवाद सत्रे होतील.

• नॉलेज सेमिनार : प्रख्यात तज्ज्ञ आणि या क्षेत्राशी संबंधित प्रमुख व्यक्ती ‘संरक्षण क्षेत्रातील नवे प्रवाह, संधी आणि आव्हाने’ यावर दृष्टीक्षेप टाकतील.

• कौशल्य विकास कार्यशाळा: संरक्षण उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एमएसएमई कर्मचाऱ्यांची कौशल्ये आणि क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने परस्पर संवादाची सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

• सरकारी सहाय्य उपक्रम : संरक्षण उत्पादनात एमएसएमईंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सरकारी योजना, धोरणे आणि आर्थिक साहाय्याचे पर्याय प्रदर्शित करण्यात येतील.

• धोरणात्मक भागीदारी : संरक्षण क्षेत्रात एमएसएमईना व्यवसाय वाढवण्यासाठी संभाव्य खरेदीदार, सहयोगी गुंतवणूकदारांशी संपर्क साधता येईल.

• नव्या प्रवाहाविषयी माहिती: तज्ज्ञांची चर्चासत्रे आणि कार्यशाळांद्वारे संरक्षण उद्योगातील नवीनतम घडामोडी आणि प्रवाहावर अद्ययावत माहिती मिळू शकेल.

• आर्थिक सहाय्य : संरक्षण क्षेत्रातील एमएसएमईंच्या वाढीला चालना देण्यासाठी सरकारी योजना आणि निधीच्या संधी उपलब्ध होतील.

या एक्स्पोद्वारे एमएसएमईंना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यामध्ये उद्योग जोडणी सुलभ करणे, तांत्रिक सहाय्य मिळवून देणे करणे आणि नियामक प्रक्रिया सुव्यवस्थित करणे समाविष्ट आहे. यामुळे भारताच्या संरक्षण परिसंस्थेमध्ये त्यांना सक्रियपणे सहभागी होण्यास सक्षम करता येईल. ‘एमएसएमईं डिफेन्स एक्स्पो २०२४’ मध्ये एमएसएमईं, संरक्षण अधिकारी, उद्योग प्रतिनिधी, गुंतवणूकदार आणि शैक्षणिक क्षेत्रातील २ हजाराहून अधिक संस्था सहभागी होतील अशी माहिती उद्योग विभागाचे प्रधान सचिव, डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.

एल ॲंड टी. डिफेन्स, महिंद्रा, टाटा, डीआरडीओ, सोलार, भारत फोर्ज आणि सरंक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम (पीएसयू) सारख्या उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी केलेल्या नाविन्यपूर्ण संरक्षण उत्पादनामुळे महाराष्ट्राची संरक्षण क्षेत्रात प्रमुख उत्पादक म्हणून ओळख निर्माण झाली आहे. यात सहभागी संस्थांना फायदेशीर व्यावसायिक संधी, शेकडो कोटींचे संभाव्य व्यवहार आणि संरक्षण तंत्रज्ञान निर्यात क्षेत्रातील एमएसएमई आणि स्टार्ट-अप्ससाठी धोरणात्मक उपाययोजना यामाध्यमातून शक्य होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- हा एक्स्पो आपल्या राज्याच्या संरक्षण क्षमता बळकट करण्यासाठी आमची बांधिलकी अधोरेखित करतो. नावीन्य आणि सहकार्यावर लक्ष केंद्रित करून, आमच्या प्रवासात हा कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावतो. आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत आत्मनिर्भरतेकडे, संरक्षण क्षेत्रातील वाढ आणि नवकल्पनांना चालना देतो.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- आत्मनिर्भर भारत ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरंक्षण क्षेत्रात आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात डिफेन्स एमएसएमई तयार झाल्या आहेत. तीनही सैन्य दलाचा सहभाग यात असणार आहे. आज देशात मोठ्या प्रमाणात संरक्षण साहित्य निर्माण होत असताना महाराष्ट्रात १० ऑर्डंनंस फॅक्टरी आणि ५ डिफेन्स पीएसयु आहेत. ती इकोसिस्टिम राज्यात तयार झाली आहे. टाटा, भारत फोर्ज, सोलार, एल ॲंड टी, अशा मोठ्या कंपन्या राज्यात संरक्षण क्षेत्रात उपादने तयार करतात. यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योजक येतील, गुंतवणूक वाढेल. मुख्य म्हणजे उत्पादन करणारे आणि खरेदीदार आर्म्ड फोर्स असे दोन्ही एका ठिकाणी एकत्र असतील. उद्योग विभागाने पुढाकार घेऊन ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. आजपर्यंत झालेल्या एक्स्पोमधील सर्वात मोठा एक्स्पो महाराष्ट्रात करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत- महाराष्ट्रातील एमएसएमईच्या संरक्षण उत्पादनातील अफाट क्षमतेचा उपयोग करण्यासाठी हा एक्स्पो एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्थानिक नवकल्पना वाढवून आणि आपली देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत करून संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचा पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाशी हे सुसंगत आहे.

कार्तिक केदार निवाते याची स्केटिंग स्टेट लेवल साठी निवड

पिंपरी, पुणे (दि. १७ फेब्रुवारी २०२४) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील कार्तिक केदार निवाते याची स्केटिंग असोसिएशन पुणे मधून अंडर ११ मध्ये २०२४ स्टेट लेवल साठी निवड झाली आहे. कार्तिक निवाते हा तिसरीचा विद्यार्थी आहे. त्याने नियमित अभ्यास करून रोज तीन तास स्केटिंगचा सराव करून हे यश मिळवले आहे. अंडर – ११ रोलर स्केटिंग चॅम्पियन शिप स्पर्धा मुंबई विरार येथे होणार आहे.
प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, क्रीडा शिक्षक चंद्रकांत ठोंबरे, संदीप घाडगे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी कार्तिकचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

जागतिकीकरणामुळे शिक्षण क्षेत्रातही तीव्र स्पर्धा – प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे

शि. प्र. मंडळींच्या निगडी शाळेतील प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी, पुणे (दि. १७ फेब्रुवारी २०२४)
जागतिकीकरणामुळे उद्योग, व्यवसाय बरोबरच शिक्षण क्षेत्रातही तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. पुढील काही वर्षात परदेशातील नामवंत विद्यापीठे आपल्या शहरांमध्ये शैक्षणिक संकुले उभे करून शिक्षण क्षेत्रात प्रवेश करणार आहेत. तंत्रज्ञान रोज विकसित होत आहे, या नव तंत्रज्ञानाचा वापर वेळोवेळी शालेय अभ्यासक्रमात झाला पाहिजे. भविष्यात विकसित भारत होण्यासाठी आपली अर्थव्यवस्था देखील वेगाने वाढली पाहिजे. यासाठी उद्याचा नागरिक म्हणजे आजचा विद्यार्थी देखील या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तेवढाच सक्षम असला पाहिजे. विद्यार्थ्यांचे विचार करण्याची क्षमता आणि मानसिकता विकसित झाली, तरच नवतंत्रज्ञानाद्वारे संकल्पना साकारता येतील. त्यांना घडवण्याची जबाबदारी आता शिक्षकांबरोबरच पालकांची देखील आहे त्यासाठी त्यांनी देखील प्रगल्भ आणि कौशल्यवान झाले पाहिजे असे मार्गदर्शन
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी केले.
शिक्षण प्रसारक मंडळीच्या यमुनानगर, निगडी येथील इंग्रजी व मराठी माध्यम शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दोन दिवसीय भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी (दि.१७) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी, मुख्याध्यापिका लीना वर्तक, ज्योति बक्षी, सविता बिराजदार, रवींद्र मुंगसे तसेच शिक्षक, पालक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
मोबाईल सारख्या भौतिक गोष्टीकडे नवीन पिढी आकर्षित होत असताना या प्रदर्शनात लावलेल्या पुस्तकांच्या स्टॉलवर विद्यार्थ्यांसह पालकांनी गर्दी केली होती हे आशादायी चित्र आहे. हे प्रदर्शन रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत खुले असून सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे. या ठिकाणी लावण्यात आलेल्या विविध दालनास पालक, विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी भेट देऊन मनसोक्त खरेदीचा आनंद लुटावा असे आवाहन शाळा समितीचे अध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी यांनी केले आहे.
येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी चित्रांचे कोलाज आणि पुस्तके, गोविज्ञान व आधारित वस्तू आणि त्यावरील पुस्तके तसेच विविध प्रकारची झाडे यांचे प्रदर्शन व विक्री दालने थाटण्यात आली आहेत. विद्यार्थी, पालक व प्रेक्षकांनी खाऊ गल्लीत विविध खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर गर्दी केली होती.
स्वागत प्रार्थना स्नेहल देशपांडे, शुभांगी डोंगरे, रमा जोशी यांनी सादर केली. प्रास्ताविक रवींद्र मुंगसे, आभार शोभा जोशी यांनी मानले.

अनिल कपूर यांनी कोलकाता येथे फ्रेंच चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या आवृत्तीचे केलं अनावरण 

 अनिल कपूरने कोलकाता येथील फ्रेंच फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्या आवृत्तीच्या उद्घाटन समारंभात हजेरी लावून या कार्यक्रमाला एक शोभा आणली. हा कार्यक्रम सिनेमॅटिक उत्कृष्टता आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचा उत्सव होता. 
 नंदन यांच्या सहकार्याने Alliance Française du Bengale कोलकाता यांनी आयोजित केलेला हा सोहळा भारतीय आणि फ्रेंच चित्रपटसृष्टीतील एक नवीन दुवा जोडणारा ठरला आहे. फ्रेंच कौन्सेल जनरलचे विचारशील विचार आणि अनिल कपूर यांनी “कहां कहां से गुजर गया’ या चित्रपटातील एक खास फोटो इथे दाखवला.
 प्रख्यात छायाचित्रकार नेमाई घोष यांनी कॅप्चर केलेले या छायाचित्राने चित्रपटाच्या पाठीमागील सर्जनशील प्रक्रियेची एक झलक दाखवली. 
https://www.instagram.com/p/C3arkuKofE1/?igsh=cDNqbWluZ2ljcjJh

 अनिल कपूर यांनी महोत्सवाचा एक भाग असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि सिनेमाद्वारे क्रॉस-कल्चरल समज वाढवण्याच्या विचारावर चर्चा केल्या. कोलकाता येथील फ्रेंच फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्या आवृत्ती च अनावरण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला असून शहराच्या सांस्कृतिक लँडस्केपमध्ये एका नवीन गोष्ट या निमित्ताने घडली आहे. अध्यायाची सुरुवात झाली. भारत आणि फ्रान्स यांच्यातील भविष्यातील सहकार्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुद्धा या निमित्ताने झाली.

गांधी-नेहरु विचारधारा संपवण्यासाठी भाजपाकडून पंडित नेहरुंवर सातत्याने टीका: रमेश चेन्नीथला.

नरेंद्र मोदींच्या सत्तेचे दरवाजे महाराष्ट्रच बंद करु शकतो: नाना पटोले.

लोकसभेच्या निवडणुकीत मोदी व भाजपाला हटवण्याचा संकल्प करा: बाळासाहेब थोरात

मोदी सरकारच्या तुलनेत डॉ. मनमोहनसिंह सरकारच्या अर्थव्यवस्थेची गती जास्त: पृथ्वीराज चव्हाण

लोणावळ्यातील दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीराची सांगता.

लोणावळा, दि. १७ फेब्रुवारी

नरेंद्र मोदी व भाजपा लोकशाहीला संपवण्यासाठी बसले आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदी पुन्हा सत्तेत आले तर अनेकांना जेलमध्ये जावे लागले. कारण ते लोकशाही, संविधान काहीच मानत नाहीत. आता आपल्यासमोर करा किंवा मरा अशी परिस्थिती आहे. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यावर भाजपा व नरेंद्र मोदी सातत्याने टीका करत असतात त्यामागे गांधी-नेहरुंची विचारधारा संपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असे प्रभारी रमेश चेन्नीथला म्हणाले आहेत.

लोणावळ्यातील दोन दिवसाच्या राज्यस्तरीय शिबिरात समारोपाचे मार्गदर्शन करताना चेन्नीथला पुढे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीसाठी फार कमी वेळ राहिला आहे. आता निवडणुका सायंटिफिक पद्धतीने लढवल्या पाहिजेत यावर चर्चा झाली आहे. बुथ मॅनेजमेंट हे सर्वात महत्वाचे आहे. इंडिया आघाडीला सत्तेत आणण्यासाठी काम केले पाहिजे आणि राज्यातून ४८ जागा जिंकण्याचे लक्ष ठेवा. तसेच पक्षात शिस्त असली पाहिजे. कोणी काहीही बोलावे हे चालणार नाही. एनएसयुआय, युवक काँग्रेस, फ्रंटल सेल त्यांच्याही प्रदेश स्तरावर बैठका झाल्या पाहिजेत.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, लोणावळ्यात दोन दिवसाच्या शिबिरातून चांगले बौद्धीक व वैचारिक मंथन झालेले आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान बाळगून काम करा. काँग्रेस पक्ष संपूर्ण राज्यात एकजूट असला पाहिजे. सर्व सेल, फ्रंटल संघटना सर्वांनी सोबत असले पाहिजे. पक्षाच्या अजेंड्यावरच सर्वांनी काम केले पाहिजे व काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या अजेंड्यानुसारच काम करा आणि लोकसभेची लढाई जिंकायची आहे हा संकल्प घेऊनच जा. आता आपल्याकडे वेळ नाही, युद्ध पातळीवर काम करायचे आहे. भाजपा कसे खोटे बोलत आहे, जनतेची फसवणूक करत आहे हे लोकांमध्ये जाऊन सांगा, कुठेही कमी पडू नका. आघाडीला विजयी करुन भाजपाचा पराभव करावा लागणार आहे. वातावरण काँग्रेस व मविआच्या बाजूने आहे. नरेंद्र मोदींच्या सत्तेचे दरवाजे महाराष्ट्र बंद करु शकतो, हे लक्षात घ्या असे सांगत शेवटी नाना पटोले यांनी “तुम मुझे आंधीओंका डर बताते हो, मैं तो तुफानों से बगावत कर के आया हूँ”. हा शेर ऐकवून भाषण संपवले.

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, काँग्रेसची पिछेहाट झालेली नाही तर तत्वज्ञानाची पिछेहाट होत आहे, शिबीरे कमी झाली म्हणून विचाराची पिछेहाट झाली आहे. आपल्याकडे परंपरा, तत्त्वज्ञान, विचार, काँग्रेस सरकारने केलेले काम आहे, काँग्रेसने देशासाठी बलिदान दिले आहे आपण काँग्रेस पक्षाचे आहोत याचा अभिमान असला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपल्याकडे फारसा वेळ नाही. आघाडी करून निवडणुका लढवल्या जाणार आहोत. उमेदवार कोणीही असला तरी लक्ष्य एकच आहे ते म्हणजे भाजपा व नरेंद्र मोदी सत्तेवर राहता कामा नये ते देशासाठी हिताचे नाही.

सध्या व्यावसायिक राजकारण झाले आहेत, सत्ता आली की तिकडे जायचे, पुन्हा काँग्रेसची सत्ता आली की पुन्हा काँग्रेसमध्ये यायचे. हे चालणार नाही अशी भूमिका घेतली पाहिजे. सत्तेत जायचे, पैसे कमावायचे असले धंदेवाईक राजकारण चालू देऊ नका. अशांना काँग्रेस पक्षात स्थान देऊ नका. अशा धंदेवाईक राजकारण्यांना जनतने धडा शिकवला पाहिजे. राहुल गांधी यांचे कष्ट वाया जाणार नाहीत, भारत जोडो यात्रेतून सकारात्मक उर्जा निर्माण होत आहे. आपणही जनतेकडे गेले पाहिजे, चांगले काम केले तर महाविकास आघाडी लोकसभेच्या ३८ जागांपेक्षा जास्त जिंकू शकते.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की, पंतप्रधान मोदी सातत्याने भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाची असल्याचे सांगत असतात व स्वातंत्र्याला १०० वर्षे होतील त्यावेळी २०४७ साली भारत विकसीत राष्ट्र होईल. भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाची झालेली आहे परंतु नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्थेची जी गती राहिली त्याच्या तुलनेत डॉ. मनमोहनसिंह सरकारच्या काळातील गती जास्त होती, त्याच गतीने वाढ झाली असती तर भारत आजच तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला असता. युपीए काळात अर्थव्यवस्थेचा विस्तार १८३ टक्के झाला तर मोदी काळात तो १०३ टक्के झाला. अर्थव्यवस्थेची पिछेहाट होण्यामागे नोटबंदी, जीएसटीची अंमलबजावणी, अचानक लावलेला लॉकडाऊन, शेतकऱ्यांविरोधात पुकारलेले युद्ध आणि भ्रष्टाचार या पाच मुद्द्यांमुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावली.

२०४७ साली भारत विकसीत राष्ट्र होणार असे स्वप्न दाखवले जात आहे पण त्यासाठी दरडोई उत्पन वाढले पाहिजे. ज्या देशाचे दरडोई उत्पन्न जास्त ते समृद्ध राष्ट्र. त्यासाठी दरडोई उत्पन्न १३ हजार ८४५ डॉलर असावे लागते. सध्या भारताचे दरडोई उत्पन्न २८०० डॉलर आहे. आणि त्यासाठी १० टक्के दराने अर्थव्यवस्था वाढली पाहिचे पण मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेचा दर ६.०-६.२५ टक्के आहे.म्हणजे ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ अशी मोदींची अवस्था आहे, असे चव्हाण म्हणाले.

शिबिराची सांगता झाल्यानंतर नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले, शिबिराची माहिती दिल्यानंतर पटोले म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा असा करावा लागेल की तो कोर्टातही टिकला पाहिजे. देवेंद्र फडणविसांनी २०१८ साली असाच कायदा केला पण तो पुढे कोर्टात टिकला नाही. आता सरकार जे विधेयक आणत आहे त्यावर विधिमंडळात सर्व मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे. भाजपा सरकारने मराठा समाज व जरांगे पाटील यांची फसवणूक केली आहे.आता पुन्हा फसवणूक करु नका असेही पटोले म्हणाले.

पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, संजय राठोड, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, एनएययुआचे प्रदेशाध्यक्ष अमिर शेख आदी उपस्थित होते.

‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’ ला जुन्नर येथे सुरुवात

पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमातून इतिहास आणि कलासंस्कृतीचे सुंदर दर्शन

पुणे, दि.१७: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’ चा शुभारंभ जुन्नर येथे करण्यात आला. १९ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात उपस्थितांना राज्याच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.

महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव म्हणजे कला, संगीत, साहस आणि इतिहास यांचा सुरेख संगम आहे. पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमांची सुरुवात विनायक खोत यांच्या हस्ते ‘महादुर्ग फोर्ट वॉक’ च्या उद्घाटनाने झाली. या सहलीच्या माध्यमातून पर्यटकांना जुन्नर परिसरातील इतिहासाचा वारसा पहायला मिळाला.

जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे धनेशशेट संचेती यांच्या उपस्थितीत ‘ॲडव्हेंचर झोन’ या साहसी खेळांचे रोमांचक प्रदर्शन करण्यात आले . याचदरम्यान जुन्नर किल्ल्यावरील ‘हेरिटेज वॉक’ आणि संस्कृतीचे प्रदर्शन करणाऱ्या बुट्टे पाटील मैदानातील ‘आर्ट डिस्ट्रिक्ट’ प्रदर्शनामुळे सोहळ्याची रंगत वाढली.

पर्यटन संचालक बी. एन. पाटील, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यशील शेरकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर, विभागीय अभियंता गणेश सिनाळकर यांच्या हस्ते जलाशय किनारी मनमोहक वास्तव्याचा अनुभव देणाऱ्या टेंट सिटीचे उद्घाटन करण्यात आले. बुट्टे पाटील मैदानातील कार्यक्रमस्थळाच्या संगीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.

श्री.शेरकर यांनी पॅरामोटरिंग झोनचे उद्घाटन केले. बुट्टे पाटील मैदानात वसलेल्या फूड डिस्ट्रिक्टमधील खाद्य महोत्सव खास आकर्षण आहे. येथील महिला बचत गटांनी तयार केलेल्या कलात्मक वस्तूंच्या स्टॉल्सचे उद्घाटन जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आशाताई बुचके यांच्या हस्ते, तर द्राक्ष महोत्सवाचे उद्घाटन अनिल मेहेर यांच्या हस्ते करण्यात आले.

पहिल्या दिवसांच्या कार्यक्रमाची सांगता ही सूर्यास्तासोबत झालेल्या रात्रीच्या निरभ्र आकाशात तारकादर्शनाच्या मनमोहक अनुभवाने झाली.

दुसऱ्या दिवशी १८ फेब्रुवारी रोजी सायं. ६:३० ते ७:३० वा. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ ही नृत्य नाटिका, सायंकाळी ७:३० ते रात्री ९.३० वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचे दर्शन घडवणारा ‘गनिमी कावा’ हा कार्यक्रम होईल.

सार्वजनिक आरोग्य विभागाची १९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम

पंधरवड्यात १ लाख शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष्य

पुणे दि.१७- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत १९ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२४ दरम्यान राज्यभरात विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार असून, या कालावधीत १ लाख रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे.

शासकीय रुग्णालय, मान्यता प्राप्त स्वयंसेवी संख्या रुग्णालय येथे मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

या मोहिमेंतर्गत १ लाख शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हानिहाय नियोजन केले असून संबंधित आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्र शासनामार्फत ‘राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान’ ही विशेष मोहीम जून, २०२२ पासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत ५० किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये अंधत्व आणि एसव्हीआय कारणीभूत असलेल्या मोतिबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष पूर्णपणे भरून काढण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत २०२२ ते २०२५ या तीन वर्षात २७ लाख मोतिबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आहे. आरोग्य विभागाच्या या मोहिमेमुळे नागरिकांना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ घेता येणार आहे.

सन २०२२-२३ मध्ये राज्यात मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे ११२.५१ टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे व २०२३-२४ या आर्थिक वर्षात डिसेंबर, २०२३ पर्यंत एकूण उद्दिष्टाच्या ६७.३० टक्के मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता १९ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२४ या कालावधीत जिल्हा स्तरावर ‘विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेकरिता दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी शासकीय आरोग्य संस्थांसह, अशासकीय स्वंयसेवी संस्था तसेच खासगी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. याविषयी किंवा इतर आरोग्य विषयक सल्ला घेण्यासाठी नागरिकांनी १०४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

शरद पवार म्हणाले पक्ष आणि चिन्ह गेल्याने आपलं अस्तित्व संपत नाही

पुणे-राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हातून गेल्यानंतर शरद पवार आज पहिल्यांदाच बारामतीमध्ये आहेत. यावेळी त्यांनी पक्ष आणि चिन्ह दुसऱ्याला दिलं म्हणून अस्तित्व संपत नाही असे म्हणत कार्यकर्त्यांना धीर देत नव्याने लढण्याची उमेद दिली. तसेच माझ्या वयाची चिंता करू नका, असे सांगत त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला.संपूर्ण पवार कुटुंबाने मला वेगळे पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असे अजित पवार बारामतीत झालेल्या सभेत म्हटले आहे. या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “उमेदवारी कोणी असेल तर, त्याला मतदारांची सात घालण्याचा अधिकार आहे. त्या दृष्टीने त्यांनी काही केले असेल. पण संपूर्ण कुटुंबातील लोक एका बाजूला आहेत आणि मीच एकटा आहे, असे सांगणे यांचा अर्थ लोकांना स्वत: भावनाकत्मक भूमिका मांडून त्यांची सहानुभती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.” असे पवार म्हणाले.

शरद पवार म्हणले, ”राजकारणात पक्ष उभे राहतात, काही पक्ष सोडून जातात. नवे येतात, असं होत असतं. एखादी व्यक्ती गेली म्हणजे संपूर्ण पक्ष गेला, असं नाही. चिन्हाची काळजी करायची नसते. चिन्ह काढून घेतलं म्हणजे संघटनेच अस्तित्व संपेल अस कधी होत नसतं. सामान्य लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे”,असा सल्ला त्यांनी दिला. तसेच मी आत्तापर्यंत 14 निवडणुका लढलो त्यातल्या पाच निवडणुकांमध्ये चिन्हं वेगवेगळी होती असेही त्यांनी नमूद केले.यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ”ज्याने पक्ष स्थापन केला त्याचा पक्षच काढून दुसऱ्याला दिला. नुसता पक्षच दिला नाही तर चिन्हही देऊन टाकलं. ठीक आहे, हा निर्णय कायद्याला धरुन आहे असं वाटत नाही. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा निकाल नीट लागेल अशी अपेक्षा आहे.