पुणे : पुण्यातील टिळक रोडवर दोन टोळक्यांनी राडा घातला , पुण्यात दिवसाढवळ्या ऐन गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. जोंधळे चौक भागात १० ते १२ जणांच्या दोन टोळक्याने एकमेकांवर हल्ला चढवला होता. तरुणांनी परस्परांवर कोयता आणि दगडाने वार करत मारहाण केल्याचं समोर आलं आहे. पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर काही जण पसार झाले आहेत. या हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.पुण्यातील सिंहगड परिसरातून 6 जण रिक्षातून पुण्याच्या मध्यभागी असलेल्या कुमठेकर रोडवर आले आणि तिथं दहशत मजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते टिळक रोडवर आले आणि तिथं उभे असलेल्या एका नागरिकाला कोयत्याने मारहाण केली. असे एकूण 3 जणांवर हल्ला केला. घटनास्थळी पोलिस पकडण्यासाठी गेले असता एका कर्मचाऱ्याला देखील चावा घेतला आहे. पोलिसांनी आतापर्यंत 5 आरोपींना पकडले आहे, तर काही आरोपी फरार झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेया हल्ल्यामध्ये तिघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आरोपींनी पोलिसांवरही हल्ला केल्याची माहिती आहे. पोलिसांनी जखमी तरुणांना रुग्णालयात दाखल केलं आहे. सपा महाविद्यालयाजवळील टिळक रोडसारख्या गजबजलेल्या परिसरात हा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.घटनेच्या वेळी रस्त्यावर अनेक जण उपस्थित होते, मात्र टोळीतील तरुणांची आक्रमकता पाहून कोणी मध्ये पडण्याची हिंमत केली नाही. बघ्यांनी ही घटना कॅमेरात कैद केल्यानंतर याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. उपस्थितांनी हा प्रकार जवळच्या पोलीस स्थानकात कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी काही जणांना ताब्यात घेतलं, तर जखमींना रुग्णालयात नेलं. मात्र काही आरोपी हातावर तुरी देऊन निसटण्यात यशस्वी ठरले.सर्व प्रकारणाचा तपास विश्रामबाग ठाण्यातील पोलिस निरीक्षक सुनिल माने करत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपी पकडले आहेत. यामध्ये काही आरोपी फरार झाले असल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे.