Home Blog Page 12

पुतीन भेट समारंभास काँग्रेसच्या विरोधीपक्ष नेत्यांना राष्ट्रपती भवनचे निमंत्रण न देणे, ही परंपरा व संकेतांची पायमल्ली..!

प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

रशिया सोबत संबंधाची पायाभरणी काँग्रेस काळात..!
मुंबई -१९७१ च्या युद्धात अमेरिकेने जेंव्हा बंगालच्या उपसागरात विमानवाहू जहाज पाठवून पाकिस्तान’ला पाठिंबा दिला होता,
त्यावेळी २ दशकात झालेली पं नेहरूं, शास्त्रीं व इंदीरा गांधी’च्या नेतृत्वाखालील भारताची प्रगती, सामर्थ्यपुर्ण अस्तित्व, स्वयंसिद्धता व परराष्ट्र नितीची दखल घेऊनच, रशिया’ने भारतास मदत देऊ केली, हे वास्तव आहे.
तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदीरा गांधीची परराष्ट्र निती व मुत्सद्देगिरी मुळे ऑगस्ट १९७१ मध्ये भारताचा “शांतता, मैत्री आणि सहकार्याचा भारत-सोव्हिएत करार” होऊ शकला हे ईतिहास साक्ष आहे.
रशिया सोबत उभारलेले गतकाळातील, काँग्रेस कालीन मैत्री संबंध वेळोवेळी भारतास उपयुक्त ठरले.
चीनच्या धमक्यांना न घाबरतां रशिया ने भारतास पाठिंबा दिला व सदैव मैत्री जपली. ज्या मैत्री’ची पायाभरणी ही काँग्रेस सत्ताकाळ्त झाल्याचे सांगण्यास काँग्रेसजनांना अभिमान वाटत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
सोव्हिएत नौदलाने अमेरिकेच्या सातव्या ताफ्याला तोंड देण्यासाठी हिंद महासागरात युद्धनौका तैनात केल्या, जो भारतासोबत सोव्हिएत युतीचा एक प्रमुख पथदर्शक होता.
मात्र अमेरिका धार्जिण भुमिका घेणारे भाजपचे शिर्ष नेतृत्व
रशिया सोबतची साथ संगत सोडण्याच्या भुमिकेत होती हे वास्तव देखील भाजप’ला मान्य करावे लागेल.
केवळ स्वतःच्याच नेतृत्वाची पाठराखण करण्यात मग्न असणारे व धन्यता मानणारे भाषणजीवी पंतप्रधान मा मोदी’जी हे रशिया दौऱ्यावर असतांना “२०१४ पुर्वी भारत निराशा व हतबलतेच्या खाईत होता” अशी देशाची बदनामी करणारी व अहंकारी वक्तव्ये करतात तेंव्हा भारतीय नागरिक म्हणून मनास वेदना होतात.
गेल्या ६५ वर्षात काँग्रेस’ची केंद्रात सरकारे असतांना संसदीय लोकशाही संकेत व परंपरेचे पालन करीत वेळोवेळी प्रोटोकॉल प्रमाणे लोकसभा व राज्यसभेतील विरोधी पक्ष नेत्यास (ज्याला इंग्रजी परंपरेत Shadow PM) संबोधले जाते, त्यांना राष्ट्रपती द्वारा स्वागतपर भेटीच्या कार्यक्रमाला नेहमीच बोलावले जात होते.
तत्कालीन विरोधी पक्षनेते मा अटलजी बाजपेयी, अरुण जेटली, सुषमा स्वराज हे नेते उपस्थित देखील राहिले होते, मात्र मोदी – शहांच्या काँग्रेस प्रती असुयेपोटी व अहंकारी वृत्तीने या प्रथांना पायदळी तुडवले जात असल्याची बाब संविधानीक व लोकशाही परंपरांचे हनन करणारी असल्याचे काँग्रेस वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधानांकडून अर्पोरा, गोवा येथे लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त


पीएमएनआरएफमधून अनुदान जाहीर

मुंबई-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्पोरा, गोवा येथे  आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात सुधारणा व्हावी, यासाठी त्यांनी प्रार्थनाही केली.

पंतप्रधानांनी सांगितले की त्यांनी या दुर्घटनेबाबत  गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे. राज्य सरकार या दुर्घटनेत प्रभावित झालेल्यांना सर्वतोपरी मदत पुरवत असल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधानांनी सामाजिक संपर्क  माध्यम X वर पोस्ट केले आहे;

“गोवा, अर्पोरा येथील आगीची दुर्घटना अतिशय दु:खद आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी लवकर बरे होवोत. या स्थितीबाबत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जी यांच्याशी चर्चा केली. राज्य सरकार प्रभावितांना सर्वतोपरी मदत पुरवत आहे. तसेच पंतप्रधानांनी पीएमएनआरएफ  मधून प्रत्येक मृत व्यक्तीच्या निकटवर्तीयांना ₹ 2 लाख आणि जखमींना ₹  50,000 इतके अनुदान जाहीर केले आहे.”

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले आहे;

“अर्पोरा, गोवा येथील दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या निकटवर्तीयांना पीएमएनआरएफ मधून ₹ 2 lakh इतके अनुदान दिले जाणार आहे. जखमींना Rs. 50,000 दिले जातील: PM @narendramodi”

पुण्याचे मोहोळ जबाबदार:विमान प्रवाश्यांच्या हलाखीच्या स्थितीवर नाम फौंडेशन आणि राष्ट्रवादीच्या सोनाली देशमुख आक्रमक

परभणी:डीजीसीएने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तीन पत्रं पाठवली: इंडिगोला १८-२२% पायलट कमी पडणार सांगितले ,पण केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री असलेल्या पुण्याच्या मोहोळ साहेबांनी हे पत्र फक्त “रिसीव्ह्ड” केलं. एकही बैठक घेतली नाही.एका कंपनीला त्यांनी संपूर्ण देशाला ओलीस ठेवू दिलं, एकालाही बोलावून विचारणा केली नाही .. लाखो विमान प्रवाश्यांच्या हलाखीच्या अवस्थेला तेच प्रथम जबाबदार आहेत .अनेकांना औषधे वेळेवर मिळू शकली नाहीत, अनेक जण आजारी पडले, आजारी नातलगांना भेटू शकले नाहीत, मुलाबाळांचे महिलांचे हाल झाले , आर्थिक नुकसान झाले असा आरोप नाम फौंडेशन च्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सोनाली देशमुख यांनी केला आहे.

या संदर्भात देशमुख यांनी सोशल मिडीयावर आपली आक्रमक प्रतिक्रिया पोस्ट केली आहे .

त्यात त्यांनी म्हटले आहे कि ,

मुरलीधर मोहोळ यांची अपयशाची नऊ ठळक पुरावे.
(६ डिसेंबर २०२५, रात्री ११:५९ पर्यंतची स्थिती)
१. त्यांना लिहून सांगितलं होतं, तरीही त्यांनी काहीच केलं नाही
डीजीसीएने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तीन पत्रं पाठवली: इंडिगोला १८-२२% पायलट कमी पडणार.
मोहोळ साहेबांनी फक्त “रिसीव्ह्ड” केलं. एकही बैठक घेतली नाही.
२. एका कंपनीला त्यांनी संपूर्ण देशाला ओलीस ठेवू दिलं
इंडिगोने ३० नोव्हेंबरला सांगितलं: आम्हाला अजून १४०० पायलट कमी आहेत.
मोहोळ साहेबांचा प्रतिसाद? शून्य. रेल्वेशी समन्वय नाही, इतर एअरलाइन्सना अलर्ट नाही.
३. सुरक्षेचं नियमावली त्यांनी ३६ तासांत गुंडाळली
५ डिसेंबरला इंडिगो मालकांचा एक फोन आला, आणि मोहोळ साहेबांनी डीजीसीएला नवीन FDTL नियम “अबेयन्स” मध्ये टाकायला लावले.
थकलेल्या पायलटांना रोखण्यासाठी बनवलेला नियम एका फोनवर विकला गेला.
४. त्यांनी एकालाही शिक्षा केलेली नाही
आजपर्यंत एकही शो-कॉज नोटीस नाही, एक रुपया दंड नाही, एकही अधिकारी बोलावलेला नाही.

२०२२ मध्ये स्पाइसजेटने थोडं चुकलं तर ९० विमानं ग्राऊंड केली.
आता इंडिगोने देश बंद केलं, तरी मौन.
५. चार दिवस तो लपला होता
@mohol_murlidhar यांचे पहिलं ट्विट: ५ डिसेंबर रात्री ११:१४ वाजता.
त्याआधी विमानतळांवर राडे झाले, तरी प्रेस कॉन्फरन्स नाही, एअरपोर्टला भेट नाही.
६. त्यामुळे जगासमोर भारताची फजिती झाली
आजची हेडलाइन्स:
“India grounds itself” – BBC
“World’s fastest-growing aviation market paralyzed by one incompetent minister” – Bloomberg
७. त्याच्यामुळे लाखो प्रवाशांचं नुकसान
६ दिवसांत ५,२००+ फ्लाइट्स रद्द, ७ लाखांहून जास्त प्रवासी अडकले, तिकीट दर ४००-८००% वाढले.
८. त्याच्यामुळे सरकारची अब्रू गेली

ResignMohol आज २ लाखांहून जास्त ट्विट्स.

महाराष्ट्र, कर्नाटक, बंगाल सरकारांनी पीएमओला पत्र लिहिलं: “आम्हाला मोहोळांवर विश्वास नाही.”
९. त्यांच्याकडे सगळे अधिकार होते, सगळी माहिती होती, पाच आठवडे वेळ होती
आणि तरीही त्याने प्रत्येक टप्प्यावर अपयश मिळवलं.
थोडक्यात:
मुरलीधर मोहोळ हे फक्त “नालायक” नाहीत.
ते “सिद्ध नालायक” आहेत, १४० कोटी लोकांसमोर, रिअल टाइममध्ये.
महाराष्ट्राच्या आकाशाला आणि प्रवाशांना यापेक्षा चांगला मंत्री हवा आहे.

मोहोळफेल झाले

गोव्यातील नाइट क्लबमध्ये सिलींडर स्फोट, 25 जणांचा मृत्यू

गोव्यातील अरपोरा परिसरात शनिवारी रात्री उशिरा एका नाईट क्लबमध्ये सिलींडर स्फोट झाल्याने 25 लोकांचा मृत्यू झाला. जखमींची संख्या अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, आग रात्री १२ वाजण्याच्या सुमारास लागली.

घटनेची माहिती मिळताच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि स्थानिक आमदार मायकल लोबो घटनास्थळी पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मृतांमध्ये तीन महिला आणि ३-४ पर्यटकांचा समावेश आहे.

ते म्हणाले की, तिघांचा मृत्यू भाजल्याने झाला असून, उर्वरित लोकांचा मृत्यू गुदमरल्याने झाला आहे. या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.सध्या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाईट क्लबने अग्निसुरक्षा नियमांचे पालन केले नव्हते. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या अनेक गाड्यांनी क्लबला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.घटनास्थळी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. आज सकाळी फॉरेन्सिक (FSL) पथक आग लागण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास करेल.

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलं
पुणे: पुण्यातील एका सहकारी संस्थेच्या सभासदांकडे आठ कोटीची लाच मागून पहिला हप्ता म्हणून तीस लाख रुपये स्वीकारणाऱ्या लिक्विडेटर आणि ऑडिटरला रंगेहात अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने) केलेल्या या कारवाईमध्ये सहकार विभागातील लिक्विडेटर विनोद देशमुख आणि ऑडिटर भास्कर पोळ यांना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील धनकवडी भागात एकता सहकारी संस्था आहे. या संस्थेच्या मालकीची पुण्यात जागा आहे. २००५ साली स्थापन झालेल्या या संस्थेचे ३२ सभासद आहेत. मात्र २०२० साली सभासदांमध्ये वाद झाल्याने प्रकरण सहकार विभागाकडे गेलं आणि २०२४ साली या संस्थेवर विनोद देशमुख यांची लिक्विडेटर म्हणून नेमणूक करण्यात आली होती. देशमुख यांनी या संस्थेच्या ३२ सभासदांना शेअर सर्टिफिकेट हवं असेल तर तीन कोटी रुपयांची लाच (bribe) मागितली. त्याचबरोबर संस्थेची जागा विक्री करण्यासाठी परवानगी हवी असेल तर आणखी पाच कोटींची मागणी करण्यात आली. त्यापैकी तीस लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना विनोद देशमुख आणि भास्कर पोळ यांना शनिवार पेठेतील एका कार्यालयासमोर रंगे हात अटक करण्यात आली आहे.सहायक पोलीस आयुक्त नीता मिसाळआणि पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांनी सप्ला रचून या दोघांना पकडले .
पुण्यातील धनकवडी परिसरामध्ये एकता सहकारी संस्था आहे. या संस्थेच्या मालकीची पुण्यात जागा आहे. २००५ साली स्थापन झालेल्या या संस्थेचे ३२ सभासद आहेत. मात्र २०२० साली सभासदांमध्ये वाद झाल्याने प्रकरण सहकार विभागाकडे गेलं आणि २०२४ साली या संस्थेवर विनोद देशमुख यांची लिक्विडेटर म्हणून नेमणूक करण्यात आली होती. देशमुख यांनी या संस्थेच्या ३२ सभासदांना शेअर सर्टिफिकेट हवं असेल तर तीन कोटी रुपयांची लाच मागितली. त्याचबरोबर संस्थेची जागा विक्री करण्यासाठी परवानगी हवी असेल तर आणखी पाच कोटींची मागणी करण्यात आली. त्यापैकी तीस लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना विनोद देशमुख आणि भास्कर पोळ यांना शनिवार पेठेतील एका कार्यालयासमोर रंगे हात अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदारांनी 5 डिसेंबर 2025 रोजी पुणे एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीने प्रथम लाचेची पडताळणी केली असता, 8 कोटींची मागणी खरी असल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती 30 लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून देण्याचे ठरले. एसीबीने शनिवार पेठेतील तक्रारदारांच्या कार्यालयासमोर सापळा रचला आणि देशमुख यांनी पंचांसमोर 30 लाखांची रोख रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली. एसीबी अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पुणे विभागातील सहकारी संस्थांच्या लिक्विडेशन प्रक्रियेत एवढ्या प्रचंड रकमेची लाच मागितल्याची ही पहिलीच घटना मानली जात आहे.

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे केली मागणी

पुणे : केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील आणि पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या व्यवस्थापनातील काही जमिनींचे बेकायदेशीरपणे वक्फ मालमत्ता म्हणून वर्गीकरण केल्याच्या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

प्रा. डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, “काही दिवसांपूर्वी डिमॉस फाउंडेशन-सेंटर फॉर रिसर्च इन ह्यूमॅनिटीज संस्थेने याबाबत सविस्तर शिफारसी व निवेदन दिले आहे. तसेच पुणे कँटोन्मेंटमधील अनेक नागरिकांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. काही धार्मिक संस्थांनी संरक्षण व केंद्र सरकारच्या मालकीची जमीन, जी पूर्वी विशिष्ट इस्लामिक संस्थांना तात्पुरत्या भाडेपट्ट्यावर दिली होती, ती वक्फ मालमत्ता म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. हे सर्व कायद्याच्या तरतुदींना व मालमत्ता नियमांना धरून नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी.”

या कारवाया कोणत्याही परवानगीशिवाय झाल्याचा संशय असून, काही अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे किंवा संगनमतामुळे हे प्रकार घडल्याची शक्यता आहे. यामुळे जमिनीचा कायदेशीर दर्जा बदलून केंद्र सरकारच्या मालकीहक्कावर परिणाम होऊ शकतो. अशा घटना संरक्षण खात्याच्या जमिनींवर अतिक्रमण व गैरवापराच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात. केंद्र सरकारच्या मालकीहक्काचे रक्षण आणि संरक्षण खात्याच्या जमिनींच्या व्यवस्थापनाची शुचिता टिकवण्यासाठी तातडीची हस्तक्षेप आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर व कालबद्ध चौकशी करण्यात यावी, डीजीडीई, कँटोन्मेंट बोर्ड, संरक्षण इस्टेट कार्यालय आदी संबंधित यंत्रणांना जमिनीचे नोंदवही, भाडेअटी व बदल तपासण्याचे निर्देश द्यावेत, चुकीने वक्फ म्हणून वर्गीकृत केलेली कोणतीही केंद्र सरकारची जमीन मूळ कायदेशीर स्थितीत परत आणावी, तसेच जबाबदार अधिकारी व संस्थांवर कारवाई करावी, आदी मागण्या प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी केल्या आहेत.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. उद्योजकता विकास मेळावा, क्रिकेट स्पर्धा, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल, निबंध स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखाताई दमिष्टे यांनी दिली. प्रसंगी सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष निलेश दमिष्टे, कार्यकर्त्या अर्चना कुभांरकर, नंदिनी कुंभारकर, कुसुम लोणारे, सुनिता चाकणकर आणि वैशाली दमिष्टे आदी उपस्थित होते.

सुरेखाताई दमिष्टे म्हणाल्या, “शरदचंद्र पवार साहेब हे देशाचे आदरणीय नेते आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या ३० वर्षांपासून या भागात आम्ही १२ डिसेंबरला विविध समाजोपयोगी उपक्रम घेत असतो. यंदा आठवडाभर हे उपक्रम चालणार आहेत. देशात बेरोजगारांची संख्या मोठी आहे. तसेच अलीकडे स्टार्टअप संस्कृती विकसित होत आहे. त्यामुळे समाजातील तरुणांमधील उद्योजक घडवण्यासाठी व्यावसायिक मेळाव्याचे आयोजन केले आहे. व्यावसायिक मेळावा १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व माजी आमदार कुमारभाऊ गोसावी यांच्या उपस्थितीत असून, या मेळाव्यात उद्योग संक्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन आहेत.”

“विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल १४ डिसेंबर रोजी शिवाजीनगर येथील एव्हिएशन गॅलरी, पर्वती येथील क्रिकेट संग्रहालय येथे आयोजित केली आहे. क्रिकेट स्पर्धा १६ व १७ डिसेंबर रोजी वडगाव आणि धायरी येथील क्रीडांगणावर होणार आहेत. त्याचदिवशी विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धा होणार आहेत. यासह इतर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्पर्धेत सहभागीना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे,” असे निलेश दमिष्टे यांनी नमूद केले.

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो प्रवाह पुढे जात जात स्वरसमुद्राला जाऊन मिळतो. ज्या योगे घराण्याची परंपरा मोठी होत जाते. ही घराणी म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध परंपराच आहेत, पण असे असले तरी सांगितीक घराण्यांचा वाद कधीच असू नये. घराण्याविषयी आपलेपणा असला तरी दुसऱ्यांच्या घराण्यातील वेगळेपण जाणून घेतल्यास घराण्यातील भिंती असून देखील त्यांचा अडथळा जाणवत नाही, तर सर्वसमावेशक दृष्टी निर्माण होते, असे प्रतिपादन ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक, पंडित अरुण कशाळकर यांनी केले.

ग्वाल्हेर, किराणा आणि जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका विदुषी डॉ. अलका देव-मारुलकर यांच्या अमृत महोत्सवी पदार्पणानिमित्त निनादिनी आणि ललित कला केंद्र गुरुकुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांगितीक महोत्सवात आज (दि. ६) डॉ. मारुलकर यांचा सत्कार पंडित अरुण कशाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी पंडित कशाळकर बोलत होते. एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पंडित अरुण कशाळकर पुढे म्हणाले, घराण्यांची स्वतंत्र ओळख असली तरी आपल्या हस्ताक्षराचे मालक आपणच असतो, त्याला वळण लावण्याचे काम गुरू करत असतो, त्यामुळे गुरूंचे महत्व मोलाचे आहे. विदुषी मारुलकर यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, आपण उत्तम शिष्यवर्ग घडवत आहात. शिष्यांच्या चेहऱ्यावरील प्रामाणिक हसू हा गुरूंचा सन्मानच होय. आपला शिष्यपरिवार म्हणजे देवनगरीत जमलेली जणू देव माणसेच आहेत. तुमचा माझ्या हस्ते सत्कार होणे म्हणजे माझ्या लहान बहिणीचा सत्कार केल्याचे समाधान आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या उभारणीत मोलाचे योगदान दिल्याबद्दल ललित कला केंद्रातर्फे डॉ. अलका देव-मारुलकर यांचा डॉ. चैतन्य कुंटे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. गानवर्धनतर्फे संस्थेचे अध्यक्ष डॉ. दयानंद घोटकर, डॉ. राजश्री महाजनी, सविता हर्षे, डॉ. निलिमा राडकर, वासंती ब्रह्मे, डॉ. विद्या गोखले यांच्या हस्ते डॉ. मारुलकर यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

शिष्य परिवारातर्फे मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन डॉ. अलका देव-मारुलकर यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.

सुरुवातीस पंडित अरुण कशाळकर, विदुषी अलका देव-मारुलकर, डॉ. चैतन्य कुंटे, प्रफुल्ल देव, मधुवंती देव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पंडित अरुण कशाळकर यांचे स्वागत मधुवंती देव यांनी केले.  

कार्यक्रमाच्या  उत्तरार्धात विदुषी डॉ. अलका देव-मारुलकर यांची गायन मैफल झाली. त्यांनी आपल्या गायन मैफलीची सुरुवात राग पट बिहागमधील विलंबित तीन तालातील ‘लेत जायो री संदेस’ या बंदिशीने केली. त्याला जोडून द्रुत तीन तालातील ‘बैरन भई’ ही बंदिश प्रभावीपणे सादर केली. राग कानडा बहार सादर करताना डॉ. अलका देव-मारुलकर यांनी मध्यलय रूपक तालातील ‘आज रंग भीनो सोहे बलमा’ ही बंदिश बहारदारपणे सादर करून रसिकांना मोहित केले. मैफलीची सांगता मिश्र भैरवीमधील ठुमरीने करून आपल्या गायनाचा ठसा रसिकांच्या मनावर उमटविला. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), संजय देशपांडे (तबला), मधुवंती देव, कल्याणी तत्त्ववादी, मधुवंती भिडे (तानपुरा-सहगायन) यांनी समर्पक साथ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी धामणकर यांनी केले.

ध्वज दिन निधीला हातभार लावूया… सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुया.. !

7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त राज्यस्तरीय लेख..

मातृभूमीच्या रक्षणासाठी, देशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस सीमेवर तैनात असणाऱ्या आपल्या शूर सैनिकांच्या शौर्य, समर्पण आणि देशसेवेला सलाम करण्याचा दिवस म्हणजे सशस्त्र सेना ध्वज दिन.! केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. परंतु देशवासीयांनाही सैनिकांप्रती कर्तव्य बजावण्याची संधी मिळावी आणि जनसहभागातूनही सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी थेट निधी देता यावा, यासाठी ध्वज दिन निधी संकलन करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ७ डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन राष्ट्रभक्तीच्या उत्साहात देशभर साजरा केला जात आहे..

✦ ध्वजदिनाची पार्श्वभूमी

२८ ऑगस्ट १९४९ रोजी देशाच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दरवर्षी ७ डिसेंबर रोजी ध्वजदिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी नागरिकांना सशस्त्र सेनेचे प्रतिक असलेले छोटे ध्वज वितरित करुन निधी संकलनाची परंपरा सुरु करण्यात आली. १९९३ मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली विविध सैनिक कल्याण निधी एकत्र करुन त्याचे एकत्रित नाव “सशस्त्र सेना ध्वज दिन निधी” असे ठेवण्यात आले. तसेच हा निधी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी वापरण्यात येऊ लागला.

✦ ध्वज दिनाचा उद्देश

*नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे.
*सैनिकांच्या त्यागाचे आणि योगदानाचे स्मरण करुन देणे.
*शहीद सैनिकांचे कुटुंब, जखमी जवान, माजी सैनिक यांच्या कल्याणासाठी मदत उपलब्ध करणे.
*सैनिकांसाठी नागरिकांमध्ये कर्तृत्व, दातृत्व निर्माण करणे.
*तसेच राष्ट्रीय एकात्मता आणि सहकाराची भावना वाढीस लावणे, हे ध्वज दिनाचे उद्देश आहेत. हा निधी लोकसहभागातून संकलित केला जातो आणि तो थेट सैनिक व त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी वापरला जातो.

✦ ध्वज निधी संकलन कशासाठी- ध्वज दिन निधीमधून सैनिकांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. जखमी आणि अपंग सैनिकांवर उपचार, त्यांचे पुनर्वसन, निवृत्त सैनिकांना आरोग्य सुविधा, निवृत्ती वेतन, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती असे अनेक उपक्रम सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबवले जातात. घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर एखादे कुटुंब उघड्यावर पडू नये, यासाठी शासन आपली जबाबदारी निभवते, परंतु सामाजिक दायित्व म्हणून त्यांच्या पाल्याप्रती सहवेदना व्यक्त व्हावी हा देखील यामागचा उद्देश आहे.

✦ निधीचा वापर –

राज्यात संकलित झालेल्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमधील ६० टक्के निधी राज्याच्या सैनिक कल्याण विभागाच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निर्धारित धोरणानुसार सेवारत तथा माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांवर खर्च केला जातो. उर्वरित ४० टक्के निधी राज्याचे राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निर्धारित धोरणानुसार सैनिक मुला-मुलींची वसतिगृहे व सैनिक विश्रामगृहे निर्माण करण्यासाठी व चालवण्यासाठी वापरला जातो.

✦ निधी संकलन –

सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनासाठी सन २०२३ सालासाठी महाराष्ट्र राज्याला ३६ कोटी ६४ लाख रुपये उद्दिष्ट दिले होते, परंतु ४३ कोटी ६८ लाख २ हजार ५४ रुपये म्हणजेच ११९.२१ टक्के निधी संकलित झाला. तर सन २०२४ वर्षासाठी ४० कोटी रुपये उद्दिष्ट देण्यात आले होते, पण नागरिकांच्या उस्फुर्त सहभागामुळे ४८ कोटी ९४ लाख ८१ हजार ३१८ रुपये म्हणजेच १२२.३७ टक्के निधी संकलित झाला आहे. ही आकडेवारी देशवासीयांच्या देशभक्तीची, सैनिकांप्रती असलेल्या आदराची, प्रेमाची, सन्मानाची व अभिमानाची साक्ष असून या निधीच्या माध्यमातून आपणही सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी थेट योगदान देऊ शकतो.

✦ उत्कृष्ट निधी संकलनाबद्दल राज्यपालांच्या हस्ते सन्मान –

सशत्र सेना ध्वजदिन २०२४ निधी संकलनात सर्वात जास्त निधी संकलन केल्याबद्दल छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त तसेच सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, अमरावती, नागपूर या ६ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा ध्वजदिन निधी कल्याण समितीचे अध्यक्ष व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना मुंबई येथील लोकभवन(राजभवन) मध्ये १० डिसेंबर २०२५ रोजी होणा-या ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमात राज्यपालांच्या स्वाक्षरीचे प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ८ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर मध्ये ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम होणार असल्याची माहिती सैनिक कल्याण विभाग, पुणे संचालक कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.

✦ अनेक व्यक्ती, संस्थांचे योगदान – सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योग संस्था, संघटना, विद्यार्थी, शिक्षक, शासकीय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, देशवासीय नागरिक मोठ्या प्रमाणात स्वेच्छेने देणगी देतात.

✦ निधी जमा करण्यासाठी संपर्क –

  • संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या नावाने
  • बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा घोरपडी, पुणे
  • Name of Account : FLAG DAY FUND (PUBLIC) Bank A/c No. : ६००६१३४७७८४, IFSC Code- MAHB0000184,
  • MICR Code-411014004 यामध्ये
  • रोख, धनादेश अथवा CBS द्वारे ध्वज निधी जमा करता येतो.
  • आपल्या नजीकची शाळा, महाविद्यालय किंवा राज्य शासनाचे कार्यालय, तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात निधी देता येतो.
  • सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी दिलेली संपूर्ण रक्कम आयकर कायदा १९६१ कलम ८० जी (५) (vi) अन्वये करमुक्त आहे. त्यासाठीचे आयकर सुटीचे प्रमाणपत्र आवश्यतेनुसार संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे येथून दिले जाते.

✦ संकल्प एक – योगदान हजारोंचे
तहानभूक विसरुन, कुटुंबापासून दूर.. देशाच्या सीमेवर तैनात असलेले सैनिक हे ऊन, वारा पाऊस, थंडीत मृत्यूच्या छायेत दररोज झुंजतात.. ते केवळ कर्तव्य म्हणून नाही, तर देशसेवेचे व्रत पाळण्यासाठी. देशाच्या संरक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी वापरण्यात येणाऱ्या सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये अमूल्य योगदान देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्राण पणाला लावून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना केवळ शब्दांनी नव्हे तर कृतीतून व्यक्त करण्याची संधी म्हणजे ध्वज दिन. ध्वज दिन निधी संकलनासाठी सन २०२५ सालासाठी ४० कोटी निधी संकलित करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्यासाठी आहे. चला तर मग.. सशस्त्र सेना ध्वज दिना निमित्त आपल्या सैनिकांना सलाम करुया.. ध्वज दिन निधीमध्ये आपला मोलाचा हातभार लावूया..!

लेखन: वृषाली मिलिंद पाटील.
सहायक संचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय
कोल्हापूर

सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पूलाची तोडफोड न करता पर्यायी जागेतुन मेट्रो रेल्वे प्रकल्प राबवा-आम आदमी पक्षाची मागणी

पुणे:

पुण्यातील सिंहगड रोडवर नव्याने बांधलेल्या राजाराम पुल ते वडगाव बुद्रुक फनटाईम पर्यतचा उड्डाणपूल मेट्रोच्या कामासाठी ६६ ठिकाणी तोडण्यात येणार आहे त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च वाया जाणार असुन वाहतूक कोंडीसह पुल कुमवत व लहान होणार आहे त्यामुळे नियोजित खराडी ते खडकवासला व हिंजवडी ते माणिकबाग या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी पर्यायी जमीन उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.
या बाबत पुणे शहर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
आम आदमी पक्षाचे अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, मेट्रो साठी या प्रशस्त पुलाची तोडफोड करण्यात येणार आहे. त्यामुळे पुलाची रुंदी कमी होऊन वाहतुकीची कोंडी पुन्हा गंभीर होणार आहे.
मेट्रोचे खांब उभारण्यासाठी हा बदल आवश्यक करण्यात येणार आहे. ११८ कोटी रुपये खर्चून बांधलेला हा पूल ठिक ठिकाणी तोडल्याने पुलाला भगदाडे पडण्याची तसेच वाहतूकीस असुरक्षित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या दुर्घटनांची टांगती तलवार कायम उभी राहणार आहे.
पुलाच्या तोडफोडीचा फटका सिंहगड रोड,
वडगाव, धायरी, नऱ्हे , खडकवासला परिसरासह पानशेत, सिंहगड भागातील नागरिकांना व लाखो पर्यटकांना फटका बसणार आहे.
उड्डाणपूलासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आले. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले.

महापालिकेने या बदलासाठी आवश्यक असलेली तरतूद करुन पुलाची उभारणी केली असल्याचे सांगितले जात आहे असे असताना पुलाची ६६ ठिकाणी तोडफोड करण्याची गरज आहे का असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे .

चार दिवसांत रद्द झालेल्या विमानांची संख्या 2,000 पेक्षा जास्त-सुमारे 3 लाख प्रवाशांना थेट फटका

मुंबई-देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी इंडिगोच्या कामकाजात सलग पाचव्या दिवशी शनिवारीही सुधारणा दिसून आली नाही. दिल्ली, मुंबई, बेंगळूरु आणि चेन्नई विमानतळांवर रात्रभर प्रवासी त्रस्त दिसले. यापूर्वी चार दिवसांत रद्द झालेल्या विमानांची संख्या 2,000 पेक्षा जास्त झाली आहे. यामुळे सुमारे 3 लाख प्रवाशांना थेट फटका बसला.

आज आणि उद्या इंडिगोच्या 25-30% अधिक विमानांना रद्द किंवा उशीर होऊ शकतो. गेल्या 4 दिवसांत दररोज सरासरी 500 विमानांना उशीर होत आहे, जी संख्या शनिवार आणि रविवारी 600 पर्यंत पोहोचू शकते. याचे कारण असे की, शनिवार आणि रविवारी इतर दिवसांपेक्षा एक तृतीयांश अधिक विमाने चालवली जातात.

इंडिगोचे म्हणणे आहे की, विमानसेवा सामान्य होण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत वेळ लागेल. मात्र, नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले की, नवीन FDTL नियम 1 नोव्हेंबरपासून लागू आहेत, परंतु इतर कोणत्याही एअरलाइनला अडचण आली नाही, यावरून स्पष्ट होते की चूक इंडिगोची आहे. एअरलाइनच्या निष्काळजीपणाची चौकशी केली जाईल आणि कारवाई निश्चित आहे.

कोलकाता विमानतळावर तासभर अडकून पडल्यामुळे महिला प्रवासी रडू लागल्या.
DGCA चे ते नवीन नियम, ज्यामुळे इंडिगोमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअरलाईन्सना, विशेषतः इंडिगोला 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत तात्पुरता दिलासा दिला आहे. साप्ताहिक विश्रांतीऐवजी कोणतीही सुट्टी न देण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

DGCA ने 1 नोव्हेंबरपासून वैमानिक आणि इतर क्रू मेंबर्सच्या कामाशी संबंधित नियमांमध्ये बदल केले होते. याला फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) असे नाव देण्यात आले आहे. हे दोन टप्प्यांत लागू करण्यात आले. पहिला टप्पा 1 जुलै रोजी लागू झाला.

तर 1 नोव्हेंबरपासून दुसरा टप्पा लागू झाला. नवीन नियमांनुसार प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी पायलट आणि क्रू मेंबर्सना पुरेशी विश्रांती देण्यावर भर दिला आहे. यामुळे एअरलाईन कंपन्यांकडे पायलट आणि क्रू मेंबर्सची अचानक कमतरता निर्माण झाली आहे.
चेन्नई विमानतळावर ४८ उड्डाणे रद्द
शनिवारी चेन्नई विमानतळावर मोठ्या प्रमाणात व्यत्यय आला, आज रात्रीपर्यंत एकूण ४८ उड्डाणे रद्द करण्यात आली. यामुळे मुंबई, हैदराबाद, दिल्ली, बेंगळुरू, कोइम्बतूर, अहमदाबाद, विशाखापट्टणम, अंदमान, लखनऊ, पुणे आणि गुवाहाटी यासारख्या प्रमुख देशांतर्गत ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर परिणाम झाला.

विमानतळ अधिकाऱ्यांच्या मते, बहुतेक प्रभावित उड्डाणे चालवणारी एअरलाइन इंडिगोने जाहीर केले आहे की हे रद्दीकरण १० डिसेंबरपर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा आहे
पुण्याहून सकाळी १० वाजेपर्यंत ४२ इंडिगो उड्डाणे रद्द झाली होती. तर सकाळी १० वाजेपर्यंत दिल्ली विमानतळावरून १०६ उड्डाणे रद्द झाली होती

सरकारने विमान प्रवासाचे भाडे केले निश्चित

५०० किमी पर्यंत ७,५०० रुपये /५००-१००० किमीसाठी कमाल भाडे १२,०००/१०००-१५०० किमीसाठी १५,०००/१५०० किमीपेक्षा जास्त अंतराच्या विमान प्रवासाचे भाडे १८,००० रुपये
मुंबई- इंडिगो संकटाच्या काळात, इतर विमान कंपन्यांनी केलेल्या भाड्यात १० पट वाढ करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. आता, ५०० किमी पर्यंतच्या विमान प्रवासाचे भाडे ७,५०० रुपये असेल. ५००-१००० किमीसाठी कमाल भाडे १२,०००, १०००-१५०० किमीसाठी १५,००० आणि १५०० किमीपेक्षा जास्त अंतराच्या विमान प्रवासाचे भाडे १८,००० रुपये असेल.विमान वाहतूक मंत्रालयाने पंतप्रधान मोदींना माहिती दिली.
विमान वाहतूक मंत्रालयाने पंतप्रधान मोदींना इंडिगो प्रकरणाची माहिती दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मंत्रालय सतत बैठका घेत आहे. सरकार विमान कंपनीवर मोठा दंड आकारण्याची तयारी करत आहे.
इंडिगो संकटादरम्यान काही विमान कंपन्यांकडून अतिरिक्त भाडे आकारले जात असल्याची गंभीर दखल नागरी उड्डाण मंत्रालयाने घेतली आहे. मंत्रालयाने सर्व विमान कंपन्यांना अधिकृत निर्देश जारी केले आहेत, ज्यामध्ये त्यांनी आता स्थापित केलेल्या भाडे मर्यादांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती स्थिर होईपर्यंत ही मर्यादा लागू राहतील.

या निर्देशाचा उद्देश बाजारात किंमत शिस्त राखणे, अडचणीत आलेल्या प्रवाशांचे शोषण रोखणे आणि या काळात ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये याची खात्री करणे आहे.

मुंबई विमानतळावर तुफान राडा..प्रवाशांचा सयंम सुटला

घराची चावी, पासपोर्ट बॅगेत… आता आम्ही काय करायचे?:बॅगा गहाळ झाल्या

मुंबई -गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या इंडिगो विमानसेवेच्या सावळागोंधळाचा आता उद्रेक होऊ लागला आहे. विमाने रद्द आणि तासनतास होणाऱ्या विलंबामुळे हवालदिल झालेल्या प्रवाशांचा संयम आता सुटला असून, मुंबई विमानतळावर प्रवाशांनी अक्षरशः राडा घातल्याचे चित्र समोर आले आहे. तीन दिवस उपाशीपोटी ताटकळत राहूनही बॅगा हाती न लागल्याने एका प्रवाशाने विमानतळावर जोरदार राडा घातला.

इंडिगोच्या गलथान कारभाराचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुंबई विमानतळावर एका विदेशी महिलेने रागाच्या भरात थेट चेक-इन काउंटरवर चढून थयथयाट केल्याचा प्रकार ताजा असतानाच, आणखी एका प्रवाशाचा व्हिडिओ समोर आला आहे. इंडिगोच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशी आपला संयम गमावून बसल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओतील हा प्रवासी इंडिगोच्या चेक-इन काउंटरवर जोरजोरात हात आपटून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारताना दिसत आहे.

हा प्रवासी गेल्या तीन दिवसांपासून बंगळुरूमध्ये अडकून पडला होता. उपाशीपोटी आणि कोणताही आधार नसताना कसेबसे मुंबईत पोहोचल्यानंतर त्याची बॅगच बेपत्ता असल्याचे समजले. या प्रवाशाचे म्हणणे आहे की, “आम्ही गेल्या तीन दिवसांपासून बंगळुरूमध्ये अडकून पडलो होतो. तिथे आम्हाला अन्नाचा कण नाही की पाण्याचा घोट मिळाला नाही. कसेबसे आज आम्ही मुंबईत पोहोचलो, तर आता आमच्या बॅगाच बेपत्ता आहेत. माझ्या घराच्या चाव्या आणि पासपोर्ट त्या बॅगेत आहेत. आता आम्ही काय करायचं? कुठे जायचं?” असे विचारत या प्रवाशाने संतापाने काउंटरवर हात आपटत कर्मचाऱ्यांना जाब विचारला.

दरम्यान, मुंबई विमानतळावर इंडिगोचे विमान रद्द झाल्याने एका विदेशी महिलेने संतापाच्या भरात थेट काउंटरवर चढून कर्मचाऱ्यांना जाब विचारला. कर्मचाऱ्यांकडून प्रश्नांची उत्तरे मिळत नसल्याने तिचा संयम सुटला आणि तिने इंडिगोच्या गैरव्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तेथे उपस्थित इतर प्रवासीही फ्लाईटच्या अपडेटसाठी ताटकळत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, एकीकडे इंडिगोच्या सेवेचा बोजवारा उडाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे, इतर विमान कंपन्यांनी संधीसाधू भूमिका घेत तिकिटांचे दर दहा पटीने वाढवले आहेत. दिल्ली ते बेंगळुरू विमानाचे मूळ तिकीट दर 7 हजार रुपये आहे, ते आता 1 लाख रुपयांच्या पुढे गेले. दिल्ली ते मुंबई विमानाचे मूळ तिकीट दर 6 हजार रुपये आहे, ते आता 70 हजार रुपयांवर गेले आहे.

प्रवाशांचा होणारा हा छळ आणि खाजगी कंपन्यांची मनमानी लूट पाहून अखेर केंद्र सरकारने हस्तक्षेप केला आहे. विमान भाड्यात अचानक झालेल्या वाढीबाबत नागरी उड्डाण मंत्रालयाने आता कडक भूमिका घेतली आहे आणि सरकारने काही विमान कंपन्यांना वाढीव भाड्यांबाबत गंभीर सूचना दिल्या आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने विमान भाड्यांवर मर्यादा घालण्याचे आदेश दिले असून, भाड्याचे ‘रिअल-टाइम ट्रॅकिंग’ सुरू केले आहे. परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत वाढीव दर न आकारण्याच्या सक्त सूचना कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.

चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांना अडवल्याने तणाव:चुनाभट्टी-सायन मार्गावर मोठा गोंधळ, अखेर पोलिसांनी नमते घेत रिक्षा सोडल्या

मुंबई- महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीकडे निघालेल्या अनुयायांना पोलिसांनी चुनाभट्टी-सायन कनेक्टरवर अडवल्याने आज सकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. नवी मुंबईतील तुर्भे येथून रिक्षाने आलेल्या अनुयायांना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने संतप्त झालेल्या जमावाने पूर्व द्रुतगती महामार्गावर ठिय्या देत रस्ता रोखून धरला. यामुळे काही काळ दादरकडे जाणाऱ्या वाहतुकीचा साडे तीन तास खोळंबा झाला होता. अखेर अनुयायांच्या संतापापुढे नमते घेत पोलिसांनी रिक्षांना पुढे जाण्यास परवानगी दिली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. या निमित्ताने दादरच्या चैत्यभूमीवर मोठा जनसागर उसळला आहे. सकाळपासूनच मुंबईत काही ठिकाण वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी दिसून आली आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नवी मुंबई आणि उपनगरातून अनेक अनुयायी रिक्षाने चैत्यभूमीकडे निघाले होते. मात्र, चुनाभट्टी-सायन कनेक्टरवर रिक्षांना प्रवेश नसल्याचे कारण देत पोलिसांनी या रिक्षा अडवून धरल्या. यावर अनुयायांनी तीव्र आक्षेप घेतला.

“आम्ही दरवर्षी याच मार्गाने रिक्षाने येतो, तेव्हा अडवले जात नाही. मग यंदाच हा नियम का? आणि जर बंदी होती, तर आम्हाला त्याची पूर्वकल्पना का दिली नाही?” असा जाब विचारत अनुयायांनी पोलिसांशी हुज्जत घातली. ऐनवेळी रस्ता अडवल्याने अनुयायी आक्रमक झाले आणि त्यांनी महामार्गावरच रास्ता रोको सुरू केला. पोलिसांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तरीही अनुयायी रिक्षा पुढे नेण्यावर ठाम होते. यामुळे पोलिस आणि अनुयायांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन तणाव निर्माण झाला.

यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये मोठी वादावादी झाली. या गोंधळात एका पोलिसाच्या पायावरून रिक्षा गेल्याने तो जखमी झाल्याची घटना घडली. दुसरीकडे, अनुयायांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. “रिक्षामध्ये महिला आणि लहान मुले असतानाही 10-15 पोलिसांनी रिक्षेला मागून धक्के मारले. आलिशान गाड्यांना प्रवेश दिला जातो, मात्र गरिबांच्या रिक्षा अडवल्या जातात,” अशी संतप्त भावना आंदोलकांनी व्यक्त केली. “आमचा केवळ एकच दिवस महत्त्वाचा आहे, आजच्या दिवशी नियम शिथिल करावेत,” अशी मागणी त्यांनी लावून धरली. शेवटी पोलिसांनी अनुयायांच्या आंदोलनापुढे नमते घेत साडे तीन तासांनतर या रिक्षांना पुढे जाण्यास परवानगी दिली.

बावधनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना  69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

 पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), विकास प्रतिष्ठान आणि सुजाता महिला मंडळ बावधन यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धार्थ नगर, बावधन बुद्रुक येथे महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना  69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. 

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी सामुदायिक बुद्ध वंदना सादर केली.

या प्रसंगी बावधन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  अनिल विभूते, पेरीविंकल ग्रुप ऑफ स्कूल्सचे चेअरमन  राजेंद्र बांदल,
माजी नगरसेवक  किरण दगडे पाटील, युवा नेते सूर्यकांत भुंडे,माजी  सरपंच   वैशाली कांबळे, रिपाइं  (आठवले) महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडीचे संघटक  उमेश कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते. 

मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा, सामाजिक क्रांतीतील योगदानाचा आणि बौद्ध मूल्यांच्या प्रसारातील भूमिकेचा उल्लेख करत आपले मनोगत व्यक्त केले. सभेत सिद्धार्थ नगरमधील उपासक–उपासिका, स्थानिक नागरिक आणि बावधन परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. अभिवादन कार्यक्रमानंतर बावधनमधून शेकडो भीमसैनिक चैत्यभूमी, दादर (मुंबई) येथे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रवाना झाले.