भाजपने गेल्या ५ वर्षात केलेल्या कामाची श्वेतपत्रिका काढा-खा. सुप्रिया सुळे

Date:

पुणे : खासदार सौ.सुप्रियात सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची पुणे महानगरपालिका आयुक्त,उपायुक्त व अधिकाऱ्यांसमवेत शहरातील खड्डे,रस्ते घनकचरा या समस्यांबाबत बैठक पार पडली.
याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की,” पुणे शहरातील मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून स्मार्ट सिटीच्या नावाखाली झालेल्या रस्त्यांची दरवर्षी जर कामे करावी लागत असतील तर कामांच्या दर्जाबाबत निश्चितच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भाजपने गेल्या ५ वर्षात केलेल्या कामाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी यावेळी खा. सुळे यांनीकेली”.

या बैठकीत पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी महापालिका खड्डे व रस्ते खोदाई बाबत करत असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.पुणे शहरातील घनकचरा व्यवस्थापन ही देखील मोठी समस्या असून या समस्येवर उपाय योजना म्हणून पुणे महानगर पालिकेने इंदोर महानगरपालिकेच्या धर्तीवर काही उपाययोजना असून त्या बाबतचे सादरीकरण देखील महानगरपालिका आयुक्त यांनी सादर केले.

यावेळी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेविका अमृता अजित बाबर,ज्येष्ठ नेते अंकुश काकडे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रभाग समितीचे कार्यालय नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे केंद्र व्हावे – सौ. मंजुश्री खर्डेकर.

नगरसेवक व नागरिकांच्या उपस्थितीत वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात अध्यक्ष...

किमान ८ कोटीची उलाढाल असलेले केबलवाले आणि होर्डिंग वाले यांच्यासाठी स्थायी विरोधात लढायला ‘फौज’ तय्यार

कोट्ट्याधीशांच्या व्यवसायाला शिस्त लावून महापालिकेचे उत्पन्न वाढवू पाहणाऱ्या निर्णयांना...

मॅट्रोमोनिअलवरून वधू शोधणाऱ्या इस्त्रोच्या तोतया शास्त्रज्ञाला अटक

पुणे- मॅट्रोमोनिअल वेबसाईटवर फेक प्रोफाईल अकाऊंट बनवून महिलांची फसवणूक...