सेव्ह द चिल्ड्रन व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने मतिमंद व बहुविकलांग मुलांना एक हात मदतीचा
पुणे-गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आयुष्यभर वंचितांसाठी संघर्ष केला त्यामुळे त्यांच्या स्मृतिदिनी मतिमंद आणि बहुविकलांग ह्या खऱ्या अर्थाने वंचित मुलांना दोन महिने पुरेल एवढं किराणा सामान देऊन क्रिएटिव्ह फाउंडेशन व सेव्ह द चिल्ड्रन या संस्थांनी यथोचित श्रद्धांजली अर्पित केली असल्याचे गौरवोदगार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. मुंडे साहेब हे खऱ्या अर्थाने संघर्षयात्री होते असे सांगताना, त्यांनी ओबीसीं ना न्याय मिळवून देण्यासाठी असो किंवा शेतकऱ्यां ना न्याय मिळवून देण्यासाठी असो, ऊसतोड मजु्रांचा प्रश्नासाठी असो किंवा पक्ष संघटनेच्या कार्यविस्ताराचा भाग म्हणून मुंडे साहेबांनी राज्यभर संघर्ष यात्रा काढून न्याय मिळविण्याचा प्रयत्न केला असेही चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.त्यांनी पक्षाच्या युवा आघाडी च्या अध्यक्ष पदापासून, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अश्या विविध पदांना न्याय दिला. राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडले असेही ते म्हणाले.भाजप चे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गोपीनाथरावांना लोकनेता ही उपाधी याच पुण्यात दिल्याची आठवण ही त्यांनी सांगितली.क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक करताना मुंडे साहेबांच्या अकाली निधनाने पक्षाची असेल, ओबीसी समाजाची असेल, महाराष्ट्राची असेल निश्चितच हानी झाली पण माझी कधीही भरून ना येणारी व्यक्तिगत हानी झाली, माझे पितृतुल्य छत्र हरपले असे भावनिक उदगार काढले. साहेबांसोबत राज्यभर चांदा ते बांदा संघर्षयात्रेत प्रवास करताना साहेबांचे मोठेपण अनुभवले असेही खर्डेकर म्हणाले. राज्यात भाजप चे सरकार येईल तेव्हा येईल पण तोपर्यंत महाराष्ट्र सरकार च्या नाकर्तेपणा विरुद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष करणे हीच गोपीनाथ राव मुंडे साहेबांना समर्पक श्रद्धांजली असेल असेही संदीप खर्डेकर म्हणाले. आज चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सावली संस्था,उमेद फाउंडेशन आणि कामायनी संस्थेतील मतिमंद व बहूविकलांग मुलांना किमान दोन महिने पुरेल इतकं धन्य देण्यात आले. तसेच काही दृष्टीहीन विद्यार्थिनींना देखील एक हात मदतीचा देण्यात आला. सावली संस्थेचे वसंत ठकार यांच्या 83 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने चंद्रकांतदादांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वेस्टर्न इंडिया फोर्जिंग चे अरुण जिंदल,शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, शहर सरचिटणीस नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे, स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर, शहर चिटणीस प्रशांत हरसूले, प्रभाग सरचिटणीस बाळासाहेब धनवे, ऍड. प्राची बगाटे,रामदास गावडे,किरण देखणे,मंगलताई शिंदे,संगीताताई शेवडे,श्रीकांत गावडे,भाजप आय टी सेलच्या संयोजिका कल्याणी खर्डेकर,अपर्णाताई लोणारे,सत्यजित जाधव,युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रतीक खर्डेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संदीप खर्डेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक तर सेव्ह द चिल्ड्रन चे समन्वयक हरीश वैद्य यांनी आभार प्रदर्शन केले.