माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Date:

सोलापूर, दि. ३१: सांगोल्याचे माजी आमदार, माजी मंत्री, शेकापचे जेष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणी येथील मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार सर्वश्री शहाजीबापू पाटील, बबनराव शिंदे, समाधान आवताडे, अनिल बाबर, शेकापचे जयंत पाटील, सचिन कल्याणशेट्टी, प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार सुमनताई पाटील, सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सांगोल्याच्या नगराध्यक्ष राणीताई माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री सर्वश्री अण्णा डांगे, प्रा राम शिंदे, लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार सर्वश्री रामहरी रुपनवर, राजन पाटील, दीपक साळुंखे-पाटील, प्रकाश शेंडगे, नारायण पाटील, बाळाराम पाटील, राजेंद्र देशमुख, दत्तात्रय सावंत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उत्तमराव जानकर आदींनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

गणपतराव देशमुख यांच्या नावे शासकीय योजना – पालकमंत्री भरणे

यावेळी पालकमंत्री श्री. भरणे यांनी बोलताना सांगितले की, गणपतराव देशमुख यांच्या निधनाने संपूर्ण राज्यासह, जिल्ह्याचे नुकसान झाले आहे. सर्वसामान्य नेते आणि सामान्यांचे नेते, अशी ओळख त्यांची होती. तरुण पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी, आदर्श रहावा म्हणून राज्य शासन गणपतराव देशमुख यांच्या नावाने शासकीय योजना सुरू करेल, अशी घोषणा त्यांनी केली.

ज्येष्ठ सुपूत्र पोपट देशमुख, चंद्रकांत देशमुख, नातू डॉ बाबासाहेब आणि अनिकेत देशमुख यांनी गणपतराव देशमुख यांच्या मृतदेहाला भडाग्नी दिला.

त्यांच्या पत्नी रतनबाई देशमुख यांना पालकमंत्री श्री भरणे यांच्या हस्ते तिरंगा ध्वज देण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विजेच्या कामातील एक चूक तीन पिढ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करते – राजेंद्र पवार

महावितरण मध्ये 'लाईनमन दिवस' उत्साहात साजरा पुणे, दि. ५ मार्च,...

पीएम सूर्यघर योजनेच्या जाचक अटीविरोधात महावितरण कार्यालयावर मोर्चा

ग्राहकहित व पर्यावरणासाठी सौरऊर्जेच्या जाचक अटीच्या निषेधार्थ महावितरणवर...

पंतप्रधान आवास योजनेतील सव्वाचार कोटीच्या घोटाळ्यावर मुनगुंटीवार आक्रमक

'तारीख पे तारीख' नको, थेट निलंबन करा! सुधीर मुनगंटीवारांचा...

हुंडाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व जिल्हास्तरावर विशेष पथके तैनात करा- डॉ. गोऱ्हे

बुलढाणा-बाणेर येथील विवाहितांच्या आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी व कठोर...