शक्य आहे तर ‘वर्क फ्रॉम होम’ ची मुभा द्या-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

Date:

पुणे,दि.१६: ‘कोरोना’ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्योजकांनी औद्योगिक घटकांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’ ची मुभा द्यावी, असे आज पुहा एकदा आवाहन विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी केले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत आज डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत कौन्सिल हॉल येथे बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल व संजीव देशमुख, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख आदी उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोना साठी ठोस औषध तयार झाले नसून रुग्णाच्या लक्षणांनुसार त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. जगभरातील बहुतांश देश या विषाणूने बाधित झाले आहेत. या विषाणूच्या प्रतिबंधासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, उद्योग क्षेत्रात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जागतिक आरोग्य संघटना व केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी. कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्येत वाढ होवू नये, यासाठी औद्योगिक संस्थांनी गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित करु नयेत. रुग्णांशी संपर्क येणाऱ्या डॉक्टर व नर्स साठी मास्क वापरणे अत्यावश्यक असून सर्वसामान्य नागरिकांनी खबरदारी म्हणून खोकताना व शिंकताना केवळ रुमालाची घडी नाक व तोंडाजवळ धरावी, असे सांगून डॉ. म्हैसेकर यांनी विलगीकरण, मास्क वापरण्याची व हात धुण्याची शास्त्रोक्त पध्दत, साफसफाई चे महत्त्व, औद्योगिक संस्थांनी करावयाचे प्रयत्न आदी विषयी माहिती दिली.

यावेळी डॉ. व्यंकटेशम, श्री. सुरवसे व डॉ. देशमुख यांनीही मार्गदर्शन केले.
बैठकीला जिल्ह्यातील हिंजवडी, चाकण, रांजणगाव, भोसरी, पिंपरी- चिंचवड आदी औद्योगिक वसाहतींमधील उद्योजक, प्रतिनिधी यांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करु, असे आश्वासन देत विविध प्रश्न उपस्थित केले, त्यास डॉ. म्हैसेकर यांनी सविस्तर उत्तरे दिली.
00000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दिल्ली-टेकऑफ दरम्यान स्विस विमानाला आग :6 जखमी, 4 नवजात बालकांसह 232 प्रवासी होते

नवी दिल्ली-दिल्ली विमानतळावर टेकऑफ करताना स्विस विमानाचे इंजिन निकामी...

भोंदू बागेश्वर मनुस्मृतीचेच आधुनिक व्हर्जन:त्याने स्वतःपासूनच 4 मुले जन्माला घालण्याची सुरुवात करावी, रोहित पवार यांचा टोला

मुंबई--नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी...

बेकायदा होर्डिंग्जने गिळले महापालिकेचे १८७ कोटी तर अधिकृत होर्डिंग्जने देखील दिला ८०० कोटीचा फटका ?

पुणे- महापालिकेच्या हद्दीत गेल्या ७ वर्षापासून बेकायदा १५०० होर्डींग्जने...

महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल, दुरूस्तीचे पूर्वनियोजित कामे आता सकाळच्या सत्रात होणार

मुंबई, दि. २५ एप्रिल २०२६: उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे सध्या वेगात सुरु आहे. मात्र उन्हाचा तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करावेत असे निर्देश मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना शनिवारी (दि. २५) देण्यात आले. महावितरणची प्रामुख्याने पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीजपुरवठा खंडित होणे व वीजसुरक्षेचे धोके टाळण्यासाठी वीज ग्राहकांना पूर्वसूचना देऊन देखभाल व दुरूस्तीचे कामे वीजराज्यभरात सध्या सुरु आहे. साधारणतः मे महिन्याच्या अखेरीस सर्व कामे पूर्णत्वास जातात. मात्र सद्यस्थितीत सकाळी १० ते दुपारी २ किंवा चार वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवत देखभाल व दुरुस्तीचे कामे सुरु आहेत. नागरिकांसाठी ही गैरसोयीची वेळ टाळण्यासाठी यापुढे संबंधित दिवशी व वीजवाहिनीच्या पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीचे काम यापुढे सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करण्याचे निर्देश मुख्यालयाकडून देण्यात आले आहे. महावितरणच्या देखभाल दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे करताना सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे तसेच संबंधित वीजग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे तसेच प्रसिद्धी माध्यमांद्वारे कळविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्तीच्या पूर्वनियोजित कामांमध्ये प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या छोट्या फांद्या तोडणे, तूटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रे, फिडर पिलर, रिंगमेन युनिटचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन व ऑइल टॉपिंग अप, रोहित्राच्या वितरण पेटीची दुरुस्ती, नादुरुस्त लाईटनिंग अरेस्टर बदलणे, वीजखांब व तारांचे मजबुतीकरण, तारांमधील झोल काढणे, गंजलेले किंवा खराब झालेले वीजखांब बदलणे, जुन्या वीजतारा बदलणे, फिडर पिलरची साफसफाई व आवश्यकतेनुसार इन्सूलेशन स्प्रे मारणे, उच्च व लघुदाब वीजतारांना गार्डिंग करणे यासह उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, पॉवर ट्रान्सफॉर्मरची देखभाल व ऑइल टॉपिंग अप अशा व इतर विविध दुरुस्ती कामांसह वीजपुरवठ्याच्या पर्यायी यंत्रणा सज्ज करणे आदी कामे करण्यात येत आहेत.