डीएसके गप्पांमध्ये मारल्या दिलखुलास गप्पा
पुणे :सुरवाती पासूनच घरातून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे कला क्षेत्रात इथवर पोहचू शकले. नववीत अस्ताला पहिल्यांदा मंतरलेले पाणी हे नाटक करायला मिळाले. तेव्हा पासून नाटकाला सुरवात झाली. तसेच एनएसडी मधून घेतलेल्या शिक्षणामुळे माझा सर्वांगीण विकास झाला. तिथे मला जयदेव हट्टंगडी भेटले व आयुष्याला कलाटणी मिळाली.
मराठी, गुजराथी , तेलगु , जपानी, भाषेतील नाटक व चित्रपट करून रंगभूमी वर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या हरहुनरी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना ऐकण्याची संधी घरकुल लॉन्स येथे आयोजित डीएसके गप्पांमार्फत पुणेकरांना मिळाली.
गांधी चित्रपटा नंतर मला जागतिक दर्जावर प्रसिद्धी मिळाली याच चित्रपटातील सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी बाफ्ता (ब्रिटीश आकादेमी ऑफ टेलिव्हीजन अण्ड आर्ट) पुरस्कार मिळाला. तसेच जितेंद्रचा आईची भूमिका केल्यानंतर पुढे आईच्याच भूमिकेचा ठपका माझ्यावर पडला, चार दिवस सासूचे आणि होणार सून मी या घरची या मालिकांमुळे महाराष्ट्रातील घराघरात त्या पोहोचले असेही त्या यावेळी म्हणाल्या.
.
इयत्ता तिसरी पासून नृत्याला केलेली सुरुवात ते होणार सून मी या घरची पर्यंतचा प्रवास राजेश दामले यांनी आपल्या खुमाकदार शैलीतून प्रेक्षकांसमोर डी एस के गप्पा चा दुसऱ्या पर्वात उलगडला.
