महिला युवतींकरिता उद्योजकता परिचय वेबीनार

Date:

पुणे दि. 5:- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम सी ई डी) मार्फत आणि महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन, आयुक्त कार्यालय पुणे यांच्या सहकार्याने महिला, युवतींना पहिल्या पिढीचे यशस्वी उद्योजक बनण्यासाठी ऑनलाईन उद्योजकता परिचय वेबीनार दिनांक ०६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित केलेला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महिला उद्योजकता धोरण आणि महिला उद्योजकता कक्ष या अंतर्गत उद्योजकता परिचय उपक्रम गूगल मीट द्वारे आयोजित केलेला आहे. महिला सक्षमीकरण, महिला सशक्तीकरण आणि महिला उद्योजकता धोरण या उद्देशाने या ऑनलाईन उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.
इच्छुक महिला युवती यांनी आपले संपूर्ण नाव, मो. नं., ईमेल आय डी, प्रस्तावित उद्योग याची माहिती punepomced3@gmail.com या ईमेलवर अथवा ईमेल आय डी नसल्यास व्हॉट्स अप ९४०३०७८७५२ / ९४०३१३१२९२ अथवा एस एम एस ७०४५१७२७३६ / ७४००११०५८० या क्रमांकावर पाठवावी असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र पुणे कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे.
माहिती प्राप्त झाल्यानंतर गूगल मीट लिंक तात्काळ पाठविण्यात येईल. सर्व इच्छुक महिला युवती उमेदवार आणि भावी यशस्वी महिला उद्योजक यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी सौ. भारती सोसे राज्य समन्वयक महिला उद्योजकता विकास कक्ष महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र औरंगाबाद येथे ९४०३६८३१७३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अजित पवार मृत्युप्रकरणी व्हीएसआर कंपनी मालकाची सीआयडीकडून 8 तास चौकशी:अपघाती मृत्यू, हलगर्जीपणा की घातपात ?

पुणे -दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक मृत्यू प्रकरणात...

“चालू” ठेकेदारांना जोरदार झटका: स्थायी समितीचे नवे धोरण

''महापालिकेकडून केली जाणारी कामे दर्जेदार झाली पाहिजेत. पण खूप...

पुणे महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीसाठी पैशाचा घोडेबाजार थांबवा:रमेश चेन्नीथलांकडे तक्रार

पुणे- येथील महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून १ जागा कॉंग्रेसच्या...

अनधिकृत बांधकामांबाबत अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करा:स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

नियमित सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची स्थायी समितीची सूचना ...