पुणे-शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरवरुन मुंबई शहर परिसरात जाणारे दूध आज पुणे -मुंबई द्रुतगतीमार्गावर चक्क झेड सिक्युरीटीमध्ये रवाना झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. केवळ व्हिआयपीना दिली जाणारी सेक्युरीटी जीवनास अत्यंत आवश्यक असलेल्या दूध व भाज्यांना द्यावी लागली आहे.
यामध्ये कोल्हापूर व सांगली परिसरातील गोकुळ व वारणा दुधाचे 27 टँकर 5 पोलीस गाड्या व इतर पोलिसांच्या ताफ्यात मुंबईकडे रवाना झाले. हे दुध दुपारी दोनपर्यंत मुंबई येथे पोहचणार आहे. शेतकरी व इतर संघटनाद्वारे दुध रस्त्यावर ओतले जाऊ नये यासाठी हा पोलिसांचा ताफा गाड्यांसोबत देण्यात आला आहे.संपामुळे केवळ भाजीपालाच नाही तर दुधाचेही दुर्भीक्ष शहर परिसरात जाणवणार आहे. तुर्तास तरी शहरी जनजीवन अत्यंत असुरळीत असे नाही .