Home Blog Page 1195

मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांबाबत रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार

0

मार्ड डॉक्टरांच्या मागण्या मागण्यांना मंत्रिमंडळ मंजुरी देणार असल्याने
संध्याकाळपासून सुरु होणारा संप
मागे घेण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीतच मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांना यापूर्वी मान्यता

मागण्यांना मंत्रिमंडळाची मान्यता मिळणार असल्याने
मार्डने संध्याकाळपासूनचा संप स्थगित करण्याचे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिनिधींना दूरध्वनीवरील चर्चेत आवाहन

मुंबई, दि. २२:- मार्ड डॉक्टरांचे प्रश्न सुटावेत यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यामुळेच गेल्या ७ फेब्रुवारीला सेंट्रल मार्ड संघटनेच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्यात आला आहे. त्यानुसार तयार केलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक आहे. मात्र या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक झाली नसल्याने त्यावर निर्णय होऊ शकला नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या (२५ फेब्रुवारी) मंत्रिमंडळ बैठकीत सदर प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्याने मार्ड डॉक्टरांनी संपावर जाऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

राज्य सरकार मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सेंट्रल मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभिजित हेलगे यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली तसेच वस्तुस्थितीची माहीत दिली. राज्यातील रुग्णसेवा सुरळीत रहावी, रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून, मार्डने आज संध्याकाळपासून सुरू होत असलेला त्यांचा संप मागे घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्ड डॉक्टरांना केले आहे.

गेल्या ७ फेब्रुवारीला मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. या बैठकीत राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याचा निर्णय झाला होता. विद्यावेतन वाढीसंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्देश दिले होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाने वसतिगृहांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत. विविध जिल्ह्यांत मंजूर करण्यात आलेल्या वसतिगृहांच्या बांधकामांना गती देण्यात यावी, असे निर्देश देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, शासनाने नवीन वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करताना त्याच्या आराखड्यात वसतिगृहाचा समावेश केला आहे. त्यामुळे नवीन महाविद्यालयांमधील डॉक्टरांना पहिल्या दिवसापासूनच चांगल्या दर्जाची वसतिगृहे उपलब्ध होणार आहेत. अस्तित्वातील वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठीचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाला प्राधान्य देऊन तातडीने दुरुस्तीची कामे सुरु करावीत. त्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.

राज्यातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची तातडीने दुरुस्ती करावी. वसतिगृहांच्या दुरुस्तीदरम्यान विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था करणे गरजेचे असते. मात्र, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांच्या परिसरात पर्यायी मोकळ्या खोल्या मिळण्यात अडचणी येतात. अशा वेळी गरजेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भाड्याने खोल्या घेऊन राहता येण्यासाठी ठराविक भाडे देण्यात यावे. शक्य असेल त्याठिकाणी त्यांना पर्यायी खोल्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या होत्या.

हायवेच्या बाजूची अतिक्रमणे ७ दिवसात काढा अन्यथा…पाडण्याच्या खर्चासह कायदेशीर कारवाई…

पुणे-सोलापूर, पुणे- सातारा, पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अनधिकृत व्यवसाय काढून घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २२ : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५, पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० तसेच पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ वरील अनधिकृत व्यवसाय सात दिवसाच्या आत स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन करतानाच सेवा मार्गावरील दुभाजक तोडणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा इशारा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दिला आहे.स्वतः हून हो अतिक्रमणे काढली नाही तर आम्ही ती पाडून टाकू आणि नंतर पाडण्याच्या खर्चासह कायदेशीर कारवाईला संबधितांनी सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असाही इशारा दिला आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामधील या तीनही महामार्गाच्या हद्दीमध्ये लगतच्या काही मिळकतधारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे एनएचएआयच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे महामार्गाच्या विस्तारीकरण कामास अडथळे येत आहेत.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या हद्दीमध्ये ज्या भागात ३० मी. कायदेशीर हक्काचा मार्ग (राईट ऑफ वे) आहे त्या भागात मध्यापासून १५ मीटर तसेच ज्या भागात ६० मी. राईट ऑफ वे (आरओडब्ल्यू) आहे त्या भागात मध्यापासून ३० मीटर अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे.

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या हद्दीमध्ये ज्या भागात ३० मी. ‘आरओडब्ल्यू’ आहे त्या भागात मध्यापासून १५ मीटर, ज्या भागात ४५ मी. आरओडब्ल्यू आहे त्या भागात मध्यापासून २२.५ मी. तर ज्या भागात ६० मी. राईट ऑफ वे आहे त्या भागात मध्यापासून ३० मीटर अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे. तर पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूकडील मध्यापासून ३० मीटर अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे.

ही अतिक्रमणे व विना परवाना बांधकाम सात दिवसाच्या आत स्वखर्चाने काढून घ्यावीत. अन्यथा ही अतिक्रमणे प्राधिकरणाच्यावतीने राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) अधिनियम २००२ अन्वये निष्कासीत करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबंधित धारकाकडून वसूल करण्यात येईल. याची नोंद घ्यावी.

जिल्हा सुरक्षा समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे जे व्यावसायिक महामार्गावरील व सेवा रस्त्यांवरील मार्ग दुभाजक अनधिकृतपणे तोडून येण्या-जाण्याकरीता मार्गिका तयार करतील अशा व्यावसायिकांवर व अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांचा व्यावसाय परवाना जिल्हा प्रशासनाकडून रद्द करण्यात येईल. तरी सर्व व्यावसायिकांनी नोंद घ्यावी व अनधिकृतपणे मार्ग दुभाजक तोडू नये किंवा महामार्गावर तसेच सेवा रस्त्यांवर अतिक्रमण करु नये, असे आवाहन प्रकल्प संचालक संजय कदम यांनी केले आहे.

बारामती येथे २ मार्च रोजी भव्य ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन*

पुणे, दि. २२: कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने २ मार्च रोजी सकाळी १० वाजता विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती येथे ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात १०० पेक्षा अधिक नामांकित उद्योजकांनी सहभाग दर्शविलेला असून, त्यांच्याकडून १७ हजार पेक्षा जास्त रिक्तपदे अधिसूचित करण्यात आली आहेत. ही सर्व रिक्त पदे १० वी, १२ वी, ड्राइव्हर, पदवीधर, एमएस्सी, बी. कॉम., डिएमई, बीबीए, एमबीए, एम. फार्म, कोणत्याही शाखेचा आटीआय, डिप्लोमा, ट्रेनी इंजिनिअर अशा विविध पात्रताधारक उमेदवारांसाठी असून पुणे विभागातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांबाबत अधिक माहितीसाठी विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावे. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीस (वॉक-इन-इंटरव्यूव) येताना सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, आवश्यकतेनुसार अर्ज (रिज्यूम) व आधारकार्डाच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात.

जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४७१ रास्ता पेठ, सरदार मुदलीयार मार्ग, पुणे-११ येथे प्रत्यक्ष अथवा ०२०-२६१३३६०६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.

डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी: या मेळाव्याच्या माध्यमातून अधिकाधिक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. त्यासाठी उत्पादन, सेवा, आदरातिथ्य, औषधनिर्मिता, कृषी आदी अनेक क्षेत्रातील औद्योगिक आस्थापनांशी संपर्क साधण्यात येत आहे. त्याद्वारे दहावी, बारावीपासून ते विविध व्यावसायिक क्षेत्रातील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत. जिल्ह्यातील युवकांनी या संधीचा लाभ घेण्याचे यानिमित्ताने मी आवाहन करतो.

रंजन, चौबे, ठाकरे, श्वेता शालिनी, अंकोला यांना यंदाचा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार

पुणे –  शालिनी  फाउंडेशन तर्फे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून प्राध्यापक प्रभात रंजन, कुलगुरू डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, डेटा सायन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ डॉ. संजीव चौबे, पोलीस महानिरीक्षक जे डी सुपेकर, भाजपा महाराष्ट्र प्रवक्त्या श्वेता शालिनी, बिग बॉस विजेता शिव ठाकरे, क्रिकेटपटू सलील अंकोला आणि अशा विविध क्षेत्रातील  उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रसिद्ध उद्योजक आणि चित्रपट निर्माता अनिर्बन सरकार यांच्या हस्ते २५ फेब्रुवारी रोजी रॉयल कॅनॉट बोट क्लब येथे सायं. ६ वा. महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे फाउंडेशनचे संस्थापक आणि आयोजक विशाल गोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी अंबिका सेवा केंद्राचे अध्यक्ष शैलेश चौबे, शालिनी फाउंडेशनचे संचालक आनंद केशव आणि खजिनदार सृष्टी कुमार उपस्थित होते. 

यंदा सोहळ्याचे ३रे वर्ष असून या आधी शालिनी फाउंडेशन तर्फे अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश, एसीपी नीलिमा जाधव, अभिनेता सुनील शेट्टी, सुरेश विश्वकर्मा, प्रवीण तरडे, मानसी नाईक,  संजय खापरे, गायक उत्कर्ष शिंदे, आनंद शिंदे, कलात्मक हस्ताक्षरासाठी लक्ष्मण बावनकुळे आदीना पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे गोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जपानमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सुरू असल्याचे पाहून मनाला समाधान वाटते; बुद्धांचे तत्वज्ञान, विचार संपूर्ण जगाला आव्हाने पेलण्यासाठी उपयोगी..डॉ. नीलम गोऱ्हे

0

जपान सोबत उद्योग वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करणार

मुंबई दि.२२: भारत आणि जपानचे अत्यंत जिव्हाळ्याचे इतिहास काळापासून संबंध आहेत.जपान देशाच्या अभ्यास दौऱ्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास भेट दिली. सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या विचारातून भारतामध्ये जो विचार निर्माण झाला, तो जगामध्येही प्रसिद्ध झाला आहे व त्याचा प्रसार झाला. बुद्धांचे तत्वज्ञान व विचार संपूर्ण जगाला आव्हाने पेलण्यासाठी आज ही उपयोगी पडत आहेत.जपानमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सुरू असल्याचे पाहून मनाला समाधान वाटले. अशी भावना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

मुंबईतील जपानचे वाणिज्य दूतावास जनरल यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, जपानचे राजदूत डॉ. फूकाहोरी यासुकाता आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, जपान मध्ये गुन्ह्यांमधील दोषारोप सिद्धीचा दर हा ९८ टक्के आहे. आपल्याकडील दोषारोप सिद्धीचा दर वाढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जपानच्या सहकर्याने नैसर्गिक आपत्ती वर मात करण्यात येत असलेल्या तंत्रज्ञाचा वापर भारतात ही होणे आवश्यक आहे. तसेच जपान सरकारने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट देऊन सन्मान केल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी आभार मानले.

जपान दौऱ्यावरून आल्यावर जपान येथील बाजारपेठ राज्यातील उद्योजकांकरिता तसेच राज्यातील बाजारपेठ जपानच्या उद्योजकांना कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल त्यादृष्टीने विधान भवनात उद्योग विभागाचे अधिकारी तसेच औद्यागिक संस्थांच्यासह बैठक घेतली असून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

मला धन्यवाद नकोय तुमचा आशीर्वाद हवाय

उपमुख्यमंत्री फडणवीसांचे मुंबईकरांना आवाहन

मुंबई- मुंबईत आम्ही बिझनेस करायला आलो नाही, मुंबईला आम्ही सोन्याचे अंडे समजणारे नाही. ज्यांनी श्रमाने आपले घर उभे केले त्याची ही मुंबई आहे. काहींनी गेली 25 वर्ष मुंबईकरांना निवडणुकीपुरते वापरले. मात्र गेल्या 10 वर्षात आम्ही मुंबईकरांसाठी निर्णय घेतले. आम्ही मुंबईतील मराठी माणसाला हद्दपार होऊ देणार नाही. त्याला याच ठिकाणी हक्काचे घर मिळण्यासाठी जे काय करावे लागेल ते आम्ही करू. मला धन्यवाद नको तुमचा आशीर्वाद हवा आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काळाचौकी येथे आयोजित केलेल्या ‘धन्यवाद देवेंद्रजी’ या कार्यक्रमात मुंबईकरांना केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मुंबईकर नागरिक सहभागी झाले होते.

शहिद भगतसिंग मैदानावर भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर व भाजपा मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले की, या कार्यक्रमाला मला बोलावले तेव्हा मी म्हटले मी सत्कार घेत नाही. त्यांनी मला आग्रह केला ज्यांच्या करता आपण काम करतो त्यांच्याशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आहे. २०१९ साली प्रविण दरेकर यांच्यासोबत बैठका घेतल्या. मुंबईतील माणूस आपले स्वतःचे घर का घेऊ शकत नाही. त्यावर शासन निर्णय केला. दुर्दैवाने २०१९ साली आपले सरकार गेले. ज्यांनी आपण मराठी माणसासाठी आहोत अशा वलग्ना केल्या. त्यांनी २०१९ चा शासन निर्णय गुंडाळून ठेवला बिल्डरधार्जिन्या लोकांसाठी. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आपले सरकार आले. प्रविण दरेकर यांनी गृहनिर्माण सहकार परिषद घेतली. ती परिषद झाली त्यावेळी मला समारोपाला बोलावले. माझ्यासमोर १६ मागण्या ठेवण्यात आल्या. त्या १६ ही मागण्या आपण पूर्ण केल्या त्याचा शासन निर्णयही काढला. मात्र १६ मागण्यानी संपूर्ण गृहनिर्माणचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. काल प्रविण दरेकर यांनी माझी भेट घेऊन ३५ मागण्यांचे निवेदन दिले. या ३५ मागण्या आहेत त्यातील ८ मागण्या आजच मंजूर करण्यासारख्या आहेत. पण या ३५ मागण्यांवर १५ दिवसात बैठक घेऊन त्या कशा पूर्ण करता येतील त्यावर चर्चा करू. या कार्यक्रमासाठी ८ हजार संस्थांनी, २५ हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केले. जी निवेदने आली आहेत त्यावर आम्ही सर्वजण काम करू.

अभ्यूदय नगरचा पुनर्विकास महत्वाचा आहे. इथे येण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला परवानगी दिली तुम्ही माझ्यावतीने घोषणा करा. त्याप्रमाणे अभ्यूदय नगरच्या पुनर्विकासाचा निर्णय पुढील मंत्रिमंडळ बैठकीत घेऊ असेही फडणवीस म्हणाले. तसेच पोलीस वसाहतींचा प्रश्नही लवकरच सोडवू. आम्हाला एफएसआयची चिंता नव्हती. आम्हाला त्या भिंतीत राहणाऱ्या मराठी माणसाची चिंता होती. १०० फुटात राहणाऱ्या व्यक्तीला ५०० चौफु. घर देतोय. गिरणी कामगारांचा विषय सुनील राणे यांनी चांगला लावून धरला आहे. गोरेगाव पत्राचाळीतील लोकांचा प्रश्नही मार्गी लावलात. काही लोकांनी त्यांना गंडवले, मोर्च्यात नेले. पण त्यांचे काम केले नाही. आपण त्यांचा विषय मार्गी लावलात. हा माझ्या सत्काराचा कार्यक्रम नाही. हा सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी काय करता येईल यासाठी आयोजित केलेला कार्यक्रम आहे.

तत्पूर्वी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना आमदार दरेकर म्हणाले की, मुंबईतील हौसिंगमधील प्रश्नांची वचनपूर्ती करण्यासंदर्भात आणि ज्या समस्या आहेत त्यांची पूर्तता करण्यासाठी ‘धन्यवाद देवेंद्रजी’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आपल्यावर विश्वास व्यक्त करण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली आहे. गोरेगाव नेस्कोत परिषद घेतली. तिथे २२ मागण्या केल्या. त्या मागण्या मुंबईतून आल्या होत्या. २२ पैकी १६ शासन निर्णय मान्य करण्याचे काम देवेंद्र फडणवीस तुम्ही केलात. अनेक विषय आहेत. देवेंद्र फडणवीस तुमचे पाय येथे लागल्यामुळे इकडे काहींची हलचल वाढली आहे. गिरणगाव हा कुणाचा तरी बालेकिल्ला होता. येणाऱ्या काळात हा परिसर भाजपाचा बालेकिल्ला केल्याशिवाय राहणार नाही, असेही दरेकर म्हणाले. तसेच विकास काय असतो हे तुम्ही पाच वर्षाच्या काळात दाखवून दिलात. अडीच वर्षात विकास ढेपाळला होता. पुन्हा तुम्ही सरकार आणून विकासाला गती दिलात. येथे आलेले लाभार्थी आहेत. ही गर्दी तुमच्या प्रामाणिकपणाची, विश्वासाची आहे. तुम्हीच न्याय द्याल अशा लोकांच्या अपेक्षा आहेत. त्यांना विश्वास द्या, अशी विनंती दरेकर यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना केली.

तसेच आशिष शेलार म्हणाले की, शेवटच्या कोपऱ्यापर्यंत पाहिले तर लक्षात येते मैदानात घुसायला मुंगीलाही वाव नाही. ३० हजार सोसायट्यापर्यंत संपर्क करून ठराव घेऊन आलेली ही लोकं आहेत. मुंबईच्या इतिहासात खऱ्या अर्थाने गिरणगावात समस्त मुंबईकरांचा विषय घेऊन अभूतपूर्व मेळावा कधी झाला नसेल तो आज होतोय, त्याचे चित्र येथे दिसते. विनम्रतेचे दुसरे रूप देवेंद्र फडणवीस आहेत. २०१४ पासून फडणवीस यांच्या सरकारने निर्णय घेतले. मी गिरणगांवात जन्मलो आहे. चाळ पडली म्हणून संक्रमण शिबिरात राहिलो. त्यामुळे सगळ्या प्रश्नांची अडचण आम्हाला माहित आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना ९ मेट्रो भेट दिल्या आहेत. मुंबईकराला पक्क घर जे मिळतेय ते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे. देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या चाळीची व्याख्या बदलली. हेरिटेज टीडीआर मुंबईत कधीच नव्हता. तो आणण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. गेल्या दीड वर्षात ८५ हजार गिरणी कामगारांच्या घरांची पात्रता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दिली. दरम्यान यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचीही भाषणे झाली.

या कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, माजी आमदार विनय कोरे, शिवसेना नेते मिलिंद देवरा, आ. मनिषा कायंदे, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, खा. गोपाळ शेट्टी, खा. पूनम महाजन, भाजपा मुंबई प्रभारी आ. अतुल भातखळकर, आ. सुनील राणे, आ. योगेश सागर, आ. अमित साटम, आ. कालिदास कोळंबकर, आ. तमील सेल्वन, आ. यामिनी यशवंत जाधव, भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, आमदार प्रसाद लाड, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजपा मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय, जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, अभ्यूदय नगर सह.गृह.संस्थेचे अध्यक्ष दिलीप शिंदे, अभ्यूदय नगर सह.गृह.संस्थेचे उपाध्यक्ष विलास सावंत, अभ्यूदय नगर सह. गृह. संस्थेचे सचिव तुकाराम रासम, मुंबई भाजपा सहकार आघाडीचे अध्यक्ष सुनील बांबूळकर आदी उपस्थित होते.

बारामतीमध्ये ‘ईएसआयसी’च्या २०० खाटांच्या रुग्णालयासाठी ‘एमआयडीसी’मार्फत वाढीव जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश-उपमुख्यमंत्री अजित पवार

0

मुंबई :- केंद्र शासनाच्या कामगार मंत्रालयाने बारामतीसाठी १०० खाटांचे रुग्णालय मंजूर केले आहे. भविष्यातील वाढत्या औद्योगिक वसाहतीची गरज लक्षात घेता येथे २०० खाटांच्या रुग्णालयाला मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणारी अतिरिक्त जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) उपलब्ध करून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात बारामती औद्योगिक वसाहत संघटनेच्या मागण्यांसंदर्भात बैठक झाली. बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत, बारामती औद्योगिक वसाहत संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, राज्य कर आयुक्त आशिष शर्मा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, वित्त विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बारामती औद्योगिक क्षेत्र टप्पा २ येथे राज्य कामगार विमा रुग्णालयासाठी पाच एकर जागेची मागणी करण्यात आली होती. तथापि भविष्यातील आवश्यकता लक्षात घेऊन येथे २०० खाटांचे रुग्णालय होणे आवश्यक आहे. याबाबतचा प्रस्ताव तातडीने कर्मचारी राज्य विमा महामंडळामार्फत केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावा. यासाठी निकषानुसार अधिक जागा आवश्यक असल्याने एमआयडीसीच्या माध्यमातून अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यात यावी.

बारामतीसह परिसरातून औद्योगिक व कृषी उत्पादने मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जातात. त्याअनुषंगाने येथे ड्रायपोर्ट निर्माण करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. बारामती एमआयडीसीमधील अग्निशमन केंद्रात लवकरात लवकर आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात यावी. एमआयडीसीमधील भूखंडाचे हस्तांतरण करताना राज्य शासनाचा रेडी रेकनर मूल्यांकनाचा दर आणि एमआयडीसीच्या मूल्यांकनाच्या दरापैकी जास्त असणाऱ्या रक्कमेवर मुद्रांक शुल्क भरावे लागते. त्यामुळे उद्योजकांवर अतिरिक्त बोजा पडतो. ही तफावत दूर करण्याच्या मागणीची दखल घेऊन धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

बारामती औद्योगिक वसाहतीत एमआयडीसीचे वापराविना पडून असलेले सभागृह दीर्घ कराराने बारामती औद्योगिक वसाहत संघटनेला वापरण्यासाठी देण्यात यावे, पणदरे एमआयडीसीमधील लघुउद्योजकांच्या वीज पुरवठ्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी एक्सप्रेस फीडरद्वारे वीजपुरवठा करावा. त्यादृष्टीने ढाकाळी आणि उडाळे येथे वीज उपकेंद्र उभारण्याच्या कामास गती द्यावी. पुनर्स्थापित वितरण क्षेत्र योजनेंतर्गत ही उपकेंद्र उभारण्यास लागणारा वेळ पाहता एमआयडीसीने स्वत:च्या निधीतून त्यांची उभारणी करावी. उद्योग विभागाला ऊर्जा विभागामार्फत या निधीचा परतावा करण्यात येईल, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला. संघटनेच्या इतर मागण्यांबाबतही चर्चा करण्यात येऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जलरथामार्फत जिल्ह्यातील गावात प्रचार व प्रसिद्धी

पुणे: जलशक्ती मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), जल जीवन मिशन व गाळयुक्त शिवार इत्यादी शासनाच्या विविध योजनांची जलरथामार्फत प्रचार व प्रसिद्धी करण्यात येत असून या जलरथाला जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी जिल्हा परिषद येथे हिरवा झेंडा दाखवून या अभियानाचा शुभारंभ केला.

यावेळी जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक आप्पासाहेब गुजर, भारतीय जैन संघटनेचे समन्वयक नितीन शहा व त्याची संपूर्ण टिम व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जलरथ जिल्ह्यातील एकूण १ हजार ३८५ ग्रामपंचायतीमध्ये भेट देणार आहे. स्वच्छ भारत मिशनमध्ये एकूण १ हजार ८४३ गवांपैकी १ हजार ४०१ गावे स्वच्छ भारत मिशन टप्पा २ अंतर्गत हागणदारी मुक्त अधिक म्हणून घोषित करण्यात आली असून मार्च २०२४ अखेर सर्व म्हणजे १ हजार ८४३ गावे हागणदारी मुक्त घोषीत करण्याचा संकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे.

जिल्ह्यांतील १३ तालुक्यांतील सर्व १ हजार ८४३ गावांत जलरथामार्फत योजनांची माहिती देण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यात एक चित्ररथ फिरणार आहे, अशी माहिती श्री. गुजर यानी दिली.

भारतीय ज्ञान परंपरा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या भारतीय ज्ञान परंपरा विभागाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ.गंटी मूर्ती :  मएसो सीनियर कॉलेजच्या वतीने भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर कार्यशाळेचे आयोजन
पुणे : भारतीय ज्ञान परंपरा ही कला, संस्कृती आणि विद्येचा महासागर आहे. परंतु शेकडो वर्षांच्या पाश्चात्य आक्रमणामुळे पाश्चात्य शिक्षणाचा आणि परंपरेचा प्रभाव आपल्या मनावर राहिला आहे, त्यामुळे भारतीय ज्ञानपरंपरेपासून आपण दूर गेलो होतो आजच्या तरुणांना भारतीय संस्कृतीचे वैभव खऱ्या अर्थाने कळण्यासाठी भारतीय ज्ञान परंपरा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या भारतीय ज्ञान परंपरा विभागाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. गंटी मुर्ती यांनी व्यक्त केले.

मएसो सिनियर कॉलेज, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भांडारकर विद्या संशोधन मंदिर यांच्यातर्फे भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. गंटी मूर्ती यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक, माजी खासदार प्रदीप रावत, भांडारकर संस्थेचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, भारतीय शिक्षण मंडळाचे सहसचिव महेश दाबक, विजय भालेराव, सीनियर कॉलेजचे प्राचार्य रवींद्र वैद्य, उपप्राचार्य डॉ. पुनम रावत यावेळी उपस्थित होते.

डॉ. गंटी मुर्ती म्हणाले, भारतीय संस्कृती जगातील एकमेव अशी संस्कृती आहे जी हजारो वर्षानंतरही आजही अस्तित्वात आहे, परंतु ही परंपरा मोठ्या प्रमाणावर आज मंदिरे आणि केवळ ग्रंथालयांमध्येच अस्तित्वात आहे, ही परंपरा तेथून बाहेर पडून सर्वसामान्यांच्या आयुष्याचा एक भाग बनले पाहिजे. जर भारतीय ज्ञान परंपरा सर्वसामान्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनली, तरच ही वैभवशाली परंपरा आपण पुढील पिढीपर्यंत पोहोचवू शकतो.

डॉ.पराग काळकर म्हणाले, आपल्या संस्कृती वरील विश्वास कमी करण्याचे महत्त्वाचे काम आक्रमकानी  केले. त्यामुळेच नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठे उध्वस्त करण्यात आली. आज गावातील शिक्षण हे शहरांमध्ये आणून ते सर्वसामान्यांना परवडण्याच्या पलीकडे गेले आहे. त्यामुळेच आज भारतीय ज्ञान परंपरा गरजेची आहे  केवळ पाश्चात्यांच्या दृष्टिकोनातून आपण पाहण्याची स्वतःला सवय लावल्यामुळे आपण आपल्याच भारतीय ज्ञान परंपरेला विसरलो आहोत.

महेश दाबक म्हणाले, भारतीय ज्ञान परंपरेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक करण्याची गरज आहे. आजच्या तरुणांना त्यांच्या करिअरमध्ये भारतीय ज्ञान परंपरा कशाप्रकारे उपयोगात आणता येऊ शकते हे जर आपण त्यांना लक्षात आणून दिले, तर तेच तरुण ही परंपरा पुढे नेऊ शकतात.

भूपाल पटवर्धन म्हणाले, आजपर्यंत संशोधन क्षेत्रांमध्ये भारतीय कमी पडत होते. परंतु भारतीय ज्ञान परंपरा जर समाजाच्या तळागाळापर्यंत पोचली तर निश्चितच विद्यार्थी संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित करतील. भारताच्या वैभवशाली परंपरेच्या इतिहासाला आजच्या वर्तमानाशी जोडून उद्याचे भविष्य उज्वल करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य भारतीय ज्ञान परंपरा करू शकेल.

प्रदीप रावत म्हणाले, विविध क्षेत्रांमध्ये आणि विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये भारतीयांनी मोठे योगदान दिले आहे. परंतु पाश्चात्यांच्या पगड्यामुळे आपण त्यांचे योगदान विसरत चाललो आहोत. भारतीयांनी केवळ भारताच्याच विकासामध्ये नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये कशाप्रकारे योगदान दिले आहे हे आजच्या तरुणांना कळणे गरजेचे आहे, त्यासाठीच भारतीय ज्ञान परंपरा ही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पोहोचली पाहिजे.

रवींद्र वैद्य म्हणाले, भारतीय ज्ञान परंपरेचा अधिक प्रचार आणि प्रसार होईल यासाठी नवीन शैक्षणिक धोरणांच्या माध्यमातून अभ्यासक्रम तयार करणे गरजेचे आहे, तरच आजच्या विद्यार्थ्यांना भारताची प्राचीन आणि गौरवशाली परंपरा काय होती हे कळू शकेल.

प्रदीप नाईक म्हणाले, भारतीय ज्ञान परंपरा अतिशय समृद्ध आहे. नवीन ज्ञान परंपरा निर्माण करून भारतीय विद्यार्थ्यांना विज्ञान आणि संशोधनाकडे वळविणे गरजेचे आहे. केवळ पाश्चात्य शिक्षण व्यवस्था प्रमाण मानून त्यानुसारच आपली वाटचाल करण्यापेक्षा आपल्या ज्ञानपरंपरेत चा नवीन मापदंड आपण निर्माण केले पाहिजे.

या कार्यशाळेमध्ये पुणे व इतर कॉलेजमधील एकूण १७० हून अधिक प्राध्यापकांनी सहभाग घेतला
गौरी मोघे यांनी समारोपाचे भाषण केले. डॉ. सुरेखा वैद्य यांनी सूत्रसंचालन केले.  प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पुनम रावत यांनी आभार मानले.

२९ मार्चला येणार ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’मातब्बर कलाकार येणार एकत्र

‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ ही गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. मात्र ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ ऐकून जरा नवलच वाटले ना? तर ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ हा नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या २९ मार्चला चित्रपटगृहात हे चाळिशीतले चोर दाखल होणार आहेत. चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीतील अनेक मान्यवर कलाकार एकत्र येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे एक कमाल पॅकेज असणार आहे.

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि मृदगंध फिल्म्स एल. एल. पी. निर्मित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केले असून यात सुबोध भावे, मुक्ता बर्वे, उमेश कामत, श्रृती मराठे, अतुल परचुरे, मधुरा वेलणकर आणि आंनद इंगळे अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाचे लेखन विवेक बेळे यांनी केले असून नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे निर्माते आहेत.

चित्रपटाचे नावच प्रचंड उत्सुकता वाढवणारे आहे. विवाहित असण्याचा गुन्हा चित्रपटातील या चाळीशीतील चोरांनी केला आहे. त्यामुळे विवाहित असणे का गुन्हा आहे आणि हे नेमके काय प्रकरण आहे, याचे उत्तर आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहे. एकंदरच चित्रपटाच्या पहिल्या लूकवरून चोरांची ही टोळी दंगा करणार, हे निश्चित!

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ” विवाहीत असण्याचा गुन्हा या चाळीशीतील चोरांनी केला आहे. आता या गुन्ह्याची त्यांना काय शिक्षा मिळणार, हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मल्टिस्टारर असलेला हा चित्रपट विनोदी आहे. सगळेच कलाकार मातब्बर असल्याने प्रत्येकाच्या वेगवेगळ्या छटा या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.’’

मोदीविरोधक J&Kचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर CBI रेड

0

अगर 2024 में #नरेंद्र_मोदी को नहीं हटाया तो ये #डेमोक्रेसी को खत्म कर देगा, चुनाव ही नहीं होगा फिर। मैं देश के लोगों को कहना चाहता हूं कि आखिरी मौका है ये इस बार #जाति #धर्म सब छोड़कर इनके खिलाफ वोट करो वरना आगे आपको वोट का भी मौका नहीं मिलेगा- #सत्यपाल_मलिक (पूर्व गवर्नर)……..अशा शब्दात प्रचार करणारे J&Kचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरावर CBI रेड पडली आहे.

https://twitter.com/SatyapalmalikG/status/1760528793934983288

सीबीआयने आज (22 फेब्रुवारी) माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. याशिवाय दिल्लीतील अन्य 29 ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले आहेत. किरू जलविद्युत प्रकल्पातील भ्रष्टाचाराबाबत ही कारवाई करण्यात आली. सत्यपाल मलिक यांनी राज्यपाल असताना दावा केला होता की, एका जलविद्युत प्रकल्पाच्या दोन फायली निकाली काढण्यासाठी 300 कोटी रुपयांची लाच देऊ करण्यात आली होती. छापेमारीनंतर मलिक यांनी एक्सवर पोस्ट करत मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, छाप्याला घाबरणार नाही, असे म्हटले.

सत्यपाल मलिक यांनी 17 ऑक्टोबर 2021 रोजी राजस्थानच्या झुंझुनू येथे एका कार्यक्रमात सांगितले होते की, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांना कोट्यवधींची लाच देऊ करण्यात आली होती. त्यादरम्यान दोन फाईल्स त्यांच्याकडे आल्या होत्या. त्यापैकी एक मोठा उद्योगपती आणि दुसरी मेहबुबा मुफ्ती आणि भाजप आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या व्यक्तीची होती. त्यात घोटाळा झाल्याचे त्यांच्या सचिवांनी सांगितल्यानंतर त्यांनी दोन्ही सौदे रद्द केल्याचे मलिक यांनी सांगितले होते.

दोन्ही फायलींसाठी आपल्याला 150-150 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असेही मलिक म्हणाले होते. मलिक म्हणाला, ‘मी म्हणालो होतो की मी पाच कुर्ता-पायजमा घेऊन आलो आहे आणि तेच घेऊन निघेन. सीबीआयने विचारल्यावर मी ही ऑफर देणाऱ्यांची नावे सांगेन.

याप्रकरणी सीबीआयने 2 एफआयआर नोंदवले होते. पहिला एफआयआर अंदाजे 60 कोटी रुपयांच्या कंत्राटांच्या वितरणात कथित भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. 2017-18 मध्ये जम्मू आणि काश्मीर कर्मचारी आरोग्य सेवा विमा योजनेचे कंत्राट देण्यासाठी विमा कंपनीकडून ही रक्कम लाच म्हणून घेण्यात आली होती.

दुसरा एफआयआर किरू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट (HEP) च्या नागरी कामासाठी 2019 मध्ये एका खाजगी कंपनीला 2,200 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास सीबीआय करत आहे.

संभाजी ब्रिगेडच्या मुंबई अध्यक्ष यांच्यासह ब्रिगेडी कार्यकर्त्यांनी सोडला साहेबांचा हाथ अन दिली दादांना साथ

मुंबई-बहुजनवादी विचारधारेसाठी आक्रमक भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या मुंबई अध्यक्ष यांच्यासह राज्यभरातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज ना. अजितदादा पवार यांना समर्थन देत देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. अजितदादांच्या नेतृत्वात निस्वार्थपणे काम करण्याची इच्छा यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. आमदार अमोल मिटकरी यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

संभाजी ब्रिगेड संघटनेत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी होण्याचा निर्णय घेतला याबद्दल सर्वांचे आभार मानत अजितदादांनी सर्वांचे पक्षात स्वागत केलं. संभाजी ब्रिगेड संघटनेची ओळख विचारांसाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना अशी आहे. हा आक्रमकपणा योग्य ठिकाणी वापरून त्यातून जनहिताची कामं आपल्याला करायची असल्याचं अजितदादांनी यावेळी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आज महायुती सोबत सत्तेत सहभागी असली तरी शिव-फुले-शाहू-आंबेडकरांची बहुजनवादी विचारधारा पुढे घेऊन जात असल्याचं यावेळी ना. अजितदादा म्हणाले. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचे एकत्रित काम करायचं आहे. यासाठी एकमेकांना निश्चितच मदत करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या पक्षप्रवेश सोहळ्याला क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव तसेच संभाजी ब्रिगेड संघटनेचे मान्यवर मंडळी उपस्थित होती.

पुण्यातील कोणत्या हॉटेल्स आणि पब मध्ये होत होती MD ची डिलिव्हरी,कोण होते प्रमुख विक्रेते होलसेल ग्राहक ?

पुणे- पुणे पोलिसांनी नेमका मुळावर घाव घालून मॅफेड्रोन अर्थात MD या अंमली पदार्थाचे देशाचे लक्ष वेधून घेणारे रॅकेट अवघ्या ३ दिवसात उध्वस्त करून तमाम पोलीस दलाच्या आणि तपास यंत्रणाच्या डोळ्यात अंजन घातले असून आता पुण्यात आणि मुंबईत अथवा महाराष्ट्रात कोणकोणत्या हॉटेलात ,पब्ज मध्ये वा नेमके कोणत्या ठिकाणी ते कोणत्या नावाने,काय भावाने -किंमतीने विकले जात होते / कसा होता त्याचा बाजार..याबाबतच्या माहितीबाबत आता पुणेकरच नव्हे तर महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली आहे.पुण्यात आणि महाराष्ट्रात या अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईची संख्या,हॉस्पीटलायजेशन,विक्रेत्यांचे जाळे..नेमके या धंद्यात विक्रीला लोक कसे उतरत आणि ग्राहक कसे कुठे शोधत ? असा एकूणच प्रवास आता लोकांना आणि या बातम्यांच्या वाचकांसाठी रंजक ठरणार आहे. जो पोलीस आता लवकरच पडद्याच्या पुढे आणतील अशी अपेक्षा आहे.

कुरकुंभ सारख्या ठिकाणी असा कारखाना अगदी निर्धोकपणे सुरु होता आणि त्याचा बाजार,मार्केट हि अगदी विनासायास सहज सुरु होते या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ‘अर्थकेम लॅब्रोटरीज कंपनीचे मालक भीमाजी परशुराम साबळे यांच्या औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नं. ए ६३ मधील कंपनीच्या उत्पादनाबाबत २०२१ नंतर अर्ज न केल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र कारखाने नियमांतर्गतच्या कायद्याचा भंग केल्याने शिवाजीनगर येथील न्यायालयात २९ मार्च २०२२ रोजी खटला दाखल करण्यात आला आहे.याबाबत न्यायालयीन प्रक्रिया चालू असून १४ मार्च २०२४ रोजी पुढील तारीख आहे. याच कंपनीच्या प्लॉट नं. ए. ६३ च्या बाजूलाच अमली पदार्थ साठा सापडलेला अर्थकेम कंपनीचा प्लॉट नं. ए. ७० हा भीमाजी साबळे यांच्या मालकीचा आणखी एक प्लॉट आहे. त्यामध्ये कोणतीही परवानगी न घेता बेकायदा मेफेड्रोन या अमली पदार्थाचे उत्पादन व साठा केला जात होता, असा प्रकार खूपचमोठा धक्कादायक आहे.’’

‎येरवडा कारागृहात ड्रग उत्पादनाचा ठरला प्लान?

सूत्रांकडून असे सांगितले जाते की कि,सॅम’ नावाचा इंग्लंडचा एक आराेपी हा ‎मास्टरमाइंड असून आफ्रिकेतील‎ टांझानिया देशाचा ‘ब्राऊन’ नामक आराेपी ‎हा त्याच्या संपर्कात आल्यावर त्यांनी ‎येरवडा कारागृहात हैदर शेख, वैभव माने‎ यांच्या मदतीने ड्रग निर्मिीतीचे उत्पादन‎ घेण्याचे ठरवले.सॅम याच्या माध्यमातून ‎डाेंबिवलीचा केमिकल तज्ज्ञ युवराज‎ भुजबळ हा संपर्कात आला व त्याचा‎ वापर करून सॅमने कुरकुंभ‎ एमआयडीसीतील भीमाजी साबळे याच्या‎ कंपनीत ड्रग उत्पन्न घेण्याचे निश्चित‎केले. साबळे याच्यावर कंपनीतील‎ कामाचे तब्बल १४ काेटी रुपयांचे कर्ज‎ झाले हाेते. त्यामुळे झटपट पैसे‎ मिळवण्यासाठी ताे ड्रग निर्मितीत‎ उतरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दर आठवड्याला तब्बल ३०० किलाे‎ड्रग्ज निर्मितीची क्षमता कारखान्यात‎ निर्माण झाली हाेती.युवराज भुजबळ हा ‎डाेंबिवलीमधील आर अँड डी प्रा. लि. या ‎कंपनीत केमिकल तज्ज्ञ म्हणून काम करत‎ हाेता. या कंपनीत मागील सात ते आठ वर्षे‎काम केल्यानंतर ताे सॅम या आराेपीच्या ‎संपर्कात आल्याचेही समोर आले.‎सॅमच्या माध्यमातून ताे साबळे यास ‎कुरकुंभ येथे कंपनीत जाऊन भेटला. त्याने‎ ड्रग बनवण्याचा फार्म्युला त्यास देऊन‎ सदरचे उत्पादन घेण्याचे सांगितले.‎त्याकरिता आतापर्यंत त्याने साबळे यास ८‎लाख रुपये देखील दिले आहे. सॅम हा ‎नेमके किती उत्पादन पाहिजे हे सांगत‎ हाेता. त्याप्रमाणे साबळे यास उत्पादनाची‎ आॅर्डर दिली जात हाेती. प्रत्येक‎ डिलिव्हरीमागे लाखाे रुपये मिळत‎ असल्याने साबळे हा देखील ड्रग‎ उत्पादनात सक्रिय झाला हाेता.‎इतक्या माेठया‎ प्रमाणात आॅर्डर काेण देत हाेते, त्याचा वापर नेमका कुठे‎कुठे केला गेला, त्यासाठीचे आर्थिक रसद काेणी व‎ किती पुरवली याबाबत देखील चाैकशी करण्यात येत‎ आहे. या रकमेचा नेमका विनियाेग कशा प्रकारे झाला हे ‎देखील तपासण्यात येत आहे.पुणे पाेलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात वैभव माने व त्याचा वाहन‎ चालक या दाेघांना अटक केली व त्यांच्या ताब्यातून साडेतीन काेटींचे ‎एमडी जप्त केले. त्यानंतर त्यांच्या चाैकशीत हैदर शेख याचे नाव‎ निष्पन्न करून विश्रांतवाडी येथील गाेदाम छाप्यात ५५ किलाे एमडी‎जप्त केले. त्यानंतर सदर मालाची वाहतूक करणाऱ्या तीन टेम्पाे‎चालकांना शाेधून काढत त्यांच्याकडे चाैकशी केली. त्यात कुरकुंभ,‎सांगली व दिल्ली येथील ठिकाणांची माहिती पाेलिसांना मिळाली.‎टेम्पाे चालकांच्या मदतीने कुरकुंभ येथून ६६३ किलाे ८०० ग्रॅम एमडी,‎दिल्लीतून ९७० किलाे एमडी व सांगलीतून १४० किलाे एमडी जप्त ‎करण्यात आलेले आहे. पाेलिसांच्या पथकासाेबत विमानाने टेम्पाे‎चालक देखील दिल्लीला तपास कामासाठी रवाना करण्यात आला.‎दिल्लीत जप्त करण्यात आलेला माल सुरक्षित पुण्यात आणण्यासाठी‎ १ डीसीपीसह १४ पाेलिसांचे पथक व दाेन क्यूआरटी टीम दिल्लीस ‎पाठविण्यात आली आहे.

 सांगलीमधून १४० किलो ‘एमडी’ जप्त

सांगली जिल्हयातील कुपवाड एमआयडीसी मध्ये तीनशे कोटी रुपयाच्या एम डी ड्रग्स जप्त : तीन जणांना अटक : पुणे क्राईम ब्रँच पोलिसांची कारवाई :

सांगली जिल्हयातील कुपवाड एमआयडीसी मध्ये तीनशे कोटी रुपये किमतीचे एम डी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे क्राईम ब्रँच पोलिसांनी सांगली पोलिसांच्या सहकार्याने कारवाई केली आहे. आयुब मकानदार आणि अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी कुपवाड एमआयडीसी मध्ये केटामिनवर कारवाई झाली होती त्यानंतर आता तब्बल तीनशे कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्सवर कारवाई झाल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.


पुणे क्राईम ब्रँचने अवैधरित्या उत्पादन करणाऱ्या अमली पदार्थ एमडी ड्रग्स चा पर्दाफाश केला असून पुणे, दिल्ली पाठोपाठ सांगली जिल्ह्यात असणाऱ्या एमआयडीसी कुपवाड मध्ये काही 300 कोटी रुपयांचा एमडी ड्रगचा साठा जप्त केला आहे. पुण्यातून टेम्पो मधून काही पिशव्या कुपवाड मध्ये आल्याचे माहिती पुणे पुणे अनिव्हेशन विभागाला मिळाली. आरोपी आयुब माकनदार याने कुपवाड मध्ये रूम भाड्याने घेऊन गोण्या ठेवल्या होत्या.
सांगलीतील कुपवाड मधून 140 किमो एम डी ड्रग्स जप्त कण्यात आला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 280 ते 300 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. पुणे शहर, शिरूर, दिल्ली त्यानंतर कुपवाड मध्ये पुणे क्राईम ब्रँचची कारवाई करण्यात आली आहे.
आयुब मकानदार हा यापूर्वी ड्रग्ज प्रकरणी येरवडा मध्ये शिक्षा भोगत असताना आयुब याची पुण्यात अन्य संशयीतासोबत ओळख झाली. त्यातूनच तो ड्रग्ज पुरवठा करण्याचे काम करत होता. कुपवाड मधील स्वामी मळा मध्ये पुण्यातील क्राईम ब्रँच कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी कुपवाड येथे येवून कारवाई केली. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड आणि कुपवाड एम आय डी सी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी संयुक्तिकपणे ही कारवाई केली आहे.

पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देणार -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0

अमरावती : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभाग अहोरात्र आपले कर्तव्य बजावत असतो. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडताना पोलीस विभागाचे सर्व सुविधायुक्त अत्याधुनिकीकरण होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात शहर व ग्रामीण पोलीस विभागाला मागणीनुसार भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

पोलीस कवायत मैदान येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्तालयाला नवीन १८ चारचाकी व १० दुचाकी वाहनांचे हस्तांतरण आणि पोलीस आयुक्तालयातील प्रशिक्षण सभागृहाचे लोकार्पण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील, माजी महापौर चेतन गावंडे, निवेदिता दिघडे, तुषार भारतीय यांच्यासह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस अधिक्षक (ग्रामीण) विशाल आनंद, पोलीस उपायुक्त सागर पाटील, गणेश शिंदे, कल्पना बारावकर व सर्व पोलीस निरीक्षक आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून व वाहनांच्या ताफ्याला हिरवा झेंडा दाखवून वाहने विभागाला हस्तांतरीत करण्यात आलीत. त्यानंतर पोलीस आयुक्तालयातील नुतणीकरण करण्यात आलेल्या प्रशिक्षण सभागृहाचे पालकमंत्र्यांचे हस्ते फीत कापून लोकार्पण झाले.

श्री. पाटील म्हणाले की, अमरावती पोलीस खात्याला जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १८ चारचाकी व १० दुचाकी वाहने खरेदीसाठी 2 कोटी 26 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच दुचाकी वाहनांसाठी 8 लाख 30 हजार रुपये व सभागृहाच्या नुतणीकरणासाठी 12 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार मंजूर निधीतून उपरोक्तप्रमाणे विभागाच्या बळकटीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. यापुढेही पोलीस खात्याचे आधुनिकीकरण तसेच निवासस्थानांच्या दुरुस्ती, नवीन पोलीस स्टेशन निर्मिती, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, वेलफेअर फंड, सभागृहांची निर्मिती, अत्याधुनिक साहित्य खरेदी आदींसाठी सीएसआर फंड व जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, पोलीसांच्या सन्मानाला कुणाद्वारेही ठेच पोहोचविली जावू नये, यासाठी पोलीसांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करण्यात येणार नाही. मादक पदार्थांची विक्री व व्यसन ही समाजाला लागलेली किड आहे. ही किड समाजातून पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. पोलिसांच्या कुटुबिंयांना सर्व सोयीयुक्त निवासस्थाने उपलब्ध होण्यासाठी त्यांच्या निवासस्थांनाची दुरुस्ती करण्यात यावी. समाजातील विघातक, गुन्हेगारी वृत्तींना आळा घालण्यासाठी तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांना पायबंद करण्यासाठी पोलीसांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. दामिनी पथके अधिक सजगपणे कार्यान्वित करावित. कायदा व सुव्यवस्था अबाधितपणे राखण्यासाठी पोलीस विभागाला जे जे काही लागेल ते ते तुम्हाला पुरविण्यात येईल, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

शहर पोलीस विभागाच्या अत्याधुनिकीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर सुमारे दोन कोटी 50 लक्ष रुपये निधीतून नवीन अठरा चारचाकी, दहा दुचाकी वाहनांची खरेदी तसेच अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण सभागृहाचे नुतणीकरण करण्यात आले आहे. याव्दारे पोलीस विभागाला गस्ती व गुन्हे शोध प्रक्रिया  गतीने पूर्ण करण्यासाठी सहाय्यता होणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरुस्ती, साईनगर, बडनेरा एमआयडीसी, नांदगाव पेठ एमआयडीसी याठिकाणी नवीन पोलीस ठाणे तसेच सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्प आदींसाठी निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी पोलीस आयुक्त श्री. रेड्डी यांनी पालकमंत्र्यांना केली.