Home Blog Page 10

7 दिवसांत 4500 + विमाने रद्द- प्रवाशांच्या मनस्तापाच्या भरपाईचा हक्क देणारा कायदा देशात आहे का नाही?

मुंबई-देशातील सर्वात मोठी देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोच्या सोमवारीही 562 विमानांची उड्डाणे रद्द झाली. गेल्या 7 दिवसांत कंपनीची 4500 हून अधिक उड्डाणे रद्द झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले की, इंडिगोच्या हिवाळी उड्डाण वेळापत्रकात कपात केली जाईल. कंपनीचे काही स्लॉट इतर विमान कंपन्यांना दिले जातील.त्यांनी सांगितले-इंडिगो सध्या 2200+ विमानांची उड्डाणे चालवत आहे. आम्ही निश्चितपणे ती कमी करू. 1 ते 8 डिसेंबर (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) दरम्यान रद्द झालेल्या 7.30 लाख तिकिटांसाठी 745 कोटी रुपयांचा परतावा (रिफंड) देण्यात आला आहे.इंडिगो प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेला डीजीसीएचा पॅनेल बुधवारी सीईओ पीटर्स एल्बर्स आणि सीओओ इसिड्रे पोरक्वेरस यांना बोलावू शकतो. हा चौकशीचा भाग आहे. 5 डिसेंबर रोजी स्थापन झालेल्या 4 सदस्यीय पॅनेलला ऑपरेशनल अडथळ्यांची खरी कारणे शोधण्याचे काम सोपवण्यात आले आहे.मात्र या सर्वात प्रमुख प्रश्न असा आहे कि, हजारो प्रवाश्यांना जो मानसिक शाररीक आणि आर्थिक फटका बसला त्याची नुकसान भरपाई देणार कोण ?अशी भरपाई देणारा कायदा भारतात आहे किंवा नाही ?ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ मध्ये यावर भरपाईचा उल्लेख आहे. एक कोटीपर्यंतचे प्रकरणे जिल्हा आयोग आणि दहा कोटींपर्यंतचे प्रकरणे राज्य आयोगात दाखल होतात. पण, लहान दाव्यांमध्ये कॉर्पोरेट्सविरुद्ध लोक लढू शकत नाहीत.संकटात जास्त भाडे वसूलणाऱ्यांविरुद्ध मात्र प्रवासी न्यायालयात जाऊ शकतात

इंडिगोने DGCA ला उत्तरात सांगितले – खरे कारण माहित नाही

इंडिगोने DGCA ला सांगितले की, सध्या ऑपरेशनल अडचणींची खरी कारणे शोधणे शक्य नाही. DGCA च्या मॅन्युअलमध्ये SCN ला उत्तर देण्यासाठी 15 दिवस मिळतात, त्यामुळे संपूर्ण रूट कॉज ॲनालिसिस (RCA) करण्यासाठी आणखी वेळ लागेल.एअरलाइननुसार, समस्या डिसेंबरच्या सुरुवातीला सुरू झाली, जेव्हा ऑन-टाइम परफॉर्मन्स आणि क्रूची उपलब्धता प्रभावित झाली. हे ठीक करण्यासाठी 5 डिसेंबर रोजी सिस्टम रीबूट करण्यात आले.कंपनीने सांगितले की नेटवर्क 100% पूर्ववत झाले आहे आणि 91% विमानांची उड्डाणे वेळेवर आहेत, जी रविवारपेक्षा 75% जास्त आहे. एअरलाइनने सांगितले की तिने आतापर्यंत 827 कोटी रुपये परत केले आहेत आणि उर्वरित परतावा 15 डिसेंबर 2025 पर्यंत प्रक्रिया केला जाईल

भाड्यावर नियंत्रण शक्य आहे?
होय आहे. देशात सध्या हवाई सेवेचा प्रमुख रेग्युलेटर डीजीसीए आहे. भाड्याची देखरेख तोच करतो, पण कॉम्पिटिशन कमिशन इंडिया (सीसीआय) कडेही भाड्यावर नियंत्रण आणि कारवाई करण्याचा अधिकार आहे. कॉम्पिटिशन ॲक्ट २००२ च्या कलम ४ अंतर्गत एकाधिकार (मोनोपॉली) किंवा बाजाराच्या शक्तीचा गैरवापर झाल्यास सीसीआय कोणत्याही एअरलाइनवर कारवाई करू शकते. कलम २१ अंतर्गत ते स्वतःहून दखल घेऊ शकते. पण, यावर कठोरपणे अंमलबजावणी होत नाहीये. २०१५ मध्ये इंडिगोविरुद्ध जास्त भाडे वसूल करण्याची तक्रार झाली, पण सीसीआयने कारवाई केली नाही. पीडित व्यक्ती सीसीआयच्या वेबसाइटवर ऑनलाइन किंवा कार्यालयात थेट तक्रार करू शकतो. तक्रारीसोबत प्रतिज्ञापत्र, कागदपत्रे द्यावी लागतात.

ग्राहक कायद्यात प्रवासी संरक्षणासाठी काय मजबूत पर्याय?

अमेरिका आणि इतर विकसित देशांमध्ये ग्राहक समूह ‘क्लास ॲक्शन सूट’ दाखल करून कंपन्यांकडून सामूहिक भरपाई मागू शकतात. तर, भारतात जुन्या ग्राहक अधिनियम १९८६ अंतर्गत मॅगी प्रकरणात २०१५ मध्ये नेस्लेविरुद्ध भारत सरकारने ६४० कोटी रुपयांचा क्लास ॲक्शन सूट दाखल केला होता, नंतर हे प्रकरण कमकुवत बाजू मांडल्यामुळे २०२४ मध्ये राष्ट्रीय आयोगाने फेटाळून लावले.
डीजीसीएच्या नोटिशीच्या उत्तरात इंडिगोने सांगितले, लहान तांत्रिक गडबडी, एव्हिएशन सिस्टीममध्ये जास्त गर्दी व अपग्रेड केलेल्या क्रू रोस्टरिंग नियमांमुळे समस्या आली. ५ दिवसांत इंडिगोच्या पालक कंपनी इंटरग्लोबचा शेअर १५% घसरला आहे. रेटिंग एजन्सी मूडीजने म्हटले आहे की, इंडिगोला मोठे नुकसान सोसावे लागू शकते.

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बाबा आढाव यांच्या निधनाने दुःख व्यक्त केले आहे.

ते म्हणाले ,डॉ. बाबा आढाव यांचे पुणे शहरासाठी अत्यंत मोलाचे योगदान होते. समाजवादी नेता, मानवतावादी विचारवंत आणि रिक्षाचालक, हमाल, मोलमजुरी करणारे असंघटित कामगार यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. महापालिकेत नगरसेवक म्हणूनही त्यांनी योगदान दिले. त्यांच्या कार्याचा पुण्यावर दीर्घकालीन आणि सकारात्मक प्रभाव राहिला आहे.

असंघटित मजुरी कामगारांच्या हक्कांसाठी सातत्यपूर्ण लढा दिला. हमाल, माथाडी, फेरीवाले, बांधकाम कामगार, बाजार समित्यांमधील कामगार यांना संघटित करून या श्रमिकांच्या हक्कांसाठी बाबांनी लढा दिला. ‘माथाडी आणि इतर हातगाडी कामगार कल्याण मंडळ’ ही प्रणाली उभी राहण्यामागे त्यांचे निर्णायक नेतृत्व होते.

पुण्यातील असंघटित मजुरांना ओळखपत्र, वेतन संरचना, सामाजिक सुरक्षा, पेन्शन आणि कल्याणकारी योजना मिळण्याचा मार्ग त्यांनी मोकळा केला. त्यांच्या निधनाने पुणेकरांची अपरिमित हानी झाली आहे. मी नगरसेवक, महापौर असताना विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली, मार्गदर्शनही मिळाले होते. पुण्याचा खासदार या नात्याने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना श्रद्धांजली

नागपूर, दि. 8 :- समाजकारणातील निस्पृहता, तळमळ आणि अत्युच्च प्रामाणिकतेचे प्रतीक असलेले ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. श्रमिक, कष्टकरी, दुर्बल आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर अहोरात्र झटणारा महान संघर्षयोद्धा आज हरपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोक संदेशात म्हणतात की, हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कागद-काचा वेचणाऱ्यांची संघटना अशा विविध संघटनांद्वारे लाखो कष्टकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचे कार्य बाबा आढाव यांनी केले. ‘एक गाव एक पाणवठा’ ही चळवळ त्यांनी उभी केली. सत्यशोधक चळवळीचा विचार आपल्या कृतीतून त्यांनी आयुष्यभर जपला. समाजातील सर्वात तळातील घटकाला न्याय मिळवून देणे, हाच त्यांचा ध्यास होता. संघर्षमय जीवन जगत त्यांनी प्रत्यक्ष कामातून समाजवादाची मूर्त प्रतिमा उभी केली. त्यांचा आशावाद, परखड विचार, निस्वार्थी वृत्ती आणि जनतेशी असलेली नाळ हे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचे मोठे बळ होते. बाबा आढाव यांचे कार्य म्हणजे समाजहितासाठीचे निर्भीड आणि ज्वलंत आयुष्य कसे असावे, याचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रगत, विचारशील चळवळीचे अपरिमित नुकसान झाले असून महाराष्ट्राने समाजसेवेचा महान तपस्वी गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा आढाव यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.


सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली

मुंबई, दि.८:- श्रमिकांचे ‘बाबा’ अर्थात कष्टकरी, कामगारांचे नेते, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाने सामाजिक चळवळींचा आधारवड हरपला आहे, अशी शोकभावना व्यक्त करून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ सामाजिक नेते बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आढाव यांचे निधन ही महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींची भरून काढता येणार नाही अशी मोठी हानी झाली आहे, असेही मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, महाराष्ट्राला लाभलेल्या सामाजिक चळवळींचा वारसा पुढे नेण्यासाठी अखंड आणि व्रतस्थपणे क्रीयाशील राहणाऱ्यांमध्ये बाबा आढाव अग्रभागी राहिले. व्यवसायाने डॉक्टर असूनही बाबांनी संपूर्ण आयुष्य असंघटित क्षेत्रातील कष्टकऱ्यांसाठी वेचले. कचरावेचकांपासून ते हमाल, रिक्षाचालक बांधकाम मजूर, घरेलु कामगार यांचे संघटन त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्यासाठी समर्पित केले. ‘हमाल पंचायत, रिक्षा पंचायतच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याला संस्थात्मक असे रूप दिले. ‘एक गाव एक पाणवठा’ या त्यांच्या मोहिमेने सामाजिक समतेचा आगळा प्रयोग राबविला गेला. त्यांचा ‘कष्टाची भाकर’ हा उपक्रम सामाजिक क्षेत्रातील संवेदनशीलतेचे आगळे उदाहरण ठरले. आपल्या तत्वांशी ठाम, असणाऱ्या बाबांची विचार मांडण्याची शैली परखड होती. बाबा आढाव यांचे निधन अशा अनेक उपक्रम, सामाजिक चळवळींना, त्यातील कार्यकर्ते यांना पोरके करून गेले आहे. आम्ही या सर्वांच्या तसेच आढाव कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. श्रमिक चळवळींचा आधारवड, ज्येष्ठ सामाजिक नेते बाबा आढाव यांना व्यक्तीश: तसेच तमाम महाराष्ट्राच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

0000

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा आढाव यांच्या निधनामुळे काँग्रेस चे नेतृत्व करणाऱ्या गांधी परिवाराने दुःख व्यक्त केले आहे.

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की,सामाजिक न्याय के मजबूत स्तंभ और महान श्रमिक नेता बाबा आढाव जी के निधन का समाचार अत्यंत दुखद और एक अपूरणीय क्षति है।

वंचितों, शोषितों और मजदूरों के अधिकारों के लिए उन्होंने अपना संपूर्ण जीवन समर्पित कर दिया। पुणे से उठी उनकी संघर्ष की ज्योति ने देशभर में मशाल बन कर सामाजिक न्याय की राह को रौशन किया।

इस दुःख की घड़ी में उनके शोकाकुल परिवारजनों और असंख्य साथियों को अपनी हार्दिक संवेदनाएं व्यक्त करता हूं।

आजच्या सामाजिक दृष्ट्या अस्थिर, विषमतेने, विद्वेषाने ग्रासलेल्या काळात बाबा आढाव ह्यांच्यासारख्या विभूतींची उणीव सदैव भासत राहील: शरद पवार

पुणे:आजच्या सामाजिक दृष्ट्या अस्थिर, विषमतेने, विद्वेषाने ग्रासलेल्या काळात बाबा आढाव ह्यांच्यासारख्या निडर, विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या विभूतींची उणीव सदैव भासत राहील.अशा शब्दांत शरद पवार यांनी बाबा आढाव यांना आदरांजली अर्पण केली.

आज ज्येष्ट समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा आढाव यांचे निधन झाले .शरद पवार म्हणाले,बाबा आढाव ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आढाव कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो.आपल्या महाराष्ट्रात प्रागतिक ,कृतीशील विचार मांडून ते आचरणात आणणाऱ्या शिलेदारांची एक मोठी फळी आहे. भूमिका घेताना परिणामांची, प्रस्थापित व्यवस्थेच्या रोषाची तमा न बाळगणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक, पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक डॉ. बाबा आढाव ह्यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. आज जेव्हा त्यांच्या निधनाचं वृत्त समजलं तेव्हा त्यांचा संघर्षाचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा सारा पट डोळ्यासमोरून गेला. ‘एकाकी मजदूर’ चळवळ, कामगारांच्या हक्कांसाठीची त्यांची अखंड झुंज, समतेवर आधारित समाजरचनेचा त्यांचा ठाम निर्धार अशा सर्व भूमिकांमधून ते सतत प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देत राहिले.

ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन

पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कामगार आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा आढाव यांचे आज रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी निधन झाले, ते ९५ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते, त्यांतच त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वीच, शरद पवार हे बाबा आढावांच्या भेटीला रुग्णालयात गेले होते. पुना हॉस्पिटलमध्ये बाबा आढाव यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. तर, गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले होते. तेव्हाही शरद पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पन्नालाल सुराणा यांच्या कार्याची आठवण काढत त्यांना आदरांजली वाहिली होती.तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर , व्ही पी सिंह यांना बाबा आढावांच्या सामाजिक कार्याबाबत मोठा आदर होता या दृष्टीने त्यांनी पंतप्रधान असताना देखील पुण्यात बाबा आढाव यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवला होता. समाजवादी नेते म्हणूनच नव्हे तर ते कष्टकरी समाजाचे नेते म्हणूनही त्यांचा परिचय होता.भाई वैद्य , एस एम जोशी , मोहन धारिया आणि बाबा आढाव हि पुण्यातील समाजवादी नेते मंडळी देशभर आपल्या कार्याने परिचित होती.

बाबा आढाव यांना गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पुना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य व तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर आवश्यक ते उपचार सुरू होते. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आय.सी.यू. मध्ये ठेवण्यात आले होते. अखेर, आज रात्री 8.25 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कष्टकऱ्यांसाठी लढणारा, समाजवादी विचारांचा नेता महाराष्ट्राने गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

1970 च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. तात्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीने नेते म्हणूनही काम करत होते. ‘एक गाव एक पाणवठा’ नावाची मोहिम चालवली जात होती. बाबा आढाव त्याचे प्रणेते होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची मोठी ओळख होती, मृत्यूसमयी ते 95 वर्षांचे होते.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर देशातील आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी परखडपणे भाष्य केलं होतं. माणूस सकाळी कुठं असेल अन संध्याकाळी कुठं असेल, सध्या अशी परिस्थिती आहे. कारण त्यांना सत्तेची भूक आहे. पण लक्षात ठेवायला हवं, 140 कोटी जनताच ठरवेल, कोणाचं काय करायचं असं बाबा आढाव म्हणाले. ते म्हणाले की, काळ कठीण आहे, काळाचे भान ठेवा. सध्याचं राजकारण खूप विलक्षण आहे. कॅनडा मधून माझे कुटुंबीय म्हणतायेत की भारतात काय चाललंय नेमकं? आपल्या इथं फक्त सत्तेसाठी सगळं सुरू आहे, असे म्हणत राष्ट्रवादीतील फुटीनंतर बाबा आढाव यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत वयाच्या 93 व्या वर्षीही आंदोलन केलं होतं.

ईव्हीएमच्या विरोधात आत्मक्लेश

बाबा आढाव खऱ्या अर्थाने संघर्ष करणारे नेते होते. त्यांनी गेल्यावर्षी ईव्हीएमच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी सलग तीन दिवस ईव्हीएमच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन केलं होतं. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांनी ईव्हीएमवर टीका केली होती. त्यानंतर बाबा आढाव यांनी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण सुरु केलं होतं. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिवून त्यांनी आपलं उपोषण सोडलं होतं. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, संजय राऊत या नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती.
बाबा आढाव यांचा जन्म १९३७ मध्ये पुण्यात झाला. ते नाना पेठेतील नामांकीत आयुर्वेदिक डॉक्टर होते. याच नाना पेठ भागात अनेक व्यवसायांतील कामगार त्यांच्याकडे उपचार घेण्यासाठी येत असतं त्यातूनच त्यांना हमालांना येणार्‍या अनेक अडचणी लक्षात आल्या. हमालांचे शोषण होऊनही त्यांना कुठलेही कायदेशीर संरक्षण नसल्याचे त्यांनी पाहिले. अखेर त्यांनी १९६६ मध्ये बाबांनी डॉक्टरकीचा व्ववसाय सोडला आणि कामगारांच्या पाठीशी उभे राहायचे ठरवले.

डॉ. बाबा आढाव सुरुवातीला समाजवादी पक्षाबरोबर काम करायचे. मात्र, त्यांनी तो राजकीय पक्ष सोडला आणि १९५५ मध्ये हमाल पंचायत स्थापन केली. याच पंचायतीची पुढे १९७२ मध्ये कामगार संघटना झाली. १९५६ मध्ये वाहतूक क्षेत्रातील कामगारांना योग्य वेतन मिळावे, या मागणीसाठी हमाल पंचायतीने पहिले आंदोलन केले. त्यानंतर त्यासाठी केलेल्या सततच्या संघर्षामुळे १९६९ ला राज्यात महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा मंजूर झाला. असंघटित कामगारांच्या कल्याण आणि सुरक्षेसाठी भारतातील हा पहिला कायदा होता. याच संपूर्ण श्रेय हे बाबा आढाव यांच्या संघर्षालाच जाते. १९७२ मध्ये दलितांना सर्व ठिकाणी पाणी मिळावे, यासाठी त्यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ नावाने राज्यभर मोर्चे काढले. पुण्यातील कामगारांना स्वस्त, पौष्टिक जेवण उपलब्ध करून देणारी ‘कष्टाची भाकरी योजना’ हीदेखील आढाव यांचीच कल्पना होती. या योजनेतील पहिल्या शाखेची सुरुवात २ ऑक्टोबर १९७४ रोजी भवानी पेठेत झाली

डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या कोणत्याही पुस्तकात ‘वंदे मातरम’चा उल्लेख असल्यास तो दाखवून द्या-ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिले खुले आव्हान

ज्यांनी तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत, अरविंद सावंतांचा हल्लाबोल
नवी दिल्ली– आज ‘वंदे मातरम’चे गोडवे गाणाऱ्यांच्या ‘पितृ संघटने’ने 50 वर्षे आपल्या कार्यालयावर कधीही तिरंगा फडकवला नाही किंवा राष्ट्रगीत गायले नाही. ज्यांना इतिहासाचा विसर पडला आहे, त्यांनी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या कोणत्याही पुस्तकात ‘वंदे मातरम’चा उल्लेख असल्यास तो दाखवून द्यावा, असे खुले आव्हान ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिले आहे. संसदेत ‘वंदे मातरम’वर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला.

स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचा समाचार घेताना अरविंद सावंत यांनी देशातील संस्थांच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, पंतप्रधान आत्मनिर्भरतेच्या गप्पा मारत असले, तरी आज देशातील न्यायव्यवस्था, सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग यांसारखी कोणतीही संस्था खऱ्या अर्थाने ‘आत्मनिर्भर’ राहिलेली नाही. त्यांच्यात ‘आत्मभान’ उरलेले नाही. संविधानाच्या मूळ ढाच्यावर आणि स्वातंत्र्यावर रोज हल्ले होत आहेत. त्यामुळे ‘वंदे मातरम’चा खरा जयघोष करण्यासाठी आणि आत्मसन्मानासाठी देशाला आता स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागेल.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा उपस्थित करत सावंत यांनी सीमावासियांच्या वेदना मांडल्या. एकीकडे मातृभूमीची स्तुती केली जात आहे, तर दुसरीकडे बेळगाव-कारवार-निपाणी भागात मागील 60 वर्षांपासून न्यायासाठी लढणाऱ्या मराठी भाषिकांना अटक केली जात आहे. हा कुठला न्याय? असा संतप्त सवाल त्यांनी केला. केवळ कार्यालयांची नावे बदलून विकास होत नसतो, ‘सेवा मंदिरा’चे दरवाजे जनतेसाठी बंद झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

‘वंदे मातरम’चा खरा इतिहास सांगताना अरविंद सावंत यांनी महाराष्ट्रातील बलिदानाची आठवण करून दिली. ते म्हणाले, 1942 च्या आंदोलनात नंदुरबार येथील अवघ्या 14 वर्षांच्या शिरीष कुमारने हातात तिरंगा घेऊन ‘वंदे मातरम’चा नारा दिला आणि तो इंग्रजांच्या गोळीला हसत हसत सामोरा गेला. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात सर्व नेत्यांना अटक झाली असताना, अरुणा असफ अली यांनी धाडसाने तिरंगा फडकवत ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’चा नारा दिला होता. हा देशाचा खरा इतिहास आहे, असे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवला.

नाताळ सण सर्वधर्मीयांसह सिटी चर्च येथे साजरा करण्याची परंपरा

नाताळ सण सर्वधर्मीयांसह सिटी चर्च येथे साजरा करण्याचा परंपरा कायम असून या चर्चने शैक्षणिक कार्य उभे करण्यात मोठा सहभाग नोंदविला असे येथेख्रिश्चन समाजाचे नेते लुकस केदारी यांनी सांगितले..

पुणे : सवाई माधवराव पेशव्यांनी१७९२ मध्ये सिटी चर्चसाठी जमीन दिली. हे शहरातील पहिले चर्च आहे. तेव्हा येथून शहराला सुरुवात होत असे. सिटी चर्चने या जागेत शाळा सुरू करून या भागात मोठे शैक्षणिक कार्य उभा केले आहे, अशी भावना पुष्करसिंह पेशवा यांनी सोमवारी व्यक्त केली.
नाना पेठ क्वार्टर गेट येथील सिटी चर्च या सर्वात जुन्या कॅथोलिक चर्चला सोमवारी २३३ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुष्करसिंह पेशवा, त्यांच्या मातु:श्री जयमंगलाराजे पेशवा आणि कन्या रियाराजे पेशवा यांचा अवर लेडी ऑफ इमॅक्युलेट कन्सेपशन चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर लुई हेरेडिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पेशव्यांचा चर्चतर्फे सत्कार करण्याच्या संकल्पनेबद्दल ज्येष्ठ पत्रकार प्रवीण प्र वाळिंबे यांचा सत्कार फादर गॉडवीन सालढाणा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी फादर अल्फानसो, फादर भाऊसाहेब संसारे, रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे अध्यक्ष
लुकस केदारी , सोसायटीचे संघटक पीटर डिसुझा , फ्लॉरिना वाझ, मिलिफा फर्नांडिस, जोएन डिसुझा उपस्थित होते.
पुष्करसिंह पेशवा म्हणाले, आज जाती आणि धर्मांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. सत्तेसाठी पूर्वी संघर्ष झाला. मात्र , एका पातळीनंतर संबंध जोपासले जात होते.
चिम्माजीअप्पांनी वसईच्या लढ्यात पोर्तुगीजांचा पराभव केला. मात्र, मराठ्यांनी तेथील पोर्तुगीजांचा धर्म बदलला नाही. आज तेथे मराठी आणि ख्रिश्चन लोक मिळूनमिसळून राहतात. हेच उदाहरण पुण्यात सिटी चर्चच्या बाबतीत दिसते. सवाई माधवराव पेशव्यांनी १७९२ मध्ये सिटी चर्चसाठी जमीन दिली. माझे वडील उदयसिंह पेशवा या चर्चच्या कार्याविषयी नेहमी माहिती सांगायचे. चर्चला २२५ वर्षे पूर्ण झाली. तेव्हाही आम्ही येथे आलो होतो. पेशव्यांची आठवण ठेवून तेव्हाही आम्हाला गौरविण्यात आले होते. थोरले बाजीराव पेशव्यांची माझी दहावी पिढी आहे. हे पहिले सिटी चर्च आहे असे वडील सांगायचे. येथून शहराला सुरुवात होत असे. सिटी चर्चने येथे शाळा सुरू करून मोठे शैक्षणिक कार्य उभा केले आहे. आमच्या तर्फे सर्वांना नाताळच्या शुभेच्छा.
प्रमुख धर्मगुरू फादर लुई हेरेडिया यांनी पेशवा कुटुंबीयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपस्थित शेकडो ख्रिस्ती बांधवांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

शहरातले पहिले चर्च

सन १७८८ मध्ये शंभर पोर्तुगीज सैनिक आणि दोनशे कॅथोलिक सैनिक हे दारूगोळ्यासह पेशव्यांच्या सैन्यात दाखल झाले. पोर्तुगीजांचे अधिकारी नोमिन्हो हे माधवराव पेशवे (दुसरे) यांच्या संपर्कात होते. त्यांच्या विनंतीनुसार माधवराव पेशव्यांनी पाच एकर जागा पोर्तुगीजांना दान केली. त्यावरच पुण्यातील पहिले चर्च उभा राहिले. तेच आज सिटी चर्च म्हणून ओळखले जाते.


विमान वाहतूक मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा:इंडिगो क्रायसिसवर पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

मुंबई : इंडिगो विमानसेवेतील अलीकडील मोठ्या प्रमाणातील क्रायसिस आणि प्रवाशांना झालेल्या प्रचंड त्रासाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईतील गांधी भवन, कुलाबा येथे पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार, DGCA आणि विमान कंपन्यांवर गंभीर आरोप केले. विमान वाहतूक क्षेत्रात वाढती मक्तेदारी, नियमांचे उल्लंघन आणि सरकार-एअरलाइन यांच्यातील कथित संगनमतामुळे आजची परिस्थिती निर्माण झाल्याचा ठपका चव्हाण यांनी ठेवला.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, इंडिगो चा प्रवासी क्रायसिस हा अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक प्रकार आहे. हे सर्व DGCA आणि केंद्र सरकारने इंडिगोला दिलेल्या सूट आणि ढिलाईमुळे घडले. त्यांनी सांगितले की DGCA ने 1 जुलै 2024 पासून लागू करायचे नियमांची अंमलबजावणी न झाल्याने मक्तेदारी वाढत गेली.

पुढे बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, विमान क्षेत्रात केवळ दोनच कंपन्यांची मक्तेदारी राहिली आहे. इंडिगो 65% आणि टाटा समूह 30%. ही स्थिती अत्यंत धोकादायक आहे.

Competition आयोगाला अशा मक्तेदारीला रोखण्यात पूर्ण अपयश आले असून, हा आयोग बरखास्त करून नवी समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. इंडिगोचे दोन भाग करून दोघांचा जास्तीत जास्त 30-30% मार्केट शेअर ठेवण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.

“इंडिगोच्या मालकांनी बीजेपीला इलेक्ट्रोर बॉण्डद्वारे 56 कोटी रुपयांची देणगी दिली. त्याचा DGCA च्या निर्णयांशी काही संबंध आहे का? हे तपासणे गरजेचे आहे.

25 नोव्हेंबर 2025 रोजी अदानी डिफेन्सने देशातील सर्वात मोठ्या पायलट ट्रेनिंग संस्थेची खरेदी केली. यामुळे या क्षेत्रात सुद्धा मक्तेदारी वाढण्याची भीती आहे. कारण काही दिवसापूर्वीचं केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्यांनी जाहीर केले कि, येत्या 10-15 वर्षात देशात 30,000 पायलट ची गरज भासू शकते आणि त्यानंतरचं हा अदानी यांनी ट्रेनिंग संस्था विकत घेतली.

पुढे श्री चव्हाण म्हणाले कि, प्रवाशांनी दुप्पट-तिप्पट किंमतीत तिकीट घेतल्याने झालेल्या आर्थिक नुकसानीबद्दल सरकारने किमान 1000 कोटींचा विशेष फंड तयार करण्याची मागणी चव्हाण यांनी केली. भोपाळ गॅस दुर्घटनेप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी खालील मागण्या पत्रकार परिषदेत मांडल्या:

  1. केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
  2. DGCA चे जबाबदार अधिकारी बडतर्फ करावेत.
  3. इंडिगोचे CEO यांना तात्काळ निलंबित करावे.
  4. क्रायसिसवर 15 दिवसांत अहवाल देणारी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी.
  5. Competition committee बरखास्त करून नव्याने सक्षम आयोग स्थापन करावा.
  6. इंडिगोचे दोन तुकडे करून मक्तेदारी रोखावी.
  7. मनमोहन सिंग सरकारने प्रस्तावित केलेल्या CAA (Civil Aviation Authority) ची रचना लागू करावी.

“विमान वाहतूक क्षेत्रातील मक्तेदारी देशासाठी धोकादायक” – चव्हाण

“2004 मध्ये 10 विमान कंपन्या होत्या, आज फक्त 2 मोठ्या कंपन्या शिल्लक आहेत.”

“40 कोटी प्रवासी आणि फक्त दोन कंपन्या—ही स्थिती भविष्यात अधिक गंभीर होईल.”

“सरकारने विमान वाहतूक क्षेत्र खाजगी हातात जाऊ न देता स्वतःची एक विमान कंपनी सुरू करावी.”

अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून २००+ इच्छुकांनी दिवसभरात नेले उमेदवारीसाठी अर्ज

निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज वाटप – पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद

पुणे- महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इच्छुक उमेदवारांसाठी उमेदवारी अर्ज वाटपाची प्रक्रिया आज उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. पक्षाचे पूर्व विभागाचे अध्यक्ष सुनील टिंगरे व पश्चिम विभागाचे अध्यक्ष सुभाष जगताप साहेब या दोघांच्या हस्ते पक्षाच्या पुणे शहर कार्यालयात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सामाजिक न्यायाच्या धोरणाला अनुसरून उमेदवारी अर्जाची रक्कम निश्चित केली आहे.ओपन व ओबीसी प्रवर्गासाठी उमेदवारी अर्जासोबत २०,००० रुपये, तर अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी १०,००० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. अर्जाचा फॉर्म शुल्क केवळ ५०० रुपये ठेवण्यात आले असून, सर्वसामान्य कार्यकर्ते, तरुण आणि समाजाच्या विविध घटकांना संधी देण्याचा पक्षाचा ठाम उद्देश यातून स्पष्ट होतो. अर्ज विक्रीस सुरुवात व अर्ज स्वीकारण्याची तारीख 8 डिसेंबर पासून ते 18 डिसेंबर पर्यंत अशी 10 दिवस ठेवण्यात आली आहे.

आज दिवसभरात सुमारे २०० हून अधिक उमेदवारी अर्ज वितरित झाले असून, यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर पुणेकरांचा असलेला विश्वास आणि आगामी महापालिका निवडणुकीबाबतची सकारात्मक ऊर्जा स्पष्टपणे दिसून येते. आजी-माजी नगरसेवक, युवक कार्यकर्ते, महिला प्रतिनिधी तसेच नव्या नेतृत्वाने मोठ्या उत्साहाने अर्ज घेतले.

पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध असून, सक्षम, स्वच्छ प्रतिमा असलेले व जनतेशी नाळ जोडलेले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याचा पक्षाचा मानस आहे. त्यामुळेच उमेदवार निवड प्रक्रियेत सामाजिक समतोल, कार्यक्षम नेतृत्व आणि लोकसेवेची बांधिलकी हे प्रमुख निकष असतील, असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

पुण्यात भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची महागर्दी:पहिल्याच दिवशी दोन हजार अर्जांची मागणी…

पुणे- महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. यावेळी भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी दिसून आली.पुणे महापालिका निवडणूक लवकरच होणार असून, विविध राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघांत प्रचाराची कामे सुरू केली आहेत. पुण्यात भाजपचे १०० नगरसेवक असल्याने, पक्षाकडून उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा आहे. अर्ज स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून २ हजार अर्जांची मागणी करण्यात आली, ज्यामुळे भाजपला मोठी पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. इच्छुकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्याने भाजप नेत्यांची देखील उमेदवारी देताना सर्कस होणार आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने महापालिका निवडणुकीसाठी १० डिसेंबर पासून अर्ज स्वीकृती

दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने आज कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पुणे महानगरपालिका निवडणूक भारतीय जनता पक्षासोबत महायुतीतून लढवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. तसेच पक्षाच्या उमेदवार निवडीसंदर्भात महत्वाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांच्या अर्जांचे वाटप आणि अर्ज स्वीकृती १० ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत करण्यात येणार आहे. पक्षाच्या मुख्य कार्यालयात सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत छापील अर्जफॉर्म उपलब्ध राहतील. इच्छुक उमेदवारांनी निर्धारित सर्व माहिती अचूकपणे भरून नियोजित वेळेत अर्ज जमा करण्याचे आवाहन पक्षतर्फे करण्यात आले आहे. बैठकीस शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव,  प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, अशोक शिरोळे, मोहन जगताप, बाबूराव धाडगे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, शहर महिला अध्यक्षा हिमाली कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोरियन सांस्कृतिक महोत्सवाने जिंकली पुणेकरांची मने

फॅशन शो, के-पॉप, फ्यूजन संगीत व कोरियन खाद्य-संस्कृतीच्या स्टॉलना उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : इंडो-कोरियन सेंटर, किंग सेजोंग इन्स्टिट्यूट पुणे येथे आयोजित कोरियन सांस्कृतिक महोत्सवाला विद्यार्थ्यांसह त्यांचे कुटुंबीय आणि कोरियन संस्कृतीच्या चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. फॅशन शो, के-पॉप, फ्युजन संगीत व कोरियन खाद्य-संस्कृतीचे विविध स्टॉल, चार ऋतूंचे प्रदर्शन आदी उपक्रमांनी पुणेकरांची मने जिंकली.

बालेवाडी येथील इंडो-कोरियन सेंटरचा संपूर्ण परिसर कोरियन रंग, संगीत आणि के-पॉपच्या उत्साहाने रंगून गेला. दक्षिण कोरियाचे मुंबईतील वाणिज्य दूत यु डोंग-वॉन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून भारत–कोरिया सांस्कृतिक नातेसंबंध मजबूत करण्यासाठी संस्थेने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. इंडो-कोरियन सेंटरच्या संचालिका डॉ. एउन्जु लिम, सहसंस्थापक आणि करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे प्रमुख संजीब घटक आदी उपस्थित होते.

स्वागतपर भाषणात डॉ. एउन्जु लिम म्हणाल्या, कोरियाच्या सांस्कृतिक, क्रीडा व पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत २०२३ मध्ये स्थापन झालेल्या इंडो-कोरियन सेंटर या संस्थेत कोरियन भाषेचे प्राथमिक व माध्यम स्तरावरील अभ्यासक्रम तसेच इंटरप्रिटेशन, कोरियन संगीत, कोरियन-थ्रू-मीडिया आणि कामकाजासाठी लागणारा प्रोफेशनल कोरियन असे विशेष अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना कोरियातील उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन आणि करिअर मार्गदर्शनाची सुविधा दिली जाते.

महोत्सवाची सुरुवात सेजोंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांच्या प्रभावी सादरीकरणांनी झाली. इंडो-कोरियन फ्यूजन संगीत, कोरियन काव्यपठण आणि उत्साहवर्धक के-पॉप डान्सने उपस्थितांना कोरियन संस्कृतीची झलक अनुभवायला मिळाली. निवांत, संवादात्मक वातावरणामुळे भेट देणाऱ्यांना कोरियन संस्कृतीशी सहज जुळवून घेता आले.

कल्चरल अ‍ॅक्टिव्हिटी झोन हे महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. स्क्विड गेम-वर आधारित खेळांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. तसेच ‘फोर सीझन्स ऑफ कोरिया’ फोटोबूथ, हान्गूल कॅलिग्राफी, नामसान टॉवरच्या मॉडेलवर रंगीबेरंगी हृदय-लॉक्स टांगणे आणि कोरियन-स्टाइल फेस पेंटिंग अशा उपक्रमांमध्येही भेट देणाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. कोरियन लोकप्रिय स्नॅक्स देणारा फूड काऊंटरही विशेष लोकप्रिय ठरला. यावेळी सत्र-३ चा समारोप समारंभही पार पडला. विद्यार्थ्यांनी आपले अनुभवकथन केले. उत्कृष्ट कामगिरी, उपस्थिती आणि मेहनतीसाठी विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

शेवटी रंगतदार फॅशन शो आणि उत्साहात भर घालणाऱ्या के-पॉप रँडम प्ले डान्सने संपूर्ण वातावरण जल्लोषमय झाले. इंडो-कोरियन सेंटर भाषिक, सांस्कृतिक आणि करिअर-केंद्रित कार्यक्रमांचा विस्तार करत असून, पुण्यातील वाढत्या के-कल्चर समुदायासाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रास्ताविकात संजीब घटक यांनी नमूद केले.

राज्यपाल आचार्य देवव्रत यांची सभापती व उपसभापती यांनी घेतली सदिच्छा भेट

नागपूर, दि. ७ डिसेंबर २०२५ : मुख्यमंत्री यांच्या ‘भारतीय राज्यघटनेच्या गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल’ या विषयावर आधारित वैशिष्ट्यपूर्ण भाषणाचे पुस्तक राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आगामी ९ डिसेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज लोकभवन, नागपूर येथे जाऊन राज्यपालांना प्रदान केले.

सदिच्छा भेटीदरम्यान राज्यकारभार, राज्यातील विकासात्मक उपक्रम, विधिमंडळातील कार्यपद्धती आणि जनकल्याणाशी निगडित विविध विषयांवर सखोल व विधायक चर्चा झाली. राज्यपालांनी लोकशाही संस्थांच्या बळकटीकरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत सभापती व उपसभापती यांच्याशी मार्गदर्शक व सूचनापूर्ण संवाद साधला.

या प्रसंगी सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ आणि शाल अर्पण करून त्यांचा सत्कार केला. तसेच डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भगवान जगन्नाथ यांची प्रतिमा माननीय राज्यपालांना भेट म्हणून प्रदान केली. ही सदिच्छा भेट लोक भवन येथे स्नेहपूर्वक व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.

जागतिक वारसास्थळांवर मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था-प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्यांकडून राज्यसभेत मुद्दा उपस्थित

विशेष ‘हेरिटेज इन्फ्रा पॅकेज’ची मागणी

पुणे: महाराष्ट्रातील युनेस्को मानांकन असलेल्या किल्ल्यांवर, जागतिक वारसास्थळांवर स्वच्छता, पायाभूत सुविधा, माहितीफलक, डिजिटल गाईड यांसारख्या अत्यावश्यक सुविधा नाहीत. येथील मूलभूत सुविधांची दयनीय अवस्था असून, याठिकाणी तातडीने सुधारणांची कामे करावीत. त्यासाठी विशेष ‘हेरिटेज इन्फ्रा पॅकेज’ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सोमवारी राज्यसभेत केली.

सभापतींचे लक्ष वेधताना प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या वारशाचे प्रतीक असलेले महाराष्ट्राचे ११ किल्ले युनेस्कोच्या ४७व्या जागतिक वारसा समितीत समाविष्ट झाले, हे महाराष्ट्रासाठी अभिमानाचे पाऊल आहे. शिवनेरी, राजगड, रायगड अशा इतिहासप्रसिद्ध दुर्गांचा त्यामध्ये समावेश आहे. याआधी अजिंठा-वेरूळ, घारापुरी, तसेच पुण्यातील शनिवारवाडा यांसारख्या ठिकाणांनाही जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे.”

या वारसास्थळांच्या ठिकाणी इतिहास जाणून घेण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मात्र, या सर्व पर्यटनस्थळांवर स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, अस्वच्छता, डिजिटल माहितीचा अभाव, गाईड वा मार्गदर्शकाची अनुपलब्धता, कचऱ्याचे ढीग, प्लास्टिक व आग लागल्याने पर्यावरणाची हानी, दिव्यांगांसाठी सुविधांचा अभाव अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते, असेही त्यांनी नमूद केले.

राजगड किल्ल्यावरच्या त्यांच्या वैयक्तिक अनुभवाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, किल्ल्यावरील स्वच्छतागृह कचऱ्याने भरलेले होते, प्लास्टिकच्या बाटल्या आणि रॅपर्सचे ढीग होते. काही ठिकाणी हा कचरा जाळला जात असल्याने पर्यावरणाला हानी पोहोचते आणि वन्यजीवांनाही धोका निर्माण होतो. महाराणी सईबाईंची समाधी पूर्णपणे दुर्लक्षित आहे, तर संजीवनी माचीसारख्या अद्वितीय वास्तु-संकल्पनांना पुरेसे माहितीफलक नसल्याने पर्यटकांना त्याचे महत्त्व समजत नाही, असे त्यांनी नमूद केले.

रायगड हा महाराष्ट्राचा भावसंपन्न आणि ऐतिहासिक केंद्रबिंदू असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी परिसराचा विस्तार आणि भव्यतेसाठीही विशेष पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील किल्ले, गड-किल्ल्यांचा वारसा हा फक्त प्रदेशाचा नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक ओळखीचा आणि जागतिक प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे तेथील विकासासाठी विशेष पॅकेज आणि हेरिटेज मिशनची मागणीही त्यांनी यावेळी केली.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या प्रमुख मागण्या:

– आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये महाराष्ट्रासाठी ‘हेरिटेज इन्फ्रा अपग्रेडेशन पॅकेज जाहीर करावे

– पुढील ३ महिन्यांत राज्यातील सर्व हेरिटेज स्थळांचे व्यापक सर्वेक्षण करावे

– युनेस्को मानांकन प्राप्त स्थळांवर सुविधा विकसित करण्यासाठी पॅकेज द्यावे

– बेकायदेशीर अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावीत