पाचगणी-रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए रवाईन हॉटेल अखिल भारतीय मानांकन 2लाख रकमेच्या पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत पुरुष गटात प्रणित कुदळे, संदेश कुरळे, मनवीर सिंग रंधवा, अंतरिक्ष मोहनदास यांनी तर, महिला गटात हृदया शहा, गार्गी पवार, कशिश बोटे, यशस्विनी पवार या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राच्या हृदया शहा हिने ब्रेशना खान 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. यशस्विनी पवार हिने लालित्या कल्लुरी रेड्डीचा 3-6, 6-1, 6-1असा तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. गार्गी पवार व कशिश बोटे यांनी साक्षी चुग व एकता इंगळे यांचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.
पुरुष गटात अंतिम पात्रता फेरीत मानवीर सिंग रंधवाने वेंकटेश जाधवचा 6-3, 6-1 असा तर, प्रणित कुदळे याने रोहन तैंवालाचा 6-2, 6-1 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: महिला:
सोनाशी भटनागर वि.वि.पवित्रा रेड्डी 6-2, 6-2;
अनुशा कोंडावत्ती वि.वि.शनाया नाईक 6-2, 6-2;
हृदया शहा वि.वि.ब्रेशना खान 6-3, 6-2;
यशस्विनी पवार वि.वि.लालित्या कल्लुरी रेड्डी 3-6, 6-1, 6-1;
गार्गी पवार वि.वि.साक्षी चुग 6-0, 6-0;
कशिश बोटे वि.वि.एकता इंगळे 6-0, 6-0;
कनिका शिवरामन वि.वि.मोहिनी घुले 6-1 , 6-1;
पुरुष:
मानवीर सिंग रंधवा वि.वि.वेंकटेश जाधव 6-3, 6-1;
प्रणित कुदळे वि.वि.रोहन तैंवाला 6-2, 6-1;
मिहीर औटी वि.वि.वर्धन कारकल 6-3, 6-0;
काफील कडवेकर वि.वि.शिमोन शास्त्री 6-4, 6-4;
संदेश कुरळे वि.वि.पार्थ चिवटे 6-3, 6-3;
अंतरिक्ष मोहनदास वि.वि.कृष्णा अंकम 3-6, 6-2, 7-6(5).