श्चिम भारतातील नाविन्यपूर्ण आणि क्रयशील फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट म्हणून सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट डिझाईनचा बहुमान
पुणे : मिशवा प्रॉडक्शन्सच्या वतीने दिला जाणारा ‘इंडियाज सिग्नेचर ब्रँड’ पुरस्कार सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सूर्यदत्ता कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (एससीएमआयआरटी) आणि सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फाशीं टेक्नॉलॉजी (एसआयएफटी) या महाविद्यालयांना मिळाला आहे. गेली १० वर्षे विद्यार्थी व प्राध्यापकांनी केलेल्या इनोव्हेटिव्ह अँड क्रिएटिव्ह कामाची दाखल घेऊन संस्थेला पश्चिम भारतातील नाविन्यपूर्ण आणि क्रयशील फॅशन डिझाईन इन्स्टिट्यूट म्हणून गौरविण्यात आले.
गोवा येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी व गोव्याचे नगरविकास व कृषीमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण झाले. सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या कुलसचिव नूतन जाधव व ‘एसआयएफटी’च्या प्रा. मोनिका कर्वे यांनी पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कार सोहळ्यावेळी अनेक मोठ्या संस्था, कंपन्या, ब्रँड आणि उद्योजकांना संबंधित श्रेणींमध्ये त्यांच्या कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आले. त्यापैकी जयोति विद्यापीठ, महिला विद्यापीठ, फायटर विंग्स एव्हिएशन अकॅडमी, फिन अकॅडमी ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी, स्मार्ट व्हॅल्यू हेल्थ आणि वेलनेस, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फायर अँड सेफ्टी इंजिनिअरिंग आदी संस्थांना सन्मानित करण्यात आले.
संस्थेच्या दोन महाविद्यालयांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल ‘सूर्यदत्ता’ संस्थेच्या उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सुषमा चोरडिया म्हणाल्या, “संस्थेचे संस्थापक डॉ. संजय चोरडिया यांच्या नेतृत्वात विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्वोत्तम दर्जाचे शिक्षण देऊन गुणवत्तेचे एक मानक बनण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पुणे विद्यापीठाशी संलग्न बीएस्सी इन फँशन डिझाईन, तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्नित डिप्लोमा, अडवान्सड डिप्लोमा आदी कोर्स चालविले जातात. गेल्या १० वर्षात मोठ्या संख्येने विद्यार्थी शिकून बाहेर पडले आहेत. अनेकजण मोठमोठ्या पदावर कार्यरत असून, डिझाइन, चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत.”
प्रा. रेणुका घोसपुरकर व प्रा. मोनिका कर्वे म्हणाल्या, “डिझाईन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत आहोत. त्यासाठी पाठ्यक्रमाबरोबरच प्रात्यक्षिक आणि क्षेत्रभेटीवर भर दिला जातो. ला-क्लासे वार्षिक फॅशन शो, स्पार्क प्रदर्शन घेतले जाते. या दहा वर्षात विविध संकल्पनावर हे उपक्रम झाले आहेत. यंदा खादी संकल्पनेवर आधारित प्रदर्शन व फॅशन शो झाला. या प्रदर्शनात एक हजारपेक्षा अधिक खादीच्या वस्तू विद्यार्थ्यांनी बनवल्या होत्या. त्याची नोंद झाली आहे. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी वाढावी, यासाठी समाजातील अनेक महिलांना प्रशिक्षण दिले जाते.”