Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सिंधू सेवा दलाच्या अध्यक्षपदी अशोक वासवानी, सचिवपदी सचिन तलरेजा, खजिनदारपदी राजेंद्र फेरवानी यांची निवड 

Date:

पुणे : “सिंधी भाषा, संस्कृती आणि परंपरेला समृद्ध वारसा आहे. हा वारसा जतन करून नव्या पिढीला त्याची गोडी लावण्यासाठी त्याचे संवर्धन व्हावे. सिंधू सेवा दलाने गेल्या ३३ वर्षात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. त्यातून कुटुंब, उद्योग, व्यवसाय याबरोबरच सिंधी समाजाचा सेवाभावही तितकाच उल्लेखनीय असल्याचे दिसते,” असे मत ज्येष्ठ समाजसेवक व लेखक डॉ. राम जवाहारानी यांनी व्यक्त केले.

सिंधू सेवा दलाच्या २०२२-२५ या तीन वर्षांच्या  नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या सत्कारावेळी डॉ. राम जवाहारानी बोलत होते. सिंधू सेवा दलाच्या अध्यक्षपदी अशोक वासवानी, उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम पर्यानी, सचिवपदी सचिन तलरेजा, तर खजिनदारपदी राजेंद्र फेरवानी, सहसचिवपदी किरण फेरवानी, सहखजिनदारपदी निलेश फेरवानी तर जनसंपर्क अधिकारी म्हणून देवेंद्र चावला यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून माजी अध्यक्ष डॉ. पीटर दलवानी, मनोहर फेरवानी, सुरेश जेठवानी, दीपक वाधवानी, विजय दासवानी, जय पिंजानी व हरीश पिंजानी यांची निवड झाली.

बोट क्लब येथे झालेल्या कार्यक्रमावेळी सिंधू सेवा दलाच्या वतीने एएनपी केअर फाउंडेशनच्या सहकार्याने ‘ग्लोबल सिंधी’ या मॅट्रीमोनी ऍपचे अनावरण करण्यात आले. सिंधू सेवा दलाचे संस्थापक सदस्य ईश्वर कृपलानी, उद्योजक सुनील अडवाणी, घनश्याम सुखवानी आदी उपस्थित होते. मनोहर फेरवानी, ईश्वर कृपलानी यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुरेश जेठवानी यांनी केले. आभार विजय दासवानी यांनी मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अवैध हुक्का पार्लर चालवणाऱ्या हॉटेल चालकासह 4 जणांवर गुन्हा दाखल

पुणे:साळुंखे विहार रस्त्यावर अवैधरित्या तंबाखुजन्य हुक्का पार्लरचा पर्दाफाश करण्यास...

शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट

शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदतीची ग्वाही नांदेड दि.११ :- देगलूर तालुक्यातील तमलूर...

भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या अभ्यासक्रमांची घोषणा

पुणे :भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजने शैक्षणिक...

मिथक कथेतून वास्तवाचा बोध घ्या :प्रा.अशोक राणा

पुणे :, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या...