कोरोनाग्रस्तांना त्रास देणाऱ्या ,बहिष्कृत करणाऱ्यांंवर कडक कारवाई करणार

Date:

 

पुणे,दि.१५: कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये, यासाठी बाधित देशांतून प्रवास करुन आलेल्या तसेच परदेशात प्रवास करुन आलेल्या काही नागरिकांना आपापल्या घरी अलगीकरण करुन ठेवण्यात आले आहे. या नागरिकांना त्यांच्या सोसायटीतील (गृहनिर्माण संस्था) नागरिक, सोसायटीचे चेअरमन, सचिव व सदस्य यांनी विनाकारण त्रास देवू नये, अथवा बहिष्कार टाकू नये. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी तथा पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिले आहेत.त्याचबरोबर  कोरोना ग्रस्तांना त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होणार नाही याची दक्षता घेवून घरातच अलागीकरन कक्ष करून ठेवणे यासाठी अनुमती दिली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरोनाग्रस्त नागरिकांना दिलासा देणाऱ्या सर्व उपाय योजना शासन स्तरावर करण्यात येत आहेत.

चीन, भारत, इटली, दक्षिण कोरिया, श्रीलंका, नेपाळ, जपान, थायलंड, दुबई, अमेरिका, फ्रान्स, इराण, सिंगापूर, मलेशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, स्पेन, डेन्मार्क, पाकिस्तान इत्यादी देशांमध्ये या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात कोरोना या विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. जागतिक आरोग्य संस्थेने या आजारास जागतिक आणीबाणी घोषित केले आहे.

कोरोना विषाणूची लक्षणे मुख्यतः श्वसनसंस्थेशी निगडित आहेत. सर्दी, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे, निमोनिया, काही वेळा मूत्रपिंड निकामी होणे, अशी मुख्यत्वेकरुन लक्षणे आहेत.

कोरोना बाधित देशांतून प्रवास करुन आलेल्या नागरिकांचे स्क्रिनिंग मुंबई, पुण्यासह देशातील २१ विमानतळांवर सुरु करण्यात आले आहे. या स्क्रिनिंग मध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये भरती करण्याची सुविधा पुण्यातील नायडू रुग्णालय व पिंपरी चिंचवड मधील वाय.सी.एम. रुग्णालयात करण्यात आली आहे. विदेशातून प्रवास करुन भारतात दाखल झालेल्या व्यक्ती त्यांच्या घरात अलगीकरण कक्षामध्ये राहत आहेत. या व्यक्ती त्यांच्या घरात राहिल्यामुळे सोसायटी मधील इतर कुटुंबियांना संसर्ग होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेशात म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मिळकतकर देयकांची छपाई बँकेमार्फत; महापालिकेचा लाखो रुपयांचा खर्च वाचणार

पुणे: पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडील देयके, नोटीस व वॉरंट...

हडपसर गाडीतळ उड्डाणपुल दुरुस्तीस ५३.९६ कोटींचा प्रस्ताव; ‘संरचना’ कंपनीला काम देण्याची शिफारस

पुणे : हडपसर गाडीतळ येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी पुणे...

महिलांच्या नावावरील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मिळकतींना मिळकतकरात ५० टक्के सवलतीच्या प्रस्तावाला मान्यता

पुणे: पुणे महापालिका हद्दीतील फक्त महिलांच्या नावावर असलेल्या ५००...