पुणे, दि. ७: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ ची निवडणूक प्रक्रिया सुरू असून मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ३५- बारामती लोकसभा मतदार संघात ७ मे रोजी तर ३३- मावळ, ३४- पुणे आणि ३६- शिरूर लोकसभा मतदार संघात १३ मे रोजी मतदान होणार असल्याने त्या- त्या दिवशी मतदार संघात सुट्टी असणार आहे.
राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार ही सार्वजनिक सुट्टी संबंधित मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी मतदार संघांच्या बाहेर असतील, त्यांना देखील लागू असणार आहे. तसेच राज्य व केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम व इतर संस्था (प्रतिष्ठान) आदींना ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील.
या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे.
डब्लूएमपीएल ठरणार भारतातील महिलांसाठीची पहिली राज्यस्तरीय फ्रँचायझी क्रिकेट स्पर्धा
पहिली डब्लूएमपीएल स्पर्धा 24जून पासून रंगणार
पुणे, ७ एप्रिल २०२४: गेल्या वर्षी – २०२३ महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) ने आता महिलांसाठी महाराष्ट्र प्रीमियर लीग(डब्लूएमपीएल) स्पर्धेच्या आयोजनाची घोषणा केली आहे. एका राज्यासाठी स्वतंत्रपणे महिला प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित करणारी एमसीए ही देशातील पहिली संघटना ठरली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(बीसीसीआय)च्या मान्यतेखाली या स्पर्धेचे येत्या २४ जून २०२४ पासून गहुंजे येथील एमसीए स्टेडियम येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार, एमसीएचे सचिव ऍड. कमलेश पिसाळ, सहसचिव संतोष बोबडे, खजिनदार संजय बजाज, एमपीएलचे चेअरमन सचिन मुळ्ये, एमसीएचे ॲपेक्स कौन्सिल सदस्या कल्पना तापिकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डब्लूएमपीएल या स्पर्धेमुळे महिला क्रिकेट मधील एक मैलाचा दगड गाठला जाणार असल्याची प्रतिक्रिया एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी व्यक्त केली. महिला क्रिकेटच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून महाराष्ट्रातील गुणवान महिला क्रिकेटपटूना या स्पर्धेमुळे आदर्श व्यासपीठ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदाच्या डब्लूएमपीएल स्पर्धेत एमसीएच्या कार्यकक्षेतील चार शहरांचे प्रतिनिधीत्व करणारे चार संघ सहभागी होणार आहेत. राउंड रॉबिन पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक संघ सहा साखळी सामने खेळणार असून सर्वोत्तम दोन संघ अंतिम लढतीसाठी पात्र ठरणार आहे.
यंदाच्या महिला प्रीमियर लीग स्पर्धेत स्मृती मंधाना, देविका वैद्य, अनुजा पाटील, किरण नवगिरे आणि श्रद्धा पोखरकर अशा महाराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असल्याचे सांगून रोहित पवार पुढे म्हणाले की, या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमा आणि स्पोर्टस १८ या वाहिन्यांवरून करण्यात येणार आहे. त्यामुळे महिला क्रिकेटचा प्रसार चांगल्या पद्धतीने होईल. या स्पर्धेसाठी एकूण २० लाख रुपये विजेत्या संघाला रोख पारितोषिक देण्यात येणार असून उपविजेत्या संघाला १० लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. महिला प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या लिलावासाठी एमसीएच्या वतीने खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. त्या खेळाडूंमधून चारही संघांचे संघ मालक आपापल्या संघासाठी खेळाडूंची खरेदी करतील.
बीसीसीआयच्या नियमाप्रमाणे चारही फ्रँचायझीच्या मालकांचे नोंदणीकृत कार्यालय, व्यवसायाचे मुख्य ठिकाण, महाराष्ट्रात असणे आवश्यक आहे. संघ खरेदी करू इच्छिणाऱ्या फ्रँचायझींनी एमसीएच्या (www.cricketmaharashtra.com) या संकेत स्थळावरून अर्ज डाउनलोड करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. गेल्या वर्षी एमसीए तर्फे सुरु करण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेला प्रचंड यश मिळाले. या स्पर्धेत ऋतुराज गायकवाड, केदार जाधव, राहुल त्रिपाठी व आर्शीन कुलकर्णी असे नामवंत खेळाडू सहभागी झाले होते. हि स्पर्धा डीडी स्पोर्ट्स या वाहिन्यांवरून प्रक्षेपित करण्यात आली होती.
यास्पर्धेसंबंधीमहत्वाच्यातारखाअशाआहेत:
१. संघ खरेदीसाठी एमसीएच्या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध : ७ एप्रिल २०२४
२. फ्रँचायझींनी अर्ज करण्याची मुदत : २४ एप्रिल २०२४
३. संघ मालक निश्चित करण्यासाठी लिलाव : २७ एप्रिल २०२४
४. खेळाडूंचा लिलाव : ११ मे २०२४
५. डब्लूएमपीएल स्पर्धेस प्रारंभ : २४ जून २०२४
फ्रँचायझी खरेदी करण्यासाठी इच्छुक संघ मालकांनी आपला अर्ज विहित नमुण्यानुसार (सोबत जोडलेल्या नमुण्याप्रमाने) ई मेल द्वारे या ई मेल आयडीवर २४ एप्रिल २०२४रोजी सायंकाळी ५वाजण्या पूर्वी पाठवणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हे अर्ज पाठविण्याची सुचना व्हॉट्स ॲप द्वारे स्पर्धा संचालक राजेश राणे यांना ९८९०२६३१११ या क्रमांकावर कळविणे बंधनकारक आहे.
पुणे-बीजेपीने स्मार्ट पुण्याचे स्वप्न दाखवत संपूर्ण पुणे शहराची वाट लावली. पुणेकरांना आता बदल हवा असून सर्वसामान्य पुणेकरांच्या नागरी व सामजिक समस्या सोडविण्यासाठी जनतेत मिसळणारा उमेदवार म्हणून मला पुणेकर नक्कीच निवडून देतील असा विश्वास महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज व्यक्त केला. आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कोथरूड विधानसभा मतदार संघामध्ये ॲड. रामचंद्र उर्फ चंदू कदम यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले त्यात ते बोलत होते.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी म्हणले की, काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीनाम्यात पाच न्याय व पंचवीस गॅरंटी अंमलात आणण्याचे वचन दिले आहे. सर्व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा हा लोकाभिमुख जाहीरनामा जनतेपर्यंत पोहचवावा.
या प्रसंगी माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे म्हणाले की, देशाचे संविधान धोक्यात असून संविधान टिकले तरच या देशातील लोकशाही टिकेल त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुणेकरांच्या घरोघरी जाऊन काँग्रेस पक्षाची संविधान रक्षणाची भूमिका सांगावी.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, भाजपने पुणे मनपाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीत प्रचंड भ्रष्टाचार केला असून या निवडणुकीत पुणेकर भाजपला घरी बसवल्या शिवाय राहणार नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट पूर्ण ताकदीने व एकदिलाने या निवडणुकीत उतरली असून सामान्य जनतेसाठी धावून जाणारा माणूस म्हणून धंगेकर यांना पुणेकर नक्कीच भरभरून मतदान करतील.
काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक चंदू कदम म्हणाले की, ही लढाई जनशक्ती विरुध्द धनशक्ती अशी असून यावेळेस कोथरूडकर मतदार धंगेकर यांच्या पारड्यात किमान एक लाख मते टाकतील.
आशिष गार्डन येथे घेण्यात आलेल्या या मेळाव्याला मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे व गजानन थरकुडे, आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे व धनंजय बेनकर, पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे, लक्ष्मी दुधाणे, शिवसेना उपशहरप्रमुख राजेश पळसकर, राष्ट्रवादी ब्लॉक अध्यक्ष स्वप्नील दुधाणे, राष्ट्रवादी ब्लॉक उपाध्यक्ष गिरीश गुरुजानी, आम आदमी पार्टी ब्लॉक अध्यक्ष ॲड. अमोल काळे, प्रा. पवार सर, शिवसेनेचे नितीन पवार, पुणे शहर युवक काँग्रेस सरचिटणीस सागर सुबराव कदम, आम आदमी पार्टी महाराष्ट्र सचिव डॉ. अभिजित मोरे , महिला ब्लॉक काँग्रेस अध्यक्षा मनीषा करपे, पुणे शहर महिला काँग्रेस सरचिटणीस नायना सोनार, पुणे शहर एन एस यु आय अध्यक्ष अभिजित गोरे, शिवा मंत्री, विजय खळदकर (उपाध्यक्ष), राजीव गांधी पंचायत शहर अध्यक्ष किशोर मारणे उपस्थित होते. कोथरूड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवींद्र माझिरे यांनी प्रास्ताविक केले, यशराज पारखी यांनी आभार व्यक्त केले.
पुणे-ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजप पक्षामध्ये येण्याचा जर त्यांचे मत बनले असेलतरकेंद्रीय, आमची राज्याची समिती आता याबाबत विचार करेल पण विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही पक्षामध्ये येण्यासाठी आम्ही कोणाला नाही म्हणत नाही कारण, शेवटी मोदीजींच्या नेतृत्वातला भारत आणि त्यासाठी येणारी जी काही लोक आहेत, नेते आहेत जस की अशोक चव्हाण, अर्चना पाटील यांचा पक्षप्रवेश झाला आहे.जे जे पक्षामध्ये प्रवेश करतील त्यांचा संघटना वाढवण्यामध्ये उपयोग आहे असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.
एकनाथ खडसे हे भाजपात येत आहेत पण त्यांची मुलगी येत नाही. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, मी वारंवार सांगत आहे की केंद्रीय, आमची राज्याची समिती आता याबाबत विचार करेल. कारण निर्णय संपूर्ण करावे लागतील, तुटक-तुटक निर्णय होणार नाही.आमच्या राज्याची आणि केंद्राची समिती सगळ्या गोष्टीचा निर्णय करेल त्यानंतर मग कुठल्याही गोष्टीचा योग्य निर्णय घेतला जाईल.पण जर एकनाथ खडसे यांच भाजपामध्ये येण्याच मत असेल तर आमची केंद्रीय आणि राज्य समिती विचार करेल.एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाला अजून ग्रीन सिग्नल नाही का? याबाबत ते म्हणाले, ग्रीन सिग्नलची गरजच नाही, शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजींच्या नेतृत्वाला ज्यांना ज्यांना भाजपामध्ये असेल त्यांच्यासाठी आमचा दुपट्टा नेहमीच तयार आहे.आमच्या पक्षातून गेलेली लोकं असो किंवा काँग्रेसमधून येणारी लोकं असो आजही पुण्यामध्ये काही पक्षप्रवेश झाले आहे.त्यामुळे पक्ष प्रवेशाकरीता आमचा कुणाचीही ना नसते. एकनाथ खडसे हे भाजपात येत आहेत पण त्यांची मुलगी येत नाही. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, मी वारंवार सांगत आहे की केंद्रीय, आमची राज्याची समिती आता याबाबत विचार करेल. कारण निर्णय संपूर्ण करावे लागतील, तुटक-तुटक निर्णय होणार नाही.आमच्या राज्याची आणि केंद्राची समिती सगळ्या गोष्टीचा निर्णय करेल त्यानंतर मग कुठल्याही गोष्टीचा योग्य निर्णय घेतला जाईल.पण जर एकनाथ खडसे यांच भाजपामध्ये येण्याच मत असेल तर आमची केंद्रीय आणि राज्य समिती विचार करेल. एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाला अजून ग्रीन सिग्नल नाही का? याबाबत ते म्हणाले, ग्रीन सिग्नलची गरजच नाही, शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजींच्या नेतृत्वाला ज्यांना ज्यांना भाजपामध्ये असेल त्यांच्यासाठी आमचा दुपट्टा नेहमीच तयार आहे.आमच्या पक्षातून गेलेली लोकं असो किंवा काँग्रेसमधून येणारी लोकं असो आजही पुण्यामध्ये काही पक्षप्रवेश झाले आहे.त्यामुळे पक्ष प्रवेशाकरीता आमचा कुणाचीही ना नसते.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाला विरोध आहे का? याबाबत ते म्हणाले, खडसे यांचा पक्ष प्रवेशास कुणाचाही विरोध नाही.देवेंद्र फडणवीस यांचा पक्षप्रवेशाला विरोध नाही.देवेंद्र फडणवीस हे कधीही एकनाथ खडसे यांच्याविरोधात नाही.एकनाथ खडसे यांना सर्वात जास्त मानाचं स्थान, हृदयातील स्थान देवेंद्रनी पहिल्यापासून दिल आहे याचा मी साक्षीदार आहे.एकनाथ खडसे हे आमचे नेते होते, त्या काळातही त्यांनी देवेंद्रना पूर्ण सहकार्य केले.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आजही त्यांच्या मनातील एकनाथ खडसे यांचा सन्मान कमी झाला नाही. शेवटी पक्ष बदलत राहतात, लोक येत राहतात.देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिगत संबंध कुणाशीही वाईट नाही.विनोद तावडे हे दिल्लीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, राज्यात भविष्यात वेगळ काय पाहायला मिळेल का? यावर प्रतक्रिया देताना त्यांनी सांगितले, भविष्यात काही वेगळे नाही होत, आपणच वेगळा अर्थ करताय. आमच्या ज्या समित्या आहेत त्या समित्या निर्णय करतात त्यामुळे याची काही चिंता करयची गरज नाही.
पुणे- पुण्याचा श्वास म्हणून ओळखली जाणारी तळजाई टेकडी अनेकांच्या हृदयात स्थान मिळवून बसलेली आहे. निवडणूक कुठलीही असो या टेकडीवर उमेदवार येत नाहीत असे कधी होत नाही, होणार नाही … हा श्वास येथेच मिळतो जो लढण्याची, संघर्षाची अधिक प्रेरणा देतो आणि उमेद निर्माण करतो येथे बारामतीच्या अजित पवार गटाच्या लोकसभा उमेदवार सुनेत्रा पवार आणि पुण्याचे कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची भेट झाली .
त्यात येथे धंगेकर यांच्यासमवेत उपस्थिती होती उल्हास पवारांची ..मग काय सुनेत्रा पवारांनी यावेळी उल्हास पवारांना नमस्कार केला. आणि या ठिकाणी नेहमी फिरायला येतो, असे सांगून उल्हासदादांनी आपुलकीने त्यांची चौकशी, विचारपूस केली.
आमदार रवी धंगेकर आणि सुनेत्रा पवारांनी परस्परांना नमस्कार केला. यावेळी आमदार भीमराव तापकीर, दत्ता धनकवडे, आप्पा रेणूसे यांच्यासह महायुतीच्या सर्वच नेते पदाधिकाऱ्यांशी आपसात संवाद साधला.
पुणे – देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सगळीकडे चर्चा राजकारणाची अन गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काय केले याचीच सुरू आहे. याचा अनुभव पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप– शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लीकन पक्ष (आठवले गट)व मित्र पक्षांच्या महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी झैनी मशिदीला दिलेल्या भेटीतही आला. तेथील गप्पांच्या केंद्र स्थानी होता मोदींच्या कार्यकाळाचा मुद्दा …
यावेळी मोहोळ यांनी कोढवा परिसरातील फक्रीहिलच्या झैदी मशिदीला भेट दिली. सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. सध्या रमजानचा महिना सुरू असल्याने नमाजअदा करण्यासाठी मशिदीत चांगलीच गर्दी होती. नमाज अदा झाल्यावर मोहोळ सहका-यांसह तिथे पोचले. यावेळी अमीलसाहेब जमालुद्दीन, शेख कुतुबखान, सुजरम नगरवाला, शोएब इंडोनेशियावाला, शोएब रामपुरावाला, मोयेड नुरूनी आदी प्रमुख मंडळींसह मोठया संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. यासर्वांनी समाजाच्या वतीने मोहोळ यांचे स्वागत केले. यावेळी सर्वांशी अनौपचारिक गप्पा मोहोळ यांनी मारल्या. या गप्पांच्या केंद्रस्थानी गेल्या दहा वर्षातील मुस्लिम समाजाने घेतलेले सरकारचे अनुभव होते. सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणयात कोणताही भेदभाव होत नाही असे यापूर्वी काधीही अनुभवास न आलेला अनुभव आज देशातील सर्व धर्म, जाती पंथाचे लोक घेत आहेत. तसेच तिहेरी तलाकचाही उल्लेख आवर्जून यावेळी करण्यात आला. विश्वकर्मा योजनेचा चांगला फायदा मुस्लिमसमाजातील तरूणांना मिळणार असल्याचे मत काही तरूणांनी व्यक्त केला.
संपूर्ण देश हुकूमशाहीविरोधात एकवटला आहे. चला एकत्र येऊन देशाच्या सुपुत्रासाठी आवाज उठवूया.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाचे (आप) नेते रविवारी देशभरात उपवास करणार आहेत. यासाठी पक्षाचे बडे नेते सकाळी दिल्लीतील जंतरमंतरवर पोहोचले. त्याचबरोबर देशाच्या इतर भागातही कार्यकर्ते उपवास करून आंदोलन करणार आहेत.मद्य धोरण घोटाळ्यात 21 मार्च रोजी अटक करण्यात आलेल्या केजरीवाल यांची तात्काळ सुटका करावी, अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे. ईडीने त्यांना खोट्या प्रकरणात अडकवले आहे. पक्षाने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे- संपूर्ण देश हुकूमशाहीविरोधात एकवटला आहे. चला एकत्र येऊन देशाच्या सुपुत्रासाठी आवाज उठवूया. यापूर्वी ‘आप’ने 26 मार्च रोजी देशभरात निदर्शने केली होती. दिल्लीतील पक्षाचे कार्यकर्तेही पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी निघाले होते, पण त्यांना पोलिसांनी वाटेत अडवले आणि ताब्यात घेतले.मद्य धोरण घोटाळ्यात 21 मार्च रोजी अटक करण्यात आलेल्या केजरीवाल यांची तात्काळ सुटका करावी, अशी आम आदमी पार्टीची मागणी आहे. ईडीने त्यांना खोट्या प्रकरणात अडकवले आहे. पक्षाने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे- संपूर्ण देश हुकूमशाहीविरोधात एकवटला आहे. चला एकत्र येऊन देशाच्या सुपुत्रासाठी आवाज उठवूया.
आज सुबह 10 बजे से @ArvindKejriwal जी की साज़िशन हुई गिरफ्तारी के खिलाफ उपवास रखेगा पूरा देश 🔥🇮🇳
यापूर्वी ‘आप’ने 26 मार्च रोजी देशभरात निदर्शने केली होती. दिल्लीतील पक्षाचे कार्यकर्तेही पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी निघाले होते, पण त्यांना पोलिसांनी वाटेत अडवले आणि ताब्यात घेतले.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने 21 मार्च रोजी दिल्ली दारू घोटाळ्यात अटक केली होती. ईडीने केजरीवाल यांना 9 समन्स पाठवले होते. एकाही समन्ससमोर ते हजर झाले नाही. यावेळी ईडी आणि केजरीवाल दोघेही समन्स घेऊन कोर्टात पोहोचले होते.ईडीने 17 मार्च रोजी केजरीवाल यांना 9वे समन्स पाठवले होते. केजरीवाल यांनी 19 मार्च रोजी या समन्सविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याच्या याचिकेवर 20 मार्च रोजी सुनावणी झाली. ईडीने वारंवार समन्स पाठवल्याने न्यायालयाने समन्स बजावले.ईडीकडे चौकशीसाठी गेल्यास अटक केली जाणार नाही, असे आश्वासन केजरीवाल यांनी न्यायालयाकडे मागितले होते. केजरीवाल यांना ईडीसमोर हजर राहावे लागेल, त्यांच्या अटकेला स्थगिती नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. कोर्टाच्या निर्णयानंतर, ईडी त्याच दिवशी संध्याकाळी केजरीवाल यांच्या घरी पोहोचली आणि सुमारे 2 तासांच्या चौकशीनंतर रात्री त्यांना अटक केली.10 दिवस ईडी रिमांडमध्ये राहिले, त्यानंतर तिहारला पाठवलेकेजरीवाल 22 मार्च ते 1 एप्रिलपर्यंत ईडी रिमांडवर होते. त्याच दिवशी तपास यंत्रणेने त्यांना राऊस ॲव्हेन्यू कोर्टात हजर केले. ईडीचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत तिहार तुरुंगात पाठवले. कोर्टात हजेरी लावताना केजरीवाल मीडियाला म्हणाले की, पंतप्रधान जे करत आहेत ते देशासाठी चांगले नाही.
उमेदवार किंवा सूचकाने सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणुक निर्णय अधिकारी अथवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल करावा. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या दालन येथे देण्यात यावा. एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज दाखल करता येतात. एक उमेदवार जास्तीत जास्त दोन मतदार संघातही अर्ज दाखल करु शकतात. नामनिर्देशन पत्र भरताना जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर च्या आत जास्तीत जास्त तीन वाहने उमेदवाराला आणता येतात. अर्ज दाखल करते वेळी केवळ ५ व्यक्ति उपस्थित राहू शकतात. उमेदवारी अर्जासोबत उमेदवाराचा फोटो २×२.५ सेमी आकाराचा देण्यात यावा. ऑनलाईन डेटा एन्ट्रीची सुविधा उपलब्ध आहे. अर्ज दाखल करण्याची सुविधा ही ‘सुविधा’ या पोर्टल वर उपलब्ध आहे. त्यावर महिती आणि शपथपत्र अपलोड करता येऊ शकते. शपथ पत्र पूर्ण भलेले असावे.अपूर्ण असेल तर अर्ज रद्द होवू शकतो. नमुना c 1 ची वर्तमान पत्रातून प्रसिध्दी करावी लागते.मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी अर्ज ‘अ’ आणि ‘ब’ . भरणे आवश्यक आहे. सर्वसाधरण प्रवर्गासाठी २५हजार रुपये, व राखीव प्रवर्गासाठी १२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम भरणे आवश्यक. तीन फोटो. स्वतंत्र बँक खाते उघडणे आवश्यक आहे. मान्यता नसलेल्या पक्षाच्या व अपक्ष उमेदवार यांना १० सूचक आवश्यक आहे. आणि हे सूचक त्याच मतदासंघांतील रहिवासी असावेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघड नाराजी व्यक्त करत ऑक्टोबर २०२० मध्ये भाजपला साेडचिठ्ठी देऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले आमदार एकनाथ खडसे साडेतीन वर्षानंतर पुन्हा हाती ‘कमळ’ हाती घेणार आहेत. आठवडाभरात स्वगृही परतत असल्याचे खुद्द खडसेंनीच सांगितले आहे . दरम्यान, भाजप साेडताना त्यांच्यासाेबत असलेल्या कन्या राेहिणी खडसे यांनी मात्र तूर्त राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
खडसे यांनी आपल्या आयुष्यातील 40 वर्षांहून अधिक काळ भाजपमध्ये काम केले आहे. मात्र काही वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांना पक्ष सोडावा लागला होता. यानंतर खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, अलीकडच्या काळात खडसे यांनी भाजपमध्ये यावे म्हणून दिल्लीतून हालचाली सुरू झाल्या. विशेषत: राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजल्या जातं. खडसेंच्या संभाव्या प्रवेशामुळंच रक्षा खडसे यांना तिकीट मिळाल्याची चर्चा आहे.खडसे हे भाजपमध्ये यावेत यासाठी राज्यातील नेते तसचे केंद्रातील नेते त्यांना विनंती करत आहेत. जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. खडसे हे सध्या शरद पवार गटाचे विधान परिषदेचे सदस्य आहेत. तर त्यांची मुलगी रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत.
बारामती: बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांवर नियुक्त केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष व इतर सहायक कर्मचाऱ्यांना ईव्हीएम हाताळणी आणि निवडणूक प्रक्रियेविषयी प्रशिक्षण देण्यात आले.
माळेगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षणाला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे आदी उपस्थित होते.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामकाजाकरीता नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपली जबाबदारी चोखपणे पार पाडून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी, अशा त्यांनी दिल्या.
दोन दिवसीय प्रशिक्षण सत्रात एकूण २ हजार ६०० अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यापैकी आज पहिल्या दिवशी १ हजार ३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्राची जोडणी, हाताळणी, यंत्र चालू व बंद करणे तसेच सील करणे याबाबतचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार श्री. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.
मुंबई, : पाच टप्प्यात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. कारण २००४, २००९, २०१४, आणि २०१९ च्या तुलनेपेक्षा २०२४ मध्ये महिला मतदारांची संख्या वाढली आहे.
२००४ मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण ३ कोटी ४२ लाख ६३ हजार ३१७ मतदारांची नोंदणी झाली. २००९ आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार १ हजार पुरुषांमागे ९२५ महिला असे प्रमाण होते. सन २०१४ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण १ हजार पुरुषांमागे ८८९ महिला इतके होते. सन २०१९ मध्ये १ हजार पुरुषांमागे ९११ महिला असे प्रमाण होते. २०२४ मध्ये १ हजार पुरुषांमागे ९२३ महिला अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.
स्वीप अभियान
महिला मतदार जागृतीसाठी भारत निवडणूक आयोग, “स्वीप” (SVEEP-Systematic Voters Education and Elector Participation) कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. महिला मतदारांची संख्या वाढविणे हा या अभियानाचे महत्वाचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी अंगणवाडीसेविका, आशा कर्मचारी, परिचारिका, महिला बचत गट, अशासकीय संस्था आदींचे सहकार्य महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी घेण्यात येत आहे. शिवाय उद्योग, शिक्षण, सामाजिक, साहित्य, कला-संस्कृती यासह विविध क्षेत्रातील अग्रणी महिलांच्या माध्यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.
एकूण मतदार
२०१९ मध्ये सर्व मतदार धरुन ८ कोटी ८६ लाख ७६ हजार ९४६ एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ६४ लाख २५ हजार ३४८ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी २२ लाख ७९ हजार १९२ महिला मतदार आणि २ हजार ४०६ तृतीयपंथी मतदार होते. २०२४ मध्ये ५ एप्रिल २०२४ नुसार एकूण ९ कोटी २६ लाख ३७ हजार २३० एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ८६ लाख ०४ हजार ७९८ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार आणि ५ हजार ६१८ तृतीयपंथी मतदार आहेत.
नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या काळात महापुरुषांची बदनामी, विटंबना करण्याचा प्रयत्न करणे, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या सोशल मिडिया सेलने हुडकून काढणे सुरु केले आहे. या सेलच्या वतीने 4 जणांना नोटीस बजावली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशिष्ट धर्माविरुद्ध गैरसमज पसरविणे, तेढ निर्माण करणारे भीतीदायक फोटो प्रसारित करणे, धार्मिक ग्रंथ व महिलांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणे, विशिष्ट समाजाला धमकावणे, गर्भित इशारे देणे, लोकांच्या भावना दुःखावतील अशा पद्धतीची भाषा वापरणे, निवडणूक काळात लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे अशा अनेक गोष्टींवर सोशल मीडिया सेल लक्ष ठेवून आहे.
उमेदवारांनी नमूद करावे खाते
उमेदवारांना त्यांचे सर्व फेसबुक अकाउंट जमा करावे लागणार आहे. त्यांच्या फेसबुक व अन्य सोशल अकाउंटवरून जाहिरात करताना त्यांना माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण कक्षाची परवानगी घेणे आवश्यक आहे. अशा काही पोस्ट परवानगी न घेता आढळल्यास त्याचा सर्व खर्च उमेदवाराच्या खर्चाच्या तपशीलामध्ये जमा केला जाणार आहे. तसेच या निर्धारित सोशल मीडीया अकाउंट वरून कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होता कामा नये. त्यामुळे उमेदवारांनी देखील आपले सोशल अकाउंट हँडल करणाऱ्यांना योग्य सूचना देणे आवश्यक आहे. दरम्यान 16 मार्चपासून आचारसंहिता लागू झाल्यापासून जवळपास एक हजार नऊशे खात्यांची तपासणी करण्यात आली आहे. काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या खातेधारकांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.
१३ जणांचा शोध सुरू
जिल्ह्यातील आणखी 13 जणांचा शोध सध्या पोलीस घेत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या 13 जणांच्या आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्या आहेत. त्यांचे पत्ते व त्यांच्याबद्दलची माहिती तपासणी सुरू आहे. सोशल माध्यमांचा वापर करणाऱ्या तरुणांनी या संदर्भात अधिक जागरूक असावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा
आक्षेपार्ह काही पोस्ट आढळल्यास समाज माध्यम कक्षाकडे तक्रार करण्याची, संबंधित पोस्ट फॉरवर्ड करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. नांदेड पोलीस प्रशासनाने 83O82741OO हा नंबर दिला असून यावर अशा पद्धतीने काही आक्षेपार्ह पोस्ट कोणी केली असेल तर माहिती देण्याचे आवाहन सेलचे प्रमुख गंगाप्रसाद दळवी यांनी केले आहे.
विविध रथांसह, मर्दानी खेळ व ग्रामगुढीचा समावेश पुणे : गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शहराच्या मध्यभागात मंगळवार, दिनांक ९ एप्रिल रोजी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी ८.३० वाजता शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात हजारो पुणेकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती समितीचे संयोजक राघवेंद्र मानकर व सहसंयोजक अश्विन देवळणकर यांनी दिली. लोकमान्य टिळक पुतळ्यापासून शोभायात्रेला प्रारंभ होणार असून तुळशीबाग राम मंदिर, शनिपार, अप्पा बळवंत चौक मार्गे तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे समारोप होणार आहे. यावेळी रा.स्व.संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांच्या घराण्यातील वंशजांच्या हस्ते गुढी उभारण्यात येणार आहे. प्रबोधन मंच रथ, भजनी मंडळ, पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या विविध महिलांवर आधारित मातृशक्ती रथ, प्रभू श्रीराम रथ, छत्रपती शिवाजी महाराज रथ, ढोल-ताशा पथक, शंख पथक, बँड, मर्दानी खेळ, वेत्रचर्म पथक देखील सहभागी होणार आहेत. मतदानाचे महत्व पटवून देत मतदान जनजागृतीकरिता विशेष रथ देखील शोभायात्रेत सहभागी होणार आहे. याशिवाय विविध भजनी मंडळे, अध्यात्मिक समूह, सनातन धर्माभिमानी मंडळी, प्रभू राम-लक्ष्मण-सीता हनुमान यांच्या मूर्ती, पारंपरिक वेषभूषा आणि ऐतिहासिक, अध्यात्मिक, स्वातंत्र्यलढ्यातील थोर व्यक्ती इत्यादींचा आदर्श ठेवून केलेल्या वेशभूषेतील नागरिक मोठ्या संख्येत सहभागी होतील. पुणेकरांनी देखील भगव्या टोप्या, भगवे फेटे घालून, धर्मध्वज (भगवा) हातात घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
४४ व्या स्थापना दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
मुंबई भारतीय जनता पक्षाच्या ४४ व्या स्थापना दिनानिमित्त शहर उपनगरात विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांना दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली तसेच सामान्यांकडूनही भरघोस प्रतिसाद मिळाला. भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते मुंबई भाजपा वसंतस्मृती कार्यालयात ध्वजारोहण झाले. भाजपा मुंबईच्या सर्व खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने ध्वजारोहण तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. आ. ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक १०० मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी वरळी येथील भाजपा वॉर्ड क्रमांक १९६ तर्फे आयोजित मेडिकल कँपला भेट दिली तसेच उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. खा. मनोज कोटक यांनी कार्यालय आणि निवासस्थानी ध्वजारोहण केले. आ. अतुल भातखळकर यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले. आ. राम कदम यांनी घाटकोपर पश्चिम मतदारसंघतील सात निवडणूक कार्यालयांचे उद्घाटन केले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. आ. योगेश सागर यांनी कांदिवली येथे कार्यक्रमाचे आयोजन केले. आ. सुनील राणे यांच्या उपस्थितीत बोरीवलीत ज्येष्ठ भाजपा कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. आ. प्रवीण दरेकर यांनी दहिसर येथील जनसंपर्क कार्यालयात ध्वजारोहण केले. भाजपा दक्षिण मध्य जिल्ह्याच्या वतीने दादर शिवाजी पार्कवर ‘अबकी बार चारसो पार’ संदेश असणारे पतंग उडविण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी भारतीय जनता पक्ष अविरत परिश्रम घेत आहे. पक्षाचा हा प्रवास एक अथक आणि अखंड प्रवास आहे, हा प्रवास प्रयत्नांच्या पराकाष्टेचा आहे. हा प्रवास समर्पणाच्या आणि संकल्पाच्या शिखराचा आहे असेही भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले. यावेळी मुंबई भाजपाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
पुणे- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघात आपल्या उमेदवारालाच मोठा धक्का देण्यात आला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेले मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला होता. पक्षाच्या या निर्णयाविरोधात गेल्याने मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात येत असल्याची घोषणा वंचितच्या वतीने करण्यात आली आहे.
या संबंधी वंचित बहुजन आघाडीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली. शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्यामध्ये लढत होत आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीनीने उमेदवारी रद्द केल्यामुळे या ठिकाणी नवीन उमेदवार देणार की शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना पाठिंबा देणार? याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
या संबंधी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एका पोस्टच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शिरुर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती. तसेच, वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना आपला पाठिंबा देत तेथे उमेदवार न देण्याचे धोरण ठरवले होते. बारामतीबाबत जो निर्णय वंचितने घेतला, त्या विरोधात मंगलदास बांदल गेल्याने वंचित बहुजन आघाडीने मंगलदास बांदल यांची शिरुर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली आहे.’